आपल्या रक्ताला लाल रंग हा त्यातील हिमोग्लोबीनमुळे येतो हे सर्वश्रृतच आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून हे आपण ऐकतच आलो आहोत. हे हिमोग्लोबीन म्हणजे काय? आणि या हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया किंवा रक्तक्षयसारख्या आजाराला सामोरं जावं लागतं. हा रक्तक्षय नेमका कशामुळे होतो आणि असं कमी होऊ नये म्हणून नेमकं काय केलं पाहिजे हे जाणून घेऊया. संजय चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. घरापासून त्याला लांब राहावं लागत होतं. त्यामुळे त्याच्या खाण्या-पिण्याचे किंवा जेवणाचे खूपच हाल होत होते. मात्र त्याचा परिणाम हळूहळू त्याच्या शरीरावर होत होता. दिवसेंदिवस तो बारीक होत चालला होता. प्रथमदर्शी याचं कारण समजत नव्हतं. मात्र एकदा संजयला चक्कर आली तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी त्याच्या शरीरातलं हिमोग्लोबीन कमी झाल्याचं समजलं. आपल्याकडे हिमोग्लोबीन कमी झालं तरी त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र रक्तातील या हिमोग्लोबीनची पातळी कमी झाली की त्यामुळे शरीराला विविध आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा या हिमोग्लोबीनविषयी आपण जाणून घेऊया. हिमी आणि ग्लोबीन या दोन प्रथिनद्रव्यांचं मिश्रण म्हणजे हिमोग्लोबीन होय. पैकी ग्लोबीन हे गोलाकार प्रथिन असून त्यात खोलवर लोहाचा समावेश असतो, जो ऑक्सिजन पुरवठय़ाचा मुख्य स्रेत असतो. रक्त घटक म्हणजे मुख्यत: लाल रक्त पेशी आणि पांढ-या पेशी. ज्यात लुकोसायटस प्लेटलेटचा समावेश असतो. लाल पेशी या सर्वात मुबलक प्रमाणात असतात. ज्यात हिमोग्लोबीन अर्थात लोहयुक्त प्रथिनाचा समावेश असतो. प्रत्येक लाल पेशीमध्ये अंदाजे २८० हिमोग्लोबीनचे रेणू असतात ज्यामुळे लाल रंग येतो. जेव्हा अशक्तपण येतो तेव्हा रक्तातील लाल पेशींचं किंवा ज्या ऑक्सिजना पुरवठा करतात त्या पेशींचं प्रमाण कमी होतं. परिणामी थकवा जाणवणे, अशक्तपण येणे, श्वास घेताना त्रास होणे आणि काहीही करण्याची ताकद शरीरात नसणे आदी लक्षणं दिसायला लागतात. तेव्हा समोरच्या व्यक्तीला अॅनिमिया झाला असल्याचं समजतं. सर्वात पहिल्यांदा आढळून येणारं लक्षणं म्हणजे गोंधळ उडणे किंवा अधिकाधिक तहान लागणे. अॅनिमिया नेमक्या कोणत्या कारणांमुळे होतो ते जाणून घेऊया - » शर्रीराला झालेल्या जखमेमुळे रक्ताची कमतरता जाणवू लागते. जेणेकरून लाल पेशींची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी होतं. लाल पेशींची निर्मिती कमी झाली की साहजिकच शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होतं. मग हळूहळू जीवनसत्त्व 'बी'ची कमरतचा निर्माण होते. परिणामी मलेरियासारखे संक्रमण करणारे आजार लगेच शरीराची पकड घेतात. लाल रक्त पेशींचा आकार आणि त्यांची संख्या यावरही अॅनिमियाची स्थिती अवलंबून असते. संख्या कमी किंवा लहान असेल तर माइक्रोलिक अॅनिमिया आणि मोठी असल्यास मॅक्रोलिक अॅनिमिया संबोधला जातो. लक्षणं » अशक्तपणा » एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न होणे » धुसफूस करणे » पायात गोळे येणे » श्वास घ्यायला त्रास होणे » त्वचा पांढरी पडणे किंवा ेष्मल दिसणे निदान कसे केले जाते? उपचारादरम्यान लाल रक्तपेशींची संख्या कशी वाढेल यावर प्रामुख्याने भर दिला जातो. त्यासाठी फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी-१२ दिले जाते. संतुलित आहार घेतल्यानेही लाल रक्त पेशींचं प्रामण वाढण्यास मदत होते. आहारात काय गोष्टींचा समावेश करता येईल ते पाहूया - » आहारात अधिकाधिक सलाडय़चा वापर करावा » लिंबाच्या रसाचाही आहारात समावेश करावा » जेवण्याच्या वेळी चहा पिणं टाळावं अॅनिमिया किंवा रक्तक्षय झालेल्या रुग्णांनी कशा प्रकारे आहार घेतला पाहिजे हे जाणून घेऊया - अशा रुग्णांनी थोडय़ा थोडय़ा वेळाने काही ना काही खाणं आवश्यक असतं. त्यात पहाटेपासून अगदी रात्री झोपेपर्यंत आहाराचा समावेश करावा. एका रुग्णाचा आठवडय़ाचा आहार कसा असावा ते पुढीलप्रमाणे - » सकाळी उठल्यावर टोमॅटो आणि गाजर ज्यूसचं सेवन करावं. त्यानंतर पुदिन्याच्या चटणीसोबत पोहे घ्यावेत. त्यानंतर थोडा वेळाने एक संत्रं घ्यावं. दुपारी जेवणात ब्रोकोली आणि मशरूम यांचा समावेश असलेला भात आणि टोमॅटो सूप. संध्याकाळी दूध आिंण गाजराचे काप आणि रात्रीच्या जेवणात उकडलेल्या भाज्यांचा समावेश करावा. » दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर बीट, गाजर आणि संत्र्याचा ज्यूस घ्यावा. त्यानंतर नाचणीची लापशी घ्यावेत. त्यानंतर थोडा वेळाने एक पेरू खावा. दुपारी जेवणात मेथीची भाजी आणि फुलक्यांचा समावेश करावा. संध्याकाळी खारकांची खीर आणि रात्रीच्या जेवणात काळ्या वाटाण्याची आमटी आणि फुलका यांचा समावेश करावा. » तिस-या दिवशी गाजर, पालक आणि लिंबाचा रस सकाळी उठल्यावर द्यावा. त्यानंतर न्याहारीला इडली आणि चटणी खावी. त्यानंतर एक वाटी कलिंगडही खावं. दुपारच्या जेवणात सोयाबीनचा उपमा आिंण पुदिन्याचं रायतं यांचा समावेश असावा. संध्याकाळी फ्रुट जेली आणि रात्री शेंगाच्या भाजीसोबत भात घ्यावा. » चौथ्या दिवशी उठल्याबरोबर ग्रीन टीचं सेवन करावं. न्याहारीत बाजरीची भाकरी बटाटय़ाची भाजी आणि दहय़ाचा समावेश करावा. दुपारी जेवणापूर्वी एक सफरचंद खावं. जेवणात पालक पुलाव खावा. संध्याकाळी दूध आणि तिळाचा एखादा लाडू आणि रात्रीच्या जेवणात तळलेल्या बिटाच्या तुकडय़ांसह टोस्ट आणि टोमॅटो सूप. » पाचव्या दिवशी सकाळी उठल्यावर गव्हांकुराचा रस, न्याहारीत मेथीचा ढोकळा त्यानंतर एक आवळा, दुपारी जेवणात मोड आलेल्या कडधान्याचा डोसा आणि सांबार, संध्याकाळी अंजीर बासुंदी आणि रात्रीच्या जेवणात तिळाची पोळी आणि कढी यांचं सेवन करावं. |
No comments:
Post a Comment