Thursday, September 5, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

पंजाबी-चायनीजची उडपी खासीयत!

गिरगाव नाक्यावरचं 'राजा' हे उडपी हॉटेल गेली सत्तर र्वष शाकाहारी पदार्थाची लज्जतदार 'रिफ्रेशमेंट' पुरवत आहे. काही वेगळे पंजाबी आणि चायनीज पदार्थ या हॉटेलची वैशिष्टय़ं आहेत.

मुंबईत काही वर्षापूर्वी तांबे, पणशीकर, वीरकर, जोगळेकर, टेंबे, जोशी, सरपोतदार, छत्रे वगैरे मराठी हॉटेल आणि काही भंडारी खाणावळी जनसामान्यांची भूक भागवत असत. सकाळच्या नाश्त्यासाठी इराणी हॉटेलं होती. मुंबईत उडप्यांची हॉटेल आल्यावर या दोन्ही हॉटेलांची सद्दी संपली. सकाळी नाश्तातल्या ब्रुन मस्का, ऑम्लेट-पाव, पुडिंगची जागा इडली, मेदूवडा, मसाला डोसासारख्या पदार्थानी तर श्रीखंड-पुरी, मसालेभाताच्या जेवणाची जागा रस्सम, पायसम, बटाटयाची डोशाची भाजी असलेल्या उडपी थाळीने घेतली. आज उडपी हॉटेल मुंबईच्या गल्लोगल्ली दिसतात आणि ती दाक्षिणात्य पदार्थाबरोबर पंजाबी -चायनीज असं सगळं सव्‍‌र्ह करतात. मुंबईच्या गिरगावमधील सेंट्रल सिनेमाजवळचं 'राजा रिफ्रेशमेंट' हे याच प्रकारचं उडपी हॉटेल आहे. परंतु हे हॉटेल अलीकडचं नव्हे जवळजवळ गेली सत्तर र्वष या भागातील लोकांची क्षुधाशांती करत आहे.

१९४४ मध्ये बी. अण्णा शेट्टी यांनी गिरगाव नाक्यावर हे हॉटेल सुरू केलं, तेव्हा या हॉटेलात डोसा, इडली, मेदूवडा हे पदार्थ मिळायचे. मध्यंतरीच्या काळात गिरगावमध्ये स्थित्यंतर घडून इथली लोकवस्ती बदलली. त्यामुळे आपल्या वडिलांनंतर या हॉटेलची जबाबदारी सांभाळणा-या रणजित शेट्टी यांनी १९९९ मध्ये या हॉटेलचं नूतनीकरण करून आपल्या मेन्यूत दाक्षिणात्य पदार्थाबरोबर पंजाबी आणि चायनीज पदार्थही आणले. सध्या 'राजा'मध्ये नेहमीच्या इडली-डोशाबरोबर पावभाजी, पिझ्झा आणि नूडल्स असं सगळं काही मिळतं. अर्थात, त्यातही वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न 'राजा'ने आपल्या परीने केला आहे. उदाहरणार्थ, स्नॅक्स प्रकारात या हॉटेलात शेजवान डोसा आणि शेजवान स्प्रिंग डोसा, पनीर पालक उत्तप्पम असे पदार्थ मिळतात.

जेवणासाठीच्या मेन्यूमध्ये नेहमीच्या व्हेज कोल्हापुरी, पनीर टिक्का मसाला, दाल-खिचडी या पदार्थाव्यतिरिक्त काही खास डिशेसचा आवर्जून उल्लेख कारावा लागेल. उदाहरणार्थ, दही भेंडी. या भाजीमध्ये दही आणि भेंडी मिश्रण असतं. कॉर्न कॅप्सिकममध्ये सिमला मिरचीच्या भाजीत अख्खे मक्याचे दाणे घातलेले असतात. लसुनी सब्जी ही पालकची भाजी असते, परंतु त्यात लसणाचा भरपूर वापर केला जातो. व्हेज तिरंगामध्ये व्हेज कोल्हापुरी, पनीर पसंदा आणि नवरतन कुर्मा या तीन भाज्या प्लेटमध्ये तिरंग्याच्या रंगसंगतीप्रमाणे ठेवून पेश केल्या जातात. व्हेज कबाब मसाला ही भाजी भाज्यांचे कबाब तंदूर करून ते ग्रेव्हीत टाकून दिली जाते. पनीर काळीमिरीमध्ये पनीरच्या तुकडय़ांत आलं आणि काळीमिरीची पावडर टाकलेली असते. पनीर पसंदा ही काजूची सफेद ग्रेव्ही असलेली गोड चवीची भाजी असते, तर व्हेज खिमा मटरमध्ये बारीक केलेला मटर फार घट्ट आणि फार पातळ नसलेल्या ग्रेव्हीसोबत दिले जातात. तिखट खाण्याची आवड असलेल्यांनी इथल्या पनीर अंगाराची फर्माईश करावी. ही पनीर, ढोबळी मिरची आणि टोमॅटोची झणझणीत मिश्र भाजी असते. धिंगरीमसाला हा इथला आणखी एक वैशिष्टयपूर्ण पदार्थ. ही मशरूम (अळंबी)ची लाल ग्रेव्हीतली भाजी असते.

'राजा'चं सगळ्यात मोठं वैशिष्टय म्हणजे सोयाबीनचे पदार्थ. सोयाबीन चिली, सोयाबीन पुलाव, सोयाबीन बिर्याणी, सोयाबीन इन ब्लॅक पेप्पर सॉस असे पदार्थ इथे मिळतात. यातली सोयाबीन चिली ही चवीला जवळजवळ चिकन चिलीसारखी असते. त्यामुळे नॉनव्हेज खाऊ न शकणाऱ्यांना चिकन चिली कशी लागते, हे जाणून घ्यायचं असेल तर ही सोयबीन चिली चाखायला हरकत नाही. सोयाबीन पुलाव आणि सोयाबीन बिर्याणीबद्दलही असंच म्हणता येईल.

विशेष म्हणजे, इथे मका दाल खिचडी आणि दाल खिचडी डबल तडका मारकेही मिळते. तसंच उडपी हॉटेलची ओळख असलेली थाळीही मिळते, परंतु तीही पंजाबी असते. 'राजा'चे मालक रणजीत शेट्टी सांगतात, 'हे सगळे पदार्थ आम्ही वाजवी दरात देतो, परंतु दर्जाच्या बाबतीत आम्ही अजिबात तडजोड करत नसल्याने आमचं हॉटेल इतकी र्वष लोकप्रिय आहे. आम्ही चपातीसाठीही अन्नपूर्णाचंच गव्हाचं पीठ वापरतो. अर्थात, दाक्षिणात्य पदार्थाना पूर्वीसारखी मागणी राहिलेली नाही. लोकांना पंजाबी आणि चायनीज खायला आवडतं. म्हणून आम्ही नवनव्या पंजाबी आणि चायनीज डिशचा मेन्यूत समावेश करतो.'
शाकाहारी नाश्ता आणि जेवणाचे पदार्थ यांच्यातील वेगळेपणामुळे 'राजा'मध्ये नेहमी गर्दी असते. अर्थात, या उडपी हॉटेलात आता पंजाबी आणि चायनीज पदार्थाची चवच चाखायला खवय्ये जास्त जातात.

Read More »

मासिकांच्या गल्लीत..

'मॅगझिन गल्ली' हे नाव ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. कारण एखाद्या गल्लीचं असं नाव कसं काय असू शकतं, असा प्रश्न पडतो. पण या गल्लीला असलेल्या नियतकालिकांच्या दुकानांमुळेच तिला हे पडलं आहे. भारतातल्या कुठल्याही भागातून, शहरातून प्रसिद्ध होणारी विविध भाषांतली, विविध विषयांवरील मासिकं मुंबईत सर्वप्रथम इथेच येतात.

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोरच असलेलं मॅकडोनल्ड अनेकांचं आवडतं ठिकाण. सुट्टीच्या दिवशी पिझ्झा, बर्गर खाण्यासाठी खवय्ये हमखास या मॅकडोनल्डमध्ये जातात. पण त्यालाच लागून असलेल्या 'मॅगझिन गल्ली'विषयी खूपच कमी जणांना माहीत असेल. 

'मॅगझिन गल्ली' हे नाव ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. कारण एखाद्या गल्लीचं असं नाव कसं काय असू शकतं, असा प्रश्न पडतो. बरं मॅगझिन म्हणजे नियतकालिकं, असा अर्थ लावायचा तर या गल्लीत फुटपाथवर प्रथमदर्शनी मासिकांची दुकानंही दिसत नाहीत. पण या गल्लीचं हे नाव तिथे असलेल्या नियतकालिकांच्या दुकानांमुळेच पडलं आहे. फोर्ट किंवा सीएसटी परिसरात ज्यांची कार्यालयं आहेत, त्यांनाच या गल्लीची माहिती आहे.

'मॅगझिन गल्ली' या नावाने तुम्ही ही गल्ली शोधायला गेलात तर ती सापडणं अवघड. कारण या नावाची इथे कुठलीही पाटी नाही किंवा तिथे पुस्तकांचा, मासिकांचा विशिष्ट प्रकारचा सुवासही येत नाही. नाही म्हणायला मॅकडोनल्डच्या मागच्या भिंतीवर तुम्हाला काही इंग्रजी मासिकांची पोस्टर लावलेली दिसतील. हीच काय ती यी गल्लीची खूण!

मॅकडोनल्ड आणि न्यू एम्पायर थिएटर यांच्या मधोमध ही मॅगझिन गल्ली आहे. ती इतकी चिंचोळी आहे की, तिथे एका वेळी केवळ एकच माणूस गल्लीत शिरू शकतो. या गल्लीत साधारणत: पंधरा ते वीस दुकानं आहेत. मॅगझिन गल्लीची ही ओळख केवळ दोन-चार वर्षाचीच नाही तर तब्बल चाळीस वर्षाची आहे. नवीकोरी मासिकं मुंबईत विक्रीला जाण्यापूर्वी सर्वप्रथम या गल्लीत येतात. त्यामुळे एम्पायर थिएटरच्या बाहेर टेम्पोतून मासिकांची पोती उतरवणं आणि ती दुकानांत घेऊन जाणा-या कामगारांची वर्दळ हमखास दिसते. तिथूनच आत शिरून उजव्या हाताला वळलं की, समोरच छोटे छोटे स्टॉल्स मांडलेले दिसतात. कोणाकडे पाककलेची तर कोणाकडे अर्थविषयक, कोणाकडे क्रीडा विषयावरील, तर कोणाकडे महिलांची, लहान मुलांची इंग्रजी, हिंदी किंवा मराठी अशी भाषावार मासिकं, मग ती भारतातल्या कुठल्याही भागातून, शहरातून प्रसिद्ध होणारी असोत, इथे येतात. अगदी गुजराथी, मल्याळम, तेलुगू, कन्नड या सगळ्या भाषांतली

मासिकं असतात. इथून एक फेरी मारलीत तरी कुठली मासिकं मिळतात याची कल्पना येते. विविध विषयांना वाहिलेल्या मासिकांबरोबर इथे नकाशे, डिक्शनरी, आरतीसंग्रह, रामायण-महाभारतसारखे काही पौराणिक ग्रंथ, चटपटीत चुटकुले किंवा एसएमएसची लहान लहान पुस्तकंही मिळतात. इतकंच नव्हे तर अगदी अश्लील मासिकंही दिसतात. भाज्या, भाताच्या, पनीर, डोसाच्या, चायनीजच्या अशा विविध पदार्थाच्या रेसिपीजच्या आणि फॅशन-महिलाविषयक मासिकांचा तर खजिनाच इथे सापडेल.

गेली सोळा ते सतरा र्वष या गल्लीत व्यवसाय करणारे नितीन नलावडे म्हणतात, 'चाळीसेक वर्षापासून या गल्लीत हे स्टॉल आहेत. इथे देशभरातून प्रकाशित होणारीच नव्हे तर काही परदेशी मासिकंही मिळतात. तसंच साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं, त्रमासिकं अशी सगळ्या प्रकारची मासिकं इथे सवलतीमध्ये घाऊक आणि किरकोळ स्वरूपात उपलब्ध आहेत. प्रत्येक मासिकाला वेगवेगळी सवलत मिळते. पाच-दहा रुपयांपासून ते आठशे रुपयांपर्यंतची मासिकं इथे मिळतात. 'एचबीआर' म्हणजे हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू हे इथे मिळणारं सगळ्यात महागडं मासिक आहे. इतकंच नव्हे तर सायंदैनिकंही इथे मिळतात.'

मॅगझिन गल्लीत तुम्हाला जायचं असेल तर सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारासच जायला हवं, तरच तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे मासिकं पाहता आणि विकत घेता येतात. रविवारी मात्र ही गल्ली बंद असते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment