| ||||
कॅमे-यामधील 'फ्लॅश' होणार कालबाह्य?
आता शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नव्या कॅमेरा संवेदकामुळे (सेन्सर) कॅमे-यात फ्लॅशची गरज उरणार नाही. हे सेन्सर अतिशय प्रभावी असून त्यांच्यात प्रकाश ग्रहण करण्याची संवेदी क्षमता १००० पट जास्त आहे. छायाचित्रे घेत असताना प्रकाशयोजना अतिशय महत्त्वाची ठरते. त्यामुळेच कोणत्याही कॅमे-यामध्ये अतिशय प्रखर प्रकाशलोळ फेकून समोरची वस्तू उजळून टाकण्यासाठी फ्लॅशची व्यवस्था असते. ज्या कॅमे-यांमध्ये फ्लॅश नसतात त्या कॅमे-यांच्या साहाय्याने केवळ भरपूर सूर्यप्रकाशात किंवा कृत्रिम प्रकाशयोजना असलेल्या ठिकाणीच छायाचित्रे घेता येतात. मात्र, आता शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नव्या कॅमेरा संवेदकामुळे(सेन्सर) कॅमे-यात फ्लॅशची गरज उरणार नाही. हे सेन्सर अतिशय प्रभावी असून त्यांच्यात प्रकाश ग्रहण करण्याची संवेदी क्षमता १००० पट जास्त आहे. केवळ दृश्य प्रकाशच नव्हे तर न दिसणा-या इन्फ्रारेड किरणांनाही तो ग्रहण करू शकतो. सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी हा कॅमेरा तयार केला आहे. या सेन्सरच्या उच्च संवेदनक्षमतेमुळे अतिशय अंधुक प्रकाशातही तो छायाचित्रे घेऊ शकतो. कौटुंबिक समारंभापासून ते टेहळणी करण्यासाठी किंवा उपग्रहांच्या कॅमे-यामध्ये या सेन्सरचा वापर करता येणार आहे. या सेन्सरच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे सध्याच्या कोणत्याही कॅमे-यापेक्षा उच्च दर्जाची छायाचित्रे तो घेऊ शकतो. अतिशय मजबूत असलेल्या ग्राफिन या कार्बन संयुगापासून मधमाश्यांच्या पोळ्यासारखी(हनीकॉम्ब) रचना तयार करण्यात आली आहे. या संयुगाचे वैशिष्टय़ म्हणजे तो रबरापेक्षाही जास्त लवचिक आहे व सिलिकॉनपेक्षाही त्याची वाहकता जास्त आहे आणि हि-यापेक्षाही जास्त उष्णतारोधक आहे. प्रकाशाला धरून ठेवणा-या(लाइट ट्रपिंग) सूक्ष्म रचनांवर आधारित हा सेन्सर आहे. अशा प्रकारची रचना तयार करण्यासाटी ग्राफिन अतिशय उपयुक्त ठरले आहे. या तंत्रज्ञानामुळे नेहमीच्या इलेक्ट्रिक सिग्नलपेक्षा जास्त शक्तिशाली सिग्नल ग्रहण करून त्याचे रूपांतरत्यावर कॅमे-याने घेतलेल्या छायाचित्राप्रमाणे पहिल्यांदाच शुद्ध ग्राफिन वापरून अतिशय उच्च 'फोटोसेन्सेटिव्ह सेन्सर' तयार करण्यात आला आहे, असे संशोधकांनी सांगितले आहे. अशा प्रकारचा सेन्सर तयार करून एक स्वस्त, परिणामकारक व लवचिक सेन्सर तयार करता येत असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या शोधामुळे केवळ ग्राहकाभिमुख छायाचित्रण उद्योगालाच नव्हे तर उपग्रहांद्वारे घेतली जाणारी छायाचित्रे व दळणवळण उद्योगालाही फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. Read More » | ||||
|
Monday, June 3, 2013
FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » विà¤à¥à¤à¤¾à¤¨ तà¤à¤¤à¥à¤°à¤à¥à¤à¤¾à¤¨
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment