Tuesday, May 28, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

नालेसफाईची डोकेदुखी

एलबीटीमुळे ठाणे महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याने या निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नालेबांधणीचा कार्यक्रम संपल्यातच जमा आहे.ठाणे - ठाणे महापालिकेने सुमारे ५६ कोटी रुपये खर्च करून शहरातील नळपाडा, चिरागनगर, गांधीनगर, कापूरबावडी, भीमनगर, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, नामदेववाडी, श्रीरंग सोसायटी, गोधरपाडा, कळवा रेल्वे स्टेशन, सहकारनगर, रेतीबंदर चौक, श्रीजी पार्क, कळवा, खारेगाव, रामनगर इत्यादी ठिकाणी नालेबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याकरता निविदाही मागवण्यात आल्या आहेत. या निविदा एप्रिलअखेर उघडणे अपेक्षित होते. मात्र एलबीटीमुळे ठाणे महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याने या निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नालेबांधणीचा कार्यक्रम संपल्यातच जमा आहे.

मुंब्य्रात पुढा-यांचा हस्तक्षेप

मुंब्य्रात भरवस्तीत नाले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरी वस्तीतील हे नाले बेकायदा बांधकामांच्या निर्मितीसाठी, काही ठिकाणी भराव टाकून बुजवण्यात आले आहेत. काही ठिकाणी शॉर्टकट म्हणून पलीकडे जाण्यासाठी वाळूच्या गोण्या टाकून पूल तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणची नालेसफाई पालिकेसाठी दिव्य काम ठरणार आहे. त्यात पुढा-यांच्या हस्तक्षेपामुळेही काही ठिकाणी नालेसफाईची कामे अडली आहेत.

घोडबंदर रोडवर विकासकांचा 'अडथळा'

गेल्या काही वर्षात घोडबंदर रोड परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नामांकित विकासकांकडून या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या विकासकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवून ब-याच ठिकाणी बेकायदा नाल्यांचे प्रवाह बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नाल्यांचे प्रवाह ज्या ठिकाणी खाडीत सोडण्यात येतात, त्याच ठिकाणी या विकासकांकडून भराव टाकून अडथळे निर्माण केले गेल्याने महापालिकेसाठी ही नालेसफाई डोकेदुखी ठरली आहे.

Read More »

बारावीच्या विद्यार्थिनींसाठी 'लॉरियल'ची शिष्यवृत्ती

बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणा-या ३० गरजू आणि गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मुंबई  - विज्ञान क्षेत्रात मुलींना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी 'लॉरियल' या संस्थेने बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. 'लॉरियल इंडिया फॉर वुमेन इन सायन्स-२०१३' असे या योजनेचे नाव असून दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध शिक्षण मंडळांत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणा-या ३० गरजू आणि गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

ही शिष्यवृत्ती 'लॉरियल युनेस्को फॉर वुमेन इन सायन्स' या संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या योजनेतून दिली जाते. मागील चार वर्षापासून देशातील अनेक विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे.

बारावीच्या विज्ञान शाखेतून शिक्षण घेणा-या आणि या विषयांत पुढे संशोधन करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थिनींची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते. मात्र त्यासाठी विज्ञान विषयात ८५ टक्के गुण आवश्यक असणे बंधनकारक आहे. ३१ मेपर्यंत किमान वय १९ वर्षापेक्षा जास्त नसावे. महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीसाठी लॉरियल इंडिया प्रा. लि. ए-विंग, ८वा मजला, मॅरॅथॉन फ्युचरेस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई-१३ येथे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.

हे अर्ज पूर्ण कागदपत्रांसह भरून ३० जूनपर्यंत याच पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे. मुंबईबाहेरील विद्यार्थिनींसाठी fywis@in.loreal.com या ई-मेलवर संपर्क करता येईल. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनीला महाविद्यालयात प्रवेश प्राप्त झाल्यानंतरच लॉरियलकडून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल, अशी माहिती लॉरियलकडून देण्यात आली आहे. संपर्क : ०२२-२४९८३०००.

Read More »

ठाण्यात एचआयव्हीग्रस्तांना सापत्न वागणूक

 

ठाण्यात एचआयव्हीग्रस्तांना सापत्न वागणूक मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ठाणे - जिल्हा रुग्णालयात दाखल होणा-या एचआयव्ही रुग्णांना येथील कर्मचा-याकडून सापत्न वागणूक मिळत असून, याची सर्वाधिक झळ एचआयव्हीच्या गर्भवती महिलांना बसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात एचआयव्ही रुग्णांसाठी विशेष कक्ष बनवण्यात आला आहे. या कक्षात सामाजिक संस्थांच्या मनधरणीमुळे एचआयव्हीच्या गर्भवती रुग्णांना प्रवेश मिळतो खरा, मात्र नंतर त्यांना  अपमानास्पद वागणूकच जास्त मिळते. या रुग्णांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करून घेताना त्यांच्या केस पेपरवर ते बाधित असल्याची नोंद 'रेड मार्क'ने केली जाते.

वास्तविक या रुग्णांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आदेश असताना जिल्हा रुग्णालयात मात्र ही गोपनीयता पाळली जात नाही. शिवाय या महिलांच्या खाटा एखाद्या कोप-यात ठेवल्या जात आहेत.

दरम्यान, जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झालेल्या एका एचआयव्ही बाधित रुग्णाला येथील महिला वैद्यकीय कर्मचा-याने 'एचआयव्ही' अशी हाक मारल्याचे या रुग्णाने सांगितले.

 

Read More »

अंबरनाथ स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा

अंबरनाथ स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा.यामुळे रेल्वे स्थानक परिसरात राहणारे नागरिक व प्रवाशांना  त्रास सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसर, शहरातील पूर्व-पश्चिम विभागाला जोडणारा पादचारी पूल आणि स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात राहणारे नागरिक व प्रवाशांना गैरसोयींचा तोंड द्यावे लागत आहे.

शहरातील पूर्व-पश्चिम विभागाला जोडणारा येथे एकमेव लोखंडी पादचारी पूल आहे. सकाळी आणि सायंकाळी 'पिकअवर्स'ला येथे एकच गर्दी होते. लोखंडी पुलावर दोन्ही बाजूस फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पादचारी तसेच लोकल गाडय़ांतून उतरून पूर्व-पश्चिम विभागात येणा-या-जाणा-या प्रवाशांचे अत्यंत हाल होत आहेत. त्यातच आता स्कायवॉकवर भाजी विक्रेते आणि भिका-यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना फेरीवाल्यांमधून वाट काढत स्थानक गाठावे लागत लागत आहे.

एमएमआरडीएने हा स्कायवॉक बांधून नगरपालिकेकडे देखभालीसाठी दिला आहे. मात्र, नगरपालिकाही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. रेल्वेच्या पादचारी पुलावर गर्दी करून बसणा-या फेरीवाल्यांना कायमस्वरुपी हाकलण्याची आवश्यकता आहे.

या फेरीवाल्यांना येथील सुरक्षा दलाचे जवान अधून-मधून हुसकावून लावताना दिसतात. पण, त्यांची पाठ फिरताच  फेरीवाले पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतात. त्यामुळे आरपीएफच्या जवानांनी फेरीवाल्यांना हुसकावण्यापेक्षा त्यांच्या फळभाज्यांच्या टोपल्या जप्त कराव्यात तसेच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पादचा-यांकडून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

Read More »

भिवंडी पोलिसांवर राज्य सरकारकडून अन्याय?

भिवंडी पोलिसांवर राज्य सरकार  अन्याय करत असल्याची भावना शहर पोलिसांत आहे. भिवंडी - भिवंडी परिमंडळ-२मध्ये कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना इतर ४ परिमंडळांपेक्षा प्रवासभत्ता, घरभाडेभत्ता आणि शहरभत्ता कमी देऊन राज्य सरकार अन्याय करत असल्याची भावना शहर पोलिसांत आहे.

ठाणे परिमंडळ १, भिवंडी परिमंडळ २, कल्याण परिमंडळ ३, उल्हासनगर परिमंडळ ४, वागळे इस्टेट परिमंडळ ५ ही  परिमंडळे ठाणे पोलिस आयुक्तालया अंतर्गत कार्यरत आहेत. त्यात भिवंडी शहर संवेदनशील समजले जाते. परिणामी पोलिसांना मोठय़ा प्रमाणात दक्ष राहून आपले कर्तव्य बजावावे लागते. काही वेळा जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडावे लागेत. असे असतानाही राज्य सरकारकडून भिवंडी पोलिसांना दिला जाणारा भत्ता कमी आहे. कल्याण, उल्हासनगर, वागळे इस्टेट या परिमंडळांतील पोलिसांना प्रवासभत्ता, घरभाडे भत्ता आणि शहरभत्ता ३० टक्के मिळत आहे. तर भिवंडी परिमंडळातील पोलिसांना फक्त २० टक्के प्रवासभत्ता, घरभाडेभत्ता आणि शहरभत्ता दिला जातो.

त्यामुळे इतर परिमंडळांतील पोलिस अधिका-यांपेक्षा ४ ते ५ हजार रुपये पगार कमी मिळत आहे. तर पोलिस कर्मचाऱ्यांना दोन ते अडीच हजार रुपये पगार कमी मिळत आहे. याचा फटका २१ पोलिस निरीक्षक, २२ साहाय्यक पोलिस निरीक्षक, ४० पोलिस उपनिरीक्षक, ५१ साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, १२८ पोलिस हवालदार, ४९५ पोलिस नाईक आणि पोलिस शिपाई, तर ७८ महिला पोलिस शिपाई, १२ पोलिस वाहनचालक अशा एकूण ८४७ पोलिसांना बसत आहे.

मात्र वाहतूक शाखा, गुन्हे अन्वेषण आणि विशेष शाखेच्या पोलिस कर्मचा-यांना ठाणे पोलिस आयुक्तालयाप्रमाणेच पगार मिळत असल्याने एकाच शहरात काम करणा-या पोलिसांबाबत राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेते, असा प्रश्नही या पोलिसांनी केला आहे.

Read More »

एसटी कार्यालयांतही लैंगिक अत्याचार

महामंडळाच्या कार्यालयात जेव्हा महिला अधिका-यांकडे 'अनैतिक सुखा'ची मागणी त्यांचाच एखादा वरिष्ठ अधिकारी करतो, तेव्हा एसटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लगेचच बदलतो. याबाबतची चर्चा कुठे तरी होणे निश्चितच गरजेचे आहे.

महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यातून त्यांची होणारी कुचंबणा काही नवी नाही. यापूर्वीही या गोष्टी होत होत्या. आताही होत आहेत, मात्र त्यांचे स्वरूप बदलले आहे. काळ बदलला, स्थिती बदलली, पण महिलांवर होणा-या अत्याचारांचे शुक्लकाष्ट काही बदलले नाही. 'राज्य परिवहन महामंडळ' म्हणजे आपल्या सर्वाची एसटी. 'आपली एसटी' असे त्याला आपण सर्वच जण हक्काने म्हणतो. कशीही असली तरी एसटी आपली लाडकी. पण याच महामंडळाच्या कार्यालयात जेव्हा महिला अधिका-यांकडे 'अनैतिक सुखा'ची मागणी त्यांचाच एखादा वरिष्ठ अधिकारी करतो, तेव्हा एसटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लगेचच बदलतो.

हे प्रकरण जेव्हा उजेडात आले तेव्हा अनेक बाबी झटपट मनात आल्याशिवाय राहिल्या नाहीत. हे प्रकार केवळ एसटी महामंडळाच्या कार्यालयापुरते निश्चितच मर्यादित नाहीत. अन्य कार्यालयांत हीच बोंब असणार, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. अशा वेळी कार्यालयात काम करणा-या महिलांनी कसे काम करायचे आणि या सर्व बाबींना कसे तोंड द्यायचे, हा मुद्दा समोर येतो. त्यांनी मग काम करायचेच नाही का? की केवळ भीतीने, अत्याचार-अन्याय करणारा हा आपला बॉस आहे म्हणून गप्प राहायचे. याबाबतची चर्चा कुठे तरी होणे निश्चितच गरजेचे आहे.

एसटी महामंडळात झालेला प्रकार भयंकर आहे. या प्रकरणाला 'प्रहार'च्या माध्यमातून वाचा फोडली गेली. आता चौकशी, कारवाया होतील. सत्य बाहेर येईल किंवा ते येणारही नाही. पण महामंडळात हे प्रकार आतापासूनच सुरू नाहीत. गेल्या पाच वर्षापासून असे प्रकार होत आहेत. याबाबत अनेक महिला कर्मचारी-अधिका-यांनी तक्रारी केल्या, पण त्यांना न्याय मिळाला की नाही, हा संशोधनाचाच विषय ठरेल. त्यामुळे पूर्वानुभव पाहता कोणी महिला अधिकारी तक्रार करण्यासाठी पुढे येताना दहा वेळा विचार करतात. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. पण त्याला सत्याची आणि प्रामाणिकतेची जोड असणेही तेवढेच गरजेचे आहे.

वरिष्ठ अधिकारी, त्यात त्यांना असणारे अधिकार, सर्वासमोर त्यांची असलेली प्रतिमा, याचाच फायदा अनेक अधिकारी घेत आहेत. हेच या प्रकरणातून स्पष्ट होत आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अशा स्थिती या अधिका-यांना वेळीच वेसण घालणे, योग्य ठरू शकते. संबंधित महिला अधिका-यांनी यापूर्वीच लेखी तक्रारी केल्या असत्या तर अशा प्रवृत्तीचे अधिकारी आता घरी बसले असते. मात्र प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणा-या महिलांची 'जाऊ दे' ही मानसिकता आड येते आणि वरिष्ठ अधिका-यांचे फावते. त्याताच ते गैरफायदा घेत असतात.

अशा प्रकरणांत कार्यालयातील कर्चा-यांचेही समर्थन आवश्यक असते. सत्य काय आहे, याची अंशत: तरी कल्पना त्यांना असते. अशा वेळी पीडित महिलांना धीर देणे आणि त्यांच्या मागे खंबीर उभे राहणेही तेवढेच आवश्यक आहे. पण दुर्दैवाने कोणी या भानगडीत पडत नाही. त्याला कारणे अनेक आहेत, या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अनेक गोष्टी स्वत:च्या फायद्यासाठीसुद्धा  केल्या जातात. या गोष्टीही लपून राहिलेल्या नाहीत.

आपण आज महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून संबोधतो. पण या घटना पुढे आल्यानंतर आपण खरोखरच पुरोगामी आहोत का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. या प्रकारामुळे महामंडळाची प्रतिमा तर डागळलीच आहे, पण राज्याच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. ही स्थिती बदलू शकते. बदल करण्याची धमक आणि धडाडी त्यासाठी आवश्यक आहे. तीच कुठे दाखवली जात नसेल तर मग अशा प्रवृती वाढतात आणि त्यांचा विकास होत जातो. एक ना एक दिवस ही प्रकरणे पुढे येतात आणि त्याचा फटका सर्वानाच बसतो. त्यामुळे वेळीच पायबंद घालणे उत्तम उपाय आहे. त्यामुळे ज्या तीन महिलांनी तक्रारी केल्या तशा अनेक महिला अधिकारी असू शकतात. त्याही अन्याय, अत्याचार, छळवणूक सहन करत असतील. जो सोसतो त्याचाच छळ होतो.

त्यामुळे अशा महिला अधिकाऱ्यांनीही न घाबरता पुढे येणे गरजेचे आहे. आताच वेळ आहे, अशा प्रवृत्तींना ठेचण्याची. घाबरून आणि शरमेने कोणी मागे राहणार असेल तर या प्रवृत्तींचा कधीही नाश होणार नाही. आज एका महिलेवर ही वेळ आली. उद्या दुसरीवरही येऊ शकते. याचा कोणी तरी विचार करायला हवा. महिलांनी यासाठी एकजूट दाखवावी. आतापर्यंत झाले ते ठीक, यापुढे चालणार नाही, हा बाणा आता कुठे तरी येणे गरजेचे आहे. पण यातही प्रामाणिकपणा आणि सत्याची किनार असणे गरजेचे आहे, हे येथे नमूद करावेसे वाटते. शेवटी सत्याला एक दिशा असते, एक आधार असतो. सत्य कधीही लपून राहात नाही. त्यामुळे शेवटी सत्याचाच विजय होईल.

Read More »

केडीएमसीचे शास्त्रीनगर रुग्णालय 'सलाइनवर'

केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचाराअभावी नवजात बालिकेचा मृत्यू झाला होता.यामुळे रुग्णालयच 'सलाइनवर' असल्याने रुग्णांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

डोंबिवली - केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचाराअभावी नवजात बालिकेचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच, रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णालयाची दुरवस्था झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. डॉक्टरांची कमतरता, धूळखात पडलेली यंत्रणा आणि स्वच्छतेचा अभाव, यामुळे रुग्णालयच 'सलाइनवर' असल्याने रुग्णांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या दावडी गावात राहणारे पवन गील यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे तिने एका मुलीला जन्म दिला होता. मात्र, रुग्णालयात न्यूओ नेटल केअर युनिट नसल्याने मुलीला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात कल्याणकरांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.

दरम्यान, डोंबिवलीत महापालिकेची रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर ही दोन रुग्णालये आहेत. दोन्ही रुग्णालयांची क्षमता १२० खाटांची आहे. परिसरातील गोरगरीब जनतेसाठी शहरात दोनच रुग्णालये असल्याने रुग्णालयात दररोज एक हजारांच्या आसपास ओपीडीचे रुग्ण येतात. पण, दोन्ही रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात २००६ पासून तब्बल ८७ डॉक्टर सोडून गेले आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे एकीकडे डॉक्टरांची वानवा तर, दुसरीकडे डॉक्टर सोडून जात असल्याने येथील रुग्ण खासगी रुग्णालयांकडे
वळत आहेत.

डॉक्टर व परिचारिकांच्या भरतीची मागणी

डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व नर्सची भरती करण्यात यावी, अशी मागणी नुकत्याच झालेल्या विधी मंडळाच्या अधिवेशनात केली होती. यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन महिन्यांमध्ये डॉक्टर व नर्सची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. तर, मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी महापालिकेची रुग्णालये राज्य सरकारकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. ही मागणी राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

Read More »

उल्हासनगर पालिकेत कर्मचा-यांचा दुष्काळ

उल्हासनगर महापालिकेत मागील दहा वर्षापासून भरतीप्रकिया झालेली नाही.प्रशासकीय पातळीवर कोणतीही पावले उचलली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेच्या विविध विभागांत विभागप्रमुख, शहर अभियंता, सहाय्यक आयुक्त, कनिष्ठ अभियंते, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक आदी प्रमुख पदे रिक्त असल्याने स्थानिक पातळीवरील कामे मोठया प्रमाणावर रखडली आहेत. अधिकारी आणि कर्मचा-यांचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणतीही पावले उचलली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महापालिकेत मागील दहा वर्षापासून भरतीप्रकिया झालेली नाही. दरवर्षी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांची बदली झाल्यानंतरही नवीन अधिका-याकडे पदभार सोपवण्यात आला नसल्याचे समोर येत आहे. विद्यमान पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, उपायुक्त डी. जी. पवार, संतोष देहेरकर, राजेश चव्हाण हे तीनच वर्ग एकचे अधिकारी आहेत. या प्रत्येकांवर तीनपेक्षा अधिक विभागांची जबाबदारी आहे. शहरात विकासकामे करणा-या सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा प्रमुख असलेले शहर अभियंता पद रिक्त आहे. या पदाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश शिर्के यांना प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी पदभार गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. मिनी महापालिका असलेल्या प्रभाग समितीमधील सहाय्यक आयुक्त ही पदे सरकारकडून प्रतिनियुक्तीवर भरली जातात. मात्र गेल्या वर्षभरापासून सहाय्यक आयुक्त या पदासाठी सरकारकडून चार प्रभाग समित्यांत एकही अधिकारी पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे अन्य जागांसाठी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना या पदाचा भार देण्यात आला आहे. पालिकेच्या सहा तांत्रिक विभागांसाठी एकूण ३४ कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे. मात्र, केवळ १३ अभियंतेच पालिकेत कार्यरत आहेत. प्रत्येक अभियंत्याला त्याच्या मूळ कामाव्यतिक्ति अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय अधिकारी हे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक हे पद रिक्त आहे. या पदावर वरिष्ठ लिपिक विनोद केणे यांची प्रभारी नेमणूक झाली आहे. पालिकेच्या ७८ प्रभागांची स्वच्छता करण्यासाठी १९०० सफाई कामगारांची गरज असताना ११४० कर्मचारीच कार्यरत आहेत.

 

कर्मचारी भरतीबाबत न्यायालयाकडून स्थगिती आहे. ती उठेपर्यंत कंत्राटी पद्धतीने कनिष्ठ अभियंता व महत्त्वाची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. – बालाजी खतगावकर, उल्हासनगर महापालिका आयुक्त

Read More »

धोकादायक इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिकेच्या पॅनेलवरील ११ आर्किटेक्टना मेअखेरची डेडलाइन देण्यात आली.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २३९ धोकादायक इमारतींना महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, इमारत मालकांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेने १३ आर्किटेक्टचे एक पॅनेल तयार केले आहे. या पॅनेलमार्फत आता धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी येणारा खर्च इमारत मालकांनी न दिल्यास त्यांच्या मालमत्ता करातून वसूल करण्याचा निर्णयही महापालिकेने  घेतला आहे.
शिळफाटा इमारत दुर्घटनेनंतर पावसाळयापूर्वी सर्व धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेऊन, त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिका-यांना दिले होते.

धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी तयार करणे, अतिधोकादायक इमारत जमीनदोस्त करणे, इमारत मालकांना नोटिसा देणे, न्यायालयात प्रलंबित असलेल्या इमारतींचा अहवाल न्यायालयात सादर करणे, आदी सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील एकूण २३९ धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी महापालिकेने इमारत मालकांना नोटिसा बजाविल्या होत्या. मात्र, पालिकेच्या नोटिशीकडे अनेक इमारत मालकांनी कानाडोळा केला आहे.

त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पालिकेच्या अभियंत्यांचे प्रभागनिहाय पथक तयार करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नगररचना विभागाने ११ आर्किटेक्टचे पॅनेल तयार केले आहे.  इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिकेच्या पॅनेलवरील ११ आर्किटेक्टना मेअखेरची डेडलाइन देण्यात आली आहे.

Read More »

'धुरात' विरतात कित्येक आयुष्यं..

जागतिक आरोग्य संघटनेने 'ग्लोबोकॅन' नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत 'ग्लोबोकॅन कॅन्सर फॅक्टशीट-२००८' नावाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात देशभरात ५८ हजार लोक फुप्फसाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचं आढळून आलं. त्यातील ५१ हजार रुग्ण मृत्यूच्या दाढेत ओढले गेले. तंबाखूचं सेवन हे या रुग्णांना जडलेल्या फुप्फुसाच्या कर्करोगाचं प्रमुख लक्षण होतं. फक्त फुप्फुसंच नाहीत तर शरीरातील सारे अवयव तंबाखूपासून होणा-या आजारांसाठी खूपच संवेदनशील असतात. 'पॅसिव्ह स्मोकिंग'चा परिणाम शरीरस्वास्थ्यावरही होतो. यावरून एखाद्याला असणारा तंबाखू खाण्याचा किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचा शौक हा त्याच्या प्रियजनांची आयुष्यंही धोक्यात आणू शकतो.जवळजवळ आता सर्वानाच हे माहीत झालंय की, तंबाखू खाण्याने फुप्फुसाच्या कर्करोगाची लागण होऊ शकते. तंबाखू खाण्यामुळे फुप्फुसाशी निगडित काही आजार जडतात. तरीही तंबाखू खाणं सोडलं जातंच असं नाही. आपल्याकडे इथे असाही एक वर्ग आहे की, जो तंबाखूचं सेवन कुठल्याही प्रकारे करता नाही. तरीही त्यांना तंबाखूपासून होणा-या आजारांची लागण झटपट होते. याचं कारण असतं 'सेकंड हँड स्मोकिंग' किंवा 'पॅसिव्ह स्मोकिंग'. सिगारेट किंवा विडी ओढणं तसंच इतर कुठल्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांच्या सहवासात राहणा-यांसाठी ही एक प्रकारे शिक्षाच असते. तंबाखू खाण्यामुळे फक्त कॅन्सरच नाही तर इतरही काही आजार डोकं वर काढतात.

फुप्फुसांचा कर्करोग

कॅन्सरमुळे होणा-या मृत्यूंमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. दिवसागणिक तंबाखू खाण्यामुळे या कर्करोगाचा धोका वाढतच जातो. या कर्करोगाची लक्षणं घातक स्वरूप घेण्यापूर्वीच आपल्या लक्षात येतात. वारंवार लागणारा खोकला, दम लागणं, छातीत दुखणं, आवाजात बदल होणं, वजन कमी होणं, सांधे दुखणं, डोकंदुखी ही आजाराची काही प्रमुख लक्षणं आहेत.

अस्थम्याचा त्रास

धूम्रपान केल्यामुळे अस्थम्याचाही (दमा) त्रास वाढतो. त्यामुळे धूम्रपान करणा-यांसाठी ही एक प्रकारे धोक्याची सूचनाच आहे. सेकंड हँड स्मोकिंगमुळेही अस्थमा हा आजार बळावण्याचा सर्वात जास्त धोका निर्माण होतो. सेकंडहँड स्मोकिंगमध्ये तंबाखूच्या ज्वलनातून ७० प्रकारची रसायनं निर्माण होतात. या रसायनांमध्ये एखाद्या निरोगी व्यक्तीस 'अस्थम्या'चा त्रास जडू शकतो, इतकी ती रसायनं शरीरासाठी घातक असतात. ज्या पालकांना धूम्रपान करण्याची सवय असते, त्यांच्या श्वासोच्छ्वासातून निरोगी लहान मुलांना अस्थम्याचा त्रास जडू शकतो. न्यूमोनियाही होऊ शकतो. दिवसाला दहा सिगारेट ओढणा-यांची फुप्फुसं जितक्या वेगाने अस्थमाग्रस्त बनतात, तितक्याच वेगाने परिणाम लहान मुलांच्या शरीरावर होतो.

बर्जर्स सिंड्रोम

तंबाखूचं सेवन करणा-यांमध्ये जितक्या वेगाने या आजाराची लक्षणं दिसतात तेवढय़ाच वेगाने सिगारेट ओढणा-यांमध्ये दिसतात. या आजारात हातापायांच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. इतका की, रक्तवाहिन्या सूजतात. रक्ताचा प्रवाहीपणा कमी होतो. रक्तवाहिन्या खूप दुखतात. गँगरीन होण्याची शक्यता वाढते. हात-पाय लाल-निळे पडतात. थंड पडतात. चालणं-फिरणं, रोजची कामं करणं कठीण होऊन जातं. त्वचेचा रंग बदलतो. या आजारावर कुठल्याही प्रकारचे उपचार नाहीत. तंबाखूचं सेवन थांबवणं हा या आजारावरचा एकमेव उपाय आहे.

यावरून तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खायचे की नाहीत, हे ज्याचं त्याने ठरवायचं. शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हाती नाही का?

तंबाखू आणि आपलं हृदय

तंबाखूच्या सेवनामुळे हृदयाचे आजरही डोकं वर काढतात. सिगारेट, विडी, चिरुट, सुट्टा, पाइप ओढणा-यांना हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण धूम्रपान न करण्यांच्या तुलनेत दुपटीने वाढतं. जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच एक सव्र्हे केला. त्या सव्र्हेनुसार ज्यांना हृदयविकाराचा झटका पहिल्यांदा येतो, त्यातील ४० टक्के रुग्णांना सिगारेट, विडी, चिरुट, सुट्टा, पाइप यापैकी काहीही एक ओढणाऱ्याची सवय असते. स्मोकिंग केल्यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची घट होऊन वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं.

का लागते सवय?

तंबाखूत असलेल्या निकोटिन या रसायनात असे गुण असतात की शरीर काही दिवसातच त्याच्या अंमलाखाली वावरू लागतं. त्यामुळे तंबाखूचं व्यसन लागतं ते कायमचंच. तंबाखू आणि तंबाखूयुक्त पदार्थ खाण्याची सवय असेल आणि त्याने ते खाल्ल्यास डोकंदुखी, डोळे जड होणं, बेचैनी यांसारखे त्रास होतात.

धूम्रपान म्हणजे फुप्फुसांचा शत्रू

सिगारेटमध्ये कार्सिनोजीन (कँसर निर्माण करणारा मुख्य घटक) असतो. अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये निर्माण होणारा धूर फुप्फुसांच्या आवरणाचं नुकसान करतो. सुरुवातीला सिगारेट ओढण्यामुळे फुप्फुसांची होणारी हानी भरून काढण्याचं काम आपल्या शरीरातून होतं. मात्र सिगारेट ओढण्याचा अतिरेक झाल्यास फुप्फुसांची हानी होते. त्याच्या जोडीने मज्जारज्जू, हाडं, यकृतावरही परिणाम होतो.

सिगारेटइतकाच तंबाखूही धोकादायक :

तंबाखू हे धूरविरहित रूप शरीरावर सिगारेट, विडीइतके परिणाम करत नाही, असा समज आहे. मात्र हा गैरसमज आहे. तंबाखू तोंडात घेऊन थुंकल्यानंतर त्यातील निकोटिन शरीराच्या आत पोहोचून हानी पोहोचवण्यास सुरुवात होते. तंबाखूमुळे फक्त तोंडाचा कर्करोग होत नाही, तर अन्ननलिकेचा आणि स्वादुपिंडाचाही कर्करोग होतो.

स्मोकिंगमुळे पोटाचं आरोग्य बिघडतं :

धूम्रपान करण्याची सवय सोडणं हा एकमेव पर्याय शिल्लक असतो. सतत स्मोकिंग करणा-यांच्या तोंडात लाळेचं स्रवणं कमी होतं. शरीराची आम्लता प्रमाणापेक्षा वाढते. त्यामुळे पचनशक्तीचं कार्य मंदावतं. अपचनाचा त्रास होतो.

सोडणं कठीण तरीही गरजेचं

कुठलाही एक दिवस निवडून त्या दिवसापासून तंबाखू सोडण्याची तयारी अगदी सहज करता येते. या घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची कल्पना मित्रांना तसंच कुटुंबीयांना जरूर द्यावी. असं केल्यास आपल्याला असलेलं तंबाखूचं व्यसन सोडवण्यास आत्पेष्टांची मदत होईल.

आपल्या निर्णायावर ठाम राहा.

सवय सोडण्याची सुरुवात केल्यावर तोंड सुजणं, खोकला येणं, घसा खवखवणं यांसारखे त्रास होतात. कधी कधी थकायलाही होतं.

तंबाखू खाण्याची सवय असणा-यांपैकी काही जण सोडण्याचाही प्रयत्न करतात. पण दुर्दैवाने ती सवय सुटत नाही. अशा वेळी विविध हॉस्पिटल्समध्ये चालणा-या व्यसनमुक्ती केंद्रांचा आधार घ्यावा. समुपदेशकाचाही उपयोग करावा.

तंबाखूजन्य पदार्थ खाणं बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर निकोटिन पॅचचा उपयोग काही जण करतात. मात्र निकोटिन पॅचचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सर्वसाधारणपणे ई-सिगारेट ओढण्याने शरीरावर कोणत्याच प्रकारचा धोका निर्माण होत नाही, अशी धारणा असते. त्यामुळे तरुणाईचा कल ई सिगारेट ओढण्याकडे आहे. कारण यात प्युरिफाइड निकोटिन असतं. प्युरिफाइड निकोटिनमुळे शरीरात कॅन्सरजन्य पेशी निर्माण होत नाही, असाही गैरसमज असतो. पण ई-सिगारेटमध्ये पुरिफाइड निकोटिनचा वापर होत असला तरी सिगरेटचा हा नवा प्रकार पूर्णपणे सुरक्षित अजिबात नाही.

Read More »

जपा डोळयाना!

वातावरणातील अल्ट्राव्हायोलेट किरणांचा परिणाम हा त्वचेप्रमाणे शरीरावरही होतो. सुरक्षेचा मुद्दा लक्षात ठेवून डोळयांची काळजी घेतलीच पाहिजे.

उन्हाळयाच्या सुट्टया संपून शाळा सुरू व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीही या वाढत्या उन्हात बाहेर जाणं कोणी टाळत नाही. उन्हात बाहेर जाताना त्वचेप्रमाणे डोळय़ांचीही काळजी घेतली पाहिजे. जसं की,

= त्वचेचं अल्ट्राव्हायोलेट (अतिनील किरणं) किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशनचा उपयोग केला जातो. युव्ही कोटेड सनग्लासेसचा वापर करावा. कारण अल्ट्राव्हायोलेट किरणं डोळयावर पडल्याने मोतीबिंद होतो. रेटिनावरही परिणाम होतो.

= उन्हाळयाच्या दिवसांत फ्रेमच्या चारी बाजूला रॅप असणारे चष्मे वापरावेत.

= अल्ट्राव्हायोलेट किरणं पाणी तसंच बर्फावरून सर्वात जास्त परावर्तित होतात. वॉटर स्पोर्ट्स खेळणा-यांनी युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा. न केल्यास डोळे लाल होऊ शकतात. डोळयांतून सतत पाणी येतं. कॉर्लियावर परिणाम होतो.

= सायकल चालवणं, धूळ, मातीमध्ये बाइक चालवतानाही युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा. दगड, माती आणि धुळीपासून डोळयाचं संरक्षण करावं.

= स्वीमिंग पूलमध्येही डोळय़ांचं आरोग्य राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. याच कालखंडात संसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे स्वीमिंगपूलमधील पाणी जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्याकरता त्यात क्लोरीन आणि अन्य रसायनांचं प्रमाण वाढवतात. या रसायनांमुळे डोळयांची आग होऊन त्यातून सतत पाणी यायला सुरुवात होते. त्यामुळे पोहतानाही युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा.

= उन्हाचा परिणाम हा फक्त आणि फक्त त्वचेवरच होत नाही, तर डोळयांवरही होतो. डोळेही कोरडे होतात. या दिवसात ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्सचा वापर करावा. हे ड्रॉप्स प्रिझर्वेटिव्ह फ्री असले पाहिजेत. या ड्रॉप्सच्या वापरामुळे डोळयाची जळजळ कमी होते.

Read More »

अडाई

सुट्टीच्या काळात लहान मुलं खेळायला बाहेर निघतात.पण खेळण्या बरोबरच पोष्टीक आहारांची सुद्धा त्यांना गरज असते.

साहित्य : १ भाग हरभरा डाळ (चणा डाळ), १ भाग मूग डाळ (शक्यतो साल असलेली), १ भाग उडीद डाळ (साल असलेली), १ भाग तूरडाळ, १ भाग तांदूळ (ब्राउन राइस वापरल्यास उत्तम), चार लाल सुक्या मिरच्या, २ ते ३ लसूण पाकळय़ा, २ चमचे खोबरं (ओलं किंवा सुकं खोबरं. कोणतेही चालेल), डोसे काढण्यासाठी तेल आणि चवीपुरतं मीठ.

कृती : सर्व डाळी आणि तांदूळ नीट निवडून धुऊन पाण्यात कमीत कमी सहा ते सात तास भिजत ठेवावेत. त्यात लालमिरची आणि लसूण घालावी. त्यानंतर सहा ते सात तासांनंतर त्यातलं पाणी बाजूला काढून घ्यावं. भिजवलेली धान्यं मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून बारीक करावीत. शक्यतो जितकं बारीक करता येईल तितकं करावं. त्यात गरज लागेल तसं धान्य भिजवलेलं पाणीच घालावं. शेवटी मीठ आणि खोबरं घालावं.

अडाईसाठीचं पीठ साधारण डोशाच्या पिठासारखंच पातळ असावं. गरम नॉनस्टिक तव्यावर नेहमीच्या डोशासारखे डोसे करावेत. अडाई नेहमीच्या डोशापेक्षा थोडे जाडसर असतात. चटणीबरोबर खायला द्यावेत.

टीप : अडाईचं पीठ आंबवलं नाही तर चालतं. पण पिठात किसलेल्या भाज्या घालणार असलात तर पीठ खूप जास्त दिवस ठेवू नये.

पौष्टिक मूल्य : या रेसिपीत जीवनसत्त्व 'अ' आणि 'ब'चं प्रमाण असतं. शिवाय या पदार्थातून प्रथिनं आणि कबरेदकंही आपल्या शरीरात जातात. अडाईमध्ये भाज्या घातल्या तर फायबरचं प्रमाण वाढेल. हा तमीळ पद्धतीचा डोसा लहान मुलांना आवडेल. खोबरं आणि हरभ-यांच्या चटणीबरोबर तो चविष्ट लागतो.

Read More »

मयुराचे पोट का दुखत होते?

सध्या लग्न आणि पाटर्य़ाचा 'सीझन' जोरात सुरू आहे. पंगतीत वा बुफेमध्ये ताव मारून जेवणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच.. आणि त्यासोबतच उद्भवणारे पोटासंदर्भातील विविध आजार आणि दुखणी यांनाही आयत आमंत्रणच..! पण कधी कधी पोट दुखण्याची इतर अनेक कारणंही असू शकतात. या सगळ्यांवर उपाय मात्र एकच असू शकतो.
मयुराचं आता कसं आहे? तिला आता बरं वाटतयं का? रात्री उशिरा फोनवर बोलणं झाल्यावर लगेचच फोन ठेवून दिला. म्हटलं सकाळी उठल्यावर विचारू. मयुराचं पोटं आणि ओटीपोटही खूप दुखतं होतं. फुगलंही होतं. त्यामुळे तिला नीट बसताही येतं नव्हतं आणि झोपणं तर कठीणचं होतं. रात्री साधारण तीन वाजण्याच्या सुमारास दुखायला सुरुवात झाली. सुरुवातीला वाटलं की, पाळी येणारं असेल म्हणून दुखत असावं. एरवीही मासिक पाळीच्या वेळी खूपच त्रास होत असतो. पहिल्या दिवशी खूपच दुखत असल्यामुळे 'पेनकिलर'ची गोळी घ्यावीच लागते. तशीच तिची ती गोळीही घेऊन झाली होती. पण दीड तासांनंतरही दुखणं कमी न झाल्यामुळे काळजी वाटायला लागली.

गेल्या चार-पाच दिवसांपासून तिला थोडं 'युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन'ही झालं होतं. मयुराच्या आईने त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'पेनकिलर घेतलेली असल्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही. पोटदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. पेनकिलरनेही दुखणं कमी झालं नाही तर सकाळी दाखवायला घेऊन या, वाटल्यास सोनोग्राफी करून पाहू या,' असं त्यांनी सांगितल्यावर मयुराच्या आई जरा निश्चिंत झाल्या. पण सकाळी दहाच्या सुमारास तिचं पोट जास्तच फुगलं, कडक झालं आणि मळमळायला लागलं.

तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं असं त्यांना वाटायला लागलं. तितक्यात वैद्यबुवांची आठवण झाली. मी एकदा खाल्लेलं पचण्यासाठी औषध दिलं होतं. ते त्यांनी मयुराला दिलं. त्याने तिला बरं वाटलं.

अचानक असं का झालं? कशामुळे दुखत होतं. मी नेमकं काय औषध दिलं? मयुराच्या आईला प्रश्न मात्र पडले.

मी म्हणालो, तुम्ही काल संध्याकाळी लग्नाला गेला होतात. तिथे खाण्यामध्ये काही (अपथ्यकर) खाल्लं गेलं असेल? या उन्हाळ्यामध्ये मी कुठेही जेवयाला जात नाही आणि जावंच लागलं तर आमरस, बासुंदी किंवा कोणत्याही प्रकारची मिठाई तर अजिबात खात नाही.

मयुराच्या आई म्हणाल्या, 'तुम्ही म्हणता हे खरं आहे. पण आमच्या मयुराला गोड आवडत नाही. म्हणून तिच्या ताटात आमरस, बासुंदी किंवा मिठाई असे पदार्थ असूच शकत नाहीत. मला ठाऊक आहे की तिला भूक लागली नव्हती, म्हणून तिने खूपच कमी खाल्लं होतं. तरीही पोटदुखी, पोट फुगणं, उलटया झाल्यास प्रथम शंका जेवणातील पदार्थावरच येणं साहाजिकच आहे. अजीर्णपणामुळे, वाताने पोट फुगल्यामुळे, मासिक पाळीचा त्रास आदी कारणांमुळे उद्भवणा-या दुखण्यामुळे किंवा 'युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन'मुळे हे दुखणं आहे, असं आम्हाला वाटत होतं. परंतु त्याचं नक्की कारण ठरवता येतं नव्हतं.

फॅमिली डॉक्टरांनी दिलेली औषधसुद्धा घेऊन झाली. शेवटी वैद्यबुवा आठवले. तुम्हाला फोन केला.'

खरं तर फोनवर बोलून रोगाचं निदान होऊ नव्हतं. परंतु अपचन, युटीआय आणि मासिक पाळी या तिन्ही शक्यता विचारात घेऊन एक अतिशय सोपं पण तितकंच गुणकारी औषध सुचवलं. ते म्हणजे पुदिन्याचा अर्क. पुदिन्याचा अर्क या तिन्ही त्रासांवर उत्तम औषध आहे. पुदिन्याच्या अर्कासोबतच त्यामध्ये तुळस, ओवा आणि चित्रक (वनौषधी) यांचं एकत्रित मिश्रण वैद्यबुवांनी मयुराला द्यायला सांगितलं. त्यानंतर सुदैवाने तिला अध्र्या तासात खूप बर वाटलं आणि ती शांत झोपली.
पुदिना अन्न पचवतो. लघवीचं प्रमाण वाढवतो. तसंच ताप, चामडीचे विकार, खोकला, सुकलेला कफ पातळ होण्यासाठी तसंच वारंवार येणा-या उचक्या अशा विविध समस्यांवरही देता येतं.

पुदिन्याच्या चटणीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास वात आणि कफ या संदर्भातील अनेक आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय होतो.
पण मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की मयुराला आता यापुढे पोटासंबंधित दुखण्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या 'पेनकिलर्स' घ्याव्या लागणार नाहीत. पुदिन्यामुळे मयुराची पचनशक्तीही सुधारेल. तसंच लघवीच्या इन्फेक्शनच्या आणि पाळीच्या वेळी पोटदुखीच्या त्रासापासूनही हळूहळू सुटका होईल.

Read More »

रम्याने बनवलं सायकलचं वॉशिंग मशिन

प्रतिभावंतांच्या आपल्या देशात अनेक नवतरुण-तरुणी आपल्या प्रतिभेतून मानवी जीवन सुकर करणारे नानाविध शोध लावत आहेत. केरळमधील रम्या ही अशीच एक तरुणी. वयाच्या चौदाव्या वर्षी तिने पॅडिलगद्वारे चालणारे वॉशिंग मशिन स्वत: विकसित करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. जिज्ञासू आणि संशोधकवृत्तीच्या रम्याने विकसित केलेलं हे उपकरण कपडे धुण्यासोबत व्यायामही घडवून आणणारं आहे. तसंच यातून विजेची फार मोठी बचत करता येणं शक्य आहे. छोटया रम्याच्या या मोठया संशोधनाविषयी..

केरळमधील मलपूरम जिल्ह्यातील किझात्तूर पंचायत. या गावात राहणारी रम्या जोसे हिने वयाच्या चौदाव्या वर्षी 'वॉशिंग कम एक्झरसाइज मशिन' तयार केलं. शालेय जीवनापासूनच रम्या अभ्यासात अतिशय हुशार होती. वेगवेगळ्या वैज्ञानिक मेळाव्यांमध्ये तिने शाळेचं प्रतिनिधित्व केलं असून अनेक पारितोषिकंही पटकावली आहेत. मोबाइल फोनचं ट्रान्समिशन टॉवरचं मॉडेल आणि थर्मल कुकर म्हणून वापरण्यात येणारं, उष्णता साठवून ठेवणारं कॅसेरॉलचं भांडंही तिने बनवलं. बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रॅक्टिकलसाठी तिने भाज्या आणि फळं एक आठवडयापर्यंत ताज्या राहू शकतील, असा रेफ्रिजरेटरही तयार केला आहे.

रम्या दहावीत असताना परीक्षेच्या वेळी तिची आई आजारी पडली आणि वडील कर्करोगाचे उपचार घेत होते. त्यावेळी तिला शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी तीन बस बदलाव्या लागत असत आणि त्यासाठी दोन तास घालवावे लागत असत. त्यावेळी घरातील कपडे धुण्याचा मोठा प्रश्न होता. वॉशिंग मशिनही नव्हतं. लाँड्रीमध्ये कपडे टाकणं शक्य नव्हतं. यातूनच तिने कपडे धुण्याचं यंत्र तयार करण्याचं ठरवलं. तिने इलेक्ट्रीक वॉशिंग मशिनची कार्यपद्धती जाणून घेतली आणि इलेक्ट्रीक पॉवरऐवजी मेकॅनिकल पॉवरचा वापर करता येऊ शकतो का, याचा विचार करायला सुरुवात केली. तिने सुरुवातीला मूळ आराखडे (बेसिक डायग्राम) तयार केले. तिचे वडील हे डायग्राम जवळच्या ऑटोमोबाइल वर्कशॉपमध्ये घेऊन गेले.

तेथील कामगारांना त्यांनी विनंती केली की, तुमच्या मोकळ्या वेळेत हे तयार करा मी तुमचे पैसे देईन.' त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या सूचनांवरून आवश्यक ते सामान आणलं. कशा प्रकारे सामानाची जोडणी करावी हे तिने सांगितलं. हे वॉशिंग मशिन अतिशय साधं आणि कोणालाही चालवता येईल असं आहे. यामध्ये एक अॅल्युमिनिअमची केबिन असून तिथे आडवे लोखंडाचे नेटवायरचे सिलिंडर आहे. हे सिलिंडर पॅडिलग सिस्टिमला जोडलेलं असून त्याला सायकलचं पेडल आणि सीट जोडलेले आहेत. बाहेरून ते आपण जिममध्ये बघतो तशा व्यायामाच्या सायकलप्रमाणे दिसतं. धुण्याचे कपडे सिलिंडरमध्ये टाकायचे, केबिन कपडयांच्या पातळीपर्यंत पाण्याने भरायची, त्यात धुण्याचा साबणही टाकायचा. दहा मिनिटं तसंच ठेवायचं, त्यानंतर पॅडल मारायला सुरुवात करायची. साधारण चार मिनिटं पॅडल मारायचं. त्याने सिलिंडर अतिशय वेगाने कपडयासकट फिरायला लागतो आणि हळुवारपणे तो कपडे स्वच्छदेखील करतो. त्यानंतर साबणाचं पाणी काढून टाकायचं, त्यात पुन्हा साधं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा पॅडल मारून यंत्रणा फिरती करायची की, आतले कपडे स्वच्छ होण्याची प्रक्रिया सुरू होते. स्वच्छ धुतलेले कपडे या मशिनमध्ये ८० टक्क्यांपर्यंत कोरडेही करता येतात.

हे मशिन ज्या ठिकाणी वीजपुरवठा नेहमीच खंडित होतो, ज्या ठिकाणी वीजपुरवठय़ाची कमतरता आहे अशा ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयोगाचं आहे. सर्वसामान्य माणूस इलेक्ट्रीक वॉशिंग मशिन चटकन घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. शिवाय इलेक्ट्रीक वॉशिंग मशिन चालवताना वीजपुरवठा खंडित झाला तर सर्व प्रोसिजर पुन्हा करावी लागते. पण रम्याने तयार केलेल्या यंत्रामध्ये ही मर्यादा नाही. शिवाय यामुळे वेळही खूप वाचतो. सायकलसारखे यंत्र मशिनला लावल्यामुळे एकीकडे व्यायामही होतो आणि दुसरीकडे कपडे देखील स्वच्छ होतात. महत्त्वाचं म्हणजे या मशिनची किंमत अगदीच कमी असून ती केवळ दोन हजार रूपये आहे. त्यामुळे हा शोध ग्रामीण भागातल्या लोकांसाठी वापरण्याच्या दृष्टीने अतिशय प्रायोगिक आणि त्यांच्या खिशाला परवडेल असाच आहे.

हे यंत्र तयार करण्यामागचं रम्याचं प्रेरणास्थान आहेत, तिचे वडील. ते माध्यमिक शाळेत हिंदी विषयाचे शिक्षक असून तिची आई प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका आहे. ज्यावेळी रम्याच्या मनात वॉशिंग मशिन तयार करण्याची कल्पना आली त्यावेळी त्याबद्दलच्या तिच्या शंका आईवडिलांच्या मदतीनेच दूर झाल्या. त्यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला. यंत्र तयार करण्यात वेळ घालवू नकोस, अशा सुचना कधीही दिल्या नाहीत. रम्याची जुळी बहीण सौम्यानेदेखील तिला हे मशिन बनवण्यात खूप मोलाची मदत केली आहे.

रम्या आणि तिचं संशोधन आजूबाजूच्या परिसरात, मित्रवर्गात चांगल्या पद्धतीने माहीत झालं आहे. ते तिला आता 'छोटी शास्त्रज्ञ' असं म्हणू लागले आहेत. तिची मुलाखत दोन स्थानिक वृत्तपत्रांमध्ये छापून आली होती. चर्चमध्ये तिच्या सत्कारार्थ एक समारंभही आयोजित केला गेला होता. त्यावेळी तेथील बिशपनी तिला मानचिन्ह दिलं. दिल्ली येथील अभियंत्याने हे यंत्र अधिक सुसज्ज करण्यासाठी मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे. रम्यासारख्या छोटया शास्त्रज्ञांचा सा-यांनाच अभिमान वाटतो.

इतक्या लहान वयात वॉशिंग मशिन बनवणा-या रम्याचं स्वप्न आहे, डॉक्टर होण्याचं! आणि तिला औषधक्षेत्रात संशोधन करायचं आहे. त्यासाठी तिने आतापासूनच कोचिंग क्लास लावलेत आणि अभ्यासाची तयारी सुरू केली आहे. ती म्हणते, ''आपल्याला जे मिळवण्याची इच्छा आहे, त्यासाठी प्रयत्न करावेत. चुकांबाबत काळजी करू नये. त्या नक्की दुरुस्त करता येतात.''

Read More »

कपड्यांमध्येही हायटेक तंत्रज्ञान

आतापर्यंत गॅझेट आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत होता. पण आता कपड्यांमध्येही त्याचा आविष्कार झाला आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांना शॉक देणा-या एका अंतर्वस्त्राची निर्मिती केली. जगात अन्यत्रही अशा तंत्रज्ञानाचा वापर असणा-या कपडयाची निर्मिती होत आहे. त्यातून संगीत निर्माण करणारं जॅकेट आता तयार झालं आहे. त्याप्रमाणे कपडे हरवले तरी ते शोधून देण्यास मदत करणा-या ड्रेसचीही निर्मिती करण्यात आली आहे.

आज विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर होत नाही, अशी गोष्टच दिसत नाही. दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंमध्येही तंत्रज्ञानाचा वापर आता करण्यात येत आहे. तरुण वयात दुस-याची छेडछाड करण्याची सवय अनेकांना असते. महाविद्यालयात तर त्याला ऊत आलेले अनेक ग्रुप्सही असतात. त्यातील मुलं केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही छेडछाड करतात. अशा मुलांना धडा शिकवण्याचा प्रयोग चेन्नईच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला. त्यासाठी त्यांनी अशा मुलांना शॉक बसेल अशा अंतर्वस्त्रांची निर्मिती केली. कपडयामध्ये अशा प्रकारचं तंत्रज्ञान प्रथमच वापरण्यात आलं असावं, असं त्यावेळी अनेकांना वाटलं. पण जगभरात अंगावर घालता येणा-या कपडयांमध्ये अशा तंत्रज्ञानाचे अनेक प्रयोग होत आहेत.

संगीत निर्माण करणारं जॅकेट

कॅलिफोर्नियाच्या एका कंपनीने संगीत निर्माण करू शकेल अशा जॅकेटची निर्मिती केली आहे. याविषयी कंपनीच्या सहसंस्थापक लिडा मचिना म्हणतात, 'आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एक व्यक्ती फक्त कम्प्युटरचा वापर करून संगीत वाजवत असल्याचं आम्ही पाहिलं. ते पाहून संगीतकाराने आपल्या शरीराचा वापर करूनच संगीत निर्माण करावं, असा विचार आमच्या मनात आला.' या कंपनीच्या जॅकेटमध्ये कपडय़ांच्या खाली बारीक सेन्सर्स आहेत. वन एक्सलेरोमीटरचे हे सेन्सर्स आपल्या खांद्याने केलेली हालचाल ओळखतात. ते जॉयस्टिक म्हणून काम करतात आणि चार बटणांद्वारे ते चलित होतं. वापरणाऱ्यांच्या गरजेनुसार सेन्सर आणि बटण जशी हवी तशी लावता येऊ शकतात. ते एका इंटरफेस सॉफ्टवेअरने कम्प्युटर किंवा मोबाइल फोनशी जोडलेले असतात. हे असल्याचं मचिना सांगतात. आपण एक ऑनलाइन रेंटल स्टोअरही बनवत असून त्यामध्ये यूजर्सना प्राधान्यक्रमाने आपले कार्यक्रम अपलोड करण्याची सुविधा मिळेल. मचिना यांच्या म्हणण्यानुसार, आपण याला आयपॉड किंवा व्हीडिओ नियंत्रित करण्यासाठी वापरू इच्छित असाल तर अतिरिक्त सेन्सर जोडू शकाल. आपले सारे कोड मोफत उपलब्ध असतील, असंही मचिना सांगतात. कंपनी यामध्ये काही बदल करण्याचा विचार करत आहे. सुरुवातीच्या पातळीवर असलेलं हे जॅकेट या वर्षाच्या अखेपर्यंत तयार होण्याची अपेक्षा असल्याचंही त्या स्पष्ट करतात.

ऐकू न येणा-यांसाठी फ्लटर ड्रेस

ज्यांना ऐकू येत नाही अशा लोकांना संगीत निर्माण करणारं हे जॅकेट कदाचित आकर्षित करू शकणार नाही. पण त्यांच्यासाठी अन्य आविष्कारही आहे. त्यांच्यासाठी फ्लटर नावाचा ड्रेस तयार करण्यात आला आहे. कोलेरेडो विद्यापीठातील पीएचडीची विद्यार्थिनी हॅली प्रोफिटाने हा ड्रेस बनवला आहे. ती म्हणते, आवाज ऐकू शकेल अशा मायक्रोफोनचं एक जाळं या ड्रेसमध्ये आहे. हे सूक्ष्म-नियंत्रण प्रणालीशी संबंधित आहे. आवाज कोणत्या दिशेने आला, याची माहिती कंपनाच्या माध्यमातून दिली जाते. आपल्याला मागे पाहायचं असेल तर असं वाटेल की, मागच्या बाजूने आपल्या खांद्यावर कोणीतरी थाप मारत आहे. मोबाइल फोनच्या कंपनामुळे अनुभूती मिळते, तशीच अनुभूती या कंपनामुळेही मिळते.

याविषयी बोलताना हॅली आणखी सांगते, 'यापूर्वी आम्ही अशी उत्पादने बनवली होती जी खराब दिसत असल्यामुळे ती लोक वापरू इच्छित नव्हते. अंगावर वापरता येईल अशा तंत्रज्ञानाच्या बाबतीत हॅली खूप उत्साहित आहे. हे केवळ वापरणा-यांच्या जीवनाची पातळी उत्तम बनवतं, असं नाही तर या उत्पादनाच्या वापरातून त्या व्यक्तीला सुंदरही बनवता येऊ शकतं. फ्लटर अजून शोधाच्या पातळीवरच आहे. हॅली प्रोफिटाला लवकरच त्याचा उपयोग माणसांवर करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. फ्लटरच्या भविष्यातील डिझाइनमध्ये ऐकण्याची उपकरणंही सामील करण्यात येण्याची शक्यता आहे.

कपडे, वस्तू हरवू न देणारं तंत्रज्ञान

माणसाचा स्वभाव विसरभोळा असतो. अनेकदा स्वयंपाकघरापासून ऑफिसपर्यंत त्याला आपण एखादी वस्तू कुठे ठेवली, हे आठवत नाही. त्यामुळे तिचा शोध घेताना तो हैराण होतो. अनेकदा ती वस्तू दुस-यांनी शोधून द्यावी, अशी विनंती त्याला करावी लागते. तरीही ती सापडेलच याची खात्री नसते. कपडय़ांच्या बाबतीत तर असं अनेकदा होतं. एखादा ड्रेस आपण कोणालातरी वापरण्यासाठी वा धुण्यासाठी किंवा इस्त्रीसाठी लाँड्रीत दिलेला असतो. पण, ज्यावेळी तो हवा असतो तेव्हा तो सापडत नाही आणि आपण कुठे ठेवला हेदेखील आठवत नाही.

या शक्यता लक्षात घेऊन अशा गोष्टी झाल्या तरी तो ड्रेस आपल्याला सहज मिळू शकेल अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून एक पोशाख तयार करण्यात आला आहे. एशर लेवाईन यांनी हा ड्रेस तयार केला आहे. ते न्यूयॉर्क फॅशन हाऊसचे मालक आहेत. लेडी गागा, बियोन्स, ब्लॅक आईज्ड पीज यांसारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे कपडे ते डिझाइन करतात. त्यांनाही आपल्या कामात तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची आवड आहे. २०१२ च्या फॉल/ विटर कलेक्शनमध्ये त्यांनी मेकरबोट यांच्या बरोबरीने थ्री-डी पिट्रेड ग्लासेस सादर केले होते. यावर्षी त्यांनी ब्ल्यूटूथच्या वापरासाठी 'फोन हालो' या नव्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे.

एशर म्हणतात, 'माझे अनेक ग्लोव्ह्ज हरवले आहेत. त्यामुळे ते आपल्या उत्तम उत्पादनांमध्ये वापरण्याच्या बाजूने मी आहे. कारण अनेकदा आमची उत्पादने इतकी महागडी असतात की कपडयांवर खूप खर्च करणाऱ्या लोकांनाही ती महाग वाटतात.' चीप लावण्यात आलेल्या वस्तूपासून आपण दूर जात असाल तर एशर यांचा 'ट्रकआर अॅप' अलार्म वाजवतो. तरीही तुम्ही त्यानंतर आपल्या पसंतीचे जॅकेट सोडून जात असाल तर आपल्याला टेक्स्ट मेसेज, ई-मेल किंवा फेसबुक मेसेज पाठवते. त्यामध्ये सामानाचे जीपीएस कॉर्डिनेट्स असतात. त्या माध्यमातून गुगल मॅपचा वापर करून आपले साहित्य शोधू शकतो.

आतापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर गॅझेट किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येच केला जात होता. पण आता कपडयांमध्येही त्याचा वापर सुरू झाला आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान असणारे कपडे आपल्याकडेही असायला हवेत, अशी इच्छा नव्या पिढीला झाल्याशिवाय राहणार नाही. या कपडयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा कितीही वापर करण्यात आला असला तरी त्यांच्या आकारात बेढबपणा अजिबात नाही. कपडे तयार करताना ते फॅशनविश्वातही शोभून दिसतील, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे नव्या पिढीला हे कपडे वापरण्याचा मोह आवरणार नाही.

Read More »

नक्षलवादाची नांगी ठेचा

छत्तीसगढमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेला व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह २७ जणांचा बळी घेणारा हल्ला हा अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण त्याबरोबरच नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची फेरतपासणी व फेरआखणी करण्याची किती गरज किती तातडीने करणे आवश्यक आहे, यावरही जळजळीत प्रकाशझोत टाकणारा आहे. नक्षलवाद्यांनी यापूर्वी पोलीस व सुरक्षादलांवर अनेकदा भीषण हल्ले चढवून जवानांची मोठ्या प्रमाणावर हत्या घडवून आणली आहे व सरकारला हादरा दिला आहे. पण यावेळी त्यांनी काँग्रेससारख्या प्रमुख राजकीय पक्षाच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला करून आपण कुठल्या थराला जाऊ शकतो, हे दाखवून दिले आहे…

छत्तीसगढमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेला व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह २७ जणांचा बळी घेणारा हल्ला हा अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण त्याबरोबरच नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची फेरतपासणी व फेरआखणी करण्याची किती गरज किती तातडीने करणे आवश्यक आहे, यावरही जळजळीत प्रकाशझोत टाकणारा आहे. नक्षलवाद्यांनी यापूर्वी पोलीस व सुरक्षादलांवर अनेकदा भीषण हल्ले चढवून जवानांची मोठ्या प्रमाणावर हत्या घडवून आणली आहे व सरकारला हादरा दिला आहे. पण यावेळी त्यांनी काँग्रेससारख्या प्रमुख राजकीय पक्षाच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला करून आपण कुठल्या थराला जाऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. अजूनपर्यंत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर नक्षलवाद्यांनी असे हल्ले केले नव्हते. पण आपण असेही राजकीय 'लक्ष्य' साध्य करू शकतो व सरकारला आणि देशाला हादरा देऊ शकतो, हे नक्षलवाद्यांनी दाखवून दिले आहे. याचे भविष्यात काय परिणाम होतील व काय प्रतिक्रिया उमटतील, याची तमा या दहशतवाद्यांनी बाळगलेली नाही. तत्कालिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या भरात आणि इष्रेत त्यांनी हे कौर्य केले आहे. छत्तीसगढ राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजपने मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या नेतृत्वाखाली बस्तर जिल्हय़ात विकास यात्रा काढली होती. या विकास यात्रेला प्रत्युत्तरादाखल काँग्रेसने शनिवारी परिवर्तन यात्रा काढली. या दोन्ही यात्रांच्या निमित्ताने नक्षलवाद्यांची भूमिका स्पष्ट झाली होती. सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमुळे अधिकच निर्ढावलेल्या नक्षलवाद्यांनी बस्तरमध्ये कुणी पाऊल ठेवू नये, असा इशारा दिला होता. परंतु मुख्यमंत्री रणम सिंग यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या विकास यात्रेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काँग्रेसच्या या यात्रेला तसे खास संरक्षण नव्हते. जे काही होते ते अपुरे व नियोजनशून्य होते. काँग्रेसच्या या परिवर्तन यात्रेमध्ये काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते होते. तसेच सलवा जुडम मोहिमेचे प्रवर्तक महेंद्र कर्मा हेही होते. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीच्या सुमारे अडीचशे सशस्त्र नक्षलवाद्यांनी चढवलेला हा हल्ला हा नक्षलवाद्यांना त्यांच्या दृष्टीने पर्वणीच ठरली. नक्षलवाद्यांनी प्रथम सुरुंगस्फोट केला व त्यानंतर त्यांनी दीड तास गोळीबार केला. ताफ्यातून कुठलाच प्रतिकार होत नाही, हे पाहून नक्षलवादी वाहनांच्या जवळ आले व त्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली व जखमींना गोळ्या घालून ठार केले. त्यांनी छत्तीसगढ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल व त्यांचा पुत्र नीरज यांना जवळच्या टेकडीवर नेऊन त्यांना गोळ्या घालून ठार केले. महेंद्र कर्मा हे तर नक्षलवाद्यांचे शत्रूच. त्यांची ओळख पटताच त्यांनी कर्माला ठार केलेच, पण त्यांच्या मृतदेहावरही ते नाचले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विद्याचरण शुक्ला हेही जबर जखमी झाले व त्यांची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्याने छत्तीसगढमधील आघाडीचे विद्यमान नेतृत्व संपुष्टात आले आहे. तसेच या भीषण हल्ल्याने आणि क्रौर्याने नक्षलवाद्यांच्या समस्येचा अधिक कठोर व योजनाबद्ध रीतीने मुकाबला करण्याबाबत गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. या घटनेची देशाच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून या हल्ल्याचा निषेध करताना नक्षलवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. या संबंधात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आत्मविश्वासाने सांगितले आहे की, देश नक्षलवाद्यांसमोर कधीही झुकणार नाही आणि हल्लेखोर नक्षलवाद्यांना शोधून काढून त्यांना शिक्षा देण्यात येईल. हा हल्ला हे आव्हान असून आम्ही आता मागे हटणार नाही. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही या हल्ल्याचा निषेध करून या नक्षलवादी हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही हा हल्ला काँग्रेस किंवा पक्षाच्या नेत्यांवर झालेला नसून तो लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी सार्थ प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरे म्हणजे, सुरक्षा व्यवस्था चोख नव्हती आणि त्यात अनेक त्रुटी होत्या. तरीही छत्तीसगढमधील प्रमुख काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात ही परिवर्तन यात्रा काढून व आपल्या प्राणांचे मोल देऊन या प्रदेशाच्या परिवर्तनाचे आपले उद्दिष्ट व नक्षलवाद्यांचा सामना करण्याची जिद्द यांचे दर्शन जनतेला घडवले आहे. केवळ निवडणुका आणि सत्तेसाठी आपण धडपड आणि आंदोलने करत नाही, तर प्रसंगी देशाच्या ऐक्यासाठी, विकासासाठी, शांतता व सलोख्यासाठी आणि दहशतवाद व नक्षलवाद यांचा सामना करण्यासाठी आपण आपले प्राणही पणाला लावतो, हे छत्तीसगढसाख्या राज्यातील काँग्रेसजनांनी दाखवून दिले आहे आणि नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढय़ातील एक पान रक्ताने लिहिले गेले. या हल्ल्याचा काँग्रेस, भाजप व माकपसह सर्व पक्षांनी निषेध केला आहे व एकजुटीने नक्षलवादाच्या वाढत्या धोक्याचा बीमोड करण्यावर भर दिला आहे, हे विशेष होय. नक्षलवाद्यांचा सामना करताना त्यात कुणीही पक्षीय राजकारण आणता नये व या लढाईत वारंवार होणा-या चुका व घातक त्रुटी त्वरेने दूर केल्या पाहिजेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये नक्षलवादाचा धोका गेली काही वष्रे वाढत आहे व या धोक्याकडे जेवढय़ा गांभीर्याने नेहमी पाहिले पाहिजे होते तेवढे पाहिले गेले नाही. त्यामुळेच नक्षलवादाचा आणि नलक्षवाद्यांचा जोर वाढत गेला. याला पहिले कारण म्हणजे गुप्तहेर यंत्रणांचे अपयश. नक्षलवादी जंगलात व दुर्गम भागात वावरतात व ते चपळतेने हालचाली करतात ही गोष्ट खरी. पण त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे, त्यांची गुप्त ठिकाणे शोधून काढणे, त्यांच्या हस्तकांशी संधान बांधून त्यांना आपल्या अंकित करून घेणे, या प्रक्रियेत आपल्या गुप्तचर यंत्रणा खूपच मागे पडल्या आहेत. तसेच आपली सुरक्षा दले, गुप्तचर यंत्रणा, नक्षलग्रस्त राज्ये, केंद्र सरकार यामध्ये पुरेसा समन्वय नाही. नक्षलवाद्यांचा सामना करताना आपल्या त्रुटी त्वरित दूर करणे आवश्यक असते. नक्षलवाद्यांनी मार्गात पेरलेल्या सुरुंगांचा आधीच स्फोट होईल, अशी यंत्रणा असलेली वाहने आपल्या पोलीस दलांना हवी होती. परंतु ती मोठय़ा कालावधीनंतर देण्यात आली. परिणामी, त्या आधी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या सुरुंगांचा स्फोट घडवल्याने शेकडो पोलीस शहीद झाले. याविषयी बरीच ओरड झाल्यानंतर ही वाहने सुरक्षा दलांना मिळाली. आज नक्षलवाद्यांकडे अद्ययावत शस्त्रे, सुरुंग व संपर्क यंत्रणा आहे. त्यांना याचा वापर करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. नक्षलवाद्यांना पैसाही पुरवला जातो. त्यांना अखंड होणारी ही रसद हाच खरा कळीचा मुद्दा आहे. ही रसद सीमेपलीकडील आपल्या शत्रूंकडून पुरवली जात हे उघड आहे. ही रसद तोडण्यात यश आले तर नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे कठीण नाही. नक्षलवाद ही आज राष्ट्रीय समस्या बनली आहे. शेकडो सुरक्षा दल आणि निष्पापांच्या हत्याकांडाला जबाबदार असलेल्या नक्षलवादाची नांगी वेळीच ठेचण्याची निर्णायक वेळ आता आली आहे.

सेबीची पंचविशी

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबी ही बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. नुकतीच तिने २५ वर्षे पूर्ण केली. सर्व प्रकारच्या भांडवली व्यवहारांवर देखरेख ठेवणारी ही एक नियामक संस्था. भारतातील काही मोजक्या संस्थांविषयी जनमानसात आणि कॉर्पोरेट जगतात अजूनही आदराची आणि विश्वासाची भावना आहे.

Read More »

घुसखोरी हा चीनचा स्थायीभाव

पाकिस्तान आणि चीन हे दोन देश नेहमीच भारतावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमध्ये असतात. पाकिस्तान भारताशी कोणतीही तडजोड करायला तयार नाही, तर चीन एका बाजूला तडजोडीची, सामंजस्याची भाषा करत दुस-या बाजूला सीमेवर कुरापती काढत घुसखोरी करत असतो. चीनचे नवे पंतप्रधान ली केकियांग यांच्या भारत दौ-याला लडाखमधील चीनच्या घुसखोरीची पार्श्वभूमी होती. ली यांना भारताकडून कठोर समज दिली जाईल, अशी अपेक्षा होती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चर्चेच्या वेळी हा विषय उपस्थितही केला. पण त्याला फारसे महत्त्व दिले गेले नाही. परस्पर व्यापारी संबंध सुधारण्यावरच भर दिला गेला. मात्र सीमेवर शांतता राहिली तरच परस्परसंबंध दृढ राहतील, याची जाणीव भारताने चीनला करून दिली, हेही महत्त्वाचे आहे. मात्र, असे असतानाही लडाखमधीलच देप्सांग भागात पाच किलोमीटर परिसरात चिनी सैन्यानी घुसखोरी करून पक्का रस्ता बांधला आहे. राजकीय पातळीवर शांततेच्या गप्पा आणि व्यापारवाढीबाबत करार करून प्रत्यक्षात मात्र घुसखोरी करणे, हा चीनचा आता स्थायीभाव बनत चालला आहे. दोन्ही देशांतील राजकीय प्रश्न सुटले नाहीत तर या आíथक आणि व्यापारी संबंध कशाच्या आधारावर जोपासले जाणार आहे, हाही मोठा प्रश्न आहे.

चीनचे नवे पंतप्रधान ली केकियांग यांचा तीन दिवसांचा भारत दौरा भारतासाठी फारसा यशस्वी ठरला नाही. अलीकडेच चीनी सैन्याने लडाखमध्ये १९ किमी घुसखोरी करून तंबू ठोकले. हे तंबू तेथे तीन आठवडे होते. यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले होते. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांचा चीन दौराही यामुळे रद्द झाला. पण चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी ठरल्याप्रमाणे भारताचा दौरा केला. या दौ-यामागचा हेतू परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढवणे तसेच भविष्य काळात एकमेकांची साथ देणे हा होता, असे खुद्द ली यांनीच सांगितले. भारताबरोबर व्यापारी आणि आíथक संबंध चीनला फायद्याचे वाटतात. कारण भारताची मोठी बाजारपेठ इतर देशांप्रमाणे चीनलाही खुणावत आहे, यात शंका नाही. ली यांनी हा हेतू स्पष्ट केल्यावर इतर वादाचे मुद्दे आपोआपच बाजूला पडले आणि त्यांचा दौरा व्यापार आणि गुंतवणूक या विषयांपुरताच मर्यादित राहिला. 

भारत आणि चीन यांच्यातील व्यापार वेगाने वाढतो आहे. २०१५पर्यंत तो १००अब्ज डॉलपर्यंत नेण्याचा दोन्ही देशांचे लक्ष्य आहे. पण त्यातही बरेच असंतुलन आहे. कारण हा व्यापार ब-याच अंशी चीनच्या बाजूने झुकलेला आहे. आता चीनी बाजारपेठ भारतीय व्यापा-यांसाठी अनुकूल करण्याविषयी ली यांनी आश्वासन दिले आहे.

ली यांच्या दौ-यादरम्यान भारत आणि चीन यांच्यात आठ करार झाले. हे करार व्यापार, संस्कृती आणि जलस्रेत अशासारख्या विषयांमध्ये परस्पर हित जोपासण्याच्या दृष्टीने झाले आहेत. या दौ-यावर भारतीय हद्दीत चिनी सन्याचे घुसण्याच्या घटनेचे सावट होते. पण ली यांना हे सावट दूर करण्यात यश आले. हा विषय बाजूला ठेवून त्यांना हव्या असलेल्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात ली यांना यश आले. भारताने सीमेवरील चिनी सन्याच्या आगाऊपणाचा विषय काढला तरी त्याला फारसे महत्त्व दिले गेले नाही. भारतीय प्रसारमाध्यमांत याविषयी चर्चा झडत राहिल्या. पण राजनतिकदृष्टय़ाचीनने हा विषय बाजूला ठेवण्यात यश मिळवले.

चीनचा विस्तारवाद जगापासून लपलेला नाही. भारताला त्याचा फटका वारंवार बसतो आहे. अरुणाचल, लडाख कधी कधी तर आसामपर्यंत चीनची घुसखोरी सुरू असते. चीनच्या बाजूने सीमेवर कुरापती काढण्याचे काम वारंवार सुरू असते. पण चीनी नेतृत्व त्याकडे दुर्लक्ष करून भारताबरोबर आíथक आणि व्यापारी संबंध वाढवण्याच्या गोष्टी करत असतात. भारतातील तज्ज्ञ पाकिस्तानशी मैत्री करताना भारत आणि चीन यांच्यातील या संबंधांचे दाखले देत असतात. पण या दोन्ही देशांतील राजकीय प्रश्न सुटले नाहीत तर या आíथक आणि व्यापारी संबंध कशाच्या आधारावर जोपासले जाणार हा मोठा प्रश्न आहे.

सीमेवरील चीनच्या कुरापती सातत्याने चालूच राहिल्या आणि भारताने त्याकडे असेच दुर्लक्ष केले तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल, हेही लक्षात ठेवले पाहिजे. श्रीलंकेतील मानवाधिकार हक्कांच्या भंगाविषयी युनोत झालेल्या मतदानाच्यावेळी तामिळनाडूतील द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांचा केंद्र सरकारवर मोठा दबाव होता. त्यावेळी प्रादेशिक हितसंबंध आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांची गल्लत करू नये, आंतरराष्ट्रीय संबंध हे प्रादेशिक हितसंबंधांशी निगडीत नसतात, असे तत्त्वज्ञान अनेक विचारवंतांनी मांडले. पण देशाच्या परराष्ट्र धोरणाचा लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होत असेल तर त्याचा विचार देशाने करायलाच हवा. श्रीलंकेतील तमिळींच्या प्रश्नाचे थेट परिणाम तामिळनाडूच्या जनतेवर पर्यायाने भारतीय जनतेवर होत आहेत. त्यामुळे श्रीलंकेशी संबंध ठेवताना तामिळींचा विषय भारत बाजूला ठेवू शकत नाही, त्याने तसा ठेवता कामा नये. तीच गोष्ट चीनची आहे. चीनच्या कुरापतींचा थेट त्रास लडाख, अरुणाचल प्रदेश, आसाममधील लोकांना होत असतो. अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील नेते तर वारंवार याविषयी केंद्राकडे तक्रार करत असतात. पण केवळ व्यापारी आणि आíथक संबंध दृढ राहावेत म्हणून राजकीय प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परराष्ट्र धोरणातही आपल्या देशाचे हित सर्वात आधी पाहणे अगत्याचे असते.

भारत आणि चीन दरम्यान असलेला सीमावाद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने ली यांच्या दौ-यात काहीच चर्चा झाली नाही. हा प्रश्न जितका अधिक टाळला जाईल तितका तो अधिकाधिक धोकादायक बनत जाणार आहे. भारताचे धोरण अनाक्रमणाचे आहे, पण चीनचे तसे नाही. चीनकडून कुरापती काढण्याचे काम सुरूच राहणार. म्हणूनच ली यांच्या दौ-यात चीनला समज देणे आवश्यक होते.

वास्तविक पाहता २००६मध्ये असाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ भारत दौ-यावर आले तेव्हाही चीनच्या राजदूताने अरुणाचल प्रदेशावर चीनचा हक्क असल्याचे वक्तव्य केले आणि वादंग माजवले होते. यावेळी लडाखमध्ये घुसखोरी करून चीनने कुरापत काढली. या दोन्ही उदाहरणांवरून चीन सीमावादात आपली ताठर भूमिका सोडणार नाही हे स्पष्ट होते.

ली यांच्याबरोबरच्या चच्रेत सीमेवरील शांतता भारत आणि चीन यांच्यातील संबंध दृढ राहण्यासाठी महत्त्वाची आहे, याची जाणीव मनमोहन सिंग यांनी करून दिली. तरी यावर फारसा जोर दिला गेला नाही. चच्रेनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतही सीमाप्रश्नी नियुक्त केलेल्या विशेष प्रतिनिधींच्या कामावर समाधान व्यक्त करण्यात आले. वास्तविक यावर अधिक खोलवर चर्चा होण्याची गरज होती.

ली यांच्या भारत दौ-याने व्यापारी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण पसरले तरी या दौ-याला अवास्तव महत्त्व देण्याची गरज नाही. कारण इतर देशांच्या प्रमुखांप्रमाणेच ली यांनीही आíथक संबंधांवरच अधिक भर दिला. भारताला चुचकारून त्याला अमेरिका आणि जपानच्या जवळ जाऊ न देणे, हाही हेतू या दौ-यामागचा असू शकतो, असेही मत काही जण व्यक्त करत आहेत. पण जोपर्यंत चीनचे विस्तारवादी धोरण संपुष्टात येत नाही तोपर्यंत चीनविषयी साशंकता कायम राहील. लडाखमधील देप्सांग भागात पाच किलोमीटपर्यंत पक्का रस्ता बनवून हा परिसर आपला असल्याचा दावा चीनने केला आहे. काही दिवसांआधीच दौलत बेग ओल्डी भागातील १९ किलोमीटरची घुसखोरीचा ताजी असताना चीनने ही नवी कुरापत काढली आहे.

एकाच महिन्यात भारताच्या भागात दोनदा घुसखोरी करून चीनने पाकिस्तानपेक्षा भारताला सर्वात जास्त धोका चीनकडूनच असल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही भारतीयांना पाकिस्तानपेक्षा चीनकडून भारताला सर्वाधिक धोका असल्याचे मत व्यक्त केले होते. शांततेच्या गप्पा, व्यापार सुरू असतानाच एकीकडे घुसखोरीही सुरू ठेवायची अशी विस्तारवादी मनोवृत्ती असलेल्या चीनच्या प्रत्येक बारिकसारिक बाबींकडे अत्यंत गंभीरपणे पाहाण्याची वेळ आली आहे.

Read More »

सट्टा आणि बट्टा

गेल्या आठवडय़ात एका मित्राला त्याच्या घरी भेटायला गेलो होतो. त्याच्या इमारतीखाली जिन्यातच. एका बाजूला भिंतीवर मुलांनी लिहून ठेवले होते.. 'क्रिकेट हा आमचा धर्म आहे. सचिन तेंडुलकर आमचा देव आहे.'

गेल्या आठवडय़ात एका मित्राला त्याच्या घरी भेटायला गेलो होतो. त्याच्या इमारतीखाली जिन्यातच. एका बाजूला भिंतीवर मुलांनी लिहून ठेवले होते.. 'क्रिकेट हा आमचा धर्म आहे. सचिन तेंडुलकर आमचा देव आहे.' बाजूला वर्ल्डकपचे चित्र रेखाटले होते. भारताने वर्ल्डकप जिंकल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे अभिनंदनही केलेले होते. शिवाय तळाला पंचवीस-तीस मुलांची नाव लिहिलेली होती. भारताने वर्ल्डकप जिंकून दोन वर्ष उलटली तरी भिंतीवर लिहिलेले ते अजूनही पुसले गेलेले नाही. ते सगळं वाचून मला त्या लिहिणा-या निरागस मनांचं हसू आलं.

सचिनची भारतीय क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली नि क्रिकेटला नवी झळाली मिळाली. पुन्हा आम्ही सारे क्रिकेटमय झालो. भारत जिंकला हरला यात आम्हाला रस नव्हता. पण हमखास आम्ही जाता येता कुणाला तरी विचारायचो. सचिनने कितना बनाया? सचिन आऊट हो गया?, उसकी सेंच्युरी हो गयी? वगैरे वगैरे. पण आता पूर्वीसारखा मी झपाटून क्रिकेट पाहत नव्हतो. वनडे क्रिकेटची मोठी लाट आली होती. भारत दणादण जिंकत होता. इथेच मनात संशयाची पाल चुकचुकली. अर्थात, मला भारताबद्दल प्रेम आहेच. मी काही क्रिकेटला किंवा खेळाडूंना नाव ठेवणारा नाही.

पहिल्यांदा मला शंका आली ती शीतपेये बनवणा-या बहुराष्ट्रीय कंपन्या नव्याने भारतात आल्या होत्या तेव्हा. त्यावेळी डे-नाइट मॅचेसची क्रेझ असताना शीतपेये प्रायोजक झाल्यानंतर अनेक मॅचेस उन्हात म्हणजे दिवसा खेळल्या गेल्या. काही वेळा या मॅचेस एप्रिल ते मे दरम्यान झाल्या. म्हणजे ऐन उन्हाळ्यात. या उन्हाळ्यातच शीतपेयांचा धंदा जोरात चालतो. वन-डे निमित्तमात्र होत्या. इथे माझा पहिला हिरमोड झाला. माझा हा उन्हाचा मुद्दा मी माझ्या मित्रांना एकवला. त्यांनी मला वेडय़ात काढलं. म्हटलं जाऊदे आपलं काय जातंय.

असं म्हटलं जातं की सध्याची जगाची बाजारपेठ आशिया खंड आहे. पहिली बाजारपेठ अमेरिका होती. मग युरोप नि आता आशिया. आशियातसुद्धा भारत ही मोठी बाजारपेठ झालीय. मोठमोठय़ा मल्टीनॅशनल कंपन्या भारतात आल्यात. १०-१५ वर्षापूर्वी युरोपातला फुटबॉल खेळणा-या खेळाडूंच्या टी शर्टवरील कंपन्यांचे लोगो आता भारतीय खेळाडूंच्या टी-शर्टवर दिमाखाने झळकू लागले. एकदा बांगलादेशाशी सामना होता. भारताने फिल्डींग घेतली. इरफान पठाण त्यावेळी फॉर्मात होता. सौरव गांगुली कॅप्टन होता. इरफानची पहिलीच ओव्हर, पठ्ठय़ाने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. नंतर पुन्हा कुणीतरी दुसरी ओव्हर टाकली. त्यातही एक विकेट पडली, मग पुन्हा इरफानची ओव्हर एकदम टाइट पडली. नंतर गांगुलीने इरफानला बॉलिंग दिली नाही. खरे तर इरफानने चार-पाच ओव्हरमध्येच सगळं संपवलं असतं, पण तसं झालं नाही. ४०-४२ ओव्हपर्यंत बांगलादेशाने खेळून काढली. मला सांगा सौरव असा का वागला? मंडळी मला वाटतं त्याच्या हातात काहीच नसतं. आपण मॅच टीव्हीवर पाहतो ती जाहिरातीसाठी खेळासाठी नव्हे! तुम्हाला हे वाचून धक्का बसेल, पण ते सत्य आहे. जाहिराती तुम्हाला सतत दिसायला हव्यात म्हणून खेळ आहे. त्याशिवाय तुम्ही या कंपन्यांची प्रॉडक्ट विकत घेणार नाहीत.

कुठलीतरी तिरंगी लढत होती. भारत- पाकिस्तान- बांगलादेश. त्यावेळीही असाच अनुभव. पाकिस्तानने बागंलादेशाला १६०च्या जवळपास संपवलं होतं. मग पाकिस्तानी फलंदाज मैदानावर आले. त्यावेळी त्यांची विख्यात ओपनिंग जोडी होती सईद अन्वर आणि आमिर सोहेल. पहिल्या दोन ओव्हर्समध्येच त्यांनी बांगलादेशाला तुफान धुतले. ३०-४० धावा तिथेच झाल्या. वाटलं दहा ओव्हर्समध्येच आटपणार सगळं. पण तसं झालं नाही. मग यांचा खेळ एकदम संथ झाला. मला आजही आठवतंय १६० की काय त्या धावा करायला पाकने जवळपास ३५-४० ओव्हर्स घेतल्या. कारण काय? ..जाहिराती!

युरोपात बेटिंग वगैरे म्हणे अधिकृत आहे. आता आपल्याकडची काही मंडळी म्हणतायत भारतातही बेटिंग अधिकृत करा. बेटिंगवर फार बोलता येणार नाही. सध्या आयपीएलच्या स्पॉट फिक्िंसगने गदारोळ माजलाय. कित्येक बुकींना अटक झालीय. श्रीशांत वगैरे मंडळी पकडली गेलीत. विंदू दारा सिंगला अटक झाली आणि बॉलिवुड कनेक्शनचं टोक सापडलं. हे शेपूट आता वाढतच चाललंय. ते कुणाकुणाला जाळेल हे सांगता येणार नाही.
लोकहो तुम्ही-आम्ही फक्त धावा बघतो. खेळाडूची बॉडी लँग्वेज पाहत नाही. इथेच आपण चुकतो. खरं तर देहभाषेचा अभ्यास तुम्ही-आम्ही कशाला करायचा. याच देहभाषेचे खुलासे आता होऊ लागलेत. श्रीशांतने टॉवेल दाखवून आपण आपले काम केल्याचे बुकींना सांगितले होते, असं पोलिस म्हणातायत. कुणी बुटाची लेस बांधून, तर कुणी कमरेला कॅप खोचून माझे पैसे द्या बाबा असे खुणावतो. लोकांना ही भाषा आता पोलिसांमुळे कळली.

तुम्हाला तो सामना आठवतच असेल. वानखेडेवरचा असावा. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज. भारताला जिंकायला दहा-बारा धावा हव्या होत्या. तीन-चार षटकं बाकी होती.मॅच भारताच्या खिशातच होती. आता एक-दीड ओव्हरमध्ये सामना संपणार. भारत जिंकणार. मैदानावर प्रभाकर आणि नयन मोंगिया होते. लोकही उठून जाण्याच्या तयारीत, सगळा जल्लोष. लोकांच्या चेह-यावर विजयी हास्य. आता जिंकणार मग घरी जाऊन काही जण मस्तपैकी दोन-चार पेग रिचवून जेवणार म्हणजे काय? भारत जिंकणार नि आम्ही असेच बसणार? हट मज्जा मज्जा करणार बुवा आम्ही. पण इकडे मैदानात भलतेच घडले ना. मोंगिया-प्रभाकर जोडी संथ खेळली आणि आपण हरलो. लोकांचा विश्वासच बसेना. 'हे झाले तरी काय? आपण स्वप्न वगैरे पाहत नाही ना'. पण सत्य हेच होते की आपण हरलो! दुस-या दिवशी पेपरातही थोडाफार गाजावाजा झाला. प्रभाकर, मोंगियाला बसवले गेले. मग लोकही विसरले. मामला थंड झाला क्रिकेट पुढे वेगाने सरकले. 

आता वर्ल्डकपबद्दल शेवटचं. या वेळचा वल्र्डकप आपल्याकडे आला तेव्हाच खरं तर निकाल ठरला होता. भारत किमान अंतिम फेरीत जाणार हे ठरलं होतं. तुम्ही म्हणाल कसं काय बुवा? हा शोध तुम्ही कसा लावला? याचं साधं लॉजिक सांगतो. भारतातली महत्त्वाची स्टेडियम चकाचक झाली. वानखेडेवर तर मला वाटतं, करोडो रुपये खर्च झाले. हा खर्च कोणी उगाचच करणार नाही. शिवाय या वर्ल्डकपच्या पुरस्कर्त्यांमध्ये ब-याच मोठय़ा मोबाइल कंपन्या होत्या. वर्ल्डकप भारताने जिंकला नि देशात उत्साहाला उधाण आले. एक विजयी उन्माद रस्त्यावर रात्री दिसत होता. हजारो तरुण हातात तिरंगा घेऊन जल्लोष साजरा करत होते. याच रात्री मी टॅक्सीने उशिरा घरी जात होतो. कित्येक तरुण हातात तिरंगा घेऊन ओरडत होते नाचत होते. मला एकाच गोष्टीचे वाईट वाटतं यातल्या एका तरी तरुणाने १५ ऑगस्ट या दिवशी हातात तिरंगा धरला असेल का? तुम्हाला काय वाटतं?

Read More »

विकासापुढे नामकरण गौण

महाराष्ट्राला नामकरणाचे वाद काही नवीन नाहीत. कशाना कशाच्या तरी नामकरणावरून विविध ठिकाणी कसले ना कसले संघर्ष सुरू असतात. याचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. सध्या रेल्वे गाडय़ा, रेल्वे स्थानक, पूल, चौक, विद्यापीठे यांच्या नावासाठी ईर्षा सुरू असते. मुंबईत वरळी ते वांद्रे हा सागरी पूल उभारण्यात आला. त्यावेळी असाच वाद झाला. मुंबईत सांताक्रुझ येथे मिलन रेल्वे पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. अजून तरी पुलाला कोणाचे नाव द्यावे, यावर चर्चा झालेली नाही आणि सरकारनेही काही निर्णय घेतलेला नाही. परंतु उद्घाटनाच्या समारंभातच एका स्थानिक आमदाराने भाषण करताना काही गरज नसतानाही नामकरणाचा विषय उपस्थित केला. एकदा हा विषय उपस्थित झाल्यानंतर तिथल्या रहिवाशांमध्ये या पुलाला कोणाचे नाव द्यावे, यावरून चर्चा सुरू झालेली आहे. आता त्यातून निवडणुकीचे राजकारणसुद्धा खेळले जाऊ शकते आणि निवडणुकीतले रास्त तसेच नित्याच्या जीवनाशी संबंधित असलेले विषय बाजूला राहून अशा भावनात्मक मुद्यावरच मतदान होण्याची शक्यता असते. सध्या महाराष्ट्रात काही विद्यापीठांच्या नामकरणाचे वाद उपस्थित झालेले आहेत. अशा वादाच्या राजकारणात उतरणारे लोक नावाच्या बाबतीत आग्रह धरताना तो संयुक्तिक कसा आहे, हे पटवून देत नाहीत. एखाद्या जातीला खूष करणारे त्या जातीतील महापुरुषाचे नाव देण्याचा आग्रह धरून ते त्या जातीची मते प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातून त्यांना साध्य काहीच होत नाही. परंतु समाजामध्ये विनाकारणच दुही निर्माण होते. कटुता वाढते व एकात्म भावनेला धक्का पोहोचतो. पण मतांचे राजकारण करणा-यांना त्याची काही पर्वा नसते. ज्या सावित्रीबाईंनी प्रतिकूल वातावरणात राज्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्याही विद्यापीठाला दिलेले नाही आणि तसा आग्रहसुद्धा कोणी धरत नाही. सरकारने समाजात असे वाद निर्माण होऊ नयेत म्हणून नामकरण आणि नामांतर यांचा विचार करणारी एक खास व्यापक समिती स्थापन केली पाहिजे. तिच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश केला पाहिजे. या समितीने स्थानिक परिस्थिती तसेच वातावरण यांचा यथायोग्य विचार करून नामकरणाचा निर्णय घेतला पाहिजे. देशामध्ये आपण विकासावर फार काही बोलतच नाही. भावनिक मुद्यांवरून वेळ, शक्ती खर्च करतो. परदेशांमध्ये लोक आपली शक्ती अशा कामांत खर्च करत नाहीत. परदेशातील देशांचे अनुकरण करण्यात पटाईत असलेल्या भारतीयांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. देशाचा विकास आणि त्यातील विकासकामे महत्त्वाची आहेत. त्या विकासकामांचा वेग भारतात खूप कमी आहे. निदान पूर्णत्वाला गेलेल्या विकासकामांवरून, त्यांच्या नामकरणावरून तर वाद नको. वेळ आणि शक्तीचा अपव्यय नको.

Read More »

योग्य मार्गदर्शन घ्यावे!

योग्य मार्गदर्शन मिळाल्यास वेळ वाया जात नाही. या परीक्षेचा अभ्यास नियमित सुरूच असतो. आजूबाजूला घडणा-या महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवायला हवं. त्यामुळे पुढील काळात या घटनांचा अभ्यास करणं आणखी सोपं होतं, असं यूपीएससी परीक्षेत ३२२वा क्रमांक पटकावलेला नीलभ रोहन सांगतो.

यूपीएससी देण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला?

- माझ्या घरातील अनेक जण सरकारी सेवेत असल्याने लहानपणापासूनच यूपीएससीबाबत मला पाठिंबा मिळत गेला. घरातल्या मोठय़ांनी या परीक्षेबाबत आधीपासूनच माहिती दिल्यामुळे माझा कल आपोआप या परीक्षांकडे वळला.

या परीक्षेच्या तयारीला कधीपासून सुरुवात केली?

- मी २०१० पासून अभ्यासाला सुरुवात केली. २०११ मध्ये केलेल्या प्रयत्नाला यश मिळालं नव्हतं. कारण मी हे काम तेवढय़ा गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. त्यानंतर मात्र दुस-या प्रयत्नात मी यश मिळवलं. जागतिक घडामोडींवर मी लक्ष ठेवलं. विविध विषयांची अनेक पुस्तकं वाचून काढली.

देशात प्रशासकीय सेवांचं काय महत्त्व असतं असं तुम्हाला वाटतं?

- मला वाटतं की, योजनांची अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वपूर्ण कामात प्रशासकीय सेवांचा मोठा वाटा असतो. भारतासारख्या देशात जिथे गरीब आणि श्रीमंतांमध्ये खूप मोठी दरी आहे, तिथे या गोष्टीची गरज आहे. कारण आपल्या देशात अनेक योजना आहेत मात्र, त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही.

यूपीएससीच्या परीक्षा यंत्रणेविषयी तुम्हाला काय वाटतं?

- खूपच दीर्घ अशी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे संयम आणि मेहनत अशा दोन गोष्टी आवश्यक आहेत. या परीक्षेच्या आधीपासूनच मी या सेवेत आहे, असं विद्यार्थ्यांनी स्वत:ला सांगावं. प्रयत्न सुरूच ठेवावेत. आधी समाजात असा एक प्रवाह होता की ही परीक्षा पारदर्शक नाही. मात्र परीक्षा पद्धतीत पारदर्शकता येण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत.

या परीक्षेसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?

- या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी योग्य मागदर्शन घेणं फारच महत्त्वाचं आहे. नेमका काय आणि कशाचा अभ्यास करायचा किंवा काय वाचावं हे जर माहीत नसेल तर केवळ वेळ फुकट जातो. त्यामुळे नक्की काय करायचं याचं मार्गदर्शन असलं की ही परीक्षा सोपी जाते.

नेमकी काय तयारी केली?

या परीक्षेसाठी चौफेर वाचन आवश्यक असते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडमोडींचा अभ्यास करावा. त्यामुळे परीक्षा जवळ आल्यावर सर्व माहिती घेण्याच्या कामात गोंधळ उडत नाही. योग्य नियोजन आणि वेळच्यावेळी अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते.

Read More »

चीनची आगळीक धोकादायकच

भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमेचा वाद आहे. परंतु चीनचे पंतप्रधान ली केकियांग हे गेल्या आठवडय़ातच भारतात येऊन गेले आणि उभय देशांनी सीमेचा वाद समजूतदारपणाने सोडवावा, या गोष्टीवर दोन्ही देशांचे एकमत झाले. निदान दोन्ही पंतप्रधानांनी तसे जाहीर तरी केले. प्रत्यक्षात चीनच्या पंतप्रधानांच्या मनात नेमके काय होते, ते केवळ त्यांनाच माहीत. त्यांनी आपली वरवरची समझोत्याची भाषा वापरली पण ते इकडे समझोत्याची भाषा वापरत असतानाच त्यांचे सनिक भारताच्या हद्दीत घुसखोरी करून चक्क एक पक्का रस्ता तयार करत होते. चीनची परराष्ट्र नीती ही कूटनीती असते आणि तिचा थांग कोणालाच लागत नाही. अमेरिकेमध्ये बसलेल्या अनेक चीनचे राजकीय विश्लेषक करणा-यांनासुद्धा चीन पुढच्या क्षणी काय करेल आणि त्याच्या पुढच्या हालचाली कशा असतील, याचा अंदाज बांधता येत नाही. त्याचा अनुभव आता आपण घेतच आहोत. एका बाजूला चीनचे पंतप्रधान भारताशी समझोता करतात आणि त्या समझोत्यावर स्वाक्षरी होत असतानाच त्यांचे सनिक भारताच्या हद्दीत घुसखोरी करून रस्त्याचे बांधकाम करतात. याला कूटनीती नाहीतर काय म्हणावे? चीनचे काही जुने हिशोब आहेत. त्यांचे इतिहासाचे आकलन वेगळे आहे. त्या इतिहासातल्या काही घटनांचा बदला घेण्याची चीनची भूमिका असते. त्यामुळेच चीनचे नेते नेमके काय धोरण आखतील, याचा अंदाज येत नाही. चीनला सागरी सीमा कमी आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागरात त्यांना शिरकाव हवा आहे. त्याचबरोबर पश्चिम आशियावर थेट नियंत्रण मिळविण्यासाठी भारताच्या उत्तर आणि वायव्य सीमांमध्ये अशी घुसखोरी करून त्याला पश्चिम आशियाशी जोडणारा कॉरिडॉर हवा आहे. त्यामुळेच लडाख आणि सियाचीनच्या प्रदेशावर चीनची वक्रदृष्टी पडलेली आहे. चीनच्या सन्याकडून या भागात सातत्याने घुसखोरी करून रस्ते बांधले जातात. ही गोष्ट चीनच्या विस्तारवादाची द्योतक आहे. एकंदरीत भारत सरकारच्या सुरक्षात्मक धोरणामुळे चीनला भारताशी अशी आगळीक करण्याची संधी मिळत आहे. एका बाजुला मैत्रीचे नाटक करून भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे चीनचे धोरण असते. १९५०च्या दशकात चीनने िहदी-चीनी भाई भाईचा नारा लावला. परंतु १९६२मध्ये अचानकपणे भारतावर हल्ला केला. भारतामध्ये काही लोक चीनचे समर्थन करतात. १९६२मध्ये चीनने असे आक्रमण केले असले तरी नंतर चीनने कधीच भारतावर आक्रमण केलेले नाही. असे या चीन समर्थक लोकांचे म्हणणे असते. परंतु चीनने थेट आक्रमण केले नसले तरी चीनकडून केली जाणारी ही मैलामैलाची घुसखोरी त्या १९६२च्या युद्धापेक्षा अधिक धोकादायक आहे. आपण चीनच्या विरोधात गाणी म्हणताना, इंच इंच लढवू असे म्हणत असतो. पण चीन मात्र मैला मैलाने आत सरकत आहे. गेल्या महिन्यात तर केवळ एक मैल नव्हे तर तब्बल शंभर मैल आत घुसखोरी करून चीन हळूहळू कसा पाय पसरत आहे हे दाखवून दिले. भारताचे परराष्ट्र खाते चीनच्या या घुसखोरीकडे फारशा गांभीर्याने पाहत नाही, असे दिसते. देशाच्या अखंडतेचा आणि सीमांचे रक्षण करताना तिन्ही सेना दलांमध्ये समन्वय त्याचबरोबर डोळय़ात तेल घालून घुसखोरीला लगाम घालणे आवश्यक आहे.

Read More »

दहिसरमधील नालेसफाईचा दावा फोल?

मुंबई महापालिका क्षेत्रातील ५० ते ५५ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी दहिसर भागातील नाले केरकचरा आणि गाळाने भरलेलेच आहेत.

श्रीशंकेश्वरनगर येथील अशोकवन बसस्टॉपजवळील नाला

मुंबई- मुंबई महापालिका क्षेत्रातील ५० ते ५५ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी दहिसर भागातील नाले केरकचरा आणि गाळाने भरलेलेच आहेत. दहिसर पूर्वेकडील अशोकवन आणि शिववल्लभ रोड येथील दोन नाल्यांतील गाळ कचरा काढण्यात आलेला नाही. पावसाळ्यापूर्वी हा नाला साफ न केल्यास पाण्याचा निचरा होण्यात अडथळा येऊन परिसरात पाणी साचण्याची शक्यता आहे.

मुंबई परिसरातील नाले साफ झाले असून त्यावर दिसणारा कचरा हा तरंगता कचरा असल्याचा दावा प्रशासनाचे अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे नेते करत आहेत. मात्र या नाल्यात गवत उगवल्याने नाला गाळाने भरल्याचे स्पष्ट होत आहे. या नाल्याची स्वच्छता करणा-या कंत्राटदाराच्या 'वरवर'च्या कामामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईतील नाल्यांच्या सफाईसाठी यंदा १५० कोटी रुपये खर्च करण्यात येत असून नाल्यातील उपसलेला गाळ टाकण्यासाठी महापालिकेकडे डंपिंग ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटदारावरच गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर खुद्द महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी चार दिवस नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरही नाल्यातील गाळ 'जैसे थे'च आहे.

दहिसर पूर्व येथील नाल्यातील गाळ काढण्यासाठी यंदा २ कोटी २ लाख रुपयांचे कंत्राट 'मर्सिया इन्फ्राटेक' या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र येथील शिववल्लभ रोड, मारुतीनगर, बजरंग सोसायटीजवळील नाल्यात मोठय़ा प्रमाणात कचरा साचलेला आहे. तर श्रीशंकेश्वरनगर येथील अशोकवन बसस्टॉपजवळील नाल्यातील कचराही अद्याप साफ करण्यात आलेला नाही.

मुंबई महापालिका नालेसफाईत चालढकल करत असली तरी आपले या नाल्यांवर लक्ष आहे. हे नाले आपण स्वत: कंत्राटदारामार्फत स्वच्छ करणार आहोत. - प्रकाश दरेकर, स्थानिक नगरसेवक

महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे संचालक व पर्जन्य जलविभागाचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी दहिसर भागातील नालेसफाई चांगल्या प्रकारे होत असल्याचा दावा केला आहे. याठिकाणी वरच्या बाजूने सफाईचे काम सुरू केल्याने खालच्या भागातील एखादा नाला साफ करणे राहून गेला असेल, मात्र दिलेल्या मुदतीतच प्रत्येक नाला साफ केला जाईल, असेही अभियंता व्हटकर म्हणाले.

Read More »

उल्हासनगरात नालेसफाईसाठी 'वेळ नाही'

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील ४६ मोठे नाले आणि ७८ प्रभागांतील छोटे नाले गाळ, कच-याने भरले आहेत.

गणेशनगरचा नाला कच-याने भरला आहे…

उल्हासनगर- महापालिका क्षेत्रातील ४६ मोठे नाले आणि ७८ प्रभागांतील छोटे नाले गाळ, कच-याने भरले आहेत. सफाई करण्यासाठी महापालिकेने सुमारे १ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना विस्तारलेल्या शहर परिसरातील नाल्यांची सफाई एवढय़ा कमी कालावधीत होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही नालेसफाई वेळेवर न झाल्यास पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर शहर परिसरातील छोटे नाले मुख्य मोठय़ा नाल्याला जोडले गेले आहेत. मात्र, या नाल्यांच्या सफाईकडे महापालिका वर्षभर लक्ष देत नाही. पावसाळा जवळ आला की नाल्यांच्या सफाईची घाई केली जाते. मात्र, वर्षभर नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि गाळ १५ ते २० दिवसांत साफ करणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

नालेसफाईच्या कामासाठी महापालिकेने मागील आठवडय़ांत ५७ लाख रुपयांचे कंत्राट चार मजूर संस्थांना दिले आहे. या मजूर संस्थांना प्रभाग समितीनिहाय कामाचे वाटप करून देण्यात आले आहे. परंतु ज्येष्ठ आणि पालिका प्रशासनावर वचक असलेले नगरसेवक वगळता अन्य नगरसेवकांच्या वॉर्डात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे काही नगरसेवक नाराज आहेत. मोठय़ा नाल्यांची सफाई करणे अवघड आहे. या नाल्यांमध्ये कच-याचे थरावर थर साचले आहेत. वर्षभरापासून नाला साफ न केल्यामुळे हे थर जाड झाले आहेत. त्यामुळे कागद, प्लॅस्टिक गोळा करणारे या थरावरून सहज चालत जात असल्याचे चित्र आहे. नाला कच-याने भरल्यामुळे तो पावसाळ्यापूर्वी साफ न केल्यास लगतच्या घरांमध्ये यंदाही पाणी साचण्याची शक्यता आहे.

'स्वाभिमान' संघटना ठेवणार कामावर लक्ष

उल्हासनगर शहरात नालेसफाई ही केवळ कागदावरच होते, असा आरोप 'स्वाभिमान' संघटनेचे शहर संघटक विशाल सोनावणे यांनी केला आहे. कँप ५ मधील गणेशनगर भागात नाल्याच्या साफसफाईसाठी पोकलेन मशिनऐवजी ४ मजूर कामाला लावण्यात आले होते. ही दोन्ही कंत्राटे शशांक मिश्रा नावाच्या कंत्राटदाराला देण्यात आली होती. हा कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप सोनावणे यांनी केला. उल्हासनगरमधील नाल्यांजवळ राहणा-या रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी घुसण्याची शक्यता असल्याने नालेसफाईच्या कामावर स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते लक्ष ठेवणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, शहर संघटक विशाल सोनवणे यांनी दिली.

४६ नाल्यांसाठी ५ पोकलेन १ जेसीबी

पालिकेने मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी ४१ लाख रुपयांचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटात ४६ नाल्यांची सफाई करण्यासाठी ५ पोकलेन आणि १ जेसीबी मशिन देण्यात आले आहे. या कामी यंत्रणेच्या जोरावर १५ जूनपर्यंतही नाल्यांची सफाई होणे कठीण आहे. उल्हासनगर कँप ५ येथील गणेशनगरचा नाला कच-याने बुजला आहे. या कच-याखालून पाणी वाहते. मात्र, कच-याचा हा थर इतका जाड आहे की त्यावरून लहान मुले चालत जातात.

आपत्कालीन स्थितीसाठी पालिका सज्ज

उल्हासनगर महापालिकेला आपत्कालीन कक्ष उभारण्यासाठी ५० लाखांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून पालिका पावसाळ्यात २४ तास सुरू असलेला मदत कक्ष सुरू करणार आहे. या कक्षात काम करण्यासाठी कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, तारतंत्री, सफाई कामगार आणि मजूर यांची तीन पाळीत नेमणूक करण्यात येणार आहे. या कक्षात दोन हॉटलाइन सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे जिल्हाधिकारी कक्ष आणि सरकारच्या अन्य मदत केंद्रांशी संपर्क साधता येणार आहे. शहरात नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले असून अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्यासाठी नोटिसा देण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. – बालाजी खतगावकर, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

Read More »

जावयाच्या प्रेमात नि गेले गोत्यात

आयपीएलच्या सहाव्या हंगामात श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला पोलिसांच्या जाळय़ात सापडले आणि हळूहळू स्पॉटफिक्सिंग, मॅचफिक्सिंगमध्ये गुंतलेल्या अनेक 'साखळय़ा' उलगडू लागल्या. विंदू दारासिंग याने बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन याचे नाव घेतले आणि ही साखळी किती खोलवर एकमेकांत गुंफलेली आणि गुंतलेली आहे, हेही उघड झाले. आतापर्यंत कोणत्याही संघाचा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा तत्सम अधिका-यांविरोधात एखाद्या सट्टेबाजाने थेट आरोप केला नव्हता किंवा नावही घेतलेले नव्हते. अशा परिस्थितीत मय्यपन याचे नाव येणे म्हणजे एन. श्रीनिवासन यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. हीच शक्यता प्रसारमाध्यमे दर दिवशी दाखवत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे श्रीनिवासन मालक आहेत तर याच संघाचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मय्यपन होता आणि त्यामुळेच संशयाची सुई श्रीनिवासन यांच्याकडे वारंवार वळत आहे. मात्र, एखाद्या कसलेल्या राजकारण्यासारखा निर्विकार आणि कोरडाठाक चेहरा करत श्रीनिवासन यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. माझी नियमानुसार निवड झाली असून झालेल्या गैरप्रकाराबाबत त्रि-सदस्यीय आयोग नेमणार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही गैरप्रकाराबाबत समिती नेमून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी सरळधोपट भूमिका राजकारणी घेतात. त्याचीच री त्यांनी ओढली आहे. मात्र, अनेक सट्टेबाजांनी मय्यपनचे नाव घेऊनही आणि त्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाही समितीचा फार्स श्रीनिवासन यांनी उभारला आहे, हेच त्यांच्या कोडगेपणाचे लक्षण आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंचा लिलाव आणि खेळाडूंच्या निवडीपासून मय्यपन संबंधित आहे. त्यामुळे फिक्सिंग आणि सट्टेबाजीची पाळेमुळे किती खोलवर रुतलेली आहेत, हे स्पष्ट दिसत असतानाही श्रीनिवासन यांनी सतत जावई माझा 'भला'चा धोशा लावला आहे. २००८मध्ये आयपीएलची सुरुवात झाली. त्या आधी २००७मध्ये बीसीसीआयच्या सदस्यांना आयपीएल किंवा तत्सम संघामध्ये गुंतवणूक करता येणार नाही किंवा त्यातील समभाग विकत येता येणार नाही, या नियमात बदल करून बीसीसीआयच्या सदस्यांनाही आयपीएलमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाग घेता येईल, संघाची मालकी विकत घेता येईल, अशी तरतूद श्रीनिवासन यांनी करवून घेतली. त्यावेळी ते बीसीसीआयचे सरचिटणीस होते. २०११मध्ये शशांक मनोहर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. ताज्या प्रकरणाने मय्यपन याच्यापेक्षा श्रीनिवासन यांच्याच कारकीर्दीला संशयाच्या दाट धुक्याने वेढलेले दिसते.

Read More »

पार्किन्सनच्या रुग्णांवर नृत्याद्वारे उपचार

पार्किन्सन आजार असलेल्या रुग्णांच्या हालचालींवर निर्बंध येत असल्याने त्यांना सर्वसामान्य लोकांसारखे जीवन जगता येत नाही. मात्र, या रुग्णांना एका नव्या उपचार पद्धतीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नृत्याच्या माध्यमातून या रुग्णांना हालचाली करताना अधिक स्वातंत्र्य मिळू शकेल, असे ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ला ट्रोब विद्यापीठाच्या संशोधकांनी व्हेनिसमधील सेंट जॉन ऑफ गॉड रुग्णालयाच्या संशोधकांसोबत याबाबतचे संशोधन केले आहे. 

त्यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीमुळे व्हेनिस, लिमरिक आणि मेलबर्न येथील रुग्णांना फायदा झाल्याचे सांगितले आहे. आयरिश नृत्यापासून ते वेगळ्या प्रकारच्या नावीन्यपूर्ण नृत्यांमुळे त्यांच्या हालचाली सुधारल्या असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

पार्किन्सन आजारामुळे स्नायूंमध्ये काठिण्य येते व त्यामध्ये बसणा-या धक्क्य़ांमुळे या रुग्णांना हालचाल करणे अवघड होते. त्यामुळे अशा रुग्णांवर नृत्याच्या माध्यमातून उपचार करण्याचे आम्ही ठरवले, असे या प्रकल्पातील प्रमुख संशोधक आणि ला ट्रोब विद्यापीठाचे प्राध्यापक मेग मॉरिस यांनी सांगितले. गेल्या वर्षी मेलबर्नमध्ये केलेल्या पाहणीत पार्किन्सनग्रस्त लोकांना नृत्य करताना हालचालींमध्ये अडथळे येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे केवळ हालचालींमध्येच सुधारणा होत नाही, तर बरे होण्याची प्रक्रिया गतिमान होते, आनंद वाढतो व रुग्णांच्या जीवनाचा दर्जा उंचावतो. प्रत्येक आठवडय़ाला नृत्याच्या वर्गात सहभागी झालेल्या रुग्णांकडून या वर्गाच्या आयोजनाबद्दल आणि हाती घेतलेल्या या संशोधनाबद्दल आभार व्यक्त केले जातात, अशी माहिती मॉरिस यांनी दिली आहे.

या संशोधनाद्वारे ऑस्ट्रेलियाने पार्किन्सनवरील उपचारांमध्ये आघाडी घेतली आहे. 'अर्जेन्टाइन टँगो' नावाच्या नृत्याच्या प्रकारात सर्वसामान्य व्यक्तींना या रुग्णांसोबत नृत्य करण्यासाठी आमंत्रित केले जाते. निरोगी आणि रुग्ण या दोघांनी केलेल्या या एकत्रित नृत्यामुळे रुग्णांना एक आनंददायी अनुभव मिळतो. त्यामुळेही त्यांना बरे वाटते. त्यांच्या बरोबर त्यांची काळजी घेणा-यांच्या मनोवृत्तीतही सुधारणा होते. कारण या रुग्णांची देखभाल करताना त्यांनाही एक प्रकारच्या ओझ्याखाली असल्यासारखे वाटत असते. गेल्या दोन वर्षापासून मॉरिस यांच्याकडून हे प्रयोग सुरू आहेत आणि ते गेली दहा वर्षे एक भौतिकोपचार तज्ज्ञ म्हणून या रुग्णांवर उपचार करत आहेत.

Read More »

रिव्हर्स स्विंग, २८ मे २०१३

जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २४ मे रोजी घडलेल्या रंजक घडामोडी…

१८८०
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एमसीसी यांच्यात ऑक्सफर्डमध्ये झालेल्या सामन्यातील पहिल्या दिवशी विक्रमी ३९ विकेट्स पडल्या. एमसीसीच्या आल्फ्रेड शॉने ५३ धावांत १२ विकेट्स घेतल्या. त्यानंतर शेवटच्या विकेटसाठी १८ धावांची भागीदारी करत ऑक्सफर्डचे ४० धावांचे आव्हान एक विकेट्स राखून पार करण्यात मोलाचा वाटा उचलला.


१९०८
जॉर्ज हर्स्टच्या (१९ धावांत १२ विकेट्स) भेदक गोलंदाजीमुळे यॉर्कशायरने नॉटिंगहॅमशारला एका दिवसात (१७ आणि १५) दोनदा बाद केले. यॉर्कशायरने हा सामना एक डाव आणि ३४१ धावांनी जिंकला.


१९११
दक्षिण आफ्रिकेचे माजी तेज गोलंदाज रॉबर्ट जेम्स 'बॉब' क्रिस्प (१९११-९४) यांचा जन्म. जेमतेम वर्षभराची कारकीर्द लाभलेल्या क्रिस्प यांनी नऊ कसोटी सामन्यांत २० विकेट्स घेतल्या. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चार चेंडूंवर चार विकेट्स घेण्याची करामत दोनदा साधणारे ते एकमेव क्रिकेटपटू आहेत. गिर्यारोहणासाठीही क्रिस्प प्रसिद्ध होते.


१९१२
एका दिवसात दोन कसोटी हॅटट्रिक.. ऑस्ट्रेलियाचे लेगस्पिनर जिमी मॅथ्यूज यांनी तिरंगी स्पर्धेतील ओल्ड ट्रॅर्फडवर झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कुठल्याही सहकारी क्षेत्ररक्षकाच्या मदतीविना ही करामत साधली. टी. ए. वॉर्ड हे त्यांच्या दोन्ही हॅटट्रिकमधील तिसरी विकेट होते.


१९३४
इंग्लंडचे सवरेत्तम माजी फलंदाज सर जॅक हॉब्ज (१८८२९१९६३) यांनी सरेतर्फे खेळताना लँकेशायरविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डवर विक्रमी १९७वे डोमेस्टिक शतक झळकावले. त्यावेळी हॉब्ज ५१ वर्षे आणि १६३ दिवसांचे होते. त्यांच्या नावावर १९९ शतके आहेत.


१९५६
वेस्ट इंडिजचे माजी यष्टिरक्षक, फलंदाज जेफ्री दुजाँ यांचा जन्म. १० वर्षाच्या कारकीर्दीत ८१ कसोटीत ३३२२ तसेच १६९ वनडेत १९४५ धावा त्यांनी केल्या. कसोटीत २६७ आणि वनडेत २०४ झेल/यष्टिचीत त्यांच्या नावावर आहेत. दुजाँ खेळलेल्या मालिकांमध्ये वेस्ट इंडिजवर कधीही मालिका पराभवाची नामुष्की ओढवली नाही.


१९७४
पाकिस्तानचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज मिसबा-उल-हकचा जन्म. २००१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या मिसबाची कसोटी आणि वनडेतील सरासरी ४० हून अधिक आहे.


१९७७
दक्षिण आफ्रिकेचा सिनियर फलंदाज अ‍ॅश्वेल प्रिन्सचा जन्म. डावखु-या प्रिन्सच्या खात्यात ६२ कसोटीत ११ शतकांसह ३५५६ आणि ५२ वनडेत १०१८ धावा आहेत. जुलै २००६ मध्ये दुखापतग्रस्त ग्रॅमी स्मिथच्या अनुपस्थितीत त्याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. दक्षिण आफ्रिकेचा तो पहिला कृष्णवर्णीय कर्णधार बनला.


२००७
इंग्लंडने लीड्स कसोटी एक डाव आणि २८३ धावांनी जिंकली. पाहुण्या वेस्ट इंडिजचा हा सर्वात मोठा पराभव ठरला.

Read More »

अनधिकृत ठाणे!

शिळफाटा येथील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

ठाणे – शिळफाटा येथील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. शहरातील एकूण १,५२८ हेक्टर जागा निवासी वापरासाठी राखीव असून, त्यातील ६० टक्क्याहून अधिक म्हणजेच ९५० हेक्टर जागेवर (तीन कोटी ८० लाख चौरस फूट) बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, अशी धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यातील एक महत्त्वाचे शहर असलेल्या ठाण्यात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला असतानाही प्रशासनाचे मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

शिळफाटा दुर्घटनेने ७४ जणांचा बळी घेतल्यानंतर महापालिका क्षेत्रात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याबाबत चर्चा सुरू झाली असताना ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांना महापालिकेकडून धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. ठाणे शहराच्या क्रमांक तीन, आठ आणि नऊ या सेक्टरमध्ये २०१० पर्यंत ३८० हेक्टर जमिनीवर तीन कोटी ८० लाख चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम झालेले आहे. त्यात ८११ इमारतींचा समावेश आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात २५३ झोपडपट्ट्या असून, त्यात २,३२,९८३ झोपड्या आहेत. ५,६४८ हेक्टर जागेवर या झोपडय़ा वसलेल्या आहेत. याचाच अर्थ १२,८२३ हेक्टरवर वसलेल्या ठाणे महापालिकेत ६,०२८ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.

'झोपड्यांना तीन वाढीव एफएसआय का?'
अतिक्रमणामुळे ठाणे महापालिकेच्या सेवा-सुविधांवर ताण पडत आहे. याचा त्रास अधिकृत इमारतीत राहणा-या रहिवाशांनाच सहन करावा लागतो. वेळेवर सर्व प्रकारचे कर भरणा-या रहिवाशांना सुविधांपासून वंचित राहावे लागते. महापालिकेने अधिकृत मात्र धोकादायक असलेल्या इमारतींना वाढीव एफएसआय देण्याचे नाकारले. पण ५,६४८ हेक्टरवर वसलेल्या अनधिकृत झोपडय़ांना तीन वाढीव एफएसआय देते. हा विरोधाभास आहे, असा आरोप त्यांनी केला.

ठाणे महापालिका
एकूण क्षेत्रफळ १२, ८२३ हेक्टर
रहिवाशांसाठी राखीव क्षेत्र ९१७.२३ हेक्टर
औद्योगिक क्षेत्र ८७६.२६ हेक्टर
संरक्षण विभागासाठी राखीव १४९.९० हेक्टर
शेतजमीन ३५११.६० हेक्टर
विकास होण्यायोग्य जागा ६११.२९ हेक्टर
वन विभाग ३२३५.१५ हेक्टर

Read More »

'एलबीटी' बंदचा फटका पुस्तक प्रकाशकांना

स्थानिक स्वराज्य कर अर्थात एलबीटीविरोधात राज्यभरात झालेल्या व्यापा-यांच्या आंदोलनाचा फटका मराठी प्रकाशकांनाही बसला असल्याचे समोर आले आहे.

मुंबई - स्थानिक स्वराज्य कर अर्थात एलबीटीविरोधात राज्यभरात झालेल्या व्यापा-यांच्या आंदोलनाचा फटका मराठी प्रकाशकांनाही बसला असल्याचे समोर आले आहे. आंदोलनामुळे कागदाच्या तुटवडा जाणवला. त्यामुळे अपेक्षित प्रमाणात साहित्य प्रकाशित होऊ शकले नाही. परिणामी प्रकाशकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.

मराठी साहित्यविश्वात दर महिन्याला सुमारे तीनशे ते सव्वातीनशे पुस्तके प्रकाशित होतात. त्यानुसार एलबीटीविरोधी आंदोलनकाळात एक ते दीड हजार पुस्तके बाजारात येणे अपेक्षित होते. पण तसे न झाल्यामुळे प्रामुख्याने पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमधील प्रकाशकांना याचा फटका बसला आहे. शिवाय या गोंधळामुळे विशिष्ट कालावधीत प्रकाशित होणा-या साहित्याचे वेळापत्रकही कोलमडणार आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात सर्वाधिक प्रकाशक आहेत. विशेष म्हणजे एलबीटीविरोधातील आंदोलन येथेच जास्त चिघळले. याचा फायदा घेत कागद व्यापा-यांनी प्रकाशकांना कागदासाठी 'ब्लॅकमेल' केल्याचे समोर आले आहे. काही प्रकाशकांनी कागदाची साठवणूक करून पुस्तके छापली. मात्र विक्रेत्यांची दुकाने बंद असल्यामुळे आंदोलन काळात पुस्तकांच्या वितरणावर परिणाम झाला.

'एलबीटी'विरोधातील आंदोलनामुळे कागद व्यापा-यांची गोदामे बंद होती.त्यामुळे आमची दोन ते तीन पुस्तके प्रकाशित होऊ शकली नाहीत. आम्हाला पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांमध्येही यामुळे बदल करावा लागला. – देवेश अभ्यंकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

एलबीटी आंदोलनाचा मुंबईतील पुस्तक विक्री आणि वितरणावर काहीही परिणाम झाला नाही. या काळात पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर भागांतून वितरणासाठी येणा-या पुस्तकाचा ओध मात्र थंडावला होता. – मंदार नेरूरकर, मालक-आयडिएल पुस्तक त्रिवेणी, मुंबई

Read More »

ऑपरेशन नक्षलवादी!

काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने सोमवारी छत्तीसगडमध्ये मोहीम सुरू केली.
रायपूर – काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने सोमवारी छत्तीसगडमध्ये मोहीम सुरू केली. नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या बस्तर जिल्ह्यात निमलष्करी दलाचे दोन हजार जवान पाठवण्यात आले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. जंगल परिसर पिंजून नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश या जवानांना दिले आहेत.

काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवरील हल्ल्यानंतर छत्तीसगड सरकारने नक्षलवादविरोधी मोहीम तीव्र करण्यासाठी निमलष्करी दलाचे अधिकाधिक जवान पाठवण्याची विनंती केंद्र सरकारने केली होती. त्यानुसार केंद्राने हे पाऊल उचलले आहे.

छत्तीसगड हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा सर्वाधिक उच्छाद असलेल्या राज्यांपैकी एक असून, या हल्ल्यांत गेल्या आठ वर्षात १,९०० जणांचा बळी गेला आहे. यामध्ये ५७० नागरिक, विविध सुरक्षा दलांचे ७०० जवान यांचा समावेश आहे. छत्तीसगडवर नक्षलवाद्यांचे अधिक प्राबल्य असल्याने येथे राज्य सरकारच्या मदतीसाठी केंद्राने ३० बटालियन म्हणजेच सुमारे ३० हजार सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. यात आता निमलष्करी दलाच्या दोन हजार जवानांची भर पडणार आहे.

काँग्रेस नेत्यांवरील हल्ल्यात सहभाग असलेल्या नक्षलींच्या म्होरक्याबाबत माहिती मिळाली आहे. त्याला व त्याच्या साथीदारांना जेरबंद करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याचे पोलिस महासंचालक रामनिवास यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बेपत्ता असलेला पोलिस जवान पवन किंद्रो याचाही शोध घेतला जात असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यांत गंभीर जखमी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्याचरण शुक्ला यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Read More »

तप्त मुंबईला पावसाची चाहूल!

गेल्या काही दिवसांपासून घामांच्या धारांनी भिजणा-या मुंबईकरांना पावसाची चाहूल लागली आहे.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून घामांच्या धारांनी भिजणा-या मुंबईकरांना पावसाची चाहूल लागली आहे. अंदमानात तीन दिवस आधीच पावसाने हजेरी लावल्याने यंदा मुंबईतही पाऊस लवकर येणार, अशी चर्चा रंगत असतानाच सोमवारी सकाळी पावसाने मुंबई शहरात हजेरी लावली. वरळी व शहर भागात झालेल्या हलक्या शिडकाव्याने मुंबईकरांना आनंद झाला असला तरी या सरींमुळे उष्म्यात आणखी वाढ होणार असल्याची
माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपसंचालक एन. वाय. आपटे यांनी दिली आहे.

काही ठिकाणी कोसळलेल्या सरी म्हणजे मान्सून-पूर्व पाऊस नसून मुंबईत मान्सूनच्या आगमनाला जूनचा दुसरा आठवडा उजाडणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदा मुंबईतील तापमानाचा पारा ३० ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावला असला, तरी हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे उकाडा वाढला आहे. मान्सून येईपर्यंत हा उकाडा असाच वाढत राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.

दरम्यान, पुढचे दोन दिवस मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढच्या तीन-चार दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्यानंतरच त्याच्या मुंबईतील आगमनाचा निश्चित अंदाज बांधता येईल, असेही आपटे यांनी स्पष्ट केले.

Read More »

नाल्यांची सफाई समाधानकारक?

मुंबई महापालिका प्रशासनाने नालेसफाईची कामे हाती घेतली असून, सत्ताधारी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह महापौरांनी सोमवारी पूर्व उपनगरातील नाल्यांच्या कामांची पाहणी केली.
मुंबई - मुंबई महापालिका प्रशासनाने नालेसफाईची कामे हाती घेतली असून, सत्ताधारी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह महापौरांनी सोमवारी पूर्व उपनगरातील नाल्यांच्या कामांची पाहणी केली. पूर्व उपनगरात १३५ मोठे आणि ३४० छोटे नाले असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केवळ सहा नाल्यांचे मुखदर्शन घेत या भागातील नाल्यांची सफाई समाधानकारक असल्याचे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांना झालेल्या या उपरतीमुळे कंत्राटदार आणि महापालिकेच्या अधिका-यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी येणा-या पावसाळ्यात मुंबईकरांना त्यांच्या भरवशावर विश्वास टाकून चालणार नाही.

मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिका प्रशासनाने यंदा ५२ कंत्राटदारांची नियुक्ती करून त्यांना १६० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ५५ ते ६० टक्के मोठ्या नाल्यांची सफाई झाली आहे, अशी माहिती पर्जन्य जलअभियंता विभागाचे प्रमुख अभियंता व संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी माहिती दिली.

या नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी शिवसेनेने सोमवारी पाहणी दौरा आयोजित केला होता. या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर सुनील प्रभू आणि सभागृहनेते यशोधर फणसे आदी मंडळींनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमटीएनएल कार्यालयानजीक असलेल्या नाल्यापासून पाहणीदौरा सुरू केला. मिठी नदीचा भाग असलेल्या या परिसराची पाहणी केल्यानंतर क्रांतीनगरमधील मिठी नदी, सोमय्या नाला, उषानगर नाला, ऑक्सीजन नाला तसेच बाउंड्री नाला आदींची पाहणी या वेळी करण्यात आली.

Note: There is a poll embedded within this post, please visit the site to participate in this post's poll.

उद्धव ठाकरे यांनी केवळ धावती भेट देत नाल्यांचे मुखदर्शन केले. उद्धव ठाकरे आणि महापौर येणार असल्यामुळे कंत्राटदारांनी एकावेळी चक्क तीन ते चार पोकलेन मशीन नाल्यात उतरवून सफाई होती घेतली होती. परंतु, यंदा यापूर्वी येथे नाल्यांची सफाई झाली नव्हती, असे स्थानिक रहिवाशांनी या वेळी सांगितले.

पूर्व उपनगरात १३५ मोठे आणि ३४० छोटे नाले असताना, उद्धव आणि त्यांच्या सरदारांनी केवळ सहा नाल्यांची पाहणी करून सफाईचे काम समाधानकारक असल्याचे प्रशस्तिपत्र दिले. प्रत्यक्षात साडेतीन वाजताची वेळ असताना पक्षप्रमुखांसह महापौर सव्वाचारला मिठी नदीवर प्रकटले आणि त्यानंतर सहा वाजता बाउंड्री नाल्याची अंतिम पाहणी करून घरही गाठले. उद्धव ठाकरे यांनी या वेळी एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, रेल्वे, विमान प्राधिकरण आदींनी आपल्या भागातील नाल्यांची सफाई योग्यप्रकारे केल्यास मुंबईत पाणी तुंबणार नाही, असे सांगितले.

एमएमआरडीएसारख्या संस्थांकडे जे अधिकार आहेत, तसेच अधिकार महापालिकेला मिळायला हवेत, अशीही मागणी त्यांनी या वेळी केली. मात्र, अशा संस्थांनी नालेसफाई करण्यास महापालिकेला परवानगी द्यावी अथवा त्यांनी स्वत: करावी, अशी सूचना त्यांनी केली.

Read More »

विंदूचे २२ क्रिकेटपटूंशी 'मैत्रीपूर्ण' संबंध

सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेला 'बिगबॉस'फेम विंदू दारासिंग याच्या चौकशीत त्याचे एकूण २२ क्रिकेटपटूंशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पुढे आले आहे.

मुंबई – सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेला 'बिगबॉस'फेम विंदू दारासिंग याच्या चौकशीत त्याचे एकूण २२ क्रिकेटपटूंशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पुढे आले आहे. त्यात १२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी कोणी खेळाडू त्याला त्यांच्या संघाची अंतर्गत माहिती पुरवत होता का, यादृष्टीने गुन्हे शाखा तपास करत आहे.

बॉलिवूडमधील अभिनेते व मॉडेलच्या संपर्कात असणारा विंदू बॉलिवूड व क्रिकेट पाटर्य़ाना नियमित उपस्थित राहत होता. त्यातून त्याचे अनेक खेळाडूंशी ओळखही झाली. अशा एकूण २२ क्रिकेटपटूंशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पुढे आले आहे. त्यात १२ परदेशी खेळाडूंचाही समावेश असल्याचे गुन्हे शाखेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मय्यपनचे तीन मोबाइल सापडले
गुरुनाथ मय्यपन याच्यासंदर्भात चेन्नईत सुरू असणा-या शोध मोहिमेत गुन्हे शाखेच्या पोलिसांना एकूण तीन मोबाइल सापडले आहेत. मय्यपनच्या घरातून यातील दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून, तिसरा मोबाइल पोलिस पथकाला मय्यपनच्या बोटीत सापडला. हे बोट ७० फूट मोठे असल्याचे एका अधिका-याने सांगितले. त्यातील एका मोबाइलमधील तीन सीमकार्डे 'चेन्नई सुपरकिंग्ज,' दुसरे 'एव्हीएम' कंपनीच्या नावावर, तर तिसरे मय्यपनच्या स्वत:च्या नावावर आहे.

दरम्यान, अद्याप एक मोबाइल गुन्हे शाखेच्या हाती लागलेला नाही. याशिवाय रविवारी मय्यपनच्या घरातून सापडलेल्या डायरीत अनेक खेळांडूची नावे व त्यांच्या फॉर्म (खेळातील सातत्य) याबाबतची माहिती आढळली आहे. त्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंसह इतर संघांच्या खेळांडूंच्याही फॉर्म बाबतची माहिती असल्याचे समजते.

हॉटेल मालकाला चौकशीसाठी समन्स
चेन्नईतील हॉटेल व्यवसायिक विक्रम अगरवाल याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवले असून, त्यानूसार त्याला मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 'रॅडिसोन ब्लू इगमोर' या हॉटेलचा मालक असलेल्या विक्रमने विंदूची ओळख मय्यपनशी करून दिली होती. या दोघांच्याही चौकशीत त्याचे नाव आल्यानंतर त्याला समन्य पाठवण्यात आले आहे. त्याने पत्नीच्या नावावरील सीमकार्डच्या सहाय्याने आयपीएल सामन्यांदरम्यान किट्टी या सट्टेबाजाशी १००हून अधिकवेळा संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे.

दिल्ली पोलिसांकडील आरोपींचा ताबा घेणार
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या अश्विन जयनारायण अगरवाल ऊर्फ टिंकू याच्याविरोधात गुन्हे शाखेने न्यायालयाकडून अटक वॉरंट मिळवला असून, त्याला मुंबईत आणण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक मंगळवारी दिल्लीला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या रमेश व्यास याच्याकडील दूरध्वनी लाइनवरून तो पाकिस्तान व दुबईतील सट्टेबाजांच्या संपर्कात होता.

सहा सट्टेबाजांना अटक
'आयपीएल' सामन्यांवर सट्टा घेणा-या सहा सट्टेबाजांना मुंबई पोलिसांनी सोमवारी गोवंडी व देवनार येथे छापे टाकून अटक केली. गुन्हे शाखा तपास करत असलेल्या सट्टेबाजीच्या प्रकरणाशी या बुकींचा सहभाग आहे का, या दृष्टीने देवनार पोलिस अधिक तपास करत आहेत. गोवंडी येथील केना मार्केट परिसरात टाकण्यात आलेल्या छाप्यात इकबाल अन्सारी, महबूब अन्सारी (३२), शफीक शेख (३२) व गणेश भोसले (४०) या चार सट्टेबाजांना अटक करण्यात आली. 'चेन्नई सुपरकिंग्ज' व 'मुंबई इंडियन्स'च्या सामन्यावर काही सट्टेबाज सट्टा घेत असल्याची माहिती देवनार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. अटक अरोपींच्या चौकशीत घाटकोपर परिसरातीलही दोन बुकी कार्यरत असल्याची माहिती देवनार पोलिसांना मिळाली. त्यानुसार घाटकोपर येथील पार्लरवरही छापा टाकण्यात आला. तेथून रशीद कलमाडी (२३) व जीवन पुजारी (२४) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम व आठ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

Read More »

सीएसटी स्थानकाचे पोस्ट पाकीट प्रकाशित

सीएसटी स्थानकाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सीएसटी स्थानकाचे छायाचित्र असलेल्या पोस्ट पाकिटाचे सोमवारी अनावरण करण्यात आले.
मुंबई – सीएसटी स्थानकाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सीएसटी स्थानकाचे छायाचित्र असलेल्या पोस्ट पाकिटाचे सोमवारी अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्य पोस्ट मास्टर जनरल के. सी. मिश्रा, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक डब्यू. के. प्रधान उपस्थित होते.

सीएसटीची इमारत ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या इमारतीला १२५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे एक प्रकारे या वास्तूचा सन्मानच या मध्यमातून केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून या वेळी सांगण्यात आले. या माध्यमातून ही वास्तू आणखी लोकापर्यंत पोहोचेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. भारतीय रेल्वेच्या इतिहास जीवंत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे टपाल विभागाकडून सांगण्यात आले.

Read More »

पालिका आयुक्तांनी शिवसेनेला तोंडावर पाडले

मिठी नदीच्या सफाईसाठी एमएमआरडीए जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत सफाई केली जाणार नाही, असे सांगत स्थायी समितीत प्रस्ताव फेटाळणा-या सत्ताधारी शिवसेनेला महापालिका प्रशासनाने चांगलेच तोंडावर पाडले आहे.
मुंबईमिठी नदीच्या सफाईसाठी एमएमआरडीए जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत सफाई केली जाणार नाही, असे सांगत स्थायी समितीत प्रस्ताव फेटाळणा-या सत्ताधारी शिवसेनेला महापालिका प्रशासनाने चांगलेच तोंडावर पाडले आहे. शिवसेनेच्या विरोधानंतरही महापालिका प्रशासनाने 'मिठी'तील गाळ उपसण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत ३० ते ३५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी 'मिठी'च्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त करत श्रेय लाटण्यास सुरुवात केली आहे.

मिठी नदीची एकूण लांबी १७.८ किलोमीटर आहे. त्यापैकी ११.८ किमीचा भाग महापालिका तर सहा किमीचा परिसर एमएमआरडीएच्या अखत्यारित येतो. एमएमआरडीच्या स्वत: त्यांच्या ताब्यात येणाऱ्या मिठी नदीच्या परिसराची सफाई करते. परंतु, असे असले तरी या वर्षापासून त्यांनीही संपूर्ण मिठी नदीच्या सफाईची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे महापालिकेने एमएमआरडीएच्या ताब्यातील सहा किमी परिसरातील मिठीच्या सफाईसाठी कंत्राटदार नियुक्त नेमून सुमारे २२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असताना, सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या सदस्यांनी त्याला जोरदार विरोध केला होता. जोपर्यंत एमएमआरडीए या सफाईचे पैसे देत नाही, तोपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, अशी भूमिका घेत तो प्रस्ताव नामंजूर करत परत प्रशासनाकडे पाठवला होता.

एका बाजूला स्थायी समितीने 'मिठी'च्या सफाईचा प्रस्ताव नामंजूर केला असतानाही आपत्कालिन परिस्थिती म्हणून आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात या कामाला सुरुवात करत शिवसेनेला चांगलीच चपराक दिली आहे. आतापर्यंत 'मिठी'ची ३० ते ३५ टक्के सफाई झाली असल्याचा दावा पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता व संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी केला आहे.

सीएसटी ते माहीम खाडीपर्यंत असलेल्या 'मिठी'च्या परिसरात भरतीच्या वेळी समुद्रातून बाहेर फेकला जाणारा कचरा जमा होतो. त्यामुळे या भागाची सफाई आवश्यक असून, जर 'मिठी'च्या इतर भागाची सफाई झाली आणि या भागाची सफाई झाली नाही, तर इतर सफाईच्या कामाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे हे काम तातडीने हाती घ्यावे लागले, असे व्हटकर यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपल्याच लोकांनी नाकारलेल्या प्रस्तावाच्या विरोधात जात आयुक्तांनी स्वत: अधिकरात चालू केलेल्या कामाची पाहणी करत त्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेची नक्की भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read More »

परवान्यांच्या नूतनीकरणासाठी 'स्वाभिमान' आक्रमक

रिक्षा आणि टॅक्सींच्या मृतपरवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी 'स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी संघटने'ने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबई – रिक्षा आणि टॅक्सींच्या मृतपरवान्यांचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन विभागाने दोन वर्षापूर्वी केली होती. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने अनेक रिक्षा-टॅक्सीचालकांना त्यांची वाहने उभी करून ठेवावी लागत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडत असल्याने 'स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी संघटने'ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मृतपरवान्यांचे १५ जूनपर्यंत नूतनीकरण करून त्यांचे वाटप करावे, अन्यत: बंद पुकारण्यात येईल, असा इशारा 'स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी संघटने'चे अध्यक्ष के. के. तिवारी यांनी दिली आहे.

परिवहन विभागाकडे रिक्षांचे २८ हजार तर टॅक्सींचे १३ हजार मृतपरवाने आहेत. या परवान्यांचे नूतनीकरण करून ते नव्याने देण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वीच घेण्यात आला होता. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी याबाबत परिवहन आयुक्तांबरोबरही एक बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी हे परवाने लवकरच दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता 'स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी संघटने'ने या मुद्दयावर आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे.

मृतपरवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी स्वाभिमान संघटनेने परिवहन विभागाला १५ जूनपर्यंत मुदत दिली आहे. शिवाय सरकारने याबाबत एक अधिसूचनाही काढावी, अशी मागणी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. परवान्यांबाबत १५ जूनपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास बंद पुकारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या बंदमध्ये १० हजार टॅक्सी तर १२ हजार रिक्षाचालक सहभागी होतील, असे संघटनेचे अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले. हा बंद एक दिवसासाठी असेल मात्र परिस्थितीनुसार त्याचा कालावधी वाढवण्यातही येईल, असेही त्यांनी सांगितले.

Read More »

नक्षलवादाला आळा घालण्यासाठी कायदे अपुरे

देशातील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे असून, अधिक कडक कायदे करण्याची गरज आहे.

मुंबई – देशातील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे असून, अधिक कडक कायदे करण्याची गरज आहे. तसेच नक्षलग्रस्त भागातील विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे, असे मत राज्याचे गृहमंत्री आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले. सरकारचेच काही कायदे नक्षलग्रस्त भागाच्या विकासात अडसर ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्तीगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नक्षलवाद आटोक्यात आणणे अशक्य नाही, मात्र सध्याच्या कायद्यांच्या चौकटीत राहून त्याला आळा घालताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, नक्षलवाद्यांविरोधात लढताना पोलिसांना कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी लागते. तर नक्षलवाद्यांना कोणताही कायदा नाही. नक्षलवाद केवळ जंगलात आहे, अशा भ्रमात राहून चालणार नाही. कारण त्यांच्या समांतर संघटना शहरी भागातही आहेत. एखाद्या नक्षलवाद्याला अटक केली, तर त्याला सोडवण्यासाठी सरकारी वकिलांपेक्षा तज्ज्ञ वकिलांची फौज उभी राहते. व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेतला जातो. त्यांना मात्र माणसे मारताना कोणताही कायदा आडवा येत नाही. मात्र नक्षलवाद्यांसाठी मानवी हक्क संघटना धावून येतात. पूर्वी नक्षलवाद्यांची संख्या कमी होती. आता ती वाढली आहे. त्यांच्याकडे आता आधुनिक शस्त्रेही आलेली आहेत. त्यातील अनेक शस्त्रे त्यांनी पोलिसांकडूनच लुटली आहेत. त्यांना परदेशातून शस्त्रे मिळतात का, याचाही शोध घेण्याची गरज आहे. केवळ बांबू आणि तेंदू पत्त्यांच्या व्यापा-यांकडून त्यांना खंडणी मिळत असे. आता मात्र खनिज उत्खनन करणाऱ्या कंपन्यांकडूनही त्यांना मोठय़ा प्रमाणात निधी मिळत आहे.

नक्षलवाद बोकळण्यात दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नक्षलवादी शस्त्राच्या सहाय्याने अनेकांना आपल्या चळवळीत ओढतात. ज्या भागांचा विकास झालेला नाही, अशा भागातील तरुणांना त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना मदत केली जाते. परिस्थितीने पिछाडलेल्या तरुणांना आधार देत त्यांच्या हातात शस्त्रे दिली जातात. एका विशिष्ट वयात शस्त्राचे आकर्षण असणारे तरुण या चळवळीत मोठय़ा प्रमाणात ओढले जात आहेत. तसेच केवळ विचाराने प्रेरित होऊन काम करणारेही काही तरुण आहेत. पूर्वी आमच्या भागाचा विकास होत नाही, अशी त्यांची ओरड होती. मात्र विकास कामात तेच अडथळे आणत आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

एखादा विजेचा खांब उभा करण्यासाठी झाडाची एक फांदी तोडावी लागली, तरी वन विभागाचे अधिकारी कायदा मोडणा-या वीज कर्मचा-यांना अटक करतात. जोपर्यंत या भागाचा विकास होणार नाही, तोपर्यंत नक्षल चळवळीला आळा बसणार नाही. जर या भागाचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल, असेही पाटील यांनी सांगितले.

Read More »

'खो-खो'ला मल्टिप्लेक्स मालकांचा 'खो'

केदार  शिंदे दिग्दर्शित खो-खो चित्रपटाचे शोज मल्टिप्लेक्स मालकांनी नाकारले आहेत.

मुंबई – केदार  शिंदे दिग्दर्शित खो-खो चित्रपटाचे शोज मल्टिप्लेक्स मालकांनी नाकारले आहेत. येत्या शुक्रवारी ‘ये जवानी, ये दिवानी’चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत असल्यामुळे शोजसाठी वेळा नसल्याचे कारण सांगत मल्टिप्लेक्स मालकांनी चित्रपटावर बंदी घातली आहे.  दरम्यान, मल्टिप्लेक्स मालकांच्या या आडमुठे भूमिकेला मनसे स्टाईल उत्तर देण्यात येणार असल्याचे मनसेचे अमेय खोपकर यांनी सांगितले.

याआधी अशाच प्रकारे तानी या मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समध्ये बंदी घालण्यात आली होती.

Read More »

डॉक्टरांच्या कामाच्या तासांचा निर्णय प्रलंबित

राज्यसरकारच्या अखत्यारित येत असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती.
मुंबई – राज्यसरकारच्या अखत्यारित येत असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यात समितीने त्याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाचे अपर सचिव टी. बेंजामिन यांच्याकडे दिलेला नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या कामाच्या तासाबाबत निर्णय प्रलंबित राहिला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉक्टर हे प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयांत विविध पदांवर कार्यरत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात साडेसात हजार वैद्यकीय अधिकारी, २५० जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ५५० शल्यचिकित्सकासह ६०० तज्ज्ञ डॉक्टर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांना कामाची वेळ तसेच जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामाच्या वेळेत भिन्नता आहे. शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांना बहुधा अधिक काम नसते, असे डॉक्टरांच्या काही संघटनांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या (एनआरएच) विविध कार्यक्रमांमध्ये काम करत असलेल्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना त्या मानाने फारसा पगार दिला जात नाही. काही जिल्हा रुग्णालयांत डॉक्टरांना १४ तास, तर काही उपजिल्हा रुग्णालयात १२ तास काम करावे लागत आहे. कामाची वेळ आणि पगार यामुळे यापूर्वी अनेक डॉक्टरांनी नोकरी सोडल्याच्याही घटना घडल्या आहेत. यावर डॉक्टरांच्या काही संघटनांनी वेळोवेळी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहारही केला होता.

याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. डॉक्टरांच्या कामाची वेळ निश्चित करून त्या पद्धतीने वेतन मिळावे, यासाठी आरोग्य विभागाने एक समिती नियुक्त केली आहे. त्यात अर्थ विभाग, सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची मते जाणून घेऊन तो अहवाल आरोग्य विभागाला दिला जाणार होता. समितीच्या यापूर्वी दोन बैठका झाल्या. त्याचा अहवाल करून काही मार्गदर्शक सूचनाही मांडल्या गेल्या होत्या. मात्र, सुधारित सूचनांबाबतचा अंतिम अहवाल अद्यापही आरोग्य विभागाचे अपर सचिव बेंजामिन यांच्याकडे दिलेला नाही. अपर मुख्य सचिवांकडे अहवाल दिल्यानंतरच याबाबतचा निर्णय होऊ शकतो, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

Read More »

प्राथमिक छाननीत ५,९६१ अर्ज रद्द

म्हाडाच्या १,२४४ घरांसाठी ३१ मे रोजी काढण्यात येणा-या सोडतीसाठी ९,३३,५५९ अर्ज आले असून, छाननीत यातील ५,९६१ अर्जामध्ये त्रुटी आढळल्याने हे अर्ज प्राथमिकरित्या रद्द ठरवण्यात आले आहेत.
मुंबई – म्हाडाच्या १,२४४ घरांसाठी ३१ मे रोजी काढण्यात येणा-या सोडतीसाठी ९,३३,५५९ अर्ज आले असून, छाननीत यातील ५,९६१ अर्जामध्ये त्रुटी आढळल्याने हे अर्ज प्राथमिकरित्या रद्द ठरवण्यात आले आहेत. या अर्जदारांना त्यांची बाजू किवा पुरावा द्यायचा असेल, तर मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करावेत, मुदतीनंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असे म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली संदानसिंग यांनी सांगितले.

अनामत रक्कमही चुकीच्या पद्धतीने भल्यामुळे ४२ तर पोचपावती व डीडी बँकेमध्ये सादर केल्यानंतर अर्जामध्ये पुन्हा फेरफार केल्यामुळे सहा असे एकूण ४८ अर्ज रद्द क रण्यात आले असून, त्यांचा सोडतीत समावेश करता येणार नसल्याचे म्हाडातून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, छाननीत पात्र, अपात्र ठरलेल्या अर्जाची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांचे अर्ज प्राथमिकरित्या रद्द झाले आहेत, त्या अर्जदारांच्या हरकतीनंतर पुन्हा मंगळवारी, संध्याकाळी सहा वाजता अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीनुसारच ३१ मे रोजी सोडत काढली जाईल.

Read More »

जनाईच्या जलवाहिनीचे व्हॉल्व्ह तोडल्याने पाणीपुरवठा थांबला

सरकारच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत बारामती आणि दौंड तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील तलावातून शुक्रवारी पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.
बारामती – सरकारच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत बारामती आणि दौंड तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील तलावातून शुक्रवारी पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. मात्र, दौंड तालुक्यातील माळवाडी, पाडवी हद्दीमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी जनाईच्या जलवाहिनीचे व्हॉल्व्ह तोडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा थांबला आहे. यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुपे परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हाधिका-यांनी टंचाईमधून दुष्काळी पट्टयातील पाझर तलाव जनाईतून भरावयाच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या नंतर खडकवासल्याचे पाणी वरवंड तलावामध्ये सोडण्यात येत आहे. या तलावात पुरेसा साठा झाल्याने, शुक्रवारपासून (२४ मे) जनाईचे पाणी सोडण्यात आले. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी या योजनेचे व्हॉल्व्ह तोडले. माळवाडी आणि पडवी या ठिकाणी रात्री व्हॉल्व्ह तोडल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले. बारामती बाजार समितीचे सभापती संपतराव जगताप, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष नवनाथ चांदगुडे, सुप्याचे शिवसेना अध्यक्ष नामदेव चांदगुडे यांनी प्रत्यक्ष जनाईच्या जलवाहिनीची पाहणी केली.

पडवी आणि माळवाडी या ठिकाणी व्हॉल्व्ह तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी व माती वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. सुपे परिसर दुष्काळाने होरपळत आहे. त्यामुळे या योजनेचे पाणी सोडल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या योजनेच्या जलवाहिनीचे व्हॉल्व्ह तोडल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read More »

चिपळूण बाजारपेठ बनतेय समस्यांचे माहेरघर

चिपळूण बाजारपेठेला अनेक समस्यांनी ग्रासले असून,ही बाजारपेठ समस्यांचे माहेरघर बनली आहे.

चिपळूण – चिपळूण बाजारपेठेत दुपदरी रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली अवैध प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांची रांग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, जनावरांचा मुक्त संचार यामुळे येथील बाजारपेठेला अनेक समस्यांनी ग्रासले असून, ही बाजारपेठ समस्यांचे माहेरघर बनली आहे.

या बाजारपेठेतील रस्ता दुपदरी असूनही वाहतूक समस्या गंभीर रुप धारण करीत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. तसेच वाहने पार्किंगसाठी जागा नसल्याने गुहागर मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर वेडीवाकडी उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसेसला या ठिकाणी अनेकदा जागाच मिळत नाही. तसेच माल उतरविण्यासाठी येणारे ट्रक, हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे ग्राहकाला या बाजारपेठेतून मार्ग काढताना अडचणीचे ठरत आहे.

दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यातच बाजारपेठेत खुलेआम फिरणारी मोकाट जनावरे, गाढव, कुत्रे यांमुळे दुकानदारांबरोबरच ग्राहकांना त्रासदायक ठरत आहेत. यावर नगरपरिषदेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Read More »

विद्यार्थ्यांना वेध शाळा सुरू होण्याचे!

उन्हाळी सुट्टीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. जून महिना सुरू झाला की बच्चे कंपनीला वेध लागतील ते शाळेचे!

रत्नागिरी – उन्हाळी सुट्टीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. जून महिना सुरू झाला की बच्चे कंपनीला वेध लागतील ते शाळेचे! शैक्षणिक वस्तूंच्या खरेदीसाठी मग त्यांची लगबग सुरू होईल. त्यामुळे आता दुकाने शैक्षणिक साहित्यांनी सजू लागली आहेत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक साहित्यात पाच ते १० टक्क्यांनी वाढ होईल, अशी आशा पालकवर्ग बाळगून होता. परंतु, शैक्षणिक साहित्यामध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांचा अपेक्षाभंग झाला आहे. दप्तर, वह्या, कंपास आदी साहित्य आतापासूनच उपलब्ध होऊ लागले आहे.

दप्तरांची किंमतही दीडशेपासून एक हजार रुपयांपर्यंत आहे. लहान मुलांसाठी स्पायडर मॅन, डोरेमॉन यांची चित्रे असलेल्या दप्तरांना जास्त मागणी आहे. बेनटेन, टँना माँटेना आदी डिझाइन्सच्या दप्तरांना बच्चे कंपनीची पसंती आहे. थ्री-डी डिझाइन्स, मॅटी, रबर, नायलॉन आदी प्रकारांतही दप्तरे उपलब्ध आहेत.

सध्या वातावरण ढगाळ असले, तरी मान्सून नियमित सुरू होण्यास अजून १०-१५ दिवसांचा अवधी असल्याने छत्र्या, रेनकोट यांची मागणी होत आहे, अशी माहिती दुकानदारांनी दिली.

Read More »

गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती

गरम पाण्यातील उष्णतेचा वापर करून जगामध्ये वीजनिर्मिती केली जाते. जगात २४ देशांमध्ये अशा पद्धतीने गेली १०० वर्षापासून वीजनिर्मिती केली जात आहे.

रत्नागिरी – गरम पाण्यातील उष्णतेचा वापर करून जगामध्ये वीजनिर्मिती केली जाते. जगात २४ देशांमध्ये अशा पद्धतीने गेली १०० वर्षापासून वीजनिर्मिती केली जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे देशातील प्रथमच गरम पाण्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी संशोधन सुरू केले जाणार आहे. यामधून सुरुवातीला तीन मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राजवाडी परिसर जगाच्या नकाशावर झळकणार आहे.

गरम पाण्याच्या झ-यापासून वीजनिर्मितीच्या संशोधनासाठी पुण्यामधील थरमॅक्स कंपनी आणि राजवाडी ग्रामपंचायत यांच्यात करार केला आहे. कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. आर. आर. सोंडे आणि राजवाडीचे सरपंच संतोष भडवळकर यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत.

देशात अनेक ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळतात. कोकणामध्ये संगमेश्वर तालुक्यातच आरवली, गोळवली व राजवाडीमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. दापोलीत उन्हवरे व राजापूरमध्ये उन्हाळे या गावांमध्येही असेच झरे आहेत. मात्र, भारतामध्ये ऊर्जानिर्मिती करण्याच्या दृष्टीने संशोधन झालेले नाही. त्यामुळे 'पेम' संस्थेचे अध्यक्ष सतीश कामत व राज्य सरकारच्या पुढाकाराने थरमॅक्स कंपनीने या संशोधनामध्ये रस दाखविला. यातूनच गतवर्षी कंपनीने महाराष्ट्र ऊर्जानिर्मिती प्राधिकरणाबरोबर करार केला आहे.

त्यानंतर काही महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली ते राजापूर या पट्टय़ात विविध ठिकाणी आढळणा-या गरम पाण्याच्या झ-यांचे कंपनीच्या संशोधक चमूने रासायनिक पृथक्करण केले. यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रानेही मदत केली. आइसलॅण्ड देशामध्ये अशी वीजनिर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. देशातील आर. जी. कंपनीबरोबर थरमॅक्स कंपनीने तांत्रिक सहकार्याचा करार केला आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी विविध चाचण्यांच्या आधारे तुरळ-राजवाडी येथे गरम पाण्याच्या झ-यांच्या परिसरात अपेक्षित वीजनिर्मितीसाठी सर्वात जास्त अनुकूल असल्याचे म्हटले आहे.

राजवाडी गावातील ब्राह्मणवाडीमध्ये खोदकाम करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर संशोधनाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी थरमॅक्सच्या संशोधन चमूसह राजवाडी गावातील नागकि मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भू-औष्णिक वीजनिर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत हा २५ वा देश ठरणार आहे.

राजवाडी येथे होणारा वीजनिर्मिती करण्याचा उपक्रम हा सौरऊर्जेप्रमाणे अतिशय शुद्ध ऊर्जानिर्मिती करणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. तसेच सध्याच्या गरम पाण्याच्या झ-यांच्या साठ्यांवरही कोणताही परिणाम होणार नाही. उलट ऊर्जानिर्मितीबरोबरच शीतगृह, मासे सुकविणे, अन्न प्रक्रिया आणि वैद्यकीय पर्यटन यासारख्या उपक्रमांनाही चालना मिळणार आहे, असे थरमॅक्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आर. आर. सोंडे यांनी राजेवाडी येथे सांगितले. यावेळी राजवाडीच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश सुर्वे, उपसरपंच सुहास लिंगायत, थरमॅक्सचे भूगर्भ शास्त्रज्ञ ए. ए. अबसर, 'पेम'चे अध्यक्ष सतीश कामत आदी उपस्थित होते.

Read More »

नौका विसावू लागल्या

मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांनी आपल्या नौका धक्क्यावर आणून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
रत्नागिरी – मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांनी आपल्या नौका धक्क्यावर आणून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे कोकणात आगमन होणार असून, मच्छीमार आपल्या नौका शाकारणी आणि डागडुजीची कामे वेगाने करू लागले आहेत. बहुसंख्य मच्छीमारांनी मासेमारी स्वत:हून बंद केली आहे. रत्नागिरीतील मच्छीमारांनी नियोजित वेळेआधीच मासेमारी बंद केल्याने मत्स्योत्पादनवाढीचा उद्देश असलेला हा बंदीचा काळ फलदायी ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

सर्वसाधारणपणे १० जूनदरम्यान कोकणात पावसाला सुरुवात होते. माशांचे प्रजनन सुरळीत होण्यासाठी आणि पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रात नौकांचे कोणतेही अपघात होऊ नयेत यासाठी मासेमारीला बंदी घातली जाते. महाराष्ट्रातील समुद्रकिना-यावरील सर्व बंदरांमध्ये १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारीवर सरकारकडूनच बंदी घातली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर असून, जिल्हाभरात लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी सुमारे ४० बंदरे आहेत. या सर्व बंदरांमध्ये मासेमारी बंद करण्यात येते. मासेमारीवर बंदी असल्याने सर्व मासेमारीशी निगडित असलेले छोटे-मोठे उद्योगही बंद असतात.

जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार नौका आता या बंदीमुळे विश्रांती घेणार आहेत. मान्सूनची चाहूल लागल्याने नौकांच्या डागडुजीचे काम मच्छीमारांनी हाती घेतले आहे. खोल समुद्रात मासेमारी करताना नौका खाऱ्या पाण्यामुळे खराब होतात. त्यामुळे त्यांची वेळीच दुरुस्ती करणे आवश्यक असते. प्रत्येक मासेमारी नौकांसाठी नवे लाकूड, वंगण, तेल, रंग आणि चार महिने पावसापासून संरक्षण करण्यासाठी लागणा-या ताडपत्रीवर आणि मजुरीवर मच्छीमाराला सुमारे तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. रत्नागिरीतील भगवती बंदराजवळ नौका उभ्या करण्यात आल्या आहेत. पावसाळा संपेपर्यंत त्या त्याच ठिकाणी असणार आहेत. दुरुस्तीचे काम करण्यासाठी खलाशांचा वापर केला जात असून, ते सर्व खलाशी केरळ व नेपाळ येथील असल्याने आता त्यांचीही गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे.

मासळी महागली
लवकरच येणा-या पावसामुळे आता मासेमारी हळूहळू बंद होत आहे. काही नौका मासेमारी करीत असून मिळणा-या माशांचे प्रमाण कमी असल्याने माशांचे दर वाढले आहेत. किनाऱ्यावर पापलेट, सुरमई, बांगडा, म्हाकूळ आदी मासे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. मात्र, नौका शाकारणी आणि दुरुस्तीमुळे मच्छीमार समुद्रात जात नसल्याने मासेमारीचे दर वाढले आहेत.

Read More »

आंबोली घाट होणार सुरक्षित

आंबोली घाट पावसाळ्यात कोसळू नये यादृष्टीने येथील दरडींना सुरक्षितता मिळावी म्हणून स्वित्झर्लंडलडवरून मागवलेली जाळी रविवारी दाखल झाली आहे.

सावंतवाडीआंबोली घाट पावसाळ्यात कोसळू नये यादृष्टीने येथील दरडींना सुरक्षितता मिळावी म्हणून स्वित्झर्लंडलडवरून मागवलेली जाळी रविवारी दाखल झाली आहे. ही जाळी बसवणारे तज्ज्ञ कामगारही आंबोलीत आले असून दोनच दिवसात या कामाचा प्रारंभ होणार आहे. जाळी घेऊन येणारे जहाज समुद्रात अडकल्याने विलंब झाला होता. परंतु आता ही जाळी येथे दाखल झाल्यामुळे पावसाळय़ातील आंबोली घाटाची चिंता मिटणार आहे. पावसापूर्वी घाट सुरक्षित होणार असून पर्यटकांना पावसाळय़ातील प्रवासाचा आनंद पुन्हा घेता येणार आहे.

ब्रिटिश कालखंडात आंबोली घाटाची निर्मिती करण्यात आली. वेंगुर्ले बंदरातून येणारा माल बेळगावसारख्या घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये नेता यावा तसेच आंबोली या हिलस्टेशनवर जाता यावे यादृष्टीने तत्कालीन ब्रिटिश अधिका-यांनी या घाटाची निर्मिती केली. हळूहळू पर्यटनाचे माहेरघर म्हणून हा घाट माध्यम ठरला आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या तीन राज्यातील पर्यटक याबरोबरच विदेशी पर्यटकही या घाटमार्गावरील पर्यटनस्थळांवर येऊ जाऊ लागले.

पर्यटनाचा ओघ वाढत असताना मागील दोन वर्षात घाटातील दरडी कोसळण्याचे दुखणे सुरू झाले. गेल्या दोन वर्षातील घाटातील दरड कोसळण्याची स्थिती लक्षात घेता हा घाट आता कायमचाच नष्ट होतो की काय, अशी भीती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणावर होणारी वर्षावृष्टी, बदलत चाललेला निसर्ग आणि काही प्रमाणात मानवी अतिक्रमण यामुळे धोकादायक बनलेला हा घाटमार्ग सुरक्षित बनविण्याच्या दृष्टीने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कामाला लागले. या घाट रस्त्याचा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त अभ्यास करण्यात आला. घाटात संरक्षण भिंती उभारताना ज्याठिकाणी मोठमोठय़ा दरडी आहेत त्या दरडी कोसळण्यापासून वाचवण्याकरिता स्वित्झर्लंडलडमधील जाळी बसवण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.

आंबोली घाटमार्ग वेंगुर्ले-आकेरी-बेळगाव या १८० क्रमांकाच्या राज्यमार्गावर आहे. वेंगुर्लेहून ४० किलोमीटर अंतरावर घाटमार्गाला सुरुवात होते. तर ५५ कि. मी. अंतरावर हा घाटमार्ग संपतो. तब्बल १५ किलोमीटरच्या या घाटमार्गाच्या ५४.३०० कि. मी. अंतरावर डोंगराची कडा सुटलेली होती.

ही कडा केव्हाही रस्त्यावर कोसळू शकते व रस्ता वाहतुकीस बंद होऊ शकतो हे लक्षात घेता हा धोकादायक कडा काढून टाकण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले होते. यानुसार १६ मे रोजी भुसुरुंगाच्या सहाय्याने हा धोकादायक कडा हटवण्यात आला. यावेळीही झालेल्या स्फोटाच्या दणक्याने बाजूच्या दरडी ठिसूळ बनल्या आहेत. त्यामुळे पावसाळय़ात हा घाटमार्ग पुन्हा एकदा कोसळून वाहतुकीस बंद होतानाच त्याचा पर्यटनावरही परिणाम होईल, अशी भीती निर्माण झाली होती. यामुळे जाळीचा पर्याय हाच एक नामी उपाय आहे, असे बांधकाम विभागाने सूचित केले. अखेर ही जाळी रविवारी येथे दाखल झाल्याने पावसापूर्वी हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे यांनी सांगितले.

Read More »

संजय दत्तला 'पुणेरी हिसका'

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी बॉलिवुडचा अभिनेता संजय दत्तला येरवडा कारागृहात आणून आठवडा उलटत नाही तोच संजय दत्तला 'पुणेरी हिसका' दाखवला आहे.
पुणे – १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी बॉलिवुडचा अभिनेता संजय दत्तला येरवडा कारागृहात आणून आठवडा उलटत नाही तोच संजय दत्तला 'पुणेरी हिसका' दाखवला आहे. येरवडा कारागृह प्रशासनाने दत्तला घरचे जेवण द्यायला विरोध करत न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशा आशयाचा अर्ज टाडा न्यायालयात सादर केला असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली.

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना घरचे जेवण देणे, हे कारागृह प्रशासनाच्या नियमांच्या विरोधात आहे, असे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. संजय दत्तच्या अटकेनंतर एक महिनाभर घरच्या जेवणाची मुभा टाडा कोर्टाने दिली होती. परंतु राज्यातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सन २००० पासून घरचे जेवण देण्यास बंदी आहे. कैद्यांना पोषक जेवण कारागृहामधूनच दिले जाते. त्यामुळे संजय दत्तला घरच्या जेवणाची गरज नाही, असेही तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. न्यायालयाने संजय दत्तबाबत दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती टाडा न्यायालयाकडे केली आहे.

संजय दत्तकडे फाइल बनवण्याचे काम
शस्त्रास्त्र कायद्याखाली दोषी ठरलेल्या संजय दत्तचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम हलला असून तो येरवडा तुरुंगात पोहोचलाय. तिथे तो साडेतीन वर्ष राहणार आहे. या काळात त्याला इतर कैद्यांप्रमाणेच काहीतरी काम करावे लागणार असून, संजय दत्तकडे फाइल बनवण्याचे आणि पेपर बाइंडिंगचे काम देण्याचे तुरुंग अधीक्षकांनी ठरवले आहे. त्याचा मोबदला म्हणून त्याला २५ ते ४० रुपये रोजंदारी मिळणार आहे. येरवडा तुरुंगात पुढचे ४२ महिने तो हेच काम करणार आहे.

Read More »

बारावीचा निकाल ३० मे ला

राज्य  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या उच्च माध्यमिक विभागाचा (१२ वी) निकाल येत्या ३० मे ला जाहीर होणार आहे.

मुंबई- राज्य  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या उच्च माध्यमिक विभागाचा (१२ वी) निकाल येत्या ३० मे ला जाहीर होणार आहे. मंडळाच्या http://www.msbshse.ac.in/ या संकेत स्थळावर सकाळी अकरा वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईसह पुणे,नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती अशा नऊ जिल्ह्यातील अंदाजे १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थी बसले आहेत.  तर मुंबई विभागातून तीन  लाख ८१ हजार ४४० विद्यार्थी बसले आहेत.

Read More »

कॉल डेटा रेकॉर्ड मिळवण्याचा अधिकार द्या

इन्सायडर ट्रेडिंग आणि बाजारातील गैरप्रकारांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींच्या चौकशीत त्यांचा कॉल डेटा मिळण्याची मागणी बाजार नियामक 'सेबी'ने केली आहे.
मुंबई - इन्सायडर ट्रेडिंग आणि बाजारातील गैरप्रकारांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींच्या चौकशीत त्यांचा कॉल डेटा मिळण्याची मागणी बाजार नियामक 'सेबी'ने केली आहे. त्याच वेळी आपल्याला फोन टॅपिंगच्या अधिकाराची मागणी नसल्याचेही सेबीने स्पष्ट केले आहे. ज्या कंपन्यांची चौकशी सुरू आहे, अशा कंपन्यांचा कॉल डेटा सेबीला गरजेचा आहे. यामुळे इन्सायडर ट्रेडिंग आणि अन्य गैरप्रकाराचा तपास अधिक सुकर होण्यास मदत होईल, असे सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी सांगितले.

कॉल डेटा रेकॉर्डमध्ये संबंधितांमध्ये किती वेळा संभाषण झाले याची माहिती उपलब्ध होते. यात कुठेही फोन टॅपिंगचा प्रश्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका आणि काही देशांमध्ये इन्सायडर ट्रेडिंग आणि इतर चौकशीसाठी सर्रास फोन टॅपिंगचा आधार घेतला जातो. रजत गुप्ता यांचे उदाहरण यासाठी ताजे आहे.

गेल्या दोन वर्षापासून 'सेबी'कडून कॉल डाटा रेकॉर्ड थेट मिळण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी आहे. ही माहिती मिळाल्यास चौकशी अधिक सोपी होऊ शकेल, असा विश्वास सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. २००२मध्ये सेबी अ‍ॅक्टमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला होता. मात्र सेबीच्या अधिकारांत आणखी वाढ करण्याची काळाची गरल असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.

Read More »

टोयोटा अल्टीस मोटारी परत घेणार

जपानची आघाडीची मोटार उत्पादक टोयोटा सेडान प्रकारातील १,००० अल्टीस मोटारी परत घेणार आहे.
नवी दिल्ली - जपानची आघाडीची मोटार उत्पादक टोयोटा सेडान प्रकारातील १,००० अल्टीस मोटारी परत घेणार आहे. तीन ऑगस्ट २०१२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत उत्पादित केलेल्या डिझेलमधील अल्टीस मोटारींचा 'ड्राइव्ह शाफ्ट' सदोष असल्याने त्याला बदलण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ड्राइव्ह शाफ्टमध्ये दोष असल्यामुळे उजव्या आणि डाव्या बाजूला मोटार वळवताना अडचणीचे ठरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, ज्यामुळे अशा मोटारींना परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे टोयोटा किर्लोस्करने म्हटले आहे. तीन ऑगस्ट २०१२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत उत्पादित झालेल्या डिझेल प्रकारातील अल्टीसमध्ये हा दोष असून त्याला मोफत बदलून दिले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More »

३५ हजार करदात्यांना नोटिसा

करपरतावा भरण्यास टाळाटाळ करणा-या ३५ हजार करदात्यांना सोमवारी प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत.
नवी दिल्ली – करपरतावा भरण्यास टाळाटाळ करणा-या ३५ हजार करदात्यांना सोमवारी प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांसह प्राप्तिकर विभागाने अशा प्रकारे नोटिसा बजावलेल्या करदात्यांची संख्या १.७५ लाखांवर गेली आहे.

करमहसूल वाढवण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. करपरतावा न भरणा करदात्यांना शोधून त्यांना थेट लेखी पत्र पाठवून त्यांच्या करविषयक जबाबदारीची जाणीव करण्याची मोहीमच प्राप्तिकर विभागाने राबवली आहे. या विभागाने अशा १२ लाख करदाते शोधून त्यांची यादी केली आहे. यातील करदात्यांना प्राधान्यानुसार नोटिसा पाठवल्या जात आहेत.या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून करदात्यांनी मोठय़ा प्रमाणावर कर भरल्याचा दावा प्राप्तिकर विभागाने केला आहे.

Read More »

व्होडाफोन नव्या गुंतवणुकीच्या तयारीत

ब्रिटिश दूरसंपर्क कंपनी व्होडाफोन आणि सरकार यांच्यात करविषयक उभा वाद असला तरी देशातील गुंतवणुकीवर त्यांचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास दूरसंपर्कमंत्री कपिल सिबल यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली – ब्रिटिश दूरसंपर्क कंपनी व्होडाफोन आणि सरकार यांच्यात करविषयक उभा वाद असला तरी देशातील गुंतवणुकीवर त्यांचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास दूरसंपर्कमंत्री कपिल सिबल यांनी व्यक्त केला आहे. नव्याने अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी व्होडाफोनने चालवली असून, गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या दोनेक वर्षापासून दूरसंपर्क क्षेत्राचे नाव हे कुठल्या ना कुठल्या वादाशी जोडले गेले आहे. यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीला त्याचा मोठा फटका बसला. मात्र पुढच्या २० वर्षाचा आवाका लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या दूरसंपर्क धोरणामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा विश्वास बळावू लागला असल्याचे सिबल यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून समोरून गुंतवणुकीचे प्रस्ताव येऊ लागले असल्याचे ते म्हणाले. देशातील आघाडीची कंपनी व्होडाफोनच्या प्रमुखांनी या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचे सिबल यांनी सांगितले.

सरकारने व्होडाफोनबरोबरचा ११,२१७ कोटींच्या कराविषयर सुरू असलेला वाद न्यायालयाबाहेर परस्पर सामंजस्यातून सोडवण्याचा निर्णय घेतला असताना व्होडाफोनची ही भूमिका विशेष महत्त्वाची आहे. मात्र गुंतवणूक आणि समेटाची पावले हे वेगवेगळे विषय असून त्यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे सिबल यांनी स्पष्ट केले. सध्या दूरसंपर्क क्षेत्र कठीण काळातून वाटचाल करत आहे. १२२ टूजी परवाने रद्द झाल्याचा फटका बसल्याने बँकांकडून कर्जे मिळत नसल्याचे असल्याचे सिबल यांनी सांगितले.

व्होडाफोनने देशात मोठ्या गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे. मात्र करविषयक वादातील समेटाची चर्चा आणि गुंतवणूक यांचा एकमेकांशी कोणताच संबंध नाही. – कपिल सिबल, दूरसंपर्कमंत्री

Read More »

विकास दर ४.८ टक्के राहील

सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या सुधारणांमुळे चौथ्या तिमाहीत विकास दर पाच टक्क्यांच्या आसपास राहील, असा विश्वास अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई - सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या सुधारणांमुळे चौथ्या तिमाहीत विकास दर पाच टक्क्यांच्या आसपास राहील, असा विश्वास अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. क्रेडिट सूस, डीबीएस आणि नोमुरा यांनी चौथ्या तिमाहीत विकास दर ४.८ टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

२०१२-१३ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहींमध्ये विकासाची आकडेवारी फारशी आशादायक नव्हती. विकास दराने दशकभराचा नीचांक गाठला होता. यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत विकास दर ४.५ टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. विकासाला चालना देण्यासाठी सरकारकडून खर्च कपात, गुंतवणूक वाढवणे यासारखे प्रयत्न करण्यात आले. ज्यामुळे विकास दरामध्ये काही प्रमाणात सुधारणा होईल, असा विश्वास या संस्थांच्या अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून गुरुवारी चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. अनुदान कपातीवर दिलेला भर, कमी झालेले व्याजदर आणि गुंतवणूक वाढीस पोषक वातावरण यामुळे मार्चच्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी चांगली राहील, असे क्रेडिट सुसचे मुख्य अर्थतज्ज्ञ रॉबर्ट प्रायर वाँडसफोर्ड यांनी सांगितले. तर सरकारी खर्चाचा भार अपेक्षेप्रमाणे कमी झालेला नाही. तसेच बाजारातील मागणीही रोडावल्याने या तिमाहीत विकास दर ४.५ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा अंदाज नोमुराच्या मुख्य अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा यांनी व्यक्त केला आहे.

चौथ्या तिमाहीत विकास दर ४.५ टक्के राहील, तर २०१२-१३ साठी सरासरी पाच टक्के राहील, असे डीबीएस बँकेच्या अर्थतज्ज्ञ राधिका राव यांनी सांगितले. चौथ्या तिमाहीत औद्योगिक उत्पादनामध्ये केवळ १.८ टक्क्यांची वाढ झाली. औद्योगिक क्षेत्राची गेल्या वर्षभरातील निराशाजनक कामगिरीचा परिणाम जीडीपीवर दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.

तीन तिमाहींतील विकास दर
पहिली तिमाही ५.५ टक्के
दुसरी तिमाही ४.५ टक्के
तिसरी तिमाही ५.१ टक्के

Read More »

लोढा रहिवासी पाणीटंचाईने हैराण

लोढा पॅराडाइजचे रहिवासी पाणीटंचाई आणि 'मॅक्डोनाल्ड'मुळे होणा-या वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत.
ठाणे – लोढा पॅराडाइजचे रहिवासी पाणीटंचाई आणि 'मॅक्डोनाल्ड'मुळे होणा-या वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. याबाबत या परिसरातील रहिवाशांनी महापालिकेकडे दाद मागितली, आंदोलने केली. तरीदेखील त्यांची या समस्यांतून सुटका झालेली नाही.

भिवंडी बायपास महामार्गावर असलेल्या लोढा पॅराडाइज संकुलात १४ सोसायटय़ा आहेत. सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच 'मॅक्डोनाल्ड' सुरू करण्यात आले आहे. 'मॅक्डोनाल्ड'ने सोसायटीचा फूटफाथ ताब्यात घेऊन तेथे दुचाकींसाठी पार्किंग सुरू केली आहे. सायंकाळी या परिसरात ग्राहकांची वाहने उभी असल्याने मोठी कोंडी होते. या संकुलातून दररोज बेस्ट, टीएमटी, एनएमएमटी इत्यादी बसच्या तब्बल १२८ फेऱ्या होतात. त्यामुळे होणा-या वाहतूक कोंडीमुळे येथील रहिवाशांना मात्र अडकून पडावे लागते. मॅक्डोनाल्डमध्ये लावण्यात आलेल्या जनरेटरमुळेही रहिवासी त्रस्त झाले आहेत. लोढा संकुलाला ठाणे महापालिकेकडून सहा इंची व्यासाच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा होतो. मात्र मॅक्डोनाल्डला पालिकेच्या अधिका-यांनी दोन ते तीन इंची जलवाहिनी मंजूर केली. लोढाची स्वत:ची जलवाहिनी असताना या वाहिनीतले पाणी इतर सोसायट्यांना महापालिकेचे कर्मचारी देतात. त्यामुळे लोढा संकुलातील सोसायट्यांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे, असा आरोप लोढा पॅराडाइज सोसायटीचे अध्यक्ष अशोक पोहेकर यांनी केला आहे. प्रत्येक सोसायटीला दररोज सहा टँकर पाणी आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्यासाठी १३०० रुपये व साध्या पाण्यासाठी ८०० रुपये असा दर लावल्याने प्रत्येक सोसायटीला मासिक दोन लाख रुपयांचा भरुदड सहन करावा लागत आहे. कमी पाणीपुरवठा होत असल्याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती. पालकमंत्री ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गिरीश मेहेंदळे यांना आठ दिवसांत पाहणी करून उपाय करण्याचा आदेश दिला होता. पण अद्याप महापालिकेकडून कार्यवाही झालेली नाही. किंबहुना मॅक्डोनाल्डबाबतही अद्याप पाऊल उचलण्यात आलेले नाही, असे पोहेकर यांनी सांगितले.

Read More »

नवरोबाची लग्नमंडपातून वरात पोलिस ठाण्यात

एका महिला पोलिसाशी प्रेमसंबंध ठेवून दुस-याच महिला पोलिसाजवळ लग्न करण्याचा घाट घालणा-या पोलिस नवरोबाची वरात भिवंडीतून कळवा पोलिस ठाण्यात काढण्यात आली.
भिवंडी – एका महिला पोलिसाशी प्रेमसंबंध ठेवून दुस-याच महिला पोलिसाजवळ लग्न करण्याचा घाट घालणा-या पोलिस नवरोबाची वरात भिवंडीतून कळवा पोलिस ठाण्यात काढण्यात आली.

सोमवारी सकाळी शहापूर येथून लग्न लावण्यासाठी आलेल्या नवरीसह तिच्या नातेवाइकांना या नवरोबाचे पितळ उघडे पाडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भास्कर पाटील (२५ रा सोनटक्के, भिवंडी) असे दोन महिलांना फसवणा-या नवरदेवाचे नाव आहे. सचिन हा नवी मुंबई पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. त्याची ओळख ठाणे शहर पोलिस ठाण्यात कार्यरत तन्वी (बदलले नाव) हिजसोबत वर्षभरापूर्वी झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यातून सचिनने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. लग्नासाठी या महिलेला चकवा देत ग्रामीण पोलिस मुख्यालयातील अन्य महिलेसोबत पोलिसाने लग्नकार्य ठरवले. सोमवार २७ मे रोजी लग्नाची तयारी सुरू असताना याची कुणकुण तन्वीला लागली. त्यानंतर तिने थेट कळवा पोलिस ठाणे गाठून सचिनविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गंभीर घटनेची कळवा पोलिसांनी दखल घेऊन त्यांनी भिवंडी तालुका पोलिसांच्या मदतीने सोनटक्का गाव गाठून लग्नाच्या मंडपातून सचिनला अटक केली.

हुंडा न दिल्याने ठरलेले लग्न मोडले

ठाणे - हुंडा न दिल्याने नवरदेवाने ठरलेले लग्न मोडल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राकेश रवींद्र राठोड याच्यासह कुटुंबीयांविरोधात वर्तकनगर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. हा वाद आपसांत मिटवण्यासाठी पोलिस पुढाकार घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

साखरपुडय़ाच्या वेळी नवरदेवाने मोटारसायकल व सोन्याचा ऐवज सासरच्या मंडळींकडून घेतला होता. मात्र, तेवढय़ावरही न भागलेल्या रवींद्रने एक लाख रुपये हुंडय़ाची मागणी केली होती. माजिवडा गाव कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये राहणारी दीप्ती घोलप हिचा विवाह वर्तकनगर येथील राठोड चाळीत राहणा-या रवींद्रसोबत ठरला होता. २८ मे रोजी लग्नसोहळा होणार होता. मात्र, ऐन वेळी रवींद्रने लग्नास नकार दिल्याने घोलप कुटुंबीयांवर आभाळ कोसळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रेमंड कंपनीत नोकरीला असलेल्या दीप्तीच्या वडिलांचे निधन झाले असून, त्यांच्या निवृत्तीवेतनावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. दीप्तीच्या भावाचे अपघाती निधन झाल्याने तिची आई व दोघी राहत आहेत. साखरपुडा ठरल्यानंतर रवींद्रने दीप्तीच्या भावाची मोटारसायकल व सोन्याचा ऐवज लाटल्याचे समोर येत आहे. दीप्ती आणि रवींद्र यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त लग्नपत्रिकांचे वाटप झाले आहे. मात्र, अवघ्या एका दिवसावर विवाह सोहळा असताना हुंडा न मिळाल्याने लग्न मोडल्याचे राठोड कुटुंबीयांनी कळवले आहे. त्यामुळे नैराश्यातून दीप्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Read More »

अनधिकृत बांधकामांना वीजपुरवठा नको

महाड शहरात उभारण्यात येणा-या अनधिकृत बांधकामांना वीजपुरवठा करू नका, अशी सूचना महाड नगरपालिकेने महावितरण कार्यालयाला केली आहे.
महाड - शहरात उभारण्यात येणा-या अनधिकृत बांधकामांना वीजपुरवठा करू नका, अशी सूचना महाड नगरपालिकेने महावितरण कार्यालयाला केली आहे. ही सूचना करताना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय यांनी दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला आहे.

महावितरण कंपनी शिधा पत्रिका, स्थानिक कर पावती, मंजूर नकाशा, खरेदी करार, भाडे पावती आदींची मागणी करते. ही कागदपत्रे उपलब्ध नसल्यास संबंधित मागणीकर्त्यांकडून २०० रुपयांच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र घेऊन वीजजोडणी करून दिली जाते. या प्रतिज्ञापत्रात सर्व जबाबदारी संबंधित ग्राहकावर टाकली जाते. त्यामुळे अगदी सहजपणे अनधिकृत बांधकामांना वीजपुरवठा मिळतो. महाडमध्ये अनधिकृत बांधकामांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकामे उभारून बांधकाम व्यावसायिक सदनिका (फ्लॅट) विकत आहेत. अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई अत्यंत किचकट आहे. या बाधकामांना अभय मिळत असताना २०० रुपयांच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र केल्यास कोणतेही कागदपत्र नसताना वीजपुरवठा होतो. या नियमाचा गैरफायदा घेत अनधिकृत बांधकामांचे पेव महाडमध्ये फुटत आहे. वीजपुरवठा झाला नाही तर ही अनधिकृत बांधकामे थांबतील, असा युक्तिवाद करत महाड नगरपालिकेने 'ना हरकत' दाखल्याशिवाय वीज जोडणी करू नका, अशी सूचना महाडमधील महावितरणच्या कार्यालयाला केली आहे. ही सूचना करताना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालयाचा सहा नोव्हेंबर १९९१ आणि १० ऑक्टोबर १९८४ तसेच २५ सप्टेंबर १९८५ च्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. या सरकारी निर्णयाचा आधार घेताना स्थानिक सक्षम अधिकारी अथवा प्राधिकरणाच्या 'ना हरकती' शिवाय वीजपुरवठा करू नका, असे बजावले आहे.

वीजपुरवठा हा महावितरण कंपनीच्या नियमानुसारच केला जात आहे. अनधिकृत बांधकामांसंबंधी नगरपालिका तसे लेखी देत असल्यास अनधिकृत बांधकामांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. यापुढे पालिकेचा 'ना हरकत' दाखला सक्तीने मागितला जाईल. – क्यू. एस. शेख, उपकार्यकारी अभियंता, महाड

अनधिकृत बांधकामप्रकरणी तक्रारी वाढत असून, त्यात वाढ होत आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. – दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, महाड नगरपालिका.

Read More »

..तर सत्ताधा-यांचा डाव हाणून पाडू!

लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला पालिकेच्या सेवेत घेण्यास काँग्रेस व मनसेने जोरदार विरोध दर्शवला आहे.

कल्याण – लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला पालिकेच्या सेवेत घेण्यास काँग्रेस व मनसेने जोरदार विरोध दर्शवला आहे. 'सुनील जोशीसाठी सत्ताधा-यांची फिल्डिंग, असे वृत्त सोमवारी 'प्रहार'मधून प्रसिद्ध झाल्याने पालिका वर्तृळात खळबळ माजली होती. जोशीला सेवेत घेण्यासाठी सत्ताधा-यांनी खटाटोप चालवला असला तरी, त्यांचा व प्रशासनाचा हा डाव हाणून पाडू, असा इशाराच मनसे व काँग्रेसने दिला आहे. मंगळवार २८ मे रोजी पालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्या दालनात निलंबन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत जोशीच्या अर्जावर समिती काय निर्णय घेते, याकडे लक्ष
लागले आहे.

२००९ रोजी जोशीला पाच लाखांची लाच स्वीकारताना अटक झाली होती. त्या वेळेपासून पालिका प्रशासनाने जोशीवर निलंबनाची कारवाई केली. दोन वर्षापेक्षा जादा काळ निलंबन झाल्याने ते रद्द करून सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी जोशीने एका पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. जोशीला सेवेत घेण्यासाठी फिल्डिंग लावणा-या पालिकेतील काही धुरिणांची शिवसेनेत वरिष्ठ पातळीवरून खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे.

जोशीचे भवितव्य समितीच्या हातात?
महापालिकेतील निलंबित अधिका-यांचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार केडीएमसी आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. पालिकेत विविध प्रकरणात १८ अधिकारी व कर्मचारी निलंबित आहेत. कर्मचारी व अधिका-यांचे निलंबन योग्य आहे का, त्यांच्यावर अन्याय होतोय का, निलंबन रद्द करून नोकरीवर घेणे योग्य आहे का, आदी विविध बाबी तपासून ही समिती आढावा घेते. या समितीचे अध्यक्ष आयुक्त असून, सामान्य प्रशासनाचे उपायुक्त गणेश देशमुख, मागासवर्गीय कक्षाचे चेअरमन अशोक बैले, मुख्य लेखाधिकारी अनुदीप दिघे, सहाय्यक आयुक्त विनय कुलकर्णी व ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील एक अधिकारी हे समितीवर सदस्य कार्यरत आहेत. जोशी यांच्या निलंबनाला दोन वर्षे होत असल्याने समितीच्या माध्यमातून पालिकेत पुन्हा येऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यासाठी सत्ताधा-यांकडूनही मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे जोशीचे भवितव्य आता समितीच्या निर्णयावरच अवलंबून आहे.

मनसे भूमिकेवर ठाम
जोशीविरोधात दोन अभियोग दाखल आहेत. त्यामुळे कायद्यानुसार त्याचा विषय पटलावर येऊ शकत नाही. सत्ताधारी व प्रशासनाने हा विषय संगनमत करून आणल्यास मनसे कडाडून विरोध होईल. मनसेची भूमिका पूर्वीही तीच होती व आताही त्यावर ठाम असल्याचे पालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सांगितले. भ्रष्ट अधिका-याला काँग्रेस कधीही समर्थन देत नाही, त्यामुळे काँग्रेसचाही विरोध कायम असल्याचे काँग्रेसचे गटनेते सचिन पोटे यांनी सांगितले.

Read More »

विजयी सलामीसाठी नाडालला द्यावी लागली झुंज

विक्रमी आठव्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलेला तिसरा मानांकित स्पेनच्या राफाएल नाडालला पहिल्याच फेरीत विजयासाठी झुंज द्यावी लागली.

पॅरिस - विक्रमी आठव्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलेला तिसरा मानांकित स्पेनच्या राफाएल नाडालला पहिल्याच फेरीत विजयासाठी झुंज द्यावी लागली. जर्मनीच्या डॅनियल ब्रॅँड्सविरुद्ध पहिला सेट नाडालला गमवावा लागला होता. दुस-या सेटही नाडालने टायब्रेकरवर जिंकला होता. मात्र त्यातून वेळीच सावरत नाडालने पुढचे दोन्ही सेट जिंकले. याबरोबरच त्याने ४-६, ७-६, ६-४, ६-३ या फरकाने सामना जिंकला.

पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत सहावा मानांकित फ्रान्सच्या जो-विल्फ्रेड त्सोंगाने स्लोवाकियाच्या अ‍ॅलझॅझ बेडेनेवर ६-२, ६-२, ६-३ असा सहज विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. १०वा मानांकित क्रोएशियाच्या मॅरिन चिलीचने जर्मनीच्या फिलिप पेट्शनरला ६-१, ६-२, ६-३ असे पराभूत केले.

११वा मानांकित स्पेनच्या निकोलस अल्मागरेने सलामीला ऑस्ट्रियाच्या आंदेयास हेदर-मॉरेरला ४-६, ६-४, ६-३, ६-३ असे नमवले. महिला एकेरीत सहाव्या मानांकित चीनच्या ली नाने स्पेनच्या अ‍ॅनाबेल मेदिना गॅरिग्यूसला ६-३, ६-४ असे नमवत दुसरी फेरी गाठली. ली नाने यापूर्वी २०११ मध्ये फ्रेंच ओपन एकेरीचे जेतेपद पटकवले होते. चौथ्या मानांकित पोलंडच्या अ‍ॅग्नेस्का रॅडवांस्काने इस्त्रायलच्या शहार पीरला ६-१, ६-१ असे सहज नमवले. १५व्या मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीनेही फ्रान्सच्या स्टेफनी फोट्र्झ गॅकनचा ६-३, ६-० असा पराभव केला.

तत्पूर्वी, रविवारी उशीरा झालेल्या सलामीच्या लढतींमध्ये चौथा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने ऑस्ट्रेलियाच्या मॅरिंको मॅटोसेविकला ६-४, ६-३, ६-४ असे नमवले.

व्हिनस सलामीलाच पराभूत

सात ग्रॅँडस्लॅम विजेती अमेरिकेची व्हिनस विल्यम्स १२ वर्षानंतर फ्रेंच ओपनमध्ये सलामीलाच पराभूत झाली आहे. ३२ वर्षीय व्हिनसला रविवारी पोलंडच्या उर्झुला रॅडवांस्काकडून ६-७, ७-६, ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी २००१मध्ये व्हिनस फ्रेंच ओपनच्या सलामीला पराभूत झाली होती.

सोमदेव-फेडरर आज आमनेसामने

भारताचा सोमदेव देववर्मन मंगळवारी (२८ मे) दुसरा मानांकित स्वित्झर्लंडलडच्या रॉजर फेडररशी दुस-या फेरीत दोन हात करेल. विशेष म्हणजे सोमदेव हा फेडररचा नेहमीच चाहता राहिलेला आहे. सोमदेव यापूर्वी २०११मध्ये दुबई टेनिस स्पर्धेत फेडररविरुद्ध खेळला होता. त्यावेळी झालेल्या मोठय़ा पराभवामुळे सोमदेवचे ४५ एटीपी गुण कमी झाले होते.

सोमदेवने रविवारी एकेरीत स्पेनच्या डॅनियल मुनोझ-डे लानावाला ६-३, ६-३, ७-५ असे नमवत विजयी सलामी दिली. फ्रेंच ओपनमध्ये सोमदेवला प्रथमच पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला आहे. एकेरीत भारताची भिस्त एकटय़ा सोमदेववर आहे.

Read More »

ठाणे रेल्वे स्थानकात सरकता जिना दाखल

ठाणे रेल्वे स्थानकात बसवण्यात येणा-या जिन्यांपैकी एक सरकता जिना अखेर फलाट क्रमांक ३/४ वर दाखल झाला आहे.
ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकात बसवण्यात येणा-या जिन्यांपैकी एक सरकता जिना अखेर फलाट क्रमांक ३/४ वर दाखल झाला आहे. ठाणे स्थानकावरील नव्या पादचारी पुलाला हा जिना जोडला असला तरी अद्याप तो सुरू झालेला नाही. सर्व जिन्यांची जोडणी व चाचणी झाल्यानंतर महिनाअखेर त्यांचा वापर सुरू होईल.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 'एमआरव्हीसी'ने केलेल्या सर्वेक्षणात ठाणे रेल्वे स्थानक वर्दळीचे स्थानक असल्याचे समोर आले आहे. ठाणे स्थानकात एकूण अकरा फलाट आहेत. त्यातील दोन, तीन, चार, पाच आणि सहा या फलाटांवर सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळून वृद्ध व्यक्ती, महिला, लहान मुले, गरोदर स्त्रिया आदींना प्रवास करणे नेहमीच कर्मकठीण होत असते. येथे वारंवार होणा-या चेंगराचेंगरीनंतर नवे जिने, नवा पूल बांधण्यात आला होता. आता प्रवाशांची यातायात आणखी सुलभ व्हावी यासाठी फलाट क्रमांक तीन, चार तसेच पाच आणि सहा येथे सरकते जिने बसवण्यात येत आहेत.

ठाणे स्थानकाला पहिला मान
मुंबईला मागे टाकत सरकते जिने बसवण्याचा पहिला मान ठाणे रेल्वे स्थानकाने मिळवला आहे. रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या तरी कोणत्याही रेल्वे स्थानकात सरकते जिने नाहीत. त्यामुळे सरकते जिने असलेले ठाणे हे पहिलेच स्थानक असणार आहे.

Read More »

जेठमलानींची भाजपमधून हाकलपट्टी

भाजपचे ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून त्यांना काढून टाकण्यात आले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई  करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Read More »

राहुल गांधींचा दुष्काळी दौरा सुरु

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींच्या दुष्काळी भागाच्या दौ-याला मंगळवारी सुरुवात झाली.
औरंगाबाद – काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींच्या दुष्काळी भागाच्या दौ-याला मंगळवारी सुरुवात झाली. या दौ-याची सुरुवात त्यांनी औरंगाबाद येथून केली आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील काही दुष्काळी भागाला भेट दिली. शेतक-यांशी संवाद साधत तेथील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा रद्द केला होता. मात्र छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन  यात्रेवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर सोमवारी त्यांनी आपण दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते.

Read More »

विंदूच्या पोलिस कोठडीत वाढ

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी विंदू रांधवा याच्या पोलिस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई - स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी विंदू रांधवा याच्या पोलिस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईच्या स्थानिक न्यायालयात मंगळवारी हा निर्णय देण्यात आला. विंदूवर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगसाठी बुकींना मदत केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, शुक्रवारी न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता.विंदूचे काही बूकींशी जवळचे संबंध होते. त्यांच्यामार्फत तो सट्टा  लावत  होता.

Read More »

'मंदी तात्पुरती,८ टक्के विकासदराचे लक्ष्य'

मंदी तात्पूरती असून येत्या वर्षांत विकासदर आठ टक्क्यांपर्यंत गाठण्याचे लक्ष्य साध्य होईल असा  विश्वास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.

टोकियो – जागतिक मंदी ही तात्पुरत्या स्वरुपाची असून भारतीय अर्थव्यवस्थेची पाळमूळं मजबूत आहेत. त्यामुळे घटलेला विकासदर पुन्हा आठ टक्क्यांवर स्थिरावेल असा विश्वास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. ते येथील इंडस्ट्री चेंबरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या वर्षी आर्थिक विकासाच्या दराने पाच टक्क्यांपर्यंत निचांकी पातळीला स्पर्श केला होता. ही एक तात्पूरती मंदी होती. मात्र असं असलं तरीही २०१३-१४ या चालू आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल. पंतप्रधानांनी यावेळी गेल्या दहा वर्षांच्या विकासदाराचाही दाखला दिला. गेल्या दहा वर्षांत विकास दर आठ टक्क्यांपर्यंत स्थिर राखण्यात सरकारला यश आले आहे. त्यामुळे या तात्पुरत्या मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही तसेच ढासळलेला आठ टक्क्यांचा विकास दर पुन्हा गाठण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय अर्थव्यवस्थेची पाळमूळं मजबूत आहेत. त्याशिवाय भारताने किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणूकदारांनाही देशांतर्गत गुंतवणूकीची कवाडे उघडी केली आहेत. याचा फायदाही अर्थव्यवस्थेला होत आहेत. येत्या काही काळात रोखे बाजारात आणखीन काही नव्या सुधारणा करण्याचा मानस असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या आर्थिक सुधारणांचा परिणाम विकास दरावर दिसून येत असल्यामुळे चालू आर्थिक वर्षांत विकासदर सहा टक्क्यांपर्यंत पोहचला असल्याचा पुन:रुच्चार त्यांनी केला.

Read More »

जय हिंद !

जोधपूर येथे पासिंग आउट परेड करताना बीएसएफचे जवान

 

Read More »

डूबकी…

उकाड्याने हैराण झाल्यावर गंगेच्या तिरावर डूबकी मारण्याचा आनंद काही औरच…

Read More »

भरपेट आंबा खा!

पटना येथे आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात भरपेट आंबा खाण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थीनी.

Read More »

धक-धक गर्ल माधुरी

नच बलियेच्या नव्या सिझनच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये धक-धक गर्ल माधूरी दिक्षीतने आपल्या दिलखेच अदाकारीने सर्वांना जिंकून घेतले.

Read More »

नीरा राडियांची साक्ष…

टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी महत्वाचा साक्षीदार असलेल्या माजी  कॉर्पोरेट लॉबिस्ट निरा राडिया पटियाला न्यायालयातून बाहेर पडताना… राडिया यांनी साक्ष देण्यास टाळाटाळ केल्याने न्यायालयाने त्यांना फटकारले.

Read More »

श्रीशांत,चंडिलाला चार जूनपर्यंत कोठडी

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी असलेला क्रिकेटपटू श्रीशांतला चार जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मुंबई - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी असलेला क्रिकेटपटू श्रीशांतला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  त्याला चार जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अजित चंडेलालासुदधा चार जून पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Read More »

'आली लग्नघटिका समीप…'

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला व्हावा यासाठी सोलापूरमध्ये गाढवाचं लग्न लावण्यात आले.

Read More »

नीरा राडियांना न्यायालयाची ताकीद

२ जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणात प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करणा-या माजी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांनी मंगळवारी दिल्ली न्यायालयाने ताकीद दिली.

नवी दिल्ली – २ जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणात प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करणा-या माजी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांनी मंगळवारी दिल्ली न्यायालयाने ताकीद दिली.

या प्रकरणात तुम्ही संवेदनशील आणि महत्वाच्या साक्षीदार आहात. त्यामुळे तुमची उत्तरे सविस्तर असली पाहिजेत असे विशेष सीबीआय न्यायाधीश ओ.पी.सैनी यांनी त्यांना बजावले. विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्याऐवजी राडिया पुटपुटत उत्तरे देत होत्या त्यावर न्यायालयाने त्यांना ही समज दिली.

टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेडने २००५ मध्ये सीडीएमए परवान्यासाठी अर्ज केला होता. पण त्यांना २००८ मध्ये परवाना मिळाला. त्यांना परवाना मिळण्यास तीनवर्षाचा विलंब का लागला ? या सीबीआय वकिलाने विचारलेल्या सरळ प्रश्नावर राडिया उत्तर देण्याचे टाळत होत्या. त्यावर न्यायालयाने त्यांना ही ताकीद दिली.

Read More »

कोकण, बारामतीला पावसाचा तडाखा

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पावसाने हजेरी लावली. बारामती तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे जनावरांची छावणी उडाली.

बारामती - राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पावसाने हजेरी लावली. बारामती तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे जनावरांची छावणी उडाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पावसाने येथे एका घरावर झाड पडून घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

तर लातुरात झालेल्या तुरळक पावसाने परिसरातील तापमानात काही प्रमाणात घट झाली. बारामती तालुक्यातील जिरायत पटयातील मगरवाडी, चौधरवाडी व नाईकवाडी, देऊळवाडीसह आसपासच्या गावांतून वळवाच्या वादळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. मगरवाडी येथील जनावरांची छावणी वादळामुळे उडून गेली. त्यामुळे काही छावणीतील जनावरे देखील जखमी झाले.

Read More »

सल्वा जुडूमचा सूड उगवण्यासाठी हल्ला

काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी नक्षलवाद्यांनी मंगळवारी स्वीकारली. 

रांची - काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी नक्षलवाद्यांनी मंगळवारी स्वीकारली. 'सल्वा जुडूम' व 'ऑपरेशन ग्रीन हंट' या नक्षलवादविरोधी मोहिमांचा सूड उगवण्यासाठीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल व महेंद्र कर्मा यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची हत्या केल्याचे त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. नक्षलीविरोधात संपूर्ण देशात सुरू असलेल्या सर्व मोहिमा बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

''काँग्रेस नेते महेंद्र कर्मा व अन्य प्रमुख नेत्यांची हत्या करणे हाच तब्बल दोन तास चालेल्या या चकमकीचा प्रमुख हेतू होता. यात तळागाळाचे काँग्रेस कार्यकर्ते व निरपराध नागरिकही ठार झाले. ते आमचे शत्रू नव्हते. आम्ही त्यांच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त करत आहोत,'' असे नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा प्रवक्ता गुडसा उसेंदी याने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विद्याचरण शुक्लांच्या प्रकृतीत सुधारणा
नक्षलींच्या हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते विद्याचरण शुक्ला यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असून, त्यांच्या जीवितावरचा धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Read More »

फिक्सिंगच्या प्रश्नांवर ढोणीचे मौन

 भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले.

मुंबई : इंग्लंडमध्ये होणा-या चँपियन्स ट्रॉफीपूर्वीच्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले.

स्पॉटफिक्सिंगप्रकरणानंतर ढोणी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आल्याने मीडियाच्या प्रतिनिधींनी थेट त्याच प्रकरणी प्रश्नांचा भडिमार केला. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून स्पॉटफिक्सिंगबाबत तुझी प्रतिक्रिया काय, असे ढोणीला विचारले असता, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे एक पदाधिकारी आणि श्रीनिवासन यांचे जवळचे सहकारी डॉ. आर. एन. बाबा यांनी सदर प्रतिनिधीला तसा प्रश्न विचारण्यापासून रोखले.

चँपियन्स ट्रॉफी संदर्भातच प्रश्न विचारा, असे त्यांनी मीडियाला बजावले. स्पॉटफिक्सिंगप्रकरणानंतर तू आणि तुझे सहकारी क्रिकेटचाहत्यांचा विश्वास मिळवणे, किती कठीण आहे? तसेच चँपियन्स ट्रॉफीत 'असे' काहीही घडणार नाही, अशी खात्री काय? असे विचारल्यानंतर ढोणी बोलण्यापूर्वीच बाबा यांनी पुन्हा एकदा मध्येच नाक खुपसले. चँपियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ मध्यरात्री इंग्लंडला रवाना होत आहे.

Read More »

"कॅप्टन-कोच"

चॅंम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारताचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणी आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर पत्रकार परिषदेला संबोधित करताना.

Read More »

प्रहार बातम्या – २८ मे २०१३

नमस्कार प्रहार बातम्यांमध्ये आपल स्वागत…..

»श्रीशांत, चंडिला आणि अंकित चव्हाणला न्यायालयीन कोठडी

» सल्वा जुडूमचा सूड उगवण्यासाठी नक्षलवादी हल्ला

» तानी पाठोपाठ खो-खो ला ही मल्टिप्लेक्समध्ये नकार
» आठ टक्के विकास दराचे लक्ष्य गाठणार – पंतप्रधान

» चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ सज्ज

ऐकण्यासाठी येथे क्लिक करा… 28052013

Read More »

"दर्शनाची गर्दी"

अंगारकी चर्तुर्थी निमित्त प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.

Read More »

शेअर बाजार, तेजी कायम

 सलग दुस-या दिवशी गुंतवणूकदारांनी केलेल्या बडय़ा शेअरच्या जोरदार खरेदी मंगळवारी सेन्सेक्स १३० अंकांनी वधारला आणि २०,१६०.८२ अंकांवर बंद झाला.

सग्रहित छायाचित्र

मुंबई - सलग दुस-या दिवशी गुंतवणूकदारांनी केलेल्या बडय़ा शेअरच्या जोरदार खरेदी मंगळवारी सेन्सेक्स १३० अंकांनी वधारला आणि २०,१६०.८२ अंकांवर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही २८.१० अंकाची वाढ झाली आणि तो ६,१११.२५ अंकावर बंद झाला.

सेन्सेक्समधील रिलायन्स, कोल इंडिया, हिरोमोटो कॉर्प, आयटीसी या शेअरमध्ये तेजी दिसून आली. यामुळे सेन्सेक्समध्ये १३० अंकांनी वधरला. गेल्या दोन सत्रांमध्ये सेन्सेक्समध्ये ३५६ अंकांची वाढ झाली आहे आणि तो आठवडाभराच्या उच्चांकी स्तरावर गेला. रिलायन्स, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, टीसीएस यांच्या किमती १ ते २ टक्क्यांनी वाढल्या. तर सन फार्मा १.९० टक्के, एसबीआय १.४५ टक्के, स्टरलाइट इंडस्ट्रीज १.४० टक्के, सिप्ला १.१८ टक्क्यानी घट झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात ४०६ कोटींची गुंतवणूक केली.

रुपया गडगडला

आयातदार कंपन्यांकडून डॉलरची मोठया प्रमाणात खरेदी केल्यामुळे मंगळवारी चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ३९ पैशांची अवमूलन झाले. यामुळे रुपयाने ५६ची पातळी ओलांडली असून गेल्या नऊ महिन्यातील नीचांकी पातळी ठरली. गेल्या काही सत्रांमध्ये डॉलरच्या समोर रुपयाची मोठी दमछाक झाली आहे. डॉलरची मागणी वाढत असल्याने त्याचा फटका रुपयाला बसत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Read More »

पत्रकारांचे किस्से – भाग ३

भारतात जन्मलेल्या पण परदेशात स्थायिक झालेल्या एका पत्रकाराची त-हा काही औरच आणि चीड आणणारी होती. १९७९ मध्ये पाकिस्तानच्या भारतातील दौ-यात एका पाक्षिकासाठी हा पत्रकार लेखन करत असे.

भारतात जन्मलेल्या पण परदेशात स्थायिक झालेल्या एका पत्रकाराची त-हा काही औरच आणि चीड आणणारी होती. १९७९ मध्ये पाकिस्तानच्या भारतातील दौ-यात एका पाक्षिकासाठी हा पत्रकार लेखन करत असे. एका लेखात भारतीय पंचांच्या कामगिरीबद्दल टीका करताना, 'भारतीय पंचांची इंग्लिश पंचांबरोबर तुलनाच होऊ शकत नाही. कारण इंग्लिश पंचांचा दर्जा खूप वरचा आहे.

भारतीय पंच त्यांच्या जवळसुद्धा उभे राहू शकत नाहीत,'असे लिहिले होते. अर्थात राहत्या देशाचा स्वाभिमान आणि गो-यांचा अनुनय हेच ज्याच्या रक्तात भिनले आहे, त्याला दोष देऊन काय उपयोग? मात्र भारताच्या दौ-यानंतर पाकिस्तानच्या संघनायकाने (आसिफ इक्बाल) पंचांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केल्यावर याची प्रतिक्रिया काय होती, हे जरी कळले नाही तरी त्याला चांगलीच चपराक बसली असेल.

याच महाभागाने १९८३ मध्ये दिल्लीत झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत कहरच केला. दोतीवाला यांनी व्हिव्हियन रिचर्ड्सला पायचीत दिल्यावर ही स्वारी संध्याकाळी आमच्या जवळ येऊन 'त्या चेंडूचा टप्पा कुठे पडला होता?' अशी विचारणा केली. 'मी म्हणतो, उजव्या यष्टीबाहेर पडून मधल्या यष्टीवर जात होता तर समालोचक जयसिंहा म्हणतोय की, मधल्या आणि डाव्या यष्टीबाहेर पडून मधल्या यष्टीवर जात होता.

तर तुम्ही काय ते नक्की सांगितलेत तर त्याचे दात त्याच्या घशात मी घालीन,' असे त्याने म्हणताच, मी त्याला निघून जायला सांगितले. तसेच 'भारतीय पंच इंग्लिश पंचांपुढे काहीच नाहीत,' या त्याच्या १९७९ मधील उद्गारांची आठवण करून दिली. तसेच 'तुमचे तुम्हीच बघा' असा टोलाही लगावला. एक पत्रकार बोर्डाच्या एका अधिका-याच्या मर्जीतला असल्यामुळे त्याला आतील गोटातील बातम्या कळत. त्या बातम्या आपल्या पाक्षिकामध्ये 'खास' म्हणून छापत असे.

१९७४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत रिचर्ड्सला नाबाद दिल्यानंतर त्याने धडाकेबाज १९२ धावांची खेळी केली. भारत तो सामना एका डावाने हरला. तेव्हा या महाभागाने 'आतील बातमी' म्हणून 'गोठोस्करांना यापुढे कसोटीतून डच्चू दिला आहे' असे लिहिले. अर्थात १९७५ आणि १९७६ साली कसोटीत माझी नेमणूक झाली. त्यानंतर आजारी पडल्यावर दोन वर्षे मी पंचगिरी केली नव्हती. पण १९७९ पासून १९८३ पर्यंत अकरा कसोटीत पंच होतो. या काळात जेव्हा जेव्हा हा मला भेटत असे तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या या विधानाची आठवण करून देत असे.

१९८१ मध्ये इंग्लंडच्या भारत दौ-यात कोलकाता कसोटीदरम्यान इंग्लंडचा जेफ बॉयकॉट हा क्षेत्ररक्षणाला आला नव्हता. वदंता होती की, शिस्तभंग म्हणून त्याला मायदेशात परत पाठवणार आहेत. (आणि सामना संपल्यानंतर पाठवलेही). याबद्दल 'जरा आतली बातमी काढ आणि मला सांग म्हणजे मी 'खास' म्हणून लिहीन', असा मला निरोप आला. इतकेच नव्हे तर त्या रात्री एका बँकेतर्फे माझा सत्कार आणि जेवण होते. तेथे येऊन मला त्याबद्दल विचारू लागला. तेव्हा मी 'अशा गोष्टी मी करत नाही' असे सांगून त्याला गप्प केले.

Read More »

२०२२ फिफा वर्ल्डकपसाठी भारत पात्र ठरेल

कतारमध्ये होणा-या २०२२ फिफा वर्ल्डकपसाठी भारत पात्र ठरेल, असा विश्वास विक्रमवीर सचिन तेंडुलकरने मंगळवारी व्यक्त केला.

मुंबई - कतारमध्ये होणा-या २०२२ फिफा वर्ल्डकपसाठी भारत पात्र ठरेल, असा विश्वास विक्रमवीर सचिन तेंडुलकरने मंगळवारी व्यक्त केला. ''विद्यमान क्रमवारीत भारत खूपच पिछाडीवर असला तरी फुटबॉलमधील गुणवत्ता पाहता २०२२ वर्ल्डकपसाठी भारत पात्र ठरेल, असे मला वाटते.

प्रत्येक युवा फुटबॉलपटूने तसे ध्येय बाळगायला हवे. त्यासाठी सिनियर फुटबॉलपटू तुम्हाला मागदर्शन करतील. त्याचे मार्गदर्शन आणि सल्ल्यानुसार वागल्यास भारताला वर्ल्डकपसाठी पात्र ठरणे कठीण जाणार नाही,''असे सचिनने सांगितले. नवी मुंबईतील फादर अ‍ॅग्नेल शाळेच्या मैदानावर झालेल्या कोका-कोला कप ३५व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर (१५ वर्षाखालील) फुटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळय़ासाठी सचिनची प्रमुख उपस्थिती होती.

खेळाप्रति निष्ठा ठेवा, असा वडीलकीचा सल्ला सचिनने यावेळी युवा फुटबॉलपटूंना दिला. सचिनसह भारताचा कर्णधार सुनील चेत्रीही यावेळी उपस्थित होता. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ) टेक्निकल संचालक रॉब बान यांच्यासह अ‍ॅकॅडमी आणि कोच प्रशिक्षण विभागाचे संचालक स्कॉट ओडोनेल तसेच कोका-कोलाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (भारत) वेंकटेश किनी उपस्थित होते. अंतिम लढतीत ओदिशाचा १-० असा पराभव करत मेघालयने जेतेपद पटकावले. 'फायनल'मधील एकमेव आणि निर्णायक गोल मेघालयच्या रोनाल्ड कीडॉन लिंगडोहने पहिल्या सत्रात केला. त्याला सामनावीर म्हणून गौरवले.

Read More »

राशिभविष्य – २९ मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…

मेष : शब्दश: अर्थ घेणे टाळा.



वृषभ : नोकरीत क्लिष्ट कामे करावी लागतील.

मिथुन : सत्य परिस्थिती समजावून सांगाल
कर्क : समाजकार्यात नेतृत्व कराल.

सिंह : आदर्श मॉडेल साकाराल.

कन्या : अंत:प्रेरणा प्राप्त होऊन काव्य स्फुरेल.
तूळ : तुमच्या कौशल्याचा बोलबाला होईल.

वृश्चिक : वारसाहक्काचे लाभ दृष्टोत्पत्तीस येतील.

धनू : विरोधकांचा विरोध मावळेल.

मकर : मर्दानी खेळांसाठी नाव द्याल.

कुंभ : ज्ञानदानातून आनंद मिळेल.

मीन :कनिष्ठांच्या गुणांची वाखाणणी कराल.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe