Tuesday, February 18, 2014

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

कुणाल कपूरचा खाद्यप्रेमींसाठी पुस्तकी नजराणा

 'मास्टर शेफ इंडिया' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलेलं नावं म्हणजे शेफ कुणाल कपूर यांचं. 

'मास्टर शेफ इंडिया' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलेलं नावं म्हणजे शेफ कुणाल कपूर यांचं. अनेक कुकिंग अवॉर्डचा मानकरी ठरलेल्या कुणालने त्याच्या खाद्यप्रेमी चाहत्यांसाठी आणि स्वयंपाक शिकू इच्छिणा-यांसाठी 'अ शेफ इन एव्हरी किचन' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला. त्याने लिहिलेल्या या पहिल्या वहिल्या पुस्तकाची खासियत म्हणजे पहिल्यांदा स्वयंपाक बनवणा-यांसाठी हे पुस्तक खूपचं उपयोगी ठरणार आहे. यात जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी कोणत्या प्रकारची असावीत यापासून ते साहित्याचे प्रमाण, स्वयंपाकघरातले काही खास तंत्र या सगळ्यांची मुद्देसूद माहिती अगदी सोप्या भाषेत दिली आहे.

शाकाहारी, मांसाहारी जेवण बनवण्यासाठी लागणा-या मूळ आणि महत्त्वाच्या गोष्टींची माहितीही यात आहे. भारतातल्या तसेच जगभरातल्या रुचकर आणि करायला सोप्या अशा अनेक पाककृतींचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. काही पाककृतींची साहित्य आणि कृती देताना एखाद्या पाककृतीत कोणता घटक का वापरावा, त्या पदार्थाच्या वापराने पाककृतीच्या चवीत काय फरक पडतो, अशा काही खास टिप्सही दिल्या आहेत. त्यामुळे या पाककृती वाचताना कुणाल जणू काही वाचकांशी संवाद साधत आहे असंच वाटतं.
किंमत : ५९९

Read More »

बहुगुणी दालचिनी

सिनॅमोमम कॅसिया या वनस्पतीच्या सुकवलेल्या सालीला दालचिनी म्हणतात. ही दालचिनी कॅशिया असं म्हणतात.

सिनॅमोमम कॅसिया या वनस्पतीच्या सुकवलेल्या सालीला दालचिनी म्हणतात. ही दलाचिनी कॅशिया असं म्हणतात. ती चायनीज कॅसिया किंवा चायनीज सिनॅमोन या नावाने ओळखली जाते. दालचिनीचे दोन प्रकार. सिनॅमोमम झेलॅनिकस या वनस्पतीचं खोड आणि फांद्यांची सुकवलेली साल सिलोनी दालचिनी नावाने प्रसिद्ध आहे. ही वनस्पती मूळची श्रीलंका आणि ब्रह्मदेशातील आहे. भारत, इंडोनेशिया, लाओसम, मलेशिया, तैवान, थायलंड, व्हिएतनाम या देशांमध्ये प्रामुख्याने मोठय़ा प्रमाणावर लागवड होते. या वनस्पतीची उंची १०-१५ मीटर उंच असते. लालसर, करडय़ा रंगाची असून सुवासिक आणि काहीशी गोड असते. तिचा गंध उग्र असतो. तुकडय़ाच्या किंवा चुर्णाच्या रूपात मिळते. दोन्ही प्रकारच्या दालचिनीचा उपयोग मसाल्यांमध्ये, भाजीत, मेवा-मिठाई, लोणची, मसालेदार सॉस, आयुर्वेदिक गोळ्या आदींमध्ये वापरली जाते.

» मधुमेहींच्या रुग्णासाठी अतिशय गुणकारी असून पंधरा मिनिटं पाण्यात उकळवून त्यात तुळशीची पानं आणि एक चमचा मध घालून ते पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त प्रमाणात वाढणारे सेरम ग्लुकोज, ट्रायग्लिसराइड्स, कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
» दालचिनीच्या सेवनाने अल्झायमरसारख्या आजारातही मेंदूला आवश्यक ती पोषक द्रव्यं पोहोचवण्यात मदत करते.
» दालचिनीची पेस्ट तयार करून ती दुख-या स्नायूंवर लावल्याने आथ्र्रायटिससारख्या आजारात आराम पडतो.
» दालचिनीची पूड मधात घोळवून ती चेह-यावर लावल्याने अॅक्नेचा त्रास होत नाही.
» दालचिनीचा काढा सर्दीवरही रामबाण उपाय आहे.
» रिकाम्यापोटी दालचिनीची पूड सेवन केल्यास पोटाच्या विकारांवर आराम पडतो.
» दालचिनीच्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाला दरुगधी येत नाही.
» रिकाम्यापोटी दालचिनीयुक्त चहा प्यायलास वजन कमी होण्यासही मदत मिळते.

Read More »

मासे खा, पण, मोह आवरा!

त्वचेचे विकार किंवा रक्तदाब कमी-जास्त प्रमाणात असणारे रुग्ण यांना आणि ज्यांचं रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (एल. डी. एल. व ट्रायग्लिसराइड्स)चं प्रमाण वाढलेल्या व्यक्तींनाही कोळंबी, तिस-या आणि खेकडे अशा प्रकारचे कवचधारी मासे वर्ज्य असतात. पण हे सगळे प्रकार इतर माशांच्या तुलनेनं अत्यंत चविष्ट लागत असल्यानं मासे खाण्याचा मोह आवरणं अनेकांना कठीण होतं. पण सुरुवातीपासूनच हे पदार्थ प्रमाणात खाल्ल्यास यांचा आस्वाद आयुष्यभर घेता येईल.

कोळंबी, शिंपले / तिस-या, खेकडे, शेवंड (लॉबस्टर), कालवं, म्हाकूल (स्क्वीड) हे समुद्रजीव बीनकाटय़ाच्या माशांच्या प्रकारात येतात. या प्रकारांपैकी खेकडा हा चिखलात, वाळूत सापडतो. कालवं हा प्रकार सुमद्रातील किंवा समुद्रकिना-याला लागून असलेल्या खडकांना चिकटलेला असतो, जो खडकाचा भाग कोयत्यानं फोडून काढावा लागतो. शिंपले समुद्रकिना-यालगतच्या वाळूत खोल असतात. तर कोळंबी ही खाडीत, गोडय़ा पाण्यात (नदीत) आणि समुद्रातही आढळते. शिवाय हल्ली तर मत्स्योत्पादन प्रक्रियेंतर्गत कोळंबीची शेतीही केली जाते. म्हाकूल आणि शेवंड हे प्रकार मात्र भरसमुद्रात मासेमारी करायला गेल्यावर सापडतात.

चिखल, वाळू किंवा समुद्रातील सूक्ष्म कीटक, जीव हे माशांच्या या प्रकारांचं खाद्य असतं. हे भक्षण करताना, त्यांच्या पोटात चिखल, माती, वाळू पोटात जाते. जसं कोळंबीचं कवच सोलल्यावर तिच्या तोडापासून ते शेपटीपर्यंत लांबसर काळा दोरा दिसतो, जो पदार्थात वापर करण्यापूर्वी काढायचा असतो. तसंच शिंपल्यांपासून पदार्थ तयार करण्यापूर्वी पाण्यात उकडल्यावर ते उघडतात. त्यावेळी त्यांमध्ये बरीच वाळू अडकलेली दिसते. कधी कधी तर अख्खा बंद शिंपलाच वाळूनं भरलेला असतो. म्हणूनच अशा प्रकारचे मासे शिजवण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ करून, व्यवस्थितपणे धुवून मगच ते शिजवावेत. कोळंबी कितीही ताजी असली किंवा कोळंबीची छोटी जात म्हणजे करंदी, जिची बरेच जण सालं काढत नाहीत, कारण ते सालासकट जास्त चविष्ट लागतात. तरीही या मोहाला आवर घालून, हे दोन्ही प्रकार शक्यतो सालासकट शिजवू नयेत.
माशांचे हे सर्व प्रकार उपजतच उष्ण गुणात्मक असतात. तसंच त्यांना स्वत:ची एक अत्यंत चविष्ट अशी आगळी चव असते. परंतु त्यांना अधिक चमचमीत, तिखट करण्यासाठी त्यांमध्ये लाल तिखट, गरम मसाले, आलं, लसूण यांचा अतिरेकी वापर करणं टाळा. जेणेकरून छाती वा पोटात जळजळणं, पित्त उसळणं, विशेषत: स्त्रियांना 'युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स' ज्यामध्ये जळजळ होणं, फोड किंवा पुरळ इ., शरीराच्या कोणत्याही भागावर गळू येणं, सतत घामाघूम होणं असे उष्णतेचे विविध विकार होण्याला आळा बसेल.

वरील सर्व प्रकारांमध्ये हृदयाला घातक ठरू शकणारी घटकद्रव्यं, कोळंबी, खेकडा आणि कालवांमध्ये विशिष्ट प्रकारची चरबी असल्यानं हृदयरोगाचा त्रास असणा-यांना हे सर्व प्रकार वर्ज्य (खाण्यावर बंदी) आहेत. काहींना कवच (शेल फिश) असलेल्या प्रकारातील माशांची अँलर्जी असते. कवचधारी माशांपासून बनलेल्या पदार्थाचा पहिला घास तोंडात घेताच ओठ, तोंड व घसा यांना आतल्या बाजूने खाज, पुरळ, सूज आल्यामुळे श्वसनाचा त्रास होणं, धाप लागणं अशा अॅलर्जीच्या प्रकारांची काही लक्षणं हे पदार्थ पहिल्यांदाच खाणा-यांमध्ये दिसून येतात. या प्रकारांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात.

काही माशांना उपजतच उग्र दर्प असतो. तो निघून जाण्यासाठी व पदार्थ अधिक चविष्ट होण्यासाठी त्याला आंबट चव आणली जाते. यासाठी वापरण्यात येणा-या चिंचेऐवजी कोकमाचा वापर करावा. कारण चिंच ही पित्तवर्धक आणि सांध्यांमध्ये वातदोष निर्माण करणारी आहे. तर कोकमं ही उत्तम पित्तशामक, शरीरात थंडावा आणून दाहकता कमी करणारी आहेत. सर्व निरोगी (नॉर्मल) व्यक्तींनी सर्व प्रकारचे मासे जेव्हा शक्य असेल, तेव्हा जरूर खावेत.
हे अवश्य करा..
» मांसाहारातील कोणताही प्रकार हा पूर्ण शिजलेला असल्याची खात्री केल्यावरच मगच खा.
»  मांसाहारातील वरील सर्व प्रकार पोटाला बाधू शकतात, म्हणून ते मध्यम प्रमाणात खावेत.

कोळंबीचं भुजणं

साहित्य : स्वच्छ करून धुतलेले कोळंबी किंवा कालवं किंवा शिंपले १ मोठा बाऊल, दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, अध्र्या इंचाचा किसलेल्या आल्याचा तुकडा, पाव चमचा हळद, लाल तिखट व गरम मसाला प्रत्येकी एक ते दीड चमचा, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, परतण्यापुरतं तेल, चवीनुसार मीठ.
कृती : सालं व मधला दोरा काढून स्वच्छ केलेली कोळंबी किंवा उकडून घेतलेल्या शिंपल्यातील मांस किंवा स्वच्छ केलेली कालवं यांपैकी काहीही घेतल्यास त्यास हळद व मीठ लावून ते मुरण्यास ठेवणे. तव्यावर दोन-तीन चमचे तेल पसरून त्यावर कांदा लालसर परतावा. त्यात अनुक्रमे लसूण व आलं घालून पुन्हा थोडं परतावं. थोडंसं त्यावर कोळंबी / कालव / शिंपले घालून मिश्रण परतावं. हे तिन्ही प्रकार शिजायला वेळ लागत नाही. परतताना त्यात लाल तिखट व गरम मसालाही घालावा, शिजत आल्यावर गरज वाटल्यास मीठ घालावं. वरून कोथिंबीरीनं सजवून गरमागरम भुजणं भाकरी किंवा पोळीसोबत खायला तयार. कांदा परतताना त्यात थोडी कोथिंबीर घातल्यास, कोणत्याही पदार्थात कोथिंबीरीची चव खूपच लागते. आंबटसर चव हवी असल्यास दोन कोकमंही घालावी.

Read More »

बदलत्या वातावरणाचा ताप

गेल्या काही दिवसांपासून मधूनच कधी कडाक्याची थंडी जाणवते तर कधी वातावरण ढगाळ होऊन अकाली पाऊस पडायला लागतो. कडक ऊन असतानाही हवेत गारवा जाणवतो. या बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. वातावरणात झालेल्या या बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप, सर्दी, खोकला असे अनेक साथीचे आजार बळावतात. मळभट वातावरणामुळे अंग मोडून पडणं, अनुत्साही वाटणं, डोकं दुखणं असे आजार होतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाही तर ते आजार बळवण्याची शक्यता असते. या दिवसांत आपलं आरोग्य टिकवायचं असेल तर त्याची काळजी घेणं आवश्यक असतं.

अचानकपणे वाढलेला गारवा, हवेतील कोरडेपणा, बोचणारी थंडी, वातावरणात झालेले हे बदल गेल्या काही दिवसांत अनुभवण्यास आले. निसर्गात झालेले हे बदल ऋतू संधिकाळाचे घातक आहेत. आताचा ऋतू हा हेमंत ऋतू व शिशिर ऋतूचा संगम आहे. म्हणजेच हेमंत ऋतूतील गुलाबी थंडीची जागा आताच शिशिरातील बोच-या थंडीने घेतली आहे. 

मानवाच्या आरोग्यावर जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यांसारख्या शत्रूंचे हल्ले होत असताना, पर्यावरणात हा झालेला बदल म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. या सर्वाचे फलद्रूप म्हणून उद्भवलेल्या व्याधी आणि त्यांवर आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेखलेले शास्त्रोक्त उपचार यांचा केलेला हा गोषवारा -

प्रतिश्याय किंवा अ‍ॅलर्जीने होणारी सर्दी
हवेमध्ये होणारा कोणताही बदल आणि त्यामुळे उद्भवणारी श्वसन संस्थेतील सर्वसामान्य व्याधी म्हणजेच प्रतिश्याय. थंड वातावरणात या व्याधीची तीव्रता जास्त जाणवते. यावर आयुर्वेदात सांगितलेला उत्तम उपाय म्हणजे कडू व तिखट चवीच्या औषधी वनस्पती (उदा. सुंठ, मिरी, पिंपळी) तसेच यामध्ये त्रिभुवन कीर्ती रस, लक्ष्मी विलास सितोपलादी चूर्ण यासारखी औषधे उपयुक्त ठरतात. नाकातील व घशातील त्वचेला आलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी नाकपुडीत, आतून तिळाचे किंवा खोबरेलतेल लावावे. आयुर्वेदीय पंचकर्मात सांगितलेल्या 'नस्य' कर्माचा प्रतिश्यायात उत्तम उपयोग होतो. नस्यकर्मासाठी वचादी तेलासारख्या शोधन करणा-या तेलाचा आणि नंतर पंचेंद्रियवर्धन तेलासारख्या बल्य म्हणून काम करणा-या औषधांचा वापर प्रतिश्यायात करता येतो. यालाच जोड म्हणून उष्ण आणि तीक्ष्ण औषधी वनस्पतीची धुरी (धूषन) दिल्यास प्रतिश्यायाचा नायनाट होतो.

दमा
श्वसनरोगातील व्याधींमधील हा एक उग्रवतारच आहे. दम्यावर आयुर्वेदात सांगितलेले 'वमन' हा एक रामबाण उपाय आहे. वमन ही श्वसन संस्थेतील अवयवांची शुद्धी करण्याची क्रिया आहे. वैद्याच्या योग्य सल्ल्यानुसार किंवा त्यांच्या निरीक्षणाखाली केलेले वमन हे दम्याच्या रोग्याला जीवनदान देऊ शकते. तसेच च्यवनप्राशासारखी श्वसन मार्गातील प्रत्येक अवयवाला जल देणारी रसायन औषधे उत्तम काम करतात.

संधिवात
वातावरणात वाढवलेली थंडी आणि शरीरात वाढलेली संधिवाताची तीव्रता म्हणजे निसर्गनियमच. हाडे, सांधे कुमकवत होणे, सांधे वाजणे, जखडणे, इत्यादी लक्षणं थंडीमध्ये अतिशय तीव्र होतात. यावरील सर्वात उत्तम आणि सोपा उपाय म्हणजे स्नेहल बला तेल, सहचर तेल, निर्गुण्डी तेल, चंदन बला लाक्षाहि तेल यांसारख्या औषधी तेलाने अभ्यंग केल्यास सांध्यांची कार्यक्षमता वाढते. वातव्याधींवरील एक सर्वश्रेष्ठ उपाय म्हणजे बस्ती चिकित्सा. बस्ती चिकित्सा ही वातरोगांवरील अर्धी चिकित्सा मानली जाते.

त्वचारोग
थंडीतील रुक्ष वातावरणाचा दुष्परिणाम त्वचेवरही होत असतो. फक्त हवेतील कोरडेपणामुळे होणा-या त्वचारोगात ड्राय स्किन इक्झीमा, सोरायसिस इ. व्याधी अग्रगण्य आहेत. यामध्ये कडू औषधीसोबत स्नेहनाची जोड आवश्यक असते.

आयुर्वेदात सांगितलेल्या रक्तशुद्धीकरण प्रक्रियेचा इथे फायदा होतो. सारिवा मंजिष्ठा लोध यांसारख्या रक्त प्रसादक द्रव्यांच्या वापरासोबत पंचकर्मातील रक्तमोक्षण ही क्रिया लाभदाय ठरते. विशिष्ट ठिकाणी अशुद्ध रक्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी आयुर्वेदात वर्णिलेल्या जलौकावचारणाचा (लिच थेरपी) उपयोग होतो. तसेच सार्वदेहिक त्वचारोगांमध्ये 'सिरावेध' कर्मही फलदायी ठरते.

मानसिक रोग
नैराश्य, चिडचिडेपणा, डिप्रेशन या अशा गोष्टी हल्ली खूपच बळावताहेत. सूर्यप्रकाश कमी प्रमाणात अंगाला लागला की, मानसिक अस्थैर्यही असते. यामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, गुळवेल अशा धी, धृती आणि स्मृतीवर्धक औषधांचा वापर करता येतो. 'शिरोधारे'सारखी अतिशय प्रभावी पद्धती यांत वापरता येते. आयुर्वेदशास्त्रामुळे अनेक व्याधींवर यशस्वी उपचार करता येतात. जुनाट डोकेदुखी, आमवात, टाचदुखी, मूळव्याधींवर यशस्वी आणि प्रभावी उपचार होतात. वर सांगितलेली औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe