Tuesday, April 21, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

उन्हाळ्यातही राहा थंडगार

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना अनेकांना आजारपणाचा सामना करावा लागतो. पण या वातावरणाशी जुळवून घेताना आपण काय बदल केले पाहिजेत हे जाणून घेऊया.

सध्या मुंबईचा पारा प्रचंड वाढला आहे. या हॉट वातावरणामुळे सगळेच हैराण झालेले आहेत. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या उन्हाने आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. अक्षरश: अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.

उन्हाच्या तडाख्यामुळे जीव अगदी कासावीस होतो. उन्हामध्ये प्रचंड प्रमाणात येणारा घाम, उकाडा, चिकटपणा यामुळे सगळेच खूप त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. अशा वेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्याची गरज प्रत्येकालाच भासते. या हॉट वातावरणात कूल राहण्यासाठी पुढे काही उपाय दिले आहेत. ते करून बघा.

सुती कपडयांचा वापर

उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडयांचा वापर करावा. जेणेकरून सुती कापड उष्णता शोषून घेईल. तसेच हे कपडे सैल व सुटसुटीत असावेत. उकाडयात कॉलेजिअन्ससाठी जीन्सऐवजी लेगीन्सचा पर्याय उत्तम आहे. घट्ट कपडे टाळावेत. नायलॉन आणि सिंथेटिक कपडे घालणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. कारण नायलॉन कापड अंगाला आलेल्या घामाला चिकटतं त्यामुळे घामाचा ओलावा कायम राहतो. आणि ते आपल्या शरीराला त्रासदायक ठरते.

भरपूर पाणी प्या

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला भरपूर तहान लागते. तहान भागवण्यासाठी खूप पाणी पितो. भरपूर पाणी पिणं हे उत्तमच आहे. पण काही वेळा त्याचा जेवणावर परिणाम होतो. आपली भूक मंदावते. या काळात दिवसातून बारा ग्लास पाणी प्यावं. उकाडयातून घरी थकूनभागून आल्यावर लगेच पाणी पिणं नेहमी टाळावं. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन मगच आरामात बसून पाणी प्यावं.

शीतपेयांचा अतिवापर टाळा

आजच्या फास्ट जीवनशैलीमध्ये कोला, सोडा तसेच विविध प्रकारचे कोल्ड्रिंक्स ही शीतपेयाचा अविभाज्य अंग झालेली आहेत. उन्हाचा ताण कमी करण्यासाठी आपण पटकन एखादी शीतपेयाची बाटली काढून तोंडाला लावतो. परंतु कधीतरी हे शीतपेय पिणं ठीक आहे. रोजच व्यसन लागल्याप्रमाणे त्याचं सेवन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या कोल्ड्रिंक्सऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी, ताक इत्यादी प्यावं. त्यामुळे शरीराला स्फूर्ती येते आणि ऊर्जाही मिळते.

उन्हाळ्यातला आहार

बाहेरच्या पदार्थाची चव आपल्या जीभेवर नेहमीच असते. परंतु उन्हाळ्यात शक्यतो बाहेरचे पदार्थ टाळा. कारण त्यामुळे फुड पॉयझन अर्थात अन्नातील विषबाधा होते. शिवाय कावीळ, टायफॉइड, कॉलरा व अतिसार अशा रोगांना आमंत्रण मिळतं. रोजच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यावं. रोज शरीराला पौष्टिक घटक आणि पोषक तत्त्वं मिळत आहेत की नाहीत याकडे लक्ष द्या. उन्हाळ्यात शिजवलेले अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे शिळे अन्न टाळावं. जड आणि तिखट मसालेदार-तळलेले पदार्थ खाऊ नयेत. सहज पचणारं हलकं भोजन घ्यावं.

स्नायूंची काळजी घ्या

उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात उष्णता असल्याने घाम येतो. आणि आपल्या शरीरातले द्रवाचं प्रमाण झपाटयाने कमी होते. त्यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांची कमतरता निर्माण होऊन स्नायूंमध्ये पेटके येण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी वेदना वाढल्यास त्या भागावर बर्फ लावा. काही वेळा पाणी प्यायल्यानेसुद्धा पेटक्यांना आराम मिळतो.

उन्हापासून त्वचा सांभाळा

सूर्याची अतिनील किरणं त्वचेला घातक ठरतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना चेह-यासाठी स्कार्फचा वापर करावा. उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबाचा रस टाकून अंघोळ करावी. त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो. हानिकारक सूर्यकिरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी योग्य अशा सनस्क्रीमची निवड करा.

घरातून बाहेर निघताना २० ते ३० मिनिटं अगोदर सनस्क्रीम लावा. त्वचेला रोगमुक्त ठेवण्यासाठी दररोज दोन वेळा क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग करण्याची सवय लावावी. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असू द्या. त्वचेचा रंग सावळा होत असेल तर कच्चा टोमॅटो कुस्करून त्यात ताक मिसळून चेह-याला लावल्याने थंडावा मिळतो.

डोळ्यांची काळजी घ्या

उन्हात नेहमी २ ते ३ तासानंतर डोळ्यांवर गार पाणी मारावं. दुपारच्या वेळी डोळ्यांवर काकडीच्या फोडी ठेवाव्यात. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटं डोळ्यांवर दुधाच्या पट्टया ठेवाव्यात. तसंच घरातून बाहेर पडताना गॉगल लावणं हितावह ठरेल.

केसांची निगा राखा

उन्हाळ्यात केस कोरडे होतात. अशा वेळी कोणत्याही प्रकारचे केमिकल आणि हेअरस्टाईल बनवणा-या उपकरणांपासून दूरच राहा. याशिवाय मेंदी कंडिशनरचं काम करत असल्याने केसांचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी १५ दिवसांनी मेंदी लावावी. तसंच आठवडयातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर करावा.

आजारापासून मुक्त राहा

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना अनेकांना आजारपणाचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात आजारापासून संरक्षण करायचे असेल किंवा अंगाला खाज सुटत असेल तर खरबूज हा उत्तम पर्याय आहे. कारण खरबूजमध्ये १५ टक्के पाण्यासोबत व्हिटॅमिन्सचे प्रमाण मोठया प्रमाणात आढळते.

उन्हाळ्यात ताप किंवा डोकं दुखत असेल तर औषधं स्वत:हूनच घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक औषधे घेणं केव्हाही चांगलं. ताप अधिक असल्यास कपाळावर पाण्याच्या पट्टया ठेवल्यास अधिक आराम मिळतो. उन्हाळ्यातील आजारांचे मूळ कारण म्हणजे पाण्याची कमतरता, प्रदूषित अन्न, दूषित पाणी इत्यादी. या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या.

वातावरण प्रसन्न ठेवा

ऑफिस किंवा घरातल्या खिडक्या स्लाइड्सने किंवा पडद्याने झाका, मात्र हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या. डेस्कवर एक छानसा फ्लॉवरपॉट ठेवावा. जेणेकरून मनाला प्रसन्नता मिळेल. ब-याचदा ऑफिसमध्ये जास्त लाईट्स लावले जातात. पुरेसा प्रकाश ठेऊन अतिरिक्त लाईट्स बंद ठेवा. डेस्कवर एखादं सुखद, तजेलदार निसर्गचित्र लावून ठेवा. त्यामुळे मानसिकदृष्टया ताजेतवानं राहण्यास मदत होईल.

Read More »

वंध्यत्व निवारणातील आधुनिक उपचारपद्धती

आजकाल कित्येक जोडप्यांना मुल लवकर होत नाही. त्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. या वंध्यत्वामागे बरीच कारणं असतात. मात्र या कारणांवर मात करून आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करून वंध्यत्वाचं निवारण करू शकतो. अशा या उपचारपद्धतीची माहिती करून घेऊया.

मानव महानता, बुद्धिमता, सामर्थ्य आणि तर्कसंगतीची कौशल्ये यांमध्ये विकसित झाला असला तरीही, त्याला गर्भधारण क्षमतेमध्ये अपयशच आलं आहे. मानवाचं किंवा लोकसंख्येच्या जननक्षमतेची शक्ती म्हणजेच गर्भधारण क्षमता. सध्या मानवजातीमध्ये जननक्षमतेची शक्ती सर्वात कमी आहे. एकाच चक्रामध्ये जननक्षम जोडप्यामध्ये गर्भधारणा राहण्याचं प्रमाण जास्तीत जास्त ३० टक्के आहे. यामुळे वंध्यत्व किंवा सब-फर्टाईल जोडपे या विषयांवर चर्चासत्र होतात.

जननक्षमतेमधील आव्हानं

सब-फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाची विविध कारणे आहेत. स्त्री जोडीदाराचे वय तसेच त्यांचे जतन अंडे टीटीसी (गर्भधारणेची वेळ) ठरवतात. ६-१२ महिने गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यानंतर वेळोवेळी निदान आणि मूल्यांकन करणं आवश्यक आहे.

उपचारपद्धती

युवा जननक्षम जोडप्यांमध्ये प्रत्येक महिन्यात गर्भधारणा होण्याची शक्यता २० टक्के असते. त्यामध्ये अंडमोचन किंवा शुक्रपेशींची संख्या कमी असणे यांसारख्या तक्रारी असल्यास, अंडाशयाचे विगमन (ओव्हय़ुलेशन) किंवा इन्ट्रायुटेराईन इन्सेमिनेशन (आययूआय)सारखे उपचार करून ही शक्यता सामान्य शक्यतेप्रमाणे (१५-२०) टक्केकरता येते.

यापलीकडे, सहायक प्रजनन तंत्र आहेत. यामध्ये बंद झालेल्या अंडवाहिनींमधील आव्हानं दूर करणे, एन्डोमेट्रिओसिस, अ‍ॅनोव्हय़ुलेशन, शुक्रजंतूंची संख्या अति कमी असणे, वीर्य बाहेर पडल्यावर त्यात शुक्रजंतू नसणे, अंडाशयाचे जतन कमी असणे इत्यादी अडचणींवर इन व्ह्रिटो फर्टिलायझेशनच्या मदतीने मात केली जाऊ शकते. इन व्ह्रिटो फर्टिलायझेशन हे सर्वोत्तम प्रमाणित तंत्र आहे आणि ते आयव्हीएफच्या मदतीने पुढील पिढीमधील बाळाचे स्वागत करण्यासाठी उपयुक्त आहे.

अंडाशयाच्या उत्तेजनावर नियंत्रण ठेवून, अंडयाची वाढ करणे, स्त्री शरीरामधून या अंडयांना बाहेर काढणे आणि नियंत्रित निकषामध्ये या अंडयांना शुक्रजंतूसोबत सुपीक बनवणे या मार्गाने आयव्हीएफ काम करते. पारंपरिक आयव्हीएफ मोठया संख्येत चांगल्या शुक्रजंतूसोबत या प्रत्येक अंडयांचा थर बनवून कार्य करते.

तरीसुद्धा, शुक्रजंतूची संख्या कमी असते किंवा पुरुषांमध्ये शुक्रजंतू नसतात, तेव्हा या स्थितीसाठी इन्ट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) हे तंत्रज्ञान वापरलं जातं. यात प्रत्येक अंडयामध्ये एक उत्तम शुक्रपेशी इंजेक्ट केली जाते, व त्यावरून फलन होते. त्यामधून तयार झालेला गर्भ पुढे पूर्ण विकसित होईपर्यंत नियंत्रित तापमान व वातावरणामध्ये इन्कीब्युटरमध्ये ठेवला जातो. त्यानंतर त्यामधून निवडक एक किंवा दोन गर्भ हळुवार माता बनू इच्छिणा-या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये टाकला जातो.

आधुनिक वंध्यत्व निवारणाबद्दलच्या समजुती व व्याख्या (डिकोडिंग)

न्यूनतम आवश्यक मात्रेमध्ये सर्वोत्तम अंडयांची वाढ करणे या आव्हानासाठी, सर्वोत्तम अंडं व शुक्राणू निवडणे आणि उच्चस्तरीय गर्भ तयार करणे हे आव्हानात्मक आहे. सरासरी ४० टक्केगर्भ उच्च प्रतीचे असतात. फारच थोडे वापर न करता येण्यासारखे असतात आणि उरलेले सरासरी असतात. या व्यतिरिक्त, आयव्हीएफमुळे गर्भधारणेचा दर ४० टक्केवाढतो. संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की, ३०-४० टक्के सर्वोत्तम गर्भ असतात म्हणून त्यामुळे यशस्वी गर्भधारणा होते.

गर्भ तयार होतो, तेव्हा त्यामधील केवळ ३० टक्के अनुवंशिक स्वरूपात तयार झालेले असतात आणि प्रत्येक आयव्हीएफ चक्रामधून गर्भधारणा का होत नाही हा प्रश्न निर्माण होतो. कारण ते दिसताना व्यवस्थित असलं तरी प्रत्येक गर्भाची आतून व्यवस्थित वाढ झालेली नसते.

नवीन काय?

स्त्रीचं वय जसं वाढत जातं, त्याप्रमाणे तिचा गर्भ असामान्य होत जातो. तिच्या ४० वर्षाच्या वयातील १०पैकी केवळ २ गर्भ सामान्य असतात. ही फार मोठी संख्या आहे. या परिस्थितीचे उपचार घेणारे बरेच रुग्ण आणि उपचार करणारे डॉक्टर यांना याबद्दल माहितीच नसते. यासाठी पीजीएस हे नावीन्यपूर्ण तंत्र आहे. पीजीएस किंवा प्रिइम्प्लान्टेशन जेनेटिक स्क्रीिनग हे व्यवस्थित तंत्र गर्भाची बायोप्सी करण्यासाठी आहे आणि जेनेटिक स्क्रीिनगसाठीसुद्धा आहे ज्यामुळे सामान्य गर्भ निवडणे आणि तो गर्भाशयामध्ये सोडणे या बाबी शक्य होतात.

ज्या जोडप्यांना याची गरज असते त्यांमध्ये गर्भधारणा वयापेक्षा जास्त वय असलेले (एएमए), वारंवार गर्भधारणेमध्ये अपयश आलेले (आरपीएल), वारंवार रोपण (इम्प्लान्टेशन) न होणे आणि शुक्रपेशींची संख्या फारच कमी असणे या प्रकारच्या रुग्णांची संख्या असते. पीजीएसमध्ये गर्भाचे तिस-या दिवशी तपासण्यासाठी आणि अहवालानुसार सामान्य गर्भाची निवड करून पाचव्या दिवशी तो गर्भाशयात सोडणे यांसाठी मदत करते. मग गर्भाचे सातव्या दिवशी रोपण होते.

जनन क्षमतेसोबत काय चुकीचं घडू शकतं?

आपण केलेला गर्भ सामान्य असल्याची खात्री केली तरीही, त्यामध्ये काय चुकीचं असू शकतं?
सुपीक जमिनीमध्ये बी वाढते आणि तिचे फलन होऊन मुळे अंकुरतात आणि माता पृथ्वीकडून त्या गर्भाला पोषण मिळते. हेच गर्भाशयाच्या भित्तीवर होते, गर्भाशयाच्या स्तराला एक थर असतो ज्याला एन्डोमेट्रियल लायिनग असतात आणि त्यावरून स्पंजसारखा मुलायम बिछाना तयार होतो तो आईच्या उतींपासून तयार होतो.

त्याला रोपण म्हणतात. कोणत्याही कारणांसाठी हा बिछाना निरोगी नसल्यास, गर्भाची वाढ होत नाही. गर्भधारणा होत नाही किंवा लवकर गर्भपात होतो. हा एन्डोमेट्रियल बिछाना निरोगी असल्याची खात्री करून आणि अडथळे किंवा आजारापासून मुक्त असणे हे सारखेच महत्त्वाचे आहे.
गर्भाशयाचे मूल्यांकन दोन टप्प्यांत केलं जातं-मूलभूत अल्ट्रासाउंड किंवा थ्रीडी अल्ट्रासाउंड आणि हिस्टेरोस्कोपी.

जननक्षमता उपचाराआधी हिस्टेरोस्कोपीवरून कोणतीही असामान्यता असल्यास ती लक्षात येते. तरीसुद्धा, योग्यपणे ठेवलेले गर्भ, सामान्य गर्भाशय पोकळीमध्ये रोपण होत नाही. अशा उदाहरणामध्ये एन्डोमेट्रियल रिसीप्टिव्हीटी एॅरे हे तंत्र उपलब्ध आहे, जे रुग्णासाठी रोपणाचा वैयक्तिक मार्ग उपलब्ध करतात.

ईआरए विशिष्ट दिवशी परिणामकारक रोपणासाठी केले जाते. ही चाचणी उपचाराच्या एक महिना आधी केली जाते. ही गर्भ हस्तांतरण करण्यासाठीची अनुकरणीय पद्धत आहे आणि गर्भ हस्तांतरण करण्याऐवजी, हस्तांतरणाच्या दिवशी बायोप्सी केली जाते. ही बायोप्सी नंतर दोनशे वेगवेगळ्या जीन्ससाठी तपासली जाते ज्यावरून रिसेप्टिव प्रकार लक्षात येतो. यामुळे रुग्णासाठी व्यक्तिगत रोपणाचा मार्ग उपलब्ध होण्यास मदत होते.

विविध उपचार प्रकार उपलब्ध असण्यासह प्रजनन विज्ञान फारच आवड निर्माण होण्यासारखे आहे- युटेरियन ट्रान्सप्लान्ट, युग्मकांचे स्टेमसेल निर्मिती आणि बरेच नवीन क्षेत्र यांमध्ये आहेत. चिकित्सकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी व्यवस्थित संशोधन करून, सुरक्षित मार्गाने उपचार करून रुग्णांना लाभ करून द्यावा.

Read More »

मधुर रासबेरी

चवीला मधुर, दिसायला तेजस्वी आणि लाल रंगाची रासबेरी आपल्याकडे भारतातही लोकप्रिय आहे. मूळची युरोपात असली तरी पोलंड, अमेरिका, जर्मनी आणि चिली आदी ठिकाणी रासबेरीची लागवड होते.

चवीला मधुर, दिसायला तेजस्वी आणि लाल रंगाची रासबेरी आपल्याकडे भारतातही लोकप्रिय आहे. मूळची युरोपात असली तरी पोलंड, अमेरिका, जर्मनी आणि चिली आदी ठिकाणी रासबेरीची लागवड होते. हे फळ दिसायला बोरासारखं असून चवीला स्ट्रॉबेरीसारखं असतं. त्यात एक बीदेखील असते. अशा या फळात खनिजं आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांचा समावेश आहे. अशा या आरोग्यसंपन्न फळाविषयी जाणून घेऊया.

» यात उष्मांक आणि सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण कमी असलं तरी डाएटरी फायबर आणि अँटिऑक्सिडंटचा त्यात भरपूर समावेश असतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत करते.

» अँटिऑक्सिडंटची संयुगं असल्याने हे फळ कर्करोगापासून दूर ठेवतं.

»  रक्तातील साखरेचं अतिरिक्त प्रमाण शोषून घेतल्यामुळे मधुमेहींसाठी या फळाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं.

»  यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांब, लोह आदी घटकांचं प्रमाण अधिक असल्यामुळे हृदयाच्या विकारांपासून लांब राहतो. तसंच तांबं असल्यामुळे लाल रक्तपेशींचं प्रमाण वाढण्यास मदत होते.

»  गर्भधारणेसही अतियश उपयुक्त असून त्यामुळे मिस्कॅरेज होण्याची शक्यता धूसर होते.

»  नियमित सेवनाने पायात पेटके येण्यापासूनही आराम मिळतो.

»  त्वचेचा पोत सुधारून वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यास मदत करते.

»  यात जीवनसत्त्व ब आणि फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश असल्यामुळे डिप्रेशनपासून मुक्तता मिळते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment