Friday, May 24, 2013

कुतूहलाचा खजिना | विकासक तुपाशी,शेतकरी उपाशी

 

कुतूहलाचा खजिना


शाळेला सुट्टी लागली आणि तिचा आनंद घेता घेता एक महिना कसा संपला, हे तुम्हाला कळालंसुद्धा नसेल. हो ना? या सुट्टीत तुम्ही अनेक प्रकारे धम्माल-मस्ती केली असेल, त्यात काही शंकाच नाही. कोणी क्रिकेट, बुद्धिबळ या खेळांचं प्रशिक्षण घेतलं असेल तर कोणी गावाला जाऊन आंबे आणि फणसावर ताव मारला असेल. ही सगळी मज्जा करून झाल्यानंतर आता राहिलेल्या दिवसांत काय करायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुस्तकाचा असा एक खजिना सध्या बाजारात आला आहे. ज्याचं वाचन करून तुम्ही राहिलेली सुट्टी मज्जेत घालवू शकता.
बालसाहित्याची पुस्तकं म्हटली की, आपल्या डोळ्यांसमोर येतात, ती पारंपरिक पद्धतीच्या ससा नि कासवच्या गोष्टी असलेली पुस्तकं ! पण त्याच त्याच प्राणी-पक्ष्यांच्या गोष्टी वाचून तुम्हालाही कंटाळा आला असेल ना? पण आजच्या काळातल्या मुलांना या प्रकारच्या कथा वाचायला येणारा कंटाळा लक्षात घेऊन 'व्यास क्रिएशन' या प्रकाशन संस्थेने नव्या पिढीतील मुलांसाठी बालपुस्तकांचा नवीन खजिना खुला केला आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने लहान मुलांच्या मनात कुतूहल निर्माण करणा-या विषयांची सविस्तर माहिती या पुस्तकांतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ बालकथा न देता चित्रपट, इंटरनेट, खगोलशास्त्र, किल्ले, राजे-महाराजे, बायोगॅस, निसर्गसंगोपन यांसारख्या विषयांची सविस्तर माहिती तुम्हाला समजेल.
या पुस्तकांमध्ये वापरलेली भाषा तुम्हाला अगदी आपलीशी वाटेल अशी आहे. तर गोष्टीच्या विषयाला साजेशा चित्रांचाही समावेश या पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे ही पुस्तकं वाचताना तुम्हाला नक्कीच मज्जा येईल. गंमत म्हणजे, या पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिलेल्या कवितासुद्धा अतिशय वाचनीय आहेत. दोस्तहो, काय मग, या गोष्टींच्या दुनियेत रंगून जायला तुम्ही कधी तयार होताय?

Read More »

आपले भारतरत्न

'भारतरत्न' हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशाची कीर्ती वाढवणा-या व्यक्तीला भारत सरकारकडून या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.
सत्यजित राय
भारतीय चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाणारे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले नाव म्हणजे चित्रपट निर्माते सत्यजित राय. कोलकात्यातील बंगाली कुटूंबात त्यांचा जन्म झाला. कलेच्या ओढीमुळे १९४० साली 'शांती निकेतन'मध्ये ते दाखल झाले.
१९४७ साली आपल्या सहका-यांच्या मदतीने त्यांनी 'कोलकाता फिल्म सोसायटीची' स्थापना केली. याच कंपनीच्या कामानिमित्त लंडनला गेले असताना तेथील नववास्तववादी चित्रपटांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. आपणही असे चित्रपट निर्माण करावेत, या ध्येयाने त्यांना झपाटले.
राय यांनी एकूण ३६ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात लघुपट, माहितीपट यांचाही समावेश आहे. चित्रपट दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी कथालेखन, चित्रपट परीक्षण आणि ग्राफिक्स डिझायनिंगसुद्धा केले आहे. 'पाथेर पांचाली' हा राय यांचा सर्वात पहिला चित्रपट! राय यांनी १९५९ पासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे.
१९८९ साली फ्रान्सचा 'लीजन ऑफ ऑनर' हा सर्वोच्च बहुमानाचा किताब त्यांना देण्यात आला. भारत सरकारने १९७९ साली 'पद्मभूषण' तर १९९२ साली 'भारतरत्न' पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

Read More »

कंगना राणावत

नुकताच प्रदर्शित झालेला 'शुटआउट अ‍ॅट वडाला' हा सिनेमा तुम्ही पाहिलात? केवळ २६ वर्षीय कंगनाने २००६ साली बॉलिवुडमध्ये पदार्पण केले.
नुकताच प्रदर्शित झालेला 'शुटआउट अ‍ॅट वडाला' हा सिनेमा तुम्ही पाहिलात? त्यात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. केवळ २६ वर्षीय कंगनाने २००६ साली बॉलिवुडमध्ये पदार्पण केले.
'फॅशन' या तिच्या चित्रपटासाठी २००८ मध्ये तिला 'सवरेत्कृष्ट सहनायिके' चे 'फिल्मफेअर' आणि 'नॅशनल फिल्म अ‍ॅवॉर्ड'चा पुरस्कार मिळाला. हिमाचल प्रदेशमधल्या 'भांबला' या गावात तिचा जन्म झाला. तिची आई शिक्षिका असून वडील उद्योजक आहेत. देहरादूनमध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती दिल्लीच्या 'एलाइट मॉडेलिंग एजन्सी'मध्ये मॉडेलिंगचे शिक्षण घेण्यासाठी आली.
आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात तिने दिल्लीच्या 'अस्मिता थिएटर ग्रूप'मधून केली. तिने अनेक नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. मुंबईत आल्यानंतर २००५ साली एका कॉफी शॉपमध्ये बसलेली असताना दिग्दर्शक अनुराग बासू यांनी तिला पाहिले आणि 'गँगस्टर' या चित्रपटासाठी तिची निवड केली. हा तिचा पहिला चित्रपट. त्यानंतर तिने 'फॅ शन', 'राज', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'डबल धमाल', 'तनू वेड्स मनू' अशा अनेक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत.

Read More »

रुळांवर धावणारं विमान बुलेट ट्रेन !

सुस्साट, सुपरफास्ट बुलेट ट्रेन.. पण एकदम चिनीमकाव. बीजिंग ते शांघाय झुकझुक झुकझुक नाही, तर सपसप सपसप.
सुस्साट, सुपरफास्ट बुलेट ट्रेन.. पण एकदम चिनीमकाव. बीजिंग ते शांघाय झुकझुक झुकझुक नाही, तर सपसप सपसप. ताशी ३०० कि.मी. वेगाने वारा कापत जाणारी सुपरबुलेट ट्रेन. बीजिंग ते शांघाय अंतर किती आहे माहिताय का? १३१८ कि.मी. म्हणजे साधारणत: आपल्या मुंबईपासून दिल्लीपर्यंतचं अंतर. आणि ही सुपरफास्ट ट्रेन हे अंतर कापते अवघ्या ४ तास ४८ मिनिटांमध्ये. आपल्या राजधानी एक्सप्रेसला मुंबई-दिल्ली या प्रवासासाठी १४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. चीनने त्यांची एवढयाच अंतरावरची दोन मोठी शहरं पाच तासांपेक्षा कमी अंतरावर आणून ठेवली आहेत.
जिंघू हायस्पीड रेल्वे या नावाने चीनमध्ये ओळखली जाणारी ही रेल्वे प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक वेगाने धावणार होती. सुमारे ३८० कि.मी. वेगाने धावण्यासाठी इथले रुळ तयार केले गेले होते. त्या वेगाने बीजिंग-शांघाय हा पल्ला अवघ्या ३ तास ५८ मिनिटांत पार करता आला असता.
मात्र केवळ वेगाचा विक्रम महत्त्वाचा नाही, तर यातल्या प्रवाशांची सुरक्षाही महत्त्वाची. म्हणून रेल्वेचा वेग नंतर ताशी ३२९ कि.मी. इतका उतरवला गेला. तरीही पूर्वी या मार्गावरून धावणा-या रेल्वेपेक्षा निम्म्या वेळेत ही रेल्वे मार्गक्रमण करते.
नानजिंग साऊथ इथे एकच हॉल्ट घेत फास्ट ट्रेन आजही पाच तासांच्या आत हे अंतर कापते. मात्र बाकी पॅसेंजर ट्रेन्सही अनेक स्टेशनं घेत ताशी अडीचशेच्या वेगाने धावतातच. बरं केवळ वेगवानच नाही तर ही ट्रेन अत्यंत आरामदायी आहे. हे रुळांवर धावणारं विमानच जणू. एकूण ९० कंडक्टर, ३१३ क्रू मेंबर या दोन स्टेशनांदरम्यानचा पसारा बघत असतात.
बोहाइ इकॉनॉमिक रिम आणि यांगत्से रिव्हर डेल्टा या दोन विशेष आर्थिक प्रांत जोडणा-या या रेल्वेचं काम १८ एप्रिल २००८ साली सुरू झालं आणि ३० जून २०११ रोजी पहिली हायस्पीड रेल्वे धावलीसुद्धा. इतक्या वेगाने काम पूर्ण करणं केवळ चीनमध्येच शक्य असावं. सुमारे ३२ अब्ज डॉलर्सचा खर्च या रेल्वेमार्गासाठी आला. आजघडीला सव्वादोन लाख प्रवासी दरदिवशी या मार्गावरून प्रवास करतात. गर्दीच्या वेळेस दर पाच मिनिटाने एक ट्रेन जाते.
गमतीचा भाग म्हणजे या मार्गावरचा ८६.५ टक्के भाग एलेव्हेटेड आहे. म्हणजे १,१४० कि.मी. रुळ हे पुलांवरून जाणारे आहेत. एकूण २४४ पुल या मार्गावर आहेत. पण या पुलांची इतर पुलांशी तुलना होऊ शकत नाही. कारण दानयांग-कुनशान हा पूल चक्क १६४ कि.मी. लांबीचा आहे आणि तो जगातला सर्वात लांब पूल समजला जातो. जगातला दुस-या क्रमांकाचा ११४ कि.मी. लांबीचा पूलही याच मार्गावर आहे. एकूण २२ मोठे बोगदे या मार्गात लागतात. एकूणच या सव्वा हजार लांबीच्या ट्रेनचा प्रवास प्रचंड आनंददायी असणार यात शंकाच नको.

Read More »

टीव्हीचे व्यत्यय आणि कुंचल्याची जादू

रस्त्यावरच्या वाहनांनी सोडलेल्या धुरामुळे, प्रदूषणाचा त्रास होतोय? कानात बोळे घाला. लग्न-मुंजीचे मुहूर्त सरले. आता सणावाराचे दिवस सुरू होणार. ढोल-ताशे, कर्कश्श वाद्यवृंद, फटाके यांनी आसमंतातली शांतता भंग पावणार. डोळ्यांना गॉगल लावा. उन्हाच्या तडाख्याने डोळे जळजळतायत. अंग भाजतंय. डोकं तापतंय. नाका-तोंडावर रुमाल बांधा किंवा मास्क लावा!!
काय चाललंय? काय असंबद्ध लिहितोय मी? असं वाटलं तुम्हाला तर त्यात तुमचा अजिबात दोष नाही बरं का!
अहो, पण त्या, सुप्रसिद्ध, चित्रवाणी प्रक्षेपण-तरंग-ग्राहक-तबकडीची, जिला आपण मराठीत, रिसाव्हिंग डिश अँटेना असं म्हणतो. त्याची जाहिरात करणा-या कंपनीच्या संकल्पना-प्रमुखाला तसं वाटतंय ना!! कारण प्रदूषण म्हटलं की मास्क एवढंच शिकवलंय की हो त्याला आणि..!
प्रदूषण अनेकविध प्रकारचं असतं.. ध्वनीचं, वातावरणाचं, पाण्याचं, अगदी मनातल्या विचारांचंसुद्धा प्रदूषण होऊन मनोविकार उत्पन्न होतात. यातल्या बहुधा शेवटच्या प्रकारचे बळी असतात, असल्या (कम)कुवतीचे, 'सर्जनशील'(सर्जन?)संकल्पक!
चित्रवाणी पडद्यावरचं प्रदूषण मुख्यत: दोन प्रकारचं असतं -
- पडदाभर दिसणारं चित्र, मुंग्यासदृश लहानलहान काळ्या पांढऱ्या कणांनी प्रेक्षक त्रस्त होतात. याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक्स 'स्नो' (snow)
- पडद्यावरचं चित्र, आपण एखाद्या, पारदर्शक द्रवरूप पृष्ठभागावर प्रतिबिंबित झाल्यावर जसं दिसेल.. म्हणजे हलक्या लाटांवर स्वार झाल्यासारखं.. तसं इसम आणि प्रेक्षकांच्या कापाळाला आठय़ा पडतात. या प्रकाराला म्हणतात 'हम बार' (Hum bar)
वातावरणातल्या इलेक्ट्रॉनिक्स प्रदूषणामुळे हे दोन्हीही प्रकार घडतात.
या दोन्हीही प्रकारांचा, सर्वसामान्यपणे धूर, धूळ यामुळे होणा-या प्रदूषणाशी दुरान्वयानेही संबंध नाही. त्यामुळे नाक-तोंड झाकणं म्हणजे स्वत:चा श्वास विनाकारण रोखत, बेशुद्धावस्थेला पाचारण करण्यासारखं होणार ना!
पण लक्षात कोण घेतो? सगळंच अर्धवट माहितीच्या आधारावर करायची वाईट खोड लागलेल्या, यशस्वी होण्यासाठी, झटकन पाटय़ा टाकून पटकन चवलीचं व्यसन लागलेल्यांनाच हे प्रताप सुचतात आणि 'इनोद' म्हणजे त्यांचे अधिकारी तर त्यांच्याहून अनभिज्ञ आणि निर्ढावलेले असतात!
मग आपल्याला सचिन, भज्जी, मिलगाच्या अंगावर मास्क फेकणारा आरोग्याधिकारी आणि शेवटी चक्क अभिषेक दिसतात.
या पार्श्वभूमीवर, दारूची जाहिरात, स्वत:च्या कपडय़ांवर करायला नकार देणा-या आयपीएलमधल्या, एका मुस्लीम खेळाडूचं कौतुक करायला हवं!!
रुपाली आणि पूजा, या 'पुढचं पाऊल' मधल्या नणंद-भावजया, दृश्यांकनातून मिळणाऱ्या विरंगुळ्याच्या पळात, 'सोनी', 'कलर्स', 'लाइफ ओके' अशा वाहिन्यांवरच्या 'क्राइम पॅट्रोल', 'क्राइम डायरी', 'सावधान इंडिया', 'इंडिया फाइट्स बॅक', 'शैतान' या किंवा तत्सम मालिका बघत असणार किंवा मालिकेच्या पट(कन)कथा-सं(डेल)वाद लेखकाला, अशा प्रकारच्या क्रूर हत्या-कृत्य वर्णनाचं व्यसन असावं बहुधा.!
नाहीतर एका सासू-सून, छळवाद-मंथरवाद, सूड-कपट-कारस्थान वर्गातल्या, भाबडे प्रेक्षक-प्रिय मालिकेत, नवीन आलेल्या जाऊ-नणंदेला, कपटाने, गुंगीचं औषध पाजून, खून करून, प्रेत कपाटात लपवून, ते सडल्यावर वास येईल म्हणून, भरल्या घरातलं ते वडिलोपार्जित मालमत्तेचा भाग असलेलं कपाट, मजुरांकरवी, वाळवीचं कारण सांगत, आक्कीसमोर बाहेर काढून, भरजरी किनखापाच्या कपडयानिशी, खड्डा खणून पुरायला (हुश्श! हे लिहितानासुद्धा दमलो बुवा..) लागणारी हिंमत आली कुठून, किंवा आणली कोणी त्या दोघीत?
असो.. बघतायत ना प्रेक्षक जिभल्या चाटत..? त्यांचे प्रति कल्याण असो..!!
उदरभरणासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण, काही ना काही नोकरी, व्यवसाय करतच असतो. ते करत असताना काही कुशल-कसबी, हौस म्हणून जोपासलेले छंद, फावल्या वेळात जोजवत, आंजारत-गोंजारत असतात. कधी कधी आजूबाजूला घडणा-या घटनांची नोंद घेताना अशा एखाद्या संवेदनशील मनाला ती टोचत-बोचत राहते, त्याची प्रतिक्रिया 'छंद'बद्ध होते. तसंच काहीसं घडलंय, 'एबीपी माझा'च्या नीलेश खरेच्या बाबतीत!
'आयपीएल'च्या मैदानावरच्या, काही हावरट खेळाडूंनी, सगळं ताळतंत्र सोडत, खिलाडूवृत्तीचा निर्घृण खून, २२ मीटरच्या खेळपट्टीवरच करून, तिथंच, व्यावसायिक शिस्त, नियम, कायदे या सगळ्याच्या रक्तामासांचे तुकडे, किळसवाण्या पद्धतीने चघळत बसलेले पाहिल्यावर, नीलेशचा कुंचला खवळला. त्यातून एक बोलकं अर्कचित्र साकार झालं. या आगळ्यावेगळ्या छंदाविषयी नीलेश म्हणतो, ''व्यंगचित्रकार व्हायचंय म्हणून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. गेली १२ र्वष छंद म्हणून व्यंगचित्र रेखाटतोय. कॉलेजच्या दिवसात अरुण साधू सरांनी व्यंगचित्र काढायला खूप प्रेरणा दिली.''
सामना चालू असताना, पन्नास-साठ छायक, सगळ्या खेळाडूंच्या बारक्यासारक्या हालचाली, खाणाखुणा, निर्देश, संकेत यांची दृश्यनोंद घेत असतात, याची, श्रीसंतसारख्या अनुभवी खेळाडूला जाण नसावी..? पण बरंच झालं, अजाणतेपणामुळेच. सर्व शार्विलिक पकडले गेले की हो..!

Read More »

फॅशन दिग्दर्शनातला 'केदार'

'फॅशन' जगताभोवती एक वेगळंच ग्लॅमर आहे. स्टायलिश कपडे, डिझायनर ज्वेलरी, लाइट्सचा झगमगाट, समोर काहीशी चर्चा करत बसलेले फॅशनचे जाणकार आणि रॅम्पवरून रांगेने चालणारे मॉडेल्स.. ही चित्रं आपल्याला भारावून टाकतात. डोळ्यांना सुखद भासणारी ही सारी किमया एकत्रितरीत्या साकारण्यासाठी उभा असतो, 'फॅशन पडद्यामागचा रिअल हिरो-फॅ शन कोरिओग्राफर'!
 कायमच कुतूहलाचा विषय असलेलं हे फॅशनविश्व आपल्या अधिक परिचयाचं झालं ते चित्रपटांमधून. पण फॅशन म्हटलं की, प्रामुख्याने एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे 'फॅशन-शो'. 'लॅक्मे फॅशन शो', 'न्यूयॉर्क फॅशन विक' असे एक ना अनेक फॅशन-शोज् वर्षभर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. सामान्यत: 'फॅशन इंडस्ट्री' म्हटली की 'फॅशन डिझायनर्स' आणि 'मॉडेल्स' यांच्या पलीकडे सहसा विचार केला जात नाही. पण मॉडेल्सना एका ठरावीक वेगात, पद्धतशीरपणे कसं चालायचं हे सांगण्यासाठी किंवा प्रेक्षकांना पोशाख व्यवस्थित पाहता येईल, अशा रीतीने त्याचं सादरीकरण करून दाखवण्यासाठी या शोज्मागे संपूर्ण विचार असतो तो 'फॅशन कोरिओग्राफर्स'चा. असंच मॉडेल्सच्या 'रॅम्प-वारी'चं दिग्दर्शन करणारं मराठमोळं व्यक्तिमत्त्व म्हणजे 'केदार गावडे'.
केवळ राष्ट्रीय पातळीवरच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा केदारने आपल्या फॅशन दिग्दर्शनाची झलक दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या 'न्यूयॉर्क फॅशन वीक-२०१३' मध्ये दक्षिण आफ्रिकन डिझायनर डेव्हिड लेल याच्याकरिता दिग्दर्शन करणारा केदार हा पहिला भारतीय ठरला आहे. फॅशन दिग्दर्शनाच्या एकूणच अनुभवाबद्दल केदार उत्स्फूर्तपणे बोलतो, 'या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी होणं म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होतं. या वेळी माझ्या कामाची खूप चांगली नोंद घेतली गेली. मलाही काही तांत्रिक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या आणि जोमाने काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली.'
जॉर्जियो अरमानी, एम् टीव्ही, बकार्डी, रोहित बाल, शिवांगी बेस्टसेलर ग्रूप, व्हेरा मोडा अशा अनेक नामांकित ब्रॅण्ड्ससाठी काम करणा-या केदारचं नाव फॅशन जगताला सुपरिचित आहेच. कोणत्याही यशामागे जिद्दीचाच प्रवास असतो, याला केदारही अपवाद नाही. मात्र त्याच्या दूरदृष्टीने भविष्यातील फॅशन दुनियेचा वेध आधीच घेतला होता. तो सांगतो.. 'मी १७ वर्षाचा असतानाच मला या इंडस्ट्रीने आकर्षित केलं. आई-वडिलांना सांगितल्यावर या क्षेत्रात उतरण्यासाठी सुरुवातीला त्यांनी नकारच दर्शवला. पण मला कळून चुकलेलं की येत्या काही वर्षात 'फॅशन'चं क्षेत्र अधिकाधिक बहरत जाणार आहे आणि एखादं कलेक्शन लोकांसमोर आकर्षक पद्धतीने कसं आणावं याविषयीची कल्पकता माझ्याकडे आहे. त्यामुळे मी या क्षेत्रात उतरायचं ठरवलं'.
रॅम्पवरून चालणारे मॉडेल्स, त्यांच्या पावलांच्या साथीला थिरकवणारं संगीत आणि त्याचबरोबरीने नव्या कलेक्शनचं आकर्षक सादरीकरण पाहताना आपण हुरळून जातो. ही सारी किमया एकत्रितरीत्या उभी करणं, डोळ्यांना दिसते तितकी नक्कीच सोपी नसते. त्यातली कल्पकता उलगडून सांगताना केदार सांगतो की, 'आपण कल्पना करुयात की.. २०-३० मॉडेल्स एकामागोमाग चालत येत आहेत आणि ते तसेच नुसते चालत राहिले तर हे सादरीकरण प्रेक्षकांसाठी किती कंटाळवाणं असू शकतं. म्हणूनच फॅशन शो दिग्दर्शित करत असताना त्यात नावीन्य जपावं लागतं.
रॅम्पवरून चालणं हे केवळ वॉक नसून आम्ही त्याला 'फॅशन अ‍ॅक्ट' म्हणतो. 'संगीत' हा या शोचा एक महत्त्वाचा भाग असतो. भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या संगीताचा सुरेख वापर यात केला जातो. शिवाय मॉडेल्सच्या रचनांमध्येही वैविध्य आणण्याचा प्रयत्न असतो. दक्षिण आफ्रिकेच्या शोमध्ये मी नेहमीसारखा एक सरळ रॅम्प न ठेवता 'ग्रीड' बनवलं होतं. ग्रीड संकल्पनेत प्रेक्षकांभोवती मॉडेल्स सादरीकरण करत असल्यामुळे त्यांना सर्व बाजूंनी कलेक्शन पाहायला मिळालं.'
केदार 'सेलिब्रिटी लॉकर' या इव्हेंट आणि टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा संचालक आहे. दक्षिण आफ्रिका अणि भारत या दोन देशांमधील सिनेमा आणि दूरदर्शन क्षेत्रातल्या कलावंतांच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे या देशांना एकत्र आणण्यासाठी यंदा प्रथमच अशा प्रकारचा 'साऊथ अफ्रिका इंडिया फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन अवॉर्ड्स (सैफ्टा)' हा पुरस्कार वितरण सोहळा त्यांच्या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता.
एखाद्या डिझायनरचं कलेक्शन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं दृश्यमाध्यम आहे. त्यामुळे एखादं कलेक्शन तयार करण्यामागे डिझायनरचा काय विचार आहे, हा विचार करून लोकांना ते कलेक्शन जास्तीत जास्त कसं आवडेल, अशा प्रकारे सादर करणं या सर्व बाजू विचारात घ्याव्या लागतात,' असं सांगणारा केदार हा फॅशन विश्वातील मराठमोळा तारा नित्य चमकतच राहील, असा विश्वास वाटतो.

Read More »

खरेदीमंत्र

आताच्या तरुण मंडळीना आकर्षक अश्या अनेक गोष्टींचा सग्रह करण्याचा छंद असतो.
चिरतारुण्य देणारा मल्टिटास्किंग सनब्लॉक
नाजूक त्वचेची रक्षा करणं आता होईल अधिक सोपं आणि सुकर. लोटस हर्बल्स एजिंग क्रीमच्या आधुनिक फॉर्मुल्यामुळे . लोटस हर्बल्स या सौंदर्यप्रसाधन कंपनीने सूर्याच्या अतिनील किरणांशी सामना करण्यासाठी 'एसपीएफ १००+ आणि पीए +++ ' क्षमता असलेलं 'सेफ सन अँटी एजिंग अँटी टॅन अल्ट्रा सनब्लॉक' बाजारात दाखल केलं आहे. हे उत्पादन वापरून आता तुम्ही रणरणत्या उन्हातूनसुद्धा त्वचेची काळजी न करता मन मोकळेपणाने घराबाहेर पाऊल ठेवू शकता, अशी हमी कंपनी देतेय. उत्पादनाविषयी अधिक खात्री देताना कंपनी म्हणते, हे उत्पादन इतकं परिणामकारक आहे की, स्ट्रेच मार्क्स, तारुण्यपिटिका, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं, त्वचा फिकट-पांढरी होणं यांसारख्या त्रासांपासूनसुद्धा दूर ठेवते. त्यासाठी परिणाम करणारा या सनब्लॉकमधील घटक म्हणजे, लिकाँरिस. लिकाँरिस शरीरातील कोलॅजेनची मात्रा घटवते, ज्यामुळे तारुण्यात येणारं वार्धक्याचं प्रमाण कमी होतं. तसंच हा घटक शरीरातील मेलॅनीन निर्मिती कमी करून त्वचेचं काळवंडणं रोखून ठेवतो. किंबहुना ही प्रक्रिया मंदगतीने चालू ठेवतो. म्हणजेच सनब्लॉकबरोबरच त्वचेच्या अनेक विकारांवर उपयुक्त अशी ही क्रीम असल्याचा कंपनीचा दावा आहे.
किंमत : ७४५ रुपये (३० मिली)
 दरवळेल सिनेमॅटिक सुगं
उच्चदर्जाची सुगंधी परफ्युम्स वापरण्याचा छंद आपल्यापैकी अनेकांना असेल. अशा मंडळींसाठी ओरिफेल्म कंपनीला ४५ र्वष पूर्ण झाल्यानिमित्ताने जगप्रसिद्ध हॉलिवुड अभिनेत्री 'डेमी मूर' हिच्या सहकार्याने 'डेमी इयो डी परफ्युम्स' आणि 'डेमी डेओरेसिंग बॉडी डिओ स्प्रे' ही नवी रेंज बाजारात आणली आहे. डेमी इयो डी परफ्युमचा चंदन आणि जाईच्या सुगंध आणि डिओ स्प्रेचा सिनेमॅटिक सुगंध गर्दीतही तुमची वेगळी ओळख जपेल.
किंमत : डेमी इयो डी परफ्युम – २६९० रुपये (५० मिली)
डेमी डेओरेसिंग बॉडी डिओ स्प्रे :  १९८ रुपये (७५ मिली)
 झिप्पोचे 'सिल्क अ‍ॅण्ड स्लिम' लायटर
काही मंडळीना अँटिक, आकर्षक अशा अनेक छोटय़ा-छोटय़ा गोष्टीचा संग्रह करण्याचा छंद असतो. लायटर हीसुद्धा अशीच एक वस्तू आहे, जिचा संग्रह करायला अनेकांना आवडतं. अशाच मंडळींसाठी ही नवीन बातमी! झिप्पो कंपनीने रोजच्या वापरातील ही वस्तू नव्या रंगरूपात बाजारात आणली आहे. 'सिल्क अ‍ॅण्ड स्लिम' हे या लायटरचं खास वैशिष्टय़ म्हणता येतील. संपूर्णपणे धातूने बनवलेल्या या आयताकृती लायटरमुळे तुमच्या लाइफस्टाइलमध्ये नवी भर पडणार आहे. विविध प्रकारच्या ५ उजळ आणि उठावदार रंगसंगतीमध्ये उपलब्ध असणारे हे लायटर तुमच्या मित्रांना भेट देण्यासाठी चांगला पर्याय आहे.

Read More »

चिमणरावाचे जुगाड

अहो, त्या चिमणरावाचे नाही.हे आमच्या चिमणरावाचे जुगाड…..
अहो, त्या चिमणरावाचे नाही हो, हे च-हाट
हे आमच्या चिमणरावाचे जुगाड! हो, हो जुगाडच!!
जुनं झालं ते च-हाट आणि तो चार्लीछाप चिमणराव.
हा आमचा खर्राखुर्रा काळ्या कंठाचा चिमणराव.
तुडतुड टणाट.. एसीच्या वर त्याच्या घरटयाचा खडखडाट.
म्हणून तर जुगाड. पत्र्याआड तीनताड चिमणरावाचे जुगाड.
रस्त्यालगतचा शंकर लेडीज टेलर गेला करीत हिडिसफिडिस
त्याजागी आली कव्‍‌र्हेचर जिम.. ओनली फॉर लेडीज.
त्या वळचणीलाच चिमणरावाने घातला घरटयाचा घाट
पत्र्याआड तीनताड चिमणरावाचे जुगाड
एसीच्या खोक्यावर, पत्र्याच्या खाली सुरू झाला चिवचिवाट
गवताची एक काडी, दोन स्ट्रॉ कोल्ड्रिंक्सचे, पायाभरणीचा लगबगाट
चिमणराव एक दिवस मिस चिऊला घेऊन आला
तुडतुड तुडतुड पत्र्यावरून घरटे जरा फिरवून आला
मिस चिऊ चिवचिवली, पत्रा बघून गुरकावली
एसीचा घरघरोटा ऐकून ऐकून चिरकावली
ऐकून ऐकून ऐकेल तो चिमणराव कसला.
दोन घडी सायंकाळी बायकांचा तो व्यायाम असला.
एरवी एसी लावतो कोण,
घरटे आणि आपण दोन
मिस चिऊ हळुच हसली
चिमणरावाला हलके फसली
पत्र्याआड तीनताड
चिमणरावाचे जुगाड

Read More »

लेमनचा 'अ‍ॅस्पायर ए १' इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेनयुक्त स्मार्टफोन

तांत्रिकदृष्टया उत्तम आणि खिशाला परवडणा-या स्मार्ट फोनच्या शोधात आहात? या दोन्हीची सांगड घालायची असेल तर आता आपल्या पुढे एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे
तांत्रिकदृष्टया उत्तम आणि खिशाला परवडणा-या स्मार्ट फोनच्या शोधात आहात? या दोन्हीची सांगड घालायची असेल तर आता आपल्या पुढे एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. लेमन मोबाइलने इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेनयुक्त स्मार्टफोन 'ए १' बाजारात आणला आहे. आधुनिक तंत्राचा वापर करून तयार केलेल्या 'अ‍ॅस्पायर सिरिज'मधल्या या पहिल्या फोनचं वैशिष्टय़ म्हणजे या फोनच्या स्क्रीनवर लिहून आपल्याला हवी असलेली फाइल, गाणं किंवा इतर काही गोष्टी पटकन सर्च करता येतात. या पेनचा वापर आकर्षक स्केचिंग आणि आर्टवर्क करण्यासाठीही होऊ शकतो. या फोनला इतर स्मार्टफोन्सपेक्षा वेगळे 'क्वर्टी की-पॅड' आहे.
'अ‍ॅस्पायर ए १' हॅण्डसेटसोबत दोन मायक्रोफोनसुद्धा आहेत. या फोनची स्क्रीन ५.३ इंचाची आहे. इतकंच नव्हे, तर ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. २ मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-यांचीही सोय करण्यात आली आहे, ज्याच्या आधारे तुम्ही आकर्षक आणि क्लिअर फोटो काढू शकता. अँड्रॉइड ४.० आयसीएस ओएस हे सॉफ्टवेअर या फोनमध्ये वापरलेलं आहे आणि १ जीबी क्षमतेची रॅम आहे. 'अ‍ॅस्पायर ए १'मध्ये ४ जीबी इंटर्नल मेमरी आहे. जर तुम्हाला अधिक डाटा सेव्ह करण्याची गरज लागली तरी ३२ जीबी एक्सपांडेबल मेमरीचीही सोय या फोनमध्ये उपलब्ध आहे.
२५०० एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये वापरण्यात आली आहे. हा फोन तयार करताना कंपनीने ग्राहकांची सोय लक्षात घेऊन तो अतिशय पातळ म्हणजेच केवळ १० मीमी रुंदीचा बनवलेला आहे. फोन खरेदी करताना त्याच्या फिचर्सबरोबरच 'लूक'लाही महत्त्व देणा-या 'मोबाइलप्रेमीं'ची मागणी लक्षात घेऊन लेमन कंपनीने हा फोन आकर्षक रूपात सादर केला आहे.
किंमत – १५,९९९ रुपये

Read More »

धम्माल 'किड्स कार्निव्हल'चा आनंद लुटा..

सध्या सुट्टयाचा मोसम आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाल्याबरोबर ही सुट्टी 'एन्जॉय' करता यावी, यासाठी दोन दिवसीय 'किड्स कार्निव्हल' आयोजित करण्यात आलं आहे
कुटुंब आणि मुलांचं आरोग्य, अन्नातून त्यांना मिळणारं पोषणमूल्य, त-हेत-हेचे खेळ, शिक्षण आणि शिकण्याच्या पद्धती, शाळा आणि छंद अशा बालपणाशी संबंधित अनेक लहान-सहान गोष्टी आपल्या पाल्याच्या रूपाने प्रत्येक पालक अनुभवतो. मात्र खरोखरंच पालकांनाही त्यांच्या मुलांसोबत पुन्हा एकदा लहानपण अनुभवता आलं तर? तुम्हाला या क्षणाच्या तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या चेह-यावरचा निखळ आनंदाची कल्पना करता येईल? खरं तर कल्पनेच्या पलीकडे सुखद अनुभव देणा-या बालपणीच्या आठवणीत रमण्यापेक्षा हा अनुभव आता प्रत्यक्ष घेता येणार आहे..
सध्या सुट्टयाचा मोसम आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाल्याबरोबर ही सुट्टी 'एन्जॉय' करता यावी, यासाठी दोन दिवसीय 'किड्स कार्निव्हल' आयोजित करण्यात आलं आहे. मुलांशी संबंधित विविध विषयांवर सामूहिक चर्चा, गमती-जमतीतून शिकण्याच्या मजेशीर क्लुप्त्या, पालकांना मार्गदर्शन आणि मुलं व पालकांसाठी काही बोधपर 'थेरपीज' अशा विविध उपक्रमांचा खेळांच्या माध्यमातून या कार्निव्हलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या कार्निव्हलची सुरुवात 'सुपर मॉम डायरिज' या अनोख्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि निवेदन सिनेअभिनेत्री पारिझाद झोराबेन-इराणी हिच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरदिवशी घरासाठी हसतमुखानं कष्ट करणा-या आणि संपूर्ण घराच्या संतुलनाची धुरा समर्थपणे सांभाळणा-या 'आई'ला तिच्यात निर्माण होणा-या भावनांना कशा प्रकारे वाट मोकळी करून द्यायची, यावर सादर होणारा कार्यक्रम हे या 'कार्निव्हल'चं एक खास आकर्षण ठरेल.
उन्हाळी सुट्टी संपायचे दिवस आता हळूहळू जवळ येत चालले आहेत. पण उरलेल्या दिवसातही धम्माल, मजा-मस्ती करणं का सोडायचं? काय मग, सहभागी होणार ना या धम्माल कार्निव्हलमध्ये?
 'स्मोकिंग मिरर प्रायव्हेट लिमिटेड'तर्फे बच्चेकंपनीसाठी 'फुलऑन' धम्माल असणारं हे 'किड्स कार्निव्हल' १ आणि २ जूनला सिडको ग्राउंड्स, सेक्टर १९, सानपाडा, नवी मुंबई इथे होणार आहे. १५ र्वष वयोगटापर्यंतच्या मुलांसह त्यांचे पालकही या 'कार्निव्हल'मध्ये सहभागी होऊ शकतात.

Read More »

टिंकी बनली डॉक्टरीण!

 टिंकी माकडीण सर्कसमध्ये काम करायची. उंच-उंच उडया मारणं, पेटत्या टायरमधून आरपार होणं, कमरेवर हात ठेवून ठुमकत चालणं, अशा गोष्टी करायला तिला भारी आवडायच्या.
 टिंकी माकडीण सर्कसमध्ये काम करायची. उंच-उंच उडया मारणं, पेटत्या टायरमधून आरपार होणं, कमरेवर हात ठेवून ठुमकत चालणं, अशा गोष्टी करायला तिला भारी आवडायच्या. एकदा तिच्या सर्कशीचा तंबू एका नदीकाठी लागला होता. अचानक नदीला मोठा पूर आला आणि त्यात तंबू वाहून गेला. सर्कशीतले सगळे प्राणी आपापला जीव मुठीत धरून पळाले. टिंकी मात्र एका पिंज-यात अडकली होती. डंपू अस्वलाला तिची दया आली. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने तिची सुटका केली. सुटका झाल्यासरशी टिंकी वाट दिसेल तिकडे पळाली. पळता पळता जंगलात आली.
जंगलातलं जीवन टिंकीसाठी अगदीच नवं होतं. केव्हा वाट्टेल तेव्हा उठायचं, कुठं वाट्टेल तिकडे हुंदडायचं. कोणी कोणावर रागावणारं नव्हतं की, कोणी मारणारं! बस्स. फक्त एकचं समस्या होती, ती म्हणजे खाण्याची! तिला सर्कशीत वेळच्या वेळी नेमानं खायला मिळायचं. पोटासाठी कुठली कटकट नव्हती. इथे मात्र स्वत:च्या भोजनाची व्यवस्था स्वत:लाच करावी लागायची. सुरुवातीला टिंकीला त्याचा फार त्रास झाला. तिला झाडाच्या अगदी शेंडयावर चढून कोलांटया उडया मारता येत होत्या. पण तिथली जांभळं किंवा आंबे तोडून खाणं मात्र जमत नव्हतं.
असं असलं तरी तिला एक काम मात्र छानपैकी जमत होतं. तिला स्वच्छ आणि टापटीप राहायला भारी आवडायचं. टिंकीला सर्कशीतल्या शिस्तीची सवय होती. ती रोज सकाळी उठून आपल्या घरादाराची साफसफाई करायची. मग नदीवर जाऊन स्वच्छ घासून-पुसून अंघोळ करायची. रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरायची. तिला पाहून तिच्या शेजारी राहणारी अंची माकडीण चेष्टेने हसत तिची टिंगलटवाळी करायची. अंची आणि तिची तिन्ही पिल्लं दिवसभर घाणीत लोळायची. फळं आणि भाजीपाला न धुता, न साफ करताच खायची. अंघोळीचं तर नावच नव्हतं.
पुरानंतर जंगलातला प्रत्येक प्राणी आजारी पडत होता. अंचीच्या घरातला तर कोणी ना कोणी नेहमी आजारी असायचा. ज्या वेळेला प्रदेशातला दादा?चिंडया वाघ स्वत: आजारी पडला, त्या वेळेला मात्र त्याने शहरातून डॉक्टर गज्जा हत्तीला बोलावून घेतलं. गज्जा हत्तीने जंगलात पाय ठेवताच त्याच्या नाकाला भप्पकन दरुगधीनं भरलेला वास झोंबला. त्याने पटकन रुमाल काढून नाकाला बांधला. जंगलात सगळीकडं घाणीचे साम्राज्य पसरलं होतं. बघावं तिकडे घाणच घाण! या जंगलातले प्राणी घाणीतच झोपायचे. तिथेच खायचे आणि पाणी प्यायचे. गज्जा हत्तीला चालता चालताच उंचबळून येऊ लागलं. रस्त्याच्या कडेला बल्लू?चित्याचा ढाबा होता. तिथे जाऊन गज्जा बसला. बल्लूने त्याला एका भांडयात पाणी दिलं. पण गज्जाने ते साफ नाकारलं. कारण ग्लास धुळीने पार माखला होता तर त्यातलं पाणी हिरवंगार होतं. गज्जानं त्याकडे तिरस्कृत नजरेने पाहत म्हटलं, 'तुम्ही हे असलं पाणी पिता? मग आजारी पडणार तर काय होणार?'
बल्लू चित्याने थोडा वेळ विचार केला, मग म्हणाला, 'हो, समजलं, म्हणजे तुम्हाला टिंकीकडूनच पाणी मागवावं लागेल.' बल्लूच्या बोलावण्यावरून टिंकी आली. येताना तिने एक मोठी वॉटर बॅग आणली होती. टिंकीला स्वच्छ कपडयामध्ये पाहून गज्जा डॉक्टरला आनंद झाला. पहिल्यांदा तिने आपला हात स्वच्छ घुतला मग ग्लास! आणि त्यात गज्जा डॉक्टरला पाणी दिलं. पाणी पिताच डॉक्टरने ओळखलं, पाणी उकळून घेतलं आहे. गज्जा तिच्याकडे पाहत म्हणाला, 'जिथे?टिंकी आहे, तिथे कसला आलाय आजार!'
गज्जा डॉक्टरला ?चिंडया वाघाकडे नेण्यात आलं. चिंडयाला औषध-गोळ्या दिल्यावर गज्जाने घोषणा केली,'आजपासून जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी टिंकी सांगेल तसं वागायचं. टिंकीसारखं स्वच्छ, टापटीप राहिलं की, आजार तुम्हाला कधीच शिवणार नाही.'
आता जंगलातले प्राणी टिंकीजवळ येऊन स्वच्छतेच्या टिप्स घेऊ लागले. सगळ्यात अगोदर तर अंची आली आणि म्हणाली, 'आजपासून तू तुझ्या खाण्या-पिण्याची ?चिंता सोडून दे. बस्स! फक्त आमच्या आरोग्याची काळजी घे. आम्ही तुझी काळजी घेऊ.' त्यानंतर जंगलात कधीच कोणी प्राणी आजारी पडला नाही.

Read More »

प्रगतीपथावर दमदार पावले

गेली चारही वर्षे यूपीए सरकारला अनेक अडचणींना, आव्हानांना, आरोपांना, वादळांना व विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. पण तरीही हे सरकार वादळातल्या दीपस्तंभाप्रमाणे अढळ, अचल व जनतेला अखंड मार्गदर्शन करत राहिले, हे या सरकारचे वैशिष्ट्य होय.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारभाराला चार वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने दिल्लीत झालेल्या वर्धापन दिन सोहळ्याला पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि अन्य अनेक मंत्री आणि आघाडीतील अनेक पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी आघाडी सरकारने केलेल्या विकासकार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेले भाषण हे आत्मविश्वास, देशाला या पुढेही प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार आणि व आगामी निवडणुकीचे आव्हान स्वीकारून ती जिंकण्याची विजिगीषु वृत्ती यांचे दर्शन घडवणारे आहे. गेली चारही वर्षे यूपीए सरकारला अनेक अडचणींना, आव्हानांना, आरोपांना, वादळांना व विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. पण तरीही हे सरकार वादळातल्या दीपस्तंभाप्रमाणे अढळ, अचल व जनतेला अखंड मार्गदर्शन करत राहिले, हे या सरकारचे वैशिष्ट्य होय. यावेळी बोलताना डॉ. सिंग म्हणाले की, आम्ही सुरुवात करण्यापूर्वी पेला पूर्ण रिकामा होता, आता तो भरला जात आहे, हे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ असा की, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारपेक्षा यूपीए सरकारचा कारभार कितीतरी चांगला आहे. हे सांगताना सिंग यांनी केवळ शब्दांचा फुलोरा न फुलवता सरकारने केलेल्या कामांचा ताळेबंदच सादर केला. या ताळेबंदाने यूपीए सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांना व प्रचाराला सिंग यांनी सडेतोड उत्तरही दिले आहे. या सरकारवर भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांवरून तीव्र हल्ले चढवले व हे सरकार भ्रष्ट असल्याचा व भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा प्रचारही केला. विशेषत: टू-जी स्पेक्ट्रम प्रकरणावरून भाजपने सरकारवर हल्ला चढवला. एवढेच नाही तर पंतप्रधान सिंग यांच्यावरही आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण पंतप्रधानांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून या प्रकरणाशी संबंधित मंत्र्यांचे राजीनामेही घेतले व या मंत्र्यांवर खटलेही भरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे हे मंत्री असल्याने आघाडी सरकारला धोका असूनही पंतप्रधानांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले व आपण भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, असे परखडपणे दाखवून दिले. या राजीनाम्याच्या व चौकशी प्रकरणाने आघाडी सरकारमधील द्रमुक पक्ष नाराज झाला व तो सरकारमधून बाहेरही पडला. भाजपने भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे उकरून काढून सरकारला कोंडीत पकडण्याचे सत्र सतत चालूच ठेवले की, जेणेकरून या सरकारची प्रतिमा मलिन होईल आणि अशा प्रतिमा मलिन झालेल्या पक्षाला सत्तेतून सहज बाहेर घालवता येईल. विशेषत: गेल्या वर्षभरात भाजपला सिंग सरकार कोसळेल व मुदतपूर्व निवडणुका जाहीर होतील, अशी आशा होती. पण जंग जंग पछाडूनही भाजपची ही आशा अजूनपर्यंत फलद्रूप झाली नाही. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा भाचा सिंगला हा लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याचे जाहीर झाल्याने पंतप्रधानांनी बन्सल यांचा राजीनामा घेतला तसेच सर्वोच्च न्यायालयात कोळसा खाणीप्रकरणी सादर करायचा चौकशी अहवाल कायदा मंत्र्यांनी पाहून त्यात बदल केल्याचे न्यायालयात सांगण्यात आल्याने व न्यायालयाने शेरे मारल्याने पंतप्रधानांनी कायदा मंत्र्यांचाही राजीनामा घेतला. हे राजीनामे घेऊन पंतपधान सिंग यांनी आपण भ्रष्टाचार व गरव्यवहाराला पाठीशी घालत नसल्याचे स्पष्ट केले. लोकपाल विधेयक काय किंवा भ्रष्टाचाराची प्रकरणे काय, भाजपने या विषयांवरून संसदेत आकाशपातळ एक केले व वेळोवेळी संसदेचे कामकाज ठप्प केले. किंबहुना काही ना काही निमित्ताने भाजपने संसदेचे कामकाज दिवसामागून दिवस बंद ठेवून जनतेचे हे सर्वोच्च व्यासपीठ जणू ओलीसच ठेवले. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपने संसदेत व संसदेबाहेर सरकारविरुद्ध प्रचाराची राळ उडवली. पण हा डाव कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवरच उलटला. या निवडणुकीत काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भर दिला आणि भाजप मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर हल्ला चढवला. परिणामी भाजपचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाला व काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. यूपीए सरकारच्या वर्धापनदिनी घेतलेल्या आढाव्यात सिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचा उल्लेख करून या संबंधात केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. महागाई हा विरोधी पक्षांनी उचललेला आणखी एक विषय. गेली दोन वष्रे महागाई वाढत आहे हे खरे. पण सरकार ही महागाई कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. २०१०-२०११मध्ये ९.५६ असलेला निर्देशांक मार्च २०१३मध्ये ६ टक्क्यांवर आला आहे. यंदा पाऊस चांगला व वेळेवर पडला तर चलनवाढीचा दर आणखी कमी येईल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे व सरकारलाही तशी आशा आहे. सिंग यांनी २०१२-२०१३ मध्ये विकास दर ६ टक्के होता व त्याला जागतिक मंदी कारणीभूत आहे, असे सांगून केंद्रात यूपीए सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास १२व्या पंचवार्षकि योजनेत विकास दर ८ टक्क्यांवर नेण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली आहे. एनडीए सरकारच्या काळात विकास दर ५.७ टक्क्यांच्या पलीकडे गेला नव्हता, हेही सिंग यांनी निदर्शनाला आणले आहे. याच काळात कृषी विकास दर २.४ वरून ३.७ वा पोहोचला आहे. दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांची संख्या कमी झाली असून २००४च्या तुलनेत तिच्यात लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. यूपीए सरकारने जनहिताच्या अनेक योजना सुरू केल्या. कामांचा मोबदला दुप्पट झाला आहे व अन्नधान्यातील अनुदानात त्रिस्तरीय वाढ झाली आहे, हे विशेष होय. कुठल्याही अनुदान योजनेत झारीतले शुक्राचार्य आड येत असतात व ते मधल्यामध्ये लोण्याचा गोळा मटकावत असतात, हे लक्षात घेऊन सरकारने काही दिवसांपूर्वी विविध योजनांत दिली जाणारी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याची व्यवस्था सुरू केली आहे. या योजनेमुळे अनुदान लाभार्थी आता वंचित राहणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेद्वारे ४ कोटी ८० लाख कुटुंबीयांना रोजगार देण्यात आला आहे. दिल्लीत बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांवरील अत्याचारविरोधी कायद्यात बदल करून बलात्कार व खून करणा-याला फाशी देण्याची तरतूद केली. म्हणजे सरकार नेहमी जनतेबरोबर राहिले आहे. पण भाजपने विकासकार्याबाबत नेहमी आडमुठी भूमिका घेतली आहे. यूपीए सरकारची अन्न सुरक्षा विधेयक व भूसंपादन विधेयक ही जनहिताची महत्त्वाकांक्षी विधेयके. पण ती मंजूर करण्यासाठी भाजप व अन्य विरोधी पक्ष सहकार्य देत नाही, असेही पंतप्रधानांनी भाषणात निदर्शनाला आणले आहे. पण कितीही अडचणी आल्या तरी आपले सरकार देशाच्या प्रगतीसाठी दमदार पावले टाकण्यात कसूर करणार नाही, ही पंतप्रधानांची ग्वाही जनतेला विश्वास देणारी आहे.


आयपीएल नावाचा तमाशा


इंडियन प्रिमियर लीगमधील ताज्या स्पॉटफिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचे धोरण बोटचेपेपणाचे असल्याचे कडक ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ओढले. त्याच दिवशी सहारा पुणे वॉरियर्स या सहारा समूहाची मालकी असलेल्या आयपीएल फ्रँचायझीने स्पर्धेतूनच माघार घेणे, हा योगायोग नाही.
Read More »
शिक्षण संस्थांसमोर रॅगिंगचे आव्हान

रॅगिंगला आळा घालण्यासाठी कितीही कठोर नियम, कायदे करण्यात आले असले तरी या विकृतीला लगाम लागलेला नाही. याचे कारण अनेक महाविद्यालयांमध्ये या नियमांची अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे रॅगिंग घेणा-यांना फावते आणि त्यामध्ये निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी जातो. महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशत असते. अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य रॅगिंगने उद्ध्वस्त केले आहे. अलीकडे नेरुळच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिकणा-या नितीन पडळकर या विद्यार्थ्यांने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी रॅगिंगला आळा घालण्याचे मोठे आव्हान शिक्षणसंस्थांना पेलावे लागणार आहे.
महाविद्यालयीन आयुष्य म्हणजे खरेतर प्रत्येक तरुण-तरुणींसाठी एक नजराणा असतो. कारकिर्दीची दिशा तेथेच वळण घेत असते. त्याचप्रमाणे जीवभावाच्या मित्रांची साथही तेथेच मिळत असते. त्यामुळे महाविद्यालयीन दिवसांची प्रत्येक शालेय विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतो. पण, आता ही भावना असली तरी त्याच्याबरोबर रॅगिंगचा ताणही असतो. गेल्या काही वर्षात मान्यताप्राप्त महाविद्यालयातूनही रॅगिंगच्या घटना उघडकीला आल्या आहेत. त्यामुळे तेथे पाऊल ठेवणा-या विद्यार्थ्यांच्या मनात आपल्यावरही रॅगिंग होईल का, अशी भीती असते. त्या मुलांप्रमाणेच त्यांच्या आई-वडिलांनाही संभाव्य रॅगिंगचे मोठे दडपण वाटत असते. ते रोखण्यासाठी कितीही कठोर तरतुदी करण्यात आल्या तरी रॅगिंग करण्याची विकृती थांबलेली नाही. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या महाविद्यालयातील रॅगिंगचे प्रकार उघडकीला येत असतात. अलीकडेच मुंबईतील नेरुळच्या डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग महाविद्यालयात नितीन पडळकर या विद्यार्थ्यांने रॅगिंगला कंटाळून रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. अभ्यासात अतिशय हुशार असणारा नितीन हा इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतून त्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये त्याने दोन विद्यार्थ्यांची नावे लिहिली असून त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे. अभ्यासात अतिशय हुशार असणा-या नितीनने अनेक परीक्षांमध्ये बक्षिसेही पटकावली होती. पण, या रॅगिंगने त्याचा हा प्रवास कायमचा रोखला.
रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी तो केला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकारानंतर गौरव मढवी आणि प्रदीप पाईककर या दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागच्या दीड वर्षापासून हे दोघे नितीनचा मानसिक छळ करत होते. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी असे प्रकार वारंवार का घडतात, याचा विचार करणे आवश्यक आहे. मुळात रॅगिंग करण्याची ही प्रवृत्ती येते कोठून? त्यामागची मानसिकता काय? त्याला कसा आळा घालता येईल, ज्यांच्यावर रॅगिंग झाले त्या विद्यार्थ्यांचे काय? अशा विविध प्रश्नांची या निमित्ताने चर्चा करणे आवश्यक आहे.
रॅगिंग ही एक विकृती असे सरसकट म्हटले जाते. त्यामध्ये पूर्ण तथ्य नाही. ही पूर्णपणे विकृती आहे, असे म्हणता येणार नाही. वास्तविक, वरच्या वर्गातील मुलांनी नव्याने महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा तो प्रकार आहे. त्यामधील सकारात्मक भाग लक्षात घेणे आवश्यक आहे. तथापि, समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेचा कोणताही विचार न करता त्यांची मस्करी करणे आणि त्यातूनच पुढे त्याचा अतिरेक झाला की, तो मानसिक छळ होतो. मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना. साधी बुटाची लेस बांधणे याच्यापासून महाविद्यालयाच्या आवारातील कचरा काढण्यापर्यंत अनेक प्रकारे काम करायला विद्यार्थ्यांना सांगितले जाते आणि हाच छळ होय. विनोद करणे, टर उडवणे अशा प्रकारच्या शाब्दिक चकमकी झाल्या तर काही प्रमाणात ठिक असते. मात्र, त्याचा अतिरेक करणे म्हणजे मानसिक छळच होय.
वरच्या वर्गातील विद्यार्थी आपल्या ज्येष्ठतेचा गरवापर करतात. त्यातूनच महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या मुलांना शारीरिक, मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडतात. या गोष्टींचा अतिरेक होतो तेव्हा त्याची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.
दुस-यावर वर्चस्व गाजवण्याच्या मानसिकतेतून रॅगिंगसारखे प्रकार घडतात. कधीकाळी सुनेच्या भूमिकेत असताना स्वत:ला झालेल्या त्रासाचा वचपा एखादी स्त्री सासूच्या भूमिकेत गेल्यानंतर काढते. तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी होतो.
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयं, शैक्षणिक संस्थांनी कडक नियमांची अंमलबजावणी करायला हवी. अनेकदा असे नियम असले तरीही रॅगिंगवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे अवघड होते. अशा वेळी महाविद्यालयामध्ये नव्याने दाखल होणा-या विद्यार्थ्यांसाठी 'सपोर्ट सिस्टिम' तयार करायला हवी. ज्या ठिकाणी हे विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करू शकतील, अशी यंत्रणा महाविद्यालय व्यवस्थापनानेच निर्माण करायला हवी. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून द्यायला हवी. एखाद्या कमकुवत मनाच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्यास त्याच्या मनात कायमचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. परिणामी त्याचे अभ्यासाकडे आणि इतर उपक्रमांकडेही दुर्लक्ष होते. कधी असे विद्यार्थी आत्महत्येसारखा मार्गही स्वीकारतात. अशा वेळी या विद्यार्थ्यांना समुपदेशनाचा चांगला फायदा होऊ शकतो.
रॅगिंगमुळे झालेल्या नराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने अशी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी.
केवळ नव्याने महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून चालणार नाही तर त्याचबरोबर वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांचेही प्रबोधन व्हायला हवे.
'माझ्यावर कधीतरी रॅगिंग झाले होते म्हणून मीही आता कोणाचे तरी रॅगिंग करणार' हे चक्र त्यातून मोडून काढायला हवे. अर्थातच त्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापनाने पुढाकार घ्यायला हवा. स्वत:चा मोठेपणा किंवा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दुस-यांना त्रास देणे, हा मार्ग असू शकत नाही, हे या मुलांना पटवून सांगायला हवे. महाविद्यालय जीवनात मजा लुटण्याची मानसिकता असली तरी दुस-यांना त्रास देऊन स्वत:ला आनंद मिळू शकत नाही, हे त्यांना समजावून सांगायला हवे. मजा लुटायला हरकत नाही, पण त्याचा अतिरेक नको, हे या तरुणाईला सांगायला हवं.
शिक्षण संस्थांमधून हा प्रकारच नाहीसा व्हावा, यासाठी राज्य सरकारने १९९९मध्ये महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा केला. या कायद्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंगविरोधी कक्ष स्थापन करून सेलमधील सदस्याचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक असणारे फलक महाविद्यालयाच्या दर्शनी भागात चिकटवणे बंधनकारक आहे. आता कायदा अस्तित्वात येऊन अनेक वर्ष झाली. पण, आजही शेकडो महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत असल्याचे दिसत नाही.
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये रॅिगगला प्रतिबंध करणा-या कायद्याअंतर्गत दोषींसाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. रॅगिंग करणा-या आणि करण्यास प्रेरित करणा-यांना दोन वर्षापर्यंत आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच एखाद्याच्या विरोधात रॅगिंगची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रथमदर्शनी संबंधीत दोषी आढळल्यास तात्काळ निलंबन करणे आणि दोष सिद्ध झाल्यास त्याचा संस्थेतून प्रवेश रद्द करणे तसेच अशा विद्यार्थ्यांला दुस-या कोणत्याही शिक्षण संस्थेत पुढील पाच वर्षापर्यंत प्रवेश घेता येत नाही. रॅगिंगसंबंधी तक्रार प्राप्त झाल्यानंतर संस्थेच्या प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यास प्राचार्य, संचालक आणि संबंधीत प्रशासकीय व्यक्तीवरही कारवाई होऊ शकते.


बांधिलकी ना लोकांशी, ना धोरणांशी


'शेठजी आणि भटजीं'चा पक्ष अशी भाजपची ओळख त्याच्या स्थापनेपासूनच आहे. यातील शेठजींबरोबर भाजपचे अजूनही साटेलोटे आहे. ब्राह्मणांनी मात्र पटले तरच भाजप अन्यथा दुसरा पक्ष अशी भूमिका कधीच स्वीकारली आहे. आता नरेंद्र मोदी यांना पुढे करून भाजप केंद्रातील सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मोदी नावाचा 'मसिहा' आपल्याकडे आहे, असा पद्धतशीर प्रचार भाजपने चालवला आहे.
Read More »
दुष्काळाने नेले दुधालाही आवाक्याबाहेर

संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाचा तर राज्यातील तीन चतुर्थाश भागाला भीषण दुष्काळाचा चटका जाणवत आहे. त्यामुळे चारा महागला आहे. पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक शेतक-यांची दुभती जनावरे गुरांच्या छावण्यांमध्य बांधलेली आहेत. तिथे त्यांची व्यवस्था चांगली होत नाही. विशेषत: संकरीत गायींचे तिथे फार हाल होतात. या गायी भरपूर दूध देत असल्या तरी त्या उन्हाला आणि उकाडय़ाबाबत फार संवेदनशील असतात आणि फार वेळ उन्हात बांधल्यास त्यांच्या दुग्धोत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे राज्यातले दुधाचे उत्पादन घटले आहे. परिणामी सर्वच शेती उत्पादनाप्रमाणे दुधाचे दर वाढणेही अपरिहार्य ठरले आहे तसे तर दुधाचे भाव सतत वाढत आलेलेच आहेत. अनेक शेतकरी आणि शहरातले बिगर शेतकरी दुग्धोत्पादक ग्राहकांना थेट दूध विकतात. आता त्याच्या पाठोपाठ सरकारी दरात वाढ झाली आहे. सरकारी दूध योजनांमधून विकल्या जाणा-या टोंड दुधाचा दर २९ रुपयांवरून ३१ रुपये प्रती लीटर असा झाला आहे. म्हशीच्या फुल क्रिम दुधाच्या विक्रीत ३ रुपये वाढ झाली असून ते आता ३७ रुपयांच्या ऐवजी ४० रुपये प्रती लीटर झाले आहे. दुधाच्या दरवाढीच्या या प्रमाणातच शेतक-यांकडून विकत घेतल्या जाणा-या दुधाचे दरसुद्धा वाढवण्यात आले आहे. गायीचे दूध १७ रुपयांवरून साडेअठरा रुपयांवर नेण्यात आले आहे तर म्हशीचे दूध २५ रुपयांवरून साडेसत्तावीस रुपये करण्यात आले आहे. साधारणत: दुधाचे दर वाढले की, शहराचे दुधाचे ग्राहक नाराजी व्यक्त करतात. कारण त्यांचेही जगणे महागाईने असहय़ झालेले आहे. परंतु शेवटी शेतक-यांचेही खर्च वाढत चाललेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढत्या खर्चानुसार दुधाचे दर वाढणे, अपरिहार्य आहे. महाराष्ट्रातला दुधाचा दर सहकारी आणि खासगी दुग्ध व्यावसायिक संस्था मिळून ठरवत असतात. राज्यात सुसंघटीतपणे होणा-या दुग्ध संकलनाचे आणि वितरणाचे प्रमाण दररोज एक कोटी लीटर एवढे आहे. त्यातले ५० लाख लीटर दूध सहकारी संस्थांतर्फे संकलित केले जाते तर उर्वरित ५० लाख लीटर दूध खासगी संस्था संकलित करून वितरण करत असतात. त्यामुळे या संस्था एकत्रित येऊन दुधाचे भाव ठरवतात. सध्या दुष्काळी भागात कडब्याची एक पेंडी किमान १२ ते १५ रुपयांना विकली जात आहे. एखादी दुभती गाय सांभाळायची असेल तर दिवसाकाठी तिला ६० ते ७० रुपयांचा नुसता कडबाच खाऊ घालावा लागतो. त्याशिवाय पशुखाद्य, पेंड, भुसा यांचा खर्च वेगळाच. त्यामुळे शेतकरीसुद्धा दुभती जनावरे सांभाळण्याचा खर्चापायी मेटाकुटीला आलेले आहेत. त्यांना जर आता वाढत्या खर्चानुसार दरवाढ मिळाली नाही तर त्यांची दुग्धोत्पादनातील रुची कमी होईल आणि दुधाचे उत्पादन घटेल. तसे झाल्यानंतर तर दुधाचा दर आणखीनच वाढेल. त्यामुळे आता त्याला दरवाढ दिली पाहिजे ज्यातून तो या व्यवसायात टिकेल.

Read More »

सामान्यांच्या स्वप्नाकडे 'म्हाडा'ची पाठ

वास्तविक पाहता सरकारने म्हाडाची घरे ही 'स्वस्तातील घरे' म्हणून बांधायला सुरुवात केलेली आहे. कारण मुंबईतील घरांच्या किमती सामान्यच काय पण उच्च मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत. तेव्हा सामान्य माणसालाही आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारची मदत हवी असते. म्हणूनच सरकारने म्हाडासारख्या संस्था स्थापन केल्या आहेत. लोकांना अशा योजनांतील घरे स्वस्तात द्यायला सुरुवात केली आहे. ही घरे स्वस्त असतात, असे म्हटले तरीही ती सर्वसामान्य लोकांसाठी महागडीच ठरत आहेत. म्हणून म्हाडाच्या घरांच्या किमतीवर बरीच टीकाही झाली. शेवटी म्हाडाची घरे स्वस्त आहेत, याचा अर्थ ती तुलनात्मकदृष्टय़ा स्वस्त आहेत, असा होतो. म्हणूनच म्हाडाच्या सध्या सुरू असलेल्या योजनेला कितपत प्रतिसाद मिळतो, या विषयी शंका व्यक्त केल्या जात होत्या. परंतु सध्याच्या घरांच्या सोडतीसाठी ब-यापैकी प्रतिसाद मिळालेला आहे. या वर्षीच्या १२४४ घरांसाठी अनामत रकमेसह अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ८८ हजार ९०० अर्ज दाखल झाले. २२ मे ही शेवटची तारीख होती आणि २१ मे च्या सायंकाळपर्यंत ७५ हजार अर्ज आले होते. तसा विचार केल्यास हा प्रतिसाद अल्पच होता. परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे २२ मे रोजी अनामत रकमेसह अर्ज भरणा-यांची घाई सुरू झाली आणि त्यांच्या रांगा लागल्या. शेवटच्या एका दिवसात जवळपास १४ हजार अर्ज आले. आता २६ मेपासून अर्जाची छाननी सुरू होईल आणि २७ रोजी ती संपेल. ३१ मे रोजी वांद्रय़ाच्या रंगशारदा सभागृहात लोकांच्या नावांच्या सोडती काढल्या जातील आणि नशीबवान लोकांची नावे जाहीर होतील. छाननीनंतर बाद वा मान्य होणा-या अर्जाच्या अर्जदारांची नावे आणि सोडतीनंतर घर मिळणा-या अर्जदारांची नावे ऑनलाईन जाहीर केली जाणार आहे. बुधवापर्यंत मिळालेला प्रतिसाद निरनिराळय़ा घरांसाठी निरनिराळा होता. बोरिवली-मागाठाणे भागातील अत्यल्प उत्पन्न गटातील ६२ घरांसाठी ११ हजार अर्ज दाखल झाले होते. त्याचबरोबर पवई-तुंगा भागामध्ये घरे महागडी असल्याची टीका होत होती. पण तिथेसुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणचा प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा आहे, काही ठिकाणचा चांगला आहे. मात्र या सगळय़ा प्रतिसादाचे विश्लेषण नंतर कधी तरी केले जाईल. शेवटी सरकारची कोणतीही योजना ही जनतेसाठी असते आणि ती अधिकाधिक निर्दोष असावी, असा सरकारचा हेतू असतो. मुंबईतील घरांच्या किमती, लोकांची गरज आणि म्हाडासारख्या योजनेतील घरांची संख्या याचा कुठे तरी मेळ घातला गेला पाहिजे. कारण घरांची गरज प्रचंड आहे त्या मानाने म्हाडा असो किंवा अन्य कोणत्याही योजना असो त्यांच्या घरांची संख्या फारच अल्प आहे. सरकार ग्रामीण भागामध्ये आणि 'क' वर्ग नगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये गरिबांसाठी घरकुल योजना राबवते. अशा योजनांतील घरे स्वस्तही असतात आणि अगदी शेतमजुरांनाही परवडतात. उत्तर प्रदेशात मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये बेघर लोकांसाठी २८० चौ. फुटाचा भूखंड कमी दरात देऊन घरांच्या बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न केला होता. तसा प्रयत्न महाराष्ट्रातसुद्धा होण्याची गरज आहे. त्याशिवाय घरांचा प्रश्न सुटणार नाही.

Read More »

कॉर्पोरेट खलनायक

कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वच कारभार पारदर्शी नसला तरी सामान्य स्तरापासून वरिष्ठ स्तरावर काम करणा-या प्रत्येकाला नियमांचे लिखित आणि अलिखित करार पाळावेच लागतात. यात अघोषित नैतिकतेचाही समावेश असतो. कंपनीच्या प्रतिमेला बाधक होईल, अशी कोणतीही चूक कंपनीसाठी आणि कर्मचा-यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा चुकींच्या यादीत लैंगिक छळाचाही समावेश आहे. इन्फोसिसचे नाव आणि व्यवसाय अमेरिकेसह जगभर वाढवणा-या आणि आय-गेट या तोटय़ातील आउटसोर्सिग कंपनीला पुन्हा फायद्यात आणून नावारूपाला आणणा-या फनीश मूर्तीनी मात्र ही चूक दुस-यांदा करून आपली कॉपरेरेट बॉस म्हणून कारकीर्दच संपवली आहे. बंगलोरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या फनीश यांनी मद्रास आयआयटीमधून बी-टेक पूर्ण केल्यावर अहमदाबादमधील 'आयआयएम'मधून व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले. इन्फोसिसमध्ये कंपनीचे जागतिक विक्रीप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी इन्फोसिसचा जगभरातील व्यवसाय ९० कोटींवरून ७ अब्जावर नेला. स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी इन्फोसिसमधील आपली कारकीर्द वाढवत नेली आणि त्यांच्या वाढीला नारायण मूर्ती आणि नंदन निलेकणी यांनीही सतत प्रोत्साहन दिले. २०००मध्ये त्यांना इन्फोसिसचे अध्यक्ष आणि इन्फोसिस बीपीओचे प्रमुख बनवण्यात आले. मात्र, २००२मध्ये बल्गेरियन-अमेरिकन सचिव, रेका मॅक्सिमोव्हीच हिने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि नारायण मूर्तीनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. या प्रकरणाने नारायण मूर्ती यांना प्रचंड धक्का बसला होता. नारायण मूर्ती यांच्याबरोबर समोरासमोर झालेल्या बैठकीत फनीश अक्षरश: लहान मुलासारखे रडल्याचे सांगण्यात येते. रेकाचे प्रकरण इन्फोसिसने सुमारे १३ कोटी ५० लाख मोजून न्यायालयाबाहेर मिटवले. त्यानंतर फनीश यांनी माहिती तंत्रज्ञानामध्ये सेवा देणारी नवी कंपनी स्थापन केली आणि ती नावारूपाला आणली. ही कंपनी अमेरिकास्थित आय-गेट या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने विकत घेतली. आय-गेटच्या संचालक मंडळाने मूर्ती यांना तोटय़ात असलेल्या कंपनीचे अध्यक्ष बनवले. मूर्ती यांनी कंपनीच्या रचनेत मोठे फेरबदल घडवत अमेरिका आणि भारतातील दिग्गज माहिती तंत्रज्ञान कंपनींशी दोन हात करून आय-गेट एक जागतिक ब्रँड म्हणून नावारूपाला आणला. आय-गेटमध्ये असताना भारतातील पटनी कंप्युटर सिस्टिम ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी २००८मध्ये विकत घेतली. आउटसोर्सिग क्षेत्रातील हा अत्यंत धाडसी निर्णय होता. मूर्ती हे क्रेडिट कार्डने फेरारी विकत घेत आहेत, अशी टीका त्यांच्यावर झाली. मंदीच्या काळात मोठी रक्कम मोजून पटनीची केलेली खरेदी अनेकांना रुचली नाही. त्यातच दोन दिवसांपूर्वी अरॅसेली रोझ या महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि फनीश यांची चौकशी करून रितसर हकालपट्टी करण्यात आली. खंडणी उकळण्यासाठी माझ्यावर हे आरोप होत असून मी कंपनीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. २००२मध्ये रेका या महिलेची जी वकील होती तीच वकील आता रोझ यांची केस लढवत असून हा निव्वळ खंडणी उकळण्याचा प्रकार आहे. तसेच आपल्या लैंगिक संबंधाबाबत कंपनीला माहिती दिली होती, असा दावा मूर्ती यांनी केला आहे. मात्र, आपल्याला अशी माहिती मूर्ती यांनी दिली नव्हती, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. हे खरे असेलही. मात्र, आपण फनीश यांच्याकडून गदोदर असल्याचा दावा या महिलेने केला असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत असल्याचे म्हटले आहे, त्याचे काय? इन्फोसिसमध्ये लागलेला डाग धुवून काढण्याची संधी त्यांना मिळाली होती. मात्र, ही संधीही त्यांनी गमावली.

Read More »

रिव्हर्स स्विंग, २४ मे २०१३

जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २४ मे रोजी घडलेल्या रंजक घडामोडी
१८७७
प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातली नीचांकी धावसंख्या या दिवशी नोंदवली गेली. एमसीसीविरुद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाचा संघ ऑक्सफर्डच्याच मैदानावर अवघ्या १२ धावांमध्ये उखडला गेला. या 'विक्रमा'शी बरोबरी नॉरदॅम्प्टनशायरने ३० वर्षानंतर केली.

१९००
लँकेशायरचे जॉमी ब्रिग्ज यांनी वुर्स्टरशायरविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे एका डावात ५५ धावांमध्ये १० विकेट्स घेतल्या. अशी कामगिरी लँकेशायरकडून करणारे ते पहिलेच.

१९२३
आणखी एकदा दहा विकेट्स. यावेळी वॉर्विकशायरतर्फे हॅरी हॉवेल यांनी ही कामगिरी केली. त्यांनी बलाढय़ यॉर्कशायरविरुद्ध ५१ धावांत १० विकेट्स घेतल्या, त्या एजबॅस्टन येथे.

१९३३
भारताचे माजी कसोटीपटू हेमचंद्र तुकाराम दाणी यांचा जन्म. मूळचे सोलापूरचे असलेल्या दाणी यांच्या वाटय़ाला एकमेव कसोटी आली. १९५२ मध्ये ब्रेबर्न स्टेडियमवर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत त्यांचा समावेश होता.

१९४२
दक्षिण आफ्रिकी क्रिकेटचे 'गॉडफादर' डॉ. अ‍ॅली बाकर यांचा जन्म. ते तिस-या क्रमांकावर खेळणारे उत्तम फलंदाज होतेच, शिवाय कर्णधार म्हणूनही त्यांनी एक मालिका गाजवली. १९६९-७०मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील संघानेच ऑस्ट्रेलियाला ४-० असा 'व्हाइटवॉश' दिला होता. हा संघ क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो. ते १२ कसोटी सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेट जगताने टाकलेल्या बहिष्काराचा फटका त्यांनाही बसला. बाकर यांनी नंतर एक क्रिकेट प्रशासक म्हणूनही ठसा उमटवला. त्यांनी अनेक बंडखोर दौरे आयोजित केले. पण त्याचबरोबर गौरेतर वसाहतींमध्ये क्रिकेट कोचिंगचे उपक्रमही राबवले. १९९१ ते २००० या काळात त्यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची जबाबदारी समर्थपणे हाताळली.

१९८८
इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका ३-० अशी जिंकली. त्यापूर्वी तीन वर्षात त्यांनी दोन कसोटी मालिकांमध्ये वेस्ट इंडिजकडून ०-५ असा मार खाल्ला होता. या वनडे मालिकेनंतर होणा-या कसोटी मालिकेत पुन्हा ०-४ अशी नामुष्की त्यांना पत्करावी लागली. या पार्श्वभूमीवर ३-० हा विजय नक्कीच सुखावह होता.

२००९
आयपीएल-२मध्ये डेक्कन चार्जर्सनी बंगळूरु रॉयल चॅलेजर्सना हरवून अजिंक्यपद पटकवले. आधीच्या हंगामात हेच दोन संघ तळाला राहिले होते हे विशेष.

Read More »

भूगोलावर ठिगळ!

गोंधळ सुरू आहे.. परीक्षेचा, अभ्यासक्रमाचा, पेपरफुटीचा, कॉपी बहाद्दरांचा, पटसंख्येचा आणि आता पाठ्यपुस्तकातील चुकांचा.. हा गोंधळ दरवर्षी नित्यनेमाने आमची पाठराखण करतो. ऋतुमानानुसार या गोंधळाचे स्वरूप बदलते. पाठ्यपुस्तकात कधी फोटो उलटे छापले जातात, कधी संदर्भ बदलतात, कधी पुस्तकातली पानेच्या पाने गायब असतात. अलीकडेच दहावीच्या भूगोलाचे पाठ्यपुस्तक आले आणि भारताच्या नकाशातून अरुणाचल गायब झाले. आता त्या नकाशावर स्टिकर लावण्याचे कंत्राट दिले जाईल. झालेल्या चुका पुसण्यासाठी कोट्यवधीचा खर्च होईल. हा खर्च कुणाच्या खिशातून कुणाच्या खिशात जाईल? याचा हिशेब कोण देईल?
शिक्षण खात्याचा व्याप आणि गोतावळाही मोठा आहे. त्यामुळेच जराही काही गडबड झाली की ताप वाढतो. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा, समाज, अभ्यासक आणि त्या-त्या विषयातील तज्ज्ञांची या विभागावर बारीक नजर असते. त्यामुळे हे नाते डोळ्यांत तेल घालून जपण्याचे महत्त्वाचे काम राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला करावे लागते. या खात्यातील घडामोडी वर्षभर सुरू असतात. त्या कुठलेही विघ्न न येता पार पाडणे म्हणजे तारेवरची कसरत असते. ही कसरत करता करताच अनेक घोडचुका होतात आणि शिक्षण खात्याला अवाढव्य व्याप पेलताना झालेली चूक तापदायक ठरते आणि संतापाची लाट तीव्र होते.
गेल्या आठवडय़ात दहावीच्या भूगोलाचे नवे पुस्तक आले. त्यात भारताच्या नकाशातून अरुणाचल प्रदेश गायब केले. हा विषय संवेदनशील झाला. आता वेगवेगळ्या पातळ्यांवर त्या चुकांची चौकशी करणे, त्याची कारणे शोधणे, कुणाला तरी निलंबित करणे, नवी पुस्तके छापणे, स्टिकर लावणे अशी नियोजनात नसलेली कामे शिक्षण मंडळाला करावी लागणार आहेत. पाठ्यपुस्तकात चुका होणे नवे नाही. त्या चुकांचे स्वरूप बदलले इतकेच. अगदी दरवर्षी लहान-मोठ्या चुका पाचवीलाच पुजलेल्या असतात. तरीही आम्ही काहीच बोध घेतलेला नाही, हे जास्त गंभीर आहे. अनुभवाने माणूस शहाणा होतो, असे म्हटले जाते. यापूर्वीच्या चुकांमधून मंडळाने कुठलाच बोध घेतला नसेल, शहाणपण आले नसेल तर हा पुनर्मुद्रणाचा, स्टिकर लावण्याचा प्रपंच वारंवार, सदासर्वकाळ सांभाळावा लागणार आहे, हे विसरून चालणार नाही.
असे प्रकार झाले की त्यामागचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. शंका-कुशंकांची गर्दी होते. विश्वास-अविश्वासाचे ढग जमतात. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. चुका करण्यातही खिसे भरून घेण्याचा डाव असेल, अशी शंका व्यक्त करण्यात येते. या आरोपातील खरे-खोटेपणा काहीही असो, पण समाजमनात अशी शंका घर करणे, हे शासनाच्या कुठल्याही खात्याच्या हिताचे नाही. त्यासाठी या खात्याशी संबंधित कारभा-यांनी या चुका होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. समाजमनातील शंकांचे ढग दूर करून, झालेल्या चुका फक्त अनवधानानेच झाल्या हे सांगून स्वच्छता सिद्ध केली पाहिजे. समाजमनाने केलेल्या आरोपात तथ्य असेल, तर ती कीड समूळ नष्ट करण्याचे उपाय शोधले पाहिजेत.
'भारत व सभोवतालची राष्ट्रे' या नकाशाचा आकार लहान करताना 'अरुणाचल प्रदेश'चे स्थान दर्शवताना चूक झाली असल्याचे नकाशाकार आणि अभ्यास मंडळाने मान्य केले आहे. त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. ही चूक मान्य करणे म्हणजे आपण बेजबाबदार आहोत, हेच अधोरेखित करणे होय. त्या चुकीची भरपाई त्यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीने भरून निघत नाही. त्यांच्या चुकीमुळे संपूर्ण यंत्रणा नापास ठरते. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यासक्रम देणारे अभ्यास मंडळच नापास ठरत असेल, तर ही संपूर्ण यंत्रणाच तपासून पाहिली पाहिजे.
पाठ्यपुस्तक हे अध्ययन आणि अध्यापनाचा महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या विषयांची पाठ्यपुस्तके तयार करताना त्या-त्या विषयातील तज्ज्ञ त्यावर काम करत असतात. त्या तज्ज्ञ समितीने संबंधित पुस्तक मुद्रित होण्यापूर्वी तपासले पाहिजे, ही साधी अपेक्षा करणे गैर नाही. पण त्यांना ते तपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल, इतर कामांसोबतच हे काम दिले जात असेल, एखाद्या विषयाचे तज्ज्ञच मिळत नसतील, त्यामुळे अशा चुका होत असतील, तर ही कारणे गृहीत धरून, त्यावर विचार होणे गरजेचे आहे. चूक झाली म्हणून सरसकट निलंबनाची कारवाई करून फाइल बंद करणे भविष्यासाठी हिताचे ठरणार नाही. त्या चुकांमागची पाळेमुळे शोधून कोट्यवधीचा अतिरिक्त खर्च शासनाच्या उरावर आला, तो जनसामान्यांच्या खिशातूनच जाणार आहे. ते पैसे खाण्यासाठी जाणीवपूर्वक कोणी केले असेल, तर त्यांचाही शोध घेतलाच पाहिजे.
शिक्षण विभागाला पाठ्यपुस्तकात झालेल्या चुकाच नव्हे तर अनेक समस्यांना सामोरे जायचे आहे. १७ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. बोगस पटसंख्या दाखवून शाळा चालवणा-या संस्थांवर नजर ठेवायची आहे. शाळेसाठी लागणा-या निकषांची पूर्तता न करणा-यांचा शोध घ्यायचा आहे. उपनगरांमधील असंख्य नवीन शाळा गृहसंकुलामध्ये सुरू झाल्या आहेत. त्यांनी सारे नियम धाब्यावर बसवले आहेत. हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याचाही शोध घेतला पाहिजे. आपली तपासयंत्रणा कामाला लावून ज्ञानदानाचे काम इमाने-इतबारे होत आहे की नाही, याची काळजीही वाहणे गरजेचे आहे. असा असंख्य कामांचा पसारा शिक्षणखात्याला वाहायचा आहे. शिक्षकांवरील शाळाबाह्यकामाचा ताण संपला आहे. आता त्यांना फक्त आणि फक्त विद्यादानावर लक्ष केंद्रित करायचे आहे. ही कामे कमी झाली, त्यामुळे शिक्षण खात्याची जबाबदारी वाढली आहे. त्याचा परिणाम शिक्षणाच्या एकूणच गुणवत्तेवर होणे गरजेचे आहे.
स्वप्न ई-पाठ्यपुस्तकांचे!
पाठ्यपुस्तके छापणे, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणे यावर ई-पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे, हा एक महत्त्वाकांक्षी उपाय आहे. त्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एका क्लिकवर मिळणारे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे कमी करेल. एवढेच नव्हे तर ते एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. त्याविषयी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे. उच्चशिक्षण, पदवी शिक्षण, माध्यमिक, प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक अशा क्रमाने ही ई-पाठ्यपुस्तके शिक्षणक्रांती घडवणार आहे. पाठ्यपुस्तकासाठी मोठ्या प्रमाणात लागणा-या कागदाची बचत या क्रांतीने होणार आहे. हे स्वप्न न राहता, या उपक्रमाला प्राधान्य देऊन गतिशील करणे गरजेचे आहे.

Read More »

मध्य रेल्वे रखडली

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर स्थानकादरम्यान पेंटोग्राफ तूटल्याने शुक्रवारी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबई – सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर स्थानकादरम्यान पेंटोग्राफ तूटल्याने शुक्रवारी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सीएसटीहून कर्जतकडे जाणारी तसेच कर्जतहून सीएसटीकडे येणा-या अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्या अर्ध्या तास उशिराने धावत होत्या.
त्याशिवाय मुंबईहून पुण्याकडे जाणा-या चाकरमानी लोकांनाही याचा फटका बसला. कारण पुण्याकडे जाणा-या सर्वच एक्सप्रेस गाड्या खोळबल्यामुळे कामावर जाणा-या चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला. डोंबिवली स्थानकातही इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्याने प्रवाश्यांना सकाळच्या वेळी स्थानकातच थांबावे लागत होते. दरम्यान, इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्याची सुचना देण्यात येत होती.

Read More »

आयसीसीने केले अंपायरलाच 'आऊट'

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्याने पाकिस्तानचे पंच असद रौफ यांचे नाव आल्याने आयसीसीने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून रौफ यांना डच्चू दिला आहे.
मुंबई – स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्याने पाकिस्तानचे पंच असद रौफ यांचे नाव आल्याने आयसीसीने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून रौफ यांना डच्चू दिला आहे. मुंबई पोलिसांकडून रौफ यांची चौकशीही सुरु झाली आहे.
आयसीसीने जारी केलेल्या पत्रकानुसार, मिडियाने बुधवारी स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचे पंच असद रौफ यांचा समावेश असल्याचे म्हटले होते. त्यानुसार पुढील महिन्यापासून इंग्लडमध्ये सुरु होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून रौफ यांना वगळण्यात आल्याचे सांगितले.
आयसीसीचे प्रमुख डेव्हिड रिचर्डसन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संजय जयपूरी,पवन जयपूरी आणि देवेंद्र कोठारी या तीन बुकींशी रौफ यांचे संबंध होते. या तिघांनी रत्नजडित दागिने आणि मोबाईल फोन रौफ यांना पाठवणार होते. मात्र त्यापूर्वीच या तिघा बुकींचा शोध पोलिसांनी सुरु केल्याने ते फरार झाले.
गेल्यावर्षी एका महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपही रौफ यांच्यावर आहे. दरम्यान आयपीएलच्या सहाव्या हंगामासाठी रौफ यांनी एकूण १४ सामन्यांची पंचगिरी केली आहे.

Read More »

रिक्षाचालकाकडून प्रवाशाची हत्या

रिक्षा भाडे देण्याच्या वादातून रिक्षाचालकाने एका प्रवाशाची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री अंबरनाथमध्ये घडली.
अंबरनाथ - रिक्षा भाडे देण्याच्या वादातून रिक्षाचालकाने एका प्रवाशाची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री अंबरनाथमध्ये घडली. बापू तळवळकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन मुले आणि पत्नीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असलेल्या बापूच्या मृत्यूमुळे तळवळकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
तळवलकर रात्री सव्वाएकच्या सुमारास आपल्या चार मित्रांसह बदलापुरहून अंबरनाथला येण्यासाठी रिक्षात बसले. अंबरनाथला आल्यानंतर रिक्षाचालक जसवंत याने त्यांच्याकडे ३०० रुपये भाडे मागितले. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यांनतर जसवंतने आपल्या साथीदारांना बोलवून तळवलकर यांना हॉकी आणि लोखंडी सळीने मारहाण केली. यात तळवलकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक जण जखमी झाला आहे. या घटनेनंतर रिक्षाचालक जसवंत फारार झाला असून, अंबरनाथ पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, त्याला वेळीच आळा बसायला हवा अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Read More »

मुंबई पोलिसांकडून मय्यपनला पाचारण

गुरुनाथ मय्यपन याला मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवले आहे.
मुंबई - बीसीसीआयचे अध्यक्ष व चेन्नई सुपर किंग संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन याला मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवले आहे. त्याच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे चार अधिका-यांचे एक पथक चेन्नईला गेले होते, मात्र मय्यपन तेथे सापडला नसल्याने त्याला आयुक्तालयात पाचारण करण्यात येणार आहे. दरम्यान, मय्यपन याने गुन्हे शाखेला फॅक्स पाठवून हजर राहण्यासाठी सोमवापर्यंत मुदत मागितली आहे.
'स्पॉटफिक्सिंग'प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता दारासिंग यांचा मुलगा विंदू दारासिंग याच्या चौकशीत मय्यपनचे नाव पुढे आल्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्तवाखाली चार अधिका-यांचे पथक चेन्नईला गेले होते. या पथकाने त्याच्या घरी व कार्यालयावर झापा टाकला मात्र ते सापडला नाही. त्यामुळे त्याला मुंबई आयुक्तालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. यानुसार मयप्पन व विंदू यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
मय्यपनचे सट्टेबाजीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विंदूशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पुढे आले आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमापूर्वी चेन्नईत झालेल्या क्रिकेटच्या पार्टीत एका खेळाडूमार्फत त्यांची ओळख झाली होती. तेव्हापासून म्हणजे गेल्या सहा वर्षापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. मय्यपन चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात असून, त्याला क्रिकेटबद्दल अधिक माहिती नसल्याचे विंदूने चौकशीदरम्यान म्हटले आहे.
'शरमेने मान खाली गेली'
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर एक नागरिक, खेळाचा चाहता व क्रीडामंत्री या नात्याने माझी मान शरमेने खाली गेल्याचे क्रीडामंत्री जितेंद्र सिंह गुरुवारी म्हणाले. तसेच क्रिकेटसह अन्य खेळांतील अशाप्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी विशिष्ट तपासयंत्रणा असायला हवी, अशी मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

Read More »

स्वामी विवेकानंद स्मरणोत्सव मुंबईत

शिकागो येथील धार्मिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी ३१ मे १८९३ रोजी मुंबई बंदरातून पेनिन्सुला या जहाजामधून प्रवासाला सुरुवात केली होती.
मुंबई – शिकागो येथील धार्मिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी ३१ मे १८९३ रोजी मुंबई बंदरातून पेनिन्सुला या जहाजामधून प्रवासाला सुरुवात केली होती. या ऐतिहासिक १२० वष्रे पूर्ण होत असल्याने रामकृष्ण मिशन आणि ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने ३१ मे रोजी 'स्वामी विवेकानंद स्मरणोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या दिवशी गेट वे ऑफ इंडिया येथील विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठातील सभागृहात दुपारी एक ते दोनदरम्यान हा कार्यक्रम होईल. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, रामकृष्ण मिशनचे स्वामी सर्वालोकन आणि ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन सुधाकर कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Read More »

'मध्य वैतरणा'तून यंदाही पाणी मिळणे अशक्यच

मध्य वैतरणा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम येत्या २२ जूनपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.


संग्रहित छायाचित्र
मुंबई - मध्य वैतरणा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम येत्या २२ जूनपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात या पुलाचे काम पूर्ण होण्यास जुलै उलटणार असून, पावसामुळे हे काम करण्यास अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे याही वर्षी या धरणातून पाण्याचा पुरवठा होणे अशक्यच असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेने मध्य वैतरणा धरणाचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करून विक्रम केला आहे. मात्र, अजूनही मुंबईकरांना या धरणातून पाणीपुरवठा केला जात नाही. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जुने पूल पाण्याखाली जात असल्यामुळे दोन गावांना जोडण्यासाठी ५३ मीटर उंचीच्या उड्डाणपुलाचे काम २००८ रोजी हाती घेण्यात आले आहे. परंतु या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मेअखेपर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोखाडा विभागीय उपअभियंता रंजन जाधव यांनी या पुलाचे बांधकाम २२ जूनपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला आहे.
बांधकाम विभागाकडून या पुलाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाची पाहणी करावी, अशी मागणी शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी केली होती. त्यानुसार स्थायी समिती सदस्यांसह अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या पुलाची व धरणाची पाहणी केली. या वेळी महापौर सुनील प्रभू, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सभागृहनेते यशोधर फणसे, भाजपचे गटनेते दिलीप पटेल, किशोरी पेडणेकर, तृष्णा विश्वासराव, उपायुक्त रमेश बांबळे तसेच जलअभियंता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वैतरणा नदीवर ३८० मीटर लांबीच्या पुलासाठी सात गर्डर टाकण्यात आले आहेत. मात्र, नदीत घोळ असल्यामुळे आठवा गर्डर टाकण्याचे काम शिल्लक आहे. त्यामुळे स्टिल गर्डर टाकण्यात येणार असल्याची माहिती रंजन जाधव यांनी दिली. मात्र, धरणाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले असून, केवळ धरणाचे दरवाजे लावण्याचे काम शिल्लक आहे. हे काम या पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे महापालिकेचे उपायुक्त रमेश बांबळे यांनी स्पष्ट केले.
नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यात पूर्ण होणार नसल्यामुळे जुन्या पुलाच्या खालपर्यंतच पाणी महापालिकेला साठवावे लागणार आहे. परिणामी मुंबईकरांना या पुलाअभावी पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही, असे महापालिकेच्या अधिका-यांनी खासगीत बोलताना सांगितले.

Read More »

'फाम'कडून मुख्यमंत्र्यांचे आभार

एलबीटीची अंमलबजावणी पुढे ढकलल्याबद्दल 'फाम'ने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले आहे.
मुंबई - एलबीटीची अंमलबजावणी पुढे ढकलल्याबद्दल 'फाम'ने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले आहे. मुंबईतील एलबीटीची अंमलबजावणी पुढे ढकलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे 'फाम'चे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी स्वागत केले आहे. व्यापारी कर भरायला तयार आहेत. मात्र, एलबीटीमुळे व्यापारावर विपरित परिणाम होणार असल्याने हा कर ताबडतोब मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
दिल्लीत सोनिया गांधी – राहुल गांधी यांच्याशी चर्चा
एलबीटी मागे घेण्याच्या मागणीसंदर्भात व्यापा-यांचे एक शिष्टमंडळ शुक्रवारी दिल्लीला रवाना होणार असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर आपले गा-हाणे मांडणार आहेत. अरुण दोषी, फॅमचे उपाध्यक्ष मुहम्मदली पटेल, सरचिटणीस मिलापचंद कनुगो यांच्यासह विविध व्यापारी संघटनांच्या सभासदांचा या शिष्टमंडळात समावेश असणार आहे.
याच वेळी राज्यात मोहन गुरुनानी यांच्या अध्यक्षतेखालील एक शिष्टमंडळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईत भेट घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे होणा-या या बैठकीत व्यापा-यांच्या एलबीटी संदर्भातील विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे फामने सांगितले आहे.

Read More »

पती, दिराला अटकपूर्व जामीन नाकारला

हुंड्यासाठी पत्नीचा मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती आणि दिराचा अटकपूर्व जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एच. जोशी यांनी गुरुवारी फेटाळला.
मुंबई - हुंड्यासाठी पत्नीचा मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती आणि दिराचा अटकपूर्व जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एच. जोशी यांनी गुरुवारी फेटाळला. पतीला अटक करा, त्याच्यासह त्याचे आईवडील, दीर आणि त्याची पत्नी अशा सहाजणांना अटकपूर्व जामीन देऊ नका, अशी विवाहितेने केलेली याचिका न्या. जोशी यांनी सहानुभूतीपूर्वक ऐकून पती गुफरान आणि दीर मोहम्मदला जामीन नाकारला. तसेच दोघांना शरण येण्याचे निर्देश दिले. तसेच पती-पत्नीने तडजोड करावी, असा सल्लाही न्या. जोशी यांनी दिला.
१४ मे २०१२ मध्ये मुंबईच्या फरहीनचा गुफरानशी विवाह झाला. मात्र गुफरानसह त्याचे आई-वडील आणि अन्य नातेवाइकांनी फरहीनकडे दोन लाख रुपये हुंडा आणि दागिन्यांची मागणी सुरू केली. हुंडय़ाची मागणी पूर्ण न केल्यामुळे त्यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला, तरीही मी त्यांची मागणी पूर्ण केली नाही. यामुळे मी सासरी केवळ २२ दिवस राहिले आणि नंतर माहेरी निघून आले, असे फरहीनने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस अटक करतील, या भीतीने फरहीनचा पती, दीर आदींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज केला होता.
मात्र तो फेटाळण्यात आल्याचे फरहीनने याचिकेत म्हटले आहे. सत्र न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्याची सुनावणी गुरुवारी न्या. जोशी यांच्यासमोर झाली. पीडित फरहीनने स्वत: आपली बाजू न्या. जोशी यांच्यासमोर मांडली. न्या. जोशी यांनी सुरुवातीस तिला इंग्रजीतून काही प्रश्न विचारले मात्र तिने उत्तर न दिल्यामुळे बचाव पक्षाच्या वकील जमीला शेख यांच्याकडे, त्यांना इंग्रजी कळत नाही का, अशी विचारणा केली. फरहीनने इंग्रजी समजत नसल्याचे सांगितल्यावर न्या. जोशी यांनी तिच्याबरोबर पुढील सर्व संवाद हिंदीतून केला. पतीला अटक करण्याची मागणी का केली, या न्या. जोशी यांच्या प्रश्नावर माझा खूप छळ झाल्याचे फरहीनने सांगितले.
घरातील महिलांकडूनही त्रास झाल्याने पतीसह अन्य सर्वाचा अटकपूर्व जामीन नाकारला जावा, अशी विनंती फरहीनने न्यायालयाला केली. न्या. जोशी यांनी पती आणि दिराचा अटकपूर्व जामीन नाकारला मात्र फरहीनने तक्रारी नमूद केलेल्या महिलांना जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ जून रोजी होणार आहे.


Read More »

डॉक्टरांची निवृत्ती आता ६२व्या वर्षी

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांसाठी आनंदाची बातमी आहे. या विभागातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय आता ५८ वरून ६२ होणार आहे.
मुंबई – राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांसाठी आनंदाची बातमी आहे. या विभागातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय आता ५८ वरून ६२ होणार आहे. त्याबाबतचा अंतिम प्रस्ताव आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांच्याकडे लवकरच पाठवला जाणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होईल.
ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालयांपासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत डॉक्टर काम करत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने तेथे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात साडेसात हजार वैद्यकीय अधिकारी, अडीचशे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि साडेपाचशे शल्यचिकित्सकांसह सहाशे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. यावर्षी ऑक्टोबरअखेर १७० डॉक्टर सेवानिवृत्त होणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांचे निवृत्तीचे वय वाढवले होते. त्याच धर्तीवर आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे निवृत्ती वय चार वर्षानी वाढवावे, अशी मागणी डॉक्टरांनी केली होती. डॉक्टरांच्या पदांचा विचार करून गेल्या वर्षी सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉक्टरांचे निवृत्ती वय ६२ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी राज्यसरकारने एक समितीही नियुक्त करण्यात होती. त्या समितीच्या दोन बैठका झाल्या. असे असतानाच आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय वाढवू नये, डॉक्टर कामे करत नाहीत, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. तसेच नियुक्त केलेल्या समितीने अद्याप अहवालही दिलेला नाही.
अहवाल आल्यावर त्याबाबतची मते जाणून तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. हा निर्णय झाल्यास याचा फायदा सार्वजनिक आरोग्य विभागाला मिळणार आहे.


Read More »

जयगड-निवळी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड ते निवळी या रस्त्याच्या विकासासाठी सुधारित प्रस्ताव पायाभूत सुविधा समितीकडे लवकरात लवकर पाठवून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी संबंधित अधिका-यांना दिले.
मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड ते निवळी या रस्त्याच्या विकासासाठी सुधारित प्रस्ताव पायाभूत सुविधा समितीकडे लवकरात लवकर पाठवून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी संबंधित अधिका-यांना दिले.
जयगड (धामणखोल बे) बंदर रस्त्याने जोडण्यासंदर्भात व बंदराच्या विकासकामासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात उद्योगमंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योगमंत्री राणे यांनी जयगड बंदराच्या विकासकामांचा आढावा घेतला. जयगड बंदराच्या विकासासाठी जयगड ते निवळी या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. यासंदर्भातला सुधारित प्रस्ताव लवकर तयार करून हे काम ठरावीक कालावधीत पूर्ण करावे, असे राणे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला बंदरे विभागाचे प्रधान सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव, जयगड पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. जे. शर्मा, बंदरे विभागाचे उपसचिव अं. शा. घाग्रे आदी उपस्थित होते.

Read More »

वेबकॅमसमोर केली विवाहितेने आत्महत्या

कुटुंबीयांना अंधारात ठेवून लग्न केल्यानंतर पतीच्या आई-वडिलांकडून होणा-या हुंडय़ाच्या मागणीला कंटाळून २६ वर्षीय तरुणीने पतीशी ऑनलाइन संवाद साधत असतानाच वेबकॅमसमोर आत्महत्या केली.


संग्रहित छायाचित्र
मुंबई – कुटुंबीयांना अंधारात ठेवून लग्न केल्यानंतर पतीच्या आई-वडिलांकडून होणा-या हुंडय़ाच्या मागणीला कंटाळून २६ वर्षीय तरुणीने पतीशी ऑनलाइन संवाद साधत असतानाच वेबकॅमसमोर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी जुहू येथे घडली. शोभना मनोहर सूर्ती असे मृत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी जुहू पोलिसांनी तिच्या पतीसह सासू-सास-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शोभना सूर्ती ही जुहू परिसरातील अण्णास्वामा चाळीत राहत होती. सहा वर्षापूर्वी तिची स्वप्नील सुर्वे याच्याशी ओळख झाली. त्यातून या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ते दोघेही एका खासगी कंपनीत कामाला होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी आपल्या कुटुंबीयांना अंधारात ठेवून लग्न केले. शोभनाने अलीकडेच या लग्नाबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली होती. स्वप्नीलच्या आई-वडिलांनाही नुकतीच ही बाब समजली होती. त्यातून त्यांचा शोभनाला विरोध होता.
मात्र दोघांनी लग्न केले असल्यामुळे सासरच्यांकडून शोभनावर २५ लाख रुपयांच्या हुंडय़ासाठी दबाव टाकण्यात आला. हुंडा दिल्याशिवाय घरात घेणार नाही, अशी धमकीही तिला देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शोभना व स्वप्नील या दोघांमध्ये खटके उडत होते. बुधवारी सायंकाळी शोभना आणि स्वप्नील एकमेकांशी वेबकॅमद्वारे ऑनलाइन संवाद साधत होते. त्यावेळीही त्यांची वादावादी झाली. त्यातून शोभनाने आपण आत्महत्या करीत असल्याचे स्वप्नीलला सांगितले. तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वेबकॅम सुरूच असल्याने स्वप्नीलने हा सारा प्रकार ऑनलाइन पाहिला.
शोभना आत्महत्या करत असल्याची माहिती स्वप्नीलने तात्काळ शोभनाची बहीण भाविका हिला दिली आणि तिला शोभनाच्या घरी जाण्यास सांगितले. ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली. पोलिसांनी शोभनाला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडय़ाची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी शोभनाचा पती, सासू व सास-याविरोधात गुन्हा दाखल केला.

Read More »

डीन अ‍ॅम्ब्रोसे

'जोनाथन गुड' म्हणजेच डीन अ‍ॅम्ब्रोसे हा अमेरिकन कुस्तीपटू आहे.'डब्ल्यूडब्ल्यूई' स्पर्धेतला त्याच्या नावावर जमा झालेला हा त्याचा पहिला वैयक्तिक किताब आहे
'जोनाथन गुड' म्हणजेच डीन अ‍ॅम्ब्रोसे हा अमेरिकन कुस्तीपटू आहे. अमेरिकेतल्या ओहिओ येथे त्याचा जन्म झाला. 'डब्ल्यूडब्ल्यूई'मध्ये दाखल झाल्यानंतर त्याने नाव लावलं. 'जॉन मॉक्सले' अशा नावाने त्याने हार्टलॅण्ड रेसलिंग असोसिएशन, चिकारा, इंटरनॅशनल रेसलिंग असोसिएशन अशा स्पर्धा खेळल्या. २७ वर्षीय डीनने दोन वेळा सीझेडडब्ल्यू वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप, दोन वेळा आयपीडब्ल्यू हेवीवेट चॅम्पियनशिप, तीन वेळा एचडब्ल्यूए हेवीवेट चॅम्पियनशिप आणि एकदा एफआयपी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप यांसारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत. कोडी हॉक, लेस थॅचर यांच्याकडून त्याने कुस्तीचे धडे घेतले. जून २००४ मध्ये डीनने कुस्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला.
या क्षेत्रात आल्यानंतर महिनाभरातच त्याने जिमी टर्नरसोबत टीम केली आणि त्याला त्यांनी 'नेसेसरी रफनेस' असं नाव दिलं. २००६ पासून तो इचडब्ल्यूए हेवीवेट चॅम्पियनशिप खेळू लागला. 'टॅग' टीममध्ये आल्यानंतर त्याने त्याचे प्रशिक्षक कॉडी हॉक यांच्यासह टीम तयार केली. त्यानंतर त्याने 'द शिल्ड' या टीममध्ये प्रवेश केला. रोमन रिजन्स, सेठ रोलिन्स आणि डीन अ‍ॅम्ब्रोसे या तीन कुस्तीपटूंनी एकत्र येऊन ही टीम बनवली. ६ जून २००९ या दिवशी त्याने 'कॉम्बॅट झोन रेसलिंग टुर्नामेंट ऑफ डेथ एट' या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर २००९ सालीच तो 'ड्रॅगन गेट यूएसए'साठी खेळू लागला.
'द स्ट्रीट डॉग' हे त्याचं टोपणनाव होतं. सध्या त्याच्या नावावर 'युनायटेड स्टेट्स चॅम्पियन' हा किताब आहे. 'एक्स्ट्रिम रुल्स' या स्पर्धेत कोफी किंगस्टन या कुस्तीपटूला हरवून त्याने हा किताब मिळवला आहे. 'डब्ल्यूडब्ल्यूई' स्पर्धेतला त्याच्या नावावर जमा झालेला हा त्याचा पहिला वैयक्तिक किताब आहे.

Read More »

सामान्य ज्ञान

मुलांनो, अशा अनेक जगप्रसिद्ध वास्तू आहेत की, ज्या आपल्याला अचंबित करून टाकतात. त्या सर्व वास्तूंना एक इतिहास असतो, त्या वास्तूंबाबत एखादी खास गोष्ट आपल्याला त्या वास्तूकडे आकर्षित करते. चला तर मग अशा वास्तूंबाबत आपल्याला किती माहिती आहे, हे तपासून पाहू.
१. चीन देशातील जगप्रसिद्ध ठिकाण कोणते?
२. 'ताजमहाल' कोणत्या मुघल बादशहाने बांधला?
३. अ‍ॅमॅझोनचे जंगल कोणत्या देशात आहे?
४. 'जगातील सात आश्चर्यामध्ये ब्राझिलच्या कोणत्या वास्तूरचनेचा समावेश आहे?
५. रोम येथील 'द कलोझियम' किती एकर जागेवर वसलेलं आहे?
६. इजिप्त'मधील 'गिझा पिरॅमिड्स'मधील सर्वात मोठा पिरॅमिड कोणता?
७. माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची किती ?
८. 'सुवर्ण मंदिर' या वास्तूचे दुसरे नाव काय ?
९. आयफेल टॉवर कोणत्या देशात आहे?
१०. 'बुर्ज अल अरब' कोणत्या देशात आहे?





उत्तर
१. ग्रेट वॉल ऑफ चायना २. शहाजहान ३. साउथ अमेरिका ४. क्राइस्ट द रिडीमर ५. ६ एकर ६. खुफू ७. २९,०२९ फूट ८. दरबार साहिब ९. पॅरिस १०. दुबई

Read More »

भज्जी,विराट माझे मित्र – विंदू

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी अभिनेता विंदूने विराट कोहली,भज्जी आणि मनप्रित गोने माझे जवळचे मित्र असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट केले.
मुंबई – स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेता विंदू रांधवाने विराट कोहली, हरभजनसिंग आणि मनप्रित गोने माझे जवळचे मित्र असल्याचे पोलिसांच्या चौकशीत शुक्रवारी स्पष्ट केले.
क्रिकेट विश्वातील अनेक क्रिकेटपटूंचे माझे चांगले संबंध आहेत. मात्र विराट कोहली, हरभजन सिंग आणि मनप्रित गोने माझे खास जवळचे मित्र आहेत असे स्पष्ट केले आहे. मनप्रित सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघातर्फे खेळत आहे. विंदूने चौकशीत या तिघांची नावे घेतल्याने स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील संशयाची सुई या तिघांच्या बाजूने वळली आहे. मात्र या प्रकरणात भज्जी,विराट आणि मनप्रितच्या सहभागाबद्दल अद्याप काहीही बोलणे उचित ठरणार नाही अशी भूमिका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विंदूंने आपल्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या नावांचाही समावेश केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बूकी यांच्यातील दुवा म्हणून आपण काम केल्याचे विंदूने आपल्या जबाबात कबूल केले आहे.
अनेक वर्षांपूर्वी विंदूचा मित्र आनंद सक्सेना यानेच रमेश व्यास आणि शोभन मेहता या दोन बूकींशी विंदूशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर अजित चंडेलिया आणि दिल्लीतील काही बूकींच्या मध्यस्थीनेच श्रीसंतची ओळख झाली असे त्याने सांगितले.


मुंबई पोलिसांकडून मय्यपनला पाचारण »


गुरुनाथ मय्यपन याला मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवले आहे.
Read More »
शताब्दी रुग्णालयाचे १५ ऑगस्टला उद्घाटन

मुंबई महापालिकेतर्फे कांदिवली पश्चिम येथे उभारण्यात येत असलेल्या कांदिवली शताब्दी रुग्णालयाचे १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे.
मुंबई – मुंबई महापालिकेतर्फे कांदिवली पश्चिम येथे उभारण्यात येत असलेल्या कांदिवली शताब्दी रुग्णालयाचे १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील रहिवाशांना उपचारांकरता भगवती आणि कुपर रुग्णालयात ताटकळत राहावे लागणार नाही. शताब्दी रुग्णालय ३०२ खाटांचे असून, त्यातील २० खाटा मध्यमवर्गीयांकरता सशुल्क असतील.
बोईसर, डहाणू या परिसरातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारांकरता बोरिवली येथील भगवती आणि विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात येतात. या रुग्णांमुळे इतर रुग्णांना कित्येक तास रांगेत थांबावे लागते. यामुळे पश्चिम उपनगरातील रुग्णांसाठी महापालिकेने आणखी एक अद्ययावत रुग्णालय उभारावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार कांदिवली पश्चिम येथे हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. सध्या या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या १५ ऑगस्टपासून ते जनतेसाठी सुरू होईल, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.
या रुग्णालयात सात अद्ययावत शस्त्रक्रियागृहांचा समावेश असून, अतिदक्षता विभाग (आयसीयू), लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग (पीआयसीयू), नवजात अर्भकांसाठी (एनआयसीयू), एमआयसीयू येथे एकूण ४० खाटा असतील. त्याचबरोबर सीटीस्कॅन, एमआरआय सुविधा येथे उपलब्ध असतील. तसेच नेत्रविभाग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, मेडिसीन असे सुपर स्पेशालिटी विभागही येथे असतील, असे उपनगरीय रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. सीमा मलिक यांनी सांगितले.


Read More »

ठाणे-दिवा अतिरिक्त रेल्वेमार्गाचे काम रखडले

ठाणे-दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गाचे काम एक मेपासून रखडले आहे. त्यामुळे ते लवकर सुरू व्हावे, यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी विनंती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) केली आहे.
मुंबई - ठाणे-दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गाचे काम एक मेपासून रखडले आहे. त्यामुळे ते लवकर सुरू व्हावे, यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी विनंती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) केली आहे. मात्र, जोपर्यंत रेल्वेमार्गाआड येणा-या झोपडीधारकांना पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी आडमुठी भूमिका स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे हे काम आणखी रखडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाणे-दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम २०१२ मध्येच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयीन लढाई, पर्यावरण विभागाची परवानगी इत्यादी अनेक अडचणींमुळे ते रखडले होते. अखेर या सर्व अडथळ्यांवर मात करत शेवटी एक एप्रिल २०१३ पासून या मार्गाचे काम सुरू झाले. त्यासाठी मुंब्रा येथे बोगदा खोदण्यात येत आहे. मात्र, याच ठिकाणी रेल्वेच्या जागेत असलेल्या व रेल्वेमार्गात अडसर ठरणा-या ४५ झोपड्या तोडण्याची कारवाई सुरू असतानाच स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यात हस्तक्षेप करत हे काम बंद पाडले.
३० वर्षापासून राहणा-या झोपडीधारकांना पर्यायी घरे दिली जात नाहीत, तोपर्यंत हे काम करू देणार नाही, अशी आडमुठी भूमिका त्यांनी घेतली होती. शिवाय रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारनेही अजूनही यावर तोडगा काढलेला नाही, असे आव्हाड यांनी सांगितले. यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून हे काम रखडले आहे.
त्यामुळे राज्य सरकारने मध्यस्थी करून काम करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती 'एमआरव्हीसी'ने राज्य सरकारकडे केली आहे. या मार्गाचे काम २०१२ मध्ये सुरू होऊन २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम आता २०१३ मध्ये सुरू झाल्याने ते २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस होता, असे 'एमआरव्हीसी'च्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हे काम पुन्हा रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Read More »

टीकेनंतर शिवसेनेला आली जाग

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीच्या वेळी शिवाजी पार्कवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व एलईडी स्क्रीन व इतर व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीच्या वेळी शिवाजी पार्कवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व एलईडी स्क्रीन व इतर व्यवस्था करण्यात आली होती. याचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेवर झालेल्या टीकेमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाले. त्यांनी कानउघाडणी केल्यानंतर अखेर शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे यासाठी खर्च करण्यात आलेल्या पाच लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. त्यामुळे शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव प्रशासनाकडून मागे घेतला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव या मैदानात पोलिसांच्या सूचनेनुसार महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी व इतर व्यवस्था केली होती. यासाठी सुमारे चार लाख ९९ हजार रुपयांचा खर्च आला होता. हा पैसा महापालिकेच्या तिजोरीमधून खर्च करण्यात आल्यामुळे शिवसेनेचे वाभाडे काढण्यात आले. असे असतानाही या खर्चाचा भार उचलण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेचा एकही नेता पुढे आला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले असून, त्यांनी महापालिकेतील या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्या हस्ते पाच लाखांचा धनादेश पाठवून दिला.अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्याकडे सध्या आयुक्तांचा अतिरिक्त भार असून, त्यांनी हा धनादेश स्वीकारला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने मागे घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read More »

धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा

धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा, अशा सूचना नांदेड मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केल्या आहेत.
नांदेड – महापालिका मालकीच्या ज्या इमारती किंवा व्यावसायिक संकुल धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त होईल, त्यासाठी कोणत्याही वेगळ्या आदेशाची वाट न पाहता अशा इमारती तात्काळ रिकाम्या करून घ्याव्यात, अशी सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केली.
पावसाळापूर्व तयारी संबंधात मनपा आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची त्यांच्या कक्षात बैठक घेतली. यापुढे दर शुक्रवारी सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी साप्ताहिक 'कॉफी बैठक' घेतली जाणार आहे. या बैठकीत दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही तर संबंधितांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. आपत्कालीन व्यवस्थेसाठी बिनतारी यंत्रणा सुसज्ज ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.
महापालिकेच्या किंवा खासगी इमारती धोकादायक असतील तर त्यांचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करून घ्यावे. जी खासगी इमारत पाडणे अत्यंत आवश्यक आहे, अशांचा प्रस्ताव पाठवावा. कोणत्याही स्थितीत जीवित आणि वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नालेसफाईची कामे वेगाने पूर्ण करून घ्यावीत. घनकचरा कमी होण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांनी लोकांमध्ये प्रबोधन करावे. भुयारी मार्गातील पाणी उपसण्याचे आणि त्याची देखभाल करण्याचे काम खासगी ठेकेदाराकडे सोपवण्याची सूचनाही त्यांनी केली.

Read More »

सत्ताधा-यांचे पाणीपुरवठय़ाचे आश्वासन हवेतच

सावंतवाडी शहराची तहान भागवणा-या पाळणेकोंड धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने, शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
सावंतवाडी - सावंतवाडी शहराची तहान भागवणा-या पाळणेकोंड धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने, शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. धरणातील गाळ न काढल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली. सद्य:स्थितीत केवळ एक तासच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात चोवीस तास पाणी देण्याच्या सत्ताधा-यांच्या खोट्या आश्वासनांचा प्रत्यय ग्रामस्थांना आला आहे. दरम्यान, चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने, सत्ताधा-यांनी ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उन्हाळी हंगामात कमी-अधिक प्रमाणात पाण्याच्या टंचाईची समस्या सर्वत्र भासू लागली आहे. मात्र, सावंतवाडी शहरात पाण्याचा तुटवडा भासत आहे तो नगर परिषदेच्या दुर्लक्ष आणि नियोजनशून्य धोरणामुळेच. मुळात पाळणेकोंड धरणाचा गाळ काढणे व धरणाच्या गोडबोले प्रवेशद्वाराची उंची वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. असे असूनही उन्हाळी हंगामात गाळ काढण्याचे काम नगर परिषदेच्या सत्ताधा-यांनी केले नाही. परिणामी गाळ न काढल्याने पाण्याच्या पातळीत घट होताना दिसत आहे. योग्य वेळेत गाळ काढला असता तर ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा झाला असता.
सद्य:स्थितीत शहरातील प्रत्येक वॉर्डात दोन वेळा केवळ एकच तास पाणी सोडण्यात येते. आधीच धरणातील पाण्याच्या पातळीत घट त्यातच शहरातील विहिरींनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तलावातील जलसाठ्यामुळे परिसरातील झ-यांना पाणीपुरवठा होऊन विहिरीत विपुल पाणी असते. मात्र, ऐन उन्हाळ्यातच नगर परिषद कार्यालयाच्या आवारात तलावालगत नगर परिषदेने विंधन विहिरी बसवून घेतली. या विंधन विहिरीमुळे तळय़ाच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे.
विंधन विहिरी, भटवाडीतील ऐतिहासिक चांदा तळी व अन्य ठिकाणच्या पाण्याचा उपसा करून ते पाणी इमारत बांधकामासाठी पुरविण्यात नगर परिषदेचे सत्ताधारी गुंतले आहेत. थोडक्यात ग्रामस्थांची तहान भागवण्यापेक्षा बांधकाम व्यावसायिकांची मर्जी सांभाळण्यात सत्ताधारी समाधानी असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
पाण्याचा तुटवडा ही गंभीर बाब असतानाही नगर परिषदेचे सत्ताधारी त्यावर कोणतीही उपाययोजना करत नाही. पाळणेकोंड धरणातील गाळ योग्य वेळी काढला असता, तर ही पाण्याची टंचाई भासली नसती. पाणीपुरवठा विभागाकडे निधीची तरतूद असूनही पाण्याच्या समस्येकडे सत्ताधारी गांभीर्याने पाहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात ग्रामस्थांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन सत्ताधा-यांनी दिले होते. असे खोटे आश्वासन देणा-या सत्ताधा-यांनी ग्रामस्थांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Read More »

केरळींच्या विळख्यात कोकणची जमीन

माणगाव खो-यातील निसर्गरम्य सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या आंजिवडे गावातील सुमारे दीडशे एकर खासगी क्षेत्रात केरळींनी रबर लागवड करून येथील जैवविविधतेला धोका पोहोचवला आहे.
कुडाळ - माणगाव खो-यातील निसर्गरम्य सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या आंजिवडे गावातील सुमारे दीडशे एकर खासगी क्षेत्रात केरळींनी रबर लागवड करून येथील जैवविविधतेला धोका पोहोचवला आहे. मुळात जिल्ह्यात वृक्षतोडीवर बंदी असतानाच केरळींनी मात्र, जमिनी घेऊन येथील वनसंवर्धनावर मात केली आहे. त्यामुळे माणगाव खो-यातील स्थानिक शेतकरी भूमिहीन झाले आहेत.
आंजिवडेतील खासगी जमिनी केरळींनी कवडी मोलाने खरेदी करून, तेथील भलेमोठे वृक्ष नाहीसे करून त्यावर रबरची लागवड केली. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. वृक्षतोडीचा परिणाम वन्यजीव व पर्यावरणावर झाल्याने वन्यजीव आता मनुष्यवस्तीत घुसू लागले आहेत. याबाबत वनविभाग व संबंधित विभागाकडून कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा माणगाव खो-यातील स्थानिक शेतक-यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दीडशे एकर क्षेत्रातील हजारो वृक्ष तोडून, दहा वर्षाच्या लागवडीनंतर कोटय़वधी रुपये मिळवण्याच्या स्वार्थासाठी केरळींनी ही रबर लागवड केली आहे. मात्र याचा धोका निसर्गाला पोहोचून वन्यप्राण्यांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. वनविभागाकडून मात्र याबाबत डोळेझाक होत आहे.
एकीकडे सर्वसामान्यांना एक झाड तोडण्यासाठी परवानगी देताना वनविभागाकडून दुसरे झाड लावण्याचे हमीपत्र घेतले जाते. अशा वेळी आंजिवडेतील दीडशे एकर क्षेत्रातील हजारो झाडे तोडताना तशी हमीपत्रे वनविभागाने घेतली का? असा प्रश्न निसर्गप्रेमींमधून विचारला जात आहे. दररोज पाच ते दहा ट्रक जळावू लाकूड बेळगाव, कोल्हापूर आदी शहरांमध्ये जात आहे.
आंजिवडे येथील गवळीवाडी परिसरातील खासगी डोंगरमाथ्यावरील जमिनी काही दलालांनी केरळींना दिल्या आहेत. त्यात स्थानिक गरीबच राहिला असून, दलाल व केरळींचे खिसे मात्र भरले. आर्थिक लोभापायी आधुनिक पद्धतीने झाडांची लागवड करताना ती लवकर वाढण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक खतांचा वापर केल्यास काही दिवसांनी या जमिनी भकास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी रबर लागवडीच्या संपूर्ण क्षेत्रात विद्युतभारीत तारांचे कुंपण करण्यात आले आहे. हे कुंपण सौरऊर्जेवर चालू आहे. कुंपणाच्या आसपास येणारे वन्यप्राणी या विद्युतभारीत तारांचा धक्का लागल्याने दूर पळतात. त्यामुळे येथील वन्यप्राण्यांनी आता मनुष्यवस्तीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
आंजिवडे गवळीवाडी येथील या दीडशे एकर क्षेत्रात तीन वर्षापूर्वी रबर लागवड करण्यास सुरुवात झाली. या लागवडीवर सुमारे कोटय़वधींचा खर्च केला जात आहे.

Read More »

परतीच्या प्रवासासाठी रेल्वेस्थानकांवर गर्दी

मुंबईकर कोकणवासीयांना आता परतीचे वेध लागले असून, एसटी तसेच लग्झरी बस यांच्यापेक्षा प्रवासी रेल्वेला अधिक पसंती देत असल्याने विविध रेल्वेस्थानकांवर सध्या प्रवाशांची तुफान गर्दी होत आहे.
सापुचेतळे – मुंबईकर कोकणवासीयांना आता परतीचे वेध लागले असून, एसटी तसेच लग्झरी बस यांच्यापेक्षा प्रवासी रेल्वेला अधिक पसंती देत असल्याने विविध रेल्वेस्थानकांवर सध्या प्रवाशांची तुफान गर्दी होत आहे.
मोठ्या प्रमाणावर गावी दाखल झालेले कोकणवासी मिळेल त्या गाडीने परतीच्या प्रवासाला लागले आहेत. याचा फायदा खासगी लग्झरी बसगाड्यांनी घेतला आहे. साध्या लग्झरी गाडय़ांचे तिकीट सध्या ५०० ते ६०० रुपये आहे. तर एसटी बसच्या तिकिटांचे दरही ३५० रुपयांच्या आसपास आहेत. त्यामानाने रेल्वेचे मुंबईला जाण्यासाठी तिकीट कमी आहे. तसेच रेल्वेचा प्रवास अनेकांना आवडत असल्याने रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे विविध आगारांतून १५ ते २० एसटी तसेच अनेक लग्झरी बस शहराकडे जात असतानाही रेल्वेला मात्र गर्दी कायम आहे.
राज्यराणी एक्स्प्रेस तब्बल तीन तास उशिरा
बुधवारी सकाळी ८.४० वा. नांदगाव रेल्वेस्थानकावर येणारी राज्यराणी एक्स्प्रेस तब्बल तीन तास उशिरा आल्याने व ठिकठिकाणी जलद गतीच्या गाडय़ांमुळे या गाडीला थांबा मिळत असल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी नांदगाव स्टेशन मास्तरला जाऊन जाब विचारला. प्रवाशांचा संताप पाहून वरिष्ठांशी संपर्क साधून राज्यराणी एक्स्प्रेस दुपारी १२.३५ च्या सुमारास सोडण्यात आली. इतर जलद गाडय़ांच्या क्रॉसिंगसाठी राज्यराणी थांबवण्यात आली. त्यामुळे तीन तास उशीर झालेल्या राज्यराणी गाडीतील प्रवासी मात्र ताटकळत राहिले.
खेड आगार सज्ज
कोकणात दाखल झालेल्या कोकणवासीयांना परतीचे वेध लागले असून, येथील आगार प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. स्थानकातून उन्हाळी हंगामासाठी मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे आदी मार्गावरील नियमित फे-यांसह नऊ जादा फे-या सुरू करण्यात आल्या असून, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता सहा जूनपर्यंत या जादा फे-या सोडण्यात असल्याची माहिती येथील एसटीच्या सूत्रांकडून देण्यात आली. जादा फे-यांचे आरक्षण सुरू असून, गर्दी लक्षात घेता आरक्षणाची वेळ वाढवण्यात आली आहे. जादा फे-यांमुळे नियमित फे-यांवर कोणताही परिणाम होणार नसून योग्य नियोजन करूनच जादा फे-यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. मुंबई मार्गावरील भरणे नाका, नातूनगर, खवटी, कशेडी या थांब्यांवर प्रवाशांची गर्दी दिसून येते.



Read More »

हॅपी बर्थ डे गुफी

दोस्तहो, आपल्या या निरागस गुफीचा वाढदिवस कधी असतो हे माहित आहे का तुम्हाला?
बोजड, पोरकट पण तितकाच प्रेमळ..'मिकी माऊस'च्या विश्वातलं गुफी हे एक गोंधळलेलं, रडकं पात्र! दोस्तहो, आपल्या या निरागस गुफीचा वाढदिवस कधी असतो हे माहित आहे का तुम्हाला? येत्या २५ मे रोजी गुफी तब्बल ८१ वर्षांचा होणार आहे. 'डिस्ने ज्युनियर' वाहिनीवर दाखविल्या जाणा-या कार्यक्रमात मिकी माऊस आणि डोनाल्ड डकचा जवळचा मित्र असलेल्या गुफीचा यंदाचा वाढदिवस काहीसा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे.
२५ मे रोजी सकाळी सात ते साडेबाराच्या दरम्यान 'मिकी क्लब हाऊस'चे काही विशेष भाग प्रसारित होणार आहेत तर २६ मेला सकाळी सहा वाजता 'मिकी क्लब हाऊस' हा विशेष चित्रपट दाखविला जाणार आहे.
चला तर मग मित्रांनो, गुफी बरोबर धम्माल करायला आपणही तयार होऊया !

Read More »

ब्रिटनमध्ये दहशतवादाचे पुनरागमन?

ब्रिटनमध्ये बुधवारी अज्ञात व्यक्तींनी एका सैनिकाचा शिरच्छेद केल्यावर हा एक प्रकारचा दहशतवादी हल्ला असल्याचे तर्क होऊ लागले आहेत.
ब्रिटनमध्ये बुधवारी अज्ञात व्यक्तींनी एका सैनिकाचा शिरच्छेद केल्यावर हा एक प्रकारचा दहशतवादी हल्ला असल्याचे तर्क होऊ लागले आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या एका संशयिताच्या लिंकनशायर येथील घरावर पोलिसांनी छापा घातला आणि ते घर सील केले. सैनिकाची हत्या करणा-या दोन्ही संशयितांना पोलिसांनी गोळ्या घातल्या आणि जखमी अवस्थेत असलेल्या या दोघांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले आहे.
लंडनमध्ये वुलविच येथे असलेल्या लष्कराच्या तळावरून हा सैनिक जात असताना, या दोन संशयितांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर चाकूने वार केल्यावर या दोघांनी त्याला रस्त्याच्या मधोमध आणून टाकले आणि त्याचे मुंडके कापण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले जाते. भर रस्त्यावर अनेक लोकांच्या समोर सैनिकाला ठार करणारे माथेफिरू धार्मिक घोषणा देत होते. त्यापैकी एकाने तर तेथे असलेल्या लोकांना उद्देशून इशारे दिले. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी अरबस्तानातील देशांमध्ये सैन्य पाठवल्याबद्दल त्याचा सूड उगवण्यासाठी आम्ही हे कृत्य करत आहोत व तुम्हा सर्वावर हीच वेळ येणार आहे, असे हा माथेफिरू ओरडत होता. या वेळी तेथे असलेल्या लोकांना ओरडून तो म्हणाला की, देवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी लढणे मी थांबवणार नाही.
हल्ल्याचे नायजेरियन कनेक्शन
या हल्ल्यात सहभागी असलेल्या दुस-या संशयिताची सविस्तर माहिती पोलिसांना मिळाली आहे. या संशयिताचे नाव मायकेल अदेबोलाजो असून तो नायजेरियन वंशाचा असल्याचे म्हटले जात आहे. लिंकनशायर गावातील ज्या घरात तो राहत होता, तेथील शेजाऱ्यांनी हे कुटुंब तेथे गेल्या दहा वर्षापासून राहत असल्याचे सांगितले. मायकेलने काही वर्षापूर्वी धर्मातर केले असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्याचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महिलेचे असामान्य धाडस
भर रस्त्यात एका सैनिकावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केल्यावर काही महिलांनी या माथेफिरूंना अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी इनग्रिड लोयू केनेट ही महिला या हल्लेखोरांच्या समोर कोणतीही भीती न बाळगता उभी राहिली व ती त्यांच्याशी सतत बोलत राहिल्याने या हल्लेखोरांना पकडणे सोपे गेले. या महिलेने दिलेल्या मुलाखतीत तिने केलेल्या धाडसाचे वर्णन केले आहे. एका डबल डेकर बसमधून जात असताना तिला रस्त्यावर एक मृतदेह पडल्याचे दिसले. त्या वेळी बसमधून खाली उतरून ती त्या मृतदेहाजवळ गेली. त्याची तपासणी केल्यावर ती व्यक्ती मरण पावली असल्याचे निष्पन्न झाले. त्याच वेळी हातात सुरा आणि पिस्तूल घेतलेला एक कृष्णवर्णीय तरुण तिथे आला आणि जवळ जाऊ नका असे त्याने या महिलेला सांगितले. त्या वेळी त्याच्या हातात शस्त्र असूनही आपल्याला अजिबात भीती वाटली नाही आणि आपण त्याला तू असे का केले, असे विचारल्याचे तिने सांगितले. त्या वेळी हा ब्रिटिश सैनिक असून त्याने इराक व अफगाणिस्तानमध्ये मुस्लीम महिला व बालकांना ठार मारले असल्याने त्याची हत्या केली असल्याचे त्या तरुणाने सांगितले. आपण त्याच्याशी पाच मिनिटे बोलत होतो, अशी माहिती तिने दिली. आता लवकरच पोलिस येथे येतील त्या वेळी तू पुढे काय करणार असे त्याला विचारले असता आपण पोलिसांनाही ठार करू असे त्यांना सांगितले. काही वेळाने तो हल्लेखोर त्याचे म्हणणे लोकांना ओरडून सांगण्यासाठी दुसरीकडे निघून गेला. त्या वेळी दुस-या काहीशा शांत असलेल्या हल्लेखोराशीही आपण बोलणे सुरू ठेवले. त्याच्या हातात जे काही आहे ते त्याला आपल्याकडे देण्याची इच्छा आहे का, असे विचारल्यावर त्याने नकार दिला. त्यांना अशा प्रकारे बोलण्यात गुंतवून ठेवल्यावर काही वेळाने पोलिसांची गाडी आली. पोलिस आल्यावर हे हल्लेखोर धावत सुटले. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्या पायावर गोळ्या घातल्या असाव्यात, अशी माहिती या धाडसी महिलेने दिली. या महिलेच्या धाडसाचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी कौतुक केले आहे.


Read More »

मय्यपन हाजीर हो !

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी असलेला चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मय्यपनला चौकशीसाठी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तात्काळ हजर राहण्यास मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
मुंबई - स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी असलेला चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मय्यपनला चौकशीसाठी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तात्काळ हजर राहण्यास मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
मय्यपनविरोधात पोलिसांनी गुरुवारी समन्स बजावला होता.या समन्समध्ये गुरुनाथ मय्यपनने मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागासमोर शुक्रवारी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हजर रहावे असे म्हटले होते. मात्र गुन्हे अन्वेषण विभागापुढे हजर राहण्यासाठी मय्यपनने मुदत वाढवून मागितली होती. ही मुदत त्याला नाकारण्यात आली आहे.संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मय्यपन हजर न झाल्यास त्याला अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, मय्यपनच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चार जणांचे एक पथक गुरुवारी चेन्नईला गेले होते. मात्र तिथेही मय्यपनची भेट होऊ शकली नाही.

Read More »

नासाच्या 'ऑपॉच्र्युनिटी'ने मोडला ४० वर्षाचा विक्रम

नासाच्या 'ऑपॉच्र्युनिटी' या मंगळावर उतरलेल्या अंतराळवाहनाने(रोव्हर)अंतराळात एखाद्या ग्रहावर उतरून केलेल्या प्रवासाच्या अंतराचा ४० वर्षाचा जुना विक्रम मोडला आहे.
नासाच्या 'ऑपॉच्र्युनिटी' या मंगळावर उतरलेल्या अंतराळवाहनाने(रोव्हर)अंतराळात एखाद्या ग्रहावर उतरून केलेल्या प्रवासाच्या अंतराचा ४० वर्षाचा जुना विक्रम मोडला आहे. सुमारे नऊ वर्षे मंगळावर संशोधनासाठी केलेल्या प्रवासानंतर नवा विक्रम करण्यात ऑपॉच्र्युनिटीला यश आले आहे. २००४मध्ये मंगळावर उतरल्यानंतर या रोव्हरने आतापर्यंत ३५.७६० किलोमीटर अंतर कापले आहे. या रोव्हरला हाताळणाऱ्या पथकाला मंगळावरून मिळालेल्या सिग्नलद्वारे कापलेल्या अंतराची पुष्टी झाली आहे. गुरुवारी या रोव्हरने ८०मीटर अंतर प्रवास केल्यावर त्याने आतापर्यंत कापलेले अंतर ३५.७६० झाल्याचे निष्पन्न झाले.
यापूर्वी १९७२मध्ये जेव्हा अपोलो १७ हे यान चंद्रावर उतरले होते, त्या वेळी युजिन सेर्नान व हॅरिसन श्मिट या अंतराळवीरांनी तीन दिवसांत त्यांचे चंद्रावर उतरवलेले वाहन सुमारे ३५.७४४ किमी चालवले होते. नासाच्या कोणत्याही वाहनाने कापलेले ते सर्वात जास्त अंतर ठरले होते व हा विक्रम अद्याप कायम होता.
मात्र हा विक्रम मोडण्यासाठीच प्रस्थापित केला होता व तो मोडला गेल्यामुळे आपल्याला अतिशय आनंद झाला आहे, असे त्या मोहिमेतील अंतराळवीर सेर्नान यांनी सांगितले आहे.
मात्र, अंतराळातील ग्रहावर सर्वात जास्त अंतर कापण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम सोव्हिएत युनियनच्या रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या 'लुनॉखोद' या अंतराळवाहनाच्या नावे आहे. या वाहनाने १९७३मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर ३७किमी. प्रवास केला होता.


Read More »

कुत्रा पाळा, हृदयविकार टाळा!

कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू आणि तितकाच प्रामाणिक पाळीव प्राणी.
कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू आणि तितकाच प्रामाणिक पाळीव प्राणी. घराची रखवाली करण्याबरोबरच मालकावर प्रेम करणारा हा प्राणी त्याच्या आरोग्यासाठीही फायदेकारक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. घरात कुत्रा असल्यास हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव वाढत आहे. त्याचा परिणाम शरीरव मानसिक हालचालींवर होत असतो. हृदयविकाराचे वाढते प्रमाण हादेखील याचाच दुष्परिणाम आहे. हा मानसिक तणाव कमी करण्यासाठी औषधोपचाराबरोबरच पाळीव प्राणी, विशेषत: कुत्रा असल्यास मोठा फायदा होतो, असे ह्युस्टन येथील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
बायलर कॉलेज ऑफ मेडिसीनचे प्राध्यापक ग्लेन एन. लेव्हिन यांनी ५,२०० व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर घरात कुत्रा असल्यास हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. ज्यांच्या घरात कुत्रा पाळलेला असतो त्यांच्या शारीरिक हालचाली मोठय़ा प्रमाणात होत असतात. कारण कुत्र्यांची घरात सारखी पळापळ चाललेली असते. त्यामुळे त्याच्या मालकाला सातत्याने त्याच्या मागे राहावे लागते. ज्या घरांमध्ये कुत्रा असतो, त्या घरांतील शारीरिक श्रमाचे प्रमाण ५४ टक्के असल्याचे आढळले. तसेच कुत्रा असल्याने तणावाचा सामना उत्तमरीत्या करता येतो, असे लेव्हिन यांनी सांगितले.
मानसिक तणाव कमी करण्यासाठी अनेक जण मनोरंजनाच्या साधनांचा वापर करतात, तर काही योगासनांकडे वळतात. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी किमान आपल्या घरी कुत्रा पाळावा. कारण ज्यांच्याकडे कुत्रा पाळलेला असतो त्यांची प्रकृती खूप चांगली व जीवन जगण्याची इच्छा खूप चांगली असते. तसेच रक्तदाबाचे आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच लठ्ठपणा कमी असतो, असे लेव्हिन यांनी केलेल्या संशोधनात आढळले. लेव्हिन यांचे हे संशोधन अमेरिकन हार्ट असोसिएशनने
प्रसिद्ध केले आहे.

Read More »

विंदू, मय्यपनची 'मॉडेल लिंक'

बीसीसीआयचे अध्यक्ष व चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन व सट्टेबाजीप्रकरणी अटकेत असलेला विंदू दारा सिंग यांचे लोखंडवाला येथे राहणा-या  दोन मॉडेलशी घनिष्ट संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे.
मुंबई - बीसीसीआयचे अध्यक्ष व चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन व सट्टेबाजीप्रकरणी अटकेत असलेला विंदू दारा सिंग यांचे लोखंडवाला येथे राहणा-या  दोन मॉडेलशी घनिष्ट संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. गुन्हे शाखेने या दोनही मॉडेल्सची चौकशी केली आहे. मय्यपन व विंदूच्या फोनच्या तपशिलावरून त्यांच्यातील संबंध उघड झाले आहेत.
या दोन मॉडेलपैकी एक मूळची हैदराबाद, तर दुसरी ओरिसा येथील रहिवासी आहे. दोघीही तीन वर्षापूर्वी मॉडेलिंगसाठी मुंबईत आल्या होत्या. वर्षभरापूर्वी एका बॉलिवुड पार्टीमध्ये त्यांची विंदूशी ओळख झाली. त्यानंतर या दोघी मय्यपनच्याही संपर्कात आल्या.
दोन्ही मॉडेलनी विंदू व मय्यपनसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे. यातील एक मॉडेल मय्यपनला चेन्नईत तीनदा, तर दुसरी एकदा भेटल्याचेही समोर आले आहे. आता गुन्हे शाखेकडून या दोन मॉडेल्सबाबतही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. या दोघींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र त्यांचे मोबाइल व लॅपटॉपसारख्या इतर तांत्रिक वस्तूंची पाहणी करण्यात आली आहे. विंदू व मॉडेल्समधील संभाषणाच्या काही ध्वनिफितीही गुन्हे शाखेकडे उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सट्टेबाज 'डी' कंपनीच्या गुंडांच्या बराकमध्ये रमेश व्यास, अशोक व्यास, पांडुरंग कदम, पंकज शहा ऊर्फ लोटस, प्रवीण बेहरा ऊर्फ पीडी, नीरज शहा ऊर्फ चिंटू या सट्टेबाजीतील सहा आरोपींना पाच तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता आर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक १०मध्ये ठेवण्यात आले आहे. याच बराकमध्ये मुस्तफा डोसा याच्यासह 'डी' कंपनीशी संबंधित गुंडांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे बुकी 'डी' कंपनीशी संबंधित असल्याचेच अप्रत्यक्षपणे सिद्ध होत आहे. कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परस्परविरोधी टोळीच्या गुंडांना एकत्र ठेवले जात नाही.
दरम्यान, गुन्हे शाखेने अटक केलेल्या बुकीने मिरा रोड येथील 'डी' कंपनीच्या एका बडय़ा बुकीच्या जावयाचा सट्टेबाजीचा व्यवसाय चालवत असल्याचे चौकशीत सांगितले आहे.
बुकी तुरुंगात तरीही 'बुक' चालूच..
सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या प्रवीण बेहरा याचे सट्टेबाजी जगतात 'पीडी' या नावाने 'बुक' चालते. त्याला अटक झाल्यानंतरही त्याच्या 'बुक'मधून सट्टेबाजीचे व्यवहार सुरू असल्याचे पुढे आले असून, यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.

Read More »

अग्निशमन व विद्युत विभाग प्रमुखांवर कारवाईची शिफारस

आगीबाबत नेमकी माहिती समोर यावी, या उद्देशाने उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.
अहमदनगर – महापालिकेच्या जुन्या इमारतीतील सभागृहाला एक मे रोजी लागलेल्या आगीत ऐतिहासिक सभागृह जळून खाक झाल्याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्या समितीने आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ व विद्युत विभागाचे प्रमुख बाळासाहेब सावळे यांच्यावर ठपका ठेवला आहे. या दोन्ही अधिका-यांची चौकशी करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली असल्याने आयुक्तांनी दोघांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
आगीबाबत नेमकी माहिती समोर यावी, या उद्देशाने उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. चौकशी समितीने अग्निशमन विभागाचे प्रमुख, अधिकारी, विद्युत विभाग प्रमुख, इमारतीतील कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी, आगीच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नागरिक अशा अनेक लोकांचे जबाब घेतले. पालिकेच्या जुन्या इमारतीचे फायर ऑडिट केल्यानंतर त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करून इमारतीत तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे होते. तसेच इमारतीत अनेक भागांत विजेच्या वायर्स धोकादायक स्थितीत असतानाही त्याची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. या गोष्टींना जबाबदार धरून चौकशी समितीने अग्निशमन विभाग प्रमुख व विद्युत विभागाचे प्रमुख यांच्यावर ठपका ठेवला.


Read More »

तुकोबारायांच्या अश्विरगणाबाबत प्रश्नचिन्ह

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे.
बारामती – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. यंदा इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल अश्विरगणाबाबत स्थानिक अतिक्रमणांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सोहळ्यापूर्वी अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. तर पालखी सोहळा प्रमुखांनी अतिक्रमणे न हटवल्यास शेकडो वर्षापूर्वीची येथील गोल अश्विरगणाची परंपरा खंडित होण्याचा इशारा दिला आहे.
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल अश्वरिंगण बेलवाडी येथे होते. या िरगण सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. मात्र, गेल्या १५ वर्षापासून रिंगण सोहळ्याच्या मैदानात अतिक्रमित घरांची संख्या वाढत आहे. या मैदानाचे जवळपास १५ एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये जवळपास पाच ते सहा एकर क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणामुळे पालखीतील रिंगण सोहळ्याला अडचणी निर्माण होतात. रिंगण सोहळा नेत्रदीपक करण्यासाठी अतिक्रमण काढावीत अन्यथा आगामी रिंगण सोहळा होणार नसल्याचा इशारा गेल्या वर्षी संत तुकाराम पालखी सोहळ्याच्या विश्वस्थांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी २० मे रोजी पालखी सोहळा प्रमुख अशोक महाराज मोरे यांनी मैदानाची पाहणी करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यामुळे पुन्हा एकदा रिंगण सोहळ्याचा विषय ऐरणीवर आला आहे. सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितले की, सध्या तरी अतिक्रमण जैसे थे आहे. ग्रामपंचायत पदाधिका-यांनी सोहळ्यापूर्वी हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. २७ मे रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांसमवेत होणा-या बैठकीत हा विषय मांडला जाणार आहे. रिंगण सोहळा नेत्रदीपक होण्यासाठी अधिक जागा आवश्यक आहेत. अतिक्रमणावर प्रशासन अंकुश ठेवू शकले नाही. यावर प्रशासन लवकरच तोडगा काढेल, अशी अपेक्षा आहे.
बेलवाडीचे उपसरपंच अनिल खैरे यांनी सांगितले की, गट नं. १३८ मधील रिंगण सोहळा मैदानाच्या मोजणीसाठी १५ हजार रुपये शुल्क ग्रामपंचायतीने जमा केले आहे. एक जून रोजी मोजणी होईल. त्यानंतर अतिक्रमित घरे स्थलांतर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याबाबत प्रांताधिका-यांसह जिल्हाधिका-यांना देखील माहिती देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

Read More »

कोकणात सुरू मिरगाची बेगमी

या वर्षी मान्सून जूनपूर्वी दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे, तसेच वातावरणातही बदल जाणवू लागल्यामुळे पावसाची चाहूल शेतक-यांना लागली आहे.
कणकवली – या वर्षी मान्सून जूनपूर्वी दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे, तसेच वातावरणातही बदल जाणवू लागल्यामुळे पावसाची चाहूल शेतक-यांना लागली आहे. सात जूनला मृग नक्षत्र आहे. या मृग नक्षत्राला मालवणी भाषेत मिरग म्हटले जाते. पावसाची चाहूल लागण्यापूर्वीच पावसाळय़ाची बेगमी करण्याची पद्धत परंपरागत सुरू आहे.
कोकणात ग्रामीण भागात पावसाळ्यात प्रवास करणे फार कठीण असते. शिवाय मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर नदी-नाले दुथडी भरून वाहू लागतात. त्यामुळे शेतकरी लोक संसारोपयोगी लागणा-या सर्व वस्तू मे महिन्यातच घरी नेऊन ठेवतात. चालू मे महिन्यात गेले दोन आठवडे लोकांची गर्दी कणकवली बाजारपेठेत होती. मंगळवारी बाजार असल्यामुळे लोकांनी कांदे, मिरची, बटाटे, मसाला, सुकी मच्छी आदी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. मिरचीचा भाव दर आठवडय़ाला वाढत आहे. १०० रुपयांपासून ते १७० रुपयांपर्यंत मिरचीचा भाव आहे. कांदे घाऊक दराने खरेदी करण्याकडे लोकांचा कल जास्त होता. बाजारपेठेत महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
कोकणात भातशेतीला जास्त महत्त्व आहे. कोकणातील एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ ७० ते ८० टक्के शेतकरी भातशेतीचे उत्पन्न घेतात. जून महिना सुरू झाल्यानंतर केव्हाही पाऊस लागेल, असे चित्र असल्यामुळे शेतक-यांना बाजारहाट करता येत नाही. यासाठी शेतकरी वर्गाने मिरची, कांदे अशा प्रकारच्या संसारोपयोगी वस्तू घेऊन पावसाची बेगमी केली आहे.

Read More »

…तर पालिका अधिका-यांना नाल्यात बुडवणार!

नालेसफाईच्या कामासाठी केडीएमसी प्रशासनाने उशिरा का होईना, हालचाली सुरू केल्या आहेत.


संग्रहित छायाचित्र
कल्याण – नालेसफाईच्या कामासाठी केडीएमसी प्रशासनाने उशिरा का होईना, हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी ९० तर छोट्या नाल्यांसाठी ७० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सफाईचे हे काम मजूर संस्थांमार्फत करण्यात येणार असल्याचेही पालिका आयुक्तांनी म्हटले आहे. मात्र, मे महिना संपत आला तरी नालेसफाई सुरू न झाल्याने पालिकेतील सदस्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सभागृह नेते रवी पाटील यांनी तर पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्यास पालिका अधिका-यांनाच नाल्यात बुडवण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील छोट्या नाल्यांची सफाई मजूर संस्थांमार्फत करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, उपायुक्त अनिल डोंगरे यांनी ही कामे पालिका कर्मचा-यांमार्फत करण्यात येतील, असे आदेश दिल्याची चुकीची माहिती सदस्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी महापौर कल्याणी पाटील यांच्याकडे धाव घेतली. महापौर पाटील यांनी सभागृहनेते रवी पाटील, गटनेता कैलाश शिंदे यांच्यासह उपायुक्त गणेश देशमुख यांच्यासमवेत एक बैठक घेतली. तसेच १०७ सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
मोठे नाले जेसीबी व पोकलेनच्या मदतीने स्वच्छ करण्यात येतील. छोटे नाले मजूर संस्थांमार्फत स्वच्छ केले जातील. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली छोटी गटारे स्वच्छ करण्याचे काम पालिका कर्मचा-यांकडून केले जाणार आहे. प्रशासकीय आदेशाचा चुकीचा अर्थ सदस्यांपर्यंत पोहोचवला गेल्याने सदस्यांत संभ्रम निर्माण झाला होता. प्रत्यक्षात नालेसफाईच्या कामात कोणतीही आडकाठी करण्यात आलेली नाही. – रामनाथ सोनावणे, आयुक्त केडीएमसी
सदस्यांची नजर हातसफाईकडे?
अनेक मजूर संस्थांचे स्लिपिंग पार्टनर व अप्रत्यक्षरीत्या कंत्राटदार हे नगरसेवक असल्याने छोट्या नाल्यांच्या स्वच्छतेविषयी सदस्य आग्रही व आक्रमक झाले. सदस्यांना नालेसफाईशी काही देणे-घेणे नसून त्याच्या कामातून मिळणा-या आर्थिक व्यवहारावरच त्यांची नजर असल्याचे चित्र नालेसफाईच्या निमित्ताने समोर येत आहे.


Read More »

उजनी धरणातील पाणी सोडणे बंद

उजनी धरणातून पाणी सोडणे बुधवारी २२ मेपासून बंद करण्यात आले आहे.
बारामती – उजनी धरणातून पाणी सोडणे बुधवारी २२ मेपासून बंद करण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतक-यांनी नि:श्वास सोडला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी उजनी धरणातून आठ मेपासून पाणी सोडण्यात येत होते. २२ मेपासून धरण व्यवस्थापन विभागाने पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे गुरुवारी धरणामध्ये उणे २५.८३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर एकूण पाणीसाठा ३७.८३ टीएमसी आहे. पाणीपातळी ४८६.४६२ मीटर आहे, अशी माहिती धरण व्यवस्थापन विभागाने दिली.
तब्बल १४ दिवस उजनी धरणातून पाणी सोडल्याने दरम्यानच्या काळात शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतक-यांनी लाखो रुपये चारी खोदणे, पाइप, केबलसाठी खर्च झाले आहेत. हा खर्च करताना शेतकरी मेटाकुटीस आला होता. मात्र, पाणीपातळी खालावल्याने भीमा नदीचे पात्र भिगवण भागात कोरडे पडले आहे. तर नदीपात्रात केवळ चिखल, गाळ, दलदल यामुळे खर्च करूनदेखील पाण्याच्या ठिकाणी जलवाहिन्या टाकता आलेल्या नाहीत. तसेच खोदलेल्या च-यांनाही पाणी येत नसल्याने शेतक-यांचे लाखो रुपये पाण्यात गेल्यातच जमा आहेत.
भीमा नदीकाठावरील जवळपास १९ गावांच्या उजनी धरणावरील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्या गावांना हातपंप व विंधन विहिरीवरून पाणीपुरवठा होत आहे. पुढील महिन्यापर्यंत पाऊस व्यवस्थित झाला नाही, तर या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी इंदापूर पंचायत समितीकडून विशेष मोहीम हाती घेण्याचे ठरवले. उजनी धरणातील पाणी आता सोडू नये, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, येत्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पुन्हा पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करावे. उजनी धरण व्यवस्थापनाने पुढील वर्षी अशी वेळ येऊ नये, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतक-यांकडून होत आहे. त्यासाठी पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
उजनी धरण व्यवस्थापनाने धरणातून पाणी सोडणे बंद केल्यामुळे शेतक-यांनी नि:श्वास सोडला असला तरी पुन्हा धरणातून पाणी सोडले जाईल की काय, अशी भीती ही व्यक्त केली जात असल्यामुळे अनेकांनी शेतातील ऊस तोडून जनावरांना घालण्यास सुरुवात केली आहे.


Read More »

विकासक तुपाशी,शेतकरी उपाशी


नागरिकरणाचा वेग झपाट्याने वाढत असलेल्या कल्याण, उल्हासनगर नवी मुंबई, ठाणे या चार महापालिकोंच्या मधोमध वसलेल्या २७ गावांतील शेतक-यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
डोंबिवली – नागरिकरणाचा वेग झपाट्याने वाढत असलेल्या कल्याण, उल्हासनगर नवी मुंबई, ठाणे या चार महापालिकोंच्या मधोमध वसलेल्या २७ गावांतील शेतक-यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. बिल्डर लॉबीने या भागात शेकडो एकर जमिनी खरेदी करून गावक-यांचीच नाकेबंदी सुरू केली आहे. स्पेशल टाऊनशिपच्या नावाखाली विकासकांना बांधकाम परवानग्या मिळत आहेत. मात्र, २७ गावांचा विकास आराखडा मंजूर झाला नसल्याने येथील गावक-यांना राहण्यासाठी घरही बांधणे तर दूरच पोटापाण्यासाठी शेतीचे पीकही घेता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे विकास आराखडा प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनधिकृत बांधकामेच करावी लागतील, असा इशाराही त्यांनी सरकारला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिकेतून २००३ रोजी २७ गावे वगळण्यात आली. मागील दहा वर्षापासून २७ गावात नियोजन प्राधिकरण नाही. २००६ रोजी कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीएची) नेमणूक झाली. 'एमएमआरडीए'ची नेमणूक होऊन सात वर्षे उलटली. या भागासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला. मात्र, विकास नियमावलीला आजपर्यंत अंतिम मंजुरी मिळालेली नाही. विकास आराखडा जाहीर होत नसल्याने संबंधित शेतक-यांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२७ गावाचा विकास आराखडा लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे. शेतक-यांकडे जमीन आहे. मात्र, या जमिनीत बारमाही गटारांचे पाणी साचत असल्याने ती कसताच येत नाही. कोणतेही पीक घेता येत नाही. सर्व शेती ओसाड पडून आहे. त्यामुळे त्यांना उपजिवीकेचे साधनच उरलेले नाही. येथील शेतकरी परिसरातील कारखान्यांत नोकरी करून कुटुंबाची गुजराण करत आहेत.
मात्र, या भागातील कारखाने बंद पडल्याने बेरोजगार झालेल्या गावातील अनेकांना रोजंदारीवर काम करावे लागत आहे. जमिनीवर बांधकाम करून कुटुंबीयांसाठी उपजिवीकेची व्यवस्था करावी तर कायद्याची बांधकाम परवानगी देणारी व्यवस्था नाही. 'एमएमआरडीए' या भागात दोन एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक)देते. मात्र, त्यात साधे राहते घरही बांधता येत नाही. ही शेतक-यांची चालवलेली थट्टा असल्याची नाराजी स्थानिकांतून व्यक्त होत आहे.

Read More »

ठाण्यात सेना-राष्ट्रवादी आमने-सामने

ठाणे रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत.
ठाणे - ठाणे रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत. सेनेला ठाणे पूर्वेकडे नवा सॅटिस प्रकल्प उभारायचा आहे तर राष्ट्रवादीला ठाणे स्थानक परिसराचा 'मेकओव्हर' करण्याचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडत आहे. त्यामुळे या घोषणा प्रत्यक्ष अंमलात येतील की हवेत विरतील, असा सवाल ठाणेकरांतून उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीने कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट केला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांकडून या कामाची प्रशंसा होत आहे. कोपरी पाचपाखाडी येथील आमदार एकनाथ शिंदे यांनी कोपरी पूर्व आनंदनगर ते ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस थांब्यांपर्यंत सॅटिसची तयारी सुरू करून मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवास करणा-या ठाणे रेल्वे स्थानकातील सुविधांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांत नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी खासदार संजीव नाईक यांनी ठाणे स्थानकाला हेरिटेजच्या दर्जा देण्याबरोबर, प्रवाशांच्या सोयीसाठी सरकत्या जिन्यांची सुविधा केली आहे. भिकारी आणि फेरीवाल्यांनी वेढलेला ठाणे स्थानक परिसर मुक्त करण्याचा निर्धार खासदार नाईक यांनी केला आहे. त्यामुळे सेनेच्या आमदारांकडून बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद मंजूर नसताना महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्याकरवी आनंदनगर ते ठाणे स्थानक असा एक किमी लांबीच्या सॅटिस प्रकल्पाच्या निर्मितीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यास सांगण्यात आले आहे.
हा सॅटिस पूल एक किमी लांब व जवळपास ३०० ते ४०० मीटर रुंदीचा राहणार आहे. या मार्गावरील काही इमारतींसह अनेकांचे पुनर्वसन करण्याचे धारिष्ट्य पालिकेला दाखवावे लागणार आहे. हा सॅटिस पूल भविष्यात सर्व सोपस्कार पार पाडून किती वर्षात पूर्ण होईल, याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. मात्र, सध्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेकडून ठाणेकरांच्या स्वप्नातील ठाणे स्थानक परिसराचा कायापालट करण्याचे आश्वासन मिळू लागले आहे.
ठाणे स्थानक परिसराच्या विकासासाठी एक कोटी
ठाणे स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी खासदार संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून एक कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्या दृष्टीने एक मास्टर प्लॅनही तयार करण्यात आला आहे. स्थानक परिसरातील रिक्षातळात सुधारणा, सॅटिसच्या पाय-या सुधारणे आदी कामांचा समावेश आहे. ठाणे स्थानक ते विटावादरम्यान स्कायवॉकला परवानगी मिळाली आहे. ठाणे ते डोंबिवली रेल्वेरुळालगत समांतर रस्त्याला 'एमएमआरडीए'ने मान्यता दिली आहे. ठाणे पश्चिमेकडील बहुमजली पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Read More »

मुंबईसमोर राजस्थानचे आव्हान

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यातील विजेता 'फायनल'मध्ये खेळणार असल्याने दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोलकाता- आयपीएल-६ मधील अंतिम फेरीतील दुसरा संघ शुक्रवारी (२४ मे) निश्चित होईल. ईडन गार्डन्सवर होणा-या 'क्वालिफायर-२' मध्ये मुंबई इंडियन्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल. यातील विजेता 'फायनल'मध्ये खेळणार असल्याने दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अव्वल दोन संघांत स्थान पटकावण्यात यश आले तरी 'क्वालिफायर-१' मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबईने निराशा केली. मात्र त्या लढतीतील पराभूत संघाला आणखी एक संधी मिळते. राजस्थानविरुद्ध त्याचा फायदा मुंबई संघ उठवेल का? २०१० नंतर पुन्हा एकदा मुंबईला अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. दुसरीकडे, 'स्पॉटफिक्सिंग'च्या आरोपांखाली वावरणा-या राजस्थानची मैदानावरील कामगिरी मात्र प्रत्येक सामन्यागणिक उंचावत आहे. 'एलिमिनेटर'मध्ये हैदराबाद सनरायझर्सला हरवल्याने त्यांना पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याची संधी चालून आली आहे. पहिल्या आवृत्तीत (२००८) त्यांनी अंतिम फेरीत पोहोचताना जेतेपद पटकावले होते. साखळीचा विचार केल्यास मुंबईचे पारडे जड वाटते. मुंबईने चेन्नईप्रमाणेच सर्वाधिक ११ सामने जिंकलेत. राजस्थानला १० सामने जिंकता आले. मात्र मुंबई आणि चेन्नईसह त्यांच्यात साम्य म्हणजे राजस्थानने घरच्या मैदानावरील (होम) सर्वच्या सर्व आठ सामने जिंकलेत.
मुंबई संघ समतोल वाटतो. त्यांच्यात अनेक 'स्टार' क्रिकेटपटूंचा समावेश आहे. क्रिकेटपटूंचा योग्य उपयोग करवून घेण्यात संघ व्यवस्थापनाला अपयश येत आहे. मुंबईला सलामीचा प्रश्न प्रकर्षाने भेडसावतोय. सचिन आणि रिकी पाँटिंग, सचिन आणि ड्वायेन स्मिथ तसेच आदित्य तरे आणि स्मिथ अशा अनेक जोडय़ांचा प्रयोग मुंबईने केला. मात्र तो अयशस्वी ठरला आहे. सध्या स्मिथ चांगला खेळत असला तरी त्याला चांगला जोडीदार मिळत नाही. दमदार सलामी होत नसल्यामुळे मधल्या फळीवर अधिक ताण पडत आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे गेल्या तीन लढतीत न खेळलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. स्मिथसह कर्णधार रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू आणि कीरॉन पोलार्डवर फलंदाजीची भिस्त आहे. मात्र त्यांना सातत्य राखता आलेले नाही. मिचेल जॉन्सन आणि लसित मलिंगा या तेज दुकलीवर मुंबईची गोलंदाजीची भिस्त आहे. त्यांना हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा हा फिरकी जोडीकडून चांगली साथ अपेक्षित आहे. धवल कुलकर्णी उर्वरित लढतींना मुकल्याने मुंबईला पाचव्या गोलंदाजांची उणीव भासते आहे. त्याच्या जागी मुनाफ पटेलला खेळवण्याची अधिक शक्यता वाटते.
कर्णधार राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे या सलामी जोडीने ब-यापैकी सातत्य राखले तरी शेन वॉटसन आणि ब्रॅड हॉज या फटकेबाज जोडीवर राजस्थानची फलंदाजीची मदार आहे. स्टुअर्ट बिन्नी आणि संजू सॅमसनने मधल्या फळीत चांगले योगदान दिले आहे. राजस्थानची गोलंदाजी खूपच प्रभावी वाटते. जेम्स फॉकनर आणि केवॉन कूपरने अचूक मारा केला आहे. त्यांना शेन वॉटसन आणि सिद्धार्थ त्रिवेदीची चांगली साथ लाभली आहे. साखळीत मुंबई आणि राजस्थानने प्रत्येकी एक सामना जिंकलाय. मात्र 'प्ले ऑफ' फेरी त्रयस्थ ठिकाणी खेळावी लागत आहे. त्यातच ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबाबत भाकीत करणे कठीण असते. त्यामुळे दोन्ही संघांचा कस लागेल.
वॉटसन-पोलार्ड पुन्हा आमनेसामने
'क्वॉलिफायर-२'च्या निमित्ताने वॉटसन आणि पोलार्ड पुन्हा आमनेसामने येतील. शेवटच्या साखळी लढतीत वानखेडे स्टेडियमवर दोघांमध्ये खूप 'खुन्नस' दिसली. वास्तविक पाहता पोलार्डने वॉटसनला अधिक डिवचले. ईडन गार्डन्सवर दोघांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. मात्र मैदानात कसे वावरतात, याची तितकीच उत्सुकता आहे.

Read More »

आयुक्त राजीव राहणार की जाणार?

ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेपुढे मान न तुकवता त्यांना हैराण करून सोडणारे आयुक्त आर. ए. राजीव यांचा कार्यकाळ शनिवारी संपत असल्याने अनेकांना उकळय़ा फुटल्या आहेत.
ठाणे – महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेपुढे मान न तुकवता त्यांना हैराण करून सोडणारे आयुक्त आर. ए. राजीव यांचा कार्यकाळ शनिवारी संपत असल्याने अनेकांना उकळय़ा फुटल्या आहेत. राजीव हे सध्या रजेवर असल्याने रजा संपून ते पुन्हा येणार की जाणार, असे आखाडेही बांधले जाऊ लागले आहेत.
राजीव यांची कार्यपद्धती जर हटके असल्याने त्यांना थेट विरोध करण्याच्या भानगडीत शिवसेना कधी पडली नाही. तत्पूर्वी तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी ठाणे शहराच्या विकासात आघाडीची भूमिका बजावल्याने त्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने जीवाचे रान केले होते. आता विद्यमान आयुक्त राजीव यांचा कार्यकाळ संपत आल्याने ते जातील किंवा राहतील हे सरकारच्या हाती आहे. शिवसेना नेत्यांनी मात्र ते येथून जावेत यासाठी आकाशपाताळ एक करण्यासाठी तयारी चालवली आहे. मात्र, राजीव यांची बदली होऊन त्यांच्या जागी येणारा आयुक्त सरकारच्या मर्जीतील असल्यास शिवसेनेला भारी पडणार आहे.
राजीव यांनी २५ मे २०१० रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. हा कार्यकाळ २५ मे २०१३ मध्ये संपणार आहे. तत्पूर्वी ते २९ एप्रिल ते ९ जूनपर्यंत रजेवर गेले आहेत. त्याचदरम्यान त्यांचा कार्यकाल संपत असल्याने ते रजेवरून परत पालिकेत येणार की राज्य सरकारकडे परत जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सरकारी नियमाप्रमाणे कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती तीन वर्षे ग्राह्य धरली जाते. त्यामुळे राजीव यांचा कार्यकाळ संपत असल्याने सरकार त्यांना मुदतवाढ देणार की त्यांची नियमाप्रमाणे बदली करणार हा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे.
राजीव यांचा कार्यकाळ वादळी व वादग्रस्त ठरला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांबद्दल त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी ते डोकेदुखी ठरले. ठाणे महापालिका क्षेत्रात मूल्यावर आधारित करप्रणाली राबवण्यासाठी राजीव आग्रही होते. त्या वेळी शिवसेनेने कर आकारणीसाठी प्रथम पाठिंबा दर्शवला. मात्र, जनमताच्या रेटय़ामुळे हा पाठिंबा काढून घेतला व आयुक्तांना तोंडघशी पाडले. त्यानंतर ठाणेकरांसाठी महत्त्वाचा ठरणा-या 'एलआरटी' प्रकल्पालाही विरोध दर्शवण्याचे काम शिवसेनेने केले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांच्या विरोधाची हवा निघून गेली. शीळ येथील इमारत दुर्घटनेनंतर आयुक्तांनी पावसाळय़ापूर्वी शहरातील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली. ही कारवाई शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या विधानसभाक्षेत्रात सुरू झाल्यावर सेनेने ओरड सुरू केली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी धरून शहरात बंद घडवून आणून शहरवासीयांना वेठीस धरण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.


Read More »

अनिल-प्रिती एकत्र

मुंबईत झालेल्या ‘इश्क इन पॅरिस’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री प्रिती झिंटा एकत्र आले होते.


Read More »

गस्त वाढवली…

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे तीन जवान शहीद झाले. या घटनेनंतर या भागातील सुरक्षा  व्यवस्था वाढवण्यात आली होती.


Read More »

'जवान अमर रहे'

देशप्रेमासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या शहीद जवानांना कून्नूर येथे आदरांजली वाहण्यात आली.


Read More »

कम्प्युटरची विक्री वाढली

आयपॅड आणि लॅपटॉपच्या स्पर्धेमध्येही कम्प्युटरने बाजारातील आपली क्रेझ कायम ठेवली आहे.

बंगळूरु- आयपॅड आणि लॅपटॉपच्या स्पर्धेमध्येही कम्प्युटरने बाजारातील आपली क्रेझ कायम ठेवली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च या तिमाहीत कम्प्युटरच्या विक्रीत ७.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
सरकारी कार्यालये, आयटी कंपन्यांकडून कम्प्युटरची मागणी वाढली. जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशात २७ लाख १० हजार कम्प्युटरची विक्री झाली. यामध्ये ब्रँडेड डेक्सटॉपला अधिक मागणी होती, असे 'आयडीसी'ने आपल्या अहवालात म्हटले आहे. तर सर्वसामान्यांकडून मात्र कम्प्युटरला फारच कमी मागणी आहे. या तिमाहीत यामध्ये केवळ १.५ टक्क्याची वाढ झाली.
'एचपी'ने कम्प्युटरच्या विक्रीमध्ये बाजी मारली असून बाजारातील हिस्सा २२.५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तसेच एसर आणि डेल संयुक्तपणे दुस-या स्थानी असून त्यांचा हिस्सा १३.८ टक्के आहे. सरकारकडून आणि 'बीएफएसआय'कडील मोठी मागणी वाढल्याने पहिल्या तिमाहीत एचपीला फायदा झाला असल्याचे 'आयडीसी'चे बाजार विश्लेषक मनीष यादव यांनी सांगितले.

Read More »

उफफss… हा उकाडा

अलाहबादमध्ये उका़ड़्याने हैराण झालेल्या या तरुणींनी कडक उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी स्कार्फचा वापर केला आहे.


Read More »

चंद्र आहे साक्षीला…

मावळता सूर्य आणि ढगाआड लपलेला चंद्र यांचा अनोखा मिलाफ गुरुवारी फ्लोरिडामध्ये पहायला मिळाला.


Read More »

२७ हजार भारतीय सौदी अरेबिया सोडणार

सौदी अरेबियामध्ये नवे कामगार धोरण मंजूर झाल्यानंतर तेथे नोकरी करणा-या २७ हजार भारतीय नागरिकांनी मायदेशी परतण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

रियाध – सौदी अरेबियामध्ये नवे कामगार धोरण मंजूर झाल्यानंतर तेथे नोकरी करणा-या २७ हजार भारतीय नागरिकांनी मायदेशी परतण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या नागरिकांचा मायदेशी परतण्याचा मार्ग सुलभ व्हावा यासाठी भारत सरकार २७ हजार आपत्कालीन प्रमाणपत्रे देणार आहे.
भारतीय दूतावासाने आप्तकालीन प्रमाणपत्र मंजूर झालेल्या नागिरकांची दुसरी यादी प्रसिध्द केली आहे. आप्तकालीन प्रमाणपत्रासाठी रियाधमधून २४ हजार तर पूर्व प्रांतातून ३,७०० अर्ज दाखल झाल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे. आप्तकालीन प्रमाणपत्रासाठी भारताने सौदी अरेबियात ठिकठिकाणी मदतकेंद्रे सुरु केली आहेत.
सौदी अरेबियात निताकत कामगार कायदा मंजूर झाला आहे. या नव्या कायद्यानुसार स्थानिक कंपनीला दहा स्थलांतरित कामगारांमागे एका सौदी नागरिकाला नोकरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद शुक्रवारी सौदी अरेबियाच्या दौ-यावर रवाना झाले आहेत. गेल्या पाचवर्षातील भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा हा पहिलच सौदी दौरा आहे.

Read More »

बीसीसीआय अध्यक्ष राजीनामा देणार ?

बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांचे नाव आल्याने श्रीनिवासन अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नवी दिल्ली - आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांचे नाव आल्याने श्रीनिवासन अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाशी संलग्न असणा-या क्रिकेट संघटनांनी श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदी कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर, श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बीसीसीआयमधील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआयचे माजी अध्यक्ष मनोहर यांच्या सल्ल्यावर श्रीनिवासन यांचे अध्यक्षपदाचे भवितव्य ब-याच प्रमाणात अवलंबून रहाणार आहे.
काही संघटना या मुद्यावर परस्परांच्या संपर्कात आहेत. बीसीसीआयमध्ये संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मनोहर बीसीआयमधील विश्वासार्ह व्यक्तिमत्व आहे. मनोहर यांची स्वच्छ प्रतिमा आणि निर्णयातील निपक्षपातीपणा यामुळे बीसीसीआयमध्ये त्यांचा आदर केला जातो.
मनोहर यांचे मत स्वीकारणे बंधनकारक नाही किंवा अंतिमही नाही तरी त्यांच्या मतावर अन्य संघटना भूमिका ठरवू शकतात त्यामुळे श्रीनिवासन यांचे अध्यक्षपद आता ब-याच प्रमाणात मनोहर यांच्या मतावर अवलंबून आहे असे बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या एका सदस्याने वृत्तसंस्थेला सांगितले. जगमोहन दालमिया, ललित मोदी यांची भ्रष्टाचाराच्या मुद्यावर हकालपट्टी झाली मग श्रीनिवासन यांना वेगळा न्याय का ?  असा सवाल या सदस्याने केला.

Read More »

काबूलमध्ये साखळी बॉम्बस्फोट

अफगाणिस्तानमधील काबूल येथे भारतीय दूतावासाजवळ तीन साखळी बॉम्बस्फोट झाले.

काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे भारतीय दूतावासाजवळ तीन साखळी बॉम्बस्फोट झाले असून अद्यापही धुमश्चक्री चालू आहे. भारतीय दूतावासाजवळ ५०० मीटर अंतरावर हे तीन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. दहा मिनिटांच्या आत हे तीन बॉम्बस्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे स्फोट नेमके कोणी घडवून आणले याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.
या स्फोटांमुळे भारतीय दूतावासाला कसलेही नुकसान झाले नसून सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे समजते. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.

Read More »

फिक्सिंग विरोधात कठोर कायदा करा – राजीव शुक्ला

आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनी शुक्रवारी केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांच्याकडे फिक्सिंग विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली.

नवी दिल्ली - आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने डागाळलेली भारतीय क्रिकेटची प्रतिमा सुधारण्यासाठी आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनी शुक्रवारी केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतली व फिक्सिंग विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली.
फिक्सिंगच्या घटना मोडीत काढण्यासाठी आम्ही सिब्बल यांच्याकडे लवकरात लवकर कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे असे राजीव शुक्ला यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
फिक्सिंग विरोधात कायदा नसल्याने काही जण त्याचा फायदा उचलत आहेत. फिक्सिंग करणा-यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. लवकरात लवकर या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असे शुक्ला यांनी सांगितले. आम्ही लवकरच केंद्रीय क्रिडामंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कठोर कायदा करण्याची मागणी करणार आहोत असे शुक्ला यांनी सांगितले.

Read More »

विंदूच्या पोलिस कोठडीत वाढ

विंदू दारा सिंगला शुक्रवारी मुंबईतील स्थानिक न्यायालयाने जामीन नाकारला तसेच त्याच्या पोलिस कोठडीत २८ मे पर्यंत वाढ केली आहे.

मुंबई - आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेला विंदू दारा सिंगला शुक्रवारी मुंबईतील स्थानिक न्यायालयाने जामीन नाकारला तसेच त्याच्या पोलिस कोठडीत २८ मे पर्यंत वाढ केली आहे. विंदूवर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगसाठी बुकींना मदत केल्याचा आरोप आहे.
विंदूचे काही क्रिकेटपटूंशी जवळचे संबंध होते त्यांच्या मार्फत तो बुकींना मदत करत असल्याचा आरोप आहे. राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू एस.श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक झाल्यानंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत.
बिग बॉस ३ मुळे विंदू दारा सिंहला ओळख मिळाली. विंदू दारा सिंहला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मंगळवारी अटक झाली. पोलिस चौकशीत त्याने विराट कोहली आणि हरभजन सिंगशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले आहे.

Read More »

"कोलकात्यात ढोणी"

आयपीएल सहाच्या अंतिम सामन्यासाठी कर्णधार महेंद्रसिंह ढोणीचे पत्नी साक्षीसह कोलकात्यात आगमन झाले.


Read More »

"सेबीची रौप्य महोत्सव"

सेबीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी पोटेज स्टॅम्पचे अनावरण केले.


Read More »

"पावसाचा खेळ"

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील प्लेऑफच्या महत्वाच्या सामन्यापूर्वी कोलकात्याच्या इडन गार्डनवर पावसाचा खेळ रंगला.



Read More »

आयपीएल LIVE राजस्थानची प्रथम फलंदाजी

क्वालिफायर-२ मध्ये मुंबई इंडिन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होत आहे.  राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता - आयपीएल सहाच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये क्वालिफायर-२ चा सामना होत आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
लाईव्ह स्कोरसाठी येथे क्लिक करा 
क्वालिफायर-१ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुध्द मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. गुणतालिकेत अव्वल दोन संघांमध्ये असल्याने मुंबईला अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी पुन्हा एक संधी मिळाली आहे.
दोन्ही संघ तुल्यबळ असून, यंदाच्या मोसमात दोन्ही संघांनी सरस कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात जो संघ कामगिरी उंचावेल त्या संघासाठी अंतिम फेरीचे दरवाजे उघडे होणार आहेत.
आयपीएल अपडेटसाठी येथे क्लिक करा 

Read More »

वादग्रस्त अंपायर

आयपीएलच्या सहाव्या हंगामातील स्पॉटफिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचे अंपायर असद रौफ यांची चौकशी होणार असल्याचे मुंबई पोलिसांनी जाहीर केल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याची गंभीर दखल घेत रौफ यांना आगामी चँपियन्स ट्रॉफीमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ५७ वर्षीय रौफ यांची अंपायर म्हणून कारकीर्द सर्वोत्तम आहे. गेल्या १३ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अंपायर म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. २००० मध्ये वनडेत आणि २००५ मध्ये कसोटीत त्यांनी पहिल्यांदा पंचगिरी केली. त्यानंतर आजवर ७२ वनडे आणि २९ कसोटींमध्ये रौफ यांनी अंपायर म्हणून काम पाहिले. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणारे रौफ मैदानाबाहेर मात्र वादग्रस्त ठरले. त्यामुळे त्यांच्या सुरेख पंचगिरीवर पाणी फेरले आहे. आयपीएलमध्ये मैदानाबाहेरील घडामोडींवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केल्याचे जाणवले. राजस्थान रॉयल्सचे तीन क्रिकेटपटू गुंतल्याचे कळल्यानंतर स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रूतली आहेत, याचा अंदाज आला. प्रथम क्रिकेटपटू आणि त्यानंतर बॉलीवुड कलाकार विंदू दारासिंगच्या मुसक्या आवळल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली. विंदूने त्याच्या चौकशीदरम्यान रौफ यांचे नाव घेतले. विंदूच्या संपर्कात असलेला बुकी पवन जयपूर हा रौफ यांना महागडया वस्तू तसेच पैसे पुरवायचा. त्याचप्रमाणे पवनने त्यांना अनेक परदेशी वाऱ्या घडवून असल्याचे विंदूने पोलिसांना दिली असल्याचे समजते. फिक्सिंग आणि पाकिस्तानचे जुने नाते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिक्सिंगचे एक केंद्र म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जात आहे. क्रिकेटचा विचार केल्यास १९९९-२००० मध्ये उघडकीस आलेल्या मॅचफिक्सिंग प्रकरणात माजी कर्णधार सलीम मलिकचा समावेश होता. त्यानंतर तीन वर्षापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंनी 'स्पॉटफिक्सिंग' केले. इंग्लंडमधील एका दैनिकाच्या 'स्टिंग ऑपरेशन'नंतर स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी तिन्ही क्रिकेटपटूंना अटक केली. त्यानंतर त्यांना शिक्षाही झाले. क्रिकेटपटूंप्रमाणे अंपायरही फिक्सिंग गुंतल्याचे गतवर्षी सर्व जगासमोर आले. त्यात पाकिस्तानचे नदीम घौरी आणि अनीस सिद्दीकी, बांगलादेशचे नादीर शाह तसेच श्रीलंकेचे गामिनी दिसानायके, मॉरिस विन्स्टन आणि सागरा गालागे असे सहा अंपायर त्यात गुंतले होते. या प्रकरणी पाकिस्तान बोर्डाने नदीम घौरी यांच्यावर चार वर्षाची बंदी घातली आहे. घौरी यांच्या पाठोपाठ रौफ यांचे नाव फिक्सिंगमध्ये आल्याने पाकिस्तानचे सर्वच अंपायर संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. मैदानाबाहेरील घडामोडींमुळे असद रौफ यापूर्वी चर्चेत आले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुंबईस्थित लीना कपूर नामक मॉडेलने गेल्या वर्षी केला होता. रौफ यांच्या सोबतचे फोटो तिने प्रसिद्ध केले होते. सुरुवातीला रौफ यांनी आरोप फेटाळले. मात्र सर्व काही आपल्याविरुद्ध जात आहे, असे लक्षात येताच त्यांनी सर्व काही मान्य केले. मॉडेल लीनाच्या प्रकरणातून रौफ सहीसलामत बाहेर पडले तरी स्पॉटफिक्सिंग प्रकरण त्यांना चांगलेच शेकणार, हे निश्चित.


Read More »

प्रहार बातम्या – २४ मे २०१३
नमस्कार प्रहार बातम्यांमध्ये आपल स्वागत……
» श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची शक्यता वाढली
» महाराष्ट्रात सुंदर शहरांसाठी सिंगापूर सरकार करणार सहकार्य
» विंदू दारासिंहच्या पोलिस कोठडीत वाढ
» २७ हजार भारतीय सौदी अरेबिया सोडणार
» सहाराचा भारतीय संघाचे प्रायोजकत्व काढण्याचा इशारा
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा… 24052013



Read More »

पाकिस्तानचे संशयास्पद विमान उतरवले

लाहोरहून मॅँचेस्टरकडे निघालेल्या पाकिस्तानच्या विमानाचा संशय आल्याने ते तातडीने स्टॅँडफोर्डच्या दहशतवादविरोधी विमानतळावर उतरवण्यात आले.
लंडन- मॅँचेस्टरकडे निघालेले पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाचा संशय आल्याने ते तातडीने स्टॅँडफोर्डच्या दहशतवादविरोधी विमानतळावर उतरवण्यात आले.
यासाठी ब्रिटिश हवाई दलाच्या दोन विमानांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे विमान लाहोरहून आले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Read More »

तैवानकडूनही भारत पराभूत

चुरशीच्या लढतीत तैवानकडून १-२ असे पराभूत व्हावे लागल्याने एएफसी महिलांचा आशियाई चषक (पात्रता फेरी) स्पर्धेतील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
रामल्ला – चुरशीच्या लढतीत तैवानकडून १-२ असे पराभूत व्हावे लागल्याने एएफसी महिलांचा आशियाई चषक (पात्रता फेरी) स्पर्धेतील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे.
दोन्ही संघांची कामगिरी चांगली झाल्याने पहिल्या सत्रात केवळ एक गोल झाला. ४३व्या मिनिटाला यु सिउ चिनने तैवानचे खाते उघडले. मध्यंतराला १-० अशी आघाडी घेण्याचा तैवानचा आनंद फार काळ टिकला नाही. ५३व्या मिनिटाला सस्मिता मलिकने भारताला बरोबरी गाठून दिली. सामना बरोबरीत सुटणार, असे वाटत असतानाच ८१व्या मिनिटाला लाइ लि चिनने केलेला गोल तैवानला तारून गेला.
भारताविरुद्धच्या विजयानंतर तैवानने दोन सामन्यांत सहा गुण मिळवत पुढील फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. म्यानमारचेही दोन लढतींतून सहा गुण झालेत. अन्य लढतीत त्यांनी पॅलेस्टाइनचा ९-० असा धुव्वा उडवला. म्यानमार आणि तैवानविरुद्धच्या पराभवांमुळे भारताची गुणांची पाटी कोरीच आहे. यजमान पॅलेस्टाइनचीही तीच अवस्था आहे.

Read More »

जोकोविच-नाडाल उपांत्य फेरीत आमनेसामने?

 नोवाक जोकोविच आणि फ्रेंच ओपनचा बादशाह स्पेनचा राफाएल नाडाल ही अव्वल दुकली रविवारपासून (२६ मे) सुरू होणा-या फ्रेंच ओपन ग्रॅँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे.

पॅरिस - अव्वल मानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि फ्रेंच ओपनचा बादशाह स्पेनचा राफाएल नाडाल ही अव्वल दुकली रविवारपासून (२६ मे) सुरू होणा-या फ्रेंच ओपन ग्रॅँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे.
शुक्रवारी जाहीर झालेल्या 'ड्रॉ'नुसार, नाडाल आणि जोकोविचने विजयात सातत्य राखले तर उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकतील. दोघांचाही एकाच लेगमध्ये समावेश आहे. त्यामुळे कुणा तरी एका 'स्टार'ला अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. याचा फायदा दुसरा मानांकित स्वित्झर्लंडलडच्या रॉजर फेडररला होऊ शकतो. ब्रिटनचा अ‍ॅँडी मरे आणि अर्जेटिनाचा हुआन मार्टिन डेल पोट्रोने दुखापतीमुळे माघार घेतल्याने फेडररला उपांत्य फेरीत मोठी चुरस असण्याची शक्यता कमी आहे.
महिला एकेरीत गतविजेती रशियाची मारिया शारापोवा आणि तिसरी सीडेड बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका या उपांत्य फेरीत आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला अंतिम फेरी गाठण्याची सर्वाधिक संधी आहे.

Read More »

राशिभविष्य, २५ मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…
मेष : माणसं जोडाल.



वृषभ : नोकरीनिमित्त प्रवास घडतील.

मिथुन : बढतीचे योग येतील.
कर्क : घराचे नूतनीकरण कराल.

सिंह : नाटकातील तुमच्या भूमिका गाजतील.

कन्या : धार्मिक रितीरिवाज पाळाल.
तूळ : वैवाहिक जोडीदाराबरोबर सामंजस्य ठेवाल.

वृश्चिक : वारसाहक्काचे लाभ मिळतील.

धनू : मुलाखतीतून स्वत:चा प्रभाव पाडाल.

मकर : कामांना वेग येईल.

कुंभ : वाहनखरेदीचा विचार जोर धरेल.

मीन : उत्तम धनप्राप्ती होईल.