Wednesday, November 18, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

खास हिवाळ्यासाठीचे पदार्थ

हिवाळा म्हटलं की, गारेगार वा-याची झुळूक, कुडकुडणारे हात-पाय आणि स्वेटर-हातमोजे-कानटोपी घालत थंडीचा केला जाणारा सामना, असं चित्र डोळय़ांसमोर येतं. मुंबईत सध्या म्हणावा तसा थंडीचा जोर पडलेला नाही. पण हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. गारेगार थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येक जण तयारी करेल. म्हणूनच या थंडीपासून बचाव करण्यासाठी काही स्निग्ध पदार्थाचा मारा करणं आवश्यक आहे.

गुलाबी थंडीचा आनंद प्रत्येक जण घेतो. कुडकुडणा-या थंडीत चहा-कॉफीची मजाच काही औरच. कुणी स्वेटर-शालची खरेदी करेल, तर कुणी कोरडया पडणा-या त्वचेला सुरक्षाकवच पोहोचवण्यासाठी बाजारात उपलब्ध विविध क्रीम्सची खरेदी करेल. केवळ स्वेटर-शाल घालून शरीराला ऊब मिळते का? विविध क्रीममुळे कोरडया पडलेल्या त्वचेला ऊब मिळेल का? उत्तर आहे, नाही. हे सगळं करत असताना शरीरातील सरासरी तापमान राखण्यासाठी योग्य, संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.

हिवाळा तसा आल्हाददायक असतो. या अल्हाददायक वातावरणात आहारही पौष्टीक, रुचकर असल्यास ताजेतवाने वाटेल. त्यामुळे शरीराला थंडीशी सामना करण्यास आपसूकच ऊर्जा मिळेल. हिवाळ्यात वातावरण थंड असतं. थंडीमुळे भूक वाढते. पण या वातावरणात पचनक्षमताही वाढल्याने इतर वेळी पचनास जड वाटणारे पदार्थ हिवाळ्यात सहज पचतात. अशा वेळी दूध, तूप, ताक, लोणी या स्निग्ध पदार्थाचे नियमित सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरतं. योग्य आहारामुळे शरीराला आवश्यक ऊब मिळतेच तसेच वात-कफ दोषांचे संतुलनही होते. चला तर मग पाहूयात हिवाळ्यातील स्निग्ध पदार्थाचा उबदार आहार कसा असावा.

दूध, ताक, लोणी, तूप हे पदार्थ शरीराला स्निग्धता आणि ऊब दोन्ही देतात. असे पदार्थ हिवाळ्यात खाण्यास केव्हाही चांगले. प्रत्येक स्निग्ध पदार्थाची चव म्हणावी तितकी चविष्ट नसते. त्यामुळे हिवाळ्यात दररोजच्या आहारात याचा समावेश करावा तरी कसा ? असा प्रश्न हमखास पडतो.

विशेषत: लहान मुलांना हे स्निग्ध पदार्थ खाऊ घालण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. अशा वेळी या स्निग्ध पदार्थात सुकामेवा, साखर, मध, हळद, मीठ, जिरे, कोथिंबीर, मिरची पूड आदी पदार्थ टाकत त्याची चव बदलत ते मुलांना दिल्यास मुलेही आवडीने खातील. हे स्निग्ध पदार्थ नुसते खाण्याऐवजी चपाती, भाकरी, भात, खिचडीसोबत खावेत.

दूध : आबालवृद्धांच्या आहारात दुधाचा हमखास समावेश असतो. अनेक जण सकाळ-संध्याकाळ दूध आवडीने पितात. पण दुधाला पाहून नाक मुरडणारेही अनेक जण आहेत. अशा वेळी दुधाची चव बदलत ते पिल्यास केव्हाही चांगले. हिवाळ्यात ज्यांना नुसते गरम दूध आवडते त्यांनी ते दररोज एक ग्लास प्यावे.

दुधात साखर घालण्याऐवजी मध टाकून प्यावं. मध हा साखरेला उत्तम पर्याय आहेच, शिवाय मधात स्वत:चे उष्ण गुणधर्म आहे. त्यामुळे ग्लासभर दुधात एक चमचा मध टाकल्यास चविष्ट दूध लागेल. हे दूध मुले आवडीने सेवन करतील. साखर आणि मधऐवजी दूध मसाला हाही एक उत्तम पर्याय आहे. केशर, बदाम, काजू, वेलचीपूड, जायफळ यांचा समावेश असलेला दुधाचा मसाला दुधात टाकावा. दुधासोबत मसाल्यात समाविष्ट सुकामेव्याचे गुणधर्मही शरीराला मिळतील.

ताक : हिवाळ्यातील थंडीत भूक अधिक लागते. थंड वातावरणामुळे पचनही लवकर होते. अशा वेळी ताकाचे सेवन केल्यास उत्तम. पण दररोज त्याचे सेवन करू नये. जेवणानंतर ग्लासभर ताक पिणं चांगलं. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. नुसतं ताक पिण्याऐवजी त्यात आवडीनुसार साखर घालूनही पिऊ शकतो. तर इतर वेळी कोथिंबीर, मीठ, हिंग, जिरे यांचा समावेश असलेला ताकाचा मसाला वापरतही ताकाची चव वाढवता येऊ शकते.

लोणी : ताजे लोणी हे नेहमी रुचकर लागते. ताजे लोणी चवीला गोड असते आणि त्यात ताकाचा अंश असल्याने चविला किंचित तुरट, आंबटही लागते. लोणी पचायला हलके असल्याने हिवाळयात दिवसातून दोन-तीन चमचे नुसते खावे. ज्यांना नुसते लोणी खाणे आवडत नसेल त्यांनी लोण्याचा दररोजच्या आहारात समावेश करावा.

बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत ताजे लोणी चविष्ट लागेल. लोण्यात किंचित मिरचीपूड टाकल्यास लोण्याचीही चव वाढवता येऊ शकते. लोणीमध्ये चमचाभर साखर घालत हे मिश्रण गरम चपाती किंवा भाजलेल्या ब्रेडवर लावून दिल्यास मुले आवडीने खातील.

तूप : साजूक तूप जेवढे चविष्ट, रुचकर आहे तेवढेच ते औषधीही आहे. दररोजच्या आहारात तुपाचा सर्रास वापर होतो. हिवाळ्यात गरम चपाती, भाकरीसोबत तूप खावे. तांदळाच्या भातासोबत तसेच मुगाची किंवा मिक्स डाळींची खिचडी करत त्यासोबत तूप खाल्ल्यास चांगले. मटकी, तूर, उडीद, वाल या आणि इतर कडधान्यांचा वापर करत दर दोन-तीन दिवसांनी त्याची भाजी करावी.

जिरे, लसूण, मोहरी, सूंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात.

थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी सुकामेवा उपायकारक ठरतो. त्यामुळे हिवाळयात सुकामेवा तर खावाच खावा. खारीक, अंजीर, बदाम, जर्दाळू, चारोळी, काजू, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड नुसते खावेत. डिंकाचा लाडून उत्तम. सोबत तिळाची चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्कीही खावी.

सर्दी-खोकल्याच्या वेळीस थंड पाणी न पिता सकाळ संध्याकाळ कोमट पाणी प्यावे.

Read More »

स्वागतापासून ते बिलापर्यंत..

अगदी पाहुण्यांचं स्वागत करण्यापासून ते बिल देण्यापर्यंतचे आपल्याकडचे शंभर एक शिष्टाचार आपण या ठिकाणी पाहिले आहेत. कुठेही बिझनेस मीटिंगला जाताना किंवा बिझनेस मीटिंग अटेंड करताना याचा नक्कीच फायदा होईल.

आतापर्यंत आपण खाताना, पिताना, पाहुण्यांचं स्वागत करताना आणि ऑर्डर देताना काय शिष्टाचार असतात हे आपण पाहिलं आहे. असे कित्येक शिष्टाचार भारतात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र याशिवायही प्रत्येक देशात अनेक शिष्टाचार पाळले जातात. याची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत.

आपण सुरुवातीला आपल्या जागेवर बसल्यानंतर मांडीवर घेतलेला नॅपकीन जेवण झाल्यावर टेबलावर ठेवतो तेव्हा आपलं जेवण झाल्याचं समोरच्याला समजतं.

दातांना तार लावली असेल तर ती नेहमी स्वच्छ ठेवावी. त्यात अडकलेले पदार्थ चांगले दिसत नाहीत. चूळ भरताना काही अडकलं नाही ना याची खात्री करून घ्यावी.

कधी कधी पातळ पदार्थामधले काही कण किंवा तुकडे कप किंवा काचेच्या ग्लासच्या कडांना लागतात. ते अतिशय खराब दिसतं. कित्येक वेळा समोरच्याच्या कपाळावर आठयादेखील पडू शकतात. खासगी जागी किंवा पार्टीमध्ये असं करणं टाळावं.

फ्रेंच, इटालियन, चायनिझ आणि अन्य काही परदेशी रेस्टॉरंटमध्ये असे काही मेन्यू असतात जे आपल्याला माहिती नसतात. तुम्हाला त्यांची माहिती नसेल किंवा तुम्ही यापूर्वी कधीही त्यातला पदार्थ खाल्ला नसेल तर तुमच्या समोर आलेल्या मेन्यूत तुम्हाला काय घातलं आहे, याची माहिती हवी असेल तर तुम्ही त्याबद्दल विचारू शकता.

तुम्ही काय ऑर्डर करता हे तुम्ही पाहुणे आहात की होस्ट आहात यावर अवलंबून असतं. तुम्ही कोणत्या प्रकारचं जेवण ऑर्डर करणं पसंत करतात, किती जणांचं टेबल असणार आहे, जेवायला बोलावलेले पाहुणे पुरुष आहेत की स्त्रिया, त्यांची बसण्याची व्यवस्था आदी गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं. या सगळ्या गोष्टी होस्ट किंवा आदरातिथ्य करणारी व्यक्ती ठरवत असते. मोठा ग्रुप असल्यास सव्‍‌र्ह करणारा माणूस ठरवतो कोणापासून वाढायला सुरुवात करायची ते. शक्यतो महिलांना प्रथम वाढलं जातं.

तुमचं संपूर्ण वेळेचं नियोजन ठरलं असेल तर तशी सव्‍‌र्हरला पूर्वकल्पना द्या. जास्त वेळ नसेल तर पटकन काहीतरी होणारा पदार्थ सव्‍‌र्ह करायला सांगा.

चीझ ऑर्डर करताना : तुम्हाला जेवताना चीझ हवं असेल तर वेटरला आधीच सांगून ठेवा. फ्रीजमध्ये असेल तर ते जेवणाची ऑर्डर देतानाचा त्याला काढून ठेवायला सांगावं. म्हणजे ते साधारण तापमानाला येईल. म्हणजे तुम्हाला ते खाणं अगदी सहज शक्य होईल.

तुम्ही आदरातिथ्य करणार असाल तर तुम्ही आमंत्रित केलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या आधी पोहोचणं आवश्यक आहे. त्यांच्या स्वागताला तुम्ही रेस्टॉरंटच्या दरवाजापाशी किंवा टेबलापाशी थांबणं आवश्यक आहे. टेबलापाशी थांबणार असाल तर तुमच्या टेबलाचा नं. किंवा ग्रुपचं नाव रिसेप्शनपाशी देणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या पाहुण्यांना नेमकं कोणत्या टेबलापाशी यायचं आहे याची कल्पना येईल.

एखाद् दुसरा ग्रुपमधला माणूस उशिरा येणार असेल तर बाकीच्यांना त्याच्यासाठी ताटकळत ठेवू नये. त्यांना बसण्याची विनंती करावी. पंधरा ते वीस मिनिटं थांबूनही त्या व्यक्ती आल्या नाहीत तर मात्र जेवणाची ऑर्डर देऊन टाकावी.

तुमच्या प्लेटला तुमच्या हातांनी घेरू नका.

कप किंवा ग्लास उचलताना तुमची बोटं वळवू नका.

वेटर खाद्यपदार्थ सव्‍‌र्ह करत असेल तेव्हा तुमच्या डाव्या हातात काटा चमचा आणि उजव्या हातात चमचा धरावा. प्लेटमध्ये ठेवल्यास त्याला वाढायला त्रास होतो.

जेव्हा आठ किंवा त्यापेक्षा जास्त माणसं जेवायला असतील तेव्हा होस्टला आणि आलेल्या पाहुण्यांना वाढेपर्यंत थांबावं. सगळ्यांना वाढून झाल्यावरच सुरुवात करावी. मोठया कार्यक्रमात तुमच्या आजूबाजूच्यांना वाढल्यावरच तुम्ही घ्यावं.

ब्रेड तुमच्यापासून लांब असेल तर तो तुमच्याजवळ देण्याची आजूबाजूच्यांना विनंती करावी. तसंच आपला घेऊन झाल्यावर तो एका कपडयाने झाकून ठेवावा.

तुम्हाला चावणं शक्य होईल इतकाच घास घ्यावा. कारण उगाचच मोठा घास घेऊन खाणं अजिबात चांगलं दिसत नाही.

बिल देताना तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही त्याची वेटरला आधीच कल्पना द्या. माफी मागून टेबलापासून बाजूला व्हा आणि थेट मॅनेजरशी बोला.

तुम्ही टेबलक्लॉथवर किंवा जमिनीवर काही पदार्थ सांडले तर तुमच्या जवळ असलेल्या नॅपकिनने ते उचला आणि वेटरला दुसरा नॅपकिन देण्याची विनंती करा. तसं तुमच्या ग्लासवर काही उडाल्यास ते क्लिन करायलादेखील नॅपकिनचा वापर करा.

तुम्ही ऑर्डर दिलेला पदार्थ त्याप्रमाणे नसेल किंवा त्यात काही पडलेलं तुम्हाला सापडलं तर तुम्ही ते तुम्ही त्वरित तुम्हाला जेवण सव्‍‌र्ह करणा-या वेटरला सांगावं. आणि ताबडतोब रिप्लेस करायला सांगावं.

नॅपकिन खाली पडल्यास तुम्ही तो स्वत: उचलावा. मात्र उचलताना टेबलाला धक्का लागणार याची काळजी घ्यावी. असं होत नसेल तर वेटरला ताबडतोब दुसरा नॅपकिन देण्याची विनंती करावी.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe