Tuesday, October 20, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

पेनकिलर गोळ्यांचा हृदयाला धोका!

आजकालच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही. कारण जरा काही दुखायला लागलं की ही मंडळी लगेच पेनकिलरला पसंती देतात.

आजकालच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही. कारण जरा काही दुखायला लागलं की ही मंडळी लगेच पेनकिलरला पसंती देतात. त्यांना डॉक्टरांकडे जायचाही कंटाळा येतो. दुखण्यावर कुठलंही मलम लावण्यापेक्षा ते पेनकिलरलाच अधिक पसंती देतात. या पेनकिलरमुळे आपल्याला तत्काळ बरं वाटतं यामुळेच त्या गोळ्यांची सवय होते.

सवय याचा अर्थ असा की या गोळ्या आपण वारंवार घेतो. अशा रीतीने या पेनकिलरची हळूहळू सवय होते आणि आपण प्रत्येक वेळी या गोळ्या घेतो मात्र या गोळ्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. केवळ हृदयाचं आरोग्यच नव्हे तर ब्रेन स्ट्रोकचादेखील धोका यामुळे संभवतो. कारण या गोळ्यांमध्ये आयब्रूफेन आणि डाइक्लोफेनैकसारखी केमिकल्स असतात. ही केमिकल्स हृदयाची गती अनियमित करतात. यामुळे ऑट्रियल फिब्रिलेशनचा धोका वाढतो. या स्थितीत हृदयाचे ठोके इतके वाढतात की हार्ट अॅटॅकचा धोका अधिक असतो. या पेनकिलर शरीरात साइक्लोऑक्सिजन नामक इंझाइमला बाधित करतं. त्यामुळे रक्तदाब वाढतो जेणेकरून ठोक्यांची अनियमितता वाढते. म्हणूनच सातत्याने पेनकिलर घेतल्यामुळे हार्टअॅटक येण्याचा धोका तीन टक्क्यांनी वाढतो. म्हणून शक्य असेल तितकं या गोळ्यांपासून लांबच राहा. तुमच्या दुखण्यापासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर तुम्ही योगधारणा, ध्यान, योग्य आहार आणि नियमित दिनचर्येचा अवलंब केला पाहिजे.

Read More »

फरसबी

फरसबी या भाजीला फ्रेंच बिन्स, फ्रेंच ग्रीन बिन्स, स्ट्रिंग बिन्स किंवा स्नॅप बिन्स अशी अनेक नावं आहेत

फरसबी या भाजीला फ्रेंच बिन्स, फ्रेंच ग्रीन बिन्स, स्ट्रिंग बिन्स किंवा स्नॅप बिन्स अशी अनेक नावं आहेत. या आकाराने लांब, बारीक आणि थोडय़ा फुगीर असतात. अशी ही भाजी जगभरात खाल्ली जाते. ही भाजी ताजी तर चांगली लागतेच पण याशिवाय ती फ्रोजन आणि कॅनमध्ये ठेवलेलीदेखील चांगली लागते. म्हणजेच ही चांगली टिकते. लवकर खराब होत नाही. ही भाजी शिजवून त्याचप्रमाणे कच्ची खाल्लीही जाते. या भाजीत कमी कॅलरीज असून जीवनसत्त्व आणि खनिज यांचा भरपूर साठा आहे. अशा या भाजीचे गुणधर्म जाणून घेऊयात.

  • डाएटरी फायबरचं प्रमाण अधिक असल्याने रेचक म्हणून काम करते. त्यामुळे आतडय़ाचा कॅन्सर होत नाही.
  • सारक असल्याने पचनशक्ती सुधारते.
  • रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.
  • यात आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, मॅगनिझ आणि पोटॅशिअमचा साठा असल्याने शरीराचा मेटॅबॉलिझम चांगला ठेवण्यास मदत होते. यातील पोटॅशिअममुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
  • गरोदर बायकांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं कारण यात फॉलिक अॅसिडचं प्रमाण अधिक असल्याने अर्भकाच्या चेतासंस्थेची वाढ उत्तम होते. मासिक पाळीच्या दरम्यानही या भाजीचं सेवन करावं. बिजधारणेसाठी आवश्यक असणारं लोह या भाजीतून मिळतं.
  • या भाजीच्या सेवनाने डिप्रेशनचा त्रास होत नाही.
  • विटॅमिन केची कमतरता असली की हाडं ठिसूळ होऊन ती फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.
  • मात्र या भाजीतून व्हिटॅमिन के मिळत असल्याने हाडं मजबूत होतात.
  • जीवनसत्त्व अ असल्याने डोळ्याचं आरोग्य सुधारतं.

Read More »

वक्रासन

या आसनात शरीराचा वरील भाग हा पूर्णपणे वक्र होतो म्हणून या आसनास वक्रासन असं म्हणतात.

या आसनात शरीराचा वरील भाग हा पूर्णपणे वक्र होतो म्हणून या आसनास वक्रासन असं म्हणतात. असं केल्याने पाठीचा कणा, हात, पाय, तसंच पाठीच्या स्नायूंना चांगलाच ताण मिळतो.

आसन

आता जमिनीवर बसून दोन्ही पाय लांब करून बसावं. पाठ ताठ असावी. आता डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्या जवळ ठेवावा. म्हणजेच पाय वाकवून त्यानंतर उजवा हात हा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवावा. म्हणजे गुडघ्याजवळ खांदे आले पाहिजेत. तसंच हाताचा पंजा हा जमिनीवर टेकवावा. चित्रात दाखवल्याप्रमाणे. या आसनात कंबर ताठ ठेवावी आणि डावा हाताचा पंजा मागे जमिनीवर ठेवावा. तसंच शक्य असेल तितके मागे वळून बघावं. काही सेकंद या आसनात राहावे. योग्य वेळ विश्रांती घेऊन पुन्हा हे आसन उजव्या बाजूने म्हणजेच उजवा पाय वाकवून करावे.

श्वास

पाय गुडघ्यात वाकवताना श्वास घ्यावा.
शरीराचा वरील भाग वळवताना श्वास सोडावा
आसन स्थितीत असताना नियमित श्वासोच्छ्श्वास चालू ठेवावा.

वेळ

सुरुवातीला सात ते दहा सेकंद थांबावं. सुरुवातीला जेवढे सेकंद थांबू शकाल तेवढा वेळ थांबावं. नंतर हळूहळू वेळ वाढवावा. हे आसन चार ते पाच वेळा करावे.

आसन करताना घ्यावयाची काळजी

या आसनात शरीराचा वरील भाग वळवताना काळजी घ्यावी. वळवताना घाई करू नये. वर सांगितल्याप्रमाणे हात जमिनीवर ठेवावेत. पण सुरुवातीला तुम्ही हात अँकलला (पायाच्या घोटय़ाला) पकडावे आणि हळुवारपणे हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. शरीराला जास्त स्ट्रेच करू नये. हे आसन नेहमी केल्यास तुम्ही ते व्यवस्थित करू शकता. सुरुवातीला शरीराचा वरील भाग जेवढा वळवता येईल तेवढा वळवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जो पाय वाकवणार अगदी त्याच्या विरुद्ध हात घ्यावा. सुरुवातीला तुम्हाला पायाचा घोटा पकडता आला नाही तर तुम्ही पोटरीला पकडले तरीही चालते. हळूहळू नियमित सरावाने तुम्ही हे आसन चांगल्याप्रकारे करू शकाल.

फायदे

या आसनाने शरीराच्या वरील भागात चांगल्या प्रकारे ताण मिळतो.
या आसनाने पाठीच्या स्नायूंनाही चांगल्याप्रकारे ताण मिळतो.
पोट आणि कमरेचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता आणि पोटाचे इतर आजार बरे होण्यास मदत होते.
हात आणि मानेचादेखील व्यायाम होत
असल्याने मान आणि हात चांगल्याप्रकारे कार्यक्षम होतात.

Read More »

चांगल्या प्रसूतीसाठी आवश्यक गोष्टी..

गरोदरपणाची पहिली वेळ असो वा दुसरी प्रसूती होईपर्यंत ती कशी होईल याचं नाही म्हटलं तरी थोडं टेन्शन हे असतच. मात्र या टेन्शनमुळे बाळावर परिणाम होऊ शकतो. मात्र असं होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जे तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

आपण गरोदर आहोत हे समजल्यावर कोणत्याही स्त्रीला जितका आनंद होतो तितकंच टेन्शनही येतं. मग तिची पहिलीच वेळ असो किंवा मग दुसरी.. पूर्णत: प्रसूती होईपर्यंत सगळं नीट सुरळीत होईल की नाही याचं नाही म्हटलं तरी टेन्शन हे असतंच. म्हणून तिचं हे टेन्शन काहीसं कमी व्हावं म्हणून तिने थोडीशी काळजी घेतली तर लहान-सहान गोष्टींमुळे येणारं टेन्शन काहीसं कमी होईल. जेणेकरून आई आणि वाळ या दोघांनाही आरोग्य सुरक्षित राहील.

गर्भावस्थेमध्ये लहान-सहान गोष्टी खूप त्रास देतात. वाढतं प्रदूषण आणि बदलतं वातावरण यामुळे आजकाल भारतीय महिलांना गरोदरपणात अस्थमाची समस्या खूप त्रास देते. किमान सात ते आठ टक्के महिलांना या प्रकारचा त्रास होतो. केवळ गर्भवती महिलाच नाही तर तिच्या बाळावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच सुरुवातीपासूनच सावधानी बाळगणं आवश्यक असतं. कारण याचा त्रास वाढला तर मूल कमी वजनाचंदेखील होऊ शकतं. नाक चोंदणे, श्वास घेताना शिटीचा आवाज होणे, सतत कफ होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, तसंच सतत डोकेदुखी, थकावट किंवा झोप न लागणे आदी लक्षणं आहेत. यासाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे ते पुढीलप्रमाणे -

  • बदलत्या वातावरणात आरोग्याचं भान ठेवा. विशेषत: मोकळ्या हवेत फिरताना तोंडावर मास्क लावावा. जेणेकरून बाहेरचे जंतू शरीरात जाणार नाहीत.
  • बदलत्या वातावरणाचा शरीरावर लगेच परिणाम होतो. परिणामी सर्दी, खोकला, ताप असे विकार लगेच होतात. पण त्यावर औषधं न घेता डॉक्टरांकडे जावं. उगाच कोणतीही औषधं घेऊ नयेत.
  • थंडीत स्वेटर वगैरे घालणं आवश्यक असतं. गळ्यापाशी किंवा छातीवर गरम तेलाने मालिश करणं आवश्यक असतं.
  • पोट, तीव्र गंध आणि पर्यावरण प्रदूषण यापासून लांबच राहा.
  • पाळीव प्राणी उदाहरणार्थ कुत्रा, मांजर यांपासून दूर राहा. त्यांना हात लावू नका.
  • दररोज दहा ते पंधरा मिनिटं प्राणायाम करावं. म्हणजे श्वसनासंबंधी विकार होणार नाहीत.
  • धूम्रपान होत असलेल्या ठिकाणी गर्भवती स्त्रीने अजिबात फिरकू नये. अशा ठिकाणी गेल्यामुळे अस्थमाचा अ‍ॅटॅक येण्याचा धोका असतो. ज्यामुळे भ्रूणापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा पोहोचणं कमी होतं.
  • अतिश श्रमदायक कामांपासून दूरच राहा. मात्र हलके फुलके काम करत राहा. म्हणजे तुम्ही अ‍ॅक्टिव्ह राहाल.

काय खाल?

गर्भवती महिलेला आणि तिच्या बाळाला भरपूर प्रमाणात योग्य ते जीवनसत्त्व मिळणं आवश्यक असतं. त्यासाठी कोणते पदार्थ घ्यावेत हे पुढीलप्रमाणे -

  • रोज सकाळी उठल्यावर चार-पाच भिजवलेले बदाम खावेत.
  • न्याहारीदरम्यान फळं आणि ग्रीन टी अवश्य घ्यावा. ग्रीन टीमध्ये निकोटीन कमी असतं. यामुळे भूक जास्त लागते. तुम्ही अंड किंवा ज्यूस खाऊ शकता.
  • न्याहारीनंतर थोडय़ा वेळाने हिरव्या भाज्या घालून दलिया किंवा पोहे खावेत.
  • जेवणात डाळ, आमटी किंवा रस्सेदार भाजी आणि पालकाची भाजी तसंच चपाती किंवा रोटी खावी.
  • जेवणानंतर थोडा वेळाने कोणतंही एक फळ खावं.
  • संध्याकाळी सूप पिणं आवश्यक आहे. त्यामुळे रात्रीच्या जेवणाच्या वेळी जोरदार भूक लागते. सोबत ड्रायफ्रूट्स खाणं आवश्यक असतं.
  • रात्रीच्या जेवणात चपाटी, डाळ, रसदार भाजी, हिरवी भाजी आणि भात घ्या. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर कॅल्शिअम असतं.
  • रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यावं, हे आई आणि बाळ दोघांच्याही स्वास्थ्यासाठी उत्तम आहे.
  • दिवसभरात खूप भूक लागत असल्यास आणि काही खावंसं वाटत असेल तर ताजी फळं, सलाड आणि उकडलेल्या भाज्या खाऊ शकतात.
  • त्याचप्रमाणे पनीर, मोड आलेली कडधान्य, सोयाबीन आणि अंडीदेखील घेतली तरीही चालतात.
  • दिवसभरात योग्य मात्रेत पाणी पिणं आवश्यक असतं.
  • ज्यूसपेक्षा संपूर्ण फळच खावं कारण फळातील जे तंतुमय भाग असतात. त्याचा गर्भवती महिलेला अधिक फायदा होतो.
  • गर्भावस्थेमध्ये फॉलिक अ‍ॅसिड मिळणं आवश्यक असतं. जे गर्भात वाढणाऱ्या अर्भकासाठी आवश्यक असतं. म्हणूनच सॅलेडमध्ये तीळ घालून खावेत.
  • सुकलेले अंजीर खावेत फायदेशीर ठरेल. म्हणजे बद्धकोष्ठता होत नाही. कॅल्शिअमचा भरपूर स्रेत मिळतो.
  • कित्येक महिलांना सकाळच्या वेळी थकवा जाणवतो तो कमी व्हावा म्हणून आल्याचा रस अतिशय फायदेशीर ठरतं.
  • कोल्ड्रिंकचं अधिक सेवन करू नका. बाळामध्ये अपंगत्व निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.
  • अधिक वेळ ठेवलेले बटाटे खाऊ नयेत.
  • या अवस्थेत अर्धवट शिजलेले, कच्चे किंवा अधिक मसालेदार मांस खाऊ नये. कारण अशा पदार्थामध्ये बॅक्टेरिया असण्याचा संभव असतो. ज्यामुळे बाळाला इजा होऊ शकते.
  • मांसाहारी पदार्थदेखील शिजवलेलेच खावेत.
  • ओट्स, कडधान्य, ढोकळा, उपमा, सँडविच, इडली, रोस्टेड चणे, चिवडा आणि पोहे हे पदार्थ या दिवसांत सेवन करणं चांगलं असतं.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment