Tuesday, July 7, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

तिशीनंतरच्या मातृत्वासाठी चाचणी..

कित्येक स्त्रियांना त्यांचं करिअर महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या मूल होण्याचा निर्णय लांबणीवर टाकतात. मात्र वाढतं वय हा पुनरुत्पादन क्षमता कमी करणारा मोठा घटक आहे. तिशीनंतर एएमएच चाचणीद्वारे मातृत्वाची शक्यता जाणून घेता येईल.  ज्या स्त्रियांना मूलबाळ होण्यासाठी तिशीनंतरही थांबायचं आहे त्यांनी तर वेळीच एएमएच टेस्ट करणं आवश्यक आहे. कारण या चाचणीद्वारे त्यांचा आणखी थांबण्याचा निर्णय योग्य आहे की नाही यासंबंधी त्या पुनर्वचिार करू शकतील.

तेहतीस वर्षाच्या अरुंधतीने आपण अजून तरुण आहोत, मूल होण्यासाठी एक-दोन र्वष थांबलो तरी काही हरकत नाही असं गृहीत धरलं होतं. आपल्या करिअरमध्ये स्थैर्य यायला हवं. मुलंबाळं होण्याआधी नवरा-बायकोने एकमेकांच्या सहवासात अधिक कोळ घालवायला हवा, असा त्या दोघांनी विचार केला.

पण जेव्हा त्यांना त्यांच्या फार्टिलिटी एक्स्पर्टने चाचणी घेऊन अरुंधतीचा ओव्हेरियन रिझव्‍‌र्ह कमी झाला आहे असं सांगितलं तेव्हा ते खडबडून जागे झाले. तिच्यातील जननक्षम स्त्रीबीजांचा साठा रोडावला होता. असं का झालं आणि हे सारं आपल्याला आधीच का नाही समजलं याचा तिला खेद वाटला.

आज अरुंधतीसारख्या अनेक स्त्रिया आहेत, ज्यांना हाच प्रश्न सतावत असतो. मातृत्वासाठी अनेक मुली वयाची पस्तीशी उलटण्यापर्यंत वाट पाहतात. मात्र पुनरुत्पादनाची क्षमता वयाच्या तिसाव्या वर्षी घटायला सुरुवात होते तर पस्तीशीनंतर ती झपाटयाने घसरू लागते, हे फार कमी जणींना ठाऊक असतं.

आपल्याकडे सगळं काही वयातच व्हायला पाहिजे म्हणतात ते याचसाठी. प्रत्येक स्त्रीकडे जन्मजात दोन दशलक्ष अंड-कुपांचा साठा असतो. मुलगी वयात येईपर्यंत म्हणजे तिच्या पौगंडावस्थेपर्यंत त्यांची संख्या साडेसात लाखांपर्यंत खाली येते. तर वयाच्या पस्तीशीपर्यंत हीच संख्या नव्वद टक्क्यांनी रोडावते. वयाची पंचेचाळीशी आल्यावर दहा हजार स्त्रीबीजं शिल्लक राहतात तर रजोनिवृत्तीपर्यंत ही संख्या शून्यावर पोहोचते.

वय वाढतं तशी प्रजननक्षमता कमी होते. वयोमानाप्रमाणे प्रजननक्षम स्त्रीबीजांची संख्या घटत जाते. काही स्त्रियांच्या बाबतीत ही घट फार वेगाने होते. रजोनिवृत्तीकडे अनुवांशिक कल असलेल्या स्त्रिया तसेच कर्करोगावर केमोथेरपी किंवा रेडियोथेरपी वा अन्य उपचार चालू असलेल्या स्त्रिया किंवा अंडाशयाची शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांच्या बाबतीत हे प्रकर्षाने आढळतं. अशा स्त्रियांसाठी ओव्हेरियन रिझव्‍‌र्हची चाचणी आवश्यक आहे. अशी चाचणी करण्यामध्ये कोणतीही जोखीम नसते.

रक्तामधील फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची (FSH) आणि एस्ट्राडायोल यांची पातळी मोजून ओव्हेरियन रिझव्‍‌र्हचा अंदाज बांधता येतो. तसंच सोनोग्राफीदरम्यान अँट्रल फॉलिकलचे ((AFC) तसेच रक्तामधील अँटिम्युलेरियन हार्मोन (AMH)चं प्रमाण मोजूनही हा अंदाज बांधता येतो. मासिक पाळीच्या दुस-या किंवा तिस-या दिवशी एफएसएच व एस्ट्राडायोलचं प्रमाण मोजण्यात येतं.

महिन्याभरात तसेच महिन्याच्या अंतरात हे प्रमाण वर-खाली होऊ शकतं. पण एएमएचचं प्रमाण बहुतांशी स्थिर असतं आणि रक्ताचा नमुना चाचणीसाठी केव्हाही घेता येऊ शकतो. कारण एएमएच ही चाचणी सोयीस्कर आणि किफायतशीरसुद्धा आहे.

ओव्हेरियन रिझव्‍‌र्हचा अंदाज करण्यासाठी ती अधिक उपयुक्तसुद्धा आहे. जेवढं एएमएचचं प्रमाण कमी तितकी स्त्रीबीजांची घट जास्त. अर्थात कमी स्त्रीबीजं असणं याचा अर्थ गर्भधारणा अशक्य आहे असा होत नाही. त्याचा अर्थ इतकाच की गर्भधारणेसाठी अधिक उपाय करावा लागेल, त्यासाठी खटपट सुरू करावी लागेल. एक मात्र निश्चित की जसं वय वाढेल तशी गर्भधारणा दुरापास्त होत जाईल.

वाढतं वय हा पुनरुत्पादन क्षमता कमी करणारा मोठा घटक आहे. एएमएच टेस्ट केल्यावर खात्रीलायक निदान करता येतं. हेही लक्षात ठेवायला हवे की एएमएच टेस्ट जरी नॉर्मल आली तरी गर्भधारणा न होण्यामागे इतरही काही कारणं असू शकतात.

ज्या स्त्रियांना मूलबाळ होण्यासाठी तिशीनंतरही थांबायचं आहे त्यांनी तर वेळीच एएमएच टेस्ट केली तर आणखी थांबण्याचा निर्णय योग्य आहे की नाही यासंबंधी त्या पुनर्वचिार करू शकतील. जर एएमएचचं प्रमाण कमी आलं तर त्यांना अधिक तपास करून घेता येईल व त्या आपला निर्णय योग्य वेळीच बदलू शकतील. जर एएमएचचं प्रमाण समाधानकारक असेल तर मूल होण्यासाठी त्या थांबू शकतील. नियमित कालावधीनंतर एएमएच चाचणी करीत राहणे यात हित आहे.

अँटीम्युलेरियन हार्मोन (अटऌ)चं प्रमाण मासिक पाळी दरम्यान फार कमी प्रमाणात बदलते आणि म्हणून ओव्हरियन रिझव्‍‌र्हची तपासणी करण्यासाठी ही टेस्ट योग्य आहे.

महिन्यादरम्यान तसेच वेगवेगळ्या महिन्यात फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या (ष्टद्धr(7०)रऌ) पातळीत अधिक चढ-उतार होऊ शकतात.

बहुतेक स्त्रियांसाठी वय ही गोष्ट गर्भधारणा होण्यासाठी फारच महत्त्वाची असते आणि सामान्यत: वयानुसार अंडाशयामधील जननक्षम स्त्रीबीजांची संख्या कमी होत जाते.

बहुतांश वेळी ओव्हेरियन रिझर्व कमी असूनसुद्धा स्त्रियांची मासिक पाळी नॉर्मल असू शकते. अशा वेळी ओव्हेरियन रिझव्‍‌र्हसाठी रक्त चाचणी करणे कमी जोखमीचे आणि उपयुक्त असते.

Read More »

पद्मासन

आतापर्यंत आपण या सदरात प्राणायामची माहिती घेतली. आता आपण इथून पुढे प्रत्येक आसनाविषयी जाणून घेऊ या.

पद्म म्हणजे कमळ. आपण हे आसन करतो तेव्हा शरीराला कमळासारखा आकार प्राप्त होतो. तसेच या आसनास पद्मासन म्हणतात. हे आसन ध्यान आणि जपासाठी केलं जातं. हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. गौतम बुद्ध ध्यान करताना पद्मासन या आसनात बसतात. आपण ब-याचदा बघितलं आहे की बुद्ध पद्मासनात बसतात.

क्रिया

प्रथम जमिनीवर बसून पाय लांब करून ताठ बसावं. नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा. काहींना प्रथम उजव्या पायाच्या मांडीवर डाव्या पायाचं पाऊल व डाव्या पायाच्या मांडीवर उजव्या पायाचं पाऊल ठेवणं सोपं जातं. नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांचे अंगठे तर्जनीच्या टोकाला लावावेत.

जसं आपण चिमटीने मीठ पकडतो अगदी तसं, पण अलगद पकडावं. स्पर्श करावा, डावा हात डाव्या गुडघ्यावर आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. पाठ आणि मान ताठ ठेवावी. डोळे बंद किंवा उघडे ठेवले तरी चालेल. पण शक्यतो डोळे बंद ठेवावेत.

आसनाची सुरुवात करताना प्रथम सुरुवातीस पाच मिनिटे या आसनात बसावं. या आसनात बसल्यास मनाला शांती मिळते. सुरुवातीस काही दिवस दोन ते तीन मिनिटं बसावं व हळूहळू वेळ वाढवावा.

या आसनात बसल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. आपण तर्जनी व अंगठा पकडतो किंवा हळुवार स्पर्श करतो तेव्हा जर का आपण मनाने व डोक्याने शांत झालो अथवा डोक्यात आणि मनात कोणतेही विचार नसतील तर आपल्याला तर्जनी व अंगठयामधील जादू जाणवेल. असं वाटतं की काहीतरी स्पर्श करून जातो.

घ्यावयाची काळजी

सुरुवातीस हे आसन काहींना जमणार नाही. हे आसन करताना मांडया खूप दुखतील. तेव्हा या आसनात १० सेकंदच राहावं. जर का तुम्हाला सहन होत नसेल तर एका बाजूनेच करावं, म्हणजे उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवावा. अशा पद्धतीने सराव करावा.

फायदे

»  या आसनामुळे शरीरातील चरबी कमी होते.

»  ध्यान, धारणा, प्राणायाम, जप आणि समाधीसाठी या आसनाचा उपयोग केला जातो.

»  दमा, निद्रानाश यासारखे रोग या आसनामुळे नाहीसे होऊ शकतात. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी हे आसन जरूर करावे.

विशेष टीप पद्मासनासाठी :

» ज्या व्यक्तींना सायटिकाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. तसेच ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनीदेखील हे आसन करू नये.

» गरोदर महिलांनी हे आसन करू नये.

पद्मासन
आतापर्यंत आपण या सदरात प्राणायामची माहिती घेतली. आता आपण इथून पुढे प्रत्येक आसनाविषयी जाणून घेऊ या.

पद्म म्हणजे कमळ. आपण हे आसन करतो तेव्हा शरीराला कमळासारखा आकार प्राप्त होतो. तसेच या आसनास पद्मासन म्हणतात. हे आसन ध्यान आणि जपासाठी केलं जातं. हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. गौतम बुद्ध ध्यान करताना पद्मासन या आसनात बसतात. आपण ब-याचदा बघितलं आहे की बुद्ध पद्मासनात बसतात.

क्रिया

प्रथम जमिनीवर बसून पाय लांब करून ताठ बसावं. नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा. काहींना प्रथम उजव्या पायाच्या मांडीवर डाव्या पायाचं पाऊल व डाव्या पायाच्या मांडीवर उजव्या पायाचं पाऊल ठेवणं सोपं जातं. नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांचे अंगठे तर्जनीच्या टोकाला लावावेत.

जसं आपण चिमटीने मीठ पकडतो अगदी तसं, पण अलगद पकडावं. स्पर्श करावा, डावा हात डाव्या गुडघ्यावर आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. पाठ आणि मान ताठ ठेवावी. डोळे बंद किंवा उघडे ठेवले तरी चालेल. पण शक्यतो डोळे बंद ठेवावेत.

आसनाची सुरुवात करताना प्रथम सुरुवातीस पाच मिनिटे या आसनात बसावं. या आसनात बसल्यास मनाला शांती मिळते. सुरुवातीस काही दिवस दोन ते तीन मिनिटं बसावं व हळूहळू वेळ वाढवावा.

या आसनात बसल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. आपण तर्जनी व अंगठा पकडतो किंवा हळुवार स्पर्श करतो तेव्हा जर का आपण मनाने व डोक्याने शांत झालो अथवा डोक्यात आणि मनात कोणतेही विचार नसतील तर आपल्याला तर्जनी व अंगठयामधील जादू जाणवेल. असं वाटतं की काहीतरी स्पर्श करून जातो.

घ्यावयाची काळजी

सुरुवातीस हे आसन काहींना जमणार नाही. हे आसन करताना मांडया खूप दुखतील. तेव्हा या आसनात १० सेकंदच राहावं. जर का तुम्हाला सहन होत नसेल तर एका बाजूनेच करावं, म्हणजे उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवावा. अशा पद्धतीने सराव करावा.

फायदे

या आसनामुळे शरीरातील चरबी कमी होते.

ध्यान, धारणा, प्राणायाम, जप आणि समाधीसाठी या आसनाचा उपयोग केला जातो.

दमा, निद्रानाश यासारखे रोग या आसनामुळे नाहीसे होऊ शकतात. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी हे आसन जरूर करावे.

विशेष टीप पद्मासनासाठी : ज्या व्यक्तींना सायटिकाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. तसेच ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनीदेखील हे आसन करू नये.
' गरोदर महिलांनी हे आसन करू नये.

Read More »

घरगुती सौंदर्योपचार

सुंदर दिसावं असं कोणाला नाही वाटत! मग बाजारात मिळणारी विविध सौंदर्य प्रसाधनं वापरून सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात कधी कधी फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं. पण काही घरगुती गोष्टींचा वापर केला तर आपण आपलं सौंदर्य टिकवू शकतो. अशाच काही घरगुती गोष्टींची ही माहिती.

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे सौंदर्य टिकवण्यासाठी वा खुलवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. अनेक रासायनिक क्रीम, साबणांचा वापर केला जातो मात्र त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या ताणतणावांमुळे सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचं दिसतं. सारखं सारखं ब्यूटिपार्लरमध्ये जाणं आपल्याला शक्य नसतं. ब्यूटिपार्लरमध्ये धावपळ करण्यापेक्षा घरच्या घरी साध्या सोप्या उपायांच्या साहाय्याने सौंदर्य जपता येऊ शकतं.

चेह-याप्रमाणेच हाता-पायांचे, डोळ्यांचे, केसाचे सौंदर्य आपण घरीच टिकवू शकतो. तेही कोणताही खर्च न करता! त्यामुळे सौंदर्य टिकवण्यासाठी वा खुलवण्यासाठी घरच्या घरीच करता येणारे सहज सोपे उपाय :-

नितळ त्वचेसाठी

»  नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

»  कोबीच्या रसात गंधक व क्लोरीन ही द्रव्य असतात. त्यामुळे त्वचेला नवं जीवन मिळतं.

»  ज्यांची त्वचा अत्यंत शुष्क झाली आहे, अशा मध्यमवयीन किंवा प्रौंढ स्त्रियांना अंडयाचा पिवळा बलक उपयोगी आहे तर ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी चेह-याला अंडयाचा पांढरा बलक लावावा. आणि ज्यांची त्वचा नॉर्मल आहे त्यांनी चेह-यावर प्रथम पांढरा बलकचा पॅक लावावा. तो »  »

»  सुकल्यावर त्याच पॅकवरती पिवळ्या बलकाचा पॅक लावावा. म्हणजे हे दोन्ही बलक त्वचेमध्ये शोषून घेतले जातील. त्वचा मऊसर होईल.

» आंबेहळद, जायफळ दुधात किंवा लिंबाचा रसात उगाळून त्याचा लेप करावा. हा लेप रक्तशुद्धी करणारा आहे. त्वचेवरील काळसरपणा किंवा डाग घालवण्यास या लेपाचा फार उपयोग होतो.

» तांबडया मुळ्याचा रस व दही यांचं मिश्रण चेह-याला लावलं तर चेह-यावरचे मुरमांचे डाग कमी होतात.

» टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व एकत्र करून चेह-याला लावल्यास काळे डाग व वर्तुळं कमी होतात.

निरोगी केसांसाठी

»  लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याच प्रतीक मानलं जातं. त्यामुळे त्यांची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं.

»  केसात कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना १० मिनिटं लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत.

»  केस धुवायच्या ४-५ तास अगोदर अर्धा कप लिंबाच्या रसात जराशी साखर मिसळून केसांमध्ये लावावी.

»  केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा.

»  वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते.

केस गळत असल्यास..

»  सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा. रात्री झोपताना आवळा वाटून केसांना लावून लेप करावा. एका तासाने कापडाने पुसून घ्यावेत. सकाळी अंघोळ करताना धुवून टाकावेत.

»  केस गळत असतील तर एक मध्यम आकाराचे डाळिंब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करावं. जास्वंदीचं फूल, १० -२० ब्राम्ही पानं, १ चमचा आवळा पावडर, मेंहदी पानं अंदाजे घ्यावीत. हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडाच्या कढईत मंद गॅसवर तडतडेपर्यंत गरम करून कोमट असतानाच एका बाटलीत भरून ठेवावं व ते केसांना लावावं.

टक्कल पडत असल्यास..

»  दोन-तीन लसणाच्या पाकळ्या डोळ्यांना लावायच्या सुरम्याबरोबर वाटाव्यात. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावावं. जळजळ झाली तर आगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. २० ते ३० दिवस हा लेप दररोज करून लावावा.

»  दिवसातून २-३ वेळा कोथिंबिरीच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसांत फायदा होतो.

डोळ्यांचे सौंदर्य..

»  डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात.

»  डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्टया डोळ्यांवर ठेवाव्यात.

हातापायांची काळजी..

»  हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचं पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा.

»  पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो.

»  पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचं मिश्रण भेगांना रोज लावल्यानेही फायदा होऊ शकतो.

»  लिंबू चोळल्याने नखांना चमक येते.

»  लिंबाचा रस हाताचा कोपरा व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe