Tuesday, August 25, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

मोबाईल वापरा, पण जपून!

मोबाईल फोन ही आजची अतिशय गरज झाली आहे, असं म्हटलं तरीही चालेल. अगदी वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळेच जण मोबाईलचा सर्रास वापर करताना आढळतात. पण या मोबाईलवर सतत वापर केल्याने कित्येकांना डोकेदुखी, चिडचिडेपणा, त्वचा लाल होणे यांसारख्या अनेक विकारांना सामोरं जावं लागतंय.
एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी मोबाईल फोन वापरले जाऊ लागले आणि बघता बघता ते प्रत्येकाच्या हातातलं एक खेळणं झालं आहे, असं म्हटलं तरी चालेल. कारण लहानग्यांपासून अगदी मोठय़ांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलच्या अधीन झालेले दिसतात. मग कधी गाणी ऐकण्यासाठी तर कधी गेम खेळण्यासाठी तर कित्येकांच्या पेशाची गरज म्हणूनही तासन् तास फोनवर बोलावं लागतं. थोडक्यात काय तर सध्या मोबाईल हे जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे. आपल्या देशात करोडो लोक मोबाईल वापरतात. त्यामुळे आपल्या देशात भरपूर मोबाईल टॉवर आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. मात्र या मोबाईलमुळे आपल्याही नकळत काही विकारांना सामोरं जावं लागत आहे. मोबाईलमधून काही विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडतात. हे तरंग शरीरातील पेशींना हानी पोहोचवतात परिणामी शरीराचं खूप नुकसान करतं. सध्या सीडीएमए आणि जीएसएमए असे दोन प्रकारचे फोन वापरात असतात. जीएसएम (ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल कम्युनिकेशन) या प्रकारात मोडणा-या फोनवर बोलत असताना साधारण ८९० ते ९१५ हर्ट्झ तरंग टॉवरमधून मोबाईलपर्यंत जातात. तर सीडीएमए फोनवर बोलताना ८६७ ते ८४९ हर्टझ लहरी उठतात. आपल्या शरीरातही काही विद्युत तरंग असतात जी आपल्या शरीराला आवश्यक असतात. या लहरींमधून वातावरणातील विविध बदल आणि संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यानुसारच विविध संकेत मेंदूमार्फत विविध अवयवांना पोहोचतात. मोबाईल आणि अन्य उपकरणातून बाहेर पडणा-या विद्युत चुंबकीय लहरी शरीरावर परिणाम करतात. याचा मुख्य परिणाम आसपासच्या पेशींना गरम करण्यावर होतो. याचबरोबर शरीराच्या अन्य अवयवांसाठीही या लहरी हानिकारक असतात. यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात ते पाहू या.

मोबाईलच्या अतिरेकामुळे शरीरावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे -

विविध अभ्यासाअंती हे समजलं आहे की, मोबाईलचा अधिक वापर केल्याने आणि काही विशिष्ट पद्धतीने वापर केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय.

= एकाग्रता कमी होते, नवीन शिकण्याची क्षमता कमी होते. ग्रहणशक्ती कमी होते. हा परिणाम प्रामुख्याने मुलांवर अधिक प्रमाणात होतो. आजकालची मुलं मोबाईलवर अधिक प्रमाणात गेम्स खेळताना दिसतात. अशा मुलांना अल्झायमरसारख्या आजारांनाही सामोरं जावं लागतं.

= विद्युत चुंबकीय लहरी सतत कानाच्या आसपास पोहोचत असल्याने केवळ कानच नाही तर आसपासच्या अन्य पेशींवरही परिणाम होऊ शकतो. कधी कधी फोनवर बोलताना किंवा अधिक वेळ फोनवर बोलण्यामुळे मोबाईल गरम झाल्याचं आपण अनुभवलं असेलच.

= मोबाईला अति वापर स्त्री आणि पुरुष यांच्या गुणसूत्रांवर आणि हार्मोन्सवरही होतो. परिणामी नपुंसकत्वही येऊ शकतं.

= उच्च तापमानाचा डोळ्यांवरही परिणाम होतो हे तुमच्यापैकी ब-याच जणांना माहिती असेलच. अधिक गतीच्या चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा मोतीबिंदूसारखे विकारही होण्याची शक्यता असते.

= एकाच बाजूने मोबाईलचा अधिक वापर केल्याने त्या बाजूला ब्रेन टय़ुमरसारखे आजारही होऊ शकतात.

= मोबाईलच्या सतत वापरामुळे त्वचा लाल होणे, जळजळणे असे प्रकारही होऊ शकतात.

= याशिवाय थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, चक्कर येणे, मळमळणे, तसंच पोट बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

= कधी कधी फोन न वाजताही फोन आल्याचा भास होतो. याला रिंगटोन एन्जायटी असंही वैद्यकीय भाषेत सांगितलं जातं.

= कित्येक जण डोक्याशी फोन घेऊन झोपतात. अशा लोकांची झोपही कमी होते.

= हृदयांच्या ठोक्यांच्या गतीवर परिणाम होतो. हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात.

= कित्येक जण वाहन चालवताना किंवा रस्ता ओलांडताना मोबाईल वापरतात. कित्येक जण तर हँडस फ्री लावतात. त्यामुळे आजूबाजूच्या वाहनांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अशा वेळी दुर्घटना होण्याचाही संभव असतो.

काय करायचं?

= तासन् तास फोनवर बोलू नये. फोनवर अधिक वेळ बोलणं ही कामाची गरज असल्यास हेडफोनचा वापर करावा. अणि फोन शरीरापासून जितका लांब ठेवता येईल तितका तो लांब ठेवावा. ब्ल्यूटूथ हेडसेटचा वापर करावा.

= एकाच बाजूने अधिक वेळ न बोलता दोन्ही बाजूंचा वापर करावा.

= सोळा वर्षाखालील मुलांना मोबाईल हाताळायला देऊ नये.

= काही मोबाईलमध्ये वेब गार्डचा वापर केलेला असतो. जेणेकरून मोबाईलमधून निघणा-या लहरी कमी करण्याचं काम करतं.

= मोबाईल कधीही शर्टाच्या वरच्या खिशात ठेवू नये.

= मोबाईल टॉवर घराच्या वस्तीपासून लांब लावावा. तसंच शाळा किंवा रुग्णालयांपासूनही लांब ठेवावा.

= वाहन चालवताना फोनवर बोलणं टाळावं. तसंच ट्रेन, बस आदी वाहनांमधून प्रवास करतानाही फोनवर बोलणं टाळावंच.

= गरज नसेल तेव्हा मोबाईल फोन बंद ठेवावा.

= शक्य असल्यास लँडलाईनचा वापर करा. त्यातही कॉर्डलेस फोनचा वापर टाळावा.

= रात्री झोपताना फोन शरीरापासून लांब राहील याची काळजी घ्या.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe