Tuesday, December 15, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

ताडासन

या आसनात संपूर्ण शरीराला ताण दिला जातो. उंची वाढणे, अतिरिक्त चरबी कमी करणे तसंच एकाग्रता वाढण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते.

दोन्ही पायांमध्ये एक फूट अंतर ठेवावं. दोन्ही हात शरीरालगत असावे. शरीर ताठ असावे आणि शरीराचं वजन दोन्ही पायांवर समांतर असावे. आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करावेत. वर नेल्यावर हातांची बोटं एकमेकांत गुंफवा. आता जेवढा हातांना स्ट्रेच देता येईल तितका द्यावा. नंतर दोन्ही पाय म्हणजेच टोजवर उभं राहावं. या आसनस्थितीत काही वेळ थांबावं. आसन सोडताना प्रथम हातांना रिलॅक्स करावं मग पाय खाली आणावेत. थोडा वेळ विश्रांती करून पुन्हा हे आसन करावं.

श्वास

  •  दोन्ही हातांना डोक्याच्या दिशेला नेताना श्वास घ्यावा.
  •  आसनस्थितीत नॉर्मल श्वास असावा.
  •  दोन्ही हात खाली आणताना श्वास सोडावा.

घ्यावयाची काळजी

ताडासन या आसनात पूर्ण शरीराचा तोल आपण सांभाळतो. सुरुवातीला आपल्याला तोल सांभाळणं जमणार नाही. पण सराव करा. आसन करताना समोर एका ठिकाणी लक्ष केंद्रित करा. हळुवारपणे शरीराच्या बाजूने हातांना वरती नेऊन एकमेकांत गुंफवावेत. हातांना जेवढा ताण देता येईल तेवढा चांगला. याच स्थितीत काही सेकंद राहा. आता पायांना वर करा म्हणजेच बोटांवर उभे राहा. ताडासन या आसनस्थितीत आपला बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना प्रथम हातांना बाजूने खाली आणावेत. मग पायांना पूर्वस्थितीत आणावं.

वेळ

  •  सुरुवातीला १५ सेकंद थांबावं. नंतर हळूहळू सेकंद वाढवावेत.
  •  हे आसन चार ते पाच वेळा करावे.

फायदे

  • या आसनात संपूर्ण शरीराला ताण मिळतो. त्यामुळे पोट आणि पाठीवरील फॅट्स (चरबी) कमी होते.
  •  हे आसन नियमित केल्याने उंची वाढते.
  •  हात, खांदा आणि पाय यांना चांगलाच ताण मिळतो.
  •  शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे एकाग्रता वाढते.

Read More »

गुणकारी मुळा

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या भाजीला एक प्रकारचा उग्र वास असतो. मुळ्यात प्रथिनं, कबरेदकं, फॉस्फरस, लोह असतं. त्याची राखही क्षारयुक्त असते. मुळा हा उष्ण गुणधर्माचा आहे.

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या भाजीला एक प्रकारचा उग्र वास असतो. मुळ्यात प्रथिनं, कबरेदकं, फॉस्फरस, लोह असतं. त्याची राखही क्षारयुक्त असते. मुळा हा उष्ण गुणधर्माचा आहे. ही जगभर उगवणारी वनस्पती असून पांढरा, लाल, जांभळा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. तसंच तो लांबट, लंबगोल किंवा गोल आकाराचा असतो. तिचे आकार, रंग आणि उगवण्याच्या पद्धतीनुसार त्याच्या विविध जाती आहेत. मुळ्यापासून तेलदेखील काढलं जातं.

इंग्रजीत याला 'रॅडिश' असं नाव आहे, तर आशियातल्या काही भागात 'डायकॉन' असंही नाव आहे. या मुळ्याची कोशिंबीर, भाजी किंवा पराठे, लोणचंही केलं जातं.

  •  मुळय़ाच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.
  •  जेवणात कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते आणि अन्नाचं पचनही व्यवस्थित होतं.
  •  यात ज्वरनाशक गुण आहेत. त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास खूप फरक पडतो.
  •  थंडीत भूक वाढते. अशा वेळी मुळा खावा. त्यामुळे गॅसेसचा त्रास होत नाही.
  •  याच्या पानांचा रस प्यायल्याने लघवी आणि शौचास साफ होते. मूळव्याधीचा त्रास असलेल्यांनी याचं अवश्य सेवन करावं.
  •  कंदापेक्षा पानाच्या रसात अधिक गुणधर्म असतात. ही पानं पचण्यास हलकी असतात. मात्र उष्ण असतात, त्यामुळे पित्त वाढते. म्हणून ती भाजीतूनच खावीत.
  •  कच्चा मुळा दररोज पहाटे अनशा पोटी खाल्ल्याने काही दिवसांतच कावीळ पूर्णत: बरी होते.
  •  रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राखत असल्यामुळे मधुमेहीच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो.
  •  पाणीदार असल्याने याच्या सेवनाने भूक क्षमते. म्हणूनच वजन कमी करू इच्छिणा-यांनी याचं अवश्य सेवन करावं.
  •  सर्दी होणे, घसा खवखवणे किंवा सायनससारख्या समस्येवरदेखील उत्तम उपाय होतो. व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करतो.
  •  किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतं.
  •  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.
  •  आहारात नियमित समावेश केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं.
  •  डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही उपयुक्त आहे.

Read More »

अपुरी झोप मधुमेहाला आमंत्रण

मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा तो असलेल्या लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो. मधुमेही लोकांना झोप लवकर लागत नाही. रात्री उशिरापर्यंत ते जागत बसतात. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही आणि मग त्यांची प्रचंड चीडचीड होते. या सगळ्याची परिणती रक्तदाब आणि लठ्ठपणा वाढण्यात होते. रात्री उशिरा झोपण्याची सवयही टाईप 2 मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते.
आतापर्यंत मधुमेह होण्यास फक्त लठ्ठपणा कारणीभूत आहे असं मानलं जायचं, पण मधुमेह होण्यापाठी कितीतरी कारणं असतात हे लक्षात घ्या. ज्या व्यक्ती पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी-जास्त होत राहते. तुम्ही जितके कमी तास झोपाल, खाण्याची इच्छा तितकीच जास्त होईल. तुम्ही थकलेले असता तेव्हा तुमचे शरीर भुकेची भावना करून देणारे हार्मोन स्र्वते, त्यामुळे अधिक खावंसं वाटतं. परिणामी लवकर ऊर्जा मिळवण्याकरिता अनेक कॅलरी आणि कबरेदकांचं सेवन केलं जातं. दररोज पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेणा-या व्यक्तींना दररोज ७ ते ८ तास झोप घेणा-या व्यक्तींपेक्षा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. ज्या लोकांमध्ये ग्लुकोजचं प्रमाण सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी-जास्त होत राहते, त्यांनाही मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.

मधुमेही लोकांना झोपेचा त्रास असतो. मधुमेही लोकांपैकी किमान अध्र्याहून अधिक लोकांना रात्री झोप येत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने ग्लुकोजचे प्रमाण पुरेसे राखले जात नाही, तात्पर्याने इन्शुलीन पुरेशा प्रमाणात स्र्वत नाही. त्यामुळे तुम्हाला टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते. झोपेच्या अभावामुळे इन्शुलीनची निर्मिती करणा-या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होतात, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि तात्पर्याने मधुमेह होण्याची शक्यताही वाढते.

पुरेशी झोप न मिळण्याने ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेह आहे त्यांना हा धोका आणखीनच वाढतो. सलग काही रात्री झोप मिळाली नाही तर या व्यक्तींच्या जीवावरही बेतू शकतं. मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत मधुमेही लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो असे पुराव्याने सिद्ध झालेले आहे. एक-दोन दिवस पुरेशी झोप झाली नाही, तर ती झोप नंतर भरून काढता येते; पण झोप न लागण्याचा त्रास कायम राहिला तर मात्र त्यातून सावरणे अवघड होऊन बसते. जितके जास्त दिवस तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही, झोप भरून काढणं तितकंच अशक्य होत जाईल. असं झाल्यास तुमचं शरीर पुरेशी झोप न मिळण्यालाच सरावून जाईल आणि त्याची परिणती तुमचा मधुमेह वाढण्यात होईल.

बहुतेक लोकांना रात्री सात ते नऊ तासांच्या झोपेची गरज असते, तरीही भारतीय लोक सहा तासांहून कमी झोप घेतात असे अभ्यासातून दिसून आले आहे. या समस्येवर मात करायची असेल तर झोपेचे वेळापत्रक ठरवून घ्या. ठरावीक वेळी झोपा आणि सकाळी ठरावीक वेळेचा अलार्म लावा. त्यामुळे तुमचे शरीरही या वेळापत्रकाला सरावेल आणि तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळेल. रात्री उशिरापर्यंत जागू नका, पुरेशी झोप घ्या, आरोग्यदायी आहार घ्या आणि व्यायाम करणे सोडू नका!

पुरेशा झोपेसाठी

ज्याप्रमाणे आपल्या शरीराला हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते त्याप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही गरजेची असते. वैज्ञानिकांच्या मतानुसार झोपेमध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तन होतात. त्यामुळे केवळ शरीरालाच नाही तर मेंदूलाही आराम मिळतो. पुरेशी झोप मिळाली नाही तर दुस-या दिवशी थकवा जाणवतो. म्हणूनच पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे झोप वयानुसार कमी-जास्त होत असते. चांगली आणि पुरेशी झोप हवी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.

  •  सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्तीला सहा ते आठ तास झोप आवश्यक असते.
  • झोपण्याची आणि उठण्याची एक योग्य वेळ निश्चित करावी.
  •  झोपण्याचं ठिकाण शांत असावं. तसंच काही जणांना खोलीत लाईट लावायची आवड असते त्या दिव्याचा प्रकाश हलका असावा.
  •  डोक्याखाली घेतली जाणारी उशी व्यवस्थित असावी. त्याचा जोर आपल्या डोक्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रात्रीच्या जेवणात चांगला सकस आहार घेतलात तर झोप चांगली येईल. त्यात तांदूळ, बटाटा आणि मुळं असलेल्या भाज्यांचा समावेश करावा.
  •  झोपण्यापूर्वी अतिरिक्त म्हणजे पोट भरेपर्यंत जेवण करू नये.
  •  दिवसा नियमित व्यायाम करावा, म्हणजे रात्री चांगली झोप येईल.
  •  झोपण्यापूर्वी मनातील चिंता, काळजी दूर करा.

Read More »

श्वेतप्रदर आणि घरगुती उपाय

कित्येक महिलांना अंगावरून पाणी जाणं किंवा श्वेतपदराच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. मात्र कित्येकदा याकडे महिला दुर्लक्षच करताना दिसतात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. मुळात असं का होतं, आणि त्यावर घरच्या घरी उपाय कसे करावेत याविषयी जाणून घेऊ.
उमाच्या पोटात खूप दुखत होतं. तिला काहीही काम करणं मुश्कील वाटायला लागलं होतं. तिच्या अंगावरून पाणी जात होतं. त्यामुळे तिला काहीसा थकवाही जाणवत होता. दोन दिवस झाले तरीही ही समस्या काही कमी होत नव्हती म्हणून मग तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांनी दिलेल्या औषधांमुळे तिला त्वरित आराम पडला. मात्र ती डॉक्टरांकडे गेली नसती तर मात्र या समस्येने गंभीर रूप धारण केलं नसतं.

श्वेतप्रदर हा काही गंभीर आजार नाही. तर गर्भाशयाशी संबंधित ही समस्या असल्यानं मानलं जातं. ही समस्या सर्वसामान्यपणे महिलांमध्ये आढळते. त्यात योनीमार्गातून अंगावरून पांढरा स्रव बाहेर पडतो. त्यालाच अंगावरून पांढरं जाणे, पाणी जाणे किंवा श्वेतप्रदर असं म्हणतात. हा स्रव कधी कधी निळसर, पिवळा, दुधाप्रमाणे, गुलाबी, घट्ट आणि कधी कधी काळ्या रंगाचाही असतो. सर्वसाधारणपणे पांढरा-पारदर्शक स्रव बाहेर जातोच, मात्र वरीलप्रमाणे त्यात रंग दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्यावी. नाही तर हा आजार गंभीर आजाराचं स्वरूप धारण करतो.

लक्षणं

  • योनीमार्गातून पांढरा, चिकट स्रव बाहेर पडणं
  •  योनीमार्गात खाज येणं
  •  कंबर दुखणं
  •  चक्कर येणं
  •  अशक्तपणा जाणवणं
  • बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
  •  डोकं दुखणे
  •  पोट फुगणे

कारणं

  •  थंडी वाजल्याने
  • शरीराची स्वच्छता न राखल्याने
  • गर्भाशयाला सूज येणं,
  •  वारंवार गर्भपात करणं,
  •  अधून मधून अंगावरून रक्त जाणं,
  • अधिक मसालेदार पदार्थाचं सेवन करणं..

काय काळजी घ्यावी?

  •  दररोज योनीमार्गाची स्वच्छता राखणं आवश्यक असतं.
  •  प्रत्येक वेळी मूत्रविसर्जनानंतर ती जागा स्वच्छ पाण्याने धुणं आवश्यक आहे.
  •  शरीरसंबंधांनंतरही स्वच्छता राखणं आवश्यक आहे.

उपाय काय कराल?

  •  केळं खाऊन त्यावर मध घातलेलं दूध प्यायल्याने लगेच आराम पडतो. कारण केळं आणि दूध हे एक चांगलं डाएट समजलं जातं.
  •  कच्च्या केळ्याची भाजी किंवा दोन पिकलेल्या केळ्यांमध्ये मध घालून खाल्ल्यानेही आराम पडतो. पिकलेल्या केळ्यात साखर घालून खाल्ल्यानेही आराम मिळतो.
  • डाळिंबाची ताजी पानं दहा-बारा काळी मिरीसोबत कुटायचं आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घालून ठेवा नंतर गाळून हे पाणी सकाळ-संध्याकाळी घेतल्याने आराम पडतो.
  •  शंभर ग्रॅम मूगडाळ तव्यावर चांगली भाजून त्याची पूड करून घ्यावी. त्यानंतर दोन मूठ पाणी एक कप पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून मूगडाळीचं चूर्ण पाण्यात घालून ते पाणी प्यावं.
  •  जिरं भाजून ते साखरेसोबत खाल्ल्यानेही आराम मिळतो.
  •  एक मोठा चमचा तुळशीचा रस आणि मधाचं चाटण दिवसातून दोनदा घेतल्यानेही आराम मिळतो.
  •  भाजलेल्या चण्यांमध्ये गूळ किंवा साखर घालून ते खावे आणि त्यावर एक कप दुधात तूप मिसळून प्यावं. आराम पडतो.
  •  दोन चमचे कांद्याच्या रसात मध मिसळून हे चटण सकाळ-संध्याकाळ घेतल्याने आराम मिळतो.
  •  पिंपळाच्या दोन-चार पानांचा लगदा करून तो दुधात उकळून प्यावा. या उपयाने स्त्रियांच्या अनेक रोगांवर नियंत्रण मिळतं. उदाहरणार्थ, मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास किंवा मासिक पाळीची अनियमितता.
  •  गुलाबाची फुलं सावलीत व्यवस्थित सुकवून घ्यावीत. नंतर त्याची बारीक पूड करावी. ही पूड तीन ते पाच ग्रॅम मात्रेत दररोज सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घेतल्याने श्वेतप्रदरापासून सुटकारा मिळू शकतो.
  •  आवळा सुकवून त्याचं चूर्ण करून घ्यावं. या चुर्णाची तीन ग्रॅम मात्रा दररोज सकाळ-संध्याकाळ घेतल्याने आराम मिळू शकतो.
  •  काकडीचं बी, काकी, कमळ जिरं आणि साखर समान मात्रेत घ्यावी. ही मात्र दररोज दोन ग्रॅम इतकी घ्यावी. त्यामुळेही लाभ होतो.
  •  गाजर, पालक, कोबी आणि बिटाचा रस प्यायल्याने गर्भाशयाची सूज नष्ट होते.
  •  मेथीचं चूर्ण असलेल्या पाण्यात बुडवलेला कपडा योनीमार्गात ठेवल्यानेही आराम मिळतो.
  •  एक चमचा भरडलेल्या मेथीचं चूर्ण आणि एक चमचा गूळ काही दिवस सेवन केल्याने ही समस्या दूर होते.
  •  दोन ग्रॅम दुधीच्या मुळांची पूड गाळून घ्यावी आणि दिवसातून तीन वेळा घेतल्याने श्वेतप्रदार आणि रक्तप्रदराचा त्रासही कमी होतो.
  •  गुलमोहराच्या फुलांचं चूर्ण मधासोबत सकाळी अनशापोटी (काहीही न खाता) आणि रात्रीच्या जेवणापूर्वी एक तास आधी घेतल्यानेही आराम मिळतो.
  •  इसबगोल दुधात चांगलं उकळावं. त्यात खडीसाखर घालून प्यायल्याने आराम मिळतो.
  •  शंभर ग्रॅम कुळीथ शंभर ग्रॅम पाण्यात उकळावं. त्यानंतर उरलेलं पाणी गाळून ते पाणी प्यायल्यानेही आराम मिळतो.

Read More »

मेरू वक्रासन

शरीराचा वरचा भाग पूर्ण वळत असल्याने कंबर, पाठ, मान, हात आणि पायालाही चांगलाच ताण मिळतो. अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
पाय सोडून खाली बसावं. पाय सरळ आणि ताठ असावेत. तसंच पाठही सरळ असावी. आता डावा पाय गुडघ्यातून वाकवून उजव्या गुडघ्याजवळ ठेवावा. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे उजव्या बाजूने हाताच्या आधाराने वळा म्हणजेच दोन्ही हात उजव्या बाजूला घेऊन जमिनीवर ठेवावेत. जितकं मागे वळता येईल तितकं मागे जाण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर मानही वळवावी. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे. मग कमरेला सरळ करावे, म्हणजेच पूर्वस्थितीत यावं. दुमडलेल्या पायालादेखील पूर्वस्थितीत आणावं. थोडा वेळ थांबून हेच आसन आता दुस-या बाजूने करावे.

श्वास कसा घ्यावा

  •  पायाला दुमडताना श्वास घ्यावा.
  •  कमरेला मागे नेताना श्वास सोडावा.
  •  आसनस्थितीत श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे असावा.
  •  पूर्वस्थितीत येताना श्वास घ्यावा.
  •  पाय सोडताना म्हणजेच दुमडलेला पाय सरळ सोडताना श्वास सोडावा.

आसन करताना घ्यायची काळजी
या आसनात शरीराच्या वरच्या भागाला वळवताना घाई करू नये. वळताना दोन्ही हातांच्या साहाय्याने करावे. सुरुवातीला शक्यतो जमेल तितकाच वळवावा. जितकं मागे नेता येईल तितकाचा न्यावा. आसन सोडताना पटकन वळून पूर्वस्थितीत येऊ नका. हळूहळू या.
या आसनात मागे वळताना उजवा हात थोडासा वळवावा. म्हणजेच आतल्या बाजूला ज्या दिशेला वळाल त्या दिशेला हात दुमडावा. तसंच मागे वळताना नितंबांना उचलू नये. शक्यतो नितंब उचलली जाणार नाहीत असा प्रयत्न करावा. तसंच जो पाय सरळ असेल त्याचे घोटे बाहेरच्या दिशेला असावेत.

वेळ
दहा सेकंद आसनस्थितीत असावे. किमान दोन ते तीन वेळा हे आसन करावे.

फायदे

  •  मेरू वक्रासन या आसनात मणक्याला चांगलाच व्यायाम मिळतो.
  •  या आसनाने कमरेवरील चरबी कमी होण्यास मदत होते.
  •  शरीराच्या वरच्या भागाला चांगलाच ताण मिळतो.
  •  कंबर, पाठ, मान, हात आणि पायालाही चांगलाच ताण मिळतो.
  •  हे आसन पाठीचं तसंच मानेचं दुखणं असलेल्या तसंच सायटीकचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अवश्यक करावे, फरक पडेल.

Read More »

फुफ्फुसांचा आजार

फुप्फुसांमध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. तेव्हा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज होतो. निदान वेळेत झालं नाही तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते. हा वाढणारा आजार असून तो जुना झाल्यास घातक ठरतो. हा पूर्णत: बरा होत नाही पण त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं.

भारत वेगाने बदलत आहे – केवळ भौगोलिक, शहरीकरण आणि आíथक पातळीवरच नव्हे तर आरोग्य, आजारांची बदलती स्थिती, आजारांचे वर्चस्व, स्थूलता आणि मृत्यूचे प्रमाण या बाबतीतही भारत बदलत आहे. भारतात सीओपीडीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाची टक्केवारी अधिक प्रमाणात वाढताना दिसते आणि तेही प्रमाण मागील दहा वर्षात सर्वाधिक दिसून येत आहे.

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज (सीओपीडी) हा एक फुप्फुसाचा आजार आहे. त्यामध्ये फुप्फुसांमध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होत असतो. निदान वेळेत झालं नाही तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते. सीओपीडी हा वाढणारा आजार आहे आणि परिणामी तो जुना झाल्यास घातक ठरतो.

सीओपीडी बरा होत नाही पण त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार अंदाजे तीन दशलक्ष लोकांचा मृत्यू हा सीओपीडीमुळे म्हणजेच जगभरांतील मृत्यूच्या सहा टक्केमृत्यू हे यामुळे होताना दिसतात.

»  सीओपीडीची साधारण लक्षणं पुढीलप्रमाणे-
»  कफ होणे
»  श्वसनाला अडथळा होणे

कारणे

»  हा विशेष करून प्रदूषणामुळे होताना दिसतो. सीओपीडीचे मुख्य कारण म्हणजे तंबाखूचा धूर (यामध्ये दुस-याने केलेले धूम्रपानही समाविष्ट आहे). अन्य धोकादायक घटकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे -

»  घरांतील प्रदूषण (उदा. ग्रामीण भागातील चुलीवरील स्वयंपाकामुळे निर्माण होणारा धूर आणि उष्णता)
बाहेरील प्रदूषण

»  कामाच्या ठिकाणची धूळ आणि रसायने (वाफा किंवा त्रासदायक घटक किंवा ज्योती)

»  लहानपणात सातत्याने होणारे श्वसनाचे आजार

»  अयोग्य पद्धतीने दम्यावर उपचार झाल्यास त्यांतूनही सीओपीडी होऊ शकतो. विशेषकरून वय र्वष ४०च्या पुढे हे होऊ शकते, पण कित्येक परिवारात हे वय ३५ वर्षावरही दिसून येते. धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणारे यांनाही सीओपीडीचा धोका अधिक दिसून येतो. याचं मुख्य कारण म्हणजे शहरांतील प्रदूषण तर गामीण भागातील बायोमास इंधनाचा वापर होय.

»  हा आजार पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही अधिक प्रमाणात दिसून येतो. शहरी महिलांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षामध्ये धूम्रपानाची सवय वाढू लागली आहे. परिणामी हे काळजीचं कारण बनलं आहे. त्याचबरोबर हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयरोग आणि ऑस्ट्रिओस्पोरोसिसमुळेही नंतर सीओपीडी होऊ शकतो. म्हणूनच सीओपीडी हा अधिक धोकादायक ठरतो.

कसा ओळखाल?

पल्मनरी फंक्शनटेस्ट (पीएफटी) या चाचणीमध्ये व्यक्ती किती प्रमाणात श्वास आत घेऊ शकते किंवा बाहेर टाकू शकते याची चाचणी केली जाते व त्यातूनच ती फुप्फुसांपर्यंत किती प्रमाणात पोहोचते हे जाणले जाते. परिणामी त्यातूनच त्या व्यक्तीला सीओपीडी आहे किंवा नाही हे शोधले जाते. सध्याच्या सामाजिक राहणीत किंवा जीवनशैलीमध्ये प्रत्येकी १०० पैकी १० लोकांना भविष्यात सीओपीडीचा धोका आहे.

उपचार

»  याच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांना ब्राँकोडिलेटर्स म्हणजेच चांगली इन्हेलर्स तसेच तोंडातून दिली जाणारी औषधे यामुळे फुप्फुसांपर्यंत हवा पोहोचवण्यासाठी पयत्न केले जातात.

»  रुग्णाच्या स्थितीनुसार त्यांच्या श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी फिजिओथेरपी, न्यूट्रिशिअन किंवा प्रोटिनचे पदार्थ यांचे उपचार केले जातात. परिणामी आयुष्याची गुणवत्ता सुधारते. कधी कधी रुग्ण हे औषधं किंवा इन्हेलरचा उपाय करून लवकर आराम मिळवतात. जे व्यायामामुळे लवकर शक्य नसते.

»  भारतात सीओपीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धूम्रपानाविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच जागतिक स्तरावरील घातक अशा या आजाराविषयी माहिती देणे आवश्यक असते. ग्रामीण भारतात अनारोग्यपूर्ण पर्यावरण, विशेष करून गरीब लोकांना हा धोका असतो तर शहरी भागात तंबाखूच्या सवयी, अनारोग्यपूर्ण भोजन आणि व्यायाम नसणे यांमुळे अपमृत्यू तसेच टाळता येणाऱ्या अशा आजारांवर उपचार करणे शक्य होते.

Read More »

पाचक दोडका

दोडका ही भाजी हिरवी गार असून त्यावर रेषा असतात. हिची साल जाड असून आतील गर हा पांढऱ्या रंगाचा असतो. तसंच त्यात बिया असतात. याला हिंदीत 'तुरई' असं म्हणतात.

दोडका ही भाजी हिरवी गार असून त्यावर रेषा असतात. हिची साल जाड असून आतील गर हा पांढऱ्या रंगाचा असतो. तसंच त्यात बिया असतात. याला हिंदीत 'तुरई' असं म्हणतात. याशिवाय इंग्रजीत हिला भाजी 'रिज्ड गार्ड', तर मराठीत 'दोडका' या नावाने ओळखली जाते.

तसंच ही भाजी 'लुफ्फा' या नावानेही ओळखली जाते. भाजीची निवडताना तिचा हिरवा रंग आणि न वाकणारा निवडावा. तसंच त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत. पूर्णत: गडद असावा. ही भाजी प्रामुख्याने आंध्र प्रदेशात लोकप्रिय असली तरी महाराष्ट्रातही ती भाजीच्या स्वरूपात खाल्ली जाते. यात 'क' जीवनसत्त्व, झिंक, लोह, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज असल्याने हिच्यात भरपूर गुणधर्म आहेत. तिचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले गुणधर्म जाणून घेऊयात.

»  रक्तशुद्धीकरणाचं काम करतं. त्याचप्रमाणे यकृताचं कार्य सुधारतं.

»  पोटाचं कार्य सुरळीत करतं. फायबरयुक्त असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते. हा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. परिणामी मूळव्याधीचा त्रासदेखील कमी होतो.

»  याचा ज्युस कावीळ झालेल्या लोकांना दिल्याने कावीळ लवकर बरी होते.

»  मूत्रातील आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.

»  शरीरात साचलेल्या चरबीचं प्रमाण कमी करण्यास मदत करते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

»  शरीराला नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकणारं हे उत्तम टॉक्सिन आहे.

»  नियमित खाल्ल्याने त्वचेचा पोतही सुधारतो.

»  पोटाचे सर्व विकार दूर करते. प्रतीकारशक्ती सुधारते. त्यामुळे या भाजीचं सेवन करावं.

»  या भाजीचा ताजा ज्युस प्यायल्याने लघवीच्या ठिकाणी होणारी जळजळ होत नाही.

»  अ‍ॅसिडिटीवर उत्तम उपाय आहे. याच्या सेवनाने अ‍ॅसिडिटीबरोबरच अल्सरचा त्रासही कमी होतो.

»  वारंवार सर्दीचा त्रास होणार असेल तर त्यांनी याचं सेवन करावं.

»  शरीरातला कोरडेपणा नष्ट करते.

»  डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असून दृष्टी सुधारण्याचं काम करते.

»  केस गळण्यावरही उत्तम औषध असून दांतांच्या आरोग्यासाठीही चांगलंच आहे.

Read More »

नजराजासन

ही आसनस्थिती आपल्याला 'चला काम करा' असं सुचवते आणि काम करण्यास प्रेरणा देते. आसन प्रथम सरळ, ताठ उभे राहावे.

ही आसनस्थिती आपल्याला 'चला काम करा' असं सुचवते आणि काम करण्यास प्रेरणा देते. आसन प्रथम सरळ, ताठ उभे राहावे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता हळुवारपणे डावा पाय मागील बाजूस उचलावा आणि डाव्या हाताने पायाला पकडावे. किंवा पायांच्या बोटांचा अंगठा पकडावा. तसंच उजवा हात हळुवारपणे उचलावा. व तो खांद्याच्या पातळीपर्यंतच उचलावा.

डावा पाय जेवढा वरती उचलता येईल तेवढा वर उचलावा. आता दहा सेकंद या स्थितीत उभं राहा. या आसनात आपण फक्त एका पायावर पूर्ण शरीराचा समतोल साधतो. त्यामुळे पूर्ण शरीराचा भार हा दुस-या पायावर येतो. काही सेकंद म्हणजेच दहा सेकंद थांबावे. मग थोडा वेळ थांबून हे आसन दुस-या पायाने म्हणजे उजवा पाय मागील बाजूस उचलून करावे.

श्वास

श्वास घेताना पाय मागील बाजूस उचलावे. आणि श्वास सोडताना मोकळा एक हात खांद्याच्या रेषेत ठेवावा.

वेळ

सुरुवातीला हे आसन तीन ते चार वेळा करावे. या आसनात सुरुवातीला दहा सेकंद थांबावं. मुख्य आणि महत्त्वाचे की तुम्ही सुरुवातीला जितका वेळ थांबून शरीराचा समतोल साधू शकता तितकाच वेळ थांबावं.

आसन करताना घ्यायची काळजी

या आसनात आपण एक पाय मागील बाजूस वरती नेतो तेव्हा आपण घाई करू नये. पायाला लगेच वरती नेऊ नये. त्याचे कारण असे की जर आपण पायाला मागील बाजूला नेऊन वरती आणले की मांडयांमध्ये लचक भरण्याची शक्यता असते.

तसंच आपण हाताने पायाला पकडताना स्नायूंना ताण पडतो. त्यामुळे लचक भरू शकते. असं झाल्यास आसन करणे सोडावे. थोडावेळ थांबून पुन्हा हे आसन करावे. या आसनामध्ये एक पाय मागील बाजूला वरती असतो तर दुस-या पायावर पूर्ण शरीराचा भार येतो.

तेव्हा जो पाय खाली असतो तो शक्यतो ताठ असावा. सुरुवातीला तुम्हाला समतोल राखणे अवघड जाईल. पण सरावाने तुम्ही हे करू शकता. आसन सोडताना पाय हळुवारपणे खाली आणावा.

विशेष टीप

हे आसन कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी करू नये.

फायदे

»  शरीराचा समतोल उत्तमरीत्या साधू शकतो.

»  खांदे, छाती, पोट आणि पायाला चांगल्या प्रकारे ताण मिळतो.

»  पायांमध्ये ताकद येते.

»  नियमित हे आसन केल्यास कंबरेचं दुखणं कमी होतं.

Read More »

शरीराला द्या 'आहारा'ची ऊब

मुंबई आणि उपनगरात शनिवारी पडलेल्या पावसामुळे संध्याकाळच्या वेळी चांगलेच थंडगार वारे वाहायला लागले आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी मस्त गुलाबी थंडी पडू लागली आहे. या गुलाबी थंडीचा लहानग्यांपासून ते मोठयांपर्यंत प्रत्येकच जण आनंद घेतो. गारठलेल्या शरीराला ऊब पोहोचवण्यासाठी लोकरीचे कपडे आवश्यक आहेतच, पण त्याचसोबत शरीराला आतून उष्णता पुरवणारे पदार्थही आवश्यक आहेत. यासाठी दररोजच्या आहारात शरीराला उष्णता पुरवणा-या पदार्थाचा समावेश करायला हवा.

दोन दिवसांपूर्वी पडलेल्या थंडीमुळे लोकांनी बासनात गुंडाळलेले लोकरीचे कपडे बाहेर काढले असतील. थंडी म्हटलं की, सर्दी-ताप-खोकल्याला आमंत्रण आलंच. त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी औषधे आलीच. पण या औषधांच्या सेवनासोबत आहारातील औषधी पदार्थाचे सेवन केल्यास अधिक उत्तम. या अल्हाददायक वातावरणात पौष्टिक, रुचकर तसंच औषधी गुणधर्मानी युक्त आहार घेतल्यास अधिक ताजंतवानं वाटेल.

त्यामुळे शरीराला थंडीशी सामना करण्यास आपसूकच ऊर्जा मिळेल. शरीर उबदार राहिल्याने हाता-पायांमध्ये अधिक चपळपणा येतो. अंगदुखी किंवा आखडण्याचे त्रास होत नाही. हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण नियमित आहार करू. पण हा आहार सेवन करताना शरीराची प्रकृती आणि पचनशक्तीचा विचार करूनच या पदार्थाचा आहारात समावेश करावा. चला तर मग पाहूयात हिवाळ्यातील उबदार आहार कसा असावा.

»  सर्व ऋतूंमध्ये ताजे, गरम अन्न खाणं केव्हाही चांगले. पण हिवाळ्यात आवर्जून ताजं आणि गरमागरम भोजनाचे सेवन केल्यास उत्तम. यामुळे भूक तर भागतेच शिवाय ताजे, गरम भोजन पचायलाही सोयीस्कर पडते. वेळेवर ताजे, गरम जेवण केल्यास शरीराला जडपणा येत नाही. थोडक्यात काय, तर शरीरही उबदार राहते.

»  हिवाळ्यातील आहारात शरीराला उष्णता पोहोचवणाऱ्या पदार्थाचे सेवन निष्टिद्धr(155)तच करावे. पण त्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीराची प्रकृती, पचनशक्ती लक्षात घेता आहाराचे सेवन करावे, अन्यथा उष्ण पदार्थाचे अधिक सेवन बाधक होऊ शकते.

»  भाज्या, फळे, सुकामेवा, कडधान्य, दूध-ताक सारखे स्निग्ध पदार्थ, मसाले या पदार्थाचे योग्य संतुलन राखत आहार घ्यावा.
आहाराच्या माध्यमातून मिळणारी उष्णता बाधू नये यासाठी सकाळ-सायंकाळ नियमित व्यायाम करावा. पहाटे लवकर उठून चालणे, योगा, सूर्यनमस्कार आदी व्यायाम करावेत.

»  गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यावर साजुक तुपाची धार, याचे सेवन करावे. जेवणात तांदळाच्या नेहमीच्या भाताऐवजी मुगाची किंवा मिक्स डाळींची खिचडी खावी. सोबत तूपही घ्यावे. कधी ज्वारी-बाजरीची भाकरी बनवावी. त्यासोबत तूप-गूळ खाल्ल्यास चविष्ट लागते.

»  शरीराला स्निग्धता पुरवणारे पदार्थ म्हणजे दूध, ताक, लोणी. हे पदार्थ शरीराला स्निग्धता आणि ऊब दोन्ही देतात. असे पदार्थ हिवाळ्यात खाण्यास केव्हाही चांगले. नुसते गरम दूध पिण्याऐवजी त्यात केशर, बदाम, वेलची आदींचा समावेश असलेल्या दुधाचा मसाला टाकून प्यावे. तर कधी हळद टाकून दूध प्यावे. भाकरीसोबत तुपाऐवजी लोणी खावे. जेवणानंतर ग्लासभर ताक प्यावे. आवडीनुसार कधी साखर तर कधी ताकाचा मसाला टाकावा.

»  मटकी, तूर, उडीद, वाल या आणि इतर कडधान्यांचा वापर करत दर दोन-तीन दिवसांनी त्याची भाजी करावी.

»  जिरे, लसूण, मोहरी, सुंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात.

»  थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी सुकामेवा उपायकारक ठरतो. त्यामुळे हिवाळ्यात सुकामेवा तर खावाच खावा. खारीक, अंजीर, बदाम, जर्दाळू, चारोळी, काजू, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड नुसते खावेत. डिंकाचा लाडून उत्तम. सोबत तिळाची चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्कीही खावी.

»  सर्दी-खोकल्याच्या वेळीस थंड पाणी न पिता सकाळ-संध्याकाळ कोमट पाणी प्यावे.

»  साखरेला मध हा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे अनेक जण मधाचा आहारात वापर करतात. हिवाळ्यात मधाचा वापर नियमित केल्यास ते उपायकारकच आहे. मधाच्या सेवनामुळे शरीर उष्ण राहते. तसेच हिवाळ्यात खोकला तर हमखास होतो.

»  अशा वेळी नुसत्या मधाचे चाटण घेण्याऐवजी मध आणि आलं एकत्र करत त्याचे चाटण बनवावे. सकाळी आणि रात्री हे चाटण नियमित घेतल्यास घशाला आराम मिळेल. दररोज एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात एक चमचा मध घालून सेवन केल्यास उत्तम.

»  हिवाळ्यात फुटलेल्या ओठांची काळजी घेताना त्यावर क्रीम लावण्याऐवजी दुधाची साय किंवा तूपही लावू शकतो. ओठ लगेच मऊ पडतात.

Read More »

खास हिवाळ्यासाठीचे पदार्थ

हिवाळा म्हटलं की, गारेगार वा-याची झुळूक, कुडकुडणारे हात-पाय आणि स्वेटर-हातमोजे-कानटोपी घालत थंडीचा केला जाणारा सामना, असं चित्र डोळय़ांसमोर येतं. मुंबईत सध्या म्हणावा तसा थंडीचा जोर पडलेला नाही. पण हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. गारेगार थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येक जण तयारी करेल. म्हणूनच या थंडीपासून बचाव करण्यासाठी काही स्निग्ध पदार्थाचा मारा करणं आवश्यक आहे.

गुलाबी थंडीचा आनंद प्रत्येक जण घेतो. कुडकुडणा-या थंडीत चहा-कॉफीची मजाच काही औरच. कुणी स्वेटर-शालची खरेदी करेल, तर कुणी कोरडया पडणा-या त्वचेला सुरक्षाकवच पोहोचवण्यासाठी बाजारात उपलब्ध विविध क्रीम्सची खरेदी करेल. केवळ स्वेटर-शाल घालून शरीराला ऊब मिळते का? विविध क्रीममुळे कोरडया पडलेल्या त्वचेला ऊब मिळेल का? उत्तर आहे, नाही. हे सगळं करत असताना शरीरातील सरासरी तापमान राखण्यासाठी योग्य, संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.

हिवाळा तसा आल्हाददायक असतो. या अल्हाददायक वातावरणात आहारही पौष्टीक, रुचकर असल्यास ताजेतवाने वाटेल. त्यामुळे शरीराला थंडीशी सामना करण्यास आपसूकच ऊर्जा मिळेल. हिवाळ्यात वातावरण थंड असतं. थंडीमुळे भूक वाढते. पण या वातावरणात पचनक्षमताही वाढल्याने इतर वेळी पचनास जड वाटणारे पदार्थ हिवाळ्यात सहज पचतात. अशा वेळी दूध, तूप, ताक, लोणी या स्निग्ध पदार्थाचे नियमित सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरतं. योग्य आहारामुळे शरीराला आवश्यक ऊब मिळतेच तसेच वात-कफ दोषांचे संतुलनही होते. चला तर मग पाहूयात हिवाळ्यातील स्निग्ध पदार्थाचा उबदार आहार कसा असावा.

दूध, ताक, लोणी, तूप हे पदार्थ शरीराला स्निग्धता आणि ऊब दोन्ही देतात. असे पदार्थ हिवाळ्यात खाण्यास केव्हाही चांगले. प्रत्येक स्निग्ध पदार्थाची चव म्हणावी तितकी चविष्ट नसते. त्यामुळे हिवाळ्यात दररोजच्या आहारात याचा समावेश करावा तरी कसा ? असा प्रश्न हमखास पडतो.

विशेषत: लहान मुलांना हे स्निग्ध पदार्थ खाऊ घालण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. अशा वेळी या स्निग्ध पदार्थात सुकामेवा, साखर, मध, हळद, मीठ, जिरे, कोथिंबीर, मिरची पूड आदी पदार्थ टाकत त्याची चव बदलत ते मुलांना दिल्यास मुलेही आवडीने खातील. हे स्निग्ध पदार्थ नुसते खाण्याऐवजी चपाती, भाकरी, भात, खिचडीसोबत खावेत.

दूध : आबालवृद्धांच्या आहारात दुधाचा हमखास समावेश असतो. अनेक जण सकाळ-संध्याकाळ दूध आवडीने पितात. पण दुधाला पाहून नाक मुरडणारेही अनेक जण आहेत. अशा वेळी दुधाची चव बदलत ते पिल्यास केव्हाही चांगले. हिवाळ्यात ज्यांना नुसते गरम दूध आवडते त्यांनी ते दररोज एक ग्लास प्यावे.

दुधात साखर घालण्याऐवजी मध टाकून प्यावं. मध हा साखरेला उत्तम पर्याय आहेच, शिवाय मधात स्वत:चे उष्ण गुणधर्म आहे. त्यामुळे ग्लासभर दुधात एक चमचा मध टाकल्यास चविष्ट दूध लागेल. हे दूध मुले आवडीने सेवन करतील. साखर आणि मधऐवजी दूध मसाला हाही एक उत्तम पर्याय आहे. केशर, बदाम, काजू, वेलचीपूड, जायफळ यांचा समावेश असलेला दुधाचा मसाला दुधात टाकावा. दुधासोबत मसाल्यात समाविष्ट सुकामेव्याचे गुणधर्मही शरीराला मिळतील.

ताक : हिवाळ्यातील थंडीत भूक अधिक लागते. थंड वातावरणामुळे पचनही लवकर होते. अशा वेळी ताकाचे सेवन केल्यास उत्तम. पण दररोज त्याचे सेवन करू नये. जेवणानंतर ग्लासभर ताक पिणं चांगलं. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. नुसतं ताक पिण्याऐवजी त्यात आवडीनुसार साखर घालूनही पिऊ शकतो. तर इतर वेळी कोथिंबीर, मीठ, हिंग, जिरे यांचा समावेश असलेला ताकाचा मसाला वापरतही ताकाची चव वाढवता येऊ शकते.

लोणी : ताजे लोणी हे नेहमी रुचकर लागते. ताजे लोणी चवीला गोड असते आणि त्यात ताकाचा अंश असल्याने चविला किंचित तुरट, आंबटही लागते. लोणी पचायला हलके असल्याने हिवाळयात दिवसातून दोन-तीन चमचे नुसते खावे. ज्यांना नुसते लोणी खाणे आवडत नसेल त्यांनी लोण्याचा दररोजच्या आहारात समावेश करावा.

बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत ताजे लोणी चविष्ट लागेल. लोण्यात किंचित मिरचीपूड टाकल्यास लोण्याचीही चव वाढवता येऊ शकते. लोणीमध्ये चमचाभर साखर घालत हे मिश्रण गरम चपाती किंवा भाजलेल्या ब्रेडवर लावून दिल्यास मुले आवडीने खातील.

तूप : साजूक तूप जेवढे चविष्ट, रुचकर आहे तेवढेच ते औषधीही आहे. दररोजच्या आहारात तुपाचा सर्रास वापर होतो. हिवाळ्यात गरम चपाती, भाकरीसोबत तूप खावे. तांदळाच्या भातासोबत तसेच मुगाची किंवा मिक्स डाळींची खिचडी करत त्यासोबत तूप खाल्ल्यास चांगले. मटकी, तूर, उडीद, वाल या आणि इतर कडधान्यांचा वापर करत दर दोन-तीन दिवसांनी त्याची भाजी करावी.

जिरे, लसूण, मोहरी, सूंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात.

थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी सुकामेवा उपायकारक ठरतो. त्यामुळे हिवाळयात सुकामेवा तर खावाच खावा. खारीक, अंजीर, बदाम, जर्दाळू, चारोळी, काजू, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड नुसते खावेत. डिंकाचा लाडून उत्तम. सोबत तिळाची चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्कीही खावी.

सर्दी-खोकल्याच्या वेळीस थंड पाणी न पिता सकाळ संध्याकाळ कोमट पाणी प्यावे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment