Tuesday, June 21, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

वोक्हार्टमध्ये थॅलेसेमिया रुग्णांसाठी ब्लडबँक

महाराष्ट्रात रक्तदान चळवळीने जोर धरला असून रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक रक्तदान दिनानिमित्त मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

या रक्तदान शिबिरात ५० बाटल्या रक्त जमा झाले. या शिबिरातून जमा झालेले रक्त हे घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीमध्ये जमा करण्यात आले तसेच या शिबिरासाठी युथ थॅलस्यामिक अलायन्स या सामाजिक संघटनेसोबत अशाच प्रकारे भविष्यामध्ये पुन:श्च रक्तदान शिबीर घेऊन सतत ह्या सामाजिक कार्यात सहभाग ठेवण्याचा वोक्हार्ट हॉस्पिटलचा मानस आहे.

अजूनही आपल्या समाजात रक्तदानाबाबत अनेक गरसमज असल्याने आणि सुशिक्षित लोकही रक्तदानाकडे पाठ फिरवताना दिसतात. या शिबिरात १८ ते ४० वयोगटातील नागरिकांनी भाग घेतला असून अनेक रक्तदात्यांनी आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केले.

अपघातामुळे, आजारामुळे किंवा छोटया-मोठया शस्त्रक्रिया करताना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुस-या कोण्या व्यक्तीकडूनच घ्यावे लागते आणि या गोष्टीचा थेट संबंध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो, म्हणूनच तर रक्तदानाला विशेष महत्त्व आहे आणि ते आजच्या युगात सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे, अशी भावना यामध्ये भाग घेतलेल्या रक्तदात्यांनी बोलून दाखवली.

मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अतिदक्षता कक्ष असून मुंबई ते अहमदाबाद महामार्गावरील अपघात्ग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज लागत असते तसेच येथे थॅलेसेमिया व रक्त-कर्करोगासंबंधित रुग्णांवर आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असून मुंबई-पालघर, गुजरात व राजस्थान इथून अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात व त्यांना वेळोवेळी रक्ताची गरज भासत असल्यामुळे रक्तदान चळवळ समाजात, जनमानसात रुजवण्यासाठी हा उपक्रम राबविला होता.

Read More »

औषधांवरील खर्च वाचवणारं अॅप

आजकाल डॉक्टरकडे गेले की डॉक्टर औषधांची पावती (प्रिस्क्रिप्शन) लिहून देतात. पण त्यात औषधांची नावे ही ब्रँडच्या नावाने लिहिलेली असतात. 

आजकाल डॉक्टरकडे गेले की डॉक्टर औषधांची पावती (प्रिस्क्रिप्शन) लिहून देतात. पण त्यात औषधांची नावे ही ब्रँडच्या नावाने लिहिलेली असतात. ती त्यातील औषधांच्या घटकांनुसार लिहिलेल्या नसतात. त्यामुळे आपल्याला जास्तीचे पैसे आदा/खर्च करावे लागतात. पण तुम्हाला हे पैसे वाचवायचे आहेत काय? मग खालील गोष्टीचे पालन करा व औषधांवरील पैसे वाचवा.

»  सर्वप्रथम प्लेस्टोअरवरून, 1 mg-health app for India WZ 6 MB चे सॉफ्टवेअर (ऑन्ड्रॉइड मोबाईलकरिता) डाऊनलोड करा.

»  सॉफ्टवेअर सुरूकरून हवं त्या औषधांचा शोध घ्या.

»  तुम्ही हवं त्या औषधाचं स्पेलिंग टाका. (e.g. Lyrics 75mg, Pfizer company)

»  सॉफ्टवेअर तुम्हाला औषधाचं नाव, कंपनी, किंमत व त्यातील घटक दाखवेल.

»  आता महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सॉफ्टवेअरमधील, रवइरळकळवळएवर क्लिक करा.

आपण आश्चर्यचकीत व्हाल. जेव्हा पर्यायी औषधांच्या प्रतिथयश कंपन्या आणि किमती बघून. (e. g. 'Lyrica' WZ 'Pfizer कंपनीचे औषधांची किंमत ७६८.५६ रुपये १४ गोळ्या. म्हणजे ५४.८९ रु. प्रती गोळी. पण याच औषधी घटकांचा समावेश असलेली अन्य कंपनीचे औषध PrebaxeWZ (CIPLA कंपनी) औषध मात्र ५९ रुपयांना मिळते (१० गोळ्या) म्हणजे फक्त ५.९० रुपयांना १ गोळी. याप्रमाणे अन्य औषधाचे पर्याय आपण शोधू शकतो व औषधांवरील खर्च वचवू शकतो.

Read More »

स्टेम सेल आशेचा नवा किरण

वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली असली तरी, आजही मानवाला अनेक असाध्य आजारामुळे मृत्यूला सामोरे जावं लागतंय हेदेखील तितकंच खरं आहे, मात्र अशा असाध्य रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्टेम सेल थेरपी सध्या महत्त्वाची मानली जाते.

असाध्य आजारांनी ग्रस्त असणा-या रुग्णांसाठी ही थेरपी आशेचा एक नवीन किरण घेऊन आली आहे. आपल्याच शरीरातील मूळ पेशींच्या आधारावर असलेल्या या थेरपी सध्या जगभरातून विश्वासाने स्वीकारल्या जात आहेत.

स्टेम सेल म्हणजे शरीरातील मूळ पेशी. या पेशी कुठल्याही प्रकारच्या नवीन पेशी निर्माण करण्यास सक्षम असतात. स्टेम सेल हे, प्रसूतीच्या वेळी मातेच्या गर्भ नाळेतून, रक्त किंवा अस्थिमज्जा (बोनमॅरो) मधून प्राप्त करता येतात. यातील पहिला आणि सर्वात चांगला प्राप्तीचा स्रोत म्हणजे मातेच्या गर्भ नाळेतील निघणारे रक्त होय.

ज्या पेशींच्या अभावी रुग्णाला असाध्य आजार जडलेला असतो वा एखाद्या आजारात ज्या अवयवाचं नुकसान झालेलं असतं त्या भागावर स्टेम सेलद्वारे यशस्वी उपचार करणं आता शक्य झालं आहे. त्या रुग्णाच्या शरीरातील रक्तप्रवाहात किंवा शरीराच्या कुठल्याही भागात स्टेम सेल म्हणजे मूळ पेशीचे प्रत्यारोपण करता येते. अशा प्रकारच्या प्रत्यारोपणामुळे अनेक असाध्य रोगांचा उपचार उपलब्ध झाले आहेत.

ज्या रुग्णावर सध्या सर्व प्रकारचे उपचार करूनदेखील यश मिळाले नाही, त्यांच्यावर स्वत:च्या शरीरातून प्राप्त केलेल्या मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाने उपचार केले जात असून त्याचा आजार बरा होण्यात बराच लाभ होत आहे. स्टेम सेल प्रत्यारोपण उपचार पद्धतीने कायम स्वरूपाचे अपंगत्व, जैविक असाध्य आजार, अनुवांशिक आजार कायमचे बरे होऊ शकतात.

आपल्या शरीरात अशा प्रकारच्या मूळ पेशींचा साठा असतोच. बोनमॅरोद्वारे स्टेम सेल प्राप्त करून त्याद्वारे निकामी झालेल्या अवयवाचे कार्य पुन्हा सुरू करणे शक्य होते. यालाच 'ऑर्गन ट्रान्सप्लान्ट' असं म्हटलं जातं. यात काही अवयव वा त्याच्या पेशींच्या ऊती नव्याने तयार करता येतात. मधुमेहासारखा आजार असो वा लिव्हर सोरायसिससारख्या आजारातही याचा प्रभावी लाभ झाला आहे.

आपल्या शरीरात स्वत:चा आजार बरा करण्याची शक्ती असते आणि ती पुनरुज्जीवनाची शक्ती स्टेम सेलद्वारे प्राप्त होते. गुडघ्याच्या जुनाट दुखण्यावरील नि रिप्लेसमेंटची शस्त्रक्रियादेखील यशस्वी झाली आहे.

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे वय वाढते. त्यानुसार आपलं क्रोनोलॉजिकल वय ठरतं. आपलं बायोलॉजिकल म्हणजेच जैविक वय हे काळानुसार वाढत असतं, परंतु आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार प्रत्येकाच्या क्रोनोलॉजिकल वयाची पातळी वेगवेगळी असते. त्यानुसार आपल्या एखादा आजार जडल्यानंतर त्या अवयवाची पुन्हा कार्यक्षम होण्याची मर्यादाही ठरवता येते आणि पद्धतीत स्टेम सेल प्रत्यारोपणाचा खूप लाभ होतो. स्टेम सेलद्वारे अवयव प्रत्यारोपण हे इतर अवयव प्रत्यारोपणापेक्षा कमी खíचक व सुलभ असतं. तसंच यात निराळी जैविक कार्यक्षमता असणा-या अवयवाचं प्रत्यारोपण न होता स्वत:च्या शरीरातील ऊतींपासून बनलेल्या अवयवाचं प्रत्यारोपण केलं जातं, त्यामुळे आजार बरा होण्याची क्षमता अनेक पटीने वाढते.

तसंच अवयव प्रत्यारोपणानंतर होणारा त्रास अनेक पटींनी कमी असल्याचं दिसून येतं व ही कार्यक्षमता कायमस्वरूपी राखली जाते. तसंच या उपचारांना खूप कमी कालावधी लागतो. अशा पद्धतीने ही टु वे उपचार पद्धत असल्याने तिचा अवलंब केला पाहिजे.
अल्झायमर, पाíकसन्स, रक्ताचा कर्करोग अशा असाध्य रोगांवरही उपचार पद्धती बव्हंशी यशस्वी झाल्याचं दिसून आलं आहे. थॅलेसेमियासारख्या आजारात जिथे सतत रक्ताची आवश्यकता असते, अशा आजारात तर पूर्ण उपचार पद्धतीने चांगला बदल घडवता येतो. या आजारात दर सहा महिन्यांनी रक्तसंक्रमण करावे लागते.

यात प्रत्येक वेळी मिळता-जुळता रक्तगट सहज उपलब्ध होईल, याची खात्री नसते. अशा स्थितीत रक्तपेशी प्रत्यारोपणाच्या (ब्लड स्टेम सेल) माध्यमातून या जीवघेण्या रक्तविकारांपासून रुग्णाचे प्राण वाचवता येणे शक्य होत आहे. या उपचाराद्वारे रक्तपेशी आणि रोगप्रितकार शक्ती पुन्हा निर्माण करणे व आजारविषयक निगा राखणे हे प्रत्यारोपणाचे उद्देशही सहज साध्य होताना दिसतात.

अनेक आजारामध्ये उपयुक्त ठरू लागल्याचे समोर आल्यानंतर जगासह भारतात या थेरेपीला लोकमान्यता हळूहळू मिळायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या काळात असाध्य आजारामधील स्टेम सेल उपचार पद्धत सर्वात चांगली उपचार पद्धती आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

Read More »

मेरुदंडासन

हात, पाय, मान, पोट, ओटिपोट, गुडघे अशा सगळ्या अवयवांना या आसनामुळे चांगलाच ताण मिळतो.

योगामॅटवर पाय सोडून बसावे. दोन्ही पाय सरळ आणि ताठ असावेत. आता पायांना गुडघ्यातून वाकवावे. दोन्ही हातांच्या मदतीचे पायांचे अंगठे पकडा आणि हळुवारपणे पायांना वरती आणताना दोन्ही पाय पसरावे. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) दोन्ही पाय ताठ असावे. तसंच हातसुद्धा ताठ असावेत.

दोन्ही पाय जितके स्ट्रेच करता येईल तितके ताणावेत. मात्र गुडघा वाकवू नये. त्याचबरोबर हातसुद्धा सरळ आणि ताठ असावे. पूर्ण शरीराचा तोल वर आणावा. सुरुवातीला जितके जमेल तितकेच सेकंद त्यात थांबावे.

काही सेकंद थांबल्यावर पुन्हा दोन्ही पाय समोर आणावे. हळुवारपणे वाकवावे आणि खाली ठेवावे. जसं आसनास सुरुवात करतो अगदी तसाच शेवट करावा.

श्वास

»  सुरुवातीच्या स्थितीमध्ये श्वास घ्यावा.
»  श्वास आत घेत पायांना ताण द्यावा आणि अंतिम स्थितीमध्ये थांबावे.
»  अंतिम स्थितीमध्ये श्वास नियमित असावा. जमल्यास थांबावे.
»  पायांना खाली आणताना श्वास सोडावा.

वेळ

मेरुदंडासनाचा सराव तीन ते चार वेळा करावा. सुरुवातीला जेवढे सेकंद थांबू शकता तेवढेच सेकंद थांबावं. पूर्ण शरीराचा तोल सांभाळता आला पाहिजे. चित्रात दाखवल्याप्रमाणे पायांना वाकवताना घाई करू नये.

घाई केल्यास पायात क्रॅम्प येण्याची शक्यता असते आणि जितका ताण देता येईल तितकाच ताण द्यावा. पण पाय हे शक्यतो सरळ असावेत. गुडघ्यातून वाकवू नये. तसंच हातसुद्धा सरळ आणि ताठ असावे. जितकं थांबू शकता तितकं थांबावं. आसन करताना जशी आपण सुरुवात करतो तशीच आसन सोडतानासुद्धा करावी.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना रक्तदाब, हार्ट अलायमेंट, स्लिपडिस्क, सायटिका असणा-यांनी हे आसन करू नये.

फायदे

»  पोटाला चांगलाच व्यायाम मिळतो. तसंच लिव्हर अािण ओटिपोटाचे स्नायूंची मजबुती वाढते.
»  या आसनामुळे एकाग्रता वाढते.
»  शरीराचा तोल सांभाळता येतो.
»  पाय, हात आणि पाठीला चांगलाच ताण मिळतो.
»  पायातील थकवा दूर करण्यास मदत होते.
»  गुडघ्यांसाठी हे अतिशय उत्तम आसन आहे.

Read More »

पालेभाज्यांचे औषधी उपयोग

चाकवत ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

कोथिंबीर : उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

कढीलिंब : पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.

पालक : मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.

माठ : हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.

चाकवत : ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

हादगा : खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यांत घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो, असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.

अळू : याच्या पानांचा व दांडय़ांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरीराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होतो.

अंबाडी : मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.

घोळ : मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.

टाकळा : सर्वागाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.

मायाळू : अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी होते. लहान मुलांना थंडी-खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.

तांदूळजा : बाळंतिणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.

मेथी : सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेह-यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.

शेपू : वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.

शेवगा : ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.

सॅलड : या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणा-यांनी नियमित सॅलड खावे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe