Tuesday, October 27, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

शरीराला आवश्यक खनिजं

आपल्या शरीराच्या भरणपोषणासाठी किंवा शरीर सुदृढ राहण्यासाठी शरीराला खनिजांची आवश्यकता असते असं म्हणतात. पण ही खनिजं कोणती आहेत आणि ती आपल्याला कोणत्या पदार्थामधून मिळू शकतात हे आपण जाणून घेऊ या. जेणेकरून आपला आहार संतुलित कसा असावा याची तुम्हाला कल्पना येईल.

आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाचं तसंच उपविभागाचं कार्य सुरळीत राहावं म्हणून त्यांना खनिजांची गरज असते. कारण शरीरातली प्रत्येक क्रिया मग ती रासायनिक असो किंवा हार्मोनल त्या प्रत्येक क्रियेत खनिजं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ही खनिजं कुठे मिळतील असा तुम्हाला प्रश्न पडेल.

पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जे अन्न सेवन करतो त्यात ही खनिजं नैसर्गिकरीत्याच परिपूर्ण असतात. आणि जे पदार्थ किंवा खनिजं शरीराला अनावश्यक आहेत ती मल- मूत्र किंवा घामावाटे शरीराबाहेर टाकली जातात. ही सगळी खनिजं निसर्गत:च उपलब्ध असतात.

तुम्ही कृत्रिमरीत्या शरीराला त्या खनिजांचा साठा पुरवण्याचा प्रयत्न केलात तर शरीर त्या खनिजांचा स्वीकार कजरत नाही परिणामी आपल्याला विविध आजारांना तोंड द्यावं लागतं. खनिजं ही कार्बनविरहीत रासायनिक तत्त्व असतात जी पाण्यामध्ये अगदी सहज विरघळतात.

निसर्गात २४ प्रकारची खनिजं असून त्यातली सात खनिजं ही अनिवार्य असतात आणि ती फळं, भाजी, धान्य, दूध आणि पाणी या नैसर्गिक गोष्टींमधून मिळतात. आपल्या शरीराला आवश्यक असणारी खनिजं कोणती, त्यांचं काय कोणतं आणि ते कुठे मिळतात हे जाणूण घेऊ या.

कॅल्शिअम

कशात असतं?

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर

कमतरतेमुळे काय होतं?

हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे

कार्य काय असतं?

शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.

लोह

कशात असतं?

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी

कमतरतेमुळे काय होतं?

शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

कार्य काय असतं?

शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.

सोडिअम

कशात असतं?

मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं

कमतरतेमुळे काय होतं?

रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

कार्य काय असतं?

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.

आयोडिन

कशात असतं?

शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

कमतरतेमुळे काय होतं?

थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

कार्य काय असतं?

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.

पोटॅशिअम

कशात असतं?

सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.

कमतरतेमुळे काय होतं?

अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

कार्य काय असतं?

शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.

फॉस्फरस

कशात असतं?

दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

कमतरतेमुळे काय होतं?

ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

कार्य काय असतं?

मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.

सिलिकॉन

कशात असतं?

गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,

कमतरतेमुळे काय होतं?

कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

कार्य काय असतं?

जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.

मॅग्नेशिअम

कशात असतं?

बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

कमतरतेमुळे काय होतं?

उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

कार्य काय असतं?

पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.

सल्फर

कशात असतं?

दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

कमतरतेमुळे काय होतं?

प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

कार्य काय असतं?

इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.

क्लोरिन

कशात असतं?

पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

कमतरतेमुळे काय होतं?

अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.

कार्य काय असतं?

सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.

खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.

»  फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.

»  डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.

»  काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.

»  दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.

»  फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.

Read More »

जानुशिरसासन

दिवसा उठल्यावर येणारा थकवा नाहीसा करण्यासाठी तसंच मूत्रविकार, पोटावरील चरबी नष्ट करणे आदी फायदे होतात. त्यामुळे पचनक्रियाही सुधारते. पश्चिमोत्तासनाप्रमाणेच हे आसन असल्यामुळे त्याचप्रमाणे याचे फायदेदेखील आहेत.

हे आसन पश्चिमोत्तासनासारखचं आहे. जानू म्हणजे गुडघा.

आसन

दोन्ही पाय लांब करून बसावं. आता डावा पाय दुमडावा. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या इनर थाय अर्थात जांघेवर ठेवावी. डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकलेला पाहिजे.

आता हळुवारपणे शरीराच्या वरील भागास वाकवून डोकं गुडघ्याला लावावं. हातांनी पायाचा अंगठा पकडावा. काही वेळ या स्थितीत राहावं. मग थोडा वेळ विश्रांती घेऊन उजव्या पायाने हे आसन करावं.

श्वास

»  पाय वाकवून श्वास घ्यावा
»  शरीराचा वरील भाग खाली घेताना श्वास सोडावा.
»  आसनस्थितीत असताना नियमित श्वासोच्छ्श्वास चालू ठेवावा.

वेळ

»  सुरुवातीला दहा सेकंद थांबावे.

»  हळूहळू सेकंद वाढवावेत.

»  हे आसन पाच वेळा करावं.

घ्यावयाची काळजी

पाय दुमडताना व्यवस्थित दुमडावा. दुमडलेला पाय या त्याच्या विरुद्ध बाजूच्या पायाच्या जांघांना लागला पाहिजे. शरीराचा वरील भाग खाली आणताना घाई करू नये. जर का तुमचे डोकं गुडघ्याला लागत नसेल तरी चालेल. सुरुवातीला जेवढे वाकता येईल तेवढे वाका.

पायांचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. आपण पुढे वाकल्यानंतर मागच्या बाजूला वाकणंही गरजेचं आहे. या आसनानंतर शशांकासन करावं. आसन सोडताना घाई करू नये. डाव्या पायाने आसन झाल्यास दोन सेकंद होल्ड करावं. मग उजव्या पायाने हे आसन करावं.

विशेष टीप

सायटिका, हर्निया किंवा स्लिप डिस्क असलेल्यांनी व्यक्तींनी हे आसन करू नये.

फायदे

»  जानुशिरसासनामुळे मूत्रविकार दूर होतात.

»  पोटात येणारी कळ नाहीशी होते.

»  या आसनामुळे शरीरातील आळस नाहीसा होतो.

»  पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

»  जे फायदे पश्चिमोत्तासनामुळे मिळतात तेच फायदे या आसनामुळेही मिळतात.

»  या आसनामुळे पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Read More »

आरोग्यदायी गवार

गवार किंवा गोवार नावाने प्रचलित असलेली भाजी हे वेलवनस्पती आहे. पॅपिलिऑनसिया कुळातील या भाज्या आहेत.

गवार किंवा गोवार नावाने प्रचलित असलेली भाजी हे वेलवनस्पती आहे. पॅपिलिऑनसिया कुळातील या भाज्या आहेत. शेंगांच्या प्रकारात मोडत असून हे झाड साधारण एक मीटर उंच वाढतं. ही भाजी द्विदल पिकांच्या श्रेणीत मोडते.

उत्तर भारतात गवारीचे पीक अधिक घेतले जाते. कमी पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने हिची शेती केली जाते. हिचं शास्त्रीय नाव साया मोटिसस टेट्रागोनोलोबस असं आहे. यापासून गोंद केला जातो.  इंग्रजीत या भाजीचं नाव क्लस्टर बीन्स, तेलुगुमध्ये गोरुचिक्कुडु काया आणि कन्नडमध्ये गोरीकाई तसंच तामिळमध्ये कोठावरी असं म्हटलं जातं. यात भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत.

»  जेवणाची इच्छा न होणा-यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. कारण या भाजीच्या सेवनामुळे भूक वाढते.
मांसपेशी मजबूत होतात.

»  यात भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात जी शरीराला आवश्यक असतात.

»  रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवत असल्यामुळे मधुमेहींनी आवर्जून खावी.

»  पित्तनाशक वनस्पती आहे.

»  नियमित भाजीचं सेवन केल्याने रांतआंधळेपणा नष्ट होतो.

»  गवारीची पूड पाण्यात घालून त्याचा लेप मुरगळलेल्या किंवा जखम झालेल्या भागावर लावल्यास लवकर आराम मिळतो.

»  रक्तातील कोलेस्टोरॉलची पातळी नियंत्रित राखण्यास मदत करते. म्हणून हृदय रोगींसाठी अतिशय उपयुक्त भाजी ठरते.

»  फॉस्फोरस आणि कॅल्शिअमचा भरपूर स्रेत असल्याने हाडांची मजबुती चांगली होते.

»  आयर्नचं प्रमाण अधिक असल्याने हिममोग्लोबीन वाढवण्यास मदत करते.

»  शरीरातील फॉलिक अ‍ॅसिड टिकवून ठेवायचं असल्यास गरोदर महिलांनी ही भाजी आवर्जून खावी.

»  लोह असल्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. नियमित सेवनाने कित्येक आजारांपासून लांब ठेवते.

»  या भाजीमुळे मेंदूवरील ताण कमी होण्यास मदत होते. तसंच मेंदूचे कार्य सुरळीत होते.

»  ही भाजी उत्तम विरेचक म्हणून काम करते, शरीराला नको असलेले घटक शरीराबाहेर फेकण्याचं काम करते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते.

»  अल्सरसारख्या आतडय़ांच्या होणाऱ्या विकारांवरही ही भाजी नियंत्रण आणते.

»  ही भाजी वजन कमी करण्यासही मदत करते.

»  या भाजीतल्या बिया सुकवून त्याची पूड सॉस, आइस्क्रीमसारख्या अन्नपदार्थात घातल्याने ते अन्नपदार्थ घट्ट होण्यास मदत होते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment