Sunday, August 18, 2013

घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी परिसरात डोंगरावर वसलेल्या डॉ. आंबेडकरनगर


HAAR | ONLINE MARATHI NEWS
समस्यांचा डोंगर

घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी परिसरात डोंगरावर वसलेल्या डॉ. आंबेडकरनगर आणि पंचशील नगरातील रहिवासी मूलभूत सुविधांपासूनच वंचित आहेत.
मुंबई -  घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी परिसरात डोंगरावर वसलेल्या डॉ. आंबेडकरनगर आणि पंचशील नगरातील रहिवासी मूलभूत सुविधांपासूनच वंचित आहेत. या भागात पाणीटंचाई, अस्वच्छता, शौचालयांची कमतरता असून स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या भागात अनधिकृत झोपडयाही उभारण्यात आल्या आहेत. डोंगरभागातील या वस्त्या जुन्या आहेत. कमालीची अस्वच्छता, डास, घुशींचा उपद्रव आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव या भागात कायम असतो.
घाटकोपर डोंगरालगतचे रहिवासी सुविधांपासून वंचित
भटवाडी परिसरातील डोंगरालगतच्या डॉ. आंबेडकरनगर आणि पंचशीलनगरात राहणा-या रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे खासगी संस्थेकडून येथील रहिवाशांना पाणी घ्यावे लागते. त्यासाठी महिन्याला १२० रुपये येथील रहिवाशांना मोजावे लागत आहेत. डोंगरावर ही वस्ती असल्यामुळे पाणी चढवण्यात अडथळा होऊन कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.
पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न आहे. कचराकुंडय़ा नसल्याने अस्वच्छचा आहे. या भागात टाकलेला कचरा उचलण्यासाठी पालिकेची कोणतीही व्यवस्था नाही. वस्तीतील घराघरांसमोर कच-याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे हे रहिवासी डंपिंग ग्राउंडवरच राहत असल्यासारखे चित्र आहे. अस्वच्छतेमुळे उंदीर, घुशी आणि डासांचा उपद्रव वाढला असल्याने या भागात मलेरिया होणा-यांची संख्या जास्त आहे.
सार्वजनिक शौचालयांना दरवाजे नाहीत, पाणी नाही, अस्वच्छतेमुळे दरुगधी पसरलेली आहे. मात्र, तरीही पर्याय नसल्यामुळे येथील रहिवाशांना या शौचालयांचाच वापर करावा लागतो. लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही.
कोणत्याही सुविधा नसल्यामुळे अनेक वर्षापासून आम्ही त्रास काढून राहत आहोत. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. पाण्यासाठी तर कायम वणवण करावी लागते.  - सुदाम वाघमारे , रहिवासी
या भागात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत झोपडया वाढत आहेत. त्याची दखल कुणी घेत नाही. या वाढणा-या झोपडयामुळे अस्वच्छतेत आणखीन भर पडली आहे. शिवाय ज्या काही थोडया सुविधा मिळत आहेत, त्यावरही ताण
पडत आहे.  - विजया बनसोडे ,  रहिवासी
डोंगरावर असलेल्या टाकीत पाणी चढवले जात नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही. त्यामुळे पाणी आणण्यासाठी डोंगर परिसरतील निसरडय़ा रस्त्यांवरून डोक्यावरून हंडे घेऊन जावे लागते. उपलब्ध असलेल्या नळालाही कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे किमान अर्धातास तरी पाणी सोडणे आवश्यक आहे.  -  अंजली लाड ,  रहिवासी 

Read More »

'निराश व्हायचे नाही'

अपयश आले तरी निराश व्हायचे नाही, हा धडा या परीक्षेसाठी पहिल्यांदा गिरवावा लागतो. त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे. अभ्यास करण्यासाठी विशेष मार्गदर्शन घेतल्यास अडचण नाही. मात्र, स्वत:चा आत्मविश्वासही या परीक्षेच्या यशात मोलाची भूमिका बजावतो.
यूपीएससी परीक्षेच्या तयारीला कधीपासून सुरुवात केली?
> मी पदवीनंतर लगेचच या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. त्यासाठी आवश्यक असणारे घटक मिळवले. या परीक्षेसाठी आवश्यक ती माहिती काढणे हे माझे पहिले काम होते. सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊन त्यानंतरच परीक्षा देण्याचे ठरवले.
परीक्षेची तयारी करत असताना निराश व्हायला झाले का?
> अपयश आले तरी निराश व्हायचे नाही, हा धडा या परीक्षेसाठी पहिल्यांदा गिरवावा लागतो. या परीक्षेला सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी बसतात. त्यामुळे दडपण येणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यासाठी संयम आवश्यक आहे. जर संयम असेल तर निराश न होता ही परीक्षा उत्तीर्ण करता येते.
घरच्यांनी यश मिळवण्यात कशी मदत केली?
> अपयश आल्यास आईवडील दिलासा देतात. या परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी तसेच अन्य तयारीसाठी खूप वेळ जातो. त्या वेळी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोच असे नाही. त्या वेळी आईवडीलच आपल्या आरोग्याची काळजी घेतात. घरातल्यांचा पाठिंबा नसेल तर ही परीक्षा उत्तीर्ण करणे थोडे कठीण होते. मात्र, मला घरातून पाठिंबा मिळाल्याने यश मिळवणे सोपे गेले.
या परीक्षेची तयारी करणा-यांना काय सांगाल?
> या परीक्षेसाठी वाचन करणे आवश्यक आहे. जो विषय जास्त कठीण वाटतो त्याचीच जास्तीत जास्त तयारी करायला हवी. त्या विषयातील आवश्यक माहिती, नोंदी आत्मसात करून घ्याव्यात. मात्र, हे करत असताना इतर विषयांकडे दुर्लक्ष होता कामा नये.
या परीक्षेसाठी तुम्ही कुणाचे मार्गदर्शन घेतले?
> ज्या विषयाची तयारी करण्यासाठी मला जास्त वेळ द्यावा लागत होता, त्या विषयाच्या अभ्यासासाठी मी युनिक अ‍ॅकॅडमीत प्रवेश घेतला होता. गरज असेल त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही.
तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रयत्न करणार?
> यूपीएससी परीक्षेतील सर्वच पदे ही जनतेच्या सेवेसाठीच असतात. मात्र, मला इंडियन फॉरेन सव्‍‌र्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा आहे. मी त्यासाठी प्रयत्न करेन.

Read More »

धारावीत पहिला इको-पॉड

धारावी टी-जंक्शनवर प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करण्यासाठी दोन 'इको-पॉड' तयार करण्यात आले आहेत.
मुंबई - धारावी टी-जंक्शनवर प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करण्यासाठी दोन 'इको-पॉड' तयार करण्यात आले आहेत. या पॉडमध्ये सौरऊर्जेचा वापर करून एलईडी प्रकाशझोतांच्या आधारे हे वाहतूक बेट सुशोभित करण्यात आले आहे. पर्यावरण जनजागरूकतेबाबत प्लॅस्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा इको पॉड तयार करण्यात आला आहे.
प्लॅस्टिकच्या बाटल्यांमुळे पर्यावरणाला निर्माण होणा-या धोक्याची चर्चा पावसाळ्याच्या सुरुवातीला नेहमीच केली जाते. हवाबंद पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरून झाल्यावर फेकून दिल्या जातात. या बाटल्या गटारात, नाल्यांमध्ये जमा होतात. त्यामुळे पाणी तुंबते व परिसर जलमय होतो. त्यामुळे या प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर पुनर्प्रक्रिया करून त्याचा वापर वाढल्यास बाटल्यांचा होणारा कचरा कमी करता येईल, ही संकल्पना या इको पॉडमागे आहे.
धारावी टी-जंक्शनजवळ प्लॅस्टिक बॉटल्स जमा करण्यासाठी दोन 'इको पॉड' बनवण्यात आले आहेत. 'अ‍ॅप्रो ग्रिन टेक' या कंपनीच्या माध्यमातून मुंबईत प्रथमच अशी दोन इको पॉड बनवण्यात आली आहेत.
मुंबई महापालिकेच्या सहकार्याने बनवण्यात आलेल्या या इको पॉडमुळे वाहतूक बेटांचे सुशोभीकरणही केले जाणार आहे. धारावीत सर्वात जास्त इ-कच-याचे प्रमाण आहे. धारावीत प्लॅस्टिकचा कचरा जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण वाढते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करता येतो. हा संदेश देण्यासाठी हे इको पॉड तयार करण्यात आले आहेत. असे 'अप्रो ग्रिन टेक' कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित सिरकर यांनी सांगितले.

Read More »

हा 'प्रहार' आपल्यासाठीच!

अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे.
अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे. या सर्व समस्यांचा सामना अगदी झोपडीपासून गगनचुंबी इमारतींपर्यंत कुठेही राहणा-या मुंबईकरांना करावा लागतोच. त्याविषयी कुरबुर करणे, आपसात चर्चा करून महापालिका किंवा संबंधित संस्थेला दूषणे देणे किंवा फार तर तक्रार नोंदवणे यापलीकडे काही केले जात नाही. या तक्रारींची दखल घेतली जाईलच, याचीही शाश्वती नसते. त्यामुळेच 'प्रहार'ने वाचकांसाठी हे खास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या समस्या तुम्ही इथे मांडल्यास आणि संबंधित छायाचित्रेही सोबत जोडल्यास त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
संपर्क : प्रहार कार्यालय, इंडियाबुल्स वन सेंटर, ज्युपिटर मिल्स कंपाउंड, फितवाला रोड, लोअर परळ, मुंबई- १३, फॅक्स : ०२२-४०९६९९००
ई-मेल : prahaar.complaint@prahaar.co.in


अंबरनाथ स्कॉयवॉकचा वापर फेरीवाल्यांनी त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी सुरू केला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत पादचा-यांना अडथळ्यांची शर्यत पार करून स्कायवॉकवर जावे लागते, ही समस्या छायाचित्रातून मांडली आहे संतोष तिवारी यांनी.


Read More »

मैदान, उपवनासाठीच 'रेसकोर्स' राखीव

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ही पाण्याच्या निच-यांसाठी, तलाव बांधण्याकरता राज्य सरकारने महापालिकेला दिली होती.
मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ही पाण्याच्या निच-यांसाठी, तलाव बांधण्याकरता राज्य सरकारने महापालिकेला दिली होती. मात्र या जागेवर कोणत्याही प्रकारे रेसकोर्सचे आरक्षण नसून, त्यावर फक्त मनोरंजन मैदान, खेळाचे मैदान तसेच उपवन अशा प्रकारचेच आरक्षण आहे, असा दावा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केला आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेसकोर्सची जागा भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या रॉयल टर्फ क्लब या कंपनीबरोबरचा करार ३१ मे रोजी संपुष्टात आला. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेतील सत्ताधा-यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या जागेवर थीमपार्क बनवण्याचे संकल्पचित्रही सादर केले आहे. मात्र, या जागेचा करार संपुष्टात आला म्हणून ती जागा ताब्यात येत नाही, हे यापूर्वीच्या अनुभवानुसार स्पष्ट होत आहे. याआधी या क्लबची मुदत १९९४ ला संपुष्टात आल्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या भाडेकराराचे नूतनीकरण करण्यात आले होते.
मात्र शनिवारी स्थायी समिती अध्यक्ष शेवाळे यांनी नालेसफाईच्या पाहणीच्या निमित्ताने रेसकोर्समधून सैर मारण्याची हौस पूर्ण करून घेतली आणि ही जागा आपण ताब्यात घेणार असल्याचे सांगितले. रेसकोर्सची जागा ही 'शेडयूल्ड-डब्ल्यू'मध्ये असल्यामुळे भाडेकरार संपल्यानंतर ती जागा त्या-त्या प्राधिकरणाकडे आपोआपच हस्तांतरीत होते, असेही त्यांनी सांगितले.

Read More »

एकाच गुन्ह्यात मनीषा गुरवला चार वेळा अटक का?

लक्ष्मण माने बलात्कार प्रकरणी कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवर उच्च न्यायालयाचे न्या. अभय ठिपसे यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली.
मुंबई  - लक्ष्मण माने बलात्कार प्रकरणी कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवर उच्च न्यायालयाचे न्या. अभय ठिपसे यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली. या प्रकरणातील अन्य आरोपी मनीषा गुरव हिच्यावर बलात्काराचे सहा गुन्हे दाखल असताना, सातारा पोलिसांनी तिला चार वेळा अटक करण्याचे कारण काय, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
मनीषा गुरवच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली असता, नियमित जामीन अर्जावर साता-याच्या महानगर दंडाधिका-यांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अन्य दोन गुन्ह्यांत तिला एक-दोन दिवसांत अटक करण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील हितेंद्र देढिया यांनी उच्च न्यायालयाला दिली असून, या प्रकरणावर १२ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मनीषा गुरवविरोधात सहा गुन्हे दाखल झाले असून, तिला चार प्रकरणांत अटक झाली आहे. मात्र तिचा अटकपूर्व जामीन न्यायालयासमोर येण्याच्या आधी एक दिवस पोलिसांनी तिला चार वेळा अटक केली आहे, असे तिचे वकील उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. त्यामुळे तिला मानसिक त्रास होत असल्याचे ते म्हणाले. एकाच गुन्ह्यात ब-याचदा अटक करता येणार नाही,
असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना सातारा पोलिसांनी एकाच गुन्ह्यात तिला चार वेळा अटक कशी केली, हे अनाकलनीय आहे, असे मत न्या. ठिपसे यांनी व्यक्त केले.

Read More »

अर्धवट सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे निधी मागणार

राज्यात अर्धवट अवस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडे स्वतंत्र निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबई - राज्यात अर्धवट अवस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडे स्वतंत्र निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यात मोठया प्रमाणावर सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. अर्धवट काम झालेल्या या सिंचन प्रकल्पांपैकी जे प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होऊ शकतात अशा प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी वेगवर्धित सिंचन योजनेच्या (एआयबिपी) व्यतिरिक्त विशेष पॅकेजची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील अन्य मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. पाच जून रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्यासह नियोजन विभागाच्या उपाध्यक्षांची भेट घेण्यात येणार आहे.
यापूर्वी विशेष बाब म्हणून बिहार,उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश या राज्यांना निधी देण्यात आला आहे. यातील अनेक राज्यांची सिंचनाची सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र, महाराष्ट्राची सिंचन सरासरी १७ टक्केच असून किमान राष्ट्रीय सिंचन सरासरीपर्यंत येण्यासाठी राज्याला विशेष निधीची आवश्यकता आहे.

Read More »

परीक्षेपलीकडचा पर्यावरणाचा अभ्यास..

पर्यावरण म्हणजे काय? असा थेट प्रश्न कोणी विचारल्यास त्याचं एका शब्दात किंवा एका वाक्यात सहज उत्तर देता येत नाही. पण यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत अचूकतेवर भर असल्याने परीक्षार्थीला त्याची नेमकी व्याख्या माहीत असावी लागते. २००५ नंतर स्पर्धापरीक्षांमध्ये पर्यावरणशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरला आहे. नुकत्याच राज्यसेवा पूर्वपरीक्षेत या विषयासाठी आठ ते दहा गुण होते, तर यूपीएससी पूर्वपरीक्षेतसुद्धा या विषयावर दहा ते बारा गुण होते.
एकविसाव्या शतकात पर्यावरण हा विषय मानवी अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला गेला आहे. पाश्चिमात्य लोकांनी पर्यावरणाची हवी तशी मनसोक्त लूट केली. त्याचा प्रतिकूल परिणाम संपूर्ण जग सहन करतंय. सध्या भूतलावरील मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ पाहतोय, असं म्हटल्यावर त्याच पाश्चिमात्यांनी पर्यावरणरक्षणाचा राग आळवायला सुरुवात केली आहे. मग ग्लोबल वॉìमग, कार्बन क्रेडिट, क्लोरोफ्लुओरोकार्बनसारख्या संज्ञा तयार झाल्या. थोडंफार स्वरूप वगळता जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या तशाच राहिल्या आणि या सगळ्यांचं प्रतिबिंब स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये दिसायला सुरुवात झाली. साहजिकच जसा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र तसाच 'पर्यावरणशास्त्र' हा स्वतंत्र विषयच तयार झाला. त्याचंच नाव 'ई. व्ही. एस. (evs)' असं संक्षिप्त झालं.
२००५ नंतर पर्यावरणशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरला आहे. २०१३च्या नुकत्याच राज्यसेवा पूर्वपरीक्षेत याविषयक आठ ते दहा गुण होते. तर यूपीएससी पूर्वपरीक्षेतसुद्धा या विषयावर दहा ते बारा गुण होते. पर्यावरण ऱ्हासाची धग १९७०पासूनच जाणवत होती. त्यावर उपाययोजना होत होत्या. आपण २००० नंतर या विषयाकडे गांभीर्याने पाहत आहोत.
पर्यावरणाची संकल्पना समजून घेताना आपल्याला हे माहीत हवं की, पृथ्वी नैसर्गिकरीत्या सूर्यकिरण शोषून घेते आणि त्यातील काही किरण पुन्हा उत्सर्जति करते. यातील काही औष्णिक किरणं हरितगृह वायू वातावरणात पकडून ठेवतात. त्यामुळे भूपृष्ठावरील तापमान वाढतं. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाल्यापासून वातावरणातील CO2,CH4, N2O चं प्रमाण मोठया प्रमाणात वाढलं. त्यामुळेच १९९० मध्ये पृथ्वीचं उष्णतामान सरासरी सामान्य उष्णतामानापेक्षा वाढलं, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. २००१ साली विक्रमी उष्णतामानाची नोंद झाली. त्यानंतर सलग पुढची र्वष विक्रमी तापमानाची नोंद झाल्याचं आढळतं. २०१० पासून देशाला आणि महाराष्ट्राला भेडसावणारा दुष्काळ पर्यावरणाचीच गंभीर समस्या आहे.
पर्यावरण अभ्यासाची तयारी करताना परिस्थितीकी विज्ञान, पर्यावरण आणि हवामानबदल या मुख्य घटकांच्या आधारे करावा. पर्यावरण परिस्थितिकीमध्ये जीवावरण, पर्यावरणाच्या मूलभूत संकल्पना, जलीय परिसंस्था महत्त्वाच्या आहेत. जलीय परिसंस्थांचं उपघटकाच्या आधारे वाचन झालं पाहिजे. वाचताना विषयाची खोली समजून घ्यावी. विषयाची खोली म्हणजे महत्त्वाची जलीय परिसंस्था हा उपघटक असेल तर दलदलीच्या प्रदेशाचे वर्गीकरण, मार्शेश म्हणजे – पाण्याबाहेर डोकावणा-या वनस्पती, स्वॅम्पी प्रदेश म्हणजे – प्रामुख्याने वृक्ष आणि फर्न – प्राथमिक उत्पादकतेनुसार असणारा वनस्पतींचा क्रम ही माहिती लक्षात ठेवावी. दलदलीच्या प्रदेशाचं संवर्धन करणं महत्त्वाचं ठरतं. कारण स्थलांतर करणा-या ८०० पक्षांच्या प्रजातींपैकी सुमारे ६० टक्केपेक्षा जास्त प्रजाती या दलदलीय प्रदेशावर अवलंबून आहेत. ही या पक्ष्यांची निवासस्थानं आहेत. या परिसंस्था देशाचा मौल्यवान ठेवा आहेत.
हा ठेवा मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आला आहे. या दलदलीय परिसंस्थाच्या रक्षणाच्या दृष्टीने 'रामसर' करार महत्त्वाचा ठरतो, हे माहीत हवं. रामसर करार १९७१ मध्ये झाला. यात १६० देश सहभागी आहेत. 'रामसर' यादी हा या कराराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या यादीमध्ये भारतातील २६ दलदलीय प्रदेश आहेत. देशातील प्रमुख सरोवरांचा यात समावेश होतो. या यादीत महाराष्ट्रातील एकही स्थळ नाही. विषयाची खोली म्हणजे काय हे आता लक्षात आलं असेल. नंतर उपघटक खारफुटीची वनं किंवा मँग्रोव्ह्ज याचा विचार करता भारतामध्ये जगाच्या ५ टक्के खारफुटीची वनं आढळतात. राष्ट्रीय धोरण २००६नुसार खारफुटीची वनं पर्यावरण समतोलासाठी अधिक महत्त्वाची आहेत. कारण विविध सागरी प्रजातींना त्या निवास पुरवतात, प्रतिकूल हवामानापासून रक्षण करतात, त्या पर्यटनासाठी उपयुक्त आहेत.सुंदरबनबरोबरच महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर (रत्नागिरी) खारफुटीची वनं आहेत.
पर्यावरणाच्या अभ्यासाचा आणखी एक भाग म्हणजे जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी). याचा अभ्यास तीन टप्प्यांत केला जातो.
जनुकीय विविधता
जीवप्रजाती विविधता
परिसंस्था विविधता
जैववैविधतेच्या या -हासामुळे मानव अनेक वनस्पती आणि पशूंना कायमचा मुकत आहे. उदा. चित्ता व दोनिशगी गेंडा हे प्राणी भारतात कधीच दिसणार नाहीत. शिवाय मानवी आजारावर उपयोगी पडणा-या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आता दुर्मीळ होत आहेत. उदा. मलेरियाच्या उपचारासाठी वापरलं जाणारं क्युनिन हे औषध 'सिकोना' वनस्पतीपासून तयार केलं जातं. तर हृदयरोगासाठी केलं जाणारं औषध 'डिजिटॅलीस फॉक्स ग्लेव्ह' या वनस्पतीपासून मिळवतात. पर्यावरणाचा मानवी आरोग्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे.
भारतातील जैवविविधता
भारताचं भौगोलिक स्थान, हवामानातील विविधता यामुळे भारत संपन्न असा देश आहे. 'झुऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया'नुसार भारतात सस्तन प्रजाती – ३९७, पक्षी – १२३२, सरपटणारे प्राणी – ४६२, उभयचर प्राणी – ३१२, मत्स्यवर्गीय प्राणी – २६४१ अशी संख्या आहे.
पर्यावरणरक्षणात प्रदूषण कमी करणं, असा मुद्दा येतो. मग प्रदूषण म्हणजे काय? त्याची व्याख्या व ते कमी करण्याचे उपाय, लोकसहभाग, शासनसहभागी इ. प्रदूषणामध्ये हवा, पाणी व जलप्रदूषण असा क्रम ठरतो. त्यावरील उपाययोजना, मग सर्वाधिक प्रदूषित नदी, प्रदूषके, अ‍ॅसिड रेन, धुके, धुरके, त्यांचा परिणाम याबाबीही माहीत होतात. पर्यावरणरक्षण हा विषय विविधांगी भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक वर्णानुसार वेगवेगळ्या पद्धतीने जपला जातोय. वृक्ष, पाणी, नदी, डोंगर यांचा आदर केला आहे.
वृक्षवल्ली नातेवाईक मानले आहेत. मग त्यांची काळजी घेतली जावी, असा दंडक घालून दिला आहे. पर्यावरणाचे रक्षण म्हणजे पर्यायाने पृथ्वीवर मानवी अस्तित्व अधिक काळ वाढवणे, असा त्याचा सोपा अर्थ होईल. पर्यावरणाच्या अभ्यासाने व्यक्तीचे उत्तरदायित्व समजेल. निसर्गाची लूट थांबेल. आपण परीक्षेत तर गुण मिळवूच, पण अधिक सुखदायी अन् निकोप शरीर व मनसंपदेकरता पर्यावरणाचा अभ्यास करायलाच हवा. पुढील लेखामध्ये पर्यावरणावर अधिक माहिती घेऊ या.

Read More »

चाकोरीबाह्या करिअरचे पर्याय

नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. यापूर्वी आपण बारावी सायन्सनंतर सहज उपलब्ध होतील अशा वैद्यकीय क्षेत्रांतील विविध पर्यायांची ओळख करून घेतली आहे. याशिवाय आणखीही भरपूर पर्याय आहेत. अशाच आणखी काही वेगळ्या पर्यायांची आज आपण तोंडओळख करून घेऊ या
 डिप्लोमा इन न्यूट्रिशियन अँड डाएटेटिस
भारताने आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली असली तरी कुपोषण आणि अतिपोषण या बाबतीतील समस्या मोठया प्रमाणात भेडसावताना दिसताहेत. ही आरोग्यासंबंधीची समस्या सोडवण्यासाठी आहारशास्त्रासंबंधीचे अभ्यासक्रम विविध संस्थांमध्ये राबवण्यास सुरुवात झाली आहे. भारत हा मधुमेह आणि इतर आहारासंबंधीच्या समस्यांची राजधानी बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर आहारतज्ज्ञांची गरज मोठया प्रमाणात वाढली आहे. म्हणून आहारासंबंधीचे वेगवेगळे पदविका पातळीवरील अभ्यासक्रम यासाठी उपयुक्त ठरतील, अशा पद्धतीनं सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास बारावी उत्तीर्ण अथवा पदवीधर असणं आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांतर्गत वेगवेगळ्या अन्नपदार्थातील पोषकतत्त्वं, लोकांना खाण्याबद्दलच्या सवयी कशा असाव्यात याबाबतचा सल्ला देणं आणि आरोग्य सुधारण्यासाठी नियोजित आहार कसा असावा..
याबाबत मार्गदर्शन करणं यांसारख्या विषयांचा समावेश असतो. हा अभ्यासक्रम खासकरून सर्वसामान्य लोकांचं आरोग्य लक्षात घेऊन बनवलेला आहे. आहारतज्ज्ञ हे वेगवेगळ्या हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि वेट लॉस क्लिनिकमध्ये काम करू शकतात. या ठिकाणी वैयक्तिक पद्धतीनं प्रत्येकाच्या गरजांनुसार आहाराबाबत हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. तसंच आहारातून जास्तीत जास्त पोषकतत्त्वं कशी मिळतील, याबाबत आग्रही राहतात. याव्यतिरिक्त स्पोर्ट्स सेंटर्स, हेल्थ केअर सेंटर्स या ठिकाणीही ते काम करू शकतात किंवा आहारतज्ज्ञ म्हणून खासगी क्लिनिकही सुरू करू शकतात. यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या व्यक्तींना खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. पदविकाधारक व्यक्तीला सुरुवातीला १० ते १५ हजार रुपये प्रति महिना वेतन मिळतं. या अभ्यासक्रमात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, मॅथ्स, बायोलॉजी, होम सायन्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी आणि सोशिओलॉजी हे विषय गरजेनुसार वेगवेगळ्या टप्प्यांवर शिकवले जातात.
या क्षेत्रातील काही पदविका अभ्यासक्रम
डिप्लोमा इन न्यूट्रिशन अ‍ॅण्ड हेल्थ एज्युकेशन
पीजी डिप्लोमा इन पेडिएट्रिक न्यूट्रिशन
पीजी सर्टिफिकेट इन पेडिएट्रिक न्यूट्रिशन
सर्टिफिकेट इन फूड अँड न्यूट्रिशन
सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन अँड चाइल्ड केअर
सर्टिफिकेट इन फूड सेफ्टी
काही प्रमुख संस्था
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी
इन्स्टिटयूट ऑफ होम इकॉनॉमिक्स
लेडी इर्विन कॉलेज, दिल्ली
अविनाशी लिगम युनिव्हर्सिटी फॉर वुमन, कोइम्बतूर
जे. डी. बिर्ला इन्स्टिटय़ूट, कोलकाता


डिप्लोमा इन फिशरीज टेक्नॉलॉजी/ अ‍ॅग्रीकल्चर
आपल्या देशात मोठया प्रमाणात मासे उत्पादन होत असते. माशांची मोठी निर्यातही होत असते, ज्यातून परदेशी चलन मिळतं. माशांचं उत्पादन अधिक होत असलं तरीही ताजे मासे हे नाशवंत असतात. त्यामुळे हे मासे त्यातील पोषक तत्त्वं नष्ट न होता टिकाऊ उत्पादनात परिवर्तित करणं, हे मोठं आव्हान असतं. त्यासाठी डिप्लोमा इन फिशरीज टेक्नोलॉजी, अ‍ॅग्रीकल्चर हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त ठरू शकतो. कुठलाही विज्ञान पदवीधर उमेदवार या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतो. अभ्यासक्रमाचा कालावधी एक ते दोन वर्षाचा असतो. या अभ्यासक्रमांतर्गत मासे पकडल्यानंतर त्याचं नियोजन, त्यावर करण्यात येणा-या प्रक्रिया, माशांचं मोठया प्रमाणावर प्रजोत्पादन करणं, क्वालिटी कंट्रोल ऑफ फिश यांसारख्या गोष्टींवर भर दिलेला असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यक्ती स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकते किंवा वेगवेगळ्या फिशरीजमध्ये काम करू शकते. या ठिकाणी फिश ब्रिडिग, प्रिझर्व्हिंग, मार्केटिंग या क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठी गरज असते.
फिशरीज टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी इनलँड फिशरीज फिश ब्रिडिग अ‍ॅण्ड कल्चर नर्सरी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अ‍ॅग्रीकल्चर
फिशरीज मॅनेजमेंट काही प्रमुख संस्था
श्री व्यंकटेश्वरा व्हेटेरिनरी युनिव्हर्सिटी, आंध्र प्रदेश आरएआरएस पट्टांबी, केरळ अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, बिरसा
अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, रांची इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, दिल्ली


पीजी डिप्लोमा इन हॉर्टकिल्चर
हॉर्टकिल्चर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर उद्यानशास्त्र, उद्यानविद्या किंवा बागकामशास्त्र. हिरव्यागार भाज्या, रंगीबेरंगी फुलं वाढवण्यासाठी हॉर्टकिल्चर तज्ज्ञाची गरज असते. आपल्या पृथ्वीवर असंख्य प्रकारची झाडं, पानं, फळं आहेत. ती झाडं, त्यांची फळं, पानं हे माणसाच्या आहाराचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या झाडांच्या जैविक जातींचं रक्षण करणं गरजेचं आहे.
हॉर्टकिल्चर तज्ज्ञ हेच काम करतात. झाडांची जोपासना करणं, त्यांना उत्तम फळं येतील याकडे लक्ष देणं, भाज्यांची गुणवत्ता तपासणं आणि फुलांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवणं या सर्व गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं. हॉर्टकिल्चर ही कृषी विज्ञानाचीच एक शाखा आहे. त्यासाठी पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन हॉर्टकिल्चर अभ्यासक्रम राबवला जातो.
हॉर्टकिल्चर शाखेच्या विद्यार्थ्यांना रोप आणणं अथवा तयार करणं, बियाणांची साठवणूक करणं, त्यांना योग्य ती जागा देणं, रुजवल्यानंतर त्यांना पुरेसं पाणी घालणं, बियाणांमध्ये वाढ करणं तसंच झाडांचं सौंदर्य वाढवणं, घरात लावता येण्याजोगी (इन डोअर), बाहेरील (आउट डोअर) झाडांच्या उत्तम जाती तयार करणं, यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातात. यासाठी जीवशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणूनच विज्ञान शाखेच्या पदवीधरांना या अभ्यासक्रमासाठी प्राथमिकता दिली जाते. बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.
भारतात हॉर्टकिल्चर इंडस्ट्रीचा विकास होण्याच्या खूप संधी आहेत. आपण तज्ज्ञ हॉर्टकिल्चरिस्ट तयार केले तर देशातील कुपोषणाची समस्या आपल्याला पूर्णपणे घालवता येईल.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जमीन उत्पादनाशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता येऊ शकतं. खासकरून भाज्या, धान्य, मसाले, फ्लोरिकल्चर, गार्डिनग आणि नर्सरी इंडस्ट्रीमध्ये काम करता येतं. त्याचबरोबर ऑर्नामेंटल गार्डनर्स म्हणून टेरेस गार्डन्स, कॉर्पोरेट नर्सरीज, नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीज ऑफ इंडिया या ठिकाणीदेखील काम करता येऊ शकतं. कामाचं ठिकाण आणि अनुभव यानुसार वेतन मिळतं. पण तरीही सरकारी नोकरीमध्ये सुरुवातीला १५ ते २० हजार प्रति महिना मिळतो.
या अभ्यासक्रमांतर्गत प्लान्ट ब्रिडिग, प्लान्ट फिजिओलॉजी, ट्रॉपिकल अ‍ॅण्ड ड्राय लॅण्ड फ्रूट प्रोडक्शन, ऑग्रेनिक हॉर्टकिल्चर, प्रपोगेशन अ‍ॅण्ड नर्सरी मॅनेजमेंट फॉर फ्रूट क्रॉप्स यांसारख्या विषयांचा समावेश असतो.
काही प्रमुख संस्था
अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी बिहार युनिव्हर्सटी
कॉलेज ऑफ हॉर्टकिल्चर,म्हैसूर युनिव्हर्सटी ऑफ मुंबई 

Read More »

गृहखरेदीत हवा

घरांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात घर किंवा जमीन घेणं हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरत आहे. घर खरेदीने गुंतवणूक तर होतेच पण पैसा सत्कारणी लागल्याचं समाधानही मिळतं. मात्र, ही बाब वाटते तितकी सोपी नाही. आयुष्यभराची मिळकत घरावर खर्च होणार असते. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणं आवश्यक आहे. 

घरामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय कधीही तोटयात जात नाही. कारण हल्ली राहत्या घरांची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेच लहान आणि मोठया शहरांतील घरांच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळतात. रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये आणखी तेजी येणार आहे. ही तेजी केवळ पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांमध्येच नव्हे तर लहान गावांमध्येही बदल घडवून आणणारी आहे. त्यामुळे तेथील घरांच्या किमतीही वाढणार आहेत, किंबहुना वाढू लागल्या आहेत. अशा वेळी घर खरेदी डोळसपणे केल्यास विकासक आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल. त्यासाठी पुढील काळजी घेणं आवश्यक आहे.
> घर खरेदी करण्यापूर्वी..
घर खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची योजना आखावी. खरेदी करायची स्थावर मालमत्ता भविष्यात किती फायद्याची ठरू शकेल, याचा विचार करावा. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकाच्या मनात काल्पनिक रचना (मॉडेल) तयार असणं चांगलं. त्यानुसार घराची शोधाशोध करणं सोपं जातं. घर घेतल्यानंतर 'आपण हे घर का घेतलं' हा निर्णय पुन्हा बदलता येत नाही. सुधारताही येत नाही. त्यामुळे ही खबरदारी आधीच घेणं आवश्यक असतं. कुठल्याही ठिकाणी प्रॉपर्टी घेताना केवळ बातम्यांवर विश्वास ठेवू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी चांगला रिअल इस्टेट एजंट, वकील, बँक यांचा सल्ला घ्यावा. उत्साहाच्या भरात एखादं घर खरेदी करताना आपण मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे मोजतो आणि नंतर नुकसान सहन करावं लागतं.
घर खरेदी करणं ही आपण करत असलेल्या गुंतवणुकांपैकी सर्वात मोठी गुंतवणूक असू शकते! एक छोटं नियोजन आपल्याला आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्यात मदत करेल.
नवीन घर खरेदी करण्यासाठी आपण कर्ज घेतलं असल्यास आणि कोणत्याही अनिश्चित घटनेमध्ये घरावरील अस्तित्वात असलेलं कर्ज फेडण्यास असक्षम असल्यास बचावाचा एक पर्याय म्हणजे पुरेसा लाइफ इन्शुरन्स आपल्याकडे असणं गरजेचं असतं. आवश्यक असलेला लाइफ इन्शुरन्स घेतल्याने, आपण घेतलेलं घर, आपलं कुटुंब आपल्या मालकीचं करण्यात सक्षम होतं.
स्थावर मालमत्ता खरेदी करताना बहुतेक वेळा ग्राहकाच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळेच ती खरेदी करण्यापूर्वी हे प्रश्न नक्की विचारा-
बिल्डरकडे (विकासक) योग्य सरकारी परवानगी म्हणजे महापालिका, विभाग विकास प्राधिकरण, वीज नियामक मंडळ आणि पाणीपुरवठा विभाग इत्यादींच्या परवानग्या आहेत का ?
कोणत्याही इमारतीचं बांधकाम सुरू करण्याचं प्रमाणपत्र विकासकाकडे आहे का?
विकासकाकडे जमिनीचं क्लीअर टायटल आहे का?
तयार ताबा घेण्यायोग्य विकासकाकडे मालमत्तेचं, मालमत्ता पूर्णत्वाचं प्रमाणपत्र आहे का? तसंच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे जागेचा ताबा मिळण्यापूर्वी मिळालं आहे का?
गृहकर्जातून घर घेताना बिल्डरकडे बँकेला तारण म्हणून ठेवण्याकरता त्या जागेचं अधिक ना हरकत प्रमाणपत्र आहे का? कारण हे प्रमाणपत्र त्याला विक्रीचा करार केल्याच्या नोंदणीनंतर लगेच द्यायचं असतं.
सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्या मालमत्तेचं डाउन पेमेंट करण्यास सुरुवात होते. त्यानंतर थोडया थोडया कालावधीनंतर पैशाचा भरणा करायचा असतो. या प्रत्येक टप्प्यानंतर खरेदीदाराला नियमितपणे खालील कागदपत्रं मिळावयास हवीत, तो त्याचा हक्क आहे.
विक्री कराराची कॉपी.
पैसे मिळाल्याची पावती.
विक्री कराराची नोंदणीकृत प्रत.
पझेशन रिसीट.
घर खरेदी करणा-याने वकिलाकडून विकासकाकडे जमिनीचा कायदेशीर अधिकार असल्याचं प्रमाणपत्र मिळवावं. गरज पडल्यास वकिलाकडून त्याचा अभ्यास करून घ्यावा. यामुळे तुमच्या फसवणुकीचा मार्ग बंद होईल. हे आवश्यक आहे..
हल्लीच्या टेक्नोसॅव्ही युगात प्रत्येक जण इंटरनेट सर्फिंग करत असतात. या माहितीच्या महाजालातून शहरात असलेल्या मालमत्तेची माहिती तो मिळवत असतो. असं असलं तरी जागेचा शोध ऑनलाइन घेत असताना आवडलेल्या जागेच्या ठिकाणी एकदा तरी भेट द्यावी. बिल्डरकडे असलेली सर्व कागदपत्रं, करार आणि मालमत्तेची प्रमाणपत्रं नीट तपासावीत. आजूबाजूच्या दुस-या जागांचे दर पडताळून पाहा. बांधकामाचा दर्जा, फ्लॅटमध्ये देण्यात येणाऱ्या इतर सुविधा जसं की फ्लोरिंग, किचन फिटिंग्ज इत्यादी तपासा. विकासकाने दिलेला नकाशा, जागेच्या बांधकामासाठी वापरलेल्या सामानाची गुणवत्ता, यांची योग्य माहिती घ्या. पिण्याचं पाणी, पाणी साठवण्याची जागा, नसíगक उजेड यांची गरज, वायुविजन, पाण्यासाठीची जोडणी, मलनि:सारण इत्यादी गोष्टींची माहिती नीट करून घ्या. त्याचबरोबर सर्वसामान्य सुविधा गटात(कॉमन सव्‍‌र्हिस एरिया) मोडणाऱ्या सर्व गोष्टी पडताळून पाहा आणि तिचा दर योग्य आहे का, याचाही अभ्यास करा. महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा, भूकंपविरोधी बांधकाम, पार्किंग सुविधा, लिफ्ट्स, पर्यायी मार्ग, जिने, गच्चीवर जाण्याचे मार्ग आणि सुरक्षा यांचाही अभ्यास करा.

 बांधकामाधीन अवस्थेतल्या इमारतीत घर खरेदी करताना..
काही जण इमारत बांधली जात असताना त्यात फ्लॅट प्री-बुकिंग करतात. तयार घरांपेक्षा निर्मितीप्रक्रियेतील घरांसाठी दर थोडा कमी असतो. शिवाय पैसे उभे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. कधी कधी प्रकल्प वेळेत पूर्ण करणं काही विकासकांना शक्य होत नाही. त्यामुळे ग्राहकांनीच बांधकामाधीन इमारतीत घर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची पडताळणी करणं गरजेचं आहे. ही इमारत कोणत्या विभागात येणार आहे? दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत ती बांधून होणार आहे की नाही, याची माहिती घ्या. जिथे विकासकाम अधिक जोराने चालू आहे, तिथे घरांचे दर अधिक असतील, मात्र बांधकाम चालू असेल, तो विभाग अद्याप विकसित व्हायचा असेल, तर तिथे कमी असतील.

 आवश्यक मंजुरी
'इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल (आयओडी)' आणि 'कमेन्समेंट सर्टिफिकेट (सीसी)' मिळाल्यावरच बिल्डर बांधकाम सुरू करू शकतो . 'आयओडी' साधारणत: वर्षभरासाठी असते. त्यानंतर त्याचं नूतनीकरण (रिन्यू) करावं लागतं. तुम्हाला ज्या मजल्यावर घर घ्यायचं आहे, त्या मजल्यासाठी 'सीसी' मिळाल्यावरच बुकिंग करा.

मालकीहक्क
संबंधित फ्लॅटवर बिल्डरचा मालकीहक्क असेल तरच तो ती मालकी अन्य ग्राहकाकडे हस्तांतरित करू शकतो. त्यामुळे घर घेण्यापूर्वी मालकीहक्क तपासून पाहायला हवा. तो ग्राहकाचा हक्कच आहे. 'टायटल सर्च'साठी वकिलाचा सल्ला घेता येईल. गृहकर्जासाठी अर्ज केल्यावर कर्जमंजुरी देण्यापूर्वी बँकाही 'टायटल सर्च' करतात. कर्जासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागली तरी सुरुवातीलाच कायदेशीर बाबी स्पष्ट होतात.

 सॅम्पल फ्लॅट
मार्केटिंगचा एक पर्याय म्हणून काही बिल्डर सॅम्पल फ्लॅट तयार करतात. आपला फ्लॅट कसा दिसेल, याचा नमुना ग्राहकांना यामुळे बघता येतो. आपल्या घरातील वैशिष्टय, बारकावे आणि अन्य पैलू सॅम्पल फ्लॅटप्रमाणेच असतील, याची खात्री बिल्डरकडून करून घ्यावी. तुमच्यात आणि बिल्डरमध्ये झालेल्या करारानुसार सर्व सोयीसुविधा सॅम्पल फ्लॅटमध्ये आहेत का, त्या तुमच्याही फ्लॅटला मिळणार आहेत का, तेही बघावं.

 मालमत्तेचा 'मॉर्गेज' मार्ग
बिल्डर बँका आणि एनबीएफसीकडून कर्ज घेतो आणि तो गृहप्रकल्प बँकेकडे तारण ठेवतो. बांधकाम सुरू असलेला फ्लॅट घेताना संबंधित रकमेचा चेक बिल्डरने आपल्या विशिष्ट बँकेतील विशिष्ट खात्याच्या नावाने काढायला सांगितल्यास समजावं की, संबंधित प्रकल्प तारण ठेवलेला आहे. त्या प्रकल्पातील फ्लॅट घेण्यासाठी बँकेचं 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) घ्यावं लागतं. त्यामध्ये फ्लॅटचा सर्व तपशील असावा लागतो. बिल्डरने बँकेकडून घेतलेले पैसे परत न केल्यास बँक इमारतीचा ताबा घेऊ शकते आणि फ्लॅट खाली करण्यास सांगू शकते. पण 'एनओसी' घेतली असल्यास हे संकट टळू शकतं.

 वेगवेगळे खर्च
किंमत कमी पडावी म्हणून बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटला पसंती दिली जाते. पण ही खरेदी करताना स्टॅम्प डयुटी आणि रजिस्ट्रेशन, इलेक्ट्रिक मीटर, गॅस कनेक्शन, फíनचर, फिटिंग यासाठी येणारा खर्चही विचारात घ्यावा. मोठय़ा गृहप्रकल्पांमध्ये बिल्डर पाच वर्षापर्यंत अ‍ॅडव्हान्स मेंटेनन्स डिपॉझिट घेतात.

 विकासकाची प्रतिमा
व्यवहार करण्यापूर्वी विकासकाची विश्वासार्हता, त्याचे आतापर्यंतचे प्रकल्प, कामगिरी आणि प्रतिमा यांची खातरजमा करून घ्यावी. मोठे आणि चांगले नाव असलेल्या बिल्डरच्या प्रकल्पांचा विचार केलेला बरा. कारण त्यांच्याकडे अंमलबजावणीची क्षमता आणि संसाधनं तुलनेने जास्त असतात. या क्षेत्रात नवीन असलेल्या विकासकांशी व्यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. रिअल इस्टेट मार्केट कोसळल्यास सर्वाधिक फटका त्यांना बसण्याची शक्यता असते.

 विक्रीबाबत अटी
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तुम्ही फ्लॅट घेतला असेल आणि तो पूर्ण होत आला असताना वाढलेल्या किमतीला तुम्हाला तो विकायचा असेल तर तशा तरतुदी बिल्डरसोबतच्या करारामध्ये आधीच करायला हव्यात. बिल्डर सेल अ‍ॅग्रीमेंटमध्ये 'नो सेल' अशी तरतूद करतात. बांधकाम पूर्ण झाल्यावर किती काळाने फ्लॅट विकता येईल, ते त्यामध्ये नमूद केलेलं असतं. हा कालावधी दीड ते तीन वर्षाचा असतो. त्यापूर्वीच फ्लॅट विकायचा असेल तर बिल्डरकडून 'एनओसी' घ्यावं लागतं.

 घरास अर्थसहाय्य करण्यासाठी कर्ज
बरेच लोक (अर्थसहाय्य आणि कर बचतीमुळे) नवीन घर खरेदी करताना त्यांच्या घराची संपूर्ण किंमत देण्यास अनुत्सुक असतात. या मुख्य कारणामुळे पुष्कळ लोक नवीन घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात.

 गृहकर्ज घेतेवेळी
कर्जमागणी अर्ज कसा करावा, किती कर्ज मिळू शकतं, अन्य अटी आणि शर्ती, तसंच अस्थायी आणि स्थायी (फ्लोटिंग आणि फिक्स) व्याजदर म्हणजे नेमकं काय, यातील कोणता व्याजदर स्वीकारावा, अशा प्रश्नांचं निरसन वेळीच होणं गरजेचं असतं.
गृहकर्ज शक्यतो राष्ट्रीयीकृत बँक अथवा केवळ घरासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या एचडीएफसी, जीआयसी होम फायनान्स, एलआयसी होम फायनान्स यांसारख्या वित्तीय संस्थांकडून घ्यावं. गृहकर्जासाठीचा कर्जमागणी अर्ज सर्व संस्थांचा साधारपणे सारखाच असतो.
त्यामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे माहिती आणि कागदपत्रं द्यावी लागतात.
अर्जदाराची स्वत:ची माहिती-उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, पॅनकार्ड, निवासाचा दाखला.
नोकरी/व्यवसाय याबाबतची माहिती.
वार्षकि उत्पन्न व त्याबाबतची पूरक कागदपत्रं (मागील ३ वर्षाचे फॉर्म १६, व्यावसायिक असल्यास मागील ३ वर्षाचे ताळेबंद)
फ्लॅट खरेदीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर विकासकाबरोबर झालेल्या कराराची प्रत आणि करार करतेवेळी त्याला दिलेल्या रकमेची पावती

Read More »

कानमंत्र सुरक्षित घराचा

असुरक्षितता हा जणू आजच्या युगाचा मंत्रच बनला आहे. नोकरीपासून रस्ताप्रवासापर्यंत सर्वत्र आपलं बस्तान मांडलेल्या या असुरक्षिततेच्या विळख्यातून घरही सुटलेलं नाही. किंबहुना, अलीकडील काळात घरांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची बनली आहे. घरफोडी, चोऱ्या ही कारणे आहेतच, पण आग लागण्यासारख्या घटनाही अलीकडील काळात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या घरकुलाच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज ठरली आहे. यासाठी तंत्रज्ञानाचाही आधार घेता येईल
 चोरीच्या वाढत्या घटनांच्या बातम्या नेहमीच वर्तमानपत्रातून वाचायला मिळत असतात. अशा वेळी रात्री-बेरात्री घरात थोडंसं खुट्ट झालं की आपली झोप चटकन उडते आणि आपण घरभर फिरून येतो. असं होऊ नये म्हणून घर अशा प्रकारे सुरक्षित करावं की, आपल्याला कुठलीही चिंताच लागू नये. घराची आणि घरातल्यांची सुरक्षितता आपण स्वत: करू शकतो. मात्र, त्यासाठी थोडा समजूतदारपणा, सावधगिरी आणि जागरूकता राखणं गरजेचं आहे.
पिप होल आवश्यक : सर्वप्रथम दरवाजावर 'पिप होल' असावं. म्हणजे बाहेर कोण आलं आहे, हे चटकन समजतं. अशा प्रकारचं होल अलीकडे प्रत्येक ठिकाणीच असतं. मात्र घरात लहान मुलं असतील तर हे पिप होल मुलांच्या उंचीनुसार बनवावं. जेणेकरून त्यांनाही बाहेर कोण आलं आहे, हे समजेल.
दोन दरवाजे : घराला मुख्य दरवाजासोबत आणखी एक मजबूत दरवाजाही असावा. तसंच गच्ची असल्यास आणि बाल्कनीच्या दरवाज्याबाबतदेखील सुरक्षा व्यवस्था असावी. या मार्गाद्वारे बाहेरच्या व्यक्तीला आपल्या घरात थेट प्रवेश मिळू शकतो, हे लक्षात ठेवावं.
तंत्रज्ञानाचा आधार घ्या : घरात ओळख दर्शवणारी सुरक्षितता म्हणजे 'बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन' असावा. याद्वारे आपली बोटं, हात किंवा चेहऱ्याच्या ओळखीने दरवाजा उघडेल किंवा लावता येऊ शकेल. घराच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थादेखील निश्चित करावी. जेणेकरून रात्रीदेखील आपणाला बाहेरच्या हालचाली सहजपणे बघता येतील. याव्यतिरिक्त घराच्या मुख्य दरवाजावर व्हीडिओ डोअर फोन लावल्यास उत्तम ठरेल.
आपत्कालीन परिस्थितीसाठीची तयारी : घरात अशी कुठलीही वस्तू ठेवू नये जी चटकन आग पकडणारी असेल. अशा कुठल्याही आपत्कालीन स्थितीसाठी घरात इमर्जन्सी एक्झीट असावी. जे आतून सहजपणे उघडू शकेल. इलेक्ट्रीसिटी वायरिंग, स्विच बोर्ड इत्यादी गोष्टी चांगल्या स्थितीत असाव्यात, जुन्या नकोत. शॉर्ट सíकट झाल्यास धुरावर किंवा आगीवर पाणी टाकू नये. तर मेन स्विच बंद करावा आणि घराच्या बाहेर यावं. मुलांच्या बाबतीत दुर्घटना होण्याची शक्यता थोडी जास्त असते कारण मुलं धोक्यांबाबत गांभीर्याने विचार करू शकत नाहीत. मूल जर चार वर्षापेक्षा मोठं असेल, तर त्याला धोक्यांबाबत आणि त्याच्या परिणामांबाबत सांगावं, जेणेकरून ते स्वत: आपली सुरक्षितता राखू शकेल.
मुलांना करा सजग : दरवाजा कोणी ठोठावल्यास अथवा बेल वाजवल्यास सर्वप्रथम पिपहोलमधून बघावं, अनोळख्या व्यक्तीसाठी कधीही दरवाजा उघडू नये, हे मुलांना आवर्जून सांगावं. खिडक्यांवर स्लायिडग दार लावणं योग्य नाही. कारण इथून मूल पडू शकतं. म्हणून अशा खिडक्यांना जाळी जरूर लावावी. खिडकी, गच्ची अथवा बाल्कनीजवळ असं कुठलंही फर्निचर ठेवू नये ज्यावर मूल चढून पडू शकेल. गच्चीची किंवा बाल्कनीची पॅरापिट वॉल उंच ठेवावी.
इतर काळजी : घरात क्लिअर ग्लास म्हणजे ज्या काचेतून आरपार बघता येईल, अशी काच असल्यास त्यावर गडद रंगाची स्क्रिन किंवा स्टिकर लावावं, ज्यामुळे मुलांना समजेल की ही काच आहे, याला धडकू नये. घराला सेल्फलॉक डोअर किंवा लॅच कुलूप असेल तर मुलांना एकटं सोडू नये आणि चावी घेतल्याशिवाय बाहेर निघू नये. कारण दरवाजा बंद झाल्यास मूल आत अडकू शकतं.
सुरक्षित घरासाठी सेल्फलॉकच्या दोन ते तीन किल्ल्या ठेवाव्यात. घराला डबलडोअर असावं. त्यापैकी बाहेरचा दरवाजा धातूचा आणि आतला दरवाजा लाकडाचा असावा. मुख्य आणि आतील दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारची लॉकिंग व्यवस्था असावी. त्यासाठी नॉर्मल लॉक, डेड बोल्ट्स, सिरम लॉक, फ्लोर लॉक इत्यादींचा वापर करावा. दरवाज्यावर सेफ्टी चेन असावी. म्हणजे अनोळखी व्यक्तीसाठी पूर्ण दरवाजा उघडावा लागणार नाही. घरात येणा-या कुठल्याही व्यक्तीकडे म्हणजे टेलिफोन दुरुस्त करणारा, टीव्ही दुरुस्त करणारा किंवा मीटर रीडिंग घेणारा कोणीही आल्यास त्याच्याकडे ओळखपत्र जरूर मागावं. आपल्या कामवाल्या बाईबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. नियमानुसार पोलिस स्टेशनमध्ये तिचं नाव, पत्ता नोंदवावा.
आपण कुठे बाहेर फिरायला जाणार आहोत, याची माहिती कोणाला देऊ नये. घराचा दरवाजा, खिडकी, बाल्कनी किंवा गच्चीजवळ मोठं झाड नसावं जेणेकरून, त्याचा आधार घेऊन कुणीही सहज वर चढू शकेल. बाहेर जाताना घराची किल्ली कोणालाही देऊ नये. बंगला असल्यास घराला चहूबाजूंनी भिंत (बाउंड्री वॉल), काटेरी झाडांचं कुंपण किंवा तार लावावी. घरात एक पाळीव कुत्रादेखील ठेवावा. घरातील प्रत्येक लहान-मोठय़ा वस्तूंवर काही ओळखीची चिन्हं लावावीत, जेणेकरून आपली वस्तू चुकून चोरीला गेल्यास ती चटकन ओळखता येईल.
एखादी व्यक्ती संशयास्पद आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. घराचे पडदे जाड आणि गडद रंगाचे असावेत. जेणेकरून कोणीही आतील मौल्यवान वस्तू डोकावून बघू शकणार नाही. सुट्टयामध्ये बाहेर जाणार असाल तर सेल्फलॉक नक्की लावावं आणि घरातील एखादा दिवा सुरू ठेवावा. यामुळे घरात कुणीतरी आहे, असं वाटेल. यासाठी टायमर असणा-या दिव्यांचा वापर करावा. घराच्या सुरक्षिततेसाठी अशा काही उपायांचा वापर करावा.

Read More »

काळी मैना दाखवतेय रोजगाराचा राजमार्ग

महाराष्ट्रात काळी मैना म्हणजे करवंद. ही आरोग्य व धन देणारी मोठी संपत्ती आहे. एकूण उत्पन्नाच्या पाच ते दहा टक्के फळांचा वापर केला जातो. अन्य फळे अनास्थेमुळे फुकट जातात. करवंदाच्या फळावर प्रक्रिया केल्यास वर्षभर त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो. तसेच त्यापासून शेतक-यांना चांगले उत्पन्नही मिळू शकते.
काळी मैना म्हणजे करवंद खाऊन आपण शारीरिक आणि मानसिक संतुलन जपू शकतो. आपल्याकडे सहज मिळत असल्याने या मेव्याकडे दुर्लक्ष होतो. विदेशातून त्याच्यावर प्रक्रिया झाल्यावर तोच पदार्थ परदेशी आहे, असे सांगून मोठया दिमाखात सेवन करतो. करवंदाचे काटे लागतात म्हणून ब-याच मोठया समृद्ध मेव्यापासून दुरावत आहोत. या मेव्याला जपायला हवे. करवंदाच बहुगुणीपणा समजून घ्यायला हवा.
करवंद म्हणजे जंगलातील काळी मैना. हे पीक राज्यातील द-याखो-यात मुबलक होते. या पिकांच्या फक्त पाच ते १० टक्के फळे खाल्ली जातात तर ९० ते ९५ टक्के फळे वाया जातात. करवंद हे लोह खनिजाचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. प्राचीन काळापासून करवंदांचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. पच्शिम घाटमाथ्यावर आदिवासी करवंदाचा वापर रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी तसेच जठरांचे संरक्षणकवच म्हणून करतात. करवंदाचा वापर वेगवेगळया आजारांमध्ये जसे अ‍ॅनिमिया, त्वचारोग, जखमा लवकर भरून येण्यासाठी केला जातो. पाणी १० ग्रॅम, ऊर्जा ३६४ किलो कॅलरी, प्रथिने २ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ १० ग्रॅम, खनिजे ३ ग्रॅम, कबरेदके ६७ ग्रॅम, कॅल्शिअम १६० मिलीग्रॅम, फॉस्फरस ६० मिलिग्रॅम, लोह ३९ मिलीग्रॅम, जीवनसत्त्व अ १६१९ आय. यू., जीवनसत्त्व क ११ मिलीग्रॅम असा मोठा खजिना ठेवून असणारी ही काळी मैना आपल्याला वर्षभर वापरता येणे शक्य आहे.
अशी ही बहुगुणी करवंदांची फळे ठरावीक हंगामातच उपलब्ध असतात आणि त्याला टिकवणे कमी असल्याने ती वाया जातात. तसेच सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार सरबत, लोणचं, जॅम, जेली यांसारख्या पदार्थाची मागणी बरीच वाढली आहे. करवंदांच्या फळावर प्रक्रिया करून निरनिराळे पदार्थ तयार केल्यास करवंदांची गोडी आपल्याला वर्षभर चाखता येईल आणि यातून शेतक-यांना आर्थिक फायदाही मिळविता येईल. करवंद आर. टी. एस. स्क्वॅश, करवंद सिरप, करवंद लोणचं, करवंद जॅम, करवंद जेली हे सर्व पदार्थ तयार करण्याबाबत काही प्रक्रिया जाणूनघ्यायला हरकत नाही. कच्च्या करवंदांची पेयेप्रथम पूर्ण वाढलेली कच्ची करवंदे देठ काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर एक-दोन या प्रमाणात पाणी घेऊन करवंदे फुटेपर्यंत शिजवावीत. करवंदे फुटल्यानंतर त्यापासून आलेला रस गाळून घ्यावा. गाळलेल्या रसात पुढीलप्रमाणे घटक वापरून पेय तयार करावे.
कच्च्या करवंदाचा रस : ५०० ग्रॅम
एकूण विद्राव्य घटक : २० टक्के, १९० ग्रॅम साखर
आम्लता : ०.३ टक्के
पाणी : ३१० ग्रॅम
तयार झालेल्या पेयात सोडियम बेंझोएट १४० मि. ग्रॅ. प्रति किलो
या प्रमाणात टाकावे. अशा प्रकारे तयार झालेले पेय र्निजतूक केलेल्या बाटल्यांत भरून त्याचे ३० मिनिटे पाश्र्चरीकरण करून बाटल्या थंड व कोरडया ठिकाणी ठेवाव्यात.
कच्च्या करवंदांचा स्क्वॅश
पेय तयार करण्यासाठी दिलेल्या कृतीनुसार रस तयार करावा. कच्च्या करवंदांच्या रसात पुढीलप्रमाणे घटक वापरून स्क्वॅश तयार करावा.
कच्च्या करवंदाचा रस : ५०० ग्रॅम
एकूण विद्राव्य घटक : ४४० ग्रॅम साखर
आल्मता : ५ ग्रॅम
पाणी : ३.८ टक्के प्रमाणे ५५ ग्रॅम
तयार झालेल्या पेयात सोडियम बेंझोएट ६१० मि. ग्रॅ. प्रतिकिलो या प्रमाणात मिसळावे आणि तयार झालेला स्क्वॅश र्निजतुक केलेल्या बाटल्यांत हवाबंद करावा. आस्वाद घेण्यापूर्वी सिरपमध्ये दोन ते तीन पट पाणी मिसळावे.
कच्च्या करवंदांचे सिरप
पेय तयार करण्यासाठी दिलेल्या कृतीचा वापर करून रस तयार करावा. कच्च्या करवंदांचा सिरप तयार करण्यासाठी रसात साखर योग्य प्रमाणात मिसळून त्यातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६२.५ टक्के करावे. सिरपमध्ये योग्य प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळून सिरपची आम्लता १.५ टक्के ठेवावी. र्निजतुक केलेल्या बाटल्यात सिरप भरून बाटल्या थंड व कोरडय़ा ठिकाणी ठेवाव्यात. आस्वाद घेण्यापूर्वी सिरपमध्ये ४ ते ५ पट पाणी मिसळावे.
कच्च्या करवंदांचे लोणचे
ताजी कच्ची करवंदे देठ काढून ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. लोणच्यासाठी पुढीलप्रमाणात साहित्य वापरावे
कच्ची करवंदे – १.५ किलो, मीठ – २.५० ग्रॅम, मेथी -२० ग्रॅम, हळदपूड -३० ग्रॅम, हिंग – ५० ग्रॅम, लाल मिरची पावडर – ४६ ग्रॅम, मोहरी पावडर/ डाळ – १०० ग्रॅम, गोडेतेल – ४०० ग्रॅम एकत्र केल्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात करावी.
प्रथम करवंदांना निम्मे मीठ व निम्मी हळद लावून ती स्टीलच्या पातेल्यात दोन ते तीन तास ठेवावीत यामुळे करवंदातील पाणी निघून जाईल. २०० ग्रॅम गोडेतेल घेऊन त्यात मेथी, हिंग, मोहरी वापरून फोडणी तयार करावी. हळद व मीठ लावलेल्या करवंदामधून पाणी काढून टाकावे आणि तयार केलेली फोडणी त्यात मिसळावी. नंतर उरलेले मीठ, हळद व तिखट त्यात मिसळावे. लोणच्यात एक किलोस २५० मिलिग्रॅम सोडियम बेंझोएट मिसळून बाटलीत भरावे. शिल्लक गोडेतेल उकळून थंड करून बाटलीत ओतावे. तेलाची पातळी लोणच्यावर राहील याची काळजी घ्यावी.
कच्च्या करवंदांचे जॅम
कच्ची करवंदे देठ काढून तीन-चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर १:१:५ या प्रमाणात करवंद आणि पाणी घेऊन करवंदे चांगली शिजवावीत. त्यानंतर ती कुस्करून एक मिमीच्या स्टील चाळणीतून त्याचा गर वेगळा करावा. नंतर एक किलो गरात एक किलो साखर आणि एक ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मिश्रण पेजेप्रमाणे घट्ट होईपर्यंत उकळावे. मिश्रण करपू नये म्हणून सतत ढवळत राहावे. मिश्रणाचे तापमान १०५ अंश सेल्सिअस झाले किंवा एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६८ टक्के झाल्यावर जॅम तयार झाला असे समजावे. यावेळी एक चमचा जॅम घेऊन थोडा थंड करून खाली टाकावा.
तयार जॅम खाली पडताना एकसंध गोळीसारखा पडतो. जॅमच्या कडेला पाणी सुटलेले दिसत नाही असे निच्श्रित झाल्यावर जॅम पूर्णपणे तयार झाल्याचे स्पष्ट होते. जॅममध्ये २५० मिलीग्रॅम सोडियम बेंझोएट प्रति किलो जॅम या प्रमाणात मिसळून जॅम थोडा थंड करून नंतर रुंद तोंडाच्या र्निजतुक केलेल्या बाटलीत भरावा.
कच्च्या करवंदांची जेली
कच्च्या करवंदाची जेली करण्यासाठी करवंदे व पाणी १:१:५ प्रमाणात घेऊन फुटेपर्यंत शिजवावी. करवंदे शिजल्यानंतर करवंदाचा निव्वळ रस कापडातून गाळून घ्यावा. एक किलो रसात ७५० ग्रॅम साखर मिसळून मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळावे. रस जसाजसा आटत जातो तसे त्याचे उष्णतामान वाढत जाते. ते १०५ अंश सेल्सिअस झाल्यावर जेली तयार होते. या वेळी एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६८ टक्के असते. थोडासा रस चमच्यामध्ये घेऊन थोडा थंड करून खाली टाकावा. रस पडताना त्याचा थेंब लांबट होऊन खाली पडला तर जेली तयार झाली असे समजावे. अशा प्रकारे तयार झालेली जेली थोडी थंड होऊ द्यावी व नंतर उकळून र्निजतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बरणीत भरावी.
कच्च्या करवंदांची चटणी
कच्च्या करवंदाच्या चटणीसाठी शिजवलेल्या करवंदाचा गर एक किलो, साखर एक किलो, वेलची १५ ग्रॅम, दालचिनी १५ ग्रॅम, लालमिरची पावडर १५ ग्रॅम, कांदा बारीक केलेला ६० ग्रॅम, लसूण बारीक केलेली १५ ग्रॅम, मीठ ४० ग्रॅम, व्हिनेगार ९० मिली. असे मिश्रण वापरावे. कच्ची करवंदे देठ काढून पाण्याने स्वच्छ धुवून शिजवून घ्यावीत आणि चाळणीच्या सहाय्याने त्याचा गर काढून घ्यावा. सर्वप्रथम करवंदाच्या गरामध्ये साखर आणि मीठ मिसळून मिश्रण उकळत ठेवावे. त्यानंतर वेलची, दालचिनी, मिरचीपूड, आले, कांदा आणि लसूण मलमलच्या कापडात बांधून ती पुरचुंडी उकळत ठेवलेल्या मिश्रणात सोडावी व मिश्रण ढवळत राहावे. मिश्रण जॅम प्रमाणे घट्ट झाल्यावर मसाल्याची पुरचुंडी पिळून घ्यावी. नंतर मिश्रणात व्हिनेगार टाकून ते थोडावेळ उकळावे. चटणी टिकण्यासाठी २५० मिलिग्रॅम सोडिअम बेंझोएट प्रति किलो चटणीत मिसळावे.
पिकलेल्या करवंदांचे सिरप
पूर्ण पिकलेली करवंदे निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. करवंदाचा रस काढावा. यात एक किलो रसासाठी दोन किलो या प्रमाणात साखर टाकून विद्राव्य घटकांचे प्रमाण ६८.५ टक्के करावे. त्याचप्रमाणे सिरपमध्ये १४ ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. तयार झालेले सिरप र्निजतुक केलेल्या बाटलीत भरून ठेवावे. सिरपचा आस्वाद घेताना त्यात चवीनुसार पाच ते सहा पट पाणी टाकावे. हे सर्व करंवदाचे पदार्थ आहेत. याशिवाय आणखी काही पदार्थ प्रत्येकाला आपाल्या पद्धतीनुसार करता येणे शक्य आहे. जेणेकरुन या काळी मैनेच्या माध्यमातून रोजगाराचा राजमार्ग खुला होऊ शकतो. सध्या करवंदे उपलब्ध आहेत. आपण थोडा वेळ काढला आणि पदार्थ तयार करण्याचे मनावर घेतले तर सारेच शक्य आहे. आपल्याला हवी ती मदत देण्यास आम्ही तयार आहोतच.

Read More »

न्यूझीलंडचे किवीफ्रूट भारतात

न्यूझीलंडमध्ये तयार होणारे आरोग्यदायी, चविष्ट 'किवीफ्रूटस' भारतात दाखल झाले आहेत.
न्यूझीलंडमध्ये तयार होणारे आरोग्यदायी, चविष्ट 'किवीफ्रूटस' भारतात दाखल झाले आहेत. पौष्टिक, स्वादिष्ट आणि भरपूर जीवनसत्त्व असलेली ही फळे झेस्प्री इंटरनॅशनलने (आशिया) आणली आहेत. भरपूर रस असलेली ही फळे कडाक्याच्या उन्हापासून शरीराला थंडावा देतात. संत्र आणि सफरचंदापेक्षाही यात जास्त पोषणमूल्य आणि जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे या फळाला 'सुपर फ्रूट' असे संबोधले जाते.
भारतात कडक उन्हाळा असल्याने घाम मोठया प्रमाणावर बाहेर पडतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन निर्जलीकरणाचा त्रास होत असतो. रोज दोन 'किवीफ्रूटस' खाल्ल्यास दिवसभराची 'क' जीवनसत्त्वाची गरज भागू शकते.
महिलांनी हे फळ खाल्ल्यास त्यांच्या शरीरातील लोहाची क्षमता भरून निघते. तसेच हे फळ पोटॅशियमने समृद्ध असल्याने हृदयविकार, मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.


Read More »

..आधी हे 'करून दाखवावे'

 महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने आपले घोडे दामटवण्यास सुरुवात केली. रेसकोर्सच्या जागेचा भाडेकरार केव्हा संपतो आणि आम्ही त्याचा कधी ताबा घेतो, असे वातावरण निर्माण करणा-या शिवसेनेने या जागेवर जगातील नववे आश्चर्य म्हणून भव्य उद्यान बांधण्याचा संकल्प सोडला.
महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने आपले घोडे दामटवण्यास सुरुवात केली. रेसकोर्सच्या जागेचा भाडेकरार केव्हा संपतो आणि आम्ही त्याचा कधी ताबा घेतो, असे वातावरण निर्माण करणा-या शिवसेनेने या जागेवर जगातील नववे आश्चर्य म्हणून भव्य उद्यान बांधण्याचा संकल्प सोडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात या उद्यानाच्या संकल्पचित्राचे सादरीकरण प्रसारमाध्यमांसमोर करून आपले 'स्वप्न' दाखवले. पण भाडेकरार संपण्यापूर्वीच उद्यानासाठी उतावीळ असलेली शिवसेना करार संपुष्टात आल्यानंतर शांत झाली.
९९ वर्षाकरता रेसकोर्सची जागा भाडेकरारावर दिल्यानंतर हा करार पहिल्यांदा १९९४ मध्ये संपला होता. त्यानंतर तब्बल १० वर्षानी म्हणजेच २००४ मध्ये रॉयल टर्फ क्लबसोबत १९ वर्षाचा भाडेकरार करण्यात आला. संपलेल्या कराराचे नूतनीकरण न करताच रेसकोर्स चालवायला दिले होते. करार संपल्यानंतर ही जागा ताब्यात घेणे सहज शक्य होते. मात्र, त्या वेळी तसे झाले नाही. आता राज्य सरकारने ही जागा ताब्यात घेऊन त्यावर मोठे उद्यान बांधावे म्हणून मागणी होत आहे.
राज्यात १९९५ ते ९९ या कालावधीत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. त्याच वेळी महापालिकेत युतीची सत्ता होती. या काळातच रेसकोर्सच्या जागेचा करार संपुष्टात आला होता. मात्र, त्यानंतरही 'रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब'ला रेसकोर्सची जागा बेकायदा वापरासाठी देण्यात आली. त्या वेळी ही जागा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने आवाज उठवला नाही. मात्र आज शिवसेनेला ही जागा ताब्यात का घ्यावीशी वाटते याचाही विचार होणे आवश्यक आहे.
महापालिकेत शिवसेना सत्तेवर आहे. रेसकोर्सची जागा ताब्यात घेता येईल किंवा नाही हा नंतरचा मुद्दा आहे. मात्र तरीही रेसकोर्सच्या जागेवर भव्य उद्यान बांधण्याचा संकल्प उद्धव ठाकरेंनी केला आहे. पण ज्या महापालिकेच्या ताब्यात राणीबागसारखे प्रशस्त असे उद्यान व प्राणीसंग्रहालय आहे.
भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्याचे मनसुबे आखले गेले. त्याचे सुमारे ४८० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम कासव गतीने सुरू आहे. हे काम सुरू असल्याने नवे प्राणी आणलेले नाहीत तर जुन्या प्राण्यांचीही पुरेशी काळजी न घेतली गेल्यामुळे त्यांचेही काही खरे नाही. पिंजरे रिकामे होऊ लागले आहेत.
या उद्यानाच्या कामाबाबत विविध विभागातील मंजुरीच्या अडचणी, विरोध होत असल्यामुळेच काम वेळेवर होत नसल्याचा युक्तिवाद शिवसेनेचे नेते करतील. राणीबागेसाठी जे हेरिटेज आरक्षण आहे. तेच आरक्षण रेसकोर्ससाठीही आहे. शिवाय जोडीला सीआरझेड आहेच. ज्या महापालिकेच्या प्रशासनाला आणि शिवसेनेला शिवाजी पार्कमधील चौथ-याच्या पुढील बांधकामासाठी सीआरझेडची मान्यता आणता आली नाही, ते या रेसकोर्सच्या जागेसाठी कुठून आणणार? असा प्रश्न आहे.
शिवसेनेने नव्या उद्यानांची थीम मांडली असली तरी पाच वर्षापासून मुंबईत थीम गार्डनची संकल्पना रुजली आहे. जिथे कमी खर्चात उद्यानांच्या सुशोभीकरणाचे काम केले जात होते, तिथे थीम गार्डनच्या नावाखाली कोटयवधी रुपयांचा खर्च केले गेला आहे. मुंबई महापालिकेने २२ थीम गार्डनची कामे जाहीर केली. पण प्रत्यक्षात १३ गार्डनची कामे त्यांना पूर्ण करता आली.
या थीम गार्डनच्या नावाखाली तब्बल ९५ कोटींहून जास्त पैसे खर्च केले गेलेत. गार्डनसाठी कोटयवधी रुपये खर्च केल्यानंतरही संबंधित कंत्राटदारांकडूनच याची योग्य देखभाल केली जात नाही. विजेचे पैसे भरले नसल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. खेळाचे साहित्य, बसण्याचे बाकडे तुटून गेलेत. याकडे महापालिकेतील सेनेच्या नेत्यांना लक्ष देता येत नाही आणि ते जगातील नववं आश्चर्य बनवायला निघालेत. खरं तर महापालिकेची ही बकाल झालेली थीम गार्डनच जगातील आश्चर्यापैकी एक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या सरदारांना सांगून किमान विकसित केलेल्या उद्यानांकडे तरी लक्ष द्यायला सांगावे. जगातील नववं आश्चर्य उभारून मुंबईकरांसाठी कोणता लाभ करून दिला जाणार आहे, हा प्रश्न उरतोच.
रेसकोर्सची जागा ही कुस्त्रो वाडिया यांनी सरकारला दान म्हणून दिलेली आहे. आज या रेसकोर्सवर सर्वसामान्यांचे दर्शन घडत नाही. पण या रेसकोर्सची खाती परदेशांतही असून मुंबईत येणारे परदेशी पर्यटकांचे हे ठिकाण म्हणजे पहिली पसंती असते. हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. असे हे रेसकोर्स सर्वसामान्यांसाठीही खुले करावे. भाडेकरार संपला म्हणून ते ताब्यात घेणे चुकीचे ठरेल.
या रेसकोर्सवर रॉयल टर्फ क्लबने 'सबलिज' करत अन्य कंपनीला रेस्तराँ चालवण्यास दिले आहे. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाईही व्हायलाच हवी, हा कराराच भंग आहे. पण करार संपला म्हणून जागा ताब्यात घेण्यासाठी जर शिवसेना आग्रही असेल तर मग शिवाजी पार्कच्या पार्क क्लबबाबत मूग गिळून बसणे कितपत योग्य आहे. सेंच्युरी मिलच्या जागेवरील भाडेकरार संपूनही त्याचा ताबा अद्याप घेतला गेलेला नाही.
टाइम्स ऑफ इंडियाचा करार संपल्यानंतरही त्याचाही ताबा घेण्यात आलेला नाही. महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडे आज अशी अनेक प्रकरणे असून करार संपुष्टात येऊनही संबंधित कराराचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आधी 'हे करून दाखववावे' आणि मग नवव्या आश्चर्याची स्वप्न पाहावीत, अशीच चर्चा होत आहे.

Read More »

स्थानिक बियाणे हेच शेतीचे बलस्थान

नैऋत्य मोसमी वा-यांच्या आगमनाची वर्दी प्रसारमाध्यमांतून पोहोचली आहेच. हवामानातील बदलही पाऊस येत असल्याचा संदेशही देतोय.
नैऋत्य मोसमी वा-यांच्या आगमनाची वर्दी प्रसारमाध्यमांतून पोहोचली आहेच. हवामानातील बदलही पाऊस येत असल्याचा संदेशही देतोय. महाराष्ट्रभर दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहतोय. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा भारतातील शेतकरी वर्ग आजही पंचांगातील नक्षत्रे आणि वाहन यावरून पावसाचा अंदाज बांधतात. यंदा सात जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन हत्ती आहे. तर २१ जूनपासून आद्र्रा नक्षत्र लागत असून त्याचे वाहन बेडूक आहे. पाच जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. या तीनही नक्षत्रांची वाहने पाण्याशी संबंधित असल्यामुळे या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील शेतक-यांचे भात हेच मुख्य पीक असल्यामुळे आणि ते पावसाच्या पाण्यावरच होत असल्यामुळे त्याप्रमाणे शेतक-यांचे नियोजन आवश्यक आहे. संकरीत व सुधारित भात बियाणे खरेदी करताना जात किती दिवसात तयार होणार आहे हे पहावे. त्याची खात्री झाल्यावरच पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे. हल्ली शेतक-यांचा कल बाजारातील बियाणे घेण्याकडे मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भविष्यात आपण परावलंबी होण्याची भीती वाटत आहे. आपल्या स्थानिक जाती हेच बलस्थान आहे. या जातीपासूनच नवनवीन सुधारित संकरित जाती तयार होत असतात. तेव्हा या जाती आपणच जोपासल्या वाढवल्या पाहिजे. दक्षिण भारतात काही स्वयंसेवी संस्था हे काम इमानेइतबारे करत आहेत.
तेव्हा सुधारित संकरीत भात बियाणांबरोबरच स्थानिक जातींचा वापर केला पाहिजे. तसेच बियाणांवर वीज प्रक्रिया ही करायला हवी. तीन टक्के मिठाच्या द्रावणात बियाणे बुडवून द्रावणावर तरंगणारे बी काढून टाकावे. तळाशी राहिलेले जड बी स्वच्छ पाण्याने दोनदा किंवा तीनदा धुवावे आणि सावलीत २४ तास वाळवावे. नंतर एक किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात थायरम हे बुरशीनाशक चोळावे.
बियाणे खरेदी अगोदरच करावी. पाऊस पडल्यावर बियाणे खरेदीसाठी तुडुंब गर्दी होते आणि मिळेल ते बियाणे आपण खरेदी करतो आणि आपले नियोजन फसते. तेव्हा हंगामापूर्वी घेणा-या जातीची पूर्ण माहिती घेऊनच बियाणे खरेदी करावे म्हणजेच दगदग आणि मन:स्ताप दोन्ही टाळता येईल. बियाण्याबरोबरच खताचेही नियोजन करायला हवे. आता रासायनिक खते गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट महाग झालेली आहेत. त्यामुळे शेणखत किंवा कंपोस्ट याचा वापर आणि हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांवरील खर्च कमी करता येईल.
हिरवळीच्या खतांमुळे जमिनीला सेंद्रीय खतांचा पुरवठा होतो. जमिनीतील जीवाणूंची कार्यक्षमता वाढल्यामुळे जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणांमध्ये आमूलाग्र सुधारणा घडून येते. कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनामुळे असे दिसून आले आहे की, गिरिपुष्पाचा पाला हेक्टरी १० टन घातल्यास भाताचे उत्पन्न शिफारस केलेल्या रासायनिक खताच्या मात्रांपासून मिळणा-या उत्पन्नाइतकेच मिळते. गिरिपुष्पाची रोपे अथवा खुंट पावसाळ्याच्या सुरुवातीला बांधावर अथवा पडीक जमिनीत लावावे.
पावसाच्या सुरुवातीला गिरिपुष्पाची वाढ जोमाने होत असल्याने भात लावणीच्या वेळी गिरिपुष्पाचा पाला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. साधारणत: गुंठयाला चार ते सहा झाडांचा पाला पुरेसा होतो. भात लावणीपूर्वी चिखलणीच्या वेळी हा पाला जमिनीत गाढल्यास त्यापासून २.७५ टक्के नत्र, ०.५ टक्के स्फुरद आणि १.१५ टक्के पालाश लगेचच पिकाला उपलब्ध होते. अशा खर्चात बचत होऊन जादा उत्पन्न मिळू शकते. याचबरोबर जेवढी जास्त जमीन भात लागवडीखाली येईल त्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यामुळे सकस तांदूळ मिळेलच आणि जमीन लागवडीखाली आल्यामुळे पर्यावरणाचे संतुलनही सांभाळले जाईल. भात पिकाचा हिशोब मांडता येईल. पण या शेतीमुळे पर्यावरणाचा बेहिशोबी फायदा होईल.

Read More »

ठाण्यात शाळेच्या बसची मोडतोड

विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवल्याविरोधात पालकांनी ठाण्यात शाळेच्या बसची मोडतोड  केली.
ठाणे - विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवल्याविरोधात आंदोलन करणा-या दोघा पालकांना बिला बाँग इंटरनॅशनल शाळेने अब्रुनुकसानीची नोटिस पाठवल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शाळेच्या चार बसेसची मोडतोड केली. या वेळी कार्यकर्त्यांनी शाळेच्या फलकाला काळे फासले.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या आंदोलनाचे समर्थन केले. मात्र, श्रीनगर पोलिसांनी 'अज्ञात' व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. शाळेने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये १२ टक्के वाढ केली होती. पालकांना विश्वासात न घेता शाळेने हा निर्णय घेतल्याचे पालकांचे म्हणणे होते. पालकांनी इंटरनेटच्या माध्यमातून त्याविरोधात आंदोलन छेडले होते.
शिक्षण अधिका-यांनी चौकशी करून फी वाढीला स्थगिती दिली. परंतु पालकांच्या आंदोलनामुळे शाळेची बदनामी झाली म्हणत शाळा व्यवस्थापनाने पालकांना माफी मागा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

Read More »

१६ गुंठयात सोळा आणे उत्पन्न

जिद्द आणि कल्पकता असल्यास कोणत्याही गोष्टीत यश मिळू शकते हे सिद्ध केलेय ते बांदिवडे येथील युवक गोविंद ऊर्फ नितीन प्रभू यांनी.
जिद्द आणि कल्पकता असल्यास कोणत्याही गोष्टीत यश मिळू शकते हे सिद्ध केलेय ते बांदिवडे येथील युवक गोविंद ऊर्फ नितीन प्रभू यांनी. त्यांनी उच्च शिक्षणाचा बागुलबुवा न करता शेतीतील कोणतेही ज्ञान नसतानाही स्वत: मातीत रमत १६ गुंठयात सेंद्रीय पद्धतीने झेंडूची लागवड करून चांगले यश संपादन केले.
मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून मुंबईत काम करताना आकस्मिक कंपनी बंद झाल्याने आलेल्या संकटाला धिराने तोंड देत पुन्हा नोकरीच्या मागे न लागता गावी जाऊन शेतीत रमण्याचा निर्धार केला. साथीला त्यांची पत्नी श्रावणीची साथ होतीच. घरात शेती पार्श्वभूमी नाही. स्वत:ला शेतीचे ज्ञान नाही. अशातच केवळ जिद्दीने शेतीच्या आवडीपोटी इतरांचे मार्गदर्शन घेत त्यांनी शेती करण्याचा निर्धार केला.
यासाठी त्यांनी चौकसपणे अभ्यास करत वर्षभर मागणी असणा-या आणि गुरेढोरे आदींचा त्रास नसणा-या झेंडू शेतीची निवड केली. कृषी अधिकारी मदने, कृषी सहाय्यक मृदुला प्रभू यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी लागवडीसाठी जमीन तयार करण्याचे काम सुरू केले. झेंडू लागवडीसाठी आकर्षक आणि आकाराने मोठी अशा कलकत्ता रेड जातीच्या झेंडूची निवड केली. कोल्हापूर येथील जगताप यांच्या आनंदी रोपवाटिकामधून त्यांनी दीड रुपयाला एक रोप अशी १८०० रोपे आणली. लागवडीला आनंदी मंगल रोपवाटिकेचे जगताप यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले.
जमिनीची स्वत: मशागत करत त्यांनी ट्रॅक्टरने नांगरणी केली. जमीन तयार झाल्यावर कृ षी अधिका-याच्या मार्गदर्शनाखाली तीन बाय दोन अंतरावर खड्डे पाडून लागवडीला सुरुवात केली. खड्डय़ात गांडूळ खत, शेण खत, निंबोणी पेंड, सुपर फॉस्फेट आदी खत घालत चार मार्चला लागवड सुरू केली. पाणी व्यवस्थापनाला त्यांनी ठिबकचा अवलंब केला. शेजा-यांच्या विहिरीवरून त्यांनी पाणी घेत झेंडूला शिंपण्याची व्यवस्था केली. साधारण उन्हाळयात पाणी प्रश्नाप्रमाणे शेती करण्यास टाळाटाळ केली जाते. पण प्रभू यांनी उपलब्ध पाणी साठयाचे योग्य व्यवस्थापन करत ठिबकचा वापर करून पीक घेतले. त्यामुळे त्यांना लग्नसराईचे ज्या कालावधित फुलांचा तुटवडा भासतो अशा मे महिन्यात बाजारपेठ काबीज करता आली.
४५ व्या दिवसांपासून झेंडू फु लायला सुरुवात झाली. लागवडीनंतर आठ दिवसांच्या फरकाने 'बाविस्टीन कॅलॅडान १९:१९:१९' आदी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली.
नर्सरीचे जगताप यांच्या म्हणण्याप्रमाणे झेंडूला जोर येण्यासाठी पहिल्या कळी खुडून टाकल्या. साधारण गुढीपाडव्यापासून त्यांच्या शेतात झेंडू डोलायला लागले. झेंडूवर किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यावर त्यांनी गोमुत्राची फवारणी केली. शेतातला दिवस त्यांचा सकाळीच सहा वा. सुरू होतो. शांत वातावरणातच रोपांना पाणी देण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेचा उपयोग केला.
सध्या त्यांच्या शेतात झेंडू तयार झाले असून विक्रीसाठी स्थानिक मार्केटचाच उपयोग केला. त्यांच्या शेतातील झेंडूला चांगली मागणी येत असून कणकवली,आचरा मार्केटमध्ये खप वाढत आहे. मजुरांची अनुपलब्धताही त्यांना सतावत होती. पण इंग्रजी माध्यममध्ये शिक्षिका असणा-या त्यांच्या पत्नी सौ. श्रावणी प्रभू यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. मजूर नाही अशा वेळी स्वत:च मातीत काम केले. नोकरी सांभाळून पत्नीची होणारी मदत त्यांना आधार देत होती.
घरात शेतीची पार्श्वभूमी नाही, घरातील नोकरशाही वातावरण, स्वत: उच्चशिक्षित असतानाही शेती करण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगाच. शेतीचा पहिला प्रयत्न आणि त्याला मिळालेले यश यामुळे त्यांनी आता शेतीतूनच भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार केला. बांदिवडे येथील पालयेवाडीत असलेल्या उपलब्ध जागेतून शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन प्रयोग करण्याचा मनोदय व्यक्त केला. आपल्या शिक्षणाचा बागुलबुवा न करता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कष्ट उपसत त्यांनी झेंडू शेतीत मिळविलेले यश केवळ नोकरीच हवी ही मानसिकता घेऊन वावरणा-या तरुण पिढीला आदर्शवत आहे.

Read More »

ठाणे महापालिकेच्या जागा राजकीय कार्यकर्त्यांच्या ताब्यात

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे ताब्यात ठेवल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या मालमत्ता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे ताब्यात ठेवल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी खासगी व्यायामशाळा, पक्षांची कार्यालये, मंगल कार्यालये तर काही जागांवर बालवाडीऐवजी पोळीभाजी केंद्रे व धार्मिक साहित्यांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
२००७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी स्थावर मालमत्ते संदर्भातील विषय महासभेत चर्चेसाठी आणला होता. त्या वेळी सर्व मालमत्तांचे सव्र्हेक्षण करणे निश्चित करण्यात आले होते. मात्र, अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या अनेक मालमत्ता बळकावून शिवसेनेने आपल्या शाखा उभारल्या आहेत. इतर राजकीय पक्षांनीही पालिकेच्या जागांचा ताबा मिळवला आहे. ठाणे महापालिकेने गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मालमत्तांचे सव्र्हेक्षण न केल्याने या मालमत्ता नक्की कुठे आहेत, याची माहितीच महापालिकेकडे नाही.
अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बालवाडय़ा चालवण्यासाठी महापालिकेच्या जागा घेतल्या आहेत. पण, तिथे बालवाडय़ा चालवणे दूरच सध्या येथे पोळीभाजी केंद्र सुरू आहे. किसननगर येथील रोड क्रमांक २२ वर असलेल्या बालवाडीच्या जागेत पोळीभाजी केंद्र सुरू असल्याची तक्रार नगरसेविका विशाखा खताळ यांनी केली आहे.
गोरगरिबांच्या सभागृहात अन्य विभागांचे कार्यालय
गोरगरिबांना सवलतीच्या दरात सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी बांधण्यात आलेल्या बहुद्देशीय सभागृहाचे काम खासगी कंत्राटदाराला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता. गांधीनगर येथील ओसवाल पार्क येथे बांधण्यात आलेल्या या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन २०१२ ला ठाणे महापालिका निवडणुकीआधी करण्यात आले होते. त्याच वेळी या इमारतीमधील दोन मजले भाडय़ांनी गोरगरिबांच्या कार्यासाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. सध्या, या इमारतीमध्ये राजीव गांधी आवास योजना आणि एलबीटीचे मुख कार्यालय सुरू आहे. यापूर्वी स्थावर मालमत्ता विभागाने या सभागृहासंदर्भात निविदा काढली होती.
परंतु, रेडीरेकनरचा दर जास्त असल्याने कोणीही हे कंत्राट घेतले नाही. हे सभागृह सध्या महापालिकेने स्वत:च्या वापरात आणल्याने ज्या कारणासाठी हे सभागृह बांधण्यात आले तो उद्देशच असफल झाल्याने ही दोन्ही बहुउद्देशीय सभागृहे महापालिकेने खाली करून गोरगरिबांना द्यावीत, अशी मागणी नगरसेवक अशोक वैती यांनी केली आहे.

Read More »

पावसाचे वरदान आणि भीतीचे सावट

मुंबईसहित सारा महाराष्ट्र गेले काही दिवस पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. वाढता उन्हाळा, राज्यात पडलेला तीव्र दुष्काळ आणि अभूतपूर्व पाणीटंचाई यामुळे नागरिक आणि शेतकरी हैराण झाले असून दोघेही पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. राज्यात पाऊस सुरू झाल्यावर आनंदाचा उत्सव सुरू होईल. मात्र, योग्य पद्धतीने नालेसफाई न झाल्यामुळे नाले तुंबणे आणि खड्डय़ांमुळे मुंबईकरांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण होईल.
मुंबईसहित सारा महाराष्ट्र गेले काही दिवस पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. संपूर्ण महाराष्ट्र गेले दोन महिने वाढत्या तापमानात अधिकाधिक होरपळत आहे. गेले आठ-दहा दिवस तर महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमान ४० ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले लोकांना उन्हाळा असहय़ झाला आहे. मुंबईतही पारा आता ३८ अंशांपर्यंत सरकला आहे. वाढता उन्हाळा, राज्यात पडलेला तीव्र दुष्काळ आणि अभूतपूर्व पाणीटंचाई यामुळे नागरिक आणि शेतकरी हैराण झाले असून दोघेही पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. हवामान खात्याने यंदा पाऊस वेळेवर आणि समाधानकारक म्हणजे ९६ ते ९८ टक्के पडेल, असे भाकीत केले होते. हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीप्रमाणे, पावसाची वाटचाल योग्य दिशेने होत आहे व तो काही दिवसांपूर्वी अंदमानात रुजू झाला आहे व आता तो ठरलेल्या एक दिवस आधीच म्हणजे एक जूनला केरळमध्ये पोहोचला. केरळमध्ये त्याचे आगमन होऊन तेथे ४८ तास मुसळधार वृष्टी झाली. पावसाने शनिवारी अरबी समुद्राचा दक्षिण भाग, केरळ, लक्षद्वीप, दक्षिण कर्नाटक व तामिळनाडूच्या काही भागात आगमन केले. केरळमध्ये पाऊस आला म्हणजे तो महाराष्ट्राच्या अगदी उंबरठय़ावर आला असे म्हणायला हरकत नाही. कोकणात आणि कोल्हापुरात वळवाच्या पावसाने हजेरी लावलीही आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात खरिपाच्या काही कामांना वेगही आला आहे. केरळमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर साधारणपणे सहा दिवसांनी महाराष्ट्रात पाऊस सुरू होतो. पावसाची वाटचाल अशीच चालू राहिली तर पावसाने सात जूनला 'मिरग' साधायला हरकत नाही. या वर्षी मुख्य समस्या पाणीटंचाईची होती. यंदा चांगला पाऊस होईल व तो वेळेवर होईल, असा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज आहे व तो खरा ठरत आहे हे सर्वाच्याच दृष्टीने, विशेषत: शेतक-यांच्या दृष्टीने आनंदाची व समाधानाची बाब आहे. केवळ ग्रामीण भाग व शेतक-यांच्याच दृष्टीने नव्हे तर मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांच्या दृष्टीनेही पावसाचे आगमन महत्त्वाचे आहे. यंदा पुणे शहरातही पाण्याची कधी नव्हे ती टंचाई भासली. त्यामुळे नागरिक भांबावले. पुणे शहरात वीज तर रोज जातेच, पण मुबलक पाणी मिळणा-या पुण्यात नळ आणि पाण्याची भांडी कोरडी पडू लागली. पाऊस पडला की, ही परिस्थिती सुधारेल, अशी लोकांना आशा आहे. तसेच मुंबईकर काय किंवा पुणेकर काय, तो पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण गेले काही दिवस तो वाढत्या व असहय़ उन्हाळ्याने अक्षरश: भाजून निघत आहे. डोक्यावर रणरणणारे उन्ह, गरम वारे आणि दिवसेंदिवस वाढणारी हवेतील आद्र्रता यामुळे मुंबईचा घामाच्या धारांनी त्रस्त झाला आहे. आता पाऊस पडायला मोजकेच दिवस उरलेत. धो-धो पाऊस पडेल, घामाच्या धारा थांबतील, हवेत सुखद गारवाही येईल. पण पाऊस आल्याने मुंबईकरांच्या अडचणी आणि हालही वाढतील. याचे कारण जे मुंबईकरांना उत्तरदायी आहेत, ज्यांनी मुंबईकरांच्या सोयीसुविधांसाठी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे व त्यांच्या भल्यासाठी तत्परतेने व जागरुकपणे आपली कामगिरी पार पाडली पाहिजे, त्या महापालिकेतील सत्ताधा-यांनी आपल्या जन्मजात खाबूगिरीमुळे, गरकारभारामुळे व महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी संगनमत करून केलेल्या पराकोटीच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना दरवर्षी अतोनात हाल सहन करावे लागतात. पावसाळा जवळ आला की, दोन विषय प्रामुख्याने पुढे येतात, ते म्हणजे नालेसफाई आणि रस्त्यावर पडणारे मोठेमोठे खड्डे. यापैकी नालेसफाईचा विषय हा पावसाळा जवळ यायला की, चच्रेला येतो व प्रसारमाध्यमांतूनही नालेसफाईची समस्या नाल्यांच्या छायाचित्रांसहित प्रसिद्ध होऊ लागते. परीक्षा जवळ आली की, एखाद्या उनाड आणि ढ मुलाला आपल्या पुस्तकांची आठवण होते, तशी नालेसफाईची महापालिकेला आठवण येते. वास्तविक नालेसफाई हा काही घाईघाईने करण्याची बाब नाही. मुंबईच्या आरोग्याशी आणि पावसाचे पाणी वाहून जाण्याशी म्हणजे पाण्याचा निचरा होण्याशी या नालेसफाईचा संबंध असल्याने तो अत्यंत महत्त्वाचा आहे. महापालिकेचे नेहमीच 'हात'सफाई करणारे अधिकारी, सर्वत्र हात पोहोचलेले नगरसेवक आणि कंत्राटदार यांची युती महापालिकेच्या कुठल्याही योजनेला वा उपक्रमाला केवळ बाधक नव्हे तर घातक ठरली आहे. मग ती योजना रस्ते बांधणी असो, खड्डे बुजवण्याची असो किंवा कच-यापासून वीज वा गॅस बनवण्याची असो, ही अपवित्र युती कुठल्याही योजनांचा पुरता बोजवारा उडवते, हा नागरिकांचा अनुभवच आहे. दरवर्षी होणारी ही नालेसफाई हा एकाचवेळी येणा-या विनोदी प्रहसनाचा आणि शोकांतिकेचा अनुभव आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच नालेसफाईची पाहणी करून समाधान व्यक्त केले असले आणि पालिकेने आपल्या क्षेत्रातील ५० ते ५५ टक्के नालेसफाई झाली आहे, असा दावा केला असला तरी ठाकरेंच्या या पाहणीत पालिकेच्या दाव्याचे पितळ उघडे पडले आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे ठाकरे यांनी नाले पाहणी सुरू केली. पश्चिम उपनगरातील एका नाल्याची त्यांनी पाहणी केली तेव्हा तो नाला कच-याने तुडुंब भरलेला दिसला. दहिसर भागातील नाले कच-याने व गाळाने भरलेलेच आहेत. गंमत अशी की, धारावीतील नालेसफाई ही तर डोळ्याला पाणी लावणेच असते. धारावीतील राजीव गांधी येथील मुख्य नाल्याची सफाई दरवर्षी केवळ नावापुरती असते. तो ज्या ठिकाणी मिठी नदीला मिळतो तेथील गाळ काढला जात नाही व त्यामुळे पाणी तुंबते. धारावी शेटेवाडी नाल्यातील गाळाचीही तीच स्थिती असते. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरते. भांडुप पश्चिम येथील जिजामाता शाळेसमोरच्या नाल्यात डेब्रिज टाकण्यात आल्याने तो नाला पूर्णपणे बुजला आहे. ठाण्यातील नाल्याची कहाणीही काही वेगळी नाही. आता पाऊस सुरू झाला की, मुंबईत प्रवास कसा करायचा या भीतीने मुंबईकरांच्या पोटात खड्डा पडतो. राज्यात पाऊस सुरू झाल्यावर आनंदाचा उत्सव सुरू होईल. मात्र, योग्य पद्धतीने नालेसफाई न झाल्यामुळे नाले तुंबणे आणि खड्डय़ांमुळे मुंबईकरांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण होईल. घडाळय़ाच्या काटय़ावर चालणा-या मुंबईकराला या पावसाचा आनंद तर घेता येतच नाही. मात्र, पालिकेच्या तथाकथित 'नालेसफाई'मुळे तो काहीसा भांबावतो. पावसाळय़ात घराबाहेर पडल्यानंतर कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागेल, याचा विचार करतच तो घराबाहेर पाऊल टाकेल. दुष्काळाने होरपळलेल्या भागांमध्ये पाऊस हा वरदान म्हणून पडणार आहे तर मुंबईसारख्या शहरांवर त्यांचे भीतीचे सावट असणार आहे. पालिका, नगरसेवक आणि कंत्राटदारांच्या भ्रष्ट युतीमुळे गेली अनेक वर्षे मुंबईकरांच्या मनावरील भीतीचे हे सावट आजही कायम आहे.


कोकणाची शैक्षणिक आघाडी


विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि उच्च शिक्षणाची नवी दालने उघडणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला व आपणाला हव्या असणा-या नव्या शैक्षणिक दालनांमध्ये आपल्या निवडीप्रमाणे व कुवतीप्रमाणे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
[/EPSB}

Read More »

टाळ, मृदंग आणि बँजो

राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि त्यात आपण उपमुख्यमंत्री असू, अशी स्वप्ने रामदास आठवले यांना पडू लागली आहेत. कधीही सत्यात न येणा-या या स्वप्नात ते रममाण झाले आहेत. जाग आल्यास स्वप्न भंग होईल म्हणून जास्तीत जास्त काळ ते झोपूनच राहत आहेत. सभा-संमेलनाला जातानाही आपली झोप मोडणार नाही, याची ते काळजी घेतात आणि मग झोपेतच आपले भाषण करतात. झोपेतच असल्याने काल काय बोललो होतो, परवा काय आपली भूमिका होती, याची आठवण त्यांना राहत नाही. त्यामुळे आधी मांडलेल्या मतांच्या एकदम विरोधी भूमिका घेतात. राज ठाकरेंना महायुतीत घेतले तर त्यांच्यासोबत राहायचे की नाही, याचा पुनर्विचार करावा लागेल, असे म्हणणारे आठवले मग राज यांना महायुतीत येण्याचे निमंत्रण देतात आणि मग ज्या 'मातोश्री'च्या उंब-याला झोके घेतले तिथेच मृदंगासारखे दोन्हीकडून बडवले जातात. शिवसेना-भाजपचा टाळ-मृंदगाचा ताल गेली २५ वर्षे सुरू आहे. त्यात रामदास आठवलेंचा बँजो मिसळेल काय?
राज्यात महायुतीचा टाळ, मृंदग आणि बँजो एकत्र वाजवण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत. महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीचा खेळ टाळ-मृदुंगाच्या तालावर रंगला आहे. भाजपचे प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील समन्वयाने युतीचे भजन चांगले रंगत होते. त्यांची ही भजनसंध्या रंगात आली असतानाच १९९२मध्ये बाबरी मशिद कोसळली आणि देशभर दंगली उसळल्या. महाराष्ट्रातही रक्तपात झाला. त्याचा परिणाम असा झाला की, युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. परंतु ही सत्ता फार काळ टिकली नाही. तरीही पुढे शिवसेना-भाजप युतीचे भजन सुरूच राहिले. अर्थात भाजपने हळूच काही कळ काढली की, शिवसेनाप्रमुख बेधडकपणे मृदंगाला दोन्ही बाजूंनी बडवून काढत. मग प्रमोद महाजन 'मातोo्री'वर जाऊन समन्वयाचे अभंग आळवीत आणि युतीचे भजन पुन्हा रंगू लागे. हिमालयाच्या उंचीचे शिवसेनाप्रमुख आणि प्रखर बुद्धिमत्ता असलेले प्रमोद महाजन हे दोन्ही नेते दुर्दैवाने आज हयात नाहीत. म्हणूनच युतीच्या टाळ-मृदंगाचा आवाज बेसूर होऊ लागला आहे. त्यामुळे सत्तेची स्वप्ने सत्यात उतरण्याची कोणतीही आशा वाटत नाही. त्यातूनच मग अनेक जणांची मोट बांधून महायुतीचे गाणे गायले जाऊ लागले. सत्तेपासून दुरावल्यामुळे उदास झालेल्या रामदास आठवलेंना जवळ करून दलित जनतेला युतीशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खरे तर रामदास आठवले यांनी अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने अनेक सत्तेची पदे उपभोगली. महाराष्ट्रात मंत्रीपदापासून ते केंद्रात खासदारकीपर्यंत सर्वपदांचा उपभोग घेतला. ते खासदार असताना त्यांनी अनेकदा 'साहेब मला एकदा तरी मंत्री करा' अशी आळवणी करून पाहिली. परंतु ते स्वप्न काही त्यांचे पूर्ण झाले नाही. २००९ च्या निवडणुकीत पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे आरक्षण उठले. आठवलेंनी मला शिर्डीत उमेदवारी द्या, असा आग्रह धरला. खरे तर हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाचा होता. तरीही तो आठवलेंसाठी देण्यात आला. परंतु प्रत्यक्ष निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेच्या उमेदवाराने त्यांचा दणदणीत पराभव केला. अनेक दिवस सत्तेची उब लागलेले आठवले, अचानक सत्तेबाहेर फेकले गेले आणि 'जीवना वेगळी मासोळी। तैसे सत्तेविना रामदास तळमळी॥' अशी आठवले यांची अवस्था झाली. खरे तर शरद पवार यांनी त्यांना राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र पराभवाच्या आघाताची जखम खोलवर गेलेली असल्याने त्यांनी ती 'ऑफर' धुडकावून लावली. ज्यांना आपण आतापर्यंत सांभाळले त्यांनी अशी देऊ केलेली ऑफर धुडकावल्यामुळे आठवले पवार यांच्या मनातून उतरले आणि त्यांनी आपल्या 'मेमरी'मधून आठवलेंचे नाव 'डिलीट' करून टाकले. शरद पवार हे तळागाळातील कार्यकर्त्यांना नावासह ओळखतात. दहा-पंधरा वर्षानंतर भेट झाली तरी तितक्याच आपुलकीने चौकशी करतात, असे सांगितले जाते. मात्र त्यातील एखाद्या कार्यकर्त्यांचे – नेत्याचे नाव त्यांनी एकदा आपल्या मेमरीमधून 'डिलीट' केले की, तो कितीही जवळचा माणूस असला तरी ते पुन्हा त्याला ओळखही दाखवत नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे अनेक वर्षे कडेवर वागवलेल्या आठवलेंचे नाव पवारांनी आपल्या मेमरीतून कायमचे डिलीट केले. हे जेव्हा आठवलेंच्या लक्षात आले तेव्हा सत्तेच्या जवळपास जाण्याचे अन्य पर्याय शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. पुन्हा सत्तेत येण्यासाठी आता कोणत्याही कोलांटय़ा उडय़ा मारायला ते तयार होत आहेत. त्यातील पहिली हास्यास्पद उडी म्हणजे ज्या शिवसेनेच्या उमेदवाराने आठवले यांचा दणदणीत पराभव केला, आठवले त्याच शिवसेनेच्या वळचणीला गेले आणि शिवशक्ती-भीमशक्तीच्या आरोळय़ा ठोकू लागले.
राज्यात शिवसेना-भाजप आणि रिपब्लिकन जनतेमध्ये यापूर्वी अनेक वेळा संघर्ष झालेला आहे. मराठवाडा नामांतराच्या वेळी तर हा संघर्ष शिगेला पोहोचलेला होता. त्यावेळी बसलेले चटके दलित बांधव विसरणे शक्य नाही. नेत्यांनी मांडीला मांडी लावली, तरी कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनता मात्र ही अनैसर्गिक युती मान्य करणार नाही, याचा प्रत्यय मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आला. शिवसेना-भाजप आणि रिपब्लिकन महायुतीने मुंबईसह काही महानगर पालिकांच्या निवडणुका एकत्रित लढवल्या. मात्र त्यात दोन्ही पक्षाला कोणताही लाभ झाला नाही. ना रिपब्लिकन पक्षाची महापालिकेतील एखादी जागा वाढली ना दलित मते शिवसेना-भाजपच्या उमेदवाराला मिळाली. तरीही महायुतीचे गाणे गायले जातच आहे.
शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्ष यांच्या बळावर राज्यात सत्ता येणे अशक्य वाटत असल्याने भाजपच्या धुरिणांनी मनसेला युतीशी जोडण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी नितीन गडकरींपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत सर्वानीच 'फेव्हीकोल का मजबूत जोड' होण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना त्यावेळी ताठर होती. मनसेला बरोबर घेण्यास शिवसेनेचा विरोध होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पहिल्याच मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंना टाळी देण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा रामदास आठवले यांनी थयथयाट केला. राज ठाकरे यांना महायुतीत घेतले जाणार असेल तर आम्हाला या युतीत राहायचे की, नाही याचा विचार करावा लागेल, अशी भूमिका त्यांनी घेतली. अर्थात उद्धव ठाकरे यांनी दिलेली 'टाळी'ची ऑफर राज ठाकरे यांनी धुडकावून लावली, हा भाग वेगळा. परंतु ज्या आठवलेंनी राज यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता त्यांनीच गेल्या आठवडय़ात राज यांना महायुतीत येण्याचे निमंत्रण दिले आणि मोठा गहजब झाला. ज्या 'मातोश्री'च्या उंब-याला आठवले झोके घेत आहेत, तेथून त्यांना मृदंगासारखे बडवून काढण्यात आले. 'टाळी-मृदंगां'चे क्लासेस काढले जात असल्याचा टोला लगावला गेला. खरे तर आठवले आणि 'टाळी-मृदंगा'चा तसा संबंध कधी आलेला नाही. मात्र शिवसेना-भाजपचा टाळ-मृदंगाचा ताल गेली २५ वर्षे सुरू आहे. आठवलेंचा असला तर बँजो असेल. टाळ-मृदंगाच्या सूस्वरात बँजोचा घणघणाट मिसळेल का? टाळ-मृदंगाच्या आवाजात बँजो जसा सहज मिसळणारा नाही, तसाच जाती-धर्मावर आधारित शिवसेना-भाजपच्या विचारधारेत आंबेडकरी विचार मिसळणार नाही. बाकी ज्यांना टाळ-मृदंग वाजवायचे असतील, त्यांनी खुशाल वाजवावेत.


नक्षलवादाचे कडवे आव्हान


नक्षलवादी किंवा माओवादी यांचा भारताच्या सुरक्षेला किती धोका आहे, याविषयी आपल्या देशातील बुद्धिजीवी वर्गात आणि राजकीय नेत्यांत वैचारिक गोंधळ आहे. माओवाद्यांचे आव्हान शस्त्राच्या बळावर मोडून काढायचे की, परिवर्तन, विकासाच्या मार्गाने मोडून काढायचे, या संदर्भातही मतभेद आहेत. माओवाद्यांची समस्या कशी हाताळायची, यावर अशी नुसतीच चर्चा होत असताना माओवादी मात्र आपला कार्यभाग साधून रिकामे होतात.
Read More »
आधारवडाचे पुनरागमन

दुष्काळाच्या झळा बसलेला महाराष्ट्र पावसाची मोठय़ा आतुरतेने वाट पाहत आहे. केरळमध्ये या जीवनदायी पावसाचे आगमन झाल्यावर महाराष्ट्रानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अशीच काहीशी अवस्था माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसची झाली आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक व अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी २०११ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. मात्र, इन्फोसिस तसेच इतर कंपन्यांचे मार्गदर्शक म्हणून ते काम पाहू लागले. या दरम्यान स्पर्धेत इन्फोसिसची बाजारात घसरण झाली. गेल्या दोन वर्षात कंपनीच्या समभागात घसरण तसेच जागतिक ग्राहकांमध्ये कपात झाली होती. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने नारायण मूर्ती यांच्याकडे पुन्हा धुरा सोपवली आहे. १ जून २०१३ पासून कार्यकारी अध्यक्ष आणि अतिरिक्त संचालक म्हणून इन्फोसिसची धुरा स्वीकारली असून त्यामुळे इन्फोसिस आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही आनंदाचे वातावरण आहे. माहिती क्षेत्रातील अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिका-यांनीही मूर्ती यांचे आगमन फक्त इन्फोसिससाठीच नाही तर एकूणच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल, अशी आशा व्यक्त केली आहे. खुद्द प्रतिस्पध्र्यानी नारायण मूर्ती यांच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. असे मूर्ती हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे.
आज भारताच्या सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे ६ टक्के इतके योगदान आहे. १९८१मध्ये ज्यावेळी नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची स्थापना केली त्यावेळी माहिती तंत्रज्ञान हे क्षेत्र केवळ आणि केवळ स्वप्नवत होते. त्यांनी भारताला या क्षेत्राचे महत्त्व पटवून तर दिलेच पण त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानात मोठी आघाडी घेतली. १९८१ ते २००२ पर्यंत ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते तर २००२ ते २०११ पर्यंत अध्यक्ष होते. या काळात त्यांनी आपल्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराने इन्फोसिसला जागतिक क्षेत्रात सल्लागार, अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान आणि आऊटसोर्सिग पुरवणारी एक अग्रगण्य कंपनी म्हणून नावारूपाला आणले.
आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इन्फोसिसची काही प्रमाणात पिछेहाट सुरू आहे. अशा कठीण काळात आघाडीची कंपनी म्हणून इन्फोसिसचा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी मोठय़ा आत्मविश्वासाने ते त्यांच्या 'दुस-या कार्यकाळा'कडे पाहत आहेत. पुढील पाच वर्षासाठी ते इन्फोसिसचे नेतृत्व करणार आहेत. या काळात ते वार्षिक फक्त एक रुपया इतके मानधन घेणार आहेत. इन्फोसिसच्या संचालक मंडळाने मोठय़ा आशेने नारायण मूर्तीचा 'नारायण!' 'नारायण!' असा धावा केला आहे. नारायण मूर्तीनीही या धावेला ओ देत कंपनीचे नेतृत्व स्वीकारले आहे. एक काळ असा होता की, जागतिक शेअर बाजार सुरू झाले की, इन्फोसिसचा समभाग कितीवर पोहोचला याची चर्चा होत असे. युरोप, अमेरिकेतील ग्राहक काही झाले तरी चालेल पण किमान नारायण मूर्ती यांचा वाहनचालक तरी कर, अशी प्रार्थना देवाजवळ करत असत. या मागचे कारण होते, मूर्ती यांनी त्यांच्या कर्मचा-यांना कंपनीचे समभाग देऊन त्यांना थेट कंपनीचे मालकी हक्क बहाल केले आणि कर्मचा-यांना लाखोपती, कोटय़धीश केले. त्यामुळे कर्मचारीही इन्फोसिसबरोबर प्रामाणिक राहिले. आज त्याच इन्फोसिसच्या घसरणीच्या काळात हाच आधारवड पुन्हा मदतीला आला आहे आणि म्हणूनच सर्वच थरातून त्यांच्या पुनरागमनाचे जोरदार स्वागत केले जात आहे.

Read More »

रिव्हर्स स्विंग- तीन जून २०१३

क्रिकेटच्या इतिहासात तीन जून रोजी घडलेल्या ठळक घडामोडी…
१८८९
महान फलंदाज डब्ल्यू. जी. ग्रेस यांच्या कसोटी कारकीर्दीतील शेवटचा दिवस. त्यावेळी त्यांचे वय ५० वर्षे आणि ३२० दिवस होते. सर्वात वयस्कर कर्णधार म्हणून ग्रेस यांची नोंद आहे.

१८९३
नॉटिंगहॅमशायरचे फ्रँक शॅकलॉक यांनी सॉमरसेटविरुद्ध ४६ धावांत आठ विकेट्स घेतल्या. त्यात सलग चार विकेट्सचा समावेश आहे. श्ॉकलॉक आणि त्यांचे अन्य सहकारी मॉर्डेकाय शेरविन यांच्या नावांवरून सर आर्थर कॉनन डॉयल यांनी प्रसिद्ध काल्पनिक डिडेक्टिव्ह शेरलॉक होम्स पात्राचे नाव बनवले, असे म्हटले जाते.

१९२८
न्यूझीलंडचे सवरेत्तम माजी अष्टपैलू आणि कर्णधार जॉन रीड यांचा जन्म. त्यांनी ५८ कसोटी सामन्यांत ३३.२८च्या सरासरीने सहा शतकांसह ३४२८ धावा आणि ८५ विकेट्स घेतल्या. रीड यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने तीन कसोटी सामने जिंकले. निवृत्तीनंतर सिलेक्टर आणि आयसीसीचे सामनाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.

१९६१
झिम्बाब्वेचे माजी कसोटीपटू केव्हिन अरनॉट यांचा जन्म. त्यांची क्रिकेट कारकीर्द थेट कसोटीतच सुरू झाली. १९९२-९३ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करणा-या अरनॉट यांच्या वाटय़ाला केवळ चार सामने आले. वडील डॉन यांच्यानंतर कसोटी शतक ठोकणारे ते झिम्बाब्वेचे दुसरे क्रिकेटपटू ठरले.

१९६६
पाकिस्तानचा माजी कर्णधार तसेच जगातील एक सवरेत्तम डावखुरा तेज गोलंदाज, अष्टपैलू वासिम अक्रमचा जन्म. वनडेत पाचशेहून अधिक (५०२) आणि कसोटीत चारशेहून अधिक (४१४) विकेट्स घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज आहे. १९९०-९१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या लाहोर कसोटीत सलग चार चेंडूंवर चार विकेट्स, दोन कसोटी हॅटट्रिक, तितक्याच वेळा वनडे हॅटट्रिक, १९९६-९७ मध्ये विक्रमी १२ षटकारांसह झिम्बाब्वेविरुद्ध २५७ धावांची तडाखेबंद खेळी अशा अनेक सवरेत्तम विक्रमांमुळे अक्रम कायम सर्वाच्या लक्षात आहे. सध्या सल्लागार आणि समालोचकाच्या भूमिकेत तो पाहायला मिळतो. मात्र अक्रम डायबेटिक रुग्ण आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

१९७१
पाकिस्तानचे वर्ल्डकप विजेते कर्णधार इम्रान खान यांनी इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टनमध्ये कसोटी पदार्पण केले.

१९७६
इंग्लंडचे एक सवरेत्तम फलंदाज माइक ब्रिअर्ली यांनी ३४व्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध टेंटब्रिजमध्ये कसोटी पदार्पण केले. याच सामन्यात वेस्ट इंडिजच्या लॅरी गोम्स यांनी कसोटी पदार्पण केले. मात्र दोघांनाही पदार्पणात खाते खोलता आले नाही.

१९९४
वॉर्विकशायरतर्फे खेळताना ब्रायन लाराने 'विश्वविक्रमी' सातवे शतक झळकावले. आठ डावांत सात शतके ठोकण्याचा विक्रम त्याने केला.

१९९८
गॉल हे कसोटी क्रिकेटमधील ७९वे ठिकाण बनले. न्यूझीलंडविरुद्ध येथे झालेल्या पहिल्या कसोटीत यजमान श्रीलंकेने डावाने विजय मिळवला.

२०००
माजी कर्णधार मोहंमद अझरुद्दीन आणि माजी कसोटीपटू अजय जडेजाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचा दिवस. ढाक्यात झालेल्या आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अझरुद्दीनने (१) जेमतेम खाते खोलले. मात्र जडेजाने १०३ चेंडूंत सर्वाधिक ९३ धावा केल्या. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मॅचफिक्सिंग प्रकरणी अझरवर आजीवन आणि जडेजावर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

२००८
प्रतिबंधित अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून पाकिस्तानचा तेज गोलंदाज मोहंमद आसिफला दुबई विमानतळावर अटक करण्यात आले.

Read More »

जाहिरातबाजीला 'ब्रेक'!

जाहिरातींच्या मा-यामुळे गांजून गेलेल्या प्रेक्षकांना दिलासा देण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'ने पावले उचलली आहेत.
नवी दिल्ली – टीव्हीवर चित्रपट किंवा अन्य लोकप्रिय कार्यक्रम पाहताना मधूनमधून येणा-या जाहिरातींमुळे अनेकदा त्रागा होतो. मात्र जाहिरातबाजीची ही डोकेदुखी आता कमी होणार आहे. जाहिरातींच्या या मा-यामुळे गांजून गेलेल्या प्रेक्षकांना दिलासा देण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'ने पावले उचलली आहेत. यापुढे टीव्हीवरून प्रसारित होणा-या कार्यक्रमांच्या काळात एका तासात केवळ १२ मिनिटेच जाहिरातींना देण्यात यावीत, असे 'ट्राय'ने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी बेसुमार जाहिरातींमुळे टीव्हीवर दाखवल्या जाणा-या कार्यक्रमाचा प्रेक्षकांना आनंद घेता येत नव्हता. अतिशय जास्त प्रमाणात सतत आदळणा-या या जाहिरातींमुळे टीव्ही पाहणे एक त्रासदायक अनुभव बनला होता. मात्र, 'ट्राय'च्या या निर्णयामुळे टीव्ही पाहणे आता काहीसे आनंददायी होणार आहे. तर टीव्हीवरून प्रसारित होणा-या जाहिरातींशी संबंधित असलेले प्रसारणकर्ते, जाहिरात कंपन्या, नियोजनकर्ते आणि जाहिरातदार या सर्वाना त्यांच्या धोरणाबाबत नव्याने विचार करावा लागणार आहे.
'ट्राय'चा हा निर्णय स्वीकारण्याबाबत साशंक असलेल्या प्रसारणकर्त्यांनी जाहिरातींबाबतचा हा १२ मिनिटांचा निर्बंध टप्प्याटप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. प्रत्यक्षात जाहिरातींवरील निर्बंधाबाबतचा हा कायदा (केबल टीव्ही कायद्यामधील जाहिरात संहिता) गेल्या आठ वर्षापासून अस्तित्वात आहे. परंतु अशा प्रकारचा कडक कायदा आणण्यापूर्वी एका नव्या उद्योगाची पाळेमुळे विकसित होण्यासाठी काही काळ थांबण्याची गरज असल्याचे सरकारचे मत होते. आता या उद्योगाचे बस्तान ब-यापैकी बसले असल्याचे सरकारला दिसत असल्याने हा कायदा अंमलात आणण्यात येणार आहे. या निर्णयाला स्वीकारण्याची तयारी प्रसारणकर्त्यांनी दर्शवली असली तरी यामुळे या क्षेत्रावर होणा-या संभाव्य परिणामांबाबत भीती व्यक्त केली आहे.

Read More »

मुंबई भाजपमध्ये सावळागोंधळ

भाजपमध्ये मुंबई अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या संघर्षात रोज नव्या प्रकरणांची भरत पडत आहे.

मुंबई- भाजपमध्ये मुंबई अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या संघर्षात रोज नव्या प्रकरणांची भरत पडत आहे. त्यात अलीकडेच पदाधिका-यांच्या नियुक्ती आणि स्थगितीची भर पडली आहे.
अध्यक्षपदाच्या दुस-या टर्मसाठी उतावीळ झालेल्या राज पुरोहित यांनी अलीकडेच विविध पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र, या नियुक्त्या बेकायदा आणि समर्थकांची सोय असल्याचा आरोप करत अन्य गटांनी याला तीव्र हरकत घेतली. पुरोहित यांच्या दालनाबाहेरच घोषणाबाजी आणि विरोध प्रदर्शन झाल्याने त्यांनी केलेल्या नियुक्त्या रद्दबातल करण्याची नामुष्की पक्षावर ओढावली आहे.
मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने पक्षांतर्गत धुसफूस वाढली आहे. आपला दावा मजबूत करण्यासाठी शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत आले आहे. अलीकडेच राज पुरोहित यांनी वरळी, भायखळा आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या. यात पात्र उमेदवारांना डावलून केवळ स्वत:च्या मर्जीतील समर्थकांची वर्णी लावण्यात आल्याचा आरोप इतर गटांनी केला. या नियुक्त्या ताबडतोब रद्द करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी नुकतीच पुरोहित यांच्या दालनाबाहेर तीव्र घोषणाबाजी केली.
शिवडी, भायखळा, वरळी आणि दक्षिण मुंबईतील नाराज कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या नियुक्त्या मागे घेण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की पक्षावर ओढावली.
विविध पदांवर समर्थकांची वर्णी लावून स्वत:चे स्थान बळकट करू पाहणा-या पुरोहित यांना या निर्णयामुळे जोरदार झटका बसला आहे. अध्यक्षपदाच्या नेमणुकीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा आणि विचारविनिमय सुरू असताना इच्छुकांनी चालवलेल्या साठमारीमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

Read More »

प्रीतीवरील हल्ल्याची सीबीआय चौकशी

प्रीती राठीवरील हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी तिच्या कुटुंबीयांना दिले.
मुंबई – वांद्रे येथे झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर मृत पावलेल्या प्रीती राठीवरील हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी तिच्या कुटुंबीयांना दिले. सीबीआय चौकशीचे आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा प्रीतीच्या कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. त्यामुळे प्रीतीचा मृतदेह सोमवारी दिल्लीला नेण्यात येणार आहे.
प्रीतीच्या कुटुंबीयांनी रविवारी दुपारी गृहमंत्र्यांची भेट घेतली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर सोमवारपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीतीचे शनिवारी दुपारी निधन झाले होते.
दरम्यान, प्रीती राठी हिच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली.


Read More »

'उमेदवारी रद्द करण्याचाही आयोगाला अधिकार'

खोटे हिशोब सादर करणा-यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकारही आहेत, असा युक्तिवाद नुकताच आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला.
नवी दिल्ली – केवळ उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदी ठेवणे एवढेच निवडणूक आयोगाचे काम नसून, खोटे हिशोब सादर करणा-यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकारही आहेत, असा युक्तिवाद नुकताच आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला. खर्चाचा हिशेब सादर केला नाही तरच, आयोग उमेदवारावर कारवाई करू शकतो, या कायदा खात्याच्या दाव्याला उत्तर देताना आयोगाने आपली बाजू मांडली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या 'पेड न्यूज' प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करताना आयोगाने आपली बाजू मांडताना एखाद्या उमेदवाराने खर्चाचे खोटे हिशोब सादर केल्यास आयोग त्याला तीन वर्षासाठी अपात्र ठरवू शकतो, असे स्पष्ट केले. तसेच निवडणूक खर्चाचा योग्य ताळेबंद ठेवण्यात कसूर केल्यास उमेदवारी रद्द करण्याचे अधिकार आहेत, असेही नमूद केले.

Read More »

कामे अडवा, पैसे जिरवा

'कामे अडवा पैसे जिरवा' असा एककलमी कार्यक्रम राबवणा-या मुरबाड पंचायत समितीच्या पाटबंधारे उपविभागाने शेतक-यांना वा-यावर सोडून अधिकारी आणि कंत्राटदारांचे चांगभले करण्यावर भर दिला आहे.

ठाणे- 'कामे अडवा पैसे जिरवा' असा एककलमी कार्यक्रम राबवणा-या मुरबाड पंचायत समितीच्या पाटबंधारे उपविभागाने शेतक-यांना वा-यावर सोडून अधिकारी आणि कंत्राटदारांचे चांगभले करण्यावर भर दिला आहे.
कोकण टाइप (पद्धतीचा) बंधारा बांधकामासाठी निविदा मागणीचा कालावधी पंधरा दिवसांचा ठेवण्याऐवजी तीन दिवसांचा ठेवून निविदा प्रक्रियेत घोळ घातल्याचा आरोप होत आहे. तब्बल २२.५० लाख रुपये खर्चाच्या बंधा-याच्या बांधकामात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
मुरबाड तालुक्यातील खापरी येथे 'कोकण टाइप' बंधारा बांधण्याच्या कामास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी घेण्यात आली. या कामासाठी सरकारी निर्णयानुसार निविदा प्राप्तीचा कालावधी १५ दिवसांचा असतो. मात्र, मुरबाड पंचायत समितीने मर्जीतल्या कंत्राटदाराला धनलाभ होण्यासाठी हा कालावधी केवळ तीनच दिवसांचा ठेवला. या निविदा तीन भाषिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध न करता परस्पर 'मॅनेज' केल्याचा आरोप होत आहे. या कामासाठी प्राप्त तीन निविदांपैकी दोनच निविदा उघडण्यात आल्याने व फेरनिविदा न मागवल्याने स्पर्धात्मक दराचा लाभ झालेला नाही. ही बाब महाराष्ट्रात पंचायत राज संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून उघड झाली आहे.
स्वामित्व धनावर पाणी सोडले
कंत्राटदाराकडून करून घ्यायच्या करारनाम्यात निर्धारित किमतीपेक्षा १३०० रुपयांचा मुद्रांक पेपर कमी वापरला आहे. नियमबाह्य पद्धतीने बांधण्यात आलेल्या 'कोकण टाइप' बंधा-याच्या कामाच्या देयकातून कंत्राटदाराकडून 'स्वामित्व'धनाची (रॉयल्टी) तीस हजार ७३० रुपये वसूल करण्यात आलेली नाही. 'व्हॅट' (मूल्यवर्धित कर प्रणाली) नियमानुसार कार्यकंत्राट कराचे ४५ हजार हजार वसूल करण्यात आलेले नाहीत. या कामाचे मूल्यांकन २१ लाख ९५ हजार ३६६ रुपये असताना कार्यादेशामध्ये २२ लाख ३४ हजार ६२ रुपये एवढी रक्कम नमूद केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.
मासवणे बंधा-याचा खर्च ४३ वरून ७६ लाखांवर
मुरबाडमधील मासवणे येथील कोकण टाइप बंधा-याच्या बांधकामास ठाणे लघुपाटबंधारे मंडळाचे अधीक्षक-अभियंत्यांनी ३१ डिसेंबर २००२ रोजी तांत्रिक मंजुरी दिली होती. सुमारे ४३ लाख ८ हजार ९४६ रुपये खर्चाच्या बंधा-याच्या बांधकामास तांत्रिक मंजुरी मिळाली असताना त्यावर खर्च मात्र ७६ लाख ७ हजार ९१२ एवढाच करण्यात आला आहे. या कामासाठी तीन निविदांपैकी दोनच निविदा उघडण्यात आल्याने स्पर्धा होऊ शकली नाही.
स्पर्धात्मक दराचा लाभ होऊ शकला नाही. प्रादेशिक दरसूचीनुसार यूसीआर मशिनरी इन फाउंडेशन १.५ या बाबीसाठी २.८३ बॅग सिमेंट वापरायचे असताना २.५७ बॅग सिमेंट वापरल्याने एकूण २२२१.८४ घनमीटर मात्रेच्या कामावर ८६ हजार ५५० रुपयांचे सिमेंट कमी वापरण्यात आले. या बंधा-याचे काम जून २००४ पासून बंद असल्याने या कंत्राटदाराला नोटिसा बजावून जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधित कंत्राटदाराला कार्यवाही करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-याकडे २८ सप्टेंबर २००६ ला पत्रव्यवहार केला होता. मात्र याच कंत्राटदाराला ३१ मार्च २००९ पर्यंतच्या मुदतवाढीपेक्षा ३० जून २००९ पर्यंत मुदतवाढ दिल्याचा ठपका लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालात ठेवण्यात आला आहे. मौजे खापरी व मासवणे येथील या बंधा-याच्या कामात निविदेपासून ते काम पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराला पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Read More »

भ्रष्टाचारविरोधी पथकाचा अहवाल मागे घ्यायला लावला

तीन वर्षापूर्वी झालेल्या श्रीलंका दौ-यात एका भारतीय क्रिकेटपटूने भ्रष्टाचारविरोधी नियमांचा भंग केल्याचा श्रीलंका बोर्डाचा अहवाल बीसीसीआयच्या पदाधिका-याने मागे घेण्यास भाग पाडले, असा आरोप पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांनी बीसीसीआयवर केला आहे.


चंडीगड – तीन वर्षापूर्वी झालेल्या श्रीलंका दौ-यात एका भारतीय क्रिकेटपटूने भ्रष्टाचारविरोधी नियमांचा भंग केल्याचा श्रीलंका बोर्डाचा अहवाल बीसीसीआयच्या पदाधिका-याने मागे घेण्यास भाग पाडले, असा आरोप पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांनी बीसीसीआयवर केला आहे. बिंद्रा यांच्या आरोपांमुळे स्पॉटफिक्सिंग प्रकरणात तोंडघशी पडलेल्या बीसीसीआयच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
''भारताने २०१० मध्ये केलेल्या श्रीलंका दौ-यावेळी 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमील ईलम (एलटीटीई) ऑपरेशन'मुळे भारतीय संघाच्या सुरक्षेची जबाबदारी लंकेच्या माजी निवृत्त जनरल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. भारतीय क्रिकेटपटूंसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. क्रिकेटपटूंचे वास्तव्य असलेल्या हॉटेलच्या लॉबीसह प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्यावेळी संघासोबत असलेला पदाधिकारी एका क्रिकेटपटूच्या खोलीत आपल्यासोबत एक तरुणी घेऊन गेला. हा क्रिकेटपटू गेले सहा मोसम चेन्नई संघातर्फे खेळतो आहे. सदर तरुणी रात्रभर त्या क्रिकेटपटूच्या खोलीत होती, असे सीसीटीव्हीच्या 'फुटेज'मधून निदर्शनास आले. आयसीसीच्या संशयित बुकींच्या यादीतील एकाने त्या तरुणीला पाठवल्याचे समजते. या घटनेमुळे आयसीसीच्या सुरक्षेच्या नियमांसह भ्रष्टाचारविरोधी अटींचाही भंग झाला. जनरल यांच्या अहवालानंतर श्रीलंका बोर्डाने भारताच्या संघव्यवस्थापकांना तसे लेखी कळवले. त्यानंतर आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या अधिका-यांच्या कानावरही सदर बाब घातली. तसेच सीसीटीव्ही 'फुटेज'ही सुपूर्द केले. मात्र भारतीय बोर्डाच्या पदाधिका-याच्या दबावामुळे श्रीलंका बोर्डाने तक्रार मागे घेतली,''असा दावा बिंद्रा यांनी त्यांच्या संकेतस्थळावरील स्तंभात केला आहे. त्यानंतर 'द संडे टाइम्स'मध्ये याबाबत छापून आले. मात्र बीसीसीआयचे प्रवक्ते तसेच श्रीलंका बोर्डाने तसे काही घडले नसल्याचे सांगत प्रकरण दडपले.


Read More »

डोंबिवलीत छमछमवाल्यांची पळापळ

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुंबईसह राज्यभरात डान्सबार बंदीचा निर्णय घेतला असला तरी डोंबिवलीत अनेक ठिकाणी डान्सबारमध्ये छमछम सुरूच आहे.

डोंबिवली- गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुंबईसह राज्यभरात डान्सबार बंदीचा निर्णय घेतला असला तरी डोंबिवलीत अनेक ठिकाणी डान्सबारमध्ये छमछम सुरूच आहे. याविरोधात धडक मोहीम राबवत मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने येथी मयुर डान्सबारवर छापा टाकून १३ अल्पवयीन मुलींसह ६३ बारबाला व बारमालकासह ४२ ग्राहकांना अटक केली. त्यांना रविवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता, अल्पवयीन मुलींची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली अटकेत असलेल्या ४२ जणांपैकी १७ जणांना जामीन मिळाला असून, बारमालकासह २५ जणांना ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याण- शिळ मार्ग हा 'डान्सबार रोड' म्हणूनच ओळखला जातो. मानपाडा पोलिसांच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात डान्सबार, बीअर व लॉज येतात. मयुर डान्सबारसंदर्भात मुंबई पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या वेळी बारचालक कुमार शेट्टी हा पसार झाला.
वरिष्ठ अधिका-यांवर कारवाई होणार?
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमाकांत महिरे यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच मुंबई पोलिसांनी डान्सबारवर छापा टाकला. चव्हाण यांना रक्तदाबाचा त्रास झाल्याने ते रुग्णालयात दाखल झाले. मानपाडा हे क्रिम पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या भागात वर्णी लावण्यासाठी मोठी बोली लागली होती. केंद्रातील एका मंत्र्यानेही यात रस घेतल्याचे वृत्त आहे. पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांची बदली होऊन त्यांच्या जागी हिरासिंग जाधव यांनी पदभार स्वीकारला आहे. जाधव हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. उपायुक्त जाधव हे सरकारविरोधात 'मॅट'मध्ये गेले होते. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत डान्सबार सुरू असतील त्या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिले होते. त्यामुळे डोंबिवलीतील डान्सबारप्रकरणात आता कुणावर कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read More »

खरेदीची लगबग…

शाळा सुरू व्हायला, अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी आणि पालकांनी रविवारी दादर येथे दप्तर खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.


Read More »

'इस्टर्न फ्रीवे'ला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या

चेंबूर ते यलो गेट या 'इस्टर्न फ्रीवे'चे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
मुंबई- चेंबूर ते यलो गेट या 'इस्टर्न फ्रीवे'चे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करावे, अशी मागणी अणुशक्ती विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
एमएमआरडीएने चेंबूर ते यलो गेट दरम्यान हा मार्ग बनवला आहे. त्यासाठी येथील रहिवाशांनी एमएमआरडीएला चांगले सहकार्य केले आहे. या परिसरातील बहुतेक रहिवासी मागासवर्गीय समाजातील आहेत. डॉ. बाबासाहेब आंबडेकर त्यांचे श्रद्धास्थान असून, या मार्गाला त्यांचे नाव देण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या भावनेचा आदर करून या मार्गाचे डॉ. बाबासाहेब आंबडेकर असे नामकरण करावे, असे मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Read More »

'सीमॅट'मध्ये मुंबईचे ६ विद्यार्थी यशवंत

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीडीबीएम या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या 'कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट'(सीमॅट) या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचे सहा विद्यार्थी झळकले आहेत.

मुंबई- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीडीबीएम या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या 'कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट'(सीमॅट) या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचे सहा विद्यार्थी झळकले आहेत.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर ही परीक्षा घेतली जात होती. परंतु, यंदा प्रथमच केवळ राष्ट्रीय पातळीवर ही परीक्षा घेण्यात आली. मे महिन्यात झालेल्या या परीक्षेला देशभरातून ६७ हजार विद्यार्थी बसले होते. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील होते. गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये बंगळूरु, कोलकाता, रांची आणि चेन्नई येथील प्रत्येकी एक, तर मुंबई केंद्रातून परीक्षा दिलेल्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
बंगळूरु येथील रोहित राव हा ४०० पैकी ३५५ गुण मिळवून देशात प्रथम आला, तर मुंबईचा सत्यप्रकाश दुबे आणि कोलकाता येथील जिशाल अली मौला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. देशात १२ वी आलेली वीणाश्री सामनी ही मुलांमध्ये पहिली आली असून, आठवा आलेला कुशल कोटियार हा ओबीसी संवर्गातून पहिला आला आहे. दरम्यान, सोमवारपासून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

Read More »

मुंबई-बंगळूरु सेवेमुळे एसटीचा तोटा वाढणार?

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आर्थिक संकटात असतानाही तोटय़ातील मार्ग बंद करण्याऐवजी पुन्हा त्याच मार्गावर नव्याने बस फे-या सुरू करण्याचा चंग बांधला आहे.

मुंबई- राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आर्थिक संकटात असतानाही तोटय़ातील मार्ग बंद करण्याऐवजी पुन्हा त्याच मार्गावर नव्याने बस फे-या सुरू करण्याचा चंग बांधला आहे. महामंडळ ५ जूनपासून मुंबई ते बंगळूरु वातानुकूलित स्लिपर सेवा सुरू करणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही एसटीने पुणे-बंगळूरु दरम्यान अशा पद्धतीची बस सुरू केली होती. परंतु, तिला प्रतिसाद न मिळाल्याने महिनाभरातच ती बंद करावी लागली होती. असे असतानाही एसटी पुन्हा या मार्गावर ही सेवा का सुरू करत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
एप्रिल आणि मे या सुट्टीच्या हंगामाचा यंदाही महामंडळाला फायदा करून घेता आलेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यांत एसटीचे ९ टक्के प्रवासी कमी झाले आहेत. त्यातून महिन्याला जवळपास पाच कोटींचा तोटा एसटीला सहन करावा लागला आहे. अशा स्थितीत ठोस आणि कठोर निर्णय घेऊन एसटीला तोटय़ातून सावरण्याची आवश्यकता होती. मात्र, एसटी महामंडळाने तशी पाऊले उचललेली दिसत नाहीत.
एसटीने गाजावाजा करून ५ जून २०११ रोजी पुणे-बंगळूरु दरम्यान वातानुकूलित स्लिपर सेवा सुरू केली होती. त्याचे तिकीट ९०० रुपये होते. मात्र, या गाडीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे ती एका महिन्यात बंद करावी लागली होती. त्यामुळे मुंबई-पुणेदरम्यान या बस चालवण्यात आल्या. असे असतानाही आता पुण्याऐवजी मुंबईतून बंगळूरुसाठी ही सेवा सुरू केली जात आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे ही सेवा सुरू करत असल्याचा दावा एसटीने केला आहे. या बसचे तिकीट २,१८० रुपये असणार आहे. ९०० रुपये तिकीट असताना या गाडीला प्रवाशी मिळत नव्हते तिथे २,१८० रुपये खर्च करून कोण प्रवास करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बंगळूरुत बस नेण्याचा फायदा काय?
वसईतील सहा मार्ग तोटय़ात असल्याचे कारण देत एसटीने त्या मार्गावरील सेवा बंद केली होती. प्रत्यक्षात ती सेवा बंद झाल्याने वसई, विरारमधील नागरिकांचे हाल झाले. 'गाव तिथे एसटी' हे महामंडळाचे उद्दिष्ट असताना राज्यातील गावांऐवजी बंगळूरुपर्यंत महामंडळाची बस नेण्यात कोणता फायदा आहे, याचे गणित मात्र कोणालाही समजू शकलेले नाही.

Read More »

बायर्नला वर्षातील ऐतिहासिक तिसरे जेतेपद

बुंदेस्लिगा, चॅँपियन्स ट्रॉफी आणि जर्मन कप या तीनही स्पर्धा जिंकणारा बायर्न म्युनिच हा जर्मनीतील पहिला संघ ठरला.
बर्लिन – बुंदेस्लिगा, चॅँपियन्स ट्रॉफी आणि जर्मन कप या तीनही स्पर्धा जिंकणारा बायर्न म्युनिच हा जर्मनीतील पहिला संघ ठरला. शनिवारी वीएफबी स्टुटगार्टचा ३-२ असा पराभव करत बायर्नने जर्मन कपवर शिक्कामोर्तब केले. त्यांनी १६व्यांदा ही
स्पर्धा जिंकली.
मारियो गोमेझने दोन (४८ आणि ६१व्या मिनिटाला) आणि थॉमस म्युलरने (३७व्या मिनिटाला) एक गोल करत बायर्नच्या विजयात योगदान दिले. ०-३ पिछाडीवर पडलेल्या स्टुटगार्टकडून मार्टिन हर्निकने (७१ आणि ८०व्या मिनिट) दोन गोल करताना सामन्यात रंगत आणली. मात्र बरोबरी साधणे स्टुटगार्टला शक्य झाले नाही. या जेतेपदासह जुप हेन्केस यांच्या दोन वर्षाच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीचाही शेवट गोड करण्यात बायर्नच्या फुटबॉलपटूंना यश आले.

Read More »

रेल्वे प्रशासनाने लावली अध्यादेशाची विल्हेवाट

स्वत:च्याच अध्यादेशाची पायमल्ली रेल्वे प्रशासनाकडून होताना दिसत आहे.

मुंबई- रेल्वे अपघातात ठार झालेल्या बेवारस मृतदेह अंत्यसंस्कार करण्याच्या खर्चात रेल्वेने ३०० रुपयांची वाढ देऊन तो हजार रुपये केला आहे. याबाबतचा अध्यादेश मार्चमध्ये रेल्वे प्रशासनाने महाव्यवस्थापकांना पाठवूनही मुंबईत मध्य रेल्वेतर्फे पोलिसांना केवळ ७०० रुपयेच दिले जात असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
रेल्वे अपघातातील बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीच्या खर्चासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते समिर झवेरी यांनी प्रश्न विचारला होता. रेल्वे अपघातात ठार झालेल्या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी राज्य रेल्वे पोलिसांना ७०० रुपये दिले जात होते. हा निधी १४०० रुपये करण्याची मागणी रेल्वे पोलिसांनी केली होती. यासाठी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर रेल्वेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या खर्चात ३०० रुपये वाढ करून तो हजार रुपये केला. या निर्णयाची माहिती रेल्वे प्रशासनाने राज्य पोलिस आयुक्तालयाला दिलीच नाही. त्यामुळे पोलिसांना ७०० रुपयांवर समाधान मानावे लागत आहे.
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मिळणारे ७०० रुपये कमी होते. अनेक वेळा पोलिसांना खिशातील पैसे घालून अंत्यसंस्कार करावे लागत होते. त्यामुळेच या निधीत वाढ करण्याची मागणी केली होती. ३०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती स्थानिक रेल्वे प्रशासनाने राज्य पोलिसांना दिली नाही, असा दावा रेल्वे पोलीस आयुक्त प्रभात कुमार यांनी केला आहे. त्यामुळे स्वत:च्याच अध्यादेशाची पायमल्ली रेल्वे प्रशासनाकडून होताना दिसत आहे.

Read More »

मध्य रेल्वेची मोबाइल तिकीट सेवा तांत्रिक कचाट्यात

तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वे प्रशासनाला गेल्या पाच वर्षापासून मोबाइलद्वारे तिकीट सुविधा सुरू करता आलेली नाही.

मुंबई- रेल्वे तिकीट खिडक्यांवर लागणा-या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने सीव्हीएम कूपन, एटीव्हीएम, जेटीबीएस या सुविधा सुरू केल्या आहेत. या सुविधांमध्ये मोबाइलद्वारे तिकीट सेवेचाही समावेश होता. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वे प्रशासनाला गेल्या पाच वर्षापासून मोबाइलद्वारे तिकीट सुविधा सुरू करता आलेली नाही.
मोबाइलद्वारे लोकलचे तिकीट ही महत्त्वकांक्षी संकल्पना मध्य रेल्वेने २००८ मध्ये मांडली होती. या सुविधेद्वारे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना मध्य रेल्वेच्या तीन अंकी ग्राहक सुविधा क्रमांकावर एसएमएस करावा लागणार होता. त्यात कोठून कुठेपर्यंत प्रवास करायचा आहे, याचा तपशील नमूद करावयाचा होता. त्यानंतर या तिकिटाचे शुल्क आणि ते कोणत्या बँकेतून भरणार याचा तपशील पुन्हा प्रवाशांना पाठवावा लागणार होता. त्यानंतर तिकीट प्रवाशांना मोबाइलवरच मिळणार होते. मात्र, ही संकल्पना राबवण्यासाठी आवश्यक असलेला तीन अंकी क्रमांक अजूनही मध्य रेल्वेला मिळालेला नाही. त्याचबरोबर तिकिटांच्या किमती कमी असल्याने त्याचा परतावा बँका रेल्वेला कशा करणार हा देखील एक प्रश्न होता. परंतु, आता त्यावरही मात करण्यात आली असून, ३० बँकांना या सुविधेसाठी करारबद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येईल, असे मध्य रेल्वेतील माहीतगारांनी सांगितले.
सध्या तिकीट खिडक्या, सीव्हीएम कूपन, एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट बुकिंग केंद्र आदी ठिकाणी मध्य रेल्वेची तिकीटे उपलब्ध आहेत. मंत्रालयात येणा-या नागरिकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने तेथेच एटीव्हीएम मशिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी देखील एटीव्हीएम मशिन बसवण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. मोबाइलद्वारे लोकल तिकीट सुविधा सुरू झाल्यास प्रवाशांना आणखी दिलासा मिळणार आहे.

Read More »

'हरभजनचा सल्ला पुनरागमनासाठी उपयुक्त'

ऑफस्पिनर हरभजन सिंगला स्वत: भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यात अपयश येत आहे.
नवी दिल्ली – ऑफस्पिनर हरभजन सिंगला स्वत: भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यात अपयश येत आहे. मात्र त्याने दिलेला सल्ला 'स्टार' ड्रॅगफ्लिकर संदीप सिंगला पुनरागमनासाठी उपयोगी पडला. ''गेले नऊ महिने माझ्यासाठी कठीण गेले. मात्र जवळचा मित्र हरभजनने दिलेला सल्ला मला उपयोगी पडला. भरपूर मेहनत घे आणि कुटुंबियांसोबत सर्वाधिक वेळ घालव, असे त्याने मला सांगितल्याचे,'' संदीपने म्हटले. या महिन्यात हॉलंडमध्ये होणा-या एफआयएच जागतिक लीग राउंड तीन (उपांत्य फेरी) साठी संदीपची भारतीय हॉकी संघात निवड झाली आहे.


Read More »

ठाणे जिप लेखापरीक्षणाचा घोळ

शाळा दुरुस्तीसाठी केलेल्या तरतुदीतून शिक्षकांचा सत्कार करता येतो काय? लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल व वार्षिक प्रशासन अहवालावरील मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या साक्षीनंतर पंचायत राज समिती मंत्रालयातील विभागांच्या सचिवांची साक्ष घेणार आहे.

ठाणे- ठाणे जिल्हा परिषदेच्या २००५-०६चा लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल व वार्षिक प्रशासन अहवालावरील मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या साक्षीनंतर पंचायत राज समिती मंत्रालयातील विभागांच्या सचिवांची साक्ष घेणार आहे. ४ आणि ५ जूनला ही साक्ष घेण्यात येणार असून, त्यात लेखा पुनर्विलोकन अहवालातील प्रलंबित मुद्यांची चिरफाड समिती सदस्य करणार आहेत.
पंचायत राज समितीने १६ ते १९ ऑक्टोबर २०१२मध्ये ठाणे जिल्हा परिषदेस भेट देऊन तपासणी केली होती. जिल्हा परिषद दौ-याच्या वेळी पंचायत राज समितीने लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल व वार्षिक प्रशासन अहलावरील प्रश्नावली क्रमांक १ व २च्या संदर्भात तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुरुंदकर आणि संबंधित अधिका-यांची साक्ष घेतली होती. या साक्षीच्या वेळी उपस्थित झालेल्या मुद्दय़ांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी मंत्रालयीन सचिवांची साक्ष घेण्यात येणार आहे.
पंचायत समितीने उपस्थित केलेले प्रश्न
या साक्षीसंदर्भात पंचायत राज समितीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यात शाळा दुरुस्तीसाठी केलेल्या तरतुदीतून शिक्षकांचा सत्कार करता येतो काय? वसई पंचायत समितीने शैक्षणिकदृष्टय़ा मागास असलेल्या अनुसूचित जाती व जमातींसाठी 'टीएसपी' योजनेंतर्गत वेतन व भत्त्यातील तरतुदीतून साहित्यासाठी ४ टक्के खर्च कोणत्या आधारे केलेला आहे? विद्यार्थ्यांना पाटीव्यतिरिक्त इतर लेखन साहित्य न पुरवण्याची कारणे काय? अंबरनाथ येथे नियमबाह्य विहिरीचे अनुदान देणा-या जबाबदार अधिकारी व कर्मचा-यांवर कोणती कार्यवाही करण्यात आलेली आहे? जव्हार तालुक्यातील हातवणे येथील कोकण पद्धतीच्या बंधा-यासाठी सिमेंट पुरवण्याची जबाबदारी कोणाची? या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेसोबत कंत्राटदाराने विक्रीकर नोंदणी प्रमाणपत्र सादर केलेले नसताना ही निविदा का मंजूर करण्यात आलेली आहे? वसई तालुक्यातील शिरसाड येथील नळपाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे नोंदणी नसलेल्या जय जवान मजूर कामगार सहकारी संस्थेला का देण्यात आलेले आहे? याच योजनेवर अंदाजपत्रकापेक्षा जास्त रक्कम का खर्च करण्यात आलेली आहे? मुरबाड पंचायत समिती येथील बांधकाम विभागातील मैला कामगारांचा पगार हडप करणा-या अधिका-याला आणि कर्मचा-याला निलंबित करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे? सुमारे १ लाख रुपये अपहार केलेले असताना ती रक्कम केव्हा वसूल करण्यात आलेली आहे? अपहारित रक्कम वसूल केली असल्यास व्याजासहित रक्कम का वसूल करण्यात आलेली नाही? जिल्हा परिषदेतील कंत्राटदार, विभागप्रमुख व कर्मचा-यांना वेळोवेळी दिलेल्या आगाऊ रकमांची आजपर्यंत किती रक्कम वसूल करण्यात आलेली आहे? किती थकित आहे, इत्यादी प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयातील सचिवांना साक्षीदरम्यान उत्तर द्यावी लागणार आहेत.

Read More »

बार्सिलोनाचा शेवट गोड

स्पॅनिश ला-लिगा जेतेपदावर यापूर्वीच शिक्कामोर्तब करणा-या बार्सिलोनाने शनिवारी मलागाचा चार- एक असा पराभव करत १०० गुणांसह हंगामाचा शेवट गोड केला.
बार्सिलोना – स्पॅनिश ला-लिगा जेतेपदावर यापूर्वीच शिक्कामोर्तब करणा-या बार्सिलोनाने शनिवारी मलागाचा चार- एक असा पराभव करत १०० गुणांसह हंगामाचा शेवट गोड केला. गतविजेता रेआल माद्रिदप्रमाणेच बार्सिलोनानेही गुणांच्या 'शतका'च्या विक्रमाशी बरोबरी साधली.
बार्सिलोनाकडून डेव्हिड व्हिया (तिसऱ्या मिनिटाला), सेस्क फाब्रेगॅस (१४व्या मिनिटाला) आणि मार्टिन मोंटोयाने (१६व्या मिनिटाला) पहिल्या १६ मिनिटांतच गोल करत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. आंद्रेस इनियेस्टाने ५२व्या मिनिटाला बार्सिलोनाचा गोलांचा 'चौकार' पूर्ण केला. मलागाकडून एकमेव मोरॅल्सने ५६व्या मिनिटाला केला. या लढतीने बार्सिलोनाने कर्करोगावर मात करणारा फ्रान्सचा बचावपटू एरिक अ‍ॅबिडेलला निरोप दिला.
मॉरिन्यो यांनी घेतला निरोप
गतविजेता रेआल माद्रिदनेही शेवटच्या लढतीत घरच्या मैदानावर ओसॅसुनावर ४-२ असा विजय मिळवला. या लढतीसोबतच रेआल माद्रिदचे प्रशिक्षक जोस मॉरिन्यो यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Read More »

मय्यपन,विंदूच्या कोठडीत वाढ

गुरुनाथ मय्यपन,विंदू यांच्यासह दोन आरोपींच्या न्यायायलीन कोठडीत १४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी गुरुनाथ मय्यपन, विंदू दारा सिंग, प्रेम तनेजा आणि अल्पेश पटेल या चारजणांच्या न्यायालयीन कोठडीत १४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईच्या किला न्यायालयात ही सुनावणी झाली. या चौघांनीही तात्काळ जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावरील सुनावणी थोड्याच वेळात सुरु होणार आहे.


Read More »

सेरेना, फेरर उपांत्यपूर्व फेरीत

अव्वल सीडेड अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियाची स्वेतलाना कुझनेटत्सोवा आणि चौथा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेररने रविवारी फ्रेंच ओपनमध्ये एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पॅरिस – अव्वल सीडेड अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियाची स्वेतलाना कुझनेटत्सोवा आणि चौथा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेररने रविवारी फ्रेंच ओपनमध्ये एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. शनिवारी उशीरा झालेल्या लढतींमध्ये अव्वल सीडेड सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि तिसरा सीडेड स्पेनचा राफाएल नाडालनेही चौथ्या फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीत सेरेनाने १५व्या मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीला सहा-एक, सहा-तीन असे सहज नमवत दमदार फॉर्म कायम ठेवला. सेरेनाला कारकीर्दीत दुस-यांदा फ्रेंच ओपन जिंकण्याची संधी आहे. मात्र लक्ष वेधून घेतले ते ८५व्या रॅँकिंगवर घसरलेल्या कुझनेत्सोवाने. तिने आठव्या मानांकित जर्मनीच्या अ‍ॅँजेलिक कर्बरला सहा-चार, चार-सहा, सहा – तीन असा पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच २००९ फ्रेंच ओपन विजेती कुझनेटत्सोवाने अन्य मानांकितांनाही आव्हान दिले आहे. पुरुष एकेरीत फेररनेही २३वा मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केविन अ‍ॅँडरसनचा सहा -तीन, सहा-एक, सहा-एक असा सहज पराभव केला.
तत्पूर्वी, शनिवारी उशीरा झालेल्या लढतींत अव्वल मानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि तिसरा सीडेड स्पेनचा राफाएल नाडाल यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला.
जोकोविचने २६वा मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवला सहा -दोन, सहा-दोन, सहा-तीन असे सहज नमवले. याबरोबरच जोकोविचने गेल्या महिन्यात माद्रिद ओपन एटीपी स्पर्धेत दिमित्रोवकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली. प्रथमच फ्रेंच ओपन जिंकण्याच्यादृष्टीने जोकोविचची आगेकूच याबरोबरच कायम राहिली. विक्रमी सातवेळा फ्रेंच ओपन जिंकणारा नाडालने २७वा मानांकित इटलीच्या फॅबियो फोगनिनीचा सात – सहा, सात-चार, सहा- चार असा पराभव केला. पहिल्या दोन राउंडमध्ये नाडालला पहिले सेट गमवावे लागले होते. येथेही त्याला पहिल्या सेटमध्ये टायब्रेकपर्यंत झुंज द्यावी लागली.
आठवा मानांकित सर्बियाच्या यांको टिपसारेविचला तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. २९वा मानांकित रशियाच्या मिखाइल युझ्नीने टिपसारेविचचा सहा-चार, सहा-चार, सहा-तीन असा पराभव केला. सातवा मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटनेही घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करत चौथी फेरी गाठली. त्याने रशियाच्या निकोलाय डेव्हिडेन्कोचा सहा-चार, सहा-चार, सहा-तीन असा पराभव केला. नववा मानांकित स्वित्झर्लंडलडच्या स्टानिस्लास वावरिंकानेही चौथ्या फेरीत प्रवेश करताना २१व्या मानांकित पोलंडच्या जर्झी जॅनोविझला सहा-तीन, सहा- सात, सहा – तीन, सहा -तीन असे नमवले. १२वा मानांकित जर्मनीच्या टॉमी हासने चुरशीच्या लढतीत १९वा मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नेरला सात -पाच, सात – सहा, चार- सहा, सहा- सात, १०- आठ असे पराभूत केले. याबरोबरच हासने चौथी फेरी गाठली. महिला एकेरीत १८वी मानांकित सर्बियाच्या येलेना यान्कोविचने तिस-या फेरीत नवव्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या सामंथा स्टॉसूरला तीन- सहा, सहा-तीन, सहा-चार असा पराभवाचा धक्का दिला. सातव्या मानांकित चेक रिपब्लिकच्या पेट्रा क्विटोवालाही तिस-या फेरीत अमेरिकेच्या जेमी हॅम्प्टनकडून एक-सहा, सहा – सात असा पराभवाचा धक्का बसला.
सानिया-बेथनी दुस-या फेरीत
भारताच्या सानिया मिर्झाने तिची अमेरिकेची सहकारी बेथनी मॅटेक-सॅँड्ससह रविवारी महिला दुहेरीत विजयी सलामी दिली. या सातव्या सीडेड जोडीने अ‍ॅलिझ कॉर्नेट आणि व्हर्जिन रॅझानो या फ्रान्सच्या जोडीचा सहा – तीन, सहा-चार असा पराभव केला.
'बर्थडे बॉय' नाडाल
सोमवारी (तीन जून) नाडालचा २७वा वाढदिवस आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठून 'बर्थ डे' साजरा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्याची चौथ्या फेरीत १३वा मानांकित जपानच्या की निशीकोरीशी गाठ पडत आहे.

Read More »

कोहलीसह 'बर्थडे बॉय' कार्तिकचा फलंदाजीचा सराव

गोलंदाजी अपयशी ठरली असली तरी फलंदाजीने भारताला पुन्हा एकदा सावरले.
बर्मिगहॅम – गोलंदाजी अपयशी ठरली असली तरी फलंदाजीने भारताला पुन्हा एकदा सावरले. विराट कोहली (१२० चेंडूंत १४४ धावा) आणि दिनेश कार्तिकच्या (८१ चेंडूंत १०६ धावा)दणदणीत शतकांमुळे भारताने शनिवारी पहिल्या सराव लढतीत श्रीलंकेवर पाच विकेट्सनी विजय मिळवला. संघाच्या विजयासह कार्तिकने २८वा वाढदिवसही दणक्यात साजरा केला.
विजयासाठी ३३४ धावांचे आव्हान गाठताना एका क्षणी भारताची अवस्था २० षटकांत चार बाद ११० अशी होती. मात्र कोहली आणि कार्तिकने आयपीएलमधील सवरेत्तम फॉर्म कायम राखत पाचव्या विकेटसाठी १४० चेंडूंत १८६ धावांची भागीदारी करताना भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. कार्तिकने चौकार ठोकत एक षटक राखून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताप्रमाणेच श्रीलंकेचे गोलंदाजही स्विंगला साथ देणा-या खेळपट्टीचा फायदा उठवू शकले नाहीत.
कोहली श्रीलंकेसाठी पुन्हा घातक
सराव लढत असली तरी कोहली पुन्हा श्रीलंकेविरुद्ध घातक ठरला. त्याने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत ३० वनडे खेळताना ५५.४४च्या सरासरीने तब्बल १३८६ धावा फटकवल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. सराव लढतीतील त्याच्या खेळीने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात श्रीलंकेविरुद्धच्या वनडेची आठवण करून दिली. त्यावेळी त्याने ८६ चेंडूंत नाबाद १३३ धावा फटकवल्या.
वॉटसनच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय
कार्डिफ – सलामीवीर शेन वॉटसनने अवघ्या ९८ चेंडूंत (१५ चौकार आणि चार षटकार) १३५ धावा फटकवल्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या सराव लढतीत वेस्ट इंडिजला चार विकेट्सनी नमवता आले. विजयासाठी २५७ धावांचे आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाची दोन बाद चार अशी स्थिती होती. मात्र वॉटसनने एकहाती फटकेबाजी केली. तो बाद झाल्यावर मिचेल मार्शने १९ चेंडूंन नाबाद ३९ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, वॉटसनने गोलंदाजीही चांगली करत सहा षटकांत १२ धावाच दिल्या. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मात्र विंडिजकडून डॅरेन ब्रॉव्हो (८६) आणि जॉन्सन चार्ल्सने (५५) अर्धशतके झळकवत संघाला ५० षटकांत नऊ बाद २५६ धावा करू दिल्या.
पाकिस्तान- द. आफ्रिकेचा आज सराव
लंडन – पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सोमवारी (तीन जून) सराव लढत होत आहे. श्रीलंकेविरुद्धची पहिली सराव लढत पावसामुळे वाया गेल्यामुळे पाकिस्तानची चॅँपियन्स ट्रॉफीपूर्वी ही पहिलीच सराव लढत आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीच्या सरावासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. प्रतिस्पर्धी संघही त्याच प्रयत्नात असेल.
वेळ : दु. तीन वाजता.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेटवर.

Read More »

प्रमोद जठारांनी किती गावांची तहान भागवली

काँग्रेसवर टीका करून प्रसिध्दी मिळवणे हाच जठार यांचा कार्यक्रम आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त केला हे त्यांना कधी दिसले नाही का, असा सवाल काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस काका कुडाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
कुडाळ – आमदार प्रमोद जठार यांनी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातील किती गावांची तहान भागविली आणि पाण्यासाठी जिल्हा परिषदेकडे किती प्रस्ताव पाठवले, हे जाहीर करावे. काँग्रेसवर टीका करून प्रसिध्दी मिळवणे हाच जठार यांचा कार्यक्रम आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त केला हे त्यांना कधी दिसले नाही का, असा सवाल काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस काका कुडाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
पाणीटंचाई काँग्रेसची देणगी हा प्रमोद जठार यांचा जावईशोध आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे जठार अज्ञानीपणे वक्तव्य करत आहेत. हा त्यांचा खटाटोप पाण्यासाठी नसून मतांसाठी आहे. मात्र जिल्हय़ातील जनता एकदा सोसू शकते वारंवार नाही, हे जठार यांनी लक्षात घ्यावे, असा सल्लाही कुडाळकर यांनी दिला. राज्य दुष्काळग्रस्त असताना सिंधुदुर्गात मात्र टँकरची गरज नाही. ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र, जठार दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत, असा आरोप कुडाळकर यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या टंचाई कार्यक्रमांतर्गत २०२ अंदाजपत्रके मंजूर आहेत. त्यात नवीन १४८ विंधन विहिरी, १२७ विंधन विहिंरी दुरुस्ती, १२ विहिरींच्या खोलीची कामे, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीचे काम जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत होत आहे. जिल्हा परिषदेला सरकारकडून २०१२-१३ वर्षाकरता राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तब्बल सहा कोटी दोन लाख आणि २०१३-१४ साठी पाच कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती कुडाळकर यांनी पत्रकातून दिली.
जलस्वराज्य योजनेंतर्गत सरकारने ग्रामसभेला आराखडा बनवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पाणीटंचाई काँग्रेसची देणगी आहे, असे म्हणणे केवळ हास्यास्पद आहे. स्वत:ला कार्यक्षम आमदार म्हणता तर आपण जिल्हा परिषद प्रशासनाच्या नावाने बोंबाबोंब करण्यापेक्षा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून किती गावांची पाणीटंचाई दूर केली, त्याचा खुलासा करावा, असे आवाहन कुडाळकर यांनी जठार यांना केले आहे.

Read More »

खेडमध्ये आठवडाभरात दहा घरफोड्या

खेड शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल दहा घरफोडय़ा करून चोरटय़ांनी येथील पोलिसांना आव्हान दिले आहे.



संग्रहित छायाचित्र
खेड – वर्षभरापूर्वी शहरातील ऋषभ ज्वेलर्स ही सराफी पेढी फोडून केलेल्या लाखोंच्या घरफोडीसह इतर चोरीप्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल दहा घरफोडय़ा करून चोरटय़ांनी येथील पोलिसांना आव्हान दिले आहे.
चोरटय़ांनी जणू खेडमध्ये आपले बस्तानच बांधले आहे. २६ मे रोजीच्या रात्री शहरातील दमेज अपार्टमेंट येथील डॉ. पाध्ये दवाखाना, अमान सप्लायरचे कार्यालय, बाबा खेडेकर यांचे स्पेअर पार्टचे दुकान तसेच मुद्राळे यांचे घर फोडून हजारोंचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. ३० मे रोजी रात्री महाडनाका येथील जुनेद अपार्टमेंट येथील भूषण देशमुख यांचा बंद फ्लॅट फोडून २० हजारांच्या रोख रकमेसह चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबवले. या चोरीच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांना चकवत चोरट्यांनी लगेचच दुस-या दिवशी म्हणजेच ३१ मे रोजीच्या रात्री समर्थ नगर येथील कुळे व प्रकाश हेळगावकर यांची घरे तसेच शहरालगतच्या भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीन फ्लॅट फोडले.
दरम्यान, या सर्व घरफोडय़ांमध्ये चोरटय़ांच्या हाती काही लागले नसले, तरी पांडुरंग जाधव यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. यांपैकी काही घर मालकांनी चोरीची तक्रार दिली असून, काहींनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर अविश्वास दाखवत तक्रार देणे टाळले. चोरी, घरफोडीच्या प्रकरणांत तालुका आघाडीवरच असून, हे प्रकार रोखण्यात येथील पोलिस अपयशी ठरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढच होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read More »

सिंधुदुर्गमध्ये १२ पशुवैद्यकीय दवाखाने भाड्याच्या जागेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ पशुवैद्यकीय दवाखाने भाड्याच्या इमारतीत आहेत.
सिंधुनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ पशुवैद्यकीय दवाखाने भाड्याच्या इमारतीत आहेत. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध करून घेऊन स्वमालकीच्या इमारती बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे आदेश शनिवारी झालेल्या पशुसंवर्धन समितीच्या सभेत उपाध्यक्ष तथा सभापती मधुसूदन बांदिवडेकर यांनी दिले.
सभेला आत्माराम पालयेकर, भगवान फाटक, सोनाली शिर्सेकर, सीमा जंगले, धोंडू पवार आदी सदस्य उपस्थित होते. कुडाळ तालुक्यातील घावनळे, वाडोस, सरंबळ, कणकवली तालुक्यातील खारेपाटण, सावंतवाडीमधील आंबोली, दोडामार्गमधील उसप, वैभववाडीतील तिथवली, आखवणे, भुईबावडा, देवगडमधील पोयरे, कुवळे, मोंड या ठिकाणचे पशुवैद्यकीय दवाखाने भाडय़ाच्या तर काही ग्रामपंचायतीच्या जागेत आहेत.
याठिकाणी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास स्वमालकीच्या जागेत हे दवाखाने नेता येतील. त्यासाठी त्या ग्रामपंचायतींना पत्राने कळवावे व जागा उपलब्ध होत असतील तेथे इमारत बांधकामांचे प्रस्ताव तयार करावेत, असे आदेश सभापती बांदिवडेकर यांनी दिले. तर पोईप व दिगवळे निर्लेखनासाठी आहेत. तर इन्सुली येथे नवीन इमारत मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील १४ ठिकाणची शीतगृहे बंद असून, ती लवकरच सुरू करण्यात येतील. दुधाळ जनावरे निवड योजनेत ४४ लाभार्थीचे १२० अर्ज दाखल झाले आहेत. त्याची छाननी करून त्या जनावरांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात सभेत देण्यात आली.
जिल्हय़ातील २६ गावात जनावरांच्या खोड्याची मागणी झाली असून, तीन लाखांचे अनुदान उपलब्ध आहे. अन्य गावांचे प्रस्ताव तातडीने घेऊन हे काम पूर्ण करावे, असेही आदेश सभापतींनी दिले. कामधेनू दत्तक योजनेत यावर्षी १०२ गावे निवडण्यात येणार असून, मुख्य गावातील जनावरे कमी पडत असतील तर लगतचे गाव सहभागी करून घेऊन तसा ग्रामसभेचा ठराव घ्यावा व या नव्या बदलानुसार कामधेनू दत्तक योजनेत यावर्षी गावे समाविष्ट करावीत, असेही आदेश या वेळी सभापतींनी दिले.

Read More »

सिंधुदुर्गने नाव दिले.. रत्नागिरीने काम शिकवले

सिंधुदुर्ग जिल्ह्याने मला नाव दिले, पण काम कसे करायचे, हे मला रत्नागिरी जिल्ह्याने शिकवले,'' हे उद्गार आहेत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार डॉ. निलेश राणे यांचे.
रत्नागिरी - ''खासदारकीच्या चार वर्षात मला खूप अनुभव मिळाले. माझा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी खूप विकासकामे केली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग विकसित आहे. मात्र रत्नागिरीत तसे नव्हते. सगळय़ा विचारांच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याने मला नाव दिले, पण काम कसे करायचे, हे मला रत्नागिरी जिल्ह्याने शिकवले,'' हे उद्गार आहेत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार डॉ. निलेश राणे यांचे.
खासदार डॉ. राणे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन शनिवारी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते झाले. या वेळी डॉ. राणे यांनी आपल्या भाषणात काही चिमटे काढले, तर सहकार्य करणा-यांचे आभारही मानले. रत्नागिरीतील परिस्थिती बदलण्यासाठी कार्यकर्त्यांनी काय करायला हवे, याबाबत मार्गदर्शनही केले. युवा खासदार म्हणून ओळख निर्माण केलेल्या डॉ. राणे यांनी आपल्या राजकीय परिपक्वतेचे उदाहरणच या भाषणातून दिले. उद्योगमंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमय केला असल्याने तिथे 'टीम' बांधण्याची गरज नाही. मात्र रत्नागिरीत तसे नाही. सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं अवघड काम आपल्याला करायला लागले. लोकं कशी असतात, मत मिळवणे किती कठीण आहे, हे इथे आल्यावर आपल्याला कळले, असे मिश्कीलपणे सांगत यातूनच आपल्याला कामाची पद्धत शिकता आली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी मोठय़ा विश्वासाने आपल्याला खासदार बनवले. त्यामुळे कोणाच्याही टीकेला भीक न घालता आपण काम करत राहायला पाहिजे एवढेच आपल्याला कळते. कोकणाने उद्योगमंत्री राणे यांना आणि आपल्या परिवाराला जे काही दिले आहे ते आयुष्यभर फेडता येणार नाही. या ऋणातच आपण सातत्याने कार्यरत राहू, असे अभिवचन खासदार डॉ. राणे यांनी या वेळी दिले.
आपण खासदार म्हणून पुन्हा निवडून येणार, यात शंकाच नाही. पण तेवढय़ावरच समाधानी राहायचे का, असा प्रश्न त्यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्यात आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका इतकेच नाही, तर ग्रामपंचायतीही काँग्रेसकडेच असायला हव्यात. सत्ता नसेल तर कार्यकर्त्यांना ताकद कोठून मिळणार, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठला पाहिजे. तरच इथले चित्र बदलेल, असे खासदार डॉ. राणे म्हणाले.
भाषणात खासदार डॉ. राणे यांनी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांचे कौतुक केले. बूथ प्रतिनिधी नियुक्तीचे काम रत्नागिरी जिल्ह्यातच सर्वात चांगले झाले आहे आणि त्याचे श्रेय रमेश कीर आणि त्यांच्या सहका-यांचे आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्या आयुष्यातले पहिले पद आपल्याला रत्नागिरीतच मिळाले. आपण पक्षाचा प्रभारी झालो ते प्रथम रत्नागिरी जिल्ह्यातच. या प्रेमापोटीच आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी सतत कार्यरत राहू, असेही खासदार डॉ. राणे म्हणाले.
तालुकाध्यक्ष नाना मयेकर यांनी प्रास्ताविक केले. दोन रुग्णवाहिका, बेरोजगार तरुणांसाठी बारा रिक्षा, दुष्काळग्रस्तांसाठी टँकर, असंख्य क्रीडा स्पर्धा, सिंधुदुर्गातून सुरू झालेला गावभेट कार्यक्रम यांसारख्या अनेक उपक्रमांमधून खासदार डॉ. निलेश राणे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. चंद्रकांत तथा चंदुभाई देशपांडे यांनी रामायणातले किस्से, शायरी या माध्यमातून उद्योगमंत्री राणे आणि खासदार डॉ. राणे यांच्या कामाची पद्धत उपस्थितांसमोर मांडली. डॉ. निलेश राणे यांच्या नम्र वागण्याचेही त्यांनी आवर्जून कौतुक केले. याप्रसंगी मनोहर खापणे, सौ. हुस्नबानू खलिफे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. राणे यांनी सर्वात जास्त निधी राजापूरला दिल्याचे माजी आमदार गणपत कदम यांनी सांगितले.
या वेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात पावसमधील भाजपचे आबा गुळेकर, वाटदचे अरुण मोरे, जयगडमधील शिवसेनेचे राजू पवार, संजय महाकाळ, महेंद्र दुर्गवळी यांचा समावेश होता.
जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी आपल्या भाषणात डॉ. निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. कोणाच्याही हाकेला ओ देणारे खासदार अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. विकास करायचा असेल तर उद्योगमंत्री नारायण राणे हेच एकमेव पर्याय आहेत, असे कीर म्हणाले.

Read More »

'त्या' कृषी पर्यवेक्षकाची हकालपट्टी

संगमेश्वर तालुक्यातील माखजन विभागातील वसुंधरा पाणलोट समितीचे अध्यक्ष व सचिवांना धमकावणारा कृषी पर्यवेक्षक सुधाकर पवार याची कृषी विभागाने हकालपट्टी केली आहे. 
माखजन – संगमेश्वर तालुक्यातील माखजन विभागातील वसुंधरा पाणलोट समितीचे अध्यक्ष व सचिवांना धमकावणारा कृषी पर्यवेक्षक सुधाकर पवार याची कृषी विभागाने हकालपट्टी केली आहे. 'प्रहार'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने दखल घेत ही कारवाई केली.
पवार यांच्याकडे कृषी कामाबरोबर पाणलोट योजनेच्या १८ नंबर क्लस्टरची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पवार यांनी पाणलोट समितीचे अध्यक्ष व सचिवांना धमकावण्याचा प्रकार घडला होता. कासे तसेच आंबव पोंक्षे येथील अध्यक्ष व सचिव यांना हा अनुभव नुकताच आला होता. त्यामुळे क्लस्टर १८ मधील सर्व अध्यक्ष व सचिव यांनी एकत्र येवून पवार यांच्याविरोधात जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी के ली होती. याबाबत 'प्रहार'ने वृत्त देताच कृषी विभागाने यांची गांर्भियाने दखल घेवून पवार यांना निलंबित केले असल्याची माहिती आरवली मंडल अधिकारी बाजीराव भोसले यांनी दिली. पवार यांची हाकालपट्टी झाल्याने क्लस्टर १८ मधील अध्यक्ष व सचिवांना नि:श्वास सोडला आहे. या सर्वानी 'प्रहार'ला धन्यवाद दिले.

Read More »

'बीएसएनएल'ची सेवा विस्कळीत

रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर भागात ऑप्टिकल फायबर केबलमध्ये झालेल्या बिघाडामुळे 'बीएसएनएल'ची शहरातील सर्वच प्रकारची सेवा विस्कळीत झाली.
रत्नागिरी – शहरातील शिवाजीनगर भागात ऑप्टिकल फायबर केबलमध्ये झालेल्या बिघाडामुळे 'बीएसएनएल'ची शहरातील सर्वच प्रकारची सेवा विस्कळीत झाली. या तांत्रिक बिघाडामुळे शहराचा संपर्क शनिवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तुटला होता. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपासूनच 'मीडिया फेल्युअर'मुळे राजापूर, चिपळूणसह दापोली तालुक्यातील दूरध्वनी, मोबाइल सेवाही पूर्णपणे बंद होती.
शहरातील शिवाजीनगर भागात ऑप्टिकल फायबर केबलमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शुक्रवारी पहाटेनंतर बीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेसह मोबाइल, डब्लूएलएल, ब्रॉडबँड तसेच थ्री-जी सेवाही ठप्प झाल्याने रत्नागिरीतील हजोरो ग्राहकांचा शहराबाहेरील संपर्क कोलमडला. बंद पडलेली सेवा नेमकी कधी पूर्ववत होणार याबाबतही माहिती मिळू न शकल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली.
बीएसएनएलच्या सेवेतील या तांत्रिक बिघाडामुळे केवळ रत्नागिरी शहरांतर्गत लँडलाइन सेवा सुरू होती. ब्रॉडबँडसह थ्री-जी सेवाही ठप्प पडल्याने त्याचा फटका शहरातील अनेक बँकांनाही बसला. केबल नेट तसेच इतर कंपन्यांचे दूरध्वनी घेतलेल्या बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत सुरू होते. शनिवारी पहाटेपासून बंद पडलेली बीएसएनएलची सेवा दुपारी साडेतीन वाजता पूर्ववत झाली.

Read More »

कोळपेवासीयांनी उभारले एका रात्रीत मंदिर

एका रात्रीत मंदिर उभारण्यासाठी ग्रामस्थांचे सरसावले हात व माता काळेश्वरीच्या जयघोषात नियोजनबध्द काम करून एका रात्रीत मंदिर उभारण्यात कोळपे येथील ग्रामस्थांना यश आले.
वैभववाडी - एका रात्रीत मंदिर उभारण्यासाठी ग्रामस्थांचे सरसावले हात व माता काळेश्वरीच्या जयघोषात नियोजनबध्द काम करून एका रात्रीत मंदिर उभारण्यात कोळपे येथील ग्रामस्थांना यश आले.
कोळपे गावातील माता पार्वती श्री काळेश्वरी देवीच्या मंदिर उभारणीची मुहुर्तमेढ नियोजित वेळेनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजून ११ मिनिटांनी रोवण्यात आली. अडीच महिने सुरु असलेल्या नियोजनानुसार चरी मारणारे कामगार पूढे सरसावले. चरीसाठी केवळ २० मिनिटे देण्यात आली होती. २० बाय २६ फुट लांबी रुंदीची चरी ठरलेल्या वेळेत कामगारांनी पूर्ण केली. त्यांची जागा लगेच चि-याचे काम करणा-या ३० कारागिरांनी घेतली. चि-याचे दोन थर होताच २६ फुटाच्या लांबीला ठराविक अंतरावर तीन लोखंडी कमानी उभारण्यात आल्या. हाताला मिळेल ते काम करण्यासाठी कारागिरांबरोबर भाविकही परिश्रम घेत होते.
गाभारा व कळसाचे काम करणारे कारागिर मुंबईहून दाखल झाले होते. त्यांनी ठरलेल्या वेळेतच काम पूर्ण केले. सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी उभ्या राहिलेल्या देखण्या व आकर्षक मंदिराच्या वास्तूत ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.


Read More »

आणखी एक सट्टेबाज विमानतळावरून अटकेत

युरोपला पळून गेलेला सट्टेबाज किशोर बादलानी उर्फ किशू पुणे याला पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी अटक केली. 
मुंबई- युरोपला पळून गेलेला सट्टेबाज किशोर बादलानी उर्फ किशू पुणे याला पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी अटक केली. आयपीएलमधील स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात सहभाग असल्याच्या त्याच्यावर संशय आहे.
बादलानीचे नाव स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात आल्यानंतर तो युरोपला पळून गेला होता. आज भारतात परतताना विमानतळावरच त्याला अटक करण्यात आली. बादलानी हा पाकिस्तान व भारतामधील सट्टेबाजांमधला मुख्य दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे.
आयपीएल स्पॉट फिक्‍सींगप्रकरणी आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी १३ सट्टेबाजांना अटक केली आहे. शनिवारी दिल्ली येथून अश्विन अगरवाल उर्फ टिंकू दिल्ली या सट्टेबाजाला अटक केली असून सहा जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पुण्याचा सट्टेबाज युरोपला पळाला, दोन अटकेत


गुन्हे शाखेच्या रडारवर असलेला पुण्यातील सट्टेबाज किशोर बादलानी उर्फ किशू पुणे याने अटकेच्या भीतीने भारतातून पलायन केले.

सात बुकी देश सोडून पळाले


आयपीएलमध्ये झालेल्या सट्टेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक कारवाईचा सपाटा लावला असला, तरी त्यांच्या प्रकरणातील सात मोठय़ा बुकींनी देश सोडून पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read More »
खेर्डी बाजारपेठेत सुक्या मासळीची आवक वाढली

पावसाला सुरुवात झाली की मासेमारी बंद होते आणि खवय्यांना सुक्या मासळीचा आधार असतो.
खेर्डी – पावसाला सुरुवात झाली की मासेमारी बंद होते आणि खवय्यांना सुक्या मासळीचा आधार असतो. दीर्घकाळ टिकणारी सुकी मासळी पावसाळ्यापूर्वी बाजारात दाखल झाली आहे. सध्या खेर्डी बाजारपेठ अशा सुक्या मासळी विक्रेत्यांनी गजबजली आहे. बाजारात बांगडा, कोलीम, मांदेली, कोळंबी, बोंबील व काड या सुक्या मासळीची आवक वाढली आहे.
चिपळूण तालुक्याच्या शेजारी असलेल्या दापोली, गुहागर या तालुक्यांना सागरकिनारा लाभला आहे. या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. मात्र, पावसाळय़ात सागराने उग्ररुप धारण केल्यानंतर मासेमारी बंद होते. या कालावधीत आपली उपजीविका चालविण्यासाठी येथील मच्छीमार पावसाळ्यापूर्वी काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बोंबील, आंबडकाड, कोलीम, मांदेली, बांगडे आदी प्रजातीचे मासे सुकवतात. हे मासे दीर्घकाळ टिकतात. पारंपरिक पद्धतीने त्यांना मीठाचा थर दिला जातो. खेर्डी बाजारपेठेत येथील सुकी मासळी विक्रीसाठी आली आहे.
चिपळूणला समुद्रकिनारा नाही. मात्र, रत्नागिरी व गुहागर येथून येथे मच्छी येते. यंदा मच्छीचा दुष्काळ असल्याने मच्छीचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे नागरिकांनी मच्छीपेक्षा मटण, चिकन याकडे आपला मोर्चा वळविला आहे. ओली मच्छी महाग असल्याने सुक्या मच्छीची आवक वाढली आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सुक्या मासळीमध्ये सोड्याची मागणी अधिक आहे. सुक्या मासळीला वर्षभर मागणी असते. मात्र, पावसाळ्यात खाण्यासाठी सुकी मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

Read More »

बारामती, अहमदनगरमध्ये मुसळधार

बारामती शहर आणि परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली.
बारामती - शहर आणि परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रातील पहिल्याच पावसाने शेतकरी वर्ग सुखावला. मात्र, पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी चौफेर दमदार पावसाची गरज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. तालुक्यातील बाबुर्डी येथे वीज पडल्याने गायीचा मृत्यू झाला. तर खताळपट्टा येथे नारळाच्या झाडावर वीज पडली. त्यामुळे नारळाच्या झाडांनी पेट घेतला होता. मोरगावला ११० मिमी सर्वात जास्त पावसाने हजेरी लावली. सुपे परिसरात अत्यल्प दोन मिमी पावसाची नोंद झाली.
सोमेश्वरनगर परिसरात रात्री उशिरा तीन तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस सुरू होता. बारामती शहरात शनिवारी रात्री आठ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री दोन तास कोसळत होता. शहरात या पावसाची ३६ मिमी नोंद झाली. तालुक्यात माळेगाव ५५ मिमी, मानप्पावस्ती ५७ मिमी, पणदरे ४० मिमी, मोरगाव १०५ मिमी, सुपे दोन मिमी, वडगाव पाच मिमी, लोणी २५ मिमी, उंडवडी २० मिमी पाऊस झाल्याचे तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.
लोणी भापकर परिसरात या पावसामुळे मशागतीला गती मिळली. सुपे परगणा ते शिर्सुफळ, क-हावागज मुख्यत: खरिपाची पिके घेतली जातात. परंतु, पेरणीपूर्व मशागतीसाठी रोहिणी नक्षत्राची अपेक्षित असते. यावर्षी सुरू झालेल्या पावसाने करंजे या परिसरात जोरदार हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी माळेगाव, क-हावागज, उंडवडी, बारामती परिसरात पाऊस झाला. रात्री उशिरा वडगाव, बाबुर्डी, खाताळवाडी, मासाळवाडी याच्यासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पाणी साठले होते. या पावसामुळे खरिपाच्या पेरणीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी व चा-यासाठी मोठ्या दमदार पावसाची आवश्यकता आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरकर संतप्त
अहमदनगर – मे महिन्याच्या संपूर्ण कालावधीत अहमदनगर शहर आणि परिसरात ४२ अंशांपेक्षा जास्त तापमान होते. त्यामुळे उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावून नागरिकांना शनिवारी रात्री दिलासा दिला. जोरदार पाऊस आणि वा-यामुळे तापमान बरेच खाली उतरल्याने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र पाऊस सुरू होताच शहराच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले.
गेले दोन दिवस नगर शहराच्या आजूबाजूला पाऊस झाला असला तरी शहराला मात्र पावसाने हुलकावणीच दिली होती. त्यामुळे पावसाने नागरिकांना दिलासा दिला. शनिवारी रात्री आठनंतर नगर शहराच्या सावेडी, तारकपूर, रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसर, केडगाव, भिंगार, औरंगाबाद रस्ता, शहराच्या मध्यवर्ती भागाला जोरदार पावसाने झोडपले. वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस बराच काळ शहर आणि परिसराला झोडपत होता. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्री नऊच्या सुमारास पावसापाठोपाठ शहराच्या बहुतांश भागातील वीज पुरवठा बंद जाला. मोठा बिघाड झाल्याने वीजपुरवठा बंद झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. पाऊस सुरू झाल्याने आनंदी झालेल्या नागरिकांना मात्र लगेचच वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांच्या आनंदावर विरजण पडले. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. अहमदनगर शहरासह पाथर्डी, अकोले, जामखेड, नगर तालुका, कर्जत या तालुक्यांमध्येही शनिवारी चांगला पाऊस झाला.

Read More »

'दादर-सावंतवाडी'बाबत रेल्वेकडूनच चुकीची माहिती

उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेल्या दादर-सावंतवाडी विशेष रेल्वे गाडीबाबत रेल्वेकडून चुकीची माहिती देण्यात आली आहे.
रत्नागिरी – उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेल्या दादर-सावंतवाडी विशेष रेल्वे गाडीबाबत रेल्वेकडून चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने दादर-सावंतवाडी (०१००३) तसेच सावंतवाडी- दादर (०१००४) उन्हाळी विशेष गाडी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करण्यात आली आहे. या गाडीच्या फे-या तीन जूनला संपत असल्याने गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने ही गाडी आठ जूनपर्यंत विस्तारित केली आहे. मात्र, या गाडीला वातानुकूलित चेअर कार तसेच सेकंड, लास सिटींग अशी डब्यांची रचना असताना रेल्वेने प्रवाशांसाठी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीत १३ डब्यांच्या या गाडीला स्लीपरचे आठ डबे असल्याचे म्हटले आहे.
यानुसार तिकीट खिडकीवर या गाडीचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या लोकांना या गाडीला स्लीपर कोचचे डबेच नसल्याने या वर्गाचे तिकीट देता येणार नाही, असे सांगण्यात आले. यावर काहींनी बुकिंग क्लर्कला संबंधित जाहिरातही दाखवली. आयआरसीटीसीच्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीवरही या गाडीला स्लिपर दर्जाचा कोच नसल्याचे आढळले. त्यामुळे गाडीला स्लीपर क्लासचे डबे नसतानाही तशी माहिती 'हाय- टेक' रेल्वेने दिलीच कशी, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. या गाडीची माहिती देणारी जाहिरात इंग्रजीसह नामवंत मराठी दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

Read More »

रत्नागिरीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

फिनोलेक्स महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

रत्नागिरी- फिनोलेक्स महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या तिस-या वर्षात शिकणा-या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. मुळचा पुण्याचा असलेल्या या विद्यार्थ्याने येथील माळ नाका परिसरात आत्महत्या केली.
परीक्षेत कॉपी केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. याबाबतची माहिती पालकांना होईल, या भीतीने त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

Read More »

"यमला, पगला, दीवाना"

बुर्जुग अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांचे पुत्र सनी आणि बॉबी देओल यांची एकत्रित विनोदी केमिस्ट्री असलेला ‘यमला, पगला, दीवाना २’ येत्या शुक्रवारी सात जूनला प्रदर्शित होत आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुस-या भागातही विनोद, अँक्शन आणि कॉमे़डीचा तडका आहे. संगित सिवनने सिक्वल दिग्दर्शित केला आहे. यमला, पगला, दीवानाचा पहिला भाग हिट ठरला होता.


Read More »

स्पॉट फिक्सिंग – संजय जगदाळेंची चौकशी

माजी बीसीसीआयचे सचिव संजीव जगदाळे यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले.
नवी दिल्ली – माजी बीसीसीआयचे सचिव संजीव जगदाळे यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स, क्रिकेटपटू, फ्रॅचायझी यांच्यादरम्यान बीसीसीआय आणि श्रीनिवासन यांच्या भूमिकेसंदर्भात  जगदाळे यांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
राजस्थान रॉयल्स संघाने अटक करण्यात आलेल्या श्रीशांत,अजित चंडेलिया आणि अंकित चव्हाण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. जगदाळे यांच्याकडून आम्हाला काही ठराविक माहिती हवी आहे. त्यासाठी त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, संजय जगदाळे यांनी बीसीसीआयच्या सचिव पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहा मे पासून आतापर्यंत तीन क्रिकेटपटूंसह २६ जणांना अटक करण्यात आली आहे.

Read More »

"तात्या" परत येतोय सावधान

तात्या विंचू परतला आहे. “झपाटलेला २” मधून तात्या विंचू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण यावेळी तात्या विंचूचे वैशिष्टय म्हणजे त्याला थ्री डी स्वरुपातही पाहता येणार आहे. झपाटलेला या तुफान लोकप्रिय ठरलेल्या मराठी चित्रपटाचा सिक्वल येत आहे. झपाटलेलामधील तात्या विंचूचे पात्र लोक आजही विसरु शकलेले नाहीत. मेहश कोठारी यांनी या चित्रपटाचा पहिलाभाग दिग्दर्शित केला होता. दुसराभागही त्यांनीच दिग्दर्शित केला आहे. मराठीमधील हा पहिलाच थ्री डी सिनेमा आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

Read More »

सामान्य माणसाची असामान्य पावर

पावर हा राजकीय दबंगशाहीवर भाष्य करणारा चित्रपट आहे. यात एका असहाय्य महिलेचा राजकीय सत्तेशी लढा दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शकाने एका सामान्य महिलेच्या माध्यमातून राजकरण्यांना सामन्य माणसाची ताकत दखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक महिला केंद्रीत सिनेमा आहे. नागेश भोसले, निशा परुळेकर, विजय पाटकर, स्मिता शेवाळे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. विजय राणे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.  

Read More »

भरत घडवणार भूताचा हनिमून

भूताचा हनिमून एक विनोदी चित्रपट आहे. प्रेत-आत्म्याचा कथानक असलेला विषय विनोदीअंगाने मांडण्यात आलेला आहे. गावाला भूताचा शाप असल्याने गावात दहावर्षांपासून एकही लग्न झालेले नसते. त्यामुळे गावात कोणाच्याही घरात पाळणा हललेला नसतो. भरत जाधव या शापातून गावाची कशी सुटका करतो ते पाहण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल. भरत जाधव, विजय चव्हाण, संतोष मापेकरे, रुचिता जाधव यांच्या या चित्रपटाच प्रमुख भूमिका आहेत. राज मोहिते यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 

Read More »

'आजिविका योजना त्वरीत लागू होणार'

संपूर्ण देशात विशेषत: पूर्वीय राज्यांमध्ये ग्रामीण आजिविका योजना त्वरित लागू करण्यात येणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितले.
नवी दिल्ली – संपूर्ण देशात विशेषत: पूर्वीय राज्यांमध्ये ग्रामीण आजिविका योजना त्वरित लागू करण्यात येणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितले.
राष्ट्रीय ग्रामीण आजिविका मिशनच्या दुस-या वर्षपूर्ती निमित्त दिल्लीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत 'आम आदमी'च्या हिताच्या दृष्टीकोनातून आजिविका योजना लवकरात लवकर लागू करण्यात येणार असल्याची घोषणा सोनिया गांधी यांनी केली. आगामी २०१४ च्या निवडणूकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.
या योजनेंतर्गत उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेश या इशान्येकडील राज्यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. पुढील दहा वर्षांत दारिद्यरेषेखालील सात कोटी जनता दारिद्यमुक्त होईल. हे काम कठीण असलं तरी अशक्य नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या दोन वर्षांत ज्या राज्यांनी आजिविका योजनेचा स्विकार केला आहे त्या राज्यांतील ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास झाला आहे. विशेषकरुन ग्रामीण महिला सक्षमीकरणाला या योजनेमुळे हातभार लागला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात लवकरचं ग्रामीण आजिविका योजना लागू करण्यात येईल असा निर्धार काँग्रेस अध्यक्षांनी व्यक्त केला.
आजिविका योजना केंद्रीय ग्रामविकास विभागाने २०११ मध्ये सुरु केली होती. ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान सुधारण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना सुरु करण्यात आली होती. त्यात अंदाजे ६०० जिल्ह्यांतील, सहा लाख गावांतील अंदाजे सात कोटी जनतेपर्यंत पोहचण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

Read More »

'वर्ल्ड वॉर झेड'…

‘वर्ल्ड वॉर झेड’ या चित्रपटाच्या लंडनमधील प्रिमिअरला अभिनेत्री अँजेलिना जोली व ब्रॅड पिट उपस्थित होते.


Read More »

रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बदलापूर-अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
बदलापूर- बदलापूर-अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. बदलापूरजवळ सोमवारी दुपारी रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे सीएसटीच्या दिशेने येणा-या गाड्या काही काळ बदलापूर स्थानकावर खोळंबल्या. यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून युद्धपातळीवर काम सुरु आहे. तासाभरात रेल्वे सेवा पूर्ववत होईल असा दावा रेल्वेच्या अधिका-यांनी केला आहे.

Read More »

क्रिकेट पूर्वपदावर येईल-श्रीकांत

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली असली तरी लवकरच सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली असली तरी लवकरच सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे. श्रीकांत सध्या एका रिअँलिटी शोमध्ये काम करत आहेत.
मी या संपूर्ण प्रकरणामुळे खूप दुखी झलो आहे. तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचीही स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे निराशा झाली आहे. काही ठराविक क्रिकेटपटूंच्या या कृत्यामुळे क्रिकेटचे नाव बदनाम होत आहे ही खेदाची गोष्ट आहे, असे श्रीकांत सांगतात.
मात्र या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरचं क्रिकेटची मलीन झालेली प्रतिमा परत येईल. जनतेने क्रिकेटवर नेहमीच भरभरुन प्रेम केले आहे. एक क्रिकेटपटू त्यांच्यामुळेच यशशिखर गाठू शकतो. येत्या काही दिवसांतच स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा गुंताही लवकरच सुटेल असा विश्वास श्रीकांत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने श्रीशांत,अजित चंडेलिया आणि अंकित चव्हाणला १५ मे च्या दिवशी अटक केली आहे. त्यानंतर अभिनेता विंदू रांधवा याच्यासह आत्तापर्यंत २६ जणांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आले आहे.

Read More »

अडसर…

श्रीनगरमध्ये भररस्त्यात झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सोमवारी विस्कळीत झाली होती.


Read More »

एअर इंडियाच्या कर्मचा-याने केली सिगरेट तस्करी

सिगरेटची तस्करी केल्या प्रकरणी लंडन पोलिसांनी एअर इंडियाच्या कर्मचा-यांना ताब्यात घेतले होते.

मुंबई - सिगरेटची तस्करी केल्या प्रकरणी लंडन पोलिसांनी एअर इंडियाच्या कर्मचा-यांना ताब्यात घेतले होते. भाविक शहा या कर्मचा-याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर लंडन पोलिसांनी इतर कर्मचा-यांना सोडून दिले. मात्र भाविक शहाला आठ तास ताब्यात ठेवले होते.
एअर इंडियाने पाचहजार पाऊंडसचा जामिन भरल्यानंतर त्याची सुटका झाली. एअर इंडियाने या कर्मचा-याला निलंबित केले आहे. गेल्या शुक्रवारी ही घटना घडल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली. एअर इंडियाचे मुंबई-लंडन विमान हिथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर केबिन क्रू हॉटेलमध्ये जात असताना, त्यांच्या सामानाच्या तपासणीमध्ये पन्नास सिगरेटचे क्रेटस आढळले.
तपासणीमध्ये क्रेटस सापडलेल्या बॅगेवर कोणीही दावा केला नाही. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण क्रू ला च ताब्यात घेतले. चारतासाच्या चौकशीमध्ये क्रेटसची बॅग शहाची असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीसाठी शहाला थांबविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Read More »

लगबग पेरणीची

पावसाचे वेध लागले की पेरणीला सुरुवात होते. श्रीनगरमध्येही पावासाची सुरुवात झाल्याने शेतक-यांची भातशेतीसाठीची लगबग वाढू लागली आहे.


Read More »

फॅशन @ ६०

मुंबईमध्ये फॅशन डिझायनर शायना एनसीने आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये सहभागी झालेली ज्येष्ठ अभिनेत्री मधू शहा.




Read More »

रिती स्पोर्टसशी संबंध नाही – आर.पी.सिंह

भारताचा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंहने रिती स्पोर्टसशी करार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

नवी दिल्ली – भारताचा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंहने रिती स्पोर्टसशी करार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. रिती स्पोर्टसशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असे रुद्र प्रताप सिंहने सोमवारी स्पष्ट केले.
रिती स्पोर्टसमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणीची पंधरा टक्के भागीदारी असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. आर.पी.सिंह, सुरेश रैना, रविंद्र जाडेजा आणि प्रग्यान ओझा रिती स्पोर्टसशी करारबध्द असल्याचा दावा वर्तमानत्राने केला होता. महत्वाचे म्हणजे रैना आणि जाडेजा आयपीएलमध्ये ढोणी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधीत्व करतात.
आर.पी.सिंह भारतासाठी चौदा कसोटी आणि ५८ एकदिवसीय सामने खेळला आहे. रिती स्पोर्टस अरुण पांडेच्या मालकीची कंपनी आहे. अरुण पांडे ढोणीचा जवळचा मित्र आहे. २०१० मध्ये ढोणीने रिहीती स्पोर्टसबरोबर २१० कोटींचा करार केला. भारतीय क्रिकेटमधील हा सर्वात महागडा करार होता.

Read More »

क्रिकेट 'जंटलमन' खेळ नाही राहिला- प्रसन्ना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या चेन्नईमध्ये झालेल्या बैठकीनंतर क्रिकेट जंटलमन खेळ राहिला नाही
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या चेन्नईमध्ये झालेल्या बैठकीनंतर क्रिकेट जंटलमन खेळ राहिला नाही, असे माजी फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.
प्रसन्ना म्हणाले, “क्रिकेटमध्ये आता सर्वकाही पैशाच्या बळावर होत असून, तो जंटलमन खेळ राहिलेला नाही. आयपीएल दरम्यान भारतातील मैदाने खचाखच भरलेली दिसत होती. पैशाच्या जोरावर क्रिकेट चालत असल्याचे दिसून आले. आयपीएलदरम्यान क्रिकेट हा जंटलमन नागरिकांचा खेळ राहिला नसल्याचे पाहायला मिळाले. आमच्यावेळी फलंदाज बाद झाल्यानंतर पंचाचा निर्णय येण्यापूर्वीच स्वतःहून मैदान सोडत असे. त्यावेळी खरोखरच जंटलमन खेळ होता. मात्र, आता तशी परिस्थिती पाहायला मिळत नाही.’
सध्या क्रिकेटपटूंच्या मते पंच हे त्यांची भूमिका बजावत असून, त्याबद्दल त्यांना पैसे मिळत असल्याची भावना खेळाडूंच्या मनात निर्माण झाली आहे. चेन्नईमध्ये रविवारी बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीवरही प्रसन्ना यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read More »

राजकीय पक्ष माहितीच्या अधिकारात

राजकारण पारदर्शक होण्याच्या दिशेने केंद्रीय माहिती आयोगाने हे महत्त्वाचा निर्णय घेतला असून यापुढे देशातील सर्व राजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराखाली येणार आहेत.
नवी दिल्ली- राजकारण पारदर्शक होण्याच्या दिशेने केंद्रीय माहिती आयोगाने हे महत्त्वाचा निर्णय घेतला असून यापुढे देशातील सर्व राजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराखाली येणार आहेत.
केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त सत्यानंद मिश्रा यांनी सोमवारी ही माहिती दिली. काँग्रेस, भाजप, सीपीआय(एम), सीबीआय, एनसीपी आणि बसपा हे सहा राजकीय पक्ष माहितीच्या अधिकारात येत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
या सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्ष आणि मुख्य सचिवांना सहा आठवड्यात मुख्य माहिती अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय पक्षाच्या मुख्य माहिती अधिका-याने त्याच्याकडे आलेल्या अर्जावर चार आठवड्यात उत्तर देणे आवश्यक असल्याचे माहिती आयोगाने म्हटले आहे.
राजकीय पक्षांना त्यांना मिळणा-या वित्तीय मदतीची माहिती निवडणूक आयोगाला देणे गरजेचे असते. माहिती आयोगाच्या या निर्णयामुळे मात्र राजकीय पक्षांना सर्व माहिती उपलब्ध करुन द्याव लागणार आहे.

Read More »

ग्लोबमास्टर'मुळे भारतीय वायुसेना उत्साहीत

दूरच्या लढाईसाठी व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे ग्लोबमास्टर ताफ्यात दाखल झाल्यास वायुसेनेची ताकद ख-या अर्थी वाढणार असल्याचे मानले जात आहे.
नवी दिल्ली - अवजड शस्त्रसंभार वा शस्त्रसज्ज सैन्य वाहून नेऊ शकणारे सी-17 ग्लोबमास्टर हे विमान भारतीय वायुसेनेमध्ये लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आज (सोमवार) सूत्रांनी दिली. दूरच्या लढाईसाठी व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे ग्लोबमास्टर ताफ्यात दाखल झाल्यास वायुसेनेची ताकद ख-या अर्थी वाढणार असल्याचे मानले जात आहे.
“पहिले ग्लोबमास्टर हे जूनच्या मध्यावधीपर्यंत दिल्लीपासून जवळच असलेल्या हिंडॉन येथील वायुसेनेच्या विमानतळावर दाखल होईल. यानंतर जुलै महिन्यात आणखी दोन ग्लोबमास्टर वायुसेनेत दाखल होणार आहेत. वायुसेनेसाठी हे विमान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल,” असे भारतीय वायुसेना प्रमुख एन ए ब्राऊन यांनी सांगितले. अमेरिकेशी 2011 मध्ये करण्यात आलेल्या करारानुसार जून 2015 पर्यंत 10 ग्लोबमास्टर विमाने भारतीय वायुसेनेमध्ये दाखल करण्यात येणार आहेत. 4.1 अब्ज डॉलरचा हा करार अमेरिकेशी आत्तापर्यंत करण्यात आलेला सर्वांत मोठा संरक्षणविषयक खरेदीचा करार आहे.
ग्लोबमास्टर हे विमान तिबेट येथे सीमारेषेच्या पलीकडे चीनने विकसित केलेल्या लष्करी पायाभूत सुविधांच्या प्रचंड जाळ्याला उत्तर असलेल्या भारताच्या रणनीतीच्या केंद्रस्थानी असल्याचे मानले जात आहे. सीमेपलीकडे साधारणत: लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशला लागून असणा-या तिबेट प्रांतामध्ये चीनने 58,000 किमी लांबीचे रस्ते बांधले आहेत. याबरोबरच, या भागामध्ये पाच सुसज्ज लष्करी विमानतळ असून संपूर्ण विकसित रेल्वेचे जाळेही या भागामध्ये पसरलेले आहे.
याशिवाय, काश्‍मीर व लडाखमध्ये “डोंगरी लढाई’साठी सैन्याचे दळणवळणही ग्लोबमास्टरद्वारे करता येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले आहे.70 टन वजनाचे असलेले ग्लोबमास्टर 4200 किमीपर्यंत प्रवास करू शकते. याबरोबरच या विमानाला उड्डाण करण्यासाठी केवळ 3500 फूट धावपट्टी आवश्‍यक आहे.

Read More »

वाचकांचे व्यासपीठ- मान्सूनसाठी महापालिका सज्ज?

मान्सून दारावर पोहोचला तरी मान्सूनपूर्व तयारीचा भाग असलेली नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आदी विविध कामे सुरूच आहेत. महापालिका दरवर्षी पाणी तुंबणार नाही, असे दावे करते.
मान्सून दारावर पोहोचला तरी मान्सूनपूर्व तयारीचा भाग असलेली नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आदी विविध कामे सुरूच आहेत. महापालिका दरवर्षी पाणी तुंबणार नाही, असे दावे करते. मात्र तरीही पाणी साचण्याच्या घटना घडतातच. यंदाही मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांसह रेल्वे व इतर यंत्रणांनी नालेसफाई व इतर कामे समाधानकारक झाल्याचे दावे केले आहेत, ते खरे ठरतील का? मान्सूनपूर्व कामांना दरवर्षी उशीर का होतो? २००५च्या प्रलयानंतर आज ८ वर्षानी तरी प्रशासकीय यंत्रणांनी धडा घेतला आहे, असे वाटते का? मुंबईतील मिठीने गेल्या काही वर्षांत रौद्रावतार दाखवला नसला तरी मिठीची कामे योग्यरीत्या होत आहेत, असे वाटते का? पावसाळ्यात उद्भवणा-या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे का?

Read More »

पाऊसथेंबांची वाट

मरीन डाइव्ह परिसरात मान्सूनच्या वातावरणाचा अनुभव घेताना मुंबईकर.


Read More »

दालमियांचा चीअरलीडर्सला विरोध

बीसीसीआयचे नवनियुक्त हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी आयपीएलची स्वच्छता हाती घेण्याचे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली - आयपीएलची विश्वासहर्ता पुन्हा निर्माण करण्यासाठी बीसीसीआयचे नवनियुक्त हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी आयपीएलची स्वच्छता हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. दालमिया यांनी आयपीएलमधील चीअर लीर्डस आणि स्ट्रॅटजिक टाईमआऊच्या पद्धतीला विरोध केला आहे.
माझ्यावर जबाबदारी सोपवली असून, मी ती टाळू शकत नाही असे दालमिया यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच  पत्रकारपरिषदेला संबोधित करताना सांगितले. आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू बेकायदा कृत्यात सहभागी असतील, तर त्यासाठी संघमालकांना जबाबदार धरले जाईल असे दालमिया यांनी स्पष्ट केले.
आयपीएलला अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी सामन्यानंतर होणा-या पार्ट्यांवर बंदी एक पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे राजीनामा मागे घेण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष अजय शिर्के यांच्या प्रतिसादाची आम्ही वाट पहात आहोत असे दालमिया म्हणाले..

Read More »

आला आला वारा…(फोटो फिचर)

केरळमध्ये अंदाजाच्या एक दिवस आधी आलेल्या पावसाने मुंबईत दाखल होण्याचे संकेत दिले आहेत. मान्सून येण्याच्या पार्श्वभूमीवरचे सीएसटी परिसरातील टिपलेले विविध मूड…









Read More »

प्रहार बातम्या- तीन जून २०१३
नमस्कार प्रहार बातम्यांमध्ये आपल स्वागत..
» राजकीय पक्ष माहिती अधिकार कक्षेत
» देशभरात लवकरच 'ग्रामीण उपजीविका योजना' लागू करणार
» स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ
» सेन्सेक्स महिनाभराच्या नीचांकावर
» आयपीएलमधल्या चियरलीडर्सला जगमोहन दालमियांचा विरोध
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा…03062013

Read More »

न्यूझीलंडने जिंकली वनडे मालिका

मार्टिन गप्टिलने सलग दुसरे शतक झळकवल्याने न्यूझीलंडला रविवारी इंग्लंडविरुद्धची दुसरी वनडे ८६ धावांनी जिंकता आली.

साउदम्प्टन - मार्टिन गप्टिलने सलग दुसरे शतक झळकवल्याने न्यूझीलंडला रविवारी इंग्लंडविरुद्धची दुसरी वनडे ८६ धावांनी जिंकता आली. याबरोबरच न्यूझीलंडने तीन वनडेंच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
आता उभय संघांत बुधवारी (५ जून) तिसरी आणि अंतिम वनडे खेळण्यात येणार आहे. त्यात जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. चॅँपियन्स ट्रॉफीपूर्वी हा मालिका विजय न्यूझीलंडसाठी महत्वपूर्ण ठरेल, असे सामन्यानंतर कर्णधार ब्रेंडन मॅककलमने स्पष्ट केले.
सलग दुसरे शतक सलामीवीर गप्टिलने साजरे केले. त्याने १५५ चेंडूंत १९ चौकार आणि दोन षटकार फटकवत न्यूझीलंडकडून वनडेतील सर्वाधिक धावसंख्या नोंदवली. याआधी लू विन्सेन्टने न्यूझीलंडकडून सर्वाधिक १७२ धावा फटकवल्या होत्या. त्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे न्यूझीलंडला ५० षटकांत ३ बाद ३५९ धावा फटकवता आल्या.
कर्णधार ब्रेंडन मॅककलमनेही १९ चेंडूंत नाबाद ४० धावा करत भर घातली. त्याबदल्यात जोनाथन ट्रॉटच्या नाबाद शतकाचा (१०९) अपवाद वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. ट्रॉट एक बाजू धरून खेळत असताना त्याला दुस-या बाजूने एकानेही साथ दिली नाही. मिचेल मॅग्लॅशनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

Read More »

सेन्सेक्स महिनाभराच्या नीचांकावर

'एचएसबीसी' या संस्थेने मे महिन्यात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवल्याने सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी मुंबई शेअर बाजारात विक्री केली.
मुंबई- 'एचएसबीसी' या संस्थेने मे महिन्यात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवल्याने सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी मुंबई शेअर बाजारात विक्री केली. ज्यामुळे सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला आणि १९,६१०.४८ अंकावर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ४६.६५ अंकाची घट झाली आणि तो ५,९३९.३० अंकावर बंद झाला.
'एचएसबीसी'ने मे महिन्यात कारखाना उत्पादनात विक्रमी घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे बाजारातील भांडवली वस्तू, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा या क्षेत्रात विक्री वाढली. कारखाना उत्पादन २००९ पेक्षाही कमी असेल, अशी भीती 'एचएसबीसी'ने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिला असल्याचे शेअर दलालांनी सांगितले.
दरम्यान रुपयाचे डॉलरसमोर होत असलेले अवमूल्यनही बाजारातील विक्रीला बळ देऊन गेले. यामुळे सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. गेल्या महिनाभरातील त्याची ही नीचांकी पातळी ठरली. एकीकडे बाजारात विक्रीचा जोर असला तरी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली. त्याचबरोबर मे महिन्यात विक्रीमध्ये घट झाल्याचा फटका बाजारातील वाहन उत्पादक कंपन्यांना बसला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर घसरले. यात हिरो मोटो कॉर्प ३.६५ टक्के, बजाज ऑटो ३.३२ टक्के, ओएनजीसी २.८५ टक्के, सन फार्मा २.६८ टक्के, एचडीएफसी २.४० टक्के, मारुती सुझुकी २.२७ टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज २.१७ टक्के, टीसीएस १.९४ टक्के, एचडीएफसी बँक १.६३ टक्के, भेलमध्ये १.४३ टक्क्यांची घट झाली. तर इन्फोसिस ४.४ टक्के, जिंदाल स्टील २.२ टक्के, टाटा स्टील १.६ टक्के, गेल इंडिया १.४ टक्क्यानी वधारले. जागतिक शेअर बाजारांमध्येही अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीचा दबाव होता. यामुळे चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर यामधील शेअर निर्देशांकामध्ये घट झाली. तर ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स यांदेशातील शेअर बाजार घसरणीसह व्यवहार करत होते.
..मात्र मूर्तीमुळे इन्फोसिस फॉर्मात 
नारायण मूर्ती यांना पुन्हा एकदा कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्याने कंपनीच्या शेअरला बाजारात मोठी मागणी होती. इन्फोसिसचा शेअर चार टक्क्यांनी वधारला. या तेजीमुळे कंपनीच्या बाजारातील भांडवलामध्ये ६,१०७ कोटींची वाढ झाली. दिवसभरामध्ये शेअरने नऊ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली होती. तर ४.४२ टक्क्यांच्या वाढीसह तो बंद झाला. यामुळे इन्फोसिसचे बाजारातील भांडवल ६,१०७ कोटींनी वाढून १,४४,३६० कोटींवर गेले.

Read More »

वळवाचा गारवा!

वळवाच्या पावसाने रविवारी मुंबईकरांना चिंब केल्यानंतर सोमवारी सर्वत्र गारवा निर्माण झाला होता. संध्याकाळचे तापमानही तीन ते चार अंशांनी कमी झाल्याने गेली तीन महिने घामांच्या धारांचा अनुभव घेणारे मुंबईकर या सुखद गारव्याने आनंदले आहेत.
मुंबई- 'वासाचा पयला पाऊस आयला.. नभाचे घुम्मड वासाने भारियले!'.. प्रा. अशोक बागवे यांनी वळवाच्या पावसामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचे अशा सुंदर शब्दांत वर्णन केले आहे. अशाच सुखद आणि आल्हाददायक वातावरणाचा अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत. वळवाच्या पावसाने रविवारी मुंबईकरांना चिंब केल्यानंतर सोमवारी सर्वत्र गारवा निर्माण झाला होता. संध्याकाळचे तापमानही तीन ते चार अंशांनी कमी झाल्याने गेली तीन महिने घामांच्या धारांचा अनुभव घेणारे मुंबईकर या सुखद गारव्याने आनंदले आहेत.
केरळमध्ये शनिवारी दाखल झालेला मान्सून दोन ते तीन दिवसांत कोकणात दाखल होईल, त्यानंतर टप्प्याटप्याने तो राज्यभरात सक्रिय होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली. केरळमधील पावसाच्या आगमनानंतर मान्सून राज्यात सात जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु एक जूनला केरळात दाखल झालेले मान्सूनचे वारे वेगाने पुढे सरकत असून सोमवापर्यंत त्यांनी कर्नाटकची कारवार सीमा गाठली होती. मान्सूनचा पुढे सरकण्याचा हा वेग पाहता पुढच्या दोन-तीन दिवसांतच महाराष्ट्राला मान्सूनचे दर्शन होण्याची चिन्हे आहेत, असे पुण्याच्या वेधशाळेने सांगितले.
मुंबईतही या आठवडयातच मान्सून बरसेल मात्र मान्सून पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत मुंबईवर मान्सूनपूर्व पावसाचा शिडकावा होत राहील, असा अंदाजही मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. यामुळे पावसाच्या पहिल्या शिडकाव्याने सुखावलेल्या मुंबईकरांच्या आनंदात अधिकच भर पडली आहे. दिवसा उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होत असली, संध्याकाळी मात्र मान्सूनपूर्व पावसाचा सुखद गारवा मुंबईकरांच्या वाटय़ाला येत आहे. सोमवारी संध्याकाळीही मुंबईवर मळभ दाटून येऊन वातावरणात गारवा पसरला होता. काही ठिकाणी पावसाच्या 'चिंब' सरींचा अनुभवही रहिवाशांनी घेतला.
पुणे, कोल्हापुरात दमदार पाऊस
राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावले आहेत. धरणक्षेत्रांत चांगला पाऊस पडल्याने पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. रत्नागिरी, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, उदगीर, वेंगुर्ला या भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.

Read More »

बर्थडे बॉय

स्पेनच्या राफाएल नाडालने फ्रेंच ओपनच्या कोर्टवरच आपला २८वा वाढदिवस साजरा केला.


Read More »

पहिल्याच पावसाचे पाच बळी

विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यांसह रविवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यात तिघांचा, तर कोल्हापूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला.

वाडा, कोल्हापूर- विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यांसह रविवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यात तिघांचा, तर कोल्हापूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला. शहापूर तालुक्यात वीज अंगावर कोसळून आवडी बाळू मेंगाळ (३२) आणि सुमन जगन मेंगाळ (३५) या आदिवासी महिलांचा मृत्यू झाला.
वाडा तालुक्यातील वरसाळे नवापाडा येथील सखाराम वझरे हे आदिवासी शेतकरी शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. याच शेतावर काम करणारे अनंता मराळ, दौलत तुंबडा, मोहन तुंबडा, दत्तू गोतारणे, दिलीप साहू, काशीनाथ टोकरे आणि धर्मा घाटाळ हे मजूर जखमी झाले. त्यांना परळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात रविवारी रात्री वीज कोसळल्याने मंगल पोवार (४५) ही महिला ठार झाली. करवीर तालुक्यातील गिरगाव येथे सोमवारी सकाळी वीज पडल्याने भिकाजी मेंढे (५२) या शेतक-याचा मृत्यू झाला.

Read More »

मर्सिडिझ उत्पादन दुपटीने वाढवणार

आलिशान मोटारींमधील आघाडीची कंपनी मर्सिडिझ भारतातील उत्पादन दुपटीने वाढवणार आहे.
कोलकाता- आलिशान मोटारींमधील आघाडीची कंपनी मर्सिडिझ भारतातील उत्पादन दुपटीने वाढवणार आहे. देशात मोटारींना चांगली मागणी असून उत्पादन वाढवण्यासाठी २५० कोटींची नवी गुंतवणूक करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
२०२० पर्यंत देशातील लक्झरी मोटारींची बाजारपेठ चार टक्क्यांनी वाढेल. यामध्ये विकासाच्या मोठया संधी असल्याचे मर्सिडिझ इंडियाच्या विक्री विभागाचे संचालक बोरिस फिट्झ यांनी सांगितले. सध्या देशातील वाहन क्षेत्रात लक्झरी मोटारींचा दोन टक्के हिस्सा आहे.
मर्सिडिझच्या मोटारींची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी कंपनी मोटारींचे उत्पादन दुपटीने वाढवणार आहे. सध्या देशात वर्षाला १०,००० मोटारींचे उत्पादन होत असून ते २०,००० पर्यंत वाढवले जाईल, अशी माहिती फिट्झ यांनी दिली. उत्पादन वाढवण्यासाठी किमान २५० कोटींची गुंतवणूक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षात कंपनीने भारतात ७,१३८ मर्सिडिझ मोटारींची विक्री केली. तर चालू वर्षात विक्रीमध्ये दुपटीने वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Read More »
इंदिरा गांधी आवास योजना चि