Tuesday, June 30, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

स्वत:च व्हा स्वत:चे डॉक्टर!

तापमानात झालेला बदल, दूषित आणि साठवलेलं पाणी यामुळे पावसाळ्यात मोठया प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन होतं, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. हे सांसर्गिक आजार टाळण्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. थोडीशी काळजी घेतली तर हे आजार टाळता येतात. कसं ते पाहू या.

पावसाच्या पहिल्याच तडाख्याने असहय़ उन्हापासून सुटका मिळाली. ओल्या मातीचा हवाहवासा गंध, ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरींचा आवाज यामुळे हवेत एक प्रकारचा ताजेपणा आला आणि पावसाच्या आगमनाची चाहूल लागली.

गार वारे आणि बोचरी हवा यामुळे पावसाळ्यात सर्व प्रकारचे अन्न, पाणी आणि हवेतून होणारे संसर्ग फोफावतात. थोडीशी काळजी घेतल्याने या ऋतूत होणारे संसर्ग टाळणं शक्य होतं. कमी झालेली प्रतिकारशक्ती आणि जंतूंमुळे होणारे वाढते आजार ही मान्सूनची कारणे असून यामुळे संपूर्ण देशभरात अनारोग्याचे वातावरण तयार होतं.

पाण्यामुळे होणारे आजार उदा. हेपेटायटीस ए, टायफॉईड, कॉलरा, पोट बिघडणे, लेप्टोस्पायरोसीस इ. मोठया प्रमाणावर होऊ शकतात आणि अनेक जणांना याची कल्पना नसते. लेप्टोस्पायरोसीसचा संसर्ग हा उंदराच्या मुतामध्ये असलेल्या लेप्टोस्पायरा जंतूपासून होतो.

साठलेल्या पाण्यातून अनवाणी जाणाऱ्या माणसाला पायाला होणारी जखम किंवा छेद असेल तर किडनी किंवा लिव्हरचं कार्य बिघडू शकतं. दूषित पाणी प्यायल्यामुळे होणारे आजार पावसाळ्यात सर्वाना माहीत असून हे प्रामुख्याने सखोल भागातून जाणाऱ्या पाईपलाईन आणि लीकेजची शक्यता हे यामागील प्रमुख कारण आहे.

दूषित पाण्यामुळे हगवण, कॉलरा, टायफॉईड आणि हेपेटायटीस ए आणि ई यासारखे आजार होतात. साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास मोठया प्रमाणावर होऊन मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांमध्ये वाढ होते आणि रुग्णाच्या शरीराच्या तापमानात घट होते.

तापमानात झालेला बदल, दूषित पाणी आणि साठलेले पाणी यामुळे पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन मोठया प्रमाणावर होते. सर्दी, खोकला आणि ताप याबरोबरच आता एच1एन1 स्वाईन फ्लूचा प्रसार जगभरात मोठया प्रमाणावर होत आहे. हा सांर्सगिक आजार असून पावसाळी तापाप्रमाणे त्याचा प्रसार होतो. थोडीशी काळजी घेतली तरी आजार टाळता येतो. आपण आपली आणि कुटुंबीयांची अधिक काळजी घ्यायला हवी.

रस्त्यावरील खाद्यपदार्थाचे सेवन करणे

पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील भजी, वडापाव, भेळ, पाणीपुरी, चाट इ. पदार्थामुळे तुम्हाला आजार होऊ शकतात. जर तुम्हाला रस्त्यावरील हे पदार्थ खायची आवड असेल तरी पावसाळ्यात उघडयावरचे हे पदार्थ खाणं टाळा. हेच पदार्थ घरी आरोग्यदायी पद्धतीने तयार करा आणि खा.

बाहेरील पाणी आणि बर्फ खाणं टाळा

उकळलेले, सीलबंद आणि शुद्ध पाणी प्या. कोणतेही पाणी वापरून तयार केलेला बर्फ वापरू नका. बाहेरची, न उकळलेल्या किंवा प्रक्रिया न केलेल्या पाण्यातील सरबतं पिणं व त्यात बर्फ घालून घेणं टाळा. ज्यूस, ताक, लिंबू सरबत इ. गोष्टी बाहेर पिणे टाळावं.

लसीकरण

काही संसर्ग टाळता येऊ शकतात. आपण वेळीच लसीकरण करून घेतलं तर हे साध्य होऊ शकतं व त्याकरता फार खर्च येत नाही. हेपेटायटीस ए व ई आणि एच1एन1 करता लस उपलब्ध आहे. विशेषत: लहान मुलांना ती दिली गेली पाहिजे.

चिरून ठेवलेल्या भाज्या किंवा फळे खाऊ नका

सोलून अथवा चिरून उघडयावर ठेवलेली फळं कधीच खाऊ नका. कोबी, पालक, मेथी यासारख्या भाज्यांबाबत विशेष काळजी घ्या. त्यामध्ये असलेली माती त्यातून येणारे जंतू यामुळे संसर्ग होऊ शकतो. पेर, पीच, पपया, केळी यांसारखी फळं मोठया प्रमाणावर उपलब्ध असून चविष्ट असतात. खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत.

डासांपासून लांब राहा

पावसाच्या सरींमुळे डासांना चालना मिळते आणि त्यातूनच मलेरिया व डेंग्यूसारखे आजार पसरतात. तुमचे घर आणि आजूबाजूचे वातावरण स्वच्छ व कचराविरहित ठेवा. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साठू देऊ नका. अंधार पडल्यावर दारे व खिडक्या बंद करा किंवा लाईट बंद करून पडदे बंद ठेवा. डासांशी थेट संपर्क येऊ नये म्हणून स्प्रेचा वापर करा. पूर्ण हात असलेले कपडे वापरण्याचा प्रयत्न करा, तसंच डास मारणारी कॉईल वापरा. मच्छरदाणी लावून झोपा.

वारंवार हात धुवा

वारंवार हात धुण्यासारख्या सवयी लावून घ्याव्यात. विशेषत: जेवणापूर्वी जेणेकरून सांसíगक आजार टाळता येतील. या हात धुण्याच्या सवयीमुळे पावसाळ्यात होणारे विविध आजार टाळण्यास मदत होईल.

संतुलित आणि प्रोटिनयुक्त आहार घ्या

ग्रीन टी, ताजी फळं, नट्स यामुळे सांसíगक आजाराशी लढा देता येतो. हे लक्षात ठेवा की संतुलित आणि प्रोटिनयुक्त आहारामुळे पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवता येते.

आपले शरीर अनेक संसर्गाना अनुकूल असते. वेळेवर काळजी घेणं कधीही चांगलं असतं. यामुळे पावसाचा आनंद घेता येतो. घरीच खावं व शीतपेये घेण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून स्वच्छता पाळली जाईल. साधा ताप किंवा सर्दी झाल्यास डॉक्टरांकडे जा. संतुलित पोषक आहार व जीवनसत्त्वांच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे नियमितपणे घ्याव्यात.

या साध्या सूचना पाळा आणि या पावसाळ्यात स्वत:च स्वत:चे डॉक्टर बना.

Read More »

प्राणायामचे आणखी काही प्रकार

मागच्या आठवडयात आपण प्राणायामचे काही प्रकार पाहिले त्यापुढील प्रकार आज आपण पाहणार आहोत.

भ्रामरी

'भ्रामरी' हा शब्द 'भ्रमर' या शब्दावरून आला आहे. हा प्राणायाम 'ॐकार'ने केला जातो. हा आवाज भुंग्याच्या आवाजासारखा असल्याने या प्राणायामास 'भ्रामरी' असं नाव पडलं.

क्रिया : पद्मासनात अथवा मांडी घालून बसावं. दोन्ही नाकातून जोराने श्वास आत खेचा आणि बाहेर काढा. घाम येईपर्यंत ही क्रिया करावी.

शेवटी नाकाद्वारे शक्य तितका दीर्घ श्वास घ्या आणि जितका वेळ श्वास रोखता येईल तितका वेळ रोखून ठेवावा. नंतर दोन्ही नाकपुडयांद्वारे श्वास बाहेर सोडा. सुरुवातीला जसजसा तुम्ही जोराने श्वास घ्याल तशीच तुमच्या रक्ताभिसरणाची गती वाढते आणि शरीरात उष्णता वाढत जाते. परंतु शेवटी घाम सुटल्यावर शरीर थंड पडते.

फायदे : या प्राणायामामुळे मन व चित्त प्रसन्न राहते.

विशेष नोंद : अनुलोम प्राणायामचा सराव केल्याशिवाय या प्राणायामापासून फारसा फायदा होणार नाही.

मूच्र्छा

या प्राणायामात साधकाची स्थिती ही मूच्र्छेप्रमाणे होते. तो भानरहित होतो. म्हणून यास 'मूच्र्छा' असं म्हणतात.

क्रिया : मांडी घालून बसावं अथवा पद्मासनात बसावं. नाकाद्वारे पूरक करा. नंतर जालंधरबंध करून कुंभक करा (श्वास रोखून ठेवा) व मूच्र्छा येईपर्यंत कुंभक चालू ठेवा. नंतर दोन्ही नाकाद्वारे रेचक करा.

फायदे : या प्राणायाममुळे मन भानरहित होते. त्यामुळे हा प्राणायाम करण्यास आनंद प्राप्त होतो. हा प्राणायाम केल्याने मनातील संकल्प-विकल्प नाहीसे होतात. काही काळ तरी मन परमात्मस्वरूप बनून जाते.

प्लाविनी

प्लाविनी हा शब्द संस्कृतमधील 'फ्लु' (पोहणे) म्हणजेच पोहायला लावणारी. हा प्राणायाम करणाऱ्यास पाण्यावर पोहण्याची क्षमता प्राप्त होते. हा प्राणायाम करण्यासाठी कुशलतेची गरज असते.

क्रिया : सुरुवातीस वज्रासन या आसनात बसावं. अंतर दोन्ही नाकांद्वारे पूरक करून कुंभक करावं. नंतर जालंधरबंध करावं. यामुळे श्वास आतडयात साठवला जातो व त्यांना फुलवलं जातं. शेवटी दोन्ही नाकांद्वारे रेचक करा व गरज वाटल्यास ढेकर देऊन हवा बाहेर काढता येते.

फायदे : हा प्राणायाम करणारी व्यक्ती अनेक दिवसांपर्यंत अन्नाशिवाय म्हणजेच हवेवर राहू शकतो. या प्राणायाममुळे रक्ताभिसरणाची क्रिया अत्यंत वेगाने होते. त्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक नाहीसे होतात.

विशेष नोंद : हा प्राणायाम अत्यंत हळुवारपणे क्रमश: व नियमितपणे करावा. या प्राणायामचा अभ्यास ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

हे प्राणायाम करताना घ्यायची काळजी.

» प्रथम हे प्राणायाम ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

» प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा.

» हा प्राणायाम करताना प्रथम श्वासांची तयारी करावी. म्हणजेच एक नाक बंद करून दुस-या नाकाने श्वास घेणे व सोडणे, तसेच दुस-या नाकपुडीनेही करावे.

» प्राणायाम करताना कंफर्टेबल आसनात बसून करावं.

» प्राणायाम करताना घाई करू नये.

» फक्त वाचून प्राणायाम करू नये. जाणत्या योग गुरूंच्या मदतीने किंवा त्याच्या साहाय्याने त्यांच्या समोर
करावा.

» थकवा येईपर्यंत प्राणायाम करू नये.

» प्राणायाम करताना श्वासोच्छ्वास अत्यंत सावकाश करावा असे पतंजलीने सांगितले आहे. असे केल्याने मन स्थिर व शांत होते.

» प्राणायामसाठी जागा हवेशीर व शांत असावी.

» प्राणायाम केल्यानंतर लगेच स्नान करू नये. अध्र्या तासानंतर करावे.

(क्रमश:)

Read More »

आरोग्यदायी बेलफळ

बेलफळाला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे. शंकराच्या आराधनेत याचा वापर केला जातो.

बेलफळाला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे. शंकराच्या आराधनेत याचा वापर केला जातो. इंग्रजीत या फळाला वुड अ‍ॅपल तर हिंदीत बेल फल, बेल पत्थर, ओडिशात बेला, तेलगूत मरेडु, कन्नडात बिल्व, उर्दूत सिरी फल, सिंधीत कथोरी किंवा काथ गरो अशी नावं आहेत.

हे अतिशय थंड आणि चवीला गोड असं फळ आहे. उन्हाळयाच्या दिवसात शरीराचं तापमान थंड ठेवायला मदत करतं. हे ताजं किंवा सुकलेलं खावं. याचा मुरंबा किंवा लोणचं करतात. तसंच ज्युसदेखील करतात.

» बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी हे फळ आवर्जून खावं.

» मूत्राशयाच्या समस्यांवर अतिशय गुणकारी आहे.

» ओबेसिटीच्या विकारावरही अतिशय गुणकारी आहे.

» मुळव्याधीत होणारा रक्तस्रव याच्या सेवनाने कमी होतो.

» अजीर्णचा त्रास कमी होतो.

» जठरातील अल्सर कमी व्हायला मदत होते.

» तोंडाच्या आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे.

» मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास याच्या सेवनाने कमी होतो.

» सूज येणे यासारखे विकार कमी होतात.

» बेलाच्या पानांचा २० मि.लि. रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. तसंच सतत बाथरूमला जाण्याचा त्रासही कमी होतो.

» हायपरटेन्शन कमी होतं.

» केसांत कोंडा होत नाही.

» क्षयरोगाच्या रुग्णांनी कच्च्या बेलाचा गर, साखर आणि मध जेवणानंतर नियमित सेवन केल्यास लवकर आराम पडतो. किमान चाळीस दिवस तरी हे औषध म्हणून घ्यावं.

» भूक लागत नसल्यास बेलाच्या वाळलेल्या पानाचं चूर्ण तीन दिवस घ्यावं भूक वाढते.

» सकाळी अनशा पोटी बेलाची तीन ते चार पानं आणि काळी मिरी कोमट पाण्यासोबत एक महिना घेतल्यास अस्थमाचा त्रास कमी होतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe