Showing posts with label थायरॉईड एक महत्त्वाची ग्रंथी. Show all posts
Showing posts with label थायरॉईड एक महत्त्वाची ग्रंथी. Show all posts

Wednesday, December 16, 2015

थायरॉईड एक महत्त्वाची ग्रंथी

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

थायरॉईड एक महत्त्वाची ग्रंथी
आपल्या शरीरातील अनेक ग्रंथींमधली एक महत्त्वाची ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी. ही ग्रंथी शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रित राखण्याचं काम करते. मात्र या ग्रंथीच्या कमतरतेमुळे किंवा अतिरिक्त प्रमाणामुळे शरीराचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. अशा या महत्त्वपूर्ण ग्रंथीविषयी जाणून घेऊ या.

कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहतो ज्या एकदम बारीक होत जातात किंवा काही केल्या त्यांचं वजन कमी होत नसतं. किंवा काही व्यक्तींच्या गळ्याशी मोठी गाठ आलेली दिसते.
इतकंच नाही तर मासिक पाळी अनियमित होणे, मूल न होणे, केस गळणे तसंच खूप घाम या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. असं का होतं हे आपल्याला कळत नाही. अशा वेळी त्या व्यक्ती थायरॉईडचा शिकार झालेल्या असतात. अशा या थायरॉईडविषयी जाणून घेऊ या.
वात, कफ आणि मेद जेव्हा दूषित होत. तेव्हा ते सगळं गळ्यामध्ये जमा होतात. त्यानंतर त्या ठिकाणी सूज येते. हळूहळू ही सूज वाढत जाते. यालाच आपण गलगंड झालं असं म्हणतो. आपल्या शरीरात काही अंत:स्रव करणाऱ्या ग्रंथी असतात, ज्यांचं काम शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखणं असं असतं. या ग्रंथींपैकीच एक ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी होय. ही ग्रंथी गळ्याच्या मधल्या भागात असते. यातून दोन प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात एक टी३ आणि दुसरं म्हणज टी ४. या ग्रंथी आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमला नियंत्रित करण्याचं काम करतात.
टी३ हे हार्मोन १० ते ३० मायकोग्राम आणि टी४ हे ६० ते ९० मायकोग्राम अशा स्वरूपात बाहेर पडत असतं. निरोगी व्यक्तीमध्ये या दोन्ही हार्मोन्सची मात्रा प्रमाणात असते. जेव्हा यात काही बिघाड होतो त्यावेळी या ग्रंथींचं प्रमाण हे वाढतं किंवा कमी होतं. आणि या दोन्ही हार्मोन्सना नियंत्रित करण्याचं काम टीएसएच (थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन) नावाच्या हार्मोन्सला नियंत्रित ठेवते. इंडियन थायरॉईड सोसायटीच्या नुसार आज भारतात जवळपास ४.२ करोड भारतीय या थायरॉईड ग्रंथींमुळे त्रस्त आहेत तर ६० ते ७० टक्के लोकांना आपल्याला थायरॉईड आहे याची मुळात कल्पनाच नसते.
थायरॉईड होण्याची कारणं कोणती?
» हा अनुवंसिक आजार आहे.
» खाण्यात आयोडिनचं प्रमाण कमी असल्यास
» अति चिंता करणे
» खाण्याच्या चुकीच्या पद्धती
» रात्री जागरण करणे
» तसंच मूड डिसऑर्डरची मात्र दीर्घकाळ घेतल्याने हार्मोन्सची मात्र कमी होत जाते त्यामुळे थायरॉईडच्या ग्रंथीचं संतुलन बिघडतं.
थायरॉईडचे प्रकार कोणते?
थायरॉईडचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे हाईपोथायराईडिज्म आणि दुसरा म्हणजे हायपरथायराईडिज्म. पैकी टी४ या थायरॉक्सिनची हार्मोनची पातळी कमी झाली तर टीएसएचची पातळी वाढते तेव्हा त्याला हाईपोथायराईडिज्म असं म्हणतात. तर टी४ या थायरॉक्सिनची हार्मोनची पातळी वाढल्यास टीएसएचची पातळी कमी होते तेव्हा या प्रकाराला हायपरथायराईडिज्म असं संबोधलं जातं. गलगंड हा देखील याचाच एक भाग आहे, असं म्हटलं तरी चालेल.
लक्षणं
» भूक कमी लागणे पण वजनात वाढ होत जाणे
» हृदयाचे ठोके कमी होणे
» गळ्याच्या आसपासच्या भागात सूज येणे
» आळस वाटणे
» अशक्तपणा जाणवणे
» डिप्रेशनमनध्ये जाणे
» घाम कमी येणे
» त्वचा कोरडी होणे
» अधिक थंडी लागणे अधिक म्हणजे उन्हाळ्यातही थंडी लागणे
» केसांच्या गळतीत वाढ होणे
» स्मरणशक्ती कमी होणे
» स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते. काही वेळा सुरुवातीला मासिक पाळी हळूहळू कमी होते आणि बंद होते.
» काही लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होते
काय करावं?
» नियमित व्यायाम करावा.
» हा आजार गळ्याशी निगडित असल्यामुळे खाकरणे, किंवा गळ्यात कंपन निर्माण करणारी आसनं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.
» शांत आणि स्वस्थ राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा. ताणतणाव, चिंता यापासून स्वत:ला दूर ठेवा.
» जीवनशैली व्यवस्थित ठेवा
» रागावर नियंत्रण ठेवा.
काय खावं?
» हलका आहार घ्यावा, उदाहरण द्यायचं झालं
» तर दलिया, उकडलेल्या भाज्या आणि आमटी-पोळी खावी
» अन्न शिजवताना कमी तेल किंवा तुपाचा वापर करावा.
»हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा
नियंत्रित कसं आणाल?
हा आजार औषधांनी नियंत्रित केला जाऊ शकतो. पण कधी कधी काही केसेसमध्ये ऑपरेशनही करावं लागतं. आजाराच्या प्रकारावर किंवा गांभीर्यावर या आजाराची उपचारपद्धती अवलंबून असते. हाईपोथायराईडिज्म हा प्रकार औषधांनी नियंत्रित आणता येतो.
उदाहरणार्थ हृदयाचे कमी झालेले ठोके औषधांनी नियंत्रित करता येतात. मात्र जेव्हा हायपरथायराईडिज्म होतो त्यात थायरॉईड ग्रंथींचं वाढलेलं प्रमाण कमी करणं आवश्यक असतं. किंवा त्या ग्रंथीतून अतिरिक्त स्रव बाहेर पडू नये म्हणून काळजी घेणं आवश्यक असतं. म्हणूनच हायपरथायराईडिज्ममध्ये औषधांनी काहीही नियंषित होत नाही. या प्रकारात गळ्याची सूज वाढून गलगंड होण्याची शक्यता अधिक असते.
हा गलगंड वाढत गेल्यास परिणामी ऑपरेशनशिवाय कोणताही पर्याय नसतो. कारण पुढे जाऊन थायरॉईड कॅन्सर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच तो गलगंड काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करणं आवश्यक असतं. मात्र बहुतांश वेळा थायरॉईड ग्रंथीचा आजार नियंत्रित राखण्यास औषधांचा उपयोग होतो, त्यामुळे घाबरण्यासारखं काहीही नाही. म्हणूनच आपण आपल्या डॉक्टरांना वेळोवेळी आपल्याला काय होतंय, याची कल्पना देणं आवश्यक आहे.
काय खाऊ नये?
» मिरची किंवा मसालेदार खाणं कमी करावं.
» वांगं, भात, दही, राजमा यांचा आहारात वापर करू नये
» तेलकट पदार्थ समोसे, वडे यांचं सेवन करू नये
» अति गरम किंवा अति थंड असा कोणताही पदार्थ सेवन करू नये

Read More »

गोमुखासन
संस्कृतमध्ये गो म्हणजे 'गाय' आणि मुख म्हणजे 'तोंड.' या आसनात शरीराचा आकार गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला 'गोमुखासन' म्हणतात. मधुमेही रुग्ण, अखडलेले खांदे, पाठ आदी दुखण्यापासून आराम मिळतो.

क्रिया
प्रथम खाली बसून दोन्ही पाय सरळ ताठ ठेवावेत. पाठ ताठ असावी. डावा पाय मागील बाजूस वाकवून, डाव्या टाचेच्या नितंबाच्या डाव्या बाजूखाली ठेवा. नंतर उजवा पाय अशा प्रकारे वाकवा की, उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर येईल आणि उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीखाली येईल.
आता डावा हात कोपऱ्याशी वाकवून वरती डोक्याकडे घ्यावा आणि मानेखाली खांद्यामध्ये टेकवावा. आता उजवा हात कोपराशी वाकवून मागील बाजूने वर घ्यावा. तसेच डाव्या हाताचे पहिले व दुसरे बोट आणि उजव्या हाताचे पहिले व दुसरे बोट एकमेकांत गुंतवा. सुरुवातीस जमणार नाही; पण प्रयत्न करा. शरीराचा वरील भाग व डोके एका सरळ रेषेत ठेवावं. या आसनात दहा-पंधरा सेकंद राहावं.
फायदे
» या आसनामुळे पायाचा संधिवात बरा होतो, तसेच मूळव्याधीची तक्रार दूर होते.
» या आसनामुळे छाती सुडौल होते.
» फुप्फुसाची आणि हृदयाची शक्ती वाढण्यास मदत होते.
» आरोग्यासाठी हे आसन खूप उपयोगी आहे.
» या आसनात हाताला, खांद्याला खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेच मिळाल्याने खांद्याचे दुखणे कमी होते.
» हाडं बळकट होतात. पाठीचं दुखणं बरं होतं.
» हे आसन कोडासाठीसुद्धा उपयोगी आहे. शरीरावर कोड येतात त्यांनी हे आसन करावं.
» या आसनामुळे थकवा, टेन्शन, चिंता, काळजी, अस्वस्थता दूर होते.
» पाठीचा, सायटिका व तसेच संधिवात यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. खांदा व मानेवरील स्टीफनेस दूर होतो. या आसनाच्या सरावाने ताकद (एनर्जी) मिळते.
» पायांनाही चांगला व्यायाम मिळतो.
घ्यावयाची काळजी
हे आसन करताना हातांची बोटं एकमेकांत गुंफत नसतील तर रूमालाच्या साहय्याने करावं व हळूहळू तुम्ही बोटं एकमेकांत गुंफू शकाल. उजवा हात मागील बाजूला वाकवताना काळजी घ्यावी. तसेच आलटून – पालटून हे आसन करावं. प्रथम डाव्या बाजूने मग नंतर उजव्या बाजूने करावं.
विशेष टीप :
ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, ते पाय न दुमडता (with cross legs) मांडी घालून हे आसन करू शकतात.

Read More »

मशरूम
पावसाळ्यात आपल्या झाडांच्या पायथ्यापाशी छत्रीसारखं काहीतरी उगवलेलं दिसतं. त्यालाच आपल्याकडे इंग्रजीत 'मशरूम' किंवा मराठीत 'कुत्र्याची छत्री' आणि हिंदीत कुकुरमुत्ता असं म्हटलं जातं.

पावसाळ्यात आपल्या झाडांच्या पायथ्यापाशी छत्रीसारखं काहीतरी उगवलेलं दिसतं. त्यालाच आपल्याकडे इंग्रजीत 'मशरूम' किंवा मराठीत 'कुत्र्याची छत्री' आणि हिंदीत कुकुरमुत्ता असं म्हटलं जातं. याची लागवड विशेषत: जमिनीवर किंवा अन्न स्रेतावर एका बुरशीच्या रूपाने होत असते. या मशरूमची वाढ एका रात्रीतही वेगाने होऊ शकते. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे.
भारतात मशरूमचा अधिक वापर केला जात नाही. पण हल्ली चायनिजसारख्या पदार्थामध्ये याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे हल्ली मशरूमची लोकप्रियता वाढलेली दिसतेय. मशरूमचे अनेक प्रकार असून भारतात प्रामुख्याने तपकिरी मशरूम, पांढरा मशरूम असे प्रकार असून त्याला टेबल मशरूम किंवा इटालियन मशरूम किंवा पांढरं बटण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
याचा आकार छत्रीप्रमाणे असून त्यावर काळ्या रंगांचे ठिपके दिसतात. अनेक ठिकाणी हे मशरूम सुकवून बाजारात विकले जातात. यापासून लोणचं, सूप पावडर, मुरंबा, बिस्किटं, चॉकेलट आदी पदार्थ केले जातात. हा अतिशय पौष्टिक असून याचे काही औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
» यात प्रोटिनचा भरपूर समावेश असतो.
» स्तनांचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो.
» अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.
» खनिजांचा भरपूर साठा असल्याने यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते.
» यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबरचं प्रमाण अधिक असल्याने हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते.
» याच्या सेवनाने चयापचय शक्ती सुधारते.
» यात कॅलरीजचं प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
असं असलं तरी मशरूम खाताना थोडीशी खबरदारी बाळगावी लागते. कारण हे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला धोकादायकही ठरू शकतं.

Read More »