स्वर्ण प्राशन विधि | जायफळ माहिती मराठी | कोणते मासे खावे |
अॅलर्जीला पर्याय सुवर्णाचा
अॅलर्जी हा एक विषारसदृश प्रकार आहे आणि याला आधुनिक मेडिकल सायन्समध्ये कोणताच उपाय नाही. हवेतल्या धूलिकणांपासून ते कीटक दंशांची, खाण्या-पिण्यात येणा-या पदार्थापासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंत किंवा वा-याबरोबर आलेल्या गंधाने म्हणा, कोणत्याही कारणाने अॅलर्जी होऊ शकते. हा विषारांचा एक प्रकार आहे. आयुर्वेदात वर्णन केलेला व शरीराला अशा विषारांपासून वाचवणारा पदार्थ म्हणजे 'सुवर्ण'.
सुवर्णप्राशन price
'काल मी उपवास असल्यामुळे फक्त साबुदाण्याचे वडे खाल्ले आणि आज बघ माझं तोंड कसं सुजलंय ते!' अतिशय रडवेल्या आवाजातलं सुमनचं हे बोलणं सुधाकाकूंनाही खूपच लागलं. त्या म्हणाल्या, 'चल, आता अकरा वाजले आहेत. डॉक्टर आले असतील एवढय़ात. बाजूच्या बिल्डिंगमधल्या प्रीतीकाकूंना घेऊन डॉक्टरांकडे जाऊया'. सुमन लगेच तयार झाली. तिचं फक्त तोंडच सुजलं होतं असं नाही, तर संपूर्ण अंगावर खाज सुटली होती आणि सकाळी उठल्यापासून ते दुपापर्यंत ती वाढतच जात होती. सोबत अंगावर लालसर चकंदळे आणि चट्टेही उमटले होते. डोळे बारीक दिसत होते. कारण पापण्या सुजल्या होत्या. तिला अगदी क्षणभरही शांत बसवत नव्हतं, खाजही येत होती आणि रडूही येत होतं.सुवर्णप्राशन डोस
डॉक्टर नुकतेच आले होते आणि सुमनचा तिसरा नंबर लागला. आत गेल्या गेल्या सुधाकाकूंना रडूच कोसळलं. रडवेल्या आवाजातच त्या डॉक्टरांना म्हणाल्या, 'पाहा हो, माझ्या मुलीला काय झालंय! संपूर्ण अंगाला खाज सुटलीय. कसला आजार आहे माझ्या मुलीला? सगळं घरचंच करून देते खायला. तरीसुद्धा हे असं कसं काय?''हे पाहा, एवढं रडण्यासारखं काहीही झालेलं नाही.'- डॉक्टर
'अहो, असं काय करताय, माझ्या सुमनचा चेहरा तरी पाहा कसा सुजलाय तो. काकू सांगा ना डॉक्टरांना सुमनचा चेहरा एरवी कसा असतो आणि आता कसा झालाय. 'खरंय डॉक्टर, सुमन खूप रेखीव आहे हो.. आत्ताच ही अशी सुजलेली दिसतेय.' – प्रीतीकाकूंनी चटकन सांगून टाकलं.
सुवर्णप्राशन ड्रॉप्स
'हे कधीपासून सुरू झालं, काय काय घडलं हे नीट सांगाल का मला?' – डॉक्टर'डॉक्टर, खरं सांगायचं ना तर काल संध्याकाळपर्यंत अगदी रात्री झोपेपर्यंतही मला काहीच त्रास होत नव्हता. रात्री जेवण जेवून आम्ही दहाच्या दरम्यान झोपलो. मला खरं तर सातच्या आधी कधीच जाग येत नाही. आज मात्र पावणे सहाच्या सुमारास जाग आली आणि विचित्र जाणीव होत होती. असं वाटत होतं की, अंग जड झालंय. चेह-यावर थोडीशी खाज येतेय. मी बिछान्यातून उठले, बाथरूमला जाऊन आले आणि परत बिछान्यात शिरले. पण मला काही झोप येईना. कधी पाठीवर तर कधी पायाला, तर कधी कपाळाला खाज येतेय, अशी विचित्र जाणीव होत होती आणि झोप काही येत नव्हती. मग ६.३०च्या सुमारास मला खूपच खाज जाणवू लागली म्हणून आईला उठवलं. आई म्हणाली, काही नसेल, घामामुळे वाटलं असेल.. स्वच्छ आंघोळ करून आलीस की बरं वाटेल. म्हणून मी आंघोळीला जायला निघाले आणि जाता जाता कपाळालासुद्धा खाज येते म्हणून आरशात बघितलं तर हे लालसर चट्टे दिसले. वाटलं अंघोळ केल्यावर बरं वाटेल. पण कसलं काय.. आंघोळीचं गरम पाणी जास्तच गरम वाटत होत मला आणि हे चट्टे मात्र अधिकच लाल दिसतायेत आणि खाजतायेत.' सुमन म्हणाली.
'काही इंजेक्शन वगरे घ्यायला हवं का हो सुमनला?' सुमनची आई काकुळतीने म्हणाली.
सुवर्णप्राशन ड्रॉप्स price
'हे बघा, एवढं घाबरण्यासारखं अगदी काही म्हणजे काहीच नाही हे आधी लक्षात घ्या. हे जे दिसतंय ना तो काही आजार नव्हे तर ते आजाराचं एक लक्षण आहे आणि त्वचेवर दिसतंय म्हणून तुम्ही त्याला 'त्वचा विकार'(skin disease) म्हणणार असाल तर ते सपशेल चूक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक अॅलर्जी आहे,' डॉक्टर.अॅलर्जी अॅलर्जी खूप ऐकलंय. पण कशामुळे ही अॅलर्जी होते हो डॉक्टर?' – सुधाताई
सुवर्णप्राशन मराठी
कशाची अॅलर्जी ते सांगणं तितकं सोपं नाही. कारण हवेतल्या धूलिकणांपासून ते छोटय़ा-मोठय़ा कीटक दंशांची, खाण्यात-पिण्यात येणा-या पदार्थापासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंत आणि चण्या-शेंगदाण्यापासून ते पालक आणि पनीपर्यंत म्हणा किंवा वा-याबरोबर आलेल्या गंधाने म्हणा- कोणत्याही कारणाने ही अॅलर्जी होऊ शकते.जो पदार्थ आपल्या मुखावाटे शरीरात गेल्यावर पचताना नको असलेला वाटतो त्याला शरीर सामावून न घेण्याचा प्रयत्न करते. हे करताना कधी चकंदळे उठणे, कधी रंग न बदलताही त्वचेला खाज येणे, श्वासोच्छ्वासामार्फत शरीरात प्रविष्ट झाल्यास दम लागल्याची जाणीव होणे, मुखावाटे पोटात गेल्यास मुखापासून गुदापर्यंतच्या भागांपैकी कोणत्याही भागास त्रास देणारा ठरणे, शरीरात प्रविष्ट झाल्यावर मुखावाटे, उलटीद्वारे किंवा गुदावाटे जलीय घटकांबरोबर – पातळ मलप्रवृत्ती घडवून आणत बाहेर टाकणे अशा पद्धतीची लक्षणे दिसतात, त्याला आपण अॅलर्जी म्हणतो.खरं तर केवळ मुखावाटे शरीरात प्रविष्ट झालेला पदार्थच नव्हे तर अगदी त्वचेशी संपर्क येणारा घटकही शरीराला त्रास देणारा वाटत असला तर तोही शरीर स्वत:शी असात्म्य समजून त्याला सात्म्य करण्याच्या प्रयत्नात असताना त्वचेवर चट्टे येणे, लालसर चकंदळे उठणे अशी लक्षणे निर्माण होतात.
सुवर्णप्राशन संस्कार मराठी
अॅलर्जी हा एक विषारसदृश प्रकार आहे आणि याला आधुनिक वैद्यकात कोणताच उपाय नाही. आयुर्वेदात सांगितलेला उपाय मात्र अधिक र्सवकष आहे आणि तो म्हणजे आपलं शरीर आणि त्यातील घटकच एवढे उत्तम बनवायचे की, कोणत्याच गोष्टीची अॅलर्जी होऊ शकणार नाही. आयुर्वेदात याला उपाय आहे. कारण आयुर्वेद त्या प्रत्येक घटकाला 'विषार' मानते. यामुळे एखाद्याला अॅलर्जी होते. तोच घटक दुस-याला पचू शकतो, स्पर्शानेही त्रास देत नाही आणि म्हणून त्या व्यक्तीला तो विषारसदृश नसतो.शरीराला अशा विषारांपासून वाचवणारा आणि आयुर्वेदात वर्णन केलेला पदार्थ म्हणजे 'सुवर्ण'. 'सुवर्ण' अर्थात सोने हा सर्व धातू घटकांमध्ये गुणांच्या दृष्टीने अग्रगण्य. पूर्वीच्या काळी सुवर्ण सेवन राजा-महाराजांपासून ते सामान्यांपर्यंत निरनिराळ्या पद्धतीने करीत असत आणि त्यामुळे त्यांना अपचनापासून ते अत्यंत असाध्य रोगांपासून संरक्षण मिळत असे. आजच्या पिढीमध्ये सुवर्ण खाऊन किंवा सुवर्ण वर्ख खाऊन तो पचवण्याची क्षमता असणे कठीण आहे. अशांसाठीच सुवर्णाचे भस्म करावे असे आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे. आणि अगदी विषारच काय तर विषांवरही सुवर्ण उत्तम कार्य करून विषांना निष्प्रभ करण्याची क्षमता बाळगतं हेही स्पष्ट केलं आहे.
स्वर्ण प्राशन दवा
सुमारे ५००० वर्षापूर्वी लिहिलेल्या चरक संहिता ग्रंथात 'हेम सर्व विषाण्याषु गरांश्च विनियच्छति। न सज्जते हेमपाङ्गे विषं पद्मदलेम्बुवत्॥' या शब्दांत सुवर्ण महात्म्य वर्णन करताना अतिशयोक्ती अलंकार वापरलेला नाही तर जे निश्चित आहे ते ठामपणे मार्मिक उदाहरणांसह सामान्यांनाही कळावं, समजावं व पटावं यासाठी साध्या भाषेत सांगितलं आहे.आयुर्वेदकालीन भाषा गीर्वाणभारती अर्थात् संस्कृत असल्याने सर्वच आयुर्वेदीय साहित्य त्या भाषेत असलं तरी मार्मिक उदाहरणांनी ते सोपं सरळ आणि स्पष्ट केलेलं आढळतं.मूळ धातूचं शरीरात पचणारं स्वरूप म्हणजे भस्म! भस्म बनवण्याच्या विविध पद्धतींचं वर्णन करतांना आयुर्वेदाच्या महत् विद्वानांनी पूर्ण उकल करीत ज्या पद्धतीने बनविलेलं भस्म उत्तम गुणयुक्त व शरीरास कोणतंही नुकसान न करणारं असतं त्याचंही स्पष्टीकरण दिलं आहे. १४१ वर्षाहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या या संस्थेच्या 'सुवर्ण वसंत मालती', या कल्पाचा अॅलर्जी झाली असलेल्या परिस्थितीत अत्यंत उत्तम लाभ होतो. तसेच सुवर्णभस्मयुक्त स्वामला या कल्पाच्या सेवनामुळे शरीरातील सातही धातू, त्यांचे त्यांचे स्वास्थ्य टिकवण्याचं कार्य करणारं धात्वग्नी आणि पेशीन् पेशी स्तरावर कार्यरत असणारे पंचमहाभूताग्नी या सर्वच स्तरांवर 'स्वामला' या उत्पादाचे लाभ दिसतात.
स्वर्ण प्राशन विधि
अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर स्वत:च्या शरीराशी वा शरीरात संपर्क येणा-या गोष्टी कोणत्याही असोत, आपल्या शरीराला व शरीरातील घटकांना त्या त्रास देऊ शकणार नाहीत याची काळजी घेणं म्हणजे अॅलर्जीपासून स्वत:ला वाचवणं! अॅलर्जी ज्या वेळी दृश्य स्वरूपात जाणवते त्या वेळी एक गोष्ट निश्चित की कोणता तरी घटक शरीराला सात्म्य झालेला नाही आणि जर एखादा पदार्थ सात्म्य होणं आवश्यक असेल तर त्यासाठी अत्यावश्यक असतं शरीराने – शरीराच्या अग्नीने – पचनशक्तीने त्याला पूर्णत: पचवून धातू घटकांपर्यंत पोहोचविणं. यासाठी – विशेषत: प्रत्येक घटकाच्या उत्तम पचनासाठी आवश्यक असतो तो विविध स्तरांवरील अग्नी उत्तम असणेआरोग्यपूर्ण अन्नघटक मासे
मासे खाणा-यांच्या अनेक आवडीनिवडी असतात. त्यातील काही जण हे शरीरयष्टी कमवण्यासाठी किंवा बांधा सुडौल राहण्यासाठी कठोर मेहनत घेणारे, तर दुसरा वर्ग हा पट्टीचे मासे खाणा-यांचा, ज्यांना माशाच्या नुसत्या घमघमाटावरच दोन घास जास्त जातात. पहिल्या प्रकारातील व्यक्तींचा कल हा विशेषत्वानं मोठे किंवा कमी काटे असलेले, पर्यायानं सोपे मासे खाण्याकडे असतो. परंतु पट्टीच्या मासे खाणा-यांना छोटय़ा किंवा काटेरी मासे खाण्याचं जास्त अप्रूप असतं. याचं कारण म्हणजे त्यांच्यातील मूलभूत चविष्टपणा आणि आरोग्यास हितकारक असलेले गुणधर्म.
कोणते मासे खावे
मांसाहार करताना 'मासे' या अन्नघटकाला सर्वाधिक प्राधान्य द्या. म्हणूनच आहारात माशांचा समावेश आठवडय़ातून तीन दिवस केल्यास उत्तम, असा सल्ला डॉक्टर्स किंवा डाएटिशियनही देतात. माशांच्या अनेकविध प्रकारांमधील पापलेट, रावस, सुरमई, बांगडा, सौंदाळे, हलवा, घोळ इ. मोठे आणि कमी काटे असलेले मासे. छोटय़ा आणि काटेरी माशांमध्ये करली, भिंगी, पाला (हे तिन्ही मोठे, पण भरपूर काटे असलेले मासे आहेत) तर मांदेली, मोदकं, बोंबील, कांटा, तारली, मुडदुसे, टोकेरी सुळे, बोयटं, पेडवे, निवटे, शिंगाडा इत्यादी अनेक प्रकारचे मासे खाल्ले जातात. मोरी / मुशी (शार्कची जात) या माशाला काटे नसून केवळ मध्यभागी मणका असतो, हा पथ्याचा मासा म्हणून बिनधोकपणे खाल्ला जातो.गोड्या पाण्यातील मासे प्रकार
छोटय़ा माशांमध्ये चरबीचं प्रमाण अतिशय कमी असून, त्यात प्रामुख्याने शरीरातील वाईट चरबी (एल. डी. एल. ट्रायग्लिसराइड्स) विरघळवणारं 'ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स' हे हृदयसंरक्षक रसायन द्रव्य मुबलक प्रमाणात आहे. ओमेगा थ्रीमध्ये 'पॉलिअनसॅच्युरेटेड' आणि 'मोनोअनसॅच्युरेटेड' हे दोन अत्यंत उपयुक्त चरबीचे प्रकार समाविष्ट असतात. या प्रकारची चरबी शरीरात निर्माण होत नसल्याने, परंतु वाढलेलं वाईट कोलेस्टेरॉल पुन्हा नियंत्रणात आणायला आणि पर्यायानं आरोग्याला अत्यावश्यक असल्याने, ते विविध प्रकारच्या विशेषत: बारीक माशांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. संधीवाताचे विकार, नैराश्य अशा आजारांवरही 'ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स' गुणकारी आहेत.
नदीतील मासे
ज्या व्यक्तींच्या रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण नियंत्रित मर्यादेपेक्षा जास्त आहे, अशांनी तळलेले मासे खाण्याच्या मोहाला आवर घालून मासे आमटी, कालवण, रस्सा अशा स्वरूपात खावेत. माशाच्या कालवणामध्ये खोब-याचं प्रमाण कमी ठेवून लाल टोमॅटोचा गर, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरे, मेथी दाणे हे सर्व वाटून आमटीचा बेस तयार करून घ्यावा व नंतर त्यात मासे सोडून ते व्यवस्थित शिजू द्यावेत. अशा प्रकारे तयार केलेली आमटी ही आरोग्याला जास्त पथ्यकर असते. अंडी, चिकन किंवा मटण या मांसाहाराच्या तुलनेत मासे खाण्याचं प्रमाण अधिक असणं, हे चौरस आहाराला पूरक ठरणारं असल्यानं पर्यायानं आरोग्यालाही ते केव्हाही उत्तमच!हे अवश्य करा..
मासे खाण्याचे फायदे
» मासे आणताना मोजक्याच प्रमाणात आणा. त्यांचा ताजेपणा असेपर्यंत त्यांचा वापर केल्यास त्यातून जास्तीत जास्त पोषणमूल्य मिळतात आणि त्यांना डीप फ्रिजरमध्ये ठेवण्याची वेळही येत नाही.» बाजारातून भरपूर प्रमाणात आणलेल्या ताज्या माशांची साठवणूक करताना, ते व्यवस्थित स्वच्छ करून, धुऊन त्यांना मीठ व हळद लावून, हवाबंद डब्यात भरून डीप फ्रिजरमध्ये ठेवावेत. म्हणजे पुढचे आठ-दहा दिवस ते चव न उतरता चांगले टिकतात.
» डीप फ्रिजरमध्ये साठवणीस ठेवलेले मासे फार काळ न ठेवता, त्यांचा शक्य तितक्या लवकर वापर करावा.
डाएट फिश
मासे पकडण्याचे साधन
साहित्य : मांदेली, मोदकं किंवा आवडीचा कोणताही मासा (शक्यतो छोटे किंवा काटेरी मासे घ्यावे), बारीक चिरलेले कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी २, २ चमचे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हिंग, १ चमचा हळद, चवीपुरतं मीठ, फोडणीपुरतं तेल.
मासे पालन व्यवसाय माहिती
कृती : मासे स्वच्छ करून धुऊन (मोठा मासा घेतल्यास त्याच्या पातळ तुकडय़ा कराव्या) घ्यावेत. या तुकडय़ांना हळद व मीठ व्यवस्थित चोळून त्या मुरण्यासाठी एक तास फ्रिजमध्ये ठेवावेत. एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात हिंग घालावं. मग त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून परतावं. परतताना कांदा मऊसर झाल्यावर त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट घालून पुन्हा व्यवस्थित परतून चांगली वाफ येईपर्यंत झाकण ठेवावं.
समुद्रातील मासे नावे
मिश्रणाला तेल सुटल्यावर त्यावर हळद, मिठात मुरलेले मासे ठेवावे व मिश्रण अलगद हाताने एकत्र करून, मासे व्यवस्थित शिजेपर्यंत पुन्हा झाकण ठेवावं. शिजल्यावर वरून पुन्हा कोथिंबीर भुरभुरल्यावर डाएट फिश खाण्यास तयार. रस्सा हवा असल्यास कांदा-टोमॅटो शिजताना त्यात पाणी घालावं. माशाच्या या पदार्थात खोब-याचा अजिबात वापर न केल्यामुळे डाएट करणारे, वाईट कोलेस्टेरॉल वाढलेले त्याचप्रमाणे निरोगी व्यक्तीही तो बिनधास्तपणे खाऊ शकतात.बहुपयोगी जायफळ, जायपत्री..
जायफल और दूध के फायदे
मिरीस्टिका फ्रॅग्रन्स या वनस्पतीचं पक्व आणि सुकवलेल्या बीवरील जाळीदार आवरणास 'जायपत्री' तर आतील भागास 'जायफळ' असं म्हणतात. हिंदी, मराठी, बंगाली आणि गुजरातीमध्ये जापत्री, जायवित्री, जोत्री या नावाने ओळखलं जातं.मिरीस्टिका फ्रॅग्रन्स या वनस्पतीचं पक्व आणि सुकवलेल्या बीवरील जाळीदार आवरणास 'जायपत्री' तर आतील भागास 'जायफळ' असं म्हणतात. हिंदी, मराठी, बंगाली आणि गुजरातीमध्ये जापत्री, जायवित्री, जोत्री या नावाने ओळखलं जातं. आयुर्वेदिक नाव 'जातीफळ' असं आहे. जायपत्री आणि जायफळ या दोन्ही गोष्टी सुकवून बाजारात आणलं जातं.
जायफळ झोप
एकाच फळापासून हे दोन पदार्थ तयार केले जातात. हे झाड ९ ते १२ मीटर उंच असतं. ही वनस्पती मूळ मोलकाझ बेटातील असून उष्ण कटिबंधात याची लागवड अधिक होते. यात पायनीन, मिरिस्टिसीन, कम्फेन असे स्वाद आणणारे घटक असतात. जायफळाला गोड, मसालेदार, उग्र गंध आणि तिखट चव असते. तर जायपत्रीला तिखट, कडवट आणि उग्र वास असतो.
जायफळ आणि मध
जायपत्री रंगाने पिवळट करडी किंवा नारंगी रंगाची असते. जायफळाचा उपयोग प्रामुख्याने गोड पदार्थ, मिठाई, गोड मेवा, केक या पदार्थात केला जातो, तर जायपत्री ही प्रामुख्याने मसाल्यांमध्ये वापरली जाते.
जायफळ माहिती मराठी
जायपत्री आणि जायफळाचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे -» जायफळ किसून गरम भांडय़ात थोडं गरम करावं. त्यात तेवढाच गूळ घालावा. त्याच्या लहान लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या डायरियासारख्या आजारात घेतल्यास लवकर आराम पडतो.
» जायफळाची पूड लिंबाच्या रसात घोळवून त्याची पेस्ट चेह-यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. ही पेस्ट एक उत्तम ब्लीच समजलं जातं.
» पॅरालिसिसच्या रुग्णांची जीभ जड होते, तेव्हा त्या रुग्णांच्या तोंडात जायफळ चघळायला दिल्याने रुग्णांना अतिशय उपयोगी ठरतं.
जायफल और शहद के फायदे
» निद्रानाश होत असल्यास जायफळाची पूड तुपात घोळवून ती कपाळावर लावल्याने झोप येते आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.» अस्थम्याच्या झटक्यावर जायपत्री अतिशय गुणकारी ठरते. एक ग्रॅम जायपत्री मधात घोळवून दिवसातून ४-५ वेळा खाल्ल्याने अस्थम्याच्या रुग्णांना बराच आराम पडतो.
जायफळ चे फायदे मराठी
» जायपत्री तेलाच्या सेवनाने लहान मुलांची भूक वाढते आणि वजन कमी करण्यासही ती उपयुक्त ठरते.» अति तहान लागत असल्यास नैसर्गिक चहात (हर्बल टी)मध्ये ३ ग्रॅम जायपत्री टाकून तो चहा प्यावा. यामुळे लगेच आराम पडतो.
जायफल के फायदे चेहरे के लिए
» जायपत्री तेल आणि नारळाचं तेल दोन्ही एकत्र करून त्याने टाळूला मालीश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची वाढ होते.» आयरायटिससारख्या आजारात जायपत्रीचं तेल लावल्यास त्वरित आराम पडतो.
» बद्धकोष्ठतेवरही जायपत्री तेलाचा बाह्योपचार केला जातो.