Tuesday, January 5, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

योग मुद्रासन

पद्मासनात बसावं. पाठ सरळ आणि ताठ असावी. आरामात बसावं. हाताला मागे न्यावे. डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट अगदी घट्ट पकडावे. हात सुटता कामा नये.

आसन

पद्मासनात बसावं. पाठ सरळ आणि ताठ असावी. आरामात बसावं. हाताला मागे न्यावे. डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट अगदी घट्ट पकडावे. हात सुटता कामा नये. आता हळुवारपणे कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा. खाली वाकताना हात सुटणार नाही याची काळजी घ्यावी. सुरुवातीला काही व्यक्तीचे कपाळ जमिनीला लागणार नाही पण नित्य सरावाने तुम्ही करू शकाल. महत्त्वाची गोष्ट खाली वाकताना नितंब उचलणार नाही किंवा उचलता कामा नये याची काळजी घ्यावी.

हे आसन आपण दुस-या पद्धतीनेसुद्धा करू शकतो.

पद्मासनात बसावं. पाठ, मान, ताठ आणि सरळ असावी. हाताना मागील बाजूस नेऊन डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडावे. आता कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा. प्रथम डाव्या बाजूस मग उजव्या बाजूस नेणे, डाव्या बाजूस नेण्यास आता पूर्वस्थित राहावे. हातांना सोडू नये. हाताची पोझिशन तशीच राहावी. थोडा सेकंद थांबून मग पुन्हा दुस-या बाजूला करावे.

श्वास

»  सुरुवातीला पोझिशनमध्ये श्वास हा हळुवारपणे पण खोलवर घ्यावा.
»  खाली वाकताना श्वास सोडावा.
»  फायनल पोझिशनमध्ये श्वास हा खोलवर आणि हळुवारपणे घ्यावा.
»  सुरुवातीच्या पोझिशनमध्ये येताना श्वास घ्यावा.

वेळ

अंतिम स्थितीमध्ये एक किंवा दोन मिनिटं थांबावं. शक्य असल्यास दहा ते पंधरा सेकंद थांबावं.

घ्यायची काळजी

हे आसन करताना शरीर एकदम सैल सोडावे. कारण शरीराच्या वरील भागास खाली नेताना मानेवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. खांद्यांना रिलॅक्स ठेवावे. मानेला वरती आणताना घाई करू नये. हळुवारपणे मानेला आणि शरीराच्या वरील भागाला आणावे.

फायदे
»  हे आसन पोटासाठी खूप फायदेशीर आहे.
»  बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होत नाही.
»  शरीर चांगलं ठेवण्यास हे आसन खूप महत्त्वाचं आहे.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना डोळे, पाठ, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असेल त्या व्यक्तींनी हे आसन करू नये. पूर्वी आजार असलेल्यांनी, प्रसूतीनंतर किंवा मासिक पाळीदरम्यान हे आसन करू नये.

Read More »

पित्तशामक काकडी

हे एक पित्तशामक फळ असून त्याचं शास्त्रीय नाव कुकुमिस सॅटिव्हस आहे. पाणीदार असल्याने टरबुज किंवा कलिंगडाच्याच कुळातील म्हणता येईल.

हे एक पित्तशामक फळ असून त्याचं शास्त्रीय नाव कुकुमिस सॅटिव्हस आहे. पाणीदार असल्याने टरबुज किंवा कलिंगडाच्याच कुळातील म्हणता येईल. चवीला रूचकर असून उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यास मदत करते. इंग्रझीत कुकुम्बर, कानडीत संत्रेकाई, गुजरातीत काकाडी, तामीळ मुल्लवेल्लरी, बंगालीत खिरा, संस्कृतमध्ये एर्वारू किंवा कर्कटी अशी बरीच नावं आहेत.

काकडीचे कित्येक रंग आणि आकार पाहायला मिळतात. कित्येक ठिकाणी पांढरी, पिवळी अगदी केशरी रंगाची काकडी बघायला मिळते. आपल्याकडे काकडीचे दोन प्रकार आहेत. त्यातली गावठी काकडी चवीला उत्तम असते.

»  जीवनसत्त्व बीचं प्रमाण अधिक आहे, म्हणूनच चहा किंवा कॉफी ऐवजी एक स्लाईस काकडीची खावी.

»  यातला ९५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून ठेवते.

»  दिवसभराला आवश्यक असणारी जीवनसत्त्व काकडीतून मिळतात. सालीसकट खाल्ल्यासही फरक पडतो. सालीत जीवनसत्त्व सीचं प्रमाण भरपूर असतं.

»  काकडीची साल खाणं कित्येकांना आवडत नाही. त्यांनी काकडीची साल जळजळ होत असलेल्या भागावर किंवा उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर लावल्यास खूप आराम पडेल. डोळे सुजल्यास त्यावर एक काकडीची फोड किंवा साल ठेवल्यानेही फुष्कळ आराम मिळतो.

»  यातील सिलिकॉन आणि सल्फर केसांची वाढ करण्यास मदत करतात.

»  काकडीची एक फोड किंवा काप आरशाच्या काचेवर चोळल्यास आरशावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.

»  काकडीची चकती तोंडात वरच्या भागात जिभेच्या साहाय्याने तीस सेकंदांसाठी धरून ठेवावी. असं केल्याने तोंडाची दरुगधी येणा-या किटाणूंचा नायनाट करते.

»  सकाळी उठल्यावर होणारी डोकेदुखी बंद करण्यासाठी रात्री झोपायला जाण्यापूर्वी काकडीच्या फोडी खाव्यात. सकाळी उटल्यावर कंटाला किंवा डोकेदुखी यामुळे नाहीशी होते.

»  लो कॅलरीज आणि पाण्याचा साठा यामुळे डाएट करण्याऱ्या लोकांसाठी उत्तम आहे. शरीराला नको असलेले द्रव्य पदार्थ शारीराबाहेर टाकण्याचं काम करते.

»  इन्शुलिन निर्माण करण्यासाठी स्वदुपिंडातील पेशीना आवश्यक असलेले द्रव्य निर्माण करणं आवश्यक आहे. ज्याचा मधुमेहीच्या लोकांना खूप फायदा होतो. काकडीत असलेले स्टेरॉल्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करायला मदत होते.

»  काकडीत असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम अणि फायबर असल्यामुळे रक्तदाब सुरळीत सुरू राहतो.

»  स्नायूंचे दुखणे, पायात वात भरणे यासारखे विकार दूर करण्याची क्षमता यात असते.

Read More »

तंदुरुस्त राहा

हवामानात बदल झाले की त्याचा परिणाम शरीरावर झालाच म्हणून समजा. सध्यादेखील बदलत्या वातावरणामुळे कित्येक जण आजारी पडताना दिसत आहेत. मात्र अशा या वातावरणात आपण आरोग्यपूर्ण पदार्थाचं सेवन केलं तर ते आपल्या शरीरासाठी उत्तम ठरेल. अशाच काही फळ आणि भाज्यांची आज आपण माहिती घेणार आहोत.

सध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. मध्येच गरम होतंय तर मधूनच कधी संध्याकाळचे बोचरे वारे झोंबायला लागतात. त्यातच रात्रीची जागरणं.. या सगळ्याचा परिणाम तब्येतीवर होताना दिसतोय. आजूबाजूच्या थंड वातावरणामुळे पाणीही पोटात कमी जातं. मग अपचन होऊन उलटया-अतिसार वगैरे विकारांना समोरं जावं लागतं.

कित्येक जण सर्दी, ताप, अंगदुखीमुळे बेझार झाले आहेत. या दिवसांत तब्येतीच्या अशा कुरबुरी वाढतच जातात. यासाठी आपलं खाणं-पिणं योग्य असेल तर त्याचा आपल्या शरीरावर नक्कीच परिणाम होतो. म्हणूनच या दिवसांत नक्की काय खाल्लं पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे. आज आपण अशाच काही पदार्थाची माहिती घेणार आहोत.

डाळिंब

डाळिंबाचा ज्युस आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम असतो. यात इतर फळांच्या रसाच्या तुलनेत अँटिऑक्सिडंटचा भरपूर साठा असतो. जे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. नियमित डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्वचेचा पोत सुधारतो. त्याचप्रमाणे स्तनांचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो.

लिंबुवर्गीय फळांचा वापर

लिंबू, संत्र, इंडलिंबू, द्राक्ष अशी फळं या मोसमात खाणं केव्हावी चांगलंच म्हणावं लागेल. जीवनसत्त्व क आणि फ्लेव्होनाईड्स अधिक प्रमाणात असतं. जे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नष्ट करून चांगल्या एचडीएलची वाढ करण्यास मदत करते. यांच्या सेवनाने त्वचेचा पोत सुधारतो. टोमॅटो, कलिंगड, पेरू अशी फळंदेखील तुम्ही या दिवसांत खाऊ शकतात.

बटाटे

या दिवसांत बटाटे खाणं अधिक चांगलं म्हणता येईल. उत्तम स्टार्च म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. यात पोषणमूल्याचा भरपूर साठा आहे. पण या बटाटयाचं नुसतं सेवन करणं योग्य नाही. तो कशाच्या तरी बरोबरीने खाणं अधिक उत्तम ठरेल. यातदेखील विटॅमिन सी आणि बी ६ अशा जीवनसत्त्वाचा साठा असतो. महिलांनी या दिवसांत आवर्जून सेवन करावं.

कांदा

तुमच्यापैकी कित्येक जण दररोजच्या जेवणात कांद्याचा वापर करत असाल. कांदा भलेही तुमच्या डोळ्यातून पाणी काढत असेल मात्र शरीराला तो अतिशय चांगला आहे. यात कॅलरीज कमी असून जीवनसत्त्व आणि फयाबरचा भरपूर साठा आहे. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलवरदेखील नियंत्रण आणण्याचं काम करतो.

बीट

गोड आणि लाल रंगांचं हे कंदमूळ आरोग्यासाठी उत्तम आहे. कॅन्सरपासून रक्षण करतं. अ, ब, आणि क जीवनसत्त्व तसंच पोटॅशिअम आणि फॉलिक अ‍ॅसिडचा साठा आहे. त्याचप्रमाणे त्यातून नैसर्गिकरीत्या शर्करा मिळते.

रताळं

यात फायबर, बिटा केरोटिन, जीवनसत्त्व अ आणि क, तसंच अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतं. त्यामुळे या दिवसांत ते अतिशय उपयुक्त ठरतं.

कोबी

फ्लॉवरच्या तुलनेत जीवनसत्त्व, खनिज याचबरोबर फायबर, अँटिऑक्सिडंटचा भरपूर साठा असतो. जे शरीरातील अनावश्यक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे कॅन्सर आणि मधुमेहची शक्यताही कमी करतं.

तांबडा भोपळा

याचे विविध प्रकार आहेत. केशरी आणि पिवळ्या रंगाचा भोपळा चांगलाच प्रचलित आहे. एक कप उकडलेल्या भोपळ्यात कमी कॅलरीज असतात मात्र त्यात ए आणि क जीवनसत्त्वाचा भरपूर साठा असतो. याचप्रमाणे पोटॅशिअम, फॉलेट तसंच जीवनसत्त्व बी ६ आणि के जीवनसत्त्वाचा भरपूर साठा असतो.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत हे आपण कित्येक वर्षानुवर्ष ऐकतो आहोत. मेथी आणि पालक यासारख्या पालेभाज्या पाचक तर आहेतच, त्याचबरोबर त्यात जीवनसत्त्वदेखील भरपूर प्रमाणात आहेत. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत. पाचक असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. या दिवसांत विशेषकरून जेव्हा अन्न पचत नाही तेव्हा अशा भाज्यांचा आवर्जून आहारात समावेश कारावा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment