Sunday, June 2, 2013

जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात दोन जून रोजी घडलेल्या रंजक घडामोडी…

 क्रिकेटच्या इतिहासात दोन जून रोजी घडलेल्या रंजक घडामोडी…

Image result for क्रिकेटच्या इतिहास"
१८६५
इंग्लंडचे एक सर्वोत्तम माजी मध्यम तेज गोलंदाज जॉर्ज लोमन (१८६५-१९०१) यांचा जन्म. १० वर्षाच्या कारकीर्दीत १८ कसोटी सामन्यांत त्यांनी १०.७५च्या सरासरीने ११२ विकेट्स घेण्याची करामत साधली. ३४ चेंडूमागे लोमन यांनी एक विकेट घेतली. १९९५-९६ मधील दक्षिण आफ्रिका दौ-यात तीन कसोटी सामन्यांत त्यांनी ५.८०च्या सरासरीने ३५ विकेट्स टिपल्या.

१९०८
न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू लिंडसे वेयर (१९०८-२००३) यांचा जन्म. 'डॅड' या टोपणनावाने प्रसिद्ध. सात वर्षात केवळ ११ कसोटी सामने वाटयाला आलेले वियर यांना केवळ ४१६ धावा करता आल्या. सर्वाधिक आयुर्मान (९५) लाभलेले कसोटीपटू म्हणून त्यांची नोंद आहे.

१९६५
स्टीव्ह आणि मार्क वॉ या ऑस्ट्रेलियाच्या जुळया माजी कर्णधारांचा जन्म. कसोटी क्रिकेट खेळणारे ते पहिले जुळे बंधू ठरले. स्टीव्ह हा मार्कपेक्षा केवळ चार मिनिटांनी मोठा आहे. स्टीव्हने १६८ कसोटी सामन्यांत ५१.०६च्या सरासरीने १०, ९२७ आणि ३२५ वनडेत ३२.६०च्या सरासरीने ७५६९ धावा केल्या. ३२ कसोटी शतके त्याच्या नावावर आहेत. स्टीव्ह वॉचे भारतप्रेम सर्वश्रुत आहे. स्टीव्हनंतर पाच वर्षानी कसोटी पदार्पण केलेला मार्क 'स्ट्रोकप्लेयर' म्हणून प्रसिद्ध होता. त्याने १२८ कसोटीत ४१.८१च्या सरासरीने ८०२९ आणि २४४ वनडेत ३९.३५च्या सरासरीने ८५०० धावा फटकावल्या. कसोटीत २० आणि वनडेत १८ शतके मार्कने ठोकली. प्रभावी ऑफब्रेक मा-याने त्याने कसोटी आणि वनडेत अनुक्रमे ५९ आणि ८५ विकेट्सही घेतल्या.

१९८७
श्रीलंकेचा विद्यमान कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूजचा जन्म. फलंदाज म्हणून त्याचा ठसा असला तरी त्याने सर्वोत्तम गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. काँपॅक कपमधील (२००९) तिसऱ्या लढतीत यजमानांच्या ३०८ धावांच्या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६८ धावांत संपला. मध्यमगती अँजेलोने २० धावांत सहा विकेट घेत लंकेच्या सहज विजयात मोलाचा वाटा उचलला. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी वनडेत नवव्या विकेटसाठी लसित मलिंगाससह विश्वविक्रमी १३२ धावांची भागीदारी करताना मॅथ्यूजने श्रीलंकेला एका विकेटने सवरेत्तम विजय मिळवून दिला होता.

२००४
संघात निवड होण्यासाठी दोन राष्ट्रीय सिलेक्टर्सना लाच देऊ केल्याबद्दल भारताचा माजी वनडेपटू अभिजीत काळेवर २००५ पर्यंत बंदी घालण्यात आली. डोमेस्टिक स्पर्धात बहारदार कामगिरी करणा-या काळेच्या वाटयाला बांगलादेशविरुद्ध (२००३) एकमेव वनडे सामना आला.

 शिक्षण खात्याला मराठीचे वावडे


राज्य शिक्षण विभागाने आठ मे रोजी अध्यादेश काढून अंशत: भरतीला परवानगी देताना इंग्रजी, गणित व विज्ञान याच विषयांचे शिक्षक घेता येतील, अशी अट घातल्याने राज्याच्या शिक्षण खात्यालाच मराठीचे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कणकवली- माध्यमिक शाळांच्या शिक्षक भरतीवर स्थगिती आणणा-या राज्य शिक्षण विभागाने आठ मे रोजी अध्यादेश काढून अंशत: भरतीला परवानगी देताना इंग्रजी, गणित व विज्ञान याच विषयांचे शिक्षक घेता येतील, अशी अट घातल्याने राज्याच्या शिक्षण खात्यालाच मराठीचे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारने गेल्या वर्षी राज्यातील सर्व शाळांती पटपडताळणी केली होती. यामध्ये राज्यात सुमारे पाच हजारपेक्षा जास्त शिक्षक बोगस आढळले होते. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक भरतीवर सरकारने नवे अध्यादेश काढून बंदी आणली होती. यामध्ये बोगस पट दाखवून नियुक्त केलेल्या शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्यानंतर आता अंशत: भरतीला परवानगी दिली आहे. यामध्ये शिक्षण विभागाने मातृभाषा असलेली मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट असताना याच मराठी भाषेलाच वेशीबाहेर ठेवले आहे.
शिक्षकांची पदे रिक्त असतील तर फक्त इंग्रजी, विज्ञान आणि गणित याच विषयांचे शिक्षक नेमता येतील, अशी अट घातल्याने मराठी विषयाला शिक्षक नसेल तर मराठी शिकवायचे नाही काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मराठीबरोबरच भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र या विषयांनाही शिक्षक नेमायचे नाहीत, असे सरकारचे अध्यादेशामध्ये म्हटले आहे.
राज्यात झालेल्या पटपडताळणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व शाळांमध्ये योग्य विद्यार्थी संख्या आढळली होती. त्यामुळे पटपडताळणीत सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल होता. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. आता उच्च माध्यमिक परीक्षा निकालातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा दहावी- बारावीच्या परीक्षांमधून राज्यात अव्वल असल्याने सिंधुदुर्ग पॅटर्नचा राज्यभर गवगवा होत आहे.
उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यास परवानगी देत नसल्याने गुणवत्तेत अव्वल असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांची पाटी कोरी राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने शिक्षक भरतीवरील रोख पूर्णपणे उठवावा व शिक्षण क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांची पदे भरण्यास परवानगी दय़ावी, अशी मागणी संस्था संचालकांकडून होत आहे. सध्या माध्यमिक शाळांची अवस्था 'आई जेवू घालीना आणि बाप भक मागू देईना' अशीच झाली आहे. एका बाजूला दर्जेदार शिक्षणासाठी बाल शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करून राज्य सरकारने शैक्षणिक गुणवत्तेसाठी सर्व शाळांवर चाबूक उगारला आहे. तर दुस-या बाजूला शिक्षक भरतीवर रोख लावला आहे. शाळेत शिक्षक च नसतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार कोण, असा सवाल संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे.
बोगस पटसंख्या दाखवून शिक्षक भरती करणा-या नाशिक, धुळे, अमरावती या भागातील शिक्षण संस्थांनी केलेल्या कारभाराची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला का,असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन माध्यमिक शाळांमध्ये आवश्यक त्या विषयानुसार शिक्षक भरतीसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Read More »
ग्रहांचे भाकीत

साप्ताहिक राशिभविष्य, दोन ते आठ जून २०१३




मेष :   नव्या युगाची मुहूर्तमेढ कराल.
चालू सप्ताहात तुमच्या संवाद कौशल्याने संवाद प्रक्रिया कार्यक्षम कराल. आधुनिक तंत्र आत्मसात करून जगाशी संपर्क साधाल. वेळेची, श्रमाची बचत आणि अर्थप्राप्ती एकाच छताखालून साधाल. सहका-यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या भरवशावर नव्या युगाची मुहूर्तमेढ कराल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले विवाहयोग जमतील. परिसरात तुम्ही उपयुक्त आणि म्हणून आदरणीय ठराल. पर्यटनातून, कार्यक्रम- समारंभातून आवश्यक ओळखी होतील.  
वृषभ :  आर्थिक व्यवहार सक्षमपणे कराल.
कर्तव्यपूर्ती आणि चोख व्यवहारातून तुमचा आवाज अधिकच खणखणीत होईल. गोष्टी हसण्यावारी न्याल आणि कोणत्याही क्षणी वास्तवाचे भानही करून घ्याल. तुमची व्यापारी राशी असल्याने अर्थत्रिकोणाच्या बलवत्तेने मोठे आर्थिक व्यवहार, उलाढाली सक्षमपणे कराल. बाजाराच्या अभ्यासातून अंदाजांचे शास्त्र निर्माण कराल. विविध समस्यांवर अचूक तोडगे काढाल. नोकरीत उमेदवारांना प्रशिक्षण देऊन कामांची परिणामकारकता साधाल. भरगच्च कार्यक्रमांनी एकच त्रेधातिरपीट उडेल.
मिथुन :   जनसमुदाय आकृष्ट कराल.
आपल्या कामांची, विचारांची किंवा उत्पादनांची यशस्वी प्रसिद्धी करताना स्वत:च्या बडेजावाचा विचार नसेल. महत्त्वाची निवेदनं करून लोकांना चकित करून टाकाल. ज्ञान, संवादकौशल्य आणि योजनेने जनसमुदाय आकृष्ट कराल. मुलाखतींमध्ये उत्तम प्रभाव पाडत मुलाखतींचे तंत्र सांभाळाल. डॉक्टर्स, सर्जन्स नवे तंत्र आत्मसात करतील. कायद्यांचा अभ्यास करून कामांना दिशा द्याल. विद्यार्थी ज्ञानाची शाखा निवडून तयार असतील.
कर्क :   लोकसंग्रह वाढेल
जे शोधत आहात किंवा ज्याचा शोध घेत आहात, त्यांचा बसल्या जागीच उलगडा होईल. रुग्णसेवेतून थोरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्याल. लोकसंग्रह बराच वाढलेला असेल. प्रभावी आणि दमदार लोक तुमच्या पाठीशी असतील. तंत्रज्ञानात मौलिक योगदान घडेल. कौटुंबिक जीवनाकडे जरी पूर्ण लक्ष चालू सप्ताहात देता आले नाही, तरी कौटुंबिक शिस्त आणि घराण्याचे संस्कार तुमची अर्धी कामे करून टाकतील. औषधे आपल्याच मनाने घेणे टाळा.
सिंह :   मोठयांच्या संपर्कातून मोठे लाभ

चालू सत्पाहात तुम्ही ज्या क्षेत्रात क्रियाशील असाल, त्यातील मूल्यांचे आग्रही बनून ज्ञानाने, विचारांनी ज्येष्ठत्व प्रस्थापित कराल. तुमचे मार्गदर्शन अनेकांना प्राप्त होऊन त्यांना कल्याणाचा मार्ग सापडेल. यशस्वी उद्योजक म्हणून गौरविले जाल. डॉक्टरी विद्या, औषध विद्या, रसायनशास्त्र कार्यान्वित कराल. मोठय़ांच्या संपर्कातून आणि त्यांच्या सहकार्यातून मोठे लाभ पदरी पाडून घ्याल. थोडी उच्चभ्रू जीवनशैली अनारोग्याकडे घेऊन जाईल.

कन्या :  'लोककल्याण' हा तुमचा मंत्र असेल
बुध- शनि- नेपच्यून यांच्यातील शुभयोग आणि बुध- शुक्र- गुरू यांच्या राजयोगकारक युत्या या भांडवलावर कला-क्रीडापासून उद्योग-राजनीतीपर्यंत आणि काव्य- साहित्यापासून पत्रकारितेपर्यंत यशाची शिखरे सर कराल. 'लोककल्याण' हा तुमचा मंत्र असेल. बाजार गुंतवणुकींचे लाभ दृष्टिपथात येतील. अर्थनीती आणि अर्थशास्त्रावर अभ्यासपूर्ण लिखाण प्रसिद्ध होईल. विक्रेते त्यांच्या मालाच्या विक्रीचा उच्चांक मोडतील. वेळी-अवेळी आणि बाहेरचे खाणे टाळावे.

तूळ :  तुमची स्वयंस्फूर्त मदत स्मरणात राहील
मागितल्यावर देणारे आणि सांगितल्यावर करणारे खूप भेटतात, पण चालू सप्ताहातील तुमची स्वयंस्फूर्त मदत, स्वयंस्फूर्त सेवा यांची विशेष दखल घेतली जाऊन ती चिरस्मरणात राहील. नीर-क्षीर-विवेकाने माणसे जवळ कराल. संगीतात कला आणि अभ्यासाला स्फूर्ती आणि प्रेरणेची जोड द्याल. रसिकांशी नाते जोडाल. प्रसिद्धी आणि कीर्ती हा 'हेतू' नसून तो 'परिणाम' असल्याचे तुमच्या लक्षात येईल.

वृश्चिक: प्रसिद्धीच्या झोतात याल
जगात सर्वात न लपवता येणारी कोणती गोष्ट असेल, तर ती 'गुण' आणि 'गुणवत्ता'! चालू सप्ताहात ज्ञान आणि अभ्यासातून तुम्ही प्राप्त केलेले गुण लपून राहू शकणार नाहीत. प्रसिद्धीच्या झोतात याल. कामानिमित्त दूरवरचे प्रवास घडतील. अनेक अनुभवांचे टिपण कराल. देश-विदेशातील मान्यवरांच्या भेटी होतील. मौल्यवान भेटवस्तू प्राप्त होतील. विवाहेच्छुकांचे विवाहयोग सप्ताहाच्या उत्तरार्धात यशस्वीरीत्या जुळून येतील. आरोग्य उत्तम राहील.

धनू :   कल्पनाशक्तीला उधाण येईल
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी चंद्राला दृष्टीबल प्राप्त होऊन तुमच्या कल्पनाशक्तीला उधाण येईल. विज्ञान-तंत्रज्ञानात नव्या विचारांची, कल्पनांची भर घालाल. वैद्यकीय क्षेत्रातील नव्या उपकरणांमध्ये अद्ययावतता आणाल. तुमच्या ब्रँडची, नवी गुणकारी औषधे निर्माण कराल. त्यावर तुमचे हक्क प्रस्थापित कराल. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चाकोरीत बसवाल. कायद्याचा संदर्भ द्याल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील.

मकर :  आपापल्या ज्ञानशाखेत प्रगल्भ व्हाल
बुध-शुक्र युती आणि बुध-शनी-नेपच्यूनची पूरकता तुमच्या अर्थ-त्रिकोणास बल प्रदान करून ग्राहकानुवर्ती सेवा देणारे उद्योजक ग्राहकांच्या सेवेला, त्यांच्या हिताला आणि त्यांच्या गरजा भागविण्याला बांधील राहतील. कम्प्युटरवर काम करणारे, टुरिझमशी संबंधित कर्मचारी तसेच लेखाधिकारी, लेखापरीक्षक त्यांच्या कामात वाक्बगार राहतील. तुमच्या कामाचा, कार्याचा आणि गुणांचा गौरव होईल. बिझिनेस लॉ, सर्जरी आणि 'लॉ'चे विद्यार्थी आपापल्या ज्ञानशाखेत प्रगल्भ होतील.

कुंभ :  कार्यक्षमता वृद्धींगत होईल
तुमच्या बुद्धिमान म्हणून समजल्या जाणा-या राशीस्थानी अंतर्मनाचा कारक नेपच्यून बुध-शनीच्या त्रिकोण योगात येऊन अनुभवांच्या जोडीला अंत:प्रेरणेची साथ मिळेल. सृष्टीतील अनेक गुपितांची उकल कराल. चिकित्सक अभ्यास संशोधन कराल. उत्साहातून कार्यक्षमता आणि कार्य-निपुणता वृद्धींगत होईल. घरांचे विकासक, दलाल, कंत्राटदार यांच्या कार्याचा विस्तार होईल. उत्तम समुपदेशनातून सांगाल ते पटेल. मनातल्या योजनांना मूर्त स्वरूप प्राप्त होईल.

मीन :   नव्या युगाची सुरुवात संभवते
चालू सप्ताहात घरोघरी पोहोचण्याच्या आणि घरोघरी पोहोचवण्याच्या कार्यप्रवृत्ती तुम्हास उत्तेजित करतील. तुमचे विचार, तुमच्या कला, वृत्तपत्र, दूरदर्शन यांसारख्या माध्यमातून घरोघरी पोहोचतील. ज्ञानदानातून विद्यार्थी घडवताना संस्कारांना प्राधान्य द्याल. वाहने तुमच्या दिमतीला तयारच असतील. जे तत्त्वज्ञान इतरांना सांगाल त्याची सुरुवात स्वत:पासूनच आणि आपल्या कुटुंबापासूनच कराल. त्यामुळे तुमचा अधिकार अधिकच वाढेल. एका नव्या युगाची, नव्या अध्यायाची सुरुवात संभवते.

अल्पसंख्याकांनी मूळ प्रवाहात यावे


अल्पसंख्याक समाजाने आपले मागासलेपण दूर करून विकासाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी केले.
राजापूर- केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन अल्पसंख्याक समाजाने आपले मागासलेपण दूर करून विकासाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी केले.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे धोरण हे अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असून त्यांनी सुरू केलेल्या विविध योजनांमुळेच आज अल्पसंख्याक समाजाची प्रगती होत आहे. या योजनांच्या माध्यमातून मागासलेल्या अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाच्या आणि आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणले पाहिजे, असे यावेळी अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी यावेळी सांगितले.
महासेवा संघ मुंबई यांच्या वतीने राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा आरंभ खान यांच्या हस्ते झाला. यावेळी राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जावेद ठाकूर, मुंबई अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष निजामुद्दीन राहिन, आरोग्य शिबिराचे आयोजक अब्दुल रहिम रखांगी, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालिका हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्षा स्नेहा कुवेसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राणेसाहेबांचे कोकण प्रेम कौतुकास्पद
राजापूर- मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या धोरणात्मक निर्णय बैठकीत विकासात्मक कामांबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय असो, सिंचनाचा निधी असो की अन्य कोणताही विकासाचा प्रस्ताव असो 'माझ्या कोकणसाठी काय आणि किती तरतूद केली आहे?' असा बुलंद आवाज म्हणजे उद्योगमंत्री नारायण राणे आहेत, अशा शब्दात राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान यांनी असे यावेळी अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी सागंत उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या कोकण विकासाच्या तळमळीला त्यांनी उजाळा दिला.

Read More »

दादर-सावंतवाडी विशेष गाडी आठ जूनपर्यंत


उन्हाळी हंगामासाठी सुरू केलेल्या दादर-सावंतवाडी विशेष रेल्वे गाडी आता ती आठ जूनपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे.
रत्नागिरी- उन्हाळी हंगामासाठी सुरू केलेल्या दादर-सावंतवाडी विशेष रेल्वे गाडी आता ती आठ जूनपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. या गाडीच्या फे-या तीन जूनला संपणार होत्या. मात्र कोकणातून मुंबईला जाणा-या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने ही गाडी आठ जूनपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार ०१००३ ही आठवडयातून तीनदा धावणारी गाडी दादरहून चार तसेच सात जूनला सावंतवाडीसाठी धावेल. तर परतीच्या प्रवासात ०१००४ ही गाडी सावंतवाडीहून पाच तसेच आठ जूनला सुटेल. ही गाडी दादर ते सावंतवाडी दरम्यान ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप स्थानकांवर थांबणार आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

Read More »

'फॅशन'मुळे कासार व्यवसाय अडचणीत


फॅशनमुळे कासारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. आजच्या फॅशनेबल युवतींनी बांगडया वापरण्याचेच सोडून दिल्याने बांगडया विक्रीसाठी गावोगावी येणारे 'कासार मामा' दिसेनासे झाले आहेत.
चिपळूण- फॅशनमुळे कासारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. आजच्या फॅशनेबल युवतींनी बांगडया वापरण्याचेच सोडून दिल्याने बांगडया विक्रीसाठी गावोगावी येणारे 'कासार मामा' दिसेनासे झाले आहेत.
'कासार मामाऽ' अशी हाळी कानी पडताच गल्लीबोळातील लहान मुलांपासून ते सुवासिनी महिलाही आदराने या नेहमीच्या पाहुण्याच्या स्वागताला तयार असत. लग्नमंडपात तर त्यांना मोठा मान असायचा. आठवडा पंधरा दिवसांतून एकदा तरी त्यांचे 'कासार मामा' हे शब्द कानी पडायचे. परंतु त्यांचे आता दर्शन दुर्मीळच होत चालले असून, खानदानी आणि पारंपरिक असणारा कासार मामाचा व्यवसाय अनेक समस्यांच्या खाईत सापडला आहे.
कासार म्हटलं की, त्याच्या खांद्यावर व पाठीवर तीन-चार पिशव्यांत बांगडयांचे असलेले भलेमोठे पेटारे व हातात लाकडी मुठीची बारा काडयांची मोठी छत्री अशा रुबाबात चालणारी दुरूनही ओळखता येणारी व्यक्तिरेखा. कोकणात प्रसिद्ध असणारा कासार व्यवसाय अनेक घराण्यांत पिढीजात चालत आलेला आहे. त्यामुळे या व्यवसायाची खांद्यावरील धुरा सांभाळताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अगदी सुरुवातीच्या काळात बांगडयांसाठी 'डायमंड' ही एकच कंपनी प्रसिद्ध होती. आता बांगडया बनविणा-या अनेक कंपन्या आल्यामुळे ग्राहकांची पसंती चोखंदळ झाली आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांच्या बांगडया पाठीवरुन फिरवता येत नसल्यामुळे ग्राहकांपुढे कासार अपुरे पडू लागले आहेत. सध्या बाजारपेठांमध्ये प्लास्टिक व कचकडयाच्या बांगडयांनी धुमाकूळ घातला असून, या फॅशनेबल असणा-या बांगडयांकडे तरुणींचा कल वाढत आहे. त्याचप्रमाणे आधुनिक युगातील फॅशनही कासार मामांच्या मुळावर उठली असून, अगदी युवतींपासून सुवासिनी महिलाही समाजात हात उघडे ठेवून वावरत असल्याने कासार मामांचे सुवासिनी महिला हे हक्काचे गि-हाईक त्यामुळे कमी झाले आहे. आपला गाव सोडून परगावात जाऊन उन्हा तान्हातून कासारकीचा पिढीजात चालत असलेला धंदा करणारे 'कासार मामा' समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत.

Read More »
तो आणि मी

स्थळ : बसस्टॉप,वेळ : सकाळी ९.२५ वा. ,तो : कमालच केलीस बुवा! मी : (दचकून) ती कोणती बुवा?
स्थळ : बसस्टॉप
वेळ : सकाळी ९.२५ वा.
तो : कमालच केलीस बुवा!
मी : (दचकून) ती कोणती बुवा?
तो : कसलं भन्नाट लिहितोस.. मानलं तुला!
मी : (भेदरून) काय म्हणतोस काय तू? तू.. तू.. वाचतोस माझं?
तो : म्हणजे काय. माझी बारीक नजर असते.
काय सॉल्लिड डेप्थ आहे तुझ्या लिखाणात. ग्रेट.. नो वर्ड.
मी : (गोंधळून) डेप्थ? म्हणजे काय?
तो : काय राव खेचतोस पण.. सकाळी मीच भेटलो वाटतंय.
मी : (चाचरत) नाही रे मी कशाला खेचेन?
तो : असो अप्रतिम लिहितो. एक काम होतं. पन्नास एक आहेत खिशात? रिहर्सलला चाललोय. उशीर झालाय. म्हटलं सरळ टॅक्सी पकडावी. बरोबर ना?
मी : (आनंदून) एकदम बरोबर! पन्नास नको हे शंभर ठेव. कमी-जास्त झाले तर असू दे तुझ्याकडे.
स्थळ : मार्केट
वेळ दुपार २ वा. रविवार
तो : बरं झालं भेटलास ते. एक काम होतं.
मी : (गोंधळून) माझ्याकडे?
तो : एक स्क्रिप्ट लिहिशील?
मी : (भेदरून) कुणाला विचारतोयस तू? मला?
तो : मग कुणाला?
मी : (दचकून) स्क्रिप्ट आणि मी? छे बुवा! ते मोठ्ठ काम आहे. मी कुठे आणि ते स्क्रिप्ट कुठे? नाही बाबा मला नाही जमायचं. आताच पाय थरथरायला लागलेत बघ!
तो : जमेल यार.. जमेल. फक्त तुलाच जमेल.
मी : काय म्हणतोस काय?
तो : मी म्हटलं ना माझी नजर बारीक असते. तूच लिहिणार!
मी : खरंच?
तो : होय तूच लिहिणार. मी पक्याशी बोललोय.
मी : (गोंधळून) पक्या कोण?
तो : अरे पक्या.. आपला प्रकाश जगदाळे. महेशला असिस्ट करतो.
मी : (गोंधळून) महेश कोण?
तो : आयला तूना- माठय़ा आहेस. महेश ठाऊक नाही. आपला महेश मांजरेकर.
मी : (भेदरून) ओह माय गॉड!
तो : मग काय. तुझं स्क्रिप्ट डायरेक्ट महेशकडे जाणार. एक काम कर पन्नासेकआहेत.
मी : (आनंदून) आहेत ना!
स्थळ : सलून :
वेळ रात्री ८ वा.
तो : अरे देवा! तुझं डोकं ठिकाणावर आहे ना?
मी : (दचकून) का? काय झालं?
तो : काय भंगार शर्ट चढवलायस अंगावर.
मी : (चाचरत) हा खराब आहे?
तो : म्हणजे काय? आयला तू माझी वाट लावणार.
मी : (गोंधळून) पण.. पण..
तो : अरे तू कुठे.. हा शर्ट कुठे?
मी : (गोंधळून) मी कुठे म्हणजे?
तो : अरे तू टॉपचा लेखक. उगाचच तू स्वत:चं मार्केट खराब करणार आहेस.
मी : (गोंधळून) कुठलं मार्केट म्हणतोयस तू?
तो : तुला नाही कळायचं. नंतर सांगतो. खिशात पन्नास एक आहेत?
स्थळ : रेल्वे स्टेशनची खिडकी
वेळ ९.२० वा.
तो : यार तू मला लटकवणार!
मी : (गोंधळून) ते कसं काय?
तो : अरे तू डायलॉग्ज तरी लिहिणार आहेस का?
मी : (भेदरून) डायलॉग्ज आणि मी?
तो : मग कोण लिहिणार? मी? अरे तुझ्यासारखं १० टक्के जरी मला लिहिता आलं असतं तर एव्हाना मी जुहूला प्लॅट घेतला असता.
मी : (भेदरून) काय म्हणतोस? इतकं मला जमतं?
तो : मग काय! आता तू चमकेशगिरी करत नाहीस हा भाग वेगळा. नाहीतर तूही खोऱ्याने पैसा ओढला असतास.
मी : (गोंधळून) खरंच?
तो : हो तर! असो, बरं झालं पैशाचा विषय निघाला. आहेत का थोडेफार खिशात?
मी : (सावरत) आहेत ना!
स्थळ : जयराम लॉण्ड्री
वेळ सकाळी ८.३० वा.
तो : गेले चार दिवस कुठे गायब झाला होतास?
मी : (चाचरत) तब्येत नरम होती रे.
तो : काय म्हणतोस काय? बापरे तू मला लटकवणार!
मी : मी लटकवणार? कसे काय?
तो : यार तू आजारी बिजारी पडलास तर मला जीव द्यावा लागेल.
मी : (चाचपडत) का रे?
तो : यार तू तब्येतीची काळजी घे. मी अनुराग कश्यपशी बोलतोय.
मी : (गोंधळून) कोण आहे रे हा?
तो : आयला दगड आहेस तू? अनुराग ठाऊक नाही तुला 'गॅँग्ज ऑफ वासेपूर'वाला.
मी : अच्छा अच्छा ते होय.
तो : मग काय त्याच्याबरोबर माझं बोलणं झालंय. तू तय्यार रहा. स्टोरी पार्ट आपल्याकडे आहे. तू चमकणार.
मी : (बावचळून) काय म्हणतोस काय?
अनुरागला मी स्टोरी देणार?
तो : हो बाबा तूच लिहिणार. असं बरं.. थोडे ढिले करना!
मी : किती देऊ रे?
स्थळ : मेडिकल स्टोअर
वेळ रात्री ९.३० वा.
तो : तुझ्या लिखाणाबद्दल मला आता डाऊट यायला लागलाय.
मी : कसला रे?
तो : छे यार, तुला जमतच नाही.
मी : ..
तो : यार तुला कळत कसं नाही?
मी : (दचकून) काय कळत नाही?
तो : साला प्रत्येकवेळी मीच तुझ्याकडे पैसे मागायचे काय? दरवेळी मी कारणे सांगितलीच पाहिजे का? छोड यार तू काही हाडाचा लेखक नाहीस.
मी : (घाबरून) असं काही बोलू नकोस यार. मला एकदम टेन्शन आलंय. हवे तर हे सगळे पैसे ठेव. पण मी खरंच लेखक आहे रे.
तो : ठीक आहे. किती पैसे आहेत हे?
मी : (चाचरत) मला वाटतं दोनअडीचशे तरी असतील.
तो : ओके. तर मग एैक. कधीकधी बरं लिहितोस. निघतो मी.
स्थळ : माझ्या घरी
वेळ रात्री ११.३० वा.
तो : गेले पंधरा दिवस कुठे मेला होतास?
मी : (दचकून) काय बोलतोस काय तू हे?
तो : काय बोलतो म्हणजे?
मी : (गोंधळून) अरे मेलाबिलास असं बोलणं बरं नाही रे.
तो : साला गेला आठवडा एकदम कंडम गेला. हातभट्टीची लावायलाही खिशात दहावीस रुपये नव्हते.
मी : (दचकून) म्हणजे! .. तू हातभट्टीची पितोस?
तो : मग काय फॉरेनची पिणार? साला तुम्ही टिनपाट लोक. देऊन देणार किती पन्नास रुपये! टिनपाट साले.

Read More »
सुचलेलं आणि फुललेलं

कधी कधी काय, नेहमीच असं होतं..म्हणजे सुचतं एक..पण पुढे ते फुलत जातं तेव्हा लक्षात येतं,फुललेल्यापेक्षा सुचलेलं भलतच असतं.. 
कधी कधी काय, नेहमीच असं होतं..
म्हणजे सुचतं एक..
पण पुढे ते फुलत जातं तेव्हा लक्षात येतं,
फुललेल्यापेक्षा सुचलेलं भलतच असतं..
म्हणजे सूर्यफुलाचं म्हणून,
छोटंसं रोप लावावं,
मस्त खतपाणी घालावं
आणि झाड वाढून फुलं मात्र
धोत-याची यावीत.. असं!
कधी कधी उलट असतं,
फुललेलं सुचलेल्यापेक्षा जास्त छान असतं!!
कुठेतरी बागेच्या कोप-यात

जंगल तोडीचे परिणाम  

जंगली फुलाचं झाड उगवतं
अन ते जेव्हा एखाद्या सकाळी
असं मोहक फुलतं..
तेव्हा आपण मेहनतीने लावलेल्या झेंडुपेक्षा
सुंदरतेत भाव खाऊन जातं.
इम्पोर्टेड मेकअपचा खर्च करायचा
स्पा वगरे घ्यायचा..
आरशात सारखं सारखं बघून
केस सावरून आपणच आपलं खुश व्हायचं.
आता फक्त पार्टीला जायचं..
सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा झेलायच्या..
'अय्या कुठून घेतली ही डाळींबी साडी?'
'ओ गॉर्जियस! काय लिपस्टिक आहे..'
'कुठे करतेस गं तू पेडीक्युअर?'
अशा कमेंटस् ऐकायच्या..
आपल्यावरच खुश होऊन मंद मंद हसायचं..
'ओ हाय! आफ्टर अ लॉन्ग टाइम..
किती दिवसांनी भेटतोय ना!'
चलो एकदम रॉकिंग एण्ट्री घ्यायची पार्टीत
आणि..?
आणि काय?
आपला मेकअप पोहचायच्या आधीच
निसर्गदत्त सोंदर्य लाभलेल्या एखाद्या युवतीने
कुठली तरी मळकी जीन्स घालून,
खिदळत खिदळत सहजपणे
पार्टीचा कलेजा खल्लास केलेला असायचा!
असं असतं खरं..
न त्रास घेता निसर्गत: फुललेलं
सहजसुंदर असतं खरं
ते इतकं सहज आणि छान असतं,
की ते उत्स्फूर्तपणे फुललेलं असतं
शरीराला आपोआपच फुटलेल्या शब्दांसारखं..
असतं कधी कधी आपल्याला
फुलता फुलता सुचत गेलेलं
असतं खरं असं देखणं..
मात्र बहुतेक वेळा
आपण लिहीत जातो
स्वत:ला केंद्रीत धरून..
मग स्वत:ला अजिबात न सोडता
सुचलेल्यापेक्षा काही वेगळंच
आपण फुलवत जातो..
तेव्हा मात्र ते.. ते मारून मुटकून आणलेलं अवसान असतं!
आणि समोर कसलेला पैलवान आला
की अवसानघात झालेल्या काडीपैलवानासारखं
आपण लिहिलेलं मैदान सोडून
अंग चोरून बसलेलं असतं..

Read More »
सायबर युद्धाची चाहूल देणारा लेख..

कोलाज पुरवणीत महेश म्हात्रे यांनी 'सायबर युद्धाच्या उंबरठयावर..' या लेखात आज भारतासमोरच नाही तर जगासमोर आणि प्रत्येक माणसासमोर 'सायबर'चं जे भयावह संकट उभं आहे, त्याचं यथार्थ चित्र उभं केलं आहे.
कोलाज पुरवणीत महेश म्हात्रे यांनी 'सायबर युद्धाच्या उंबरठयावर..' या लेखात आज भारतासमोरच नाही तर जगासमोर आणि प्रत्येक माणसासमोर 'सायबर'चं जे भयावह संकट उभं आहे, त्याचं यथार्थ चित्र उभं केलं आहे. तीन वर्षात १०३० सरकारी वेबसाइट हॅक होऊनही जर सरकार गांभीर्याने घेत नसेल तर कपाळमोक्ष होण्यास वेळ लागणार नाही. त्यातच सायबर क्षेत्रात चीनने केलेली प्रगती ही भारताच्या मुळावर येणार, त्याला रोखण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर व्हायला हवा.
सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही र्वष देशात राहून सेवा करण्याची अट ठेवायला हवी. म्हात्रे यांचा सदर लेख वाचल्यावर सायबर गुन्ह्यांएवढे भयानक गुन्हे दुसरे नसावेत, असं वाटतं. याच लेखाचे पुढचे पान ठरावे, असा याच पुरवणीतील चंद्रशेखर नेने यांनी लिहिलेला 'पाहिजे ते सावधपण!' हा लेख होय.
पाकिस्तानात नवाज शरीफ यांची सत्ता येताच काही भोळसट राजकारण्यांनी व उदारमतवाद्यांनी जणू काही पाकिस्तानात आता शांतता नांदणार, पाक आणि भारतात चांगली मैत्री होणार असे संकेत द्यायला सुरुवात केलीय. अशांसाठी शिवाजी राजांच्या चाणाक्ष व सावधानता या गुणांची विस्तृत माहिती नेने यांनी देऊन त्यांचे हे गुण भारताने अंगीकारले पाहिजेत, असे म्हटले आहे. पण स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी आपले मित्र व शत्रू ओळखण्यात चूक करून चीन व पाकिस्तानवर विश्वास ठेवला. त्याची किंमत भारताला पदोपदी मोजावी लागतेय.
शिवाजीराजांचे चरित्र पाहिल्यास त्यांच्यावर एकापेक्षा एक अशी बिकट, जीवावर बेतणारी संकटे आली पण प्रत्येक संकटाला त्यांनी धिराने, संयमाने व युक्तीने तोंड देऊन त्यावर विजय मिळवला. त्यांची आरमार दक्षता आम्ही घेतली असती तर २६/११ चा हल्ला झालाच नसता. अशा शूर, मुत्सद्दी, धाडसी शिवाजीराजांना आमच्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी लुटेरा, वाट चुकलेला देशप्रेमी ठरवला, मग ते त्यांचा आदर्श कसा घेणार? त्यात आजही फारशी सुधारणा झालेली नाही. समर्थ भारतासाठी शिवाजीराजांचेच गुण अंगीकारायला हवेत, हे नक्की!

Read More »
आपल्या भाषेतून हरवलेलं क्रियापद

वैदिक, संस्कृत किंवा आधुनिक भारतीय भाषांमध्येही नाही, असा क्रियापदांचा एक अनोखा प्रकार जरमॅनिक भाषांमध्ये आढळतो, तो म्हणजे 'मोडाल व्हर्ब' अर्थात 'हेतुदर्शक क्रियापद'. खरं तर आपल्याकडे ही क्रियापदं नसली तरी समांतर रचना आहेत, त्यात काही सुधारणा करायला हरकत नाही. त्यासाठीच इंग्लिश, जर्मन वगरे जरमॅनिक भाषांमध्ये मोडाल व्हर्ब हा प्रकार आहे तरी काय, हे पाहू. त्यांच्या समांतर रचना भारतीय भाषांमध्ये आहेत त्या कशा आहेत, ते पाहू आणि इंग्लिशच्या हव्यासापोटी आपण आपल्या रचना कशा गमावत आहोत, हेही पाहू या.

संस्कृत भाषेत क्रियापदांची म्हणजे धातूंची संख्या खूप असली (सुमारे २०००) तरी या बाबतीत संस्कृतची बरोबरी करणारी जगातली दुसरी भाषा म्हणजे, अरबी. अरबी भाषेत ३००० धातू आहेत आणि त्यांची रूपंही संस्कृतच्या तुलनेनं खूप सोपी असतात. संस्कृतची वैशिष्टय़ं बघताना आपण अरबी, ग्रीक, लातिन अशा भाषांचा विचार किमान तुलनेसाठी तरी करावयास हवा! असो, तरी पण खूप-खूप क्रियापदांचा तो समृद्ध वारसा संस्कृतच्याच मुलींना/नातींना म्हणजे आधुनिक भारतीय भाषांना मात्र (दुर्दैवानं) मिळालेला दिसत नाही.
आता तो त्यांना रीतसरपणे का मिळाला नाही. की, तो घेण्याची पात्रता त्यांच्यात नव्हती, हा एक अगदी वेगळा विषय आहे. या तुलनेत जरमॅनिक भाषांमध्ये धातू कमी असले तरी त्यांच्याकडे क्रियापदांचा एक अनोखा प्रकार आहे की, जो वैदिक भाषांमध्ये नाही, संस्कृतातही नाही आणि आधुनिक भारतीय भाषांमध्येही नाही, तो म्हणजे मोडाल व्हर्बचा (modal verb).
भारतात इंग्रजी राज्य होतं, देशाची एकमेव राष्ट्रभाषा इंग्लिश होती, तिचा प्रचंड दबदबा होता. तेव्हाही आपल्यावर आणि आपल्या भाषांवर इंग्लिशचा तसा प्रत्यक्ष प्रभाव नव्हता. सिन्ड्रेलाच्या सावत्र आईप्रमाणे इंग्लिशच्या बुटात आपल्या मुलींचे पाय घुसवण्यासारखा प्रकार आपण आपल्या भाषांबाबत करत नव्हतो. त्यामुळे इंग्लिशमधल्या मोडाल व्हर्बसारखं काही आपल्याकडे नाही याची कोणालाच खंत नव्हती नि खंत करण्यासारखी परिस्थितीही नव्हती. कारण त्याचे मराठी-हिंदीतले रूढ पर्याय आपल्या वापरात होते. त्यामुळे आपल्या भाषा याबाबतीत कमी पडतात, हे आपल्याला कधी जाणवलंच नव्हतं.
पण गेल्या ५०/६० वर्षामध्ये आपल्याला इंग्रजीचं वेड लागल्यामुळे इंग्लिश भाषेसाठी आपण आपल्या भाषांचा/भाषिक परंपरांचा बळी द्यायलाही तयार झालो आहोत. खरं तर आपल्याकडे ही क्रियापदं नसली तरी समांतर रचना आहेत, त्यात काही सुधारणा करायला हरकत नाही, पण सध्या सरळ सरळ इंग्लिशचं शब्दश: मठ्ठ भाषांतर केलं जातं, हे योग्य वाटत नाही.
मुळात इंग्लिश, जर्मन वगरे जरमॅनिक भाषांमध्ये मोडाल व्हर्ब हा प्रकार तरी काय आहे, हे पाहू. त्यांच्या समांतर रचना भारतीय भाषांमध्ये आहेत त्या कशा आहेत, ते पाहू आणि इंग्लिशच्या हव्यासापोटी आपण आपल्या रचना कशा गमावत आहोत, हेही पाहू या.मोडाल व्हर्ब म्हणजे एखाद्या क्रियेच्या पाठीमागे, ती क्रिया करण्यामागे काय हेतू आहे, काय उद्देश आहे, काय कल्पना आहे, हे सांगणारं क्रियापद. मुख्य क्रियेच्या मागे असलेला हेतू, कल्पना वगरे सांगणे म्हणजे त्यासाठी एखादी क्रिया मुळात असण्याची आवश्यकता असते नि तिला साथ देणारी आणखी एक क्रिया आपण या प्रकारात जोडतो म्हणूनच सारी मोडाल व्हर्ब ही सहाय्यकारी क्रियापदं (ऑक्झिलरी व्हर्ब) असतात.
आता अशा प्रकारची इंग्लिशमधली क्रियापदं कोणती हे सांगितलं की, सर्व गोष्टी एकदम स्पष्ट होतील. can, must, may, should अशी जी क्रियापदं आहेत त्यांनाच मोडाल व्हर्ब असं म्हणतात. मराठीत आपण त्यांना 'हेतुदर्शक क्रियापद' असं म्हणू या!
आजच्या इंग्लिशमध्ये वापरात असलेली काही हेतुदर्शक क्रियापदं सांगितली की, तुम्हाला त्याची कल्पना येईल -
can एखाद्या गोष्टीची शक्यता, पात्रता वगरे दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो.
must एखाद्या गोष्टीची सक्ती, आवश्यकता, तीव्र अंदाज वगरे दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो.
want इच्छा प्रदर्शित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
may अनुमति, परवानगी वगरेसाठी याचा उपयोग होतो.
should नैतिक आधारावर काही व्यक्त करण्यासाठी.
(इंग्लिशमधल्या हेतुदर्शक क्रियापदांचा अभ्यास हा आपला उद्देशच नाही, म्हणून त्यांचे बारकावे इथे सांगितलेले नाहीत.)
जर्मन भाषेत हेतुदर्शक क्रियापदे सातव्या शतकात पुन्हा एकदा साफसुफ केल्यामुळे (रिकन्स्ट्रक्ट केल्यामुळे) इंग्लिशच्या तुलनेनं ती अधिक तर्कसंगत झाली आहेत आणि त्यांची रूपंही व्यवस्थित झाली आहेत. त्यामुळे तिथे onnen, wollen, mussen, durfen, sollen, mochtenl' असा सहा क्रियापदांचा आटोपशीर कारभार तयार झाला.
मित्रांनो, आता तुम्ही याच्याशी आपल्या मराठी रचनांची तुलना करून पाहा, काय दिसतं?
१. पहिली गोष्ट म्हणजे रचनेच्या दृष्टीनं असं काही आपल्या भाषेत अस्तित्वातच नाही.
२. असं काही आपल्या भाषेत नाही याचा अर्थ परवानगी, सक्ती वगरेसारख्या गोष्टी आपण मराठीत व्यक्तच करत नाही का? – असं नाही!
३. मग आपण या गोष्टी मराठीत (हिंदीत) कशा प्रकारे व्यक्त करतो.
मित्रांनो, याबाबत तुम्ही थोडासा विचार करून ठेवा. पुढच्या वेळी आपण याचा विचार करणार आहोत. इंग्लिशमधल्या या हेतुदर्शक क्रियापदांचा मराठीवर खूप परिणाम होत आहे, म्हणून हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.

Read More »
घरोघरच्या लक्ष्मींवर 'अर्थ'संस्कार

'महागाई काही संपत नाही आणि कमावलेला पैसा काही पुरत नाही.' अशी न संपणारी परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी स्त्रियाही मोठया संख्येने घराबाहेर पडलेल्या दिसतात. केवळ पैसे कमावणे किंवा साठवणे पुरेसे नसून त्या पैशाची योग्य गुंतवणूक करून ते वाढवणेही तितकेचे गरजेचे आहे. अशा गुंतवणुकीच्या माध्यमांची उपासना करून महिलांना त्यांच्या भविष्यातील आशा-आकांक्षा फलद्रुप करण्यासाठीचा मंत्र देणारं पुस्तक म्हणजे, लेखक विनायक कुळकर्णी यांचं 'तिची लक्ष्मी'!

बोल रे परतावा बिहार का थोडा वेळ 

स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या तरी मिळालेला पैसा त्या अजूनही वडील, पती, भावाच्याच हातात देतात. व्यवहारातलं तिला फारसं काही कळत नाही, असा अनेकांचा समज(गैर) असतो. तीही फारसा विचार न करता आपल्या कष्टाची कमाई त्यांच्या हातात सोपवत असते. पण आपल्या हक्काचा पैसा तिला आपल्या मनानुसार गुंतवता येण्यासाठी गुंतवणूक या विषयाची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. शिवाय गुंतवणूक भावनिक होऊन न करता वास्तविकता लक्षात घेऊन करणेही गरजेचे असते. महिलांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची संपूर्ण माहिती 'तिची लक्ष्मी' या पुस्तकात करून देण्यात आली आहे.
सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून पूर्वीपासून बॅँका व पोस्टाचा बोलबाला होता. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी बँका व पोस्टाचे व्याज पुरवठय़ाला येऊ शकत नाही. त्यामुळे शेअर बाजार, म्युच्युअल फंड, ईटीएफ, चलन बाजार आदींमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक क्षेत्रात फसवणुकीची शक्यता जास्त असल्याने आर्थिक साक्षर बनणे गरजेचे आहे, हे 'मनी मॅनेजमेंट-स्त्रियांचे वैशिष्टय़' या पहिल्याच लेखात लेखकाने स्पष्ट केले आहे.

पेटारी  

स्त्रियांनी गरज व मागणी यात फरक करणे गरजेचे आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला लेखक देतात. 'आर्थिक संस्काराचे वळण' या लेखात लहान मुलांना गुंतवणुकीचे धडे देण्यास सुरुवात करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. 'शेअरमधील गुंतवणूक भावनिक व व्यावहारिक' हा लेख शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. याचे कारण शेअरमध्ये गुंतवणूक करताना अनेक जण भावनाशील होत असतात. आपण केलेल्या गुंतवणुकीचा तात्काळ चांगला परतावा मिळायला हवा, अशी त्यांची इच्छा असते.
पण शेअर बाजारात अल्पमुदतीची व दीर्घमुदतीची गुंतवणूक असते. चांगल्या कंपन्यांचे समभाग अधिक काळ ठेवल्यास अधिक परतावा देतात. शेअर बाजारात नफाच होईल या भरवशावर राहू नये. बाजारात व्यावहारिक व तटस्थ राहून निर्णय घ्यायचे असतात, असा महत्त्वपूर्ण सल्ला लेखकाने दिला आहे. सोन्याचांदीच्या खरेदीलासुद्धा गुंतवणूक म्हणून प्राधान्य क्रम दिला गेला आहे. पण गेल्या काही वर्षात याला हिरे, प्लॅटिनम यांची जोड मिळाल्याने लोकांच्या मनात या विषयीचे कुतूहल वाढले आहे. त्यामुळे या नव्या पर्यायांविषयी 'लखलख चंदेरी' या लेखात लेखक सविस्तर मीमांसा करतो.
'आर्थिक दायित्वे की जबाबदाऱ्या', 'आर्थिक जीवनातील सप्तपदी', 'मुलांचे शिक्षण व नियोजन', 'चाळिशीच्या आत मेडिक्लेम', 'वेडिंग बेल इन्शुरन्स', 'सिबील स्कोअर-कर्जदारांच्या 'क्रेडिट'चे प्रगतिपत्रक, 'कोटी रुपयांची भविष्यातील किंमत', 'ई-प्लॅटिनम'-गुंतवणुकीचे नवीन साधन', 'जागो ग्राहक जागो', 'करन्सी फ्युचर्ससाठी', 'करमुक्त शेतकरी होण्याचे धाडस', 'कर भरला डर कशाला?', 'कायदेशीर वारस आणि नामांकन' आदी विविध विषयांवर थोडक्यात लेखकाने मार्गदर्शन केले आहे.
पुस्तक माहितीपर असलं तरी गुंतवणुकीचे मार्गदर्शन करताना ते स्त्रियांच्या लोकलच्या प्रवासातील गप्पांच्या स्वरूपातच मांडण्यात आले आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्टय़! मैत्रिणी एकमेकांशी गप्पा मारत मारत एकमेकींना गुंतवणुकीचे ज्ञान देत असल्याने ते पटकन मनाची पकड घेते. सर्वच महिलांना हे पुस्तक सहजपणे समजू शकणार आहे. हे पुस्तक महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही वाचल्यास गुंतवणुकीची सर्व माहिती त्यांना मिळू शकेल.

मैत्रेय कंपनी ताजी बातमी
मैत्रेय ताजी बातमी

'तिची लक्ष्मी'
विनायक कुळकर्णी
मैत्रेय प्रकाशन
पानं – १४४, किंमत – १५० रुपये

Read More »
बोधी ते बौद्ध..

नाटयक्षेत्रातल्या एका चळवळीतून निर्माण झालेले नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या 'बोधी कला-संस्कृती' या पुस्तकाचं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माहितीवजा डायरीचं प्रकाशन हे दोन कार्यक्रम मुंबईत नुकतेच पार पडले, या दोन कार्यक्रमाचा हा लेखाजोखा.

भारतीय समाजातील विविध समस्या हे मध्यवर्ती आशयसूत्र डोळ्यांसमोर ठेवून नाटय़लेखन करणारे लेखक म्हणजे, प्रेमानंद गज्वी! नाटककार म्हणून त्यांचं नाव आज प्रसिद्ध असलं तरी त्यांचा साहित्य क्षेत्रातला प्रवास कवितालेखनापासून सुरू झाला, जो पुढे कांदबरी, कथा हे वाङ्मय प्रकार हाताळत एकांकिकेपर्यंत जाऊन पोहोचला.
नाटयक्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणा-या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या नाटकांना एक रंगमंच मिळवून देण्यासाठी गज्वींनी आपल्या काही सहका-यासह 'बोधी नाटय़ परिषदे'ची स्थापना केली. या परिषदेतर्फे भरवला जाणारा पाचवा बोधी नाटय महोत्सव नुकताच मुंबईत पार पडला. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेल्या 'बोधी कला-संस्कृती' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने डॉ. रामदास भटकळ, डॉ. हरिश्चंद्र थोरात, अवधूत परळकर, प्रा. डॉ. सुरेश मेश्राम आणि पुष्पा भावे या मान्यवर व्यक्तींनी या पुस्तकाविषयी त्यांची मते मांडली.
प्रत्येक व्यक्तीचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यातून इतिहासाचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर येतात. केवळ नाटकच नाही, तर संगीत, नृत्य, साहित्य, समाजव्यवस्था.. यांचीसुद्धा चर्चा या ग्रंथात करण्यात आल्याचे मत ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांनी व्यक्त केले. एलबीटीच्या आंदोलनामुळे प्रकाशकांना कागद उपलब्ध न झाल्यामुळे या पुस्तकाच्या छापील प्रतीचं यावेळी प्रकाशन होऊ शकलं नाही. त्यामुळे प्रकाशकांनी पुस्तकाच्या ई-आवृत्तीचं प्रकाशन करून वेळ मारून नेली.
आमंत्रित मान्यवरांपैकी एक नाटककार संजय पवार हे काही कारणामुळे या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. पण त्यांनी पाठवलेल्या भाषणाचे वाचन प्रकाशक किशोर शिंदे यांनी केले. आपल्या भाषणातून त्यांनी गज्वी यांच्या ग्रंथाचा गौरव केला. 'घोटभर पाणी'नंतर दलित नाटककार म्हणून तयार झालेली ओळख जाणीवपूर्वक नाकारून बोधी नाटय़ चळवळीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा एका अर्थाने विचारांचा प्रवास म्हणावा लागेल. दलित रंगभूमी, दलित साहित्य या संज्ञा नाकारताना त्याला पर्याय देण्याची जबाबदारीही ते पार पाडतात. त्याच जबाबदारीचं फलित म्हणजे बोधी नाटय़ चळवळ आणि बोधी कला-संस्कृती हा ग्रंथ असल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. याच महोत्सवात प्रेमानंद गज्वींनी लिहिलेल्या 'अभिजात जंतू' या नव्या नाटकाचा प्रयोगसुद्धा पार पडला.
प्रा. हरिश्चंद्र थोरातांचा अभ्यासाचा विषय कादंबरी हा असला तरी त्यांनी सुरुवातीलाच मी काही बौद्ध संस्कृतीचा अभ्यासक नाही. पण या विषयावर बोलायला बोलावल्यामुळे थोडा अभ्यास करून आल्याचं मान्य करत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषण करताना त्यांनी मधेच इतिहासाच्या संकल्पनेला हात घातला आणि गज्वींनी स्वीकारलेली इतिहासाची संकल्पना कशावर आधारित आहे, हे तपासून पाहण्याचा मार्मिक सल्लाही दिला. एरवी कादंबरी या विषयावर सखोलपणे बोलणा-या थोरातांचं भाषण साहित्यप्रेमी नेहमी लक्षपूर्वक ऐकतात, पण विषयाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना आणि त्यांचं भाषण बरंच लांबल्यामुळे उपस्थित प्रेक्षक आपापसात नाराजी व्यक्त करत होते.
सन, वार आणि तारखा म्हणजे इतिहास हेच आपल्याला शाळेपासून शिकवलं जात असलं तरी समांतरपणे कला इतिहासाचाही विकास होणं महत्त्वाचं असल्याचं मत अवधूत परळकर यांनी व्यक्त केलं. प्रत्येक समाजाला इतिहास असतो. हा इतिहास लिहायला घेतला की मात्र गडबड होते. वैचारिक बैठक, विचार, वागणूक या माणसाच्या स्वभावाचं प्रतिबिंब म्हणजे इतिहास होय. अशी इतिहास या विषयाची तात्त्विक मांडणी त्यांनी केली. पुढे प्रा. पुष्पा भावे यांनी गज्वींनी या पुस्तकात स्त्रीवाद आणि संस्कृतीच्या इतिहासाला अनेक प्रश्न विचारले आहेत, असं असलं तरी शरद पाटलांच्या मांडणीची दखल घेण्याची गरज होती, असं म्हणत त्यांनी पुस्तकातील उणिवा लेखकाच्या निदर्शनास आणून दिल्या. शेवटी प्रा. डॉ. सुरेश मेश्राम यांनी अतिशय मोजक्या शब्दांत प्रेमानंद गज्वींशी असलेली मैत्री आणि त्यांच्या आजवरच्या लेखनावर भाष्य करून कार्यक्रमाची सांगता केली.
एकीकडे गज्वींनी आपल्या या पुस्तकातून बोधी कला आणि संस्कृतीची माहिती वाचकांना उपलब्ध करून दिली, तर दुसरीकडे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र आयुष्यावर प्रकाश टाकणा-या माहितीवजा डायरीचं संपादन करून माधव गायकवाड यांनी बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली, असं म्हणावं लागेल. प्रथक प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या डायरीत बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या डायरीत संविधानाचं प्रास्ताविक, आंबेडकर यांच्या चरित्रातील महत्त्वाच्या घटनांचा तपशील, धर्मातराप्रसंगी दीक्षार्थीना दिलेल्या बावीस प्रतिज्ञा, त्यांचे प्रबंध आणि त्यांचे मौखिक विचारांबरोबरच धम्माच्या जागतिक इतिहासाबद्दलच्या माहितीचाही समावेश करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षापासून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी साहित्याच्या अभिवाचनाचे प्रयोग काही वाचनालयं राबवतात. असा एक प्रयोग नुकताच माहीम सार्वजनिक वाचनालयात राबवला गेला होता. वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्ताने ग्रंथालयातील वाचकांनी आपल्या आवडत्या विनोदी लेखकाच्या पुस्तकातील उतारे वाचून दाखवण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी विनोदी वाचनासाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी सभागृहाच्या भिंतीवर व्यगंचित्रकार वसंत सरवटे, शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रांबरोबरच आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, राम गणेश गडकरी, जयवंत दळवी या विनोदी लेखकांचे फोटो लावण्यात आले होते.
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' आणि 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणा-या 'कृतार्थ मुलाखतमाला' या उपक्रमांर्गत कन्सल्टिंग इंजिनीअर असणारे नीळकंठ श्रीखंडे यांची कवी अरुण म्हात्रे यांनी मुलाखत घेतली. शिक्षण, कला, संस्कृती या क्षेत्रात काम करणा-या श्रीखंडे यांच्या कार्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न अरुण म्हात्रेंनी यावेळी केला.

Read More »
युथ फेलोशिपची बहुपेडी कहाणी

वंचित तरुणांना स्वत:चं जगणं समजून घ्यायला लावण्याबरोबरच त्यांचं ते जगणं तसं का आहे, याचा विचार करायला लावणा-या आणि त्यांना आत्मशोधाकडून समाजबदलाकडे नेणा-या 'पुकार' च्या युथ फेलोशिप उपक्रमाची कहाणी सांगणारं 'इथे खरी मुंबई भेटते' हे पुस्तक ८ जून रोजी 'समकालीन प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने या युथ फेलोशिपची सुरुवात कशी झाली, याची माहिती देणारा हा लेख..

'युथ फेलोशिप' म्हणजे नेमकं काय, हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी 'पुकार' या संस्थेबद्दल समजून घ्यावं लागेल. पुकारची स्थापना ज्या मूल्यांवर झाली त्यातच युथ फेलोशिपमधील जादूच्या कांडीचं रहस्य लपलेलं आहे.  ही गोष्ट आहे, सुमारे २०-२५ वर्षापूर्वीची, म्हणजे पुकारची सुरुवात होण्याच्याही बरीच आधीची. जागतिक कीर्तीचे मानववंशशास्त्रज्ञ आणि शहरीकरणाचे अभ्यासक प्रा. अर्जुन अप्पादुराई यांनी 'पुकार'ची स्थापना केली.
अप्पादुराई आणि त्यांच्या अभ्यासक पत्नी कॅरॉल ब्रकेनरिज हे दोघंही अमेरिकेतच स्थायिक झालेले असले तरी शहरीकरणाच्या अभ्यासासाठी त्यांचा ओढा भारताकडे आणि त्यातूनही मुंबईकडे होता. ज्या वेळी जगात अजून शहरीकरणाच्या अभ्यासाला फारसा वेग आला नव्हता, त्या काळात या दोघांनीही मुंबई शहरालाच आपली प्रयोगशाळा मानलं होतं. पण संशोधकांबरोबरच शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांनीही त्यांना त्यांच्या शहरात दिसणारे बदल नोंदवले पाहिजेत, त्यावर चर्चा, वादविवाद झाले पाहिजेत, नागरिकांनी शहराच्या अभ्यासात सहभागी झालं पाहिजे, असं या दोघांचंही म्हणणं होतं. म्हणूनच शहरातल्या बदलांबाबत विचारमंथनाला प्रोत्साहन देणारं आणि या विचारमंथनामध्ये विविध क्षेत्रांमधील उत्साही मंडळींना सामावून घेणारं व्यासपीठ म्हणून 'पुकार'ची (पार्टनर्स फॉर अर्बन नॉलेज, अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड रिसर्च) सुरुवात झाली.
पण बौद्धिक विचारमंथन म्हटलं की, त्यात फक्त सुशिक्षित, उच्चवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचाच समावेश असणार, ही चाकोरी अप्पादुराई आणि कॅरॉल या दोघांनाही मोडून काढायची होती. उलट, शहरातल्या तळागाळातल्या नागरिकांच्या स्पंदनाची नोंद शहराच्या दस्तावेजीकरणामध्ये प्रतिबिंबित होत नाही तोपर्यंत शहराच्या अभ्यासाला पूर्णत्व येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच मुंबईच्या झोपडपट्टय़ा, वस्त्यांमध्ये हलाखीचं जीवन जगणा-या तरुणांनी आपल्या जगण्याची नोंद केली पाहिजे, असं त्यांना वाटतं होतं. मुंबईसारख्या शहरात पन्नास टक्के समाज हा सोयी-सुविधांपासून, हक्क-अधिकारांपासून आणि आत्मसन्मानापासून वंचित आयुष्य जगत आहे.
समाजातल्या या कष्टक ऱ्यांच्या जीवावरच शहरं चालताहेत, पण त्यांच्या या कष्टांची ना कुठे नोंद आहे, ना त्यांना त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवण्याची संधी मिळते आहे. पिढय़ान् पिढय़ा हा समाज तसाच मागून पुढे चालतो आहे. या समाजाबद्दल जसं उर्वरित अर्ध्या मुंबईला काहीच माहिती नाही तसंच या समाजालाही आपल्या परिस्थितीचं पुरेसं भान आलेलं नाही, असं अप्पादुराई यांना जाणवत होतं. ते भान कसं येईल, यावरचं त्यांचं उत्तर होतं, 'स्वपरिस्थितीच्या आकलनाने अन् अभ्यासानेच.'
वंचित समाजातले तरुण जेव्हा स्वत:च्या समाजाचा अभ्यास करतील, आपल्या हलाखीची कारणं समजून घेतील, त्यातून त्यांना पडणा-या नव्या प्रश्नांची उत्तरं शोधू लागतील तेव्हा बदलाची प्रक्रिया सुरू होऊ शकेल, असा सिद्धांत अप्पादुराई यांनी मांडला. याच आधारावर पुकारच्या युथ फेलोशिप या उपक्रमाचा जन्म झाला.
'पुकार'ने असं मानलं होतं की, बदल घडवण्याची क्षमता कुणात असेल तर ती तरुणांमध्येच. कारण तेच उद्याच्या समाजाचं भविष्य आहेत. म्हणूनच दहा-बारा तरुण-तरुणींच्या गटाला त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन आणि फेलोशिप देऊ करायची, असं ठरलं. संशोधनाच्या वेगळ्या वाटेवर सामील होणा-या या तरुणांना नाव दिलं गेलं, अनवाणी संशोधक!
युथ फेलोशिपमधली सर्वात कळीची गोष्ट म्हणजे, हे अनवाणी संशोधक कोण असावेत याला कोणतंही बंधन नव्हतं आणि नाही. तरुण, म्हणजे १८ ते ३० या वयोगटांतल्या उत्सुक मुंबईकरांनी स्वत:च्या परिसराकडे, स्वत:च्या समाजाकडे, वस्तीकडे, स्वत:च्या आयुष्याकडे, पर्यावरणाकडे डोळे उघडे ठेवून पाहावं, एवढीच अपेक्षा होती. त्यामुळे कॉलेजमधील तरुण, कॉलेजातून नुकतेच बाहेर पडलेले नोकरदार-व्यावसायिक, तरुण गृहिणी यांच्याबरोबरच शाळा सोडलेले बालकामगार म्हणून काम करत आलेले मजूर, शाळा सोडून घरी बसलेल्या मुली, अनाथाश्रम, सरकारी वसतिगृहांमधली मुलं, वेश्यांची मुलं, खेडेगावातली मुलं-मुली, आदिवासी, भटके-विमुक्त असा कोणताही वर्ग या अनवाणी संशोधकांच्या चळवळीत सामील होऊ शकणार होता. अटी फक्त दोनच होत्या- एक, या मुलामुलींनी गटात सर्वासोबत मिळून काम करायला हवं आणि दुसरी, आपल्या भोवतालाकडे पूर्वग्रह बाजूला ठेवून नव्या दृष्टीने बघण्याची तयारी आणि उत्साह हवा.
अर्थात, या उत्साही तरुणांनी युथ फेलोशिपच्या वर्षभराच्या काळात नेमकं काय करायचं याचा विचार 'पुकार'ने केलेला आहे आणि तो यशस्वीरीत्या अंमलातही आणला आहे. गेल्या आठ वर्षामध्ये 'पुकार'मध्ये वेगवेगळ्या स्तरांवर सहभागी झालेल्या असंख्य व्यक्तींनी त्यात व्हॅल्यू अ‍ॅडिशन करण्याचं काम केलं आहे. कारण 'पुकार'चा एका व्यक्तीच्या बुद्धी किंवा क्षमतांपेक्षा सर्वानी एकत्र मिळून काम करण्यावर विश्वास आहे. त्याचंच प्रतिबिंब युथ फेलोशिपच्या वर्षभराच्या प्रक्रियेत पडलेलं दिसतं. ही प्रक्रिया म्हणजेच ती जादूची कांडी!
गटाची निवड होते, तीच मुळी गट किती तळमळीचा आणि एकत्र काम करण्यासाठी उत्साही आहे यावरून! प्रत्येक गटाने सुरुवातीच्या काळात आपल्या संशोधनविषयाचा विचार केलेला असतो. पण अनेकदा त्यांना सुचलेले विषय ढोबळ असतात आणि ते त्यांच्या जगण्याशी संबंधित नसतात. हे विषय त्यांना का सुचले, त्यातून त्यांना नेमकं काय शोधायचं आहे, या विषयांचा त्यांच्या स्वत:च्या जगण्याशी अन् त्यांच्या समाजाशी काही संबंध आहे का? या प्रश्नांवर मुलांना विचार करण्यास प्रवृत्त केलं जातं. या सुरुवातीच्या काळात गटातल्या मुला-मुलींची एकमेकांशी आणि पुकारच्या कार्यकर्त्यांशी ओळख होत असते. विविध गटांमध्ये होणा-या चर्चामध्ये, पुकारतर्फे आयोजित केल्या जाणा-या कार्यशाळांमध्ये त्यांना इतर मुलामुलींचे विचार ऐकायला मिळतात.
सुरुवातीचे काही दिवस काही मुलं आसपास घडणा-या गोष्टी पाहणं आणि ऐकणं, हे काम करतात. पण नंतर मात्र त्यांना मैदानात उतरावं लागतं, स्वत: विचार करावा लागतो. तो सर्वासमोर मांडावा लागतो, तो तपासून पाहावा लागतो, इतरांची मतं विचारात घ्यावी लागतात. एकूण हा काळ बराच धुमश्चक्रीचा असतो. त्यातूनच मुलामुलींचा परिघ वाढतो, समज खोल होते, संवेदना जाग्य होतात, मतं बनू लागतात, बदलू लागतात. या अनवाणी संशोधकांनी केलेल्या या अभ्यासांतून एका वेगळ्याच मुंबईचं दर्शन होत आहे. गेल्या आठ वर्षामध्ये युथ फेलोशिपमध्ये झालेल्या अभ्यासांची यादी पाहिली की आपणच नव्हे, तर भलेभले संशोधकही थक्क होतात. असे कोणते अभ्यासविषय आहेत या यादीमध्ये?
युथ फेलोशिपच्या पहिल्याच वर्षी मुलांनी गिरणगावातल्या उत्सवांचे व्यापारीकरण, जात या संकल्पनेबाबत मुंबईतल्या कॉलेज युवकांच्या समजुती आणि त्यांची वागणूक, नाका कामगार – एक दुर्लक्षित कष्टकरी, रेल्वे परिसरात काम करणा-या अंध फेरीवाल्यांच्या कहाण्या, शहराच्या आठवणींचं चित्रण, मच्छीमार जमातीतील मुलींच्या शाळागळतीचं प्रमाण, मुंबईतील तीन धर्माच्या देवालयांत बोलले जाणारे नवस.. अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास मुलामुलींनी केला.
त्याच्या पुढच्या वर्षामध्येही अभ्यासविषयांमध्ये असंच वैविध्य होतं. कारण वेगवेगळ्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीतून तरुण युथ फेलोशिपमध्ये येत होते. गिरणगावातील माणसांचा जुन्या झाडांशी असणारा ऋणानुबंध, लिंगभेदापलीकडील मैत्री शक्य आहे का? युवकांचा वृत्तपत्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्थानिक आणि स्थलांतरितांमधील आर्थिकआणि सामाजिक संघर्षाचा तौलनिक अभ्यास, प्रवासात होणारी छेडछाड, कॉलेज तरुणांमधील व्यसनाधीनता, गिरणगावात खानावळी चालवणा-या महिलांची परिस्थिती, दक्षिण मुंबईतील भुताखेतांच्या गोष्टींचं दस्तावेजीकरण, अंधांना अपेक्षित असलेले आपण, पत्रकारांची अनियमित जीवनशैली, मुंबईतल्या रात्रशाळा, अभ्यासगल्ल्या, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत स्थलांतरित झालेल्या लोकांवर होणारा भावनिक आणि आर्थिक परिणाम, पोलिस हवालदाराचं आयुष्य, मुंबईतील वैदू समाजाची परिस्थिती, एकविसाव्या शतकातील अस्पृश्यतेचं बदलतं रूप, नक्षलवादासंबंधी शहरी तरुणांची मतं, अनाथ मुलांना अठराव्या वर्षानंतर येणा-या समस्या, पडद्यामागील कलाकारांच्या समस्या, समलैंगिक पुरुषांच्या दुस्तरीय आयुष्याच्या व्यथा, वेश्यावस्तीतील मुलांच्या आयुष्याचं दस्तावेजीकरण, फेसबुक आणि मैत्री, मुंबईकरांच्या नजरेतून मुंब्रा, स्ट्रेचर हमालांची स्थिती इत्यादी.
ही यादी जवळपास दोनशे अभ्यासांची आहे. त्यामुळे ती सगळी इथे देणं शक्य नाही. पण या उदाहरणांवरून मुंबईतले अनेक अनडॉक्युमेंटेड कोपरे मुलांनी नोंदवले असल्याचं सहज लक्षात येईल. उदा. मुंबईच्या वेश्यावस्तीत राहणा-या मुलांचं दस्तावेजीकरण हा विषय वेश्यांच्या मुलांनीच अभ्यासला. नाटय़क्षेत्रात येऊ बघणा-या नवोदित तरुणांनी पडद्यामागच्या कलाकारांचा अभ्यास केला. गिरणगावात वाढलेल्या मुलामुलींनीच या भागात होत असलेले बदल नोंदवले. मुस्लीम मुलींनी आपल्यावर लादल्या जाणा-या बंधनांचा शोध घेतला. ही उदाहरणं पाहिली की, 'डॉक्युमेंटेशन फ्रॉम बिलो'चा अर्थ आपसूक कळू लागतो.
तर ही झाली, युथ फेलोशिपची बहुपेडी कहाणी. ही नावीन्यपूर्ण कल्पना आज जगात अनेक महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये नावाजली जाते आहे. युथ फेलोशिपकडे एका स्वयंसेवी संस्थेचा एक उपक्रम म्हणून न पाहता एक विचार म्हणून पाहिलं पाहिजे. तरुणांना आपल्या भोवतालाचं भान देणारा आणि आपल्या आसपासचे बदल टिपण्यास प्रवृत्त करणारा हा विचार आपापल्या पद्धतीने प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी घेणं, हीच कदाचित पुकारच्या कामाला दिलेली पावती असेल.

Read More »
हाती सूर्य धरू या!

 भारताला येत्या काही वर्षात सर्वात जास्त कशाची टंचाई जाणवेल तर ती म्हणजे इंधनाची अर्थात विजेची. इंधनावर आयातीसाठी सर्वात जास्त खर्च करणा-या भारताला विजेची सर्वात जास्त गरज भासणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत तर कोळसा, लाकूड, पेट्रोल, डिझेल, केरोसिन यासारखी पारंपरिक ऊर्जा साधने संपण्याच्या मार्गावर आली आहेत. औष्णिक, जलविद्युत आणि अणुऊर्जेवरील वीजनिर्मिती खर्चिक आहे. पवनचक्कीतून निर्माण होणा-या विजेसाठी काही ठरावीक परिस्थिती (वा-यांचा वेग योग्य नसेल तर) वातावरण लागते. या मापदंडाची पूर्तता झाली नाही तर वीज निर्माण होत नाही. मग उरते ती सूर्यापासूनची वीजनिर्मिती. पावसाळयाचे दिवस सोडले तर सुमारे ३०० दिवस सूर्य तळपत असतो. सौरऊर्जेचा उपयोग करून विविध उपकरणांचा वापर केल्यास मोठया प्रमाणात ऊर्जाबचत होऊ शकते. भारनियमन आणि ऊर्जाबचतीसाठी सौरऊर्जेचा वापर आवश्यक आहे. सौर (सूर्य) ऊर्जेबद्दल शहरापासून ग्रामीण भागापर्यंत कसा वापर करता येईल आणि उष्णतेच्या लाटेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत आणि प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युतऊर्जेत कसं करता येईल, हे सांगत आहेत विज्ञान शिक्षण आणि ऊर्जा संवर्धन संस्थेचे सल्लागार अभय यावलकर.


अलीकडे सौरऊर्जेचा वापर जगभरात वाढत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये तो सर्वाधिक आहे. जगभरातील सरकारे नागरिकांना सौरऊर्जेचा वापर करण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. भारतातील अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचा स्त्रोत म्हणून सौरऊर्जेकडे पाहिलं जात आहे. पण असं असतानाही भारतातील सौरऊर्जेचा वापर मात्र म्हणावा तसा वाढलेला नाही. याची काय कारणं आहेत?
> मुळात भारताची लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढत गेली त्याच वेळी अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला. त्यावेळी आपण उत्पादन कसं वाढवता येईल, याचा शोध घेतला आणि त्यावेळी 'आयसीआरए'चे संचालक डॉ. स्वामीनाथन आणि पी. सुब्रमण्यम यांच्या प्रयत्नाने मेक्सिकोमधून गव्हाचं मेक्सिकन वाण भारतात आणलं आणि हरितक्रांतीला सुरुवात झाली. म्हणजे अन्नधान्य टंचाईवर पर्याय शोधून काढला. मात्र अन्नधान्याची जशी टंचाई जाणवू लागली तशाच प्रकारची इंधनाचीही टंचाई मोठय़ा प्रमाणात जाणवू लागली. दुस-या महायुद्धानंतर आखाती देशांनी सर्वच प्रकारच्या इंधनाचा पुरवठा थांबवला.
आपण तेलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. देशात काही प्रमाणात इंधनसाठे सापडले. मात्र नंतरच्या काळात दुर्दैवाने तिच्याकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं नाही. सरकारने जलविद्युत, औष्णिक, आण्विक वीजनिर्मितीला चालना दिली खरी. पण, त्यासाठी मोठया प्रमाणात जमीन संपादित करावी लागत असल्यामुळे वीजनिर्मितीचा मुख्य उद्देश काहीसा बाजूलाच राहिला आणि त्यावरून राजकारण सुरू झालं. १९९० पासून भारतात जागतिकीकरणाची लाट आली आणि देशाला मोठया प्रमाणात इंधनाची टंचाई जाणवू लागली. यात पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनापासून स्वयंपाकघरासाठी लागणा-या इंधनाचा समावेश आहे. १९९५ पासून इंधनाची ही टंचाई अधिक तीव्र झाली. नागरिकांना या तीव्रतेची तितकीशी झळ पोहोचली नाही आणि उपलब्ध इंधनसाठय़ांची वास्तविकताही कळली नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणून उपलब्ध आणि सहज मिळू शकणाऱ्या इंधनाचा वापर जास्तीत जास्त करत आला. मात्र, जसजशी इंधनटंचाईची वास्तवता कळू लागेल तसे प्रत्यक्ष चटके बसायला सुरुवात होईल. त्यावेळी हा वापर निश्चितच वाढलेला असेल. याच एका चटक्यामुळे मी १९९०-९१मध्ये पहिल्यांदा सूर्यचूल (सोलर कुकर) बनवली.
सौरऊर्जेच्या प्रसारासाठी सोलर कुकरच का बनवावासा वाटला? त्याचा व्यवहारात जास्त वापर होईल म्हणून?
> हो. तेही एक कारण होतं. कारण स्वयंपाकासाठीच सर्वात जास्त ऊर्जेचा, इंधनाचा वापर केला जातो. तसंच स्वयंपाकघर हा गृहिणींच्या आणि प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय. त्यामुळे सोलर कुकरपासून प्रसाराला सुरुवात केली. लोक विचारत असत, बोलत असत, पण सोलर कुकर कसा बनवावा, त्यामुळे किती ऊर्जा वाचेल, त्यासाठी किती खर्च येईल, त्यात काय काय शिकवता येऊ शकेल, याची सखोल माहिती कोणीही विचारत नसे. सर्व जण वरवर माहिती घेत असत. मग, शाळा-शाळांमध्ये या सोलर कुकरची माहिती देऊ लागलो. शाळेतील मुलं ही संस्कारक्षम असतात. संस्कारक्षम वयोगटात त्यांना एखादी गोष्ट नीट सांगितली, समजावली तर भविष्यात इंधनटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही पिढी पुढाकार घेऊ शकेल. हेच विद्यार्थी आई-वडिलांना, शेजा-यांना याची जाणीव करून देऊ शकतील, या हेतूने शाळा-शाळांमधून याचा प्रचार करू लागलो. मात्र, इंधनटंचाईचं संकट आता आहे, तसं त्यावेळी बिकट नव्हतं. फोन केला की, गॅसवाला सिलिंडर घरी आणत असे. त्यामुळे अशा प्रकारे सूर्याच्या मदतीने चालणा-या उपकरणाची संकल्पना रुजली नव्हती. या कुकरमध्ये काय काय शिजवता येऊ शकतं, याची प्रात्यक्षिकं आम्ही दाखवू लागलो. ग्रामीण भागातही याचा मोठया प्रमाणात प्रसार करायला सुरुवात केली.
सगळयात जास्त फायदा या उपकरणाचा कुठे होतो? शहरी भागात की, ग्रामीण भागात?
> मराठी विज्ञान परिषदेतर्फे आम्ही सुरुवातीला ग्रामीण भागात निर्धूर चुलीचा (कार्यक्षम चूल) प्रकल्प राबवला होता. तोही चांगला उपक्रम होता. मात्र, त्यालाही काही मर्यादा होत्या. गावाकडे वापरल्या जाणा-या चुलींमध्ये मोठया प्रमाणात लाकूडफाटा जाळला जातो. गृहिणींचे डोळे धुरानं चुरचुरतात. यातील धोकादायक बाब म्हणजे गृहिणींच्या नाकातोंडात मोठय़ा प्रमाणात धूर जातो. त्याचं प्रमाण प्रचंड असतं. याकडे तुलनात्मक पाहता एकाच वेळी सुमारे २०० सिगारेट्स् पेटवल्या असता त्यावेळी होणारा धूर आणि स्वयंपाक करताना होणारा लाकडाचा धूर सारखाच असतो. या धुरामुळे गृहिणींना फुप्फुसांच्या आजारांना सामोरं जावं लागत असे. तसंच पूर्वी लाकूडफाटयाची समस्या नव्हती. घराबाहेर जाऊन एका तासात दिवसभरातील जळणासाठी लाकूडफाटा मिळत असे. मात्र, आता दिवसभर फिरूनही सरपण मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून निर्धूर चुलीची अंमलबजावणी आम्ही खेडोपाडी केली.
महत्त्वाची बाब म्हणजे शहरासारखा स्वयंपाकाचा गॅस आजही ग्रामीण भागात पोहोचला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात महिलांना सर्वस्वी लाकडाच्या इंधनावर अवलंबून राहावं लागत आहे. ग्रामीण भागातील ५४ टक्के लोक इंधन म्हणून लाकडाचा वापर करतात. एवढया मोठया प्रमाणात सरपणासाठी लाकूड लागतं. त्यामुळे प्रदूषण होतं आणि वृक्षतोडही होते, ती वेगळी गोष्ट. बरं हे सर्व करत असताना नवीन झाडं मात्र लावली जात नाहीत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे जागतिक तापमानवाढीत भर पडते. शहरात गृहिणींना सर्वस्वी स्वयंपाकाच्या गॅसवर अवलंबून राहावं लागतं. त्यांना लाकडाचा वापर हा इंधन म्हणून करता येत नाही. म्हणूनच शहरी आणि ग्रामीण भागाला इंधनाची मर्यादा आहे. मात्र सौरऊर्जेला पावसाचा अपवाद वगळता फारशा मर्यादा नाहीत. म्हणूनच या प्रदूषणरहित ऊर्जेचा वापर वाढायला हवा. कारण इतर इंधनासारखं यातून कोणत्याही प्रकारची प्रदूषकं बाहेर पडत नाहीत. म्हणूनच सौरऊर्जेला प्रदूषणरहित ऊर्जा असंही म्हणतात. ग्रामीण आणि शहरी भागात ही सूर्यचूल अत्यंत उपयोगी ठरत आहे.
सूर्यचुलीत कोणकोणते पदार्थ तयार करता येतात?
> भाकरी आणि चपाती सोडून सूर्यचुलीत अगदी सगळे पदार्थ करता येतात. कारण भाकरी-चपातीसाठी सुमारे ३२५ ते ३५० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. मात्र, सध्याच्या स्थितीत सूर्यचुलीत मिळणारे तापमान हे १३० ते १३५ अंश सेल्सिअसपर्यंत असतं. त्यामुळे चपाती, भाकरी भाजणं अशक्य होतं. सूर्यचुलीत मिळणा-या कमीत कमी तापमानामुळे पदार्थ हळुवारपणं शिजतो. त्यामुळे तो चविष्ट बनतो. परिणामी पदार्थातील जीवनसत्त्वांची हानी होत नाही. डाळ, भात, अंडं हे पदार्थ त्यात उत्तमरीत्या शिजतात. पदार्थाचा मऊ किंवा कठीणपणा त्याचा विचार करता एक ते दीड तासात अन्न शिजतं. थंडीत मात्र पदार्थ शिजताना काहीसा अधिक वेळ लागू शकतो. दुपार आणि संध्याकाळच्या जेवणात काय केलं जाणार आहे, याची कल्पना गृहिणींना असते.
या सूर्यचुलीत सगळय़ा प्रकारची कडधान्यंही शिजतात, हे विशेष. विदर्भात मोठय़ा प्रमाणात सूर्यप्रकाश आहे, अशा ठिकाणी काबुली चणेही दोन तासात शिजतात. म्हणजे इतर अन्नही याच कालावधीत शिजू शकतं, हे निश्चित. सूर्यचूल ही हातातील ब्रीफकेससारखी (पेटीसारखी) असते. त्यामुळे शहरात ही सूर्यचूल गच्चीवर तर ग्रामीण भागात, अंगणात जिथे पुरेसा सूर्यप्रकाश असतो तिथे ठेवावी. सकाळी नऊ ते दुपारी दोन ही वेळ पदार्थ शिजवण्यासाठी उत्तम असते. दोन वाजल्यानंतर तापमान कमी होऊ लागतं. त्यामुळे वरील कालावधीत सूर्यचूल सोयीनुसार गच्ची अथवा अंगणात जिथे सूर्यप्रकाश असेल त्या ठिकाणी ठेवावी. अनुभवानं अन्न शिजण्याचा अंदाज निश्चित कळतो.
सूर्यचुलीमुळे घरातील ५० टक्के इंधनाची बचत होऊ शकते. डाळ, भात, भाज्या, कडधान्यं उत्तम शिजतात. तसंच रवा, बेसन, शेंगदाणेदेखील चांगल्या प्रकारे भाजता येतात.
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ उत्तमरीत्या शिजतात. मांसाहारी पदार्थासाठी थोडा जास्त वेळ लागतो. सद्यपरिस्थितीत सर्वाधिक खर्च हा स्वयंपाकाच्या इंधनावर होत असतो. अशा वेळी ५० टक्के इंधनाची बचत होणं, म्हणजे पैसे वाचवणं त्याचबरोबरच राष्ट्रीय संपत्तीचा -हास आणि प्रदूषणाला आळा घालणं होय.
तुम्ही सूर्यचूल बनवण्याचं प्रशिक्षणही देता? त्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे? सूर्यचुलीच्या किंवा सौरउपकरणांच्या किमती जास्त असतात? सरकार सौरऊर्जेच्या प्रसारासाठी मोठया प्रमाणात सबसिडी (आर्थिक सवलत) देत आहे?
> मराठी विज्ञान परिषदेत मी सौरऊर्जा प्रकल्प प्रमुख आहे. आम्ही तेथे सूर्यचूल तयार करण्याचं प्रशिक्षण देतो. आजपर्यंत सुमारे सात हजार व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे. भारतात सौरऊर्जेचा वापर वाढत आहे. सौरऊर्जेवर चालणारी उपकरणं बाजारात येत आहेत. सूर्यचूल ही त्यापैकीच एक होय. सूर्यचुलीबद्दल आपण जास्त बोलतो आहे, ते अशासाठी की, इंधनबचतीसाठी सूर्यचूल हा इंधन आणि पैसेबचतीचा मोठा मार्ग आहे. सूर्यचुलीसह सोलर वॉटर हिटर (सौरबंब), दिवे, पंखे, घरातील इतर यंत्रणा तसेच सोलर ड्रायर इत्यादी यंत्रणा सौरऊर्जेवर उत्तम प्रकारे चालू शकतात. सर्व प्रकारच्या भाज्या वाळवण्यासाठी सोलर ड्रायरचा वापर केला तर त्या भाज्या अधिक काळ टिकतात.
आता सौरउपकरणाच्या किमतीविषयी बोलायचं म्हणजे, मोबाइल ज्यावेळी आला त्यावेळी हँडसेटची किंमत ५० हजार रुपये होती आणि प्रति मिनिट बोलणं १६ रुपये होतं. त्यातच येणा-या  फोनसाठीही पैसे मोजावे लागत असत. परंतु जसजसं त्याचा वापर वाढला तसतसं त्याच्या किमती कमी होत गेल्या. हेच सौरउपकरणांबाबत घडू शकेल. त्याचा वापर वाढला की, त्यांच्या किमतीही कमी होतील. पाच व्यक्तींच्या कुटुंबासाठी असलेला सोलर कुकर २५०० ते तीन हजार रुपयात, १२५ लीटरचा सोलर हिटर (सौरबंब ) २० ते २५ हजार, छोटय़ा स्वरूपातील सौरदिवे हे ११०० रुपयांपासून ते आपल्या गरजेप्रमाणे तयार करून दिले जातात. सरकारकडून ठरावीक उपकरणांसाठी साधारणपणे ३० ते ४० टक्के सबसिडी दिली जात आहे. ग्रामीण भागात सौरऊर्जेचा प्रचार व्हावा, यासाठी सरकारी ग्रामीण भागातील लोकांना सबसिडीचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही सबसिडी सर्रास सगळयाच उपकरणांसाठी दिली जात नाही.
आज मोठमोठी सरकारी कार्यालयं, धार्मिक संस्था तसंच संशोधनपर संस्था त्यांना लागणारी वीज सौरऊर्जेचा वापर करून बनतात. तसंच मोठमोठी देवस्थानं अन्नछत्र चालवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करतात. शेफलर या तंत्रज्ञाने आर्किमिडीजचं तत्त्व वापरून मोठमोठय़ा आंतरवकड्रिश तयार केल्या, ज्यामुळे पाण्याचं तापमान ३०० ते ४०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. हेच गरम पाणी थंड पाण्यातून फिरवल्यानंतर त्याचं वाफेत रूपांतर होतं. तयार झालेली वाफ तीव्र दाब निर्माण करून मोठमोठय़ा भांडय़ामध्ये सोडली जाते. या तंत्राचा वापर करून माउंट आबू येथे ३८ हजार लोकांचा, तिरुपती बालाजी येथे ५५ हजार लोकांचा तर शिर्डीचे साईबाबा येथे ३० हजार
लोकांचा स्वयंपाक करण्यासाठी केला जात आहे. या यंत्रणेला पॅराबोलिक सोलर कुकर असं म्हणतात.
राज्यात विजेची टंचाई भासत असताना ज्या ठिकाणी पूर्णपणे अंधार आहे त्या ठिकाणी किंवा जी गावं अंधारात आहेत, अशा गावांसाठी किमान प्रकाशासाठी अतिशय छोटया स्वरूपातील सौरदिवे उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात एकूण पाच हजार मेगावॉट विजेचं भारनियमन सुरू आहे. यामुळे काही शहरांबरोबरच अनेक खेडेगावं अंधारात आहेत. तर काही अतिदुर्गम भागात ही यंत्रणा पोहोचलेली नाही. अशा अंधकारमय गावांकरता छोटया सौरदिव्याची उपलब्धता करून दिलेली आहे. राज्यातील पाच टक्के कुटुंबांनी जरी प्रकाशासाठी सौरदिव्यांचा वापर सुरू केला तरीदेखील सुमारे एक हजार मेगावॉट एवढी विजेची बचत होऊ शकेल. अशाच प्रकारे जर लोकांनी सोलर वॉटर हिटरचा वापर केला तर राज्यातील संपूर्ण भारनियमनच दूर होणं शक्य आहे. पारंपरिक विजेवर चालणारी उपकरणं सौरऊर्जेवर चालवायची झाल्यास इन्व्हर्टर वापरणं आवश्यक ठरतं. सद्यपरिस्थितीत अनेक कुटुंबांनी इन्व्हर्टर घेतलेलं असून या यंत्रणेलादेखील सौरऊर्जेची जोड देता येते. अशा कुटुंबांनी सौरऊर्जेची मदत घेतली तर विजेच्या खर्चात बचत तर होईलच, परंतु बॅटरीचं आयुष्यही वाढेल. बॅटरीच्या खर्चावरही बचत करता येणं शक्य होईल.
त्याचबरोबर मोबाइल चार्जिग, सौरखेळणी, मिक्सर तसंच रस्त्यावरील विक्रेते, भाजीवाले यांनाही सौरदिव्याचा वापर करता येऊ शकतो. त्यांच्यासाठी तर सौरदिवे म्हणजे आर्थिक बचतीबरोबर व्यवसायाच्या प्रगतीसाठी एक उत्तम मार्ग आहे.
सौरऊर्जा सर्वच थरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुमचा उद्देश आहे. त्यासाठी भविष्यातील आणखी काही योजना आहेत का?
> अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. ज्यामधून कमीत कमी खर्चात दोन दिवे आणि एक पंखा किमान सहा तास चालवता येईल, अशी यंत्रणा विकसित करून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच अन्न शिजवण्यासाठी आणि इंधनबचतीसाठी सोलर कुकरचा वापर गावागावांमधून कसा वाढवता येईल, यासाठी जोमानं प्रयत्न करणार आहोत. शेतक-यांसाठी तसंच सामान्य कुटुंबांसाठी भाज्या वाळवणी यंत्राची (सोलर ड्रायर) निर्मिती केलेली आहे. या यंत्रामुळे जास्त उत्पादित झालेल्या भाज्या वाळवून इतर जास्त काळ टिकवता येणं शक्य आहे. भविष्यात इंधनटंचाई अटळ आहे. या टंचाईवर भावी पिढीला मात करता यावी, यासाठी भावी पिढीला सौरऊर्जेच्याबाबतीत सक्षम करण्याचं काम करण्याची इच्छा आहे. यासाठी गावपातळीवर, नगरपालिका पातळीवर सहकार्य अपेक्षित आहे. सरकारी पातळीवरही सहकार्य मिळणं आवश्यक आहे तर सौरऊर्जेचं हे मिशन आणखी जोमानं पुढे जाऊ शकेल.

Read More »
फजिती दुसरी जनामध्ये

घोटाळ्यांचं युग आहे. लोकांना त्याची सवय झाली आहे. मात्र कॉर्पोरेट एम्बरॅसमेंट अर्थात औद्योगिक नामुष्कीची वेळ काही समूहांवर आणि व्यक्तींवर आली आणि ते सार्वजनिक व्हायला वेळ लागत नाही. त्याचं कवित्व दीर्घकाळ राहातं.
गुळे माखोंनिया दगड ठेवीला । वरी दिसे भला लोकाचारी ।
अंतरी विषयाचे लागले पैं पिसे। बाहिरल्या वेषे भुलवी लोका ।
तुका म्हणे येणे कैसा होय संत । विटाळले चित्त कामक्रोधे ।
गेल्या आठवडयात तुकाराम महाराजांचा हा अभंग वारंवार आठवावा असे अनेक प्रसंग घडले. सार्वजनिक नामुष्कीला सामोरे जाण्याचा प्रसंग अनेक व्यक्तींवर आला. अशा पब्लिक एम्बरॅसमेंटच्या प्रसंगांना सामोरे जाण्याचा अनुभव जसा वैयक्तिक आयुष्यात येतो तसाच ब-याच कंपन्यांना – राजकीय पक्षांना -काही वेळा देशांनाही अनुभवावा लागतो. या आठवडय़ाची प्रश्नावली आहे सार्वजनिक नामुष्कीच्या घटनांवर.
पहिली घटना आहे आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग घोटाळ्याची. आतापर्यंत असे घोटाळे झाले नव्हते असे नाही, पण या घोटाळ्यांची व्याप्ती क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या उंबरठय़ापर्यंत पहिल्यांदाच पोहोचली आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्ड आतापर्यंत अंतर्गत राजकीय खेळांसाठी सुप्रसिद्ध होते. या राजकारणाची झलक काही चित्रपटांमध्ये बघायला मिळते. क्रिकेटचा विचार केला तर गेल्या काही वर्षात दोन चित्रपट येऊन गेले. एक होता नागेश कुकनूर दिग्दर्शित 'इकबाल'. या चित्रपटात खेळातल्या राजकारणाचे सुंदर चित्रण केले होते. (अशाच राजकारणाचे चित्रीकरण 'चक दे इंडिया'मध्येपण होते.)
अगदी अलीकडेच आलेल्या राजेश मापूस्कर यांनी दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटात सध्याच्या क्रिकेटवर भाष्य करणारा एक संवाद बेहेराम देबूच्या (बोमन इराणी) तोंडी आहे. तो असा.. ''गेम के पिछे भी एक गेम होता है रुसी.''
हा चित्रपट कोणता?
फणीश मूर्ती यांना 'आयगेट' या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून लैंगिक दुराचाराच्या आरोपावरून हाकलून देण्यात आले. फणीश मूर्ती यांच्या आयुष्यातील हा पहिला प्रसंग नव्हता. या अगोदर अशाच एका भानगडीतून पैसे खर्च करून त्यांना सोडवण्यात आले होते. युरोप आणि अमेरिकेत अशा घटनांचे प्रमाण अधिकाधिक आहे आहे आणि वाढत जाते आहे. पीडित व्यक्तींना अमेरिकन कायद्याप्रमाणे एक आधार दिला जातो. त्या तरतुदीला contingency fee provision म्हणतात. या तरतुदीप्रमाणे जर पीडित व्यक्तीला न्याय मिळाला तरच वकिलाला अशिलाकडून पैसे मिळतात. कदाचित यामुळे खटल्यांचे प्रमाण वाढत असेल, पण अशा 'फणीश मूर्ती'ची संख्याही काही कमी नाही. फणीश मूर्तीचे त्यांच्या कंपनीतल्या कर्मचा-याशी संबंध होते. पण इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या (आंतरराष्ट्रीय नाणे निधी) व्यवस्थापकीय संचालकांनी तर एका हॉटेलच्या स्त्री कर्मचा-यावर अतिप्रसंग केल्यामुळे त्यांना राजीनामा देणे भाग पडले होते. ही घटना आहे २०११ सालची. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या या व्यवस्थापकीय संचालकांचे नाव काय?
काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक घटना घडली होती, ज्यामुळे तत्कालीन सत्तेत असलेल्या पक्षाला शरमेने मान खाली घालायला लागली होती. 'हॅनोव्हरचा हँगओव्हर' या टोपणनावाने हा किस्सा ओळखला जातो. परदेशातून परत येताना महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी दारूच्या नशेत एअर इंडियाच्या हवाईसुंदरीसोबत अतिप्रसंग केला होता. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ते गृहस्थ कालवश झाले आहेत, त्यामुळे नामोल्लेख टाळू या. पण अशाच एका प्रसंगाचा (आणि अपमानाचा) रूपन देओल बजाज या सनदी अधिकारी स्त्रीने कसा मुकाबला केला, त्याची कथा आठवण्यासारखी आहे. चंडीगढ येथे एका मेजवानीत पंजाबच्या डीजीपींनी त्यांच्या पार्श्वभागावर चापटया मारल्या होत्या. पद्मश्री पुरस्काराने विभूषित असे हे डीजीपी दारूच्या नशेत होते. रूपन देओल बजाज यांनी न्यायालयात धाव घेतली आणि या डीजीपी साहेबांना दोन लाखांचा दंड आणि तीन महिन्याची सजा ठोठावण्यात आली. प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. सजा कायम राहिली. या डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस यांचे नाव काय?
अचानक ओढवलेला सार्वजनिक नामुष्कीचा प्रसंग कसा हाताळावा हे शिकायचे असेल तर कॅडबरी इंडियाचे उदाहरण पाठय़पुस्तकात शोभणारे आहे. २००३ साली दिवाळीच्या आसपास मुंबईत कॅडबरीच्या डेअरी मिल्क चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या. हा एखाद-दुसरा अनुभव नव्हता, तर ब-याच ग्राहकांना एकाच वेळी हा अनुभव आला. फुड अ‍ॅण्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने ताबडतोब कॅडबरीचा साठा जप्त केला. कॅडबरीसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीला हा एक मोठा धक्का होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. शेवटी कॅडबरीने आपली हार मानली. ताबडतोब आवरणे बनवणारी यंत्रे बदलली. अमिताभ बच्चन यांना ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर बनवून नवीन जाहिराती बनवल्या. वितरकांसाठी 'विश्वास' अभ्यासक्रम बनवला आणि थोडय़ाच दिवसात पप्पू पास झाला. पण हे सगळे घडले एफडीएच्या कडक आणि कणखर पवित्र्याने. कॅडबरीवर वेळीच लगाम लावल्यामुळे कंपनीने कार्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारून बदल घडवून आणले. कॅडबरीसारख्या कंपनीला वठणीवर आणणा-या त्यावेळच्या एफडीए कमिशनरांचे नाव काय?
आता बघू या असे कंपनी घोटाळे, ज्यांच्यामुळे देशाची विश्वासार्हता पणाला लागली. रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज या कंपनीला या महिन्यात अमेरिकेतील एफडीएने ३५० मिलीयन डॉलर्सचा. म्हणजे अदमासे अठराशे कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अमेरिकेत भेसळयुक्त औषधे विकण्याच्या आरोपाचा स्वीकार केल्यानंतर रॅनबॅक्सीला हा दंड आकारण्यात आला आहे. जागतिक इतिहासात एखाद्या औषध कंपनीला इतकी मोठी शिक्षा पहिल्यांदाच भोगायला लागत आहे. रणबीर आणि गुरुबक्ष सिंग (म्हणून नाव रॅनबॅक्सी) या भावांनी चालू केलेली ही कंपनी भाई मोहन सिंग यांनी १९५२ साली विकत घेतली. त्यानंतर त्यांचा मुलगा परमिंदर सिंग यांनी कामात भाग घ्यायला सुरुवात केल्यानंतर जागतिक बाजारात या कंपनीचे नाव आदराने घेतले जायचे. जगातल्या १२५ देशांना औषध पुरवणा-या कंपनीचे गुडविल या घोटाळ्यानंतर शून्यावस्थेत पोहोचले आहे. पण याचा फटका परमिंदर सिंग किंवा इतर संचालकांना बसला नाही, कारण या कंपनीच्या समभागांचा सिंहाचा वाटा म्हणजे ६३ टक्के भाग २००८ साली त्यांनी एका जपानी कंपनीला विकला होता. ज्यामुळे हा दंड कंपनीला भरावा लागला तो घोटाळा २००६-२००६ सालचा आहे. त्याबाबत महत्त्वाची माहिती दाबून ठेवल्याचा आरोप आता जपानी कंपनीने रॅनबॅक्सीच्या जुन्या संचालकांवर केला आहे. जागतिक बाजारात नुकसान ज्या जपानी कंपनीचे झाले आहे त्या कंपनीचे नाव काय?
सुशिक्षित महाराष्ट्रात एनरॉनचे नाव ऐकले नाही, असा नागरिक सापडणे मुश्कीलच आहे. एन्रॉनचा करार, त्यांना दिलेली विजेची आधारभूत किंमत आणि त्यानंतर एनरॉनचे महाराष्ट्रात आगमन या विषयावर उडलेली राजकीय धुळवड यामध्ये जितकी ऊर्जा खर्च झाली तितकी ऊर्जा निर्माण होण्याआधीच एनरॉनची पालक कंपनी रसातळाला गेली आणि त्यासोबत विलयाला गेली सर्व राजकीय पक्षांची विश्वासार्हता. नुकसान मात्र झाले संपूर्ण महाराष्ट्राचे. अमेरिकेतील एन्रॉन कंपनी बुडीत खात्यात गेली ती कंपनीने दाखवलेल्या खोटय़ा आर्थिक अहवालामुळे आणि त्यासोबत नाहीशी झाली ऑर्थर अँडरसन ही जगातल्या पाच अग्रगण्य कंपन्यापैकी एक ऑडिट कंपनी. आता सरकारने एन्रॉन कंपनीचे दाभोल पॉवर कंपनी हे नाव बदलून नव्या नावाने कारभार सुरू केला आहे. या नव्या कंपनीचे नाव काय?
२००९ साली अशाच खोटय़ा आर्थिक व्यवहारामुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर बद्दू झाले होते. यावेळी निष्काळजीपणा केला होता 'प्राइस वॉटरहाउस कूपर' या कंपनीने. गंमत अशी की, या घोटाळ्यामुळे 'सत्यम' कंपनी बंद पडली नाही किंवा'प्राइस वॉटरहाउस कूपर' पण बंद पडली नाही. घोटाळा इतका मोठा होता की की तो सरकारने स्वत:च निस्तरला आणि 'सत्यम'चा म्होतूर एका नव्या कंपनीसोबत लावून देण्यात आला. ज्या नव्या कंपनीच्या हातात सत्यमचा हात देण्यात आला त्या कंपनीचे नाव काय?
हे सगळे घोटाळे माहिती दडवून-दाबून ठेवल्याने झाले. हे सगळे किळसवाणे उद्योग बघितले की महाराजांच्या या रचनेची आठवण होते.
चिरगुटे घालूनी वाढविले पोट
गरभार बोभाटा जनामध्ये
लटकेची डोहाळे दाखवी प्रकार
दूध स्तनी पोर पोटी नाही
तुका म्हणे अंती वांझ तेची खरी
फजिती दुसरी जनामध्ये
(या लेखातील प्रश्नांची उत्तरे याच पुरवणीत इतरत्र)
'प्रश्नमालिका' सदरातील प्रश्नांची उत्तरे
१) राजेश मापुस्कर यांनी दिग्दर्शित केलेला सध्याच्या क्रिकेटवर भाष्य करणारा संवाद असलेला चित्रपट – 'फेरारी की सवारी'
२) स्त्री कर्मचा-यावर अतिप्रसंग केल्यामुळे राजीनामा देण्यास भाग पडलेल्या आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे नाव – 'डॉमिनिक स्ट्रॉस कान'
३) विनयभंग केल्यावरून रूपन देओल बजाज यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेऊन शिक्षा व दंडास पात्र ठरवलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस यांचे नाव – 'केपीएस गील'
४) कॅडबरी कंपनीला वठणीवर आणणा-या एफडीए कमिशनरांचे नाव – 'उत्तम खोब्रागडे'
५) रॅनबॅक्सी घोटाळ्यात जागतिक बाजारात नुकसान झालेल्या जपानी कंपनीचे नाव – 'दाइईची सॅन्क्यो'
६) एनरॉन कंपनीचे दाभोळ पॉवर कंपनी हे नाव बदलून नव्या नावाने कारभार सुरू केलेल्या कंपनीचे नाव – 'रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रायव्हेट कंपनी'
७) ज्या नव्या कंपनीच्या हातात 'सत्यम'चा हात देण्यात आला त्या कंपनीचे नाव – 'टेक महिंद्रा'


Read More »
रंगछटांतून गालिचा फुलवणारा कलाकार..

चीन देशात गेल्या अडीच हजार वर्षापासून 'हनी राइस टेरेस' म्हणजेच डोंगरावर भाताची शेती केली जात आहे. युनेस्कोने 'हेरिटेज'चा दर्जा दिलेलं या जागेचं कलात्मक शैलीतलं विहंगम दृश्य आपल्या चित्रकलेतून सादर करणारे चित्रकार म्हणजे, शांताराम सोनावणे. त्यांच्या 'हनी राइस टेरेस'च्या चित्रांचं 'हेवनली' हे चित्रकला प्रदर्शन जहांगीर कलादालनात ३ जूनपर्यंत सकाळी ११ ते ७ या वेळेत कला रसिकांसाठी खुलं आहे.
'नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा' असं म्हटलं जातं. म्हणजेच नवनवीन कल्पनांना जन्म देते, ती मनुष्याच्या ठायी असलेली 'प्रतिभाशक्ती'. त्यामुळे सर्वसामान्यांपेक्षा 'कलाकार' वेगळा ठरतो तो इथेच! प्रतिभेचा वरदहस्त लाभलेल्या कलाकाराच्या सौंदर्यदृष्टीला एखाद्या गोष्टीतला नेमका कोणता पैलू भावेल, त्याची कल्पनाशक्ती कोणत्या दिशेला भरारी घेईल आणि त्यातून तो काय साकारेल, याची कल्पना करणंच कठीण!
गेली २७ वर्षे वेगवेगळ्या चित्रप्रदर्शनांमधून आपली कला सादर करणा-या चित्रकार शांताराम सोनावणे यांना एकदा एक चायनीज चित्रकार भेटले. त्यांनी चीनमध्ये गेल्या अडीच हजार वर्षापासून 'हनी राइस टेरेस' म्हणून ओळखली जाणारी पारंपरिक भातशेती कशी केली जाते, ते दृश्य किती विलोभनीय दिसतं.. याचं वर्णन करून सांगितलं आणि झालं, वर्षभरातच शांताराम सोनावणे यांनी 'हनी राइस टेरेस'च्या ३० कल्पक चित्रांचं 'हेवनली' हे प्रदर्शन भरवलं. चीनमध्ये युआनयांग देशाच्या वरच्या बाजूला असलेल्या पर्वतरांगांवर ही भातशेती केली जाते.
सोनावणे यांच्या 'हेवनली' चित्रांची खासियत म्हणजे, त्यांनी जसंच्या तसं चित्र न काढता, त्यात ऋतूंनुसार होणारे बदलही प्रभावीपणे रेखाटले आहेत. या सर्व चित्रांतून त्यांची कलात्मकता पाझरते. 'हनी राइस टेरेस'चं विहंगम दृश्य प्रेक्षकांना या चित्रांद्वारे पाहायला मिळेल. शांताराम सोनावणे यांची ही चित्रं वास्तवदर्शी नाहीत. ती 'क्रिएटिव्ह लॅण्डस्केप' या प्रकाराखाली मोडतात. 'आजतागायत मी जी चित्रं काढली, ती सर्व चित्रं 'क्रिएटिव्ह पेंटिग्स' आहेत. कॅमे-यासारखं यंत्रसुद्धा कोणत्याही गोष्टीची हुबेहुब 'कॉपी' करतंच. म्हणून वास्तववादी चित्रांपेक्षा मला स्वत:च्या कल्पनेने चित्र काढायला जास्त आवडतं. कारण त्यात मी माझी कला दाखवू शकतो. त्यामुळे या चित्रांमध्येही मी मला भावलेला निसर्ग मांडलेला आहे,' असं ते सांगतात.
रेषा, रंग आणि काही भौमितिक आकारांचा सुयोग्य वापर करून त्यांनी या चित्रांमध्ये परिणाम साधला आहे. सामान्यत: डोंगर पाहिल्यानंतर आपल्याला एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसतात. डोंगरावरचे चढ-उतार, झाडांमधल्या वेगवेगळ्या रंगछटा, प्रकाशानुसार एकाच डोंगरावर दिसणारे वेगवेगळे रंग जसे आपल्याला प्रत्यक्षात दिसतात, तसे ते सोनावणे यांनी चित्रातही दाखवले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात डोंगरावर दिसणारी वलयं, रंगसंगती या चित्रांमध्येही दिसतात. एका चित्रात डोंगरउतार, भातशेती आणि सूर्यप्रकाशात दिसणारं त्यांचं रूप आपल्याला पाहायला मिळतं तर दुस-या चित्रात हिरव्यागर्द डोंगरावर नटलेली लाल फुलांची रांग आपल्याला आकर्षित करते.
लयबद्ध रेषांमध्ये डोंगराचा एखादा भाग दाखवण्यासाठी वापरलेल्या भौमितिक आकारामुळे चित्रात निर्माण झालेला विरोधाभास शोभून दिसतो. 'व्हॅली'चं चित्र उभं करण्यासाठी हिरव्या रंगांच्या अनेक छटा आणि त्या रंगाला साजेशा इतर काही रंगछटांमध्ये चित्रं रंगवण्याची त्यांची शैली तर निराळीच! हे चित्र पाहूनच त्या 'व्हॅली'च्या खोलीची आणि भव्यतेची कल्पना येते. त्याचप्रमाणे तळं, डोंगराच्या उतारावर पाणी अडवून केली जाणारी शेती, सूर्यास्ताच्या वेळी या डोंगरांच्या दृश्यात दिसणारे बदल.. यांसारखी चित्रंही या प्रदर्शनात दिसतात. एका चित्रात तर ब्रशने किमया साधत शेतातले बारकावे अधोरेखित केले आहेत.
'हेवनली' या संकल्पनेच्या बाहेर जाऊन शांताराम सोनावणे यांनी इतरही काही चित्रांचा समावेश या प्रदर्शनात केला आहे. यामध्ये सोनावणे यांनी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपती साकारलेला आहे. 'बिंदूवाद' म्हणजेच 'पॉइंटिलिजम' या शैलीत साकारलेले गौतम बुद्धही आकर्षक रंगांमुळे प्रेक्षकांवर छाप पाडत आहेत.
शांताराम सोनावणे यांनी १९७७ साली 'रहेजा स्कूल ऑफ आर्ट'मधून आपलं चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलं. १५ र्वष ते महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होते. चित्रकला विश्वातल्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाबाबत ते सांगतात, 'मी गरिबीतून वर आल्यामुळे कोणत्याही गोष्टीच्या बाह्यरंगापेक्षा अंतरंग जाणून घ्यायला मला जास्त आवडतं. कारण गरिबाला कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करण्याची तळमळ असते.
त्यामुळे कोणतंही चित्र काढतानासुद्धा मी त्याचा अभ्यास करतो. चित्रकलेतलं माझं प्रेरणास्थान दत्तात्रय परूळेकर आणि माझे आईवडील हे आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे माझी आई असेपर्यंत माझ्या प्रत्येक चिप्रदर्शनाचं उद्घाटन मी तिच्या हस्तेच केलं आहे.' सोनावणे यांनी २००७ साली आपल्या शिक्षकी पेशातून निवृत्ती घेतली. आता चित्रकलेसाठी बराच वेळ देता येत असल्याने यानंतर 'दरवर्षी एका नवीन चित्रसंकल्पनेवर काम करून रसिकांना आनंद देण्याचा माझा प्रयत्न असेल,' असं ते सांगतात.
आजवर अनेक पुरस्कार सोनावणे यांच्या नावावर जमा आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचा १९९३ सालचा कला पुरस्कार, १९९१ सालचा 'सर्वोत्कृष्ट कला शिक्षक- महापौर पुरस्कार' शिवाय 'कॅमल आर्ट अवॉर्ड', 'लायन्स क्लब अवॉर्ड' यांसारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं आयोजित करण्यात आली आहेत. याआधी शांताराम सोनावणे यांची 'जहांगीर आर्ट गॅलरी' येथे ६ सामूहिक प्रदर्शनं झालेली आहेत, तर स्वतंत्रपणे भरलेलं हे दहावं प्रदर्शन आहे.
अजूनही चित्रकला म्हणावी तितकी अधिकाधिक लोकांपर्यंत का पोहोचली नाही, असं विचारलं असता त्यांनी सुंदर विचार मांडला.
ते म्हणाले, 'मूल जन्माला आल्यावर आई मुलाचे कान तपासून पाहते, डोळे तपासते. पण 'दृष्टीचं' काय? मूल मोठं होत असतानाच चित्रकलेसाठी आवश्यक असणारी दृष्टीही प्रगल्भ झाली पाहिजे. मुलांवर तसे संस्कार लहानपणापासूनच केले गेले पाहिजेत. तरच चित्रकलेचा जाणकार वर्ग समाजात निर्माण होईल.'चित्रकलेसोबतच संगीत, काव्य या कलांचीही आवड असणा-या शांताराम सोनावणे यांची कलेविषयीची जाण त्यांच्याकडच्या सर्वच कलांना पूरक ठरते आणि एका सुंदर कलाविष्काराची अनुभूती देते.

Read More »
पहारा नको हा शांततेचा

न लागे सुगावा, न वार्ता जराशी
कुठे श्वास लपले, कशी स्पंदने ही..
पहारा नको हा तुझा शांततेचा
तुझे वागणे भासते वै-यापरी
माझ्याच एका कवितेतल्या या ओळी विविध संदर्भाने अनेकदा मनात येतात. अबोला, दुरावा हा अनेकदा त्रासदायक असतो. संवाद नसल्याने वर दिसणारी शांतता जीवघेणी असते. याचा अर्थ कर्कश आवाज, कोलाहल असला की तो नेहमी हवासा वाटतो, असा नाही. ऐकू येतं म्हणून ध्वनीशी आपलं एक अतूट नातं असतं, याची जाणीव ही शांतता अधिकच स्पष्ट करते.

पहाटे चार-साडेचारची वेळ. तुम्हाला बंदुकीने गोळ्या झाडण्याचा आवाज आला तर काय मनात येईल ? ते स्वप्न नाही याची खात्री झाली तर ? खिडकीतून बाहेर बघताना एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन तुमच्या घरासमोर फिरते आहे. नेमकं काय झालं, याची तुम्हाला काही कल्पना नाही. अशा वेळी तुम्ही फोन हाताशी ठेवाल, पोलिसांना बोलवाल.. पण त्याआधी कुणी दार वाजवलं तर? बाहेर दारासमोर तुमची देखणी शेजारीण, तिच्या कपडय़ावर रक्ताचे डाग.. असे दृश्य असेल तर? तिला घरात घ्यायचं की नाही, असा विचार मनात आला तर बरं होईल. पण ते भान राहायला हवं. अन्यथा त्या व्यक्तीने एखाद्याला भोसकून तो चाकू तुमच्या स्वयंपाकघरात ठेवला असं पोलिसांना कळलं तर पुढचे काही महिने झोपेचा विसर पडेल, एवढं नक्की.
ही घटना साधारण वीस वर्षापूर्वीची. युनिव्हर्सिटीजवळ माझा नवरा त्याच्या मित्रांबरोबर राहायचा त्या वेळची.. एकंदर शांतताप्रिय आणि कायद्याचे पालन करणा-या लोकांना बघायला मिळणार नाही अशाप्रकारची. शहराचे ठरावीक भाग वगळता अगदी क्वचित घडेल अशी. आपल्याकडे येऊन गप्पा मारणारी, एखादा कांदा-बटाटा हक्काने येऊन घेऊन जाणारी आपली शेजारीण कुणाला मारण्याचा प्रयत्न करू शकते आणि विनाकारण आपल्याला त्यात अडकवू शकते, ही घटना सिनेमात शोभली असती.
पहाटे पाचला मशिदीतून कानावर येणारी बांग एक दिवस आलीच नाही, असा दिवस नसेलच. अनेक घरांतून रेडियो ऐकू येतो. देवळाशेजारी राहत असाल तर तिथल्या आरत्या, अभंग कानावर येतात. घराघरांत दूधवाला येतो. पेपरवाला पेपर टाकतो. लग्नानंतर वरात, कुठली मिरवणूक, दिवाळी आणि फटाके हे सर्व आपण त्रास झाला तरी असेलच हे मान्य केलेले आवाज. अमेरिकेतला पहिला दिवस उजाडतो आणि हे सर्व आवाज आपल्यापासून हजारो मैल दूर गेले आहेत, हे प्रकर्षाने जाणवतं. यापैकी अनेक आवाजांना झोपमोड केली म्हणून आपणच शिव्या दिल्या असतात. पण ते आवाज आपल्या आयुष्याचा एक भाग झाले आहेत हे जाणवलेलं नसतं.
अमेरिकेत लाउड म्युझिकची आवड असली तरी रोज घराघरांतून असे आवाज कानावर येतातच असं नाही. घरात विविध उपकरणांचे आवाज असतात. पण शांत वातावरणात वाजणारा स्मोक अलार्म, गराज उघडण्याचा आवाज, नळातून पडणारे चार-दोन थेंब शांततेत आपलं लक्ष वेधतात. पण एकंदर हा आवाज एवढा कमी असतो की, आवाजापासून एकदाची सुटका झाली असं म्हणणारं आपलंच मन नकळत आवाजाच्या स्मृती जागवत राहतं. एरवी हे सर्व विसरायचं ठरवलं वा त्याची जाणीव नसली तरी भारतवारी झाली वा भारतातून कुणी तिथे आलं की याची उजळणी होते. चित्रपटाचा नायक कमल हसन रेडियोचा नॉईज सुरू करून मग शांतपणे झोपतो हा सीन आठवतो का? त्याचा प्रत्यय अशा विरोधी वातावरणात नक्की येतो.
एखाद्याला सूचना केल्या, रागावलं, ओरडाआरडा केला तर त्या वेळी आपला आवाज वाढतो किंवा तो वाढवावाच लागतो, हे आपण मान्य केलं आहे. त्यामुळे ते नव्याने आपल्या लक्षात येत नाही.डिलिया, या खिडक्या जरा पुसून घे, गेल्या दोन वेळेससुद्धा इथे धूळ राहिली होती. मी खरं सहज बोलावं तसं नेहमीच्या आवाजात तिला सांगितलं होतं, पण ती एकदम रडायलाच लागली. मला काही कळेच ना. तिचं मन लावून काम करणं पाहून माझ्या मनात ती तिचं स्वत:च घर याहून आणखी किती स्वच्छ करत असेल, असा प्रश्न अनेकदा आला होता. उगाच मोठय़ाने गप्पा, रेडियो लावणं, फोनवर बोलत बसणं, असे प्रकार ती कधी करत नसे. होणा-या आवाजाविषयी ती दक्ष होती. म्हणूनच डेलियाच्या कामाविषयी माझी कधीच तक्रार नसे.
जवळ जवळ वर्षानंतर खिडकीत धूळ दिसली होती, म्हणून मी तिला पहिल्यांदा काही सांगितलं होतं. माझ्या नऊ वर्षाच्या मुलाचं पोट गेल्या एका महिन्यात तीन वेळा बिघडलं होतं. दिसेल ते तोंडात घालणं, बोट चोखणं हे त्याचे तेव्हाचे आवडीचे उद्योग. मग दुसर काय होईल? एकंदर जागरण, डॉक्टरच्या फे-या, पालक म्हणून येणारा क्षणिक वैताग.. मी गप्प राहू शकले नव्हते. पण डेलियाला ते अपमानास्पद वाटलं असावं. स्वच्छतेत ती काटेकोर होती, विश्वासू होती. त्या घटनेनंतर ती काम सोडून जाईल की काय, अशी धाकधूक मला वाटली, पण तिनं तसं केलं नाही.
मुलं शाळा-कॉलेजला गेली, सर्व आपापल्या नोकरीनिमित्त एकदा घराबाहेर पडले की, इथे जवळ सर्व नेबरहुड्समधे एकंदर शुकशुकाट असतो. थंडी वगळता इतर वेळी कुणी फिरायला, सायकल चालवायला गेलेलं दिसतं. पूर्ण वेळ गृहिणी आणि फ्री-लान्स काम करणा-यांपैकी कुणी जॉगिंगला वा कुत्र्याला घराबाहेर नेऊन आणणारे काही जण त्यात असतात. नेबरहुड्सचे रस्ते जणू ओस पडलेले असतात. अगदी क्वचित एखादी गाडी अशा आतल्या रस्त्यावर दिसते. फ्री-वेवर वा मोठय़ा रस्त्यांवर मात्र ये-जा सुरूच असते. तरीही या रहदारीला सगळ्या रस्त्यांवरच्या सकाळ आणि संध्याकाळच्या ट्राफिकची सर नाही. घराची साफसफाई करणारी, किरकोळ दुरुस्त्या करणारी, लॉन आणि बागेची कामं करणारी, अशी मंडळी रस्त्यावरून जाणं-येणं करतात, काम करतात.
एवढाच आवाज. या काम करणा-या मंडळींवर कुणी लक्ष द्यायला घरी असलं पाहिजे, असं नाही. कामवाल्या बाईकडे जशी घराची किल्ली असते तसंच काही ठिकाणी माणसं येऊन घरातली वा बगिच्याची कामं करून जातात. कुणी लक्ष ठेवायला नाही म्हटलं की खरी कामं नीट होऊ शकतात, यावर आपला विश्वास बसत नाही. पण गेली अनेक वर्ष मी ही कामं ८० टक्क्य़ांहून जास्त प्रमाणात व्यवस्थित होतात, असं पाहिलं आहे. तसंच एखादं काम अगदी टप्प्याला बिनसत जातं असंही होतं. काम करणा-यांवर आरडाओरडा करायचा नाही, त्यांना सांगायचं ते सगळं, प्लीज- थँक्यू म्हणत! ही सवय अंगी बाणवून घ्यावी लागते. जॅनिटर, हाउस क्लीनर, टॅक्सी ड्रायव्हर, नॅनी, रेस्टॉरंटमधला वेटर.. या कुणाच्या अंगावर एकदाही खेकसायचं नाही, अशी सिस्टिम मला स्वत:ला कदाचित पंचतारांकित हॉटेलातही राबवता येणार नाही.
मग हा असा आरडाओरडा अमेरिकेत कुठे अस्तित्वात नसतो का?
अमेरिकेतल्या इंडियन स्टोअर्स, इंडियन रेस्टॉरंटमध्ये जरा आत डोकावून पाहा. दिवसभरातून किमान एकदा तार स्वर लागतोच. फक्त बाहेर मात्र त्यांना तसं दाखवता येत नाही. आपल्या सहका-याशी वागताना वा हाताखालच्या लोकांशीही बोलताना किमान सभ्यता पाळली जाते, हे पाहिलं आहे. बेसबॉल, सॉकर याचे सराव आणि सामने याठिकाणी प्रशिक्षकाने संघातल्या खेळाडूंवर आवाज चढवलेला पाहून मी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. अन्यथा ऑफिसातले सहकारी, शेजारीपाजारी सार्वजनिक ठिकाणी होणा-या गाठीभेटी यात अगदी गोडीगुलाबीचे वातावरण असते. म्हणूनच ते फार कृत्रिम वाटते. अगदी क्वचित आवाजाची पट्टी वाढलेली दिसते. हमरीतुमरीवर येऊन कितीही वाद झाला तरी आवाज मात्र संयमित असतो. थोडक्यात माणसाशेजारी एक माणूस असणं म्हणजे आरडाओरडा आलाच. याच वातावरणात आपण मोठे होतो. अशा वेळी विसंवादी बोलण्याला शिस्तशीर वातावरण असावं, ही अपेक्षा तर आपल्या गावीच नसते.
कॉर्पोरेट अमेरिका हे नक्की शिकवते. आमच्याकडे वेगवेगळ्या भागात राहत असताना एशियन, अमेरिकन, मेक्सिकन अशा विविध वंशाचे लोक कामासाठी आले तेव्हा ती मंडळी परस्परांशी कशी वागतात ते अनेकदा बघता आलं. अमेरिकन वगळता इतर सर्व संस्कृतीमधून आलेले आपल्या वरिष्ठ अधिका-यांशी वागताना अतिशय नम्र होते. त्याउलट चूक झाली वा जाब विचारायचा असेल तर या सर्व अधिका-यांचा आवाजाचा टोन बदलला होता, पट्टी त्यामानाने फार बदलली नव्हती. विविध वंशाची, विविध देशांतून आलेली जोडपी जेव्हा त्यांच्या भाषेत एकमेकांशी बोलत असतात तेव्हा ते ऐकण्यासारखे आणि बघण्यासारखे असते. ती भाषा कळत नसली तर त्याची मजा अधिकच. आवाजातले चढ-उतार, टोन, दोन शब्दांमधली शांतता, हावभाव यांमुळे बांधता येणारे अंदाज यातून अनेक गोष्टी समजतात. अपरिचित भाषेतला चित्रपट बघताना आपण इंग्रजी कॅप्शन वाचायची नाहीत, असं ठरवलं तर जो अनुभव येईल त्या अनुभवाशी याचं साधम्र्य आहे.
शांतता किंवा आवाजाचा अतिरेक दोन्ही वाईटच. अमेरिकेत हे दोन्ही अनुभव येतात. पण आपल्या सततच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर एकंदर चटकन जाणवते, ती शांतता. आवाजाचे सर्व प्रकार, सर्व टोन अमेरिकेच्या मेल्टींग पॉटमध्ये जगातल्या भिन्न संस्कृती, रीतिरिवाजासकट हळूहळू अमेरिकनाइज्ड होत जातात, नियंत्रणाखाली येतात, हेच खरं.


Read More »
हिम्मतवाला आणि वाह्यात भांडण – भाग दोन

हिम्मतवाला हा सिनेमा स्वीकारताना जितेंद्रसमोर पर्याय नव्हता. कारण भांड चित्रपटासाठी समकालीन नटांमध्ये तोच योग्य होता. कारण भांड चित्रपटासाठी आवश्यक तो वाह्यातपणा करणे त्याला शक्य होते आणि विनोदी सिनेमा देणे ही त्याची गरजही होती. मात्र साजीद खान याने 'हिम्मतवाला' पुन्हा करताना रिमेक न करता रिपिटेशन केले आणि तो तोंडावर पडला. खूप सेफगेम खेळणं त्याच्यासाठी मोठी रिस्क ठरली.
मागील लेखात भांड म्हणजे काय, ते आपण पाहिले आणि जितेंद्रची 'हिम्मतवाला' या भांडसाठी का निवड केली गेली, तेही पाहिले. त्याची फिल्म करण्यासाठी निवड करण्यात आली आहे, असे जेव्हा जितेंद्रला सांगण्यात आले तेव्हा त्याच्यापुढे अनेक प्रश्न उभे राहिले. मुळात 'हिम्मतवाला'त पूर्वी हास्यरसाची जी अवस्था होती, ती गुंतागुंतीची होती. प्रतिसृष्टीय युगामध्ये हास्यरस हा तीन टप्प्यांतून जातो. पहिला टप्पा हास्यास्मिकेचा होता. जितेंद्रच्या समकालीन नायकांनी आणि अनेक दिग्दर्शकांनी 'हिम्मतवाला' पूर्वी काही चांगल्या कॉमेडीज निर्माण केल्या होत्या.
उदा. धमेंद्रने 'चुपके चुपके' आणि 'प्रतिज्ञा' या दोन हास्यास्मिकेत धम्माल उडवली होती. 'प्रतिज्ञा' या चित्रपटातील 'मैं जट यमला, पगला, दिवाना' या गाण्याने एक कल्ट निर्माण केला आणि आताची धमेंद्रची जी डान्सिंग स्टाइल म्हणून ओळखली जाते ती या चित्रपटापासूनच सुरू झाली आणि यमला, पगला, दिवाना होणे हा एक मस्तवालपणाचा सिम्बल बनून गेला. जितेंद्रचा दुसरा समकालीन नायक राजेश खन्ना याने याच काळामध्ये हृषिकेश मुखर्जी यांच्या 'बावर्ची' या चित्रपटात अशीच धम्माल उडवली होती. याचा पुढे डेव्हीड धवनने 'हिरो नंबर वन' हा रिमेकही बनवला. जितेंद्रचा तिसरा समकालीन संजीव कुमार याने 'अंगुर,' 'स्वर्ग नरक', 'श्रीमान-श्रीमती' असे धम्माल विनोदी चित्रपट दिले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जितेंद्रच्या खात्यात मात्र काहीच नव्हते. याच काळात आलेल्या अमोल पालेकर याने 'रजनीगंधा' आणि 'गोलमाल'सारख्या चित्रपटात धम्माल उडवून दिली. त्यामुळे साहजिकच आपल्या नावावर कॉमेडी चित्रपट न लागणे, हे जितेंद्रला क्लेशदायक वाटू लागले. प्रश्न असा होता की, एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत असतानाही जितेंद्रला कॉमेडी चित्रपट का ऑफर केले जात नव्हते, याचे कारण म्हणजे कॉमेडीला जी सूक्ष्म अभिनयाची गरज असते आणि मुद्राभिनयावर जे कमालीचे प्रभुत्व लागते आणि व्हाइस मोडय़ुलेशनमध्ये ज्या अभूतपूर्व कसरती कराव्या लागतात, त्यांचा दुष्काळ जितेंद्राच्या अभिनयात होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर जितेंद्राला हास्यास्मिका ऑफर करणे कुठल्याही दिग्दर्शकाला अतिशय जोखमीचे वाटत होते.
त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा 'हिम्मतवाला'सारखा वाहय़ात भांड त्याला ऑफर केला गेला, तेव्हा साहजिकच विनोदी चित्रपटामध्ये काम करण्याची एक उत्तम संधी आहे, हे जितेंद्रने ओळखले. शिवाय 'हिम्मतवाला'चा जो दिग्दर्शक होता, के. राघवेंद्र राव त्यांच्याशी जितेंद्रचे चांगले संबंध होते. म्हणून जितेंद्रने हा चित्रपट स्वीकारला आणि 'हिम्मतवाला'ने चक्क सुवर्णमहोत्सव साजरा केला. अगदी कोल्हापूरसारख्या ठिकाणीही हा चित्रपट भरपूर चालला. याच चित्रपटाने श्रीदेवी नावाची एक सुपरस्टार जन्माला आली.
'हिम्मतवाला' या चित्रपटाची कहाणी अत्यंत वाहय़ात असणे, हे अत्यंत गरजेचे होते. आतापर्यंत सोज्वळ गाणी लिहिणा-या गीतकार इंदिवरने आपण वाहय़ात झालो तर काय करू शकतो, हे दाखवून दिले. या चित्रपटाने आतापर्यंत आर. डी. बर्मनच्या सावलीत काम करणारे बप्पी लाहिरी त्यांच्या सावलीतून दूर झाले आणि त्यांनी स्वत:ची स्वतंत्र संगीतशैली रचली. या चित्रपटाने कोरिओग्राफीमध्ये नायक आणि नायिकांच्या मागे १०० डान्सर ठेवणे, मडकी, सफरचंद, मोसंबी यांसारखी प्रचंड फळे ठेवणे, डोंगरावरून एका टाइपच्या १०० वस्तू घरंगळत नायिकेबरोबर सोडणे यांसारख्या अनेक क्लृप्त्या आणल्या. नायक-नायिकेचे गाण्यात अत्यंत खासगी क्षण चित्रीत करणारा डान्स सिक्वेन्स असतानाही पाठीमागे १०० एक डान्सर नाचताना दिसणे, असा एक विनोदी प्रकारही 'हिम्मतवाला'पासूनच सुरू झाला आणि आजतागायत हा प्रकार सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हळुहळू 'हिम्मतवाला'ला एक कल्ट चित्रपटाचा दर्जा मिळाला.
साजीद खानने महाविद्यालयात असताना जेव्हा हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्याच्यावर त्याचा प्रचंड प्रभाव पडला. साजीदने तो ३५ वेळा पाहिला. अजय देवगणनेही तो पाहिला आणि दोघे महाविद्यालयात असताना त्यांनी एक गोष्ट निश्चित केली होती, ती म्हणजे या चित्रपटाची रिमेक करायची आणि या रिमेकचे दिग्दर्शन साजीदने करायचे आणि अजयने त्यात काम करायचे. अर्थात साजीद खानने 'हिम्मतवाला' दिग्दर्शित करायचा हा काही त्याचा महाविद्यालयातील निर्णय नव्हता. त्या मागे त्याच्या स्वत:चा सिनेमा जगतातील प्रवासही होता. साजीद खानची प्रवृत्ती हीच मुळात भांडाची. या भांडपणामुळे त्याने चित्रपटसृष्टीत अनेक लोकांशी पग्गे घेतले. (आशुतोष गोवारीकरसारख्या मित्राशी 'जोधा अकबर'वरून त्यांची चांगलीच जुंपली होती आणि त्याला कारण म्हणजे त्याचा वाहय़ात बोलभांडपणा होता.)
साजीद खानने आपल्या दिग्दर्शकीय करिअरची सुरुवातही एका हास्यास्मिकेपासून केली होती. फिल्मचे नाव होते 'हे बेबी.' या फिल्ममध्ये भांडपणाची काही लक्षणे असली तरी मुळात ती एक हास्यास्मिका होती. साजीद खानने 'हाऊसफुल्ल-१' केली तेव्हा मात्र त्याच्यातील भांड जागा झाला आणि एक उत्तम भांडपट प्रहसनाच्या शैलीत हिंदी चित्रपटसृष्टीला लाभला. या नंतरच्या 'हाऊसफुल-२' मध्ये मात्र साजीद खानचा खरा भांडपणा उफाळून आला. हा चित्रपट म्हणजे एक वाहय़ात भांडपट होता. साहजिकच अनेक सभ्य लोकांनी 'हाऊसफुल-२' पाहताना नाके मुरडली. या चित्रपटानंतर साजीदपुढे खरा प्रश्न निर्माण झाला, व्हॉट नेक्स्ट? कारण हास्यास्मिका, प्रहसन आणि भांड हे तीनही विनोदी प्रकार हाताळून संपले होते. अशा वेळेला त्याच्यापुढे दोनच पर्याय होते.
एखादा अभिजात कॉमेडी प्रकार निर्माण करणे किंवा सटायर निर्माण करणे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 'पडोसन'चा अपवाद वगळता एकही अभिजात कॉमेडी चित्रपट निर्माण झाला नाही. त्यामुळे साहजिकच असा काही प्रकार आपल्या हातून घडेल याची साजीद खानला खात्री नव्हती. सटायर हा साजीद खानचा पिंड असला तरी 'आज का एमएलए' या एकमेव चित्रपटचा अपवाद वगळता बॉलिवुडमध्ये एकही सटायर यशस्वी झाला नव्हता. 'जाने भी दो यारो'सारखा एखादा अभिजात फार्स (प्रहसन) द्यायला मुळात ज्या ताकदीचे लिखाण हवे त्या ताकदीचे लिखाण साजीद खानकडे नव्हते.
त्यामुळे त्या सर्व शक्यता नष्ट झाल्या. या दरम्यानच्या काळात अचानकपणे जुन्या चित्रपटाची रिमेक बनवणे शक्य आहे का, या अंगाने अनेक लोक चाचपणी करत होते. या स्पर्धेत डेव्हीड धवनने 'चष्मेबदूर'चे हक्क मिळवून बाजी मारली तर 'हिम्मतवाला' या चित्रपटाचे रिमेकचे हक्क वासू भगनानी याने आधीच मिळवले होते. दुर्दैवाने याच काळात वासू भगनानींच्या दोन फिल्म फ्लॉप झाल्याने त्यांना आता सेफ गेम खेळायचा होता. त्याचवेळी अजय देवगणने 'गोलमाल-१ आणि दोन' अशा कॉमेडीत आणि 'बोलबच्चन'सारखे प्रहसन केले आणि ते यशस्वीही झाले. आता फक्त त्याच्यासाठी विनोदाचा फक्त एकच प्रकार हाताळायचा होता आणि तो म्हणजे भांड.
थोडक्यात काय, तिघांचाही चित्रपट उद्योगातील प्रवास एका अशा ठिकाणी पोहोचला होता जिथे भांडाशिवाय पर्याय नव्हता आणि रिमेकसारखी सेफ्टी नव्हती. त्यातच साजीद खानने तीन विनोदी चित्रपट आणि अजय देवगणने तीन विनोदी चित्रपट लागोपाठ दिले असल्यामुळे वितरकांसाठी हा अत्यंत सेफ गेम बनला होता. त्यामुळे वासू भगनानीने या दोघांना घेऊन 'हिम्मतवाला'च्या रिमेकची निर्मिती करण्याचे निश्चित केले. थोडक्यात काय, सर्व बाजूंनी आणि सर्व दिशांनी हा चित्रपट एक बिझनेस प्रपोजल म्हणून हमखास यशस्वी होईल, असा प्रकल्प होता. फक्त एकच चूक झाली, या सर्वानी रिमेक बनवला नाही तर रिपिटेशन केले आणि रिपिटेशनला दाद देण्यात कोणालाच रुची नव्हती आणि 'हिम्मतवाला' कोसळला. हे नेमके कसे झाले ते आपण पुढील लेखात पाहू.

Read More »
आमचा कायदेभंग!

कोणीही जर कायदा तोडला तर लगेच त्याचे उदात्तीकरण करणारी एक विचित्र विचारधारा आपल्या देशात मूळ धरू पाहत आहे. आज प्रचलित असलेले कायदे हे स्वतंत्र भारताच्या संविधानाचे, आपले स्वत:चे कायदे आहेत हे सत्य आपण विसरूनच गेलो आहोत. स्वातंत्र्यपूर्वकाळातील कायदेभंगाला मिळालेली प्रतिष्ठा हेच तर या विचित्र वागणुकीचे कारण नाही ना, अशी पुसटशी शंका हल्ली मनात येते.
स्थळ : दांडी
दिनांक : ६ एप्रिल १९३०, महात्मा गांधींनी सकाळी साडेसहा वाजता तत्कालीन ब्रिटिश सरकारला कुठलाही कर दिल्यावाचून मीठ बनवले. त्याद्वारे त्यांनी सरकारी कायद्याचा भंग केला. त्यासाठी त्यांना महिन्याभराच्या आत, ४-५ मे रोजी अटक करण्यात आली. या अटकेनंतर मोठय़ा प्रमाणात चळवळ सुरू झाली. सरकारने अभूतपूर्व दडपशाही करून ही चळवळ मोडण्याची पराकाष्ठा केली. जवळजवळ वर्षभर हे आंदोलन चालू होते. पुढे सरकारने गांधीजींची सुटका केली. हे आपल्या स्वातंत्र्यलढय़ातील एक महत्त्वपूर्ण पर्व आहे. या सत्याग्रहानंतर कायदेभंग या कृतीला एक उज्ज्वल आणि देदीप्यमान परिमाण लाभले. ज्या ज्या भारतीय नागरिकाने ब्रिटिश सरकारचा कायदा मोडण्याचे धाडस केले तो तो नागरिक एक उच्च प्रतीचा देशभक्त मानला गेला.
स्थळ : मुंबईच्या एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग कॉलेजच्या समोरची गल्ली.
दिनांक : कुठलाही कॉलेजला सुट्टी नसलेला दिवस. अनेक विद्यार्थी, जे बहुतेक या कॉलेजचेच असावेत, आपल्या कॉलेजकडे निघालेले आहेत. पण विशेष म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी एकही रस्त्याच्या बाजूला असलेल्या (आणि रिकाम्या असलेल्या) पदपथांवरून चालत नाहीये.
सारे के सारे रस्तेपर चलते चलते चले!
आता जेथे पदपथ, म्हणजे फुटपाथ असतात तेथे पादचा-यांना पदपथावरून चालणे कायद्याने आवश्यक आहे. रस्त्याच्या रुंदीमधून वेगळा भाग काढून विशेषत: पायी चालणा-या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशी व्यवस्था नगरपालिकेने मुद्दाम खर्च करून केलेली असते. पण आपल्या सध्याच्या सुजाण नागरिकांना त्याचे काय अप्रूप होय! त्यांना कायदेभंग करण्यातच रस आहे! बरे हे जे विद्यार्थी चालत चालत आपल्या महाविद्यालयात निघाले आहेत, ते सगळे सुशिक्षित नागरिक आहेत, आपले भावी अभियंते आहेत, पुढे राष्ट्रनिर्माण करण्याची जबाबदारी यांच्याच शिरावर आहे.
यांना आपण फुटपाथवरून चालले पाहिजे, रस्त्याच्या मधून नाही, या नियमाचे पक्के ज्ञान आहे. तरीपण ते या साध्या नियमाचेदेखील पालन करीत नाहीत. ही वृत्ती कुठून येते? याचेच पुढचे आवर्तन आपण ट्रॅफिक सिग्नलवर बघतो, लाल दिवा असला तरी सरळ पुढे जाणारे वाहनवीर, पादचारी रस्ता ओलांडण्याचा दिवा लाल असताना धावत ओलांडणारे जीवावर उदार झालेले चालणारे नागरिक (अर्थात हे कायद्याने चालणारे मात्र नाहीत!), चालत्या उपनगरी लोकल गाडीच्या टपावरून प्रवास करणारे तरुण तुर्क, ही सगळी या आगळ्या वेगळ्या कायदेभंग करणा-या समाजाची बहुविध रूपे आहेत.
स्वातंत्र्यपूर्वकाळातील कायदेभंगाला मिळालेली प्रतिष्ठा हेच तर या विचित्र वागणुकीचे कारण नाही ना, अशी पुसटशी शंका हल्ली मनात येते. या सगळ्या चुकीच्या समजुतीत, तेव्हाचे कायदे परकीय, ब्रिटिश सरकारने केलेले होते म्हणून त्यांचा भंग ही एक प्रतिकात्मक देशभक्तीची कृती होती हे भानच सुटलेले आहे. त्यामुळे कोणीही जर कायदा तोडला तर लगेच त्याचे उदात्तीकरण करणारी एक विचित्र विचारधारा या देशात मूळ धरू पाहत आहे. आज प्रचलित असलेले कायदे हे स्वतंत्र भारताच्या संविधानाचे आपले स्वत:चे कायदे आहेत हे सत्य आपण विसरूनच गेलो आहोत. आपणच आपले कायदे पाळण्याचे सोडून देत आहोत आणि समाजाला शिस्त ज्यांनी लावायची अपेक्षा आहे, ते आपले बहुसंख्य नेते, स्वत:च अशा कायदेभंगाला सुप्त किंवा उघड समर्थन देण्यात धन्यता मानीत आहेत.
कुठल्याही ख-या किंवा खोटय़ा अन्यायाची तड लावण्याचे यांचे उपाय म्हणजे रास्ता रोको, दगडफेक, हरताळ, 'बंद' अशाच मार्गाने जातात. हे सगळे वैध आणि अवैध मार्ग त्या काळी परकीय सत्तेविरुद्ध वापरलेले मार्ग होते ही जाणीव आपल्या समाजमानसातून नाहीशी करण्यात आपल्याला यश मिळालेले दिसते. आणि सरकारविरुद्ध वापरतो. त्याने आपले स्वत:चेच नुकसान करून घेतो. दगडफेक करून बेस्ट बसेसच्या फोडलेल्या काचांचा सगळा खर्च सरतेशेवटी बेस्ट आपल्यासारख्या प्रवाशांच्याच खिशातून भाडे वाढवून वसूल करत आहे. हे देखील तारतम्य समाजाला उरलेले दिसत नाही.
या प्रकारच्या वागणुकीचे अंतिम परिणाम मात्र किती भीषण आहेत ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. अशा बंद, हरताळ, इत्यादी मुळे हजारो कामांचे तास वाया जातात, सरकारी आणि खासगी, म्हणजे पर्यायाने आपल्या राष्ट्राच्या संपतीचा विनाश होतो. चालणा-या व्यवसायाच्या राष्ट्रगाडय़ाला खीळ बसून प्रचंड नुकसान होत असते. एकीकडे आपले सरकार परकीय भांडवल आणून देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मागे लागले आहे. त्या भांडवलाचा मार्गदेखील कुंठीत होतो कारण कुठलाही शहाणा गुंतवणूकदार कधीही अस्थिर समाजव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करीत नाही. परिणामी देशाच्या प्रगतीचा ओघ मंदावून देश पुन्हा गरिबीच्या मिठीत ढकलला जातो आहे.
ही सगळी कारणपरंपरा आपल्या समाजाच्या जाणिवेत घट्ट रुजलेल्या कायद्याविषयीच्या अनादरामुळे आणि कायदेभंगाबद्दल मनात रुजवलेल्या खोटय़ा प्रतिष्ठेमुळे (False Glamour), सुरू झालेली आहे. सगळ्या जगात प्रगत राष्ट्रे आपण जेव्हा बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की त्या सगळ्या राष्ट्रात कायदापालनाला सर्वोच्च स्थान दिलेले आढळून येईल. तसेच सगळ्या अप्रगत आणि मागासलेल्या देशात सर्रास कायदा मोडणा-यांची बहुसंख्या असल्याचेही आपल्या लक्षात येईल. माझ्या व्यवसायानिमित्त मी अनेक देशात प्रवास आणि वास्तव्य केले आहे. प्रगत देशातल्या नागरिकांचा कायद्याच्या प्रती असलेला आदर बघून मी अनेकवेळा आश्चर्यचकित झालो आहे. एकदा अमेरिकेत, माझ्या भावाबरोबर, श्रीकांत नेनेबरोबर रात्री बाराच्या सुमारास घरी परत येत होतो. वाटेत एका छोटय़ा चौरस्त्यावर एक 'रळडढ' साइनपाशी त्याने मोटार थांबवली आणि लगेच सुरू केली. कोठूनही कुठेही वाहने येत नव्हती. तिथे कुठलाही ट्रॅफिक सिग्नलचा दिवा नव्हता. अगदी व्हिडियो कॅमेरासुद्धा नव्हता.
मी : 'इथे थांबण्याची काय गरज होती?'
श्रीकांत : 'अमेरिकेत ट्रॅफिक नियम असा आहे की, अशा 'रळडढ' साइनपाशी वाहन पूर्णपणे थांबवून, मग जर रस्ता मोकळा असेल तर पुढे जायचे. म्हणजे तुमच्या गाडीचा वेग नेहमी हळू आणि नियंत्रणामध्ये राहतो. या प्रकारे वागले असता चुकूनही कधी अ‍ॅक्सिडेंट होऊ शकत नाही. आणि नियमात असे कुठेही लिहिलेले नाही की, रस्ते रिकामे असताना असे थांबायचे नसते! अमेरिकेत मोटार वाहने खूप जास्त प्रमाणात आहेत आणि रस्ते चांगले असल्याने वेग पण खूप जास्त असतो. म्हणून हे नियम अतिशय विचारपूर्वक तयार केलेले आहेत. आणि त्यांचे पालन कडकपणे करण्याबाबत सगळे प्रजाजन अतिशय आग्रही आहेत आणि म्हणून सगळे लोक ते पाळतात. त्यामुळेच प्रत्यक्ष अपघात कमी आहेत.'
हे म्हणणे मात्र मला पूर्णपणे पटले. कायदेकानून सदासर्वदा पाळण्याची समाजाला सवय लागल्यानेच अपघाताच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते. नाहीतर आपल्याकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर इथल्या चांगल्या रस्त्याच्या क्वालिटीमुळे भरधाव मोटारी चालवल्या जातात. आणि नियम पाळण्याची सवय नसल्याने अपघातही अनेक आणि तेसुद्धा गंभीर, सदैव होत असतात.
जर आपल्यापैकी काही लोकांना काही कायद्यांबद्दल आक्षेप असतील तर आपल्या न्याय आणि राजकीय व्यवस्थेमध्ये ते बदलण्याचीदेखील प्रक्रिया उपलब्ध आहे. उठसूट आंदोलने करण्यापेक्षा अशी योग्य प्रक्रिया वापरून आपण कायदे समाजाच्या सुव्यवस्थेसाठी बदलू शकतो. आणि अंती ही प्रक्रियाच आपल्याला स्थायी समाधान देऊ शकते. आंदोलनांचे यश हे तात्पुरते असते आणि फिरून काही अस्वस्थ लोकांना वाटले म्हणून दुस-या आंदोलनांनी हे यश पुन्हा हिरावून टाकले जाऊ शकते!
सध्या भारत हा देश एक महासत्ता होणार अशा बातम्या खूप वेळा आपण बघतो, ऐकतो आणि ऐकून मनातल्या मनात खूश होतो.
पण जर आपला समाज कायद्याची बूज राखण्यास शिकला नाही तर महासत्ता तर सोडाच, सध्या आहे तेवढीसुद्धा पत आणि प्रत आपला देश सांभाळू शकणार नाही. कारण राष्ट्राची उन्नती करणारे नागरिक हे कायदापालनाच्या बाबतीत किती कठोर आणि जागरूक आहेत यावरच राष्ट्र एक मोठे आणि समृद्ध राष्ट्र होईल का नाही हे ठरेल. आणि आपल्या आसपासचे कुठलेही देश जर बघितले तर हे आपल्या लगेच ध्यानात येईल की फक्त कायदापालक देशच प्रगतीच्या पथावर आहेत.
ही कायदापालनाची वृत्ती आपल्या समाजात आणि विशेषत: तरुण मुलामुलींमध्ये बाणवणे अतिशय आवश्यक आहे, नाहीतर येणा-या काळाचे आव्हान पेलणे आपल्याला फारच कठीण जाईल. आपल्याला बाहेरच्या शत्रूपेक्षासुद्धा हा आपल्या समाजाच्या कायद्यांबद्दलच्या ढिसाळ आणि बेजबाबदार वृत्तीचा धोका अधिक गंभीर आहे. त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने आपण आपल्या देशाच्या कोठल्याही कायद्याशी प्रतारणा करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. कायदेशीर मार्गाने जाणारा समाजच शेवटी स्थायी प्रगती करतो हे एक वैश्विक सत्य आहे.

Read More »
निश्चितीच्या पैजा जिंकी

पैजा लावण्याचा वारसा आपल्या सांस्कृतिक धमन्यांमधून वाहतोय. बैलाच्या शर्यतींपासून ते कोंबडयांच्या झुंजींपर्यंत रक्तलांछित पैजांना आपण अधिष्ठान दिलंय. आताशा क्रिकेट-बिकेट सामन्यांमुळे पैजांमधलं रक्त जरा कमी झालं होतं म्हणावं, तर या माफिया लोकांनी इथेही घुसखोरी केली. पाश्चिमात्य जगतात पैजा निश्चित करून पैजाबाज लोकांशी बेईमानी करणा-यांचे खून पडतात म्हणे. इथे असे लोक चर्चाबाजांचे मीडियाशिरोमणी होतात.
सरडय़ांची झुंज पाहिली तेव्हा आम्ही खूप लहान होतो. मोठया मुलांनी सरडे पकडले होते. त्यांच्या तोंडात तंबाखू भरली आणि आमच्या लपाछपीच्या विहिरीत त्यांना टाकलं. लपाछपीची विहीर म्हणजे एक काँक्रिटच्या मोठय़ा पाइपचा तुकडा होता. तो उभा करून ठेवलेला. त्यामुळे त्यात लपता यायचं. तिथेच सरडय़ांची झुंज होती. सरडय़ांची नावं पण ठरली होती. एक लाल्या आणि दुसरा झुपक्या. लाल्या जिंकणार असं ज्यांना वाटत होतं त्यांनी पाच लेबल्स जमा केली होती. जिंकल्यावर त्याची दहा मिळणार होती. पण त्याआधीच वॉचमन महाराज उगवले आणि सगळा डाव उधळला गेला. पाच लेबलंही गेली ती गेलीच.
अमृताशी पैजा वगैरे बोधामृत शाळेतच मिळाल्यामुळे पैजा लावणं फारसं गैर नसावंसं वाटायचं. 'लागली बेट' हे दर चार-सहा वाक्यांनंतर येणारं वाक्य असायचं. एकदा टाळी दिली म्हणजे बेट लावल्यात जमा असायचं.पैजा लावणं आणि जुगार हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला जुगार खेळणं अनेक ज्ञातींमध्ये संमत आहे. विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जुगाराला मान्यता आहे. चाणक्याने आपल्या उत्पन्नाच्या ९ टक्केपर्यंत धन जुगारावर लावण्यात हरकत नाही, असं सांगितलेलं आहे. तरीही धनसंपत्तीपासून ते बायकोपर्यंत अनेक गोष्टी जुगारात लावण्याचा सांस्कृतिक इतिहास आहे. तसा जुगाराचा सांस्कृतिक इतिहास चीनलाही आहे.
महासत्ता बनण्याच्या या दोन संस्कृतींच्या शर्यतीत मात्र जुगाराच्या बाबतीत आपली पीछेहाट झाली आहे. जुगाराच्या सांप्रत जगतात चिनी माणूस भारतीयांच्या खूप पुढे आहे. मकाऊच्या कसिनोंमध्ये सायंकाळी छान नट्टापट्टा करून चिनी तरुण-तरुणी जुगार खेळायला जाताना दिसतात. तिथली जुगाराची केंद्रंही प्रचंड मोठी. एकेक फुटबॉलच्या मैदानाएवढं मोठं. दालनंच्या दालनं आणि मजलेच्या मजले जुगा-यांनी भरलेली. सर्वसामान्यांसाठी हिरवी आणि केंद्रस्थानी किरमिजी रंगाची मखमल असलेली टेबलं मात्र श्रीमंतांसाठी राखीव असतात. कारण तिथले सुरुवातीचे दावेच लाखांपासून सुरू होतात. मकाऊच्या सुरक्षाव्यवस्थेत फिलिपिन्यांसह नेपाळी गुरखे मोठया प्रमाणावर आहेत.
भारतीय किंवा पाकिस्तानी माणूस दिसला की आवर्जून ते हिंदीत बोलायला येतात. एका गुरख्यानेच तिथल्या किरमिजी टेबलांच्या दालनाची सफर घडवून आणली. लाखो डॉलर्सचा जुगार खेळणाऱ्या त्या टेबलांवर चक्क चार भारतीय चेहरे दिसले. गुरख्याने सांगितलं की ते मूळ भारतीय असलेले अमेरिकन आहेत. जुगाराच्या त्या श्रीमंती टेबलांवर भारतीय वंशाचा झेंडा फडकताना पाहून मला आणि त्या नेपाळ्याला आनंद का व्हावा, कुणास ठाऊक?
तिथली कंट्रोल रूम पाहण्याची विनंती केली. अर्थातच चिन्यांनी दाद दिली नाही. पण तिथल्या नेपाळी बहिर्जी नाइकांच्या कानाशी लागून खूप सारी माहिती काढून घेतली. अट्टल चिनी जुगारी कधीच एका टेबलावर बसत नाही. तो रात्रीत वारंवार टेबल बदलतो. कारण कंट्रोल रूमवरून जुगा-यांवर लक्ष ठेवून असणारी एक वेगळी फळीच असते. ते सुरुवातीला नवख्या माणसाला जिंकू देतात. जिंकू देण्यासाठी ही यंत्रं कॅलिब्रेट केलेली असतात. जुगाऱ्याचा आत्मविश्वास वाढला की मग अधिकाधिक टोकनांचे दावे करू लागतो आणि मग त्याला लुटण्यासाठी ही सगळी यंत्रणा सुसज्ज असते.
कसिनोचं नाइट लाइफ आपल्याकडे नाही. गोव्यात आहे. गोव्यात ६ कसिनो आहेत. पैकी दोन मांडवीच्या पाण्यात तरंगणारे आहेत. पण अधिकृत नसलं तरी मुंबईसारख्या शहरात जुगा-यांचं नंदनवन रात्री झगमगू लागतं, असं बोललं जातं. पैकी गिरदी-दाना हा पारंपरिक प्रकार. किरमिजी टेबलांऐवजी इथे गाद्या-गिरद्या आणि तक्के-लोड असतात. झुबरं आणि हंडय़ा टांगलेल्या असतात. हि-यांचे कफलिंक्स असलेले शेठजी लोडाला टेकून बसलेले असतात. मुंबईच्या मायावी जगतातले अनेक मानेजाने लोक इथे हजेरी लावतात, म्हणे. बाकी यांत्रिक जुगार कुठेकुठे चालतात. अगदी नाक्यावरच्या व्हीडियो पार्लपर्यंत जुगाराचं लोण पसरलेलं आहे. पण सारं अगदी अनधिकृतपणे अधिकृत.
आयपीएल क्रिकेटमधल्या फिक्सिंग प्रकरणानंतर बेटिंग आपल्याकडे अधिकृत करावं का, अशा काही चर्चा ऐकल्या-वाचल्या आणि आपल्याकडच्या बेटिंगशी निगडित मानसिकतेबद्दलची चक्र मनात फिरायला लागली. जगात काही ठिकाणी बेटिंग अधिकृत आहे, तर अनेक ठिकाणी ते निषिद्ध आहे. बेटिंग अधिकृत असल्यामुळे सेटिंग अथवा फिक्सिंग थांबलं आहे,अशातला भाग नाही. कारण फसवणुकीची मानसिकता वेगळीच असते. अमेरिकेतला सुपर बोल असो किंवा युरोपियन फुटबॉल क्लब्ज असोत, बेटिंगचा कल पाहून त्याप्रमाणे सामने सेट केल्याचे आरोप होतच असतात. मात्र तिकडे पाश्चिमात्य जगतात अशा फसवणुकीला उत्तर बंदुकीच्या नळीतूनही दिलं जातं. कारण या बेटिंग आणि फिक्सिंगच्या जगतात कुठेही गेलात तरी माफियांचा हस्तक्षेप अपरिहार्य असतो.
बेटिंग अधिकृत म्हणणा-यांना या गोष्टींचं गांभीर्य कळलेलं नाही. अमेरिकेत बेटिंगमध्ये जर सेटिंग करताना आढळल्यास दहा ते पंधरा वर्षाचा कारावास आहे आणि दंडात्मक कारवाईही खूप कडक आहे. आपल्या देशातल्या कारवाईबाबत न बोललेलंच बरं. प्रथमच कुणा क्रिकेटपटूला अटक झाली आहे, पण यातले मोठे मासे अजूनही जाळ्याबाहेरच आहेत.
उद्या जर बेटिंग अधिकृत झालं तर फिक्सिंगची तुलना आपण शेअर बाजारातल्या इनसायडर ट्रेडिंगशी करू शकतो. मधल्या काळात इनसायडर ट्रेडिंगची प्रकरणे उघडकीस आली होती. जग मुठीत धरू पाहणाऱ्या कंपनीलाही केवळ ११ कोटींचा दंड झाला आणि ब्रोकरचे लायसन्स गेले. बस्स. बेटिंगमधले बुकमेकर्स हे बहुतांश माफियांच्या गुहेतून आलेले असतात. ते माफियांचा काळा पैसा घेऊन आलेले असतात आणि त्यांना नुकसान झालेलं चालत नसतं. त्यामुळे बेटिंग अधिकृत केल्यास फक्त ही माणसं उजळ माथ्याने फिक्सिंग करू लागतील, एवढंच.
पैज अस्तित्वात येण्यासाठी काहीतरी अनिश्चित कारण लागतं. अनिश्चितता हे मुख्य तत्त्व. पैजेपासून जुगारापर्यंत ही अनिश्चितताच या खेळाची मजा वाढवत असते. त्यामुळेच झुंजीपासून ते क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत आणि निवडणुकांपासून पावसाच्या लहरीपर्यंत कशावरही पैजा लागतात. आकडेवारी आणि सांख्यिकी हा या पैजेच्या खेळाचा प्राण. आकडय़ांची लॉटरी अर्थात मटका पद्धतही या अनिश्चिततेवर होती. फिक्सिंग आलं की, ही अनिश्चितता संपते आणि मग पैजेचा मूळ उद्देशच नाहीसा होतो. जिथे प्रचंड पैसा आला की, तिथे व्यावसायिकांचे हितसंबंध येणारच. हितसंबंध आले की त्यापाठोपाठ माफिया आलाच. माफियांबरोबरच काळा पैसा येतो आणि काळ्या पैशाला इतर पैशाला आपल्या रंगात रंगवून टाकणं एवढंच पटतं. मग माफिया पद्धतीने निश्चितीकरणाची निश्चिंती होऊन जाते. या सगळ्यात जनतेशी बेईमानी करणारे धकून जातात. त्याचं कुणालाच काही वाटत नाही.

Read More »
आयपीएल, द रिअँलिटी शो !

इंडियन प्रिमियर लीग बंद करा, अशी इच्छा असलेल्या नि वैताग करणा-या हजारो क्रिकेटप्रेमींना आणि क्रिकेटद्वेषींना इशारा.. ती कधीच बंद होणार नाही! कारण आता ही 'इर्रिव्हर्सिबल प्रोसेस' आहे. तिच्यात इतकी मंडळी गुंतलीयेत, जी संख्येनं भरपूर आहेत आणि ताकदीनं, प्रतिष्ठेनंही मोठी आहेत
इंडियन प्रिमियर लीग बंद करा, अशी इच्छा असलेल्या नि वैताग करणा-या हजारो क्रिकेटप्रेमींना आणि क्रिकेटद्वेषींना इशारा.. ती कधीच बंद होणार नाही! कारण आता ही 'इर्रिव्हर्सिबल प्रोसेस' आहे. तिच्यात इतकी मंडळी गुंतलीयेत, जी संख्येनं भरपूर आहेत आणि ताकदीनं, प्रतिष्ठेनंही मोठी आहेत. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असं लंबचौडं आणि सरंजामी नामकरण असलेल्या बीसीसीआय नामक संस्थानिकांना ही लीग म्हणजे त्यांची स्वत:ची प्रतिष्ठा वाटते.
या लीगमुळेच जगभरचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटू बीसीसीआयच्या दावणीला बांधले गेलेत. लीग संपू दिल्यास बीसीसीआयची मातब्बरी ती काय उरणार? आयपीएलच्या सहाव्या पर्वात फ्रँचायझींची संख्या जेमतेम आठवरून नऊवर गेली होती. म्हणजे संख्यात्मक वाढ या आघाडीवर तरी फारशी नाहीच. फ्रँचायझी फी आणि प्रक्षेपण हक्कांची फी वाढवून बीसीसीआयनं आपली तुंबडी भले गच्च भरून घेतली असेलही. पण फ्रँचायझी रक्तबंबाळ होत आहेत. गळून पडत आहेत. कोची आणि पुणे गळाल्या.
हैदराबादचे मूळ मालकही कंगाल झाले नि नवीन मालक शोधावा लागला. पंजाब, राजस्थान आणि बंगळूरु यांची स्थिती खस्ता आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद यांच्या मालकांकडे रोकडराशी असल्यामुळे सध्या तरी प्रश्न नाही. तरीही एक बिझनेस मॉडेल म्हणून आयपीएलला अजूनही उभं राहता आलेलं नाही. क्रिकेटपटूंना मिळणारा पैसा आणि कामगिरी यांचं कोणतंच गणित कोणालाही मांडता आलेलं नाही. सगळ्यांसाठी ते सोयीचंही आहे म्हणा. डॅनियल ख्रिस्तियन. नाव तरी लक्षात आहे का? स्नप्नील असनोडकर. चेहरा तरी आठवतो का? ग्लेन मॅक्सवेल. सांगा कुठं आहे नि कुणाचा आहे? यांतल्या एकानं पहिली आयपीएल गाजवली. इतर दोघांसाठी फ्रँचायझींनी विक्रमी रकमा मोजल्या.
पण पुढील हंगाम सोडा, त्याच हंगामात त्या इन्व्हेस्टमेंट मातिमोल ठरल्या. सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, ज्याक कॅलिस, सौरव गांगुली, मुथय्या मुरलीधरन यांच्या नावांच्या जोरावर.
आयपीएल तिच्या सगळ्या पाप-पुण्यासह, माकडचाळ्यांसह, भंपक पेज-थ्री पाटर्य़ासह आणि आगाऊ फ्रँचायझी मालकांसह क्रिकेटप्रेमींनी खपवून घेतली होती. आयपीएलच्या सातव्या पर्वात सचिनही नसेल, राहुलही नसेल नि गिलख्रिस्टही नसेल कॅलिसच काही खरं नाही. बाकीच्यांनी पूर्वीच निवृत्ती घेतलीये. सौरव गांगुलीच्या (वादग्रस्त असूनही) प्रदीर्घ कारकीर्दीचा अपमान करण्याचा कोडगेपणा एखादा फ्रँचायझी मालकच (नाव घ्यायला हवंय?) दाखवू धजला. लक्ष्मण, राहुल हे नव्या फॉरमॅटमध्ये मिसफिट ठरताहेत, असं त्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं जात होतं.
फ्रँचायझींच्या व्यवहारांत अचानक 'मार्केट एलिमेंट' आलं होतं. त्यामुळे भारताला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आणून ठेवलेली अनेक मंडळी अडगळीची वाटू लागली होती. प्रत्यक्षात स्थिती अशी आहे, की आज ते तिशी-चाळीशीतले क्रिकेटपटू एकीकडे आणि पंचविशीच्या आतले कथित आयपीएल स्पेशालिस्ट दुसरीकडे असा टी-२० सामना जरी लागला, तरी 'बुढ्ढे' लोक हास्यास्पदरीत्या आरामात जिंकतील. कारण क्रिकेट म्हणजे एखादा षटकार-चौकार किंवा बाउन्सर किंवा दोन-दोन ब्रेकचं नाटक करून टाकलेली २० षटकं नव्हेत. क्रिकेट ही कोणत्याही खेळाप्रमाणे एक तपश्चर्या आहे. त्या तपश्चर्येवर क्रिकेटप्रेमींची श्रद्धा असते. या श्रद्धेतूनच प्रेम निर्माण होतं. श्रद्धेतूनच देव निर्माण होतात, आयकॉन्स उभे राहतात. आयपीएलमध्ये या बहुतेक आयकॉन्सचं माकड केलं जातं.
निव्वळ नफ्या-तोटय़ाच्या गणितांवर आयपीएलचा डोलारा उभा राहिला असता, निकोप स्पर्धेचे निकष इथं पाळले गेले असते, तर सामान्य क्रिकेटप्रेमींनी तिच्याकडे सदैव संशयानं पाहिलंच नसतं. आयपीएल सदैव संशयाच्या भोव-यात वावरत होती. ताज्या स्पॉटफिक्सिंग प्रकरणानं तो संशय.. अव्यक्त परंतु निश्चित असा संशय खरा ठरलाय. एक कसोटीपटू आणि एका प्रभावशाली फ्रँचायझीचा चीफ एग्झेक्युटिव्ह आज फिक्सिंग आणि बेटिंगप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्यावर 'चारसोबीसी' लावण्यात आलीये आणि विश्वासघाताचं कलमही लावण्यात आलंय. द्रविड कर्णधार असताना त्याच्या संघातले तिघे फिक्सिंग करत होते. उद्या तो नसल्यावर काय होईल?
दुर्दैवानं या सगळ्यात सारी चर्चा बोर्डाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याच्या मागणीभोवती केंद्रित झाली आहे. परंतु ते असण्यानं किंवा पायउतार झाल्यानं बहुतेक प्रश्न अनुत्तरितच राहतील. आयपीएल ही इंग्लिश प्रिमियर लीग किंवा युरोपियन चँपियन्स लीग यांच्यासारखी गुणवत्तेलाच प्रमाण मानणारी स्पर्धा आहे, की डब्ल्यूडब्ल्यूईसारखी फिक्स्ड सामन्यांची लीग आहे? सट्टेबाज, त्यांचे क्रिकेटपटू आणि फ्रँचायझीवाल्यांशी असलेले संबंध यांच्याबाबत दरवेळी पोलिसांनाच कारवाई करावी लागणार, की बोर्डही त्याबाबतीत काही तरी करणार? या संपूर्ण प्रकरणात एकटा राहुल द्रविड काहीतरी ठोस आणि डोक्याचं बोलला. पण बाकीच्यांचं काय? सचिन तेंडुलकर ते सुनील गावस्कर यांच्यासारख्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी अद्याप तोंड का उघडलेलं नाही? सगळेच काय 'काँट्रॅक्ट'नं बांधले गेलेले आहेत. असली कसली ही काँट्रॅक्ट, ज्यांच्यामुळे क्रिकेटपटूंना अत्यंत वादग्रस्त आणि संवेदनशील विषयांवरही मतप्रदर्शन करता येत नाही! बोर्डाचे कित्येक सदस्य तर सुरुवातीचे काही दिवस काहीही बोलत नव्हते.
या सगळ्यांना विषयातलं गांभीर्य कळत नाही की हे लोक कोणत्या तरी भीतीनं ग्रासले गेलेत? आयपीएल हे बुकींसाठी इतकं सॉफ्ट टार्गेट ठरत असेल, तर उद्या त्यांचे गॉडफादर अर्थात डॉन मंडळी आणखीही पुढे जातील. प्रत्येक वेळा दिल्ली किंवा मुंबई पोलिसांसारखा सावधपणा दाखवला जाईल, असं समजण्याचं कारण नाही. फ्रँचायझी मालकांना केवळ दरवर्षी येणाऱ्या तमाशाची पडलेली आहे. त्यांतल्या काहींना तर बेटिंगचाही चस्का लागल्याचं उघडच आहे! सर्वात गंभीर म्हणजे, एखादे दिवशी या भानगडीत एखाद्या क्रिकेटपटूचा जीवही जाईल! त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ती वेळ येऊ नये म्हणून पावलं कोण उचलणार आहे? भारतात हल्ली काय खपतं, तर रिअ‍ॅलिटी शो.
आयपीएल हाही भारतीय समाजमनाचा रिअ‍ॅलिटी शो ठरू लागलाय. या रिअ‍ॅलिटी शोंमध्ये रिअ‍ॅलिटी किती असते नि नाटक किती असतं, हे आपण सारे जाणतोच. क्रिकेटमधल्या 'सी'पेक्षा सेलेब्रिटी आणि कॉर्पोरेटमधले 'सी' शिरजोर झाले होतेच. आता त्यांना क्राइममधला 'सी'देखील येऊन मिळालाय! ही रिअ‍ॅलिटी स्वीकारून काही उपाययोजना झाली, तर उत्तम. नाहीतर पुढील वर्षी पुन्हा आयपीएल आहेच. ती नवी पापं घेऊन आली, तरी मागील पापं धुऊन टाकते! कदाचित म्हणूनही समाजातल्या विशिष्ट वर्गाला तिची गरज भासत असावी!

Read More »
'ई'फासाचा विळखा!

सोनू, बाबू, गंग्या, परश्या, पिंकी सारे जण भर उन्हात अंगणात खेळण्यात दंग होते. इतक्यात आठवडा बाजारातून परतलेल्या आजोबांची चाहूल पिंकीला लागली. पिंकीने इशारा करताच सगळ्यांनी घराकडे धूम ठोकली.
सोनू, बाबू, गंग्या, परश्या, पिंकी सारे जण भर उन्हात अंगणात खेळण्यात दंग होते. इतक्यात आठवडा बाजारातून परतलेल्या आजोबांची चाहूल पिंकीला लागली. पिंकीने इशारा करताच सगळ्यांनी घराकडे धूम ठोकली. पडवीच्या लाकडी दरवाजामागे सगळे लपून दरवाजाच्या फटीतून पाहू लागले. आजोबा ओटयाच्या खालच्या पडवीत आले. पडवीत त्यांची लाकडी आराम खुर्ची होती. आजोबा खुर्चीत बसले त्या वेळी खुर्चीच्या नायलॉनचे कापड निघून ते धाडकन खाली कोसळले. त्यांच्या नातवंडांनी कापडातील एका बाजूचा दांडका काढून ठेवला होता. आजोबा पडल्याचे पाहून खोडकर नातवंडे पोट धरून हसू लागली. नेहमीप्रमाणे संतापल्याचे नाटक करून आजोबांनी खुर्चीखालून दांडका शोधला आणि खुर्चीच्या कापडात बसवून खुर्ची नीट केली.
थोडया वेळाने आजोबांनी कुर्त्यांच्या वरच्या खिशात हात घालून एक पुडी बाहेर काढली. ती पुडी पाहून नातवंडांच्या जिभेला पाणी सुटले. आजोबांनी नेहमीप्रमाणे बाजारातून लेमनच्या गोळ्या आणल्या होत्या. दरवाजाआड लपलेली खोडकर नातवंडे लगबगीने बाहेर आली आणि आजोबांच्या दिशेने धावत जाऊन त्यांच्यासमोर हात पसरून उभी राहिली. प्रत्येकाच्या हातावर दोन-दोन गोळ्या आजोबांनी टेकवल्या. बाबूला गोळ्या दिल्यानंतर त्याच्या पायावर आजोबांनी त्यांच्या काठीने फटका मारला. जोरात लागलेले नसतानाही बाबू केकाटत 'पाय लावून' पळाला. आज बाबूनेच खुर्चीचा दांडका काढल्याचे आजोबांनी ओळखले होते. दांडका काढण्यासाठीचे नातवंडांचे वेळापत्रक वयोवृद्ध आजोबांच्या 'मेमरी'त फिट झाले होते. नातवंडांनाही गोळ्यांसोबत आजोबांच्या काठीचा प्रसाद
नित्याचाच होता.
मात्र हळूहळू चित्र बदलले. आजोबा बाजारातून येतात.. पण, अंगणात खेळताना नातवंडे दिसत नाहीत.. आजोबांनी चष्मा काढून कुर्त्यांला पुसला आणि पुन्हा लावून पाहिले.. पण, अंगणात कुणीच नव्हते. हिरमुसलेले आजोबा पडवीत येतात.. खुर्चीत बसतात.. पण, ते खुर्चीतून पडत नाहीत. खोडकर नातवंडांनी खुर्चीचा दांडका काढलेला नसतो. खुर्चीतून पडले नाहीत म्हणून खूश होण्याऐवजी नातवंडांशी जवळीक दुरावल्याचे दु:ख आजोबांच्या चेह-यावर दिसते. तरीही खिशातून लेमनच्या गोळ्या काढून ते वाट पाहतात.. पण, त्या गोळ्यांसाठी पसरणारे हातही पुढे येत नाहीत. मग आजोबांसह त्यांची काठीही हिरमुसते आणि आजोबांच्या काप-या हातातून गळून पडते.
आता आजोबांच्या नातवंडांचा दिनक्रम बदलला. त्यांच्या आवडी-निवडी बदलल्या. अंगणात खिदळणारी नातवंडे 'ई' युगात रमू लागली. आजोबांकडच्या चवदार लेमनच्या गोळ्यांची जागा मोबाइलमधील अत्याधुनिक 'जेली बीन', 'जिंजर ब्रेड' आदींसारख्या 'अँड्रॉइड'ने घेतली. काळ बदलला आहे, अशी समजूत करून घेऊन पालकांनीही मुलांचे 'ई' युग स्वीकारले. मात्र या 'ई' युगात 'सोशल नेटवर्किंग'च्या नावाखाली 'न सोसणारे' काय-काय प्रकार मुले करतात, हे सविस्तर सांगण्याची गरज नाही. 'ई' युग स्वीकारताना संस्कारात कसर राहत असल्याचे पालक विसरत आहेत. त्यामुळे मुले भरकटत आहेत. याची जाणीव पालकांना नाही की त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो.
मुंबईत गेल्या आठवडयात एका तरुण विवाहितेने पतीशी ऑनलाइन चॅटिंग करताना वेबकॅमवर पतीसमोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आई-वडिलांना अंधारात ठेवून प्रेमविवाह करणा-या या तरुणीने लग्नानंतर काही दिवसांतच एका क्षणात आयुष्य संपवले. तिच्या आत्महत्येची कारणे काहीही असतील. मात्र, अशा घटनांमुळे संस्कारातील कमरता प्रकाशात येते. ऑनलाइन प्रेम जुळले, लग्न आणि घटस्फोट झाल्याच्या बातम्या ऐकिवात यायच्या. आता 'ऑनलाइन आत्महत्या' ही घटना कोणत्या संकटाचे संकेत देते? 'ई' युगात आता आत्महत्येचीही पद्धत बदलली आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे. आई अभ्यासासाठी ओरडते, बाबांनी पॉकेटमनी दिला नाही, आदी क्षुल्लक कारणांसाठी आत्महत्येचे प्रकार घडतात. आई-बाबांशी ऑनलाइन बोलताना वेबकॅमे-यावर त्यांच्यासमोरच मुलाने आत्महत्या केली तर? त्या दुर्दैवी आई-बाबांवर होणा-या आघाताची कल्पनाच करवत नाही. मात्र भविष्यात अशा घटनांची शक्यताही नाकारता येत नाही. संस्काराची व्याख्याच जणू बदलत चालल्याने हे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. 'ई' युगात पालक-मुलांचे संवाद हरवू लागले आहेत. आजोबांच्या काठीतील संस्कारांचा धाक बदलत्या पिढीनुसार ठिसूळ झाला आहे. आता 'ई' संस्काराची तर गरज नाही ना? 'ई'च्या जाळ्यात गुरफटत चाललेल्या मुलांना आवर घालण्यासाठी 'ई' संस्कार हवेत का? कदाचित 'होय' असे उत्तर असेल.
आजोबांची काठीही आता 'ई-काठी' व्हायला हवी. 'आई'तला 'ई'सुद्धा जागा होण्याची गरज आहे. पालकांनी 'ई' युगाचा फायदा-तोटा लक्षात घेऊन धोकादायक मानसिकतेने बेभान झालेल्या मुलांवर 'ई' संस्कार करण्याची वेळ आली आहे. तरच भविष्यातील दुर्दैवी घटना टळतील. नाहीतर, हा 'ई-फास' अधिकच घट्ट होत जाईल.


Read More »
पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या आठवणी

एका कसोटीदरम्यान हॉटेलमधील आमच्याच मजल्यावर उतरलेला पत्रकार सकाळ-संध्याकाळ आमचा नाश्ता आला की खोलीत येत असे आणि त्याचा समाचार घेत आम्हास 'हा बाद कसा दिला, हा नोबॉल का दिला' असे प्रश्न विचारून सतावत असे.
एका कसोटीदरम्यान हॉटेलमधील आमच्याच मजल्यावर उतरलेला पत्रकार सकाळ-संध्याकाळ आमचा नाश्ता आला की खोलीत येत असे आणि त्याचा समाचार घेत आम्हास 'हा बाद कसा दिला, हा नोबॉल का दिला' असे प्रश्न विचारून सतावत असे. म्हणून दुस-या दिवसापासून नाश्ता आला की याला 'आम्ही महत्त्वाची चर्चा करत आहोत तरी 'डिस्टर्ब' करू नका,' असे म्हणून टाळत असू. नंतर दुस-या एका सामन्यात हे महाभाग भेटले तेव्हा 'त्या सामन्याच्या वेळी' तुम्ही माझा अपमान केलात तो विसरलो नाही तेव्हा आता काही बोलू नका, असे आम्हास सांगितल्यावर आम्ही अवाक झालो. याला म्हणतात, चोराच्या उलटया बोंबा.
कोलकात्याच्या एका पत्रकाराने त्याच्या वर्तमानपत्रात माझी मुलाखत छापली आणि ती मला आणून दाखवली. तेव्हा माझा फोटोच फक्त पाहता आला कारण बंगालीच येत नव्हते. मग वाचणार काय? त्यावरून मला एका विषयाची आठवण झाली. दोघे जण काश्मीरमध्ये 'दल तळे' पाहण्यास जात असताना त्यांना बाण दाखवून पुश्तूमध्ये असलेली एक पाटी दिसली. तेथे उभ्या असलेल्या एका स्थानिकाला विचारताच त्याने यावर 'दल तळ्याकडे जाण्याचा रस्ता, ज्याला पुश्तू येत नसेल त्याने बाजूच्या चांभाराला विचारले,' असे लिहिल्याचे सांगितले. ते पाहून परत हॉटेलात आल्यावर दोघांपैकी एकाने दुस-यास विचारले की 'जर तो चांभारच तेथे नसेल तर काय करायचे? त्यावर दुस-याने कपाळावर हात मारून 'मग त्या भेटलेल्या स्थानिकाला जाऊन विचार' असे रागाने सांगितले. वरील बंगाली भाषेबद्दल माझे पण असेच झाले.
माझा आणखी एक अनुभव असा. सर्वसाधारपणे खेळाडूंची भरपूर छायाचित्रे (फोटो) काढली जातात व त्यांना दिली जातात. पंचांची फार क्वचितच. तरी सुद्धा काही छायाचित्रकारांनी मला प्रसंगांच्या छायाचित्रांच्या प्रती दिल्या होतात. त्यातील काही दुर्मीळ होत्या. मात्र त्यातील काही माझ्या लेखांबरोबर प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने ज्यांनी नेली ती कधीच परत केली गेली नाहीत. काही नमूद करावयाची झाल्यास
१) १९७९ बंगळूरुला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत मैदानात मधमाशा आल्यावर क्षेत्ररक्षण करणारा भारतीय संघ, झहीर अब्बास, मुद्दसर नझर हे फलंदाज तसेच मी आणि स्वरुप किशन असे सर्वजण जमिनीवर कानात बोटे घालून उपडे पडलो होतो.
२)१९७३ साली ब्रेबर्न स्टेडियमवरील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत एका प्रेक्षकाला कॉलर धरून बाहेर काढत होतो.
३) १९८३ साली वानखेडेवरील वेस्ट इंडिजच्या कसोटीत उपस्थित प्रेक्षक विन्स्टन डेव्हिसला प्लास्टिकच्या बाटल्या आणि कोका कोलाचे छोटे डबे मारत असताना तसे न करण्याची हात जोडून विनवणी करत होतो, असे काही फोटो दुर्मीळच नव्हे का? मग ते परत न मिळाल्यामुळे व्यथित असलेला मी त्यांना दोष देऊन काय करणार? अर्थात मी सदैव टीकाच करतो, असे नव्हे, मला आलेले काही अनुभव नमूद केले आहेत. काही वेळेस समालोचक किंवा पत्रकार वस्तुस्थिती समजावून घेऊन माझ्या कृतींचे आपल्या लेखनात किंवा समालोचनात जोरदार समर्थनही करीत, हेही तितकेच खरे.

Read More »
टॉलस्टॉयला अनावृत पत्र

सध्या परलोकातील विभूतींना पत्र लिहिण्याचा एक ट्रेण्ड आहे. इहलोकात ज्यांचा दबदबा आहे, अशाच व्यक्ती हा उद्योग करतात. मी त्यापैकी नाही. मला फारसं कुणी ओळखत नाही. तरीदेखील तुम्हाला पत्र टाकण्याचं धाडस करीत आहे. कारण तुम्ही मला प्रभावित केलंत, माझी होती नव्हती तेवढी मन:शांती घालवून लावलीत, पण पुन्हा ती सावरायला मदतही केलीत.
कौंट लिओ टॉलस्टाय यांस,
आदरणीय महोदय,
तुम्ही वयाची ८२ वर्षे (१८२८ – १९१०) इहलोकात काढलीत. मी आज तुमच्यापेक्षा एक वर्षाने वडील आहे, शिवाय माझे वय वाढत राहील, तुमचे तेवढेच राहील. पण तुम्ही ख्रिस्ती, मी हिंदू. आपले परलोक वेगवेगळे आखून दिलेले आहेत. तुम्ही तिकडेच राहणार अन् माझी ट्रान्सफर पुन्हा इकडे होणार, म्हणून आपली भेट शक्य नाही. आमचा पाप-पुण्याचा हिशेब मरणानंतर कॅरी फॉरवर्ड होतो. तो सेटल् करायला आम्हाला 'पुनरपि जननम् पुनरपि मरणम्' पत्कारावे लागते. तुम्हा लोकांचा जन्म original sin मधून झालेला. तुमच्याकडे पुण्यसंचय ही भानगड नाही. आहे ते फक्त पापक्षालन. तरी हे सर्व नियम धुडकावून तुम्ही शून्यात विलीन होणार असं सांगून गेलात. माझीसुद्धा तीच इच्छा आहे. पण आमच्या इच्छेला विचारतो कोण?
माझ्या मनावर प्रथम ठसला तो तुमचा उदारमतवादी प्रामाणिकपणा. Confession मध्ये तुम्ही अस्मानाची उंची गाठलीत. उघड कबुलीजवाब देताना परिणामांची पर्वा केली नाहीत. चर्चने तुम्हाला धर्मबहिष्कृत केलं, पण तुम्ही डगमगला नाही. बुद्धिवादी- विज्ञानवादीसुद्धा तुमच्या विरोधात गेले. तरी तुम्ही अढळ राहिलात. असाही एखादा माणूस असू शकतो हे जगाला दाखवून दिलेत. इंडियाच्या स्वातंत्र्याचा तुम्ही पुरस्कार केलात. हा लढा अहिंसक मार्गाने चालविला जावा, असे मत व्यक्त केलेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत वकिली करणारे बॅरिस्टर गांधी प्रभावित झाले. अन्यायाविरुद्ध त्यांनी उघडलेल्या लढय़ाला नैतिक तत्त्वज्ञान लाभले. शाकाहाराचा पुरस्कार हाही तुमच्या दोघांमधील एक दुवा होता, पण त्यांचा-तुमचा लेखी संपर्क १९०९-१० सालातला, तुमच्या अखेरच्या वर्षातला. पुढे महात्मा गांधींनी आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व केले. एका बलाढय साम्राज्याला नमविले. त्यांनीही आत्मवृत्त लिहिले- Experiments in Truth (१९२७). पण ते गांधीजी राजकारणी होते. आपल्या संतप्रतिमेला परवडेल एवढेच सत्य त्यांनी सांगितले. गैरसोयीचे ते दडवून ठेवले. असे डबल डीलिंग तुमच्यात नव्हते, म्हणून तुम्ही ग्रेट!
ऑर्थोडॉक्स चर्चची श्रद्धा बाळगणा-या गर्भश्रीमंत वतनदार-घराण्यात तुमचा जन्म झाला. अशा जमीनदाराच्या मुलांनी वागावे तसेच तुम्ही वागलात. विद्यापीठातले शिक्षण अर्धवट टाकून तुम्ही बडया शहरात चैन केली. जुगार खेळून पैसे उधळलेत, पण त्याचबरोबर राष्ट्रभक्ती व रशियन साम्राज्यवाद यांनी भारावलात अन् लष्करात भरती झालात. क्रिमियन युद्धात (१८५४) तुर्काशी लढलात. माणसे क्रूरपणे ठार मारलीत. आपल्या ताकदीचा तुम्हाला गर्व झाला होता, हे तुम्ही कबूल करता. युद्ध समाप्तीनंतर तलवार टाकून लेखणी उचललीत. लेखक म्हणून नाव झाले. War and Peace आणि Anna Karenina या जगप्रसिद्ध कादंब-यांची निर्मिती केलीत. पहिल्या कादंबरीत ५८० पात्रांना एकत्र गुंफण्याची किमया साधून १९ व्या शतकातील राजकीय व सामाजिक परिस्थती जिवंत केलीत, पण त्यातील साहित्यिक गुण दुय्यम होते, असे स्वत:च सांगितलेत. Anna Karenina ही तुम्हाला खरी कादंबरी वाटली. ढोंगी नीतिमूल्ये जगणा-या समाजाची शिकार झालेल्या एका व्यभिचारी मुलीची ही कथा तुम्ही स्वत:चे स्त्रीलंपट जीवन डोळ्यासमोर ठेवून लिहिलीत. प्रामाणिकपणाचा हा एक आगळा आविष्कार! शेक्सपियरला ब्रिटिश वसाहतवादी मूल्ये रुजविण्यासाठी उचलून धरले गेले, यावर बोट ठेवलेत.
परिवर्तन होऊ लागल्यानंतर एकेक विदारक सत्ये तुमच्या लक्षात येऊ लागली. खरेपणा आणि खोटेपणा हे दोन्ही, पवित्र परंपरा व धर्मग्रंथ यातच आहेत. चर्चनामक संस्थेने हा खरे-खोटेपणा लोकांपर्यंत पोहोचविला आहे. कुटुंब, राज्य व धर्म या प्रस्थापित संघटनांनी आपल्याला निरनिराळ्या आयडेंटिटी दिलेल्या आहेत. त्या भूमिका बजावताना माणूस तुरुंगात अडकले. त्यापासून माणसाने स्वत:ला मुक्त केले पाहिजे. तुम्ही म्हणालात The State is a conspiracy designed not only to exploit but above all to corrupt citizens. यातून तुम्ही एक लाखमोलाचे सत्य मांडलेत. 'जीवन हा एक नशा आहे. तो नशा असतो तेव्हाच जीवन जगता येते. एरवी हे जीवन केवळ लबाडी आहे, एक मूर्ख लबाडी.' काहींच्या बाबतीत ती मूर्ख लबाडी असेल, पण एरवी ती धूर्त लबाडी असते, हेच खरे. आपले हितसंबंध जपण्यासाठी आपण नाटके करीत आहोत, खोटे खोटे हसत आहोत.. हे चालाख लोकांना चांगले समजते. आपण कधीच लबाडीने वागलो नाही असे सांगणारे, आपल्याला जे सोयीचे असेल ते कुठल्या तरी नैतिक तत्त्वात बसवून घेतात. ढोंग पांघरणे, लबाडी करणे हा माणसाचा स्थायिभावच आहे. नशा म्हणाल तर त्याग, बलिदान अशा उदात्त ध्येयांचाही नशा बनतो. स्वत:चे अस्तित्व पुसून टाकण्याचा तुमचा निर्धार नशाच नव्हता काय? सर्व ऐहिक मिळकतींवर पाणी सोडण्याचे जाहीर करून तुम्ही आपल्या सुखी संसाराची ट्रॅजिडी करून टाकलीत. नशा पुढचा-मागचा विचार नष्ट करतो. चुपचाप तुम्ही घर सोडलंत, पण तुमचा अंत उदात्त ठरला काय? माध्यमांनी तो उदात्त म्हणून सादर केला.
एकेकाळी माझ्यापुढेही तो आदर्श होता, पण मग लक्षात आलं की, आपल्या मृत्यूचे इव्हेंट बनवण्याची इच्छा त्यामागे आहे. शिवाय तो मार्ग व्यवहार्य नाही.
काही असो, पण तुमचे एक योगदान पुढच्या काळाला पथदर्शक ठरेल. श्रद्धा व बुद्धी यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास लोक सोयिस्करपणे श्रद्धेच्या परडय़ात आपले वजन टाकतात. प्रस्थापित गटातील सुरक्षा निवडतात. पण तुम्ही नैतिकता धर्मात शोधणारे असल्यामुळे श्रद्धा व बुद्धी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलात. देव माजला तरी त्याचा-माझा संबंध काय, हा प्रश्न उभा केलात, धर्मातर्गत बंडखोरीचा वस्तुपाठ सादर केलात. म्हणजे एक प्रकारे ख्रिश्चन अस्तित्ववादाचा मार्ग मोकळा केलात. मानवतेच्या हितासाठी उजव्यांनी डाव्यांकडून व डाव्यांनी उजव्यांकडून शिकण्यासारखं आहे, हे दाखवून दिलंत.
श्रद्धा-बुद्धीप्रमाणे भावना व बुद्धी यातील द्वद्वांचा एक कळीचा प्रश्न असतो. यात नेहमी भावनेची बाजू उचलून धरणारा तुमचा समकालीन प्रतिभावंत फियोदोर- डोस्टोव्हस्की (१८२१- १८८१) याची आठवण येते. त्याने जमीनदारी प्रथा नष्ट करण्यासाठी लेखणी झिजवली. तुम्ही त्याच सिस्टिमचे प्रतिनिधी होता. तेव्हा दोघांमध्ये सख्य अपेक्षित नव्हतं. पण उत्तरकाळात तुमच्यात परिवर्तन झालं. तुम्ही पश्चात्ताप केलात. डोस्टोव्हस्कीप्रमाणे भावना व बुद्धी यांच्या संघर्षात न्यायासाठी भावनेच्या बाजूने कौल दिलात. त्या काळात तुमच्या दोघांमध्ये वैचारिक देवाण-घेवाण झाली काय? तुम्ही एकमेकांना कधीच भेटला नाहीत, हे खरं. झारच्या गुप्तहेरांचा ससेमिरा कदाचित त्याला कारणीभूत असेल.
तुमचा दुसरा समकालीन प्रतिभावंत लेखक अन्तोन चेकॉव्ह (१८६०- १९०४) हा एका गुलामाचा नातू. म्हणजे दुस-या टोकाचा. भूदासांची मुक्तता झालेली असल्यामुळे तो मेडिकल कॉलेजात शिक्षण घेऊन डॉक्टर झाला. वृत्तीने सेवाभावी. डॉक्टरप्रमाणे जीवन व्यवहाराचं डायग्नॉसिस करणारा व कलावंताच्या नजरेतून त्यावर लिहिणारा म्हणून तो प्रसिद्ध झाला. विज्ञाननिष्ठा हे त्याच्या कथांचं वैशिष्टय होतं. प्रत्येक लेखकाला विज्ञानाची थोडी माहिती असलीच पाहिजे, असं तो म्हणे. तुमच्याबद्दल त्याला मोठा आदर होता, पण तुम्हाला वैद्यकीय ज्ञान मुळीच नाही, शिवाय तुमच्या लेखनात खूप चुका आहेत आणि त्या सुधारण्याचा तुम्ही प्रयत्नही करत नाही, असं परखड मत त्यांनी दिलं होतं. १८९८ मध्ये चेकॉव्हने याल्टाजवळ जमीन घेऊन एक सुंदर हवेली बांधली. तेथे विचारवंतांचा अतिथी सत्कार केला. त्यात टॉलस्टॉय, मॉर्की अशा हस्ती राहून गेल्या. पण तुम्ही चेकॉव्हचे ऋण मानले काय? टॉलस्टॉय समजून घेण्यास आम्हाला चेकॉव्ह मदत करतो. त्यामुळे तुमच्याबद्दलचा आमचा आदर कमी होत नाही. धर्माच्या इतिहासात तुमचं नाव अढळ राहणार यावर विश्वास आहे.
कळावे,
आपला चाहता,
कुणी एक, यशवंत रायकर

Read More »
छबिलदास : नाबाद १२५!

आजपासून छबिलदास शाळेचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू होत असून त्यानिमित्ताने अनेक उपक्रम वर्षभरात राबवण्याचा शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा मानस आहे. शैक्षणिक उपक्रमांबरोबर मुंबईतील शिक्षण संघटना आणि प्रायोगिक रंगभूमीसारख्या अभिनव चळवळींना या शाळेने आपल्या पंखाखाली घेऊन बळ दिलं. सव्वाशेव्या वर्षात पदार्पण करणा-या आणि अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचं हे कवतिक.
दोन फलाटांचं दादर स्थानक, स्थानकाबाहेर पडलं की डाव्या हाताला केवळ एक अरुंद रस्ता, बाकी उजव्या हाताला थेट टिळक पुलापर्यंत सर्वत्र दलदल, हिरवं गवत आणि डबकी, या दलदलीतून वाट काढत कोहिनूर सिनेमाच्या बाजूने मुकुंद मॅन्शनच्या कोप-याशी गेलं की दिसायची एक दुमजली इमारत. ही इमारत म्हणजे दादरची छबिलदास लल्लूभाई बॉईज् अ‍ॅण्ड गर्ल्स हायस्कूल.
अर्थात, त्यावेळी तिचं नाव 'छबिलदास' नाही, तर 'दादर इंग्लिश स्कूल' असं होतं. आजच्या गजबजलेल्या आणि दाटीवाटीच्या दादर स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली आणि या परिसरातील असंख्य इमारतींमध्ये दडलेली छबिलदास ही शाळा गाठण्यासाठी १९२५ साली पूर्ण दलदल पार करावी लागत असे. आज या विचारानेही अंगावर शहारा येतो. पण त्याकाळी या शाळेत शिकणा-या अनेकांसाठी हे नित्यकर्म होतं.
हळूहळू काळानुरूप आसपासचा परिसर बदलला, शाळेचं नामांतर झालं, आधी केवळ मुलांसाठी असलेली शाळा मुलींसाठीही खुली झाली आणि बघता बघता २ जून १८८९ साली स्थापन झालेल्या या शाळारूपी रोपटयाचं एका वटवृक्षात रूपांतर झालं. 'दादरमधील पहिली शाळा' असा रुबाब मिरवणारी छबिलदास आज आपल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उंबरठयावर आहे. या १२५ वर्षाच्या कालखंडात या शाळेने अनेक चढ-उतार पाहिले, पण तरीही 'अधिकातल्या अधिकांचे अधिकतम हित' या विनोबा भावेंच्या उक्तीला अनुसरून अव्याहतपणे या वास्तूत विद्यादानाचं कार्य सुरू आहे.
गो. ना. अक्षीकर यांनी केशव ताम्हणे यांच्या सहकार्याने १८८९ साली सुरू केलेली ही शाळा त्यावेळी अगदीच लहान होती. नंतर १९२८ साली छबिलदास लल्लूभाई नामक गृहस्थांनी या शाळेला जमीन आणि काही रक्कम देणगी स्वरूप दिली. त्याच जागेवर आज ही शाळा उभी असून त्यांचंच नाव या शाळेला देण्यात आलं आहे. या शाळेने देशाला माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर, भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव, अभिनेता दिलीप प्रभावळकर, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती शरद दिघे, ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे, श्री. ना. पेंडसे, राम प्रधान यांसारखे दिग्गज तर दिलेच, पण महाराष्ट्राला अनंत नामजोशी, सदानंद वर्दे आणि सुधीरभाऊ जोशी हे तीन शिक्षणमंत्री देणारी ही एकमेव शाळा आहे.
विद्यादान हे आद्यकर्तव्य असलं, तरी त्यापुरतं मर्यादित न राहता या शाळेने आजवर अनेक नवनव्या उपक्रमांना पाठिंबा दिला. यामध्ये अग्रक्रमाने प्रायोगिक रंगभूमीचा उल्लेख करावा लागेल. छबिलदास ही महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीची जणू कर्मभूमीच! या शाळेच्या आधारानेच 'आविष्कार' ही प्रायोगिक संस्था स्थापन आणि विकसित झाली. आविष्कारने अनेक र्वष छबिलदासच्या सभागृहात वेगवेगळ्या नाटकांचे विविध प्रयोग केले आहेत. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ 'छबिलदास चळवळ' या नावाने ओळखली जाते, यातूनच खरं तर प्रायोगिक रंगभूमी आणि छबिलदास यांचं अतूट नातं लक्षात येतं. याशिवाय मुंबईतील शिक्षण संघटनेनेही याच वास्तूत बाळसं धरलं. आलेल्या सर्वाना आपल्यात सामावून घ्यायचं, हे या शाळेचं धोरणच आहे.
कदाचित म्हणूनच प्रायोगिक रंगभूमी असो वा मुंबईतील शिक्षण संघटना अशा अनेक चळवळींची ही इमारत साक्षी आहे, असं 'जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट' या छबिलदासच्या ट्रस्टचे कार्यवाह डी. एम. पवार सांगतात. १२५ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत साहित्य, क्रीडा, विज्ञान, राजकारण, कला, उद्योग, समाजकार्य आदी क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तींनी या शाळेला भेटी दिल्या आहेत. या यादीत नेताजी सुभाषचंद्र बोस, साने गुरुजी, सेनापती बापट, स्वामी विवेकानंद, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, शरद पवार अशा काही बडया नावांचा समावेश आहे.
परंतु ज्याप्रमाणे एखादं उत्तुंग शिखर सर केल्यावर ते उतरावंही लागतं, अशीच काहीशी अवस्था छबिलदासची झाली आहे. म्हणूनच एके काळी प्राथमिक व माध्यमिक मिळून सुमारे ४ हजार इतकी असलेली या शाळेची पटसंख्या आज जेमतेम ५५० विद्यार्थ्यांवर आली आहे. दादरचं मध्यवर्ती ठिकाण ही पूर्वी ज्या शाळेची ओळख होती, तेच मध्यवर्तीपण आज या शाळेला काहीसं मारक ठरत आहे. शिवाय पालकांवरील इंग्रजी माध्यमाचा प्रभाव प्रमाणाबाहेर वाढल्याने आजकाल बहुतांश पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच टाकतात.
घटणा-या पटसंख्येमागे ही सारी कारणं आहेत, असं शाळेचं व्यवस्थापन सांगतं. परंतु या कारणांवर मात करून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा जन्म घेण्यासाठी आणि या छबिलदासची पूर्वीची ऊर्जितावस्था तिला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी या शाळेचं व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सा-यांनीच कंबर कसली आहे. आणि त्यादृष्टीने पावलं उचलण्यासही सुरुवात केली आहे. त्यातील पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे इंग्रजीचा अडसर दूर करणं. गेल्या तीन वर्षापासून 'सुजया फाउंडेशन' ही संस्था छबिलदासशी संलग्न असून शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजी शिकवण्यात ही संस्था हातभार लावते.
रोज सकाळी योग केल्यानंतर या संस्थेतील प्रशिक्षकांकडून घेतले जाणारे इंग्रजीचे वर्ग हा प्राथमिक तसंच माध्यमिक सर्वच वर्गाचा दिनक्रम आहे. गेल्या तीन वर्षात राबवलेल्या या उपक्रमामुळे आमच्या शाळेतील १ ते ७वीचे विद्यार्थी आता इंग्रजी माध्यमातील मुलांच्या तोडीस तोड इंग्रजी बोलू शकतात, असे छबिलदासचे माजी विद्यार्थी आणि 'जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट'चे संचालक अरविंद पार्सेकर सांगतात. तसंच केवळ मुलांचं इंग्रजी सुधारण्यापुरतंच सीमित न राहता अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना संगणक, अभिनय, नृत्य आणि छायाचित्रण आदी गोष्टींचं प्रशिक्षणही दिलं जातं. याद्वारे अभ्यासेतर बाबींमध्येही छबिलदासच्या विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळवून देणं हेच संस्थेचं उद्दिष्ट आहे.
एकेकाळी छबिलदासचा स्वत:चा क्रिकेटचा संघ होता, या जुन्या आठवणींमध्ये रमताना दरम्यानच्या काळात काही अडचणींमुळे त्याची धुरा पुढे सुरू ठेवता नाही आली, अशी खंत पार्सेकर व्यक्त करतात. पण शिवाजी पार्क मैदानावरील चार खेळपट्टय़ा आजही छबिलदासच्या मालकीच्या आहेत, ही बाब लक्षात घेऊन पुन्हा एकदा छबिलदासचा क्रिकेट संघ उभारण्याचा आपला मानसही ते व्यक्त करतात. या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात छबिलदासच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा विचारही चालू आहे तसंच या नव्या इमारतीत नवनवीन शैक्षणिक माध्यमं व शाखा अंगीकारून अत्याधुनिक सोयी-सुविधांसह विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येईल, असंही डी. एम. पवार यांनी सांगितलं.
२ जून २०१३ रोजी छबिलदासच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाची सुरुवात होत असून वर्षभर त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहे. त्याची सुरुवात २ जूनला शाळेच्या ग्रंथालयात होणा-या एका विशेष कार्यक्रमाने होईल. यामध्ये सहभागी होण्यसाठी समस्त दादरकर, शाळेचे आजी-माजी विद्यार्थी यांना शाळेने आवाहन केलं आहे.

Read More »
शिक्षणाची पाटी कोरीच!

कल्याणजवळील वरप गावातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पंधरा शिक्षक 'कल्याण ते कारगिल मोटरसायकल यात्रेवर रवाना' अशी बातमी वाचली आणि प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार व विचारवंत विल डय़ुरंट यांच्या गाजलेल्या 'द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी' या ग्रंथातील लोकशाहीवरील ओळी आठवल्या. ते लिहितात, 'शिक्षणाविना लोकशाही म्हणजे अनिर्बंध भंपकशाही.' या पंधरा शिक्षकांनी म्हणे यात्रेदरम्यान कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना सलामी आणि पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांची मुक्तता करण्यासाठी जनजागृती करण्याचे ठरवले आहे.
कारगिल युद्धाला किती वर्षे झाली आणि पाक तुरुंगातील भारतीय कैदी सोडविणे हा प्रश्न भारतात जनजागृती करून मिटणारा आहे का, असे दोनच प्रश्न या 'मिशन'वर निघालेल्या शिक्षकांना विचारले तर त्यांच्याकडे उत्तर असेलही कदाचित, मात्र तुमच्या शाळेतील मुलांच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि वैश्विक जाणिवा वाढवण्यासाठी तुम्ही काय करता, असा प्रश्न विचारल्यावर ते निश्चितच निरुत्तर होतील.
कारण 'रॅटरेस'वर विश्वास ठेवणा-या आमच्या शिक्षणव्यवस्थेत मुलांच्या सर्वागीण विकासाचा विचारच होताना दिसत नाही. शिक्षणाच्या मूल्यांपेक्षा परीक्षेत मिळणारे गुण महत्त्वाचे ठरत असल्याने, 'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांना सहजपणे ९० टक्के गुण मिळतील अशी 'कायदेशीर' व्यवस्था होते, मग आमचे एस.एस.सी., एच.एस.सी. बोर्डवाले कसे मागे राहणार, त्यांनी 'कॉपी' करणे या दृष्कृत्याला सामूहिक आणि सामाजिक दर्जा दिला आहे. बालक हाच समाजातील सर्व परिवर्तनाचा केंद्रबिंदू झाला आहे.
राष्ट्राची प्रगती ही बाळाच्या छोटय़ाशा, इवल्याशा पावलांच्या मंद गतीने होते, असे बालशिक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करणा-या मादाम माँटेसारी यांनी एका भाषणात सांगितले होते. पण आज आमच्या बालक्षिणापासून विद्यापीठातील शिक्षणापर्यंत, केजीपासून पीजीपर्यंत जो गोंधळ सुरू आहे, तो पाहिल्यावर शिक्षणाचे रक्षण करण्यासाठी एक आघाडी उघडण्याची गरज वाटते.
परि एक एक जो नवा शब्द तू शिकसी।
शक्ती तयाची उलथील सर्व जगासी।।

बुद्ध देवा तुझी ज्ञानगंगा मार्ग दावी आम्हाला प्रसंग
बुद्ध देवा तुझी ज्ञानगंगा मार्ग दहावी आम्हाला प्रसंग  

या स्पष्ट काव्यपंक्तींमध्ये कविवर्य केशवसुत यांनी ज्ञानाचे, शिक्षणाचे सामर्थ्य व्यक्त केले होते. केवळ भारतीयच नव्हे तर जगभरच्या विचारवंतांनी ज्ञानाचे हे महत्त्व वेळीच जाणले होते, त्यामुळे त्यांनी हे ज्ञान धार्मिक वा राजकीय सत्ताधाऱ्यांच्या हातात मर्यादित न राहता सर्वसामान्य लोकांपर्यंत जावे असा प्रयत्न केला. आजच्या एवढया वेगवान साधनसुविधा नसताना, आधुनिक तंत्राचा शोध लागलेला नसतानाही अडीच हजार वर्षापूर्वी जन्मलेल्या गौतम बुद्ध यांचे विचार जगभर पोहोचले. 'प्रज्ञा' म्हणजे ज्ञानाधारित विचक्षण बुद्धीचा पुरस्कार करणा-या या महामानवाने 'शिल'संवर्धनाचा उपदेश केला.
मुख्य म्हणजे माणसाच्या हृदयात सुप्तावस्थेत असलेला 'करुणे'चा प्रवाहही तथागत बुद्धांनी वाहता केला. त्यानंतर तेराव्या शतकात जन्मलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतच्या कपाटात बंदिस्त असलेले ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत नेले आणि महाराष्ट्रामध्ये नि:शब्दपणे 'शब्दक्रांती' घडविली. माऊलींसोबत नामदेव महाराज आणि अठरापगड जाती-जमातींमधील संत या शब्ददिंडीमध्ये मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले. त्यांची जातीय, सामाजिक वा आर्थिक स्थिती 'वारकरी' या शब्दाने, 'रामकृष्ण हरी' या विठ्ठलमंत्राने एकसारखी केली, हा त्या वेळचा फार मोठा चमत्कार होता.
आपल्या नावातच 'ज्ञान' घेऊन आलेल्या ज्ञानोबा माऊलींनी प्रस्थापित ब्राह्मण-पुरोहितवर्गाला आव्हान देऊन ही क्रांती केली, म्हणून देहूच्या तुकाराम महाराजांच्या वाणीला अभंगतेचे वरदान लाभले. त्यानंतर महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी आदी वैचारिक पाया मजबूत असणा-या लोकनेत्यांनी ही ज्ञान-क्रांतीची ज्योत आपले सर्वस्व पणाला लावून धगधगती ठेवली. पण आजच्या शिक्षणाची ज्ञानदान-ज्ञानार्जनाची एकूण स्थिती पाहता, आधुनिक ज्ञान हे प्राचीन काळाप्रमाणेच मूठभरांचीच मक्तेदारी राहील काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
भारतातील प्राचीन शिक्षणपद्धतीचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. मुळात ऐतिहासिक साधनसामुग्री जपण्याची, इतिहासातून बोध घेण्याची पद्धत पूर्वीही आपल्याकडे नव्हती, आजही नाही. त्यामुळे प्राचीनकाळी अभिजनवर्गातील मुलांना 'गुरुकुल' पद्धतीचे शिक्षण उपलब्ध होते. त्यात धर्मशास्त्र, व्याकरण, नीतिशास्त्र यासोबत शस्त्रविद्येचेही प्रशिक्षण दिले जात असे; अशा आशयाच्या पुराणकथांमधील वर्णनांवरूनच आपल्याला तत्कालीन शिक्षणपद्धतीचा अंदाज घेता येतो. त्या काळात जातिव्यवस्था हीच समाजव्यवस्था होती. त्यामुळे सुताराचा मुलगा उपजीविकेसाठी सुतारकाम आणि लोहाराचा मुलगा लोहारकामच शिकू शकत होता. त्यांना वेद, धर्म वा शास्त्राचा अभ्यास करण्याचा 'अधिकार' नव्हता.
ऋषी-मुनींच्या आश्रमातील पोपटाने वेदमंत्राचा उच्चार केला तर त्याचे कौतुक होई. पण तसे धाडस एखाद्या क्षत्रिय, वैश्य वा शुद्राने केले तर त्याच्या कानात शिसे ओतण्याची शिक्षा होती. थोडक्यात सांगायचे तर ख-या ज्ञानाच्या चाव्या मूठभरांच्या हातात होत्या. त्या मूठभरांच्या उर्मट सत्तेशी यशस्वी लढा देऊन गौतम बुद्ध, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर आदींनी ही ज्ञानाची गंगोत्री अठरापगड जातींच्या लोकांच्या दारात पोहोचवण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटनेने शिक्षणाचा हक्क सगळ्यांना दिला. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या हजारो सेवाभावी कार्यकर्त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे ही ज्ञानगंगा मोठय़ा जोमाने प्रवाहित झाली होती; परंतु आज स्वातंत्र्याला सहा दशके झाल्यानंतरचे चित्र मन अस्वस्थ करणारे आहे.
आज शिक्षणाचा अक्षरश: बाजार सुरू आहे, कारण शिक्षण हे ख-या अर्थाने सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे, हे आम्ही विसरून गेलो आहोत. आज आम्हाला युरोप-अमेरिका, चीन-जपान येथे झालेली भौतिक प्रगती आकर्षित करते; परंतु ही सारी प्रगतीची शिखरे उंचावण्यासाठी हजारो ज्ञानी-विचारवंतांनी स्वत:ला ज्ञानसाधनेत गाडून घेतले होते. त्यांच्या विज्ञाननिष्ठ आणि शोधकवृत्तीच्या पायावर त्यांची प्रगती उभी राहिली, हे आम्ही विसरलो. ब्रिटिशांसाठी कारकून तयार करणे या उद्देशाने लॉर्ड मेकॉले यांनी तयार केलेल्या १०+२+३ या ठरावीक साच्याला आम्ही स्वातंत्र्यानंतरही कवटाळून बसलो. आज आपल्याकडे पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय अशा पाच पातळ्यांवरून शिक्षण दिले जाते. या पंचविध पातळीवरून दिल्या जाणा-या शिक्षण – प्रशिक्षणाचा एकमेकांमध्ये थोडाफार तरी समन्वय असावा, हे शिक्षण देणा-या- घेणाऱ्यांमध्ये सुसंवाद असावा, असा प्रयत्न होणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही.
खरे पाहिले तर, बालकाच्या वयाची ३ ते ७ ही वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. त्या काळात मुलाची ज्ञानेंद्रिये अत्यंत कार्यक्षम असतात, म्हणून आपण पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीत जन्मलेल्या फ्रेड्रिक विल्यम् ऑगस्टस् फ्रोबेल यांनी प्रत्यक्ष प्रयोगातून आणि 'द एज्युकेशन ऑफ मॅन' या ग्रंथातून लहान बालकांच्या शिक्षणाची जगाला ओळख करून दिली. पण आजही आमच्याकडे ३ ते १० वयोगटांतील मुला-मुलींच्या शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे जगाच्या तुलनेत आमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कच्चा आहे, असे सिद्ध होऊ लागले आहे. विद्यापीठापासून हे पाहायला गेलो तर जगातील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाची वर्णी लागू शकत नाही, एवढा आमचा शैक्षणिक दर्जा घसरला आहे. विज्ञान – तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयातील संशोधन तर जवळ-जवळ थांबलेले दिसते.
सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या 'ब्रिक्स' (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) संघटनेचा हल्ली उदोउदो सुरू आहे. या पाच देशांकडे भावी महासत्ता म्हणून पाहिले जात आहे, त्या देशांपैकी फक्त भारताचे विद्यापीठ पहिल्या २०० दर्जेदार विद्यापीठांच्या यादीत नसणे, ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. पण त्याची ना कुणाला खंत वा खेद. आपल्याकडील प्राथमिक शाळांचीसुद्धा विद्यापीठांसारखीच दुरवस्था झाली आहे. कारण आजही आमच्याकडे पूर्वप्राथमिक – प्राथमिक शिक्षण म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा आणि जीवनाचा पाया आहे, असे मानले जात नाही. बालशिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, 'बालकाचे शिक्षण बरोबर होते किंवा नाही हे तपासण्याची एक चावी आहे, ती म्हणजे बालकाची प्रसन्नता.
आजची बालके हीच उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, राजकारणी, मुत्सद्दी, तत्त्ववेत्ते व आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ होत.' मादाम माँटेसारी यांच्या बालशिक्षण तंत्राला गांधीवादी साधेपणा आणि सच्चेपणाची जोड देऊन महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक प्रकल्प उभे राहिले. ताराबाई मोडक, अनुताई वाघ, साने गुरुजी, भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदी ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्रातील बालशिक्षणाला 'वळण' लावले. त्यांच्या प्रेममय मार्गदर्शनातून तयार झालेल्या अनेक पिढय़ांनी महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली. दुर्दैवाने आज असे प्रकल्प आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडलेले आहेत. अनुताई वाघ यांच्या अथक मेहनतीमधून आकारास आलेल्या 'कोसबाड प्रकल्पा'लाही निधीची आवश्यकता आहे; पण त्यासाठी ना शासनाला लक्ष देण्यास सवड आहे, ना लग्न-पाटर्यामध्ये पैसे उडविणा-या धनिकांना अशा प्रकल्पांची पर्वा.
बालशिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शिक्षणावर अमेरिका, चीनपाठोपाठ, सर्वाधिक खर्च करणा-या भारताचे शैक्षणिक भवितव्य काळवंडलेले दिसते. तीन वर्षापूर्वी 'पिसा' (प्रोजेक्ट फॉर इंटरनॅशनल स्टुडंटस् अ‍ॅसेसमेंट) या जागतिक स्तरावरील शिक्षणाची तपासणी आणि चिकित्सा करणा-या संस्थेने आपला सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला होता. जगातील एकूण ७४ देशांतील ४६ हजार विद्यार्थ्यांची कसून परीक्षा घेऊन 'पिसा'ने संबंधित देशांतील शिक्षण व्यवस्थेविषयी मत व्यक्त केले होते. भारतातील हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यांपुरते हे सर्वेक्षण मर्यादित होते. 'पिसा'तर्फे मुलांचे सामान्यज्ञान, वाचनाची क्षमता, गणित आणि वैज्ञानिक ज्ञानाची तयारी याची चाचणी घेतली गेली. वाचन आणि गणितात ७४ देशांमध्ये भारताचा क्रमांक अनुक्रमे ७२ आणि ७३वा लागला. ही आहे आमच्याकडील १५ वर्षाखालील मुलांच्या शिक्षणाची अवस्था.
महाराष्ट्रामध्ये तर प्राथमिक, माध्यमिक शाळा काढणे म्हणजे एखादे 'दुकान' उघडण्यासारखे झाले आहे. हल्ली गल्लोगल्ली, खेडोपाडी खासगी शाळा निघताहेत; कारण आमच्या राज्यकर्त्यांच्या कृपेने राज्यात 'डीएड कॉलेजेस' अर्थात शिक्षक बनविण्याचे कारखाने अफाट वाढले आहेत. सध्या राज्यात अशी ११२० महाविद्यालये आहेत. त्यातून दरवर्षी ८० ते ९० हजार शिक्षक तयार होतात. वास्तविक पाहता, महाराष्ट्राची गरज १० हजार शिक्षकांहून जास्त नाही. परंतु त्याचा विचार न करता मायबाप सरकारने भरमसाट शिक्षक महाविद्यालये काढण्यास परवानगी दिली. त्यामुळे भलेही काही राजकीय नेत्यांची 'सोय' झाली; पण या कारखान्यांमधून बाहेर पडणा-या शिक्षकांचे काय? शिक्षकच काय साधी कारकुनी करण्याची कुवत नसलेली ही मंडळी १०-१५ लाख रुपये संस्थाचालकांकडे देऊन शिक्षकाची नोकरी मिळवतात. कायम नोकरीचा गड एकदाचा 'सर' केला की, शिक्षकाचे काम संपते.
१८४० मध्ये 'किंडर-गार्टन'चा प्रयोग करताना शिक्षक झालेल्या फ्रोबेल यांनी शिक्षकी पेशाबद्दल स्वानुभवातून लिहिले होते, ते म्हणतात, 'शिक्षणाच्या, ज्ञानदानाच्या बाबतीत आपली स्वत:ची तयारी असल्याशिवाय शिक्षक म्हणून काम करणे व्यर्थ आहे.' परंतु आमच्याकडे स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आमच्याकडे 'पैसे देण्याची तयारी असल्याशिवाय शिक्षक बनणे अशक्य आहे,' अशी स्थिती पाहायला मिळते. शाळेत जास्त शिक्षक नेमल्याने जास्त पैसे मिळतात, म्हणून संस्थाचालक आपल्या शाळेत जास्त विद्यार्थी असल्याचे कागदोपत्री दाखवतात. होय, हे अगदी खुलेआम सुरू असते. हा 'बोगस विद्यार्थी घोटाळा' शिक्षण विभागाने नुकताच मान्य केला. राज्य सरकारचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान करणा-या या घोटाळय़ाने महाराष्ट्राच्या एकूण शैक्षणिक गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. शासकीय आकडेवारीनुसार राज्यात १ लाख प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. त्यात २ कोटी १६ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात, अशी नोंद असली तरी २० लाखांहून अधिक विद्यार्थी 'बोगस' आहेत. त्यांची पटावर नोंद असली तरी ते शाळेत येतच नसतात.
ब-याचदा त्यांची नावेही खोटी असतात. असा बोगसपणा करणा-या ६०० शाळा शिक्षण विभागाने शोधून काढल्या आणि त्यामध्ये त्यांना थोडेथोडके नाही, तर साडेचार हजार जादा शिक्षक सरकारी पगारावर मजा मारताना दिसले. जगातील सगळय़ात भ्रष्टाचारी देशातही शिक्षण क्षेत्रात जेवढा भ्रष्टाचार नसेल तेवढा आपल्याकडे सुरू आहे. त्यामुळे कुणी कुणाला बोलण्याची सोय उरलेली नाही. पैशाला सोकावलेल्या खासगी इंग्रजी शाळा इतक्या मस्तवाल झाल्या आहेत की, त्यांना कुणाचाच अगदी सरकारचाही धाक उरलेला नाही. मध्यंतरी 'बिलबाँग' नामक शाळेने अवाच्या सव्वा फी वाढवली म्हणून काही पालकांनी तक्रारी केल्या, तर शाळेने काय करावे? त्या पालकांवरच पाच कोटींचा दावा ठोकला. पालक घाबरले. सरकार मात्र मजा बघत बसले आहे. अगदी तीच स्थिती सेंट्रल बोर्ड (सीबीएसई) आणि प्रादेशिक बोर्ड म्हणजे एसएससी परीक्षांची. सीबीएसई परीक्षेतील ७० गुण शाळेच्या हातात, तर ३० बोर्डाच्या. त्यामुळे आपले विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक 'गुणवान' व्हावेत, असा शाळांचा कल नसेल तरच नवल. परिणामी एकेका वर्गात दहा-दहा ९०-९५ टक्के मिळविणारे विद्यार्थी दिसतात आणि त्यांच्याशी बरोबरी करण्यासाठी एसएससी बोर्डाच्या शाळा आपल्या मुलांना कॉपी करण्याची सवलत देतात, असा सार्वत्रिक अनुभव यायला लागला आहे.
झाडावर पिकलेला आंबा गोड असतो, चुना वा अन्य विषारी रसायने वापरून भलेही कैरी लवकर पिकल्यासारखी दिसते. मात्र तिच्यात गोडी नसते. ती ब-याचदा नासतेही. आम्ही साधारणत: ती फळं खराब झाल्यावर विचार करायला लागतो. म्हणजे विद्यार्थी आत्महत्या, खून वा चोरी-मारी करायला लागले तर आम्हाला जाग येते; पण तोवर वेळ निघून गेलेली असते. आमच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला आज बाजारीकरणाची कीड लागली आहे. ती वेळीच रोखली नाही, तर अवघी समाजव्यवस्था धोक्यात येईल..

Read More »
'सुखा'चा सुखद अनुभव

सुख हे मानण्यावर असतं, पण होतं काय इगोमुळे आपण आपलं सुख गमावून बसतो. गेलेला काळ परत येत नाही. आणि त्या सुखाच्या कल्पनेमध्ये गेलेल्या काळाचं दु:ख करत बसतो. या विषयावर आधारित 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' हे नाटक रंगभूमीवर आलंय.

लेखक : सुनील हरिश्चंद्र
दिग्दर्शक : सुदेश म्हशिलकर
कलाकार : सुलेखा तळवलकर, संतोष जुवेकर आणि सुदेश म्हशिलकर सुख हे मानण्यावर असतं, पण होतं काय इगोमुळे आपण आपलं सुख गमावून बसतो. गेलेला काळ परत येत नाही. आणि त्या सुखाच्या कल्पनेमध्ये गेलेल्या काळाचं दु:ख करत बसतो. या विषयावर आधारित 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' हे नाटक रंगभूमीवर आलंय. नवविवाहित जोडप्यांच्या जीवनशैलीवर भाष्य करणा-या या नाटकात आजच्या काळाचे संदर्भ सापडतात.
अनादी काळापासून माणूस सुखाच्या शोधात आहे. कालानुरूप त्याच्या सुखाच्या व्याख्या बदलत गेल्या. व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुसार 'सुख' विविध त-हेनं सामोरं येतं. 'सुखा'ची सर्वमान्य व्याख्या करणं म्हणजे यशाची शिंगं शोधण्यासारखं आहे. समर्थ रामदासांना जिथे 'सर्व सुखी' माणूस या अखिल विश्वात सापडला नाही, तर इतर पामरांची काय कथा? यावर तोडगा काय?.. तर 'सुख' ही एक मानसिक अवस्था, 'सुख' हे मानण्यावर असतं.. अशी सोयीची व्याख्या स्वत:च्या समाधानासाठी करून घेणं.. इथे 'सुखाचा शोध' विसावतो.
नव्या तरुण रंगकर्मीसाठी 'सुखा'चा शोध घेणं आव्हानात्मक वाटत असावं. सुनील हरिश्चंद्र हे नव्या दमाचे, तरुण नाटककार. त्यांनी आपल्या परीनं, तरुण जीवांच्या सहाय्यानं 'सुखा'चा शोध मांडला आहे. या नाटयकृतीचं नाव आहे, 'सुख म्हणजे नक्की काय असतं?'
या नाटयकृतीचा कालपट अत्यंत छोटा, म्हणजे अवघ्या ४-६ वर्षाचाच आहे, पण या अल्पशा काळातही 'सुखा'च्या विविध रूपांचं दर्शन लेखक सुनील हरिश्चंद्र यांनी घडवलं आहे. लेखक तरुण असल्याने त्यांच्या व्यक्त झालेल्या भावनाही तारुण्यसुलभ आहेत. जोडीदार हेरण्यातलं सुख, मग 'गटवण्यातलं' सुख, प्रेमाला स्वीकारण्यातलं सुख, प्रेमाच्या बहराचं सुख, हुरहूर लावण्यातलं आणि ती लावून घेण्यातलं सुख, प्रियकर-प्रेयसी ते पती-पत्नीच्या नातेबंधात अडकण्याचं सुख, हा नातेबंध निभावण्यातलं सुख, संसारातील गोडीचं सुख, छोटया-मोठया कुरबुरींचं सुख, रुसव्या-फुगव्यांचं-मनधरणीचं सुख, परस्परांच्या सहवासाचं सुख.
सुखाची ही जंत्री मोठी होईल, पण नाटककार सुनील हरिश्चंद्र यांनी छोटया-मोठया घटना-प्रसंगांतून, त्यांना अभिप्रेत असणारं 'सुख', पात्रांच्या माध्यमातून रसिकांसमोर ठेवलंय. या नाटकात मुख्य पात्रं दोनच, सुहास आणि सुनिधी- हे दोन तरुण जीव. पण त्यांना 'सुखा'च्या वाटेत सहाय्यभूत ठरणारा सूत्रधार आणि डॉ. सुदेश. सूत्रधाराच्याच मदतीने हे दोन जीव एकत्र येतात अन् मग परस्परांवरील अपेक्षांच्या ओझ्यानं दु:खाला आमंत्रित करतात. सुख काय नि दु:ख काय, या दोन्ही अवस्था कायम टिकणा-या नव्हेत. त्यांचं चक्र सतत फिरतं राहणारं. म्हणूनच सुनिधी- सुहास यांच्या सततच्या सहवासानं त्यांच्यात होणारे गैरसमज, त्यातून उद्भवणारी भांडणं.. यामुळे त्यांच्या नात्यात निर्माण होणारी 'दरार'. 'स्त्रियांना दोन मेंदू असतात आणि पुरुषाला एक', या गृहितकावर सुहास हा सुनिधीच्या वागण्याचं विश्लेषण करतो. तर सुनिधी ही सुहासवरील 'संशया'नं सुखालाच दूर लोटते. आपल्या प्रेमात वाटेकरी नको, असं दोघांनाही वाटणं.. हे खरं तर परस्परांवरील प्रेमाचंच प्रतीक, पण 'बायको आपली जहागीर आहे, हे पुरुष कधीच विसरत नाही,' हे दु:खाचं मूळ कारणही लेखक सांगून टाकतो.
नाटककार सुनील हरिश्चंद्र यांचं हे व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं दुसरं नाटक. यापूर्वी 'फार- फार तर काय?' हे नाटक त्यांनी लिहिलं होतं, पण त्यास व्यावसायिक यश काही लाभलं नाही. ब-याच एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत. त्यामुळे नाटयमाध्यमाशी ते परिचित आहेत. हिंदी रंगमंचावर त्यांचं 'तेरे घर के सामने' हे नाटक सुरू आहे. त्यांच्या लेखनात सफाई आहे, ती 'सुख म्हणजे..'मध्ये विशेषत्वाने जाणवते. त्यांनी लिहिलेले संवादही चमकदार, प्रत्ययकारी आहेत. उदा. रविवार नाही, हा तर 'राडा'वार. किंवा 'लग्न हा शब्द लग्नापूर्वी ऐकला की मोहरून जायला होतं आणि लग्नानंतर ऐकला की गळून जायला होतं.' किंवा 'एक क्षण भाळण्याचा आणि बाकी सांभाळण्याचा!' यातील प्रसंगही त्यांनी चांगले लिहिले आहेत. विशेषत: सुहास दारू पिऊन आल्यानंतरचा, पार्टीहून परतल्यानंतरचा.. किंवा डॉ. सुदेशने मध्यस्थी करतानाचा.. अप्रतिम. लेखकाचं नवखेपण कुठेच जाणवत नाही.
सुदेश म्हशिलकर यांचं दिग्दर्शक म्हणून हे पहिलंच नाटक. अनावश्यक 'नाटय़' घडवण्यापेक्षा त्यांनी हे सहजतेनं 'घडू' दिलं आहे. पात्रांचा वावर, रचनाबंध त्यांनी मुक्त, सहज ठेवला आहे. म्हणूनच ही पात्रं, त्यांची समस्या, त्यावरचे त्यांचे उपाय, त्यांच्यातील वाद-संवाद नाटयरसिकांना 'सुख' देऊन जातात. सचिन गोताड यांनी उभारलेल्या नेपथ्याचाही सुयोग्य वापर त्यांनी केलाय. गोताड यांनी सुखवस्तू वस्तीतला, अंतर्गत सजावटीनं सुस्वरूप फ्लॅट उभा केलाय. त्यातून त्यांची सौंदर्यदृष्टी जाणवते आणि फ्लॅटची 'स्थिती'ही! शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना करताना दिलेलं काळाचं भान सुयोग्य. राजेश परब यांना रंगभूषेत करण्याजोगं विशेष काही नव्हतं. प्रकाश निमकर यांनी मात्र सुनिधी- सुहास यांच्या वेशभूषेत त्यांच्या तारुण्यातील चैतन्याबरोबरच त्यांच्या 'भावना'ही दिसतील, याची दक्षता रंगसंगती, डिझाइन्सच्या, कपडयांच्या वैविधतेतूनही घेतली होती. दीपाली विचारे यांचं नृत्यदिग्दर्शन ठीक.
सुलेखा तळवलकर यांनी 'सुनिधी'ची आणि संतोष जुवेकर यांनी 'सुहास'ची मध्यवर्ती भूमिका साकारलीय. या दोन्ही कलावंतांची अभिनयाची समज, परस्परांमधील देवाण- घेवाण, परस्परांना 'पूरक' होत प्रसंग रंगवणं, हे बहारदार होतं. दोघांच्याही कामात, वावरण्यात, संवादफेकीत आत्यंतिक सहजता आहे. सुहासने दारू पिऊन घरात आल्यानंतरचं त्याचं बोलणं-बरळणं, चालणं, विचार करण्याची कुवत.. भावनाविवश होणं.. सारंच जुवेकर यांनी संयमानं, पण बारकाव्यानिशी दर्शवलं. हा अभिनेता कल्पक, विचारी आहे, याचा प्रत्यय त्यांची ही भूमिका पाहताना येतो. सुदेश म्हशिलकर यांनी सूत्रधार आणि डॉ. सुदेश या भूमिका सफाईदारपणे केल्या आहेत.
पती- पत्नीच्या नातेसंबंधातील बदलणा-या 'सुखा'चा सुखद अनुभव घेण्यासाठी, प्रत्येक सुखाच्या शोधातील नाटयरसिकांनी, हे नाटक पाहायला हवं.
सुख म्हणजे नक्की काय असतं!!!

Read More »
अभिनयाचा खोखो

केदार शिंदेच्या 'खोखो' या चित्रपटाची कथा अनेकांना माहीत असलेली. त्याच्याच २००३ साली आलेल्या 'लोच्या झाला रे' या नाटकावर बेतलेली.

खोखो
दिग्दर्शक : केदार शिंदे
कलाकार : भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कमलाकर सातपुते, विजय चव्हाण, प्राजक्ता माळी. केदार शिंदेच्या 'खोखो' या चित्रपटाची कथा अनेकांना माहीत असलेली. त्याच्याच २००३ साली आलेल्या 'लोच्या झाला रे' या नाटकावर बेतलेली. एका गावातला एक शिक्षक श्रीरंग देशमुख (भरत जाधव) याचा पिढीजात मोठा वाडा असतो. त्यावर मेहता (उदय टिकेकर) या बिल्डरचा डोळा असतो. तो त्याचा हस्तक पक्याभाई (कमलाकर सातपुते) याच्यामार्फत त्याच्यावर वाडा विकण्यासाठी दबाव आणत असतो. त्याला घाबरून तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतो. त्याच्या सात पिढयांना मात्र हे मंजूर नसतं. ते त्याला मदत करण्यासाठी अवतीर्ण होतात व शेवटी तो वाडा त्याच्याकडेच राहतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.
कथेत फार नावीन्य नाही. नावीन्य आहे ते तिच्या सादरीकरणात. या चित्रपटात वापरण्यात आलेले स्पेशल इफेक्ट्स अगदी आवश्यक तेवढेच आहेत. त्यात कुठेही अतिरंजितपणा नाही. चित्रपटाचं छायांकन सुरेश देशमाने यांनी केलंय. कॅमेरा व प्रकाशयोजना याच्या सहाय्यानं त्यांनी आपल्याला एक दृश्य मेजवानीच दिलीय. केदारचं दिग्दर्शन व त्याचं चित्रपट सादर करण्याचं कौशल्य वादातीत आहे. चित्रपटाचा वेगही त्यानं चांगलाच राखलाय; काही प्रसंगांत मात्र अभिनेत्याच्या प्रेमापोटी चित्रपटाचं संतुलन जातंय की काय, असं वाटून राहतं. ज्या गोष्टी नाटकात अचंबित करून टाकतात व हक्काच्या टाळया व हशा वसूल करतात, त्या गोष्टी तितक्याच प्रभावीपणे चित्रपटात येतील असं होत नाही. तरीही हा चित्रपट आपली छान करमणूक करून जातो. हा केवळ मनोरंजक चित्रपट आहे. त्यातून काही भव्यदिव्य व संदेश वगैरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही, याच्याशी केदार प्रामाणिक राहिलाय.
चित्रपटाची खरी गंमत ही त्याच्या अभिनयातली आहे. भरतने तर धमालच केलीय. अगदी त्याच्या पहिल्याच फ्रेमपासून त्याने प्रेक्षकांना आपल्या ताब्यात घेतलंय. साधा सरळ शिक्षक, उत्तेजित शिक्षक, घाबरट, पापभिरू, परिस्थितीशी लढणारा किंवा त्याला शरण जाणारा सामान्य माणूस तर त्याने ताकदीने उभा केलाच, त्याचबरोबर आपण इतर सगळयांच्या अभिनयाचा अभिनय करू शकतो (नक्कल नव्हे) हेही त्याने दाखवून दिलंय. सिद्धार्थच्या आदिमानवाचं नाटकातही कौतुक झालं होतं, ते योग्यच होतं. तसं काम त्याने चित्रपटातही केलंय. ही भूमिका तो अक्षरश: जगलाय. कोणत्याही संवादांची मदत नसताना त्याने केवळ आपल्या देहबोलीतून आणि भावमुद्रेतून जे दाखवलंय, ते अचाट आहे. विजय चव्हाण यांचा घाटपांडेही जबरदस्त. त्याचबरोबर क्रांती रेडकरने रंगवलेलं पात्रही भाव खाऊन जातं. प्रत्येकाने आपापली कामं चोख केल्यावर समोर जे घडतं ते नाकारता येत नाही, हेच या चित्रपटानं दाखवून दिलंय.
या चित्रपटाचा सुरुवातीचा भाग हा वेगवान झाला असला तरी पूर्वज आल्यानंतर स्वत: दिग्दर्शकच या पूर्वजांच्या प्रेमात पडलाय की काय, असं वाटून राहतं. त्यांच्या येण्यात व पात्र प्रस्थापित करण्यात गरजेपेक्षा अधिक फुटेज वापरण्यात आल्याचं जाणवतं. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटानं चांगला वेग पकडलाय. या चित्रपटाचा नायक मात्र फारच साधा दाखवला गेला आहे. त्याच्याकडून इतर अनेक कारवाया झाल्या असत्या तर त्याची धमाल अधिक वाढली असती. नाटकाचा चित्रपट स्वीकारताना नेहमीच प्रेक्षकांची द्विधा मन:स्थिती होते. ती टाळण्यात केदार चांगलाच यशस्वी झालाय. या चित्रपटातून पदार्पण करणारी प्राजक्ता माळीही आश्वासक आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेला जुना वाडा उभारणा-या सुधाकर मांजरेकर यांचं कलादिग्दर्शनही सुरेख आहे. त्यातले बारकावे मनात भरणारे. एकंदरीत मराठीतला हा एक चांगला मनोरंजनपट आहे. त्याची तुलना इतर मनोरंजनपटांबरोबरच करायला हवी. दिग्दर्शकाच्याही इतर कामांबरोबर सतत तुलना करून त्याला कमी ठरवण्यात हशील नाही. 'या बसा आणि हसा' असा हा चित्रपट आहे.

Read More »
परिपूर्ण व्यावसायिक

'ये जवानी है दिवानी' चित्रपट! तो तरुणाईसाठी आहे असं म्हणतात, पण तो बेचव पिझ्झा आणि खाता न येणा-या बर्गरच्या 'मार्केटिंग तंत्रा'सारखाच बनवण्यात आलाय..


ये जवानी है दिवानी
दिग्दर्शक : अयान मुखर्जी
कलाकार : रणबीर कपूर, दीपिका पडुकोण, अदित्य रॉय कपूर, कल्की मनोरंजनाचं उत्तम माध्यम असलेला चित्रपट हा एक मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायाची गणितंही फार वेगळी असतात. काहींना ती सोडवता येतात, काहींना नव्याने मांडता येतात. अशाच प्रकारच्या व्यवसायांच्या गणितांनी कथानकालाही प्रभावित करणारा असा 'ये जवानी है दिवानी' चित्रपट! तो तरुणाईसाठी आहे असं म्हणतात, पण तो बेचव पिझ्झा आणि खाता न येणा-या बर्गरच्या 'मार्केटिंग तंत्रा'सारखाच बनवण्यात आलाय..
उन्हाळयाची सुट्टी पडली की, अनेक जण कुठे कुठे जाण्याच्या योजना तयार करतात. उन्हाळा सरता सरता त्यांच्या लक्षात येतं की, 'अरेच्या, आपण कुठेच गेलेलो नाही. ही सुट्टी अशीच नेहमीची काम करण्यात गेली.' अशा सा-यांनाच आता सुट्टीच्या शेवटच्या आठवडयात काही तरी केलंच पाहिजे, याची जाणीव झाली असणार. कुठे तरी जाण्यासाठी हातात वेळ कमी. मग, आता काय करणार? तर चला, एक दिवसाची 'मूव्ही मस्ती' करू या, असं अनेकजण ठरवतात. अशा अनेक रसिकांचे तांडेच्या तांडे सध्या विविध मॉलमध्ये फिरताना दिसतात. या इतक्या मोठया प्रमाणातल्या रसिकांना खूश करण्यासाठी यावेळी कसा चित्रपट पाहिजे, याचा विचार करून तयार करण्यात आलेला एक परिपूर्ण व्यावसायिक चित्रपट म्हणजे 'ये जवानी है दिवानी'. या चित्रपटात 'दिवानी' हा शब्द असला तरी हा चित्रपट 'येड घेऊन पेडगावला' जाण्याचा महामार्ग आहे.
चित्रपटाची कथा, साधी-सोपी, अनेक चित्रपटांतून दिसून आलेली. बिन्नी ऊर्फ कबीर थापर (रणवीर कपूर) हा आपला मित्र अविनाश (अदित्य रॉयकपूर) आणि अदिती (कल्की) यांच्याबरोबर सुटीचे दिवस मजेत घालवत असतो. ते सगळे जण मनालीला एका ट्रेकला जाणार असतात. इकडे नैना तलवार (दीपिका पडुकोण) ही अभ्यासू मुलगी, शाळेत पहिली येणारी. आता ती मेडिकलला आलेली आहे. इतरांपेक्षा बरीच वेगळी. सतत अभ्यास एके अभ्यास असं तिचं सुरू असतं. आपणही इतरांसारखी मजा-मस्ती करावी असं तिलाही वाटत असतं. मात्र घरच्यांमुळे ती हे करू शकत नाही. तिची मैत्रीण भेटल्यानंतर मात्र तीही अशा प्रकारे कुठेतरी वेळ घालवायला जायला उत्सुक होते. एकदा घरातल्यांना काहीही न सांगता तीही मनालीच्या ट्रेकला जायला निघते. मात्र आयत्या वेळी तिला रिझव्‍‌र्हेशन मिळत नाही, मात्र बिन्नी तिला आपल्या ग्रुपमध्ये येण्याचं सुचवतो. त्यानुसार ती त्यांच्याबरोबर मनालीला जाते. साध्याभोळया अभ्यासू नैनाला स्वत:तलेच अनेक पैलू कळतात. याच काळात बिन्नी आणि तिच्यात प्रेमाचं नातं निर्माण होतं. बिन्नीला मात्र कुठेही अडकायचं नाहीए. संपूर्ण जग फिरण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अमेरिकेला निघून जातो. पुढे त्याचा व्यवसाय आणि फोटोग्राफीच्या छंदामुळे तो जगभर फिरत राहतो. मनालीच्या ट्रेकनंतर एकमेकांपासून काहीसे दुरावलेले हे सगळे मित्र आठ वर्षानंतर पुन्हा अदितीच्या लग्नात एकत्र येतात. जग फिरण्यापेक्षा आपल्या माणसात राहण्यातलं सुख या दरम्यान बिन्नीला समजून येतं आणि तो सगळं सोडून स्थिर होण्यासाठी नैनाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतो.
चित्रपटाच्या कथेत काहीही दम नाही. दिग्दर्शकाने काही विशेष करण्याचा प्रयत्नही केलेला नाही. दिग्दर्शकाचं जे काही कौशल्य आहे, ते केवळ जाहिरातींच्या जंजाळातून चित्रपट कसा दिसेल हे पाहण्यापुरतंच आहे. हा चित्रपट कोणा एका प्रेक्षकवर्गासाठी नसून तो सर्वासाठीच आहे. चित्रपटाचा पहिला काही भाग तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, त्यात माधुरी दीक्षितचं एक नृत्य हे युपी, बिहारच्या प्रेक्षकांसाठी, हे झाल्यानंतर एका सहल आयोजक कंपनीच्या जाहिरातीसाठी सहलीचा घाट. त्यानंतर जगातल्या विविध पर्यटन विकास महामंडळांतर्फे आयोजित केल्याप्रमाणे वाटावी अशी परदेशाची एक दीर्घ सफर. आता मध्यमवयीन लोकांसाठी आई-वडिलांच्या प्रेमाचे, वात्सल्याचे एक-दोन प्रसंग, त्यानंतर परदेशस्थ भारतीयांच्या संदर्भवाढीसाठी अदितीच्या लग्नाबरोबरच राजस्थान पर्यटन विकासाची एक सफर, त्यात पुन्हा भारतीय संस्कृती व कौटुंबिक मूल्य दाखवण्यासाठी 'गाव भटकण्यात आनंद असला तरी शेवटी माणसाला घर असायलाचं हवं' हे दाखवणारे प्रसंग, त्यात पुन्हा अगदी आंब्यापासून ते रुहअफ्जापर्यंत अनेक भारतीय पदार्थाच्या जाहिराती. भारत सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी बर्गर आणि मटण बिर्याणी यांच्यातला वाद. या साऱ्या गोष्टींचा एकत्रित पसारा सांभाळण्याचं काम तेवढं दिग्दर्शकाने केलंय. त्यातही सुरुवातीला प्रत्येकाच्या घरी कसली ना कसली पार्सलं का येतात, ते पुढे कुठेच येत नाही.
दिग्दर्शकाने या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात केली व शेवट कुठे करायचा हे त्याचंच त्याला कळलं नाही, असं वाटतं राहतं. हो एक विसरलोच. ज्यांना मारामारी पाहायला आवडते, त्यांच्यासाठी एक कारण नसताना केलेली उगाचची मारामारीही आहेच. कशाचा कशाशी काहीही संबंध नसताना चित्रपटाच्या कथेपेक्षा अनेक गोष्टींच्या जाहिरातींचं एक परिपूर्ण पॅकेज कसं करावं, हे दाखवणारा हा चित्रपट आहे. बरं हे सगळं करताना किमान हा चित्रपट वेगवान तरी करावा तर तेही नाही. त्यामुळे अर्धा वेळ आपण मध्यंतराची वाट पाहत राहतो; तर उरलेल्या अध्र्या वेळात चित्रपट संपण्याची. या चित्रपटाचं एक वैशिष्टय़ मात्र आहे, ज्यांना चित्रपटबाह्य गोष्टींनी आपलं मनोरंजन करून घ्यायचं असेल, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
चित्रपटाच्या जमेची दुसरी बाजू म्हणजे, कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाचं छायांकन. ज्या पद्धतीने मनाली किंवा जगातली इतर ठिकाणं चित्रबद्ध करण्यात आलेली आहेत, त्याला तोडच नाही. त्याचबरोबर उदयपूरचा तळयातला महालही अशाच अभिनव पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटातली प्रकाशयोजना नजरेला एक सुखकारक असा अनुभव देऊन जाते.
अभिनयाच्या बाबतीत सांगायचं तर रणबीर कपूरने आतापर्यंत आपण तरुणाईचा आवडता कलाकार असल्याचं सिद्ध केलंच आहे. या चित्रपटातली त्याची नृत्यंही खणखणीत झाली आहेत. अनेक संवेदनशील प्रसंगांतला त्याचा अभिनय आणि त्याची संवादफेकही जबरदस्त. तशाच प्रकारचा चांगला अभिनय दीपिकानेही केलाय. सुरुवातीची अभ्यासू मुलगी ते स्वत:वरची सगळी बंधनं झुगारून देऊन स्वत:वर प्रेम करणारी, तसंच बिन्नीलाही योग्य रस्त्यावर येण्यासाठी प्रवृत्त करणारी नैना तिने छान उभी केलीय. अदित्य रॉय कपूरचा अविनाशही आश्वासक असला तरी काही महत्त्वाच्या प्रसंगी त्याची संवादफेक कर्कश्श वाटते. या चित्रपटात त्याला फारसा वाव नसला तरी त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. कल्कीने आपली भूमिका तिच्या व्यक्तिमत्त्वासारखी बिनधास्त केलीय.
हा फार आवर्जून पाहायलाच हवा असा चित्रपट नाही. ही 'मूड मूव्ही'आहे. आता या सुट्टीत कुठेच गेला नसाल व एक दिवस कुटुंबियांसोबत पैसे खर्च करण्याचा विचार असेल तरच हा चित्रपट पाहावा. सोबत भरपूर खाद्यपदार्थ असावेत.

Read More »

कॉर्पोरेट कंपन्यांना बँकिंग परवाने


रिझर्व्ह  बँकेकडून कॉर्पोरेट कंपन्यांना बँकिंग परवाने देण्याची नियमावली दोन महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आली. देशात अजूनही बँकिंग सेवा सर्वदूर पोहोचलेली नाही. बँकिंग क्षेत्रात विकासाच्या मोठया संधी आहेत. खेडयापाडयांना बँकिंग सेवेने जोडण्यासाठी रिझव्र्ह बँकेकडून कॉर्पोरेट कंपन्यांना परवाने देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. यासाठी केवळ एकच महिना शिल्लक असल्याने बँकिंगबाबत उत्सुक असणा-या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मात्र एप्रिल महिन्यात उघड झालेल्या कोलकात्यातील चिट फंड घोटाळय़ाने वित्तीय क्षेत्रातील अनागोंदी समोर आली. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांना बँकिंग परवाने देताना आरबीआयला नीट विचार करावा लागणार आहे.
कोलकात्यातील चिट फंड घोटाळयाने हजारो गुंतवणूकदारांचे ६००० ते ७००० कोटी रुपये बुडाले. यातील डझनभर गुंतवणूकदारांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. चिट फंडांवर अंकुश ठेवण्याइतपत कठोर नियमावली नसल्याने यासारखे घोटाळे वारंवार होत आहेत. त्यातच आरबीआयकडून कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी परवाने दिले जाणार आहेत. आर्थिक घोटाळयांच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट कंपन्यांना बँकिंग सेवेसाठी कितपत विश्वास ठेवायचा यावर आरबीआयला विचार करावा लागणार आहे.
सध्या देशात १९६ छोटया मोठया बँका आहेत. यातील बहुतेक बँकांवर सरकारी अंमल आहे. बँकिंग सेवेला तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि आर्थिक सर्वसमावेशकतेसाठीही आरबीआयकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच पुढच्या महिन्यात बँकेकडून नवीन परवाने दिले जाणार आहेत. याआधी दहा वर्षापूर्वी म्हणजेच २००३-०४ मध्ये आरबीआयने दोन बँकिंग परवाने इश्यू केले होते. ज्यामुळे कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक सुरू झाली. एक जुलैपर्यंत इच्छुक कंपन्यांना बँकिंग परवान्यांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र अजूनही यामध्ये कुठल्याच कॉर्पोरेट कंपनीने सारस्य दाखवलेले नाही. ज्यामुळे आरबीआयला अर्ज सादर करण्याची मुदत वाढवावी लागेल, असा अंदाज आहे.
दरम्यान बँकिंग परवान्यासाठी आरबीआयने कठोर नियमावली जाहीर केली आहे. ज्यामुळे देशातील बडया उद्योगांना बँकिंग सेवा सुरू करण्यास अडथळे निर्माण होतील. बँकिंग सेवेसाठी भारतीय वंशाचे सिटी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी उत्सुकता दाखवली आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातील जे. एम. फायनान्शिअलमध्ये पंडित यांनी हिस्सा खरेदी केला आहे. यामध्ये टाटा, बजाज, महिंद्रा, एलआयसी हौसिंग, रिलायन्स कॅपिटल, एलअँडटी फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्शिअल यांच्याकडून अर्ज सादर केले जातील. सध्या या कंपन्यांनाकडून विविध वित्तीय सेवा दिल्या जात आहेत. मात्र त्यांना खुल्या बाजारातून ठेवी उभारण्याचा अधिकार नाही. यासाठी बँकिंग परवाना आवश्यक आहे.
बँकिंग प्रणालीचा आधारस्तंभ असलेल्या आरबीआयच्या अधिकारांमध्ये सरकारी दबाव वाढू लागला आहे. त्यातच बँकांकडून आरबीआयच्या सूचनांचे तितक्या गांभीर्याने पालन केले जात नाही आहे. शेतक-यांना प्राधान्याने कर्ज देण्यासाठी आरबीआय बँकांना सांगत असूनही त्याला बँकांकडून तितकासा प्रतिसाद दिला जात नाही. कॉर्पोरेट कंपन्यांना  बँकिंग सेवा सुरू करण्यासाठीची त्यांची पात्रता आणि अटी व शर्थी याआधीच आरबीआयने जाहीर केल्या होत्या. ऑगस्ट २०११ मध्ये या मसुद्यावर बँकेकडून सूचना मागण्यात आल्या होत्या. मात्र यामध्ये काही बदल करून आता सूचनांच्या आधारावर नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.
याआधीही खासगी बँका सुरू झाल्या मात्र त्यांच्याकडून ग्रामीण भागापेक्षा निमशहरी आणि शहरी भागांमध्ये शाखा विस्तार करण्यात आला. त्यामुळे अजूनही देशातील हजारो खेडयांमध्ये बँकिंग सेवा पोहोचलेली नाही. आता मात्र कॉर्पोरेट क्षेत्राला बँकिंग सेवा सुरू करण्यास परवाने दिल्याने हे लक्ष्य साध्य होईल, असा आरबीआयला विश्वास वाटत आहे. सध्या देशात सार्वजनिक बँकांना वाढत्या बुडीत कर्जाने हैराण केले आहे. त्यानुसार बँकिंग सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरबीआय आणखी कडक नियमावली आणावी लागेल. कॉर्पोरेट क्षेत्राला बँकिंग परवाने दिल्याने या क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमुळे बँकिंग उत्पादनांचे अधिक पर्याय बाजारात उपलब्ध होतील. या कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यावर भर दिला जाईल, ज्यामुळे पर्यायाने ग्राहकांचा फायदा होईल. सध्या व्याजदर नियंत्रणमुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या आगमनानंतर चांगले अधिक व्याज मिळेल, अशी आशा आहे. नव्या बँकाकडून आकर्षक व्याजदराच्या योजना आणल्या जातील. ज्या ग्राहकांसाठी फायद्याच्या ठरतील. कॉर्पोरेट कंपन्यांना बॅकिंग सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्याने बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा वाढेल, परिणामी ग्राहकांना चांगले पर्याय निर्माण होती. बँकिंग सेवेच्या प्रसाराला हातभार लागेल. नवीन बँकांमुळे सरकारी बँकांपेक्षा खासगी क्षेत्रातील बडया बँकांना मोठी स्पर्धा निर्माण होईल.
कॉर्पोरेट कंपन्यांना बँकिंग परवाने दिल्यास त्यातून या कंपन्यांकडून आपल्याच कंपन्यांना कर्ज देण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकिंग सेवेची परवानगी मिळाल्याने या कंपन्यांची किंवा उद्योगांची शक्ती आणखी वाढेल. १९९० मधील आर्थिक मंदीमुळे आशियातील इंडोनेशिया, दक्षिण कोरिया यासारख्या देशांनी कॉर्पोरेट किंवा उद्योगांच्या ताब्यात असलेल्या बँकांसाठीची नियमावली कडक केली होती. भारतातील उद्योगांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर यातील कित्येक कंपन्यांवर मोठी कर्जे आहेत, मात्र तरीही त्या कंपन्या स्पर्धेमध्ये टिकून आहेत. क्रेडिट सूस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माहितीनुसार मार्च २०१३ पर्यंत देशातील १० मोठया उद्योगांवर देशातील बँकिंग क्षेत्रातील एकूण भांडवलाच्या ९८ टक्के कर्ज आहे. तसेच कंपन्यांकडून मॉरिशस मार्गे होणारी गुंतवणुकीवरही अंकुश ठेवावे लागणार आहे.
बँकिंग सेवा सुरू करण्याबाबत आरबीआयला कंपन्यांच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा घ्यावा लागेल. गेल्या काही महिन्यांमध्ये बँकिंग परवान्यांबाबत लाच देण्याच्या वावडयाही उठत आहेत. परवाना मिळवण्यासाठी काही कंपन्यांकडून आरबीआयला मोठी ऑफर दिली होती. ज्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली होती. दरम्यान सप्टेंबरमध्ये गव्हर्नर डी. सुब्बाराव निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांनी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र बँकिंग परवान्यांच्या वाटपाबाबत काही घोटाळा झाल्यास नव्या गव्हर्नरांना काम करणे कठीण जाईल. त्यामुळे बँकिंग परवान्यांची प्रक्रिया पार पाडणे म्हणजे आरबीआयला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. कंपन्यांना बँकिंग परवाने दिल्यास त्यांच्याकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक कंपन्यांच्या पात्रतेची काटेकोरपणे पडताळणी करावी लागेल.
सौजन्य : दि इकॉनॉमिस्ट

Read More »
चँपियन्स ट्रॉफी- ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला सर्वाधिक संधी

चँपियन्स ट्रॉफी 'ए ग्रूप'मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका संघाचा समावेश आहे. या ग्रूपमधील संघांची बलस्थाने आणि कच्चे दुवे जाणून घेऊया. आज नजर टाकूया ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या अव्वल संघांवर. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हॅटट्रिकची संधी आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा इंग्लंडला होईल.
ऑस्ट्रेलिया हॅटट्रिक साधणार?
आयसीसी रॅँकिंग- दोन
मागील दोन्ही आवृत्तींमध्ये जेतेपद पटकवणारा ऑस्ट्रेलिया संघ यंदा हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक असेल. त्यातच गेल्या काही वनडेंमधील ऑस्ट्रेलियाची कामगिरीही चांगली झाली आहे.
बलस्थाने : शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर हे आघाडीचे धडाकेबाज फलंदाज ऑस्ट्रेलियाची ताकद आहे. वॉटसनने गेल्या आवृत्तीतील जेतेपदात मोलाची भूमिका बजावली होती. वॉटसन आता प्रभावी गोलंदाजी करत असल्याने हा 'मॅचविनर' अष्टपैलू प्रतिस्पर्ध्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मधल्या फळीत उपकर्णधार जॉर्ज बेलीकडूनही खूप अपेक्षा आहेत. मिचेल जॉन्सन आणि जेम्स फॉकनर या वेगवान दुकलीचा आयपीएलमधील दमदार फॉर्म ऑस्ट्रेलियाची जमेची बाजू ठरणार आहे. या दोघांनाही इंग्लिश वातावरणाचा फायदा उठवण्याची संधी आहे.
अपेक्षा : कर्णधार मायकेल क्लार्क सध्या तितका फॉर्मात नाही. सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी त्याने कुशल नेतृत्वासह फलंदाजीत अधिकाधिक योगदान देण्याची आवश्यकता आहे.
कच्चे दुवे : ऑस्ट्रेलिया संघातील ब-याच क्रिकेटपटूंना ५० षटकांच्या आयसीसीच्या मोठया स्पर्धेत खेळण्याचा अनुभव नाही. ते पाहता त्यांना दडपणाशी जुळवून घेता आले पाहिजे.

 घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा इंग्लंड उठवेल?
आयसीसी रॅँकिंग- तीन
घरच्या मैदानावर चँपियन्स ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी इंग्लंडला चालून आली आहे. त्यातच गेल्या वर्षभरात वनडेतील कामगिरी संमिश्र राहिली आहे.
बलस्थाने : इंग्लंडकडे कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि इयन बेल ही विकेट टिकवून ठेवणारी सर्वोत्तम सलामी जोडी आहे. चांगली सुरुवात देण्यात नेहमीच या जोडीचा हातखंडा आहे. ऑफस्पिनर ग्रॅमी स्वान हा कोणत्याही वातावरणात विकेट घेण्यासाठी सज्ज असतो. जोडीला वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅडरसनचा दमदार फॉर्म त्यांची ताकद आहे. त्यातच घरच्या मैदानावर त्यांचे वेगवान गोलंदाज स्विंग आणि बाउन्सचरचा जास्तीत जास्त वापर करतील, यात शंका नाही.
अपेक्षा : कसोटी खेळणारेच बरेच क्रिकेटपटू इंग्लंड संघात असल्याने एकदिवसीय क्रिकेटला साजेशी फटकेबाजी करण्याची अपेक्षा यजमान फलंदाजांकडून आहे.
कच्चे दुवे : जो रूट, इयॉन मॉर्गन, रवी बोपारा या मधल्या फळीतील फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे.

Read More »
भाजप-शिवसेनेने विकास रोखला!

''काँग्रेस सरकारने विकासाची गंगा आणली आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेला फक्त विरोधच माहीत आहे,अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विरोधकांच्या विकासविरोधी वृत्तीवर हल्लाबोल केला.
रत्नागिरी – ''केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने विकासाची गंगा आणली आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेला फक्त विरोधच माहीत आहे. गरिबांना स्वस्तात धान्य मिळावे यासाठी केंद्र सरकार अन्नसुरक्षा विधेयक आणत आहे. कोणत्याही भूसंपादनामध्ये शेतक-यांच्या हिताचे रक्षण करणारे भूसंपादन विधेयक आणत आहे. पण भाजप-शिवसेनेने संसदेचे अधिवेशनच होऊ दिले नाही. त्यामुळे लोकहिताची ही विधेयके रखडली आहेत,'' अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विरोधकांच्या विकासविरोधी वृत्तीवर हल्लाबोल केला.
रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात शनिवारी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या कार्यअहवालाचे दिमाखदार प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी राणे यांनी विकासाच्या मार्गात आडवे येणा-या विरोधकांचा समाचार घेतला.''आम्ही उद्योजक आहोत. राजकारणातून आम्हाला काही कमवायचे नाही.
पण माझा जन्म कोकणात झाला आहे आणि कोकणातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळेच मला विविध पदे भूषवता आली. हे कोकणचे ऋण फेडायचे असल्यानेच मी आणि माझे कुटुंब सतत कोकणच्या विकासासाठी झटत असते,'' असे ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यात लोकप्रतिनिधी म्हणून वावरणा-यांकडे पुढच्या दहा-वीस वर्षाचा विकासाचा काही आराखडा आहे का, सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या काही योजना आहेत का, असे सवाल करत पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा विकास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात या दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उपन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त करण्यासाठी आपले प्रयत्न करणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. काँग्रेसला विकासाची भाषा कळते. मात्र शिवसेना-भाजपाला दोन टक्के आणि पाच टक्के एवढेच कळते. आपण कोकणात उद्योग आणले. मात्र शिवसेना-भाजपाला फक्त उद्योग बंद कसे पाडायचे, हेच ठाऊक असल्याची टीकाही त्यांनी केली.
'मंडप नाही, नवरी नाही, तरी बाशिंग बांधून तयार'
लोकहिताची विधेयके मांडली जाणार असलेले संसदेचे अधिवेशन होऊ न देणाऱ्या भाजपाची चिंता वेगळीच आहे. त्यांच्यात चर्चा रंगली आहे, ती पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची. अजून मंडप नाही, नवरीचा पत्ता नाही. पण हे बाशिंग बांधून तयार आहेत, असे राणे यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी हशा पिकला.

Read More »
सेन्सॉर बोर्डसाठी राष्ट्रगीतही 'गाणं'च!

चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी राष्ट्रगीत सुरू होते. सारे प्रेक्षक शांतपणे उभे राहून मानवंदना देतात.
मुंबई - चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी राष्ट्रगीत सुरू होते. सारे प्रेक्षक शांतपणे उभे राहून मानवंदना देतात. मात्र या राष्ट्रगीताच्या आधी जे सेन्सॉरचे प्रमाणपत्र पडद्यावर झळकते, त्यातल्या शीर्षकात 'गाना-जन गण मन' असे शब्द दिसतात. या शीर्षकावरून सेन्सॉर मंडळाने इतर गाण्यांच्या श्रेणीत राष्ट्रगीताचाही समावेश केला आहे.
'जन गण मन..' हे शब्द कानावर पडले किंवा त्याची केवळ सुरावटही ऐकली की राष्ट्रप्रेमाने मन उचंबळून येते. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांची ही रचना भारतीयांसाठी केवळ शब्द व सुरांचा संगमच नसून, अस्मिता आहे, प्रेरणा आहे. केंद्रीय फिल्म प्रमाणन विभाग अर्थात सेन्सॉर बोर्डाने मात्र हे राष्ट्रगीत 'गाना' श्रेणीत टाकून अवमान केल्याची टीका होत आहे.
राष्ट्रगीत हे गीत असले तरी ते त्यापेक्षाही वरच्या दर्जाचे आहे, याची जाणीव सेन्सॉर बोर्डासारख्या सरकारी संस्थेने ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रगीतावर कोणतीही श्रेणी असता कामा नये, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सध्या अनेक माध्यमांतून राष्ट्रगीताचे सादरीकरण करण्यात येते. मूकबधिरांच्या भाषेत, केवळ सुरावटींमधून, आघाडीच्या कलाकारांकडून सादर होत असल्याच्या चित्रफितीतून, प्रतिथयश गायकांच्या आवाजात सादर करण्यात येणारे राष्ट्रगीत चित्रपटगृहात सादर केले जाते. राष्ट्रीय सन्मान कायदा १९७१ च्या अंतर्गत राष्ट्रीय सन्मानचिन्हांचा वा राष्ट्रगीताचा अनवधानानेही मानभंग झाला की नाही हे पाहण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची आहे. अनेक वेळा अशा वेळी सेन्सॉर बोर्डाने योग्य ती भूमिका घेतलेली आहे. मात्र प्रत्यक्षात सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रातच राष्ट्रगीत हे 'गाना' या श्रेणीत येत असल्याने औचित्यभंग होत असताना दिसत आहे. राष्ट्रगीताचा प्रत्यक्ष अपमान झालेला दिसत नसला तरी त्याला वेगळा मान का दिला जात नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. राष्ट्रगीताचा उल्लेख केवळ राष्ट्रगीत या एका शब्दातच व्हावा, असेही अनेकांचे मत आहे. 'सेन्सॉर'च्या या प्रमाणपत्रावर केवळ राष्ट्रगीत असाच उल्लेख असावा त्यात 'गाना' हा शब्द असता कामा नये, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रगीत हे कोणत्याही श्रेणीत येणे शक्य नाही. ते स्वतंत्र आहे, त्याची एक स्वतंत्र अशी अस्मिता आहे. कोणत्याही परिस्थितीत ती अस्मिता जपली गेलीच पाहिजे. सेन्सॉर बोर्डाने याबाबत योग्य ते बदल करणे आवश्यक आहे.- नरेंद्र कोठेकर, सदस्य, सेन्सॉर बोर्ड

Read More »
सट्टेबाजांची तिहार तुरुंगात हाणामारी

स्पॉटफिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला मुख्य सट्टेबाज अश्विनी अग्रवाल ऊर्फ टिंकू व सुनील भाटिया या सट्टेबाजामध्ये तिहार तुरुंगात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई – स्पॉटफिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला मुख्य सट्टेबाज अश्विनी अग्रवाल ऊर्फ टिंकू व सुनील भाटिया या सट्टेबाजामध्ये तिहार तुरुंगात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. अजित चंडिलाला पैसे देणा-या सुनीलमुळे नुकसान झाल्याच्या रागावरून टिंकूने त्याला मारहाण व शिवीगाळ केल्याचे सूत्राने सांगितले. सुनीलने चंडिलाला २० लाख रुपये दिले होते. त्यानुसार त्याने एका षटकात १४ धावा दिल्या, मात्र ठरलेला इशारा देण्यास तो विसरला. यामुळे टिंकूला ७० लाखांचा फटका बसला होता.
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या रमेश व्यास याच्याकडील दूरध्वनी लाइनवरून पाकिस्तान व दुबईतील सट्टेबाजांशी संपर्कात असलेल्या टिंकूचे सट्टेबाजारात 'अर्जुन' या नावाने बुक चालते. त्याने सुनीलमार्फत अजित चंडिला व अंकित चव्हाणला 'फिक्स' केले होते. १७ एप्रिल रोजी झालेल्या मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात एका षटकात १४ धावा देण्यापूर्वी चंडिलाला गळ्यातील सोनसाखळी तोंडात धरून आकाशाकडे बघत सट्टेबाजांना इशारा करायचा होता. परंतु तो तसे करण्यास विसरला. या वेळी लंबू गुजरात व ज्युपिटर या दोन सट्टेबाजांकडे टिंकू मोठा डाव खेळला. मात्र प्रत्यक्षात चंडिलाने इशाराच केला नसल्यामुळे सट्टेबाजारात ते षटक मोजले गेले नाही. त्यामुळे टिंकूला ५० लाख रुपयांचा फटका बसला. याशिवाय चंडिलाला षटक 'फिक्स' करण्यासाठी दिलेले २० लाख रुपयेही त्याला परत मिळाले नाहीत.
राजीव शुक्ला यांचा राजीनामा
नवी दिल्ली – आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रविवारी (२ जून) होणाऱ्या बीसीसीआय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी शुक्ला यांनी राजीनामा दिल्याने बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावरील दबाव वाढला आहे. ''गेल्या काही दिवसांपासून मी राजीनामा देण्याबाबत विचार करत होतो. राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते,'' असे शुक्ला यांनी सांगितले.
श्रीनिवासन यांच्या अटी
बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांनी राजीनाम्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. आपल्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास पुन्हा अध्यक्षपद मिळावे, अशी पहिली अट आहे. आयसीसीच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करू द्यावे. तसेच सचिव संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांचा नव्या पॅनेलमध्ये समावेश नसावा, अशा अन्य दोन अटी आहेत.

Read More »
नगर जिल्ह्यात २४८ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी होणार

राज्य सरकारच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व २४८ सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम एक जूनपासून सुरू करण्यात आली असून ही मोहीम संपूर्ण जून महिनाभर सुरू राहाणार आहे.
अहमदनगर – राज्य सरकारच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व २४८ सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम एक जूनपासून सुरू करण्यात आली असून ही मोहीम संपूर्ण जून महिनाभर सुरू राहाणार आहे. तपासणी मोहिमेदरम्यान कोठेही त्रुटी आढळून आल्या तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात एकूण २४८ सोनोग्राफी केंद्र व २२१ मान्यताप्राप्त गर्भपात केंद्र आहेत. सोनोग्राफी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणा-या स्त्रीभ्रूणहत्यांसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या मोहिमेची आखणी केली आहे. सोनोग्राफी केंद्र तपासणीची मोहीम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणार आहे.
प्रत्येक तालुकास्तरावर त्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांमध्ये तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांच्या तपासणीत कोठेही त्रुटी आढळून आल्या तर संबंधितांवर गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील कोणत्याही सोनोग्राफी केंद्र अथवा गर्भपात केंद्राबाबत काहीही गैरप्रकार माहिती असतील किंवा तक्रारी असतील तर थेट जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निटूरकर यांच्याकडे गोपनीयरित्या माहिती सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.संजीवकुमार यांनी केले आहे.


Read More »
उच्चशिक्षणाचा गुणात्मक विकास आवश्यक

देशातील उच्चशिक्षणाचा संख्यात्मक विस्तार होत असताना त्याचा गुणात्मक विकास होणे अत्यावश्यक आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले.
लातूर – देशातील उच्चशिक्षणाचा संख्यात्मक विस्तार होत असताना त्याचा गुणात्मक विकास होणे अत्यावश्यक आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले.
येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राष्ट्रपती मुखर्जी यांच्या उपस्थितीत झाला. विचार मंचावर राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरिवद सोनवणे, सचिव रमेश बियाणी उपस्थित होते.
देशातील १८ ते २४ वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी सात टक्के लोकसंख्या शिक्षणाच्या प्रक्रियेत आहे. अन्य विकसित देशाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उच्चशिक्षणाच्या संधीचा विस्तार होणे आवश्यक असून त्याचबरोबर हे शिक्षण गुणात्मकदृष्टया दर्जेदार आणि आर्थिक दृष्टीने परवडणारे असणे गरजेचे आहे. सरकारने उच्चशिक्षण आवाक्यात आणण्यासाठी शिष्यवृत्तींची संख्या वाढवलेली असली व शैक्षणिक कर्जाची सुविधा सुलभ केलेली असली तरी आर्थिक दृष्टीने उच्चशिक्षण परवडण्याच्या दृष्टीने आणखी पावले उचलली जाणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
आपल्या देशातील प्राचीन काळातील तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, सोमपरा अशा विद्यापीठांच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देऊन राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले की, तक्षशिला विद्यापीठ हे भारतीय, ग्रीक, चिनी आणि पर्शियन संस्कृतीच्या वैचारिक देवाणघेवाणीचे एक केंद्र होते. आज आपल्या देशात जागतिक दर्जाचे शिक्षण देणा-या संस्थांची संख्या कमी आहे त्यामुळे अनेक बुद्धिमान विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्यास प्राधान्य देतात ही परिस्थिती बदलली पाहिजे. देशातील विद्यापीठात शिक्षण घेऊन आणि संशोधन करून सी. व्ही. रामन यांच्या सारख्या थोर शास्त्रज्ञाने नोबेल पारितोषिक प्राप्त केले. त्यानंतर देशातच शिक्षण घेऊन व संशोधन करून हे पारितोषिक मिळविण्याचा मान भारताला मिळालेला नाही याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले.
संशोधनावर होणारा खर्च ही गुंतवणूक असते. या गुंतवणुकीचे चांगले परिणाम दिसण्यास कालावधी लागतो. अशी गुंतवणूक वाढवण्यासाठी देशातील उद्योगांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षण संस्थांनी उत्तम विद्यार्थी आणि उत्तम शिक्षक यांचा समन्वय घडवून आणून संशोधनाला चालना देणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. संशोधनासाठी शिक्षण संस्था, सरकार आणि उद्योग क्षेत्र यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. आज देशाची आणि जागतिक अर्थव्यवस्था ज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित असतांना उच्च शिक्षणाची गुणवत्ता व संशोधनाला वाव दिला जाणे याबाबी महत्वपूर्ण ठरतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दयानंद शिक्षण संस्थेचा गौरव करून त्यांनी सुवर्ण महोत्सवाचा क्षण हा सिंहावलोकनाची संधी देताना भविष्यातील वाटचालीबद्दल बांधिलकी निर्माण करण्यास प्रेरणा देतो, असे उद्गार काढले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या सुवर्णस्मरणशिल्प या स्मरणिकेचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यांनी या
स्मरणिकेची पहिली प्रत राष्ट्रपती मुखर्जी यांना प्रदान केली.

Read More »
उदगीरच्या हत्तीबेट समितीस प्रथम पारितोषिक

संत तुकाराम वन ग्राम योजनेंतर्गत लातूरच्या उदगीर तालुक्यातील हत्तीबेट समितीस प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
मुंबई – संत तुकाराम वन ग्राम योजनेंतर्गत लातूरच्या उदगीर तालुक्यातील हत्तीबेट समितीस प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तर द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर मडेघाटला मिळाला आहे. सन २०११-१२ करिता हे पारितोषिक घोषित झाले आहेत.
राष्ट्रीय वननीती १९८८ नुसार वनसंरक्षण आणि वन विकासात स्थानिक लोकांचा सहभाग होण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन ग्रामीण लोकांच्या सहभागातून वनव्यवस्थापन राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेनुसार वन क्षेत्रामध्ये आणि वनक्षेत्राच्या सीमेवर असणाऱ्या सुमारे पंधरा हजार ६०० गावांपैकी १२ हजार ६६१ गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांनी वनांचे सरंक्षण करणे, अवैध वृक्षतोड, वन क्षेत्रातील अतिक्रमण, वन वणवा, अवैध चराई इ. प्रतिबंध करणे अपेक्षित आहे. ग्रामीण जनतेत वनाचे महत्त्व या विषयी जागृती निर्माण करणे यासारखी कामे संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत करण्यात येतात. या कामात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीकोनातून या समित्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट काम करणा-या समित्यांना संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत पारितोषिके देण्यात येतात.
पुरस्कार मिळवलेल्या इतर समित्या
नागपूर – भंडारा -लाखांदूर – मडेघाट – द्वितीय पारितोषिक विभागून ५० टक्के विभागून),
ठाणे – रायगड – कर्जत-खैराट धनगरवाडा-द्वितीय पारितोषिक विभागून (५० टक्के विभागून)
चंद्रपूर – चंद्रपूर – पोंभूर्णा – सातारा भोसले – तृतीय पारितोषिक ( २५ टक्के विभागून)
नागपूर – वर्धा – सेलू – आमगाव खडकी – तृतीय पारितोषिक (२५ टक्के विभागून)
धुळे – धुळे – साक्री – नांदर्खी – तृतीय पारितोषिक (२५ टक्के विभागून)
अमरावती – बुलडाणा – जळगाव जामोद – निमखेडी तृतीय पारितोषिक (२५ टक्के विभागून)
औरंगाबाद जिल्ह्याच्या औरंगाबाद तालुक्यातील चौका समितीस मराठवाडा प्रशासकीय विभागासाठी प्रोत्साहनात्मक पारितोषिक.

Read More »
कोकणच्या विकासासाठी गारमेंट उद्योगावर भर

कोकणातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावे, रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानेच गारमेंट उद्योगावर भर देण्यात आला आहे,अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी - कोकणातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावे, रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानेच गारमेंट उद्योगावर भर देण्यात आला आहे. कोकणातील जनतेच्या हितासाठी ही भूमिका घेत असतानाच नव्या औद्योगिक धोरणात या उद्योगाला अधिक सवलती देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज दक्षिण भागाचा विकास हा गारमेंट उद्योगावर झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर हा उद्योग वाढणे गरजेचे आहे. यातून कोकणातील जनतेला फायदा होणार आहे. दरडोई उत्पन्न वाढणार असून, मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार असल्याचे राणे यांनी सांगितले. कोकणातील जनतेला त्याचा फायदा मिळावा यासाठी या उद्योगाला औद्योगिक धोरणात सवलती देण्यात आल्या आहेत.
पश्चिम घाट विकास आणि इको सेन्सिटीव्हच्या नावाखाली कोकणातील माणूस उद्ध्वस्त होणार असेल तर अशा प्रकारच्या दर्जाची आवश्यकता नाही. लोकांच्या पोटापाण्याचे माध्यमच शिल्लक राहणार नसेल तर असा दर्जा काय उपयोगाचा, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. कोकण पॅकेजच्या माध्यमातून कोकणाला निधी मिळाला आहे. याशिवाय राज्याच्या निधीतून अधिक तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पातही निधी वाढवण्यात आला. अन्य योजनांमधून कोकणाला निधी उपलब्ध झाला आहे. साकवासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कोकणाला अधिकाधिक निधी देण्याचे धोरण सरकारचे राहिले असल्याचेही राणे यांनी या वेळी सांगितले.
कोकणातील विकासासाठी आणखी ३५० कोटीची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्याला राज्यपालांकडून मंजुरी मिळाली नाही. अनुशेष असल्याशिवाय मंजुरी न देण्याची भूमिका राज्यपालांकडून घेण्यात आली. अन्यथा कोकणाला आणखी निधी उपलब्ध झाला असता. काँग्रेस कोणालाही पाठीशी घालत नाही, असे सांगताना राणे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्याकडून चुकीची गोष्ट झाली असेल तर अशावेळी कोणालाही पाठीशी घातले
जात नाही.
सिंचन घोटाळय़ाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, हा विषय सध्या न्यायालयात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत विकास हाच मुद्दा असेल. काँग्रेसच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. विकास कामे घेऊनच लोकांसमोर जाणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
नेत्यामधला भारावलेला पिता!
केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा, विरोधकांचा सणसणीत शब्दात समाचार, कोकणाबद्दलची तळमळ हे सारं मांडणारा कणखर आणि अभ्यासू नेता पाहतानाच लोकांनी भारावलेला पिताही पाहिला.. मुलगा कर्तृत्ववान असेल तर पित्याला आनंद मिळतो.. या अर्थाने आज मी जगातला सर्वात आनंदी माणूस आहे.. असा गहिवरला अनुभव मांडणारा पिताही पाहिला..
कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून विविध वक्त्यांनी डॉ. निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर कार्य अहवालाचे प्रकाशन झाले. या सा-यानंतर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या उद्योगमंत्री राणे यांनी सर्वप्रथम हीच भावना मांडली. जिल्हाध्यक्ष रमेश कीर, चंद्रकांत तथा चंदुभाई देशपांडे, नाना मयेकर, गणपत कदम, खलिफे यांनी आपल्या भाषणांमधून डॉ. निलेश यांचे कौतुक केले हे ऐकून आपण खूप भारावून गेल्याचं या पित्यानं खूप प्रांजळपणे सांगितलं. एक पिता म्हणून आपण खूप सुखावल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
'डॉ. निलेश असोत किंवा नितेश असोत, माझ्या दोन्ही मुलांनी आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट नेहमी ऐकली. पंधरा-सोळाव्या वर्षी मी निलेशला परदेशात शिक्षणासाठी पाठवले. जाशील ना, एवढंच विचारलं. त्यांनी लगेच सांगितले, 'बाबा तुम्ही सांगताय ना, मग मी जाणार.' हीच गोष्ट लोकसभा निवडणुकीप्रसंगीही घडली. निवडणूक लढवशील का, असं मी विचारलं. त्यावर त्यानं एवढंच सांगितलं की, बाबा तुम्ही सांगताय ना, मग मी लढवेन. निलेशच्या नम्र वागण्याचं मला नेहमीच कौतुक वाटतं. शाळेत असताना त्याने कधीही माझी लाल दिव्याची गाडी वापरली नाही. आजही तो वेळीअवेळी दौ-यावर निघतो. हेलिकॉप्टरने जा, असं सांगितल्यानंतर त्याचं उत्तर एकच असतं, हेलिकॉप्टरने गेलं तर लोकांमध्ये दुरावा निर्माण होईल. त्यापेक्षा मी गाडीनेच जातो. त्याचा हा नम्रपणा पिता म्हणून मला भावतो,'.. उद्योगमंत्री राणे यांचे हे उद्गार सभागृहातल्या प्रत्येकाच्याच हृदयाला स्पर्शून गेले.
'आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या तो नेहमी पाया पडतो. मग विरोधी पक्षातील नेता असला तरी. विमानतळावर भर गर्दीतही निलेश पाया पडला, किती चांगले संस्कार केले आहेत तुम्ही, असं एखाद्या नेत्यानं सांगितलं की बरं वाटतं. समाधान वाटतं. आज निलेशने आपल्या कामाचा अहवाल तुमच्यासमोर ठेवलाय. मी गरिबीतून मेहनतीने वर आलो. निलेशही तशीच मेहेनत करतोय, हे पाहून माझ्यातल्या पित्याला खूप समाधान मिळतं'.. अतिशय ओघवत्या शैलीतले हे गहिवरले शब्द होते महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचे.. त्या नेत्यामधल्या पित्याचे..

Read More »
ठाण्याच्या महापौरांना कंत्राटदारांचे हित 'प्यारे'

ठाण्यातील महापौरांनी शुक्रवारी फक्त वागळे इस्टेट परिसरातील नाल्यांची पाहणी करून नालेसफाई समाधानकारक झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

ठाणे - मान्सून पूर्व पावसाने इंदिरानगर परिसरात तुंबलेल्या नाल्यामधील पाणी घरात शिरून शहरातील नालेसफाईचा पोलखोल केला होता. ही घटना ताजी असतानाच ठाण्यातील महापौरांनी शुक्रवारी फक्त वागळे इस्टेट परिसरातील नाल्यांची पाहणी करून नालेसफाई समाधानकारक झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे महापौर शहरातील नालेसफाईपेक्षा कंत्राटदारांचे हितच जोपासत असल्याचा सूर नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यात पडलेल्या मान्सून पूर्व पावसाने इंदिरानगर भागात हाहाकार उडवला. येथील नाल्याची सफाई समाधानकारक न झाल्याचा फटका परिसरातील २५ कुटुंबांना बसला. नाल्यातील गाळ व कचरा या कुटुंबांच्या घरात शिरून पूरस्थिती निर्माण झाली होती. याबाबत महासभेत विरोधकांनी लक्षवेधी मांडली होती. मात्र, प्रशासनाने या कुटुंबांना ५० हजारांची तुटपुंजी मदत देऊन फक्त मलमपट्टी केली.
महासभेत इंदिरानगरवासीयांचा प्रश्न गाजल्यानंतर शिवेसनेला जाग आली. शुक्रवारी महापौरांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, घनकचरा विभागाचे उपायुक्त अशोक कुमार रणखांब आणि अन्य अधिका-यांचा लवाजमा घेऊन वागळे प्रभाग समितीच्या क्षेत्रातील नाल्यांचा पाहणी दौरा केला.
दौ-यादरम्यान महापौरांना नाल्यांच्या शेजारी राहणा-या नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. इंदिरानगर परिसरात नालेसफाईची पाहणी करताना अनेक रहिवाशांनी या आगोदर पाहणी दौरा केला असता, तर आमचा संसार वाचला असता, अशा शब्दात प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. तरी, पाहणी दौ-यानंतर नालेसफाई समाधानकारक झाल्याचा निर्वाळा महापौरांनी दिला. तसेच चार दिवसांत नालेसफाईचे १०० टक्के काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.

Read More »
१६ जणांना तीन वर्षाचा कारावास

ठाणे महापालिका परिवहन सेवेतील ३० बसच्या बॉडी बांधणी भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन सात परिवहन सदस्यांसह १३ जणांना ठाणे सत्र न्यायालयाने तीन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
ठाणे – ठाणे महापालिका परिवहन सेवेतील ३० बसच्या बॉडी बांधणी भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन सात परिवहन सदस्यांसह १३ जणांना ठाणे सत्र न्यायालयाने तीन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये मनसेचे सुधाकर चव्हाण आणि शिवसेनेचे विलास सामंत यांचा समावेश आहे.
१९९२-९३ मध्ये ठाणे परिवहन सेवेत तत्कालीन सभापती शिवसेनेचे विलास सामंत यांच्या कारकीर्दीत ३० बसच्या बॉडी बांधणीसाठी ३० सप्टेंबर १९९१ ला परिवहन समिती सभेत ठराव करण्यात आला होता. या ठरावानुसार १५ जुलै १९९२ ला जाहिरात देण्यात आल्या. त्यानुसार भारती वर्कशॉप, स्टारलाइन बेळगाव-मुंबई, त्रिमूर्ती मोटर बॉडी, इन्कोच बिल्डर या कंपन्यांनी निविदा भरल्या. यात भारती वर्कशॉपने तीन लाख ४६ हजार ८४०, स्टारलाइन बेळगाव-मुंबईने चार लाख २४ हजार ७४२, त्रिमूर्तीने चार लाख ७१ हजार ५५५ आणि इन्कोचने चार लाख ८० हजार ६२९ रुपयांच्या निविदा भरल्या होत्या. या निविदा प्राप्त झाल्यानंतर बाजारमूल्य न तपासताच स्टारलाइन, त्रिमूर्ती आणि इन्कोच बिल्डर या कंपन्यांना हे काम देण्यात आले. यामध्ये परिवहन सेवेला ३२ लाखांचे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबत सत्ताधा-यांतील काही सदस्यांनी आवाज उठवल्याने तसेच वृत्तपत्रात बातम्या आल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परिवहन सेवेतील भ्रष्टाचार विरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये त्रिमूर्तीचे भागीदार सीताराम आंबेकर, इन्कोचचे भागीदार अशोक धिंगरानी आणि स्टाइलाइनचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चोप्रा यांना अटक करण्यात आली होती. या तिन्ही आरोपींना पोलिसी हिसका दाखवताच परिवहन समितीचे सभापती शिवसेनेचे विलास सामंत, मदन मंत्री, दीपक देशमुख, परिवहन सदस्य व सध्याचे मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण, काँग्रेसचे डॅनी डिसोझा, राष्ट्रवादीचे देवराम भोईर, काँग्रेसचे रामचंद्र ठाकूर, भाजपचे रामनयन यादव आणि रिपाइंचे गंगाराम इंदिसे या परिवहन सदस्यांचा या घोटाळ्यात समावेश असल्याचे लाचलुचपत विभागाच्या तपासात निष्पन्न झाले. निविदेमध्ये घोटाळा करण्यास तत्कालीन परिवहनचे अधिकारी अरविंद आगाशे, मुकुंद केळकर, परिवहन उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित आणि मधुसुदन आपटे यांनी मदत केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
या सर्व सोळा आरोपींविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे सत्र न्यायालयात १९९३ ला आरोपपत्र दाखल केले. तब्बल वीस वर्षानंतर शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश के. आर. वारीचर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान मृत पावलेले भाजपचे रामनयन यादव, रामचंद्र ठाकूर आणि परिवहन लेखापाल मधुसुदन आपटे या आरोपीं व्यक्तरिक्त उर्वरित १३ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षाची सक्तमजुरी व प्रत्येकी १५ हजार रुपयांची शिक्षा ठोठावली. या सर्व आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर लागलीच १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामीनावर जामीन देण्यात आलेला आहे.

Read More »
ठाण्यात औद्योगिक नगरीचा 'कोंडमारा'

वागळे इस्टेट येथे असलेली ठाणे महापालिकेची घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा आणि कचरा वाहून नेणा-या गाड्यांची दिवसभर सुरू असलेली ने-आण यामुळे परिसरातील कारखानदार व उद्योजक त्रस्त झाले आहेत.
ठाणे – वागळे इस्टेट येथे असलेली ठाणे महापालिकेची घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा आणि कचरा वाहून नेणा-या गाड्यांची दिवसभर सुरू असलेली ने-आण यामुळे परिसरातील कारखानदार व उद्योजक त्रस्त झाले आहेत. या बाबत अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे परिसरातील उद्योजक संतप्त झाले आहेत.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसर उद्योग नगरी म्हणून ओळखला जातो. हा परिसर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली येतो. येथे सातशेहून अधिक छोटे-मोठे कारखाने असून हजारो व्यक्तींना येथे रोजगार मिळत आहे. वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक २६ येथे ठाणे महापालिकेची घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व कचरा वर्गवारी करण्यासाठी आणला जातो. त्यानंतर वर्गीकरण केलेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर पाठवला जातो. दिवसभर ५०० टन कच-याचे वर्गीकरण येथे केले जाते. त्यासाठी दिवसभरात सुमारे १५० कच-याच्या गाड्यांची येथे वर्दळ सुरू असते. कच-याची ने-आण करण्याचे काम दिवस-रात्र चालू असते. कच-याच्या या गाड्या येथील कंपन्यांच्या प्रवेशद्वाराजवळ वाकड्यातिकड्या उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे कर्मचा-यांना तसेच इतर वाहनांना गैरसोय होते. या कच-यांच्या गाड्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कचरा कोंबला जातो. त्यामुळे हा कचरा रस्त्यावर इतरत्र पडून दुर्गंधी पसरते.
या संदर्भात अनेकदा वाहनचालकांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. रस्त्याच्या कडेला गाडय़ा उभ्या करून वाहनचालक कुठेही निघून जातात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीही होते. या त्रासाबाबत कारखानदारांनी अनेक वेळा महापालिकेला सूचना, निवेदन दिले. परंतु, ठाणे महापालिकेकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने कारखानदार संतप्त
झाले आहेत.
वागळे इस्टेट परिसरात कच-याच्या गाड्या थांबवल्या जातात, हे खरे आहे. तसेच कंपन्यांना होणा-या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे याबाबत वाहनचालकांना सक्त सूचना दिल्या जातील आणि आवश्यकता असल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. आर. पी. दांडेकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक
वागळे इस्टेट येथील कच-याच्या गाड्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाहनचालकांचीही दादागिरी वाढत चालली आहे. येथील दरुगधीमुळे कामगार आजारी पडत आहेत. – सूर्यकांत कदम , सहाय्यक व्यवस्थापक, अ‍ॅडव्ही केमिकल्स


Read More »
अन् महापौर नाल्यात उतरल्या!

केडीएमसीच्या महापौर कल्याणी पाटील यांनी   शनिवारी  चक्क नाल्यात उतरून किती गाळ काढला याची पाहणी केल्याने पालिका अधिका-यांसह कंत्राटदारही अचंबित झाले.
कल्याण – आठ महिने नाल्यांच्या सफाईकडे ढुंकूनही पाहायचे नाही आणि पावसाळा आला की, नालेसफाईची तयारी करायची. कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढायच्या आणि नालेसफाई झाली नाही अशी ओरड सुरू झाली की, पाहणी दौरा करायचा. हा सगळा प्रकार नित्याचाच झाला आहे. मात्र शनिवारी केडीएमसीच्या महापौर कल्याणी पाटील यांनी चक्क नाल्यात उतरून किती गाळ काढला याची पाहणी केल्याने पालिका अधिका-यांसह कंत्राटदारही अचंबित झाले. नाल्यात उतरून पाहणी करणा-या केडीएमसीच्या इतिहासातील या पहिल्याच महापौर ठरल्या आहेत.
महापालिका हद्दीत एकूण १३ मोठे नाले आहेत. मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी ९० लाख तर छोटय़ा नाल्यांसाठी ७० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. 'कल्याणात नालेसफाई गाळातच' अशा आशयाचे वृत्त शुक्रवारी 'प्रहार'मध्ये छायाचित्रासह प्रकाशित करण्यात आले होते. पावसाळा तोंडावर आला असतानाही नोलसफाई झाली नसल्याचे समोर आल्यानंतर शनिवारी महापौर नालेसफाईच्या पाहणीसाठी धावल्या.
डोंबिवलीतील केळकर रोड, घन:श्याम गुप्ते नाला, गांधीनगर ब्रिज नाला, गौरी शंकर नाला, खंबालपाडा नाला तर कल्याणातील लोकधारा, पुना लिकं रोड नाला, साईनगर ब्रिज नाला, खडेगोळवली एसटीपी नाल्यांची महापौरांनी महापालिका अधिका-यांस प्रत्यक्ष पाहणी केली. नाल्यांची साफ सफाई झाली नसल्याने कंत्राटदाराला जाब विचारण्यात आला. सदर नाल्यातून गाळ काढला नसल्याची बाब महापौरांनी कार्यकारी अभियंता रवींद्र जौरस यांच्या निदर्शनास आणून देऊन चार जूनपर्यंत नाला साफ करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर राहूल दामले, स्थायी समिती सभापती प्रकाश पेणकर, पालिका सचिव सुभाष भुजबळ आदी उपस्थित होते.


Read More »
कल्याणमधील नाल्यांमध्ये जैविक कचरा

जनावरांच्या कत्तलखान्यातील जैविक टाकाऊ कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे बंधनकारक असतानाही कल्याणातील बैलबाजार येथील कत्तलखान्यातील जनवरांचे अवयव परिसरातील नाल्यात टाकले जात असल्याचा प्रकार माजी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आणला.
कल्याण – जनावरांच्या कत्तलखान्यातील जैविक टाकाऊ कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे बंधनकारक असतानाही कल्याणातील बैलबाजार येथील कत्तलखान्यातील जनवरांचे अवयव परिसरातील नाल्यात टाकले जात असल्याचा प्रकार माजी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आणला. त्यांनी या बाबतची छायाचित्रे बैठकीत दाखवल्यामुळे खळबळ उडाली. जैविक कचरा उचलण्याचे काम करणा-या कंत्राटदाराकडून अधिका-यांना टक्केवारी मिळत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.
कल्याण पश्चिमेत आधारवाडी येथे कार्यरत असलेल्या दोन टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प देखभाल दुरुस्तीच्या कामाबाबत दोन वष्रे कालावधीसाठी 'मे अवनी एन्टरप्रायझेस' यांना ४१ लाख रुपये चार हजार रुपयांस देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी माजी सभापती शेट्टी यांनी कंत्राटदारांकडून कत्तलखान्यातील जैविक कचरा उचलला जात नसून तो नाल्यातच टाकला जात असल्याची माहिती समितीसमोर सादर करण्यात आली. सदस्यांच्या माहितीसाठी त्यांनी छायाचित्रही सादर केले. पालिकेकडून कंत्राटदाराला लाखो रुपये दिले जातात मात्र जैविक कचरा उचलला जात नसेल तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्न शेट्टी यांनी केला.
कंत्राटदार व अधिका-यांची या बाबत 'मिलीभगत' असून, पालिकेचे अधिकारी भंगारे हे कंत्राटदारासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आतापर्यंत या प्रकल्पावर किती खर्च करण्यात आला, याची माहितीही सदस्यांनी मागितली. मात्र ही माहितीही अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे देता आली नाही. २००९ पासून हा प्रकल्प कार्यरत आहे. आतापर्यंत पालिकेने ७५ लाख रुपये प्रकल्पावर खर्च केले आहेत. त्यापैकी एमएमआरडीकडून १५ लाख ९० हजार रुपये अनुदान मिळाले आहे, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र पुराणिक यांनी दिली. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीने सदस्यांचे समाधान झाले नाही. संपूर्ण माहितीसह सभेत या, असे सदस्यांनी सूचित करून हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला. पालिके तील खातेप्रमुखांनी सभेला येताना त्या विषयाच्या मािहतीसह हजर राहावे असे निर्देश सभापती प्रकाश पेणकर यांनी दिले.
कल्याण-डोंबिवलीत कच-याचे ढीग
गेल्या दोन महिन्यांपासून डोंबिवलीतील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे शहरातील कचरा कुंड्या भरल्या आहेत. हा कचरा रस्त्यावर पसरला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कचरा उचलला न गेल्यास रोगराई पसरून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडण्याची भिती सदस्य रणजीत जोशी यांनी व्यक्त केली. कल्याणातील 'ड' प्रभागातही कच-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. असे पिंगळे यांनी सांगितले. पालिकेच्या ' ह ' व ' ड ' प्रभागात कच-याचे खासगी कंत्राट 'अ‍ॅन्थेनी'कडे आहे. त्यामुळे अ‍ॅन्थेनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी सदस्यांनी केली. पाच डंपर भाडेतत्वावर घेण्यासंदर्भात चर्चा झाली मात्र अद्याप डंपर घेतले नसल्याबाबत प्रमोद पिंगळे यांनी नाराजी व्यक्त केली. अ‍ॅन्थोनी कंत्राटदाराच्या कंत्राटाबाबत उच्च न्यायालयात दावा प्रलंबित आहे. या बाबतची स्थगिती उठल्यानंतर पालिको कर्मचा-यांकडून साफसफाई करण्यात येईल. सदर प्रभागातील कचरा उचलण्यासाठी 'ड' व 'ह' प्रभागात प्रत्येकी चार डंपर भाडेतत्वावर घेण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त सुरेश पवार यांनी दिली.
पाणी शुद्धीकरणासाठी साडेतीन कोटींचे रसायन
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठ्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या रसायन खरेदीस शनिवारच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. महापालिकेची बारावे, मोहिली, टिटवाळा व नेतीवली जलशुद्धीकरण केंद्र आहे. लिक्विड अ‍ॅलम ग्रेड- तीन रसायनचा पुरवठा करण्यासाठी 'मे ठक्क र इनऑरगॅनिक्स प्रा.लि'. यांचा ३४ लाख रुपये खर्चाचा, जलशुद्धीकरण केंद्रातील जलकुंभाकरता ४२ लाख ९२ हजार २६० रुपयांची ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी 'मे रविराज केमिकल्स' यांचा तर 'लिक्विड क्लोरीन'साठी ७५ लाख २२ हजार २०० रुपयांचा 'मे आयडीयल के मिकल्स इ प्रा.लि', तसेच 'पॉलि अ‍ॅल्युमिना क्लोराईड'साठी एक कोटी १७ लाख ९० हजार रुपये खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीसाठी एक वर्षासाठी 'मे महाराष्ट्र इले.मेक.प्रा.लि'.यांचा दोन कोटी दोन लाख १२ हजार २२४ खर्चाच्या प्रस्तावही मंजूर करण्यात आला. टिटवाळा जलशुद्धीकरण प्रकल्प २००० मध्ये सुरू करण्यात आला आहे. मोहने येथून दररोज १४७ दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. मोहिली जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले असून, नेतीवली जलशुद्धीकरण केंद्राची सोमवारी चाचणी सुरू करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता तरूण जुनेजा यांनी सांगितले.
'कर्मचारी घरी बसून पगार घेतात'
हरी सोमा ठोंबरे हा पालिकेचा कर्मचारी गेल्या साडेचार वर्षापासून अनुपस्थित असल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. नोकरीवर परत घ्यावे असा अर्ज त्याने केला होता. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. मानवतेच्या दृष्टिकोनातून मूळ वेतनावर कामावर घ्यावे असे निर्देश सभापती प्रकाश पेणकर यांनी दिले. मनसेने त्याला नोकरीवर घेण्यास तीव्र विरोध दर्शवला. पालिकेचे अनेक कर्मचारी गैरहजर आहेत. घरी बसूनच ते पगार घेतात. गैरहजर राहून हजेरी शेडवर हजेरी लावल्या जात असल्याचा आरोप सदस्य प्रमोद पिंगळे यांनी केला.


Read More »
विक्रीकर कार्यालयातील दोन कर्मचा-यांचा संशयास्पद मृत्यू

मुंबईतील माझगाव येथील विक्रीकर कार्यालयात काम करणारे ओंकार भाऊ पष्टे  व दिपाली योगेश चव्हाण या कर्मचा-यांचे मृतदेह शनिवारी पहाटेच्या सुमारास कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आटगाव रेल्वे स्थानकानजीक आढळले.
कल्याण – मुंबईतील माझगाव येथील विक्रीकर कार्यालयात काम करणारे ओंकार भाऊ पष्टे (३०) व दिपाली योगेश चव्हाण (३०) या कर्मचा-यांचे मृतदेह शनिवारी पहाटेच्या सुमारास कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आटगाव रेल्वे स्थानकानजीक आढळले. ओंकार हे वासिंद येथे राहणारे होते तर दिपाली या डोंबिवलीत राहात होत्या. या दोघांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या झाली याबाबत रात्री उशीरापर्यंत कल्याण रेल्वे पोलिस माहिती घेत होते.
शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणा-या गितांजली एक्सप्रेस गाडीच्या चालकाला रेल्वे स्थानकाजवळ या दोघांचे मृतदेह आढळले. त्यांनी कल्याण पोलिसांनी माहिती दिली. दोघांकडे असलेल्या पॅनकार्डमुळे त्यांची ओळख पटली. दिपालीचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. हे दोघेही एकाच कार्यालयात काम करत होते. २९ तारखेला दिपाली कामावर गेल्या होत्या. मात्र, त्या दिवसांपासून त्या घरी परतल्या नव्हत्या. ओंकार,दिपालीकडे कसारा ते आसनगाव दरम्यानचे रेल्वे तिकिट पोलिसांना मिळाले आहे.

Read More »
झोपडपट्टयांतील रहिवाशांचा जीव टांगणीला

पावसाळा जवळ आला की संबंधित यंत्रणांना मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी जाग येते. याला म्हाडाचे झोपडपट्टी सुधार मंडळही अपवाद नाही.
मुंबई – पावसाळा जवळ आला की संबंधित यंत्रणांना मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी जाग येते. याला म्हाडाचे झोपडपट्टी सुधार मंडळही अपवाद नाही. या कामासाठी म्हाडाला प्रत्येकवर्षी निधी मंजूर होतो. मात्र, संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेळेत सुरू होत नाही. त्यामुळे धोकादायक स्थितीतील झोपड्यांमधील रहिवाशांना जीव टांगणीला लागला आहे. यापूर्वी उपनगरातील १०३ ठिकाणांपैकी ८२ ठिकाणांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. ती या पावसातही पूर्ण होण्याची शक्यता नाही. इतर ठिकाणीही हीच स्थिती आहे. निधी असतो मात्र सुस्तावलेल्या यंत्रणेला वेळेवर जाग येत नसल्याने हा निधी कागदावरच पडून राहत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
शहर व उपनगरातील डोंगरावरील व डोंगर उताराखाली असलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये संरक्षक भिंत बांधण्यासाठी सरकारकडून दरवर्षी निधी मिळतो. शहरातील १४ ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यापूर्वीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी राज्य सरकारकडून एक कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत निविदांसाठी जाहिरात देण्यात येणार आहे. जाहिरातींना प्रतिसाद देणा-या ठेकेदारांना ऑनलाइन निविदा भरता येणार आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. असे असताना भिंत बांधण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. शिवाय पावसात अशी कामे करणेही धोकादायक असल्याने भिंतीचे काम पावसानंतरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे एका अधिका-याने सांगितले.
Note: There is a poll embedded within this post, please visit the site to participate in this post's poll.
शहरातील डोंगरावर वसलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये पावसाळ्यात व इतरवेळी डोंगराचा नरम झालेला भाग खाली घसरून पडतो. काही वर्षापूर्वी कुर्ला येथील डोंगरावरील झोपडपट्टीत अपघात झाला होता. पावसात असे प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा संरक्षक भिंती बांधण्याचा प्रस्ताव असतो. पवई येथील 'आयआयटी' यांचा तांत्रिक सल्ला घेतला जातो. त्यानुसार नऊ मीटर उंचीपर्यंतच्या डोंगर भागात दगडी संरक्षक भिंत बांधणे तांत्रिकदृष्टया शक्य आहे. यात जागा व आवश्यक तेनुसार दोन ते नऊ मीटपर्यंतच्या भिंतीचे बांधकाम करण्यात येते.




Read More »
'मिठी'च्या पात्रातच अनधिकृत झोपड्या

२६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीची 'मगरमिठी' कमी करण्यासाठी पात्राचे रुंदीकरण करण्याकरता लगतची अनधिकृत बांधकामे हटवली जात आहेत.
मुंबई - २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीची 'मगरमिठी' कमी करण्यासाठी पात्राचे रुंदीकरण करण्याकरता लगतची अनधिकृत बांधकामे हटवली जात आहेत. मात्र, एकीकडे ही अनधिकृत बांधकामे हटवून पात्र कुटुंबांचे पुनर्वसन करताना प्रशासनाच्या दमछाक होत असताना धारावी पिवळ बंगला परिसरात मिठीच्या पात्रातच राजीव गांधी नगरमध्ये सुमारे ३० ते ४० झोपड्यांचे अनधिकृत बांधकाम झाले आहे. यामुळे मिठीच्या पात्राची रुंदी कमी झाली आहे. मात्र या झोपड्यांवर कारवाईबाबत महापालिका प्रशासन डोळेझाक करत आहे.
मुंबईतील १७.६ कि. मी. लांबीच्या मिठी नदीचे रुंदीकरण केले जात असताना धारावी येथील पिवळा बंगला परिसरातील राजीव गांधी नगरमध्ये मिठीच्या पात्रात तिवरांची झाडे तोडून त्यावर भराव टाकण्यात आला. तेथे झोपड्या बांधल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या झोपड्यांमुळे मिठीचे पात्र अरुंद झाले असून, याच्याच शेजारी हा भाग वगळून महापालिकेतर्फे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या अनधिकृत झोपड्यांकडे मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शनिवारी शहर भागातील नालेसफाईची पाहणी करताना या भागाचीही पाहणी केली. त्यानंतर नालेसफाईची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. मात्र या अनधिकृत बांधकामाबाबत शेवाळे यांनी कोणत्याही अधिका-याकडे विचारणा केली नाही.
मागील दीड ते दोन वर्षापूर्वीच या झोपड्या वसल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र ही जागा जिल्हाधिका-यांची असून, अनधिकृत झोपड्या तसेच बांधकामे तोडण्यासाठी त्यांना याची कल्पना दिली आहे. याबाबत येत्या दोन-चार दिवसांत कारवाई केली जाईल, अशी माहिती जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. ही अनधिकृत बांधकामे असल्यामुळे त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read More »
'मिठी'च्या रुंदीकरणासाठी २००९चा आराखडा वापरा

मिठी नदीच्या पात्राचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने नदी लगत असलेल्या झोपड्या आणि बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत.
मुंबई – मिठी नदीच्या पात्राचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने नदी लगत असलेल्या झोपड्या आणि बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, त्यासाठी महापालिकेने २००७च्या विकास आराखड्याऐवजी २००९ मध्ये बनवलेल्या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास ६० मीटपर्यंतच्या जागेतील केवळ ३० ते ४० झोपड्याच बाधित होणार आहेत. तसेच या कुटुंबीयांचे पुनर्वसन करून कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी केली आहे.
मिठी नदी पात्राच्या रुंदीकरणात अडसर ठरणा-या कुर्ला पश्चिम येथील किस्मतनगर येथील तब्बल ४५० झोपड्या तसेच बांधकामांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाधित कुटुंबांच्या समस्येबाबत तोडगा काढण्याचे निर्देश वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान आणि आमदार कृपाशंकर सिंह यांनी विरोधी पक्षनेते निकम यांना दिले होते. त्यानुसार निकम यांनी अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांच्यासोबत नुकतीच एक बैठक महापालिका मुख्यालयात घेतली.
२००७च्या मिठी नदी विकास आराखड्यानुसार १०० मीटपर्यंतची जागा बाधित होणार आहे. त्यात सुमारे ४५० झोपड्या व बांधकामांवर कारवाई करावी लागणार आहे. या ऐवजी महापालिकेनेच २००९ मध्ये बनवलेल्या मिठी नदीचा नव्या आराखड्याची अंमलबजावणी करावी. या आराखड्यानुसार ६० मीटर जागेवरील केवळ ३० ते ४० झोपड्याच बाधित होणार असल्याची बाब निकम यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या सूचनेला अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकम यांनी सांगितले. या बैठकीला माजी नगरसेवक मंसूर अन्सारी उपस्थित होते.


Read More »
बंगळूरुसाठी एसटीची वातानुकूलित 'शिवनेरी'

प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून राज्य परिवहन मंडळातर्फे बुधवारपासून मुंबई ते बंगळूरु मार्गावर वातानुकूलित 'शिवनेरी' स्लिपर बस सुरू केली जाणार आहे.
मुंबई – प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून राज्य परिवहन मंडळातर्फे बुधवारपासून मुंबई ते बंगळूरु मार्गावर वातानुकूलित 'शिवनेरी' स्लिपर बस सुरू केली जाणार आहे.
ही बस मुंबई सेंट्रलहून दुपारी एक वाजता सुटणार असून, पुणे (स्वारगेट), सातारा, कराड बायपास, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड, हवेरी, चित्रदुर्ग, टुमकुर असा १,०१६ कि. मी. चा मार्ग पार करून दुस-या दिवशी सकाळी सात वाजता बंगळूरु येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी बंगळूरु येथून ही बस सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुस-या दिवशी सकाळी १०.३० वाजता मुंबईत पोहोचेल. मुंबई सेंट्रल ते बंगलोर या बस चे तिकीट प्रौढांसाठी २,१८० रुपये असेल. या वातानुकूलित बसमुळे पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, बंगलोर परिसरातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यरत असणा-या प्रवाशांना विशेष लाभ होणार आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर या बसचे ऑनलाइन आरक्षण उपलब्ध असेल, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली.

Read More »
गावठाणांतील नागरिकांना मिळणार नळजोडणी

मुंबईतील गावठाणांमधील रहिवाशांची अनेक वर्षापासूनची मागणी महापालिका प्रशासनाने मान्य केली असून, गावठाणांमधील लोकांना यापुढे नळजोडणी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
मुंबई - मुंबईतील गावठाणांमधील रहिवाशांची अनेक वर्षापासूनची मागणी महापालिका प्रशासनाने मान्य केली असून, गावठाणांमधील लोकांना यापुढे नळजोडणी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. गावठाणांमधील रहिवाशांना एप्रिल १९६४ पर्यंतच पुरावे सादर केले, तरच पाण्यासाठी जोडणी दिली जाते. मात्र ही अट शिथिल करण्यात आली असून, आता १९९५ पूर्वीचे पुरावे द्यावे लागणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली. त्यामुळे या निर्णयाचा फायदा कोळीवाड्यातील रहिवाशांना मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वरळी, खार, वांद्रे, मालाड, कांदिवली, बोरिवली, ट्राँबे, मुलुंड, भांडुप आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठाणे असून, या गावठाण क्षेत्रात १७ एप्रिल १९६४ नंतर बांधकामास नळजोडणी देण्यात येत नव्हती. त्यामुळे गावठाणांमधील रहिवाशांची तसेच त्याभागात प्रतिनिधित्व करत असलेल्या नगरसेवकांकडून नळजोडणी देण्याची मागणी वारंवार केली जात होती. गावठाणांमध्ये १९६४ पूर्वीच्या पुराव्यांआधारे जलजोडण्या देण्यात आल्यामुळे या भागांतील वाढीव बांधकामे व तेथील वाढलेली लोकसंख्या यांना अपुरा पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे येथील रहिवाशी विहिरीतून अथवा टँकरचे किंवा ज्यांच्याकडे नळजोडणी आहे त्यांच्याकडून पाणी विकत घेत गरज भागवत होते. त्यामुळे येथील रहिवाशांकडून झोपडपट्टयांसाठी पात्र असलेल्या एक जानेवारी १९९५ च्या धर्तीवर गावठाणांमधील रहिवाशांचे पुरावे घेत जलजोडणी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.
त्यामुळे झोपडपट्टय़ांना ज्याप्रमाणे १९९५ पूर्वी अस्तित्वात असलेल्या झोपडय़ांना नळजोडणी देण्यात येते, त्याच धर्तीवर गावठाण भागातील बांधकामांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाण्यासाठी नळजोडणी देण्याचा निर्णय घेतला महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला आहे. मात्र, ही परवानगी देताना या भागातील बांधकामावर महापालिकेच्या अधिनियमांनुसार कारवाई करण्यास मुभा असेल, यासापेक्ष हा निर्णय असणार असेही त्यांनी स्पष्ट केले. या नव्या नळजोडणींना एक हजार लिटर पाण्यामागे सव्वातीन रुपये एवढा दर आकारला जाणार असून, माणसी ९० लिटर पाणी दररोज दिले जाईल, असेही कुंटे यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबतचा प्रस्तावच आयुक्तांनी स्थायी समितीपुढे सादर केला आहे. समितीची मान्यता मिळाल्यानंतर गावठाणांमधील पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. एरव्ही प्रत्येक अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांची तरतूद करूनही त्याचा योग्य वापर केला जात नसल्यामुळे किमान या नळजोडणीच्या निर्णयामुळे गावठाणांमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


Read More »
चौकशीविना प्रमाणपत्रांचे वितरण

कोणतीही चौकशी न करता किंवा ठोस कारण नमूद न करता जात प्रमाणपत्रांचे वितरण केले जात असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला धारेवर धरले.
मुंबई - कोणतीही चौकशी न करता किंवा ठोस कारण नमूद न करता जात प्रमाणपत्रांचे वितरण केले जात असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला धारेवर धरले. समितीच्या या बेजबाबदारपणामुळे खरोखर आरक्षित वर्गात मोडणा-यांचा तोटा होत असल्याचे मतही न्यायालयाने या वेळी नोंदवले. ज्योत्स्ना परमार यांना १९ जानेवारी २०११ रोजी देण्यात आलेल्या जातीच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेत सुमन कदार यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना न्या. अभय ओक व ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने समितीच्या निर्ढावलेल्या कारभारावर ताशेरे ओढले.
महापालिकेच्या २०११-२०१२ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट जात प्रमाणपत्राची अनेक प्रकरणे समोर आली होती. काही प्रकरणांत खुद्द राज्य सरकारनेच आव्हान दिल्याचे खंडपीठाने सांगितले. समितीच्या अशा कारभाराचा खरोखर आरक्षित वर्गात येणाऱ्यांचा फटका बसत असल्याचे परखड मतही न्यायालयाने नोंदवले.
याप्रकरणी न्यायालयाने महाधिवक्ता डेरियस खांबाटा यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची हमी दिली. तसेच जात प्रमाणपत्र देताना ज्या प्रकरणांत कोणतीही चौकशी करण्यात आली नाही किंवा ठोस कारण नमूद करण्यात आलेले नाही,अशा प्रकरणांचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले. त्याचप्रमाणेज्योत्स्ना परमार यांच्या जात प्रमाणपत्राबाबत समितीने नव्याने निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने सांगितले.


Read More »
प. रे.च्या गाड्यांमध्ये 'बायो टॉयलेट'

मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये 'बायो टॉयलेट' संकल्पना साकारली जाणार आहे.
मुंबई – मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये 'बायो टॉयलेट' संकल्पना साकारली जाणार आहे. यामुळे रेल्वे स्थानक आणि लोहमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होईल. पश्चिम रेल्वेवरील दुरोन्तो, स्वराज, गोल्डन टेंपल आणि जम्मू-तावी एक्स्प्रेस या सारख्या गाडय़ांमध्ये ही शौचालये असणार आहेत.
मध्य रेल्वेने सर्वात प्रथम महानगरी एक्स्प्रेसमध्ये 'बायो टॉयलेट' ही संकल्पना साकारली आहे. या शौचालयामुळे मैला थेट रेल्वे रूळांवर पडत नाही. तसेच रसायनांच्या माध्यमातून तो परस्पर नष्ट केला जातो. त्यामुळे प्रदूषण टाळून स्वच्छता राखण्यास मदत होते. महानगरी एक्स्प्रेसमध्ये ही संकल्पना यशस्वी ठरल्यानंतर आता ती पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये राबवण्यात येणार आहे. 'डिफेन्स रिसर्च डिझायनर्स ऑर्गनायझर्स'ने ही शौचालये तयार केली असून, सध्या ती गाडय़ांमध्ये बसवण्याचे काम लोअर परळ कारखान्यात सुरू असल्याचे माहीतगारांनी सांगितले.


Read More »
महिला पोलिसाचा जाच,तरुणाची आत्महत्या

महिला पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून एका २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


संग्रहित छायाचित्र नाशिक – महिला पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून एका २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाला माझ्याशी लग्न कर किंवा तीन लाख रुपये खंडणी दे अशा प्रकारची मागणी या महिला पोलिस अधिका-याने केली होती.
दिपक सावकार बर्वे (२५) असं या तरुणाचे नाव असून नाशिकमधील भोरटेंभे गावात राहत होता. दिपकचे रविवारी त्याचे लग्न होणार होते. मात्र त्यापूर्वीच शिळापूरजवळील धावत्या गाडीखाली जीव दिला. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयातील मनिषा कुंजूरे हीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दिपकच्या वडिलांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून आत्तापर्यंत मनिषा कुंजूरे हिच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Read More »
हेडलीला'तात्पुरतं'भारताच्या स्वाधीन कराव

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला वर्षभरासाठी भारताच्या ताब्यात देण्यात द्यावे.
नवी दिल्ली – मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला वर्षभरासाठी भारताच्या ताब्यात देण्यात द्यावे. त्याशिवाय तहुव्वीर राणाचे प्रत्यार्पण करण्यात यावे जेणेकरुन मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अधिक नवे खुलासे हाती लागतील, अशी विनंती भारताने अमेरिकन सरकारला केली आहे.
भारत अमेरिका यांच्यात २० ते २२ मे दरम्यान झालेल्या सुरक्षा परिषदेमध्ये हेडलीला वर्षभरासाठी भारताच्या स्वाधीन करावे अशी विनंती सरकारने अमेरिकेला केली आहे. मात्र अमेरिकेने हेडलीच्या प्रत्यार्पणासंदर्भात अक्षमता दाखवली.
लष्कर ए तैयब्बाचा दहशतवादी हेडलीचा मित्र राणा याच्या प्रत्यार्पणासंदर्भात मात्र अमेरिकेने भारताला आश्वासन दिल आहे. राणाने मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात मदत केली होती.
भारताच्या या विनंतीवर अमेरिकन सरकारने दुस-यांदा हेडलीच्या चौकशीची मागणी मान्य केली आहे.मात्र डेन्मार्क वृत्तपत्राच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या राणाशी आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या चौकशीची परवानगी भारताला देण्यात आलेली नाही. त्यामुळे राणाच्या चौकशीची विनंती मान्य झाल्यास २६/११ च्या हल्ल्यासंदर्भातील अनेक महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

Read More »
श्रीनिवासन राजीनामा देणार ?

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासंर्दभात निर्णय घेण्यासाठी कार्यकारिणीची बैठक सुरु झाली आहे.
चेन्नई- स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासंर्दभात निर्णय घेण्यासाठी कार्यकारिणीची बैठक सुरु झाली आहे. मात्र या बैठकीपूर्वी श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या काही महत्वाच्या अधिका-यांशी चर्चा केली.
श्रीनिवासन यांनी अशा प्रकारे अधिका-यांशी केलेल्या चर्चेत कोणतेही गैर नसल्याचे, बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. मात्र क्रिकेटच्या विश्वासअर्हतेच्या दृष्टीने श्रीनिवासन यांनी राजीनामा देणेच उचित ठरेल असेही ठाकूर यांनी सांगितले.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये नाव आल्यामुळे बीसीसीआचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. त्यातच बीसीसीआयचे राजीव शुक्ला, अजय शिर्के आणि संजय जगदाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रविवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आली. दरम्यान, राजीनामा देण्यासाठी श्रीनिवासन यांनी तीन अटी ठेवल्या आहेत.


Read More »
बूकी परेश भाटियाच्या कोठडीत वाढ

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला बूकी परेश भाटियाच्या पोलिस कोठडीत सहा जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला बूकी परेश भाटियाच्या पोलिस कोठडीत सहा जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.स्थानिक न्यायालयाने रविवारी हा निर्णय दिला.
बेटिंग प्रकरणात परेशला गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी अटक केली होती. त्याआधी परेशची गेल्या आठवड्यात गोवा पोलिसांनी जामिनावर सुटका केली होती.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मय्यपन आणि विंदू यांच्यातील धागेदोरे उलघडण्यासाठी परेश भाटियाची अधिक चौकशी करण्यासाठी त्याच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी विनंती गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला केली होती. परेश भाटिया हा मय्यपन आणि विंदू यांच्यातील दुवा म्हणून काम करत होता. विंदू आणि परेश यांच्यातील संभाषणाची प्रतही पोलिसांच्या हाती लागली आहे. बेटिंगचे मिळालेले पैसे इतर बूकींना वाटण्याचे काम तो करत होता असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने पोलिसांची ही मागणी मान्य करत परेशच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे.
दरम्यान, परेश भाटियाला गेल्या आठवड्यात गोवा पोलिसांनी अटक केली होती.त्याच्याकडून ४६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.


Read More »
'मिस मॉस्को'चा आनंद

मॉस्को येथे रविवारी झालेल्या ‘मिस मॉस्को ब्यूटी कॉन्टेस्ट’मध्ये ‘मिस मॉस्को’ हा किताब डारीया यूलॅनोव्हा हिने पटकावला.


Read More »
आधार सावलीचा…

पश्चिम बंगालमधील हावडा लोकसभेसाठी रविवारी झालेल्या पोटनिवडणूकीत मतदान करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी सावलीचा आधार घेतला..


Read More »
मिस्टर अँड मिसेस बच्चन..

लंडनमधील एका कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांनी उपस्थितांशी संवाद साधला..


Read More »
पुन्हा एकदा 'परिवर्तन'

काँग्रेसच्या  परिवर्तन यात्रेवर झालेल्या हल्ल्याच्याच ठिकाणाहूनच पुन्हा एकदा परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे.
छत्तीसगड – गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी दर्भा गती खो-यात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केला होता. आता याच ठिकाणाहून पुन्हा एकदा परिवर्तन यात्रा काढण्याचा निर्धार छत्तीसगड काँग्रेसने व्यक्त केला आहे.
आम्ही याच ठिकाणाहून पुन्हा एकदा परिवर्तन यात्रा काढण्याचे ठरविले आहे. यात्रेची तारीख पक्षश्रेष्ठी घेतील असा निर्धार छत्तीसगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के.हरिप्रसाद यांनी व्यक्त केला.
नक्षलवाद्यांनी २५ मे रोजी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता.त्यात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा यांच्यासहित २७ जणांचा मृत्यू झाला. तर व्ही.सी.शुक्ला यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर गुडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या सहा जूनला काँग्रेसच्या सर्व जिल्हास्तरीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. तर सात जूनला सर्व जिल्हास्तरीय मुख्यालय बंद ठेवण्यासाठी बैठक होणार आहे.


काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवादी हल्ला


छत्तीसगडमधील कॉँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर शनिवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला.  या हल्ल्यात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा यांचा मृत्यू झाला.
दुर्गा मातेची 'परदेशवारी'…

लॉस एन्जलिसला दुर्गापुजेसाठी निघालेल्या या मुर्तींवर शेवटचा हात फिरवताना भारतीय मुर्तीकार…


Read More »
रंगीबेरंगी सफर…

केरळमध्ये पावसाचे आगमन झाले असून कोचीत ठेवणीतले रंगीबेरंगी रेनकोट आता रस्त्यावर दिसू लागले आहेत..


Read More »
प्रितीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

अ‍ॅसिड हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी प्रिती राठोड हिच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई- वांद्रे रेल्वे स्थानकात अ‍ॅसिड हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी प्रिती राठोड हिच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. प्रिती राठोडचे शनिवारी मुंबई रुग्णालयात निधन झाले.
मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीवर रुजू होण्यासाठी प्रिती राठोड दोन मे रोजी वांद्रे रेल्वे स्थानकात उतरली होती. तेव्हा अज्ञात व्यक्तीने तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले होते. त्यात ती गंभीर भाजली होती. भायखळा येथील मसिना रुग्णालयात तिच्यावर उपचार होते. मात्र तिची प्रकृती अधिक खालावल्यानंतर तिला मुंबई रुग्णालयात हालविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. मुख्यमंत्र्यांनी रविवारी तिच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.


अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी प्रीती राठीचे निधन


वांद्रे येथे झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीचे शनिवारी दुपारी निधन झाले.
सायबर हॅकिंगमुळे अमेरिका व चीनमध्ये वाढला ताण

सायबर हॅकिंगच्या  आरोपामुळे काही दिवसांपुर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची रविवारी तणावपूर्ण भेट होण्याची शक्यता होती.
वॉशिंग्टन -  सायबर क्राईमच्या आरोपामुळे काही दिवसांपुर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची रविवारी तणावपूर्ण भेट होण्याची शक्यता होती.येत्या शुक्रवारी बराक ओबामा आणि शी यांची दक्षिण केलेफोर्निया येथे कृत्रिम वातावरणात भेट होणार आहे. मात्र दोन्ही देशामधील अघोषित सायबर गुन्हाच्या पाश्वभूमीवर भेटीच्या यशस्वी बद्दल शंका व्यक्त केली आहे.
शी यांचे पूर्वसुरी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ हे स्वत:च्या कठोर व कृत्रिम स्वभावाबद्दल प्रसिद्ध असल्याने कोणत्याही राष्ट्रप्रमुखाचा त्यांच्यबरोबर वैयक्तिक स्नेह निर्माण होऊ शकला नाही. हु यांच्यानंतर चीन व अमेरिकेचे संबंध सौहार्दपूर्ण व्हावेत या हेतूने ओबामा यांच्याबरोबर शी यांची ही भेट आयोजित करण्यात आली आहे. मात्र, वाढत्या चिनी हॅकींगसंदर्भात ओबामा यांनी कठोर भूमिका घेतल्यास या भेटीचे फारसे प्रयोजनच राहणार नसल्याचे, चिनी सामरिक तज्ज्ञांचे मत आहे. त्याबरोबरच, चीनच्या चारी बाजूंने अमेरिका स्वत:चे प्रभावक्षेत्र वाढवित असल्याचा चीनचा आरोप आहे.
“अमेरिकेच्या सायबर क्षेत्रामधील वाढत्या चिंतेविषयी शी यांच्याशी थेट व रोखठोक चर्चा करण्याचा ओबामा यांचा मानस आहे. चीनमधून सतत होणाऱ्या सायबर हॅकींगमुळे अमेरिकन कंपन्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हा विषय शी यांच्याशी बोलताना ओबामा कचरणार नाहीत,” असे एका वरिष्ठ अधिकायाने सांगितले. अमेरिकेच्या महत्त्वाच्या शस्त्रप्रणालीसंदर्भातील ब्ल्यू प्रिंट्‌स चिनी हॅकर्सनी चोरल्याचा आरोप अमेरिकेने नुकताच केला आहे. या पार्श्‍वभूमीवर ओबामा व शी यांची भेट तणावपूर्ण ठरण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.

Read More »
शीला दीक्षित विरुद्ध केजरीवाल लढणार

दिल्ली विधानसभेच्या नोव्हेंबर महिन्यात होणा-या निवडणुकीत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मतदारसंघातूनच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या नोव्हेंबर महिन्यात होणा-या निवडणुकीत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मतदारसंघातूनच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी स्पष्ट केले.
या निवडणुकीत आपण थेट दीक्षित यांनाच आव्हान देणार असून, त्या ज्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरतील, तिथूनच आपणही निवडणूक लढवणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

Read More »
 बातम्या- दोन जून २०१३
नमस्कार  बातम्यांमध्ये आपल स्वागत..
» नक्षलवादी हल्ल्यांच्या ठिकाणावरूनच परिवर्तन यात्रेचा पुनरारंभ करणार- काँग्रेसचं धाडसी पाऊल
» मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरुद्ध केजरीवाल निवडणूक लढवणार
» राजीव गांधी जीवनदायी योजनेकरिता सामाजिक संस्थांची मदत घेणार
» प्रिती राठीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाखांची मदत
» बीसीसीआयच्या हंगामी अध्यक्षपदी जगमोहन दालमिया यांची निवड
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा…  02062013

Read More »
आता सामाजिक संस्थेच्या मदतीने 'कार्ड वाटप'

राज्य सरकारतर्फे सुरू असलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या लाभार्थीना कार्ड वाटपाकरिता आता सामाजिक संस्थाची मदत घेतली जाणार आहे.

मुंबई- राज्य सरकारतर्फे सुरू असलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या लाभार्थीना कार्ड वाटपाकरिता आता सामाजिक संस्थाची मदत घेतली जाणार आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने कार्ड वाटणे सोपे पडणार असल्याचे योजनेचे राज्य समन्वयक डॉ. मुकेश मोहाडे यांनी सांगितले. सध्या ही योजना आठ जिल्हयात सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे.

दारिद्र रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील रुग्णांकरिता राज्यातील आठ जिल्हयात राजीव गांधी जीवनदायी योजना राबवली जात आहे. या योजनेत तब्बल ९७२ शस्त्रक्रिया, औषधोपचारासह १२१ फेर तपासण्यांचा लाभ रुग्णांना घेता येतो. गेल्या वर्षी दोन जुलै रोजी ही योजना आठ जिल्हयात सुरू झाली आहे. या योजनेतील लाभार्थीना कार्ड वाटण्याचे काम पूर्वी शिक्षकांना देण्यात आले होते. शिक्षकांनी विरोध केल्यावर हे काम अंगणवाडी सेविकांना दिले गेले. मात्र त्यांच्याकडून कार्ड वाटपाबाबत फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ही जबाबदारी सामाजिक संस्थांकडे दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थीना मदत मिळण्यास हातभार लागेल.
Note: There is a poll embedded within this post, please visit the site to participate in this post's poll.
आतापर्यंत राज्य सरकारने या योजनेत १७७ कोटी रुपये खर्च केले आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात ही योजना राबवली जाणार असल्याचे डॉ. मोहाडे यांनी सांगितले. राजीव गांधी जीवनदायी योजनेत आतापर्यंत २२० आरोग्य शिबिरे झाली आहेत. त्याच प्रमाणे ६४,९६५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यापैकी १४,४८५ हदयरोगाच्या, ११,६७० कर्करोगाच्या, मुत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया आणि डायलिसिस ११,०३८, लहान मुलांच्या २,४८३, इतके शस्त्रक्रिया/उपचारांची नोंद आहे. जर मुंबईचा विचार केला असता, मुंबईत सर्वाधिक मुत्रपिंड/डायलिसिसचे ८,३१५, हदयाच्या ७,९९७, कर्करोगाच्या ४,२९२ अशा मिळून २९,९४२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
कॉलसेंटरला चांगला प्रतिसाद
राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माहितीकरिता १८००-२३३-२२०० या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनला महिन्याला ४० हजार फोन येत असतात. हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
पत्राद्वारे जाणून घेतात मते
उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सही असलेले पत्र पाठवले जाते. त्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्या रुग्णाला निरोगी आरोग्य लाभो, पुढील वाटचालीस शुभेच्छा देतात. तसेच काही प्रश्नही विचारले जातात, त्यात उपचारास दिंरगाई झाली का, आरोग्यमित्रांनी पैसे मागतिले का, असे प्रश्न असतात. ते पत्र योजनेच्या कार्यालयात पाठवण्याची निशुल्क सोयही करण्यात आली आहे.

Read More »
आल्या पाऊसधारा!

विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात  पावसाने रविवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे  आणि रायगडमध्ये जोरदार सलामी दिली.

मुंबई- 'येणार येणार..' म्हणून बातम्यांचा विषय झालेल्या पावसाने रविवारी संध्याकाळी 'आलो, आलो.' म्हणत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात कुर्ला, शीव, माटुंगा, मुलुंड, अंधेरी, कांदिवलीसह मुंबईची काही उपनगरे आणि ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे जोरदार सलामी दिली. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भरून आलेल्या आभाळानेच मुंबईकरांना पाऊसथेंबांची हुरहूर लावली होती. पावसानेही त्यांची निराशा न करता तास-दीड तास मनमुराद पाऊसधारांचा वर्षाव करत लहानथोरांना चिंब करून टाकले. चिपळूण, पुणे, कोल्हापूर पट्टय़ातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
पश्चिम उपनगरात कांदिवली आणि नालासोपारा येथे जोरदार पाऊस झाला. तर मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण मध्येही तुफान कोसळणा-या पाऊसधारांनी परिसर थंडगार करून टाकला. उन्हाने कावलेल्या मुंबईकरांना या गारव्याने काही अंशी दिलासा मिळाला. नेहमीप्रमाणे पहिल्याच पावसात विस्कळीत होण्याचा वसा मध्य रेल्वेने कायम राखला. रात्री साडेआठपर्यंत १.२ मिमि पाऊस कोसळल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले.
या पहिल्याच पावसाने मध्य रेल्वेला मात्र थोडा धक्का दिला. ठाण्यापुढे पावसाने जोरदार वा-यांसह धिंगाणा घातल्यामुळे गाडय़ा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.
ठाणे, रायगडात सर आली धावून
रखरखीत उन्ह तर कधी सावल्यांचा खेळ खेळून मी येतोय, अशी वर्दी देणा-या वरुणराजाने रविवारी सुट्टीचा दिवस हेरून ठाणे, रायगड जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार हजेरी लावली. त्यामुळे घामाच्या धारांनी चिंब भिजणा-या शहर व ग्रामीणवासीयांना सुखद धक्का मिळाला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, वाडा, वसई, विरार नालासोपारा भागात अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. ठाणे शहर परिसरात विजांचा लखलखाट आणि ढगांच्या कडकडाटासह दाखल झालेल्या पावसाने रविवारी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्यांची पळापळ झाली. पावसापासून बचावासाठी छत्रीची तजवीज नसल्याने आडोसा शोधण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर तर रिक्षा पकडण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. वाडा तालुक्यातही जवळपास दोन तास धारानृत्य सुरू असल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.
महाड, कर्जतमध्येही दमदार हजेरी
जोरदार वारे व विजांच्या कडकडाटासह महाड, माणगाव, गोरेगाव तसेच कर्जत तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. महाडच्या बिरवाडी एमआयडीसी भागात शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे बराच काळ विजेचा लपंडाव सुरू होता. ग्रामीण भागातही (छत) पागोळय़ा गळेपर्यंत पाऊस पडल्याने फाटीतुटका (जळण) तसेच गुरांसाठी वैरणीची सोय करणा-या शेतक-यांची त्रेधा उडाली. रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीच्या कामाने वेग घेतला आहे. माथेरानमध्ये विवाह सोहळा सुरू असतानाच अचानक पावसाने हजेरी लावल्याने वऱ्हाडीमंडळींची लगीनघाई झाली. पोलादपूर शहर व ग्रामीण भागातही बराच काळ धारानृत्य सुरू होते. पनवेल, खालापूर भागात पंधरा मिनिटांहून अधिक काळ पावसाच्या सरी कोसळल्या.
रोह्यात बत्तीगुल
रोहा तालुक्यात जोरदार वारे आणि विजांच्या लखलखाटासह सडकून मारा करणा-या पावसाने अनेक भागातील विद्युत्पुरवठा खंडित झाला. सायंकाळी सातच्या सुमारास आलेल्या पावसाच्या सरीने अनेक भागात पाणीच पाणी चोहीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रोह्यातील अनेक भागांत पाऊसधार सुरूच राहिल्याने बहुतांश भागात बत्तीगुल होती. नागोठण्यातही पंधरा मिनिटांहून अधिक काळ धारानृत्य सुरू होते.

Read More »
राशिभविष्य- तीन जून २०१३

दैनंदिन राशिभविष्य…

मेष :  परिसरात आदरणीय ठराल.



वृषभ :  तुमचे मार्ग सचोटीचे असतील.
मिथुन :  मुक्तकंठाने तुमची स्तुती होईल.
कर्क : नवी दिशा मिळेल.
सिंह :  उद्योग जगतात पाय रोवून उभे राहाल.

कन्या :  पित्याचा सन्मान होईल.
तूळ :  विदेशात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न कराल.
वृश्चिक : मौलिक भेटवस्तू प्राप्त होतील.
धनू :  विरोधक नियंत्रणात असतील.
मकर :  नोकरीतील कामातून आनंद मिळेल.

कुंभ : कलेचे सादरीकरण कराल.
मीन :  कुटुंबात आनंदी, सात्त्विक वातावरण राहील.


Read More »
प्रेक्षणीय स्थळे 'नो स्मोकिंग झोन' करावीत

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे 'नो स्मोकिंग झोन' म्हणून जाहीर करावीत.
मुंबई  - जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे 'नो स्मोकिंग झोन' म्हणून जाहीर करावीत. तेथे 'नो स्मोकिंग झोन'चे फलक लावावेत. आणि याची सुरुवात जागतिक दर्जाचे प्रेक्षणीय स्थळ असलेले 'गेट वे ऑफ इंडिया' पासून करावी. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया येथे जनतेच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
या सह्यांचे निवेदन मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुनील प्रभू, महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे व आरोग्य समिती अध्यक्ष गीता गवळी यांना देण्यात आले.
या वेळी 'मी आहे हुक्का, मी अनेकांना केलंय लुख्खा, 'माझे नाव गुटखा मी घातलाय समाजाला व युवापिढीला व्यसनांचा विळखा' असे व्यसनविरोधी संदेश देणारे मोठे फलक पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते. व्यसन केल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम मानवी सापळ्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले. तर व्यसनविरोधी पत्रकेही वाटण्यात आली.
जनतेला नशेच्या दुष्परिणापासून दूर करण्याचे काम नशाबंदी मंडळ करत आहे. हे काम धाडसाचे आहे, असे कुलाबा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावंत म्हणाले.
या वेळी व्यसनमुक्ती संदेशाच्या भव्य फलकाचे उद्घाटन मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला.

Read More »
भिवंडीला पुराचा धोका कायम

निजामपूर शहर महानगरपालिकेतील सत्ताधा-यांचा गलथान कारभार आणि त्यांना विरोध करण्यासाठी असक्षम ठरलेल्या विरोधकांमुळे महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे.
भिवंडी -  निजामपूर शहर महानगरपालिकेतील सत्ताधा-यांचा गलथान कारभार आणि त्यांना विरोध करण्यासाठी असक्षम ठरलेल्या विरोधकांमुळे महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. कंत्राटदारांच्या थकबाकीमुळे नालेसफाई वेळेवर व योग्यरीत्या होत नसल्याने शहरवासीयांना पावसाळय़ात पुराचा सामना करावा लागणार आहे. मात्र, या गंभीर गोष्टीकडे नगरविकास खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने आणखी किती समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
महानगरपालिकेवर सुमारे ३५० कोटींचे कर्ज आहे. यामध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेची थकीत बिले आहेत. यात प्रभाग समिती क्रमांक एक मधील २०११ ते २०१२ मध्ये नालेसफाईची थकबाकी २४ लाख ९१ हजार २०२ रुपये (कुणाल इंटरप्राईजेस), २०१२- २०१३ मध्ये नालेसफाईची थकबाकी ३८ लाख ५२ हजार ८७५ रुपये (आकार कन्ट्रक्शन), प्रभाग समिती क्रमांक २ मधील २०१२ ते २०१३ मध्ये नालेसफाईची थकबाकी २४ लाख ९७ हजार ९०६ रुपये (बुबेरे असोसिएट्स), प्रभाग समिती क्रमांक पाच मधील २०१२ ते २०१३ मध्ये नालेसफाईची थकबाकी २४ लाख ६५ हजार ७७४ रुपये (आकार कन्ट्रक्शन) अशी थकबाकी आहे, असे असतानाही या वर्षी महापालिकेने मोठा गाजावाजा करत नालेसफाईचे काम हाती घेतले. मात्र, नालेसफाईचे काम करूनही कामाचे पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नसल्याने कर्जबाजारी झालेल्या कंत्राटदारांनी अनुभव असतानाही यंदा काम हाती घेतले नाही. तर, महापालिकेतील अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील काही कंत्राटदारांनी काही ठिकाणी नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.
प्रभाग समिती क्रमांक एक व दोन मधील नालेसफाईचे तीन कंत्राट आकार कन्ट्रक्शन व प्रभाग समिती क्रमांक तीन, चार व पाच मधील नालेसफाईचे तीन कंत्राट बुबेरे अण्ड असोसिएट्स यांना देण्यात आले आहेत. बुबेरे अॅण्ड असोसिएट्स या कंत्राटदाराने काम सुरू केले आहे. मात्र, मागील थकबाकी दिल्याशिवाय काम सुरू न करण्याचा पवित्रा आकार कन्ट्रक्शनने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नालेसफाईचा कांगावा करणा-या महापालिकेने सहा जूनच्या अगोदर नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पण, तोपर्यंत नालेसफाई पूर्ण होणार नसल्याने भिवंडीला पुराचा धोका आहे.
दरम्यान, महापालिकेने थकबाकी रखडवल्याने दररोज नालेसफाई करण्यासाठी लागणारा मजुरांचा पगार, जेसीबी, डम्पर, पोकलेन, इत्यादी साहित्याचे भाडे तसेच पेट्रोल-डीझेलचा खर्च कंत्राटदाराला करावा लागत आहे. मात्र, पैशाअभावी काम करणे कंत्राटदारांना अडचणींचे ठरत आहे. त्यामुळे आमची मागील थकबाकी तात्काळ अदा करावी, अशी मागणी आकार कन्ट्रक्शनने महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मात्र, पहिली पेमेंट ऑर्डर भरा आणि काम सुरू करा, अशी नोटिस नऊ व १३ मेला काढण्यात आली होती. याबाबत १५ मे रोजी कंत्राटदाराला उत्तर द्यायचे होते. पण, १८ मार्च रोजी आकार कन्ट्रक्शनचे काम रद्द करून ते बुबेरे अॅण्ड असोसिएट्सला देण्यात आल्याने थकबाकी असलेल्या संस्थेला डावलून दुस-या संस्थेला थकबाकी दिल्याबद्दल महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.