Monday, April 4, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

भू नमन वज्रासन

योगा मॅटवर वज्रासन या आसनात बसावं. दोन्ही हात शरीराच्या मागे घ्यावेत. आता उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडावं. हळूहळू शरीराचा वरील भाग खाली आणावा.

योगा मॅटवर वज्रासन या आसनात बसावं. दोन्ही हात शरीराच्या मागे घ्यावेत. आता उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडावं. हळूहळू शरीराचा वरील भाग खाली आणावा.

तसंच कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा. काही सेकंद या आसनात थांबावं. हळुवारपणे शरीराचा वरील भाग वरती आणावा. पूर्वस्थितीत राहावे. हातांना रिलॅक्स करावं.

श्वास

»  वज्रासन आसनात श्वास घ्यावा.

»  शरीराचा वरील भाग खाली नेताना श्वास सोडावा.

»  आसनस्थितीत श्वास रोखावा अथवा नॉर्मल श्वासोच्छ्श्वास करावा.

वेळ

हे आसन दोन ते तीन वेळा करावं. सुरुवातीला या आसनात दहा सेकंद थांबावं. हळूहळू सेकंद वाढवावे.

विशेष नोंद

»  ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, पाठीचं दुखणं, गुडघेदुखी असतील त्या व्यक्तींनी हे आसन करू नये.

आसन करताना घ्यायची काळजी

भू नमन वज्रासन या आसनात आपण शरीराचा वरील भाग खाली आणताना-वर नेताना घाई करू नये. दोन्ही नितंब हे टाचांना स्पर्श केलेले असावेत. शरीराचा वरील भाग खाली नेताना नितंब उचलता कामा नयेत.

तसंच उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडावं. हाताला मागून थोडा स्ट्रेच द्यावा. सुरुवातीला कपाळ किंवा हनुवटी जमिनीला स्पर्श होत नसेल तरी चालेल, नित्य सरावाने तुम्ही हे आसन करू शकाल. आसन सोडताना घाई करू नये.

शरीराचा वरील भाग वरती आणताना हळुवारपणे वरती यावं. जर का तुम्ही पटकन वरती आलात तर मानेला झटका बसू शकतो. दोन्ही हात रिलॅक्स करावेत. तसंच वज्रासन हे आसन सोडून दोन्ही पायांना सरळ ठेवावं. थोडा वेळ रिलॅक्स होऊन हे आसन दोन ते तीन वेळा करावं.

फायदे

»  भू नमन वज्रासन या आसनाने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

» मधुमेह, सर्दी, वात, स्वप्नदोष, निद्रानाश, दमा, मुरडा आणि अजिर्णसारखे आजार दूर होतात.

»  ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्या व्यक्तींनी हे आसन आवर्जून करावं.

»  या आसनाच्या नित्य सरावामुळे जठर सुदृढ होते. यकृतातील विकृती दूर होतात. आणि स्वादुपिंडातील शिथिलता नाहीशी होऊन ते सक्रिय बनतात.

»  या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो आणि पोट आणि छातीचं सगळे स्नायू बळकट होतात.

Read More »

'ड' जीवनसत्त्वाची कमतरता..

भारतीयांमध्ये सध्या वाढत असलेली ड जीवनसत्त्वाची कमतरता ही वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. 
भारतीयांमध्ये सध्या वाढत असलेली ड जीवनसत्त्वाची कमतरता ही वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. भारतीय वैद्यक संघटनेच्या (आयएमए) मुंबई शाखेच्या वतीनं ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राईज अँड शाईन मोहिमेंतर्गत घाटकोपरमध्ये एका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलं होतं.

ड जीवनसत्त्व हे कॅल्शियम आणि हाडांच्या सशक्तपणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मानसिक आजार, मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार तसंच शरीराच्या डाव्या बाजूला पोकळीत पेशींची अतिरिक्त वाढ होण्यापासून ड जीवनसत्त्व निर्बंध करते.

जवळपास ८० ते ९० टक्के भारतीयांमध्ये या ड जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येते. त्यामुळेच यावर चर्चा करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये शहरातील ९० महत्त्वाचे डॉक्टर्स सहभागी झाले होते. दोन वर्षामध्ये देशभरातील ३० राज्ये आणि १७०० शाखांमधील अडीच लाख सदस्यांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेबाबत जागरूक करण्याबाबत संवेदनशीलता निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्याशिवाय डॉक्टरांना काही महत्त्वाची अन्य प्रशिक्षणंही यामध्ये अंतर्भूत आहेत.

ज्यामध्ये लोकांसमोर बोलणे, रुग्णांची ऑनलाईन नोंदणी ठेवणे, नवीन मोबाईल अ‍ॅप संस्कृतीविषयी माहिती करून घेणे, रुग्णाच्या मृत्यूची त्याच्या नातेवाइकांना बातमी संवेदनशीलपणे कशी सांगायची याबद्दलही प्रशिक्षण दिले जाते.

भारतीय वैद्यक संघटनेचे मानद सरसचिव डॉ. एस. एस. अग्रवाल यांनी आपल्या निवेदनात ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे दीर्घकालीन परिणाम होतात. 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार जडतात. जसे हृदयविकार, रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदय बंद पडणे आणि झटका येण्याची भीती वाढते.

२५ हायड्रोक्सिव्हिटॅमिन डीचे प्रमाण २५ पेक्षा कमी असल्यास उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची, तसंच हृदयाशी संबंधित विकारांची शक्यता वाढते.

लोकांना डी जीवनसत्त्वाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ घेण्यासाठी, सूर्यप्रकाशात अधिक वेळ घालवण्यासाठी, तसेच आवश्यक तेव्हा आणि तसे पूरक अन्न घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.'

आयएमएचे घाटकोपरचे सचिव डॉ. हरेश टोलिया यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, ''शरीरात ड जीवसत्त्वाचे पुरेसे प्रमाण असल्यास हाडे आणि दात मजबूत राहतात.

कर्करोग, टाईप १ मधुमेह, धमन्या आक्रसणे अशा अनेक आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते. तसेच शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते आणि फॉस्फरस शोषून घेतला जातो.

सारख्या प्रमाणात ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी उत्तर अमेरिकी किंवा युरोपीय लोकांच्या त्वचेपेक्षा दक्षिण आशिया किंवा आफ्रिकन्स लोकांच्या त्वचेसाठी जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

भारतीय लोकांची २५ टक्के त्वचा सूर्यप्रकाशात उघडी राहत असेल तर (चेहरा, मान, हात आणि तळहात) तर त्यांना १५ ते २० मिनिटे सूर्यप्रकाश पुरेसा होतो. आणि १५ टक्के त्वचा सूर्यप्रकाशात उघडी राहत असेल तर (चेहरा, मान आणि हात) तर २०-३० मिनिटे सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, असं सुचवण्यात आलं आहे.

अर्थात यावर अन्य गोष्टींचाही परिणाम होतोच. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेमधल्या सूर्यप्रकाशात ड जीवनसत्त्वाचं प्रमाण सर्वात जास्त असतं. त्यामुळे या वेळेत सूर्यप्रकाशात बाहेर पडणे चांगलं असतं.''

Read More »

आरोग्याचा उत्तम स्त्रोत

वाटाणा हे एक द्विदल कडधान्य आहे. याचं शास्त्रीय नाव पिसम सॅटिवम असं आहे.

वाटाण्याचे पांढरा, हिरवा आणि काळा असे प्रकार आहेत. वाटाणा सोलून तो वाळवला जातो. वाटाणा हा कमी चरबी आणि उष्मांक असलेला पदार्थ आहे.

सोयाबीनच्या तुलनेत वाटाण्यामध्ये कमी कॅलरीज असतात. वाटाण्यात क, अ, जीवनसत्त्व तसंच कॅल्शिअम, फायबरचं प्रमाण असल्याने वाटाणा हा आरोग्याचा एक चांगला स्त्रोत असल्याचं म्हणता येईल.

» वजन कमी करण्यास प्रभावी मानला जातो.

» कर्करोग टाळण्यासाठी हिरव्या वाटाण्याचं सेवन करावं.

» लोह, कॅल्शियम म्हणून अनेक खनिजांचे स्रेत आहे. जस्त, तांबे याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली वाढते.

» उतारवयात होणा-या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.

» याच्या सेवनाने त्वचेचं नैसर्गिक आरोग्य सुधारतं.

» यातील 'क' जीवनसत्त्व संधिवातासारख्या आजाराला प्रतिबंध करण्यास मदत करते.

» उच्च फायबर आणि प्रथिनं असल्यामुळे शरीरातील साखर कमी करण्यास मदत करते.

» नवजात बाळांना आणि मातांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

» वाटाण्यात फायबर असल्याने पचायला मदत होते.

» वाटाण्यामध्ये अ जीवनसत्त्व असल्याने ते त्वचा आणि आरोग्यासाठी अधिक उपयोगी आहे.

Read More »

औषधी कडुनिंब

शुक्रवारी पाडवा. हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी आपल्याकडे सकाळी अंघोळ झाल्यावर अनशापोटी कडुनिंबाच्या कोवळ्या पानं, गूळ, जिरं आणि हिंग घालून ती चटणी किंवा बारीकशी गोळी खाण्याची प्रथा आहे.

रोग निवारणासाठी ही गोळी खाल्ली जाते अशी त्या मागची समजूत आहे. म्हणजे येणारं र्वष निरोगी जावं ही त्यामागची भावना आहे. अशा या कडुनिंबाचे खरोखरच आयुर्वेदिक उपयोग दिले आहे. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे उपयोग जाणून घेऊ या.

» कडुनिंबाच्या पानाचा रसाच्या सेवनाने रक्तदोष दूर होतात. रक्त शुद्ध होते.

» याच्या सेवनाने झालेली जखम किंवा गळू दूर होतात. त्यात पू होत नाही. कंड, व्रण किंवा फोड नाहीसे होतात.

» दोन ते तीन पानं रोज चावून खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते.

» ही पानं हवेतील धूळ, धूर शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात. प्रदूषण रोखायलाही त्यामुळे मदत होते.

» कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास हिरडया मजबूत होतात, तोंडाचं आरोग्य सुरक्षित राहते, दातातील कीड मरते, पायोरिया होत नाही. मौखिक कर्करोगालाही आळा बसतो.

» कडुनिंबाची पानं जाळल्यास मलेरिया आणि डेंग्यूच्या जीवाणूच्या वाढीला प्रतिबंध होतो.

» मधुमेही रुग्णांनी नियमित १५-२० पानांचा रस प्यावा. त्यामुळे रक्तातील आणि लघवीतील साखर कमी करतो.

» याच्या सेवनाने त्वचारोगही बरा होतो.

» वाळलेल्या पानांचा चुरा करून धान्यात टाकल्यास धान्याला कीड लागत नाही.

» रात्री झोपताना कानात कडुनिंबाचे तेल टाकल्याने कानात बुरशी होत नाही. कानातला मळ यायलाही मदत होते.

» पावसाळ्यात पायांच्या या दोन बोटांमध्ये होणारा चिखलीचा त्रास झाल्यास कडुनिंबाच्या तेलाचे दोन-तीन थेंब घालावेत म्हणजे चिखली पूर्णपणे बरी होते. पुन्हा होत नाही.

Read More »

मधुमेहींनो सावधान!

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेचा स्थापत्य दिन म्हणून हा साजरा केला जातो. सध्याचं र्वष हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने मधुमेह र्वष म्हणून घोषित केलं आहे. या जागतिक दिनाच्या निमित्ताने मधुमेहाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न.

येत्या काही वर्षात मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. वेळीच जनतेची जागरूकता झाली नाही तर २०३० पर्यंत हा आजार सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच सध्याचं र्वष हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने मधुमेह र्वष म्हणून घोषित केलं आहे.

मधुमेह होऊच नये किंवा मधुमेह झाल्यावर काळजी कशी घ्यायची याविषयी प्रत्येकाने जनजागृती मोहीम राबवली पाहिजे. कारण दर चार लोकांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू या मधुमेहाने होतो, असं निदर्शनास आलं आहे. यासाठी मधुमेहाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणं गरजेचं आहे.

हा आजार कुठे होतो, कसा होतो, याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. त्याला काही स्थळ आणि काळाच्या मर्यादा नाहीत. कित्येकांना तर आपल्याला हा आजार आहे याविषयीही अजिबात माहिती नसते. हा आजार असाच वाढत राहिला तर वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर तो अतिशय खोलवर परिणाम घडवू शकतो.

बैठं काम करण्याची जीवनशैली असलेली मंडळी साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थाचं सेवन करतात अशा लोकांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. अतिरिक्त वजन आणि व्यायामाचा अभाव यामुळे ९० टक्के लोकांना टाइप २ चा मधुमेह होतो. खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा मधुमेह बरा होऊ शकतो.

फक्त तो लवकर समजणं गरजेचं आहे. या आजाराचं निदान लवकर झालं नाही तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक्स, अंधत्व किंवा चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते. म्हणूनच हा आजार होऊच नये म्हणून आपण स्वत: काही पावलं उचलणं आवश्यक आहे.

सकस आहार आणि शर्करायुक्त पेय कटाक्षाने टाळणं आवश्यक आहे. तसंच आपल्या अवयवांकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण किती खायला घेतो यापेक्षा आपण खातोय ते किती पौष्टिक आहे याकडे लक्ष द्यावं. थोडक्यात आपण सेवन करत असलेल्या पदार्थातून आपल्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आहारातून मिळते की नाही, यावर लक्ष ठेवायला हवं. त्याचप्रमाणे दररोज ३० मिनिटं नियमित चालणं आणि आठवडयातून किमान पाच वेळा तरी वजन वाढणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक असतं.

थोडं फार सरकारनेही याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे कित्येकदा मुलं आरोग्याला अनावश्यक पदार्थाचं सेवन करतात. ज्या पदार्थापासून मुलांना मधुमेहाचा धोका आहे. म्हणूनच अशा पदार्थाच्या पाकिटावर सरकारने मुलांना कळेल अशा पद्धतीचं लेबल लावायला हवं. जेणेकरून लोकांना हे समजेल. तसंच शर्करायुक्त पदार्थावर टॅक्स लावणं आवश्यक आहे, याचा खरोखरच फायदा होईल, असं मला वाटतं.

तसंच लोकांना आपली काळजी कशी घेता येईल यासाठी सरकारने प्रयत्नशील असायला हवं. या आजाराची शिक्षणातून जनजागृती करणं, लोकांना हा आजार ताब्यात कसा ठेवता येईल, याबाबत धडे देणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर लोकांना कमी खर्चात उपचार कसे मिळतील यासाठीही काही प्रयत्न करायला हवेत. कारण मधुमेह यशस्वीपणे ताब्यात ठेवता येतो.

मधुमेहाचं त्वरित निदान झाल्यास आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास मधुमेहामुळे निर्माण होणा-या समस्यांना आपण ताब्यात ठेवू शकतो.

जागतिक आरोग्य दिन हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेचा स्थापत्य दिन म्हणून साजरा केला जातो. १९४८ साली या संस्थेची स्थापना झाली होती. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दरवर्षी एका थीमचं आयोजन केलं जातं. ही संस्था २०१६ वर्षात मधुमेह हा आजार थोपवणे, उपचार करणे आणि चोप देणे याकडे लक्ष केंद्रित करणार आहे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment