Tuesday, March 10, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

जीवनशैली बदला किडनी वाचवा..

देशातील बहुसंख्य लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच हा किडनी विकारांचा धोका वाढला आहे. इतर अनेक रोगांप्रमाणे आणि त्यांच्या लक्षणांप्रमाणे किडनी विकार हा अचानक आपलं रूप दाखवत नाही. लोकांनी आपल्या शरीराची काळजी न घेतल्यामुळेच हा विकार उद्भवतो. १२ मार्च या जागतिक किडनी दिनानिमित्ताने किडनीच्या विकारांना कसं दूर ठेवावं हे जाणून घेऊया.

आरोग्य उत्तम राखणे ही एक कला आहे. उत्तम आरोग्य हे आपल्याला सहजासहजी मिळत नसतं, तर देवाने दिलेल्या आपल्याला या शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते.

जीवनशैलीतील सततचे बदल हे सध्या डायबेटिस, हायपरटेन्शन, कोलेस्टेरॉल, थायरॉइड आदी आजारांना निमंत्रण ठरू लागले आहेत.

फास्ट फुडचा अतिरेक आणि बैठे काम करण्याची सवय, त्याचवेळी व्यायामाचा कंटाळा किंवा त्यासाठी वेगळा वेळ न देणे हे डायबेटिस, हायपरटेन्शन, जठरासंबंधीचे विकार आणि स्थूलपणा या आजारांना निमंत्रण ठरते आहे.

इतकंच नव्हे, तर हे आजार लहान मुले आणि तरुणांमध्ये वाढू लागले असून, या आजारांमुळे किडनी आणि त्यासंबंधीचे विकार बळावू लागले आहेत.

भारतीयांना किडनी विकारांचा धोका सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आलं आहे. देशातील बहुसंख्य लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच हा किडनी विकारांचा धोका वाढला आहे. इतर अनेक रोगांप्रमाणे आणि त्यांच्या लक्षणांप्रमाणे किडनी विकार हा अचानक आपलं रूप दाखवत नाही. लोकांनी

आपल्या शरीराची काळजी न घेतल्यामुळेच हा विकार उद्भवतो. याची प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे -

» सर्वाधिक सोडियमचे प्रमाण असलेले अन्नपदार्थ खाणे.
» सोडायुक्त शीतपेये पिणे.
» जेवणाच्या विचित्र वेळा विशेषकरून रात्री उशिरा उच्च काबरेहायड्रेट असलेला आहार घेणे.
» जेवल्या जेवल्या झोपायला जाणेही होय.

किडनी विकाराने ग्रस्त असलेले देशभरातील ६० टक्के रुग्ण हे एकतर डायबेटिस किंवा उच्च रक्तदाब या विकारांनी पछाडलेले असतात. त्यातही मधुमेह हे किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारण आहे. यामुळे किडनीजवळील तुमच्या मोठया रक्तवाहिन्या आणि लहान रक्तवाहिन्या निकामी होतात.

त्याचबरोबर उच्च रक्तदाब, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, स्थूलपणा, प्रतिकारशक्ती कमी असणे, मूत्रिपडातील संसर्ग, मूत्रिपडाचे काही कौटुंबिक आजारही किडनी विकारांना कारणीभूत ठरतात.

या सर्वाचा परिणाम किडनीवर होतो. रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले न गेल्याने त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीरात टाकावू द्रव्यपदार्थाचं प्रमाण साठत जातं. त्यामुळे मग डायलिसिस करण्याची वेळ येते किंवा किडनी रोपण करण्याची वेळ येते.

तीव्र मूत्रिपडाचा विकार (सीकेडी) हा कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. पण, हा विकार प्रामुख्याने ४० ते ५० वयोगटांतील व्यक्तींमध्ये दिसून येतो. देशातील १० टक्क्यांहून अधिक लोकांना तीव्र मूत्रिपडाचा विकार असून, हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

तर आकडेवारी असं सांगते की, दरवर्षी भारतात सुमारे तीन ते चार लाख लोकांना किडनीरोपणाची आवश्यकता आहे,

मात्र त्यातील एक टक्काच रुग्णांना किडनी रोपणासाठी दाते उपलब्ध होतात व त्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात.  जनजागृतीचा अभाव, डायबेटिस आणि तीव्र मूत्रिपडाचा विकार यांच्या अभद्र युतीमुळे हे अपयश पदरी पडते.

आहारामध्ये काही आवश्यक बदल आणि काही आरोग्यदायी सवयी यांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणू शकता. विविध प्रकारचे आवश्यक बदल हे प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरतात.

मग त्यांना मूत्रिपडाचा विकार असो वा नसो. आणि ते केवळ त्या व्यक्तीलाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यदायी जीवनशैलीलाही उपयुक्त ठरतात!
पुढील पथ्ये पाळतील तर तुम्ही तुमची किडनी तंदुरुस्त ठेवू शकता :

» तुमच्या रक्तातील ग्लुकोज आवाक्यात ठेवा.
» तुमचा रक्तदाब नियमित ठेवा. तुम्ही जर रक्तदाबासाठी काही औषधे घेत असाल, तर ती तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
» सकस आहार घ्या आणि तुमच्या आहारतज्ज्ञाने ठरवून दिलेल्या आहाराप्रमाणे घ्या.
» वर्षातून किमान एकदा तरी किडनीसंदर्भातील चाचण्या करून घ्याव्यात.
» वारंवार पेनकिलर्स घेणे टाळावे. आर्थरायटीस रोगामध्ये नॉन स्टेरॉइड दाहकविरोधी औषधांचे दररोज सेवन केल्यामुळे तुमची किडनी निकामी होऊ शकते.
तुम्ही जर आर्थरायटीजसारख्या आजाराने ग्रस्त असाल आणि अशा प्रकारची औषधं तुम्हाला घ्यावी लागत असतील, तर यासंदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि किडनीला कोणतीही हानी पोहोचणार नाही अशा तऱ्हेने तुमच्या आजारावर तोडगा काढा.
» मूत्राशय किंवा किडनी विकारांसाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या वाईट सवयी सोडा

» मद्यपानाला रामराम करा.
» धूम्रपानामुळेही तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे किडनीचे विकार उद्भवू शकतात.
» चरबीयुक्त आहार घेणे टाळा. शरीराचे वजन कमी ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबही नियमित राहू शकेल.
» उच्च तणावाच्या जीवनशैलीत राहणे टाळा. त्यामुळे हायपरटेन्शनचा विकार जडू शकतो.

या विकाराविषयी किमान जनजागृती आणि माहितीद्वारे किडनी विकार दूर ठेवता येतात आणि तुम्ही आनंदी जीवन जगू शकता.

Read More »

आरोग्यदायी खरबूज

खरबूज हे फळ जगात 'मस्कमेलन', 'रॉकमेलन' आणि 'स्वीटमेलन' या नावांनी ओळखलं जातं. हे विविध आकारांत आणि रंगांत मिळतं. वरून पांढरं आणि आतून केशरी रंगांचं असतं.

खरबूज हे फळ जगात 'मस्कमेलन', 'रॉकमेलन' आणि 'स्वीटमेलन' या नावांनी ओळखलं जातं. हे विविध आकारांत आणि रंगांत मिळतं. वरून पांढरं आणि आतून केशरी रंगांचं असतं. याच्या बियांचेदेखील औषधी उपयोग आहेत.

भारत, इराण आणि आफ्रिकेत प्रामुख्याने याचं पीक घेतलं जातं. पाणीदार असल्याने शरीराचं तापमान काहीसं थंड ठेवायला मदत होते.

भरपूर जीवनसत्त्व आणि खनिज असलेलं हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. म्हणून कलिंगडाप्रमाणेच पाणीदार असल्याने उन्हाळ्यात सेवन करणं अधिक चांगलं असतं.

» बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी आवर्जून खावं. यात भरपूर पाणी आणि पाचक फायबर असल्याने अन्न पचतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

» पोटाचे सर्व विकार आणि अपचन या विकारांवरही गुणकारी आहे.

» भूक लागत नसल्यास हे फळ खायला द्यावं. भूक वाढते.

» अतिसार होत असल्यास टरबुजाच्या फोडीवर काळी मिरी, आलं पावडर, सैंधव मीठ, जिरा पावडर घालून खाल्ल्यास लगेच आराम पडतो.

» नियमित सेवन केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन, फॉलिक अ‍ॅसिड, सी, ई, के आणि ए अशा जीवनसत्त्वांचा भरणा असल्याने

त्वचा मृदु, चमकदार व्हायला मदत होते. शुष्क त्वचा, काळे डाग आदी विकारांवर गुणकारी ठरते.

» यात मोठया प्रमाणात पोटॅशिअम असल्याने मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना होणाऱ्या अतिरक्तस्रवापासून आराम मिळतो.

» प्रसूतीनंतर दूध वाढण्यास मदत होते. लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड असल्याने बाळ आणि माता दोघांसाठी फायदेशीर ठरतं. गरोदरपणात सुरुवातीच्या काळात येणारा सकाळचा थकवा कमी होण्यास मदत होते.

» लो कॅलरी आणि उच्च डाएटरी फायबर, पाणी, खनिज आणि जीवनसत्त्वांचा भरणा असल्याने मधल्या न्याहारीच्या वेळी या फळाचा आवर्जून समावेश करावा.

» वजन नियंत्रित करण्यासही मदत होते.

» डोकेदुखी असल्यास याची पेस्ट करून डोक्यावर लावावी आराम पडतो.

» ज्यूसचं सेवन केल्याने ताणापासून मुक्ती मिळते.

»  रोज सकाळी एकदा सेवन केल्यावर किडनीचे आजार दूर होतात. मूतखडयाच्या त्रासापासून मुक्तता होते.

» ठरावीक वयानंतर होणारं हाडांचं नुकसान टाळण्यास मदत होते.

» केस गळती थांबवण्यास मदत होते. केसांच्या मुळाशी खरबुजाच्या गराने मसाज करावा. हा गर उत्तम कंडिशनर म्हणून काम करतो.

» रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.

» अँटिकॅन्सरिअस म्हणून काम करतं.

» हृदयरोगापासून संरक्षण होतं.

» पचनसंस्थेचं कार्य सुधारतं.

» यात 'अ' जीवनसत्त्व असल्यामुळे दृष्टिदोष नाहीसा होण्यास मदत होते.

» खरबूज रक्तशुद्धीकरणाचं काम करतं.

» मेंदूचं आरोग्य सुधारून स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

» उन्हाळ्यात दररोज एकदा खाल्ल्याने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं.

Read More »

परीक्षेचा काळ, ताणावर मात!

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सगळ्या मुलांचा अभ्यास झाला असेलच; पण तरीही आयत्या वेळी केलेला अभ्यास आपल्याला आठवेल का, आपल्या लक्षात राहील का, आपल्याला चांगले मार्क मिळवायचे आहेत, पालकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा असे विविध प्रश्न आपल्याला पडतात. या सगळ्याचा आपल्या मनावर कुठे ना कुठेतरी ताण येत राहतो. त्यामुळे आपलं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. कित्येक जण तर या ताणापोटी रात्रंदिवस अभ्यास करतात. मग अपचन, उलटया अशा विकारांना तोंड द्यावं लागतं; पण या सगळ्यावर मात करून अभ्यासात लक्ष केंद्रित कसं करता येईल हे पाहूया.

पूर्ण तयारी करा

कित्येक जणांना ऑप्शनला टाकायची सवय असते. नेमके तेच प्रश्न आले की मग मात्र त्यांची भंबेरी उडते. म्हणूनच शक्य होईल तितकी तयारी करा. केलेला अभ्यास सतत वाचत राहा. काही अडत असेल तर वेळी शिक्षकांना विचारा. दोन पेपरांच्या मधला वेळ पेपर सोडवा. लिहायला आवडत असेल तर झालेला अभ्यास प्रश्न, गणिताची प्रमेय पुन्हा लिहून काढा.

पुरेशी झोप घ्या

साधारणपणे ७-८ तास पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. रात्रभर अभ्यास केला तरच आपला अभ्यास होईल आणि आपण परीक्षेत चांगलेल मार्क मिळवू हा भ्रम मनातून काढून टाका. पुरेशी झोप घेतली नाही तर केलेला अभ्यास विसरण्याची भीती असते. म्हणून पेपरच्या आधी दिवसभर अभ्यास करा आणि रात्री पुरेशी झोप घ्या.
व्यायाम करा

शारीरिक व्यायामामुळे मनावरचा ताण काहीसा हलका होतो. मित्रांबरोबर फिरायला, चालायला किंवा धावायला जा. तुम्हाला जो खेळ आवडतो तो खेळा. मोकळ्या हवेत गेल्यानं बरं वाटतं.

तुमच्या गरजा ओळखा

आपला मित्र लिहितो म्हणून आपणही लिहून काढावं असं काही नाही. कदाचित तुम्हाला वाचनाने लक्षात राहात असेल तर प्रथम प्राधान्य वाचनाला द्या.

रिलॅक्सेशन तंत्राचा वापर करा

अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या स्नायूंना मसाज द्या. तुम्हाला आवडेल अशा गोष्टी पाहा किंवा ऐका. जेणेकरून तुम्ही थोडे रिलॅक्स व्हाल. आणि पुढे केलेला अभ्यास तुमच्या चांगला लक्षात राहील.

'नाही' म्हणायला शिका

अभ्यास करायच्या वेळीच काही ना काही कोणीतरी काम सांगतं किंवा भेटायला येतं. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्यांना तसं स्पष्ट सांगा. किंवा मग त्यांना एक ठरावीक वेळ द्या. तेव्हा त्या वेळेत त्यांना भेटा,

साथसंगत चांगली ठेवा

तुम्हाला हसवतील, तुमच्याशी बोलतील अशाच माणसांना आजूबाजूला ठेवा. म्हणजे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमचा अभ्यास चांगला होईल.
सकारात्मक विचार करा

विचार, भावना आणि कृती या तिन्ही गोष्टी नेहमी एकमेकांसोबत असतात. म्हणून तुम्ही स्वत:विषयी काय विचार करता हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुम्ही सकारात्मक कृती कराल जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यास मदत करते.

तज्ज्ञांना भेटा

तुम्ही या सगळ्या गोष्टी करूनही जर पुरेशी झोप घेऊ शकत नसाल, टेन्शनने तुमचं वजन कमी होत असेल तर त्वरित तज्ज्ञांची किंवा मानसोपचारतज्ज्ञाची भेट
घ्या. जे तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढतील.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe