Monday, May 20, 2013

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS »

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » विज्ञान तंत्रज्ञान
गुगलची मॅप क्षेत्रात क्रांती

गुगलच्या मॅप क्रांतीमुळे आता युजर्सला मॅप, गुगल मॅपिंग तसेच इनडोअर फोटो पहाणे, आदी सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
सॅन फ्रॅन्सिस्को- तुमच्यासाठी एक खास आनंदाची बातमी आहे. मॅप क्षेत्रातील स्पर्धेमुळे गुगलने आठ वर्षांपुर्वी सुरु केलेल्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा केल्या आहेत. यामुळे युजर्सला मॅप, गुगल मॅपिंग तसेच इनडोअर फोटो पहाणे, आदी सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
नव्या प्रणालीमध्ये युजर्सने मॅप सर्व्हिस सुरु केल्यावर सर्व प्रथम नेहमीच्या गोष्टी उदा.घर, हॉटेल्स कोठे आहेत, हे चुटकीसरशी पहाता येईल. गुगल सर्च, हिस्टरी, गुगल प्लस आणि जीमेल मधून गोळा केलेल्या माहि्तीच्या आधारे या गोष्टी दाखवल्या जाणार आहेत. तसेच या बाबत आणखी सर्च केल्यानंतर त्या ठिकाणाची विस्तृत माहिती दाखवली जाणार आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीने त्या ठिकाणास भेट दिल्यास आता ते देखील या मॅप मध्ये कळणार आहे. याद्वारे ज्या ठिकाणी जायचे असेल तेथील संबंधीत माहिती व फोटो यांची माहिती यात्रेकरुंना मिळणार आहे.
नव्या मॅपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ३ डी इमेज दिसणार आहे. त्यामुळे एखाद्या शहराचा संपुर्ण नकाशा आणि झूम केल्यावर त्या ठीकाणाची इत्यंभूत सर्व माहिती पहायला मिळेल. झूम इन आणि झूम आउटची सोयही गुगलने केली आहे. या आधारे सुर्य, पृथ्वी, तारे व ग्रहांचा आनंद घेता येईल. सध्यातरी सर्वसामान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नसली तरी map.google.com/preview या संकेतस्थळावर जाउन स्वतःला आमंत्रित करुन या सेवेचा लाभ घेता येईल.

Read More »

'दुस-या पृथ्वी'ची शोधमोहीम संकटात

पृथ्वीसारख्या दुस-या ग्रहांचा शोध घेण्यासाठी अंतराळात पाठवलेल्या नासाच्या केप्लर या अंतराळयानात झालेल्या बिघाडामुळे, ग्रहांची ही शोधमोहीम संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
पृथ्वीसारख्या दुस-या ग्रहांचा शोध घेण्यासाठी अंतराळात पाठवलेल्या नासाच्या केप्लर या अंतराळयानात झालेल्या बिघाडामुळे, ग्रहांची ही शोधमोहीम संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या अंतराळयानाने या मोहिमेअंतर्गत आपल्या सौरमालेबाहेरील पृथ्वीसारखे असू शकणारे काही महत्त्वाचे ग्रह शोधले होते. मात्र, या अंतराळयानातील दुर्बिणीला नियंत्रित करण्यासाठी असलेल्या चाकांमध्ये(फ्लायव्हील किंवा रिअ‍ॅक्शन व्हील) बिघाड झाल्यामुळे हे अंतराळयान यापुढे काम करू शकणार नाही.
या अंतराळयानातील दुर्बिणीला अंतराळातील एखाद्या ग्रहावर किंवा आकाशगंगेमधील ता-यांच्या समूहावर रोखून त्यांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी आतील परावर्तक व इतर उपकरणांचे चलनवलन या चाकांद्वारे केले जाते. अशा प्रकारची नियंत्रण करणारी चार चाके या यानामध्ये असून त्यापैकी किमान तीन चाके काम करण्याच्या स्थितीत असावी लागतात. मात्र, गेल्या वर्षी जुलै महिन्यात या अंतराळयानातील एक चाक निकामी झाले होते. त्यानंतर आता दुसरे चाकही निकामी झाल्यासारखे वाटत आहे. जोपर्यंत हे चाक पुन्हा काम करू लागत नाही तोपर्यंत सौरमालेबाहेरील ही शोध मोहीम पुन्हा सुरू होऊ शकणार नाही, असे केप्लरचे मुख्य संशोधक बिल बोरुकी यांनी सांगितले आहे. तीन चाकांशिवाय या प्रतिमा मिळवण्याचा प्रयत्न करता येईल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या अंतराळयानाबरोबर या आठवडय़ात १४ मे रोजी दुस-यांदा संपर्क प्रस्थापित केल्यावर हे यान सुरक्षित प्रणालीवर (सेफ मोड) काम करत असल्याचे आढळले. त्याचे मूळ कारण अद्याप समजले नसले तरी यांत्रिक हालचालींमधील दोष यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
ज्या वेळी या यानातील नियंत्रण चाकावर लक्ष केंद्रित करण्यात आले त्या वेळी या चाकाला पूर्ण ऊर्जा दिल्यानंतरही ते फिरत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे या चाकामध्ये अंतर्गत बिघाड झाल्याची शक्यता आहे. सध्या हे यान सुरक्षित प्रणालीवर ठेवण्यात आल्याचे नासाने सांगितले आहे. हे यान पुन्हा सुरू करण्यासाठी पुढील अनेक दिवस किंवा आठवडे इतर पर्यायांची चाचपणी करण्यात येईल. त्याला चाके व जोरदार धक्का (थ्रस्ट) या दोन्ही प्रणालींच्या माध्यमातून सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील. या यानात सध्या पुरेसे इंधन असून ते पुढील अनेक महिने चालू शकेल, असे नासाचे म्हणणे आहे. निकामी झालेल्या दुस-या चाकामुळे हे यान पूर्वीइतक्या सुस्पष्ट प्रतिमा मिळवू शकेल असे वाटत नाही. मात्र, त्याच्याकडून होत असलेली माहिती गोळा करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे नासाने स्पष्ट केले आहे.
६० कोटी डॉलर(सुमारे ३००० कोटी रुपये) खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत या यानाचे २००९मध्ये प्रक्षेपण करण्यात आले होते. दुस-या पृथ्वीचा शोध घेताना तशा प्रकारचे २७०० संभाव्य ग्रह या यानाने शोधले असून त्यापैकी काही ग्रह तर मानवी वसाहतीसाठी अनुकूल असल्याचे मानले जात आहे. केप्लरने साडेतीन वर्षाची प्राथमिक मोहीम पूर्ण केल्यावर नोव्हेंबर २०१२ मध्ये वाढीव मोहिमेचे काम सुरू केले होते.

Read More »

मोबाइलची मागणी सुस्तावली

मोबाइलमध्ये दिवसागणिक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असले तरी मोबाइलच्या विक्रीमध्ये मात्र फारशी वाढ झालेली नाही.
मुंबई- मोबाइलमध्ये दिवसागणिक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असले तरी मोबाइलच्या विक्रीमध्ये मात्र फारशी वाढ झालेली नाही. पहिल्या तिमाहीत मोबाइलच्या जागतिक विक्रीत केवळ ०.७ टक्क्याची वाढ झाली असून मंदीची झळ मोबाइल बाजारपेठेलाही बसू लागली आहे.
जानेवारी ते मार्च या तिमाहीत जागतिक बाजारपेठेत ४२ कोटी ५८ लाख मोबाइल फोन्सची विक्री झाली असल्याचे गार्टनरने आपल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ४२ कोटी २९ लाख मोबाइलची विक्री करण्यात आली होती.
गेल्या तिमाहीत सॅमसंगने विक्रीमध्ये नेहमीप्रमाणे बाजी मारली आहे. सॅमसंगने १० कोटी ०६ लाख मोबाइल विकले असून बाजारातील हिस्सा २३.६ टक्क्यांवर गेला आहे. तर त्याखालोखाल नोकिया असून कंपनीने सहा कोटी ३२ लाख मोबाइल फोन्सची विक्री केली. आयपॅड उत्पादक अ‍ॅपललाही या तिमाहीत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या तीन महिन्यांत कंपनीने केवळ तीन कोटी ८३ लाख मोबाइलची विक्री केली. त्याचबरोबर एलजी एक कोटी ५६ लाख, झेडटीई १ कोटी ४६ लाख आणि सोनीने ७९ लाख मोबाइलची विक्री केली असल्याचे गार्टनरने आपल्या अहवालात म्हटले आहे. फीचर फोनची विक्री घटल्याने नोकियाला फटका बसला आहे.
युरोप आणि अमेरिकेतील विक्रीमध्ये ३.६ टक्क्यांची घट झाली आहे. तसेच जपानमधील मोबाइलची विक्रीही ७.३ टक्क्यांनी कमी झाली. आशिया आणि प्रशांत क्षेत्रात तब्बल ५३ टक्के मोबाइलची विक्री झाली असून त्याचा परिणाम एकूण विक्रीवर झाला असल्याचे गार्टनरचे प्रमुख संशोधक अंशुल गुप्ता यांनी सांगितले. स्मार्टफोनलाच ग्राहकांची पसंती असून एकूण विक्रीत स्मार्टफोनचा ४९ टक्के वाटा होता. तर फीचर फोनच्या विक्रीत मात्र २२ टक्क्यांची घट झाली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अँड्रॉइड आणि आयओएस या दोनच कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र फायरफॉक्स आणि टिझेन यांसारख्या नव्या ऑपरेटिंग सिस्टीम ग्राहकांना काही प्रमाणात आकर्षित करतील, असा अंदाज आहे. – अंशुल गुप्ता, प्रमुख संशोधक, गार्टनर

Read More »

'जीमेल'ची मर्यादा १५जीबी वर

जी ड्राईव्ह, जीमेल आणि गुगल प्लस या सर्वांना मिळून १५ जीबी जागा उपलब्ध करुन देत गुगलने आपल्या युझर्ससाठी खुष खबर दिली आहे.
मुंबई- गुगलने आपल्या युझर्ससाठी खुष खबर दिली आहे. गुगल युझर्स जी ड्राईव्ह, जीमेल आणि गुगल प्लस या सर्वांना मिळून १५ जीबी जागा वापरू शकतात. यामुळे युझर्सना गुगलच्या या तिन्ही सेवामध्ये अधिक माहिती साठवून ठेवता येणे शक्य होणार आहे.
याआधी जी-मेलसाठी केवळ १० जीबीची जागा देण्यात आली होती. तर जी ड्राइव्ह आणि गुगल प्लससाठी मिळून पाच जीबी जागा देण्यात आली होती. मात्र यापुढे युझर्स या तिन्हीसाठी मिळून १५ जीबीचा वापर करु शकतो. विशेष गुगलने जीमेलची १० जीबी जागा वाढवली आहे. एखादा युझर जी ड्राईव्ह, गुगल प्लसचा वापर कमी करत असले तर या दोन्हींसाठी देण्यात आलेली जागा जी-मेलसाठी वापरु शकतो.
अधिक जागा हवी असल्यास युझर ती विकत घेऊ शकतो. युझर गुगलकडून १०० जीबीपर्यंतची जागा दहमहा ४.९९ डॉलर्स इतकी रक्कम देऊन घेऊ शकतो. याआधी गुगलकडून केवळ २५ जीबीपर्यंची जागा विकत दिली जात होती. मात्र आता ही मर्यादाही काढून टाकण्यात आली आहे.

Read More »

मिरी-टोमॅटो खा, 'पार्किनसन्स' रोखा!

मुख्यत्वे वृद्धापकाळात होणारा मेंदूसंबंधीचा 'पार्किनसन्स' आजार टाळायचा असल्यास तुम्हाला महागडा औषधोपचार करण्याची गरज नाही.
मुख्यत्वे वृद्धापकाळात होणारा मेंदूसंबंधीचा 'पार्किनसन्स' आजार टाळायचा असल्यास तुम्हाला महागडा औषधोपचार करण्याची गरज नाही. कारण रोजच्या जेवणात मिरी आणि टोमॅटोचा वापर केल्यास पार्किनसन्स रोखता येऊ शकतो, असा दावा ब्रिटिश संशोधकांनी केला आहे.
पार्किनसन्स या आजारात मेंदूच्या पेशींची हानी होते. त्यामुळे शरीरातील अवयवांमध्ये संतुलन राहत नाही. संपूर्ण शरीराच्या हालचाली पूर्णपणे मंदावत जातात. या आजारावर कायमस्वरूपी बरा करणारे औषध अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नियमित औषधे घ्यावी लागतात.
साहजिकच यासाठी बराच खर्च येतो. मात्र मिरी किंवा टोमॅटोंच्या नियमित सेवनाने यावर आळा घालता येत असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे.
यापूर्वी सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने खाल्ल्याने पार्किनसन्सचा धोका कमी होऊ शकतो, असे एका अभ्यासात समोर आले होते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या डॉ. सुसान सर्ल्स व निल्सेन आणि त्यांच्या सहका-यांनी पार्किनसन्सग्रस्त ४९० रुग्णांवर उपचार व संशोधन करून हा निष्कर्ष काढला होता. हे संशोधन अमेरिकन न्युरोलॉजिकल असोसिएशन व चाइल्ड युरोलॉजी सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.

Read More »

भारतीय दरमहा ऑनलाइन पाहतात ३७० कोटी व्हीडिओ

चित्रपटगृहात किंवा टीव्हीवर कार्यक्रम बघण्यापेक्षा भारतीय प्रेक्षक आता इंटरनेटवर व्हीडिओ पाहणे पसंत करू लागले आहेत.
चित्रपटगृहात किंवा टीव्हीवर कार्यक्रम बघण्यापेक्षा भारतीय प्रेक्षक आता इंटरनेटवर व्हीडिओ पाहणे पसंत करू लागले आहेत. भारतीय इंटरनेटवर दर महिन्याला ३७० कोटी व्हीडिओ पाहत असल्याचे जागतिक डिजिटल संशोधन कंपनी 'कॉमस्कोअर'ने जाहीर केले.
मार्च २०११ रोजी दरमहा १८६ कोटी व्हीडिओ दरमहा पाहिले जात होते. हेच प्रमाण आता ३७० कोटी व्हीडिओपर्यंत गेले. गेल्या दोन वर्षात प्रेक्षकांची संख्या ६९ टक्क्याने वाढून ५४.०२ दशलक्षावर गेली आहे.
गुगलची 'यू टयूब' ही प्रेक्षकांच्या पसंतीच्या पहिल्या क्रमांकावर असून तिचे ३१.५ दशलक्ष प्रेक्षक आहेत. तर फेसबुकचे १८.६ दशलक्ष आणि याहूचे ८.२ दशलक्ष प्रेक्षक आहेत. देशात ऑनलाइन व्हीडिओ वाढत असल्याच्या परिणामामुळे मीडिया कंपन्या आणि विपणन कंपन्यांना याचा फायदा होणार आहे, असे कॉमस्कोअरचे वरिष्ठ संचालक केदार गव्हाणे यांनी सांगितले.

Read More »

मद्यपान कमी करणारी गोळी

मद्य ही जागतिक पातळीवर मोठी समस्या झाली आहे. मद्य कसे सोडावे याचे मार्गदर्शन करणारे अनेक समुपदेशक व संस्था कार्यरत आहेत.
मद्य ही जागतिक पातळीवर मोठी समस्या झाली आहे. मद्य कसे सोडावे याचे मार्गदर्शन करणारे अनेक समुपदेशक व संस्था कार्यरत आहेत. ब्रिटनमधील एका कंपनीने मद्याचे प्रमाण कमी करणारी गोळी तयार केली आहे. ही गोळी रोज घेतल्यास मद्य पिण्याचे प्रमाण कमी होते, असा दावा कंपनीने केला.
या गोळीचे नाव 'नालमेफेन' असून ती घेतल्यास मद्यपानाचे प्रमाण ६१ टक्क्याने कमी होते. ही गोळी डॉक्टर्सच्या प्रिस्क्रीप्शननंतरच मिळणार शकेल.
क्लिनिकल चाचण्यांमध्ये ही गोळी मद्यपान कमी करण्यासाठी प्रभावशाली असल्याचे सिद्ध झाले. दिवसाला १२.२५ युनिट मद्यपान कमी करणारी व्यक्ती दिवसाला पाच युनिटपर्यंत मद्यपान करू लागली. हे प्रमाण ६१ टक्के आहे. तसेच औषधोपचाराबरोबरच समुपदेशन घेतल्यास भरपूर मद्यपानाचे प्रमाण मोठया प्रमाणावर कमी होऊ शकते.
आम्ही चाचणी केलेले रुग्ण हे कुटुंबासोबत किंवा कामाच्या ठिकाणी मद्य घेणारे होते. औषध व समुपदेशानाच्या जोरावर त्यांनी त्यांचे मद्यमान कमी झाले, अशी माहिती द लंडन स्कूल ऑफ मेडिसीनचे डॉ. डेव्हीड कॉलिअर यांनी दिली.

Read More »

वीज कोसळण्याची माहिती देणार 'अ‍ॅप्स'

अमेरिकेत वीज कोसळण्यापूर्वी माहिती देणारे 'अ‍ॅप्स' तयार झाले आहे.
पावसाळ्याच्या काळात गडगडाट होऊन वीज कोसळण्याची भीती सर्वाधिक असते. प्रचंड ऊर्जा असलेली ही वीज कोसळताच जीवित व वित्तहानी मोठया प्रमाणात होते. ही वीज कधी कोसळणार याची माहिती कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे अनेकांना आपले बहुमोल प्राण गमवावे लागतात. अमेरिकेत वीज कोसळण्यापूर्वी माहिती देणारे 'अ‍ॅप्स' तयार झाले आहे. या नवीन शोधामुळे विजेपासून अनेकांना जीव वाचवता येणे शक्य आहे.
'वेदरबग' कंपनीने हे अ‍ॅप्स बनवले असून त्याचे नामकरण 'स्पार्क' असे करण्यात आले आहे. तुमच्या परिसरात वीज कोसळणार असल्यास त्याची माहिती तात्काळ मोबाइलवर ग्राहकांना मिळू शकेल. यासाठी कंपनीने 'टोटल लायटनिंग नेटवर्क्‍स' कंपनीकडून माहिती पुरवण्याचा करार केला आहे. वीज पडल्यास त्यापासून सुरक्षित जागेची माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती 'अवरअ‍ॅमेझिंगप्लॅनेट' या संकेतस्थळाने दिली.
मोबाइलमध्ये रडार नकाशा झूम केल्यानंतर तुम्ही उभे असलेल्या स्थानाची माहिती द्यावी, त्यानंतर तुम्हाला तात्काळ वीज कुठे पडणार याची माहिती मिळू शकेल. तसेच हवामानाची विशेष माहिती पुरवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read More »

अमेरिकी विमानाचा वेगाचा उच्चांक

ध्वनीच्या वेगाने किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करणा-या विमानांना सुपरसॉनिक म्हटले जाते. मात्र, ध्वनीपेक्षा पाच पट जास्त वेगाने प्रवास करण्याची किमया एका अमेरिकन विमानाने करून दाखवली आहे.

ध्वनीच्या वेगाने किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करणा-या विमानांना सुपरसॉनिक म्हटले जाते. मात्र, ध्वनीपेक्षा पाच पट जास्त वेगाने प्रवास करण्याची किमया एका अमेरिकन विमानाने करून दाखवली आहे. हा वेग साध्य करण्यामध्ये गेल्या वर्षी या विमानाला अपयश आले होते.
मात्र, १ मे रोजी घेतलेल्या या विमानाच्या चाचणीच्या वेळी या विमानाने या वेगाने साडेतीन मिनिटे प्रवास करून ऐतिहासिक लक्ष्य साध्य केले. 'एक्स-५१ वेव्हरायडर' असे या मानवरहित विमानाचे नाव असून हे विमान बोइंग कंपनीने तयार केले आहे. त्यासाठी स्क्रॅमजेट इंजिनाचा(रॉकेट इंजिन) वापर करण्यात आला.
इतक्या वेगाने प्रवास करता येत असल्याचे या विमानाने सिद्ध केल्यामुळे ही चाचणी भावी काळातील हायपरसॉनिक संशोधनासाठी व या अतिवेगाचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा या विमान प्रकल्पाचे व्यवस्थापक चार्ली ब्रिंक यांनी व्यक्त केली आहे.
४.३ मीटर लांबीच्या या विमानाने केवळ सहा मिनिटात ५.१ मॅक(ताशी ६२४२ किमी.) हा सर्वोच्च वेग प्राप्त केला आणि या वेगाने केलेला साडेतीन मिनिटांचा प्रवास हा हवा आत खेचून रॉकेट इंधनाच्या ज्वलनाने एखाद्या विमानाने केलेला सर्वात जास्त काळाचा प्रवास आहे.


Read More »

माशीच्या आकाराच्या 'रोबो'चे नियंत्रित उड्डाण

मानवाचे श्रम कमी करणारा आणि अनेक आश्चर्यकारक कामे लीलया करणारा यंत्रमानव(रोबो) नवीन नसला तरी अतिशय लहान आकाराचा उडणारा यंत्रमानव ही संकल्पना नवी आहे.
मानवाचे श्रम कमी करणारा आणि अनेक आश्चर्यकारक कामे लीलया करणारा यंत्रमानव(रोबो) नवीन नसला तरी अतिशय लहान आकाराचा उडणारा यंत्रमानव ही संकल्पना नवी आहे. उडणा-या माशीपासून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या एका चिमुकल्या यंत्रमानवाचे हवेत नियंत्रित उड्डाण करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आले आहे. असा यंत्रमानव तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांचे गेल्या एक दशकापासून प्रयत्न सुरू होते. 'हार्वर्ड स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अ‍ॅप्लाइड सायन्सेस' व 'विस इन्स्टिटयूट फॉर बायॉलॉजिकली इन्स्पायर्ड इंजिनीअरिंग'च्या संशोधकांनी हा यंत्रमानव तयार केला आहे. माशी ज्या क्रियेने उडते त्या क्रियेचा वापर यात केला आहे. यामध्ये दोन अतिशय पातळ पंख वापरले असून हे पंख माशीप्रमाणेच एका सेकंदात तब्बल १२० वेळा फडफडत असल्याने ती क्रिया दिसत नाही.
सूक्ष्मतंत्रज्ञानाचा हा एक अभिनव आविष्कार आहे. हा उडणारा यंत्रमानव तयार करताना संशोधकांना अनेक अडचणी आल्या. या यंत्रातील एक बिघाड दुरुस्त करताना आणखी पाच समस्या निर्माण होत, असे त्यांनी सांगितले. एका बोटाच्या टोकाएवढया आकाराचे पंखाचे स्नायू सहजपणे तयार करता येत नाहीत. त्याच प्रकारे मोठे यंत्रमानव विद्युतचुंबकीय मोटरवर चालतात. पण एवढया लहान आकाराचा यंत्रमानव तयार करताना तुम्हाला दुसरा पर्याय शोधावा लागतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी यामध्ये 'पिझोइलेक्ट्रिक' तंत्रज्ञानाचा वापर केला. सिरॅमिकच्या पट्टया जेव्हा विद्युत क्षेत्राच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचे आकुंचन व प्रसरण होत असते. या गुणधर्माचा वापर करून पंख तयार करण्यात आले.
पंखांना जोडणारे सांधे तयार करण्यासाठी कार्बन फायबरमध्ये गुंडाळलेल्या प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला. या सर्व सांगाडयाच्या क्रिया नियंत्रित करण्यासाठी एक अतिशय कौशल्याने संतुलित केलेली आज्ञा प्रणाली वापरण्यात आली. प्रत्येक पंख स्वतंत्रपणे नियंत्रित करण्याची सोय करण्यात आली. लेझर किरणांचा वापर करून अतिशय अचूकपणे कापलेल्या भागांचे थर  एकावर एक रचून त्याची एक सपाट उघडझाप करणारी तबकडी तयार करण्यात आली. ही रचना विद्युतचुंबकीय मोटरवर चालणारी होती. अशा प्रकारचे आता अधिक उपयुक्त व जास्त परिणामकारक यंत्रमानव तयार करण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत.

Read More »