Tuesday, September 29, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

कर्मचा-यांचं आरोग्य जपण्यासाठी..

सोयीस्कर आणि पटकन मिळणा-यां जंक फूडच्या आहारी शहरातला तरुण वर्ग दिवसेंदिवस वळत आहे. मात्र त्यामुळे हृदयविकारासारख्या परिणामांना सामोरं जावं लागतं, याबद्दल लोक अनभिज्ञ आहेत. लोकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण होऊन आपले कर्मचारी निरोगी राहावेत, यासाठी बहुतेक ऑफिस आणि कॉर्पोरेट्समध्ये कामाच्या ठिकाणी व्यायाम आणि आरोग्यदायी आहार या गोष्टीवर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. आजच्या हृदयदिनाच्या निमित्ताने त्याविषयी थोडं जाणून घेऊ या.

मृणाल अवघ्या तिशीतली मुलगी.. अतिशय हुशार, पण जंक फूड खाल्ल्यामुळे तिचं वजन वाढत चाललं होतं. पण त्याकडे तिचं दुर्लक्ष होत होतं. सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे अवघ्या तिशीत तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

ही काही मृणालचीच समस्या नाही. हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणा-यां तरुण स्त्री-पुरुषांच्या मृत्यूबद्दल आपण सातत्याने ऐकत असतो. शहरी भागात अशा प्रकारच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. काही पिढयांपूर्वी पन्नाशी किंवा साठीतील पुरुषांना हृदयविकार व्हायचा. आता मात्र स्त्री-पुरुषांना तिशी-चाळिशीतच या विकाराचा त्रास होताना दिसत आहे.

कार्डिओव्हॅस्क्युलर डिझिजेस(सीव्हीडी)चे प्रमाण वाढत असण्यामागे प्रामुख्याने दिसणारी कारणं म्हणजे ताण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी. आज शहरी तरुण (स्त्री व पुरुष) काम, आरोग्य, आर्थिक परिस्थिती, समाज, इतरांशी तुलना यातून येणा-यां प्रचंड तणावाखाली असतात. त्याला खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नाची जोड मिळते. त्यामुळेच शहरी तरुणाईला सीव्हीडी आणि हृदयविकाराच्या झटक्यांचा त्रास होत आहे. बैठय़ा जीवनशैलीचा हा चुकीचा परिणाम होत आहे, असं म्हणता येईल.

बहुतेक ऑफिस आणि कॉर्पोरेट्समध्ये आपले कर्मचारी निरोगी राहावेत यासाठी कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहेत. कॉर्पोरेट्स आपल्या कर्मचा-यांना योग, एरोबिक्ससारख्या उपक्रमांमध्ये गुंतवत आहेत, तसंच आहारतज्ज्ञांची नेमणूक करून त्यांच्याद्वारे कर्मचा-यांना खाण्याच्या आरोग्यदायी सवयींविषयी मार्गदर्शनही करत आहेत.

सध्या विविध कार्यालयांमध्ये शारीरिक व्यायाम आणि आरोग्यदायी आहार या गोष्टी सीईओ आणि टीम लीडर्सच्या प्राधान्यक्रमावर अग्रणी आहेत. मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक व्हीडिओ फिरत होता. त्यात ऑफिसमधलं काम सुरू करण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं सगळे कर्मचारी त्यांच्या आवडीच्या गाण्यांवर थिरकत होते.

कामाला सुरुवात होण्यापूर्वी सगळं विसरून मुख्य म्हणजे शरीराला ऊर्जा मिळून ते काम करतील असा हेतू त्यामागे होता. थोडक्यात कर्मचा-यांच्या मानसिक संतुलनासाठी केलेला तो प्रयोग होता. त्यांना त्यांच्या ताणातून बाहेर काढण्याचा तो एक मार्ग त्या कंपनीला सुचला असावा.

आज अन्नाचा दर्जा खालावत असून फास्ट फूड तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. पूर्वी ४५ ते ६० वर्ष वयोगटामध्येही हृदयविकार किंवा सीव्हीडी ही खूप मोठी घटना समजली जायची, मात्र आता हा वयोगट २५ ते ३५ वर्षादरम्यान आला आहे.

शिवाय, आधुनिकीकरण, स्वयंचलित यंत्रांमुळे शारीरिक हालचाल पूर्णत: बंद झाली आहे. आता दुर्दैवाने पळणे, सायकल चालवणे किंवा चालण्यासारखे व्यायाम विशेषत: तरुण पिढीमध्ये फारसे दिसून येत नाहीत.

भरपूर ट्रान्सफॅट आणि रिफाईंड साखरेचा समावेश असलेले व सहजपणे उपलब्ध होणारे जंक फूड हे हृदयविकारामागचे प्रमुख कारण आहे. शहरी कर्मचारीवर्गाला जंक फूडची (फ्रेंच फ्राईज, तळलेले खाद्यपदार्थ) प्रचंड सवय झाली आहे, कारण ते सोयीस्कर व पटकन मिळणारे आहे, मात्र त्याच्या हृदयविकारासारख्या परिणामांबद्दल लोक अनभिज्ञ आहेत. एका अभ्यास अहवालानुसार ग्रामीण भारतात व्यक्तिगणिक फॅट्सचे सेवन ९ ते २२ ग्रॅम आहे, तर शहरी भागांत हेच प्रमाण २५ ते ४५ ग्रॅम असून ते अतिशय धोकादायक आहे.

आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी ट्रान्सफॅट्स आणि रिफाईंड साखर (बेकरी उत्पादने व जंक फूड) यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. त्याशिवाय, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करण्यानेही हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. अमेरिकेतील वैज्ञानिक अभ्यासानुसार दररोज दहा हजार पाय-यां चालल्यास हृदयविकार किंवा सीव्हीडी होण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.

दैनंदिन जीवनात केलेल्या थोडय़ाशा बदलामुळे दीर्घायुष्य जगण्यावर तसेच हृदय निरोगी राहण्यास मदत होते. सातत्याने तपासणी व मूल्यांकन केल्यास कामाचं ठिकाण निरोगी राहण्यास चालना व पाठिंबा मिळेल.

Read More »

रंग सांगतो आजाराचं लक्षण

आपण तंदुरुस्त असताना आपल्याला होणा-यां लघवीचा रंग हा पिवळा असतो. मात्र कधी कधी हा रंग गडद होतो किंवा पांढरा होतो इतकंच नाही तर काही पदार्थामुळे हा रंग वेगळाही दिसतो.

आपण तंदुरुस्त असताना आपल्याला होणा-यां लघवीचा रंग हा पिवळा असतो. मात्र कधी कधी हा रंग गडद होतो किंवा पांढरा होतो इतकंच नाही तर काही पदार्थामुळे हा रंग वेगळाही दिसतो. थोडक्यात काय तर आपल्या लघवीचा रंग जसा बदलतो त्यानुसार आपल्याला कोणता आजार होतो आहे याचं लक्षण समजतं.

कोणताही आजार अगदी साधा ताप आला तरी डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला युरीन टेस्ट करायला सांगतात. आपण टेस्ट करतो मात्र पण ही टेस्ट आपल्याला कशाला करायला सांगितली आहे, त्यामागचं कारण काय आहे, हे मात्र आल्याला कळत नाही.

खरं म्हणजे युरीनच्या रंगावरून आपल्याला नेमका काय आजार झाला आहे याची डॉक्टरांना कल्पना येते असं ब्रिटनच्या विंडसर युरोलॉजीचे युरोलॉजिस्ट डॉ. मार्क लैनियाडो यांनी सांगितलं आहे. त्यांनी काही उदाहरणं सांगितली आहेत ज्यावरून आपल्या युरीनच्या साहाय्याने आपल्याला काय होतंय याचा अंदाज आपण लवकरात लवकर लावू शकतो. ही यादी पुढीलप्रमाणे -

»  फिकट पिवळा : शरीराला आवश्यक असणारी पाण्याची पातळी तुम्ही गाठली असून तुमची तब्येत ठीक आहे. मात्र हाच पिवळा रंग गडद असेल तर तुम्हाला अधिक पाणी पिण्याची आवश्यकता आहे हे समजावं.

»  गडद पिवळा : शरीराला आवश्यक असणा-यां जीवनसत्त्वांची पूर्तता झाली आहे असं समजावं.
केशरी किंवा ऑरेंज : शरीरातील पाण्याची कमतरता तसंच मिठाची मात्रा अधिक झाल्याचं समजावं. कधी कधी हे काविळीचंदेखील लक्षण मानलं जातं.

»  निळा : याचा अर्थ काही जीवाणूंचा संसर्ग तुम्हाला झालेला आहे. अधिक प्रमाणात केक किंवा त्यावरचं आयसिंग खाल्ल्याने थोडक्यात अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने हा रंग येऊ शकतो.

»  हिरवा : जीवाणूंच्या उपस्थितीमुळे असा रंग येऊ शकतो किंवा पार्किंन्सससारख्या आजारावरील औषधांमुळेदेखील असा रंग येऊ शकतो.

»  गुलाबी किंवा लाल : बीट किंवा ब्लॅकबेरी खाल्ल्यानेदेखील असा रंग येतो. याशिवाय लाल रंग हा मूत्राशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

»  काळा किंवा चॉकलेटी : किडणीचा त्रास असणा-यां किंवा ज्या व्यक्ती ड्रग्जच्या अधीन असतात त्यांच्या
लघवीला असा रंग येतो.

» पांढरा : पांढरा रंग म्हणजे शरीराला अतिरिक्त पाणी मिळतं, पण जीवाणूंना रोगसंसर्गाची लागण होण्याची?शक्यता नाकारता येत नाही.

Read More »

पोषक पडवळ

'ट्रायकोसॅथेस अ‍ॅग्विना' असं या भाजीचं शास्त्रीय नाव असून ही एक उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. वेलीवर लांबलचक फळं येतात.

'ट्रायकोसॅथेस अ‍ॅग्विना' असं या भाजीचं शास्त्रीय नाव असून ही एक उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. वेलीवर लांबलचक फळं येतात. ही फळं साधारण १५० सेंमी लांबीपर्यंत वाढतात. ही फळं म्हणजेच ही भाजी होय. आत पांढरट, हिरव्या रंगाचा, मऊ, रसदार गर असतो. पडवळाला हिंदीत 'चिचिडा' तर इंग्रजीत 'स्नेक गोअर्ड' अशी नावं आहेत. पडवळाची चव काहीशी कडवट असते मात्र तो शिजल्यावर ही चव निघून जाते. या भाजीच्या आकारामुळे कित्येक जण ही भाजी खात नाहीत. मात्र या भाजीत भरपूर खनिज, जीवनसत्त्व आणि पोषकद्रव्य असतात. अशा या भाजीचे अनेक औषधी गुण आहेत.

»  पडवळात पाण्याचा साठा भरपूर असल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राखण्यास मदत करते. म्हणूनच ताप आलेल्या माणसाने ही भाजी खाल्ल्याने त्वरित आराम पडतो.

»   यात लो कॅलरीज आणि कमी चरबीयुक्त पदार्थ असल्याने वजन कमी करण्यासाठीदेखील ही भाजी खावी. इतकंच नव्हे तर मधुमेहीच्या रुग्णांनाही भरपूर पोषणमूल्य देऊन त्यांचं वजन कमी करायला मदत करते.

»  फायबरचं प्रमाण मुबलक असल्याने पचनशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचा आहारात आवर्जून समावेश करावा. लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास त्यांना या झाडाच्या पानाचा रस प्यायला दिल्याने लवकर आराम पडतो.

»   हृदयविकार किंवा हृदयाचे ठोके अनियमित असलेल्यांनी पडवळाच्या पानाचा रस प्यावा. आराम पडतो.

»   केसांत कोंडा झालेल्यांनी पडवळाच्या पानांचा रस काढून तो रस केसांच्या मुळाशी लावल्याने कोंडा नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय केस वाढण्यास मदत होते. तसंच चाई पडली असल्यासही ही भाजी खाल्ल्याने लवकर आराम पडतो.

»  शरीराला नको असलेले पदार्थ लघवीवाटे बाहेर फेकण्याचं काम ही भाजी करते.

»   श्वसनाचा त्रास असलेल्यांनी या भाजीचा आहारात समावेश करावा. कारण कफ मलावाटे बाहेर पडतो. सायनसचा त्रास असलेल्यांनीही ही भाजी नक्की खावी. म्हणजे कफ बाहेर पडण्यास मदत होते.

»   कॅरोटिन्स आणि 'क' जीवनसत्त्वामुळे आपली प्रतिकारशक्ती सुधारते.

Read More »

हलासन

संपूर्ण शरीराला चांगल्या प्रकारे व्यायाम देऊन रक्ताभिसरण सुरळित करणारं हे आसन म्हणजे हलासन होय. या आसन केल्यावर शरीराचा आकार हल किंवा नांगराप्रमाणे दिसतो म्हणून याला हलासन असं म्हणतात.
हल म्हणजे नांगर. हे आसन करताना शरीराचा आकार हा नांगराप्रमाणे दिसतो म्हणून याला हलासन असं म्हणतात.

आसन

सर्वप्रथम जमिनीवर बसावं. हात शरीराच्या दोन्ही बाजूला, तळहात जमिनीकडे करून शरीराजवळ ठेवा. दोन्ही पायू ताठ आणि सरळ रेषेत असावेत. आता दोन्ही पाय वरती घ्यावे. पाय ताठ असावे. गुडघे दुमडू नये. आता हाताच्या साहाय्याने दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने न्यावे. पायांची बोटं जमिनीला स्पर्श करावीत.

दोन्ही हात ताठ असावेत. हनुवटी ही छातीला स्पर्श करावी. या स्थितीत सुरुवातीला सात ते आठ सेकंद थांबावं. हे आसन सोडताना घाई करू नये. दोन्ही पाय वरती आणावेत. ९० अंशाएवढे हाताच्या साहाय्याने पायांना हळुवारपणे खाली आणावे. पाय पूर्वस्थितीत म्हणजे खाली आणताना कंबरेला हादरा बसणार नाही याची काळजी घ्यावी. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पायांना ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

श्वास

दोन्ही पायांना वरती आणताना श्वास घ्यावा. पाय डोळ्यांच्या दिशेने न्याल तेव्हा श्वास सोडावा. आसनस्थितीत श्वासोच्छ्वास चालू असावा. तोंडाने श्वास घेऊ नये.

आसन करताना घ्यायची काळजी

हे आसन करताना घाई करू नये. हातांच्या साहाय्याने पायांना उचलावं. पायांची बोटं जमिनीला टेकत नसतील तर जास्त उगाचच ताण देऊ नये. असे केल्यास मानेला त्रास होईल. आसनस्थितीत पाच सेकंद नाही राहू शकला तरी सुरुवातीला चालेल. हळूहळू सरावाने तुम्ही करू शकाल. आसन सोडताना घाई करू नये.

हातांच्या साहाय्याने कंबरेलाल अलगद खाली आणावं. तसंच पायांना खाली आणताना कंबरेला हादरा बसणार नाही याची काळजी घ्यावी. हे आसन स्त्रियांनी किंवा मुलींनी करताना केस सोडावेत. बोदेखील नसावा. कारण हे आसन करताना बो किंवा आंबाडा घातला असेल तर हे आसन करताना मानेला त्रास होईल म्हणूनच असं कृपया करू नये.

फायदे

»  या आसनाने पूर्ण शरीराला चांगल्याप्रकारे व्यायाम होतो.
»  रक्ताभिसरण सुरळीत होतं.
»  यात पाठीच्या कण्यावर ताण पडतो त्यामुळे पाठीचे स्नायू, मणके सुदृढ होतात.
»  आसनाच्या नियमित सरावाने शरीरात चैतन्य निर्माण होते.
»  चेहरा तेजस्वी दिसतो. रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होत असल्याने चेह-यांचे स्नायू कार्यक्षम होतात. म्हणूनच चेह-यांवर तेज येतं.
»  पोटातील स्नायू सुदृढ आणि मजबूत होतात.
»  संधिवात किंवा लचक भरणे यासारख्या तक्रारी दूर होतात.

विशेष टीप

»  ज्या व्यक्तींना हर्निया, स्लिपडिस्क, सायटिका उच्च रक्तदाब किंवा गंभीर असा पाठीचा त्रास तसंच मानेचा आथ्र्राटिस असेल अशा व्यक्तींनी हे आसन करू नये.

»  हे आसन मार्गदर्शनाखालीच करावं.

»  हे आसन करताना स्त्रियांनी किंवा मुलींनी केसांचा आंबोडा किंवा बो घालू नये. त्यामुळे मानेला त्रास होईल. केस सोडावेत किंवा केसांची सैलसर वेणी घालावी.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment