Tuesday, February 3, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

कर्करोगासोबतचं युद्ध

भारतीय वैज्ञानिकांनी खाद्यपदार्थाच्या पोषक ऊर्जेपासून कर्करोगावर एक स्वस्त औषध तयार केलं आहे. कर्करोगावरील औषधं ही विविध जडीबुटीपासून बनवली जातात. ही औषधं मानवाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त तर होतीच, शिवाय त्यांचा मानवी जीवनावर व स्वास्थ्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. या सेंटरने सन १९८२मध्ये कर्करोगावर औषध तयार केलं. त्याचा काही रुग्णांवर प्रयोगही केला आणि त्याचा रुग्णांवरही सकारात्मक परिणाम झाला. परंतु हे औषध अजूनही बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध नाही.
विश्व स्वास्थ्य संगठन यांच्या मतानुसार आज जगात प्रतिवर्षी ८० लाख लोक कर्करोगामुळे आपले प्राण गमावत आहेत. हा भयानक आजार दिवसेंदिवस आपले स्वरूप वाढवीत चालला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार दररोज अधिक भयावह होत असलेल्या या आजारामुळे २०२० सालापर्यंत आजच्या संख्येच्या दुपटीने म्हणजेच जवळपास पाऊणे दोन करोड लोकांना आपले प्राण गमवावे लागणार आहेत. या भयानक गोष्टीकडे लक्ष देण्यामध्ये विश्व स्वास्थ्य संघटनेला एक अडचण होती.

कर्करोगाची सुरुवातीची तपासणी व्यवस्थित झाली पाहिजे. उशिराने केलेली तपासणी आणि चुकीचे केलेले उपाय कर्करोगावर प्रतिकूल परिणाम करतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. भारतात कर्करोगावर उपाय घेण्यासाठी टाटा, अपोलो, एम्स यांसारख्या विश्वसनीय रुग्णालयांव्यतिरिक्त काही मोठी खासगी रुग्णालयेही उपलब्ध आहेत. काही जागतिक पातळीवरील डॉक्टर तसेच विशेषज्ञही आज उपलब्ध आहेत. पण ज्या प्रकारे कर्करोग आपल्या देशामध्ये पसरत आहे, त्या प्रमाणात त्याचा सामना करण्यासाठी हे सारं अपुरं आहे. तसंच काही चिकित्सा संस्थांमध्ये ऑन्कोलोजी नाही. संपूर्ण उडीसामध्ये केवळ एक रुग्णालय आहे. आधुनिक सुविधा आहेत त्यासुद्धा काही मोठय़ा शहरांसाठीच मर्यादित आहेत. त्यासाठी आपल्याला काही साधनं वाढवावी लागतील. लहानातील लहान शहरांपर्यंत कर्करोगावरील उपचार केंद्रांची निर्मिती करावी लागेल.

ज्या वेगाने शरीरात कर्करोगाची ही विषवेल वाढत आहे, त्याचप्रमाणे त्याला सामना करण्याची आणि त्यावर विजय मिळवण्यासाठीचे चिकित्सालय-उपायही जगामध्ये उपलब्ध होत आहेत. भारतासहित अन्य दहा देशांतील वैज्ञानिकांची टीम कर्करोगाचे जंतूचे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये इंग्लंडची टीम स्तनाच्या कर्करोगावर, जपानी टीम यकृत कर्करोगावर आणि भारतीय टीम तोंडाच्या कर्करोगावरील जंतूंचा संग्रह करण्यामध्ये व्यस्त आहे. या व्यतिरिक्तचिनी वैज्ञानिक पोटाचा कर्करोग तर अमेरिकी मस्तिष्क, गर्भाशय आणि स्वादुपिंड कर्करोगावरील जंतूंचं रहस्य जाणून घेण्यामध्ये व्यस्त आहे. या सर्व वैज्ञानिकांच्या मते कर्करोग कोण-कोणत्या जंतूंमुळे होऊ शकतो, त्याची यादी बनवण्यासाठी अजून २ वर्षे लागतील. आतापर्यंत इंग्लंडमधील वैज्ञानिकांनी सगळ्यात भयानक म्हणजे त्वचा आणि फुप्फुसाच्या कर्करोगावर प्रतिउत्तर शोधून काढलं आहे. आज त्यांच्या या कर्तृत्वाला कर्करोगाशी सामना करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जात आहे.

भारतीय वैज्ञानिकांनी खाद्यपदार्थाच्या पोषक ऊर्जेपासून कर्करोगावर एक स्वस्त औषध तयार केलं आहे. परंतु हे औषध अजूनही बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध नाही. औषधांचे परिणाम-परीक्षण ही एक वैज्ञानिक पद्धती आहे. कर्करोगावरील औषधं ही विविध जडीबुटीपासून बनवली जातात; परंतु त्या औषधांचे पहिल्यांदा ती औषधे मनुष्याच्या स्वास्थ्यासाठी तसेच जीवनासाठी नुकसानकारक तर नाहीत ना याचं परीक्षण केलं जातं. परंतु डी. एस. रिसर्च सेंटरने तर मेहनतीच्या खाद्यपदार्थामध्ये योग्य पोषक ऊर्जा निर्माण करून औषधं बनवली होती म्हणून तर ही औषधे मानवाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत. तसंच औषधांची चवही दुग्धशर्करेप्रमाणे बनवली होती की, ज्याचा मानवी जीवनावर व स्वास्थ्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. या सेंटरने सन १९८२ मध्ये कर्करोगावरती औषध तयार केलं. या औषधाच्या चाचणीसाठी प्रथमत: असं ठरवण्यात आलं होतं की, फक्त अशा रुग्णांची निवड केली जाईल, की ज्यांना रुग्णालयांनी उपचारासाठी अयोग्य ठरवून शेवटच्या टप्प्यात सोडून दिलं आहे. त्यासाठी विविध ठिकाणं निवडून तिथून अशा प्रकारच्या रुग्णांपर्यंत पोषक ऊर्जेची औषधे पोहोचवली जाऊ लागली. त्यांना हेही सांगण्यात आलं की त्यांनी आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी जी पहिली औषधं चालू ठेवली आहेत, त्याबरोबर ही पोषक ऊर्जेची औषधं चालू ठेवावीत. डी.एस. रिसर्च सेंटरचे वैज्ञानिक डॉक्टर उमाशंकर तिवारी यांच्या निदर्शनाखाली परीक्षण अभियान सुरू झालं. शेवटी औषधांपासून मिळालेलं यश आणि सकारात्मक परिणाम, रुग्णांचे स्वत:चे या औषधांबाबतचे अनुभव घेण्यात आले. इथपर्यंतच मर्यादित न राहता ही तपासणी रिपोर्टकडूनही प्रमाणित करण्यात आली आणि पारंपरिक रुग्णालयातील सूत्रधारांकडून वेळोवेळी ती माहिती देण्यात आली.

या औषधांची चाचणी आतापर्यंत ४०००पेक्षाही जास्त कर्करोग रुग्णांवर करण्यात आली आहे. ज्यामधील हजारो रुग्ण आज व्यवस्थित जीवन जगत आहेत. यातील एक म्हणजे उत्तर प्रदेशमधील अमेठी स्टेट बँकेचे कर्मचारी अनिल कुमार श्रीवास्तव, ज्यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यांनी आपला इलाज मुंबईमधील टाटा कर्करोग रुग्णालयात केला होता. (केस नंबर बी.डी. १७१२१ दिनांक ०७-०२-१९९२) जिथे सर्व प्रकारचे उपचार करून झाल्यानंतर त्याचा आजार जास्त तीव्र झाला होता आणि रुग्णालयाने त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. आज ते एकदम मजेत आपलं जीवन जगत आहेत आणि त्याच बँकेत कार्यरत आहेत. नंतर त्यांना टाटा रुग्णालयानेही कर्करोगापासून तुम्ही मुक्त झालात असा जाहीररित्या सांगितलं. अशी अनेक उदाहरणं संपूर्ण पुराव्यासहित आज उपलब्ध आहेत. डी.एस. रिसर्च सेंटरने आपल्या सर्वपिष्टी या औषधापासून कर्करोग मुक्त झालेल्या ४१५ रुग्णांची नावं आणि पत्ते याची माहिती पडताळणी करण्यासाठी जागतिक स्वास्थ्य संघटनेला पाठवली आहे. पण ते पडताळणीसाठी विशेष उत्सुक नाहीत.

या औषधाबद्दल जगाला माहिती कधी समजली जेव्हा भारतातीलच एक कर्करोग वैज्ञानिक जे अमेरिकेला स्थाईक झाले होते, ते या औषधामुळे कर्करोगापासून बरे झाले. न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल मेडिकल सेंटर ऑफ क्विसमधील क्ष-किरण संस्थेचे क्लिनिकल डायरेक्टर आणि वेल मेडिकल कॉलेज ऑफ कोरनोल युनिव्हर्सिटीचे क्ष-किरण संस्थेचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर सुहृद परीख यांनी कर्करोगापासून बरे झाल्यानंतर या औषधावर चर्चा करण्यासाठी मुंबईच्या जुहूमधील 'हॉटेल सी प्रीन्सेस'मध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये मुंबईमधील भरपूर रुग्णालयातील कर्करोग विशेषज्ञांनी सहभाग घेतला होता. देशातील नावाजलेले कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर एच. एस. अडवाणी आणि जसलोक रुग्णालयाचे कर्करोग विशेषज्ञ डॉक्टर वी. हरिभाऊसुद्धा या कार्यकमाला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमासाठी वाराणसी डी.एस. रिसर्च सेंटरचे प्रमुख वैज्ञनिक प्रोफेसर शिवा शंकर त्रिवेदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. त्यांना या औषधाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की, जिवंत पुराव्यानुसार आधुनिक चिकित्सा विज्ञानाशी जोडलेली कोणतीही व्यक्ती हे मानण्यासाठी तयार नव्हती की, ज्या कर्करोगावर विजय मिळवण्यासाठी संपूर्ण जगातील चिकित्सा वैज्ञानिक असमर्थ झाले होते. त्यावर भारतीय पद्धतीने विजय मिळवला गेला आहे. पण डॉक्टर परीख यांनी केलेल्या चर्चेनंतर लोकांची या विज्ञानातील आवड वाढण्यास सुरुवात झाली. आमच्याकडे जर्मनी आणि ब्रिटनमधील काही टीमसुद्धा आल्या होत्या. परंतु भारतीय चिकित्सा संस्थाने किंवा सरकारने यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

  • कर्करोगाने दरवर्षी ७४ लाख लोकांचा मृत्यू
  • जगामध्ये होणा-या जनतेच्या मृत्यूमध्ये १३ टक्के जनतेचा मृत्यू फक्त कर्करोगामुळे होत आहे.
  • जगात कर्करोगाने मृत्युमुखी पडणा-यांची संख्या दरवर्षी सुमारे ७४ लाख इतकी आहे.
  • यामध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणा-यांची संख्या सर्वाधिक म्हणजे सुमारे १३ लाख आहे.
  • पोटाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणा-यांची संख्या ८ लाखांपेक्षाही जास्त आहे.
  • मलाशय कर्करोगाने दरवर्षी ६ लाख ३९ हजार लोकांचा मृत्यू होतोय.
  • यकृताच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणा-यांची संख्या ६ लाख १० हजारपेक्षा जास्त आहे.
  • स्तनाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणा-यांची संख्या ५ लाख १९ हजारपेक्षा जास्त आहे.
  • पुरुषांमध्ये कर्करोगाने होणा-या मृत्यूंमध्ये ३१ टक्के फुप्फुसाच्या कर्करोगाने, १० टक्के पौरुषग्रंथी कर्करोगाने, ८ टक्के मलाशय कर्करोगाने, ६ टक्के स्वादुपिंड आणि ४ टक्के यकृताच्या कर्करोगाने होतो आहे.
  • कर्करोगाने मरणा-या महिलांमध्ये २६ टक्के फुप्फुसाच्या कर्करोगाने, १५ टक्के स्तनाच्या कर्करोगाने, ९ टक्के मलायश कर्करोगाने, ६ टक्के स्वादुपिंड आणि ६ टक्के गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होत आहे.
  • प्रत्येक तीन वर्षामध्ये एका व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यातील ९ जणांमध्ये एका व्यक्तीला पुन्हा कर्करोग होण्याची शक्यता असते.

Read More »

जाणून घेऊया कर्करोगाला

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अवहालानुसार २००५ ते २०१५ या दहा वर्षामध्ये ८४ दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने जगभरातील कर्करोग निदान संस्थेमध्ये कर्करोगाविषयी काळजी कशी घ्यावी, त्याची लक्षणं काय आहेत. तसंच त्यावर उपचार कसे घेतले जातात याविषयी माहिती देऊन या दिवशी जनजागरण केलं जाते. अशा या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाविषयी..
आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो.

कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. हा कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. कॅन्सरचे कितीतरी प्रकार असून या सगळ्या प्रकारांमधला समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाने नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवश्यकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजेच अर्बुद किंवा टय़ुमर(गाठी) होय. हे टय़ुमर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बिनाइन टय़ुमर म्हणजे कर्करोगाची गाठ आणि दुसरा प्रकार म्हणजे मारक गाठी (मॅलिग्नंट). पहिल्या प्रकारची गाठ ही सहज काढून टाकता येते. या गाठी नवनवीन अवयवांमध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करत नाहीत. मात्र दुस-या प्रकारात कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणा-या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवांमध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्या पेशी लसिकेमार्फत किंवा रक्तवाहिन्यांमधून इतर अवयवांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे मूळ अवयवाबरोबरच इतर अवयवांमध्येही कर्करोग पसरतो. तसंच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात, उदाहरणार्थ, डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींचा कर्करोग तसंच बहुतेक प्रकारचे ल्युकेमिया म्हणजे रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट किंवा पौरुष ग्रंथीआणि मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग प्रौढपणी होतो. या अर्बुदविज्ञानाचा अभ्यास केल्यास निदान आणि उपचाराद्वारे कर्करोग हा आजार बरा होऊ शकतो.

काय टाळाल?

शरीराला उच्च कोलेस्टेरॉल देणारे पदार्थ जसं की मांस, लिव्हर आणि दुधाचे पदार्थासारखे आहार टाळावेत.

अतितेलकट पदार्थ टाळावे.

सकाळी दहा ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हात उभे राहू नये.

मद्यपान टाळावे.

काय करावं

उन्हातून फिरताना मोठी हॅट वापरावी.

उन्हातून जाताना १५ किंवा त्याहून अधिक संरक्षक घटक असलेलेच क्रीम लावावं.

पेरू, द्राक्ष, अननस यासारख्या फळांचा आणि टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या अशा भाजांचा तसंच कडधान्याचा आहारात समावेश करावा. तसंच आहारात पास्ता,तांदूळ आणि घेवडा अशा पदार्थाचा समावेशक करावा. थोडक्यात तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्व, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्यता कमी होते.

कॅन्सरची रूपरेषा

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फुप्फुसांचा आणि तोंडाचा कर्करोग हा सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो. तर स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांनाच होतो. सध्याच्या घडीला भारतात कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणा-या लोकांचं प्रमाण अधिक असून तीन दशलक्ष रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. भारतात वर्षाला जवळपास ५ लाख लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मते, या वर्षी ही संख्या ७ लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. प्रतिवर्षी कर्करोगाने मृत्यू होणा-याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तसंच फुप्फुसं, तोंड, ओठ, घसा अािण मानेचा कर्करोग प्रामुख्याने पुरुषांमध्ये तर बहुतांश महिलांमध्ये गर्भाशय, स्तन आणि अंडाशयाचा कर्करोग आढळतो. भारतात प्रामुख्याने मूत्रपिंड, पुरुषांचे जननेंद्रिय, आतडय़ांच्या कर्करोग वृद्ध पुरुषांना तर गर्भाशयाचा कर्करोग हा वृद्ध महिलांना होतो. बाकीचे बहुतांश कर्करोग हे वयाच्या ३२ ते ३५ या वयोमर्यादेत होतात. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात ३००हून अधिक कर्करोग निदान संस्था असून त्यापैकी ४० संस्थांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. २०२० पर्यंत भारतात ६०० कर्करोग निदान संस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे.

स्तनांचा कर्करोग

गेल्या काही वर्षात स्तनांचा कर्करोग हा तरुण वयातच होण्याचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसतंय. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण अधिक वाढलं आहे. अलीकडे याकडे लक्ष केंद्रित केल्याने काही रुग्ण प्रगतिपथावर आहेत. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हा कर्करोग बरा होण्याची शक्यता असते. यासाठी नियमित एक तास स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या २० वर्षीपासूनच योग्य डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून या कर्करोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळीच उपचार केल्याने एखादीला नव्याने जीवनाची संधी मिळू शकते. जगभरातील महिलांचं मृत्यू होण्याचं प्रमुख कारण स्तनांचा कर्करोग हे आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की दर अठ्ठावीस महिलांमधील एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतात स्तनांचा कर्करोग ४३ ते ४६ या वयादरम्यान होतो. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये अधिकाधिक जागरूकता कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

कर्करोगाची मदत रुग्णांपर्यंत पोहोचत का नाही?

कर्करोगाचा उपचार करण्यासाठी लागणारा खर्च खूप असल्याने कित्येक दशलक्ष रुग्णांना त्या उपचाराचा लाभ मिळू शकत नाही. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास त्याचा उपचार कमी खर्चिक असतो तसंच रुग्ण लवकर बराही होऊ शकतो. त्याचप्रमाणे कर्करोगाचं निदान उशिरा झाल्यास त्यावरील उपचार ही मोठी खर्चिक बाब असतेच, त्याचप्रमाणे त्यातून मुक्तता होण्याची शक्यतादेखील कमी असते. डॉक्टरांच्या मते, कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनुवंशिक संप्रेरकांचा वापर आणि रोगप्रतिकारशक्तीचा अभाव हीदेखील असू शकतात. याशिवाय बाहय़ आणि पर्यावरणविषयक कारणं, उदाहरणार्थ अन्न सवयी, औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ अशीही असू शकतात.

निदान करण्यात विलंब, आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव, आपापसांत दुर्लक्ष असणे यामुळे कर्करोग हा 'किलर रोग' ठरू शकतो. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झालं तर त्यावर योग्य ते उपचार केले जातील आणि रुग्ण एक निरोगी आयुष्य जगेल. म्हणूनच कॅन्सरचे कोणते प्रकार आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत याविषयी लोकांमध्ये माहिती प्रसारित करणं आवश्यक आहे. मूत्रावाटे रक्त जाणे हे कर्करोगाचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. यावरून हे सिद्ध होतं की कर्करोगावर प्रतिबंध करण्यात अन्न हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.

या कर्करोग दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने अधिकधिक लोकांना कर्करोगाविषयी माहिती देऊन त्यांना त्या आजाराविषयी जागरूक करूया.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe