Monday, May 23, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

दीर्घकालीन अस्थमा

कबुतरांच्या विष्ठेमुळे फुप्फुसाचा दाह करणा-या जीवाणूचा शरीरात प्रवेश होतो. परिणामी श्वसनाच्या अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. त्यातूनच अस्थमा बळावतो.

वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२० साली भारत ही अस्थमा रुग्णांची जागतिक राजधानी बनेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या आजाराला अनेक धोकादायक घटक कारणीभूत असले तरी एका निरीक्षणात मुंबई व ठाणे शहरात वाढत असलेले वायू प्रदूषण आणि कबुतरांची वाढती संख्या हे सुद्धा महत्त्वाचे कारण समोर येत आहे.

प्रदूषित वातावरणामुळे फुप्फुसांचे आरोग्य बिघडण्याचा मोठा धोका देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. फुप्फुसांच्या आजारांमधील दमा हा एक दीर्घकाळ चालणारा आजार.

दमा या आजाराची मुख्य लक्षणं पुढीलप्रमाणे-

»  सतत खोकला येणं

»  धाप लागणं

»  श्वासोच्छ्श्वास करताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणं

»  श्वास बाहेर सोडण्यास त्रास होणे

»  छातीवर वजन पडल्यासारखं वाटणं

»  याविषयी अधिक माहिती देताना नवी मुंबईतील नेरूळ येथील तेरणा सह्याद्री हॉस्पिटलचे ज्येष्ठ छातीविकार तज्ज्ञ डॉ. अभय उपे म्हणाले, ''कबुतरांच्या सततच्या संपर्कामुळे सर्वच वयोगटांतील व्यक्तींना श्वसन विकारांचा त्रास होत आहे.

»  याच जोडीला देवनार येथील डम्पिंग ग्राऊंड येथील लागलेल्या आगीमुळे नवी मुंबईमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. घरातील बाल्कनी व खिडक्या येथील कबुतरांची विष्ठा वाळत घातलेल्या कपडय़ांसोबत घरामध्ये येते व त्यामुळे अतिसंवदेनशीलता फुप्फुसाचा दाह निर्देशित करणा-या जीवाणूचा आपल्या शरीरात प्रवेश होतो व त्यामुळे श्वसनाच्या अनेक आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.''
भारतातील सहा मुलांपैकी एका मुलाला दम्याचा त्रास जडतो.

»  सीआरएफ या संस्थेने २००३ साली लहान मुलांच्या आरोग्याची पाहणी केली. या पाहणीत असं दिसून आलं की, त्या सालात लहान मुलांमध्ये दम्याचं २.५ टक्के एवढं प्रमाण होतं. २००८ मधील पाहणीत मात्र हे प्रमाण ५.५ टक्के झालं होतं. तर २०१२ मध्ये या प्रमाणात साधारण आठ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती.

२०१६ साली हे प्रमाण १५ टक्क्यांवर आलं असल्याचं भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळेच दमा या आजाराविषयी माहिती करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मुंबई व जवळच्या शहरांमध्ये दूषित हवा, बदलते हवामान, मोठया प्रमाणात होणारी बांधकामं या परिस्थितींमध्ये अस्थमा रुग्णांचा त्रास वाढतो.

यामुळे मुंबईतील अस्थमाच्या रुग्णांना जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे. अस्थमाचा रुग्ण वेळच्या वेळी औषधे घेत असला तरीही धुळीचे कण, धूर, फुलांचे परागकण, थंड हवामान, पित्त, मानसिक ताण, व्यायाम, धूम्रपान अशा गोष्टी अस्थमा बळावण्यास कारणीभूत ठरतात, असं मत मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नवजात शिशुतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. समीर शेख यांनी व्यक्त केले.

शिशुतज्ज्ञ डॉ. समीर शेख असंही म्हणतात की, ''लहानवयात दमा होण्याचं प्रमाण जास्त असतं. याला आपली बदलती खाद्य संस्कृती, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, कम्प्युटर अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत. यासाठी पालकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. मुलांकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार वाढू शकतो.

अनेक अस्थमांचे रुग्ण नियमित औषधोपचार करीत नाहीत. यामुळे पुढे हा आजार वाढतो. जीवघेणा अ‍ॅटॅक येऊ शकतो. आजारावरील खर्चही वाढतो. म्हणून नियमित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार आवश्यक आहे. त्यामुळे पालकांना मुलांमध्ये दम्याची लक्षणं दिसताच त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.''

अस्थमा असल्यास ही काळजी घ्या

»  मुलाला दम्याचा अटॅक आल्यास सरळ बसू द्या. लगेच झोपवू नका. शांत आणि ढिलेपणाने पडायला सांगा. कपडे सईल करा.

»  डॉक्टरांनी सांगितलेली रिलीव्हर औषधे लगेचच द्या. त्यामुळेही सुधारणा नसेल तर आणखी पाच मिनिटांनी रिलीव्हर औषधं थोडया प्रमाणात द्या.

»  तरीही बरं वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

»  याशिवाय मुलाला स्वत:ला अस्थमाविषयी औषधं आणि साधनं (इनहेलर्स, स्पेन्सर्स) कशी वापरावीत, ते शिकवा.

इतर काळजी

»  आठवडयातून एकदा अंथरूण पांघरूण गरम पाण्याने धुऊन खडखडीत सुकवा. डस्ट फ्री कव्हर्स वापरणं चांगलं.

»  मुलांची खेळणी नीट धुऊन स्वच्छ करता येतील अशीच वापरा.

»  मांजर, कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ जपून करावा.

»  तुमच्या मुलाच्या कीटमध्ये नेहमीच एक रिलीव्हर हँडी पॅक ठेवा.

»  शाळेमध्ये तात्काळ वेळेसाठी सूचना तुमच्या टेलिफोन नंबरसहित लिहून द्या.

»  अन्न हवारोधक डब्यांमध्ये ठेवा.

»  दमट जागा जसे की, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह किंवा तळघरात हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट पंखे लावा. तिथे येणारं शेवाळं नीट धुवून ती जागा पूर्णपणे सुकवा व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा, जेणेकरून परत बुरशी येणार नाही.

»  धुम्रपान टाळा. विशेषत: मुलांसमोर व घरात तर कटाक्षाने टाळाच. कारण त्याचा धूर बराच वेळ घरात रेंगाळत राहतो.

»  एखाद्या उत्पादनातील केमिकलची मुलाला अ‍ॅलर्जी आहे, असं लक्षात आलं तर ती वस्तू टाळा.

Read More »

होमिओपथी आणि माइग्रेन?

माइग्रेनच्या समस्येवर मात करणे हा होमिओपथीचा मुख्य उद्देश आहे. कारण एकाच वेळी दोन महिलांना माइग्रेनचा त्रास असेल तरीही त्यांची लक्षणं ही भिन्न असतात. कारण त्यांच्या भावना, संवेदना आणि प्रवृत्तीदेखील भिन्नच असतात. या सगळ्यांचा विचार होमिओपथीमध्ये केला जातो.

साधारणत: २५ ते ४० र्वष वयोगटांतील तीनपैकी एक महिला ही माइग्रेनच्या त्रासामुळे त्रस्त असते. हे कशामुळे होतं तर त्यांच्या शरीरात होणारे हार्मोन्सचे बदल आणि दैनंदिन जीवनात असलेला ताण.

मुलींमध्ये माइग्रेनची ही समस्या किशोरावस्थेत सुरू होते. ७५ टक्के महिलांना माइग्रेनचा त्रास हा मासिक पाळीदरम्यान डोकेदुखीच्या रूपात होतो तर काही महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या आणि शेवटच्या तीन महिन्यांत होतो.

माइग्रेनसाठी नेमकी काय कारणं आहेत हे अजून स्पष्टपणे सांगता येत नाही. आधुनिक विज्ञानाद्वारेही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. डॉक्टरांच्या मते, माइग्रेनचा त्रास हा शरीरात निर्माण होणा-या रक्ताची गुठळीमुळे किंवा चेतासंस्थेतून स्र्वणा-या काही रसायनांमुळे होण्याची शक्यता असते.

माइग्रेनची लक्षणं पुढीलप्रमाणे -

»  मासिक पाळीच्या दरम्यान होणारी डोकेदुखी.

»  डायरिया किंवा उलटया होणे.

»  गंध आणि ध्वनी क्षमता कमी होते.

»  पाहण्यात आणि ऐकण्यात कमतरता जाणवते.

»  हाता-पायाला मुंग्या येणे.

»  झोपेशी निगडित समस्या निर्माण होणे.

होमिओपथीद्वारा मात!

माइग्रेनच्या समस्येवर मात करणे हा होमिओपथीचा मुख्य उद्देश आहे. कारण एकाच वेळी दोन महिलांना माइग्रेनचा त्रास असेल तरीही त्यांची लक्षणं ही भिन्न असतात. कारण त्यांच्या भावना, संवेदना आणि प्रवृत्तीदेखील भिन्नच असतात.

या सगळ्यांचा विचार होमिओपथीमध्ये केला जातो. थोडक्यात ज्या कारणांमुळे हा माइग्रेनचा त्रास होतो तो समूळ नष्ट करण्याचं काम होमिओपथी करते.

होमिओपथी सांगते, माइग्रेन झालेल्या दोन व्यक्तींना सारखीच औषधं देऊन चालणार नाही. उदाहरणार्थ एका व्यक्तीने कमी त्रास होत असेल आणि त्याने डोक्याभोवती रुमाल बांधला. मात्र दुसरा असं करेलच असं नाही.

कदाचित दुस-या व्यक्तीला यामुळे त्रास होऊ शकेल. म्हणूनच दोन भिन्न व्यक्तींना एकसारखी औषधं देऊन चालणार नाही. म्हणूनच होमिओपथी केवळ अस्वस्थता कमी करत

Read More »

चक्की चलनासन

पूर्वी आपण जात्यावर दळण दळायचो, अगदी तसंच हे आसन आहे. म्हणून त्याला चक्की चलनासन, असं म्हणतात.

योगा मॅटवर बसावं. आता पायांना सोडावं. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवावं. पाय सरळ आणि ताठ असावेत. तसंच पायांची बोटं स्वत:कडे असावीत. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफवा.

चित्रात दाखवल्याप्रमाणे आता उजवीकडून गोलाकार पद्धतीने शरीराच्या वरील भागास फिरवावी. जेवढे पुढे वाकता येईल तेवढी वाकवण्याचा प्रयत्न करावा.

तसंच थोडं मागेही यावं. हातांना वाकवू नये. जसं पूर्वी आपण जात्यावर दळण दळायचो अगदी तसंच हे आसन आहे. त्या पद्धतीने हे आसन केलं जातं.

श्वास

»  मागे जाताना श्वास घ्यावा.
»  पुढे येताना श्वास सोडावा.

वेळ

»  घडयाळाप्रमाणे (क्लॉकवाईज) दहा वेळा करावे.

»  अँटिक्लॉकवाईज दहा वेळा करावे.

»  असे हे आसन दोन वेळा करावं.

काय काळजी घ्यावी

हे आसन करताना स्पीडमध्ये करू नये. हळुवारपणे गोलाकार पद्धतीने करावे. पाय आणि हात वाकवू नये. पुढे जेवढं वाकता येईल तेवढं वाकवण्याचा प्रयत्न करावा. तसंच त्याचबरोबर मागेही जावं. चित्रात दाखवल्याप्रमाणे हे आसन करावं.

फायदे

» या आसनाने पूर्ण शरीराला ताण मिळतो.

» यामुळे पेलवीक आणि पोटाचा चांगल्याप्रकारे ताण मिळतो.

» पोटसुद्धा कमी होण्यास मदत होते.

Read More »

अंजीर

फळांत अंजिराचेही महत्त्व पूर्वापार पुष्कळच आहे. मऊ, गोड आणि रसाळ असे हे फळ पौष्टिक व आरोग्यवर्धक आहे. मोदकाचा आकार, गोड गर व त्यात पुष्कळ बारीक पिवळया बिया असे हे फळ आहे.

पिकलेलं ताजं अंजीर गोड, चविष्ट असून तृप्तिदायक असतं. मात्र हे फळ लवकर खराब होणारं असल्याने पिकेल तिथेच आसपास ताज्या स्वरूपात विकलं जातं. दूरवर ती सुकवूनच पाठवतात.

अंजिराचीही लागवड प्राचीन काळापासूनची आहे. ईजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व काळात ४००० वर्षापूर्वीपासून अंजीर पिकवत असत. हजारो वष्रे मध्य पूर्वेकडील देशांत ते प्रमुख अन्नापैकी एक मानले जाई.

आपल्याकडे आज महाराष्ट्रात पुणे, कर्नाटकात श्रीरंगपट्टमण, उत्तर प्रदेशात लखनौ येथे व गुजरात येथेही काही ठिकाणी याचे पीक घेतात.

»  अंजीरमध्ये आद्र्रता बरीच असून पिष्टमय पदार्थ, मेद व काही प्रमाणात प्रथिने आहेत.

»  अंजीर स्वतंत्रपणे वा इतर अन्नपदार्थाबरोबर खाल्यास त्याची पौष्टिकता वाढते.

»  केक, जॅम, पुडिंग करताना अंजिराचा वापर करतात.

»  आजारात शरीराची झालेली हानी भरून काढून प्रकृती लवकर पूर्ववत करतो.

»  ओठ, जीभ व तोंड यांना कात्रे पडत असल्यास अंजिराने ते भरून येतात.

»  अंजिरातील बारीक बियांमध्ये आतडयातील आकुंचन-प्रसरणाची क्रिया वेगाने करण्याचा गुण असल्याने पचनसंस्था स्वच्छ राहते.

»  सारक गुणामुळे मूळव्याधीवर अंजीर हे उत्तम औषध आहे. दोन-तीन अंजीर रात्री पाण्यात भिजत टाकून सकाळ, संध्याकाळी तेच गरम पाण्याने धुवून खावे. यामुळे मळाचा कडकपणा कमी होऊन आतडयाचा दाह होत नाही. असे चार आठवडे खाल्यास मूळव्याधीचा बीमोड होतो.

»  दम्यावरही अंजीर गुणकारी आहे.

»  अंजीर, खजूर, बदाम व लोणी एकत्र करून खावे.

»  पायांना होणा-या कुरुपांना कच्च्या अंजिराचा पीक लावावा.

»  अंजीर वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं.

»  भिजवलेले अंजीर पचायला सुलभ असतात.

Read More »

लायसोमल स्टोरेज डिसऑर्डर

या प्रकारचा विकार दुर्मीळ समजला जातो. ४५ प्रकारचे अनुवांशिक असणारे हे विकार लायसोमल स्टोरेज डिसऑर्डर म्हणजेच एलएसडी म्हणून ओळखले जातात. हे विकार पेशींमधील लायसोमसमध्ये असणा-या विशिष्ट एंझायमच्या कमतरतेमुळे उद्भवतात. एलएसडीवर उपचार करण्यासाठी एंझायम रिप्लेसमेंट थेरपीजची (ईआरटी) आवश्यकता असते.

मकोपॉलीसॅचायजडोसेस म्हणजेच एमपीएसविषयी जनजागृती करणे हा या लेखामागचा उद्देश होता. या प्रकारचा विकार दुर्मीळ समजला जातो. ४५ प्रकारचे अनुवांशिक असणारे हे विकार लायसोमल स्टोरेज डिसऑर्डर म्हणजेच एलएसडी म्हणून ओळखले जातात. हे विकार पेशींमधील लायसोमसमध्ये असणा-या विशिष्ट एंझायमच्या कमतरतेमुळे उद्भवतात.

बहुतांशी एलएसडीवर उपचार करण्यासाठी विशिष्ट प्रकारची काळजी घेणे आवश्यक असते. मात्र ७ विशिष्ट प्रकारच्या एलएसडीवर उपचार करण्यासाठी एंझायम रिप्लेसमेंट थेरपीजची (ईआरटी) आवश्यकता असते. भारतात सध्या असे सुमारे ३०० ते ४०० रुग्ण आहेत, ज्यांचे निदान उपचारायोग्य एलएसडी म्हणून करण्यात आले आहे.

केईएम रुग्णालयात निदान करण्यात आलेल्या ११९ एलएसडीपैकी २४ रुग्णांना एमपीएसची बाधा झाली आहे. (एलएसडीपैकी सुमारे २० टक्के) ही संख्या रुग्णालयातील बाधीत रुग्णांपैकी केवळ एक तृतीयांश इतकीच संख्या आहे.

इतर दोन तृतीयांश रुग्णांचे पूर्णपणे निदान झालेले नसते किंवा त्यांनी याबाबत आवश्यक ते रिपोर्ट्स क्लिनिकमध्ये दाखवलेले नसतात. याशिवाय अनेक कुटुंबांमध्ये एमएसपी बाधीत मुलांचा मृत्यूही उद्भवत असतो.

एमपीएसची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येणारी प्रमुख लक्षणे -

»  बाल्यावस्थेत वारंवार उद्भवणारा खोकला आणि सर्दीचा त्रास.

»  नाक तसेच कानातून वाहणारा स्राव.

»  श्वासोच्छ्वास करताना होणारा आवाज.

»  हर्नियाच्या दुखण्याचा त्रास आणि त्यामुळे उद्भवणारी पोटफुगी.

»  पाठीच्या कण्याचे दुखणे तसेच सांधे आखडणे.

वाढत्या वयानुसार या लक्षणांमध्येही बदल घडून येत असतात. त्यामुळे जीभ, डोके यांचा आकार वाढत राहतो. चेहरा ओबडधोबड दिसू लागतो. नजर कमजोर बनू लागते. पोटाचा आकार वाढून शरीरावर अनेक प्रकारची व्यंगे दिसू लागतात. ज्यामध्ये बरगडय़ांचा आकार मोठा होणे, छातीच्या हाडाचा आकार वाढणे तसेच गुडघ्याच्या हाडाचा आकार वाढणे यांसारख्या व्यंगांचा समावेश आहे.

एलएसडीला इतके महत्त्व देण्याचे कारण म्हणजे एलएसडी ग्रस्तांचे वाढत असणारे प्रमाण, जे प्रत्येक ५ हजार बालकांच्या जन्मामागे १ इतके बनले आहे. भारतात प्रत्येक वर्षी १०० रुग्ण उपचारयोग्य एलएसडी रुग्ण आढळून येत आहेत. हे रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळवण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागत आहेत.

त्यांची योग्य ती काळजी घेणारी केंद्रे शोधणे हे एक कठीण काम बनले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये एलएसडीबाबत पुरेशा ज्ञानाचा अभाव ही कारणे देखील त्याच वेळेत निदान न होण्याचे कारण आहे. ज्यामुळे रुग्णांना भविष्यात आणखी त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

मदत कशी मिळवाल?

एलएसडीच्या रुग्णांसाठी एंझायम रिप्लेसमेंट थेरपी (ईआरटी) गेल्या २५ वर्षापासून उपलब्ध आहे. एमपीएससाठी उपलब्ध असणारी थेरपी सर्वप्रथम २००३ साली वापरण्यात आली. अमेरिका, लॅटिन अमेरिका, एशिया तसेच युरोपियन युनियनमधील अनेक देशांत रुग्णांना ईआरटीसाठी सरकार किंवा आरोग्य विमा योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो.

भारतात केंद्र तसेच राज्य सरकारकडून त्याच प्रकारे एलएसडी रुग्णांसाठी मदतीची आणि लाभाची अपेक्षा आहे. अलीकडेच उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निकालानुसारही एलएसडीच्या रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत ईआरटीची सुविधा पुरवण्याची आवश्यकता आहे.

भारतातील एलएसडी कम्युनिटी आणि प्रामुख्याने एमपीएस बाधीत कुटुंबांनी आवश्यक ते उपचार मिळवण्यासाठी आपले संघटन मजबूत करण्याचीही आवश्यकता आहे. याबाबत एकजुटीने सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा केल्यास एलएसडी कम्युनिटीला आवश्यक ते उपचार आणि काळजीवाहक केंद्र उपलब्ध होऊ शकतील.

कॉर्पोरेट जगताने पुढाकार घेऊन निधी संकलनासाठी योगदान द्यावे ज्याचा एलएसडी रुग्णांच्या उपचारासाठी उपयोग होईल. ज्याचे अनुकरण इतर लोकांकडूनही होऊ शकेल.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

A pretty face will always grow old. A nice body will always change with age. However… A good soul will always be a good soul.

A pretty face will always grow old. A nice body will always change with age. However… A good soul will always be a good soul.


A pretty face will always grow old. A nice body will always change with age. However… A good soul will always be a good soul.

Posted: 22 May 2016 09:52 PM PDT

A pretty face will always grow old. A nice body will always change with age. However... A good soul will always be a good soul.
A pretty face will always grow old. A nice body will always change with age. However… A good soul will always be a good soul.

The post A pretty face will always grow old. A nice body will always change with age. However… A good soul will always be a good soul. appeared first on .

Bible Study and Book Club Updates

Bible Study and Book Club Updates


Job: Trusting God in Times of Adversity| Week 2

Posted: 22 May 2016 08:49 PM PDT

Welcome back to our online Inductive Bible Study on the book of Job, “Trusting God in Times of Adversity" by Kay Arthur.   We just completed Week Two of our study,...

...To read full article please click article title (blue words). We are leading several studies so click on the article link related to your study.

Laughing in the Dark: a Bible Study on the Book of Job | Week 2

Posted: 22 May 2016 02:46 PM PDT

Welcome to our Week TWO discussion for “Laughing in the Dark: a Bible Study on the Book of Job” by Chonda Pierce and Dale McCleskey. It would be amazing to sit...

...To read full article please click article title (blue words). We are leading several studies so click on the article link related to your study.