Monday, November 18, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

कमी वेळेतील कसून व्यायाम फायदेशीर

व्यायामशाळेमध्ये एक तास कसून, जास्त मेहनत करून केलेला व्यायाम हा ५० तास चालण्याच्या सरावाइतका परिणामकारक असतो, असे एका नव्या संशोधनात आढळले आहे.

एक तास कसून व्यायाम केल्यावर जर हृदयाच्या ठोक्यांचा दर त्याच्या सर्वोच्च क्षमतेच्या ७५ टक्के झाला तर दोन तास साधारण स्वरूपाचा कमी थकवणारा व्यायाम केल्यावर शरीरातील चरबीचे प्रमाण जितके कमी होते तितकीच घट या एक तासाच्या व्यायामाने होत असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. हे संशोधन फ्लिंडर्स विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विभागाचे डॉ. लिंडा नॉर्टन यांच्या नेतृत्वाखाली साउथ ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या संशोधकांनी संयुक्तपणे केले आहे. त्यांनी कसून केलेला व्यायाम व मध्यम तीव्रतेचा व्यायाम यांच्या प्रत्येक मिनिटाला होणा-या परिणामांची नोंद या संशोधनात घेतली. 

शरीरातील चरबी आणि वजन, कोलेस्टेरॉल, पोट व कंबरेचा घेर आणि एरोबिक फिटनेस या चार गोष्टींवर या संशोधनात लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यासाठी ६२० जणांची निवड करण्यात आली होती. या सर्वासाठी सहा आठवड्यांचा एक विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या ६२० जणांचे दोन विभाग करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी काही जणांना आठवड्यातून तीन दिवस कसून व्यायाम करण्यास व काही जणांना आठवड्याचे सातही दिवस रोज ३० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्यास सांगण्यात आले. तर १३५ जणांना कोणत्याही प्रकारचा व्यायाम प्रकार करू नये असे सांगितले होते. या १३५ जणांपेक्षा मध्यम तीव्रतेचा व्यायाम करत असलेल्या लोकांच्या आरोग्यामध्ये अधिक सुधारणा होत असल्याचे दिसून आले, तर कसून व्यायाम करणा-यांमध्ये मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणा-यांपेक्षा दुपटीने फरक दिसून आल्याचे नॉर्टन यांनी सांगितले. तसेच पाच तास चालणा-यांच्या शरीरातील कोलेस्टेरॉल जितके कमी होते तितकेच एक तास कसून सराव करणा-यांच्या शरीरातले होते, असेही या संशोधनातून दिसून आले.

Read More »

प्रथिनयुक्त न्याहरीने भूक भागते

भूक भागवण्यासाठी सकाळी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास भूक भागते. सुकामेवा व अंडे घेतल्यास भूक भागते. त्यामुळे दिवसभर अतिरिक्त अन्न खाण्याची वेळ येत नाही.

सकाळी उठल्यावर न्याहरी करणे हे आरोग्यासाठी आवश्यक असते. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळी कडकडून भूक लागते. ही भूक भागवण्यासाठी सकाळी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास भूक भागते. सुकामेवा व अंडे घेतल्यास भूक भागते. त्यामुळे दिवसभर अतिरिक्त अन्न खाण्याची वेळ येत नाही.

उच्च प्रथिने असलेले सॉस आणि अंड्याचा समावेश असलेली आणि कमी प्रथिनांच्या न्याहरीचा संशोधकांनी अभ्यास केला. तसेच न्याहरी न करणा-या १८ ते ५५ वयोगटातील महिलांचा अभ्यास करण्यात आला, असे बायोफोर्टिस क्लिनिकल रिसर्चचे संशोधक केव्हिन माकी यांनी सांगितले.

संशोधकांनी न्याहरीच्या केलेल्या संशोधनात त्यांना उष्मांक, चरबी व फायबरचे प्रमाण ३०० आढळले. तसेच प्रथिनेयुक्त न्याहरीत प्रथिनांचे प्रमाण ३० ते ३९ आढळले. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून एक प्रश्नावली भरून घेतली.

ज्या व्यक्तींनी प्रथिनेयुक्त आहार घेतला त्यांची भूक व्यवस्थित भागली होती. त्यांना न्याहरीनंतर सकाळी पुन्हा खाण्याची गरज लागली नाही.

अमेरिकेतील बहुसंख्य लोकांचा न्याहरी टाळण्याकडे भर असतो किंवा ते कमी प्रथिनांचा आहार घेतात. महिलांनी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास त्यांना अतिरिक्त खाण्याची गरज लागत नाही. त्यामुळे त्यांचा आहाराचा दर्जा वाढतो, असे मिसुरी विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक हिथर लेडी यांनी सांगितले. अटलांटा येथील द ओबेसिटी सोसायटीच्या वार्षिक बैठकीत हे संशोधन जाहीर केले.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe