Tuesday, June 4, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » विज्ञान तंत्रज्ञान

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » विज्ञान तंत्रज्ञान

तंदुरुस्तीसाठी १२ मिनिटे व्यायाम पुरेसा

व्यायामशाळेत तासन्तास घाम गाळला तरच शरीर तंदुरुस्त राहते, अशी अनेकांची समजूत असते आणि त्यासाठी काही जण महागडया व्यायामशाळांचा पर्याय निवडतात.
व्यायामशाळेत तासन्तास घाम गाळला तरच शरीर तंदुरुस्त राहते, अशी अनेकांची समजूत असते आणि त्यासाठी काही जण महागडया व्यायामशाळांचा पर्याय निवडतात. तर काही जणांकडे तेवढा वेळच नसल्याने आणि आर्थिक गणित जुळत नसल्याने तंदुरुस्तीकडे लक्ष देत नाहीत. मात्र, शरीर निरोगी ठेवण्यासाठी इतका वेळ आणि पैसा खर्च करण्याची गरज नसल्याचा दिलासा संशोधकांनी दिला आहे.

आठवडयातून तीन वेळा केवळ चार मिनिटे जोरदार किंवा जास्त ऊर्जेचा वापर करून व्यायाम केल्यास त्याचे चांगले फायदे होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या व्यायामांमुळे शरीरात ऑक्सिजन घेण्याच्या पातळीत वाढ होते व रक्तदाब आणि ग्लुकोजच्या पातळीत घट होते, असे नव्या संशोधनात आढळले आहे. नॉर्वेमधील विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाने हे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी दहा आठवडयांच्या कार्यक्रमात व्यायामाच्या परिणामांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी सतत आराम करणा-या, अतिवजन असलेल्या मात्र एरव्ही निरोगी असलेल्या २६ व्यक्तींना त्यांच्या कार्यक्रमात सहभागी केले. त्यांचे दोन गट करून त्यांनी निरीक्षण केले.

पहिल्या गटातील व्यक्तींना त्यांनी आठवडयातून तीन वेळा चार मिनिटांचे व्यायाम दिले. तर दुस-या गटाला त्यांनी त्याच प्रकारचे मात्र १६ मिनिटांचे व्यायाम चार-चार मिनिटांच्या तुकडयांमध्ये करण्यास सांगितले. या दोन्ही गटांचे निरीक्षण केल्यावर शरीरात ऑक्सिजन घेण्याच्या प्रमाणात दोन्ही गटांमध्ये सारखीच वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, १६ मिनिटे व्यायाम करणा-या गटामध्ये कोलेस्टरॉल व शरीरातील मेद कमी होण्यामध्ये अधिक चांगला परिणाम दिसून आला. संशोधकांच्या मते आठवडयातून तीन वेळा अधिक ताण देऊन काही मिनिटे केलेला व्यायाम तंदुरुस्ती वाढवण्यासाठी व रक्तदाब कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असतो. त्यामुळेच जास्त ताण देऊन कमी वेळेत केलेले व्यायाम फायदेशीर असतात, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

Read More »

इंटरनेट युझरची संख्या दुपटीने वाढणार

येत्या चार वर्षात भारतात इंटरनेट वापरणा-यांची संख्या तिप्पट होणार आहे, असे 'सिस्को'च्या अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली- भारतात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने वाढत असून इंटरनेट युझरची संख्याही झपाटयाने वाढत आहे. येत्या चार वर्षात भारतात इंटरनेट वापरणा-यांची संख्या तिप्पट होणार आहे, असे 'सिस्को'च्या अहवालात म्हटले आहे. जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर भारतात वाढत आहे.

गेल्या वर्षी भारतात १३ कोटी ८० लाख इंटरनेट युझर होते. ही संख्या २०१७ पर्यंत ३४ कोटी ८० लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज सिस्कोने व्हिज्युअल्स नेटवर्किंग इंडेक्स फॉरकास्ट या अहवालात व्यक्त केला आहे. तर २०१७ पर्यंत जागतिक स्तरावर ३.६ अब्ज लोकांकडे इंटरनेट असणार आहे, असे सिस्कोचे उपाध्यक्ष रॉबर्ट पेप्पर यांनी सांगितले.

सरकारी कार्यालयांमध्ये आणि उद्योगांनी ब्रॉडबॅँडचा वापर करण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र तरीही इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढलेली नाही. इंटरनेटवर व्हिडीओ बघण्याचे प्रमाण गेल्यावर्षी एक कोटी ६० लाख होते २०१७ मध्ये यामध्ये तब्बल १० पटीची वाढ होईल. २०१७ मध्ये इंटरनेटवर व्हिडीओ बघणा-यांची संख्या ११ कोटी ३० लाखांवर जाईल, असे सिस्कोने म्हटले आहे.

इंटरनेट बघण्यासाठी कॉम्प्युटर लागतो हा समज लवकरच पुसला जाणार आहे. कॉम्प्युटरपेक्षाही स्मार्टफोन व स्मार्ट टीव्हीवर इंटरनेट बघण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१७ पर्यंत स्मार्टफोनवर इंटरनेट वापरणा-यांची संख्या ४० टक्के तर टीव्हीवर इंटरनेट बघण्याचे प्रमाण १० टक्के असेल. भारतातील मोबाइल डेटा ट्रॅफिक २०१२ ते २०१७ पर्यंत चार पट वाढणार आहे. २०१२ रोजी हे प्रमाण अवघे तीन टक्के होते, असेही अहवालात नमूद केले आहे. येत्या २०१७ पर्यंत देशात दोन अब्ज नेटवर्किंग डिव्हाइसची मागणी असेल. सध्या ही मागणी एक अब्ज आहे, असेही कंपनीने सांगितले.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment