Tuesday, April 28, 2015

Amazing & Funny News Updates

Amazing & Funny News Updates


Strong Winds Knock Over Train (video)

Posted: 28 Apr 2015 05:20 PM PDT

Strong winds knock over a train in Jefferson Parish, Louisiana.

The post Strong Winds Knock Over Train (video) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Creative Business Card Designs (22 photos)

Posted: 28 Apr 2015 05:16 PM PDT

Unusual business cards help make a great first impression. This post features the most creative business card designs.

The post Creative Business Card Designs (22 photos) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Arresting Grandma For Stolen Car Prank (video)

Posted: 28 Apr 2015 05:14 PM PDT

Roman Atwood the famous youtube prankster decided to arresting grandma for stolen car prank.

The post Arresting Grandma For Stolen Car Prank (video) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Animals With Hilarious Reactions To Rainy Weather (20 photos)

Posted: 28 Apr 2015 05:12 PM PDT

Here are some funny animals with hilarious reactions to rainy weather.

The post Animals With Hilarious Reactions To Rainy Weather (20 photos) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Kid Breaks Rubik’s Cube World Record (video)

Posted: 28 Apr 2015 05:10 PM PDT

Collin Burns 5.25 breaks the world record for solving a rubik’s cube.

The post Kid Breaks Rubik’s Cube World Record (video) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Dancing Kid Just Make Me Laugh (video)

Posted: 28 Apr 2015 05:06 PM PDT

Something about this dancing kid just make me laugh.

The post Dancing Kid Just Make Me Laugh (video) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Fascinating Film Facts about Films (30 photos)

Posted: 28 Apr 2015 05:04 PM PDT

These are some fascinating film facts about the films that we know and love. Credits: www.ebaumsworld.com

The post Fascinating Film Facts about Films (30 photos) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Skateboarder Has A Perfect Save (video)

Posted: 28 Apr 2015 05:02 PM PDT

Watch this video of a skateboarder how he has a perfect save.

The post Skateboarder Has A Perfect Save (video) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Beautiful Pictures Of Our Big Beautiful World (25 photos)

Posted: 28 Apr 2015 05:00 PM PDT

Are you looking for an adventure? Don’t ever forget that there’s a big beautiful world right outside your front door and it’s just waiting to be explored.

The post Beautiful Pictures Of Our Big Beautiful World (25 photos) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

फळांचा राजा खुलवणार सौंदर्य

आंबा स्वयंपाकघरात आणि वैद्यकीय क्षेत्रात जसा लोकप्रिय झाला तसाच स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातही प्रसिद्ध होत आहे. यामुळे त्वचा तजेलदार राहते व चेह-यावरचा कोरडेपणा जातो. आंब्यापासून तयार करण्यात आलेले सौंदर्यप्रसाधन नेहमीच उपयुक्त व फायदेशीर ठरणारे आहे. अशा या आंब्यापासून घरच्या घरी फेसपॅक कसे तयार करायचे ते पाहू या.

खाण्याचं व्यसन लागेल अशी चव असणारा, अमृताची आठवण करून देणारा आंबा आणि सर्वश्रुत असलेला फळांचा राजा आता बाजारात बराच जोर धरत आहे. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात आंब्याच्या अनेक प्रजाती आढळतात.

हापूस आंबा, पायरी, तोतापुरी, राजापुरी, लंगडा आंबा, बारमाही आंबा असे कितीतरी आंब्याचे प्रकार कोकणात गेल्यावर कळतात. बाळ कै-या, कै-या व आंबा यांपासून आपण आतापर्यंत लोणची, पन्हं, गुळांबा, मोरांबा, छुंदा, आमरस इत्यादी पदार्थ बनवले आहेत. आमरस विशेष पद्धतीने आटवून ठेवून त्याच्या वडया आणि बर्फीही करता येतात. आंब्यामुळे वजन वाढतं, स्नायू मजबूत होतात, प्रकृती चांगली राहते.

आंबा स्वयंपाकघरात आणि वैद्यकीय क्षेत्रात जसा लोकप्रिय झाला तसाच स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातही प्रसिद्ध होत आहे. यामुळे त्वचा तजेलदार राहते व चेह-यावरचा कोरडेपणा जातो. चेह-यावरच्या सुरकुत्या जाऊन चेहरा स्वच्छ होतो. अकालीन वृद्धापकाळामुळे झालेल्या निस्तेज त्वचेसाठी आंब्याचा वापर केला जातोय.

उन्हामुळे त्वचेमध्ये गरजेपेक्षा जास्त ओलावा व चिकचिकीपणा निर्माण होतो व तजेलदारपणा नष्ट होतो. अशा वेळेस नेहमीच पार्लर ट्रिटमेंट करणं सोयीचं होत नाही. नैसर्गिकरीत्या केलेले उपचार हे फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारे असतात. आंब्यापासून तयार करण्यात आलेले सौंदर्यप्रसाधन नेहमीच उपयुक्त व फायदेशीर ठरणारे आहे. अशा या आंब्यापासून घरच्या घरी फेसपॅक कसे तयार करायचे ते पाहू या.

 »  आंब्यामध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वं प्रामुख्याने आढळून येतात. शिवाय 'ब' जीवनसत्त्व, अल्फा हायड्रोक्सी अ‍ॅसीड व पोटॅशिअम यांचं प्रमाण कमी-अधिक प्रमाणात असतं.

» आंब्यातील 'अ' जीवनसत्त्वामुळे चेह-यावरील तेलकटपणा जाऊन चेहरा टवटवीत दिसतो व सुरकुत्या नष्ट होतात. » 'ब' जीवनसत्त्व चेह-यावरील ताजेपणा आणण्यासाठी उपयोगात येतो. अल्फा हायड्रोक्सी अ‍ॅसीडमुळे मृत पेशी नष्ट होतात. त्यामुळे चेहरा नरम व निखळ दिसतो.

» 'क' जीवनसत्त्व पांढरे संयोजक पेशी जलातील प्रथिन घटक वाढवण्यास मदत करतात.

»  पोटॅशिअममुळे चेह-यातील निस्तेज त्वचा सुधारते, कोरडया त्वचेवर ओला थर निर्माण होऊन चेहरा निखळतो.

आंब्यापासून केले जाणारे फेस पॅक

हायड्रेटिंग फेस पॅक

उन्हाच्या वातावरणात आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त तेलकट होते. अशा वेळेस चेह-यावर तजेलदारपणा आणायचा असेल तर आंब्याचा रस घेऊन त्यात मुलतानी माती टाकावी. आंब्याचा रस व मुलतानी माती यांचे उत्तम मिश्रण करून चेह-यावर लावावं. हे मिश्रण चेह-यावर पंधरा मिनिटं ठेवावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. चेह-यावर तेज येऊन त्वचा सुंदर दिसते.

संवेदनशील त्वचेसाठी

काही तरुणींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे बाहेरील उन्हाचा, हवेचा व वातावरणाचा त्यांच्या चेह-यावर लगेच फरक जाणवतो. अशा वेळेस आमरसमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यात २ चमचे पाणी आणि १ चमचा दही टाकून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट तयार करून चेह-यावर व मानेवर हलक्या हाताने लावावी. हा फेस पॅक चेह-यावर जवळपास तीस मिनिटे ठेवावा. अध्र्या तासानंतर चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावा.

ताजे मँगो फिल्टर

संपूर्ण दिवसभर काम केल्यावर शरीरासोबतच आपला चेहराही थकतो. त्यामुळे चेह-यावर आलेला थकवा घालवण्यासाठी व अकालीन आलेलं वृद्धत्व दूर करण्यासाठी ताज्या मँगो फिल्टरचा वापर करावा. ७-८ अक्रोड किसून त्यात ओटचे जाडे भरडे पीठ २-३ चमचे टाकावे, ३ चमचे मुलतानी माती आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळावे. या सगळ्यांचे योग्य मिश्रण करावे.

तयार झालेले मिश्रण चेह-यावर व मानेवर लावून जवळपास तीन तास तरी सुकवावे. चेहरा पूर्णपणे सुकल्यावर थंड पाण्याने  धुवून घ्यावा. जेणेकरून चेह-यावरचा ताण कमी होऊन चेहरा त्राणविरहीत दिसू लागतो. हा उपाय सर्व प्रकारच्या चेह-यासाठी उपयुक्त असून रोज वापर केल्यास चेहरा जास्त खुलून येतो.

मँगो बॉडी स्क्रब

चेह-यासोबतच बाहेरील वातावरणामुळे शरीरावरही परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होते तसंच त्वचेतील पेशी मृत पावतात. अशा वेळेस एका भांडयात २ चमचे आंब्याचा रस घ्यावा, त्यात २ चमचे दूध आणि एक चमचा साखर घालून मिश्रण तयार करावं. मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण चेह-यावर व शरीरावर लावून घ्यावं. २० ते २५ मिनिटं शरीरावर मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका. साखरेमुळे शरीरावरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे शरीर व चेहरा टवटवीत दिसतो.

डागविरहीत त्वचेसाठी

आंब्याच्या रसामध्ये हरभ-याचे कूट टाकून त्यात एक चमचा मधाचा टाकावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. चेह-यावर आणि विशेषत: डाग असलेल्या भागावर हे मिश्रण लावावं. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय रोज केल्यास चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ होऊन डागविरहीत होतो.

मँगो फेशिअल

चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेह-याला तेज आणण्यासाठी मँगो फेशिअल नावाचा प्रकार सध्या पार्लरमध्ये प्रचलित आहे. या फेशिअलमध्ये आंब्याच्या रसामध्ये अंडयातील आतील पिवळा द्रवपदार्थ मिसळावा आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावेय.

१५ मिनिटांनंतर थंड पाणी व फेस वॉशने चेहरा धुवून घ्यावा. फेस वॉशने चेह-यावर अंडयामुळे आलेली दरुगधी कमी करता येते. साधारण तरुणी महिन्यातून एकदा तरी फेशिअल करतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात. मँगो फेशिअलमुळे चेहरा निखळ व तेजस्वी दिसतो.

Read More »

तांब्याच्या भांडयातलं पाणी आरोग्यदायी

पाण्याला जीवन संबोधलं जातं, म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनाशेपोटी व तांब्याच्या भांडयात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपरिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. मात्र या पाण्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेऊ या.

आयुर्वेदिक महत्त्व

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांडयात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कप, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ ते १० तास तांब्यांच्या भांडयात ठेवलेलं पाणी नियमित प्यावं. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी र्निजतुक होतं व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात समाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या ज्या लोकांना असते त्यांनी पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकून ते पाणी प्यायल्यास आरोग्यासाठी उत्तम असते.

१) पचन संस्थेला चालना

पित्त, अल्सर किंवा पोटात गॅसचा विकार होण्यासाठी तांब्याच्या भांडयात ठेवलेलं पाणी पिणं अत्यंत हितकारी असतं. तांब्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे पोटातील जीवाणूंचा नाश होतो. तांब्यांच्या भांडयात ठेवलेलं पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो. तसेच पोट साफ होण्यास मदतही होते.

२) वजन कमी करण्यास मदत

तेलयुक्त पदार्थ, परिपूर्ण भाज्या, फळं आणि वजन घटवण्यास तांब्याच्या भांडयातील पाणी फारच उपयोगी पडते. शरीरातील आवश्यक घाम शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक घाम बाहेर टाकण्यास मदत होते.

३) जखमा भरून काढण्यास मदत होते

तांब्याच्या भांडयात ठेवलेलं पाणी अ‍ॅन्टिबॅक्टेरिअल तसेच अ‍ॅन्टिवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते, तसंच नवीन पेशींची निर्मिती होऊन शरीराच्या आतील जखमा विशेषत: पोटातील जखमा तांब्यामुळे लवकर भरण्यास मदत होते.

४) चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात

चेह-यावर अकाली पडणा-या सुरकुत्यांमुळे काही लोक विशेषत: मुली, स्त्रिया खूप चिंतित असतात, मग पार्लर, वगैरे जाणे याकडे विशेष लक्ष देतात. तांब्याच्या भांडयातील पाणी प्यायल्याने नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते व चेह-यावर नवीन त्वचेची निर्मिती होते.

५) हृदयरोग व रक्तदाब यासारखे आजार

तांब्याच्या भांडयातील पाण्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्या सुरळीत होतात.

६) कर्करोगाशी सामना

आजकालच्या जीवनामध्ये कर्करोग हा सगळीकडे मोठया प्रमाणात पसरणारा भयावह आजार आहे. तांब्यामध्ये एवढी क्षमता आहे की, कर्करोगासारख्या भयावह आजारावर मात करू शकतो.

७) सांधेदुखी

तांब्याच्या भांडयात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने संधीवाताच्या त्रासाने होणारी सांधेदुखी दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर हाड मजबुतीसाठी तांब्याच्या भांडयातील पाणी फायदेशीर असतं.

८) थायरॉइड

तांब्याच्या भांडयातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिजन हार्मोन्स संतुलित राहतं. तांब्यातील खनिज थायरॉइड ग्रंथीचं कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थायरॉइडच्या आजारापासून आराम मिळतो.

Read More »

पाचक ब्ल्यूबेरी

ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ म्हणून ओळखलं जातं. याची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते.

ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ म्हणून ओळखलं जातं. याची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन नावाच्या माणसाने याच्या बिया अमेरिकेत आणून त्याची लागवड केली. मात्र आपल्याकडेही आता हे फळ काही नवीन राहिलेलं नाही.

विविध जाम आणि केक्समध्ये हे फळ वापरतात. निळ्या रंगांचं हे फळ चवीला मधूर असतं. हे फळ स्कॉटलंडमध्ये 'ब्लेबेरी', नॉर्वेत 'ब्लॅबर', त्याची पानं हिरवीगार तर फुलं घंटेच्या आकाराची असतात. त्यांचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो.

फळाचा रंग अर्थातच निळा असतो मात्र कच्च्या फळाचा गर हा हिरवट रंगाचा असतो. असं हे फळ दिसायला अगदी बोरासारखं असून त्यात एक लहान बीदेखील असते. जेली, जॅम, मफिन्स आणि स्नॅक्समध्ये वापरतात.

» मेंदूच्या विकारांवर मात करून स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं.

»  दररोज अर्धा कप ब्ल्यूबेरीचं सेवन केल्याने कर्करोगापासून संरक्षण करतं.

» त्वचेचा पोत सुधारते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण     कमी होतं.

» मूत्राशयाचं आरोग्य सुधारून लघवी साफ होते.

» उच्च रक्तदाब आणि रक्तातील  साखरेची पातळी नियंत्रित राखते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करते.

यात जीवनसत्त्व ए, सी आणि ईचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते.

»  डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.

» शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करते.

» पचनक्रिया सुधारते.

» बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं.

Read More »

उन्हाळ्यासाठी खास जलजिरा

उन्हाचा तडाखा वाढतोय. रखरखत्या उन्हातून फिरताना आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

उन्हाचा तडाखा वाढतोय. रखरखत्या उन्हातून फिरताना आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. प्रखर सूर्यप्रकाशामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळे डीहायड्रेशन, भोवळ येणे अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करणारे गारेगार जलजिरा सरबत उत्तम आहे. कारण त्यामुळे पचन सुधारते. असं हे शरीराला थंड ठेवणारं जलजिरा कसं करायचं हे पाहू या.

साहित्य- एक चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा पुदिन्याची पेस्ट, अर्धा चमचा कोथिंबिरीची पेस्ट, एक चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस, एक ग्लास थंड पाणी, चवीपुरता मीठ

कृती – सगळं साहित्य थंड पाण्यात एकत्र करून घ्यावं. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावं. सजावटीसाठी त्यात कोथिंबीर आणि पुदीना घालावा. असं हे जलजिरा सव्‍‌र्ह करा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe