Monday, May 2, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

स्वच्छता पाळा आजारांना पळवा

मुलं या ना त्या कारणांमुळे बरेचदा आजारी पडत असल्यामुळे हल्ली आपल्याला काळजी घ्यावी लागतेच; पण त्याहीपेक्षा अधिक सतर्क राहणं गरजेचं असतं. म्हणूनच आजारांना टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.

मुलांची व्यक्तिगत स्वच्छता कशी राखता येईल याकडे लक्ष वेधणं आवश्यक आहे. कारण मुलं शाळेच्या वातावरणात किंवा खेळाच्या मैदानावर त्यांच्याही नकळत जंतूंच्या जास्तीत जास्त संपर्कात येत असतात. तुम्ही पाहाल तिथे तुम्हाला जंतू दिसून येतात. काही अपरिहार्य असतात, तर काही अधिक प्रमाणात असतात.

काही डोळ्यांना दिसतात तर काही दिसतही नाहीत. मुलांच्या अंगी व्यक्तिगत स्वच्छतेच्या चांगल्या सवयी बाणवणे हा जंतू संक्रमण आणि समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अंघोळीपासून ते हात धुण्यापर्यंत आरोग्यवर्धक स्वच्छतेच्या सवयी मुलं लहान असतानाच बाणवल्या पाहिजेत. ज्यामुळे त्यांच्या या सवयी संपूर्ण आयुष्यभर टिकून राहतील. त्याचा त्यांनाच फायदा होईल.

हात धुणे हा एकमात्र अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे आजारांचा फैलाव टाळता येतो, हा केवळ लहान मुलांमध्येच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रौढांच्या बाबतीत देखील लागू होतो. मुलांना खाण्याआधी, प्रसाधनगृहातून आल्यावर, प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर, जर ती आजारी असतील किंवा ती लहान बाळासोबत असतील तेव्हा हात धुण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.

युनिसेफच्या मते, साबणाने हात धुणे विशेषत: विष्ठेच्या संपर्कात आल्यावर हात धुण्यामुळे ४० टक्क्यांहून जास्त प्रमाणात डायरियल आजारांना तर ३० टक्क्यांहून जास्त श्वसनासंबंधित आजारांना कमी करता येतं.

अगदी जन्माच्या वेळेपासून प्रसूतीआधी परिचारिकांनी हात धुतल्यामुळे मृत्युदरात १९ टक्क्यांनी घट झाली आहे आणि आईने आपल्या बाळाला हाताळण्याआधी हात धुतल्यामुळे मृत्यू होण्याच्या जोखमीमध्ये ४ टक्क्यांनी घट आली आहे.

दुर्बल रोगप्रतिकारक क्षमता

मुलांसाठी सर्वसामान्य आजारांवर संशोधन करताना असं आढळून आलं की आजार पुन:पुन्हा होण्याच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकीचा एक घटक म्हणजे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता होय. त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढत नाही.

याचा असा अर्थ होतो की मुलाचं शरीर जंतू आणि संक्रमणांचा सामना करण्यासाठी ठोस बचाव यंत्रणेची निर्मिती करू शकत नाही; त्यामुळे त्याला/ तिला वातावरणातील जोखमीमुळे त्रास होण्याची शक्यता अधिक बळावते.

वातावरणाच्या आधुनिक जोखमी

पर्यावरणातले वाढते प्रदूषण हे आज मुलांमध्ये वाढत्या आजारांचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, कारण ती रोजच्या जीवनात घातक घटकांच्या सातत्याने संपर्कात येत असतात. आज हवा जास्त प्रदूषित आहे, पाणी अधिक दूषित आहे आणि अन्न आधीपेक्षा जास्त प्रमाणात रसायनांनी भरलेले आहे.

शक्तिशाली आणि अधिक प्रतिकारक जंतू

सद्य:स्थितीतील वातावरणातील बदल विशेषत: ग्लोबल वॉìमगमुळे जगभरात संक्रमित होणा-या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. संशोधकांनी हे दाखवून दिलं आहे की, डेंग्यू, मलेरिया इ.सारखे आजार उष्ण वातावरणात जास्त फैलावतात. हे आजार आपल्या मुलांसाठीच नव्हे तर प्रौढांसाठी देखील जोखीम निर्माण करतात.

पारंपरिक स्वच्छतेच्या सवयींचा वापर करणे सुरू ठेवणे

हे सिद्ध झालं आहे की, आजच्या जंतूंनी भरलेल्या जगात पारंपरिक स्वच्छतेच्या सवयी पुरेशा होत नाहीत. सर्वसमावेशक स्वच्छतेच्या सवयींची आवश्यकता वाढत आहे, यामध्ये हात धुणे आणि रोगप्रतिबंधक साबणांनी अंघोळ करणे अशा स्वच्छतेच्या सवयींचा देखील अंतर्भाव होतो.

अस्वच्छ पृष्ठभागांशी जास्त प्रमाणात येणारा संबंध

जंतुविरहित राहणे खासकरून मुलांसाठी निव्वळ अशक्यप्राय गोष्ट आहे. मुलांना चिखल व अस्वच्छ जागांवर खेळायला नेहमीच आवडतं आणि अनेकदा अशा मुलांसोबत वस्तूंची अदलाबदल करतात जी स्वच्छ नसतात.

मुलं अनेक वेळा सर्वसामान्यत: सर्वाच्या संपर्कात येणा-या अस्वच्छ पृष्ठभागांच्या सान्निध्यात येतात उदा. दारांची हँडल्स, फुटबॉल्स, जिन्यांची रेलिंग्ज इ. त्यामुळे मुलांमध्ये साहजिकपणे जंतू संक्रमण होतं.

थोडक्यात, आजाराला टाळण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे चांगली स्वच्छता होय. हात धुणे आणि रोगप्रतिकारक साबणाने अंघोळ करण्यासारख्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयींना आपण मुलांमध्ये अगदी लहानपणापासून बाणवले पाहिजे.

Read More »

कमी वजनाच्या बालकांसाठी यशस्वी उपचारपद्धती

श्रीवर्धन (रायगड) येथे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणा-या रमेशच्या पत्नीने गर्भारपणातील काही समस्यांमुळे ठरावीक वेळेपूर्वीच एका अर्धवाढ झालेल्या बालकाला जन्म दिला, ज्याचं वजन केवळ दीड किलो होतं.

श्रीवर्धन (रायगड) येथे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणा-या रमेशच्या पत्नीने गर्भारपणातील काही समस्यांमुळे ठरावीक वेळेपूर्वीच एका अर्धवाढ झालेल्या बालकाला जन्म दिला, ज्याचं वजन केवळ दीड किलो होतं.

श्रीवर्धनला दोन आठवडय़ांसाठी हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर असं लक्षात आलं की त्या बालकाला जन्मजात फुप्फुसांची झडपे अरुंद असण्याची समस्या (कोंगेन्टीअल पल्मोनरी वाल्व स्टेनोसीस) आहे.

बालकामध्ये अन्न योग्य पद्धतीने न खाता येण्याची आणि अतिशय कमी वजनाची लक्षणे दिसून येत होती (दोन महिन्यांनंतर फक्त ३ किलो) त्यामुळे पुढील प्रक्रिया किंवा उपचार सुरू करण्यात देखील डॉक्टर साशंक होते.

रायगडमधील स्थानिक डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय सुचवला; परंतु रमेशचं उत्पन्न कमी असल्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च उचलणं शक्य नव्हतं. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंतर्गत पुढील उपचारांसाठी आपल्या बालकाला रमेशने मार्च महिन्यात तेरणा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.

बाळाचं वय व वजन लक्षात घेता पालकांशी चर्चा केल्यांनतर बलून उपचारपद्धतीचा मार्ग स्वीकारण्याचे सुचवलं. ज्यामुळे बालकाच्या जीवाला असणारा धोकादेखील कमी होणार होता तसेच तो लवकर बराही होऊ शकत होता.

तेरणा सह्याद्री हॉस्पिटलमधील भूलतज्ज्ञ डॉ. पुष्कर देसाई यांच्यासह पेडियाट्रिक हृदयरोग तज्ज्ञांच्या टीमने मार्च महिन्याच्या अखेरीला दोन महिन्यांच्या बालकावर बलून पल्मोनरी वाल्वोप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया करून दाखवली. बालकाचं वजन लक्षात घेता, वैद्यकीय इतिहासातील ही सर्वात आव्हानात्मक कामगिरी होती.

या प्रक्रियेमध्ये पायांच्या नसांच्या माध्यमातून बलून आत घातला गेला आणि फुप्फुसाची बंद झडपे उघडण्याकरिता तो हृदयापर्यंत घेऊन जाण्यात आला. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच कमी वजनाच्या बालकावर अशा प्रकारची उपचार प्रक्रिया करण्यात आली आणि उपशामक औषधांचा वापर करुन अवघ्या तीस मिनिटांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

रुग्णाला त्याच दिवशी वॉर्डमध्ये हलवण्यात आले आणि लगेच दुस-याच दिवशी घरी सोडण्यात आले. नेरूळ-नवी मुंबई येथील तेरणा हॉस्पिटलमधील आधुनिक वैद्यकीय तंत्र आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा गट या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी कारणीभूत आहे.

याव्यतिरिक्त कार्डिओपल्मोनरी बायपासचा वापर केल्यास जी एक ओपन हार्ट प्रक्रिया आहे, त्यासाठी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासह अतिदक्षता विभागामध्ये हलवणं गरजेचं असतं.

या केसमध्ये बाळाचे वय व वजन लक्षात घेता योग्य ती शस्त्रक्रिया निवडून तेरणा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे पेडियाट्रिक हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण या तज्ज्ञ डॉक्टरांनी दोन महिन्यांच्या बालकाचे प्राण वाचवण्यास मदत केली आणि शेवटी पालकांच्या चेह-यावर हसू फुलवलं.

आता रुग्णाला घरी सोडलं असून बाळाचे कुटुंबीय हॉस्पिटलचे कर्मचारी आणि त्यांच्या सेवेबद्दल अतिशय खूश आहेत. ही शस्त्रक्रिया नेरूळ-नवी मुंबई येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आली.

काय असते ही समस्या?

जन्मजात फुप्फुसांची झडपे निरुंद असण्याच्या समस्या (कोंगेन्टीअल पल्मोनरी वाल्व स्टेनोसीस) ही हृदयाच्या झडपेची एक समस्या आहे ज्यामध्ये फुप्फुसांच्या झडपेचा समावेश असतो. अशा प्रकारचा आजार भारतातील लोकसंख्येपैकी 8% लोकांमध्ये आढळून येतो. ही झडपे हृदयातील पोकळी (हृदयातील एक भाग) आणि फुप्फुसातील धमनी यांना विभक्त करते.

फुप्फुसातील धमनी फुप्फुसांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याचे काम करते. झडपेची उघडझाप पुरेशी होत नाही तेव्हा निरुंदपणा निर्माण होतो. ज्यामुळे फुप्फुसाला रक्ताचा पुरवठा कमी होतो.

Read More »

शक्तिदायक पिस्ता

पिस्ता हे छोटं, चविष्ट, कठीण कवचाचं पौष्टिक फळ आहे. त्याचं कवच टणक, पण दोन भागांत फुटलेलं असतं. पिस्त्याच्या गरावर शिवाय एक साल असते. त्याच्या आतील गराचा रंग हिरवट, गुलाबी किंवा पिवळा असतो.पिस्त्याचे झाड फार डौलदार दिसते. कारण त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूंनी सारख्या फुटतात व पानांनी भरून जातात.

पिस्ता मूळचा पश्चिम आशियामधील असून हजारो वर्षे पूर्वेत त्याची लागवड होत आली आहे. इराण, सीरिया, टय़ूनिशिया, पॅलेस्टाईन, मेसो पोटेमिया, तुर्कस्तान, फ्रान्स, अफगाणिस्तान व अमेरिका या ठिकाणी पिस्त्याचं पीक घेतलं जातं.

बी लावून पिस्त्याचं झाड सहज रुजवता येतं आणि ते लवकर वाढतं. इराणमध्ये व अफगाणिस्तानात पिस्ता रानावनात इतका वाढतो की, त्याची जंगलं होतात. थंडीत तिथल्या भटक्या लोकांचं ते अन्न बनतं.

पिस्ते गोड आणि पौष्टिक असतात. त्यात पाणी कमी व उरलेला भाग मूल्यवान अन्नघटकांचा असतो. पिस्त्यामध्ये प्रथिने बरीच असली तरी ती आम्ल नसून पचनक्रियेनंतर अल्कलीयुक्त बनतात. पिस्ते हे टिकाऊ आहेत. बदामाचे सर्व गुण त्यात आहेत.

» अशक्तपणावर पिस्ते हे टॉनिक म्हणून उत्तम आहे.

» दूध व मध एकत्र करून त्यात पिस्त्यांची पूड घालून प्यायल्यास मज्जातंतूंना ते चांगले टॉनिक आहे. याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते.

» हृदयाचे स्नायू मजबूत होतात व जंतूसंसर्गाचा प्रतिकार होतो.

» विपुल प्रमाणात लोह असल्याने पिस्त्यामुळे रक्त वाढतं.

» नियमित सेवन केल्यास अशक्तपणावर मात केली जाते.

» पिस्त्याच्या गराबाहेरच्या सालीचा उलटय़ा थांबवणे, पोटदुखी घालवणे आणि बद्धकोष्ठ नाहीसा करणे यावर उपयोग होतो. पचन संस्थाही सुधारते.

» पिस्त्याच्या फुलांमुळे श्वासनलिकेत जमणारा कफ दूर होतो. तसंच जुनाट खोकला, दमा, धाप, यांवर ही फुले गुणकारी ठरतात.

» पिस्त्याच्या तेलाने पोटातील जंत पडून जातात.

» पिस्ते आशियातील व युरोपातील देशांत खारवून मुखशुद्धी म्हणून हातांनी सोलून खातात.

» महाग मिठाईत चवीसाठी व शोभेसाठी पिस्त्याचे काप काढून घालतात. आइस्क्रीम, केक, बिस्किटे यांतही पिस्ते वापरतात.

» खारवलेले पिस्ते चवदार लागले तरी अन्न म्हणून ते मीठ घातल्याने आरोग्यास विघातक आहेत.

» पिस्ते हे नुसतेच खाल्ले तर मात्र ते शक्तिदायक, आरोग्यदायी व पौष्टिक असतात.

Read More »

नौकासन

या आसनास बोट पोझसुद्धा म्हटलं जातं. हे आसन करताना शरीराचा आकार हा बोटीप्रमाणे दिसतो म्हणून यास बोट पोझ म्हणतात.

आसन

सर्वप्रथम योगा मॅटवर पाठीवर झोपावं. पूर्ण शरीराला रिलॅक्स करावं. दीर्घ श्वास घ्यावा. आता श्वासाला रोखून दोन्ही पाय, खांदे, हात आणि डोकं वर उचलावं. खांदे आणि पाय जमिनीपासून १५ सें.मी. वर उचलावे किंवा एवढं अंतर असावं. या आसनात शरीराचा तोल सांभाळावा. खांदे आणि घोटा यांची लाईन किंवा लेव्हल एकसारखी असावी.

म्हणजेच पाय वरती उचललेले असतील तेवढेच खांदेदेखील उचलावे. दोघांमधील अंतर सारखे असावे. हात सरळ आणि ताठ असावेत. नजर पायावर असावी. या आसनस्थितीत काही सेकंद थांबावे. त्याचबरोबर श्वास सोडताना पूर्वस्थितीत यावं. थोडा वेळ विश्रांती करावी.

दुसरी पद्धत

आसनाची जी पद्धत वर सांगितली आहे ही पद्धतही अगदी तशीच आहे. फक्त फरक एवढाच आहे की, पायाच्या घोटय़ाला म्हणजेच पायांना शक्यतो ६० अंश वर आणावे. तसंच शरीराचा वरील भाग जेवढा जमेल तेवढा वरती उचलण्याचा प्रयत्न करावा.

शक्यतो ६० अंश इतकंच असावे आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला ताठ आणि सरळ ठेवावे. काही सेकंद थांबावं, मग विश्रांती घ्यावी.

श्वास

»  प्रथम श्वास घ्यावा आणि मग शरीराला वरती आणावे.

»  आसनस्थितीत श्वास रोखावा.

»  सुरुवातीस जमत नसेल तर नॉर्मल श्वासोच्छ्वास करावा.

»  आसन सोडताना श्वास सोडावा.

वेळ

»  सुरुवातीस पाच ते सात आकडे मोजावेत. हळूहळू संख्या वाढवावी.

»  सुरुवातीला हे आसन दोन ते तीन वेळा करावे.

आसन करताना घ्यायची काळजी

नौकासन या आसनस्थितीत राहताना सुरुवातीला जेवढे जमेल तेवढे थांबावे. तसंच आसन सोडताना हळुवारपणे शरीराला खाली आणावे. अन्यथा पाठीला आणि मानेला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आसनस्थितीत राहताना मानेला सैल सोडावे.

फायदे

»  नौकासनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

»  या आसनाने पचनशक्ती सुधारते.

»  या आसनामुळे टेन्शन दूर होते.

»  पूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment