Tuesday, May 21, 2013

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
'नवी मुंबईत रेसकोर्सला जागा द्या'

महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेची लीज 'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब'ला वाढवून देऊ नये. त्या जागेवर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी भव्य थीम पार्क उभारावे.अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
मुंबई  महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेची लीज 'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब'ला वाढवून देऊ नये. त्या जागेवर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी भव्य थीम पार्क उभारावे. मात्र रेसकोर्ससाठी नवी मुंबईत जागा द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
महालक्ष्मी येथे मोक्याच्या ठिकाणी असलेली महापालिकेची सुमारे ८ लाख ५५ हजार चौरस मीटरची जागा 'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब'ला लीजवर देण्यात आली आहे. रेसकोर्सच्या स्थापनेपासून या जागेचा वापर केवळ मूठभर धनदांडगेच करत आहेत, परंतु रेसकोर्सच्या जागेची लीज ३० मे रोजी संपत असल्याने ती 'टर्फ क्लब'ला पुन्हा वाढवून देऊ नये. त्याऐवजी या जागेवर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी थीम पार्क उभारावे, अशी मागणी आठवले यांनी केली. सध्या उद्यानाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. त्याबाबत वाद न घालता सर्वानी एकमताने निर्णय घ्यावा, असे आठवले म्हणाले.
महालक्ष्मी रेसकोर्सची लीज वाढवण्याचा निर्णय घेतल्यास रिपाइं तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही आठवले यांनी दिला. येत्या लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदाच रिपाइं दलितेतरांना तिकिटे देण्याचा विचार करत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Read More »

विरार उड्डाणपूल ५ वर्षे रखडलेलाच

विरारमधील उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
विरार- विरारमधील उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. येत्या तीन महिन्यांत हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी या याचिकेत केली आहे.
विरार शहरातील लोकसंख्या आणि वाढती वाहतूक कोंडी पाहता २००६ साली सार्वजनिक बांधकाम खात्याने या उड्डाणपुलासाठी वर्कऑर्डर काढली होती. त्या वेळी या उड्डाणपुलाचा खर्च ५ कोटी ६५ लाख इतका होता. २००८ साली या उड्डाणपुलाचे काम होणे अपेक्षित होते, मात्र आज २०१३ उजाडले तरी या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. तब्बल पाच वर्षे हा पूल रखडला आहे. तत्कालीन विरार नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा पूल बनवण्यात येणार होता. सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी घेतली होती. तर तत्कालीन विरार नगर परिषदेवर २५ टक्के रक्कम देणे, जमीन हस्तांतर करून देण्याची जबाबदारी होती. मात्र असे असतानाही हा पूल नागरिकांसाठी अद्याप खुला झालेला नाही.
सध्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी नारंगी फाटक ओलांडून जावे लागते. त्यात नारंगी फाटा हा अरुंद असल्यामुळे या फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होते. तसेच नारंगी फाटक विरार शहरापासून तीन किलोमीटर दूर असल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागते. यात नागरिकांचा वेळ आणि इंधन मोठया प्रमाणात खर्च होते.   या सर्व त्रासातून सुटका व्हावी, यासाठी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे.
'उड्डाणपुलाचे काम तीन महिन्यांत पूर्ण होईल'
येत्या ३ महिन्यांत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन देत, जागेच्या संदर्भात काही लोकांनी आक्षेप घेऊन कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे या कामाला विलंब झाल्याचे महापौर नारायण मानकर यांनी सांगितले. सध्या या उड्डाणपुलाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे ट्रॅकवरील कामदेखील पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी पश्चिम रेल्वेची होती. मात्र वारंवार सांगूनही पश्चिम रेल्वे हे काम करत नव्हती. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी पुलाच्या कंत्राटदाराने रेल्वे ट्रॅकवरील २ कोटी ३० लाखांचे काम पूर्ण केले. मात्र रेल्वेने हे पैसे कंत्राटदाराला दिले नसल्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले होते. अखेर तोडगा काढत महापालिकेनेच रेल्वेचे पैसे कंत्राटदाराला दिले आहेत. त्यामुळे लवकरच या पुलाचे काम पूर्ण होईल, असेही महापौरांनी सांगितले.
उड्डाणपुलात राजकारण?
या पुलाचे काम जाणूनबुजून रखडवले जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या ज्या नारंगी फाटकातून वाहने जातात, त्या ठिकाणी अनेक मोठे इमारत प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या विक्रीवर परिणाम होऊ नये, यासाठी विविध कारणे दाखवून या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

Read More »

नेरळमध्ये नगरपंचायत स्थापन करू

नेरळकरांची इच्छा असल्यास येत्या सहा महिन्यांत नगरपंचायत स्थापन करण्याची तयारी राज्य सरकार करेल, असे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले.
नेरळ- मुंबईचे उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या नेरळचा विचार करता, भविष्यात विकासासाठी ग्रामपंचायत पुरेशी नाही. त्यामुळे नेरळकरांची इच्छा असल्यास येत्या सहा महिन्यांत नगरपंचायत स्थापन करण्याची तयारी राज्य सरकार करेल, असे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले.
'नेरळ महोत्सवा'च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात तटकरे बोलत होते. नेरळमध्ये नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणात राबवता येणार नाहीत. गावाचे शहरात रूपांतर होणे गरजेचे आहे. त्यासाठी नेरळकरांनी मागणी केल्यास नगरपंचायत किंवा नगर परिषद सुरू करण्याची कार्यवाही राज्य सरकार करेल. माथेरान, कर्जत, खोपोली या तीन नगर परिषदांना दीडशे कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. नेरळचाही विकास मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश टोकरे उपस्थित होते.

Read More »

नालासोपा-यात अवैध प्रवासी वाहतूक

वसई तालुक्यात मोठया प्रमाणात होत असलेल्या प्रवासी वाहतुकीमुळे अधिकृत परवानाधारक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
विरार-  वसई तालुक्यात १३ हजार रिक्षांना परवाने देण्यात आले असून, हे परवानाधारक कोटयवधींचा महसूल सरकारला देत आहेत. मात्र वसई तालुक्यात मोठया प्रमाणात खासगी टाटा मॅजिकमधून होत असलेल्या प्रवासी वाहतुकीमुळे या अधिकृत परवानाधारक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ही अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याची मागणी ऑटो रिक्षा टॅक्सीचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मधुसूदन राणे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही वाहतूक बंद न झाल्यास येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयावर  धडक मोर्चा काढण्याचा इशाराही राणे यांनी दिला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेला परिवहन सेवेमार्फत टप्पा प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे. सध्या तालुक्यातील नागरिकांना रिक्षा व परिवहन सेवेमार्फत योग्य सेवा मिळत आहे. मात्र वाहतूक शाखेच्या डोळयादेखत  अवैध तथा कोणताही परवाना नसलेल्या टाटा मॅजिकमधून बिनदिक्कत टप्पा प्रवासी वाहतूक होत आहे. विशेषत: नालासोपारा, विरार या ठिकाणी मोठया प्रमाणात खासगी वापरासाठी पासिंग झालेल्या टाटा मॅजिकचा वापर टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी होत आहे. त्यामुळे इमानेइतबारे सरकारला टॅक्स भरणा-या व परवानाधारक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, नालासोपारा ब्रीजखाली चालणा-या टाटा मॅजिकमुळे पालिकेच्या परिवहन सेवेचे दर दिवसाला  १२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे पालिकेसोबतच वाहतूक विभागाने याविरोधात कडक भूमिका घेण्याची गरजही मधुसूदन राणे यांनी व्यक्त केली आहे.

Read More »

राशिभविष्य, २० मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…
मेष : विनयाने तुमची विद्धत्ता अधिक शोभून दिसेल.



वृषभ : मुद्देसूद वक्तव्य कराल.

मिथुन : समुपदेशन कराल.
कर्क : जिव्हाळय़ाचे मित्र भेटतील.

सिंह : स्थावरचे व्यवहार भाग्यवर्धक होतील.

कन्या : शास्त्रीय संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध कराल.
तूळ : मौल्यवान भेटी प्राप्त होतील.

वृश्चिक : भागीदाराचे मोलाचे सहकार्य मिळेल.

धनू : विरोधकांचा विरोध तत्त्वापुरताच राहील.

मकर : इच्छित शाखेत प्रवेश मिळणे सुकर होईल.

कुंभ : जाणीवा प्रभावी होतील.

मीन : औषधे लागू पडून आराम वाटेल.

Read More »

अंबरनाथमधील धर्मशाळेला अवकळा

 नगरपालिकेत काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना शहरातील पूर्व-पश्चिम विभागांत अनेक लोकोपयोगी वास्तू उभारण्यात आल्या होत्या, मात्र गेल्या १७ वर्षात सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने या वास्तूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या वास्तूंची वाताहत झाली आहे.
अंबरनाथ - नगरपालिकेत काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना शहरातील पूर्व-पश्चिम विभागांत अनेक लोकोपयोगी वास्तू उभारण्यात आल्या होत्या, मात्र गेल्या १७ वर्षात सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने या वास्तूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या वास्तूंची वाताहत झाली आहे. भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या धर्मशाळेलाही युतीच्या या अनास्थेमुळे आज अवकळा आली आहे.
अंबरनाथमधील पुरातन शिवमंदिरात ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे; तर जिल्ह्याबाहेरून हजारो भाविक येतात. येथे येणा-या भाविकांना क्षणभर विश्रांती मिळावी, यासाठी तत्कालिन नगराध्यक्ष प्रभाकर नलावणे यांनी शिवमंदिरापासून जवळच पालिकेच्या एका भूखंडावर सर्व सोयींनीयुक्त अशी बैठी इमारत बांधली होती. या इमारतीजवळच मनोरंजन केंद्रही उभारण्यात आले. नलावडेंच्या कारकीर्दीत असंख्य शिवभक्तांनी या धर्मशाळेत मुक्काम केला होता. पुढे शरद पवारांच्या पुलोद राजवटीत काँग्रेस पक्ष सत्तेवर असलेली ही नगरपालिकाच बरखास्त करण्यात आली. त्यानंतर शहरातील नागरिकांनी व विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले व अंबरनाथ तालुक्याची निर्मिती झाली. तथापि, तालुक्याला हव्या असणा-या तहसील कार्यालयासाठी अंबरनाथ शहरात जागा नसल्याने शिवमंदिराजवळील या धर्मशाळेचे रूपांतर तहसील कार्यालयात करण्यात आले. अनेक वर्षे हे कार्यालय कार्यरत असल्याने इमारत चांगल्या अवस्थेत होती. पुढे तत्कालिन स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रेल्वे स्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आधुनिक सोयींनी युक्त असे प्रशासकीय भवन उभे राहिले. या भवनाचा एक मजला तहसीलदार कार्यालयाला देण्यात आला. परिणामी शिवमंदिराजवळ असलेले तहसीलदार कार्यालय ओस पडले. आज या इमारतीला अवकळा आल्याने या धर्मशाळेची अवस्था एखाद्या भूतबंगल्यासारखी झाली आहे. इमारतीचे दरवाजे, खिडक्या चोरीला गेल्या आहेत. इमारतीत दगडविटांचा खच आहे. या ठिकाणी शिवमंदिर परिसरात राहणा-या तरुणांचा रात्रंदिवस राबता असतो. पत्ते खेळणे, आपापसात मारामा-या करणे इत्यादी प्रकार येथे सर्रास सुरू असतात. तर इमारतीत वीजही नसल्याने धर्मशाळा अंधार कोठडी झाली आहे.

Read More »

अंबरनाथमध्ये बेकायदा बांधकामे सुरूच

शहरात होत असलेल्या बेकायदा बांधकामांकडे पालिका प्रशासन डोळेझाक करत आहे.
अंबरनाथ शहरात होत असलेल्या बेकायदा बांधकामांकडे पालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप करून, सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाचे नगरसेवक सत्ताधा-यांना धारेवर धरत असतानाच, नगरपालिका कार्यालयापासून थोडयाच अंतरावर असलेल्या स्टेशन चौकात एका दुकानावर प्लॅस्टिक पडद्यांचा आडोसा घेऊन बिनदिक्कत बेकायदा बांधकाम सुरू आहे.
शहर विकासाच्या प्रस्तावावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी पालिका सभागृहात नुकतेच सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांच्या जनविरोधी निर्णयाविरोधात नेहमीच सभात्याग करणा-या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी या सभेत प्रथमच आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले. दरम्यान, बारवी धरणापासून काही अंतरावर असलेल्या भूखंडावर एका बडय़ा विकासकाने निवासी इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. तेथून जवळच असलेला पालिकेच्या मालकीचा आरक्षित भूखंडही या विकासकाने आपल्या नकाशात दाखवला आहे. याबाबत संबंधित इमारत विकासकाविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी तक्रार आपण जानेवारीत केली होती, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, असे नगररचना विषय समितीचे सभापती कुणाल भोईर यांनी या वेळी सांगितले. यावर मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी भोईर यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
तर वडवली येथील डंपिंग ग्राउंडलगत २५ अनधिकृत घरे कोणाच्या आशीर्वादाने बांधण्यात आली आहेत, असा संतप्त प्रश्नही रिपाइंचे नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी केला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अब्दुल शेख यांनीही या वेळी शहरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबद्दल शिवसेनेला घरचा आहेर दिला.

Read More »

आढावा न घेणा-या अधिका-यांना निलंबित करा

बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाची मागणी आढावा बैठक न घेणा-या सरकारी-निमसरकारी अधिका-यांना निलंबित करावे.
मुंबई -  मागासवर्गीय अधिकारी व कर्मचा-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्रमासिक किंवा सहामाही आढावा बैठक न घेणा-या सरकारी-निमसरकारी अधिका-यांना निलंबित करावे, अशी मागणी बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष एस. आर. भोसले व सरचिटणीस रमेश सरकटे यांनी केली आहे.
मागासवर्गीय अधिकारी-कर्मचा-यांच्या सेवाभरती, सेवाशर्ती, पदोन्नती, बदल्या, गोपनीय अहवाल पद्धत यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय विभागप्रमुखांनी दर सहा महिन्यांतून एकदा आणि कार्यालयप्रमुख, विभागप्रमुख यांनी तीन महिन्यांतून एकदा आढावा बैठक घ्यावी, असे सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी काही अधिकारी करत नसल्याचे महासंघाच्या निदर्शनास आल्याने ही मागणी केल्याचे महासंघाने सांगितले.
अधिकारी-कर्मचारी सरकारचे आदेश पाळत नसल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग होतो. त्या आधारे अशा अधिका-यांना निलंबित करणेच योग्य असल्याचे महासंघाचे मत आहे. रविवारी औरंगाबाद येथील सिंचन भवन सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असे भोसले यांनी सांगितले.

Read More »

प्रीती राठीवर शस्त्रक्रिया होणार

वांद्रे येथे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीला पुढील उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मुंबई- वांद्रे येथे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीला पुढील उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याआधी तिच्यावर भायखळा येथील मसिना रुग्णालयात उपचार सुरू होते. बॉम्बे रुग्णालयात तिच्या अन्ननलिकेवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांपासून प्रीतीवर मसिना रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची प्रकृती सुधारत असल्याचे मसिना रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे प्रीतीच्या अन्ननलिकेला इजा झाल्याने तिला पेज व दूध असा आहार सुरू आहे. अ‍ॅसिडमुळे तिच्या अन्ननलिकेला किती गंभीर इजा झाली आहे, हे सध्या सांगणे कठीण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉ. अशोक गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे बॉम्बे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. प्रीती ही अद्याप कागदावर मजकूर लिहून तिच्या भावना व्यक्त करत आहे. प्रीतीवरील हल्ल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी तिच्या नातेवाइकांनी केली आहे.

Read More »

आदिवासींना अद्याप कौलांचे वाटप नाही

पावसाळा तोंडावर आला असतानाही आदिवासींना कौलांचे वाटप नाही.जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
ठाणे - पावसाळा तोंडावर आला असतानाही आदिवासींना कौलांचे वाटप करण्यात न आल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या बाबत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी लवकरच कौलांचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील पाणीटंचाईबद्दल सदस्यांनी प्रशासनावर टीका केली. २००७ पासून मुरबाड तालुक्यातील पेंढारी येथील २७ लाख रुपयांच्या पाणी योजना अपूर्ण असल्यामुळे आदिवासींना पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याची माहीती सदस्यांनी दिली.
जव्हार मोरवाडा आणि विक्रमगड तालुक्यासाठी एकच उपअभियंता असल्याची तक्रारही सदस्यांनी केली. विक्रमगड तालुका अस्तित्वात येऊन पंधरा वर्षाचा कालावधी लोटला. तरीही अद्याप बांधकाम पाटबंधारे आणि पाणीपुरवठा विभागाची कार्यालय अद्याप सुरू झाली नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

Read More »

शाळांच्या तपासणीकरता जिल्हास्तरावर पथके

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात फिरती तपासणी पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत शाळा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई- मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात फिरती तपासणी पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत शाळा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या तपासणी पथकात जास्तीत जास्त पाच सदस्यांच्या समावेश असेल. त्यात तीन अधिकारी व दोन शिक्षणतज्ज्ञ असतील. तसेच प्रत्येक पथकात शिक्षण खात्याचा किमान एक गट शिक्षणाधिकारी दर्जाचा अधिकारी असणार आहे. या पथकातील सदस्यांची निवड व पथकप्रमुख घोषित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना देण्यात आले आहेत.
प्रत्येक पथकाला दरवर्षी ५० ते १०० शाळांच्या तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या तपासणी मोहिमेत सर्व सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी संस्थांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांचा समावेश करण्यात आला आहे. गोपनीय पद्धतीने शाळा तपासणीचा दिवस निश्चित केल्यानंतर संबंधित शाळेची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर, त्याच दिवशी तपासणीचा लेखी अहवाल मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे सोपवला जाणार आहे.

Read More »

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

ठाणे जि. प. च्या इंग्रजी माध्यमासाठी परवानगी न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाणे - जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून अद्याप इंग्रजी माध्यमातील पहिलीच्या वर्गासाठी परवानगी न मिळाल्याने ८०० मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०१३ मध्ये पहिलीचा वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारची मान्यता नसल्याने हा वर्ग भरणार का, याबाबत पालकांमध्ये संभ्रम व भीती आहे.
जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध व्हावे, म्हणून २०१० रोजी या माध्यमातून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा परिषदेने २०१० ला नर्सरीचे वर्ग सुरू करण्यात आले. प्रथम २५ शाळांमध्ये हे वर्ग सुरू करण्यात आले. २०१० ला नर्सरी, २०११ ला ज्युनिअर केजी, २०१२ ला सीनिअर केजी सुरू केले. मात्र २०१३ मध्ये पहिलीचा वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारची मान्यता नसल्याने पहिलीचा वर्ग भरणार की नाही? याबाबत प्रश्न पडला आहे.
इंग्रजी माध्यमातील पहिलीच्या वर्गासाठी राज्य सरकारची परवानगी न मिळाल्यामुळे जूनमध्ये वर्ग भरणार नाहीत, अशी पालकांची भावना झाली आहे. जिल्हा परिषदेने पालकांना अनौपचारिकरीत्या दुस-या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची सूचना केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत विश्वसनीयता राहिली नसल्याचे चित्र आहे.
सर्वसाधारण सभेत मंजुरीनंतरही विलंब
राज्य सरकारकडून मराठी, हिंदी, ऊर्दू, आदी भाषेतील तुकडय़ांना त्वरित परवानगी मिळते. मात्र सरकारी धोरणामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांना परवानगी मिळण्यास अडचण होते. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने सेमी इंग्रजी माध्यमातून पहिलीसाठी परवानगी मागण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. या संदर्भात सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर करण्यात आला आहे. शाळा सुरू होण्यासाठी जेमतेम महिन्याचा कालावधी उरला आहे. जिल्हा परिषदेचा प्रस्ताव पाठवल्यानंतर तो मंजूर होण्यासाठी एक महिन्याचा अवधी अतिशय कमी आहे. त्यामुळे जून महिन्यात पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग भरेल का, याबाबत प्रश्न चिन्ह कायम आहे. त्यामुळे ८०० मुलांचे शैक्षणिक भवितव्य काय, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

Read More »

भाविकांसाठी व्यापारी ठरले जलदूत

सामाजिक उपक्रमातून समाजसेवक व व्यापारी संघटनेने समुद्र सपाटीपासून २५०० फूट उंचीवर असलेल्या हाजीमलंग डोंगरावर जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

 कल्याण तालुक्यातील हाजीमलंग डोंगरावर राहणा-या आणि येथे दररोज येणा-या शेकडो भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नव्हती. पाण्यासाठी त्यांना डोंगरावरील तलाव व कूपनलिकांवर अवलंबून राहावे लागत होते. उन्हाळयात तलाव कोरडे पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. रहिवासी व भाविकांची ही गैरसोय लक्षात घेऊन कल्याणमधील काही समाजसेवक व व्यापारी संघटनेने समुद्र सपाटीपासून २५०० फूट उंचीवर असलेल्या हाजीमलंग डोंगरावर जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
तालुक्यातील हाजीमलंग डोंगरावर बाबांची व मच्छीद्रनाथांची समाधी आहे. या समाधींचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून शेकडो भाविक येथे येतात. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी येथे अनेक उपाहारगृहे आणि हॉटेल्सची सोय आहे. मात्र, डोंगरावर पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नाही. डोंगरावर असलेल्या कूपनलिका व तलावांमधील पाण्याचा वापर स्थानिक व भाविक पिण्यासाठी करतात. उन्हाळयात कूपनलिका व तलाव कोरडे पडत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती.
ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून हाजीमलंग व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शौकत शेख, सरचिटणीस विनोद शाहू, कल्याणमधील समाजसेवक अब्दुलभाई बाबाजी, स्थानिक आमदार गणपत गायकवाड व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी एक योजना आखली. या अंतर्गत पायथ्यापासून २५०० फुटांवर असलेल्या डोंगरापर्यंत जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करण्यासाठी हैदराबाद येथून तज्ज्ञ अभियंत्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पायथ्यालगत प्रत्येकी ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या ३ टाक्या एकमेकांना सलगपणे जोडून बसवण्यात आल्या. टाक्यांमध्ये जमा झालेले पाणी जलवाहिनीद्वारे वपर्यंत ओढण्यासाठी २५ अश्वशक्तीची मोटर बसवण्यात आली. सुरुवातीला पायथ्याशी असलेल्या तीन टाक्यांमध्ये अब्दुलभाई व त्यांच्या सहका-यांनी टँकरने पाणी भरले. आता येथील ग्रामपंचायततर्फे टाक्यांमध्ये पाणी भरले जाते. या योजनेसाठी अब्दुलभाई व त्यांच्या सहका-यांनी निधी गोळा करून सुमारे ६ लाखांचा खर्च केला. सध्या ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून आता येथील रहिवाशांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Read More »

डिम्ड कन्व्हेअन्ससाठीही ह्यएलबीटी

गृहनिर्माण संस्था पदाधिका-यांत नाराजी.गृहनिर्माण संस्थांचे डिम्ड कन्व्हेअन्स (मानीव अभिहस्तांतरण) करण्यासाठीही सरकारने १ एप्रिलपासून एलबीटी लागू केला आहे.
ठाणे - गृहनिर्माण संस्थांचे डिम्ड कन्व्हेअन्स (मानीव अभिहस्तांतरण) करण्यासाठीही सरकारने १ एप्रिलपासून एलबीटी लागू केला असून, इमारतीच्या एकूण रकमेवर १ टक्का एलबीटी आकारावा, अशा सूचना महसूल विभागाकडून नोंदणी निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र ठाण्यातील अनेक सदनिकाधारकांनी सदनिका खरेदी करताना मुद्रांक शुल्क भरला असल्याने गृहनिर्माण संस्थांत नाराजीचा सूर आहे.
ठाण्यात हजारो गृहनिर्माण संस्था असून, या इमारतींत राहणा-या सदनिकाधारकांनी सदनिका खरेदी करताना मुद्रांक शुल्क भरून नोंदणी केलेली आहे. मात्र विकासकाने डिम्ड कन्व्हेअन्स केलेले नसल्याने नव्याने डिम्ड कन्व्हेअन्स करणा-या सोसायटयांना एक टक्का एलबीटी द्यावा लागणार आहे. एखाद्या इमारतीची किंमत ५ कोटी असेल, तर त्या इमारतीला १ टक्का एलबीटी भरावा लागेल. १ एप्रिलपासून गृहनिर्माण संस्थांकडून पूर्वलक्षी एलबीटी वसूल केला जात आहे. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिका-यांचा याला विरोध आहे. गृहनिर्माण संस्थांतील सदनिकाधारकांनी सदनिका खरेदी करताना मुद्रांक शुल्क भरून नोंदणी केलेली असते. त्या वेळी विकासकाने डिम्ड कन्व्हेअन्स केलेले नाही म्हणून सरकारने मोक्का कायद्यात केलेल्या बदलाप्रमाणे डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया सुरू होते.
विकासकाने इमारत बांधल्यानंतर ती गृहनिर्माण संस्थांच्या मालकीची नसते. मात्र डिम्ड कन्व्हेअन्सच्या माध्यमातून इमारत गृहनिर्माण संस्थांच्या मालकीची होते. सरकारने विकासकांना चाप लावण्यासाठी डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया सुरू केली असली तरी नव्याने कन्व्हेअन्स करू इच्छिणा-या जुन्या गृहनिर्माण संस्थांनाही एलबीटी लागू केल्याने गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिका-यांत नाराजी आहे.
दरम्यान, इमारतींत राहणा-या सदनिकाधारकांनी मुद्रांक शुल्क भरून नोंदणी केलेली असल्याने डिम्ड कन्व्हेअन्स करताना एलबीटी लावणे अनावश्यक आहे. शिवाय इमारतीच्या एकूण रकमेच्या १ टक्का एलबीटी असल्याने गृहनिर्माण संस्थांना तो भरणे शक्य नाही. त्यामुळे एलबीटी पूर्वलक्षी वसूल करणे कायद्यानुसार अयोग्य आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया दि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.

Read More »

भिवंडीत 'झुलता पूल'

काळू नदीवर बांधण्यात आलेला लोखंडी पूल गंजल्यामुळे जीर्ण झाला आहे.त्यामुळे पूल कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
भिवंडी - काळू नदीवर बांधण्यात आलेला लोखंडी पूल गंजल्यामुळे जीर्ण झाला आहे. पुलावरून ये-जा करताना हादरे बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे पूल कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महानगरपालिकेने कल्याण तालुक्यातील उल्हास नदीवर १९६० मध्ये पाणीपुरवठा योजना राबवली होती. शहाड येथून पाणी भिवंडी तालुक्यात टँकरद्वारे टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात साठवून वितरित केले जात होते. त्यासाठी काळू नदीवर पूल बांधून पाइपलाइन टाकण्यात आली होती. या पाइपलाइनशी समांतर असा हा पूल बांधण्यात आला. सुरुवातीला लाकडी फळ्यांचा असलेल्या या पादचारी पुलावर १९७६ मध्ये पत्रे टाकण्यात आले. भिवंडी तालुक्यातील नांदकर, सांगे, इताडे, आमणे, देवरुंग ,सावद , पिसे, जानवळ, मुठवळ या गावासोबतच १५ ते २० गावातील ग्रामस्थ आंबिवली रेल्वे स्टेशन, शहाड, मोहने, टिटवाळा परिसरात ये-जा करण्यासाठी या पुलाचा वापर करतात. मात्र, हा पूल आता पूर्णपणे गंजला आहे. या पुलामुळे गावात जाण्यासाठी होणारी १५ किमीची पायपीट वाचवता येते. १९७६ पासून या पुलाचा ताबा मुंबई महापालिकेने सोडला आहे. मात्र, त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीकडे अद्याप पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही.
या पुलाची उंची नदीपात्रापासून १०० फूट उंच आहे. त्यामुळे या पुलावर ये-जा करण्यासाठी ६० पाय-या चढून व उतरून जावे लागते. नांदकर-सांगे ग्रामपंचायतीच्या वतीने भंगारामधील लोखंड वितळून या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र, या पुलाच्या जागी नवा पूल बांधण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत स्थानिक ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवले आहे.

Read More »

वाडावासीयांची पाण्यासाठी वणवण कायम

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून नेते, कार्यकर्ते, तीव्र पाणीटंचाईमुळे या भागातील रहिवाशांचे होत असलेले हाल जाणून घेण्यासाठी फिरकत नाहीत. त्यामुळे वाडावासीयांची पाण्यासाठी वणवण कायम आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उन्हातान्हात गावोगावी फिरणारे स्थानिक नेते, कार्यकर्ते, तीव्र पाणीटंचाईमुळे या भागातील रहिवाशांचे होत असलेले हाल जाणून घेण्यासाठी फिरकत नाहीत. तसेच येथील ग्रामस्थांच्या विविध समस्यांबाबत सरकार दरबारी आंदोलनही करताना दिसत नाहीत. त्यामुळे येथील गोरगरीब आदिवासींच्या विकासाच्या गप्पा मारणा-या स्थानिक राजकीय पक्षांचा दुटप्पीपणा समोर आला आहे.
खेडोपाडयातील आदिवासी निरक्षर जनता पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वारंवार सरकार दरबारी खेटे घालत आहे. स्थानिक प्रशासन त्यांची दखल घेत नाही. आदिवासी पाडयापासून पाण्याचा स्त्रोत दोन किलोमीटर अंतरावर असेल तर टँकर देता येत नाही, असे नियमावर बोट ठेवले जाते.
उज्जनी, ओगदा परिसरातील अनेक गावपाडय़ांतील महिला एक, दीड किलोमीटर डोंगर चढून डोक्यावरून पाणी आणतात. काही पाडयामधील बोअरवेल जड झाले आहेत. ४० ते ५० वेळेस हापसल्यावर एक दोन लिटर पाणी मिळत आहे. निवडणुकांच्या वेळी मते मागण्यासाठी दारोदार फिरणारे स्थानिक नेते, कार्यकर्ते आता गायब झालेत. प्रशासनाने कानावर हात ठेवलेत. आता न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न ग्रामीण, आदिवासींना पडला आहे.
वाडा तालुक्याच्या दुर्गम भागात राहणा-या अनेक गावपाडयात वर्षभर पाणी पुरेल असे पाण्याचे अनेक स्त्रोत आहेत. पण प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने तालुक्यातील ब-याचशा गावांतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. तालुक्यातील उज्जनी, ओगदा या अतिदुर्गम परिसरातील नद्यांमध्ये वर्षातील सहा महिने (जुलै ते डिसेंबर) पाणी असते.
दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात इतर ठिकाणच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद होते. या नद्यांवर पाणीसाठा करणारे चांगल्या दर्जाचे लहान-मोठे बंधारे नसल्याने सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. राज्य सरकारचा पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने या नद्यांवर काही ठिकाणी गेल्या १० वर्षात बांधलेले कोल्हापूर टाइपचे सर्वच बंधारे निकृष्ट दर्जाचे बांधल्याने एकाही बंधा-यात पाणीसाठा राहात नाही. या सर्व बंधा-यातील पाणी डिसेंबरअखेर गळती होऊन आटून जाते. या भागात असलेल्या नद्यांवर चांगल्या दर्जाचे बंधारे, पाणी प्रकल्प झाले असते तर या परिसरातील विहिरी, बोअरवेल यातील पाण्याची पातळी टिकून राहिली असती. येथील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळाले असते. पण तसा विचार आजपर्यंत येथील लोकप्रतिनिधींनी केलेलाच नाही.
आज पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिला, पुरुष आपल्या पोरांबाळांसह पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. आपला रोजगार बुडवून पूर्ण दिवस पाण्यासाठी भटकावे लागत असल्यामुळे येथील आदिवासींवर उपासमारीची वेळ येईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकंदरीत येथील नेत्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे व प्रशासनाच्या आडमुठया धोरणामुळे ग्रामीण भागातील जनतेवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलेली आहे, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही.

Read More »

श्रीशांतला कोठडीत झोप लागेना

स्पॉटफिक्सिंग प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या राजस्थान रॉयल्सचा मध्यमतेज गोलंदाज एस. श्रीशांत गेल्या दोन दिवसांपासून झोपला नाही.

नवी दिल्ली- स्पॉटफिक्सिंग प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या राजस्थान रॉयल्सचा मध्यमतेज गोलंदाज एस. श्रीशांत गेल्या दोन दिवसांपासून झोपला नाही. चांगले बाथरून नसल्याने त्याने आंघोळही न केल्याचे समजते.
दिल्ली पोलिसांच्या अटकेत असलेल्या श्रीशांतला एका छोटय़ा कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथेही त्याची कसून चौकशी केली जात आहे. बुधवारी अटक केल्यानंतर श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला एकत्र होते. मात्र त्यानंतर श्रीशांतला वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तो एकाकी पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून श्रीशांत झोपला नसल्याचे समजते. त्याने पहिल्या दिवशी जेवण्यास नकार दिला. मात्र दुस-या दिवशी श्रीशांतने कुरकूर केली नाही. कोठडीत मिळणारे जेवण खाल्ले. कोठडीतील जेवण खाण्यावाचून पर्याय नसला तरी पोलिस कोठडीतीव बाथरूममधील अस्वच्छतेबाबत श्रीशांतने नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी आंघोळ न करणेच त्याने पसंत केले आहे, असे पोलिस दलातील माहितगारांनी सांगितले.
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगप्रकरणी श्रीशांतसह राजस्थानच्या तीन क्रिकेटपटूंना दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. श्रीशांतसह अंकितने स्पॉटफिक्सिंगची कबुली दिली आहे. मात्र चंडिलाने अद्याप गुन्हा मान्य केलेला नाही. तिघा क्रिकेटपटूंसह ११ बुकींनाही पोलिसांनी पोलिस कोठडीत डांबले आहे.

Read More »

इंग्लंडची विजयी सलामी

पहिली कसोटी १७० धावांनी जिंकत इंग्लंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
लॉर्ड्स- पहिली कसोटी १७० धावांनी जिंकत इंग्लंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुस-या डावात पाहुण्यांच्या ७ विकेट टिपणारा इंग्लंडचा तेज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड सामनावीर ठरला.
पहिल्या डावात २५ धावांची नाममात्र आघाडी घेतली तरी इंग्लंडचा दुसरा डाव २१३ धावांत संपला. न्यूझीलंडचा तेज गोलंदाज टीम साउदीने सहा विकेट घेत यजमानांना मोठय़ा धावसंख्येपासून रोखले. साउदीने पहिल्या कसोटीत १० विकेट घेण्याची करामत साधली. मात्र साउदीच्या सवरेत्तम गोलंदाजीला फलंदाजांची साथ लाभली नाही. २३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्यांचा दुसरा डाव अवघ्या २२.३ षटकांत ६८ धावांत संपला. स्टुअर्ट ब्रॉड (७ विकेट) आणि जेम्स अँडरसनने (२ विकेट) एकच स्पेल टाकताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.
न्यूझीलंडच्या केवळ दोन फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. सर्वाधिक योगदान नवव्या क्रमांकावरील नील वॅग्नरने (१७) दिले. त्यानंतर केवळ बी. जे. वॉल्टिंगने (१३) दोन आकडी धावा केल्या. किवींच्या पहिल्या सहा फलंदाजांना मिळून केवळ २९ धावा करता आल्या. परिणामी ६ बाद २९ अशा बिकट अवस्थेत पाहुणे सापडले. वॅग्नर आणि वॉल्टिंगमुळे संघाला सत्तरीत पोहोचता आले. लॉर्ड्स कसोटी जिंकून यजमानांनी मालिका विजयाच्यादृष्टीने आगेकूच केली. उभय संघांमधील दुसरी आणि अंतिम कसोटी २४ ते २८ मे दरम्यान लीड्समध्ये रंगेल.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड - २३२ (बेअस्टरे ४१, साउदी ५८-४) आणि २१३ (रूट ७१, ट्रॉट ५६, साउदी ५०-६) वि.
न्यूझीलंड - २०७ (टेलर ६६, विल्यमसन ६०, अँडरसन ४७-५) आणि ६८ (वॅग्नर १७, ब्रॉड ४४-७).
निकाल : इंग्लंड १७० धावांनी विजयी. मालिकेत १-० अशी आघाडी. सामनावीर : स्टुअर्ट ब्रॉड.

Read More »

उन्हाच्या काहिलीवर ताडगोळयांचा उतारा

ठाणे, कल्याण, डोंबिवलीत मागणीत वाढ  करवंद, जांभळाला बहर कमी होताना दिसत आहे.
कुडूस - उन्हाळयात जांभूळ, करवंद या रानमेव्यांसह ताडगोळयाची मोठया प्रमाणात आवक असते. या माध्यमातून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. ताडगोळा हा थंड असतो. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून थोडा थंडावा मिळण्यासाठी ताडगोळयांना विशेष मागणी असते. सध्या, ठाणे, कल्याण, डोंबिवली या स्थानकांबाहेर मोठया प्रमाणात ताडगोळयांची विक्री होताना दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, शहापूर या भागातील बहुतांशी आदिवासी ऋतुमानानुसार रोजगाराची साधने शोधत असतात. येथील आदिवासी पावसाळयात शेतमजुरीचे काम करतात. तर, उन्हाळयात वीटभट्टयावर मजूर किंवा जांभूळ, आंबे, करवंद, डिंक विकून आपला उदरनिर्वाह करतात. पण, यंदा करवंद, जांभळाला कमी बहर आल्याने येथील आदिवासींच्या रोजगारावर मोठया परिणाम झाला आहे.
कल्पवृक्षाप्रमाणे वाढणारे ताडाचे झाड हे समुद्र किनारपट्टीवरील खा-या जमिनीत जोमाने वाढते. या झाडाची उंची ४० ते ५० फूट असते. झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर झाडाला फळे येतात. कडक आवरणाच्या या फळामध्ये पाण्याने भरलेला गोड व पांढ-या रंगाचे मऊ गोळे असतात. ताडगोळयात २० ते २५ मिली पाणी असते. उन्हाच्या काहिलीपासून थंडावा मिळण्यासाठी तोडगोळयांचा उपयोग होतो. हे ताडगोळे बाजारात ५० ते ६० रुपये डझनने विकले जातात.
ताडगोळयाचा विक्री मोसम गेल्यानंतर याच झाडापासून शेतकरी दिवसाला ८ ते १० लिटर मधुर, गोड, ताडी काढून ती १० ते १५ रुपये लिटरप्रमाणे विक्री करतात. ही ताडी नोव्हेंबर ते जुलै अशी ७ महिन्यांपर्यंत काढली जाते. त्यानंतर या ताडाच्या झाडावरील फळे काढून ती भुसभुशीत जमिनीत पेरली जातात. चार महिन्यांनंतर या ताडगोळयाच्या फळाला मुळया सारखा पिवळया रंगाचा १ ते दीड फूट कोंब येतो. हा कोंब जानेवारीत येणा-या मकर संक्रातीच्या दिवशी खाण्यासाठी वापरला जातो, अशा प्रकारे ताडाचे झाड हे आदिवासींना बारमाही उत्पन्न देते.

Read More »

यापुढे क्रिकेटपटू नजरकैदेत

आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर बीसीआयआयने क्रिकेटपटूंवर अनेक बंधने घातली आहेत.

चेन्नई- आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर बीसीआयआयने क्रिकेटपटूंवर अनेक बंधने घातली आहेत. ''प्रत्येक क्रिकेटपटूने त्याच्या एजंटची नोंदणी बीसीसीआयकडे करणे आवश्यक आहे. पुढील आवृत्तीपासून प्रत्येक आयपीएल संघमालक (फ्रँचायझी) आपल्या संघासोबत एक भ्रष्टाचारविरोधी पथकाचा अधिकारी नियुक्त करेल. तसेच एक सुरक्षा अधिकारी क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवेल,''असे बीसीसीआयने अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी कार्यकारी समितीच्या तातडीच्या बैठकीनंतर सांगितले.
स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची गंभीर दखल घेत बीसीसीआयने कार्यकारी समितीची तातडीची बैठक रविवारी बोलावली होती. या बैठकीत 'फिक्सर' क्रिकेटपटूंवर आजीवन बंदीसारखी कडक कारवाई अपेक्षित होती. मात्र बीसीसीआयने सबुरीची भूमिका घेतली आहे. ''आरोप सिद्ध होत नाही. तोपर्यंत प्रत्येक जण निर्दोष असतो. त्यामुळे तातडीने कुठलीही कारवाई न करता चौकशी समितीच्या अहवालानंतर निर्णय घेऊ. मात्र क्रिकेटपटू दोषी ठरल्यास कडक कारवाई केली जाईल,''असे श्रीनिवासन यांनी म्हटले. फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रवी सवानी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे. ही समिती बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीकडे अहवाल सादर करतील. त्यानंतर समिती कारवाई करेल. दरम्यान, चौकशी समितीने लवकरात लवकर आपला अहवाल सादर करावा, असे बीसीसीआयने सुचवले आहे.
प्रत्येक क्रिकेटपटूच्या हालचालींवर यापुढे बोर्डाचे लक्ष राहील. तो कुणाला भेटतो. तसेच कुणाच्या संपर्कात आहे, याची नोंद ठेवली जाईल. प्रत्येक क्रिकेटपटूने त्याच्या एजंटची नोंदणी बीसीसीआयकडे करावी, असा फतवाही बोर्डाने काढला आहे. ''प्रत्येक क्रिकेटपटूवर यापुढे नजर ठेवली जाईल. भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख बीसीसीआयला प्रत्येक क्रिकेटपटूचा अहवाल देतील. त्यानंतर बीसीसीआय योग्य ती कारवाई करेल. बुकींपासून दूर राहण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी पथकातर्फे क्रिकेटपटूंना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले जाईल,''असे बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांनी सांगितले. फिक्सिंगबाबत बीसीसीआयला आयसीसीकडून पूर्वसूचना देण्यात आली होती, या आरोपाचे खंडन केले. सदर स्पॉटफिक्सिंगबाबत आयसीसी किंवा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी पथकच नव्हे तर दिल्ली पोलिसांनीही आम्हाला कुठलीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयवरील निर्थक आहेत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
'फिक्सर' क्रिकेटपटूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत बीसीसीआय प्रयत्नशील होते. मात्र ते शक्य नसल्याचे बोर्डातर्फे सांगण्यात आले. ''बीसीसीआयला क्रिकेटपटूंविरुद्ध गुन्हा दाखल करता येत नाही, असा सल्ला आम्हाला देण्यात आला. कारण क्रिकेटपटू संघमालकांशी (फ्रँचायझी) करारबद्ध असतात. फ्रँचायझी क्रिकेटपटूंविरुद्ध गुन्हा दाखल करू शकते. आम्ही केवळ शिस्तपालन समितीच्या अहवालाप्रमाणे क्रिकेटपटूंवर कारवाई करू शकतो,''असे श्रीनिवासन म्हणाले. बीसीसीआयला माहितीच्या अधिकाराखाली आणल्यास बेटिंग आणि फिक्सिंग प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास मदत होईल, असे अनेकांचे मत आहे. मात्र बीसीसीआयने ही सूचना फेटाळली आहे. ''बीसीसीआय स्वायत्त संस्था आहे. आम्ही सरकारकडून कुठलाही निधी (फंड) घेत नाही. सरकारकडून निधी घेणा-या संस्था माहितीच्या अधिकाराखाली येतात. तीन 'फिक्सर' क्रिकेटपटूंना गैरमार्गाने पैसे मिळवायचे होते तर माहितीचा अधिकार त्यांना त्यापासून रोखू शकत नाही, असे श्रीनिवासन यांनी सांगितले.
बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या बैठकीला भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख सवानी यांच्यासह राजस्थान रॉयल्सचे सहमालक मनोज बदाले, आयपीएल गव्हर्निग कौन्सिलचे सदस्य रवी शास्त्री उपस्थित होते. बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचे प्रमुख अनिल कुंबळे यांनी 'व्हीडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे चर्चेत भाग घेतला.


बुकींना रोखण्यास बीसीसीआय हतबल! »


आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग रोखण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी आपली हतबलता व्यक्त केली.
राजस्थान रॉयल्स एफआयआर दाखल करणार
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीतर्फे मध्यमतेज गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतसह अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या 'फिक्सर' क्रिकेटपटूंवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. संघव्यवस्थापनातर्फे ही माहिती देण्यात आली. बीसीसीआय आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य देण्याची तयारीही संघ व्यवस्थापनाने दर्शवली आहे.
शास्त्री, कुंबळे चौकशी समितीत
बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रवी सवानी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीत माजी कसोटीपटू रवी शास्त्री आणि अनिल कुंबळेसह माजी पोलिस अधिकारी वाय. पी. सिंग यांचा समावेश आहे.
Read More »
गारवा देणारं इंटिरिअर

वाढत्या उन्हाळ्याला कसं तोंड द्यायचं, असा प्रश्न सध्या सर्वानाच पडला आहे. दुपारच्या वेळी घरात थांबणं उन्हाळ्यामुळे असह्य होत आहे. पण यावर पर्याय आहे. घराच्या अंतर्गत सजावटीत काही बदल करून उकाडा कमी करता येईल. यामध्ये घराचे पडदे बदलण्यापासून अनेक गोष्टींचा विचार करता येईल.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत आहे. वाढती सिमेंटची जंगलं, वृक्षतोड यामुळे उन्हाळा अधिक तीव्र बनू लागला आहे. दुपारच्या वेळी घरात बसणंसुद्धा अवघड बनू लागलंय. वाढता उकाडा नकोसा होऊ लागला आहे. अशा वेळी घराला थंड करण्यासाठी काही तरी उपाय करणं गरजेचं आहे. घराचं इंटिरिअर थोडंसं बदललं तर बराचसा फरक दिसून येईल आणि घरात गारवा जाणवेल.
त्यासाठी सर्वप्रथम घरातील गडद रंगाचे पडदे, कुशन कव्हर्स, बेडशीट्स काही काळापुरते काढून टाकावेत. या दिवसांत पडदे, कुशन कव्हर्स, बेडशीट्स यांसाठी गुलाबी, लेमन, पांढरा, फिरोजा, पोपटी, आकाशी, पीच यांसारखे फिकट रंग निवडावेत. यामुळे घराला खरोखरच एक शांत आणि गार वातावरणाचा अनुभव येईल. याचबरोबर फ्लोरल पिंट्रही या दिवसात खूप छान वाटतात. चादरी, सोफा कव्हरसाठी फ्लोरल पिंट्रचं कापड अवश्य वापरावं. घराचं प्रवेशद्वार खुलं असेल म्हणजे तिथे थोडी मोकळी जागा असेल तर तिथे खस (वाळा)ची ओली पट्टी लावता येऊ शकते. अशी पट्टी खिडकीवरही लावू शकता. यामुळे एक प्रकारचा गारवा आणि सुगंध घरात दरवळतो.
याबरोबरच सेंटर टेबलवर फ्लोरिंग फ्लॉवर्स एका आकर्षक बाऊलमध्ये ठेवावे. यामध्ये जब्रेरा, लिली याबरोबरच मोगरा, चाफा अशी सुगंधी फुलंही ठेवावीत. त्या पाण्यात वाळा टाकून ठेवावा. यामुळे एक प्रकारचं थंडगार आणि सुगंधी वातावरण तयार होईल. यासोबत एखाद् दुसरं हिरवंगार रोपटं घरात ठेवावं. हिरवा रंग या दिवसात डोळ्यांना गारवा देतो. शिवाय कुंडय़ा आत ठेवल्याने घरातील तापमानही कमी होण्यास मदत मिळते. शक्य असेल त्यांनी खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावावे. यामुळे तर नसर्गिक गारव्याची अनुभूती मिळते. हे पडदे थोडे महाग असतात, पण कुलर किंवा एअर कंडिशन लावून विजेची वाढीव बिलं भरण्यापेक्षा हा उपाय केव्हाही फायद्याचा आणि अधिक परिणामकारक ठरतो.
साधारणपणे खालच्या मजल्यांवर उकाडा कमी जाणवतो. पण वरचे मजले अधिक गरम होताना दिसतात. यासाठी 'फॉल्स सिलिंग' एक चांगला उपाय आहे. 'फॉल्स सिलिंग' करण्यापूर्वी त्यामध्ये थर्माकोल शीट्स लावावेत. यामुळे उष्णता कमी होते. कारण थर्माकोल उष्णता वाहून नेत नसल्यामुळे छत तापलं तरी त्याची फारशी झळ घरात जाणवत नाही. या व्यतिरिक्त निसर्गचित्र, पाण्याशी निगडित चित्र असलेले वॉलपेपरदेखील लावता येतील. हेदेखील खोलीला कूल लूक देतात. ड्रॉइंग रूममध्ये कृत्रिम फुलंही ठेवू शकता.
आणखी एक चांगला उपाय करता येऊ शकतो. अलीकडेच नासाच्या एका अहवालानुसार, शहरी भागात छतांना पांढरा रंग दिला तर त्यामुळे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत सोलार रेडिएशन (सूर्याच्या अतिनील किरणांचा किरणोत्सार) परावर्तित होऊन पुन्हा अवकाशात घेऊन जातो. शहरातील लोकांनी आपल्या घराची छतं पांढ-या रंगाने रंगवली तर ४ ते ५ अंश तापमान कमी होऊ शकतं आणि रात्रीचा पारा ७ ते १० अंश खाली येऊ शकतो. छतावर पांढरा रंग दिल्यानं वातावरणातील कार्बन डायऑक्साइडही कमी होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पांढ-या रंगामुळे सूर्याची किरणं परावर्तित होतात आणि उष्णता शोषली जात नाही.
ऑस्ट्रेलियात जी घरं पांढ-या किंवा हिरव्या रंगाने रंगवली जातात त्यांच्याकडून संपत्तीकर घेतला जात नाही. कारण त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत मिळते. थोडक्यात, छतावर पांढरा रंग देणं हा देखील उष्णता कमी करण्याचा आणि गारवा मिळवण्यासाठी उत्तम उपाय आहे. अशा प्रकारे निरनिराळ्या उपायांचा वापर करून उन्हाळ्याची तीव्रता कमी करता येईल आणि घर थंड ठेवता येईल.

Read More »

सहज नोकरीसाठी करिअरचे पर्याय?

नुकतीच सीईटीची परीक्षा झाली. हळूहळू बारावीचे निकालही लागतील. मग धावपळ सुरू होईल ती करिअरचे पर्याय निवडण्याची. आज करिअरचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की बरेचदा त्यामुळे गोंधळाची स्थिती उद्भवते. नुसती विज्ञान शाखा म्हटलं तरी त्यानंतर करिअर करण्यासाठी असंख्य मार्ग आहेत. पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबरच अलीकडील काळात डिप्लोमा कोर्स करण्याकडेही तरुणांचा ओढा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अशाच काही 'जॉबफ्रेंडली' पर्यायांची ओळख आपण करून घेणार आहोत. केवळ पदवी घेऊनच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात असे नाही. तर वेगवेगळ्या क्षेत्रांतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असतात. अनेकांना कौटुंबिक अडचणींमुळे अथवा प्राप्त परिस्थितीमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदवी घेणं शक्य नसतं. अशा उमेदवारांनी निराश न होता पदविका अभ्यासक्रमाचा पर्याय निवडावा आणि रोजगाराची संधी मिळवावी.
डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी
१०० दशलक्ष मेट्रिक टन दुग्ध उत्पादन करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. देशातील डेअरी इंडस्ट्री ही दूध देणा-या जनावरांची पैदास करणं, दूध देण्यासाठी त्यांना शारीरिकदृष्टया सक्षम करणं आणि दुधावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळी उत्पादनं मिळवणं याबाबतीत अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते. या क्षेत्रातून देशाला मोठया प्रमाणात परकीय चनलदेखील मिळतं. म्हणूनच या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तींना भरपूर मागणी आहे आणि पर्यायाने संधीही आहे.
डेअरी टेक्नॉलॉजी क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं असतं. या अभ्यासक्रमात डेअरी उत्पादनांवर प्रक्रिया कशी केली जाते आणि या संबंधीची यंत्रसामग्री कशी हाताळायची याबाबतचं कौशल्य शिकवलं जातं.
भारतातील प्रत्येक राज्यात डेअरी उत्पादनाचे कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांमध्ये उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी, साठवणूक करण्यासाठी, दुग्धजन्य पदार्थ पॅक करण्यासाठी तंत्रज्ञांची मोठी गरज भासते. म्हणूनच पदविका मिळवलेले उमेदवार अशा कारखान्यांमध्ये अथवा क्रीम युनिट्समध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करू शकतात. तसेच मिल्क टेस्टर, डेअरी प्लॅन्ट ऑपरेटर, क्वालिटी कंट्रोल असिस्टंट म्हणूनही रुजू होता येतं. याबरोबरच दुग्धजन्य पदार्थाचा स्वत:चा विक्री व्यवसायही सुरू करता येतो. या अभ्यासक्रमासाठी दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, दुधावर प्रक्रिया, उत्पादनाचे पॅकेजिंग आणि डेअरी उत्पादन असे विषय असतात.
डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम राबवणा-या प्रमुख संस्थांमध्ये कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स, अॅनिमल हजबंडरी, अॅझवाल, डेअरी सायन्स इन्स्टिटय़ूट बंगळूरु, अलाहाबाद अॅग्रिकल्चरल इन्स्टिटयूट अलाहाबाद या संस्थांचा समावेश होतो.
डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी
लॅब टेक्निशियन अर्थात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करायचं झाल्यास 'डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी' हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. कुठल्याही रुग्णाचे आयुष्य आणि डॉक्टरांचा व्यवसाय आजाराच्या योग्य निदानावर अवलंबून असतो. आजाराचे योग्य निदान करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट अशा तपासण्यांसाठी एम.डी. पॅथोलॉजिस्ट डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून काम करतात. गरजेनुसार रुग्णाचा तपासणी नमुना घेणे, त्यानंतर त्याच्या आवश्यक त्या तपासण्या करणे, तपासण्यांसाठी आवश्यक ती प्रक्रिया करणे या सर्व कामांचा समावेश यामध्ये असतो.
विज्ञान शाखेचा बारावी उत्तीर्ण झालेला उमेदवार या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. ब-याच महाविद्यालयांत पहिल्या दिवसापासूनच हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष अनुभव घ्यायला पाठवलं जातं. प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना हिस्टोपॅथोलॉजी, क्लिनिकल, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री यासारख्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवलं जातं. काही वेळेला विद्यार्थी ब्लडबँकेतसुद्धा काम करतात.
अलीकडच्या काळात वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञांची मागणी वाढली आहे. मोठमोठय़ा हॉस्पिटल्समध्ये पॅथोलॉजी क्षेत्रात अशा तंत्रज्ञांना मागणी दिसते. तसंच काही खासगी लॅबोरेटरीमध्येसुद्धा या तंत्रज्ञांची गरज असते. तसेच आउट पेशंट केअर सेंटर, ब्लडबँक, ऑर्गनबँक यांसारख्या ठिकाणीसुद्धा त्यांना काम करता येतं. या अभ्यासक्रमासाठी अॅनोटॉमी, ब्लडबँक, हिमॅटॉलॉजी, क्लिनिकल पॅथोलॉजी, क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथोलॉजी, सायटो टेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी हे विषय असतात. मणिपाल कॉलेज ऑफ अॅलायड हेल्थ सायन्स, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद, अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगढ, जादवपूर युनिव्हर्सिटी जादवपूर या काही प्रमुख संस्था आहेत.
डिप्लोमा इन जनरल
नर्सिग अण्ड मिडवायफरी
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. हा साडेतीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम असून हा अभ्यासक्रम राबविणा-या संस्था शालेय विज्ञानाच्या आधारावर प्रवेश परीक्षा घेतात. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हेल्थकेअर सेंटर, हॉस्पिटल्स, शाळा, रेड क्रॉस आणि प्रसूतिगृहांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. रुग्णाची अत्यंत सेवाभावी वृत्तीने काळजी घेणं आणि कुठल्याही अवघड दुखण्यातून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी त्याच्या मनाला उभारी देण्याचं महत्त्वाचं काम या व्यक्तींना करावं लागतं. त्यांच्या दैनंदिन कामामध्ये डॉक्टरांना साहाय्यक म्हणून मदत करणं, ताप, रक्तदाब बघणं, जखमांचं ड्रेसिंग करणं, रुग्णाला औषधं देणं इत्यादी कामांचा समावेश असतो. नर्स म्हणून काम करताना मनाने कणखर असणं गरजेचं असतं. त्याचसोबत आघात झालेल्या रुग्णांना, शस्त्रक्रिया झालेल्यांना हाताळण्याचं उत्तम कौशल्य अशा व्यक्तीकडे असणं गरजेचं असतं. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये १० ते २० हजार रुपये तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ३० हजारांपर्यंत वेतन असतं.
या अभ्यासक्रमासाठी फंडामेंटल ऑफ नर्सिग, फाम्रेकॉलॉजी, मिडवायफरी आणि कम्युनिटी नर्सिग हे वेगवेगळे विषय असतात. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मेंटल हेल्थ अॅँड निरो सायन्स (बंगळूरु), महर्षी मरकडेश्वर युनिव्हर्सिटी(अंबाला, हरयाणा), भारती विद्यापीठ, (पुणे), अविनाशीलिगम युनिव्हर्सिटी (कोईमतूर) या अभ्यासक्रम राबवणा-या प्रमुख संस्था आहेत.
(क्रमश:)

Read More »

गृहसजावटीसाठी स्टेन्सिल्स आर्ट

चार भिंतींचं असलं तरी ते 'घर' असतं. या भिंतींमुळे जगाच्या आणि आपल्यामध्ये एक कुंपण असतं. त्यामुळे 'आपलं जग' ठरवता येतं. कदाचित म्हणूनच लौकिकार्थाबरोबरच गृहसजावटीमध्येही भिंतींच्या सजावटीला अधिक प्राधान्य दिलं जात असावं. घराच्या भिंती रंगवण्यासाठी अलीकडे वेगवेगळे प्रयोग केले जातात. 'स्टेन्सिल्स आर्ट' हा त्यापैकीच एक. खोलीच्या स्वरूपानुसार एखाद्या भिंतीवर स्टेन्सिल्सचा वापर करून सुरेख पेंटिंग करता येतं. ही कला फारशी खर्चिक आणि वेळखाऊ नसल्याने सर्वसामान्यांनाही सहजपणे तिचा उपयोग करता येतो.
इंटिरिअर डेकोरेशन ही संकल्पनाच मुळात इतकी व्यापक आहे की, घरातील प्रत्येक भागाचा वेगवेगळ्या पद्धतीने आणि कल्पकतेने वापर करून घराचं सौंदर्य खुलवता येतं. त्यामुळेच भिंती, दरवाजे, खिडक्या, छत, फ्लोरिंग या सर्वामध्ये केले जाणारे बदल हे घराच्या सौंदर्याचं परिमाण ठरवत असतात. असं असलं तरी गृहसजावटीत महत्त्वाची ठरते ती भिंतींची सजावट. कारण घरात येणा-या प्रत्येक व्यक्तीची पहिली नजर ही भिंतींकडे जाते. या भिंतींच्या सौंदर्यावरून घराच्या एकूण रचनेची आणि तिथल्या वातावरणाची कल्पना येते. उदाहरणार्थ, घरातील भिंतींवर जर रेघोटय़ा ओढल्या असतील, शाई सांडली असेल तर घरात एखादं लहान मूल असल्याचं कळून येतं. घराच्या भिंतींना खूप भेगा पडल्या असतील, ओल आली असेल तर घराचं बांधकाम कच्चं असल्याचं निदर्शनास येतं. एकूण काय, तर भिंती म्हणजे घराचा आरसा असतात. त्यामुळेच वॉल डेकोरेशनला इंटिरिअरमध्ये बरंच महत्त्व आहे.
अलीकडे भिंती सजवण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. वेगळ्या रंगाचा वापर करून चार भिंतींपैकी एखादी भिंत उठावदार (हायलाइट) करण्याचा ट्रेण्ड सध्या जोरात आहे. नुसताच एक सलग रंग देण्यापेक्षा ती भिंत अधिक आकर्षक बनवण्यासाठी अलीकडे स्टेन्सिल्सचा वापर केला जातो.
'स्टेन्सिल्स आर्ट' ही अतिशय सुरेख आणि आकर्षक अशी भिंत सजवण्याची कला आहे. यामुळे खोली खूपच आकर्षक आणि सुरेख सजवलेली दिसते. स्टेन्सिल्समुळे घराची भिंत सुंदर आणि फारच प्रसन्न दिसू लागते. स्टेन्सिल्सने भिंत सजवणं ही कला फारशी अवघड नाही आणि फारशी खर्चिकही नाही. घरातील काही भिंती फारच अनाकर्षक दिसत असतात. स्टेन्सिल्स अशा छोटय़ा छोटय़ा जागांना जिवंतपणा देतात. स्टेन्सिल्स फारशा महागही नसतात. सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात यांची किंमत असते. तसंच फारसा पसारा न करता आणि अधिक रंगांचा वापर न करता भिंत आकर्षक रूपात सजवता येते.
यासाठी रंग आणि चित्राचा विषय प्रत्येकाच्या आवडीने निवडता येतो. म्हणूनच या कलेला 'लोककला' असंही म्हणतात. तसंच स्टेन्सिल्स आर्टचा वापर मुलांच्या खोलीत एखाद्या बोधकथेच्या रूपातही करता येतो. यासाठी गडद रंगांचा वापर करता येईल. त्यामुळे मुलांची खोली अधिक प्रसन्न आणि टवटवीत दिसू लागेल. बरेच जण रंगांबाबत जरा जास्तच वेगवेगळे प्रयोग करतात. त्यामागे फारसा कलात्मक विचार केला जात नाही. त्यामुळे भिंती आणि अंतिमत: खोली तितकीशी आकर्षक दिसत नाही. म्हणूनच आपल्या आवडीने रंगांची निवड करताना थोडा कलात्मकतेने विचार करणं खूप गरजेचं असतं. स्टेन्सिल्सची निवड करतानाही ती कोणत्या खोलीसाठी वापरणार आहे, याचा विचार करूनच करावी. त्याचबरोबर भिंतींचा रंग, खोलीतील फर्निचर यानुसार डिझाइनचा रंग निवडावा. स्टेन्सिलचा वापर करून एका विशिष्ट प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करता येते. त्यामुळे रंगसंगतीचं अचूक ज्ञान असणं यामध्ये आवश्यक ठरतं.
भिंतींवर स्टेन्सिल्सच्या सहाय्याने डिझाइन काढताना आजूबाजूच्या आणि भिंतीवरील सर्व वस्तू काढून टाकाव्यात. पेंटर वापरतात त्या टेपच्या सहाय्याने नेमक्या कोणत्या जागेवर डिझाइन करायचं, हे ठरवता येईल. नंतर रंगांची निवड करून स्टेन्सिलचं कार्ड घ्यावं. चाकूसारख्या तीक्ष्ण वस्तूने किंवा कटरने कार्डमधून स्टेन्सिल्स वेगळी करावी. नंतर ती भिंतीवर धरून स्पंज किंवा स्टेन्सिल्स ब्रशच्या सहाय्याने रंगकाम सुरू करावं. यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करता येतो. उदा. आर्टिस्टिक पेंट, ऑइल पेंट, हाउसहोल्ड लॅटेक्स पेंट.. इत्यादी. तुमच्या बजेटमध्ये जे बसेल त्याची निवड करा आणि पेंटिंगला सुरुवात करा. यासाठी तुमची कलात्मकता आणि निर्मितीक्षमता भरभरून वापरता येईल. रंग देताना नेमक्या आकारातच देण्याची काळजी घ्यावी. त्याबाहेर रंग जाऊ देऊ नये. एकाच भिंतीवर खूप जास्त रंगांचा वापर करू नये. यासाठी मिक्स अ‍ॅण्ड मॅचची थीम छान दिसते. स्टेन्सिल्समध्ये झाडाची फांदी आणि पक्षी, नाजूक फुलांचा सडा, एखादी नाजूक स्त्री प्रतिमा अशी कितीतरी डिझाइन्स उपलब्ध आहेत. भिंतींचा रंग बदलणार नसाल तर आहे, त्या रंगाला मॅच होणारा रंग निवडून स्टेन्सिलच्या सहाय्याने चित्र काढता येईल. स्वयंपाकघरासाठी वेगवेगळ्या भाज्या, फळे असे डिझाइन निवडता येईल. स्टेन्सिल्स भिंतीवर चिकटवण्यासाठी चांगल्या अ‍ॅडेसिव्हचा वापर करावा. तसेच स्टेन्सिल्सवर प्रोटेक्टिव्ह कोट लावावा. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं.
प्लेन रंगाने चार भिंती रंगवण्याचे दिवस आता संपले. त्याचबरोबर एक भिंत गडद करण्याचा ट्रेण्डही चलतीत असला तरी त्यात नावीन्य नाही. मग इंटिरिअर करताना नवं काय करायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळी आपल्यातील कल्पकता, आधुनिकता यांचा सुरेख संगम साधून स्टेन्सिल्सच्या मदतीने घराच्या भिंतींना एक आर्टिस्टिक लूक देऊन सजवता येईल. त्यामुळे घरात येणा-या प्रत्येकाचं लक्ष चटकन त्याकडे वेधलं जाईल.

Read More »

भूगोलाची भव्यता

भूगोल म्हणजे मानव, पर्यावरण यांचे परस्परसंबंध शोधणारे, जमीनरूप अभ्यासणारं, पृथ्वीवरील विविध घटकांचं वितरण करणारं आणि भौगोलिक राज्य किंवा भूराज्यशास्त्र आहे, असं म्हटलं तरी चालेल. त्यासाठी सखोल वाचनाचीही जोड हवी. योग्य संदर्भ-ग्रंथ पाहावेत. भूगोलाच्या अभ्यासातून नक्कीच चांगले गुण मिळतील.
अठरा मेची परीक्षा आता संपली आहे, पेपर कठीण होता, सोपा होता, सामान्य अध्ययन कठीण गेला, मेरिट अमूक लागेल.. असा गप्पांचा फड आता रंगला असेल. परीक्षेनंतर पाच दिवस तरी हा 'हँगओव्हर' राहतोच. पण हा झाला भूतकाळ.. भूतकाळ हातातून निसटलेला आहे. त्यावर चर्वितचर्वण करण्यात फार मजा नाही. आता आपण पूर्वपरीक्षेचा निकाल येण्याची वाट न पाहता मुख्य परीक्षेची तयारी म्हणून अभ्यासक्रमाची उजळणी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा एक कष्टप्रद नियम आहे तो म्हणजे अंतिम यादीत नाव येईपर्यंत थांबायचं नाही.. थांबला तो संपला.
भूगोल विषयाचा अभ्यासक्रम सुटसुटीत वाटत असला किंवा वरपांगी हा विषय सहजसाध्य, अर्थशास्त्रीय वाटत असला तरी त्याच्या भव्यतेचा अंदाज यायला हवा. भूगोल विषयाची तयारी त्याच्या व्याख्येपासूनच सुरू होते.
पृथ्वीतलावरील जमीन, लोक, त्यांचे राहणीमान, वसतिस्थान व इतर कार्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. इ. स. पू. २७६-१९४ कालखंडातील 'इरॅटोस्थेनीस'ने जीओग्राफी शब्द सर्वप्रथम वापरला. भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल ज्ञानशाखा शास्त्रीय स्वरूपाची आहे. पृथ्वीवरील आणि पृथ्वीच्या अंतरंगातील घडामोडींचा यामध्ये अभ्यास होतो. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या आधुनिक सिद्धांताचे श्रेय 'कोपर्निकस २'चे आहे. त्यानेच प्रथम सूर्यकेंद्री सिद्धांत मांडून पृथ्वीची भ्रमणकक्षा गोलाकार असल्याचे नमूद केलं. पुढे 'केप्लर' या शास्त्रज्ञाने कक्षा लंबवर्तुळाकार असल्याचं सिद्ध केलं. गेल्या अनेक वर्षाच्या संशोधनातून पृथ्वीचं वय ४५० कोटी आहे, असं मानलं आहे.
प्राकृतिक भूगोलात शीलावरण, जलावरण, वातावरण, भूआवरण इ. चा सामावेश होतो.
शीलावरण
भूखंड कवचाचा सर्वात जाड थर असून त्याची सरासरी जाडी ४० आहे. ग्रेनाइट, बेसाल्ट, शेल, वाळूचे खडक, चूनखडक, माती, ग्रॅव्हेल(खडे) इ.चं मिळून हे कवच तयार झालं आहे. कवचातील खडकांचे तीन प्रकार आहेत. खडकांची झीज, पृथ्वीच्या अंतरंगातील रचनात्मक घडामोडी याशिवाय खंडवहन या 'अल्फ्रेड वेगनेर' (१८८०-१९३०) च्या सिद्धांताप्रमाणे प्रकार पडले आहेत. पृथ्वीचं कवच अनेक तुकडयात विभाजित असून लवचिक आच्छादनावर तरंगत स्वत:चा तोल राखण्याचा प्रयत्न करते. शास्त्रज्ञांच्या मते, पाच कोटी वर्षानंतर अॅटलांटिकची रुंदी वाढत जाईल, लाल समुद्र रुंद होईल, पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया विषुववृत्ताच्या उत्तरेला येतील.
मित्रांनो, याचा अभ्यास इतका विस्तृत आहे की, एका वर्षातसुद्धा तो पूर्ण होणार नाही. पण हे सर्व वाचताना त्याच्या पायाभूत गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मग यावर प्रश्न असतो खंडवहन सिद्धांत कुणी मांडला? त्याचे स्वरूप काय आहे? पृथ्वीची त्रिज्या किती? इ.
जलावरण
पृथ्वीवरील एकूण पाण्याचे वस्तुमान किती आहे, सरासरी क्षारता किती आहे, याचा अभ्यास करावा. पृथ्वीचा दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापला आहे. म्हणूनच पृथ्वीला पाणीग्रह (वॉटर प्लॅनेट) असंही म्हटलं जातं. जलचक्रासाठी एकूणच पृथ्वीच्या सजीवांसाठी जलावरण महत्त्वाचं आहे.
वातावरण
पृथ्वीभोवतालच्या वायुरूप भागाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे वायू पृथ्वीलगतच आहेत. वातावरण अतिनील सूर्यकिरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करते. श्वसनासाठी व प्रकाश संश्लेषणासाठी उपयोगात येणा-या वायूला सामान्यपणे 'हवा' म्हणतात. मग या हवेतील इतर वायूंचे प्रमाण, त्याचे मानवाला असणारे फायदे, वाढते तापमान, त्यावरील कारणे व उपाय अशा स्वरूपात हा भाग अभ्यासावा. हवेतील नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड इ. च्या टक्केवारीचा अभ्यास करायला हवा. या वातावरणाचे शास्त्रज्ञांनी, थर्मोस्फिअर, मेसोफिअर, ट्रोपोस्फीअर, आयनोस्फीअर व एक्सोस्फेर भाग केले आहेत, त्याचाही अभ्यास करावा. ओझोन थर तप्तस्तब्धी (स्ट्रटोस्फीअर) मध्ये असतो. अशा प्रकारे प्रत्येक थराची व्यवस्थित माहिती घेतल्यावर अनेक प्रश्न सुटतात.
मानवी भूगोल
हा उपघटक महत्त्वाचा, यासाठी की प्राकृतिक भूगोलापेक्षा या घटकावर अधिक प्रश्न विचारले जातात. मानवी जीवनपद्धती व प्रक्रिया याद्वारे समाजाला आकार देणा-या घटकांचा उदा. मानवी, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक इ.चा सामावेश मानवी भूगोलात होतो. या ज्ञानशाखेचा मोठया प्रमाणावर विकास झाला आहे. या विषयावर स्वतंत्रपणे लिहिता येईल.
भारताचा भूगोल
परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करता विशेषत: यूपीएससी भारताच्या भूगोलामध्ये स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना, भारतातील हवामान, भारतातील मृदा, नैसर्गिक संपत्ती, नद्या, खनिज संपदा, खनिजसाठयाचे अवलोकन, इ. चा विशेष अभ्यास करावा. स्थान व विस्तार असा घटक केल्यास त्याबद्दल अधिक माहिती घ्यावी. उदा – स्थान व विस्तार – भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने (३२,८७,६६३) भारत सातव्या क्रमांकाचा देश आहे. गुजरातमधील घुअर मोटा ते अरुणाचल प्रदेशातील किबियू गाव या ठिकाणच्या सूर्योदयाच्या वेळेत ११६ मिनिटांचा फरक आहे. भारताची सीमा १५,२०० आणि सागरी सीमा ७,५१७ किमी आहे. या प्राथमिक माहितीचाही नीट अभ्यास करावा.
प्राकृतिक रचनेच्या घटकात उत्तरेकडील मैदानी प्रदेश ते बेटे असा पाच उपघटकांचा उल्लेख यापूर्वी आला आहेच. बेटांचा विचार करता भारताच्या तटवर्ती भागात २४७ बेटं असून बंगालच्या उपसागरात २०४ बेटं आहेत.
भारतातील मृदा
भारतीय कृषी संशोधन संस्थेने भारतीय मृदेची आठ प्रकारांत विभागणी केली आहे. जलोढ मृदा -शेतीसाठी सर्वाधिक उपयोगी, भाबर(जुनी), खादर (नवी). यामध्ये गहू, ऊस, भाजीपाला इ. पिकंही होतात. लवणयुक्त अल्क मृदेस 'रेह', 'कलहर', 'डसर' असं म्हणतात.
भारतातील नद्या
नद्यांचा अभ्यास करताना नदीचं उगमस्थान, लांबी, खो-याचं क्षेत्रफळ, उपनद्या, काठावरील शहरं, कोणत्या राज्यातून वाहते? असा सगळ्यांचा विचार करावा. यासाठी नकाशाची मदत घ्यावी. केवळ पाठांतराने या गोष्टी होत नाहीत. उदा. गंगा – उगमस्थान – अलकनंदा, ७८०० व ६६०० मी. उंचीवर २ प्रवाहात, लांबी – २५२६ किमी., क्षेत्रफळ – ८६१४०४ चौ. किमी – यमुना, रामगंगा, मंडक, कोसी, घाग्रा, गोमती या उपनद्या, अलाहाबाद, पाटणा, महत्त्वाची काठावरील शहरे व नदीचा तेथील लोकजीवनावर होणारा परिणाम असा विचार व्हावा. याप्रमाणे सिंधू, झेलम, रावी, यमुना, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, तापी, नर्मदा, कावेरी, महानदी, सुवर्णरेखा या नद्यांचा अभ्यास करावा.
देशातील, राज्यातील महत्त्वाचे धबधबे, त्यांची उंची, जिल्हे यांचाही विचार करावा.
खनिज संपत्तीचे वितरण, त्याचे साठे, त्यापासून मिळणारे उपपदार्थ उद्योगनिर्मितीसाठी योगदान असा अभ्यास करावा. आपल्या देशात ८४ प्रकारची खनिजं उत्पादित होतात. त्याचे देशातील व राज्यातील वितरण पाहावे.
प्राकृतिक भूगोलचा अभ्यास पुरेपूर नेमका करता येतो. विविध हवामान प्रदेश उदा. टुंड्रा प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, समशितोष्ण प्रदेश, त्याचे पर्जन्य, हवामान, वनस्पती व विविध मानवी आदिम वन्यजाती याचा उल्लेख व्हावा.
भारतीय भूगोलशास्त्राचा आढावा करताना सोयीसाठी पुन्हा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक असे टप्पे पाडता येतात. प्राचीन काळातील मौर्यापूर्वीचा कालखंड, चारही वेद कालखंडात वसिष्ठ व बोधायणची धर्मसूत्रं, पाणिनीचे व्याकरण, भागवतपुराण यासारख्या ग्रंथात भूगोलाचे उल्लेख आढळतात. बौद्ध ग्रंथांमधून भारतीय प्रदेशाची माहिती मिळते. कल्हनाच्या 'रजतरंगिणी'मध्ये स्थलवर्णनं आढळतात. मध्ययुगीन काळात प्रवासवर्णनांमधून स्थळवर्णनं आली आहेत. आधुनिक काळातील भूगोलावर पाश्चिमात्य छाप आहे. पद्धतशीरपणे अभ्यास याच काळात झाला. ब्रिटिश शासनकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी गॅझेट व इंपिरिअल निर्माण झाले. भूगोलाचे विश्व अधिक व्यापक झाले.
स्वातंत्र्योत्तर काळात १९६८ साली दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषद भरवण्यात आली. देशभरातून व राज्यातून भूगोल विषयाला वाहिलेली मासिकं निर्माण झाली. विद्यापीठ पातळीवर मोठया प्रमाणात संशोधन सुरू झालं. विज्ञानाप्रमाणेच भूगोलाला महत्त्व आहे. पर्यावरणीय प्रश्न व भूगोल यांचा तर अत्यंत जवळचा संबंध असल्यामुळे भूगोलाला मिळणारी मान्यता दिवसेंदिवस वाढतच आहे.
त्यामुळे भूगोल म्हणजे मानव, पर्यावरण यांचे परस्परसंबंध शोधणारे शास्त्र, भूगोल म्हणजे जमीनरूप अभ्यासणारे शास्त्र, पृथ्वीवरील विविध घटकांचे वितरण करणारे शास्त्र आणि भौगोलिक राज्यशास्त्र किंवा भूराज्यशास्त्र, असा विचार मॅकिंडर व माहॅन यांनी केला आहे. अशा प्रकारे भूगोलाची व्याप्ती, भव्यता याचा अंदाज वरवर येत नाही. त्यासाठी सखोल वाचनाचीही जोड हवी. योग्य संदर्भग्रंथ पाहावेत. भूगोल नक्कीच आवडेल व गुणही देईल.
(क्रमश:)

Read More »

अभियंता महासंघाचे 'कथाकथन'

सरकारी आणि निमसरकारी आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या 'सुरस आणि सरस' कथा आपण नेहमीच ऐकत व वाचत असतो. चित्रपटातील भ्रष्टाचाराची दृश्ये व त्यातील आकडे फिके व सपक वाटावेत, असे एकाहून एक वरचढ किस्से आपल्या अवतीभोवती प्रत्यक्षही घडत आहेत व त्या किश्शांनी आपले डोके अक्षरश: भणाणून जात आहे.
सरकारी आणि निमसरकारी आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या 'सुरस आणि सरस' कथा आपण नेहमीच ऐकत व वाचत असतो. चित्रपटातील भ्रष्टाचाराची दृश्ये व त्यातील आकडे फिके व सपक वाटावेत, असे एकाहून एक वरचढ किस्से आपल्या अवतीभोवती प्रत्यक्षही घडत आहेत व त्या किश्शांनी आपले डोके अक्षरश: भणाणून जात आहे. भ्रष्टाचाराचे एकूण प्रमाण व त्यातील आकडेवारी ऐकून अनेक वेळा ती अविश्वसनीय वाटावी. एखादा लाचखोर अधिकारी लाच घेताना सापडला तर त्याच्या घरावर, लाचेच्या पैशातून त्याने घेतलेल्या मालमत्तांवर आणि बँक लॉकर्सवर घाडी टाकल्या जातात व तब्बल आठवडय़ापेक्षा जास्त दिवस त्याच्या मालमत्तेची मोजदाद सुरू असते. सरकारी अधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या कथा ऐकून व अनुभवून सामान्य माणसांचे मत बहुसंख्य सरकारी कर्मचारी हे लाचखोर आहेत, असेच असते व तसे ते असल्यास नवल नाही. नुकत्याच झालेल्या भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमुळे देश व महाराष्ट्र हादरला आणि सर्वत्र खळबळ उडाली. त्यापैकी एक प्रकरण रेल्वे बोर्डाचे सदस्य महेश कुमार यांचे. त्यांनी बोर्डाच्या विशिष्ट विभागाचे सदस्यत्व मिळावे म्हणून माजी रेल्वेमंत्री बन्सल यांचा भाचा विजय सिंगला याला ९० लाख रुपये लाच दिल्याचे प्रकरण आहे.या 'दुभती गाय' ठरणा-या पदासाठी महेश कुमार यांनी एकूण १० कोटी रुपये देऊ केले होते. भाच्याच्या या प्रकरणामुळे बन्सल यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. दुसरे प्रकरण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नाशिक विभागातील अभियंता सतीश चिखलीकर याच्या लाचखोरीचे आहे. त्याला एका कंत्राटदाराकडून लाच घेताना अटक केल्यानंतर त्याच्या घरावर आणि ठिकठिकाणच्या मालमत्तेवर घाडी टाकल्या तेव्हा त्याच्याकडे कोटय़वधी रुपयांची मालमत्ता आढळली. त्याच्या पत्नीच्या लॉकरमघ्ये तब्बल ९ किलो सोने सापडले व लेकांना कळून चुकले की, हे तर सोनेरी दिवसांचे आणि सोनेरी लॉकरचे सोबती आहेत. लाचलुचपत खात्याचे अधिकारी किंवा प्राप्तिकर खात्याचे अधिकारी जेव्हा अशा लॉकर्सवर घाडी टाकतात तेव्हा ते अलीबाबाचे लॉकर्सच असतात. बिचा-या अलीबाबाच्या काळी लॉकरची सोय नसल्याने त्याला सर्व काही घरातच लपवून ठेवावे लागले होते. पण आता सर्व कायदेशीर व बेकायदेशीर सोने व जडजवाहीर ठेवण्यासाठी बँकांचे लॉकर उपलब्ध असतात. बँक तुम्हाला विचारत नाही की, तुम्ही जे ठेवताय ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे, चोरून आणले आहे की मारून आणले आहे? चिखलीकर या अभियंत्याला पकडण्यात आले त्यावेळी त्याच्याच खात्यातील जगदीश वाघ नावाच्या दुस-या एका अभियंत्यालाही लाचखोरीबद्दल अटक करण्यात आली. त्याच्याकडेही लाखे रुपयांची मालमत्ता सापडली. सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने तो खूपच चच्रेचा विषय बनला. तसेच आणखी काही अभियंते लाचलुचपतविरोधी खात्याच्या रडारवर अशा बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्याने अभियंते आणि त्यांच्या संघटना चांगल्याच अस्वस्थ झाल्या व मग खुलासे करणे आले. भ्रष्टाचाराबाबत खुलासा करण्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेतली. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंतेच आपल्या नातलगांच्या नावाने कंपन्या स्थापन करून कंत्राटे घेत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्याने महासंघाने 'सर्वांना एकाच मापाने मोजू नका' असे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. मात्र खुलाशांचे 'कथाकथन' करण्यासाठी घेतलेली परिषद महासंघाच्याच अंगलट आली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरे देता देता पदाधिका-यांची त्रेधातिरपिट उडाली व पत्रकार परिषद नको, पण प्रश्न आवरा, अशी त्यांची स्थिती झाली. या पत्रकार परिषदेत अभियंता महासंघाच्या पदाधिका-यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम खात्यातील काही लोकांनी भ्रष्टाचार केला म्हणून सर्व खातेच भ्रष्ट ठरत नाही. खात्यात चांगले काम करणारे अभियंतेही आहेत. पण अशा बातम्यांमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. पण असे मानसिक खच्चीकरण होण्याचे कारण काय? कारण या चांगल्या अभियंत्यांविरुद्ध वा अधिका-यांविरुद्ध कुणीही काहीही लिहिलेले नाही. त्यांच्यावर कधी कारवाई होण्याचा प्रसंग आलेला नाही. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे, जे भ्रष्टाचारात सापडलेले आहेत त्यांच्या विरुद्धच लिहिले जाते. जे चांगले काम करतात, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असोत, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर गौरवपूर्ण लिहितात व लोक वाचतात. जे अधिकारी व कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे करतात, लाच घेत नाहीत त्यांच्याविरुद्ध वाईट लिहिण्याचा प्रश्नच येत नाहीत. आता कुणी म्हणेल, त्यांच्यावर कुठे चांगले लिहिले जाते. पण तोही प्रश्न नाही. कारण अमुक अधिकारी चांगला आहे, तो कुणाकडून लाच घेत नाही, असे मुद्दाम लिहिण्याची पद्धतच नाही. अशी प्रामाणिक अधिका-यांची यादी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली तर त्या खात्यातील इतर सगळे अधिकारी आपोआप भ्रष्ट ठरतील. हे अभियंता महासंघ व अन्य संघटनांना चालेल का? सरकारमधील जे कर्मचारी-अधिकारी प्रामाणिकपणे, कार्यक्षमतेने काम करतात त्यांनी तसे करावे, अशी प्रशासनाची व लोकांची अपेक्षाच असतेमुळी. भारतातील ब्रिटिश राजवटीत एका ब्रिटिश अधिका-याला लाच खाण्याची मोठी संधी चालून आली असता त्याने लाच न घेता प्रामाणिकपणा दाखविला. त्याबद्दल त्याची प्रशंसा करणारे पत्र या अधिका-याच्या वरिष्ठाने आपल्या वरिष्ठ अधिका-याला पाठवले. तेव्हा या वरिष्ठ अधिका-याने हे प्रशंसापर पत्र पाठवणा-या अधिका-याची खरमरीत कानउघाडणी केली की, 'लाच न घेणा-या अधिका-याची ही प्रशंसा तू का करतो आहेस? त्याने लाच न घेणेच अपेक्षित आहे. त्याची प्रशंसा करण्यासारखे त्याने काही केलेले नाही.' याचा अर्थच असा की, प्रामाणिकपणाच सर्वाकडून अपेक्षित आहे. हा, आजच्या काळात लाचखोरी व भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की, यातून जे कोणी लाच न घेणारे असतील तर त्यांचा गौरवच केला पाहिजे. गंमत अशी की, या पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी पदाधिका-यांना खात्यातील प्रामाणिक अधिका-यांची नावे सांगा, असे सांगितले असता त्यांना केवळ पाच नावे सांगता आली. असे अधिकारी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असल्याने त्यांचा गौरव करणे, फार सोपेच जाणार आहे. पण अशा प्रामाणिक अधिका-यांची खात्यातील इतर 'क्रिमी लेअर'वाले किंवा मालामाल झालेले अधिकारी काय पत्रास ठेवतात व या प्रामाणिक अधिका-यांची त्यांना काय अडचण होते, हे अधिकारी संघटना सांगतील का? अभियंता महासंघाच्या या पत्रकार परिषदेत पदाधिका-यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना षटकार ठोकला. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंतेच आपल्याच नातेवाईकांच्या नावाने कंपन्या चालू करून त्यांनाच कंत्राटे देतात त्याचे काय, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पदाधिका-यांनी सांगितले की, 'अधिका-यांच्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या असल्या तरी देशातील प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. नियमावलीत नातेवाईकाने व्यवसाय करू नये, असे कुठे म्हटलेले नाही. फक्त अधिका-याने त्याला मदत करू नये एवढेच म्हटले आहे.' बरोबर आहे आणि हा अधिकारी आपल्या नातेवाईकाला मदत करतो आहे किंवा त्याने केली आहे, हे सिद्ध करणे कठीणच असते. अभियंत्यांच्या महासंघाचा 'कथाकथना'चा कार्यक्रम पार पाडला खरा. पण, पत्रकाररूपी श्रोत्यांनी मात्र, ऐकण्याऐवजी ऐकवण्याचेच काम केले. त्यामुळे या पुढे असे 'कथाकथाना'चे कार्यक्रम आयोजित करताना आपल्या पुढचे श्रोते हे पत्रकार आहेत, ते फक्त माना डोकावणार नाहीत, याचे भान या पुढे ठेवावे आणि मगच पत्रकार परिषदेचे आयोजन करावे.


क्रिकेटचे मारेकरी


क्रिकेट हा आता जंटलमन लोकांचा खेळ राहिला नाही, हे आतापर्यंत या खेळात घुसलेल्या अपप्रवृत्तींमुळे दिसून आले आहे. पैसा आणि प्रसिद्धी त्याचबरोबर फिक्सिंगचा मोहही जोडला गेला आहे. या मोहाला बळी पडणा-या आणि क्रिकेटला भारतीयांच्या मनातून संपवण्याचा विडा उचललेल्या मारेक-यांची संख्या मात्र हळूहळू वाढू लागली आहे.
Read More »
'विषयांची निवडही महत्त्वाची'

यूपीएससी या परीक्षेची तयारी करतानाच आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल होत जातात. परीक्षा प्रक्रियेत आत्मविश्वास वाढतो, मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. परीक्षेच्या तीनही टप्प्यांमध्ये आपल्यातील विविध कौशल्ये तपासली जातात. त्यामुळे त्याचाही फायदा होतोच. एकूणच या परीक्षेच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक विकासही होत जातो. त्याचा फायदा आपल्याला जीवनातील विविध आव्हाने पेलताना होतो.
प्रशासकीय सेवेत भरती व्हायचं, हे कधी आणि का ठरवलं?
खरंतर मी आधीपासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याचं ठरवलं होतं. पदाचा योग्य वापर करून समाजासाठी काम करण्याची ही एक उत्तम संधी असते. सामाजिक कार्याची मला आवड होती. त्यामुळेच या क्षेत्रात जाण्याचं पक्कं केलं.
या परीक्षेसाठीची तयारी कशी केली?
मी इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर ख-या अर्थाने मी यूपीएससीसाठीची तयारी सुरू केली. इतिहास आणि राज्यशास्त्र असे माझे विषय होते. त्यामुळे अभ्यास थोडा सोपा झाला. मागील चार-पाच वर्षे मी या परीक्षेसाठी तयारी करत होती. वेळेचे नियोजनही महत्त्वाचे होते त्यामुळे १२ ते १५ तास अभ्यास केला.
घरच्यांकडून पाठिंबा आणि सहकार्य कसे मिळाले?
घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. चार ते पाच वर्षे केवळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी द्यायचे ठरवल्यानंतर याबाबत घरच्यांनीही विश्वास दाखवून पाठिंबा दिला. मानसिक बळ दिले. मित्र-मैत्रिणींनीही मोलाची मदत केली.
यूपीएससी परीक्षेच्या एकूण प्रक्रियेविषयी काय मत आहे?
ही परीक्षा खरोखरच तुमच्या मनाची कसोटी पाहणारी असते. यातही मुलाखतीपेक्षा मला मुख्य परीक्षा कठीण वाटते. कारण मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा असते. या क्षेत्रात येणा-या विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची गरज असते. परीक्षेच्या तीनही टप्प्यांमध्ये तुमची बरीच कौशल्ये तपासली जातात. योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वासामुळे मुलाखत कठीण वाटत नाही. या परीक्षेचा अभ्यास करतानाच आपल्या विचार व व्यक्तिमत्त्वात बदल होत जातात.
परीक्षेची तयारी करताना कोणती एक चूक आहे, जी इतरांनी टाळावी असे तुला वाटते?
विषय किंवा मार्गदर्शनाची निवड काळजीपूर्वक करावी. चुकीच्या मागदर्शनामुळे चुकीच्या पद्धतीने तयारी केली जाते. त्यामुळे वेळ वाया जातो. जोपर्यंत आपली पूर्ण तयारी झाली आहे असे वाटत नाही, तोपर्यंत परीक्षेला बसू नये. कारण त्यामुळे संधी वाया जातात. खुल्या वर्गातून या परीक्षेला बसणा-यांनी याची विशेष खबरदारी घ्यावी.

Read More »

'एमडीए'चे स्वप्नरंजन

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना देवेंद्र फडणवीस यांनी 'एमडीए'चा प्रयोग करण्याची घोषणा केली. नवीन पदभार स्वीकारल्यानंतर नवीन घोषणा करणे स्वाभाविक आहे. परंतु सरकार विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधणे फडणवीस यांना शक्य होणार आहे काय? शिवसेना-भाजप नंतरचा सध्याचा राज्यातील मोठा पक्ष असलेल्या मनसेने कधीच टाळी देण्याचे टाळले आहे. रिपब्लिकन पक्षांचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अवाच्या सव्वा जागा मागून महायुतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. इतर पक्ष शिवसेना-भाजपला जातीयवादी समजत असल्याने जवळ येण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत 'एमडीए'ची घोषणा म्हणजे एक स्वप्नरंजनच ठरण्याची चिन्हे आहेत.
देशात लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-नगारे वाजू लागले आहेत. त्यानंतर काही काळातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचेही सनई-चौघडे झडू लागतील. अशा पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे या दोघांच्याही संमतीने फडणवीस यांच्या गळय़ात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांच्या झालेल्या भव्य मेळाव्यात फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. भाषण अगदी जोषपूर्ण झाले. पक्षात गटबाजी खपवून घेणार नाही, पक्षापेक्षा कुणी मोठे समजू नये, वगैरे प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांना जो काही डोस दिला जातो, तो फडणवीस यांनी व्यवस्थित दिला. त्यानंतर त्यांनी राज्यात जर सत्ता आणायची असेल तर सरकारविरोधात राज्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे, असे सांगताना त्यांनी केंद्रात जशी 'एनडीए' आहे, तशी महाराष्ट्रात 'एमडीए' करण्याची घोषणा केली. फडणवीस यांच्या वैयक्तिक क्षमतेबद्दल कुणालाही शंका घेण्याचे कारण नाही. एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. राज्यातील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. मात्र सर्वसामान्य तळागाळातील जनतेशी नाळ असलेला नेता म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. अत्यंत योग्य वयात त्यांना संधी मिळालेली असून ते प्रामाणिकपणे प्रयत्नही करतील, यात शंका नाही. मात्र त्यांनी 'एमडीए'चा प्रयोग करण्याची जी घोषणा केली आहे ती सत्यात कशी उतरणार, हा खरा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात सलग तिस-यांदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राजकारभार चालवत आहेत. केंद्रात ज्याप्रमाणे सर्व विरोधी पक्षांनी मिळून 'एनडीए' (नॅशनल डेमॉक्रेटिक अलाइन्स) स्थापना केली त्या पार्श्वभूमीवर राज्यात एमडीए (महाराष्ट्र डेमॉक्रेटिक अलाइन्स) स्थापन करण्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. परंतु अशा अलाइन्सला महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पोषक आहे काय, हा खरा प्रश्न आहे. शिवसेना-भाजपची महाराष्ट्रात पंचवीस वर्षाची युती आहे. या पंचवीस वर्षात युतीला तिसरा पक्ष जोडणेसुद्धा शक्य झालेले नाही. मागील लोकसभा निवडणुकीत तोंडावर आपटल्यानंतर रामदास आठवले आपली वैचारिक भूमिका गुंडाळून ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीच्या वळचणीला गेले. परंतु त्याचा फायदा ना युतीला झाला ना रिपब्लिकन पक्षाला झाला. मुंबई महापालिकेत आठवलेंना पूर्वीपेक्षा आपली एकही जागा वाढवता आलेली नाही. या अडीच-तीन वर्षाच्या काळात आठवलेंनी एकच केले. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला इमानेइतबारे हजेरी लावत आपले फोटो छापून आणले. याच्या पलीकडे त्यांच्या हाती काही लागले नाही. भविष्यात तसे लागण्याची शक्यता नाही. कारण शिवसेना-भाजपसोबत रिपब्लिकन पक्षाची नैसर्गिक युतीच होऊ शकत नाही. नेते जरी मांडीला मांडी लावून व्यासपीठावर बसले तरी कार्यकर्त्यांची मने एकरूप होणे अवघड आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून रिपब्लिकन जनतेचा त्यांच्याशी संघर्ष सुरू आहे. मग तो नामांतरांचा लढा असेल नाही तर आरक्षणाचा लढा असेल. जातीय आरक्षणाला असलेला विरोध शिवसेनेने कधी लपवलेला नाही. अगदी शिवसेनाप्रमुखांनी आपल्या अखेरच्या काळातसुद्धा इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देण्यास विरोध केला होता. याकडे आठवले कानाडोळा करीत असले तरी आंबेडकरी जनता हे विसरणे शक्य नाही. तीच गत शिवसैनिकांचीही आहे. ज्यांच्यासोबत जन्मभर संघर्ष केला त्यांचा प्रचार करण्यास आणि त्यांच्यासाठी मतदारांना मतदानासाठी घेऊन जाण्यास शिवसैनिक कधीही राजी होणार नाहीत. अशा वेळी मग त्यांना आधी आपल्यासोबत असलेला मनसेचाच उमेदवार जवळचा वाटतो.
महायुतीला आंबेडकरी जनतेचा अथवा युतीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा काही फायदा होण्याची कोणतीही चिन्हे नसताना नेते मात्र प्रेमाच्या आणा-भाका घेत आहेत. अर्थात हे प्रेम लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकेल का, याबद्दलही शंका घेतली जात आहे. कारण रामदास आठवले यांनी युतीकडे मोठय़ा जागांची मागणी केली आहे. आता या जागा युतीमधील कुणाच्या वाटय़ातून द्यायच्या, हा खरा प्रश्न शिवसेना-भाजपच्या समोर आहे. आठवले आपल्याला किती वाटा मिळणार, हे जाणून घेण्यासाठी उतावीळ झालेले असले तरी शिवसेना-भाजपकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. म्हणून आठवले यांनी दबावतंत्राचा वापर करीत आपल्या सभांचा सपाटा लावला, तेव्हा शिवसेना-भाजपमध्ये अस्वस्थता पसरली. म्हणूनच महायुतीच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने 'मातोश्री'वर धाव घेतली. लगोलग युतीच्या पुढील वाटाघाटीसाठी समन्वय समितीही स्थापन करण्यात आली.
जिथे महायुतीचे वांदे आहेत, तिथे महाराष्ट्र डेमॉक्रेटिक अलायन्स कसे व्हावे. मनसेला सोबत घेण्यास भाजप कधीपासून उतावीळ झालेला आहे. मात्र सुरुवातीला शिवसेनेने त्याला करडा विरोध केला होता. अगदी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या प्रदेश कार्यालयात जाऊन चहा घेऊन आले तेव्हाही शिवसेनेने आदळ-आपट केली होती. मात्र सत्तेची गोड फळे चाखायची असतील तर मनसेला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे वाटू लागल्याने शिवसेनेनेही आता मनसे बाबत मवाळ भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टाळीसाठी हात पुढे केला होता. मात्र ही टाळी काही वाजली नाही. उलट टाळीचा प्रस्ताव धुडकावून लावत राज ठाकरे यांनी स्वत:ची ताकद आजमावण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या दौ-यात ठिकठिकाणी त्यांच्या सभांना चांगली गर्दी झाली. तरुणांचा इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना शिवसेना-भाजपचे लोढणे गळय़ात अडकवून घोटाळण्यापेक्षा आपली स्वत: घोडदौड सुरू ठेवण्यात राज ठाकरे यांना अधिक रस वाटत असावा. म्हणूनच 'एमडीए'मध्ये येण्यास मनसे राजी होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. इतर सर्व डावे पक्ष शिवसेना-भाजपला अगोदरच जातीयवादी समजत असल्याने ते सोबत येणे केवळ अशक्य आहेत. अशा वेळी फडणवीस यांच्या मनातील 'एमडीए' कसा साकार होणार हा खरा प्रश्न आहे.


बँकिंग क्षेत्रातील काळा पैसा


काही व्यापारी-उद्योजक आपले व्यवहार एकाच वेळी अनेक बँकांतून करून सरकारला चकवा देत असतात. वास्तविक, कोणाच्याही खात्यातील उलाढालीविषयी संशय आल्यास बँक त्या सगळ्याच व्यवहाराचा छडा लावू शकते. पण बँका या भानगडीत पडत नाहीत. कारण त्यामुळे व्यवसाय कमी होणार असतो.
Read More »
साहसवीरांच्या मुठीत एव्हरेस्ट

माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील या शिखराची उंची सुमारे ८,८४८ मीटर म्हणजेच तब्बल २९ हजार २९ फुट इतकी आहे. हे शिखर नेपाळ आणि चीन या देशांच्या सीमेजवळ आहे. जगातील सर्वात उंच शिखर असल्यामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील गिर्यारोहकांचे हे शिखर सर करण्याचे स्वप्न असते. पण हे आव्हान तितकेसे सोपे नाही. १९३५मध्ये न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा नोग्रे यांनी एव्हररेस्टवर पहिली चढाई केली. यानंतरच्या काळात आजवर एव्हरेस्टवर साडे तीन हजारांहून अधिक चढाया झाल्या आहेत. मात्र अतिउंचीच्या त्रासामुळे तसेच खराब हवामानामुळे या चढायांदरम्यान अनेक गिर्यारोहक मृत्युमुखीही पडले आहेत. १९९६मध्ये झालेल्या चढाईमध्ये १५ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी याची नोंद इतिहासात आहे. थोडक्यात, हे आव्हान केवळ कठीणच नाही तर जीवावर बेतणारेही ठरू शकते. परंतु, साद घालणारी गिरीशिखरे खुणावणा-या गिर्यारोहकांना त्याची तमा नसते. या साहसवीरांना अर्जुनाप्रमाणेच दिसत असते ते फक्त एव्हरेस्टचे शिखर आणि काहीही करून ते सर करायचेच, असा त्यांचा दृढनिश्चय असतो. या गिरीराजावरील मोहिमांसाठी मे महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो. कारण या काळात थंडी कमी झाल्यामुळे हवामान अनुकूल असते. गेल्या काही वर्षात एव्हरेस्टवरील चढायांमध्ये महिलांचीही संख्या वाढली आहे. नुकतीच सौदी अरेबियातील राहा मोहराक या महिलेने हे दिव्य पार केले. या दिवशी तब्बल ६४ गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले. यामध्ये ३५ परदेशी गिर्यारोहकांचा समावेश होता. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील चंदा गोयान हिनेही नुकतेच हे शिखर यशस्वीपणे सर केले. माऊंट एव्हरेस्ट सर करणारी ३० वर्षीय चंदा ही पश्चिम बंगालमधील तिसरी महिला ठरली. ती हावडाची रहिवाशी आहे. यापूर्वी १९९४मध्ये कुंगा भुतिया हिने आणि २००४मध्ये लष्करातील निवृत्त मेजर शिप्रा मजुमदार हिने हे शिखर सर केले होते. एकूणच, एव्हरेस्ट सर करणा-यांची संख्या गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे. पण गिर्यारोहकांच्या या वाढत्या स्वा-यांमुळे एव्हरेस्टच्या पर्वतकडय़ांवर कचराही साचू लागला आहे. गेली अनेक दशके येथे साचलेला कचरा परत आणण्याचे कामही यापैकी अनेक साहसवीर करत आहेत. यातील काहींनी या मोहिमांदरम्यान कचरा कमी होण्यासाठीचे काही उपायही सुचवले आहेत. यामध्ये सौरऊर्जेवर चालणारे कुकर वापरणे, प्रकाशनिर्मितीसाठी सौरऊर्जेचा वापर, पाणी शुद्ध करताना उकळण्याऐवजी अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा वापर करणे तसेच मनुष्यनिर्मित कचरा परत आणण्यासाठी थैल्यांचा वापर करणे यांसारखे उपाय सर्वच गिर्यारोहकांना सक्तीचे केले जाणे आवश्यक आहे. कारण, देवाचे वसतीस्थान मानली गेलेली ही पवित्र भूमी स्वच्छ राखणे आणि करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच केवळ एव्हरेस्टच नव्हे तर इतिहासाचे साक्षीदार असणारे सर्वच दुर्ग अशा प्रकारे स्वच्छ राखणे, ही सर्व पर्यटकांची, साहसवीरांची आणि गिर्यारोहकांची प्रथम जबाबदारी असायला हवी.

Read More »

रांगेच्या त्रासातून प्रवाशांची सुटका

मध्य रेल्वेच्या जनसाधारण तिकीट बुकिंग सेवेमुळे प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.

मुंबई- मध्य रेल्वेच्या जनसाधारण तिकीट बुकिंग सेवेमुळे प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. या सेवेमुळे तिकीट खिडक्यांची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांना आता तिकिटासाठी जास्त वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकात सुरू झालेल्या जनसाधारण तिकीट बुकींगला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेवेतून दिवसाला जवळपास अडीच लाख रुपयांची तिकिटे विकली जात आहेत. या सेवेला आणखी प्रतिसाद मिळाल्यास रेल्वेची कूपन सेवा बंद करून जनसाधरण तिकीट सेवा वाढवण्याचा विचारही रेल्वेने केला आहे.
प्रवाशांना कमी वेळेत तिकीट मिळावे म्हणून सुरुवातीला सीव्हीएम कूपन, नंतर एटीव्हीएम प्रणाली अस्तित्वात आली. मात्र त्यालाही पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. आपल्या स्वत:च्या जागेवर खासगी पद्धतीने या तिकिटांची विक्री करण्याची परवानगी या योजनेत आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध बुकिंग केंद्रांवर सहज व कमी वेळेत तिकिटे उपलब्ध झाली आहेत. मात्र, या सेवेचा लाभ घेण्यासाठी एक रुपया जादा द्यावा लागतो. मात्र वेळ वाचत असल्याने प्रवासी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेत आहेत. या तिकिटामागील एक रुपया ही सेवा चालवणा-यांना मिळतो.
सुरुवातीला या योजनेकडे प्रवाशांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे रेल्वे स्थानकात तिकीट खिडक्यांवर गर्दी दिसत असे. गेल्या काही महिन्यांची आकडेवारी पाहिली असता जनसाधारण तिकीट बुकिंग सेवेच्या माध्यमातून केवळ आठ टक्केच तिकिटे विकली जात होती. म्हणजेच दिवसाला ७३ हजार तिकिटांची विक्री होत होती. पण तोच आकडा आता दिवसाला अडीच लाख तिकीट विक्रीवर गेला आहे. मध्य रेल्वेवर सध्या १५५ जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा केंद्रे आहेत. त्यांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता ही बुकिंग सेवा केंद्रे मध्य रेल्वेवर वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.

Read More »

'जीवनदाता' येतोय

दरवर्षी आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा चढू लागला की, त्याचे अधिक चटके विदर्भाला बसत असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षात तर विदर्भ, खानदेशामध्ये तापमानाने उच्चांक नोंदवले आहेत. या वर्षीही ही परिस्थिती कायम आहे. शनिवारी विदर्भामध्ये या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. शनिवारी ४७ अंश तापमान नोंदवले गेले. नागपूर, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वर्धा, अकोला, गोंदिया या विदर्भातील प्रमुख जिल्हय़ांमध्ये थोडय़ा फार फरकाने इतकेच तापमान नोंदवण्यात आले. मे महिना सुरू झाला त्याच वेळी हवामान खात्याने यंदाचा उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा अतिशय असहय़ राहील, असा अंदाज वर्तवला होता. वास्तविक, महाराष्ट्राच्या एकूण २३ टक्के जंगलक्षेत्रफळापैकी १६ टक्के जंगल विदर्भात असूनही या भागाला सूर्याच्या झळांचा अधिक सामना करावा लागतो. ऊन वाढू लागले की, पाण्याची मागणी अचानक वाढते. दुसरीकडे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही वाढल्यामुळे जलटंचाईची परिस्थिती अधिक बिकट बनते. यंदा ती अधिक तीव्रतेने जाणवत आहे. विदर्भातील प्रमुख जिल्हय़ांमध्ये पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. माणसांबरोबरच वन्यप्राणी, पशूपक्ष्यांनाही याचा तडाखा बसत आहे. पूर्वेकडील शुष्क व उष्ण वारे जोमाने विदर्भावर येऊन धडकत असल्यामुळे हा तडाखा आगामी काही दिवस अधिक तीव्र होत जाईल. तसेच छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आकाशात हलके ढगही आहेत. परिणामी, उकाडा प्रचंड वाढून नागरिकांचे जीवन असहय़ आहे. पण आता हा उन्हाळ्याचा उत्तरार्ध असून या उकाडय़ाच्या चटक्यात 'गारवा' देणारी एक घटना घडली आहे. ती म्हणजे मान्सूनचे लवकरच होणारे आगमन. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भागामध्ये आणि लगतच्या अंदमान समुद्रात नैऋत्य मोसमी वा-यांचे आगमन झाल्यामुळे उन्हाचे हे चटके अगदी काही दिवसच सोसावे लागणार आहेत. १ जूनला केरळपासून प्रारंभ करून १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून ७५ टक्के भारत व्यापण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याच्या आगमनाची वार्ता सामान्यांपेक्षाही शेतक-यांना अधिक सुखावणारी आहे. याचे कारण आपल्याकडील बहुतांश शेती ही कोरडवाहू असल्यामुळे मान्सून पुरेसा बरसला तरच शेतीचे आणि पर्यायाने एकूणच देशाचे अर्थकारण सुस्थितीत राहते. यंदाच्या वर्षी ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर भर देऊन नियोजन करण्यापेक्षा स्थानिक अंदाजांकडे लक्ष ठेवून त्यानुसार शेतक-यांनी नियोजन करण्याची आवश्यकता असते. मान्सून लवकर येण्याचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाला शेतक-यांना खत, बियाणे वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. जास्तीत जास्त क्षेत्रावर लागवड करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. जलसंधारणाची कामे चोखपणे राबवली गेली आणि वरुणराजाची कृपादृष्टी राहिली तर आगामी काळात आपल्याला जलसंकटावर आणि अन्नधान्य उत्पादनाच्या संकटावर मात करता येईल.

Read More »

एक लाख ठाणेकरांवर टांगती तलवार

ठाण्यातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे तब्बल एक लाख रहिवाशांच्या डोक्यावर दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे.

ठाणे- पावसाळा जवळ आला असतानाही ठाण्यातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे या इमारतीत राहणा-या तब्बल एक लाख रहिवाशांच्या डोक्यावर दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे.
उशिरा जागे झालेल्या महापालिकेने आता ३० हजार संक्रमण शिबिरांद्वारे या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा घाट घातला असून तसा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवला आहे. या प्रस्तावास मंजुरी केव्हा मिळेल, त्यात नागरिक कधी राहायला जातील, आदी प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत.
शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेत ७४ रहिवाशांचा बळी गेल्यावर ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करण्याची तयारी केली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी ठाणे बंद करून महापालिकेचा हा बेत हाणून पाडला. ठाणे महापालिका क्षेत्रात ६२ अतिधोकादायक इमारतींमध्ये ८५९ कुटुंबे राहतात. या घरात ३ हजार ९७९ रहिवासी आहेत. तर १ हजार ७५ धोकादायक इमारतींमधील २१ हजार २९० कुटुंबे राहतात. या घरांमध्ये ९४ हजार ५९ रहिवासी राहतात. महापालिका क्षेत्रात तब्बल १ लाख रहिवासी या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहतात. या इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांना 'क्लस्टर डेव्हलपमेंट' योजनेतून घरे द्यावी यासाठी आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला. महासभेने क्लस्टर डेव्हलपमेंटसंबंधी ठराव करून सरकारकडे पाठवला मुख्यमंत्र्यांनीही या इमारतीत राहणा-या रहिवाशांना वा-यावर सोडता येणार नाही, त्यांच्यासाठी एमएमआरडीएने बांधलेल्या घरांची व्यवस्था करता येईल का, हे पाहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेला दीड महिना उलटून गेल्यानंतरही ठाणे महापालिका हातावर हात ठेवून गप्प बसली आहे. आता महापालिकेने ३० हजार संक्रमण शिबिराच्या माध्यमातून या रहिवाशांच्या वास्तव्याची तयारी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.
ठाण्यात १९९७ मध्ये साईराज ही इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कळवा येथील 'सोनुबाई' इमारत कोसळून १० जणांचा बळी गेला. प्रदीप स्मृती इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. या घटनांनंतर ठाणे महापालिकेने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणा-यांच्या पुनर्वसनाचा विचार केला नाही. आता पावसाळा जवळ आला असताना तब्बल १ लाख रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.
ठाणे महापालिका 'क्लस्टर डेव्हलपमेंट' योजनेंतर्गत घरे बांधेल तेव्हा बांधेल. पण त्याआधी पावसाळ्यापूर्वी आमचे पुनर्वसन करा, अशी आर्जव धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांकडून केले जात आहे.

Read More »

रिव्हर्स स्विंग, २० मे २०१३

क्रिकेटच्या मैदानावर घडलेल्या रंजक गोष्टी
१९११
नॉटिंगहॅमशायर विरुद्ध ससेक्स या सामन्यात टेड अ‍ॅलेस्टन आणि विल्यम रायली या नॉटिंगहॅमशायरच्या शेवटच्या जोडीने दहाव्या विकेटसाठी १५२ धावा जोडल्या. पण बातमी अजून पुढे आहे. या भागीदारीत सिंहाचा वाटा अ‍ॅलेस्टन यांनी उचलला. रायली केवळ १० धावा काढून नाबाद राहिले. अ‍ॅलेस्टन यांनी अवघ्या ९० मिनिटांत वादळी १८९ धावा चोपून काढल्या. उपाहारानंतर पहिल्या ७ षटकांमध्ये अ‍ॅलेस्टन यांनी ११५ धावा ठोकल्या. त्यांच्या अखेरच्या ८९ धावा अवघ्या १५ मिनिटांत निघाल्या.

१९४३
वेस्ट इंडिजचे विख्यात यष्टिरक्षक डेरिक मरे यांचा जन्म. ते १९६२ ते १९८० या काळात ६२ कसोटी खेळले. एकदा त्यांना वगळले असे समजल्यानंतर त्रिनिदादमधील त्यांच्या चाहत्यांनी कसोटी सामन्यासाठीची खेळपट्टी उखडून टाकली होती! यष्टींच्या मागे ते अतिशय कार्यक्षम आणि विश्वासार्ह होते. फलंदाजीही ब-यापैकी करायचे. मरे यांच्या नावावर एकही कसोटी शतक नसले, तरी ११ अर्धशतके आहे. वर्ल्डकप १९७५च्या एका साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मरे यांच्या फलंदाजीनेच वेस्ट इंडिजला तारले होते. त्यांनी यष्टींमागे १८९ बळी घेतले आणि २२.९०च्या सरासरीने १९९३ धावा जमवल्या.

१९४४
इंग्लिश फलंदाज आणि कर्णधार कीथ फ्लेचर यांचा जन्म. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात आशादायक नव्हती अणि पहिल्या १७ कसोटी सामन्यांमध्ये त्यांची सरासरी केवळ १९ होती. पण ती बहरू लागली. ५९ कसोटी सामन्यांच्या अखेरीस त्यांची सरासरी जवळपास ४०पर्यंत पोहोचली होती. भारत अणि श्रीलंकेच्या दौ-यावर १९८१-८२मध्ये त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली. मात्र त्यांना फार भरीव काही करून दाखवता आले नाही.

१९५६
ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि निवड समिती अध्यक्ष अँड्रय़ू हिल्डिच यांचा जन्म. ते १८ कसोटी सामने खेळले आणि केवळ दोनच शतके त्यांना लगावता आली. अनेकदा हुक आणि कटचा फटका लगावताना ते बाद व्हायचे. १९८५मध्ये डेव्हिड बून आणि जेफ मार्श यांचा समावेश ऑस्ट्रेलियन संघात झाला आणि हिल्डिच यांना नारळ मिळाला.

१९६५
इंग्लिश कौंटी सामन्यात यॉर्कशायरचा संघ हँपशायरविरुद्ध अवघ्या २३ धावांमध्ये गारद झाला. यॉर्कशायरच्या संघात त्यावेळी जेफ्री बॉयकॉट, जॉन हँपशायर, ब्रायन क्लोज, रे इलिंगवर्थ, फ्रेडी ट्रमन असे निष्णात क्रिकेटपटू होते. बिनबाद ७वरून त्यांची अवस्था ८ बाद १३ अशी झाली.
१९७७
भारताची शैलीदार डावखुरी फलंदाज अंजूम चोप्रा हिचा जन्म. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिची फलंदाजी अधिक फुलली आणि भारताला काही एशिया कप सामन्यांमध्ये तिच्या फलंदाजीमुळे विजय मिळाला. तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

१९८२
पाकिस्तानी फलंदाज इम्रान फरहात याचा जन्म. ऐन भरात असताना इंडियन क्रिकेट लीगमध्ये शिरकाव करून त्याने स्वत:चे नुकसान करून घेतले. २००९मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले, त्यावेळी त्याचा भर ओसरलेला होता.

Read More »

रहिवाशांचा जीव मुठीत!

जरीवाला कंपाउंडमधील इमारतीतील रहिवाशांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन न झाल्यामुळे या इमारतीतच रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

मुंबई- जरीवाला कंपाउंड या एक मजली चाळीच्या चारही इमारती म्हाडाकडून अतिधोकादायक म्हणून जाहीर झाल्यानंतर त्यातील तीन इमारती म्हाडाने पाडून टाकल्या मात्र एका इमारतीतील रहिवाशांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन न झाल्यामुळे या इमारतीतच रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. यातील पाडून टाकण्यात आलेल्या तीन इमारतींचाही पुनर्विकास झालेला नाही. याबाबत रहिवाशांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दाद मागितली आहे.
या चाळीतील 'अ' क्रमांकाची इमारत २००५ला म्हाडाने अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर म्हाडाच्या अधिका-यांकडून या इमारतीतील रहिवाशांना वेळीच स्थलांतरित करण्यात आले नाही. याबाबत रहिवाशांनी म्हाडाकडे वारंवार निवेदनाद्वारे विनंती केल्यानंतरही त्याची दखल घेतली गेलेली नाही. माहीम येथील जरीवाला चाळीत अ, ब, क, ड, या एकमजली अतिधोकादायक चार इमारतींपैकी ब आणि क, ड या तीन इमारती म्हाडाने धोकादायक म्हणून पाडून टाकल्या. यातील रहिवाशांना गोराई व धारावीतील संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले. परंतु यातील 'अ' ही इमारतही धोकादायक झाली असतानाही त्यातील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात म्हाडा चालढकल करत आहे. त्यामुळे या इमारतीतील ६२ कुटुंबे जीव मुठीत धरून राहत आहेत.
मध्यंतरी या इमारतीच्या गॅलरीतला काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. अत्यंत जीर्ण झालेली ही इमारत कधीही पडण्याची शक्यता आहे. या इमारतीची तात्पुरती दुरुस्ती करा, अशी विनंती रहिवाशांकडून सातत्याने केली जाते. मात्र म्हाडाच्या अधिका-यांकडून याची दखल आतापर्यंत घेतली गेलेली नाही. इमारत धोकादायक जाहीर झाल्यानंतर २००५पासून इमारतीची वरच्या वर डागडुजी करून तसेच कोसळणा-या भागांना टेकू लावून रहिवासी राहत आहेत. मात्र, ही इमारत कोसळून जीवितहानी झाल्यावर म्हाडाला व संबंधित विभागांना जाग येणार आहे का, असा प्रश्न येथील रहिवाशांनी विचारला आहे.
पावसाळ्यात या इमारतीत राहण्याचा धोका आणखी वाढतो. छत, भिंतीतून पाणी गळते. इमारतीला जोडणा-या आलेल्या पाइपलाइनही जीर्ण झाल्यामुळे ठिकठिकाणी फुटल्या आहेत. या चाळीतील तीन इमारती आधीच पाडण्यात आल्या आहेत. मात्र, एक इमारत पाडण्यासाठी म्हाडा वेळ काढत आहे. याआधी पाडलेल्या इमारतींच्या ढिगा-यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येतात. त्यामुळे जीर्ण झालेल्या क्रमांक 'अ' इमारतीच्या पायाच्या भागात पाणी झिरपून तो कमकुवत होण्याची शक्यता आहे. पावसाळा जवळ आल्याने इमारतीतील रहिवाशांची भीती वाढली असून लवकरात लवकर रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी होत आहे.

Read More »

चिनी अर्थव्यवस्थेचा सारथी

जागतिक आर्थिक बदलांमध्ये चीनचे स्थान हेरून ते अधिकाधिक बळकट करण्याचे काम ली केकियांग यांनी चीनचे उपपंतप्रधान असतानाच सुरू केले. उपपंतप्रधानपदाचा कारभार २००८मध्ये स्वीकारल्यानंतर स्वित्झर्लंडलडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत त्यांनी चिनी अर्थव्यवस्थेला भविष्यात काय अभिप्रेत आहे, याचे चित्र दमदारपणे मांडले. चीनच्या आर्थिक भविष्याचा त्यांनी घेतलेला तो वेध होता. शाश्वत विकास, प्रदूषणविरहित ऊर्जानिर्मिती आणि 'आहे रे व नाही रे' गटाच्या उत्पन्नस्त्रोतामधील दरी कमी करणे यावर त्यांनी भर दिला आहे. विशेष म्हणजे त्यांना चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचेच वारसदार म्हटले जात होते. मात्र, ऐन वेळी शी जिनपिंग यांनी बाजी मारली आणि त्यांना पंतप्रधानपदावर समाधान मानावे लागले.
एका सामान्य अधिका-याचा मुलगा असलेल्या ली यांनी आपली पदवी मिळवल्यावर स्थानिक राजकारणात न पडता थेट कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्थशास्त्रातून पीएचडी करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयीन काळात थेट राजकारणाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष तसेच कम्युनिस्ट युथ लीगचे ते सरचिटणीस झाले. १९८२च्या काळात त्यांची गणना कम्युनिस्ट युथ लीगच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये होऊ लागली. चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे सध्याचे सरचिटणीस हू जिंताओ यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी झपाटय़ाने प्रगती केली. १९९३मध्ये ते पक्षाचे सरचिटणीस झाले. १९९८ ते २००४मध्ये ते चीनच्या हेनान प्रांताचे गव्‍‌र्हनर होते. या कार्यकाळात त्यांनी विविध आर्थिक विकासाचे कार्यक्रम राबवत हेनान प्रांताला चीनमधील प्रथम क्रमांकाचे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा प्रांत केला. कम्युनिस्ट युथ लीगच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेल्या पहिल्या पिढीचे ते नेते आहेत. २००८ ते २०१३पर्यंत चीनचे उपपंतप्रधान होते. २०१२पासून पक्षाच्या कार्यकारिणीत स्थायी समितीचे दुस-या क्रमांकाचे नेते आहेत. मार्च २०१३मध्ये पंतप्रधान वेन जियाबाओ यांच्या जागी त्यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. आर्थिक विकासाबाबत नेहमीच मनमोकळेपणाने बोलायला आणि आपले विचार मांडायला ते मागेपुढे पाहत नाहीत. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये चीनचे स्थान मजबूत करण्यासाठी आर्थिक विकास, महागाईवरील नियंत्रण तसेच लघु आर्थिक व्यवस्थापनावर त्यांचा भर आहे. पंतप्रधान म्हणून परदेश दौरा करताना ली यांनी पहिली निवड भारताची केली आहे, यावरूनच त्यांचा चतुरपणा दिसून येतो. तीन दिवसांच्या भारत दौ-यावर त्यांच्याबरोबर एक आर्थिक शिष्टमंडळही आहे. आज मोठय़ा प्रमाणात चिनी उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. त्याचबरोबर सीमावादाच्या (चीनची वारंवार होणारी घुसखोरी) ठिणग्या उडतच असतात. चीन-भारत या दोन्ही देशांनी एकमेकांकडे आर्थिक गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात केली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमधील दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा देऊन भारताच्या आर्थिक नाडय़ा कशा आवळल्या जातील, याकडे कटाक्ष असलेल्या देशाचे ली हे प्रतिनिधी आहेत, हेही विसरून चालणार नाही. आशियातील काही देशांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम चीनने युद्धपातळीवर घेतले आहे आणि त्यात मुसंडीही मारली आहे. 'ब्रिक्स' देशांमध्ये चीनचाही समावेश आहे. अशावेळी ली यांची भारतभेट नुसती एक राजकीय औपचारिकता ठरू नये.

Read More »

नेरळ-माथेरानची पावसाळी सफर अनिश्चित

टॉय ट्रेन पावसाळ्यातही सुरू ठेवावी हा प्रस्ताव मंजुरीच्या कात्रीत सापडल्याने या पावसाळ्यात नेरळ-माथेरान ट्रेन धावण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

मुंबई- पर्यटकांना पावसाळ्यात माथेरानमधील आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटता यावा, यासाठी नेरळ ते माथेरानदरम्यान टॉय ट्रेन पावसाळ्यातही सुरू ठेवावी आणि स्थानिकांच्या मागणीनुसार रात्री नऊ वाजेपर्यंत अमनलॉज ते माथेरान सेवा सुरू ठेवावी, हे दोन प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडे पाठवले आहेत. मात्र, असे प्रस्ताव मिळालेच नसल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीच्या कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात नेरळ-माथेरान ट्रेन धावण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.
पावसाळ्यातही नेरळ-माथेरान टॉय ट्रेन सुरू ठेवण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. १५ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्याचीही तयारी मध्य रेल्वेने केली आहे. मात्र, त्याला सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने गेल्या आठवडय़ात प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास १५ जूनपासूनही सेवा सुरू केली जाईल, असेही निगम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सूर्यास्तानंतर नेरळ-माथेरान ट्रेन बंद केली जाते. त्यामुळे या परिसरात राहणा-या स्थानिकांना त्याचा फटका बसतो. अमनलॉज ते माथेरानदरम्यान तर विजेचीही सुविधा नाही. लोकांना रात्री काळोखातूनच माथेरान गाठावे लागते. त्यामुळे कमीत कमी नऊ वाजेपर्यंत तरी अमनलॉज ते माथेरान ट्रेन सेवा सुरू राहावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्याचा विचारही मध्य रेल्वेने केला असून तोही प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र असा प्रस्ताव अजून मिळाला नसल्याचे मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे दोनही प्रस्ताव सध्या प्रशासकीय निर्णयाच्या कचाटय़ात सापडले आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

Read More »

२१व्या शतकातील नवे 'ड्रोन'

अमेरिकन नौदलाने नुकतीच 'ड्रोन' या मानवरहित विमानाच्या अतिशय आधुनिक आवृत्तीची नुकतीच चाचणी घेतली. एका युद्धनौकेवरून घेतलेल्या या ड्रोनच्या चाचणीमुळे मानवरहित विमानांच्या क्षेत्रामध्ये नव्या तंत्रज्ञानाची भर पडली आहे.
यापुढच्या काळात टॉप गन या सिनेमातील वैमानिकांच्या साहाय्याने फत्ते केलेल्या हवाई मोहिमांप्रमाणे मोहिमा मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विमानाला स्वत:ची कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रदान करण्यात आल्यामुळे कोणत्याही प्रकारची मोहीम फत्ते करण्याची याची क्षमता आहे.
एक्स-४७बी नावाचे हे ड्रोन विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण करू शकणारे पहिले ड्रोन आहे. त्यामुळे या विमानाच्या उड्डाणासाठी दुस-या देशांच्या विमानतळांची मदत घ्यावी लागणार नाही. एखाद्या क्षेत्राजवळ ही युद्धनौका नेल्यास त्या भागातून सहजपणे हे ड्रोन दिलेली कामगिरी पार पाडू शकणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इतर ड्रोनसारखे हे ड्रोन रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करावे लागत नाही. त्याच्या नियंत्रणासाठी विशिष्ट प्रकारची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या विमानामधील संगणकाला देण्यात येणा-या मार्गदर्शक आज्ञाप्रणालीवर त्याचे काम चालते. ज्या भागात उड्डाण करायचे आहे, टेहळणी करायची आहे किंवा मारा करायचा आहे, ती माहिती त्यामध्ये आधीपासून साठवली जाते व त्या आधारे हे विमान उड्डाणाबाबत स्वत:हून निर्णय घेते. कोणत्याही प्रकारचे लक्ष्य स्वत: ओळखण्याची प्रणाली यामध्ये असल्याने, हे विमान जीपीएस, ऑटो पायलट व टक्कर विरोधी सेन्सर यांचा वापर करून कोणत्याही अडथळ्याविना उड्डाण करत राहते.
हे अत्याधुनिक ड्रोन ४०,००० फुटांहूनही अधिक उंची गाठू शकते. तर याचा पल्ला सुमारे २१०० नॉटिकल मैलांचा आहे. ते सबसॉनिक (ध्वनीपेक्षा कमी) वेगाने उड्डाण करू शकते.
मात्र, या अत्याधुनिक 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' असलेल्या ड्रोनच्या वापराबाबत काही संरक्षणतज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारच्या शस्त्रप्रणालीचा वापर म्हणजे स्वत:च निर्णय घेऊ शकणा-या व नियंत्रणमुक्त असलेल्या स्वायत्त विनाशकारी यंत्रमानवाच्या निर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मानवी हक्क संघटनांनीही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शस्त्र वाहून नेणा-या, आपले लक्ष्य स्वत:च निश्चित करून, मानवी नियंत्रणाशिवाय त्यावर मारा करू शकणा-या कोणत्याही मानवरहित प्रणालीचा वापर बंद केला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. एक दिवस अशा प्रकारच्या, संगणकावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणालींवर शास्त्रज्ञांचे नियंत्रण राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Read More »

रेशनवरून पामतेल गायब

सर्वसामान्यांना रेशन दुकानांवर स्वस्त दरात दिले जाणारे पामतेलही गेल्या तीन महिन्यांपासून गायब असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मुंबई- सर्वसामान्यांना रेशन दुकानांवर स्वस्त दरात दिले जाणारे पामतेलही गेल्या तीन महिन्यांपासून गायब असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंद्राकडून राज्य सरकारला पामतेलाचा पुरवठा झाला नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. शिधापत्रिकाधारकांना पामतेल कधी उपलब्ध करून दिले जाईल, याबाबत माहिती देण्यास शिधावाटप अधिकारी टाळाटाळ करत आहेत.
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशनवर स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र सध्या रेशनवर तांदूळ, गहू, साखर, तूरडाळ, रॉकेल मिळत नसल्याच्या शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी आहेत. त्यातच आता रेशनवरून पामतेलही गायब झाले आहे. पामतेल शिधावाटप दुकानांत उपलब्ध करण्यात आले आहे, असे सांगितले जात असल्याने शिधापत्रिकाधारक पामतेला करता दररोज रेशन दुकानांत खेपा मारत आहेत. परंतु पामतेलासंदर्भात दुकानदार व शिधावाटप अधिका-यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या मुंबई आणि ठाण्यातील शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी आहेत. रेशनवर पामतेल मिळत नसले तरी काही ठिकाणी पामतेलाच्या पिशव्या या महागडय़ा दराने विकल्या जात आहेत. पामतेल फार दिवस टिकत नाही, त्यामुळे अनेक दुकानदार पामतेल विकत घेत नाहीत, असे एका दुकानदाराने सांगितले.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने मार्च महिन्यात रेशनवर पामतेल उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. मात्र, केंद्राकडून अजूनही राज्याला पामतेलाचा कोटा मिळालेला नाही. केंद्राकडून कोटा मिळाल्यानंतर शिधापत्रिकाधारकांना पामतेलाचे वाटप करणे शक्य होईल, असे शिधावाटप नियंत्रक डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी काढलेल्या एका अध्यादेशात पामतेल पुरवठा सुरळीत राहील, असे नमूद केले होते. मात्र, आतापर्यंत फार कमी वेळा शिधापत्रिकाधारकांना नियमितपणे रेशनवर पामतेल मिळाले आहे, असे रेशन कृती समितीचे समन्वयक गोरख आव्हाड यांनी सांगितले.

Read More »

मुंबई काँग्रेसचे जनसंपर्क अभियान

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई काँग्रेसने विशेष जनसंपर्क अभियानाची आखणी केली आहे.
मुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई काँग्रेसने विशेष जनसंपर्क अभियानाची आखणी केली आहे. जिल्हा ते वॉर्डस्तरापर्यंत विविध कार्यक्रम ठरवण्यात आले असून, त्यासाठी एक टीम तयार करण्यात आल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांनी सांगितले.
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चांदुरकर यांनी मे ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली आहे. मे महिन्यातील जिल्हास्तरीय कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसची विकासकामे आणि विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे मुंबईतील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दर महिन्याला १२ विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क अभियान राबवण्यात येईल. सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारची विकासकामांची माहिती देणार येणार आहे. लवकरच वॉर्ड अध्यक्षांची बैठक बोलावून त्यात अभियानाची माहिती देण्यात येणार असल्याचे चांदुरकर यांनी सांगितले.
या अभियानासाठी अमरजीत मनहास यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जनसंपर्क अभियानाची संपूर्ण आखणी आणि अंमलबजावणीची योजना या पथकाने आखली असून, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. काँग्रेसने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. जनतेच्या मनात काँग्रेसचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनहास यांनी सांगितले.

Read More »

पूर्णेकर यांच्यासह ११ जण निर्दोष

मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला विरोध करणा-या ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासह ११ जणांची ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
ठाणे – 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला विरोध करणा-या ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासह ११ जणांची ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तब्बल ११ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला.
'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला काँग्रेसतर्फे विरोध करण्यात आला होता. राज्यात या नाटकाचा प्रयोग कुठेही होऊ नये, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. मात्र तरीही आठ मे २००२ मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. तो होऊ नये, यासाठी बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले होते.
नौपाडा पोलिसांनी या आंदोलनप्रकरणी पूर्णेकर यांच्यासह ११ जणांविरोधात नाटय़गृहात जबरदस्तीने घुसणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी गुन्हे दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बारुळकर यांच्यासमोर झाली. खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. चंदने यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया ठाणे काँग्रेसचे शहर सरचिटणीस सचिन शिंदे यांनी दिली.



Read More »

ठाणे जिल्ह्यात हप्ताखोरीमुळे 'वडाप'ची चलती

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने मान टाकल्याने कल्याण, मुरबाड, भिवंडी, वसई, विरार, वाड-रोडसह अन्य तालुक्यांत 'वडाप'(अवैध वाहतूक) करणा-यांचा धंदा तेजीत सुरू आहे.
ठाणे - ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने मान टाकल्याने कल्याण, मुरबाड, भिवंडी, वसई, विरार, वाड-रोडसह अन्य तालुक्यांत 'वडाप'(अवैध वाहतूक) करणा-यांचा धंदा तेजीत सुरू आहे. एखाद्या वाहनात धड उभे राहण्यासाठी जागा नसताना कोंबाकोंबी करून प्रवासी भरणा-या या वडापवाल्यांना स्थानिक पोलिसांचे कृपाछत्र लाभत आहे. त्यात हप्तेखोरीचे ग्रहण लागलेल्या पोलिसांना दरमहा ठरावीक रक्कम मिळत असल्याने अवैध वाहतूक करणा-यांची चलती आहे.
पोलिसांचा खिसा गरम केल्यानंतर ही कसर भरून काढण्यासाठी आसनक्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरून वडापवाले पैसा वसूलही करत आहेत. या अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्याची मागणी जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर जोर धरत असताना पोलिसांकडूनच त्यासाठी अभय मिळत असल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'वडाप'च्या जवळपास ८०० गाड्या धावत आहेत. एका वाहनात पाच-सहा एवढी आसनक्षमता असताना २० ते २२ प्रवासी कोंबून आरटीओचे नियम आणि कायदा धाब्यावर बसवण्याचे काम सुरू आहे. क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, त्यानंतरही ग्रामीण भागातील लोक जीवावर उदार होऊन 'वडाप'चा प्रवास करत आहेत. ही अवैध वाहतूक करण्यासाठी पोलिसांना प्रत्येक गाडीमागे पाच हजार रुपयांचा हप्ता दिला जात असल्याचेही समोर येत आहे.
ग्रामीण भागात एसटी हेच वाहतुकीचे मुख्य साधन मानले जाते. मात्र, एसटी येण्या-जाण्याचे कोणतेही टाइमटेबल नसल्याने अनेकांनी आता वडापसारख्या अवैध वाहतुकीचा पर्याय स्वीकारला आहे. त्यात 'वडाप'वालेही मोठ्या चतुराईने प्रवासी आपल्याकडे खेचताना दिसतात. एसटीचे वेळापत्रक डोक्यात ठेवूनच ते काम करतात. एसटी येण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे आधी हे चालक संबंधित थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना गळ घालतात. एसटीची वाट पाहत बसण्यापेक्षा दहा मिनिटे लवकर जाता येईल, यासाठी प्रवासी 'वडाप'मध्ये बसतात.
स्थानिक पोलिसांचे हात ओले करणारी कोणतीही व्यक्ती वडाप चालवू शकते, अशी परिस्थिती ठाणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे अनेक एसटी स्थानकाच्या जवळ वडापवाल्यांचा थांबा दिसून येतो. एसटीच्या परिसरात जाऊन वडापवाले प्रवाशांना गळ घालून त्यांच्या गाडीत घेऊन जातात. त्यामुळे अनेकदा वडापवाल्यांकडून प्रवासी चोरल्याची तक्रार एसटीकडून ऐकण्यास मिळते.

Read More »

कोलाडनजीक एसटी-तवेराची टक्कर

पहाटे चार वाजता कोलाडनजीक तिसे फाटा येथे एसटी बस आणि तवेराची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर नऊ जण गंभीर जखमी झाले.

संग्रहित छायाचित्र
रोहा - मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी पहाटे चार वाजता कोलाडनजीक तिसे फाटा येथे एसटी बस आणि तवेराची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कणकवलीहून मुंबईला जाणारी एसटी बस आणि पोलादपूर तालुक्यातील बोरावलेकडे निघालेल्या तवेरागाडीची तिसे फाटा येथे समोरासमोर धडक झाली. तवेरा ही एल्फिन्स्टनहून बोरालेकडे निघाली होती. या अपघातात जानेश्वर पांडुरंग सावंत (३०) हे जागीच ठार झाले. जखमींमध्ये तवेरा गाडीतील किसन शिवराम मोरे, भाऊ शिवराम मोरे, लक्ष्मण शिवराम मोरे, कमल भाऊ मोरे, अश्विनी भाऊ मोरे, अजय भाऊ मोरे, संजय भाऊ मोरे, संतोष विष्णू मोरे, संतोष दाजी पाताडे (सर्व रा. बोरावले) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोह्याचे पोलिस निरीक्षक सुरेश जाधव याप्रकरणी तपास करीत आहेत.


Read More »

स्थानिक स्वराज्य संस्था विश्वासाचे केंद्र बनावे

नागरी सुविधा सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था विश्वासाचे केंद्र बनले पाहिजे, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
भिवंडी - नागरी सुविधा सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था विश्वासाचे केंद्र बनले पाहिजे, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. भिवंडी- निजामूपर शहर महापालिकेने बांधलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रविवारी पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
महानपालिकेने निर्माण केलेली नवीन इमारत शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असल्याचे कौतुकही त्यांनी केले. भिवंडी हे देशाचे ऐक्य घडवणारे शहर आहे. कापडाचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणा-या या शहरात देशाच्या कानाकोप-यातून नागरिक येत आहेत. त्यामुळे नागरिकरणात वाढ होवून शेतकरी व कामगाराचा मिलाप झाल्याचे पवार म्हणाले. नागरिकांच्या वास्तव्यासाठी घरांची गरज ओळखून विकासक बेकायदा इमारती उभारत आहेत. या इमारतींमध्ये आयुष्याची कमाई गुंतवली जात आहे. मात्र, अशा अवैध इमारती दुर्घटनाग्रस्त होऊन गरीब नागरिकांचे बळी जात आहेत. या बांधकामातील लुटारू विकासक समोर न येता पैसे कमावून पसार होत असल्याची खंतही पवार यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला महापौर प्रतिभा पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, पालकमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री राजेंद्र गावित, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुरेश टावरे, जिल्हाधिकारी पी. वेलारासू, ठाण्याचे पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी आदी उपस्थित होते.

Read More »

'स्पॉट फिक्सिंग' प्रकरणात नाहक गुंतवले

आयपीएल'च्या 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरणात माझे नाव जाणीवपूर्वक गुंतवले असून 'न्यूज नेशन' या वृत्तवाहिनीचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे, असा दावा प्रसिद्ध सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
कुडाळ – 'आयपीएल'च्या 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरणात माझे नाव जाणीवपूर्वक गुंतवले असून 'न्यूज नेशन' या वृत्तवाहिनीचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे, असा दावा प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि आगामी 'काकण' चित्रपटाची दिग्दर्शिका क्रांती रेडकर यांनी रविवारी वालावल जेठी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. आपली बदनामी करणा-या वृत्तवाहिनीच्या विरोधात लवकरच न्यायालयात जाणार असून, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहितीही रेडकर यांनी या वेळी दिली.
कुडाळ तालुक्यातील वालावल येथे सुरू असलेल्या 'काकण' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी १० मेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी ठिकठिकाणी उपस्थित आहे. १५ मेपासून वृत्तपत्र वाहिन्यांवर आयपीएलचे फिक्सिंग प्रकरण जोरदार सुरू आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी त्याचा ऊहापोह केला आहे. मात्र, एका छोट्या न्यूज नेशन नामक वृत्तवाहिनीने या प्रकरणात माझे नाव गुंतवून माझी नाहक बदनामी केली, त्यामुळे माझ्यासह माझ्या परिवारास, मित्रमैत्रिणींना मन:स्ताप झाला आहे. या वृत्तवाहिनीला आपण लवकरच नोटिस पाठवणार आहोत, असे रेडकर यांनी सांगितले.
'काकण' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी कोकणात आहे. मला या क्रिकेटमध्ये अजिबात रस नाही. स्पॉट फिक्सिंगचीही मला कल्पना नाही. मात्र माझ्या नाहक बदनामीमुळे मला धक्का बसला आहे, असे रेडकर म्हणाल्या. या वेळी चित्रपटाचे निर्माते सचिन शिंदे, प्रमोद मोहिते, फिल्म प्रॉडक्शन मॅनेजर साईनाथ जळवी उपस्थित होते.

Read More »

नरेंद्र मोदींकडून आरोपींची पाठराखण

इशरत जहाँ प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरोपींना वाचवण्याचे काम करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला.
ठाणे – इशरत जहाँ ही निरपराध होती. या प्रकरणात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरोपींना वाचवण्याचे काम करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला. रविवारी मुंब्रा येथे एका आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. एखादी वाईट घटना घडल्यानंतर काही शक्ती या शहराचे नाव खराब करण्याचे काम करतात. प्रसारमाध्यमांचा त्यात सहभाग असल्याची खंत पवार यांनी या वेळी व्यक्त केली.
मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारक व रेल्वे स्थानक प्रवेशद्वाराचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. एकेकाळी मुंब्रा शहराचे नाव अत्यंत खराब होते. एखादी वाईट घटना घडल्यानंतर सरकार व पोलिसांचे लक्ष मुंब्य्राकडे असायचे. मात्र, आता परिस्थिती सुधारली आहे. दहशतवादी समजून काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये हत्या करण्यात आली. त्या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या पोलिसांनी कोणतेही चुकीचे काम केले नसून, एका दहशतवाद्याची हत्या केल्याचे गर्वाने सांगितले. मुंबई व दिल्ली पोलिसांनी जे वाईट कृत्य केले नाही, ते गुजरात पोलिसांनी केले. त्यामुळे इशरत जहाँची हत्या झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. इशरत जहाँ निर्दोष असल्याचे नागरिक येउन मला सांगायचे. तेथील पोलिसांनी या मुलीवर अन्याय केल्याचे सांगायचे. या हत्येप्रकरणी गुजरात पोलिसांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सरकारकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने केंद्र सरकारच्या मदतीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर अहमदाबाद न्यायालयाने इशरत जहाँ निर्दोष असल्याचे स्पष्ट करत पोलिसांना अटक केली. या हत्येची किंमत चुकवावी लागेल, निर्दोष लोकांची अशा पद्धतीने हत्या होणे हे चुकीचे असल्याचा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला.
मुंब्य्राबद्दल राज्य सरकारने दृष्टिकोन बदलायला हवा
मुंब्रा परिसराकडे बघण्याचा दृष्टिकोन आधीच वाईट आहे. दहशतवादी दृष्टिकोनातून मुंब्रा परिसराकडे पहिले जायचे. मात्र, मुंब्रा देशातील एकता निर्माण करणारे शहर असून, मुंब्रा येथील लोकांना त्यांचा दृष्टीकोन बदलायला सांगण्यापेक्षा सरकारने त्यांचा दृष्टिकोन बदलायला हवा, असेही पवार म्हणाले. मुंब्रा येथील विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर कळवा येथील विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी लोकलने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, खासदार आनंद परांजपे, डॉ. संजीव नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

Read More »

'बेस्ट'च्या एक हजार बस 'सीसीटीव्ही'च्या प्रतीक्षेत

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाने जुलै २००७ पासून टप्प्याटप्प्याने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली.
मुंबई – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाने जुलै २००७ पासून टप्प्याटप्प्याने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली. गेल्या सहा वर्षात बेस्टच्या ताफ्यातील चार हजार ३२८ बसपैकी तीन हजार ३३६ बसमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित ९९२ बस अजूनही या कॅमे-यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर बसमधील १० टक्के सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये दररोज बिघाड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे बसमधील प्रत्येक प्रवशावर नजर राहावी, संशयास्पद हालचाली टिपता याव्यात आणि चोरीच्या प्रकारांना आळा बसावा, या उद्देशाने बेस्ट प्रशासनाने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यानुसार जुलै २००७ पासून टप्प्याटप्प्याने ते बसवण्यास सुरुवात झाली. मात्र, अजूनही जवळपास ९९२ बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. येत्या दोन महिन्यांत ते लावले जातील, असा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.
बसमधील सीसीटीव्ही कॅमे-यांची देखभाल ठेवणेही सध्या अडचणीचे ठरू लागले आहे. खराब रस्ते, धूळ आणि तांत्रिक बिघाड यामुळे रोज १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये बिघाड होत असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी हे कॅमेरे दुरुस्त केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे बसच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे सोईस्कर झाले आहे. त्यामुळे उर्वरित बसमध्ये दोन महिन्यांत लावले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read More »

'प्रहार' हे विचार, कलेचे व्यासपीठ

'प्रहार केवळ वृत्तपत्र नसून विचार मांडण्याचे आणि कलेचे व्यासपीठ असल्याची भूमिका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे.
मुंबई – 'प्रहार केवळ वृत्तपत्र नसून विचार मांडण्याचे आणि कलेचे व्यासपीठ असल्याची भूमिका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. या भूमिकेतूनच लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'रंगारंग-२०१३'ची संकल्पना 'प्रहार'ने साकारली, असे मत महाराष्ट्र कलानिधीचे अध्यक्ष नितेश राणे यांनी व्यक्त केले.
'महाराष्ट्र कलानिधी'निर्मित आणि 'प्रहार'ने आयोजित केलेल्या 'रंगारंग-२०१३' हा लोककलांचा महोत्सव रविवारी मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नितेश राणे बोलत होते.
लोककलेच्या माध्यमातूनच लोकसंस्कृतीचे व जीवनशैलीचे दर्शन घडत असते. लोककलेच्या माध्यमातून आपली मुळे जपण्यासाठी तसेच कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हेच महाराष्ट्र कलानिधीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जेव्हा कोकणातील लोककला मुंबईपर्यंत पोहोचवण्याची इच्छा 'प्रहार'ने माझ्याजवळ व्यक्त केली तेव्हा तो विचार आम्ही उचलून धरला. लोककलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हीच 'रंगारंग' आयोजित करण्याची भूमिका असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
'रंगारंग'च्या माध्यमातून महाराष्ट्र कलानिधीने कोकणातील कलाकारांना मुंबईत व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे. लोकसंस्कृती जपणारे लोककलाकार आपला नित्यक्रम पाळून लोककलेचा वारसा जपतात. ही कला ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवतात, अशा शब्दात 'प्रहार'चे संपादक महेश म्हात्रे यांनी लोककलावंतांचा गौरव केला. लोककलावंतांना मुंबईत व्यासपीठ मिळवून देण्याचा विचार मांडताच तो नितेश राणे यांनी उचलून धरला. त्यांच्या प्रयत्नामुळे कोकणातील लोककला मुंबईपर्यंत पोहोचली. याबद्दल रत्नागिरी आवृत्तीचे निवासी संपादक मनोज मुळ्ये यांनी नितेश राणे यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मुंबईकर रसिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Read More »

कार्बन डायऑक्साइडमुळे जगाचा श्वास गुदमरणार

जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिगमुळे जगाची चिंता वाढली आहे.
मुंबई - जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिगमुळे जगाची चिंता वाढली आहे. ग्लोबल वॉर्मिगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या कार्बन डायऑक्साइडच्या वातावरणातील प्रमाण हे ४०० दशलक्षांश (पार्ट्स पर मिलियन) या धोकादायक पातळीवर गेल्याने जगाचा श्वास गुदमरण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दशलक्ष वर्षातील हे सर्वोच्च प्रमाण अमेरिकेच्या हवाई बेटावरील मौना लोआ येथील वेधशाळेने नऊ मे रोजी नोंदवले आहे. कार्बन डायऑक्साइडचे वातावरणात प्रमाण वाढल्यास हवामानावर मोठा परिणाम होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
यापूर्वी कार्बन डायऑक्साइडचे ४०० दशलक्षांश प्रमाण गेल्या वर्षी 'आक्र्टिक्ट' भागात नोंदले गेले होते. परंतु तासाभरात ते कमी झाले होते. संपूर्ण दिवसाच्या सरासरीत एवढे प्रमाण गेल्या तीन दशलक्ष वर्षात प्रथमच आढळले, परंतु कार्बन डायऑक्साइडमध्ये होणारी वाढ किंवा घट ही तात्पुरती प्रक्रिया आहे. उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरू झाल्याने बर्फ वितळल्याने झाडे बहरणार आहेत. ही झाडे सुमारे १० अब्ज टन कार्बन डायऑक्साइड खेचून घेतील, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Read More »

महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा रास्ता रोको

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिच्या संतप्त नातेवाइकांनी रविवारी सकाळी अमिता नर्सिंग होमची मोडतोड करत धारावी ६० फूट रोड येथे रास्ता रोको केला.
मुंबई - महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिच्या संतप्त नातेवाइकांनी रविवारी सकाळी अमिता नर्सिंग होमची मोडतोड करत धारावी ६० फूट रोड येथे रास्ता रोको केला. प्रमिला बापू असे मृत महिलेचे नाव आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शाहूनगर पोलिसांनी दिले. प्रमिलाच्या मृत्यूमुळे तिच्या नातेवाइकांना मानसिक धक्का बसला आहे.
Note: There is a poll embedded within this post, please visit the site to participate in this post's poll. धारावी येथील ६० फूट रोड परिसरानजीकच्या एका कॉलनीत प्रमिला राहत होती. प्रमिलाच्या नातेवाइकांनी १६ मे रोजी तिला प्रसूतीकरता अमिता नर्सिग होममध्ये दाखल केले होते. प्रमिलाच्या या पूर्वीच्या दोन प्रसूती याच रुग्णालयात झाल्या. तिस-या प्रसूतीसाठी तेथील डॉक्टरांनी प्रमिलाचे सिझेरियन करावे लागेल, असा सल्ला नातेवाइकांना दिला होता. पण प्रमिलाची प्रसूती नॉर्मल होऊन तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाल्याने प्रमिलाचे नातेवाइक खूश होते. नर्सिग होममधील कर्मचा-यांनी ते बाळ प्रमिलाच्या नातेवाइकांना दाखवले. मात्र याच वेळी कर्मचा-यांचे प्रमिलाकडे दुर्लक्ष झाल्याने तिची प्रकृती खालावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यांनी ही बाब डयुटीवर असलेल्या परिचारिकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रमिलाला अधिक उपचाराकरता शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमिलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या नातेवाइकांना सांगितले. अखेर रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रमिलाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी नर्सिंग होमची मोडतोड केली. एवढेच नव्हे तर काही काळ रास्ता रोकोही केला होता. अखेर पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. प्रमिलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालावरून सिद्ध होईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शाहूनगर पोलिसांनी दिले.



Read More »

नमन कलेला राजाश्रय मिळवून देणार

दशावताराप्रमाणेच 'नमन' हा कलाप्रकार महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा तसेच शासन दरबारी त्याची दखल घेतली जावी यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे आणि मी स्वत: प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी सांगितले.
मुंबई – दशावताराप्रमाणेच 'नमन' हा कलाप्रकार महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा तसेच शासन दरबारी त्याची दखल घेतली जावी यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे आणि मी स्वत: प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी सांगितले.
'प्रहार'च्या वतीने आयोजित केलेल्या 'रंगारंग-२०१३' या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ निर्माते अशोक हांडे, महाराष्ट्र राज्य सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष फ. मु. शिंदे, ठाणे पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र फाटक, उपजिल्हाधिकारी कृष्णा जाधव, ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले, 'प्रहार'च्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे कार्यकारी संपादक शशिकांत सावंत, सिंधुदुर्ग आवृत्तीचे निवासी संपादक संतोष वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण राणे यांच्यामुळे कोकणाचा औद्योगिक विकास झाला आहे, असे सांगतानाच कोकणात जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय आणि सहापदरी रस्ते व्हावेत यासाठी नारायण राणे आणि डॉ. निलेश राणे यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन हांडे यांनी केले. हांडे यांच्या हेलिकॉप्टर आणि सहापदरी रस्त्यांचा धागा पकडत 'पश्चिम महाराष्ट्रातला माणूस जेव्हा कोकणात येतो तेव्हा आपली सोय कशी करून घेतो ते हांडेंच्या भाषणातून कळले,' असा टोला डॉ. राणे यांनी लगावला. त्याला संपूर्ण सभागृहाने जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला.
'लोककला व लोकसंस्कृती' यांचे जतन केल्याने ख-या अर्थाने मराठी संस्कृती टिकणार आहे. 'प्रहार'च्या माध्यमातून आयोजित केलेला हा लोककलांचा जागर नक्कीच मराठी संस्कृती पुढील पिढय़ांपर्यंत नेणारा ठरेल, असा विश्वास 'प्रहार'चे संपादक महेश म्हात्रे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन 'प्रहार'च्या रत्नागिरी आवृत्तीचे निवासी संपादक मनोज मुळ्ये यांनी केले. या कार्यक्रमाला हजारो रसिकांनी प्रतिसाद देऊन लोककलांचा आस्वाद घेतला.

Read More »

रत्नागिरीतील तरुण बनवताहेत 'हायस्कूल'

रत्नागिरीतील काही तरुण कलाकारांनी एकत्र येऊन 'हायस्कूल' हा लघुपट तयार करण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरी – मुळातच कलासक्त असणा-या कोकणाने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अनेक कलाकार दिले आहेत. एक पिढी प्रगतीच्या पाय-या चढत असताना दुसरी पिढी त्यांची जागा घेण्यासाठी येते, ही बाब कलेच्या प्रांतात कोकणाने अनेकदा सिद्ध करून दाखवली आहे. आताची तरुण पिढीही त्याला अपवाद नाही. रत्नागिरीतील काही तरुण कलाकारांनी एकत्र येऊन 'हायस्कूल' हा लघुपट तयार करण्यास सुरुवात केली आहे.
या लघुपटाने प्रारंभाच्या आधीपासूनच 'फेसबुक'वर असंख्य 'लाइक' आणि शुभेच्छा मिळवल्या आहेत. 'हायस्कूल' हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. या लघुपटातून विद्यार्थी त्यांच्या 'हायस्कूल'च्या दिवसांतील किस्से, व्यथा, त्यांचे अनुभव मांडणार आहेत. शाळा, कॉलेजचा पहिला दिवस प्रत्येकासाठी निरनिराळे अनुभव देणारा असतो.
काळाबरोबर विद्यार्थी घडत जातो, तरीही मोठा झाल्यावर हे अनुभव, आठवणी मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असतात. याच आठवणींना या लघुपटातून उजाळा मिळणार आहे. या लघुपटाचे लेखन, निर्मिती, तांत्रिक बाजू, कलावंत हे सारे काही स्थानिक तरुणांनीच आपल्या खांद्यावर घेतले आहे. चित्रपटातील एखादा प्रसंग किंवा एखादी घटना बघताना आपणही नकळत आपल्या भूतकाळात जाऊ, असा विश्वास कथेचा लेखक आणि निर्माता वेद राऊत याने व्यक्त केला आहे. 'लाइफ ऑफ स्कूल-हायस्कूल' अशी या चित्रपटाची वन लाइन स्टोरी सांगता येईल. शाळकरी मुलांच्या जीवनातील घुसमटीवर यात प्रकाश टाकला जाणार आहे. 'मोशन व्हीडिओ- रत्नागिरी' प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन ओंकार पंडित करत असून छायाचित्रणाची धुरा परेश राजिवले आणि त्यांचा सहकारी अनिकेत दुर्गवली याने सांभाळली आहे. कला दिग्दर्शन वजीर अमीनगड हे कला दिग्दर्शक असून गीत- संगीत अभिजीत नांदगावकर याचे आहे.
या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे येथील गणपतीपुळे, गणेशगुळे, देव भैरी मंदिर, भगवती किल्ला, मिरकरवाडा बंदर, भाट्ये-राजिवडा, साखरतर, थिबा पॅलेस आदी ठिकाणी होणार आहे. याचे सहदिग्दर्शन अल्पना जोशी करणार असून, कास्टींग डिरेक्टर म्हणून सागर चव्हाण जबाबदारी सांभाळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश मोरे, नरेश मोरे, अक्षय शिंदे, शिवम आंबुलकर, अक्षय केळवणकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या आरंभाचे चित्रीकरण भैरी मंदिरात करण्यात आले असून, यावेळी दीपक राऊत, सुधाकर सावंत, प्रताप सावंतदेसाई, काका तोडणकर, मुकेश गुप्ता, भाई राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More »

सिफावर गोव्यामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

जन्मजात पोटाचा दुर्धर आजार जडलेल्या सिफो शेखवर यशस्वी  शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रहारने सिफोला मदतीचा हात दिला.
साटेली- भेडशी – शांत, अभ्यासात हुशार, अशी साटेली भेडशी येथील सिफो परवेझ शेख ही मुलगी नियतीच्या अनोख्या फे-यात सापडली होती. जन्मताच तिला पोटाचा आजार जडला. हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रियेची गरज होती. यासाठी सुमारे लाखभर रुपये खर्च येणार होता. 'प्रहार'ने तीची व्यथा मांडल्यानंतर तालुक्यातील अनेक दानशुरांनी मदतीचा हात पुढे करीत सिफाच्या कुटुंबाला मदत केली. यामुळेच तिच्यावर मणिपाल- पणजी- गोवा येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दानशुरांबरोबरच सिफाच्या कुटुंबियांनी दैनिक 'प्रहार'चे आभार मानले आहेत.
शेख यांच्या साडेचार वर्षीय मुलीला पोटाच्या आजाराने ग्रासले होते. आईवडील अत्यंत गरीब, दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शिखाला जडलेला आजार अनोख्या स्वरूपाचा होता. उन्हाळ्यात तिच्या पोटावरील त्वचा जखमेचे रूप घेत असे. एका बाजूने उन्हाच्या झळा त्यामुळे जखम आणखीनच चिघळत होती.
कुटुंबाची परीस्थिती बिकट असल्याने या मुलीला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. 'प्रहार'ने त्या मुलीची व्यथा मांडल्यानंतर समाजातील सर्व स्तरातून उपचारासाठी मदत झाली. त्यामुळेच तिच्यावर महागडी शस्त्रक्रीया करणे शक्य झाले. या मुलीला जिल्हा मुस्लीम समाज उत्कर्ष समिती अध्यक्ष मुस्ताक शेख, प्रा. अन्वर खान, बाबा खतिफ यांनी सहकार्य केले. शिवाय तालुक्यातील प्राथमिक शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनीही मदतीचा हात पुढे केला होता.

Read More »

केसरी-फणसवडेचा रस्ता आंबोली घाटाला पर्याय

आंबोली घाट मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून केसरी-फणसवडे या रस्त्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.
सिंधुनगरी – आंबोली घाट मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून केसरी-फणसवडे या रस्त्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. हा रस्ता सध्या वापरात असून या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती केल्यास कमी खर्चामध्ये हा पर्यायी रस्ता उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी दिली.
आंबोली घाट मार्ग असुरक्षित बनला आहे. तसेच पावसाळय़ात हा घाट कोसळण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे पर्यायी मार्गाची मागणी होत होती. म्हणूनच केसरी-फणसवडे पर्यायी मार्ग सुचविण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांनी स्वत: या मार्गाची पाहणी केली आहे. या रस्त्यामध्ये वनखात्याचे तीन किमी. एवढेच क्षेत्र येत असून रस्तारुंदीकरणासाठी केवळ एक हेक्टर क्षेत्राचीच आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रश्नही सुटू शकतो. त्यामुळे या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
आंबोलीसह करूळ-भुईवाबडा, फोंडा या सर्वच घाट रस्त्यांच्या दुरुस्ती व कोसळणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या कामांना आरंभ झाला आहे. आगामी पावसाळा लक्षात घेऊन घाटरस्ते सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे. पावसाळय़ामध्ये घाटरस्ते बंद होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येत आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.
सिंधुदुर्गची ई-ऑफिसची यशाकडे वाटचाल
ई-ऑफिससह अन्य उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा सध्या राज्यात नंबर 'वन'वर आहे. हे यश सातत्याने टिकावे व हा जिल्हा राज्यात कायम प्रथम राहावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत या प्रणालीवर २० हजार फाइल्स व ४० हजार अर्ज संगणकीकृत होत हाताळण्यात आले आहेत. ही प्रणाली नवीन असली तरी या जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आगामी काळातही ही प्रणाली यशस्वी ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

Read More »

विदेशी पर्यटकांना कोकणी निसर्गसौंदर्याचे आकर्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे.
मसुरे - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यापैकीच एक म्हणजे मालवण तालुक्यातील हडी गावातील कालावल खाडीमधील पाणखोल जुवा बेट आहे. येथे येणा-या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, नीरव शांतता, मोकळेपणा या ठिकाणी अनुभवता यावा, यासाठी ग्रामस्थांकडून येथे विशेष प्रयत्न केले जातात. पर्यटनस्थळाची व्याख्याच या ठिकाणी बदललेली आपणाला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे केवळ भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात.
मालवणपासून केवळ नऊ कि. मी. अंतरावर कालावल खाडीमध्ये पाणखोल जुवा व बंडा जुवा ही बेटे आहेत. नारळी पोफळीच्या बागांनी नटलेल्या या निसर्गरम्य परिसरातील जुवा बेटावर ३५ घरे आहेत. तसेच पहिले ते चौथी इयत्तेपर्यंतची शाळाही आहे. हडी गावातून या बेटांवर जाण्यासाठी होडीची व्यवस्था आहे.
येथील रहिवासी सेवानिवृत्त सहायक आयुक्त शामसुंदर पेडणेकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी 'इको फ्रेंडली व्हिलेज' ही संकल्पना ख-या अर्थाने राबविण्यात येथील ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. येथे येणा-या पर्यटकांना नौकाविहाराबरोबरच मासेमारी करण्याचा, खेकडे पकडण्याचा आनंदही घेता येतो. तसेच मलईदार शहाळी, नाष्टय़ासाठी घावणे आणि रस्सा, व अस्सल मालवणी जेवण आणि राहण्यासाठी झावळ्यांच्या सहाय्याने बनवलेली झोपडी अशा प्रकारच्या विविध सेवा येथे पुरवल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी मिळत असल्यामुळे या बेटांवर पर्यटकांचा ओघ वाढत आहे.
याबाबत माहिती देताना पेडणेकर म्हणाले, बदलत्या मानसिकतेतून व नजीकच्या काळात तोंडवळी येथे होणा-या 'सी वर्ल्ड' प्रकल्पामुळे या बेटांना महत्त्व प्राप्त होणार आहे. या दृष्टीने सिंधुदुर्ग कोकणभूमी प्रतिष्ठान व सिंधुदुर्ग गाइड यांच्या माध्यमातून या बेटांच्या विकासात्मक उपाययोजना आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने पाणखोल जुवा बेट येथे 'कृषी पर्यटन' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आलेल्या पर्यटकांनी अस्सल कोकणी पाहुणचाराचा आस्वाद घेतला. ग्रामस्थांनीही ग्रामीण पर्यटन विकसित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, न्याहारी निवास योजना, कृषी पर्यटन, स्टेहोम माध्यमातून ग्रामस्थांना व बचतगटांना आर्थिक फायदा कसा होईल व गावांचे गावपण टिकवून विकास करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

Read More »

'एलबीटी'चे उत्पन्न घटल्याने महापालिका प्रशासन चिंतेत

एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कराच्या विरोधात संपूर्ण राज्यातील व्यापारी एकजुटीने आंदोलन करत आहेत.
अहमदनगर – एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कराच्या विरोधात संपूर्ण राज्यातील व्यापारी एकजुटीने आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा अहमदनगरमधील एलबीटीच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. मनपाचे एलबीटीचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे. तीन कोटींपेक्षा अधिक असणारे एलबीटीचे उत्पन्न गेल्या महिन्यात चक्क अडीच कोटींपर्यंत खाली घसरल्याने महापालिका प्रशासनाला चिंतेने घेरले आहे.
महाराष्ट्र सरकारने महापालिका क्षेत्रात जुलै २०१२ पासून जकात रद्द करून स्थानिक संस्था कर(एलबीटी) वसुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, जकातीच्या तुलनेत एलबीटीच्या वसुलीतून मिळणारे उत्पन्न बरेच कमी असल्याने महापालिका सुरुवातीपासूनच आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे एलबीटी सुरू झाल्यानंतर काही कालावधीतच महापालिका प्रशासनाने एलबीटीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. शहरात व्हॅटधारक व व्हॅटधारक नसलेले अशा सर्वच प्रकारच्या व्यापारी संस्थांची यादी तयार करून त्याची नोंदणी करून त्या माध्यनमातून उत्पन्नवाढीसाठी अधिकारी व कर्मचारी जोरदार प्रयत्न करत होते. त्याचाच परिणाम म्हणून गेले काही महिने शहरात एलबीटी वसुलीच्या माध्यमातून महापालिकेला तीन कोटींच्यावर उत्पन्न मिळू लागले होते. चांगले उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे महापालिकेसमोरील आर्थिक संकट काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता दिसू लागली होती.
दरम्यान, राज्य सरकारने मुंबई, पुणे व नागपूरसारख्या मोठय़ा शहरांमध्येही एलबीटी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात व्यापा-यांनी एक होऊन तीव्र आंदोलन सुरू केले आहे. मुंबई, नागपूरसारख्या शहरातील व्यापा-यांनी एकजुटीने बंद पाळून आपला तीव्र विरोध व्यक्त केला. तर पुण्यासारख्या शहरात आजही व्यापा-यांचा बंद सुरूच आहे. एलबीटी करप्रणालीतील जाचक अटींच्या विरोधात व्यापारी संघर्ष करत आहेत. पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या छोट्या व्यापा-यांना एलबीटीमधून सूट मिळावी, अशी व्यापा-यांची इच्छा आहे. राज्य सरकारनेदेखील सकारात्मक पवित्रा घेऊन व्यापा-यांच्या मागण्यांसंदर्भात विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल काय असेल, कोणाला एलबीटीमधून सूट दिली जाईल, याबाबत सध्या काहीही अंदाज करता येणे शक्य नाही. पण, व्यापारी आधीपासूनच सावध झाले असून त्याचा परिणाम एलबीटीच्या वसुलीवर झाला आहे.

Read More »

किराणा घाऊक मालाचा बाजार सुरू

स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या विरोधात (एलबीटी) पुणे व्यापारी महासंघाने पुकारलेल्या 'बंद'मधून दि पूना मर्चंट्स चेंबर बाहेर पडले आहे.
पुणे - स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या विरोधात (एलबीटी) पुणे व्यापारी महासंघाने पुकारलेल्या 'बंद'मधून दि पूना मर्चंट्स चेंबर बाहेर पडले आहे. सोमवारपासून मार्केट यार्ड येथील किराणा घाऊक मालाचा बाजार सुरू होणार आहे. त्यामुळे बंदमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
'दि पूना मर्चंट्स चेंबर'च्या सदस्यांनी शुक्रवारी मुंबईत राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांची भेट घेतली. या वेळी बांठिया यांनी २० हून अधिक मुद्दे मान्य केले. याबाबत अंतिम निर्णय सोमवारी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले व बंद मागे घेण्याचे आवाहन केले. त्यामुळेच चेंबरने बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पण, राज्य सरकारने आश्वासन पाळले नाही तर मंगळवारपासून पुन्हा आंदोलन सुरू करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या वेळी उपाध्यक्ष रमेशभाई पटेल, सहसचिव अशोक लोढा, माजी अध्यक्ष राजेश शहा, राजेंद्र गुगळे, दीपक बोरा, मोहन ओसवाल, कन्हैयालाल गुजराथी उपस्थित होते.
नोंदणीधारकांनी दोनदा नाही तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर ३० जूनपर्यंत विवरण पत्र भरावे, आयातीची वेगळी नोंद करावी, दंड, शिक्षा, त्यावरील व्याज हे सर्व मूल्यवर्धित कराप्रमाणेच असतील, मूल्यांकन आणि छाननीकरता मूल्यवर्धित कर प्रणालीच्या अधिका-यांच्या अधिपत्याखाली वेगळा कक्ष निर्माण करणे, त्यासाठी मार्गदर्शिका तयार करणे, खरेदीच्या पावतीवरील किमतीवर कराची रक्कम ठरवणे, गहाण खत, बँक लोन, भाडेपट्टा यांच्या नोंदणीवरील एलबीटी रद्द करणे, मुंबईमध्ये अमलात येणारा एलबीटी कायदा वेगळा असल्यास तो संपूर्ण राज्यात लागू करावा, अशा अनेक मुद्दय़ांवर एकमत झाल्याचे सेटिया म्हणाले.
एलबीटीच्या विरोधात व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू मिळत नव्हत्या. तर काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू होती. या पार्श्वभूमीवर पूना र्मचट्स चेंबर ही प्रमुख संघटना बंदमधून बाहेर पडल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Read More »

मनोरंजनातील आनंदाने आयुष्य वाढते

मनोरंजनासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी बुद्धीला मेहनतीची जोड देणे आवश्यक आहे, असे झाले तरच आपण ख-या अर्थाने जागतिक महासत्तेकडे वाटचाल करू शकू, असे मत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे केले.
राजापूर – माणसाला हवा, पाणी, अन्न यांच्यासोबत मनोरंजनाचीही गरज असते. मनोरंजनातून आनंद मिळतो. आनंदामुळे आयुष्य वाढते. मनोरंजनासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी बुद्धीला मेहनतीची जोड देणे आवश्यक आहे, असे झाले तरच आपण ख-या अर्थाने जागतिक महासत्तेकडे वाटचाल करू शकू, असे मत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे केले.
केंद्र पुरस्कृत लहान व मध्यम शहर विकास आणि राज्य वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राजापूर नगर परिषदेने सुमारे दीड कोटी खर्चून नाट्यगृह व व्यापारी संकुल उभारले आहे. या नाट्यगृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. या सोहळय़ाला खासदार डॉ. निलेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, माजी आमदार गणपत कदम, सुभाष बने, जिल्हाधिकारी राजीव जाधव, नगराध्यक्षा स्नेहा कुवेसकर, माजी नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे, काँग्रेस प्रदेश प्रवक्ते हरीश रोग्ये, उपनगराध्यक्ष संजय ओगले, उपविभागीय अधिकारी संतोष भिसे, जयश्री कदम, प्रशांत कदम, मुख्याधिकारी स्वाती घोंगडे आदी उपस्थित होते. या वेळी नाटय़गृहाचे कंत्राटदार मे. टेक्नोबिल्ट कन्स्ट्रक्शनचे जी. एच. मुलाणी, आर्किटेक्ट श्रीकांत पाटील यांचा नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी नगर परिषदेने कर कमी न करता नागरिकांनी आपल्या हाती असलेल्या रोजगाराला, व्यवसायाला कल्पतेची जोड देऊन तो वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. कर वाढला म्हणजे उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढले की आपोआपच सोयी-सुविधा वाढतील. विकास वाढेल, जीवनमान उंचावेल. कॅनडामध्ये ९८ टक्के जनता कर भरते. जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना, अमेरिका, सिंगापूरप्रमाणे आपले दरडोई उत्पन्न कसे वाढेल, याकडे पाहिले पाहिजे, ही जनता आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असे राणे म्हणाले.
राजापूर नगर परिषदेने मर्यादित आसन क्षमतेचे का होईना, एक चांगली सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये आनंद मानताना यापुढे ती अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, याकडे आपण लक्ष देऊ. नगर परिषदेने विविध १८ प्रकारांच्या नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यात नाटय़गृहाचा समावेश आहे. दिवसभर काम करताना थकलेल्या शरीराला आणि मनाला विरंगुळा मिळावा म्हणून अशी अनेक साधने नगर परिषदेने उपलब्ध केली पाहिजेत, असे सांगताना कणकवली प्रमाणे रत्नागिरी-सिंधुदुर्गात प्रत्येक तालुक्यांत मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक चित्रपटगृहे उभारण्याचा आपला मानस असल्याचे राणे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात सोयी-सुविधा उपलब्ध करत असताना त्या कोण करतेय, याची जाणीव जनतेने ठेवली पाहिजे. तसेच मी आंदोलन करणारा माणूस आहे, असे विधान करून राणे यांनी नाटय़गृहाच्या नावाच्या नमित्ताने आंदोलनाचा इशारा देणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.

Read More »

चिपळुणात वनरक्षकाची आत्महत्या

खेडमधील वनविभागाचे वनरक्षक सुरेश दत्तात्रय भोसले (४८) यांनी चिपळुणातील एका महिलेच्या घरात नायलॉनच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


संग्रहित छायाचित्र
चिपळूण – खेडमधील वनविभागाचे वनरक्षक सुरेश दत्तात्रय भोसले (४८) यांनी चिपळुणातील एका महिलेच्या घरात नायलॉनच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी सुरेश भोसलेचा घातपात झाला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने येथील वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
सुरेश भोसले हे खेड वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत होते. भरणेनाका वनविभागाच्या तपासणी नाका येथे ते काम करत होते. ते आपल्या कुटुंबीयांसमवेत खेडमध्ये राहत होते. मुलांना सुट्टी असल्याने त्यांना कोल्हापूर येथे सोडून दोन दिवसांपूर्वीच ते पुन्हा खेडमध्ये आले होते. मात्र रविवारी सकाळी ते शिवाजीनगर येथील कदम चाळीत राहणा-या एका महिलेच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत महिलेने शेजारील रहिवासी व पोलिसांना माहिती दिली. घटनेबाबत कळताच चिपळूणचे पोलिस निरीक्षक उत्तम जगदाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नामदेव जाधव, नंदकुमार पवार यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती भोसले यांच्या नातेवाइकांना दिली. पण, भोसले यांच्या नातेवाइकांनी सुरेशचा घातपात झाला आहे. त्यामुळे संबंधित महिलेवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. भोसई यांच्या नातेवाइकांच्या भूमिकेमुळे चिपळूण पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पण, सायंकाळपर्यंत भोसले यांच्या नातेवाइकांनी संबंधित महिलेविरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती.
दरम्यान, सुरेश भोसले यांची या महिलेशी काही दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. ते तिच्या घरी ये-जा करत होते. शनिवारी रात्री दोघे जेवणासाठी बाहेर गेले होते. रविवारी सुरेश भोसले हे संबंधित महिलेच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळून आले, अशी माहिती चाळीतील रहिवाशांनी चिपळूण पोलिसांना दिली. तर भोसले यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे. पण, त्यांच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाचा तपास लावणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. भोसले यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू कशाने झाला हे उघड होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Read More »

पॉलिहाउसमधील फुलशेती

जिद्द, चिकाटीला आधुनिक तंत्रज्ञान व शिक्षणाची जोड मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रात यश पायाशी लोळण घेते. बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथील महिला शेतकरी स्वाती अरविंद शिंगाडे यांनी आपल्या कृतीतून हे सत्यात उतरवले आहे. माळरान जमिनीवर दोन दशकांपासून कुसळाचे गवत उगवत होते. या जमिनीवर एमएस्सी अ‍ॅग्रोचे शिक्षण पूर्ण केलेल्या शिंगाडे यांनी पोलिस उपनिरीक्षकपदाचा राजीनामा देऊन विविध प्रकारची पॉलिहाउसची फुलशेती सुरू केली आहे. चार वर्षात पॉलिहाउससारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून त्यांनी फुलशेतीतून विक्रमी उत्पादन मिळवले आहे.
सन २००७ मध्ये स्वाती शिंगाडे पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाल्या. नाशिक येथे त्यांनी सहा महिने नोकरी केली. शेतकी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणा-या स्वाती यांचे काही केल्या नोकरीत मन रमत नव्हते. शेतीतच काही तरी करून दाखवण्यासाठी त्यांचे मन सातत्याने त्यांना बजावत होते. त्यांचे पती अरविंद शिंगाडे व दीर मिलिंद हे इंजिनीअर आहेत. मग घरची शेती पाहण्यासाठी कोणीच नव्हते. अशा वेळी स्वाती यांनी पती अरविंद यांच्याशी चर्चा करून नोकरीचा राजीनामा देण्याचा विषय काढला. स्वाती यांच्या मनातील घालमेल ओळखून अरविंद यांनी होकार दिला. शिंगाडे यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर माळरान व दगडधोंडय़ाची जमीन होती. या जमिनीत काही प्रमाणावर मशागत करून फुलशेतीसाठी पॉलिहाउसच्या युनिटची उभारणी केली.

पहिले पॉलिहाउसचे युनिट सन २००९ मध्ये उभे केले. त्यामध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन या फुलांची लागवड केली. एका युनिटसाठी त्यांना १७ लाख रुपये खर्च आला आहे. यापैकी बारा लाख रुपये बँकेचे कर्ज काढले. तर कृषी विभागाच्या (नॅशनल हॉर्टिकल्चरल मिशन) यांच्या वतीने साडेचार लाख रुपयांचे आनुदान मिळाले. ऑक्टोबर ते फेब्रुवारी व एप्रिल ते मेपर्यंत फुलांचा हंगाम असतो. या काळात एका फुलाला दहा ते बारा रुपयांचा भाव मिळतो. तर बिगर हंगामात एका फुलाला दीड ते दोन रुपये भाव मिळतो. याप्रमाणे वार्षिक सरासरी एका फुलाला तीन ते चार रुपयांचा भाव मिळतो. पॉलिहाउसच्या एका युनिटमधून सरासरी मजुरी व इतर खर्च वजा जाता सरासरी महिन्याला पंचवीस हजार रुपये शिंगाडे यांना निव्वळ शिल्लक राहतात. सध्या त्यांनी दहा पॉलिहाउसचे युनिट उभे केले आहेत.
एका युनिटमध्ये चांगले उत्पादन मिळाल्यानंतर युनिट वाढत चार वर्षात दहा पॉलिहाउसचे युनिट उभे केले. या पॉलिहाउसमुळे तेरा महिला व सहा पुरुष असे एकूण १९ लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शिंगाडे यांच्या दहा पॉलिहाउस फुलशेतीची वार्षिक उलाढाल ६५ ते ७० लाखांपर्यंत आहे. सध्या त्यांना नोकरीपेक्षाही स्वत:च्या शेतातून चांगले उत्पन्न मिळत आहे.
सध्या शिंगाडे यांनी दहा पॉलिहाउस उभारली आहेत. यामधील एका पॉलिहाउस युनिटला (एनएचबी), दोन युनिटला (एनएचएम), तर सात युनिटला (एनएचबी) अंतर्गत अनुदानासाठी प्रस्ताव पाठवला आहे. पॉलिहाउसच्या फुलशेतीला कृषी विभागाची मोलाची मदत झाली आहे. पॉलिहाउसमध्ये विविध प्रकारच्या फुलांची मजुरांकडून पॅकिंग करून पुणे, मुंबई, गुजरात, हैदराबाद, दिल्ली, राजस्थान येथील बाजाराला पाठवली जातात. पॉलिहाउस फुलशेतीसाठी कृषी विभागाने अनुदान देऊन मोलाची मदत केली. तसेच त्यांना कृषी पर्यवेक्षक पी. एस. पडारे त्यांना सहायक तसेच युनिट उभारणी व व्यवस्थापनासाठी माहिती मिळाली. शिंगाडे यांनी अल्पदरात महिलांना पॉलिहाउसचे प्रशिक्षण वर्गही सुरू केले आहेत. तीन-चार दिवसांचे प्रशिक्षण महिलांनी घेतल्यानंतर त्यांना बँक प्रकरण, अनुदान, भाजीपाला ते फुलशेतीचे व्यवस्थापन शिकवले जाते. यासाठी त्यांनी प्रशिक्षणार्थीची राहण्याची सोयही केली आहे.
ठिबक सिंचनातून पाणी व्यवस्थापन
नीरा कालव्यालगत पणदरे हद्दीत एक एकर जमीन घेऊन विहीर खोदली आहे. तसेच पॉलिहाउस असलेल्या शेतीलगत एक विहीर, एक बोअरवेल व पाणी साठवणुकीसाठी दोन ६५ हजार लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. कालव्यालगतच्या विहिरीचे पाणी शेतीपंपाद्वारे उचलून दुस-या विहिरीत टाकले जाते. आवश्यकतेनुसार दोन पाण्याच्या टाक्यांत पाणी भरून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पॉलिहाउसमधील फुलशेतीला दिले जाते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन बाष्पीभवन टळले असून मनुष्यबळावर होणारा खर्चही वाचला आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शिंगाडे यांनी १८ एकर जमीन विकत घेतली आहे. सध्या पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे.


Read More »

हिर्लोकमध्ये नाचणीची सेंद्रिय शेती

हिर्लोक येथील योगेश व आदेश परब या बंधूंनी उन्हाळी नाचणीची सेंद्रिय पद्धतीने यशस्वी लागवड केली आहे.
हिर्लोक येथील योगेश व आदेश परब या बंधूंनी उन्हाळी नाचणीची सेंद्रिय पद्धतीने यशस्वी लागवड केली आहे. नाचणीचे लागवड क्षेत्र खालावत असताना त्यांनी घेतलेले यशस्वी पीक परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. हिर्लोक परिसरात पूर्वीपासून नाचणी पीक घेण्याची मोठी परंपरा आहे. पूर्वी उभे डोंगर तोडून, जंगल जाळून डोंगरा-डोंगरामध्ये पावसाळय़ात नाचणीचे पीक घेतले जात असे. वीस-पंचवीस शेतकरी मिळून नाचणीचे पीक घेत असत. मात्र वनखात्याचे आलेले अधिनियम व रासायनिक खतांमुळे वाढलेल्या भात उत्पादनामुळे ही पद्धत बंद पडली. शेकडो वर्षाची नाचणीची समूह शेती काळाआड झाली. त्याच वेळी नाचणीची भाकरी नव्या पिढीच्या ताटातून गायब झाल्याने या शेतीला ओहोटी लागत गेली.
बदलत्या काळ प्रवाहात नाचणीला पुन्हा प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाचणीची पौष्टिकता शास्त्रीय निकषांबाबत खरी उतरल्याने नाचणीला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाचणीची भाकरी वरदान ठरत आहे. साहजिकच मुंबई-पुणेसारख्या शहरातील हा आजार असलेल्या रुग्णांकडून खास जिल्ह्यातील आप्तेष्टांकडून नाचणी मागवली जात आहे. या सर्वाचा अनुकूल परिणाम नाचणी पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. या सर्व तपशिलाचा विचार करून परब बंधूंनी उन्हाळ्यात नाचणी पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला व नियोजनबद्ध कामाने तो यशस्वीही केला.
लागवडीसाठी परब बंधूंनी नाचणीच्या स्थानिक डोंगरी जातीची निवड केली. डिसेंबरमध्ये त्यांनी नाचणीची रोपे काढण्यासाठी बियाण्याची पेरणी केली व पंचविसाव्या दिवशी रोपे काढून त्याची लागवड केली. लागवडीसाठी त्यांनी १२ गुंठ्याचे क्षेत्र निवडले होते. त्यांची चांगली नांगरणी करून शेतजमिनीत सेंद्रिय खत मिसळून घेतले. रासायनिक खतांचा शेतजमिन तसेच मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम ओळखून नाचणीची शेती पूर्णत: सेंद्रिय खतावरच करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतजमिनीत अगदी मुंग्यांची पावडर वापरणेही त्यांनी कटाक्षाने टाळले. नांगरणीनंतर जमीन लागवडयोग्य बनवल्यावर जानेवारीत ओळी पद्धतीने त्यांनी नाचणीच्या पिकाची लागवड केली. पाण्याचा योग्य पुरवठा केला. पीक जोमाने यावे म्हणून सेंद्रिय खत व गोमूत्राचा वापर केला. विविध शेतीविषयक नियतकालिकांमधून नाचणी पिकाच्या लागवड व संरक्षणाबाबत अधिक माहिती मिळवली. कडावल-हिर्लोक येथील कृषी सहाय्यक पी. व्ही. हडकर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.
पिकाचे सेंद्रिय शेती पद्धतीने योग्य नियोजन केल्याने नाचणीचे पीक जोमदार आले. नियोजन केलेल्या नाचणीची काढणी केली. १२ गुंठय़ांवर प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या पहिल्याच प्रयत्नांत त्यांना सुमारे पाच खंडी नाचणीचे उत्पन्न मिळाले. याबाबत परब बंधूंनी सांगितले की, कोणत्याही पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे ही शेतीमधील महत्त्वाची बाब आहे. त्यातून आपल्याकडील शेतकरी रासायनिक खतांच्या मोहात पडले आहेत. रासायनिक खते व औषधांचा अतिरेकी वापर शेतीला घातक आहे. सेंद्रिय खताने शेतजमिनीचा कस टिकून राहतोच व पीकही जोमदार येते. महत्त्वाचे म्हणजे सेंद्रिय शेतीवर पोसलेल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. यामुळे रोगास अशी पिके बळी पडण्याची व शेतक-याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी असते. दुसरी बाजू म्हणजे सेंद्रिय खतावर पिकलेले धान्य ग्राहकांना हवे आहे.
बाजारभावापेक्षा असे धान्य चढ्या दराने घेणारा वर्ग पुढे येत आहे. त्यामुळे मेहनतीचा योग्य भाव सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यास निश्चितच मिळते. नाचणी पीक घेताना आम्ही नेमकी ही बाब लक्षात घेतली आहे. अगदी मुंबईकर चाकरमानीही योग्य मोबदला देऊन आमच्याकडे नाचणीसाठी संपर्क करत आहेत, असे योगेश परब यांनी सांगितले. नाचणीची ताडेही दुभत्या गाई-म्हशींसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने नाचणीबरोबरच नाचणीच्या ताडाच्या माध्यमातूनही वैरणीवरील खर्च वाचवता आला. त्यामुळे शेतक-यांनी उन्हाळ्यात आवर्जून घ्यावे, असे नाचणी हे एक उत्तम पीक आहे. परब बंधूंनी याअगोदर भोपळा तसेच कारल्याचेही यशस्वी उत्पादन घेतले आहे.
सेंद्रिय शेतीवर पोसलेल्या पिकाची रोगप्रतिकारकशक्ती अधिक असते. यामुळे रोगास अशी पिके बळी पडण्याची व शेतक-याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर बाजारभावापेक्षा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या धान्याला भावही चांगला मिळतो. यामुळे शेतक-यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे.- योगेश परब, शेतकरी


Read More »

तुती लागवडीतून आदिवासींचे सबलीकरण

पारंपरिक भात आणि नागली या पिकांबरोबरच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांतील शेतकरी आता मोगरा, हळद आणि तुती लागवडीकडे वळताना दिसत आहेत़.
पारंपरिक भात आणि नागली या पिकांबरोबरच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांतील शेतकरी आता मोगरा, हळद आणि तुती लागवडीकडे वळताना दिसत आहेत़. ठाणे जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यातील आदिवासी जीवनात आनंदाचे दिवस येऊ लागले आहेत. यामुळे आदिवासींच्या आर्थिक सबलीकरणाचा नवा मार्ग सापडला आहे.
वनसंपत्तीने नटलेल्या ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील बहुतांश जनता पारंपरिक शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होती. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध राहून जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आदिवासी व शेतक-यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा यामागे प्रमुख उद्देश आहे.
ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा या तालुक्यांतील शेतक-यांनी तुतीची लागवड करून जिल्ह्यात रेशीम उद्योगाचा पायंडा घातला आहे. भातपिकाव्यतिरिक्त कोणतेही पीक घेणे शक्य नसलेल्या आदिवासी दुर्गम भागात रेशीम, मोगरा, चाफा, हळद, मत्स्य उत्पादनासाठी कृषी विभागाकडून शेतक-यांना सर्वांगीण मदत केली जात आहे. त्याद्वारे शेतक-यांनी तुतीची लागवड करण्यास जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. यासाठी शेतक-यांना अनुदानाचा हात मिळत आहे.
रेशीम उत्पादनासाठी तामिळनाडूमधून चांगल्या प्रतीचे कोष असलेल्या तुती लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतक-यांना उपलब्द्य करून देण्यात आले आह़े प्रारंभीच शेतजमिनीमध्ये तुतीची लागवड करण्यात आली. रेशीम कोष हमीभावाने खरेदी करण्याची शाश्वती शेतक-यांना देण्यात आली आहे. रेशीम कीटक संगोपनासाठी आणि शेडसाठी वेगळे अनुदान दिले जात आहे. तुती या वनस्पतीच्या लागवडीपासून रेशीम उद्योगाची सुरुवात होत़े. यामध्ये व्ही-१ व एस-१६३५ या तुतीच्या जातीच्या लागवडीतून पाल्याचे उत्पादन चांगले मिळते, असे मानले जात़े. या जाती बागायती क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आल्या आहेत़. तुतीची लागवड पावसाळय़ामध्ये करता येते. जमिनीची मशागत करून एक एका पट्ठघ्यात पाच फूट बाय दोन फूट अंतरावर तुती लागवड केली जात़े तुतीचे पहिले पीक तयार होण्यास साधारण पाच ते सहा महिने लागतात़ एकदा लागवड केलेल्या तुतीच्या झाडापासून पाच ते सहा वर्षापर्यंत पाला उपलब्ध होऊ शकतो़. कृषी विभागाच्या या मोहिमेमध्ये नेहमीच्या भातशेतीशिवाय फुलशेतीवर भर देण्यात आला आह़े. त्यामध्ये मोगरा आणि सोनचाफ्याचा सुगंध आदिवासींच्या जीवनात बहर घेऊन येणार आह़े. हळद लागवडही महत्त्वाची ठरत आह़े. एकूणच कृषी विभागाच्या या योजनांच्या माध्यमातून शेतक-यांची सामाजिक व आर्थिक विषमता निश्चितच दूर होऊ शकेल़. यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील शेतक-यांच्या जीवनात ख-या आर्थिक सुबत्ता नांदू लागली आहे.

Read More »

पंतप्रधान म्हणतात,'हिंदी-चीनी भाई-भाई'

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यात सोमवारी विविध आठ समझोता करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

नवी दिल्ली – पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यात सोमवारी दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्दयाबरोबरच विविध आठ समझोता करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
भारत आणि चीन यांच्यातील चांगल्या हितसंबंधांचा परिणाम जागतिक स्तरावरही होत आहे. दोन्ही देशांतील सीमावर्ती भागात 'शांतता आणि स्थैर्य' प्रस्थापित करण्यासाठी विशेष अधिका-यांची निवड करण्यात येईल, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

Read More »

चंडिलाच्या नातेवाईकाच्या घरावर छापे

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पोलिस कोठडीत असलेला राजस्थान रॉयल्सचा फिक्सर क्रिकेटपटू अजित चंडिला याच्या नातेवाईकाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे.

नवी दिल्ली – स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पोलिस कोठडीत असलेला राजस्थान रॉयल्सचा फिक्सर क्रिकेटपटू अजित चंडिला याच्या नातेवाईकाच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २० लाख रुपये जप्त करण्यात आले. चंडिलाला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांची कसून तपासणी सुरु आहे. चंडिलाने त्याला मिळालेले पैसे कुठे लपवले याचा शोध पोलिस घेत होते. या संशयातून पोलिसांनी  त्याच्या नातेवाईकाच्या घरावर छापा टाकला आहे.







अजित चंडिला आणखी क्रिकेटपटूंच्या संपर्कात होता


स्पॉटफिक्सिंगमध्ये आणखी काही जणांना सहभागी करवून घेण्याच्या बुकींच्या आग्रहानंतर अजित चंडिलाने आयपीएलमध्ये खेळणा-या दोन क्रिकेटपटूंशी संपर्क साधला होता.





Read More »
नक्षलवादी-पोलिस चकमक, एक ठार

हेटाळकसा जंगल परिसरात रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घातपात करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी नक्षलविरोधी अभियान राबवणा-या पोलिसांवर गोळीबार केला.
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात उपपोलिस स्थानक मालेवाडा अंतर्गत हेटाळकसा जंगल परिसरात रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घातपात करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी नक्षलविरोधी अभियान राबवणा-या पोलिसांवर गोळीबार केला. तेंव्हा पोलिसांनीसुद्धा नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारानंतर नक्षलवादी पसार झाले. त्यानंतर त्या ठिकाणी पहाणी केली असता एक नक्षलवाद्याचा मृतदेह,एक रायफल,१९ राऊंड्स, पाच राऊंड्स पिस्तूल, रॉकेट लॉन्चर आणि वायर इत्यादी साहित्य सापडले. या गोळीबारात पोलिसही किरकोळ जखमी झाला आहे.दरम्यान, मृत्यमुखी पडलेल्या नक्षलवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Read More »

द्रमुकच्या ८२ कार्यकर्त्यांना विषबाधा

द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत चिकन बिर्याणी खाल्यामुळे अंदाजे ८२ कार्यकर्त्यांना विषबाधा झाल्याची घडना घडली आहे.

संग्रहित छायाचित्र
इरोड (तामीळनाडू) – द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत चिकन बिर्याणी खाल्यामुळे अंदाजे ८२ कार्यकर्त्यांना विषबाधा झाल्याची घडना घडली आहे. या सर्वांना इरोडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
द्रमुकचे जिल्हासचिव आणि माजी मंत्री एन.के.के.राजा यांनी जिल्ह्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर कार्यकर्त्यांना जेवणात चिकन बिर्याणी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांना उलट्या आणि चक्करचा त्रास होऊ लागला. या सर्वजणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read More »

नोकरदारांना खुशखबर !

नोकरीच्या संधी उपलब्ध करणा-या एका खाजगी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विविध क्षेत्रातील कंपन्या यावर्षी सरसकट १२ टक्के पगारवाढ करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली – नोकरदारांसाठी खुशखबर! नोकरीच्या संधी उपलब्ध करणा-या एका खाजगी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विविध क्षेत्रातील कंपन्या यावर्षी सरसकट १२ टक्के पगारवाढ करण्याची शक्यता आहे.
या संस्थेने देशातील विविध क्षेत्रातील १५ कंपन्या तसेच या कंपन्यातील ३१८ प्रोफाईल्सचा अभ्यास केला. त्यानुसार, येत्या काळात कंपन्यांची भरघोस प्रगती होणार असून त्याचा फायदा कर्मचा-यांनाही होणार आहे. या कंपन्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांच्या पगारात १२ टक्के वाढ होण्याची शक्यता या अभ्यासाअंती वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह,पुणे,दिल्ली, बंगळूरु या शहरातील कंपन्यांच्या कर्मचा-यांच्या पगारात वाढ होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read More »

झैबुनिसा काझीची शरणागती

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी झैबुनिसा काझीने सोमवारी टाडा न्यायालयासमोर शरणागती पत्करली.
मुंबई – मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी झैबुनिसा काझीने सोमवारी टाडा न्यायालयासमोर शरणागती पत्करली. मुंबईच्या विशेष न्यायालयाने झैबुनिसाविरुद्ध अजामीनपात्र वॉरट बजावले होते. याप्रकरणी वैद्यकीय कारणास्तव झैबुनिसाला मुदत मिळावी यासाठी तिच्या मुलीने गेल्या आठवड्यात न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी झैबुनिसाने सोमवारी न्यायालयासमोर शरणागती पत्करली. ती आज व्हिलचेअरवरुन न्यायालयात दाखल झाली होती. न्यायालयाला दिलेल्या साक्षीत आपण निर्दोष असल्याचे तिने सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी तुरुंगात कशी राहू शकेन, असा सवाल तिने न्यायालयाला केला.
याआधी सर्वोच्च न्यायालयाने झैबुनिसाला शरणागती पत्करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. झैबुनिसाने एप्रिल महिन्यात शरणागती पत्करण्यासाठी न्यायालयाने भरीस घालू नये अशा आशयाची याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.
झैबुनिसाने आपल्याला किडनी कॅन्सर झाला असून आपल्याला सतत कोणाच्यातरी आधाराची गरज असते.त्यामुळे आपल्याला तुरुंगात ठेवू नये अशी विनंती न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत केली होती.
दरम्यान, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी झैबुनिसालाला मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. झैबुनिसाची ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत शरणागती पत्करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त प्रमाणे अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Read More »

आयपीएल विरोधात जनहित याचिका

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.

नवी दिल्ली – आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरण आणि अन्य गैरप्रकारांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
उर्वरित प्लेऑफच्या लढती स्थगित कराव्या अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. लखनऊच्या एका रहिवाशाने ही याचिका दाखल केली आहे. आयपीएलमधील फ्रेंचायजी, बीसीसीआय आणि केंद्र सरकारला प्रतिवादी बनवण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावापासून गैरप्रकाराना सुरुवात झाली आहे. यात मोठया प्रमाणावर काळापैसा गुंतला असून, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वकिल विष्णू जैन यांनी केली. सुदर्श अवस्थी यांच्यावतीने विष्णू जैन यांनी ही याचिका दाखल केली.

Read More »

मुशर्रफ यांना जामिन मंजूर

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना सोमवारी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने जामिन मंजूर केला.

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या दिवगंत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्या प्रकरणात पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना सोमवारी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने जामिन मंजूर केला.
दहालाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायाधीश चौधरी हबीब उर रेहमान यांनी मुशर्रफ यांना जामिन मंजूर केला. मुशर्रफ यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद त्यांचे वकिल सलमान सफदर यांनी केला. २००७ मध्ये झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबियांपैकी एकानेही मुशर्रफ यांना जबाबदार धरलेले नाही.
२००७ मध्ये निवडणूक प्रचारा दरम्यान झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात बेनझीर भुत्तो यांचा मृत्यू झाला होता. मुशर्रफ यांच्यावर बेनझीर भुत्तो यांना अपुरी सुरक्षा पुरवल्याचा आरोप आहे.

Read More »

"उन्हाचे चटके"

उन्हाच्या चटक्यांपासून थोडा दिलासा मिळावा म्हणून स्कार्फने चेहरा झाकून घेणा-या गुरगावमधील तरुणी.


Read More »

"जनता दरबार"

पाटण्यात आयोजित जनता दरबार कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला.


Read More »

"वॉटर राफ्टिंग"

पहलगाममधील अरु नदीत झालेल्या वॉटर राफ्टिंग स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक. काश्मीर फेस्टीव्हल २०१३ अंतर्गत ही स्पर्धा झाली.


Read More »

"सोनिया गांधी-ली केकियांग"

भारत दौ-यावर आलेले चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष आणि संपुआच्या प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेतली.


Read More »

"चेरीची बाग"

श्रीनगरमध्ये चेरीच्या बागेतून चेरी तोडणारा कामगार.



Read More »

राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी मोजा २५ रुपये

राष्ट्रपती भवन आणि प्रसिध्द मुगल गार्डन पहायला येणा-या पर्यटकांना यापुढे पंचवीस रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.

नवी दिल्ली – राष्ट्रपती भवन आणि प्रसिध्द मुगल गार्डन पहायला येणा-या पर्यटकांना यापुढे पंचवीस रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. शुल्कातून जमा होणारे पैसे मुगल गार्डनची देखभाल आणि राष्ट्रपती भवनात लोकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी खर्च करण्यातच येणार आहेत.
येत्या एक ऑगस्टपासून हे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी मुगल गार्डन उघडण्यात येते. त्यावेळी हे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही.
जे पर्यटक राष्ट्रपती भवन आणि मुगल गार्डन पाहण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणार आहेत त्यांच्याकडून हे शुल्क वसूल करण्यात येईल. तीसपेक्षा अधिक व्यक्तींच्या समूहाला या शुल्कातून काही सूट मिळणार आहे. त्याचप्रमाणे बारावर्षाखालील मुलांना नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही.

Read More »

प्रहार बातम्या – २० मे २०१३
नमस्कार प्रहार बातम्यामध्ये आपलं स्वागत…

» भारत-चीन सीमेवर शांतता आणि स्थिरतेसाठी करणार प्रयत्न
» अजित चंडिलच्या नातेवाईकाच्या घरात सापडले २० लाख
» बॉ़म्बस्फोटातील दोषी झैबुनिसा काझी टाडा न्यायालयाला शरण
» प्लेऑफ लढती स्थगित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
» आयपीएलमध्ये उद्या प्लेऑफचा पहिला सामना
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा…20052013

Read More »

'बीसीसीआय' हतबल, सट्टेबाज मोकळे

'आयपीएल'मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून याचे धागेदोरे विदर्भापर्यंतही पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांनी विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गड्डेवार याच्यासह आणखी तिघांना अटक केली आहे. हे तिघेही औरंगाबाद आणि नागपुरातून सट्टा खेळत असत.

'आयपीएल'मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून याचे धागेदोरे विदर्भापर्यंतही पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांनी विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गड्डेवार याच्यासह आणखी तिघांना अटक केली आहे. हे तिघेही औरंगाबाद आणि नागपुरातून सट्टा खेळत असत. पोलिसांनी अजूनपर्यंत अनेक सट्टेबाजांना गजाआड केले असून पोलीस या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. फिक्सिंग प्रकरणात आणखीही काही खेळाडूंना अटक होण्याची शक्यता आहे. अर्थात सट्टेबाजांचे हात दूरवर पोहोचलेले असून कायद्याचे हात जरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत असले तरी ही मंडळी अखेर कायद्याच्या कचाटय़ात कितपत सापडतात, याबाबत कायदेतज्ज्ञांना शंकाच आहे.सामना फिक्सिंग प्रकरणाबाबत पोलिसांचा या आधीचा अनुभव काही फारसा चांगला नाही. २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए याच्याविरुद्ध भारतीय फौजदारी कायद्याच्या कलम ४२० आणि १२०(बी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. पण हा गुन्हा सिद्ध करण्याइतपत पोलीस न्यायालयात पुरावा सादर करू शकले नाहीत. याच कलमांखाली आता श्रीशांत आणि इतरांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याबाबत पोलिसच म्हणत आहेत की, १३ वर्षापूर्वी आम्ही क्रोनिएविरुद्ध आरोप सिद्ध करू शकलो नाही. कलम ४२० हे फसवणुकीसंबंधात व १२०(बी) हे कलम अप्रामाणिकपणाबद्दल आहे. आधीच ही कलमे फिक्सिंगच्या गंभीर प्रकरणात फारशी कडक नाहीत. त्यात पोलीस पुरावेही सादर करू शकले नाहीत. त्यातच आणखी वाईट गोष्ट ही की, त्याच वेळी परकीय चलन नियंत्रण कायद्याच्या (फेरा) ठिकाणी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) आणण्यात आला. त्यामुळे क्रोनिएविरुद्धच्या खटल्यातील उरलासुरला दमही संपला.उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि सरकार सामना आणि स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी प्रभावी व कडक कायदा करण्याच्या दिशेने पावले टाकू शकले नाहीत. श्रीशांत याच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी कारवाई करण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी धाड टाकून श्रीशांतचा लॅपटॉप व मोबाईल जप्त करण्यात आला. पण ही कारवाई त्याला अटक करण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी करण्यात आली. त्यामुळे त्यातील सर्व तपशील नाहीसा केला जाण्याची शक्यता आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते फिक्सिंगमधील आरोपींनी कुणाची फसवणूक केली, हे आधी सांगावे लागेल. जे प्रेक्षक सामना बघायला आहे होते ते तिकिटे काढून आले होते, त्यांची फसवणूक झाली का? की, 'आयपीएल' व्यवस्थापनाची फसवणूक झाली आहे? आरोपींवरील आरोप सिद्ध झालेच तर तो दिवाणी कायद्याचा भंग ठरेल, फौजदारी कायद्याचा नाही. तज्ज्ञांचे मत असे की, पोलिसांच्या प्राथमिक चौकशी अहवालात जे आरोप करण्यात आले आहेत व पत्रकार परिषदेत जे सांगण्यात आले आहे तो पोलिसांचा पुरावा केवळ परिस्थितीजन्य असून तो ध्वनिचित्रफितीमधील चित्रण, सांकेतिक खुणा आणि आवाजाचे नमुने यांच्यावर आधारीत आहे. कायदेतज्ज्ञांचे असेही म्हणणे असे आहे की, पोलिसांनी आरोपींना पैशाच्या देवाणघेवाणीचा पुरावा नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. हॅन्सी क्रोनिए व अन्य आरोपींविरुद्धच्या खटल्यातही पोलीस सबळ पुरावा सादर करू शकले नाहीत. क्रोनिए तर खटला चालू असताना विमान अपघातात मृत्युमुखी पडला. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती धिंग्रा त्यावेळी म्हणाले होते की, 'केवळ कडक कायदाच सामना निश्चितीला पायबंद घालू शकेल. क्रोनिएसंबंधात पोलीस आरोपपत्र सादर करू शकले नाहीत, ही खेदाची बाब आहे. 'आता तर या फिक्सिंग प्रकरणात खूपच गुंतागुंत निर्माण झालेली आहे. कारण या प्रकरणात हा सट्टा चालवणारे बडे माफिया तर आहेतच, पण राजकारणाशी संबंधित काही मंडळी तसेच क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधित बडय़ा हस्ती व 'आयपीएल'मध्ये खेळणाऱ्या या संघांचे मालक या मागे असण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण कितपत तडीस जाते, हे पाहावे लागेल, असेही मत काही कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत व त्यात अगदीच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही. क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ असल्याने व तो खेळणाऱ्या खेळाडूंभोवती मोठे वलय असल्याने या खेळावर हजारो कोटींचा सट्टा खेळला जातो, हे काही गुपित राहिलेले नाही. क्रिकेट नियामक मंडळाच्या सदस्यांना याची पुरेपूर कल्पना आहे. श्रीशांत आणि मंडळींचे हे नवे वादळ घोघावू लागताच 'आयपीएल' आणि 'बीसीसीआय' या वादळात सापडले आहेत व त्यांच्यावर टीकाही होत असल्यास नवल नाही. 'बीसीसीआय'ने हा सट्टा रोखायचा प्रयत्न करायला हवा, असे क्रिकेट जगतातील लोक बोलू लागले आहेत. पण याबाबतीत मंडळाने हात वर करून आपली हतबलता व्यक्त केली आहे. या संबंधात मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सट्टेबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कायदा नसल्याने फिक्सिंग रोखण्याच्याबाबतीत आम्ही हताश आहोत. हे सांगतानाच श्रीनिवासन यांनी 'बीसीसीआय', 'आयपीएल'मधील भ्रष्टाचार तपासण्यासाठी कठोर उपाययोजना राबवणार असल्याचेही सांगितले. श्रीनिवासन यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी खेळाडूंच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे, प्रत्येक संघाबरोबर सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे, भ्रष्टाचारविरोधी अधिकारीही संघाबरोबर असणार आहेत, खेळाडूंच्या एजंटांना नोंदणी बंधनकारक असणार आहे, वगरे उपाययोजनांची यादी दिली आहे. पण यात मुख्य गोम अशी की, क्रिकेटवर होणारा सट्टा रोखण्याचे प्रभावी उपाय व अधिकार मंडळाकडे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. श्रीनिवासन यांनी आपली हतबलता व्यक्त करताना कायद्याच्या अनुपलब्धतेकडेच बोट दाखवले आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. याचा अर्थ त्यांनी चेंडू सरळ सरकारकडे टोलवला आहे. हा चेंडू सरकारकडे टोलवताना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ही खासगी संघटना आहे, आम्हाला सरकारकडून कोणताही निधी मिळत नाही. त्यामुळे मंडळ माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाही, असाही युक्तिवाद श्रीनिवासन यांनी केला. म्हणजे आपली स्वायत्तता आणि आपले अधिकार जपण्यासाठी 'बीसीसीआय' जागरुक आहे, असेच दिसून येत आहे हे विशेष. क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्याबाबत मात्र त्यांनी सरकार व पोलिसांकडे बोट दाखवले आहे. अर्थात आज क्रिकेटमध्ये काय चालले आहे, याची सरकारला चांगली जाणीव आहे. क्रिकेट सामन्यांमधील फिक्सिंग प्रकरण उफाळून आल्याने आता ते रोखण्यासाठी केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीला लागले आहे, ही उचित बाब होय. याबाबत क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करून कायद्याचा मसुदा करण्यात येईल, असे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे. हा कायदा नजीकच्या भविष्यात अस्तित्वात येईल, यात वाद नाही. परंतु केवळ कायदा येऊन उपयोग नाही. त्या कायद्याची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी होण्याची सर्वाची अपेक्षा आहे. पण त्याहीपेक्षा सर्व क्रिकेटपटूंनी या पुढे खेळाला व आपल्याला बट्टा लागणार नाही, असे वर्तन ठेवण्याची नितांत गरज आहे.


अभियंता महासंघाचे 'कथाकथन'


सरकारी आणि निमसरकारी आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या 'सुरस आणि सरस' कथा आपण नेहमीच ऐकत व वाचत असतो. चित्रपटातील भ्रष्टाचाराची दृश्ये व त्यातील आकडे फिके व सपक वाटावेत, असे एकाहून एक वरचढ किस्से आपल्या अवतीभोवती प्रत्यक्षही घडत आहेत व त्या किश्शांनी आपले डोके अक्षरश: भणाणून जात आहे.
Read More »
रिव्हर्स स्विंग, २१ मे २०१३

क्रिकेटच्या मैदानात घडलेले रंजक किस्से 
१७८७
लॉर्ड्स मैदानावर पहिला चेंडू टाकला गेला! थॉमस लॉर्ड यांनी लंडनमधील डॉर्सेट स्क्वेअर येथील जमीन भाडेपट्टीवर दिली, तीवर सुरुवातीचे लॉर्ड्स मैदान उभे राहिले. सध्याचे लॉर्ड्स मैदान सेंट जॉन्स वुड येथे १८१४मध्ये उभे राहिले.

१८६३
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर जॅक लियॉन्स यांचा जन्म. ते १४ कसोटी सामने खेळले. वेगवान गोलंदाजांविरुद्ध उत्कृष्ट खेळायचे, पण फिरकी गोलंदाजांसमोर नांगी टाकायचे.

१८६७
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशा दोन्ही देशांकडून खेळलेले प्रतिभावान डावखुरे वेगवान गोलंदाज जे. जे. फेरिस यांचा जन्म. पहिले ८ कसोटी सामने ते ऑस्ट्रेलियाकडून खेळले. १८८६-८७च्या हंगामात सिडनीतील एका कसोटीत फेरिस यांच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव ४५ धावांमध्येच उखडला गेला. कारकीर्दीतला अखेरचा म्हणजे नववा कसोटी सामना ते इंग्लंडकडून खेळले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याही सामन्यात त्यांनी १२ विकेट्स घेतल्या. ९ कसोटी सामन्यांमध्ये १२.७०च्या सरासरीने घेतलेल्या ६१ विकेट्स फेरिस यांच्या भेदकतेची साक्ष पटवतात. पण ते अल्पायुषी ठरले. ३३व्या वर्षीच त्यांना मृत्यूने गाठले.

१८९३
इंग्लिश कर्णधार आर्थर कार यांचा जन्म. ११ कसोटी सामन्यांमध्ये त्यांना केवळ एक अर्धशतक झळकवता आले. पण इंग्लंड आणि नॉटिंगहॅमशायर कौंटीचे एक खमके कर्णधार म्हणून कार प्रसिद्ध होते. ताठ कण्याचे आणि ताठ व्यक्तिमत्त्वाचे कार एक बेधडक कर्णधार होते आणि आपले निर्णय राबवताना त्यांना कोणाचाही विरोध झालेला खपत नसे. कार यांचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे, त्यांनाच 'बॉडीलाइन' डावपेचाचे जनक मानले जाते. कारण १९३२मध्ये ऑस्ट्रेलियन दौ-याच्या आधी संपलेल्या कौंटी हंगामात कार यांनी नॉटिंगहॅमशायर संघातील दोन गोलंदाजांकडून 'बॉडीलाइन' तंत्र घोटवून घेतले होते आणि ते यशस्वीही ठरले होते. ते दोन गोलंदाज होते हेरॉल्ड लारवुड आणि बिल व्होचे! हेच दोन गोलंदाज पुढे ऑस्ट्रेलियाचे त्या मालिकेतील कर्दनकाळ बनले.

१९९३
एजबॅस्टन येथील एका वनडे सामन्यात इंग्लंडच्या रॉबिन स्मिथने ऑस्ट्रेलियान गोलंदाजांची धुलाई करत १६३ चेंडूंमधेच १६७ धावा चोपल्या. इंग्लंडच्या वतीने वनडेतली ती सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. पण तरीही तो सामना इंग्लंडने गमावला. त्यावेळी हरलेल्या संघातर्फे बनवली गेलेली ती सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.

१९९७
सइद अन्वरचा विक्रमी रौद्रावतार आणि भारतीयांची दाणादाण. इंडिपेंडन्स कप स्पर्धेतील चेन्नईला झालेल्या त्या सामन्यात सइद अन्वरने विक्रमी १९४ धावा केल्या. त्यावेळी ती वनडे इतिहासातली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. सइदच्या त्या धावा अवघ्या १४६ चेंडूंमध्ये बनल्या. त्यावेळी पाकिस्तानी संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला ३९च्या पलीकडे मजल मारता आली नव्हती. सइदच्या खेळीत २२ चौकार आणि ४ षटकार होते. त्याने अनिल कुंबळेला सलग तीन षटकार चढवले.

Read More »

राशिभविष्य, २१ मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…
मेष : परस्परांना समजून घेण्यातून एकी दृढ होईल.



वृषभ : जनमानसात आदरणीय असाल.

मिथुन : अभ्यासाचे तंत्र समजावून घ्याल.
कर्क : आज तुम्ही भाग्यवान ठराल.

सिंह : ज्ञानदानातून सुस्कार कराल.

कन्या : दानधर्म कराल.
तूळ : खर्चाच्या वेळी हात आखडता घ्याल.

वृश्चिक : वैवाहिक जोडीदारास लाभ होतील.

धनू : औषधांचा चांगला परिणाम जाणवेल.

मकर : सर्व येणी वसूल होतील.

कुंभ : तुमचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होईल.

मीन : पुकाचा सल्ला देणारे खूप भेटतील.

Read More »

एलबीटी विरोधातील व्यापा-यांचा संप मागे

महाराष्ट्रातील व्यापा-यांच्या काही गटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर स्थानिक संस्था कराविरोधात पुकारलेला संप मागे घेतला आहे.

मुंबई – महाराष्ट्रातील व्यापा-यांच्या काही गटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर स्थानिक संस्था कराविरोधात पुकारलेला संप मागे घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास व्यापा-यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. व्यापा-यांनी संप मागे घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नवीमुंबई आणि ठाण्यातील व्यापा-यांनी संपातून माघार घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यापा-यांना कायद्यात आवश्यक तरतुदी करण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्रातील व्यापा-यांचा एलबीटी विरोधात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून संप सुरु होता. राज्यातील २५ ते २६ महापालिकांमध्ये जकातीच्या जागी एलबीटी लागू करण्यात येणार आहे.

Read More »