Tuesday, June 14, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

स्वयंपाकघरातले औषध कढीपत्ता

कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे. पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले, त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते. 

कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे. पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले, त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते. कढीपत्त्याचे झाड ब-यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते.

जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो. त्याला ब-याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात आणि झाड मोठे झाले की त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात.

कढीपत्त्याचे आहार आणि औषधी उपयोग

  • कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी वापरतो. प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.. त्यामुळे जेवण रुचकर लागते..
  • जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेगवेगाने नियंत्रणात येतात..
  • कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो, त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून संधव मीठ मिसळून खावीत.
  • कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.
  • मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पानं दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते.
  • कोलेस्टेरॉल वाढले असेल तर कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत.
  • कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत. शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.
  • कर्करोगाने पीडित रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते..अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो.
  • सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.
  • यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.
  • अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.
  • पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि संधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.
  • कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात.

कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.. असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा.. कच्चा चावून खा..आरोग्यप्राप्ती होईलच यात शंका नाही.

Read More »

टेन्शन मत ले यार !!!

जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आजच्या तरुण पिढीने अवलंबलेली धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, ताण दूर करण्यासाठी धूम्रपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणा-या जंकफूड खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण-तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत.

पण, सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. तरुण वयात चोरपावलांनी शरीरात प्रवेश झाल्यामुळे हृदयविकारांमध्ये वाढ झाली आहे.

रक्तदाब जितका अधिक; तितकीच हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक, अशी माहिती मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चेतन भांबुरे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. चेतन भांबुरे म्हणाले, ''छातीत धडधड होणे, सततची डोकेदुखी, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हाता-पायाला बधीरता येणे व चक्कर येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत.

परंतु पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही व लक्षात येते तेव्हा मूत्रिपड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियांवर कायमस्वरूपी दुष्परिणाम झालेले असतात व ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते.

त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो. विशेषत: तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक दिसते. अवघ्या वीस वर्षाच्या मुलालासुद्धा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने कालांतराने याचे रूपांतर हृदयविकारात होत आहे.''

आजची नवीन पिढी तर पूर्णत: डिजिटल मानसिकतेत वाढते आहे. आभासी दुनियेच्या या जगात स्थिर होऊ पाहणा-या आजच्या युवा पिढीमध्ये 'सहनशीलता' फारच अभावाने आढळून येत आहे.

तरुण पिढीमध्ये वाढत असलेल्या उच्च रक्तदाबाविषयी नेरूळ, नवी मुंबई येथील तेरणा सह्याद्री हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजेया मुंढेकर म्हणाले, ''इंटरनेटवरील वेबसाईट्स, गुगलसारखी शोधयंत्रे, फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस, इन्स्टाग्राम, यू-टय़ूब अशी सर्व बाजूंनी माहितीचा पाऊस पाडणारी सोशल मीडिया आता घडलेली घटना व्हीडिओ शूट करून क्षणार्धात जगभर पोहोचवणारे व्हॉट्सअ‍ॅप अशा एक ना अनेक गोष्टी आजच्या तरुण पिढीसमोर हात जोडून उभ्या असल्याने आजचा युवा वर्ग हा जग जिंकल्याच्या अविर्भावात वावरत असतो व अशा वेळी शालेय अथवा महाविद्यालयीन आयुष्यात येणारे अपयश किंवा करिअर /व्यवसायात आलेला चढ-उतार सहजासहजी सहन करण्याची वृती फार कमी झाली असून मानसिक तणावाचे प्रमाण भयंकर वाढीस लागल्यामुळे पंचविशीतली तरुण पिढी उच्च रक्तदाबाला बळी पडत आहे.''

याचबरोबर अधिक पैसे कमवण्याच्या हव्यासातून आज अनेक तरुण-तरुणी कॉल सेंटरचा पर्याय निवडतात; परंतु या कामांमुळे जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलत असल्याने त्याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असून उच्च रक्तदाबाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे, असे मत डॉ. अजेया मुंढेकर यांनी व्यक्त केले. २०२० सालापर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ३० कोटी लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे, अशी माहिती 'जागतिक आरोग्य संघटने'ने नुकतीच जाहीर केली आहे.

Read More »

पूर्ण शलभासन

या आसनात आपण दोन्ही पाय वरती उचलतो आणि थांबतो. म्हणून या आसनास पूर्ण शलभासन असं म्हणतात.

आसन

योगामॅटवर पाठीवर झोपावे. पूर्ण शरीर एका सरळ रेषेत ताठ असावं. दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श केलेले असावे. दोन्ही हात शरीरालगत असावे किंवा दोन्ही हाताचे तळवे मांडय़ांखाली ठेवावेत. हनुवटी जमिनीला लावावी. पूर्ण शरीराला रिलॅक्स करावे.

डोळे बंद करावे आणि अलगदपणे दोन्ही पायांना जेवढे वरती उचलता येईल तेवढे वरती उचलण्याचा प्रयत्न करावा. पाय सरळ आणि ताठ असावेत. गुडघ्यामध्ये वाकवू नये. चित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती असावी. सुरुवातीला पाच हे सहा आकडे मोजावेत. आसनस्थितीत पाय वाकवल्यावर रिलॅक्स व्हावे.

श्वास

  • सुरुवातीच्या स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्यावा.
  • पायांना वरती नेताना तसंच अंतिम स्थितीमध्ये श्वास रोखावा.
  • पायांना खाली आणताना श्वास सोडावा.
  • हे आसन पहिल्यांदा करताना पायांना वरती आणताना श्वास घ्यावा. मग हे आसन करण्यास सोपे जाईल.

वेळ

सुरुवातीस जितका वेळ या आसनात थांबू शकाल तितका वेळ थांबावं. मात्र हे आसन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये.

हे आसन दोन-तीन वेळा तरी करावं.

आसन करताना घ्यायची काळजी

  • हे आसन करताना घाई करू नये. अन्यथा क्रॅम्प येण्याची शक्यता आहे. दोन्ही पायांना वरती उचलताना घाई करू नये. जेवढे पायांना वरती उचलू शकता तितके अगदी आरामदायक उचलावे.
  • तुम्ही त्या पोझिशनमध्ये आरामदायी फिल करणं आवश्यक आहे. तसंच जितका वेळ थांबू शकाल तितकाच वेळ थांबू शकता. पायांना खाली आणताना घाई करू नये. अलगदपणे पायांना खाली आणावे. थोडा वेळ रिलॅक्स व्हावे आणि पुन्हा या आसनाचा सराव करावा.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, कोरोनरी थ्रोम्बायसिस तसंच कमजोर हृदय असेल त्यांनी या आसनाचा सराव करू नये. तसंच पेप्टिक अल्सर, हर्निया, इंटेस्टटिनल टब्र्युक्युलॉसिस अशा व्यक्तींनीही या आसनाचा सराव करू नये.

फायदे

  • या आसनामुळे पोटावर दाब पडल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात. तसंच पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
  • या आसनामुळे पायावरील सूज कमी होते.
  • नियमित सरावामुळे जठर, पित्ताशय आणि मूत्राशय हे अवयव कार्यक्षम आणि सुदृढ बनतात. तसंच आतडय़ाचे इतर विकारही दूर होतात.
  • मूतखडा, मधुमेह, मूत्रावरोध यासारखे आजार बरे होण्यास मदत होते.
  • पोट, मांडय़ा, पाय यांना चांगलाच स्ट्रेच मिळतो. तसंच त्या भागावरील स्नायू मजबूत होतात.

Read More »

वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिर

१४ जून हा दिवस संपूर्ण विश्वात 'जागतिक रक्तदाता दिवस' म्हणून पाळला जातो. जगभरातल्या सर्व देशांमध्ये प्रसूतीच्या वेळी घडून येणारा मातांचा मृत्यूचा दर, रस्ते अपघातात अतिरिक्त झालेला रक्तस्रव, थॅलेसिमिया, रक्तक्षय व रक्ताचा कर्करोग झालेल्या लहान मुलांना शुद्ध आणि सुरक्षित रक्त वेळेत मिळणं किती गरजेचं आहे याबद्दलची जागृती लोकांमध्ये निर्माण करणं हे या दिनाचे उद्दिष्ट आहे.

बोरिवली ते विरार-पालघर येथील नागरिकांसाठी आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविणा-या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने रविवारी१२ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरातून जमा झालेले रक्त हे घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीमध्ये जमा केले.

तसेच या शिबिरासाठी युथ थॅलस्यामिक अलायन्स या सामाजिक संघटनेची मदत घेतली गेली. अनेक गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा वेळी एका व्यक्तीचे रक्तच दुस-या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात, कारण मनुष्याचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही.

कित्येकदा रुग्णाच्या ब्लडग्रुपला मॅचिंग अशा रक्तगटाच्या शोधासाठी नातेवाइकांची वणवण सुरू असते. कारण त्याचाच रक्तगट असणारा रक्तदाता त्यावेळी मिळणं मुश्कील असतं; त्यामुळे एका ब्लड बँकेतून दुस-या ब्लड बँकेत अशी धावपळ सुरू होते. या शिबिरामध्ये ऐच्छिक रक्तदानाची गरज प्रत्येकाला कळून येण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचे प्रबोधन केले गेले.

Read More »

वेदना आर्थरायटिसच्या

वेदना ही खरं तर एक संरक्षणात्मक यंत्रणा असते जी तुमच्या मेंदूला, शरीराला झालेल्या इजेबाबत सूचित करते. वेदना म्हणजे निव्वळ संवेदना नसते तर त्यातून भावनिक परिणामही होत असतात. बहुतांश वेदना या आर्थरायटिसमुळे होतात. आर्थरायटिस म्हणजे संधिवात. हा आजार शरीराच्या सांध्यांना होतो.

वेदना ही खरं तर एक संरक्षणात्मक यंत्रणा असते जी तुमच्या मेंदूला, शरीराला झालेल्या इजेबाबत सूचित करते. वेदना म्हणजे निव्वळ संवेदना नसते तर त्यातून भावनिक परिणामही होत असतात. वेदनेमुळे आपण निराश किंवा बेचैन होतो.

वेदनेमुळे पुढे आपल्याला रात्री नीट झोप लागत नाही, त्यामुळे थकल्यासारखे वाटते आणि अस्वस्थता वाढू लागते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला वेदनेची झळ पोहोचू शकते, विशेषत: हाडे, गुडघे आणि कंबरेचे सांधे.

गुडघे आणि कंबरेत वेदना होण्याचे सर्वसामान्य कारण म्हणजे लिगामेण्टला दुखापत होणे, कार्टलेज फाटणे, टेण्डोनिटिस आणि रनर्स नी. बहुतांश वेदना या आर्थरायटिसमुळे होतात. आर्थरायटिस म्हणजे संधिवात. हा आजार शरीराच्या सांध्यांना होतो. संशोधन अभ्यासानुसार, आर्थरायटिसचे सर्रास आढळणारे प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस (ओए), ऱ्हुमेटॉईड आर्थरायटिस, सोरायटिक आर्थरायटिस आणि गाऊट.

नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना संधिवात इतरांहून लवकर ग्रासतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांवर मोठय़ा प्रमाणावर परिणाम होतो. परिणामी त्यांच्या सक्रिय जीवनशैलीवर मर्यादा पडतात. पुरुष आणि महिला सर्वसाधारणपणे नोकरी सोडून देतात तर विद्यार्थी कॉलेजला जाण्यास नाखूश असतात.

गृहिणी स्वयंपाक बनवू शकत नाहीत आणि नेहमीची घरातली कामेही करू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर जिने चढणे आणि व्यायाम करणे जिकिरीचे बनते. वेदनेची तीव्रता व्यक्तीगणिक वेगवेगळी असते. ती मंद ते मध्यम असू शकते. औषधं तसंच नियमित व्यायामामुळे त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

पेन मॅनेजमेंटमधली सर्वात पहिली पायरी म्हणजे आपल्या वेदनेचे मूळ कळण्यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांची अपॉइंटमेण्ट घेणे. त्याचबरोबर त्यासाठी पेन मॅनेजमेंटचा कोणता मार्ग सर्वाधिक प्रभावी ठरू शकतो याची माहिती करून घेणे. पेन मॅनेजमेण्टचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला अपेक्षित असलेला आराम मिळण्यासाठी योग्य उपचारांचे कॉम्बिनेशन आवश्यक आहे.

जळजळ आणि वेदनांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन आणि डॉक्टरांनी शिफारस केलेली ओव्हर द काऊण्टर औषधे मदत करू शकतील. उपचारांचे इतर शस्त्रक्रियारहित मार्ग म्हणजे- व्यायाम/फिजिओथेरपी, अ‍ॅक्युपंक्चर, ध्यानधारणा, मसाज आणि हळदीसारख्या हर्बल सप्लिमेण्टसचा वापर. शस्त्रक्रियेचा मार्ग म्हणजे टोटल नी रिप्लेसमेण्ट (टीकेआर).

शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाने कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याची साद्यंत माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. गेल्या काही वर्षामध्ये टोटल नी रिप्लेसमेण्ट या शस्त्रक्रियेमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल घडून आले आहेत. पिनलेस कॉम्प्युटर नेव्हिगेशनच्या वापरामुळे गुडघेबदल शस्त्रक्रियेचे निकाल आता अधिक सकारात्मक आणि अचूक येऊ लागले आहेत.

आजच्या काळातल्या सक्रिय रुग्णांची गरज लक्षात घेता, तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत प्रगत असणा-या ऑक्सिडाइज्ड झिर्कोनियम या बेअरिंग घटकाचा यशस्वीरित्या वापर केला जाऊ लागला आहे. ते ३० वर्षापर्यंत (प्रयोगशाळेतल्या चाचणीनुसार) टिकते. अशा प्रगत घटकांमुळे अधिक चांगले काम करणारे आणि दीर्घकाळ टिकणारे इम्प्लाण्ट्स बनवता येऊ लागले आहेत.

त्यामुळे हे अशा लोकांसाठी बनवण्यात आले आहेत ज्यांना आपल्या सक्रिय जीवनशैलीबाबत कोणत्याच प्रकारची तडजोड करायची नाहीय. वेदनेमुळे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागतो, तेव्हा तुम्हाला मदतीची आवश्यकता असते. सातत्याने होणा-या वेदनेकडे दुर्लक्ष करता कामा नये. वेदनेने अधिक गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घ्यावी.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment