Tuesday, February 4, 2014

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

सावली देणारी शांती अवेदना सदन

कर्करोग वेळीच कळल्यास आणि योग्य उपचार पद्धती मिळाल्यास तो लवकर बरा होण्यासारखा आजार आहे. प्रत्येक रुग्णावर औषधानेच उपचार होतो, असं नाही तर प्रेमभावनेनेही रुग्णाच्या जगण्याची उमेद वाढते.

कर्करोग वेळीच कळल्यास आणि योग्य उपचार पद्धती मिळाल्यास तो लवकर बरा होण्यासारखा आजार आहे. प्रत्येक रुग्णावर औषधानेच उपचार होतो, असं नाही तर प्रेमभावनेनेही रुग्णाच्या जगण्याची उमेद वाढते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी रुग्णाचं जगणं सुसह्यकरण्यासाठी वांद्रे, माउन्ट मेरी चर्चजवळील 'शांती अवेदना सदन' हे रुग्णालय गेली कित्येक र्वष कर्करोगग्रस्तांची सेवा करतंय. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय मोफत उपचार करतात. ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नाही आणि रुग्णाला उपचारांची गरज आहे, अशा रुग्णांना 'शांती अवेदना सदन'मध्ये मोफत उपचार मिळतात. कर्करोगाच्या रुग्णाला लागणारी औषधं महागडी असतात. रुग्णाला नेहमीच मलमपट्टीची गरज असते. हा रोजचा खर्च अधिकच असतो. यासाठी अशा रुग्णांना शांती अवेदना सदनमध्ये आणलं जातं. 'शांती अवेदना सदन' हे रुग्णालयासारखं जरी असलं तरी ते 'हॉस्पीस' म्हणजेच कर्करोगाच्या रुग्णांचा आश्रम आहे. येथे कर्करोगाच्या रुग्णांवर फक्त उपचार होतात. इथे रुग्णांची फक्त सेवा केली जाते. पण कोणत्याही प्रकारची सर्जरी, ऑपरेशन, थेरपी केली जात नाही. हा कर्करोगाच्या रुग्णांसाठीचा जगातील पहिला आश्रम आहे. १९८>> साली संस्थापक एल. जे. डीसूझा यांनी 'शांती अवेदना सदन'ची सुरुवात केली. कर्करोगाच्या रुग्णाला वेदना होऊ नयेत याची काळजी घेणं हाच त्यांचा हेतू आहे, अशी माहिती इथल्या प्रमुख सिस्टर अ‍ॅक्वीला चित्तातील यांनी दिली. त्यांच्याव्यतिरिक्त आणखी नऊ सिस्टर आणि २८ कर्मचारी रुग्णांची देखभाल करतात. गेले कित्येक र्वष ही संस्था म्हणजे कर्करोगग्रस्तांसाठी आधारस्तंभ आहे. कर्करोगग्रस्त हा सहा ते सात महिने राहतो तर, कधी दोन दिवसांचा पाहुणा असतो. अशा रुग्णांसाठी शांती अवेदना सदन ही संस्था देवदूत म्हणून धावून आली.

रुग्णव्यवस्था

0 रुग्ण कोणत्याही ठिकाणावरून आला असला, तसंच तो कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी त्याला इथं घेतलं जातं.

0 इथे एकूण १०० बेड आहेत.

0 कोणत्याही रुग्णाला इथं प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचप्रमाणे या ठिकाणीही रुग्णाची फाइल घेऊन जावी लागते. ज्यात त्या रुग्णावर चालू असलेल्या थेरपीची, ऑपरेशन केलं असल्यास त्याची, कोणत्या स्टेजला आहे त्याची सविस्तर माहिती असावी. थोडक्यात त्या रुग्णाचे सुरुवातीपासून सगळे रिपोर्ट असणं आवश्यक असतं.

0 रुग्ण उपचाराने बरा होत असेल आणि त्याला रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसेल अशा रुग्णांना ते भरती करून घेत नाहीत.

0 मुख्य म्हणजे इथे आल्यावर रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकाला एकही पैसा खर्च करावा लागत नाही. लांबून आलेल्या रुग्णाच्या केवळ एकाच नातेवाइकालाच इथं राहण्याची सोय आहे.

0 सर्व रुग्ण जनरल वॉर्डमध्ये असतात. पण एखादा रुग्ण खूपच आजारी असेल आणि त्याच्यासोबत त्याचा नातेवाइक सतत राहण्याची गरज असेल अशा रुग्णांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवल जातं. रुग्ण बरा होईपर्यंत इथं राहू शकतो.

0 रुग्ण इथून बरा होऊन गेला आणि त्याला पुन्हा त्रास झाला तर तो रुग्ण केव्हाही पुन्हा भरती होऊ शकतो.

0 रुग्ण बरा झाल्यानंतर लागणारी औषधंही आवश्यकतेनुसार रुग्णांना दिली जातात.

0 कोणताही रुग्ण रुग्णालयाच्या बंधनात नाही. म्हणजे रुग्ण कधीही उपचारासाठी येऊ किंवा जाऊ शकतो.

0 जेवण, कपडे, औषध हेदेखील रुग्णाला इथूनच दिलं जातं. रुग्णांना आवश्यक असलेले सर्व पोषक अन्न, प्रोटिन, दूध इथं दिलं जातं. ज्यांना शाकाहारी जेवण हवं असेल त्यांना शाकाहारीच आणि ज्यांना मांसाहारी जेवण हवं असेल त्यांना मांसाहारी जेवण दिलं जातं. इतकंच नव्हे तर रुग्णाच्या आवडीचं खाद्यही त्याला दिलं जातं.

0 रुग्णाला सांभाळताना स्वच्छतेचंही तितकंच पालन केलं जात. बिछान्यावरची चादर दररोज बदलली जाते. दिवसांतून दोनदा साफसफाई केली जाते.

0 रुग्णाला मलमपट्टीची गरज असेल तर ती दिवसातून दोनदा होते.

0 हवा खेळती राहावी म्हणून प्रत्येक रुग्णाच्या बेडजवळ खिडक्या आहेत.

0 रुग्णांच्या करमणुकीसाठी टीव्ही असतो. तसेच सकाळ संध्याकाळ गाणीही लावली जातात. त्याशिवाय करमणुकीसाठी इतर कार्यक्रमही आयोजित केले जातात.

थोडक्यात काय तर 'शांती अवेदना सदन'मधलं वातावरण रुग्णांना प्रसन्न वाटेल असं आहे. हा आजार आणि त्यावरील उपचार सहन करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळे रुग्णावर उपचार करताना त्यांच्या मानसिकतेही विचार केला जातो.

आर्थिक मदत
या ठिकाणी येणा-या रुग्णाची मोफत सेवा केली जाते. ज्या लोकांना स्वेच्छेने पैशांची मदत करावीशी असं वाटत असेल त्यांनी ती स्वेच्छेनेच करावी. त्यासाठी कोणतेही बंधन लादलं जात नाही.

संपर्कासाठी पत्ता

शांती अवेदना सदन
प्लॉट नं: २१६,

माऊंट मेरी रोड,

वांद्रे (पश्र्चिम).

Read More »

गर्भाशयाचा कर्करोग..

सíव्हक्स (गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव)च्या ऊतींमध्ये तयार होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग. हा सामान्यत: धीम्या गतीने वाढणारा कर्करोग आहे, ज्याची लक्षणे दिसतातच असं नाही. 

सíव्हक्स (गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव)च्या ऊतींमध्ये तयार होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग. हा सामान्यत: धीम्या गतीने वाढणारा कर्करोग आहे, ज्याची लक्षणे दिसतातच असं नाही. पण नियमित पॅपटेस्टने त्याचे निदान करता येऊ शकते. (पॅप टेस्ट ही एक प्रकिया आहे, ज्यामध्ये सíव्हक्सपासून पेशीचा एक भाग काढला जातो आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला जातो.) हा नेहमीच पॅपिल्लोमा व्हायरस (एचपीव्ही) संसर्गामुळे उद्भवतो. ही गर्भाशय ग्रिव्हामध्ये असणा-या पेशींपासून निर्माण होणारी घातक सूज आहे. आता गर्भाशय कर्करोगामुळे मरण पावणा-यांमध्ये भारत जगात सर्वोच्च स्थानी आहे.

निदान कसे होते?
लॅब टेस्ट : डॉक्टर किंवा नर्स सíव्हक्सपासून पेशींचा नमुना काढतात. पॅपटेस्टसाठी लॅब गर्भाशय कर्करोग पेशी किंवा अ‍ॅबनॉर्मल पेशीसाठी नमुना तपासते, ज्यांवर उपचार केले नाहीत तर कालांतराने कर्करोग होऊ शकतो.
गर्भाशय (सव्‍‌र्हायकल) परीक्षा : डॉक्टर सíव्हक्स पाहण्यासाठी कॉल्पोस्कोप वापरतात. कॉल्पोस्कोप उती सहज दिसावी म्हणून मॅग्निफाइंग लेन्ससह ब्राईट लाईटचा वापर केला जातो.

टिश्यू सॅम्पल : कर्करोग पेशी पाहण्यासाठी ऊती काढून बायोप्सी करणे.

लक्षणे : गर्भाशयाच्या कर्करोगामध्ये पहिल्यांदा कदाचित कोणतीही लक्षणे उद्भवणार नाहीत, पण सर्वाधिक सामाईक लक्षण म्हणजे योनीमार्गातून अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे पण काही केसेसमध्ये प्रगत टप्प्यांपर्यंत कर्करोग होईपर्यंत कदाचित सुस्पष्ट अशी कोणतीच लक्षणे दिसून येणार नाहीत. नंतर तुम्हाला कदाचित ओटीपोटाच्या वेदना किंवा योनीमार्गातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

नियमित मासिक पाळी दरम्यानचा संभोगानंतर, डाऊचिंग किंवा ओटीपोटीच्या परीक्षणानंतरचा रक्तस्त्राव, मासिक पाळी हे दीर्घकाळ राहिल्यास आणि त्यावेळेस
पूर्वीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होणे यांसारखी इतर काही लक्षणे आहेत.

उपचार पद्धतींमध्ये सर्जरी (लोकल छेदनासहित) लवकरच्या टप्प्यामध्ये आणि केमोथेरपी आणि/किंवा रेडिओथेरेपी रोगाच्या सर्वाधिक प्रगत टप्प्यांमध्ये यांचा समावेश आहे. यामध्ये कदाचित सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी किंवा यांच्या एकत्रिकरणाचा समावेश असू शकतो. उपचार पद्धती रोगाच्या गाठीच्या आकारावर अवलंबून असते, जर कर्करोग विस्तारित असेल किंवा तुम्हाला काही काळाने गरोदर बनायची इच्छा असेल. मुख्य कारण एचपीव्ही ट्रान्समिशन हे आहे, हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो. सर्वाधिक स्त्रियांची शरीर एचपीव्ही संसर्गाशी लढण्यासाठी सक्षम असतात. पण कधीतरी या विषाणूमुळे कर्करोग होतो. तुम्ही धुम्रपान करत असाल, अनेक मुले असतील, दीर्घकाळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला असेल किंवा एचआयव्ही बाधित असाल तर तुम्हाला जास्त धोका असू शकतो. हा फक्त स्त्रियांमध्ये विकसित का होतो आणि इतरांमध्ये का होत नाही याचे वास्तविक स्पष्टीकरण डॉक्टर्स देऊ शकत नाहीत. तथापि, आम्हाला माहिती आहे की इतर स्त्रियांपेक्षा ठराविक धोकादायक फॅक्टर्स असणा-या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. रिस्क फॅक्टर त्यांना म्हटले जाते, जे रोग विकसित करण्याची शक्यता वाढवू शकतात. अभ्यासानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, एचपीव्ही नामक विषाणू जवळ-जवळ सर्व गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण आहे. सर्वाधिक वयस्कर माणसांना त्यांच्या जीवनामध्ये कधी-ना-कधी एचपीव्हीचा संसर्ग होतो, पण सर्वाधिक संसर्ग स्वत:हून निवळतात. एचपीव्ही संसर्ग, जो नष्ट होत नाही व त्याच्यामुळे काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग उद्भवू शकतो.

रिस्क फॅक्टर्स खालीलपमाणे
> धूम्रपानामुळे एचपीव्ही बाधित स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढतो.

> मौखिक गर्भनिरोधक गोळ्या (ओसीज) दीर्घकाळासाठी घेतल्या तर सíव्हक्सच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. संशोधन सुचवते की, ओसीज घेणा-या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढतो पण ओसीज घ्यायच्या बंद केल्या की धोका कमी होतो.

> असुरक्षित संभोगामुळे एचपीव्ही पसरु शकतो, म्हणूनच संसर्ग वाढण्याचा धोका कंडोम वापरुन कमी करता येऊ शकतो. तथापि एचपीव्ही सामाईक आहे आणि तो विस्तृत गुप्तांगामध्ये स्किन-टू-स्किन संपर्काच्या माध्यमातून मोठ्या पमाणावर पसरतो. सुरक्षित संभोगाद्वारे याचा प्रतिबंध करणे कठीण आहे.

> गर्भाशयाचा कर्करोग काही कुटुंबांमध्ये अनुवंशिक असू शकतो. जर स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला गर्भाशयाचा कर्करोग असेल तर कुटुंबामध्ये कुणालाही कर्परोग नसणा-या स्त्रीपेक्षा या स्त्रीमध्ये रोग होण्याची शक्यता २ ते ३ वेळा जास्त असते.

गर्भाशयाचा कर्करोग नियमित स्किनिग टेस्ट करुन कमी करता येऊ शकतो. जर गर्भाशयाच्या पेशीमध्ये अस्वाभाविक बदल लवकर दिसून आले तर त्या पेशी कर्परोग पेशी बनण्यापूर्वी काढून टाकून किंवा त्यांना नष्ट करुन हा कर्करोग प्रतिबंधित करता येऊ शकतो.

Read More »

कठीण समय कर्करोगाचा

'कर्करोग' झाला आहे असं कळल्यावर मनुष्य कितीही श्रीमंत असो वा गरीब त्याच्या पायाखालची जमीन सरकतेच. कारण कर्करोग या आजाराविषयी सामान्य माणसाच्या मनात प्रचंड भीती असते. या भीतीपोटीच अनेकांचं खच्चीकरण होतं. मग ते मानसिक, शारीरिक असो वा आर्थिक. या सगळ्यात जास्त हाल होतात ते रुग्णाचे. कर्करोगाचा आजार जीवघेणा तेवढाच खर्चिकही. त्यावर उपचार करता करता जीव नकोसा होऊन जातो. असा हा कर्करोग नक्की कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्यावर कोणते आधुनिक उपचार आहेत तसंच कर्करोगाला घाबरून खचून न जाता हा आजार समजून घेऊन त्या रुग्णांसाठी निरपेक्ष भावनेने झटणा-या संस्थेविषयीची जागतिक कर्करोग दिनानिमित्त माहिती करून घेऊया.

कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. या रोगामुळे शरीरातील निरोगी उतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीर शुद्ध ठेवण्यासाठी पेशींची नियंत्रित वाढ आणि विघटन होणं आवश्यक असतं. काही पेशी वृद्ध किंवा खराब होतात, त्या वेळी त्या मरतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात. परंतु या नवीन पेशींची वाढ विशिष्ट अवयवात असंतुलित आणि अनियमित होते. त्या वेळी त्या अवयवाला कर्करोग झाला आहे, असे समजते. शरीराच्या कोणत्याही भागाला कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत. त्वचेचा, स्तनांचा, पचन संस्थेमध्ये सामान्यपणे बृहदांत्राचा आणि गुदद्वाराचा, नाकाचा, घशाचा, श्वेतपेशींचा असे कर्करोगाचे काही प्रकार आहेत.
कारणं
कर्करोग कोणत्याही पेशींमध्ये, उतीमध्ये आणि अवयवांमध्ये होऊ शकतो. कर्करोग होण्याची साधारण कारणे -

>> प्रदूषण

>> कीटकनाशके आणि रसायनांचा अतिरिक्त वापर

>> खाण्याच्या अनियंत्रित वेळा

>> ताण-तणाव

>> आहारातील पोषक तत्त्वांचा अभाव

>> आनुवंशिकता

>> अति मद्यपान

>> धूम्रपान

>> तंबाखू किंवा गुटखा सेवन
अशी अनेक कारणं आढळून येतात.

निदान

कर्करोगाचे बरेच प्रकार असल्यामुळे त्यावर एकाच प्रकारचे उपचार करून चालत नाही. कर्करोग झाल्याचं निदान झालं की डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर योग्य उपचार पद्धती होऊ शकते. रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या तीन उपचार पद्धती प्रचलित आहेत. कर्करोगाबद्दल दुर्दैवाची गोष्ट अशी की, कर्करोग पहिल्या स्टेजला असेल तर त्याची लक्षात येण्यासारखी लक्षणं फार थोडी आहेत. शरीरावरील गाठ आणि जखम बरी न होणे, सतत खोकला, तसेच कफातून बाहेर येणारं रक्त, आवाजात बदल होणे, गिळण्यास त्रास होणे, वजन घटणे, भूक न लागणे, रक्त किंवा पांढरा स्त्राव अंगावरून जाणे, लघवी आणि शौचामध्ये बदल ही कर्करोगाची काही लक्षणं आहेत. कर्करोग झाला आहे का, याचं निदान करण्यासाठी गाठीमधून सुई घालून पेशींची तपासणी केली जाते तसेच शरीरातून कर्करोगाच्या गाठीचा तुकडा काढून त्याची तपासणी केली जाते. रक्ताचा कर्करोग झाला असेल तर रक्ताची किंवा बोनमॅरो या तपासण्या केल्या जातात. त्या व्यतिरिक्त, पॅपस्मीअर सोनोग्राफी, मॅमोग्राफी एक्सरे, सिटी स्कॅन, एमआरआय, पेटासिटी स्कॅन या तपासणी करूनही कर्करोग आहे की नाही याचं निदान करता येते.

अशा कर्करोगाच्या विळख्यातून बाहेर येणारे रुग्णही आहेत. उदाहरण द्यायचंच झालं तर क्रिकेटपटू युवराज सिंग याने कर्करोगाच्या विरोधात लढाई जिंकली. लिसा रे या मॉडेल-अभिनेत्रीनेही कर्करोगावर हिमतीने मात केली. पण सामान्य माणसाला कर्करोगाशी झुंज देताना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. कर्करोगासाठी होणारा खर्च सर्वसामान्य माणसाला झेपणारा नाही. ही बाब लक्षात घेऊन गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी ब-याच जणांचे हात पुढे आले आहेत. यात सर्वात जास्त सहभागी झाले ते एनजीओ. एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संस्था. ज्या गरजू रुग्णांना आर्थिक मदत हवी असते अशा लोकांना या स्वयंसेवी संस्था मदत करतात. ज्यांची खर्च करण्याची ऐपत नसेल आणि त्या रुग्णाला ट्रीटमेन्टची गरज असेल तर या संस्था पैशांची मदत करतात. अशीच एक संस्था आहे शांती अवेदना सदन.

कर्करोगावर आयुर्वेदिक उपचारपद्धती?

कर्करोग निश्चित झाला की सर्वसाधारणपणे रेडिएशन, केमोथेरपी आणि ऑपरेशन असे तीन पर्याय समोर ठेवले जातात. पैकी रेडिएशन हे त्वचेवरून आत सोडलेल्या विशिष्ट रेडिओ किरणांमार्फत ज्या पेशी कर्करोगग्रस्त झाल्या आहेत त्यांना त्याच ठिकाणी निष्प्रभ करण्याचं काम करतं. यातील रेडिएशनमधील किरणांमुळे अत्यंत मोठय़ा प्रमाणात शरीरात उष्णता प्रविष्ट होते. त्याचा त्रास संपूर्ण शरीराला होतो. ज्या भागाला रेडिएशन केले जाते त्या व त्याच्या अवतीभवतीच्या भागावर होणा-या दुष्परिणामांपासून शरीराला वाचवण्यासाठी 'चंद्रकला' या आयुर्वेदीय औषधाचा चांगला लाभ होतो. क्वचितप्रसंगी रेडिएशन किंवा केमोथेरपीनंतर सर्वाग दाहासोबत सदाह मूत्रप्रवृत्ती अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी 'शीतप्रभा' आणि 'शीतसुधा' ही दाह कमी करणारी औषधं तसेच मलत्यागाच्या जागी – गुदप्रदेशी लावण्यासाठी 'अर्शहित'(ऑइंटमेंट) व गोळ्या लाभदायक ठरतात.

या आजारात अत्यंत उष्ण, तीव्र औषधी घटक शिरांवाटेही दिली जातात आणि त्याचा साइड इफेक्ट म्हणून केशपतन होतं. अशा वेळी केमोथेरपी सुरू होण्याआधीच 'अस्थिपोषक' नामक औषधाचा वापर अत्यंत लाभदायक होताना दिसतो. केस गळल्यानंतरही पुन्हा लवकर केस उगवायला हे औषध फायदेशीर ठरतं. चिकित्सेदरम्यान रुग्णाला दौर्बल्य आल्याची जाणीव होत असते. अशा वेळी 'स्वामला' नावाचे चाटून खाण्याचे अत्यंत चवदार आणि चटकन ताकद देणारे औषध लाभदायक ठरते. शारीरिक बल वाढवणे, मानसिक संतुलन टिकवून ठेवणे आणि पचनशक्ती व भूक वाढवणे हे महत्त्वाचे असते. द्राक्षोविन स्पेशल हे गेल्या अध्र्या शतकापासून अनेकांना लाभदायक ठरलेले औषध वरील सर्व कार्य करण्यास समर्थ असल्याने कर्करोगाच्या रुग्णांनी नित्यनेमाने सेवन करणे त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने उपयोगी ठरते.
- वैद्य शैलेश नाडकर्णी

टाळण्यासाठीकाय कराल?

0 आपला आहार संतुलित असावा. आहारात कच्च्या भाज्यांचा सामावेश असावा. आहारात लाल मटणाचा सामावेश नसावा.

0 गाईंनी जास्त प्रमाणात दूध देण्यासाठी गाईंना हार्मोन्स दिले जातात. त्यामुळे त्याच दुधातून ते आपल्या शरीरात जातात. त्यामुळे अशा हार्मोनयुक्त दुधाचा वापर टाळावा.

0 ऊर्जा देणारं व न्युट्रिशन्स अन्न खावं.

0 शरीराला रुचणारा, पचणारा आहारच घ्यावा.

0 व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँटी ऑक्सिडंट्स आणि फायबरचं प्रमाण अधिक असणा-या पालेभाज्यांचा मोठय़ा प्रमाणात सामावेश करावा.

0 तळलेले पदार्थ जास्त खाऊ नये. तेल वारंवार तापवल्याने, उकळल्याने पॉलिहायकार्बनची निर्मिती होते जी कर्करोगाला निमंत्रण देते.

0 कृत्रिमरीत्या जतन केलेल्या किंवा अतिरिक्त प्रक्रिया केलेल्या अन्नाचं सेवन टाळा.

0 जंकफूड टाळा. तसंच ताणतणावमुक्त जीवनशैली ठेवा.
0 शरीराची अंतर्बाह्य स्वच्छता राखा. अर्थात तंबाखू, गुटखासेवन आणि विडी व सिगारेटचे धूम्रपान बंद करा. – डॉ. धैर्यशील सावंत (ऑन्को सर्जन)

गरजेनुसार आर्थिक आणि औषधांची मदत करणा-या स्वयंसेवी संस्था
कॅन्सर एड अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशन
भायखळा म्युनिसिपल स्कुल बिल्डींग, एन.एम.जोशी मार्ग, भायखळा (पश्चिम).


वसंता मेमोरिअल चेम्बर
पहिला मजला, आदित्य टावर, कन्नमवार बस डेपो २च्या समोर, विक्रोली (पूर्व)


ग्लोबल विझन कॅन्सर केअर
ऑफिस नं: १७, पहिला मजला, इटरनीटी मॉल, तीन हात नाका, ठाणे (पष्टिद्धr(155)म)


द मॅक्स फाउंडेशन
सिकॉम बिझनेस सेंटर, ए ब्लॉक, बेसमेंट, शिवसागर इस्टेट, डॉ, अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe