Tuesday, March 3, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

होळी खेळताय, पण जपून

अवघ्या दोन दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. आपल्याकडे धुळवडीच्या दिवशीच रंगपंचमीचा आस्वाद लुटला जातो. कित्येक जण रंगांचा वापर करताना अनैसर्गिक रंगांना प्राधान्य देतात. परिणामी त्वचेचं आणि केसांचं नुकसान होतं. हे नुकसान कित्येक वेळा दीर्घकाळ राहतं. या रंगांमुळे नेमकं काय होतं, असं होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि होळीसाठी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत हे जाणून घेऊया.
होळी, हा रंगाचा सण आहे, जो रंगांच्या अनेक छटांना आपल्यासमोर एकत्र आणतो आणि सगळ्यांना वेगवेगळ्या रंगांत रंगवून टाकतो. हल्ली होळी सर्वत्र खेळली जात असली तरीही होळी सणाचं पूर्वीचं सौंदर्य हरवलं आहे.

उत्सवापेक्षा हा सण रंगांच्या वापरामुळे काही अंशी धोकादायकही बनला आहे. हे रंग आपल्या केसांना व त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. म्हणूनच, उत्सवाचा बेरंग होण्याआधी आपल्याला या नुकसानापासून स्वत:ला वाचवणं आवश्यक आहे.

साधारणपणे प्रत्येक रंगामध्ये रासायनिक द्रव्ये असतात. काहींमध्ये तर तांबं, शिसं, चांदी, अ‍ॅल्युमिनिअम व आयोडिनही असतं. अशा रासायनिक रंगांचा वापर केल्यामुळे आपल्या केसांचं मोठं नुकसान होतं.

या रसायनामुळे आपले केस केवळ पांढरे होत नाहीर तर केस दुभंगणे, केस तुटणे किंवा गळणे यासारखे विकारही होऊ शकतात.

कारण काही रासायनिक रंग आपल्या केसांवरील आवरणाला (क्युटिकल) नुकसान पोहोचवतात. जेणेकरून केसांची मुळं कमकुवत बनतात. परिणामी केस सहजपणे तुटू शकतात. होळी खेळणा-या अनेकांना होळीनंतर केस तुटणे व केसांच्या मुळांचं नुकसान होणे अशा दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं.

केवळ केसच नव्हे तर ही रसायनं टाळूच्या त्वचेलाही नुकसान पोहोचवू शकतात. काही जणांसाठी केसांच्या या समस्या दीर्घकाळापर्यंत राहतात.

केसांबरोबरच त्वचेलाही नुकसान होऊ शकतं. रंगातील असुरक्षित, अनसíगक रंगद्रव्यांमुळे त्वचेवर विविध प्रकारचे चट्टे निर्माण होतात किंवा अ‍ॅलर्जी होऊन खाजही येते. हे रंग अंघोळीनंतरही निघत नाहीत.

हे रंग दीर्घकाळ त्वचेवर राहिल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ त्वचेवर राहतात. काही विशिष्ट रंग डायमध्ये वापरल्या जाणा-या रसायनांनी युक्त असतात. हे आपल्या नाजूक, संवेदनशील त्वचेसाठी फार घातक असतात व ते वापरातही आणू नयेत.

अशा दुष्परिणामांचा दीर्घकाळ सामना करण्याऐवजी आपण होळी खेळण्यापूर्वीच काही काळजी घेतली तर आपण या सणाचा आनंद द्विगुणित करू शकू यात काही शंका नाही.

होळीच्या वेळेस कुठली काळजी घ्याल?

» त्वचेसाठी योग्य, असे हर्बल, नसíगक रंग किंवा नसíगक उत्पादनांचा वापर करा.
» सिंथेटिक रंग त्वचेवर दाह निर्माण करतात, त्यामुळे आंधळेपणाही येतो, म्हणून योग्य काळजी घ्या.
» अ‍ॅलर्जी असल्यास त्वरित योग्य ते उपचार घ्यावेत.
» रंग डोळ्यांत जाऊ नयेत म्हणून अशा वेळी डोळे मिटून घ्यावेत.
» रंग खेळताना तुमच्या शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल, असे कपडे घालावेत.
» होळी खेळायला जाण्याआधी तुमच्या केसाला व त्वचेला खोबरेल तेल लावावं.
» घराबाहेर पडण्याआधी हात, पाय, मान आणि चेह-यावर सनस्क्रीन लोशन लावणं आवश्यक आहे.
» डोक्यावर पाणी घेण्याआधी उडालेला रंग झटकून टाका.
» रंग काढण्यासाठी त्वचेवर साबण जबरदस्तीने घासू नका. त्याऐवजी दुधात सोयाबीनचं पीठ किंवा बेसन पीठ घालून ते हात, पाय आणि चेह-याला लावावं.
» केस कोमट पाण्याने व सौम्य अशा श्ॉम्पूने धुवावेत. त्यानंतर केसांना कंडिशनर लावा. जेणेकरून कंडिशनर तुमच्या केसांना मऊ बनवेल व रासायनिक रंगामुळे केसांना येणा-या कडकपणापासून केसांचं संरक्षणही होईल.
» धुतलेल्या केसांना टॉवेलने हलक्या हाताने पुसून कोरडं करा, केस कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर टाळावाच.

नसर्गिक रंग कसे तयार कराल?

होळी खेळण्यासाठी नसíगक रंगांचा वापर करणे सर्वात उत्तम. त्यामुळे अन्य गोष्टींवर व तुमच्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. गुलाल व अन्य नसर्गिक पाणीयुक्त रंग तुलनेने आपल्या शरीरासाठी सुरक्षित मानले जातात.

रासायनिक रंग, खासकरून कायमस्वरूपी रंग वापरणं टाळायलाच हवं. चंदेरी व चमकणारा हिरवा रंग किंवा गडद सोनेरी रंग, हे रसायनाने बनलेले असतात. ते वापरू नका. भाज्यांपासून घरी तयार केलेले रंग वापरणे सर्वात सुरक्षित आहे.

» लालसर चंदन पावडर ही एक उत्तम पर्याय असू शकते.
» बिटाचे पाणी हाही एक चांगला ओला रंग आहे.
» पालकाच्या पानाच्या कोरडय़ा पावडरीपासून सुंदर हिरवा रंग तयार होतो.
» पिवळी हळदीची पावडरदेखील एक नसíगक सुंदर पिवळा रंग तयार करते.
» वाळलेली झेंडूची फुले व त्यांची पेस्ट किंवा लाल जास्वंद ही अनसíगक रंगांसाठी उत्तम पर्याय आहे.
होळी खेळताना फक्त एवढंच लक्षात घ्या, रंग सुरक्षिततेने खेळा. तुमच्या त्वचेला, डोळ्यांना व केसांना अनसíगक रंगांपासून होणा-या दुष्परिणामापासून सावध राहा.

Read More »

उत्तम टॉनिक शिंगाडा

शिंगाडा हे वरून हिरवं आणि आतून पांढ-या रंगाचं असतं. मात्र ते सुकल्यावर काळ्या रंगांचं होतं. यातला पांढरा भाग हा खोब-यासारखा लागतो. इंग्रजीत 'वॉटर चेस्ट नट', 'वॉटर काल्ट्रॉप', 'बफेलो नट', 'बॅट नट' या नावांनी तर हिंदीत 'सिंघाडा' किंवा 'पानी फल' आणि संस्कृतमध्ये 'श्रंगाटक' या नावांनी ओळखलं जातं.

हे त्रिकोणी आकाराचं फळ असून त्याच्या शेंगांवर काटे असतात. हे फळ सुकवून, सोलून नंतर त्याचं पीठ तयार केलं जातं. साल जाड पण तोडायला मुलायम असते. याच्या फळाप्रमाणेच सालीचेही खूप उपयोग आहेत. म्हणूनच शिंगाडा हे फळ उत्तम टॉनिक समजलं जातं.

» सतत तहान लागत असेल तर ती कमी करण्याची शक्ती या फळात आहे.
» जुलाब होत असल्यास शिंगाडय़ाचं फळ किंवा त्याची पावडर ज्यूसमधून खाल्ल्याने आराम पडतो.
» कावीळ झालेल्या रुग्णांनी हे फळ कच्च किंवा त्याचा ज्यूस करून त्याचं सेवन करावं. कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.
» शरीराला नको असलेले टॉक्सिन शरीराबाहेर टाकणाचं काम हे टॉनिक करतं.
» यात आयोडिन आणि मँगनिझ असल्यामुळे थायरॉड गं्रथीचं काम सुरळीत राहण्यास मदत होते.
» अँटिऑक्सिडंटप्रमाणेच ते अँटिबॅक्टिरिअल, अँटिवायरल आणि अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतं. थकवा येणे, तोंडाला चव नसणे यासारख्या विकारांसाठी हा उत्तम उपाय आहे.
» मूत्रसंसर्गावरही शिंगाडा हे अतिशय चांगलं औषध आहे.
» पोटाच्या सर्व विकारांवर शिंगाडय़ाचा रस अतिशय गुणकारी आहे. अपचन झाल्यास याचा रस प्यायल्याने त्वरित आराम पडतो.
» शरीरात उष्णता वाढल्यास शिंगाडय़ाचा रस प्यावा, उष्णता बाहेर पडण्यास मदत होते.
» खोकला झाल्यास याची पावडर करून ती पाण्यातून किंवा ज्यूसमधून घेतल्याने कफ बाहेर पडण्यास मदत होते.
» भूक लागत नसल्यास हे पळ कच्चं किंवा ज्यूसमधून घ्यावं. भूक वाढते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींची भूक वाढण्यास मदत होते.
» गरोदर महिलांनी हे फळ आवर्जून खावं. कारण गरोदरपणात वाढणारा उच्च रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते आणि गर्भाची वाढही चांगली होते. तसंच प्रसूतीनंतरही याची पावडर महिलेला दिल्यास स्तनपानासाठी तिला मदत होते.
» रक्त शुद्ध करण्याची क्षमता असल्याने हे फळ नियमित सेवन करावं.
» शरीरावर कुठेही मुका मार लागून सूज आल्यास त्यावर शिंगाडय़ाच्या सालीची पावडर करून ती पाण्यातून लावल्याने लवकर आराम मिळतो.
» नियमित सेवनाने त्वचेचा पोत सुधारतो.
» गोवर झालेल्या रुग्णांनी शिंगाडा पाण्यात उकळून ते पाणी ६ ते ९ दिवस घेतल्यास आराम पडतो.
» एक्झिमा झाल्यास शिंगाडय़ाच्या बियांची पूड करून ती लिंबाच्या रसात घोळवून त्यावर लावावी.
» शिंगाडा केसांच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त आहे, कारण यात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले पोटॅशियम, झिंक, ब आणि ई जीवनसत्त्व असतं. जेणेकरून केसांचं आरोग्य सुधारतं.
» हे फळ नियमित खाल्ल्याने वजन कमी करण्यासाठीही मदत होते.

Read More »

जीवघेणा रक्तक्षय

आपल्या रक्ताला लाल रंग हा त्यातील हिमोग्लोबीनमुळे येतो हे सर्वश्रृतच आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून हे आपण ऐकतच आलो आहोत. हे हिमोग्लोबीन म्हणजे काय? आणि या हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया किंवा रक्तक्षयसारख्या आजाराला सामोरं जावं लागतं. हा रक्तक्षय नेमका कशामुळे होतो आणि असं कमी होऊ नये म्हणून नेमकं काय केलं पाहिजे हे जाणून घेऊया.
संजय चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. घरापासून त्याला लांब राहावं लागत होतं. त्यामुळे त्याच्या खाण्या-पिण्याचे किंवा जेवणाचे खूपच हाल होत होते. मात्र त्याचा परिणाम हळूहळू त्याच्या शरीरावर होत होता.

दिवसेंदिवस तो बारीक होत चालला होता. प्रथमदर्शी याचं कारण समजत नव्हतं. मात्र एकदा संजयला चक्कर आली तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी त्याच्या शरीरातलं हिमोग्लोबीन कमी झाल्याचं समजलं.

आपल्याकडे हिमोग्लोबीन कमी झालं तरी त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र रक्तातील या हिमोग्लोबीनची पातळी कमी झाली की त्यामुळे शरीराला विविध आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा या हिमोग्लोबीनविषयी आपण जाणून घेऊया.

हिमी आणि ग्लोबीन या दोन प्रथिनद्रव्यांचं मिश्रण म्हणजे हिमोग्लोबीन होय. पैकी ग्लोबीन हे गोलाकार प्रथिन असून त्यात खोलवर लोहाचा समावेश असतो, जो ऑक्सिजन पुरवठय़ाचा मुख्य स्रेत असतो. रक्त घटक म्हणजे मुख्यत: लाल रक्त पेशी आणि पांढ-या पेशी. ज्यात लुकोसायटस प्लेटलेटचा समावेश असतो.

लाल पेशी या सर्वात मुबलक प्रमाणात असतात. ज्यात हिमोग्लोबीन अर्थात लोहयुक्त प्रथिनाचा समावेश असतो. प्रत्येक लाल पेशीमध्ये अंदाजे २८० हिमोग्लोबीनचे रेणू असतात ज्यामुळे लाल रंग येतो. जेव्हा अशक्तपण येतो तेव्हा रक्तातील लाल पेशींचं किंवा ज्या ऑक्सिजना पुरवठा करतात त्या पेशींचं प्रमाण कमी होतं.

परिणामी थकवा जाणवणे, अशक्तपण येणे, श्वास घेताना त्रास होणे आणि काहीही करण्याची ताकद शरीरात नसणे आदी लक्षणं दिसायला लागतात. तेव्हा समोरच्या व्यक्तीला अ‍ॅनिमिया झाला असल्याचं समजतं. सर्वात पहिल्यांदा आढळून येणारं लक्षणं म्हणजे गोंधळ उडणे किंवा अधिकाधिक तहान लागणे.

अ‍ॅनिमिया नेमक्या कोणत्या कारणांमुळे होतो ते जाणून घेऊया -
» शर्रीराला झालेल्या जखमेमुळे रक्ताची कमतरता जाणवू लागते. जेणेकरून लाल पेशींची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी होतं. लाल पेशींची निर्मिती कमी झाली की साहजिकच शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होतं. मग हळूहळू जीवनसत्त्व 'बी'ची कमरतचा निर्माण होते.

परिणामी मलेरियासारखे संक्रमण करणारे आजार लगेच शरीराची पकड घेतात. लाल रक्त पेशींचा आकार आणि त्यांची संख्या यावरही अ‍ॅनिमियाची स्थिती अवलंबून असते. संख्या कमी किंवा लहान असेल तर माइक्रोलिक अ‍ॅनिमिया आणि मोठी असल्यास मॅक्रोलिक अ‍ॅनिमिया संबोधला जातो.

लक्षणं
» अशक्तपणा
» एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न होणे
» धुसफूस करणे
» पायात गोळे येणे
» श्वास घ्यायला त्रास होणे
» त्वचा पांढरी पडणे किंवा ेष्मल दिसणे

निदान कसे केले जाते?

उपचारादरम्यान लाल रक्तपेशींची संख्या कशी वाढेल यावर प्रामुख्याने भर दिला जातो. त्यासाठी फॉलिक अ‍ॅसिड किंवा व्हिटॅमिन बी-१२ दिले जाते. संतुलित आहार घेतल्यानेही लाल रक्त पेशींचं प्रामण वाढण्यास मदत होते. आहारात काय गोष्टींचा समावेश करता येईल ते पाहूया -

» आहारात अधिकाधिक सलाडय़चा वापर करावा
» लिंबाच्या रसाचाही आहारात समावेश करावा
» जेवण्याच्या वेळी चहा पिणं टाळावं

अ‍ॅनिमिया किंवा रक्तक्षय झालेल्या रुग्णांनी कशा प्रकारे आहार घेतला पाहिजे हे जाणून घेऊया -

अशा रुग्णांनी थोडय़ा थोडय़ा वेळाने काही ना काही खाणं आवश्यक असतं. त्यात पहाटेपासून अगदी रात्री झोपेपर्यंत आहाराचा समावेश करावा. एका रुग्णाचा आठवडय़ाचा आहार कसा असावा ते पुढीलप्रमाणे -

» सकाळी उठल्यावर टोमॅटो आणि गाजर ज्यूसचं सेवन करावं. त्यानंतर पुदिन्याच्या चटणीसोबत पोहे घ्यावेत. त्यानंतर थोडा वेळाने एक संत्रं घ्यावं. दुपारी जेवणात ब्रोकोली आणि मशरूम यांचा समावेश असलेला भात आणि टोमॅटो सूप. संध्याकाळी दूध आिंण गाजराचे काप आणि रात्रीच्या जेवणात उकडलेल्या भाज्यांचा समावेश करावा.

» दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर बीट, गाजर आणि संत्र्याचा ज्यूस घ्यावा. त्यानंतर नाचणीची लापशी घ्यावेत. त्यानंतर थोडा वेळाने एक पेरू खावा. दुपारी जेवणात मेथीची भाजी आणि फुलक्यांचा समावेश करावा. संध्याकाळी खारकांची खीर आणि रात्रीच्या जेवणात काळ्या वाटाण्याची आमटी आणि फुलका यांचा समावेश करावा.

» तिस-या दिवशी गाजर, पालक आणि लिंबाचा रस सकाळी उठल्यावर द्यावा. त्यानंतर न्याहारीला इडली आणि चटणी खावी. त्यानंतर एक वाटी कलिंगडही खावं. दुपारच्या जेवणात सोयाबीनचा उपमा आिंण पुदिन्याचं रायतं यांचा समावेश असावा. संध्याकाळी फ्रुट जेली आणि रात्री शेंगाच्या भाजीसोबत भात घ्यावा.

» चौथ्या दिवशी उठल्याबरोबर ग्रीन टीचं सेवन करावं. न्याहारीत बाजरीची भाकरी बटाटय़ाची भाजी आणि दहय़ाचा समावेश करावा. दुपारी जेवणापूर्वी एक सफरचंद खावं. जेवणात पालक पुलाव खावा. संध्याकाळी दूध आणि तिळाचा एखादा लाडू आणि रात्रीच्या जेवणात तळलेल्या बिटाच्या तुकडय़ांसह टोस्ट आणि टोमॅटो सूप.

» पाचव्या दिवशी सकाळी उठल्यावर गव्हांकुराचा रस, न्याहारीत मेथीचा ढोकळा त्यानंतर एक आवळा, दुपारी जेवणात मोड आलेल्या कडधान्याचा डोसा आणि सांबार, संध्याकाळी अंजीर बासुंदी आणि रात्रीच्या जेवणात तिळाची पोळी आणि कढी यांचं सेवन करावं.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe