Tuesday, April 7, 2015

Amazing & Funny News Updates

Amazing & Funny News Updates


The 15 Creepiest Wikipedia Pages You Can Read Online Right Now

Posted: 07 Apr 2015 06:09 PM PDT

Wikipedia is the world’s most efficient source for information. this are some creepiest wikipedia pages you can read online right now. Black-Eyed Children. Coffin Birth. Cotard Delusion. Euthanasia Coaster. Locked-in Syndrome. Pope Lick Monster. Premature Burial. Rat King. Scaphism. Shadow Person. Tarrare. The Dyatlov Pass Incident. The Flatwoods Monster. The Hinterkaifeck Murders. The Taman Shud […]

The post The 15 Creepiest Wikipedia Pages You Can Read Online Right Now appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Dangerou And Extreme Tricks On Pogo Sticks

Posted: 07 Apr 2015 06:08 PM PDT

In this latest video, Boys has performed a slew of inconceivable and dangerou and extreme tricks on pogo while riding pogo sticks.

The post Dangerou And Extreme Tricks On Pogo Sticks appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Seriously Why Did We Not Think of This Sooner? (30 pics + 2 gifs)

Posted: 07 Apr 2015 06:07 PM PDT

These awesome inventions will change our lives forever, Seriously why did we not think of this sooner? 360 degree wall outlets. A fun way to clean. A hair brush that is easy to clean. A pen that lets you scan and write in any color. And the ultimate outlet would also have extension cords built […]

The post Seriously Why Did We Not Think of This Sooner? (30 pics + 2 gifs) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

GoPro Camera Free Fall

Posted: 07 Apr 2015 06:06 PM PDT

GoPro Camera free fall from 9,000 feet and lives to tell the tale.

The post GoPro Camera Free Fall appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Mens Makeovers Is Commonly Associated (18 images)

Posted: 07 Apr 2015 06:05 PM PDT

Mens looking cool after getting makeovers, And its commonly associated with women.

The post Mens Makeovers Is Commonly Associated (18 images) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Don’t Mess With A Woman’s Parking Spot

Posted: 07 Apr 2015 06:04 PM PDT

Do not steal someone’s parking spot! Especially woman’s parking spot.

The post Don't Mess With A Woman’s Parking Spot appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Learn Some Fun And Interesting Facts (15 images)

Posted: 07 Apr 2015 06:03 PM PDT

They say that knowledge is power so help yourself power up by learning all of these fun and interesting facts.

The post Learn Some Fun And Interesting Facts (15 images) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Science Fiction To Use Money In The Future

Posted: 07 Apr 2015 06:02 PM PDT

Look at science fiction to figure out how humans will use money in the future.

The post Science Fiction To Use Money In The Future appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

Funny And Interesting Facts About The Movie Predator (15 images)

Posted: 07 Apr 2015 06:01 PM PDT

How much do you actually know about the movie predator, Here are some funny and interesting facts about it.

The post Funny And Interesting Facts About The Movie Predator (15 images) appeared first on Funsterz.com - Amazing Videos, Amazing Funny Pictures, Crazy Videos, Funny Photos.

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

काटेरी पण मधूर

उन्हाळा आला की जसं कैरी आणि आंब्यांचे वेध लागतात तसे फणसप्रेमींना फणसाचे वेध लागतात. कैरी आणि आंब्याप्रमाणेच हळूहळू फणसंही बाजारात दाखल होतो. फणस आकाराने मोठा असून त्याच्या आवरणाला 'चारखंड' असं म्हणतात.

चारखंडाला काटय़ासारखा टोकदार भाग असतो, तर मधोमध काठीसारखा भाग असतो त्याला 'पाव' असं म्हणतात. त्या पावालाच गरे लागलेले असतात. या ग-यांमधली बी 'आठळ्या' या नावाने ओळखली जाते. फणसाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. बरका आणि कापा. बरका हा प्रकार मधूर आणि रसाळ असून तो कोकणात आढळून येतो.

तर कापा हा फणस कमी गोड आणि रसाळ असून तो देशावर आढळतो. याशिवाय विलायती फणस अशी फणसाची आणखी एक जात असून हा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरला जातो. फणसाच्या साकटाची, पावाची, आठळ्यांची आणि कच्च्या ग-याची भाजी केली जाते. याचबरोबर फणासापासून फणस पोळी, तळलेले गरे आणि सांजणे केले जातात. फणसाला हिंदीत 'कठहल', तेलगु आणि ओरिसामध्ये 'पनस', इंग्रजीत 'जॅकफुट्र' अशी नावं आहेत. अशा या फणसाचे फायदे पुढीलप्रमाणे:-

यात भरपूर प्रमाणात 'सी' जीवनसत्त्व असल्यामुळे पचनशक्ती सुधारून पांढ-या पेशी वाढण्याचं काम फणस करतो. पचनशक्ती सुधारत असल्याने अल्सरसारखे आजार उद्भवत नाही.

फणसाच्या सेवनाने जंतुसंसर्गापासून बचाव होतो.

नियमित सेवनाने कर्करोगापासूनही मुक्तता मिळते.

यात फायबरचं प्रमाण अधिक असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. म्हणून बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या रुग्णांनी याचं सेवन करावं.

जीवनसत्त्व 'अ'चं प्रमाणही अधिक असल्याने डोळे आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं. रातआंधळेपणाचा त्रास होत नाही.

फ्रुक्टोस आणि सुक्रोजचं प्रमाण योग्य असल्याने शरीरात ऊर्जेचा स्रोत राखण्यास मदत होते.

फणसाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि फॅट्स नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

यात मॅग्नेशिअमचं प्रमाणही अधिक असतं. त्यामुळे फणस शरीरातील कॅल्शिअम शोषून घेतो, त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होत नाही.

फणसाच्या गरात तांबं अधिक प्रमाणात असल्याने थायरॉड ग्रंथींचां कार्य सुधारतं.

ब्लडप्रेशर नियंत्रित राहतं. त्यामुळे हृदयरोगासारखे आजार होण्याचा धोका टळतो. यात 'बी६' हे जीवनसत्त्व असल्यामुळे ते फळ हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतं.

फणस खाल्ल्याने शरीरातील लोहाचं प्रमाण वाढतं. इतकंच नाही तर शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं आणि अॅनिमियासारखे विकार होत नाहीत.

त्वचेचा पोत सुधारतो. तसंच त्वचेच्या कित्येक विकारांवरही अतिशय गुणकारी ठरतं.

फणसाच्या झाडाची मुळं पाण्यात उकळून त्याची वाफ घेतल्यास अस्थमाच्या रुग्णांना आराम पडतो.

Read More »

विश्व स्वास्थ्य संस्था

७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून ओळखला जातो. कारण याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. अशा या संस्थेची ही थोडक्यात माहिती…
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)ला मराठीत 'विश्व स्वास्थ्य संस्था' किंवा 'जागतिक आरोग्य संस्था' असं संबोधलं जातं. ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. ७ एप्रिल १९४८ रोजी स्वित्झर्लंडलडमधील जीनिव्हात ही संस्था स्थापन झाली. म्हणून ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून ओळखला जातो. या संघटनेविषयीच्या कराराची पहिली बैठक २२ जुलै १९४६ रोजी झाली होती. त्यात ५१ देशांच्या प्रतिनिधी सहभागी झाले होते.

त्यानंतर या ७ एप्रिल १९४८ रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अगदी सुरुवातीला देवी रोगाचं निर्मूलन करण्याची अग्रगण्य भूमिका या संस्थेने बजावली होती. सध्या एचआयव्ही, इबोला, मलेरिया आणि क्षयरोग यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रभाव कमी करण्यावर या संस्थेद्वारे विशेष भर दिला जात आहे.

याचप्रमाणे असंसर्गजन्य रोगांचा प्रभाव कमी करणे, लैंगिक संबंधातून पसरणारे रोग सुधारणे, माता आणि बाल यांच्या आरोग्याचा विकास, वृद्धत्व, पोषण आणि पर्यावरण स्वच्छता, अन्न सुरक्षा, पदार्थ निरोगी राखणे, व्यावसायिक आरोग्य राखणे, पदार्थाचा दुरुपयोग कमी करणे, तसंच आरोग्यविषयक अहवाल प्रकाशन करणे आदी गोष्टींसाठी विश्व स्वास्थ्य संस्था (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) जबाबदार असते. जागतिक आरोग्य अहवाल, त्याचं आंतरराष्ट्रीय प्रकाशन, जगभरातील जागतिक आरोग्य सव्र्हेक्षण कारणे या गोष्टीचाही त्यात समावेश आहे. १९४७ मध्ये या संस्थेने सर्वप्रथम क्षयरोग प्रतिबंधक लसीची माहिती टेलेक्सवर दिली होती.

१९५५ मध्ये मलेरिया निर्मूलनसंबंधित काम सुरू केलं होतं. १९६५ साली या संस्थेने पहिला अहवाल मांडला, ज्यात मधुमेह इन्शुलीनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये आणि लघवीमध्ये आढळणारी साखर आणि कर्क रोगासंबंधित संशोधनाविषयीची माहिती देण्यात आली होती. १९७६ मध्ये अपंगत्व प्रतिबंध आणि पुनर्वसन विषयीचा ठराव मांडण्यात आला. १९७७ मध्ये आवश्यक औषधांची पहिली यादी प्रसारित केली गेली.

राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे विश्व स्वास्थ्य संस्थेचे कार्य पुढीलप्रमाणे -

आंतरराष्ट्रीय आरोग्य कामात दिशादर्शक आणि समन्वय राखणे

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रभावी सहकार्याने विशेष संस्था, सहकारी आरोग्य प्रशासन, व्यावसायिक गट आणि इतर संस्थांचे व्यवस्थापन करणे

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सरकारला मदत करणे

योग्य तांत्रिक साहाय्य करणे आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आवश्यक ती मदत करणे

जिथे आवश्यक असेल तिथे अपघाती जखम प्रतिबंध आणि इतर विशेष संस्थांमार्फत सहकार्य करणे

काही विशेष संस्थांमधील पोषण, निवारा, स्वच्छता, मनोरंजन, पर्यावरण स्वच्छता आदी गोष्टींना प्रोत्साहन किंवा सहकार्य करणे

नियमावली, करार आणि नियम मांडणे तसंच आंतराष्ट्रीय आरोग्य वास्तू सुरू करण्यासंदर्भात शिफारसी करणे.

Read More »

साखरप्रेमींसाठी वरदान

साखरेऐवजी म्हणजे साखरेला पर्याय म्हणून आणि साखरेपासून बचाव करणारे बरेच गोड पदार्थ आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. हे पदार्थ अतिरिक्त साखर खाणे टाळणा-यांसाठी वरदान ठरत आहेत.
आपल्यापैकी कित्येक जणांना दररोजच्या जेवणात गोड खाण्याची सवय असते. म्हणजे नेहमीच्या पदार्थामधून साखर आपल्या पोटात जातेच मात्र याव्यतिरिक्तही केक, पेस्ट्रीज, कॅडबरी यांसारख्या विविध खाद्यपदार्थामधून अतिरिक्त साखर आपल्या पोटात जाते. साखर गोड, कमी खíचक, सहजतेने उपलब्ध होणारी असून ती व्यसन लावणारी आहे, परंतु काळजी न घेता त्याचे सेवन केल्यास ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात साखर घेतल्यास, गंभीर वैद्यकीय स्थिती निर्माण होऊ शकते. दुर्दैवाने, पाश्चिमात्य अन्नपदार्थ खाण्याची सवय प्रचलित होत असल्यामुळे साखरेचं सेवन दिवसेंदिवस वाढतच आहे. खरं तर, भारत हा जगातील सर्वात जास्त साखर खाणारा देश बनला आहे.

प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामध्ये साखरेचं प्रमाण दिसत नसल्याने आपण दररोज पेयांमधून आणि खाद्यपदार्थामधून किती प्रमाणात साखर खातो याचं कोणाला भानच राहत नाही. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण साखरेचा अतिरेक करतात. कोल्ड्रिंकच्या साधारण आकाराच्या बाटलीमध्ये सुमारे ७ चमचे साखर असते, आणि कोका कोलाच्या सर्वात मोठय़ा (सिनेमा सìव्हग) बाटलीमध्ये ४४ चमचे साखर असते हे तुम्हाला माहिती आहे का? प्रौढांनी २० ते २५ ग्रॅमच साखर दररोज घ्यायला हवी.

चॉकलेट, पेस्ट्री, कँडी, फास्ट फूड, ब्रेकफास्टची तृणधान्ये, आईस्क्रीम, कॅनमधील फ्रुट ज्यूस, सूप, अल्कोहोलिक पेय आणि डेझर्ट इत्यादींमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं, जे ताबडतोब आपल्या शरीरामध्ये समाविष्ट होतं. ज्यामुळे लट्ठपणा, दातांची कीड, मधुमेह आणि प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारखे आजार होतात. यामुळे चयापचय क्रियेसंदर्भातील एक किंवा अनेक आजारसुद्धा होऊ शकतात जसं की कोलेस्टेरॉल स्तर वाढणे, इन्शुलिन बाधा आणि उच्च रक्तदाब इत्यादी.

वैज्ञानिकांच्या मते, साखर ही अल्कोहोलप्रमाणेच आपल्या शरीरासाठी हानिकारक असते, आणि अल्कोहोल साखरेचे किण्वन करूनच तयार केलं जातं यात पुढे आश्चर्य वाटायला नको. त्यामध्ये केवळ रिकाम्या कॅलरी असतात आणि आपल्या निभावासाठी आवश्यक असलेलं जीवनसत्त्व व खनिज त्यामध्ये नसतात. याचा परिणाम म्हणून, आपलं शरीरात आपल भूक लपूण राहते. यामुळे त्रस्त वाटतं. आपण खात असलेल्या अन्नाने आपलं पोट शांत होत असलं किंवा आपली भूक भागत असली तरीसुद्धा आपल्या शरीराला पुरेसे पोषणतत्त्व प्राप्त होत नाही. साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे होणा-या आजारांनी प्रत्येक वर्षी जगभरात सुमारे ३५ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडत आहेत.
ब-याच देशांमध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ व पेयांवर 'साखर कर' लादावा आणि साखरेच्या सेवनासाठी कायदे व नियम घालावेत अशी मागणी होत आहे, यात काय आश्चर्य आहे? ही तर फार दूरची गोष्ट आहे; परंतु आपण हे नाकारायला नको की आपल्यापैकी सर्व जण आवश्यकतेपेक्षा खूप जास्त साखर खातो आणि त्यामुळे लट्ठपणा, मधुमेह आणि जीवनशैली संबंधित अनेक आजार यांची जणू साथच येत आहे. सुदैवाने, हळुवारपणे भारतीय साखरेच्या हानिकारक परिणामांप्रती जागरूक होत आहेत. बरेच लोक त्यांच्या साखरेच्या सेवनावर लक्ष देत आहेत. साखरेचं सेवन कमी करणं हा सर्वोत्तम उपाय आहे, परंतु ज्या व्यक्तीला गोड खावंसंच वाटतं आणि त्यांना साखरेवर नियंत्रण ठेवणं कठीण वाटतं, त्यांनी साखरेचे पर्याय वापरावेत. केवळ यामधील नियमन पाळावेत तसेच निरोगी जीवनशैली राखावी. साखरेऐवजी घेण्याच्या पदार्थाची प्रसिद्धी वाढतच आहे.

साखरेऐवजी घ्यायचे पदार्थ साखरेसारखीच गोडी देतात परंतु त्यामध्ये फारच कमी किंवा शून्य कॅलरीज असतात. मधुमेह, लट्ठपणा आणि इतर आरोग्याच्या तक्रारी असणा-या लोकांसाठी असे पदार्थ सुचवले जातात. आरोग्याबद्दल जागरूक असणारे बरेच लोक साखर खाणं टाळतात आणि साखर शरीरासाठी विष बनेल अशा विशिष्ट प्रमाणानंतर ते साखरेऐवजी घेण्याचे पदार्थ वापरतात. खरं तर, कमी कॅलरी साखर घेणारे लोक उपाशी न राहता पुरेशा प्रमाणात कॅलरीजचं प्रमाण कमी करू शकतात.
स्टेविया, अस्पार्टेम आणि सुक्रोलोज हे जगभरात उपलब्ध असणारे साखरेऐवजी वापरण्याचे पदार्थ आहेत जे सध्या भारतामध्येसुद्धा उपलब्ध आहेत आणि ते आपल्याला सुरक्षित प्रमाणात साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. साखरेऐवजी खाण्याच्या पदार्थाची या विविधतेमुळे खात्री होते.

स्टेविया ही सामान्य साखरेपेक्षा ३०० पट जास्त गोड असते आणि तिला गोड पदार्थ म्हणून ७० देशांमध्ये मान्यता प्राप्त झाली आहे. जपानमध्ये स्वीटनर बाजारात याचा ४० टक्के भाग आहे. स्टेविया विविध लाभ देत असल्याने प्रसिद्ध आहे. तिच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण शून्य आहे. शून्य ग्लायकेमिक इंडेक्स आणि शून्य मेद आहे. ती रक्तदाब कमी करण्यात आणि रक्त शर्करास्तर कमी करण्यास मदत करते, असं अभ्यासावरून लक्षात आलं आहे.

दुस-या बाजूने अस्पार्टेम ही कृत्रिम आहे; परंतु कमी कॅलरी, सॅकराईडविरहीत आणि सर्वात गोड साखर आहे जी यूएसमध्ये प्रसिद्ध आहे. ती सामान्य साखरेपेक्षा २०० पट गोड असल्यामुळे, तोच गोडवा येण्यासाठी ती फारच कमी प्रमाणात लागते. या उत्पादनाला २५ वर्षापूर्वी अन्न व्यसन म्हणून मान्यता दिली असल्याने अस्पार्टेम घेण्याबद्दल काही वेळा चिंता व्यक्त केली जाते. तरीही, युरोपियन फूड सेफ्टी अधिकारी(ईएफएसए)ने नुकतेच ती मानवासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सर्व उपलब्ध अभ्यास आणि माहितीवरून घोषित केलं आहे. ज्या पदार्थाना फार काळ गरम करावं लागत नाही अशाच पदार्थामध्ये अस्पार्टेमचा वापर करावा आणि ज्या लोकांना फेनिल किटोनमेह आजार आहे त्यांनी हा पदार्थ सेवन करणं टाळावं. युरोपियन फूड सेफ्टी अधिकारी तसेच अमेरिकन फूड अँड अॅडमिनिस्ट्रेशन सोसायटीने या पदार्थाचे ४० मिग्रॅ / किग्रॅ सेवन दररोज करणं सुरक्षित मानलं आहे.

सुक्रोलोज हे एकमेव स्वीटनर असून ते सामान्य साखरेपेक्षा ६०० पट गोड आहे. ती साखरेपासूनच बनले आहे आणि त्याची चवसुद्धा साखरेसारखीच आहे; परंतु ती कॅलरी किंवा काबरेहायड्रेट विरहीत आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम किंवा विषबाधा नाही. तसंच मधुमेह असलेल्या लोकांसाठी उत्तम अन्नघटक म्हणून सुरक्षित आहे आणि तिचा वजन कमी करण्यासाठी कॅलरी व आणि साखर कमी खाणा-या लोकांसाठी सुद्धा वरदान आहे. याची चव फार छान असून तो बहुउपयोगी पदार्थ आहे. त्याचा पेय, घरातील स्वयंपाक आणि बेकिंग यामध्ये गोडवा आणण्यासाठी वापर केला जातो.

आपल्याला निरोगी राहायचे असेल आणि वाढत्या वयात गंभीर आजारांपासून बचाव करायचा असेल तर आपण दररोजचे साखरेचे सेवन कमी करणं आवश्यक आहे यावर आरोग्य तज्ज्ञांनी भर दिला आहे. त्यांचा सल्ला ऐकण्याची ही वेळ आहे. साखरेऐवजी घेण्याचे पदार्थ गोड असतात; परंतु आपल्या शरीराला अतिरिक्त कॅलरी देऊन आणि रक्तशर्करेमध्ये वाढ करून एकूणच आरोग्याला असलेल्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी ते सुरक्षित असतात.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe