| ||||||||||||||||||||||||||
ऑलिंपिक समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्जी बुबका
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (आयओसी) अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी सवरेत्तम पोल व्हॉल्टपटू, युक्रेनचे सर्जी बुबका उतरले आहेत. सेंट पीटर्सबर्ग (रशिया) : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (आयओसी) अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी सवरेत्तम पोल व्हॉल्टपटू, युक्रेनचे सर्जी बुबका उतरले आहेत. ऑलिंपिकसह जागतिक स्पर्धात आपला वेगळा ठसा उमटवणारे बुबका हे अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेले सहावे उमेदवार आहेत. विद्यमान अध्यक्ष ज्याक रॉग येत्या सप्टेंबरमध्ये पायउतार होणार आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (आयओसी) बुधवारी (२९ मे) सेंट पीटर्सबर्गमध्ये होणा-या बैठकीत २०२० ऑलिंपिकसाठीच्या खेळाची अंतिम यादी बनवली जाणार आहे. त्यात पारंपरिक कुस्तीचा समावेश असेल, अशी आशा जगभरातील कुस्तीपटूंनी व्यक्त केली आहे. Read More » ऑस्ट्रेलिया-अमेरिकेच्या माहितीवर चिनी हॅकर्सचा डल्ला
ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम गुप्तहेर संस्थेच्या नव्या मुख्यालयाच्या अतिशय गुप्त असलेल्या आराखडयाची चिनी हॅकर्सनी चोरी केली असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम गुप्तहेर संस्थेच्या नव्या मुख्यालयाच्या अतिशय गुप्त असलेल्या आराखडयाची चिनी हॅकर्सनी चोरी केली असल्याचे म्हटले जात आहे. 'ऑस्ट्रेलिया सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन'(एएसआयओ) या संस्थेच्या कॅनबेरा येथील नव्या केंद्राची माहिती असलेल्या संगणक प्रणालीमध्ये शिरकाव करून त्यातील माहिती चीनमधील सर्वरवरून तपासली गेल्याचे आढळले आहे. ऑस्ट्रेलियाच्या तपास संस्थेने ही माहिती दिली आहे. या केंद्राची माहिती असलेला व त्याची रचना दाखवणारा आराखडा, त्यामध्ये संपर्कासाठी असलेले केबलचे जाळे, त्यातील सर्वर आणि सुरक्षाप्रणाली याबाबतची माहिती मिळवण्यात आली. या प्रकल्पाची उभारणी करणा-या कंत्राटदाराला लक्ष्य करून ही माहिती मिळवण्यात आली.त्याच प्रकारे ऑस्ट्रेलियन लष्करासाठी व गुप्तचर संस्थांसाठी रेडियो बनवणा-या ब्ल्यूस्कोप स्टील व अॅडलेडच्या कोडान या कंपन्यांनाही चिनी हॅकर्सनी लक्ष्य केल्याचे दिसून आले. सरकारी विभाग आणि महत्त्वाच्या कंपन्यांची माहितीही हॅकर्सनी मिळवली असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेशी संबंधित ही महत्त्वाची माहिती चीनमधून चोरण्यात आल्याचे स्पष्ट झाले असले तरी हे हॅकर्स चिनी सरकारसाठी काम करत असल्याचे सिद्ध झालेले नाही. मात्र, या प्रकरणाचा चीनशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ देणार नसल्याची भूमिका ऑस्ट्रेलियाने घेतली आहे. हा प्रकार चीनने केला आहे की नाही याबाबत आपण कोणतेही वक्तव्य करणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री बॉब केर यांनी म्हटले आहे. सायबर हल्ल्यांबाबत ऑस्ट्रेलियाचे सरकार खूप जागरूक आहे, असे ते म्हणाले. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या या वृत्ताचे चीनशी असलेल्या संरक्षणविषयक संबंधांवर कोणतेही परिणाम होणार नाहीत व ऑस्ट्रेलियाची चीनसोबत विविध क्षेत्रांत असलेली भागीदारी तशीच कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षाप्रणालीवर सायबर हल्ला झाला असतानाच, अमेरिकेच्या अतिशय संवेदनशील अत्याधुनिक शस्त्रप्रणालीच्या रचनांचीही चिनी हॅकर्सनी चोरी केल्याचे उघड झाले आहे. अतिशय महत्त्वाच्या असलेल्या क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमाची माहितीही त्यांनी मिळवली असल्याचे अमेरिकेच्या अहवालात म्हटले आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयासाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हॅक केलेल्या माहितीमध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन डझनांहून अधिक शस्त्रप्रणालींच्या माहितीचा समावेश आहे. अमेरिकेची लढाऊ जहाजे, विमाने व क्षेपणास्त्र हल्ल्यापासून संरक्षण कार्यक्रमाशी संबंधित या शस्त्रप्रणाली आहेत. यापूर्वी पेंटॅगॉनसाठी तयार करण्यात आलेल्या अहवालात या रचनांची माहिती चिनी हॅकर्सनी चोरल्याचा आरोप करण्यात आला नव्हता. मात्र, वरिष्ठ लष्करी आणि उद्योग क्षेत्रातील अधिका-यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे चिनी हॅकर्सच्या घुसखोरीचा आरोप केला आहे. अशा प्रकारे अमेरिकेच्या संरक्षणविषयक गुप्त माहितीची चोरी करण्यामुळे चीनला त्यांचा शस्त्रास्त्र विकास कार्यक्रम वेगाने वाढवता येणार आहे व अमेरिकेची लष्करी ताकद भविष्यात कमकुवत करता येणार आहे, असा इशारा संरक्षणतज्ज्ञांनी दिला आहे. Read More » महसूल कमाईत कॉग्निझंट दुस-या क्रमांकावर
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 'कॉग्निझंट'ने २०१२ या वर्षात भारतात महसूल कमाईत आघाडी घेतली आहे. या क्षेत्रातील इन्फोसिसला मागे टाकून कॉग्निझंटने दुसरा क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्ली - माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 'कॉग्निझंट'ने २०१२ या वर्षात भारतात महसूल कमाईत आघाडी घेतली आहे. या क्षेत्रातील इन्फोसिसला मागे टाकून कॉग्निझंटने दुसरा क्रमांक मिळवला आहे. कंपनीच्या महसुलात गेल्या वर्षात २०.१ टक्के वाढ झाली. कॉग्निझंटने २०१२ मध्ये जागतिक बाजारात ७.१ अब्ज डॉलर्स महसूल मिळवला. देशातील पाच माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचा एकत्रित महसूल १३ टक्क्याने वाढून ३४.३ अब्ज डॉलर्स (१९,००० कोटी) झाला आहे. गेल्या वर्षी हा महसूल ३०.३ अब्ज डॉलर्स होता. टीसीएसने १०.९ अब्ज, कॉग्निझंट ७.१ अब्ज, इन्फोसिस ६.७ अब्ज, विप्रो ५.७ अब्ज, एचसीएल टेक्नॉलॉजीस ३.९ अब्ज डॉलर्स महसूल मिळवला असल्याचे गार्टनरचे संशोधन संचालक अरुप रॉय यांनी सांगितले. जेनपॅक्ट, कॉग्निझंट, सिंटेल आणि आयगेट या कंपन्यांची मुख्यालये परदेशात असली तरी वितरण, व्यवस्थापन आदी बाबी भारतीय कंपन्यांसारख्याच आहेत. जागतिक मंदीमुळे भारतातील अनेक आयटी कंपन्यांची व्यवसायिक वाढ खुंटली आहे. मात्र असे असले तरी आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत त्यांची कामगिरी चांगली आहे. देशातील पाच मोठय़ा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणा-या कामाचा हिस्सा कायम ठेवला आहे. गेल्या पाच वर्षात या कंपन्यांनी १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक रक्कमेची कंत्राटे मिळवली आहेत. या कंपन्यांनी 'फॉच्र्युन १०००' कंपन्यांकडून कामे मिळवण्याचे लक्ष्य केंद्रीत केले, असे रॉय यांनी सांगितले.
Read More » ८ टक्के विकासदर शक्य
सरकारच्या द्विधा मन:स्थितीमुळे देशाचा विकासदर सातत्याने ५ ते ६ टक्क्यांमध्ये रेंगाळत असून प्रभावी प्रशासनाने ८ टक्के विकासदर गाठणे सहजशक्य असल्याचा विश्वास अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला. चेन्नई - सरकारच्या द्विधा मन:स्थितीमुळे देशाचा विकासदर सातत्याने ५ ते ६ टक्क्यांमध्ये रेंगाळत असून प्रभावी प्रशासनाने ८ टक्के विकासदर गाठणे सहजशक्य असल्याचा विश्वास अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला. सरकारच्या धोरणे राबवण्याच्या द्विधा मनस्थितीमुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर ५ ते ६ टक्क्याच्या दरम्यान आहे. सरकारकडून नियोजनबद्ध कार्यक्रम राबवल्यास आर्थिक विकासदर आठ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासाला चालना देण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. सरकारचा कारभार अधिक प्रभावी आणि जबाबदार झाल्यास हे लक्ष्य गाठणे सहज शक्य आहे. पैशाचा प्रभावी वापर आणि प्रकल्पांचे योग्य नियोजन झाल्यास ९ टक्के विकासदर गाठता येऊ शकतो असे त्यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार नाही, मात्र त्यासाठी स्थानिक कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावे लागेल, असेही ते म्हणाले. Read More » महाडमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा
तालुक्यातील नदी-नाले आटल्याने ग्रामीण भागांतील नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. येथील १ गाव व ६४ वाडय़ांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. महाड - तालुक्यातील नदी-नाले आटल्याने ग्रामीण भागांतील नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. येथील १ गाव व ६४ वाडयामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. या वाडयांना महाड पंचायत समितीमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंचायत समितीतर्फे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाडमध्ये दरवर्षी उन्हाळयात पाणीटंचाई निर्माण होते. यंदा येथील १ गाव व ६४ वाडयामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रायगड विभागातील कोकरे आणि नाते या दोन गावांमधील स्मशानभूमीजवळील गांधारी नदीकाठी पंप बसवून महाड पंचायत समितीतर्फे टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पण, गांधारी नदीच्या पात्रात जवळपास कोठेही पाणी नसल्याने आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ कपडे धुण्यासाठी येथे येतात. कपडे धुण्याचे ठिकाण आणि टंचाईग्रस्त गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी बसविलेला पंप केवळ १० ते १५ मीटर अंतरावर असल्याने टंचाईग्रस्त गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तर, पंचायत समितीमार्फत टंचाईग्रस्त गावांना फक्त टीसीएल पावडर टाकण्याचा सल्ला दिला जात असल्याने दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- डॉ. राजेंद्र शिंदे , आरोग्य अधिकारी , महाड तालुका
- संघरत्ना खिलारे , गट विकस अधिकारी , महाड Read More » स्टॉसूरची विजयी सलामी
नवव्या सीडेड ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टॉसूरने फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत विजयी सलामी दिली. तिस-या दिवशी स्पर्धेला पावसाचा फटका बसला. पॅरिस - नवव्या सीडेड ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टॉसूरने फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत विजयी सलामी दिली. तिस-या दिवशी स्पर्धेला पावसाचा फटका बसला. त्यामुळे मंगळवारचे सामने नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाहीत. प्रत्येक कोर्टवरील शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आल्याचे संयोजकांनी जाहीर केले. महिला एकेरीत मंगळवारी नवव्या सीडेड ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टॉसूरने बिनसीडेड जपानच्या किमिको डेट-क्रमला ६-०, ६-२ असे सरळ सेट्समध्ये हरवले. अन्य लढतीत कोलंबियाच्या मॅरियाना डक-मॅरिनोने चेक रिपब्लिकच्या क्रिस्तिना प्लिस्कोवानवर ६-२, ६-० असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत २६व्या सीडेड बल्गेरियाच्या ग्रिगर दिमित्रोवला सलामीचा अडथळा पार करायला फार प्रयास पडले नाहीत. प्रतिस्पर्धी कोलंबियाचा अलेजँड्रो फाल्लाने दुस-या सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घेतल्याने दिमित्रोवला पुढे चाल देण्यात आली. त्यावेळी दिमित्रोव ६-४, १-० असा आघाडीवर होता. पुरुष दुहेरीत सातव्या सीडेड अलेक्झांडर पेया (ऑस्ट्रिया) आणि ब्रुनो सोरेसने (ब्राझील) बिनसीडेड जेम्स कॅरेटनी (अमेरिका) आणि स्लोव्हाकियाच्या लुकास लॅकोवर ६-२, ३-६, ६-१ अशी चुरशीच्या लढतीत मात केली. दुस-या दिवशी सोमवारी रात्री उशीरा झालेल्या लढतींमध्ये पुरुष एकेरीत फ्रान्सच्या गेल मॉन्फिल्सने पाचव्या सीडेड चेक रिपब्लिकच्या टोमास बर्डिचचे आव्हान ७-६(८), ६-४, ६-७(३), ६-७(४), ७-५ असे चुरशीच्या लढतीत संपुष्टात आणताना दुसरी फेरी गाठली. ३०वा सीडेड फ्रान्सचा ज्युलियन बेनीटी आणि फिनलंडच्या जारको निमिनेननेही चुरशीच्या झुंजीनंतर सलामीचा अडथळा पार केला. बेनीटीने लुथियानाच्या रिकार्डास बेरॅन्किसला ७-६(५), ६-३, ५-७, ७-६(५) आणि निमिनेनने फ्रान्सच्या पॉल-हेन्री मॅथियुला ६-४, ४-६, ७-६(९), ४-६, ६-२ असे हरवले. उरुग्वेचा पॅब्लो क्युवॅस आणि फ्रान्सचा अड्रियन मॅन्नारिनो यांच्यातील लढत ६-३, २-६, ६-३, ५-७, ७-५ अशी रंगली. त्यात क्युवॅसने बाजी मारली. स्पेनच्या फेलिसियानो लोपेझ आणि मार्सेल ग्रॅनोलर्स यांच्यातील लढत ७-५, २-६, ६-४, ४-६, ६-४ अशी रंगली, यात लोपेझने विजय मिळवला.
Read More » १० मिनिटांत होणार रोगनिदान?
कर्करोग किंवा क्षयरोग, मलेरिया इतकेच नव्हे तर एचआयव्हीचा संसर्ग यांसारख्या विकाराचे निदान केवळ १० मिनिटांत करणारे यंत्र तयार केल्याचा दावा ब्रिटनमधील एका शास्त्रज्ञाने केला आहे. कर्करोग किंवा क्षयरोग, मलेरिया इतकेच नव्हे तर एचआयव्हीचा संसर्ग यांसारख्या विकाराचे निदान केवळ १० मिनिटांत करणारे यंत्र तयार केल्याचा दावा ब्रिटनमधील एका शास्त्रज्ञाने केला आहे. हे उपकरण स्वस्त आणि हाताळण्यास अगदी सुटसुटीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 'क्यू-पीओसी' नावाचे हे यंत्र टय़ूमर आणि रोगाच्या जनुकीय संकेतांचे सूक्ष्म-विश्लेषण करते आणि त्यावरील सर्वोत्तम उपचार किंवा औषधे सुचवते. हे आश्चर्यकारक यंत्र तयार करणा-या जोनाथन ओ हॅलोरन या शास्त्रज्ञाने इस्ट ससेक्समधील त्याच्या गॅरेजचे रूपांतर प्रयोगशाळेत करून हे संशोधन केले. शरीरातून घेतलेल्या सूक्ष्म नमुन्यातील डीएनए त्यात सोडून त्याच्या अनेक प्रती तयार करून अचून निदान करण्याची ही अभिनव कल्पना हॅलोरन यांनी प्रत्यक्षात आणली. या यंत्राच्या सध्या अतिशय कडक वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात असून पुढील वर्षी त्याचा वापर ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. मानवी शरीरातील टय़ूमर किंवा इतर नमुन्यातील डीएनए वेगळा काढून, तो मोठा करून त्यातील बारकावे लक्षात घेण्यासाठी आम्ही या उपकरणाचा वापर करून रुग्णांना लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे हॅलोरन यांनी सांगितले आहे. प्रयोगशाळांमध्ये शरीरातील नमुन्यांचे विश्लेषण करणारे 'हिस्टोपॅथॉलॉजिस्ट' व त्यावरील उपचार सुचवणारे वैद्यकीय तज्ज्ञ यांच्यामधील दुवा म्हणून हे यंत्र काम करणार आहे. कर्करोगग्रस्तांना याचा फायदा होईलच. त्याचबरोबर एचआयव्ही, क्षयरोग, मलेरिया आणि इतर विकारांचे निदान करण्यामध्ये डॉक्टरांना मदत होणार आहे.
Read More » आदिवासींच्या जमिनींबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी
आदिवासींच्या जमिनींची मोठया प्रमाणात बेकायदा विक्री होत आहे. त्यांच्या जमिनींत भराव आणि खोदकाम करून आदिवासींना फसवण्याचे प्रकारही वाढत आहेत. डहाणू - आदिवासींच्या जमिनींची मोठया प्रमाणात बेकायदा विक्री होत आहे. त्यांच्या जमिनींत भराव आणि खोदकाम करून आदिवासींना फसवण्याचे प्रकारही वाढत आहेत. याविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन भूमाफियांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी डहाणू तहसीलदार महेश सागर यांना दिले आहेत. डहाणू तालुक्यातील वार्षिक आमसभेचे अध्यक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. भ्रष्टाचारात अडकलेली डहाणू पाणीपुरवठा योजना, आरोग्य, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग इत्यादी मूलभूत प्रश्नांवर या आमसभेत चर्चा करण्यात आली. या वेळी जनतेने प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रस्ते, पाणी, वीज, आदिवासी विकास प्रकल्प इत्यादी विषयांवर रहिवाशांनी विविध खात्यांच्या अधिका-यांना जाबही विचारला. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठीच्या योजनेत झालेल्या गरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची, तसेच सरकारी अधिक-यांना विनवणी करूनही विहिरींकडे दुर्लक्ष होत असल्याने आदिवासी जनतेला पिण्याच्या पाण्याच्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोपही रहिवाशांनी या वेळी केला. त्यावर गावित यांनी या प्रश्नांची सोडवणूक करतानाच, आदिवासींच्या जमिनींबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. या आमसभेला डहाणू आमदार राजाराम ओझरे, सभापती मधूकर गुहे, उपसभापती दिलीप राऊत, बांधकाम सभापती राजेंद्र मेहेर, जि. प. सदस्य प्रतिमा धर्ममेहेर, जि. प. सदस्य विनिता विवेक कोरे, जि. प. सदस्य प्रदीप चुरी, जि. प. सदस्य प्रीती अक्रे, उपनगराध्यक्ष दिलीप राऊत, गटविकास अधिकारी रमेश अवचार, डहाणू तहसीलदार महेश सागर, गटशिक्षणाधिकारी जनाथे, सूर्या प्रकल्प, वीज वितरण, वनविभाग आणि पोलिस व आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. Read More » 'मदर इंडिया फेम' कांकरेज गोवंश
भारतीय गोवंशातील बघता क्षणीच प्रेमात पडावे, असा लोभस गोवंश म्हणजे 'कांकरेज गोवंश' होय. या गोवंशाने त्याच्या अंगच्या गुणवत्तेने परदेशीयांनासुद्धा संशोधन करण्यास भाग पाडले आहे. आर्यानी ज्या वेळी आक्रमण केले त्या वेळी त्यांच्याबरोबर असलेला गोवंश म्हणून या गोवंशाची नोंद आहे. कमी पावसाच्या प्रदेशात निकृष्ट अन्नावर पोषण होऊनदेखील उत्तम गुणवत्ता सिद्ध करणं हे या गोवंशाचं प्रमुख वैश्ष्टय आहे. आपल्या भारतामध्ये कच्छच्या रणाच्या दक्षिण भागात म्हणजेच पूर्वेकडील देशापासून ते पश्चिमेकडील राधानूपूर जिल्ह्यापर्यंत 'कांकरेज गोवंश' उत्तम पद्धतीने सांभाळला जातो. या गोवंशातील उत्तम जनावरे दरवर्षी माघ महिन्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असतात. बानस आणि सरस्वती या दोन नद्यांच्या खो-यातील भागामध्येसुद्धा हा गोवंश चांगल्या पद्धतीने जोपासला जातो. हा प्रदेश या गोवंशाचं मूळ उगमस्थान आहे, असं जुने जाणकार सांगतात. त्याचप्रमाणे काठेवाड, वडोदरा (बडोदा), सुरत या भागातही हा गोवंश मोठय़ा प्रमाणावर व उत्तमरीत्या सांभाळला जात आहे. या गोवंशाला स्थानिक भाषेत वडीहार, वगाड, वगाडिया अशा उपनावांनीही संबोधलं जातं. भरदार छाती, सशक्त भक्कम व मोठी शरीरयष्टी, जाडसर व सलसर कातडी, अत्यंत देखण्या चंद्रकोरीप्रमाणे रेखीव व डौलदार शिंगं, रंग पांढरा, भुरकट ते जांभळट कोसापर्यंतच्या सर्व छटांमध्ये असतो. एकूण शरीराच्या मानानं चेहरा थोडा लहान असतो, पण जबडा रुंद असतो. नाकपुडी संपूर्णपणे काळी व किंचित उचलल्यासारखी दिसते. कान लांबट अरुंद व टोकदार असतात. शिंगाच्या मुळाशी जाड केसांचं घट्ट आवरण असतं, शिंगं बहुतांशी करडय़ा रंगाची असतात. क्वचित लालसर गुलाबी छटेची आढळतात. जनावर थोराड व लांबरुंद असतं. त्यामुळे बैलांमध्ये 'पावलावर पाऊल' कधीच पडत नाही, मागचे चौक रुंद, सरळ तसेच कमी उताराचे असतात. शेपूट उंचीला मध्यम असते पण शेपूटगोंडा काळा, मोठा व झुपकेदार असतो. वशिंड एकूण शरीराच्या मानाने फार मोठं नसतं. गायींमधे कास मोठी व घोळदार असते, चारही सड (आचळ) लांबट, मोठे असून समान अंतरावर असतात. गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शिरा अत्यंत स्पष्ट, नागमोडी व ठळक असतात. या गोवंशाच्या कालवडीचं प्रथम माजावर येण्याचं वय साधारणत: ३० ते ३६ महिन्यांच्या दरम्यान असते. प्रथम वेतामध्ये या गायी दिवसाकाठी सर्वसाधारण मेहनतीवर ६ ते ७ लिटर दूध सहज देतात. सलग २७० ते ३०० दिवस विनातक्रार जेवढं आहे, तेवढं दूध देणं, ही या गोवंशाची खासियत आहे. सर्वसाधारणपणे दुधातील स्निग्धतेचं प्रमाण ३.५ ते ४ च्या दरम्यान असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २२ महिन्यांदरम्यान असतं तर संपूर्णत: भाकडकाळ ४ ते ६ महिन्यांचा असतो. जन्मत: वासरांच्या अंगावर विविध रंगाच्या छटा असतात, पण वासरू जसजसं ६ ते ७ महिन्यांपेक्षा मोठं होऊ लागतं, तसा त्याला मूळ गोवंशाचा रंग येऊ लागतो. या गोवंशाचे बैल वयाची चार र्वष पूर्ण झाल्यावर शेतीकामास योग्य होतात. बैल लांब पौंडी असल्यामुळे अंतर कमीत कमी श्रमात व झपाटय़ाने कापतात. बैल ओढकामात व शेतीकामात अंगची विलक्षण ताकद सिद्ध करून दाखवतात. या बैलांमध्ये मारकेपणा क्वचित आढळतो. ही जनावरे अत्यंत शांत व सुस्वभावी असतात. एका मालकाकडे उत्तम मेहनतीवर ही बैलजोडी २० ते २२ र्वष सहज काम करते तसंच गायीच्या ८ ते १० वेणी सहज होतात. या गोवंशाच्या उत्तम बैलजोडीची किंमत ७५ ते ८० हजारांदरम्यान असते, तर उत्तम गायीची किंमत २५ ते ३५ हजारांपर्यंत असते. आपल्या सरकारने या गोवंशाचं महत्त्व जाणून पोस्टाचं ३ रुपयांचं तिकीटही काढलं आहे. ब्राझील देशाने हा गोवंश स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्याकडे नेऊन अभ्यासपूर्ण संशोधन करून उत्तम गुणवत्तेचा परिपूर्ण असा 'गुजेरात' नामकरण केलेला गोवंश निर्माण केला. त्याचप्रमाणे अमेरिकेतही या गोवंशावर विशेष संशोधन झालं आहे. Read More » सुनील दुबईला अटक का होत नाही?
स्पॉटफिक्सिग व सट्टाप्रकरणी तपास करत असलेले दिल्ली पोलिस (विशेष दल) व मुंबई गुन्हे शाखा या दोघांच्याही तपासात अश्विन अगरवाल ऊर्फ टिंकू या सट्टेबाजाचे नाव पुढे आले आहे. स्पॉटफिक्सिग व सट्टाप्रकरणी तपास करत असलेले दिल्ली पोलिस (विशेष दल) व मुंबई गुन्हे शाखा या दोघांच्याही तपासात अश्विन अगरवाल ऊर्फ टिंकू या सट्टेबाजाचे नाव पुढे आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टिंकू हा सुनील दुबई या मोठय़ा सट्टेबाजाचा अत्यंत विश्वासू साथीदार आहे. यापूर्वीही सट्टेबाजीच्या अनेक प्रकरणांत सुनील दुबईचे नाव समोर आले आहे. तरीही आतापर्यंत कधीही त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे काहींच्या वरदहस्तामुळेच त्याला अटक होत नाही, अशी चर्चा सध्या पोलिसांत सुरू आहे. आयपीएल सामन्यांत स्पॉटफिक्सिग व सट्टा लावल्याबद्दल आतापर्यंत ३ खेळाडू व २०हून अधिक सट्टेबाजांना अटक झाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुनील दुबईच्या नावापर्यंत थांबतो, अशी चर्चा आहे. गेल्या वर्षीही गुन्हे शाखेने आयपीएलदरम्यान अध्र्या डझन सट्टेबाजांना पकडले होते. त्यातील सोनू जालान व देवेंद्र कोठारी यांच्या चौकशीतही सुनील दुबईचे नाव पुढे आले होते. याशिवाय दोन वर्षापूर्वीच्या अंधेरीतील एका गुन्ह्यातही तो 'वाँटेड' आहे. या प्रकरणांनंतर सुनील दुबईविरोधात देशातील सर्व विमानतळांवर लूकआऊट नोटिस जारी करण्यात आली होती. या नोटिसीमुळे परदेशातून भारतात येण्याची सुनील दुबईची सर्व दारे बंद झाली आहेत. लूकआऊट नोटिस जारी केल्यानंतर परदेशातून देशात कोणत्याही विमानतळावर उतरल्यास संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याचे अधिकार विमानतळ सुरक्षा यंत्रणांना मिळतात. त्यानंतर संबंधित आरोपीला तो 'वाँटेड' असलेल्या पोलिसांना सोपवण्यात येते. त्यासाठी आरोपीचे छायाचित्र व पासपोर्ट क्रमांक देशातील सर्व विमानतळांना सोपवण्यात येतो. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जारी करण्यात येणा-या या लूकआऊट नोटिसीचे नूतनीकरण करावे लागते. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊदला अत्यंत जवळचा असणा-या सुनील दुबईला या वर्षीच्या आयपीएल मालिकांपूर्वी देशात यायचे होते. त्याने त्याच्याविरोधातील लूकआऊट नोटिसीचे नूतनीकरण न करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यासाठी गुन्हे शाखेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांवर वरिष्ठांकडून दबावही टाकण्याचा प्रयत्नही केला गेला होता. पण त्यांनी या दबावाला न जुमानता सुनील दुबईच्या लूकआऊट नोटिसीचे नूतनीकरण केले. त्यानंतर दुबईने सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्याचाही प्रयत्नही केला होता. त्यासाठी दुबईतील भारतीय वकिलांपैकी काहींना त्यांनी हाताशी धरले होते. पण त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. या जामीन अर्जात त्याने विला चेंबर, ३१७, ४३ स्ट्रीट, एमरेट गॅस स्टेशन, नेक्ट टू पब्लिक लायब्ररी, मनखल, दुबई हा त्याचा दुबईतील पत्ताही दिला होता. सुनील दुबईचा पत्ता असतानाही त्याच्याविरोधात अद्याप रेड कॉर्नर नोटिस का बजावण्यात आली नाही, या प्रश्नाचा विचार केला, तर नक्कीच संशयाला वाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुबईत राहून भारतातील सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवणारा सुनील दुबई हा मूळचा मुंबईतील कुलाबा येथील राहणारा आहे. सुनील हिरानंद अभयचंदानी ऊर्फ सुनील दुबई फार वर्षापूर्वी दुबईला गेला तेव्हा तो फक्त जुगाराचा क्लब चालवायचा. त्यानंतर पाकिस्तानी सट्टेबाजाच्या संपर्कात आला आणि त्याचा सुनील दुबई झाला. तो सट्टेबाजीत शिरला. त्यासाठी 'डी' कंपनीशी त्याने जवळीक साधली व दाऊदचा अत्यंत विश्वासू बनला. सट्टेबाजीच्या प्रकरणांतअधूनमधून नाव येणारा सुनील दुबई किती मोठा आहे, याचा प्रत्यय गुन्हे शाखेच्या पोलिसांना २००५ साली आला. २००५ साली पोलिसांनी कोटय़धीश बारबाला तरन्नुमला अटक केली. तिच्या अटकेमागेही खुसखुशीत किस्सा आहे. तरन्नुमचे काही कारणामुळे तिच्या सीएसोबत वाजले होते आणि तिने नवा सीए ठेवला. या प्रकारामुळे संतापलेल्या तिच्या जुन्या सीएने तरन्नुमच्या बेनामी संपत्तीबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली. त्या वेळी प्राप्तिकर विभागाने तरन्नुमच्या नव्या सीएची चौकशी केली, त्या वेळी त्याने तरन्नुमकडे क्रिकेट बेटिंगमधून कमवलेला पैसा असल्याची लेखी माहिती प्राप्तिकर विभागाला दिली. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने या संपूर्ण प्रकाराची माहिती गुन्हे शाखेला दिली व तरन्नुमला अटक झाली. त्या वेळी श्रीलंकेचा गोलंदाज मुरलीधरनही वादाच्या भोव-यात सापडला होता. तरन्नुम ज्या बारमध्ये काम करायची, त्या बारमध्ये मुरलीधरनही यायचा. विशेष म्हणजे त्याला तेथे घेऊन येणा-या अभिनेत्याला बेटिंगमध्ये फार रस होता. मात्र चौकशीअंती मुरलीधरनला 'क्लिनचीट' देण्यात आली. विशेष म्हणजे सध्या सट्टेबाज प्रकरणी तपास करणारे पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळेच या प्रकरणाचा तपास करत होते. त्या वेळीही तिने चौकशीदरम्यान सुनील दुबई तिचा गुरू असल्याचे सांगितले होते. दुबई हा क्रिकेटचा मोठा जाणकार असून त्यानेच दिलेल्या माहितीवरून तिने सट्टयात पैसे गुंतवून कोटय़वधींची मालमत्ता जमवल्याचे सांगितले होते. याशिवाय दाऊदसोबत त्याच्या संबंधांचीही माहिती दिली होती. तरीही सुनील दुबईकडे असलेला अरबो रुपयांचा काळा पैसा व उच्च वर्तुळातील लागेबांधे यामुळे सुनील दुबई आजही मोकाट फिरत आहे. Read More » चँपियन्स ट्रॉफीत कामगिरी बहरेल?
आयपीएलनंतर एका आठवडय़ाच्या फरकाने इंग्लंडमध्ये आयसीसी चँपियन्स ट्रॉफी होत आहे.
मुंबई - आयपीएलनंतर एका आठवडय़ाच्या फरकाने इंग्लंडमध्ये आयसीसी चँपियन्स ट्रॉफी होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश असलेल्या विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, महेंद्रसिंग ढोणी आणि इशांत शर्माने आयपीएलचा सहावा हंगाम गाजवला. मात्र हाच फॉर्म चँपियन्स ट्रॉफीत राखण्यात त्यांना यश येईल? आयपीएल म्हणजे टी-२० क्रिकेट प्रकार. चँपियन्स ट्रॉफी म्हणजे ५० षटकांचा खेळ. त्यामुळे टी-२० मधून वनडे प्रकाराशी जुळवून घेण्याचे आव्हान क्रिकेटपटूंसमोर असेल. मात्र गेल्या काही वर्षातील व्यग्र वेळापत्रक पाहता अशा परिस्थितीला क्रिकेटपटू चांगलेच सरावलेले आहेत. भारताची फलंदाजीची भिस्त मधल्या फळीवर आहेत. या फळीत विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, महेंद्रसिंग ढोणीचा समावेश आहे. आयपीएलच्या सहाव्या मोसमात या सर्वाचीच फलंदाजी बहरली. कोहलीने १६ लढतींमध्ये ६३४ धावा करताना सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये तिसरे स्थान मिळवले. १८ सामन्यांत ५४८ धावा करणारा रैना त्याच्या पाठोपाठ आहे. रोहितने १९ लढतींमध्ये ५३८ धावा फटकावताना सहावा क्रमांक मिळवला आहे. १८ सामन्यांत ४६१ धावा करणारा ढोणी दहावा आहे. सर्वाधिक धावा करणा-या अव्वल दहा फलंदाजांमध्ये 'चौकडी' असल्याने भारताला फलंदाजीची काळजी नाही. चँपियन्स ट्रॉफीद्वारे पुनरागमन करणा-या दिनेश कार्तिकनेही (१९ सामन्यांत ५१० धावा) अव्वल १० फलंदाजांमध्ये स्थान राखले आहे. मात्र ढोणी संघात त्याला अंतिम संघात संधी मिळणे अवघड आहे. मधल्या फळीवर फलंदाजीची भिस्त असली तरी सलामीवर खूप काही अवलंबून असते. या स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ वीरेंदर सेहवाग आणि गौतम गंभीर या नियोजित सलामीवीरांशिवाय उतरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बहारदार फलंदाजी करणारे शिखर धवन आणि मुरली विजय भारताच्या डावाची सुरुवात करतील. कसोटी मालिका गाजवल्यानंतर या दुकलीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. विजयने १५ सामन्यांत ३१२ धावा केल्या. दुखापतीमुळे धवनच्या वाटय़ाला १० सामने आले. त्यात ३११ धावा करताना त्याने संघासाठी मोलाचे योगदान दिले. कसोटीप्रमाणे वनडेतही धवन-विजय जोडी बहरल्यास भारताला सलामीसाठी आणखी एक चांगला पर्याय मिळेल. उमेश यादव (१६ लढतींमध्ये १६ विकेट), इशांत शर्मावर (१६ लढतींमध्ये १५ विकेट)मध्यमगती मा-याची भिस्त आहे. दोघांनी ब-यापैकी सातत्य राखले आहे. इंग्लंडमधील वेगवान खेळपट्टय़ांवर मात्र त्यांचा कस लागेल. भुवनेश्वर कुमारला (१६ लढतींमध्ये १३ विकेट) चमक दाखवण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याच्यासह पुनरागमन केलेल्या आर. विनय कुमारकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत. अजय जडेजा आणि इरफान पठाणमध्ये अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. मात्र २०१ धावा आणि १३ विकेट घेणारा जडेजा यात आघाडीवर आहे. रविचंद्रन अश्विनसह अमित मिश्रावर फिरकीची धुरा आहे. अमितने १७ सामन्यांत २१ धावा घेत फॉर्म मिळवला तरी अश्विनने (१८ लढतींमध्ये १५ विकेट) निराशा केली. मात्र युवा आणि गुणवान गोलंदाजांमुळे भारताला गोलंदाजीतही फार चिंतेचे कारण नाही. आयपीएलनंतर लागलीच चँपियन्स ट्रॉफी सुरू होत असल्याने सरावाला अजिबात वेळ नाही. तरीही दोन सराव सामने खेळायला मिळतील. एक जूनला भारत श्रीलंकेशी आणि ४ जूनला ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. 'बी ग्रूप'मध्ये समावेश असलेला भारत सलामीला (६ जून) दक्षिण आफ्रिकेशी झुंजेल. त्यानंतर ११ जूनला वेस्ट इंडिजशी आणि शेवटच्या गटवार साखळीत १५ जूनला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करेल. उपांत्य फेरीसाठी दावेदारी पेश करावयाची असल्यास किमान दोन सामने जिंकणे क्रमप्राप्त आहे. २०११ वर्ल्डकप जेतेपदानंतर भारताकडे जेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे. भारतीय संघात गुणवत्तेची कमतरता नाही. मात्र इंग्लंडमधील लहरी वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान आहे. त्यात यशस्वी झाल्यास ढोणी आणि सहका-यांना जेतेपदाची सर्वाधिक संधी असेल.
Read More » तुमच्या अंतर्मनातला नेतृत्व नायक!
जीवन जगताना आपल्याला अनेक निर्णय घ्यायचे असतात. कधी कधी बराच काळ लोटल्यानंतर आपल्याला जाणवतं की, आपण पूर्वी घेतलेला निर्णय चुकला होता. आपण कामाच्या ठिकाणी जर अधिकारी पदावर असलो तर आपल्या चुकीच्या निर्णयामुळे कंपनीचं, चांगल्या प्रकल्पाचं किंवा कर्मचा-यांचं वैयक्तिक नुकसान होतं. म्हणजेच योग्य नायक.. योग्य नेतृत्व करणारा असा आपला स्वभाव बनणं ही आज काळाची गरज आहे. महायोगी श्री अरविंद यांच्या लिखाणातील ख-या नेतृत्वाविषयीचे अतिशय प्रेरक आणि तेजस्वी विचार संकलित करून या लेखामध्ये सादर केले आहेत. नेतृत्व करणारा नायक हा खरं तर तुमच्या आतच असतो. तुम्ही 'त्याला' ओळखलंत आणि त्याची इच्छा जर जाणलीत तर लोक तुमचं ऐकत नाहीयेत, असं चित्र राहणारच नाही. कारण या आवाजाशी लोकांचा आतला आवाज तादात्म्य पावेल आणि आपसूकच तुमच्या आतून येणा-या आवाजाचा/सूचनेचा लोकांकडून स्वीकार केला जाईल. तो आतला आवाज आणि ती ताकद ही तुमच्या आतच असते. जर या सामर्थ्यांचं अस्तित्व तुम्हाला तुमच्या आत जाणवलं आणि तुम्हीच तुमची ताकद बनलात, तर तुमच्या आतल्या ध्वनीच्या एका हाकेला बाहेरून हमखास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा अनुभव तुम्हाला येईल. फक्त ईश्वरी कामकाजासाठी तसंच दैवी आविष्काराच्या प्रकियेमध्ये मदतनीसाची भूमिका तुम्ही पार पाडावी, या उद्देशाने तुम्हाला तुमचं आयुष्य दिलेलं आहे, अशी पक्की खूणगाठ मनाशी बांधा. परमेश्वरी अस्तित्वाची विशुद्धता, सामर्थ्य, प्रकाश, भव्यता, शांती आणि आनंद या पलीकडे कशाचीही लालसा बाळगू नका. हे परमेश्वरी भान, तुमचं मन भरकटू नये तसंच शरीराच संतुलन राखण्यासाठी सदैव कार्यरत असतं. या अवस्थेमध्ये जगणं, हे ख-या नेतृत्वाचं लक्षण आहे. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला बाजूला ठेवता आलं पाहिजे आणि परमेश्वराची काय इच्छा आहे, हे समजून घेता आलं पाहिजे. जिथे तुमचं हृदय आहे, तिथे लालसा-इच्छा-आकांक्षा आहेत. अमूक गोष्ट बरोबर आणि आवश्यक, अशी सवयीनं होणारी तुमची मतं आहेत, ती तुम्ही बाजूला ठेवली पाहिजेत. या सगळ्याच्या पल्याड जाऊन गीतेमध्ये अर्जुनानं ज्याप्रमाणे ईश्वरी इच्छा शिरसावंद्य मानली, त्याप्रमाणे परमेश्वरानं जी गोष्ट बरोबर आणि आवश्यक अशी ठरवली आहे, ती करण्याकडे तुमचा कल असायला हवा. अशा कर्तव्य कर्माचं योग्य पालन केल्यानंतर जे होईल ते योग्यच होईल, याबाबत दुर्दम्य श्रद्धा बाळगा. या सर्व विश्वाचा गाडा हाकणारी शक्ती ही निश्चितच तुमच्याएवढी शहाणी आणि सूज्ञ आहे. या शक्तीच्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही लुडबूड करण्याची आवश्यकता नसते. परमेश्वर या सा-याची काळजी घेत असतो. स्वत:च्या कमतरता, केलेल्या चुकीच्या हालचाली ओळखणं आणि चुकीच्या रस्त्यावरून एक पाऊल मागे येऊन योग्य कृतीकडे वळणं हा मुक्तीचा मार्ग असतो. हा भला, तो बुरा, असे दुस-याचे गुण-दोष काढण्यापेक्षा स्वत:चेच गुणदोष काढा. पण त्यासाठी तुमचं मन अत्यंत शांत/नितळ असलं पाहिजे. तसंच वरवर भुलल्या जाणा-या सामर्थ्यांला बळी पडून घाईघाईनं कुठलंही मत करून घेणं, हे ख-या नेतृत्वाचं लक्षण नाही. फार उतावळेपणान कोणतंही मत बनवून घेऊ नका वा कोणती कृतीदेखील करू नका. अस्तित्वाच्या आंतर गाभ्यामध्ये शांत राहण्यासाठी नेहमीच एक जागा असते. तिथून मनाचा तळ ढवळून निघणा-या घटनांकडे अतिशय स्थिरतेनं, शांतपणे पाहा आणि त्या वेळी स्वत:चे अवलोकन, मूल्यमापन करा ('जजमेंटल' झालात तरी हरकत नाही.) या आंतर गाभ्याच्या शांततेतून झालेल्या परिस्थितीच्या आकलनानंतर योग्य बदलासाठी कृती करा. या शांततेमध्ये जगण्यास तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला तुमचा अढळ, निश्चल असा पाया गवसेल. अपयश, ढिसाळपणा किंवा 'इम्परफेक्शन' यांची जो निर्भत्सना करतो, तो परमेश्वराची निर्भत्सना करत असतो. आपल्याच आत्म्याला मर्यादा घालून तो आपल्याच दूरदृष्टीची फसवणूक करत असतो. एखाद्याबद्दल उखाळ्या-पाखाळ्या करू नका. त्याची निर्भत्सना करू नका. उलटपक्षी त्याच्या स्वभावाचं अवलोकन करा. तुमच्या बांधवांना मदत करा. त्यांच्या क्षमता आणि त्यांची हिंमत याला तुमच्यामधील कणव आणि कारुण्य यामुळे बलशाली करा. दया, माया न दाखवता स्वत:चेच कठोर आत्मपरीक्षण करा. मग आपसूकच तुमच्यातील दानत वाढेल. दान करण्याची वृत्ती तसंच इतरांप्रती असणारा दयाभाव वाढीस लागेल. टीका करण्याच्या सवयीविषयी महायोगी श्री अरविंद म्हणतात की, चुकीचे निष्कर्ष काढून, कल्पना रंगवून, अतिशयोक्तीने किंवा गरसमजामुळे केलेली टीका हा एक वैश्विक रोग आहे. आंतरिक प्राथमिक शक्तींना किंवा मूलभूत ऊर्जेला मानवी मनानं साथ दिल्यानंतर हा रोग बळावतो. स्वत:च्या संभाषणावर ताबा ठेवून जागरूकपणे या रोगास आपण नकार दिला पाहिजे. आपल्या बाहेरील जगण्याच्या शैलीमध्ये संपूर्ण बदलाव आणण्यासाठी आंतरिक अनुभवांनी सच्चा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर साधला पाहिजे. ख-या नेतृत्वामध्ये सापडणारा हा एक दुर्मीळ गुण असतो. Read More » हा 'प्रहार' आपल्यासाठीच!
अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे. अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे. या सर्व समस्यांचा सामना अगदी झोपडीपासून गगनचुंबी इमारतींपर्यंत कुठेही राहणाऱ्या मुंबईकरांना करावा लागतोच. त्याविषयी कुरबुर करणे, आपसात चर्चा करून महापालिका किंवा संबंधित संस्थेला दूषणे देणे किंवा फार तर तक्रार नोंदवणे यापलीकडे काही केले जात नाही. या तक्रारींची दखल घेतली जाईलच, याचीही शाश्वती नसते. त्यामुळेच 'प्रहार'ने वाचकांसाठी हे खास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या समस्या तुम्ही इथे मांडल्यास आणि संबंधित छायाचित्रेही सोबत जोडल्यास त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. संपर्क : प्रहार कार्यालय, इंडियाबुल्स वन सेंटर, ज्युपिटर मिल्स कंपाउंड, फितवाला रोड, लोअर परळ, मुंबई- १३, फॅक्स : ०२२-४०९६९९०० ई-मेल : prahaar.complaint@prahaar.co.in वडाळा पूर्वेकडील स्कायवॉक अनेक महिन्यांपासून अंधारातच आहे. लाखो रुपये खर्च करून हा स्कायवॉक उभारल्यानंतर वीज दिवे लावण्यात आले होते. मात्र, हे दिवे नादुरुस्त झाल्यापासून बदलण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळेत पुलावर काळोख असल्यामुळे भिकारी, गर्द पिणारे या स्कायवॉकचा ताबा घेतात. ही समस्या छायाचित्रातून पाठवली आहे 'प्रहार'चे वाचक विशाल विठ्ठल परुळेकर यांनी. Read More » फेर धरू फुगडीचा!
महाराष्ट्र कलानिधी आणि दैनिक प्रहार आयोजित 'रंगारंग-२०१३' या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी लोककलांचा महोत्सव नुकताच पार पडला. यामध्ये ख-या अर्थाने बाजी मारली ती महिला वर्गाने. मालवणातील 'सिंधुसखी महिला मंडळ', कुडाळ येथील 'चामुंडेश्वरी मंडळ' तसंच 'भैरव जोगेश्वरी मंडळ' यांनी अस्सल फुगडयांची मेजवानी प्रेक्षकांसमोर सादर केली. एरव्ही शहरी भागात परिचित नसलेल्या फुगडय़ांवर महिलावर्गाने धरलेला ताल पाहता प्रेक्षकही भारावून गेले. कधीही न पाहिलेले असे हे फुगडय़ांचे प्रकार पाहून सुखावलेल्या प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात दादही मिळाली. कोकणातील फुगडयांच्या प्रकारांचा परिचय करून देणा-या या लेखासह सुरू होत आहे लोककलाप्रकार हे नवं सदर. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील एक प्रभावी अन् स्त्रियांची मक्तेदारी असलेली नृत्यकला म्हणजे 'फुगडी'. हाताच्या टाळ्या, दोन्ही पायांवर एकाच वेळी उडी मारताना येणारा आवाज हा या फुगडीचा ताल. या नृत्यात वाद्य नसते. आपल्या सखींना गोळा करत स्त्रिया एकमेकींभोवती गोल फिरतात. डाव्या किंवा उजव्या बाजूला वाकून गोलात मागे-पुढे हात करत टाळ्या वाजवतात. मध्येच दोन स्त्रिया समोरासमोर उभ्या राहून एकमेकींचे तळहात पकडतात. मग दोन्ही पाय जुळवून एकमेकींपासून ओढ घेऊन आपल्या शरीराचा तोल सांभाळत गोल गिरकी घेतात. फुगडी खेळताना उखाणे घ्यायची पद्धत रूढ आहे. कोणी उखाणा घेतला, तर दुसरी तिला उत्तर देते. उखाणे घेऊन झाले की, स्त्रिया तोंडाने 'फूऽऽ फूऽऽ' असा आवाज करतात. या आवाजाला 'पकवा' म्हणतात. 'फूऽऽ फूऽऽ' या आवाजावरून या नृत्यप्रकारला 'फुगडी' असं नाव पडलं आहे. Read More » कोब्रापोस्ट प्रकरणी तीन बँकांना प्राप्तिकर खात्याची नोटिस
कोब्रापोस्टने बँकांमध्ये सुरू असलेल्या स्टींग ऑपरेशन प्रकरणी प्राप्तिकर खात्याने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. नवी दिल्ली - कोब्रापोस्टने बँकांमध्ये सुरू असलेल्या स्टींग ऑपरेशन प्रकरणी प्राप्तिकर खात्याने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. या तीनही बँकांकडून प्राप्तिकर खात्याने माहिती मागवली आहे. प्राप्तिकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून या बँकांना नोटिस पाठवण्यात आली आहे. मनी लाँडरिंगबाबत कोब्रापोस्टने उपस्थित केलेल्या प्रश्नांसंबधी प्राप्तिकर खात्याच्या या विभागाने बँकांकडून व्यवहारांची माहिती मागवली आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात ही माहिती सादर करण्याचे आदेशही या नोटिशीत देण्यात आले असल्याचे प्राप्तिकर खात्याच्या एका वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे. याआधीही रिझव्र्ह बँकेनेही या तीन बँकांना 'केवायसी' नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिस पाठवली होती. कोब्रापोस्टने या बँकांच्या देशभरातील विविध शाखांमध्ये कशा प्रकारे मनी लाँडरिंगचे व्यवहार होतात याचा भांडाफोड केला होता. बँकांच्या व्यवस्थापकांकडून पॅनकार्डशिवाय कोटय़वधी रुपये कसे स्वीकारले जातात तसेच विमा कंपन्यांकडूनही काळय़ा पैशांचा सर्रास स्वीकार केला जातो, याचा पर्दाफाश कोब्रापोस्टने केला होता.
Read More » सोने तारण कर्जावर नवी बंधने
सोन्याच्या आयातीत गेल्या महिन्यात मोठी वाढ झाली. ज्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली आहे. सोने आयातीला वेसण घालण्यासाठी रिझव्र्ह बँकेने सोने तारण कर्ज देणा-या कंपन्यांवर सुवर्ण कर्जाबाबत बंधने घातली आहेत. मुंबई - सोन्याच्या आयातीत गेल्या महिन्यात मोठी वाढ झाली. ज्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली आहे. सोने आयातीला वेसण घालण्यासाठी रिझव्र्ह बँकेने सोने तारण कर्ज देणा-या कंपन्यांवर सुवर्ण कर्जाबाबत बंधने घातली आहेत. यापुढे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या नाण्यांवर बँकांना किंवा वित्तीय संस्थांना कर्ज देता येणार नाही. तसेच सोने खरेदीसाठी कर्ज देऊ नये, असा आदेश आरबीआयने बँकांना दिला आहे. बँका आणि खासगी वित्तीय संस्थांना सोन्याची नाणी, ईटीएफ आणि दागिन्यांवर आरबीआयच्या नव्या नियमानुसार कर्ज वितरण करावे लागणार आहे. आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ईटीएफ आणि म्युच्युअल फंडातील गोल्ड युनिट्सवर कर्ज देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ईटीएफ आणि म्युच्युअल फंडातील सोन्यावर बँकांनी कर्ज देऊ नये, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकांना ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या सोन्याच्या नाण्यांवर कर्ज देण्यावरही आरबीआयने बंदी घातली आहे. तर संबधित बँकेच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतरच ५० ग्रॅमपर्यंतच्या नाण्यांवर कर्ज देता येणार आहे. एप्रिलमध्ये सोन्याच्या आयातीत १३८ टक्क्यांची वाढ झाली होती. ज्यामुळे आयात बिलामध्ये वाढ झाली आणि परिणामी चालू खात्यातील तूट वाढली होती. सोन्याची आयात कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आरबीआयकडून प्रयत्न केले जात आहे. सोने खरेदीसाठीही कर्ज नाही Read More » चार आणे पॉकेटमनी बारा आणे खर्चापानी
शॉपिंग करायचीय, मित्रमैत्रिणींबरोबर मूव्ही बघायचीय, पिकनिकला जायचंय, मोबाइल रिचार्ज करायचाय, गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी छोटंसं का होईना पण गिफ्ट घ्यायचंय.. जमलंच तर बाहेर फिरायला जायचंय.. एवढं सगळं करायचं पण खिशात पैसेच नाहीत. कारण कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे पॉकेटमनी मिळतंच नाहीए. आहे त्या पैशात हे सगळे खर्च भागवायचे आहेत. आई-वडिलांपुढे तरी किती वेळा हात पसरायचे? या महागाईच्या दिवसांत आपल्यासारख्या कॉलेजिअन्सच्या गरजा पुरवायच्या म्हणजे किती ओढाताण होते हे आमचं आम्हालाच ठाऊक! आपल्या महिन्याभराच्या खर्चाचं गणित हे कॉलेजियन्स कसं मांडतात याचा उमंगच्या टीमने घेतलेला आढावा.. आपण स्वत: कमावते होऊ तेव्हा होऊ, पण सध्या तरी आपली सगळी भिस्त आहे ती, आपल्या पॉकेटमनीवरच! दर महिन्याला साधारणत: रुपये पाचशे ते जास्तीत जास्त दीड हजापर्यंत मिळणारा हा पॉकेटमनी महिनाभर पुरवायचा, ही सध्याच्या महागाईत काही सोप्पी गोष्ट आहे का? आपले खर्च तसे कमीच असतात पण तरीही आपल्या किरकोळ खर्चाचं जरी गणित मांडलं तरी हा पॉकेटमनी तुलनेत अगदीच तुटपुंजा! म्हणजे बघा ना, एखाद्या जवळच्या मित्रासोबत कॉफी प्यायची झाली तर थोडी ना आपण कॉलेजबाहेरच्या टपरीवाल्याकडे जाणार, आपल्याला बुवा एखाद्या महागडय़ा कॅफेमधलीच कॉफी लागते. म्हणजे तिथेच गेली की, १०० ची एक नोट. आता महिन्यातून कमीत कमी दोनदा तरी चित्रपट बघायचा, हा कॉलेजिअन्सचा नियम आपण तरी कसा काय मोडायचा, नाही का? त्यात अशा-तशा थिएटरला जाण्याचा सवालच नाही. मल्टीपेक्सशिवाय आपलं पान हलतं का?, म्हणजे तिथे उडाले १५०-२०० रुपये! आता मल्टिप्लेक्सच्या एसीत सिनेमाचा आनंद घेताना भूक न चाळवली तरच नवल. ती शमवायची म्हणजे पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक्सशिवाय मजा नाही. मग कोण पाहतोय पैशाकडे! तिथे लागली १००-१५० रुपयांची फोडणी. मुळात आपण कॉलेजला जातो हेच घरातल्यांवर केवढे उपकार.. हातात एखादं वही-पेन उचललं की धरली कॉलजेची वाट, कोण ते बॅगचं आणि टिफीनचं ओझं सांभाळणार. सगळ्या विषयांसाठी एकच वही आणि भूक लागली की, कॉलेजचं कॅन्टीन झिंदाबाद. एकदा कॅन्टीनमध्ये बसलं की, 'किमान' बिलाची रक्कम ३० रुपये. आता एका टेबलावर बसल्यावर 'टीटीएमएम(तेरा तू- मेरा मैं)'चा फंडाही वापरता येत नाही ना, सवाल आखिर दोस्तीका है! 'कमाल' आता तरी विचारू नका! आता मोठा खर्च पुढचा.. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाचा. वाढदिवसाची दरडोकी ५० रुपयांची केकची देणगी तर ठरलेलीच शिवाय गिफ्टसाठीची १००-१५० अतिरिक्त वर्गणी वेगळीच! एकदा का गिफ्ट दिलं की, पाटी लागू होतेच म्हणा. मित्रांसोबत कितीही वेळ अशी धम्माल-मस्ती केली तरी वेळ कमीच पडतो. त्यांच्याशी संपर्कात राहणं आताशा काही कठीण नाही, फोनवरही कितीही बोललो तरी गप्पा न संपणा-या. मग 'वॉट्स अप, फेसबुक, मॅसेंजर,' यांसारखे 'ई-पोस्टमन' आहेतच म्हणा. पण या पोस्टमननाही पगार द्यायचा तो आपल्या पॉकेटमनीतूनच. असंही आपल्याला किती तरी गॉसिप्समध्ये रस असतो. तासन् तास गप्पा मारता मारता मोबाइलमधला रिचार्ज कधी संपतो तेच कळत नाही. एखाद्या हॉलिवुड चित्रपटातील 'अनसॉल्व्ह मिस्ट्रीच' वाटत राहते. असा हा फोन, ई-संपर्काचा खर्च मांडायचा तर तो असतो, महिन्याला साधारण ७००-७५० रुपये. (हे आपलं गुपितच ठेवू हं.. जर बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असेल तर मग मोबाइल बिलातच पॉकेटमनी संपला म्हणून समजा.) खरेदीशी आपलं नातं न संपणारं असंच! आपल्या मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस असला तरी आपल्याला नवे कपडे लागतात! मग लिंकिंग रोड, फॅशन स्ट्रीट, हिल रोड या ठिकाणी ग्रूपने शॉपिंगही ओघाने आलीच. तिथे जाण्याचा मोठा फायदा असा होतो की, एकतर आपण मुली भांडून किंवा गोड बोलून आपल्याला हव्या असणाऱ्या किमतीत कपडे, सॅण्डल आणि अॅक्सेसरीज घेतोच. स्वस्त मिळतंच आहे तर एकच वस्तू का घ्यायची. महिन्यातून एकदा जरी शॉपिंगला गेलो तरी ३०० ते ४०० रुपये गेलेच समजा. इथवर बजेटचे पुरते बारा वाजलेले असतात. तरीही इतकी खरेदी करून झाल्यावर आपण स्टायलीश दिसू का, अर्थातच प्रत्येक मुलीकडून 'नाही' असंच उत्तर मिळेल. महिन्यांतून किमान दोन वेळा तरी ब्यूटिपार्लरची फेरी असतेच असते. त्यात हेअर कट, हेअर कलर, आयनिंग, फेशिअल.. (लिस्ट तशी मोठीच आहे.) पण या गोष्टी एवढया गरजेच्या होतात की, त्या पूर्ण होईपर्यत कॉलेजला जायचंच नाही, असा काहीसा पवित्रा घेणाऱ्याही ब-याच मुली आहेत. मग एकदा का पार्लरमध्ये गेलं की ५००-७०० रुपयांना कात्री बसतेच! ड्रेसवर मॅचिंग नेलपॉलिश, इअर रिंग्स्, लिपस्टिकशिवाय 'ओव्हर ऑल लुक' कसा येणार.. मग २०० रुपये तरी इथे चुटकीसरशी संपतात. त्यातल्या त्यात 'स्वस्त आणि मस्त'चा फंडा आपण वापरतो. बॅ्रण्डेड घ्यायचं तर मात्र दोन महिन्यांचा पॉकेटमनी खल्लास झालाच म्हणून समजा. सर्व खर्च जर तुम्ही मोजलात तर १५०० रुपयांच्याही कितीतरी वर जाणारा. आता मला सांगा, ५०० ते १५०० रुपये पॉकेटमनीमध्ये हा खर्चाचा शिवधनुष्य कसा बरं पेलायचा? आणि त्यातूनही हा सर्व खर्च व्यवस्थित मॅनेज करणं म्हणजे डोक्याला तापच. अभ्यासासाठी एक वेळ आई पैसे काढून देईल पण मुलींनी पार्लर किंवा खरेदीसाठी पैसे मागितले तर क्वचितच मिळतील. एकविसाव्या शतकातल्या मुली आपण, त्यांनी नाही सांगितलं तर थोडेच आपण गप्प बसणार. 'आयना का बायना, घेतल्याशिवाय जाईना', असा आपला स्वभाव. मग हळूच आपलं 'ट्रमकार्ड' काढायचं ते म्हणजे 'कॉलेज प्रोजेक्टस'च. घरातल्यांवर याचा नक्की असर होतो. पैसेही जास्त मिळतात. आणि. 'अपना खर्चापानी तो निकल जाता है!' मुलांच्या खर्चाची गोष्ट आणखी वेगळी. मुलांना जो पॉकेटमनी मिळतो तो जास्त तरी असतो किंवा काहीच मिळत नाही. कारण कॉलेजमध्ये गेल्यावर मुलगा व्यसनाधीन होईल की काय, अशी भीती त्यांच्या आईवडिलांना जास्त असते. त्यामुळे त्यांना पैसे देण्यापेक्षा 'तुझे तूच कमाव' असं म्हणणारेही पालक आहेत. म्हणजे बघा, तुम्ही कॉलेज कॅन्टीन, कट्टा किंवा पिकनीकला गेलात आणि तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही मित्राला विचारलंत, तर एक म्हणेल.. 'जातोस ना तर मला पण आण. पैसे मग देतो.' मग दुसरा, तिसरा, चौथा असं करता करता ग्रूपसाठीच खायला आणावं लागतं. गेले की नाही, पटकन १०० रुपये. शिवाय पैसे परत कधी मिळतील न मिळतील याचा काहीच थांगपत्ता नसतो. काही वेळा तर कॅन्टीनपासून ते सिगारेट, दारूपर्यंतचा सगळा खर्च आज अमुक एक करणार, उद्या दुसरा करणार असं ठरलेलं असतं. मुलांच्या दोस्तीत तर एक वसूल असतो – 'मित्रांवर खर्च केलेले पैसे परत मागायचे नाहीत, नही तो दोस्तो में इज्जत कम होती है!' मग काय बसा बोंबलत. इकडे तुमचे कमीत कमी ५०० रुपये खर्च होतात. ग्रूप मोठा असेल तर खर्चाची आकडेवारी वाढतच जाते. मुलं कॉलेजला जायला लागली म्हणजे, त्यांना बस किंवा ट्रेनने प्रवास करणं जमतच नाही म्हणा किंवा लो स्टेटसच वाटतं, असं म्हणा ना. कारण कोणतंही असो, त्यांना बाइकच हवी जाते. सुरुवातीला सगळं कसं छान वाटतं पण पॉकेटमनीमधून बाइकचा खर्च सांभाळणं कठीण व्हायला लागतं. कधी कधी तर अशी परिस्थिती असते की, स्वत:चं पोट भरू की बाइकच्या टाकीत पेट्रोल भरू? कारण महिन्यातून जास्तीत जास्त सहा वेळा तरी पेट्रोल टाकावंच लागतं, म्हणजे महिन्यातून ४५० रुपये पेट्रोलचा खर्च येतो. आता हा गर्लफ्रेंड नसलेल्यासाठीचा खर्च. गर्लफ्रेंड असली की, विनातक्रार तिचा हक्काचा 'पिक अॅण्ड ड्रॉप सव्र्हिस' करणारा चालक बनायचं. म्हणजे तिला आणायला, सोडायला जायचं, आपली मोहतरमा फिरायला जायचा हट्ट करू लागली की, तिला 'सांगकाम्या'सारखं फिरवून आणायचं. शिवाय महिन्यातून एकदा तिच्यासाठी हॉटेलिंग, मूव्ही आणि गिफ्ट या गोष्टी कराव्याच लागतात. त्यासाठी कोणताही पर्यायच नसतो. गिफ्टची डिमांडही साधीसुधी नसते, बरं का! म्हणजे एखादा टॉप, बॅग, अॅक्सेसरीज किंवा कॉस्मेटिक घेऊन दे.. असं प्रत्येक गिफ्टमागे ५०० रुपये गेलेच म्हणून समजा. मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने किती महागडं गिफ्ट दिलं त्यावर तिच्या गिफ्टचं बजेट ठरतं. साहजिकच त्याच्या दुप्पट किमतीचं गिफ्ट तुम्ही तिला द्यावं अशी तिची किमान अपेक्षा असते. हा आकडा हजाराच्या घरातही जातो. रस्त्यावर बसून भीक मागितली काय किंवा एखाद्या बँकेत दरोडा घातला काय तिच्या अपेक्षा काही पूर्ण होत नाहीत. मग तर काय 'महंगाई डायन खाये जात है' बोलण्याशिवाय पर्याय नसतो. हे सगळं कमी पडतं म्हणून की काय तिचे आणखी नखरे पुरवावे लागतात, आज काय फुलं हवीत मग त्याच्यासोबत चॉकलेट पण हवं किंवा आज सीसीडीमध्ये कॉफी प्यायची आहे.. आणि रागावली तर तिची समजूत काढताना नाकीनऊ येतात ते वेगळेच. तिथे गेले १५० रुपये. आता १००० रुपये पॉकेटमनी कसे बरं पुरवायचे आणि कुठे, कसा खर्च भागवायचा? मॅनेजमेंट केलेल्या मुलांनासुद्धा पॉकेटमनी मॅनेज करता येत नाही मग आमच्याकडून तर अपेक्षाच सोडा..'पैशाची बचत करा' असं कोण कितीही ओरडलं तरी आपल्याला बचत करणं जमणार आहे थोडीच! कुठेतरी पार्ट टाइम जॉब बघायचा, नाहीतर टय़ुशन, कुठल्या तरी मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये प्रमोशनल किंवा इव्हेंटचं काम, मोठय़ा दादाला मस्का लावून.. बरेच पर्याय आपल्याकडे असतात. मग हे पर्याय वापरून आपला खर्चापानीचा जुगाड करण्याची कला प्रत्येक कॉलेजिअन आपल्या सोयीप्रमाणे आणि शिताफीने शोधून काढतोच.., जरी 'पॉकेटमनी मॅनेजमेंट' हा विषय आमच्या अभ्यासक्रमात नसला तरी!
माझ्या कॉलेजमधली मुलंमुली श्रीमंत आहेत. त्यांच्याबरोबर राहायचं म्हणजे प्रत्येक वेळी तेवढंच फॅशनेबल राहणं गरजेचं असतं. शिवाय आमचा ग्रूप कॉलेजमध्ये कमी आणि सीसीडी, मॅकडोनल्ड, मल्टिप्लेक्स आणि मॉलमध्ये जास्त असतो. कोणाचा वाढदिवस असेल तर प्रत्येकाने २०० रुपये काढायचे असा आमच्या ग्रूपचा नियम! घरातून फक्त पाचशे रुपयेच पॉकेटमनी मिळतो आणि अशा ठिकाणी नेहमी नेहमी जायचं तर माझा पॉकेटमनी एक-दोन दिवसांत संपून जातो. घरी पैसे मागायचे तर पैसे मिळणं दूरच, आधी घरातल्यांचा ओरडा मिळतो. आता हे सर्व टाळायचं तर कॉलेज लाइफमधल्या मज्जा-मस्तीला मला मुकावं लागतं. मित्रमैत्रिणींकडून उधारी घ्यायची नाही म्हणून शुक्रवार ते रविवार ३ ते ८ वाजेपर्यत मी एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करते. दिवसाचे मला २५० रुपये मिळतात. महिन्याच्या सुरुवातीला माझ्याजवळ ३००० रुपये येतात आणि पॉकेटमनीचे ५०० रुपये. मज्जा-मस्ती, शॉपिंग करून माझा महिना आरामात जातो. नेहा मुळीक
मला हजार रुपये पॉकेटमनी मिळतो. शॉपिंगसाठी दर महिन्याला खर्च करावाच लागतो, असं काही नाही. कारण माझ्या कॉलेजला युनिफॉर्म आहे पण पूर्ण वेळ कॉलेजमध्येच असल्याने खाण्यासाठी आणि मोबाइल रिचार्जसाठी बराच खर्च होतो. दिवसाला १०० रुपये तरी पेटपूजेसाठी जातात. घरच्यांना पटतच नाही की, एवढे पैसे खर्च होतात. मग पैसे नसले की मी आणि माझ्यासोबतच्या आणखी काही मैत्रिणी इव्हेंट करतो. एका इव्हेंटचे कमीत कमी ३०० रुपये आणि इव्हेंट मोठी असेल तर हजार-दीड हजार रुपये मिळतात. महिन्याला पाच-सहा इव्हेंट केल्या तर बऱ्यापैकी पैसे मिळतात आणि माझा खर्च भागवता येतो. सिद्धी पारेख
मी नाइट कॉलेजला शिकत असल्याने दिवसा काम करतो. माझे सर्व मित्रदेखील दिवसभर काम करतात. माझा तसा जास्त खर्च होत नाही. आम्हा मित्रांचे सुट्टीचे दिवसही वेगवेगळे असल्याने सहसा फिरायला जाण्याचे प्लॅन होत नाहीत. मुळात नाइट कॉलेजला शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताचीच असते. कॉलेजची फी भरणं हेच आमच्या समोरचं मोठं आव्हान असतं. मग इतर खर्चाची बातच निराळी! कोणताही खर्च करताना आम्हाला शंभर वेळा विचार करावा लागतो. सहसा अनावश्यक खर्च करायचं टाळतो. पण वाढदिवसाच्या वेळी आम्हा सगळ्यांची गोची होते. कारण मित्रांना पार्टी देण्याशिवाय पर्यायच उरत नाही. त्या वेळी मात्र मी खर्च करायला मागे-पुढे पाहत नाही. कारण तोच दिवस काय तो मनसोक्त मजा करायला मिळते. रितेश पावशे
माझ्या कडक शिस्तीच्या आई-वडिलांना माझं फॅशनेबल राहणं अजिबात आवडत नाही. मात्र मला थोडासा मेकअप, स्टायलिश कपडे, प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग नेलपेंट, चप्पल, अॅक्सेसरीज असं टिपटॉप राहायला आवडतं. यावरच माझा संपूर्ण पॉकेटमनी खर्च होतो. कधी कधी मोबाइल रिचार्जपासून ते खाण्या-पिण्यासाठीसुद्धा माझ्याजवळ पैसे नसतात. अशी वेळ आली की, ब्लॅकमेलिंगचं शस्त्र वापरायचं. मी माझ्या दादाकडून अशापद्धतीने बऱ्याचदा पैसे उकळते. त्याची गंमत अशी की, एकदा गार्डनमध्ये मला तो एका मुलीसोबत दिसला होता. मग मला पैसे हवे झाले की, दादाला 'घरी नाव सांगेन' असं घाबरवायचं की, हळूच तो पैसे काढून देतो. जास्त पैसे आले की, आम्ही मैत्रिणी मैत्रिणी मिळून पार्टीसुद्धा करतो. पूर्वी कांबळी
मी कॉलेजला जायला निघाले की, आई फक्त पन्नास रुपयेच देते. आता मी तिला कसं सांगू की, शाळेत जाणाऱ्या मुलालासुद्धा माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळत असतील खाऊसाठी. कदाचित मी कॉलेजमध्ये मजा-मस्ती करून वाईट मार्गाला लागेल ही भीती माझ्या आईला वाटत असेल. म्हणून कदाचित महिन्याला पॉकेटमनी देण्यापेक्षा दिवसाला पैसे देण्याचं तिने ठरवलं असेल. आता कॉलेजला बसने जरी जायचं-यायचं झालं तरी चोवीस रुपये तिकीट आहे. मग भूक लागली तर उरलेल्या सव्वीस रुपयांमध्ये मला कसंबसं भागवावं लागतं. त्यातून एखाद्या मूव्हीला जायचं झालं किंवा कोणाचा वाढदिवस असला तर माझ्याजवळ सव्वीस रुपयांपेक्षा जास्त काहीच नसतं. मग प्रत्येक वेळी काही तरी खोटं-नाटं सांगून मूव्हीला जायला नकार द्यावा लागतो. यावर उपाय म्हणून संगणक क्लासमध्ये अर्धवेळ शिकवण्या घेते आणि आपला खर्च भागवते. मानसी नाईक
मला जास्त फिरायला आवडत नसल्याने पॉकेटमनी फार खर्च होत नाही. मात्र मला मोबाइलची प्रचंड आवड आहे. मी मोबाइल हार्डवेअर व सॉफ्टवेअरचा कोर्स केला आहे. महाविद्यालयात शिक्षण घेताना घरच्या घरी मी मोबाइल दुरुस्त करायचं काम करतो. माझ्या बहुतेक मित्रांना हे माहीत आहे. त्यामुळे महाविद्यालयातदेखील माझा मोबाइलचा व्यवसाय चांगला सुरू आहे. जास्तीत जास्त पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि बाजारात एखादा नवीन मोबाइल आला तर तो विकत घेतो. दोन महिन्यांच्या वर कोणताच मोबाइल वापरत नाही. मात्र त्यासाठी माझ्या घरच्यांकडून पॉकेटमनी घेत नाही. उलट मला मोबाइल दुरुस्त करून जे पैसे मिळतात ते घरी देतो. कारण आपण इतके मोठे झालो असतानाही घरच्यांकडून पॉकेटमनी घ्यावा, ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही. विजय जाधव
आई-बाबांकडून सारखे पैसे मागायला विचित्र वाटायचं. पण पैसे नाही तर मित्रमैत्रिणींसोबत मजा करायला मिळत नाही. म्हणून मी स्वत: पैसे कमवायचं ठरवलं. आधी हॉटेलमध्ये काम केलं. तिकडे पैसे तर मिळाले, पण ते काम आई-बाबांना पटलं नाही. नंतर मी एका क्लासमध्ये पर्यवेक्षकाचं काम केलं. ते पैसे मी जमा करायचो. तेच पैसे पार्टीला किंवा शॉपिंगला वापरतो. आईच्या, मित्रांच्या वाढदिवसाला जमवलेल्या पैशातूनच गिफ्ट घेतो. ओमकार जांभेकर
सुट्टीचे दिवस वाया न घालवता काही ना काही काम करायचं असं ठरवलं. पुढे तेच पैसे कॉलेज सुरू झाल्यावर खर्च करता येतील. त्यामुळे मी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी अर्जदेखील केले. दोन-तीन दिवस गेल्यानंतर मला नोकरीचा एक फोन आला. मी नोकरीला लागलो. बघता बघता दोन महिने कसे निघून गेले ते कळलंच नाही. आता तर सुट्टय़ादेखील संपत आल्या आहेत. या दोन महिन्यांत आठ हजार रुपये कमावले, याचा मला फार आनंद होतोय. या पैशातूनच मी कॉलेजची फी भरून वह्या- पुस्तक विकत घेतली आहेत. केशव केळकर
कधी मम्मीकडून तर कधी पप्पांकडून शंभर रुपये घेतो आणि त्यातच आठवडाभराचा खर्च चालवतो. कधी आईने कुठे जाण्यासाठी बस किंवा टॅक्सीला पैसे दिले तर चालत जाऊन ते पैसे वाचवतो. त्यामुळे शरीराचा व्यायामही होतो. सुट्टी म्हणजे मित्रांसोबत पिकनिक तर असतेच, पण पैसे नसल्यामुळे माझा जाण्याचा प्लॅन कधी कधी रद्द होतो. कधी कधी मित्रांकडून पैसे मागतो आणि पिकनिकला जातो. सुट्टीतला खर्च चालवण्यासाठी आता सध्या क्लबमध्ये संध्याकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत पार्टटाइम बाउन्सरचे काम करतो. त्यामुळे मला कमी काम आणि पैसै दोन्हीही मिळतात. मिळालेल्या पैशातून मी स्वत:चा खर्च करून पिकनिकला जातो व हव्या असलेल्या गरजेच्या वस्तू विकत घेतो. त्यातलेच थोडेफार पैसे घरात आईला देतो. त्यामुळे माझा खर्च पण निघतो आणि मी कमावतोय हे पाहून आईला आनंदही होतो. तुषार लोखंडे
सुट्टीत जास्त पैसे लागणार हे मला आधीच ठाऊक होतं. म्हणून कॉलेज सुरू असतानाच काहीतरी कारणाने मी घरातून पैसे मागायचो. घरातून लवकर निघून रिक्षा न करता पायी चालत जायचो. पैसे तर वाचायचेच आणि व्यायामही व्हायचा. कॅन्टीनमध्ये जेवण करेन, असं सांगून पैसे घ्यायचो. थोडंसं पोटात ढकलून उरलेले पैसे जमवायचो. सगळे पैसे मग बँकेत किंवा एका गुप्त कप्प्यात जमा करायचो. एकदा तर मी माझ्या कुत्र्याचं खाणं संपलेलं आहे, असं कारण सांगूनही पैसे उकळलेत. सिद्धार्थ नागपुरे
कॉलेज सुरू असताना घरातून मिळणारा पॉकेटमनी साठवून तो फिरण्यासाठी वापरायचो. पण एकदा का कॉलेजला सुट्टी पडली की पॉकेटमनीचं टेंशन सुरू होतं, सुट्टी म्हणून पॉकेटमनीही पूर्णपणे बंद होतो. सुट्टय़ांमध्ये प्रमोशन्सचे जे इव्हेंट होतात, तिथे काम करतो. त्यातून थोडे फार पैसेही मिळतात. अशा पद्धतीने सुट्टीतला खर्च मी भागवतो. त्यातून माझ्या पुस्तकांचा खर्चही भागतो आणि आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. अमोल सांळुखे
माझ्या वडिलांचा लिंबांचा व्यवसाय आहे आणि तो मोठय़ा प्रमाणावर विस्तारल्यामुळे कामासाठी अनेक लोकांची गरज लागते. म्हणून मी स्वत: माझ्या वडिलांच्या व्यवसायात मदत करतो. त्यामुळे वडिलांनादेखील माझा कामात हातभार लागतो आणि माझा दिवसाचा खर्चदेखील निघतो. व्यवसाय अजून कसा पुढे नेता येईल, याचा प्रयत्न करतो. वडिलांना कामात मदत केल्यामुळे घरातील सर्व सदस्य माझ्यावर खूश आहेत. अभिषेक करंडे
सुट्टीत मित्रांसोबत फिरण्याचं प्लॅनिंग होतच. त्यासाठी मग आई-बाबांकडून गोडीगुलाबीने पैसे उकळायचे तर कधी त्यांनी सांगितलेली कामं निमुटपणे करायची. आईने कधी दळण आणायला सांगितलं की तिला न सांगता त्यातले पैसे घेतो. कधी बाबांचे पाय चेपत बसतो. नाहीतर मोठी ताई आहेच. तिच्याकडून पैसे उकळतो. सध्या एका मित्राच्या सायबरमध्ये जाऊन बसतो. त्यामुळे थोडेफार पैसे मिळतात म्हणजे पिकनिकचा खर्च काही प्रमाणात निघतो. पण आता माझा खर्च करण्यासाठी मी कामाला जाणार आहे, म्हणजे मित्रांसोबत फिरायला जाताना माझा खर्च मीच करेन, कोणाकडेही मागायची वेळ येणार नाही. आशीष दाते
कॉलेजला हल्लीच सुट्टी लागल्यामुळे मित्रांनी अलिबागला पिकनिकचा प्लॅन केला. पण पिकनिक म्हणजे 'खर्च' होणारच. आता पैसे आणायचे कुठून? घरात थोडे प्रॉब्लेम चालू होते. त्यामुळे घरातून पैसे मागणे योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी पिकनिकचा खर्च स्वत: करायचा यासाठी सर्वात प्रथम कामाच्या शोधात लागलो. एका मित्राने दुधाची लाइन टाकण्याचं काम सुचवलं. त्याप्रमाणे लगेच एका ठिकाणी जाऊन काम मागितलं. त्यांनी दुस-या दिवशीच रुजू व्हायला सांगितलं. मित्रांनी माझ्यासाठी पिकनिकचा प्लॅन पंधरा दिवस पुढे ढकलला. मी रोज सकाळी उठून दूध लाइन टाकायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर माझा पगार झाला आणि आम्ही सर्व मित्र दुस-याच दिवशी पिकनिकला गेलो. पिकनिकला आम्ही सर्व मित्रांनी खूप धमाल केली. हा आनंद आमच्यासाठी खूप वेगळा होता. गणेश सावंत
कॉलेज सुरू असताना चांगला पॉकेटमनी मिळायचा. पण सुट्टीत मात्र तो बंद झाला आहे. कुठे मैत्रिणींबरोबर पिकनिकला जायचं असेल तर आई-वडिलांशी गोड बोलून पैसे घेते. नाहीतर थोडेफार माझ्याकडे साठवलेले असतात ते जपून ठेवते आणि त्यातलेच पैसे वापरते. एखादी आवडती वस्तू विकत घ्यायची असेल तर स्वत:च्या पैशातून घेते. कधी कधी आई बाजारातून काही वस्तू आणायला सांगते तर त्यातले उरलेले पैसे स्वत:जवळ ठेवते. नाहीतर सुट्टीत कोणता तरी कोर्स करायचा, असं सांगून पैसे घेते आणि सुट्टीतले खर्च चालवते. पल्लवी नारकर
मुलींचा कॅफेमध्ये कॉफी – ११० रुपये सरासरी खर्च – २०००
मुलांचा महिन्याभराचा खर्च पेट्रोल – ४५० रुपये Read More » शिवसेनेची नाले पाहणीतही 'सफाई'
भांडुप भागातील उषानगर नाल्याची पाहणी करून शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी नालेसफाईचे काम उत्तम असल्याचा दावा केला. मुंबई - भांडुप भागातील उषानगर नाल्याची पाहणी करून शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी नालेसफाईचे काम उत्तम असल्याचा दावा केला. परंतु याच नाल्याला जोडणारा आणि पक्षप्रमुखांनी पाहणी केलेल्या ठिकाणापासून अवघ्या १०० पावलांवर असलेल्या भांडुप पूर्व स्थानकाजवळील कच-याने भरलेल्या नाल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. या नाल्यातील केरकचरा वेळीच उचलला न गेल्यास पावसाळ्यात या परिसरात पाणी साचण्याची शक्यता आहे. भांडुप रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला गणेश मंदिरजवळून जाणारा छोटा नाला पुढे उषानगरातील मोठया नाल्याला जाऊन मिळतो. या मोठया नाल्याचे रुंदीकरण केल्यामुळे व या ठिकाणी रहिवासी वस्ती नसल्यामुळे हा नाला सुस्थितीत आहे. परंतु याच नाल्याची पाहणी करून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी प्रसारमाध्यमांसमोर नालेसफाईचे काम समाधानकार होत असल्याचा दावा करून पाठ थोपटून घेतली. परंतु या छोटया नाल्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. Read More » प्रभावी नियोजनाने पाणीटंचाईवर मात
राज्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजना विभागाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे दुष्काळाच्या काळातही तीव्र पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यापासून दूर राहिले आहे. जर योग्य नियोजन केले आणि आखलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती दाखवली तर पाणीटंचाई निर्माण होत नाही हे वर्धा जिल्ह्याने दाखवून दिले आहे. वर्धा जिल्ह्यासह राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये गेल्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाण्याचे संकट निर्माण होणार याची चाहूल डिसेंबर महिन्यापासूनच लागली होती. पण हे संकट ओळखून त्यासाठी आवश्यक असलेला आराखडा तयार करून, त्या उपाययोजना वेळीच प्रत्यक्षात आणण्याची गरज होती. ही दूरदृष्टी वर्धा जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागाने दाखवली. त्यामुळेच इतर जिल्ह्यांमध्ये लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असताना, वर्धा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली नाही. इतकेच नव्हे तर आकस्मिक उपाययोजना म्हणून प्रस्तावित केलेली, टँकरने पाणीपुरवठा करण्याची योजनाही प्रत्यक्षात आणण्याची गरज उरली नाही. टंचाई निवारणाचा ३ कोटींचा आराखडा विविध टप्प्यात उपाययोजना विहिरींचे अधिग्रहण व दुरुस्ती टँकर मुक्तीच्या दिशेने ३१ खासगी विहिरींचे अधिग्रहण जिल्हा स्तरावर पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयाने सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करणे सुलभ झाले असून, अद्यापपर्यंत टँकरची आवश्यकता न भासल्यामुळे वर्धा जिल्हा पाणीटंचाईचा सामना करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे.
Read More » ओएनजीसीचा महाराष्ट्रात १० हजार कोटींचा प्रकल्प
सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीने महाराष्ट्रात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हय़ातील केळवा-माहीम या ठिकाणी कंपनी गॅसप्रक्रिया प्रकल्प उभारणा आहे. हैदराबाद – सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीने महाराष्ट्रात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हय़ातील केळवा-माहीम या ठिकाणी कंपनी गॅसप्रक्रिया प्रकल्प उभारणा आहे. गॅसप्रक्रिया प्रकल्पासाठी चार ठिकाणांचे परीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर केळवा-माहीम येथील जागा निश्चित केली असल्याचे ओएनजीसीच्या एका अधिका-याने सांगितले. या ठिकाणी कंपनी गॅसप्रक्रिया प्रकल्प उभारणार असून याचा अंदाजे खर्च ९,९८० कोटी रुपये आहे. या प्रकल्पात १० एमएमएससीएमडी गॅसवर प्रक्रिया करण्यात येणार असून ३० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल. या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाने पर्यावरण परिणाम मूल्यांकन अहवाल तयार करण्याची अट घातली आहे. तसेच हा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जनसुनावणीसाठी सादर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर गॅसप्रक्रिया प्रकल्पाचा पर्यावरण व्यवस्थापन आराखडा तयार करायला सांगितला आहे, अशी माहिती या अधिका-याने दिली. या प्रकल्पाला मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे. पाण्याची व्यवस्था न झाल्यास कंपनी खारे पाणी गोडे करणारा प्रकल्प उभारणार आहे. याच भागात कंपनीतर्फे २२०० मेगावॅटचा गॅस आणि औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याची योजना आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने पेट्रोलियम व नैसर्गिक वायू खात्याशी आणि केंद्रीय ऊर्जा खात्याशी चर्चा करण्यास सांगितले. या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या मिळण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
Read More » ..तर भारताच्या अडचणी वाढतील!
चीनच्या पंतप्रधानांच्या भारत दौरा सुरू असतानाच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनीही भारताला भेट दिली. करझाई यांच्या दौ-याला प्रसारमाध्यमांतून फारसे महत्त्व मिळाले नसले तरी हा दौराही तितकाच महत्त्वाचा आहे. २०१४मध्ये अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी जाणार आहे. अशा परिस्थितीत दहशतवादी आणि तालिबानशी लढण्यासाठी युद्धसामग्रीची मदत भारताने करावी, अशी मुख्य मागणी घेऊन करझाई भारतात आले होते. त्यांनी भारत सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. पण भारताने त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. अफगाणिस्तानात भारताची जवळजवळ दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. अफगाणिस्तानच्या पुनर्बाधणीत हवी तेवढी मदत करायला भारत तयार आहे. पण लष्करी मदत देताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे नाहीतर भारताच्या अडचणीत भरच पडेल. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे लष्कर २०१४मध्ये बाहेर पडले की, त्या देशाचे काय होणार ही चिंता आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे. युद्ध, तालिबानी दहशतवाद यामुळे विदीर्ण झालेल्या अफगाणिस्तानात भारताने संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली आपले सन्य पाठवावे, असा एक सूर ऐकायला मिळतो. अलीकडेच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी भारताचा दौरा केला तेव्हा त्यांची भारताकडे मुख्य मागणी लष्करी मदत हीच होती. अफगाणिस्तानातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत नाजूक आहे. अमेरिका दहशतवाद निपटून काढण्याचा निश्चय करत जवळजवळ १२ वर्षे अफगाणिस्तानात तळ ठोकून होता. पण दहशतवादाचा समूळ नायनाट होऊ शकला नाही. उलट तेथून अमेरिका बाहेर पडल्यावर तालिबान आणि त्याचे समर्थक पुन्हा फणा काढून उभे राहतील, अशी स्थिती आहे. एका अहवालानुसार, अमेरिकन सन्य बाहेर पडल्यानंतर काही महिन्यांच्या कालावधीतच अफगाणिस्तानातील ३४ प्रांतांपैकी १७ प्रांत तालिबानच्या ताब्यात येतील, असा अंदाज वर्तवला गेला आहे. थोडक्यात अफगाणिस्तानातील स्थिती अधिकाधिक बिघडत जाण्याचाच संभव आहे. अशा वेळी भारताने तेथे आपले लष्कर पाठवण्याचा धोका पत्करण्याची गरज नाही, असे अनेक तज्ज्ञांना वाटते. अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत करणे शक्य आहे. पण अशा प्रकारे सन्य पाठवणे भारताच्या दृष्टीने धोकादायक ठरेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध केवळ दोन देशांपुरतेच मर्यादित नाहीत. त्यामध्ये इतरही घटक गुंतलेले आहेत. त्यातील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे पाकिस्तान, इराण आणि तिसरा घटक अमेरिकेचा. पाकिस्तान अजूनही अमेरिकेच्या पंखाखाली असला तरी त्या देशात अमेरिकेविरोधात वातावरण तापते आहे. अफगाणिस्तानचा दुसरा शेजारी इराणशी तर त्या देशाचे उभे वैर आहे. भारत आणि इराण यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. भारताने इराणविरोधी भूमिका घ्यावी, यासाठी अमेरिकेचा भारतावर दबाव आहे. मध्य आशियात जाण्याचा मार्ग अफगाणिस्तान आणि इराणमधून जातो. त्यामुळे या देशांबरोबर भारताला कोणताही तणाव नको आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानशी संबंध ठेवण्यातील मोठा अडथळा आहे. दहशतवादविरोधी लढयात पाकिस्तानने त्याच्या लष्करी बळाचा वापर केला आणि त्या जोरावरच अफगाणिस्तानात आपला प्रभाव राखण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांचे मित्रत्वाचे नाते अफगाणिस्तानात राजकीय उलथापालथ घडवू शकते. तालिबानने तेथे सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळवले तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद यांच्या खाईत लोटला जाणार आहे. भारताने अफगाणिस्तानला लष्करी मदत केली तर हे रोखता येईल, असे करझाईंना वाटत आहे. त्यात तथ्यही आहे. पण अफगाणिस्तानला लष्करी मदत करून भारत अडचणीत येऊ शकतो. अफगाणिस्तानातील भारताच्या उपस्थितीने पाकिस्तान आधीच अस्वस्थ आहे. अफगाणिस्तानातील कोणत्याही घडामोडीत भारताला सहभागी करून घेता कामा नये, असा त्याचा पहिल्यापासून आग्रह होता. भारतानेही संयम बाळगून तेथील राजकारणात हस्तक्षेप केला नाही. मात्र अफगाणिस्तानच्या पुनर्बाधणीच्या कार्यात मोठा हातभार लावला. आज भारताची तेथे जवळजवळ दोन अब्ज कोटी रुपयांची गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक वाया जाऊ देणे, भारत खचितच सहन करणार नाही. मात्र म्हणून भारत तेथे लष्करी मदत करेल हेही शक्य नाही. कारण पाकिस्तानने अमेरिकेशी दुटप्पी वर्तन केले तसेच तो भारताशीही करणार यात शंका नाही. अमेरिकेला एका बाजूला दहशतवादाविरोधी लढाईत सहकार्य करण्याचा आव आणत दुस-या बाजूला पाकिस्तानने तालिबान आणि त्याच्याशी संबंधित दहशतवादी संघटनांशी संधान साधले होते. अमेरिकन सन्याविरोधात लढण्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला परवानगी दिल्याचे उघड झाले होते. भारताविरोधातही असेच धोरण पाकिस्तान राबवेल, हे एक आणि दुसरे म्हणजे भारताला हैराण करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये कुरापत काढू शकतो. जम्मू-काश्मीर अशांत असले तरी दहशतवादी कारवायांवर नियंत्रण आणण्यात तेथे भारतीय लष्कराला आणि सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. अफगाणिस्तानातील हस्तक्षेपाने ते वाया जाता कामा नये. अफगाणिस्तानबरोबरच भारताचे संबंध हे पाकिस्तान डोळ्यासमोर ठेवून नाही तर अफगाणिस्तानलाच डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित झाले पाहिजेत. अफगाणिस्तानबरोबर भारताचे दृढ संबंध प्रस्थापित होण्यामुळे इराण आणि मध्य आशियातील देशांबरोबरचे संबंध सुधारण्याची संधी भारताला मिळणार आहे. अर्थात अफगाणिस्तानात भारताचा प्रभाव वाढला तर पाकिस्तानला ते खपणार नाहीच. कारण तो त्याचा धोरणात्मक पराभव असेल. अफगाणिस्तानच्या पुनर्बाधणीसाठी भारताने जी गुंतवणूक केली आहे, ती पाहता अफगाणिस्तानात भारताचा प्रभाव वाढलेला आहेच. उद्या जरी तालिबानने सत्ता काबीज केली तरी भारताला त्याला डावलता येणार नाही. अफगाणिस्तानात स्थिर, लोकशाहीवादी आणि बहुवांशिक सरकार स्थापन होण्यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी इराण आणि रशिया यांच्याबरोबर योग्य संपर्क साधून पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अफगाणिस्तानातील सर्व वांशिक गटांशी भारताचे सौहार्दाचे संबंध असणे आवश्यक आहे. तसे झाले तर पाकिस्तानचे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे रोखता येईल आणि अफगाणिस्तानात स्थैर्य नांदेल. प्रत्यक्ष लष्कर पाठवण्यापेक्षा अफगाण सन्याला प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रांची मदत करणे, या मार्गाने अफगाणिस्तानला मदत करता येईल. शेवटी अफगाणिस्तानातील दहशतवादाविरोधातील लढाई अफगाणिस्तानला स्वत:लाच लढावी लागणार आहे. इतर देशांच्या चुकांची किंमत या देशाला गेल्या शतकभर सोसावी लागली आहे. आजही त्यातून त्याची सुटका नाही. यातून भारत अफगाणिस्तानला बाहेर काढू शकतो. मात्र त्यासाठी संयमी आणि कौशल्यपूर्ण धोरणाची आवश्यकता आहे. Read More » सामंजस्याला गांधी विचारांची जोड
चीनमधील पेकिंग विद्यापीठामध्ये सोमवारी एक अभूतपूर्व म्हणता येईल, अशी घटना घडली. येथे भारताचे माजी राजनतिक अधिकारी पास्कल अॅलन नाझरेथ यांनी लिहिलेल्या 'गांधीजींचे असामान्य नेतृत्व' या चिनी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चीनमधील पेकिंग विद्यापीठामध्ये सोमवारी एक अभूतपूर्व म्हणता येईल, अशी घटना घडली. येथे भारताचे माजी राजनतिक अधिकारी पास्कल अॅलन नाझरेथ यांनी लिहिलेल्या 'गांधीजींचे असामान्य नेतृत्व' या चिनी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इतिहासाचे प्राध्यापक प्रा. शांग क्वानयू यांनी या पुस्तकाचा चिनी भाषेत अनुवाद केला आहे. मुळात, भारत, चीन आणि जपान या तीन देशातील संस्कृती जगात वेगळी आणि प्राचीन मानली जाते. जगाच्या विविध देशांमध्ये मानवाचे शारीरिक आणि मानसिक प्रश्न सोडवण्याचे खूप प्रयत्न झालेले आहेत. परंतु भारत, चीन व जपानमध्ये माणसाचे आत्मिक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न खूप खोलवर झालेले आहेत, अशी तत्त्वज्ञानांची समजूत आहे. चीनमध्ये जे तत्त्वज्ञान निर्माण झाले आणि विकसित झाले त्या तत्त्वज्ञानाच्या वाढीत भारतीय तत्त्वज्ञानाचा मोठा वाटा आहे. पूर्वपरंपरेने भारतातून चीनमध्ये तत्त्वज्ञान गेलेले आहे. फार पूर्वी चीनमधले प्रवासी भारतात येत असत आणि भारतातल्या परिस्थितीचे वर्णन करत असत. भारतामध्ये कला, विद्या, शास्त्र आणि तत्त्वज्ञान याची जी प्रगती झालेली आहे, हे अनेक चिनी प्रवाशांनी लिहून ठेवलेले आहे. अशा पद्धतीने भारतातून चीनमध्ये गेलेल्या लोकांनी मात्र चीनच्या स्थितीविषयी फारसे लिहिलेले नाही. परंतु चिनी विचारवंत भारताने चीनला वैचारिकदृष्टय़ा समृद्ध केले असल्याचे मान्य करतात. वैदिक काळामध्ये अशा प्रकारची वैचारिक देवाणघेवाण झाली असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु अनेक चिनी विचारवंत चिनी जनतेच्या मनावर असलेल्या वैदिक तत्त्वज्ञानाच्या प्रभावाविषयी सांगत असतात. विचारांची दुसरी लाट बौद्धकाळामध्ये आलेली होती. भारतातील अनेक बौद्ध भिख्खू चीनमध्ये गेले आणि चीनमध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला. चीनमध्ये बौद्ध धर्मीयांची संख्या मोठी आहे. भारत व चीन यांच्यातील संबंध तसे आता तणावाचे झालेले आहेत. चिनी राज्यकत्रे विस्तारवादाच्या आहारी जाऊन भारताच्या सीमा कुरतडत आहेत. परंतु सामान्य माणसाच्या पातळीवर चीन व भारत यांच्यामध्ये सामंजस्याची भावना आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी चीन-जपान युद्धामध्ये चिनी जवानांच्या सेवेसाठी आपले पूर्ण जीवन अर्पण केले. याबाबत चीनी जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. म्हणून चीनमधील महापुरुषांच्या यादीमध्ये डॉ. कोटणीस यांचा समावेश केला जातो. वैचारिक, सांस्कृतिक पातळीवर जनतेमध्ये सामंजस्य निर्माण होणे, ही राजकीय पातळीवरसुद्धा सामंजस्य निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत असते. गेल्याच आठवडयामध्ये भारताच्या दौ-यावर आलेल्या चीनच्या पंतप्रधानांनी ही गोष्ट अधोरेखित केली. भारत व चीन यांच्यादरम्यान असे सामंजस्य निर्माण होण्यास योग्य अशी पार्श्वभूमी आहे. महात्मा गांधी यांचे विचार या देवाणघेवाणीचा आधार होऊ शकतो.
Read More » नालेसफाईमागील दिखाऊपणा
यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 'करून दाखवले'च्या फलकांची मुंबईकरांसह विविध राजकीय पक्षांनी खिल्ली उडवली होती. याचे कारण प्रत्यक्षात असणारी मुंबापुरीची बकाल अवस्था, असंख्य प्रश्नांचे प्रलंबित डोंगर, ढिम्म आणि ढिसाळ कारभार, कंत्राटदारांची बेबंदशाही यामुळे सामान्य मुंबईकराचा दररोज छळ होत आहे. यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 'करून दाखवले'च्या फलकांची मुंबईकरांसह विविध राजकीय पक्षांनी खिल्ली उडवली होती. याचे कारण प्रत्यक्षात असणारी मुंबापुरीची बकाल अवस्था, असंख्य प्रश्नांचे प्रलंबित डोंगर, ढिम्म आणि ढिसाळ कारभार, कंत्राटदारांची बेबंदशाही यामुळे सामान्य मुंबईकराचा दररोज छळ होत आहे. असे असताना किरकोळ काही तरी कामे करायची आणि त्याचा गवगवा करायचा, ही बाब कुणालाही पटणारी नव्हती. यावर सर्व स्तरातून झालेल्या टीकेतून शिवसेना आणि मुंबई पालिकेतील सत्ताधारी काहीतरी बोध घेतील, अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली आहे. किंबहुना, त्याची पुनरावृत्तीच नालेसफाईच्या प्रकरणातून दिसून आली आहे. २००५मध्ये जुलै महिन्यातील मुंबईतील महापुराला सात वर्षे उलटली तरी आजही दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते पावसाळा संपेपर्यंत मुंबईकर चिंताक्रांत असतो. पावसाचा जोर किंचित जरी वाढला तरी हे चिंतेचे ढग अधिक गडद होतात. दुर्दैवाने, सात वर्षात प्रशासनाला आपल्या मतदारराजाच्या मनातील हे चिंतेचे मळभ दूर करण्यात यश आलेले नाही. दाखवण्यासाठी थोडी कामे करायची आणि पक्षप्रमुखांकडून प्रशस्तीपत्र घ्यायचे आणि त्याचा गवगवा करायचा, असा प्रकार नित्यनेमाने सुरू आहे. नालेसफाई हे त्याचे ताजे उदाहरण म्हणता येईल. मुंबईतील नाल्यांच्या सफाईचा मुद्दा तसा नेहमीच चच्रेत असतो. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांमधील ७० टक्के गाळ काढण्यात येतो. प्रत्यक्षात पावसाळा सुरू झाल्यानंतर २० टक्के आणि उर्वरित काळात १० टक्के सफाईची काम केली जातात. मात्र, यासाठी होणारा खर्च, कंत्राटदारांची काम करण्याची पद्धत यामुळे प्रत्यक्षात किती कामे होतात, हे सर्वश्रुत आहे. यंदाही नालेसफाईसाठी महापालिकेने ५२ कंत्राटदारांची नियुक्ती करून त्यांना १६० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मुळातच गाळ टाकण्यासाठी जागा नसल्याने आणि कंत्राटदारांनी पाठ फिरवल्यामुळे ही सफाईमोहीम उशिरा म्हणजेच चार-पाच दिवसांपूर्वी सुरू झाली. पूर्व उपनगरात १३५ ते ३४० छोटे नाले आहेत. आतापर्यंत सुमारे ६० मोठय़ा नाल्यांची सफाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात नाल्यांच्या काठी राहणा-या स्थानिक रहिवाशांचा यावर विश्वास नाही. असे असताना सोमवारी उद्धव ठाकरे यांनी यापैकी अवघ्या सहा नालेसफाई कामांची वरवर पाहणी केली आणि नालेसफाईचे काम समाधानकारक असल्याचे प्रशस्तीपत्रक देऊन टाकले. यामुळे कंत्राटदारांनी सुटेकचा नि:श्वास टाकला असला तरी सामान्य मुंबईकरांचा जीव मात्र अद्यापही टांगणीलाच लागलेला आहे. याचे कारण प्रत्यक्षात नाले अद्यापही गाळातच रुतलेले आहेत. असे असताना पालिकेचा ३४ टक्के कामे पूर्ण झाल्याचा आणि उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा दावा हास्यास्पद आणि दिखाऊगिरी आहे. मान्सूनच्या आगमनास उणेपुरे आठ दिवस उरले आहेत. असे असताना उर्वरित सुमारे ७० टक्के काम पूर्ण होण्याबाबत साशंकताच आहे. थोडक्यात, प्रशासनाच्या आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे यंदाचा पावसाळाही मुंबईकरांच्या उरात धडकी भरवणाराच ठरणार आहे. Read More » सलवा जुडुमचा प्रणेता
पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली नक्षलवादी चळवळ नंतर अधिक आक्रमक तर झालीच. पण जमीनदार आणि व्यापा-यांना लुटणारे नक्षलवादी नंतर स्वत:च लुटारू होऊन सर्वसामान्यांपासून आदिवासी आणि गरिबांचे शोषण करू लागले. शोषणाविरोधातील या चळवळीचे रूपांतर नंतर दहशतवादी संघटनांमध्ये झाले. पश्चिम बंगालमधील नक्षलवादी चळवळीची अनेक शकले होऊन ती वेगवेगळया गटात विभागली गेली आणि आठ राज्यांसह महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचली. छत्तीसगडमधील बस्तर आणि दंतेवाडा तर नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले झाले. अशा बालेकिल्ल्यातच महेंद्र कर्मा या काँग्रेसच्या आदिवासी नेत्याने नक्षलींना पायबंद घालण्यासाठी सलवा जुडुम ही नक्षलवाद्यांना शह देणारी चळवळ सुरू केली. त्या आधी १९९१मध्ये त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांची 'जन जागरण अभियान' नावाची चळवळ सुरू केली होती. छत्तीसगडमध्ये खाण उत्खनन करण्यास अनेक खाण कंपन्या उत्सुक होत्या. मात्र, नक्षलवाद्यांच्या धुडगुसामुळे तिथे कोणतेही उद्योग येत नव्हते आणि टिकत नव्हते. कर्मा यांची नक्षलवाद्यांविरोधात ही चळवळ यशस्वी झाली नाही आणि नंतर बंद करावी लागली. मात्र, यामुळे ते नक्षलवाद्यांच्या 'हिट लिस्ट'वर आले. त्यामुळे पुन्हा त्यांनी १९९५ मध्ये नक्षलींचा प्रतिकार आणि त्यांना पायबंद घालण्यासाठी सलवा जुडुम चळवळ सुरू केली. यात स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासींचा समावेश करण्यात आला. सलमा जुडुमतर्फे सुरू करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये त्यांना शस्त्र चालवण्यापासून अनेक गोष्टी शिकवण्यात येत असत. छत्तीसगडमध्ये सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी या चळवळीला पाठिंबा दिला. हळूहळू जुडुमचा प्रभाव वाढू लागला आणि नक्षलवाद्यांची मोठय़ा प्रमाणात पिछेहाट सुरू झाली. त्यामुळे आधीच नक्षलवाद्यांच्या डोळय़ात खुपणाऱ्या कर्मा यांना ठार मारण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्यावर अनेक जीवघेणे हल्ले झाले. नक्षलवाद्यांनी कर्मा यांच्या मोठय़ा भावासह २०पेक्षा जास्त नातेवाईकांना ठार केले. मात्र, नक्षलवाद्यांविरोधातील ही मोहीम त्यांनी सुरूच ठेवली. जुडुममध्ये नक्षलवादातून बाहेर पडलेले आदिवासी आणि स्थानिकांचा भरणा मोठा होता. मात्र, काही वर्षानंतर जुडुमवर लहान मुलांची भरती, बलात्कार, घरे जाळणे आणि दुकाने लुटणे यासारखे आरोप होऊ लागले आणि या मोहिमेची विश्वासार्हता हळूहळू कमी होऊ लागली. २००८मध्ये जुडुम चळवळ बंद करण्याची घोषणा कर्मा यांनी केली. पण, तिचे अस्तित्व फक्त बस्तर आणि विजापूपर्यंत सीमित राहिले. २०११मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सामान्यांना शस्त्र देऊन त्यांना रक्तपातासाठी तयार करणे, घटनाविरोधी तसेच अमानवी असल्याचे स्पष्ट करत जुडुम मोडित काढण्याचे आदेश दिले. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या कर्मा यांनी आपला राजकीय प्रवास भारतीय कम्युनिस्ट पक्षातून सुरू केला होता. आमदार, खासदार अशी वाटचाल सुरू केली. नक्षलींविरोधातील जुडुमची चळवळ त्यांनी ते काँग्रेसच्या विरोधी पक्षातील आमदार असताना सुरू केली, हे विशेष होय. नक्षलींविरोधात उघड दंड थोपटण्याचे काम त्यांनी केले. म्हणूनच काँग्रेसच्या २५ मे रोजीच्या बस्तरमधील परिवर्तन यात्रेवर झालेल्या नक्षली हल्ल्यात कर्मा आणि नक्षलींविरोधात ग्रीन हंट मोहीम राबवणारे नंदकुमार पटेल यांना प्रथम लक्ष्य करण्यात आले. कर्मा यांना ठार मारल्यावर त्यांच्या मृतदेहावर चढून नक्षलवाद्यांनी नाच केला. सलवा जुडुम मोडित निघाली तरी कर्मा यांनी सुरू केलेल्या नक्षलवाद्यांविरोधातील या चळवळीची दखल सगळयांनीच घेतली.
Read More » बीसीसीआयमधील 'श्री'चा निवास
मोठे प्रस्थ, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असोत, राजकारण असो, उद्योग असो, क्रीडा असो, ते कुठल्याही तत्त्वापेक्षा आपले हितसंबंध राखूनच व्यवहार करत असतात. आरोप-प्रत्यारोप करत असतात, भांडत असतात व वेळ पाहून गळ्यात गळेही घालत असतात. गेल्या काही दशकात क्रिकेट आणि राजकारणी हे जवळ आले आहेत. मोठे प्रस्थ, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असोत, राजकारण असो, उद्योग असो, क्रीडा असो, ते कुठल्याही तत्त्वापेक्षा आपले हितसंबंध राखूनच व्यवहार करत असतात. आरोप-प्रत्यारोप करत असतात, भांडत असतात व वेळ पाहून गळ्यात गळेही घालत असतात. गेल्या काही दशकात क्रिकेट आणि राजकारणी हे जवळ आले आहेत. क्रिकेटमध्ये असलेला पैसा आणि त्या भोवती असलेले वलय यामुळे अनेक राजकीय व्यक्ती, मग ते कुठल्याही पक्षातील असोत, या ना त्या निमित्ताने क्रिकेटशी संबंधित राहण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात त्याचा त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदाही मिळत असतो. गेले आठ-दहा दिवस आयपीएल सामन्यांमधील काही खेळाडूंचे फिक्सिंग प्रकरण, त्यामध्ये अडकलेल्या बडय़ा व्यक्ती, सट्टेबाजांशी असलेले त्यांचे संबंध व क्रिकेटमधील बेटिंगवर होणारी कोटयवधी रुपयांची उलाढाल याबाबत एकच गदारोळ उडाला आहे व रोज नव्यानव्या गौप्यस्फोटांचे भुईनळे फुटत आहेत. प्रथम क्रिकेटपटू श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण व काही सट्टेबाजांना अटक करण्यात आली. यानंतर एखाद्या चित्रपटाच्या कथेत नवनवीन व प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी कथानके घडावीत त्याप्रमाणे घटना घडत गेल्या व घडत आहेत. दारासिंगचा मुलगा विंदू याचे नाव व क्रिकेटवरील सट्टयामधील त्याची 'कामगिरी' लोकांना ज्ञात झाली. त्यानंतर तर क्रिकेट जगताला हादरा देणारा मोठा बॉम्बस्फोटच झाला. चेन्नई सुपर किंग्जचे मालक व भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मय्यपन याचे सट्टबाजीतले कोटयवधी रुपयांचे व्यवहार व सट्टेबाजांशी असलेले त्याचे धनिष्ट संबंध उघड झाले आणि सारा प्रकाशझोत श्रीनिवासन यांच्यावर पडू लागला. श्रीनिवासन प्रथम हा प्रकाशझोत टाळू लागले. अंगावर चढू पाहणा-या झुरळाप्रमाणे जबाबदारी पुन्हा पुन्हा झटकू लागले. आपला याच्याशी काही संबंध नाही म्हणू लागले. प्रथम ते म्हणू लागले की, मय्यपन हे चेन्नई सुपर किंग्जचे मालक नाहीतच. ते क्रिकेटमध्ये रस घेणारे एक उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. पण त्यांचा हा बचाव आणि बनाव टिकला नाही. कारण मय्यपन हेच चेन्नई सुपर किंग्जचे मालक व सर्वेसर्वा आहेत, हे सिद्ध झाले आहे. जावई मय्यपन याचा क्रिकेट सट्टय़ातील 'किंग्ज' सहभाग सिद्ध झाल्यानंतर व त्याला अटक झाल्यानंतर सर्वाचा मोहरा त्याचे सासरे आणि बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्याकडे वळला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. पण श्रीनिवासन हे सहज डगमगणारे व डळमळणारे नाहीत व खमकेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. तेल लावलेल्या पहिलवानाप्रमाणे ते सहज कुणाच्या हाती लागणारे नव्हेत. बेटिंगचे प्रकरण बाहेर येताच व चौफेर कारवाई सुरू करताच बीसीसीआयच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. क्रिकेट सामन्यांमध्ये होणा-या सट्टेबाजीवर बीसीसीआय नियंत्रण राखू शकत नाही का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. तेव्हा यासंबंधात श्रीनिवासन यांनी पत्रकार परिषद घेऊन सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवणे, ही बीसीसीआयची जबाबदारी नाही, असे सांगून टाकले. तसेच जावई मय्यपन याला अटक होताच श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. पण श्रीनिवासन यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आपण दोषी नसल्याने राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगितले. एवढेच नाही तर फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्य समितीही नेमून टाकली. ही समिती काय करणार आहे, तिचे सदस्य कोण आहेत, हे अद्याप जाहीर झालेले नाही. मुख्य बाब म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याबाबत श्रीनिवासन ठाम आहेत व त्यासंबंधात त्यांनी मोच्रेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी असेही सांगितले की, 'माझा राजीनामा कुणीही मागितलेला नाही व मी राजीनामा द्यावा असे कुणाचेही मत नाही. सर्वाचा मला पाठिंबा आहे.' भारतीय क्रिकेट नियामक मंडळात विविध पक्षांची मंडळी आहेत. राजकारणातील त्यांचे मतभेद व विळ्या-भोपळ्याचे सख्य जाहीर आहे. एरवी ही राजकीय मंडळी एकमेकांवर तुटून पडत असतात. पण नियामक मंडळात असलेली ही विविध पक्षांची मान्यवर मंडळी फिक्सिंगबाबत आणि अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत काहीच बोलत नाहीत व ही बोलभांड मंडळी आता मूग गिळून गप्प आहेत. नियामक मंडळातील सदस्य, भाजपचे नरेंद्र मोदी व अरुण जेटली, काँग्रेसचे सी. पी. जोशी, राजीव शुक्ला, ज्योतिरादित्य शिंदे आणि नॅशनल काँग्रेसचे फारुख अब्दुल्ला या राजकारणी व्यक्ती गुरुनाथ मय्यपन यांच्या 'कर्तृत्वा'बाबत व श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. याचा अर्थच श्रीनिवासन यांनी लावलेली फिक्सिंग या मंडळींनी स्वीकारली आहे व श्रीनिवासन म्हणतात त्याप्रमाणे या विविध पक्षीय सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. फिक्सिंग आणि सट्टेबाजीत आकंठ बुडालेला मय्यपन श्रीनिवासन यांचा जावई असूनही एरवी कुठल्याही मंत्र्याच्या नातेवाईकाने केलेल्या भ्रष्टाचारावरून मंत्र्याचा राजीनामा मागणारे अरुण जेटली तसेच भ्रष्टाचार आणि गरव्यवहाराबद्दल काँग्रेसवर तुटून पडणारे नरेंद्र मोदी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत काही बोलायला तयार नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे. शेवटी माणूस कुठल्याही पक्षाचा असला तरी तो आपल्या सोयीने व्यवहार करत असतो. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, असा सर्वसाधारण मतप्रवाह असला तरी नियामक मंडळामध्ये श्रीनिवासन यांची हकालपट्टी करण्याइतके संख्याबळ नाही, हे समजून आल्याने या मागणीचा जोर बराच ओसरला आहे व याची कल्पना असल्याने श्रीनिवासन यांचा उद्दामपणा वाढला आहे. नियामक मंडळातून त्यांची हकालपट्टी करणे सोपे नाही, हे श्रीनिवासन यांना चांगले माहीत आहे. कारण बीसीसीआयचे नियमच असे आहेत की, अध्यक्षाची हकालपट्टी करणे जवळजवळ कठीण आहे. तसेच बीसीसीआय कुणी बरखास्तही करू शकत नाही. कारण बीसीसीआय ही तामिळनाडूमध्ये १९३०मध्ये मद्रास सोसायटीज अॅक्टखाली नोंद झालेली एक सोसायटी आहे आणि तामिळनाडू सरकारच त्याबाबत निर्णय घेऊ शकते. जर काही गरव्यवहार झाले असतील तर तामिळनाडू रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज बीसीसीआयला नोटीस पाठवू शकतो. पूर्वी बीसीसीआयचे नोंदणीकृत कार्यालय चेन्नईहून मुंबईत हलवण्याचा प्रयत्न झाला होता. पण तो यशस्वी झाला नाही. सोसायटीला स्वत:चे नियम व पोटनियम आहेत व बाहेरच्या कुणाही व्यक्तीला सोसायटीच्या कामात हस्तक्षेप करता येत नाही. पण सोसायटीचे स्वरूप असलेल्या बीसीसीआयचा कारभार व्यवस्थित नसेल किंवा गरव्यवहार झाला असेल तर तामिळनाडू सरकारच कारवाई करू शकते. पण सद्य परिस्थिती व श्रीनिवासन यांचे वजन लक्षात घेता अशी कारवाई होणे कठीणच दिसते. हेच श्रीनिवासन यांच्या पथ्यावर पडलेले दिसते. त्यामुळेच बीसीसीआयमधील 'श्री'चा निवास सध्या तरी अबाधित दिसतो.
नक्षलवादाची नांगी ठेचाछत्तीसगढमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेला व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह २७ जणांचा बळी घेणारा हल्ला हा अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण त्याबरोबरच नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची फेरतपासणी व फेरआखणी करण्याची किती गरज किती तातडीने करणे आवश्यक आहे, यावरही जळजळीत प्रकाशझोत टाकणारा आहे. नक्षलवाद्यांनी यापूर्वी पोलीस व सुरक्षादलांवर अनेकदा भीषण हल्ले चढवून जवानांची
Read More » 'दडपण न घेता अभ्यास करावा'
परीक्षेचे कुठलेही दडपण घेऊ नये. त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही. छंद जोपासून अभ्यास करावा, त्यामुळे मनावर ताण पडत नाही. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असणा-यांसाठी यूपीएससी परीक्षा ही एक चांगली संधी आहे. या परीक्षेसाठी काय तयारी के ली ? - माझे 'बीएएमएस'चे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. त्यासाठी पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेतून मी मार्गदर्शन घेतले. तसेच विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन केले. दिवसाचे १२-१३ तास अभ्यास केला. करिअरसाठीच तुम्ही हा पर्याय का निवडला? - पुण्यात इंटर्नशिप करत असताना मी सतत वेगवेगळ्या व्याख्यानांना हजर असायचो. तसेच त्यादरम्यान झालेल्या काही आंदोलनांमध्येही मी सहभागी होतो. अण्णा हजारेंच्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या आंदोलनातही मी सहभागी होतो. त्याचप्रमाणे पुण्यातील निर्माण ग्रूप या संस्थेमध्येही मी कार्यरत होतो. या संस्थेत काम करत असतानाच मला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली. पण सामाजिक कार्यकर्ता बनून समाजात परिवर्तन आणण्यासाठी खूप मोठा काळ लागतो, एखादा अधिकारी हेच काम लवकरात लवकर करू शकतो. याची जाणीव झाल्यामुळे मी हे क्षेत्र निवडले. या परीक्षेसाठी तयारी करणा-याना तुम्ही काय सांगाल ? - सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले ध्येय स्पष्ट हवे. आपल्याला नक्की काय हवे आहे, त्याचा विचार करावा आणि आपले ध्येय निश्चत करावे. 'भान राखून योजना आखा, बेभान होऊन कामाला लागा' बाबा आमटेंच्या या वाक्यानुसार मी कामाला सुरुवात केली. या परीक्षेचे दडपण न घेता शक्य होईल तितके स्थिर राहावे. आपल्या आवडी निवडी जोपासून अभ्यास केल्यास हे सहज शक्य होते. घरच्यांचा पाठिंबा होता का ? - घरच्यांचा संपूर्ण पाठिंबा होता. इंटर्नशिप संपल्यानंतर तीन र्वष मी या परीक्षेची तयारी करत होतो. पण यादरम्यान माझ्या घरच्यांनी कधीच नोकरीधंद्यासाठी दबाव टाकला नाही. मी स्वत: चाणक्य मंडळात स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतले. त्यामुळे पैशांचा प्रश्नही सुटला आणि माझा स्वत:चा अभ्यासही झाला. Read More » सुरक्षित प्रवासात बेस्ट
मागील ५ वर्षात बेस्ट बसेसचे ३ हजार ६८३ अपघात झाले आहेत. मात्र, त्याआधीच्या पाच वर्षाच्या तुलनेत त्यानंतरच्या वर्षात अपघातांची संख्या कमी झाली आहे. मुंबई - मागील ५ वर्षात बेस्ट बसेसचे ३ हजार ६८३ अपघात झाले आहेत. मात्र, त्याआधीच्या पाच वर्षाच्या तुलनेत त्यानंतरच्या वर्षात अपघातांची संख्या कमी झाली आहे. सर्वाधिक अपघात २००९-१० साली झाले असून सर्वात कमी अपघात २०१२-१३ वर्षात झाल्याचे आढळून आले आहे. एकूण अपघातांपैकी अडीच हजार अपघात हे किरकोळ स्वरूपाचे आहेत. पादचा-यांच्या चुकांमुळे अपघात झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुंबईत दररोज ४९ लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. बेस्टच्या ताफ्यात एकूण ४ हजार २०० गाडय़ा असून मुंबईतील ५०२ मार्गावर त्या धावतात. शून्य टक्के अपघात हे बेस्टचे लक्ष्य आहे. असे असले तरीही गेल्या पाच वर्षामध्ये वर्षाला सरासरी ६०० अपघात झाल्याचे आढळून आले आहे. या अपघातांमध्ये १९६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. किरकोळ अपघातांची संख्या जवळपास २ हजार ६१३ इतकी आहे, तर एकूण अपघातांची संख्या ही ३ हजार ६८३ आहे. विशेष म्हणजे या अपघातांमध्ये बेस्टचालकांच्या चुका कमी असल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. २०११-१२ आणि २०१२-१३ सालची आकडेवारी पाहिली असता, या कालावधीत ७५५ अपघात झाले असून त्यातील केवळ २६ अपघात बेस्टचालकांच्या चुकीमुळे झाले आहेत. यातील सात चालक बडतर्फ, चार जणांना निलंबित तर आठ जणांची वेतनश्रेणी कमी करण्याची कारवाई केली गेली आहे. यातील सात चालकांची चूक सिद्ध झाली नसल्याने त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. २०१२-१३ मधील सप्टेंबपर्यंतच्या आकडेवारीनुसार १४ अपघात हे बसचालकाच्या चुकीमुळे झाले आहेत. यामध्ये चार जणांना बडतर्फ, तीन जणांचे वेतन कमी करण्याची, तर तीन जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. यातही चार चालकांची चूक सिद्ध झाली नसल्यामुळे त्यांना सोडण्यात आले आहे. २००९-१० मध्ये झाले असून त्याची संख्या ७६५ एवढी आहे त्यानंतरच्या प्रत्येक वर्षात अपघातांची संख्या घटत असल्याचे दिसून आले आहे. २०१२-१३ या वर्षात अपघातांची संख्या १०० ने घटून ६६० एवढी झाली आहे. अपघातांची कारणे वेगमर्यादा न पाळणे
Read More » रिव्हर्स स्विंग, २९ मे २०१३
क्रिकेटच्या मैदानावरील रंजक किस्से १८३९ १९०२ १९५० २०००
Read More » पालघरजवळ लक्झरी बसला अपघात,१५ ठार
मुंबईहून अहमदाबादकडे जाणारी लक्झरी बस पुलावरुन कोसळून झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. पालघर – मुंबईहून अहमदाबादकडे जाणारी लक्झरी बस पुलावरुन कोसळून झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. बसमध्ये आणखीनही काही प्रवासी अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेंढवण गावाजवळ बस येताच चालकाचा ताबा सुटल्याने बस पुलावरुन खाली कोसळली. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. Read More » आमच्या मुलांनाही शहरी जीवन जगावसं वाटतं!
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने बदल्यांचे धोरण निश्चित केले असून, या धोरणानुसार गेल्या आठवड्यात ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकूण ८२० कर्मचा-यांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. वाडा - 'जन्मलो इथं, वाढलो इथं आता उर्वरित आयुष्यही येथंच घालवायचं का? आमचीही काही स्वप्न आहेत. आमच्या मुलांनाही शहरी जीवन जगावसं वाटतं,' ही प्रतिक्रिया आहे आदिवासी भागात तब्बल २० वर्षे जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापनाचे काम करणा-या एका शिक्षकाची. सरकारने नुकत्याच शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. या अंतर्गत शहरी भागातील तब्बल ६०० शिक्षकांच्या आदिवासी तालुक्यात बदल्या केल्या. मात्र आदिवासी तालुक्यात १५ ते २० वर्षे काम करणा-या एकाही शिक्षकाची बदली शहरी भागात केली नाही. त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने बदल्यांचे धोरण निश्चित केले असून, या धोरणानुसार गेल्या आठवड्यात ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकूण ८२० कर्मचा-यांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. यामध्ये ६०० शिक्षक, ६० ग्रामसेवक, ६० प्रशासकीय कर्मचारी, ५० आरोग्य विभागातील कर्मचारी व इतर विभागातील ५० कर्मचा-यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा परिषदेने केलेल्या या बदल्या सरकारच्या धोरणानुसार (परिपत्रकानुसार) झाल्या नसल्याचा कर्मचा-यांचा अरोप असून, त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चार च्या कर्मचा-यांच्या पाच टक्के बदल्या ठाणे जिल्ह्यातील वाडा, जव्हार, विक्रमगड, शहापूर, डहाणू, तलासरी व पालघर या आदिवासी उपयोजनेअंतर्गत येणा-या आठ तालुक्यांत पाच टक्के, तर उर्वरित भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, वसई, उल्हासनगर व ठाणे या शहरी तालुक्यांत करण्यात याव्यात, असे ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या परिपत्रक होते. आदिवासी तालुक्यांतली सर्व रिक्त जागा भरण्यासाठी शहरी भागातील कर्मचा-यांच्या बदल्या येथे करण्यात याव्यात, असेही यात स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना आदिवासी भागात वर्षानुवर्षे काम करणा-या एकाही कर्मचा-याची अथवा शिक्षकाची बदली शहरी भागात करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचा-यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Read More » गुटखाबंदी कायम!
व्यसनाधीनता ही एखाद्या परकीय शत्रूपेक्षाही धोकादायक आहे, असे सांगत गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदी कायम असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदीच्या निर्णयामुळे राज्याचा तब्बल १०० कोटींचा कर बुडाला. मात्र, गुटख्याचा भयंकर परिणाम लक्षात घेत राज्य मंत्रिमंडळाने एकमुखाने गुटखाबंदीचा निर्णय जाहीर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात विडी, सिगारेट आणि तंबाखूवरील कर साडेबारा टक्के करण्यात आला. मात्र, केवळ बंदी घालून ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वाना एकत्र यावे लागणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. गुटखा आणि तंबाखू यांविरोधात लोकचळवळ उभी राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आबांची खिल्ली Read More » मुंबई-गोवा महामार्ग बनतोय मृत्युमार्ग!
मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. माणगाव तालुक्यातील मुगवली फाटा येथे सुमो आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात तीन प्रवासी जागीच ठार झाले तर पाच प्रवासी जखमी झाले. महाडजवळ सोमवारी मध्यरात्री १२ वाजता 'स्विफ्ट' कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यात कारचालक रमेश हावरे ठार झाला, तर दुसरा अपघात माणगाव तालुक्यातील रेपोली गावात झाला. सॅँट्रो कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात कारचालक ठार झाला. या अपघातामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी बसवर कार आदळल्याने कारमधील रणजीत शेलार आणि सानिया शेलार जखमी झाले.महाड तालुक्यातील टोळ गावात तवेरा गाडीच्या चालकाचा सुटून गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले. लोणेरे-गोरेगाव रस्त्यावर एसटी बसने मागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील तरुणी जागीच ठार झाली. खेडला जाणारी वॅग्नार समोरून येणा-या ट्रकवर आदळल्याने दोन जण जखमी झाले.
Read More » सट्टेबाजांचे श्रीलंकन कनेक्शन
आयपीएल वादाच्या भोव-यात सापडली असतानाच आता 'श्रीलंका प्रीमियर लीग'मधील (एसपीएल) एक संघच डमी खरेदीदारामार्फत सट्टेबाजांनी खरेदी केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. संजय व पवन यांनी स्वत: फ्रॅचायझी घेतली नसून, त्यांनी तिस-याच व्यक्तीच्या नावावर हा संघ खरेदी केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आली आहे. आयपीएलच्या धर्तीवर दोन वर्षापूर्वी एसपीएलची सुरुवात करण्यात आली होती. त्यातील सातही संघांचे मालक भारतीय आहेत. विंदू दारासिंग याच्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पवन व संजय यांनी यातील एक संघ तिस-या व्यक्तीमार्फत खरेदी दरम्यान, पाकिस्तानी पंच असद रौफ व त्याच्या भारतीय मैत्रिणीची पहिली ओळख श्रीलंकेतच झाली होती. तो एसपीएलमधील अंतर्गत माहिती रौफ पवन व संजयला पुरवत असल्याचा संशय आहे. जामीन नाकारल्याने अंकितचे लग्न लांबणीवर
Read More » 'सोमय्या'च्या विद्यार्थ्यांनी साकारली 'जुगाड १३'
विद्याविहार येथील के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी महाविद्यालयाच्या आवारात 'जुगाड १३' या त्यांच्या पहिल्या 'फ्यूएल एफिशिएंट' गाडीचे अनावरण केले. मुंबई – विद्याविहार येथील के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी महाविद्यालयाच्या आवारात 'जुगाड १३' या त्यांच्या पहिल्या 'फ्यूएल एफिशिएंट' गाडीचे अनावरण केले. ३५ सी. सी. इंजिनची ही गाडी पेट्रोलवर चालणारी असून, तिची कार्यक्षमता ३० किलोमीटर प्रतिलिटर एवढी आहे. 'शेल ग्लोबल'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'शेल इको मॅरॅथॉन' या आंतरराष्ट्रीय महाविद्यालयीन स्पर्धेतील सहभागासाठी या विद्यार्थ्यांनी ही गाडी बनवली आहे. ही स्पर्धा क्वालालंपूरच्या आंतरराष्ट्रीय सर्किटवर होणार असून, जगभरातील १५० संघ यात सहभागी होणार आहेत. 'इटीए'हा या स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्रातील एकमेव संघ आहे. गेले पाच महिने के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या इटीए संघातील मुले ही गाडी तयार करण्यासाठी मेहनत करत होते. आमच्या महाविद्यालयातील मुलांना चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण देण्यावर आमचा भर असतो. या पाच महिन्यांच्या काळात या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून, त्यांनी बनवलेली ही गाडी नक्कीच या स्पर्धेत त्यांना यश मिळवून देईल, असा विश्वास महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभा पंडित यांनी व्यक्त केला. Read More » बांधकाम व्यावसायिकावर बोरिवलीत गोळीबार
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत इमारतींचे बांधकाम करणा-या राजाराम बाबला माजगावकर (६२) यांच्यावर दोघा अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान बोरिवली देवीपाडा परिसरात घडली. मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत इमारतींचे बांधकाम करणा-या राजाराम बाबला माजगावकर (६२) यांच्यावर दोघा अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान बोरिवली देवीपाडा परिसरात घडली. सुदैवाने या गोळीबारातून माजगावकर बचावले असून, युसुफ बचकाना याच्या आदेशावरून हा गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बचकाना हा राजन टोळीशी संबंधित आहे. दरम्यान, याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. बोरिवलीतील देवीपाडा परिसरात माजगावकर यांच्यामार्फत काही इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यांना बचकानाकडून गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे दूरध्वनी येत होते. मात्र त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. माजगावकर हे त्यांच्या स्कोडा गाडीतून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जात होते. त्यांचा चालक दिनेश माणगावकर त्यांच्यासोबत होता. सकाळी अकराच्या दरम्यान एका दुचाकीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले. त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या एका तरुणाने माजगावकरांच्या गाडीच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर ते दोघे संशयित पळून गेले. या प्रकरणी माजगावकर यांनी कस्तुरबामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी तपासासाठी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. स्टार पिस्तुलने हा गोळीबार करण्यात आला असून, घटनास्थळावरून तीन पुंगळ्या व एक जिवंत काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला असावा, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. Read More » रौफला सट्टेबाजांनी पुरवले सीमकार्ड
'आयपीएल' सट्टय़ाप्रकरणी आता पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई – 'आयपीएल' सट्ट्याप्रकरणी आता पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजांनी त्यांना एक सीमकार्ड पुरवले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामार्फतच ते भारतीय सट्टेबाज संजय व पवन जयपूर या दोघांच्या संपर्कात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आली आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर रौफ यांनी या सीमकार्डची विल्हेवाट लावल्याचेही विंदूने त्याच्या चौकशीत स्पष्ट केले आहे. विंदूच्या चौकशीत रौफ परदेशात सुरू असणा-या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील अंतर्गत माहिती सट्टेबाज पंकज व संजय जयपूर या सट्टेबाजांना पुरवत असल्याचे पुढे आले होते. मात्र आता या सट्टेबाजांनी रौफ यांना एक मोबाईल सीमकार्डही पुरवल्याची माहिती उजेडात आली आहे. दिल्ली पोलिसांनी देशभरातून सट्टेबाज व खेळाडूंना अटक केल्यानंतर याप्रकरणी पवन व संजय जयपूर यांचे नाव पुढे आल्यानंतर विंदूने त्यांना दुबईत पळण्यास मदत केली. त्यावेळी विंदूनेही १६ मे रोजी रौफ यांना दूरध्वनी करून या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली व त्यांच्याकडील सीमकार्डची विल्हेवाट लावण्यास सांगितले. गुन्हे शाखेच्या तपासानुसार रौफ यांनी या सीमकार्डची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व प्रकरण अंगाशी येत असल्याचे जाणवल्यानंतर रौफ यांनी दुबईला पलायन केल्याची चर्चा आहे. हे सीमकार्ड बंगळूरु येथील असून, ते अन्य एका व्यक्तीच्या नावावर असल्याचेही निष्पन्न झाले आहे. विंदू व मय्यपनच्या कुटुंबीयांनी घेतली भेट टिंकूचा ताबा गुन्हे शाखेला मिळणार चेन्नईतील हॉटेल मालकाची ३० मेनंतर चौकशी Read More » सत्ताधा-यांनी केले पुलांच्या कामात 'फूल'
ब्रिटिशांच्या काळात उभारण्यात आलेल्या अनेक उड्डाणपुलांनी शंभरी गाठली आहे. मात्र, ३४ उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आहेत. या पुलांच्या डागडुजीकडे पालिकेने लक्ष पुरवलेले नाही. ब्रिटिशांच्या काळात उभारण्यात आलेल्या अनेक उड्डाणपुलांनी शंभरी गाठली आहे. मात्र, ३४ उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आहेत. या पुलांच्या डागडुजीकडे पालिकेने लक्ष पुरवलेले नाही. मुंबईत पादचारी पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्गासह एकूण २५३ पूल आहेत. त्यांमध्ये शहर भागांतील २५ जुन्या उड्डाणपुलांसह पूर्व व पश्चिम उपनगरांतील एकूण ३४ पूल अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेने सध्या २१ उड्डाणपुलांच्या डागडुजीची कामे हाती घेत त्यासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र, शहरातील जे. एस. एस., केशवसूत, एलफिन्स्टन पूल आणि करीरोड पूल या उड्डाणपुलांच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी मागवलेल्या निविदांमध्ये एकाही कंत्राटदाराने स्वारस्य दाखवले नव्हते. त्यामुळे ही कामे वगळून १७ पुलांची कामे हाती घेत त्यासाठी ४२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. या पुलांचे डांबरीकरण 'मास्टिक अस्फाल्ट'द्वारे करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र त्यांपैकी आर. पी. एस या कंपनीने टिळक पूल आणि रेलकॉन-महावीर कंपनीने टी. एच कटारियामार्गावरील संत विश्वेसरय्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले. अन्य कोणत्याही उड्डाणपुलांचे काम कंत्राटदारांनी हाती घेतले नाही. काळ्या यादीतील आर. पी. एसने चार, रेलकॉन-महावीर कंपनीने पाच आणि एम. ई इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने सहा उड्डाणपुलांचेकाम केलेले नाही. जर हा प्रस्ताव तातडीने संमत करून घेतला होता, तर मग पुलांची कामे का करण्यात आली नाही, याचा प्रशासनाने दोन दिवसांत खुलासा करावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली. मास्टिक अस्फाल्टची अट घालून ही कामे देण्यात आली आहेत. मग पावसाळ्यात खड्डा पडल्यास कोणत्या तंत्राचा वापर केला जाणार, याचीही माहिती मिळावी अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेख यांनी दिला. सत्ताधा-यांची प्रशासनावर वचक नसल्यामुळे कंत्राटदारांचे फावल्याचाही आरोपही त्यांनी या वेळी केला. Note: There is a poll embedded within this post, please visit the site to participate in this post's poll. या पुलांवरील प्रवास होणार खडतर Read More » निसर्गरम्य वेंगुर्ल्यात म्हाडाची १२५ घरे
सर्वसामान्यांना परवडणा-या किंमतीत घरे देणा-या म्हाडाने आता कोकणातल्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरातही गृहप्रकल्प योजना सुरू केल्या आहे. मुंबई – सर्वसामान्यांना परवडणा-या किंमतीत घरे देणा-या म्हाडाने आता कोकणातल्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरातही गृहप्रकल्प योजना सुरू केल्या आहे. समुद्र किना-यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंगुर्ला-कॅम्परोड येथे कोकण मंडळाने १२५ घरे बांधली असून, येत्या २०१४ च्या सोडतीत या घरांचा समावेश केला जाणार आहे. एकाच ठिकाणी तीन इमारती असून, या इमारतीच्या तिन्ही मजल्याचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. आता चौथा मजला बांधण्याचा आराखडा नगर परिषदेकडे पाठवण्यात आला असून, त्यालाही लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत इमारतींचा चौथा मजलाही बांधून पूर्ण होईल. २०१४ च्या सोडतीत या घरांची सोडत काढण्याचे कोकण मंडळाने निश्चित केले असल्याचे मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी असलेल्या तेथील घरांचे क्षेत्रफळ अनुक्रमे साडेपाचशे, साडेसातशे व एक हजार चौरस फुट आहे. घरांची किंमत येत्या काही दिवसांत ठरणार आहे. घर बांधून विक्री करण्याचा म्हाडाचा उद्देश आहे. मात्र यापूर्वी काही ठिकाणी घरांना प्रतिसाद मिळाला नसल्याने ही घरे पडून होती. हा अनुभव असल्याने यावेळी कोणत्या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज घेऊनच घरे की भूखंड विक्री असा सावध पवित्रा कोकण मंडळ घेत आहे. भूखंड विक्रीचा घाट? कोकण मंडळाने भविष्यातील प्रकल्पासाठी आतापासूनच जमिनी पाहण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे ३२ एकर जागेबाबत प्रतिसाद मिळाला आहे. त्याशिवाय पनवेलजवळच्या रसायनी स्थानकाजवळ एका कंपनीने १०० एकर जमीन विकण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच पनवेल शहरात आठ एकर जागेचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षाच्या सोडतीची तयारी कोकण मंडळाने सुरू केल्याची समजते.
Read More » वेतन कराराबाबत मतभेद कायमच
एसटी कर्मचा-यांच्या वेतन कराराच्या मसुद्यातील काही मुद्यांवर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि एसटी प्रशासन यांच्यातील मतभेद कायमच राहिल्याने करार मंजूर होण्यास विलंब होत आहे. मुंबई – एसटी कर्मचा-यांच्या वेतन कराराच्या मसुद्यातील काही मुद्यांवर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि एसटी प्रशासन यांच्यातील मतभेद कायमच राहिल्याने करार मंजूर होण्यास विलंब होत आहे. कराराच्या मसुद्यात ९६ मुद्यांपैकी ६४ मुद्यांवर सुरुवातीला मतऐक्य होऊ शकले नाही. नंतरच्या बैठकांमध्ये ६४ पैकी ३३ मुद्यांवर एकमत झाले. उर्वरित ३१ मुद्यांवर बुधवारी होणा-या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, १५ जूनपर्यंत वेतन करार झाला नाही आणि जुलै महिन्याचा पगार नव्या वेतन करारानुसार झाला नाही, तर संपाच्या निर्णयावर ठाम असल्याचा इशारा महाराष्ट्र एस. टी. वर्कर काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. तसेच एसटीतील अन्य सहा संघटनानी एक जूलै रोजी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मान्यताप्राप्त संघटनेची वेतन कराराबाबत दोन फेब्रुवारीला बैठक झाली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नियमित कामगारांना दहा टक्के पगार वाढीला कामगार संघटनेने विरोध केला. त्यानंतर १२ एप्रिल रोजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीने पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात १३ टक्के पागारवाढीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ठरल्यानुसार, कराराचा मसुदा सहा मे रोजी एसटी प्रशासनाकडे आणि त्यानंतर नऊ मे रोजी कामगार संघटनेकडे पाठवण्यात आला. मात्र, या मसुद्याला कामगार संघटनेने विरोध करत अनेक मुद्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर २२ आणि नंतर २७ मे रोजी मसुद्यावर चर्चा झाली. त्यानुसार, ३३ मुद्यांवर एकमत झाले तर उर्वरित ३१ मुद्दे प्रलंबित राहिले. त्यांवर बुधवारी होणा-या बैठकीत सकारात्मक चर्चेची शक्यता आहे. यात किमान वेतनश्रेणीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा समजला जात आहे. कामगार कराराला विलंब होत असल्याने राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, कास्ट्राइब राज्य परिवहन कामगार संघटना, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, आणि महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस या सहा संघटनानी एकत्रित एक जुलैला संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे निवेदनही बुधवारी व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात येणार आहे. इंटकप्रणित महाराष्ट्र एस.टी. वर्कर काँग्रेस १५ जूननंतर संप करणार असल्याचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. Read More » हार्बर मार्गाचे वर्षभरात 'डीसी-एसी' रूपांतरण
सीएसटी ते पनवेल हार्बर मार्गाचे येत्या वर्षभरात 'डीसी' (डायरेक्ट करंट) विद्युत प्रवाहाचे 'एसी'मध्ये (अल्टरनेटिव्हकरंट) रूपांतरण करण्यात येईल, अशी माहिती मंगळवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी दिली. मुंबई – सीएसटी ते पनवेल हार्बर मार्गाचे येत्या वर्षभरात 'डीसी' (डायरेक्ट करंट) विद्युत प्रवाहाचे 'एसी'मध्ये (अल्टरनेटिव्हकरंट) रूपांतरण करण्यात येईल, अशी माहिती मंगळवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी दिली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकलच्या फे-या वाढणार असून, दर तीन ते चार मिनिटांनी लोकल सोडण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. पश्चिम रेल्वेने 'डीसी'-'एसी' रूपांतरणाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर गाड्यांची संख्या आणि फे-याही वाढल्या आहेत. मध्य रेल्वेनेही सध्या 'डीसी'-'एसी' रूपांतरणाचे काम हाती घेतले आहे. सध्या कल्याण-ठाणे आणि ठाणे-कुर्लादरम्यान हे काम प्रगतीपथावर आहे. 'डीसी' विद्युत प्रवाहाचे 'एसी'मध्ये रूपांतरण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत करणे तसेच जास्तीत-जास्त गाडय़ा चालवण्याची संधी मिळते. त्यामुळे हार्बर मार्गावरही या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होईल, असे निगम यांनी सांगितले. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास गतिमान होईलच तसेच गाड्यांच्या फे-याही वाढवता येतील. त्याचबरोबर 'एसी' विद्युत प्रणालीवर धावणाऱ्या नव्या मिलेनियम लोकलही हार्बर मार्गावर चालवणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ऑगस्ट महिन्यात आणखी काही मिलेनियम लोकल दाखल होणार आहेत. त्यानंतर या गाडय़ा मध्य रेल्वेला दिल्या जाणार आहेत. दरम्यान, 'डीसी'-'एसी' रूपांतरणानंतर हार्बर मार्गावर दर तीन-चार मिनिटांनी लोकल सोडण्याचा मध्य रेल्वेचा विचार असल्याचे निगम यांनी सांगितले.
Read More » बारावीच्या निकालासोबत विषयांचे गुणही समजणार
बारावीचा निकाल गुरुवारी ३० मे रोजी राज्य शिक्षण मंडळाच्या http://www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. मुंबई – बारावीचा निकाल गुरुवारी ३० मे रोजी राज्य शिक्षण मंडळाच्या http://www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. या वेळी विद्यार्थ्यांना निकालाचा सर्व सारांश आणि विषयनिहाय गुणही समजणार आहेत. तसेच त्यांना या निकालाची प्रत प्रिंट करून घेता येणार आहे. 'एसएमएस'द्वारे निकाल उपलब्ध होणार असून, 'बीएसएनएल' मोबाइलधारकांनी MHSC Seat No. असे टाइप करून तो ५७७६६ या क्रमांकावर पाठवल्यास तो त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शवणा-या शालेय अभिलेखांचे वाटप गुरुवारी, सहा जून रोजी सकाळी ११ वाजता सर्व विभागीय मंडळातील प्रमुख कार्यालयांत केले जाणार आहे. तर त्याच दिवशी विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजता त्यांच्या महाविद्यालयांत गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची असेल, तर त्यांनी सहा जूननंतर विहित नमून्यात आणि शुल्कासह सोमवार, १७ जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावा. मात्र, अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. श्रेणी सुधारण्याची संधी उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन मुंबई विभागीय मंडळाची हेल्पलाइन
Read More » 'एसटी'तील छळाचे नवे प्रकरण
राज्य परिवहन महामंडळात (एसटी) कार्यरत असलेल्या आणखी एका महिला अधिका-याला मानसिक त्रास दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. एसटीतील महिला कर्मचा-यांना वरिष्ठ अधिकारी मानसिक त्रास देत असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले होते. त्यानंतर आता विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी ए. बी. गायकवाड यांनीही अशापद्धतीची तक्रार केली आहे. परंतु, प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी अनुसूचित जमाती आयोगाकडे धाव घेतली आहे. आयोगानेही महामंडळाच्या अध्यक्षांना एका पत्राद्वारे गायकवाड यांच्या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई केली आहे, त्याबाबतची माहिती ३० दिवसांत पाठवण्यास सांगितले आहे. या कालावधीत एसटी प्रशासनाने कोणतीही माहिती न दिल्यास आयोग समन्स बजावणार आहे. हे पत्र महामंडळाला प्राप्त झाले असून, लवकरच त्याचे उत्तर आयोगाला पाठवले जाईल, असे माहीतगारांनी सांगितले. दरम्यान, महामंडळाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन जणांची समिती नेमली होती. मात्र या समितीमधील एक महिला अधिका-याने नोकरीचाच राजीनामा दिल्याने या प्रकरणाची पुढील चौकशी होऊ शकली नाही. लवकरच या जागेवर अन्य अधिका-यांची नियुक्ती करून चौकशी केली जाईल, असे एसटीतील माहीतगारांनी सांगितले. चौकशीला जाणूबुजून विलंब केला जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
एसटी कार्यालयांतही लैंगिक अत्याचारमहामंडळाच्या कार्यालयात जेव्हा महिला अधिका-यांकडे 'अनैतिक सुखा'ची मागणी त्यांचाच एखादा वरिष्ठ अधिकारी करतो, तेव्हा एसटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लगेचच बदलतो. याबाबतची चर्चा कुठे तरी होणे निश्चितच गरजेचे आहे.
Read More » 'मीलन' पुलाला विलासरावांचे नाव द्या!
मीलन रेल्वे ओलांडणी पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशीच स्थानिक आमदार कृष्णा हेगडे यांनी या पुलाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. या पुलाचे भूमीपूजन व त्यानंतरच्या काही तांत्रिक अडचणीही विलासराव देशमुख यांनी दूर केल्या होत्या. त्यामुळे त्यांचे नाव पुलाला दिल्यास त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे सरोदे यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांकडून पुलाच्या नामकरणाच्या विषयाचे राजकारण केले जाऊ शकते. मात्र, सध्या तरी अधिकृतरित्या विलासराव देशमुख यांच्या नावाची मागणी केली जाते आहे. पुलावर जे. कुमार कंत्राटदाराचे नाव Read More » 'महाराष्ट्र कलानिधी'चे 'मिक्टा' पुरस्कारांना पाठबळ
मराठी चित्रपट व नाटयसृष्टीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणा-या 'मिक्टा' (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अॅंड थिएटर अवॉर्डस) पुरस्कार सोहळ्याला 'महाराष्ट्र कलानिधी'चे पाठबळ लाभले आहे. मुंबई – मराठी चित्रपट व नाटयसृष्टीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणा-या 'मिक्टा' (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अॅंड थिएटर अवॉर्डस) पुरस्कार सोहळ्याला 'महाराष्ट्र कलानिधी'चे पाठबळ लाभले असून, यंदा हा सोहळा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात स्वित्झर्लंडलड येथे रंगणार आहे. मराठी भाषा, संस्कृती, कला यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणे हे आपले कर्तव्यच असून त्यात मदत, उपकार अशी भावना नसल्याचे मत महाराष्ट्र कलानिधीचे प्रवर्तक व 'स्वाभिमान' संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी सोमवारी मिक्टा पुरस्कार सोहळयाच्या बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केले. मराठी भाषेतल्या, महाराष्ट्रातल्या कोणत्याही सांस्कृतिक कार्यासाठी सगळयांनी पुढे आले पाहिजे. याच भावनेतून आपण हे प्रायोजकत्व स्वीकारले असून त्याचा आनंद होत असल्याचे नितेश राणे या वेळी म्हणाले. यंदाच्या पुरस्कार सोहळयाला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देत त्यांनी या सोहळयाला शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर म्हैसकर फाऊंडेशनचे जयंत म्हैसकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, वीणा पाटील यांच्याबरोबर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते सुशांत शेलार व किरण शांताराम उपस्थित होते. यावेळी यंदाच्या 'मिक्टा' पुरस्कार सोहळयाच्या बोधचिन्हाचे अनावरण नितेश राणे व जयंत म्हैसकर यांच्या हस्ते करण्यात आले. 'मिफ्टा' पुरस्कारांचे यंदापासून 'मिक्टा' पुरस्कार असे नामकरण करण्यात आले आहे. 'मिक्टा' पुरस्कार सोहळयाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मिक्टाचे प्रमुख दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नितेश राणे यांचे आभार मानले. यंदा आमच्या बरोबर महाराष्ट्र कलानिधी व नितेश राणे हे सहभागी होत असल्याचा आनंद असून त्यांच्यामुळे यंदाच्या पुरस्कार सोहळयाला नवी झळाळी मिळेल, असे मत म्हैसकर फाउंडेशनचे जयंत म्हैसकर यांनी या वेळी व्यक्त केले. नितेश राणे यांच्याकडे या सोहळ्याला सहाय्य करण्याची कल्पना मांडल्यावर एका मोठया भावाप्रमाणे त्यांनी ताबडतोब होकार दिल्याबद्दल अभिनेता सुशांत शेलार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या पुरस्कार सोहळयातली पर्यटनाची जबाबदारी आम्ही चोखपणे पार पाडणार असून, या पुरस्कार सोहळयानिमित्त एक अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना या वेळी 'वीणा पाटील हॉस्पीटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड'च्या वीणा पाटील यांनी व्यक्त केली. अभिनेते महेश कोठारे, वैभव मांगले, उपेंद्र लिमये, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, विजय कदम, सुनिल बर्वे, उमेश कामत, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, क्रांती रेडकर, नेहा पेंडसे, प्रिया बापट यांच्यासह चित्रपट-नाटय़ सृष्टीतील मांदियाळी यावेळी आवर्जून उपस्थित होती.
Read More » 'वानखेडे'च्या प्रेस बॉक्सला शिवसेनाप्रमुखांचे नाव
मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील प्रेस बॉक्सला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुखांचे नाव वानखेडे स्टेडियममधील प्रेस बॉक्सला देण्याची मागणी क्रिकेट क्लबने केली होती. एमसीएच्या वार्षिक बैठकीत या प्रस्तावावर एमसीएच्या व्यवस्थापन समितीत हा प्रस्ताव मंजूर केला. ठाकरे कुटुंबीयांची परवानगी घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल,असा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार एमसीएने याबाबतचे पत्र ठाकरे कुटुंबीयांना दिले. यावर उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवत नाव देण्यास हरकत नाही, असे सांगितले आहे, अशी माहिती सहसचिव डॉ. पय्याडी शेट्टी यांनी दिली आहे. व्यवस्थापकीय समितीपुढे हा प्रस्ताव येण्यापूर्वी एमसीएच्या वतीने कांदिवलीत बांधण्यात येणाऱ्या स्टेडियमला किंवा ठाण्यात ५० एकर जमिनीवर उभ्या राहत असलेल्या क्रीडा संकुलाला बाळासाहेबांचे नाव देण्यासाठी असोसिएशन आग्रही होती. त्यामुळे वानखेडेतील प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचे नाव देण्यास असोसिएशनचा अप्रत्यक्ष विरोध होता. त्याचवेळी खा. संजय राऊत यांनी प्रेस बॉक्ससारख्या छोटय़ाशा जागेला शिवसेनाप्रमुखांचे नाव देऊ नये अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे व्यवस्थापन समिती या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास चालढकल करत होती. त्यामुळे एमसीएने ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. Read More » सिद्धिविनायकाला अतिप्रसिद्धीचा फटका
दरवर्षी अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येणा-या भाविकांची संख्या यंदा तुलनेत रोडावल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. क्वचित येणारा अंगारकीचा योग साधत दरवर्षी लाखो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगांमध्ये उभे राहतात. भाविकांची होणारी ही गर्दी लक्षात घेऊन सिद्धिविनायक न्यासने मंगळवारी मंदिर परिसरात मोठा मंडप उभारला होता. पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. भाविकांना सर्व सोयी-सुविधांची माहिती व्हावी, यासाठी न्यासने भरपूर प्रसिद्धीही केली होती. परंतु, यंदा भाविकांनी दर्शनासाठी रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहण्यापेक्षा घरीच राहणे पसंत केल्याचे दिसून आले. दरवर्षी अंगारकीला पोर्तुगीज चर्चपर्यंत जाणारी दर्शनाची रांग यंदा दुपारनंतर अगदीच कमी झाल्याचे दिसून आले. सायंकाळी तर मंदिर परिसरातील मंडप अध्र्याहून अधिक रिकामाच होता. 'दरवर्षी अंगारकीला मी येथे येतो, त्यामुळे अंगारकीला किती गर्दी असते ते मला माहीत आहे. पण यंदा मात्र तेवढी झुंबड नाही,' असे एका भाविकाने सांगितले. भाविकांची गर्दी कमी झाल्याचा फटका फुले, हार आदी विक्रेत्यांनाही बसला आहे. एरवी अंगारकीला चांगलाच धंदा होतो, पण यंदा नेहमीसारखी गर्दी न झाल्याने विक्री रोडावल्याचे एका फुले विकणा-या महिलेने सांगितले. Read More » बालकाला उपचाराकरता पाच तास रखडवले
महापालिका किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये उपचाराकरता सर्वसामान्य रुग्णांना नेहमीच ताटकळत रहावे लागते. मुंबई - महापालिका किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये उपचाराकरता सर्वसामान्य रुग्णांना नेहमीच ताटकळत रहावे लागते. मात्र, 'ब्लू बेबी सिंड्रोम' हा आजार असलेल्या दीड महिन्याच्या बालकालाही तब्बल पाच तास उपचाराकरता रखडावे लागल्याची दुर्देवी घटना मंगळवारी परळ येथील केईएम रुग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून त्या बाळाची योग्य ती काळजी घेऊ, असे आश्वासन रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संध्या कामथ यांनी दिले. केईएम रुग्णालयात काही दिवसांपूर्वी बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. त्यामुळे महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हार्ट-लंग मशिन खरेदी करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाला शहाणपण सूचलेले नाही. रत्नागिरी येथील रहिवासी असलेला सार्थ नांदगावकर हा 'ब्लू बेबी सिंड्रोम' या आजाराने त्रस्त आहे. त्याच्या हृदयाला छिद्र असल्याने अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्याला अधिक तपासणीसाठी प्रथम अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले. सार्थवर तीन शस्त्रक्रिया कराव्या लागणार असून, त्यासाठी अडीच ते पावणेतीन लाख रुपये खर्च येईल, असे तेथील डॉक्टरांनी नांदगावकर कुटुंबीयांना सांगितले. मात्र, हा खर्च परवडणारा नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता केईएम रुग्णालयात आणले. या वेळी केसपेपर काढल्यानंतर काही थातुरमातुर उत्तरे देऊन त्यांना दीड तास थांबवण्यात आले. 'ब्लू बेबी सिंड्रोम' आजार असलेल्या बालकांना खूप वेळ उपचाराकरता ताटकळत ठेवणे धोक्याचे असते. त्यामुळे सार्थच्या वडिलांनी अखेर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संध्या कामथ यांच्या कार्यालयात धाव घेतली. अखेर तेथील उपस्थित डॉक्टरांनी संबंधित डॉक्टरांना फोन करून सार्थची तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतरही डॉक्टरांनी काही वेळ सार्थची तपासणी केली नसल्याचा आरोप नांदगावकर कुटुंबीयांनी केला आहे. अखेर डॉक्टरांनी दोन-सव्वाच्या सुमारास त्याला तपासून हृदयरोग विभागातील डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी तपासून सार्थवर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असे कुटुंबीयांना सांगितले. दरम्यान, घडल्या प्रकाराची चौकशी करून त्या बाळाची योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. कामथ यांनी दिले. Read More » सारिका बंगाल खुनाचा तपास सीआयडीकडे
खडपोली धनरवाडी शाळेतील शिक्षिका सारिका बंगाल यांचा दोन वर्षापूर्वी खून झाला होता. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शिक्षिका बंगाल या शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना वाटेतच त्यांचा खून केला होता. या घटनेने चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली होती. शिक्षिकेच्या मारेक-यांना अटक करावी, अशा मागणीसाठी कुणबी सेनेने शिरगाव पोलिस ठाणे व चिपळूण पंचायत समितीवर मोर्चाही काढला होता. मात्र, या प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. शिरगावचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अर्जुन राणे यांनी या प्रकरणाचा तपास लावण्यात यश येईल, असेही सांगितले होते. तसेच तत्कालिन पोलिस अधीक्षक प्रदीप रासकर यांनी या प्रकरणी संबंधितांना लवकरच अटक होईल, असे सांगितले होते. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. यामुळे या खून प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. सोमवारी सकाळी पोलिस अधीक्षक पांडय़े यांनी चिपळूण पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी पत्रकारांनी या खून प्रकरणाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले असल्याचे अधीक्षक यांनी सांगितले.
Read More » पेन्शनधारकांची होणार पडताळणी
राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणा-या विविध पेन्शन योजनांची पडताळणी सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे. महसूल विभागामार्फत निराधार कुटुंबातील विविध प्रकारच्या पेन्शन योजना राबविते. यात जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ६,७७१, श्रावणबाळ पेन्शन योजनेचे ७,७३९, वृद्धापकाळ योजनेत ६,७०८, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेत ६३२ व इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजनेत १२३ लाभार्थी मिळून २१,९७३ लाभार्थ्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो. या लाभार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा व निराधार व्याख्येत बसणारे लाभार्थी गृहित धरुनच त्यांना हे लाभ देण्यात येतात. सिंधुदुर्गातील २१,९७३ लाभार्थ्यांवर दरवर्षी १५ कोटी रुपयांचा निधी या पेन्शन योजनेवर खर्च होतो. राज्यात असे बोगस लाभार्थी असण्याची शक्यता असल्याने ही पडताळणी सरकारने हाती घेतली आहे. त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांनाच हा लाभ देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे यातील अनेक बोगस लाभार्थी या पडताळणीत समोर येणार असून त्यांची पेन्शन योजना बंद केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक तहसीलदारांकडून जिल्हाधिका-यांनी हा अहवाल मागविला आहे. Read More » कोकण रेल्वेत अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट
ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. चिपळूण - ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष करून पनवेल ते मडगाव दरम्यान थेट रेल्वे गाडीमध्ये शिरून हे अनधिकृत विक्रेते व्यवसाय करीत आहेत. मात्र, कोकण रेल्वे पोलिस मूग गिळून गप्प आहेत. या ठिकाणी फळ व भाजी विक्रेते, चहा, वडापाव व अन्य पदार्थ आणि खेळणी विकणारेसुद्धा अनधिकृतपणे रेल्वेतून धंदा करीत आहेत. रेल्वे प्रशासनाने विक्रेत्यांसाठी पासेस दिले आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर असणा-या कॅन्टीन मालकांना मर्यादित विक्रेते ठेवण्याचे बंधन आहे. व त्यांनाच पासेस देण्यात आले आहेत. मात्र, अनेक कॅन्टीनधारक मर्यादेपेक्षा अधिक विक्रेते ठेवत आहेत. याशिवाय अनेक विक्रेते उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन रेल्वेमध्ये शिरून विक्री करीत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने याची दखलच घेतलेली नाही. रेल्वे पोलिसांनी याकडे डोळेझाक केली असून, प्रवाशांना गर्दीमध्ये या फेरीवाल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेमध्ये विकण्यात येणा-या बाटलीबंद पाण्याच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त होत आहे. काही विक्रेते नदीचे पाणी भरून बाटलीला स्टीकर लावून पाणी विकतात, अशा तक्रारीही येत आहेत. मात्र, याकडे रेल्वे पोलिस कानाडोळा करीत आहेत. गर्दीच्या हंगामात प्रवाशांना धक्का देत प्रसंगी तुडवत हे विक्रेते ट्रेनमध्ये फिरतात. अनेकवेळा गुंगीचे पदार्थ देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार होत आहेत. गर्दीतून प्रवासी बाहेर फेकले जाऊन अपघातही होत आहेत. रेल्वे प्रशासनाने ज्या विक्रेत्यांना फक्त गाडय़ांच्या खिडक्यांमधून आपली सेवा देण्याचे बंधन आहे. मात्र, या नियमाचा पायमल्ली हे विक्रेते रेल्वेमध्ये मोठी गर्दी करीत आहेत. एकामागून एक येणारे चहा, कॉफी, वडापाव, भजी, आम्लेट, सॅण्डविच, फळे, पाणी बॉटल्स, थंड पेय तसेच बिर्याणी, उपमा, शिरा असे विक्रेते रेल्वेगाडय़ांमध्ये गर्दी करीत आहेत. विक्रेते मोठय़ाने आरडाओरड करत थेट आरक्षण डब्यातही प्रवेश करीत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, याबाबत रेल्वेचे टीसी, संबंधित अधिकारी आणि पोलिससुद्धा गप्प आहेत, त्यामुळे अशा विक्रेत्यांना आवर घालण्याची मागणी नागरिक करत आहेत. Read More » पर्यटकांची गुहागरला सर्वाधिक पसंती
यंदाच्या कडक उन्हाळ्याचा परिणाम कोकणातील प्रेक्षणीय ठिकाणे व पर्यटन स्थळांवर झाला असल्याचे सांगितले जात असले तरी गुहागरला मात्र, पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. गुहागर हे निसर्गरम्य, हिरवेगार, शांत आणि पर्यटकांना आकर्षित करणारा सात किलोमीटर लांबीचा पांढराशुभ्र समुद्रकिनारा आहे. याचबरोबर येथे धार्मिकतेचे दर्शन घडविणारी श्री व्याडेश्वर, श्री दुर्गादेवी व अन्य काही प्रसिध्द व नावारूपाला आलेली मंदिरे आहेत. त्यामुळे सर्वागसुंदर निसर्गाबरोबरच धार्मिकतेची जोड एकाच ठिकाणी देणारे पर्यटन स्थळ म्हणून गुहागर सध्या प्रसिद्धीस येत आहे. येथे नव्यांने सुरू झालेली 'स्पीड बोट सेवा' ही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. शहरातील पर्यटन व धार्मिकतेबरोबरच सुमारे ३० किलोमीटरच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय ठिकाणे व स्थळे उदयास आलेली आहेत. त्यामध्ये गुहागरपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेले असगोली हे गाव तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले असून राज्यातील दुसरे लवासासारखे अद्भूत ठिकाण म्हणून या गावाकडे पाहिले जात आहे. या गावाला ऐतिहासिक जोड असून पळकुठे बाजीरावाचा वाडाही याच भागात असल्याच्या खुणा आहेत. गुहागरपासून १५ किलोमीटर अंतरावर अंजनवेल हे ठिकाण असून येथे बहुचर्चित एन्रॉन कंपनीचा दाभोळ वीज प्रकल्प आज 'रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर प्रकल्प' या नावांने वीजनिर्मिती करीत आहे. याच ठिकाणी आता देशातील सर्वात मोठे गॅस टर्मिनल उभे राहीले असून बाहेरच्या देशातून समुद्रामार्गे जहाजामधून आणलेला लिक्वीड गॅसचे वायू गॅसमध्ये रूपांतर करण्याची यंत्रणा याठिकाणी उभारण्यात आलेली आहे. गुहागरपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या वेलदूर येथे मच्छिमारी जेटी आहे. येथून दाभोळ खाडीचे सुंदर दर्शन होते. गुहागरपासून १८ किलोमीटर अंतरावर धोपावे फेरीबोट हे सर्वाचे सध्या आकर्षणाचा विषय झाला आहे. गुहागरपासून मोडकाघर येथील धरणामध्ये बोटींग सेवेचा पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येतो. संपूर्ण तालुका हा समुद्र व खाड्यांनी विणला असून जवळजवळ १६ गावे ही किनाऱ्यावर वसली असून ही सर्व गावे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनच हळूहळू नावारूपास येताना दिसत आहेत. यामुळे सध्या गुहागरमध्ये देश – विदेशातूनही हजारो पर्यटक आपल्या खासगी गाडय़ा घेऊन मुंबई व पुणे येथून गोव्याकडे जाण्याऐवजी चिपळूण, रत्नागिरी व दापोली या तिन्ही मार्गानी गुहागरमध्ये येताना दिसत आहेत. त्यामुळे यावर्षी गुहागरमध्ये वाढलेली पर्यटकांची वाढती गर्दी पाहता ती पर्यटकांनी दिलेली सर्वाधिक पसंतीची दाद असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरीही हाउसफुल्ल गोव्याकडे निघालेले मुंबई, पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर या भागातील पर्यटक तसेच विदेशी पर्यटकही सध्या रत्नागिरीमध्येही दाखल झाले आहेत. तसेच हापूस आंबा खरेदी करण्याबरोबरच हापूस आंब्यापासून बनविलेली उत्पादने खरेदीवर पर्यटकांनी भर दिलेला दिसून येतो. मेअखेरीस आंबा स्थानिक बाजारपेठेमध्ये शंभर रुपये डझनापर्यंत मिळत असल्याने येथील हापूस आंबा खरेदी करताना पर्यटक दिसत आहेत. शिवाय येथील फणस, काजू, कोकम व जांभूळ, करवंदे बाजारात उपलब्ध असल्याने बाजारपेठेतील विक्रेते मोठय़ा चतुराईने गि-हाईक आकर्षित करण्याकडे अधिक भर देतात. उन्हाळ्यातही सभोवती पसरलेली हिरवी झाडी, दाटीदाटीने बांधलेली घरे, उंच नारळी पोफळीच्या बागा असे सौंदर्य पहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. पर्यटकांसाठी जेवणाबरोबरच राहण्याच्या उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरीतील हॉटेलमध्ये उत्तम व्यवस्थापन करण्यात आले आहे. रस्त्यावरही नेहमी दिसणा-या वाहनांपेक्षा परदेशी बनावटीची वाहने दिसू लागली आहेत. बीएमडब्ल्यू, मर्सिडिज, पजेरो, फॉच्र्युनर, स्कोडा, रेनॉल्ट आदी कंपनीच्या पर्यटक घेऊन येत असलेल्या गाडय़ांनी रत्नागिरीतील रस्ते गजबजून गेले आहेत. या गाडय़ांचे मोठय़ा माणसांना कुतुहल तर लहान मुलांना आकर्षण वाटत आहे. Read More » श्रीनिवासन यांना घरचा अहेर
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा खुलासा होईपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा खुलासा होईपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगत श्रीनिवासन यांना घरचा आहेर दिला आहे. बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या मुद्दयावर आवाज उठवल्यानंतर राजीव शुक्ला आणि अरुण जेटली यांनीही श्रीनिवासन यांच्यावरील राजीनाम्यासाठी दबाव टाकला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा होईपर्यंत श्रीनिवासन यांनी 'दूरच' रहावे. मात्र यासंदर्भातला निर्णय श्रीनिवासन यांचा आहे, असे शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शुक्रा आणि अरुण जेटली यांची बुधवारी बैठक झाली. दरम्यान, राजीनाम्यासाठी आपल्यावर बीसीसीआयच्या कोणत्याही सदस्याने दबाव टाकलेला नाही. मात्र मिडिया माझ्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप श्रीनिवासन यांनी रविवारी केला होता. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपनला या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष राजीनामा देणार ?बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांचे नाव आल्याने श्रीनिवासन अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. Read More » कापूस बियाणांची गुणवत्ता तपासण्याची गरज
विदर्भातील बहुतांश कापूस उत्पादन कोरडवाहू शेतीत घेतले जाते.या कोरडवाहू जमिनीत कापसाचे कोणते वाण योग्य आहे, याचे संशोधन झालेच नाही. विदर्भ जनसंग्रामचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी आयोजित केलेल्या विदर्भ कापूस परिषदेत अध्यक्षस्थानावरून राधाकृष्ण विखे-पाटील बोलत होते. या कापूस परिषदेचे उद्घाटन ऊर्जा, अर्थ व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते झाले. बाजारात शेकडो कंपन्यांचे बीटी वाण आले आहे. या बीटी कापसाच्या वाणाचा पेरा करणा-यांना मोठ्या प्रमाणात खत, कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. ही महागडी द्रव्ये खरेदी करण्याची विदर्भातील शेतक-यांची ऐपत नाही, असे सांगतानाच विखे-पाटील म्हणाले, आता बीटी बियाण्यांचे दर्जेदार वाण बाजारात यावे. त्याचा दर्जा, संशोधन, त्याची गुणवत्ता तपासणी केंद्रीय संशोधन केंद्राकडून करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. केंद्रीय संशोधन केंद्राचे गुणवत्ता प्रमाणपत्र ज्या कंपन्यांना मिळतील, तेच बीटी कापसाचे वाण बाजारपेठेत उपलब्ध होईल. जिरायती शेती करणा-या शेतक-यांना, कापूस उत्पादकांना अनुदान मिळावे, योग्य भाव मिळावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कापसावर प्रक्रिया करणारे कारखाने, सूतगिरण्या या वरुड व मोर्शी तालुक्यांत उभ्या कराव्या. सहकार तत्त्वावर हा यशस्वी प्रयोग आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी उभा करावा, सूतगिरणीला सरकार सर्वतोपरी मदत करेल. मूल्यवर्धित शेतीकडे जाण्याकरिता शेतक-यांनी दृष्टिकोन ठेवावा. मूल्यवर्धित शेतीकडे गेल्याशिवाय पिकांना भाव मिळणार नाही, असेही विखे -पाटील म्हणाले. Read More » 'झालाच पाहिजे' एक जूनला पुण्यात
संयुक्त महाराष्ट्रच्या मागणीला ५० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या पार्श्वभूमीवर येथील जनतेच्या भावनांना वाचा फोडणारे 'झालाच पाहिजे' हे नाटक महाराष्ट्र कलानिधी रंगभूमीवर घेऊन येत आहे. पुणे – संयुक्त महाराष्ट्रच्या मागणीला ५० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या पार्श्वभूमीवर येथील जनतेच्या भावनांना वाचा फोडणारे 'झालाच पाहिजे' हे नाटक महाराष्ट्र कलानिधी रंगभूमीवर घेऊन येत आहे. या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग एक जून रोजी होणार असल्याची माहिती स्वाभिमान संघटनेते संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. निर्माते अनंत पणशीकर, अभिनेते राहुल सोलापुरकर या वेळी उपस्थित होते. राणे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे लोक आंदोलन होते. या विषयी आजच्या पिढीला फारशी माहिती नाही, या प्रश्नाची माहिती, गांभीर्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 'झालाच पाहिजे'ची निर्मिती केली आहे. बेळगावात काही घडले तर त्याचे पडसाद कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीच्या पलीकडे उर्वरित महाराष्ट्राला कधीच समजत नाहीत. या प्रश्नावर जनजागृती करण्यात येऊन जनमत घडण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बेळगाव प्रश्नाविषयी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मांडलेली भूमिका वास्तव आहे, असे काही क्षण गृहीत धरले तरी, त्यांचे मत म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, अचार्य अत्रे, एस. एम. जोशी, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि १०५ हुतात्म्यांचा आपण अवमान करणार का? असा प्रश्न उपस्थित करत राणे म्हणाले, लोकांच्या इच्छेवरच राजकारणी आपले दुकान मांडतात, जनतेचा रेटा असेल आणि राजकीय हीत असेल तर राजकारणी बेळगाव प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील. या नाटकाचा पहिला प्रयोग महाराष्ट्र दिनी करण्यात आला असून याचे किमान ५० प्रयोग एक ऑगस्टपर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. एक ऑगस्टला हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी शपथ घेण्यात येणार आहे. पारंपरिक गण, गवळण, वगनाटय़ आणि त्याच्या जोडीला लोकांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात येणार आहेत. 'झालाच पाहिजे'मुळे प्रश्न सुटला नाही तरी किमान ते लोक काय यातना भोगतात याची जाणीव महाराष्ट्रातील नेत्यांना, जनतेला होईल, असा प्रयत्न करण्यात आल्याचे पणशीकर यांनी स्पष्ट केले.
Read More » कल्याणकरांचा रुपया वाचणार
प्रवासी घटल्याने केडीएमटीने केलेली प्रवासी भाडेवाढ रुपयाने कमी करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. कल्याण – प्रवासी घटल्याने केडीएमटीने केलेली प्रवासी भाडेवाढ रुपयाने कमी करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी बुधवार २९ मे रोजी परिवहन समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रवासी भाडे रुपयाने कमी होणार आहे. २० मार्चपासून परिवहन उपक्रमाने भाडेवाढ लागू केली आहे. त्यात टप्पा क्रमांक एकमध्ये शून्य ते दोन किमी अंतरासाठी पाच रुपयाचे भाडे सात रुपये तर टप्पा क्रमांक दोन या दोन ते चार किमी अंतरासाठी सहा रुपये भाडे नऊ रुपये तर टप्पा क्र. तीन या चार ते सहा किमी अंतरासाठी सात रुपये ते ११ रुपये भाडेवाढ करण्यात आली होती. ही भाडेवाढ झाल्यानंतर तीन टप्प्यातील प्रवाशांत लक्षणीय घट झाली आहे. टप्पा क्र. एकमध्ये ३२ टक्के, टप्पा क्र. दोन मध्ये २३ टक्के तर टप्पा क्र. तीन मध्ये ३२ टक्के प्रवासी घट झाली आहे. तसेच वाहकांना ११ रुपये तिकिट वितरित करताना प्रवाशांकडून एक रुपया सुट्टा मिळत नाही. नऊ रुपयांचे तिकिट देताना प्रत्येक प्रवाशास रुपयाची मोड द्यावी लागत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहक यांच्यात सुट्टया पैशांवरून नेहमीच वाद होत आहेत. त्यामुळे टप्पा क्र.एक ते तीन ची भाडेवाढ रुपयाने कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वाहन व चालकाची कंत्राटी पद्धतीने भरती Read More » ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी लवकरच
मुंबई विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांसाठी पहिल्यांदाच होणा-या ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबई – मुंबई विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांसाठी पहिल्यांदाच होणा-या ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर होणार आहे. तर सीबीएसई, आयसीएसईच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिका-याकडून देण्यात आली. मुंबई विद्यापीठात होणा-या ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेतून बी. ए., बी. कॉम., बी. एम. एम., बी. एस. डब्ल्यू., बी. एस्सी आयटी, बी. एस्सी (नॉटिकल आणि होम सायन्स मेरिटाइम हॉस्पिटॅलिटी, फोरेन्सिक सायन्स आदी), बी. कॉम. (बी.अँड आय.), बी. कॉम. (ए. अँड एफ.), बी. कॉम. (एफ. अँड एम.) आणि बी.एम.एस. आदी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि त्यांसदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ही प्रवेश पूर्व नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या सर्व महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांना आणि प्राचार्यानाही खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया विद्यार्थ्यांना सहज लक्षात यावी, यासाठी विद्यापीठाने सर्व माहिती विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in/ संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. Read More » आणखीन दोन बूकींना अटक
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बुधवारी आणखीन दोन बूकींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्याच्या दुस-या आठवड्यात झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंज बंगळूरु यांच्यातील सामन्यापूर्वी नगर आणि विकीने काही बूकींची चंडेलियाशी भेट घालून दिली होती. या बूकींनी सामना कोण जिंकणार असे चंडेलियाला विचारताच कोलकाता जिंकणार असे उत्तर चंडेलियाने दिले होते आणि सामना कोलकातानेच जिंकला होता. अजित चंडेलियाच्या या उत्तराने सामना फिक्स झाल्याचे संकेत मिळत होते. मात्र याबद्दल अद्याप काही बोलणे उचित ठरणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. या सामन्यासाठी चंडेलियाने ३० लाख रुपयांचा सट्टा लावला होता. त्यापैकी दोन लाख रुपये चंडेलियाला बूकींनी सामन्यापूर्वीच दिले होते. मात्र सामन्यात कमी धावसंख्या उभारल्याचे सांगत बूकींनी उर्वरित रक्कम चंडेलियाला देण्यास नकार दिला. दरम्यान, या दोन बूकींच्या अटकेनंतर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात देशाच्या विविध भागातून आतापर्यंत २४ बूकींना अटक करण्यात आली आहे. Read More » राजीनामा न देण्यावर श्रीनिवासन ठाम
बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन आपल्या पदाचा राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. नवी दिल्ली – बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन आपल्या पदाचा राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीनिवासन यांचा जावइ गुरुनाथ मय्यपन अटकेत आहे. त्यामुळे स्पॉट फिक्सिंगच्या कचाट्यात अडकेलेल्या श्रीनिवासन यांनी घटनेचा खुलासा होईपर्यंत अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी क्रीडा मंत्रालयाने केली होती. त्यावर काहीही झाले तरी आपण राजीनामा देणार नाही अशी ठोस भूमिका श्रीनिवासन यांनी घेतली आहे. या प्रकरणी शिक्षा करण्याचा अधिकार फक्त बीसीसीआयलाच आहे, असे त्यांनी सांगितले. सविस्तर वृत्त थो़ड्याच वेळात… Read More » सर्वपक्षीय बैठकीवर काँग्रेसचा बहिष्कार
छत्तीसगड काँग्रेसने मुख्यमंत्री रमणसिंह यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. रायपूर – छत्तीसगड काँग्रेसने मुख्यमंत्री रमणसिंह यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. राज्य सरकार नक्षलवाद रोखण्यासाठी काहीही करत नसून, सरकार काँग्रेसच्या यात्रेला संरक्षण देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे ही बैठक आयोजित करण्याला काहीही अर्थ नाही असे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते रविंद्र चौबे यांनी पत्रकारांना सांगितले. शनिवारी छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह २७ जणांचा मृत्यू झाला होता. बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात नव्या मोहिम उघडण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वपक्षांना विश्वासात घेण्यासाठी रमणसिंह यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. नक्षलवाद्यांविरोधात नव्याने मोहिम उघडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून रणनिती तयार करत आहे. Read More » उज्ज्वल निकम यांच्यावर चित्रपट
सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांच्या जीवनपटावर आधारित असलेला १५० मिनिटांचा चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. 'आदेश-कायद्याची ताकद' असं या चित्रपटाचे नाव असून मराठीमध्ये बनवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे हिंदी तसेच तेलगू भाषेतही डबिंग केले जाणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीत सुरु आहे. अभिनेता सुवधन आंग्रे हा या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक असून तोच या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीसह निकम यांनी यशस्वीपणे हाताळलेल्या चार घटनांच्या सुनावणींचा या चित्रपटांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यात कसाब,खैरलांजी,खोतेवाडी सामूहिक बलात्कारांच्या घटनांचा समावेश आहे. त्याशिवाय १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या घटनेत सहभागी असलेल्या अभिनेता संजय दत्त आणि अबू सालेम यांच्या सुनावणींच्या घटनांचाही समावेश करण्यात आसा आहे. निकम हे गेल्या १४ वर्षांपासून वकिली क्षेत्रात सरकारी वकिल म्हणून काम करत आहेत. कोणत्याही कायद्यापेक्षा माणूस मोठा नाही आणि गुन्हेगाराला कायदा योग्य शिक्षा करतोच असा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न असल्याचे सुवधन आंग्रे यांनी सांगितले. चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबाद, सातारा, पुण्यातील पौड गावात झाले आहे. चित्रपट बनवण्यापूर्वी अंदाजे १२ ते १८ महिने आपण निकमांच्या वैयक्तीक तसेच सामाजिक जीवनातील गोष्टींचा बारकाईने अभ्यास केल्याचे आंग्रे यांनी सांगितले. चित्रपटाचे चित्रिकरण गेल्या सप्टेंबर महिन्यात सुरु करण्यात आले असून आतापर्यंत ८० टक्के चित्रिकरण पूर्ण झाले आहे. आंग्रे यांनी यापूर्वी 'तारे जमीन पर', 'मंगल पांडे-द राईझींग', 'तथास्तू' या चित्रपटांना त्याशिवाय २५ मराठी नाटकांच्या दिग्दर्शनाची धूरा यशस्वीपणे सांभाळली आहे. Read More » चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज
आगामी आसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यासाठी भारतीय संघ बुधवारी इंग्लंडला रवाना झाला.
Read More » 'राजीनामा देणारचं नाही'
राजीनाम्यासाठी क्रीडा मंत्रालयाने दवाब टाकूनही आपण राजीनामा देणार नाही ही आपली भूमिका मिडियासमोर मांडताना बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन. Read More » हायटेक शिक्षणाचा वसा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बुधवारी वाराणसीमध्ये विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटले. आपल्या हातात लॅपटॉप मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना विद्यार्थी… Read More » मय्यपनला ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी
चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मय्यपनच्या पोलिस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मय्यपनच्या पोलिस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मय्यपन आणि विंदू दारासिंहची आणखी चौकशी करायची असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मुंबई पोलिसांनी केलेली विनंती न्यायालयाने मान्य केली. आयपीएलच्या सामन्यांवर बेटिंग खेळल्या प्रकरणी या दोघांना अटक झाली आहे. या दोघांबरोबर चेन्नईच्या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूचा मालक विक्रम अग्रवालही बेटिंगमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, त्यालाही मुंबई पोलिसांनी ३१ मे पर्यंत हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. मुंबई पोलिसांच्या रिमांड अर्जात मय्यपन आणि विंदूची समोरासमोर बसवून चौकशी केली असून, त्यांच्या चौकशीतून मयप्पन आयपीएल सामन्यांवर बेटिंग खेळत असल्याचे उघड झाल्याचा म्हटले आहे. मय्यपनवर संघाची अंर्तगत माहिती विंदूला पुरवल्याचा आरोप आहे. मय्यपन संघाची रणनिती, खेळाडूंची माहिती विंदूला द्यायचा, विंदू ही माहिती बुकींपर्यंत पोहचवायचा. विंदू आणि मय्यपनचे फोनवरील संभाषण कोड भाषामध्ये चालायचे. या कोडभाषेची उकल करायची आहे असे पोलिसांनी रिमांड अर्जात म्हटले आहे. मय्यपन विंदू आणि बुकींशी संर्पक साधण्यासाठी कमलनाथ या कर्मचा-याच्या नावावर असलेला फोन वापरत होता. याचा तपास होणे बाकी आहे असे रिमांड अर्जात म्हटले आहे. बचाव पक्षाचे वकिल हर्षद पोंडा यांचा युक्तीवाद न्यायालयाने फेटाळून लावला. तपासात प्रगती झाली आहे. आरोपींची अजून चौकशी आवश्यक आहे जेणेकरुन तपास यंत्रणेला आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यास पुरेशी संधी मिळेल असे न्यायालयाने सांगितले. Read More » जोर लगा के….
श्रीनगरमध्ये आयोजित केलेल्या “काश्मीर फेस्टिव्हल २०१३’च्या विविध खेळांमध्ये सहभागी झालेले युवक.. Read More » मी चौकशीला तयार आहे – रौफ
पाकिस्तानी पंच असद रौफ यांनी आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. लाहोर – पाकिस्तानी पंच असद रौफ यांनी आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामंक मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून माझी चौकशी होणार असेल, तर मी आनंदाने चौकशीस सामोरा जाईन, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन असे रौफ यांनी म्हटले आहे. पैसा, भेटवस्तू, स्पॉट-मॅचफिक्सिंग याला माझ्या आयुष्यात स्थान नाही. हे माझ्या आयुष्यातील लक्ष्य नाही असे रौफ यांनी सांगितले. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात रौफ यांचे नाव आल्याने आयसीसीने इंग्लंडमध्ये होणा-या चॅंम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील एलिट पंचाच्या यादीतून त्यांना वगळले. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात रौफ यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार असल्याने त्यांना वगळण्यात येत असल्याचे आयसीसीने म्हटले होते. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात संशयात फे-यात आलेले रौफ पहिले पंच आहेत. रौफ यांना वादांची पार्श्वभूमी आहे. गेल्यावर्षी लिना कपूर या मुंबई स्थित मॉडेलने रौफ यांच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने रौफ यांच्या वादापासून हात झटकले आहेत. आयपीएलचे सामने भारतात झाले आणि रौफ आयसीसीचे पंच आहेत असे पीसीबीने म्हटले आहे. Read More » "जापान दौरा"
टोकियोमध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेच्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अँबी शिंझो. Read More » "फिक्सिंगवर खुलासा"
आयपीएलमध्ये फिक्सिंगचाआरोप झालेले पाकिस्तानी पंच असद रौफ बुधवारी लाहोरमध्ये पत्रकारपरिषदेला संबोधित करण्यासाठी आले.
Read More » स्पॉट फिक्सिंगला श्रीनिवासन जबाबदार – शरद पवार
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणावर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी प्रगट केली. नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटची प्रतिमा मलिन करणा-या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणावर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी प्रगट केली. सध्या जी परिस्थिती आहे त्याने मी अत्यंत दु:खी आणि निराश झालो आहे. मी जर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असतो, तर असे घडले नसते असे पवार यांनी सांगितले. त्यांनी संपूर्ण स्पॉट फिक्सिंग प्रकरणासाठी एन.श्रीनिवासन यांना जबाबदार धरले. मात्र त्यांनी श्रीनिवासन यांचा थेट राजीनामा मागितला नाही. पवारांनी आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची गृहमंत्रालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. Read More » "आगीशी सामना"
मुंबईतील जे.जे.उड्डाण पुलावर गाडीला लागलेली आग विझवण्यासाठी पाणी फवारणारे अग्निशमदलाचे जवान. Read More » प्रहार बातम्या – २९ मे २०१३
सीएसटी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत
माटूंगा स्थानकात एक्स्प्रेस गाडीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने सीएसटी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई- मध्य रेल्वेच्या माटूंगा स्थानकात नागरकोल एक्स्प्रेस गाडीच्या इंजिन मध्ये अचानक बिघाड झाल्याने गाडी माटूंगा स्थानकात उभी राहीली. बुधवारी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली. सुमारे अर्ध्या तासानंतर दादर स्थानकातून इंजिन आणून नागरकोल एक्स्प्रेसला सीएसटीच्या दिशेने रवाना करण्यात आले. तोपर्यंत या गाडी मागे सीएसटीकडे येणा-या दोन एक्स्प्रेस आणि एक लोकलगाडी उभी करून ठेवण्यात आली होती. तर या तीन गाडय़ांच्या मागून येणा-या गाडय़ांना सीएसटीकडे येणा-या धीम्या मार्गावर वळवण्यात आले. मात्र या गडबडीत सीएसटी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. Read More » चँपियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ रवाना
इंग्लंडमध्ये होणा-या चँपियन्स ट्रॉफीसाठी महेंद्रसिंग ढोणीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय भारतीय क्रिकेट संघ बुधवारी दुबईमार्गे लंडनला रवाना झाला. मुंबई- इंग्लंडमध्ये होणा-या चँपियन्स ट्रॉफीसाठी महेंद्रसिंग ढोणीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय भारतीय क्रिकेट संघ बुधवारी दुबईमार्गे लंडनला रवाना झाला. भारतीय संघ गुरुवारी लंडनमध्ये पोहोचेल. चँपियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आयपीएल स्पॉटफिक्सिंगप्रकरणी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे कर्णधार ढोणीने टाळले. गुरुवारी लंडनमध्ये पोहोचल्यानंतर त्याला ब्रिटनसह आंतरराष्ट्रीय मीडियाशी संवाद साधायचा आहे. त्यावेळी ढोणीचा पवित्रा काय असेल, याची उत्सुकता आहे. आयसीसीच्या नव्या वनडे नियमांचे अनुकरण करण्याचे मोठे आव्हान असल्याचे कर्णधार ढोणीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी म्हटले आहे. तीस यार्डाबाहेर चारहून अधिक क्षेत्ररक्षक न ठेवण्याचा नवा नियम फिरकी गोलंदाजांसाठी योग्य नसल्याचे त्याचे मत आहे. सहा जूनला कार्डिफमध्ये होणा-या चँपियन्स ट्रॉफीच्या सलामीला भारत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. त्यापूर्वी एक आणि चार जूनला भारत दोन सराव सामने खेळेल. भारताचा संघ : महेंद्रसिंग ढोणी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मुरली विजय, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इरफान पठाण, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अमित मिश्रा, आर. विनय कुमार. प्रशिक्षक : डंकन फ्लेचर. मॅनेजर : रणजीब बिस्वाल. अशी रंगेल चँपियन्स ट्रॉफी २०१३ Read More » सेन्सेक्समधील तेजीला ब्रेक
गेल्या तीन सत्रांमध्ये तेजीवर स्वार झालेल्या सेन्सेक्समध्ये बुधवारी १३ अंकाची घट झाली. आयटी, धातू आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करत गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने बाजारातील तेजीला ब्रेक लागला.
मुंबई - गेल्या तीन सत्रांमध्ये तेजीवर स्वार झालेल्या सेन्सेक्समध्ये बुधवारी १३ अंकाची घट झाली. आयटी, धातू आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करत गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने बाजारातील तेजीला ब्रेक लागला. यामुळे सेन्सेक्स २०,१४७.६४ अंकावर बंद झाला. तर निफ्टीतही ७ अंकाची किरकोळ घट झाली आणि तो ६,१०४.३० अंकावर बंद झाला. शुक्रवारी चौथ्या तिमाहीतील विकास दराची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून सावध पवित्रा घेतला जात असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. दरम्यान चौथ्या तिमाहीत चांगला नफा मिळवलेल्या सन फार्माच्या शेअरची गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली. ज्यामुळे कंपनीचा शेअर ७ टक्क्यांनी वधारला. तर गेल्या तीन सत्रांमध्ये वधारलेल्या शेअरची विक्री करत नफा वसुलीवर काही गुंतवणूकदारांनी भर दिला. सेन्सेक्स १७ कंपन्यांचे शेअर घसरणीसह बंद झाले. ज्यामध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी , एसबीआय, टीसीएस, टाटा स्टील, जिंदाल स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती यांच्या शेअरच्या किमती घसरल्या. तर रिलायन्स, टाटा मोटर्स यांच्यामध्ये वाढ झाली.गृह निर्माण क्षेत्रातील एचडीआयलाच्या चौथ्या तिमाहीत तोटा झाल्यामुळे कंपनीच्या शेअरची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. यामुळे एचडीआयएलचा शेअर ७ टक्क्यांपर्यंत आपटला. जागतिक बाजारातही संमिश्र वातावरण होते. आशियातील चीन, जपान, दक्षिण कोरिाया या देशांमधील प्रमुख शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली. तर युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजार दुपापर्यंत तेजीसह व्यवहार करत होते. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या आकडेवारीने या शेअर बाजारांमध्ये तेजी होती.
Read More » राशिभविष्य- ३० मे २०१३
दैनंदिन राशिभविष्य… Read More » पेणमध्ये रॉकेलचा काळाबाजार
तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांकडून रॉकेलच्या विक्रीत मोठया प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. पेण - तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांकडून रॉकेलच्या विक्रीत मोठया प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. कार्डधारकांना १५ रुपयांत मिळणारे रॉकेल काळया बाजारात ४० ते ४५ रुपयांनी विकले जात आहे. या प्रकाराकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कार्डधारकांनी संताप व्यक्त केला आहे. पेणमधील ८० टक्के केशरी कार्डधारकांना महिन्याला फक्त १ लिटर रॉकेल मिळते. त्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रॉकेलचा साठा कमी आल्याने येथील माळेघर व उचेडे परिसरातील कार्डधारकांना केवळ अर्धा लिटर रॉकेल मिळाले आहे. केंद्र सरकारकडून रॉकेलचा कमी पुरवठा केला जात असला तरी प्रत्येक महिन्याला काळयाबाजारात रॉकेलची मोठया प्रमाणात विक्री होते. काळबाजारात प्रतिलिटर ४० ते ४५ रुपये दरात रॉकेलची विक्री होते. काळय़ाबाजारात विकायला रॉकेल आहे, मग आम्हा कार्डधारकांना का मिळत नाही, असा संतप्त सवाल येथील कार्डधारकांनी केला आहे. सध्या किरकोळ रॉकेल विक्रीचा दर १५ रुपये ५० पैसे आहे. मात्र, पेणमध्ये काळयाबाजारात तीपटीने रॉकेलची विक्री होत आहे. तालुक्यात हजारो केशरी कार्डधारकांना एक लिटर रॉकेल मिळते. मात्र, एक लिटर रॉकेल महिनाभर कसे पुरवणार याचा विचार करून सामान्य कार्डधारक काळयाबाजारात ४२ रुपये लिटर दराने रॉकेल विकत घेतात. परवानाधारक आणि किरकोळ रॉकेल विक्रेत्यांकडे ज्या दिवशी सरकारकडून रॉकेलचा साठा वितरीत केला जातो, त्याच दिवशी त्यांच्याकडील या वितरित साठय़ापैकी ६० ते ७० टक्के रॉकेलची ४२ रुपये प्रतिलिटरने विक्री होते, असेही काही कार्डधारकांनी सांगितले.
Read More » हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही
स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करेन. तसेच त्यात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे निवृत्त न्यायमूर्ती टी. जयराम चौटा यांनी बुधवारी सांगितले. बंगळूरु- स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करेन. तसेच त्यात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे निवृत्त न्यायमूर्ती टी. जयराम चौटा यांनी बुधवारी सांगितले. ''फिक्सिंगप्रकरणी चौकशीत माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. तसेच कुणीही (श्रीनिवासन) तसा प्रयत्न केला तरी मी नि:पक्षपाती काम करेन. मी स्वतंत्रपणे आणि घटनेला अनुसरून काम करेन,' असे चौटा यांनी म्हटले. प्रत्यक्ष कोणत्या विषयाशी संबंधित चौकशी करावयाची आहे, याबाबत बीसीसीआयकडून लेखी स्वरूपात सांगण्यात न आल्याने त्याविषयी बोलणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी म्हटले. ''कामाच्या स्वरूपाबाबत बीसीसीआयकडून माझ्याशी अद्याप थेट संवाद साधण्यात आलेला नाही. त्यामुळे फिक्सिंगबाबत अधिक बोलणे आततायीपणाचे ठरेल,''असे चौटा यांनी सांगितले. बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन यांच्यावरील बेटिंग आरोपाबाबतच्या चौकशीसाठी बीसीसीआयने नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीत चौटा यांच्यासह माजी न्यायमूर्ती आर. बालसुब्रमण्यम आणि बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांचा समावेश आहे. चौटा यांनी कर्नाटक आणि मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. बालसुब्रमण्यम हे मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. Read More » आयपीएल अध्यक्षपद नको रे बाबा..
आयपीएलचे अध्यक्षपद यापुढे भूषवण्यास उत्सुक नसल्याचे विद्यमान अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बुधवारी सांगितले. नवी दिल्ली- आयपीएलचे अध्यक्षपद यापुढे भूषवण्यास उत्सुक नसल्याचे विद्यमान अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बुधवारी सांगितले. स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर आयपीएल स्पर्धा वादात सापडली आहे. ''आयपीएल अध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो. प्रत्येक वर्षी मुदतवाढ दिली जाते. मात्र तिस-या वर्षी मला मुदतवाढ नको आहे. बीसीसीआयमध्ये उपाध्यक्ष असलो तरी कुठल्याही प्रक्रियेत माझा हस्तक्षेप नसतो. क्रिकेट सामन्यांचे सवरेत्तम आयोजन कसे होईल, याचाच मी अधिक विचार करतो. माझ्या पदाचा कधीही गैरवापर केला नाही. आयपीएल अध्यक्षपद हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. चांगले काम करताना पदाला मी न्याय दिला. स्पॉटफिक्सिंगमुळे बीसीसीआयची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करताना दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करून बोर्डाची प्रतिमा सुधारण्याला प्राधान्य द्यायला हवे,'' असे शुक्ला यांनी एका मुलाखतीत सांगितले. एखाददुस-याच्या चुकीमुळे संपूर्ण स्पर्धेला लक्ष्य करणे, चुकीचे आहे, असे शुक्ला यांनी यावेळी स्पष्ट केले. ''काही लोभी क्रिकेटपटू आणि व्यक्तींमुळे संपूर्ण स्पर्धेला दोषी ठरवणे, चुकीचे आहे. आयपीएलमध्ये अनके क्रिकेटपटू प्रामाणिकपणे सहभागी होतात. त्यामुळे काही चुकीच्या लोकांमुळे आयपीएल स्पर्धेवर टीका योग्य नाही,''असे ते म्हणाले. बुकींवर लक्ष ठेऊन शिक्षा करण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र स्पॉटफिक्सिंगप्रकरणी पोलिसांना बोर्डाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे शुक्ला यांनी सांगितले. श्रीनिवासन यांना घरचा अहेरस्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा खुलासा होईपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे. Read More » | ||||||||||||||||||||||||||
|
Wednesday, May 29, 2013
FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
Subscribe to:
Posts (Atom)