गुंतवणूकभान : काय घ्यावे, काय विकावे, न उमजे मजला ..स्वस्थ बसावे?
काळोखाची रजनी होती हृदयी भरल्या होत्या खंती अंधारातचि गढले सारे लक्ष्य, न लक्षी वरचे तारे विमनस्कपणे स्वपदे उचलित, Read More »
वित्त-तात्पर्य : स्वाक्षरीत खूप तफावत नसेल तर बँक धनादेश नाकारू शकत नाही
खातेदाराने दिलेला चेक वटणावळीसाठी आला असता त्यावरील सही ही बँकेकडे असलेल्या नमुना सहीशी जुळत नसल्याचे कारण देत तक्रारदार खातेदाराचा चेक परत करण्याची बँकेची कृती चुकीची होती व त्यामुळे तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात बँकेने कसर केली, Read More »
फंड-विश्लेषण : बिर्ला सनलाइफ इंडिया जेन नेक्स्ट-थीमॅटिक फंड
'थीमॅटिक फंडा'सारख्या इक्विटी डायव्हर्सिफाइड फंडात निधी व्यवस्थापक वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये निधी गुंतवतात. जसे की - बँका, वित्तीय संस्था, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, वाहन उत्पादन, मनोरंजन, दूरसंचार, रसायन, रिटेल व सेवा क्षेत्र आदी. Read More »
वित्त- वेध : 'ग्रोथ इन्व्हेस्टिंग'एक मायाजाल?
इतिहासावर नजर टाकली तर शेअर बाजारामधील गुंतवणुकीने इतर कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. तरी आजूबाजूला नजर टाकली तर बहुतांश गुंतवणूकदारांनी फायदा तर सोडाच, मुद्दलातही नुकसान भोगलेले आहे, असे का? Read More »
पोर्टफोलियो : लख्ख प्रकाशवाट..
ऊर्जा क्षेत्र विकसनशील देशांसाठी खूप महत्त्वाचे असूनही गेली दोन वष्रे विजेची निर्मिती आणि विजेचे वितरण करणाऱ्या कंपन्यांना मात्र फारच वाईट गेली आहेत. अनेक म्युच्युअल फंड्स आणि सामान्य गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक करून हात पोळून घेतले आहेत. Read More »
वेध पडत्या बाजाराचे..
शक्यता अशीही आहे की, निफ्टीवर अजूनही ५५० ते ६०० गुणांचा व सेन्सेक्सवर २,००० गुणांचा घातक उतार बाकी आहे. निफ्टी ५,३०० पर्यंत खाली आल्यावर मंदीचे एक आवर्तन संपेल. Read More »
गुंतवणूकभान : पसे झाडाला लागत नाहीत!
वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.७% पर्यंत वाढली आहे. तर परदेशी चलनातील जमा फक्त ८०० दशलक्ष डॉलर आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यापासून बाजाराने आपला कल दाखवायला सुरवात केली आहेच. येते दोन -तीन महिने बाजारासाठी खडतर असतील. Read More »
वित्त- वेध : सेन्सेक्स @ १००,०००!
नवगुंतवणूकदारांनी व्यक्तिगत कंपन्यांचे शेअर्स घेण्यापेक्षा सेन्सेक्समधीलच खरेदी करावी. सद्यस्थितीत किमान १९० रुपयांमध्ये ३० विख्यात कंपन्यांच्या आर्थिक वाटचालीचा फायदा पदरात पडू शकतो. Read More »
विश्लेषण : सुवर्णासक्तीला पर्याय आहे काय?
सोन्याबाबत अनेक गैरधारणा भारतात प्रबळ आहेत. या गैरधारणा जोवर लक्षात घेतल्या जात नाहीत, तोवर सोने-खरेदी ही उत्तरोत्तर किमतीबाबत अधिकाधिक असंवेदनशील कशी बनत गेली हे समजावून घेणे कठीणच आहे. Read More »
पोर्टफोलियो : ब्रॅण्ड टाटाची पुण्याई
टाटा समूहाच्या काही जुन्या उत्तम कंपन्यांपकी रॅलीज् ही एक नावाजलेली कंपनी. टाटा केमिकल्सची उपकंपनी असल्याने साहजिकच व्यवस्थापन टाटा समूहाकडेच आहे. देशात काही भागात दुष्काळ, खरीप आणि रब्बी पिकातील चढ-उतार, नीलम वादळ इ. कारणामुळे गेले आर्थिक वर्ष कंपनीसाठी तितकेसे चांगले नव्हते. Read More »
वित्त-नाविन्य : सिबिल 'पत-गुणांक' कसा सुधारू?
ध्या कर्जाचे व्याजदर हळूहळू खाली येत आहेत. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या गृहकर्जधारकांची चुळबुळ सुरू झाली आहे. त्यांच्या कर्जावरील व्याजदर कमी होताना दिसत नाहीत. पण नवीन गृहकर्ज घेताना मात्र व्याजदर फारच कमी आकारला जाताना दिसतो आहे. साहजिकच या मंडळींची आपले गृहकर्ज दुसऱ्या बँकेकडे घेऊन जायची इच्छा प्रबळ होते आहे. Read More »
कर मात्रा : पेन्शन, कम्युटेड पेन्शन आणि प्राप्तिकर कायदा
सेवानिवृत्त होणाऱ्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या अनेक नोकरदार व्यक्तींच्या मनात त्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेविषयी गैरसमज असतात. उदाहरणार्थ, पेन्शन करमुक्त मिळते किंवा पेन्शनच्या रकमेतून काही वजावटी म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन (जे फार वर्षांपूर्वी नोकरदार व्यक्तींना मिळत होतं ते) मिळतं का? Read More »
वित्त-वेध : 'जीवन सरल'च्या लोकप्रियतेची मेख?
एलआयसी या सर्वात बलाढय़ विमा कंपनीची पांरपारिक पॉलिसींमधील एन्डाऊमेंन्ट प्रकारामध्ये मोडणारी ही पॉलिसी. नऊ वर्षांपूर्वी; २००४ च्या पूर्वार्धात, बाजारामध्ये आलेली ही पॉलिसी आज लोकप्रियतेच्या बाबतीत अतिशय वरच्या स्थानावर आहे.. Read More »
वित्त-तात्पर्य : 'फिक्स्ड' की 'फ्लोटिंग' % एक भानगड!
गृहकर्जदारांनी 'फिक्स्ड' (कायम) व्याजाच्या दराचा पर्याय स्वीकारलेला असतानाही त्यांना अधिक दराने व्याज आकारण्याची बँकेची कृती ही 'अनुचित व्यापार प्रथा' आणि 'ग्राहकाची फसवणूक'च आहे.. Read More »
कर मात्रा : पब्लिक प्रॉव्हिडंड फ्रेंड!
प्राप्तीकर कायद्याच्या कलम '८० सी'नुसार करदात्यांना एकूण रु. १,००,००० एवढी १००%वजावट मिळण्याची तरतूद आहे. प्राप्तीकर वाचविण्याच्या दृष्टिने हे एक महत्त्वाचे कलम आहे. कलम ८० सीमध्ये नमूद केलेल्या विविध गुंतवणूक योजनांमध्ये रु. १,००,००० एवढी गुंतवणूक करून १०.३% कराच्या टप्प्यात येणाऱ्या करदात्याचा रु. १०,३०० तर २०.६% या कराच्या टप्प्यात येणाऱ्या करदात्याचा रु. २०,६०० आणि ३०.९% या कराच्या टप्प्यात येणाऱ्या करदात्याचा रु. ३०,९०० एवढा कर वाचतो. Read More » | ||
Tuesday, July 23, 2013
गुंतवणूकभान : काय घ्यावे, काय विकावे, न उमजे मजला ..स्वस्थ बसावे?
पावसाळ्यात चित्रपट यशस्वी होण्याचे सातत्य कायम
पावसाळ्यात चित्रपट यशस्वी होण्याचे सातत्य कायम
रसिकांना एकदा चित्रपट आवडला की, त्या चित्रपटाच्या यशाचा मुसळधार पाऊस कडाक्याची थंडी व प्रचंड उष्णता अशा गोष्टी रोखू शकत नाहीत याचा प्रत्यय यावर्षीच्या पावसाळ्यात यशस्वी ठरलेल्या चित्रपटांनी दिला आहे. Read More »
'खाना'वळीतला दोस्ताना.. शत्रुत्वाकडून मैत्रीकडे?
आपण एकाच पानावर फार काळ अडकून बसणे चुकीचे आहे. पुढची पाने उलटली पाहिजेत. त्यात फार वेगळ्या गोष्टी दडलेल्या असतात, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत बॉलिवूडच्या किंग खानने सलमानबरोबरचे शत्रुत्वाचे प्रकरण संपविले. Read More »
पहाः 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटातील 'तेरे मेरे बीच मै' गाण्याचा व्हिडीओ
प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांमध्ये हिट झालेल्या 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील 'तेरे मेरे बीच मै' या गाण्याचा व्हिडीओदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. Read More »
मायकल जॅक्सन माझे प्रेरणास्थान- रेमो डिसोजा
बॉलिवूडमधील सध्याचा यशस्वी नृत्यदिग्दर्शक रेमोने त्याच्या यशाचे श्रेय किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनला देतो. Read More »
जॉन अब्राहमच्या 'मद्रास कॅफे' चित्रपटास 'यूए प्रमाणपत्र'
जॉन अब्राहम आणि नरगिस फक्री अभिनीत 'मद्रास कॅफे' चित्रपटातील कोणतेही दृश्य न वगळता मुद्रण नियंत्रक मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) त्यास 'यूए प्रणाणपत्र' दिले आहे. Read More »
गायक शानची लवकरच अभिनेत्याच्या रुपात 'एंन्ट्री'
गायनाच्या आणि नृत्याच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर प्रसिद्ध गायक शान आता अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करतोय. Read More »
'खुबसूरत'च्या रिमेकमध्ये अशोक कुमार यांच्या भूमिकेत प्रसेनजीत
सोनम कपूरची बहिण रीया १९८० साली प्रदर्शित झालेल्या 'खुबसूरत' या चित्रपटाचा रिमेक बनवत आहे. Read More »
'टी-सिरीज'साठी अनुराग बसू करणार दिग्दर्शन?
'बर्फी' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अनुराग बसू टी-सिरीजकरिता दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा होती. Read More »
'भाग मिल्खा भाग' मध्यप्रदेशमध्येही करमुक्त
विख्यात धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित 'भाग मिल्खा भाग' हा नुकताच महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. Read More »
अभिनेता मनोज कुमार रुग्णालयात
अभिनेता मनोज कुमार यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Read More »
'इफ्तार' मेजवानीत शाहरूख-सलमान मनोमिलन
एकाच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दोन सुपरस्टार नायकांमध्ये स्पर्धा, असणे ही बाब नवीन नाही. मात्र कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी.. Read More »
आरजे मंत्रा 'झलक दिखला जा ६ 'मधून बाहेर
'झलक दिखला जा ६' चा स्पर्धक आरजे मंत्रा शनिवारच्या भागात शोमधून बाद झाला आहे. Read More »
रणबीर-कतरिनाची 'मुव्ही' डेट
बी-टाउनची चर्चित जोडी रणबीर-कतरिना यांच्यात केवळ मैत्रीचे संबंध नसल्याची खात्री बॉलिवूड चाहत्यांना निश्चितच झाली असेल. Read More »
सोनम आणि करिना कपूर एकत्र करणार काम?
बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री सोनम कपूर आणि करिना कपूर या एकत्र काम करण्याची शक्यता आहे. Read More »
'बिग बॉस'च्या प्रोमोमध्ये सलमानची दुहेरी भूमिका?
'बिग बॉस' या रिअॅलिटी कार्यक्रमाचा सातवा सिझन लवकरच सुरु होणार आहे. Read More » | ||||
व्हिवा लाऊंजमध्ये श्रुती सडोलीकर-काटकर!
व्हिवा लाऊंजमध्ये श्रुती सडोलीकर-काटकर!
यंदाच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून संगीतातली नवी पिढी घडवणाऱ्या गानगुरुंना व्हिवा लाउंजमध्ये आम्ही आमंत्रित केलंय. Read More »
उपास फॉर चेंज
आज आषाढी एकादशी.. उपास! उपास म्हणजे आत्मशुद्धी असं शास्त्र सांगतं. उपासाच्या दिवशी खाण्यापिण्याची बंधनं पाळणं, एक दिवस पोटाला विश्रांती असा त्यामागचा उद्देश. Read More »
उपास फॉर फिटनेस
आजकाल फिटनेससाठी उपास करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. फास्टिंग फॉर फिटनेस हे लॉजिक त्यांना जास्त मानवतं. Read More »
उपास सेलिब्रिटींचा
उपास करणं आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं. फक्त तो उपास योग्य पद्धतीनं करायला हवा, असं बहुतेक डाएटिशियन सांगतात. आपल्या सेलिब्रिटींना उपासाबद्दल काय वाटतं? सेलिब्रिटींचं 'फास्टिंग फॉर फिटनेस.' Read More »
आम्ही उपास करतो...
आजची तरुण पिढी उपास करते का? आणि केला तर कोणत्या कारणासाठी करते, हे जाणून घ्यायचा प्रयत्न व्हिवानं केला. Read More »
सो कुल : 'डास-कॅपिटल'
बहुतेक जुनी वितुष्टं आठवून सूड उगवण्यासाठी आपले पूर्वज डासांचा जन्म घेत असणार. त्याचा सामना करण्यासाठी 'मॉस्किटो रिपेलंट' हय़ा नावाखाली बाजारात जे जे काही उपलब्ध आहे... Read More »
छत्रीतलं स्टाईल स्टेटमेंट
जसं तुमच्या कपडय़ांवरून, तुमच्या पेहरावावरून तुमची आवड-निवड कळते, स्टाईल समजते. तसं स्टाईल स्टेटमेंट देण्याची क्षमता छत्रीतही आहे. Read More »
नवं काही हवं : टेम्परेचरनुसार रंग बदलणारं नेलपेंट
आज जरा हवेत गारवा आहे, बाहेर छान पाऊस आहे. किती छान वाटतंय, आता हे छान वाटणं तुमच्या नेलपॉलिशमधूनही व्यक्त होऊ शकतं. Read More »
सवलतींचा पाऊस
मान्सून सेलचा धमाका खरोखरच मोठा असतो. मान्सून वेळेवर सुरू होवो अगर न होवो, हल्ली मान्सूस सेल मात्र नेमेचि येतात. Read More »
विष्णूज् मेन्यू कार्ड : तांदुळाचे पदार्थ
रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय. Read More »
क्लिक
काश्मिरमध्ये झेलम नदीच्या किनाऱ्यावर तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना.. Read More »
वारीतले तरुणाईचे वारे
एकाचवेळी 'जुने जाऊ द्या मरणालागुनि' आणि 'ओल्ड इज गोल्ड' हे दोन्ही परपस्परविरोधी विचार परिस्थितीनुरूप आचरणे जसे योग्य तसेच अध्यात्माचेही आहे. Read More »
स्पिरिच्युअल अनुभव
जून-जुलैमध्ये सरीवर सरी कोसळायला लागल्या की, पाऊसपाण्याच्या बातम्यांबरोबर दरवर्षी नेमानं येणारी बातमी म्हणजे आषाढी वारीची. Read More »
आयटी दिंडी
पुण्यातल्या सॉफ्टवेअर आणि आयटी फिल्डमध्ये काम करणाऱ्या काही उत्साही मंडळींनी एकत्र येऊन आयटी दिंडी सुरू केलीय. सॉफ्टवेअर कंपन्यांमधली तरुणाई यात सामील होते. Read More »
आमची पंढरीची वारी
पूर्वी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर राहत असताना आईसोबत या वारकऱ्यांना काही खायला देणे होत असे, मोठे झाल्यावर ही वारी म्हणजे काय हे समजायला लागले ... Read More » | ||||
FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मà¤à¥à¤¤ मसà¥à¤¤ तà¤à¤¦à¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤
| ||||
आरोग्यावर लिहू काही!
जिथे शरीर आहे तिथे निरोगी राहण्याची, सुदृढतेची सहज भावनाही आहे. मात्र अलीकडच्या धावपळीच्या जीवनात, 'आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला?' असं सहजच बोललंही जातं. जिथे शरीर आहे तिथे निरोगी राहण्याची, सुदृढतेची सहज भावनाही आहे. मात्र अलीकडच्या धावपळीच्या जीवनात, 'आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला?' असं सहजच बोललंही जातं. ज्या जगण्यासाठी आपण कमावतो, ते जगणच आपण विसरत चाललो आहोत की काय?, असाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होतो. मात्र खरंच तसं आहे का?, यावर काहीसा विचार करायला लावणारी आणि त्यानिमित्ताने लेखनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी एक स्पर्धा लेखनप्रेमींसाठी आयोजित केली आहे, 'शतायुषी'या आरोग्यविषयक दिवाळी मासिकाने. आरोग्याच्या नवनवीन समस्या दिवसेंदिवस डोकं वर काढत असताना आयुर्मानही घटत चाललेलं दिसतं. अशा वेळी सुदृढ जीवनशैलीसाठी मुळात आरोग्याविषयीची जागरूकता आपल्यात असायला हवी. भविष्यासाठी नवनवीन स्वप्न रंगवत असताना ती स्वप्नं सत्यात उतरवायची असतील तर, आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण प्रत्यक्षात आपलं तसं होतं का, हा स्वपरीक्षणात्मक विचार प्रत्येकानेच करायला हवा.. याच अनुषंगाने यंदाच्या 'शतायुषी २०१३' च्या लेखनस्पर्धेचा विषय ठरविण्यात आला आहे, 'आरोग्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही, हे खरं किती, खोटं किती?' वेळ नाही म्हणून स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं नाही, हे बरोबर की चूक? आणि वेळ नाही म्हणण्यामागे काही कारणं असतील का? याचाच आढावा आपण लिहिलेल्या लेखांच्या माध्यमातून या दिवाळी अंकाद्वारे घेतला जाईल, जो अर्थातच सर्वसामान्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणारा असेल, म्हणूनच लिहिते व्हा.. लेखासाठीची शब्दमर्यादा ५०० शब्द असून लेख पाठविण्याची अंतिम तारीख आहे, १६ ऑगस्ट २०१३ Read More » गव्हाचे सत्त्व
गहू रात्री पाण्यामध्ये भिजत घालावेत. हे पाणी दुस-या दिवशी काढून घेऊन गहू पुन्हा नवीन पाण्यात भिजवावेत. तिस-या दिवशी हे पाणी काढून घेऊन हेच गहू पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत. गव्हाचे सत्त्व बनविण्याची मुख्य कृती : गहू रात्री पाण्यामध्ये भिजत घालावेत. हे पाणी दुस-या दिवशी काढून घेऊन गहू पुन्हा नवीन पाण्यात भिजवावेत. तिस-या दिवशी हे पाणी काढून घेऊन हेच गहू पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत. चौथ्या दिवशी गव्हातील पाणी काढून टाकावे. त्यानंतर या भिजलेल्या गव्हात थोडे नवीन पाणी घालून हे गहू वाटून घ्यावेत. अशा प्रकारे वाटलेले गहू पिळून व गाळून तयार झालेली लापशी एका पातेल्यात काढून घ्यावी व त्यावर ताट झाकून ठेवावे. पाककृती : स्थूल व्यक्तींकरता.. साहित्य : गव्हाचे सत्त्व(एक वाटी), पाणी (चार वाटी), दूध (एक वाटी), साखर (दोन चमचे), वेलची पावडर (चवी पुरती) साहित्य : गव्हाचे सत्त्व(एक वाटी), तूप (दोन चमचे), दूध (एक वाटी), साखर (दोन चमचे), वेलची पावडर (चवीपुरती) टीप : गव्हाचे सत्त्व दिवसातून एकदा वाटीभर तरी घ्यावे. अतिशय पोषणयुक्त असे हे पेय आहे. Read More »निखळ त्वचा खुलवते सौंदर्य..
अनेकांना थोडयाशा उन्हाचाही प्रचंड त्रास होतो, कित्येकांना तर उन्हामध्ये बाहेर पडताना शरीर पूर्णत: झाकून घेतल्याशिवाय पर्यायच नसतो. अशा अतिसंवेदनशील त्वचेविषयीची प्रातिनिधिक समस्या आणि त्यातून आयुर्वेदीय उपचार सुचविणारा संवाद.. प्रश्न : सर, माझी त्वचा फोटोसेंसिटिव्ह (प्रकाश तीव्रग्राही-संवेदी) आहे. गेली कित्येक वर्ष मला उन्हामध्ये बाहेर पडताना भीती वाटते. माझ्या त्वचेचा रंग उन्हामुळे काळसर होतो. आणि तो पुन्हा पूर्ववत व्हायलाही बरेच दिवस लागतात. संपूर्ण शरीरावर डाग (पॅचेस) येतात. कधी ते चॉकलेटी असतात तर कधी अगदी काळ्या रंगाचे असतात. उन्हात तर अशा प्रकारचे डाग वाढतात. काही दिवसांपासून अधिक प्रमाणात मुरमंही येत आहेत. पूर्वीपेक्षा आता या मुरमांचं प्रमाणही खूप वाढलंय. चेह-याबरोबरच मानेवर, खांद्यावर तसंच पाठीवरही ही मुरमं येतात. मुरमं खूपच कडक आणि खोलवर गेलेली आहेत. ती दुखतातही. त्यांना पिकायला बराच वेळ लागतो. ज्या ज्या ठिकाणी मुरमं झालीयत त्या सर्व ठिकाणी काळे डाग पडतात आणि ते कायम स्वरूपात राहतात. मला लवकर बरं करा. दोन महिन्यांनंतर माझं लग्न ठरलंय. माझ्या होणा-या नव-याने मला अनेक ब्युटी पार्लर्स, स्कीन स्पेशलिस्ट तसंच कॉस्मेटोलॉजिस्टची नावं सुचवली. पण रसायनयुक्त औषधांमुळेही माझ्या शरीराला त्रास होतो, मला ती सूट होत नाहीत. मी फेशिअलसुद्धा हर्बलचंच करते. माझी त्वचा खूपच संवेदनशील आहे. उत्तर : स्मिताताई, तुम्हाला माहीत असेलच की त्वचेचा रंग आयुर्वेदाप्रमाणे पित्तदोषामुळे बदलतोय. तुम्ही जर पित्तप्रकृतीचे असाल तर उन्हामध्ये नैसर्गिक पित्त वाढतं किंवा ऊन अंगावर घेतल्यास पित्त वाढतं. अशा अवस्थेत पित्त वाढेल असे आंबट-तिखट तळलेले पदार्थ अधिक खाल्ल्यास पित्ताचं प्रमाण आणखी वाढतं. त्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो. फोटोसेंसिटिव्हिटी विशेषत: पित्त वाढल्यामुळे येते. यासाठी कोणतीही तात्पुरती उपचार पद्धती नाही. थोडया प्रमाणात (पथ्यपालन) प्रकृतीनुसार खाणंपिणं ठेवावं तसंच आपल्या नेहमीच्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. मानसिक ताणतणाव, रात्रीचं जागरण, बद्धकोष्ठता आणि मासिकपाळी नियमित वेळेवर न येणं, या सर्व गोष्टीही त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी सुरळीत असणं नितांत गरजेचं असतं. ही समस्या कमी वेळात आटोक्यात आणता येते, पण त्यासाठी औषध, आहार आणि जीवनशैली या तिन्ही गोष्टी प्रमाणात बदलाव्या लागतील. औषधांमध्ये कडुनिंब, बाहवा, तुळस, कात, सारिवा, हळद, गुळवेल आणि मंजिष्ठासारखी औषधं घ्यावी लागतील. आहार आणि जीवनशैली या दोन्ही गोष्टी त्यांच्या दैनंदिनीविषयी चर्चा करून ठरवता येतील. आयुर्वेदिक स्पा बाबतीत ऐकलंय? आठवडय़ातून तीनदा स्पा घेऊन उपचार घ्यावे लागतील. त्यात हर्बल पावडर मसाजमध्ये (एक्सफोलिएशनसाठी – निर्जीव पेशीजालावरील पृष्ठभागावरून पातळ पापुद्रे सुटणे) वैद्यांनी सिद्ध(मेडिकेटेड) केलेलं 'मिल्क धारा' केलं जातं. त्यामुळे त्वचेचा रंग बदलतो, तसंच त्वचेच्या पोषणासाठी व फेसपॅक आणि हर्बल बॉडी पॅक (अनेक प्रकारच्या औषधी एकत्रित करून) मुरमांवर तसंच त्याच्या आसपासच्या भागावर लावून शरीर काही वेळेसाठी टॉवेलने गुंडाळून ठेवावं लागतं. १०-१२ सीटिंग घेतल्याने पुष्कळच फायदा होतो. Read More »लढा अॅनिमियाशी..
'अॅनिमिया' (पंडुरोग) ही महिलांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणारी प्रमुख समस्या आहे. ही समस्या स्त्रियांना आरोग्यदृष्टय़ा कमकुवत करणारी आहे. अॅनिमियाची समस्या गंभीर आजाराचं स्वरूपही बनते. स्त्रीच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची भिस्त आहे. मुली निरोगी राहिल्या तर त्यांच्यापासून सुदृढ पिढीची निर्मिती होईल. त्यामुळेच 'निरोगी स्त्री एका निरोगी कुटुंबाची ताकद आहे', असं म्हणतात ते उगीच नाही. कुटुंबातील स्त्रीचं निरोगीपण जपायचं असेल तर अॅनिमियाशी लढलंच पाहिजे 'हेल्पमुंबई फाउंडेशन (एचएमएफ)' या संस्थेने 'मेट्रो पोलिस हेल्थकेअर' यांच्या मदतीने 'अॅनिमिया इरॅडिकेशन प्रोग्राम' नावाचा उपक्रम मुंबईत सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत 'हेल्दी वुमन-सेफ वुमन' या मोहिमेचाच एक भाग आहे. १५ जून २०१३ रोजी या मोहिमेतील पहिलं शिबीर धारावी इथे घेण्यात आलं होतं. त्या शिबिरात २५३ महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ४० टक्के महिला अॅनेमिक असल्याचं आढळून आलं. या महिलांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण हे १२ ग्रॅम/डीएलपेक्षा कमी होतं. प्रौढ महिलेकरता आवश्यक असलेलं हे सर्वसाधारण प्रमाण आहे. त्यातील पाच महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण हे तीव्र असल्याचं आढळून आलं. त्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. काही दिवसांपूर्वी कलिना परिसरात संस्थेने दुसरं शिबीर घेतलं. दुस-या शिबिरात एकूण १४५ महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ६० टक्के अॅनेमिक असल्याचं आढळून आलं. तर ५२ महिलांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण १०.९ ग्रॅम/डीएल(मॉडरेट अॅनिमिया) पेक्षाही कमी होतं. त्यापैकी पाच जणी गंभीर अॅनिमियाने आजारी होत्या. त्यांच्यातील हिमोग्लोबीनचं प्रमाण हे ८ ग्रॅम/डीएल पेक्षाही कमी आढळलं. वरील आकडेवारींचं गांभीर्य समजण्यासाठी मुळात आधी अॅनिमिया म्हणजे काय, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अॅनिमिया म्हणजे लाल रक्तपेशींचा अभाव, थोडक्यात रक्ताक्षय. या तांबडया रक्तपेशींच्या अभावामुळे रक्तात प्राणवायू (ऑक्सिजन) वाहण्याची क्षमता कमी होते. हाडांच्या मगजात (बोर्न मॅरो) रक्तपेशींची निर्मिती होते. त्यांचं आयुष्य साधारण चार महिन्यांचं असतं. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी शरीरात योग्य प्रमाणात 'फॉलिक अॅसिड' आणि जीवनसत्त्व ब-१२' असावं लागतं. हिमोग्लोबीन या लाल रंगद्रव्यामुळे तांबडयापेशींना रंग प्राप्त होतो. शरीरातील प्रत्येक पेशीच्या शुद्धीकरणाचं कामही हिमोग्लोबीनमुळे होतं. हिमोग्लोबीनचा रंग फिक्का पडल्यावरही किंवा या रंगद्रव्याचं प्रमाण घटल्यावरही अॅनिमिया होतो. अॅनिमिया झाल्यावर कुपोषणाचं प्रमाण वाढतं. हिमोग्लोबीनचा रंग चांगला राहण्यासाठी, त्यांचं शरीरातील प्रमाण योग्य राहण्यासाठी लोह(आयर्न), फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व ब-१२, प्रथिनं, जीवनसत्त्व क ही जीवनसत्त्वं, प्रथिनं तसंच क्षार, खनिजं आदी पोषणमूल्यं असणा-या आहाराचं प्रमाण वाढवणं महत्त्वाचं आहे. भारतात स्त्रियांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. ४० ते ५० टक्के स्त्रिया या अॅनिमिक असतात. स्त्री अॅनिमिक असण्याचा सर्वात जास्त परिणाम हा ती गरोदर असताना होतो, असं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनिता साळवी सांगतात. त्या पुढे म्हणतात, अॅनिमियाचे दोन प्रकार आहेत. फॉलिक अॅसिड आणि जीवनसत्त्व ब-१२ मुळे यांच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया हा 'मेगेलोब्लास्टिक' अॅनिमिया म्हणून ओळखला जातो. या अॅनिमियात लाल रक्तपेशींचा आकार गरजेपेक्षा जास्त वाढतो. लोहाच्या कमतरतेमुळे होणा-या अॅनिमियाला 'मायक्रोसिटिक अॅनिमिया' म्हणतात. त्यात लाल रक्तपेशींचं आकारमान खूपच कमी होतं. या दोन्ही प्रकारच्या अॅनिमियात हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी असतं. आईने गरोदरपणात लोहयुक्त पदार्थ खाल्लेच पाहिजेत. पण त्याच्या जोडीने फॉलिक अॅसिड आणि जीवनसत्त्व ब-१२ ही पोषणमूल्य असणारेही पदार्थ खाल्ले पाहिजेत. आई होऊ इच्छिणा-या प्रत्येक स्त्रीने गरोदर राहण्यापूर्वी तीन महिने योग्य प्रमाणात फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व ब-१२ आणि लोहाचं प्रमाण असलेले पदार्थ खाल्ल्यास तिला गरोदर असताना त्रास होत नाही. तिची प्रसूतीही चांगली होते. बाळ आईच्या पोटात असताना त्याला आवश्यक असणारी लोहाची गरज तो आईकडून भागवतो. त्यामुळे गरोदरपणात लोहयुक्त आहार अधिक प्रमाणात खावा लागतो. न खाल्ल्यास बाळंतपणानंतर ती माता अॅनिमिक होते. तिला अशक्तपणा, पाय दुखणं, पायांच्या पोट-या भरून येणं, केस गळणं, ते लवकर पांढरे होणं या शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. नवजात अर्भकाच्या शरीरातही लोहाची कमतरता निर्माण होते. खासकरून अपु-या महिन्याच्या बाळांमध्ये. अपु-या महिन्याच्या बाळांमध्ये लोहाचा साठा गर्भारपणाचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय भरला जात नाही. ही कमतरता पुढे आईला भरून काढावी लागते. ज्या स्त्रियांमध्ये मासिकपाळीत जास्त रक्तस्रव होतो, त्यांच्याही शरीरात लोहाची कमतरता आढळते. आयर्न, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व ब-१३ या गोळय़ांबरोबर आणि कॅल्शियमच्या गोळय़ा एकत्र खाऊ नयेत. त्यामुळे शरीराला दोन्ही क्षार, जीवनसत्त्वांचा फायदा होत नाही. गुळात बनवलेली शेंगदाण्याची चिक्की, लाडू प्रत्येक स्त्रीने खावेत. स्त्रियांच्या आरोग्यविषयक मानसिकतेबद्दल बोलताना मेट्रो पोलिस हेल्थकेअरच्या पॅथोलॉजिस्ट, डॉ. विनती गोलविलकर सल्ला देतात, घरगुती कामाच्या गडबडीत स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण त्यांनी तसं करू नये. आपल्या दैनंदिन आहारातील कितीतरी असे पदार्थ आहेत, ज्यांच्यापासून लोह, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व ब-१२ यांची गरज भागवता येते. उदा. गूळ आणि हिरव्या भाज्या खा. काळा गूळ असेल तर अधिकच चांगलं. 'अॅनिमिया इरॅडिकेशन प्रोग्राम' या उपक्रमात गरिबीमुळे अॅनिमिया वाढतो, असंही एक निरीक्षण समोर आलं आहे. मुळात अॅनिमियाचा आजार गरिबीपेक्षा दारिद्रय़ामुळे वाढतो. आपल्याकडे फक्त खाण्याचं दारिद्रय़ नाही तर विचारांचंही दारिद्रय़ आहे. गरिबीत अपुरी पोषणमूल्यं असणारा आहार खावा लागतो. तर दारिद्रय़ात सलग उपाशी राहावं लागतं. आजही खेडयापाडयात कित्येक कुटुंबात मुली, स्त्रियांच्या वाटय़ाला अपुरा आहार येतो. आधी घरातल्या सगळय़ा लहान-थोरांनी जेवायचं, त्यातून उरलं सुरलं स्त्री खाणार; अशी मानसिकता आशिया खंडात आहे. या मानसिकतेमुळे स्त्रीच्या वाटय़ाला पुरेसा आहार येतच नाही. याही सामाजिक परिस्थितीवर तोडगा काढला पाहिजे. लोहाचं प्रमाण वाढण्यासाठी कुठला आहार आवश्यक आहे, त्या आहारातील घटकांचं कसं एकत्रीकरणं केलं पाहिजे, याचं मार्गदर्शन करणारी पुस्तिकाच काढली पाहिजे. पूर्वी अशा प्रकारची 'सकस आहार' ही पुस्तिका ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आणि पाककला शास्त्रज्ञ वसुमती धुरू यांनी अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिली होती. त्यातील पाककृती हा मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्ग यांची जीवनशैली डोळय़ांसमोर ठेवून लिहिली होती. 'समाजवादी महिला संघा'तर्फे ती छापण्यात आली होती. अशाप्रकारचं भरीव काम झालं तर अॅनिमियाशी प्रत्येक कुटुंब लढू शकेल. अर्थ हिमोग्लोबीनचा अॅनिमिया टाळण्यासाठी काय कराल? हेही लक्षात असू द्या.. लोहाच्या कमतरतेमुळे होणा-या अॅनिमियाची लक्षणं | ||||
|