Showing posts with label जेनेरिक औषधे | जेनेरिक दवा | जेनेरिक औषधे फरक आणि फायदे. Show all posts
Showing posts with label जेनेरिक औषधे | जेनेरिक दवा | जेनेरिक औषधे फरक आणि फायदे. Show all posts

Sunday, May 26, 2013

जेनेरिक औषधे | जेनेरिक दवा | जेनेरिक औषधे फरक आणि फायदे

जेनेरिक औषधे | जेनेरिक दवा | जेनेरिक औषधे फरक आणि फायदे


अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) औषध निर्माण क्षेत्रातील भारतीय कंपनी रॅनबॅक्सीला औषध निर्मितीत केलेल्या बनवेगिरी प्रकरणी दोषी ठरवले. हे प्रकरण मिटवण्यासाठी कंपनीने अमेरिकन कायद्यानुसार तब्बल ५० कोटींचा दंड भरण्याचे मान्य केले आहे.
औषध निर्मितीत हलगर्जी केल्याचा आणि औषधांची संवेदनशील माहिती लपवल्याचा आरोप रॅनबॅक्सीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची अमेरिकन न्याय विभाग आणि 'एफडीए'कडून चौकशी केली जात आहे. मात्र दंड भरून तडजोड करावी यासाठी अमेरिकन न्याय विभागाकडे
रॅनबॅक्सी गयावया करत आहे. मात्र तडजोड करण्यामुळे कंपनीवरील आणि भारतीय कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रॅनबॅक्सी प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या अमेरिकन प्रशासनाकडून भारतीय कंपन्यांवरील नियमावलीचा फास आवळल्यास भविष्यात त्याची मोठी किंमत इतर कंपन्यांनाही मोजावी लागू शकते.



संग्रहित छायाचित्र
औषध निर्मितीतील भारतीय कंपन्यांसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे. यामध्ये जेनरिक औषधांना मोठी मागणी असून याचा मोठा फायदा भारतीय कंपन्यांना मिळत आहे. मात्र रॅनबॅक्सीने केलेल्या औषध निर्मितीतील बनवेगिरीने इतर कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. २००८ मध्ये रॅनबॅक्सीने अमेरिकन औषध प्रशासनाकडे (एफडीए) काही औषधांच्या विक्रीचा परवाना घेतला होता.

जेनेरिक औषध 



जेनेरिक औषध फायदे


खरं सांगायचं तर खरं सांगायचं तर जेनेरिक औषध मोठय़ा प्रमाणावर निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्या देशात मात्र ब्रॅण्डेड नावानेच औषधे विकतात. खरं सांगायचं तर खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांमुळे श्रीमंत अमेरिका दरवर्षी शेकडो अब्ज डॉलर वाचवत असतानाच भारतात मात्र अनेक पट चढय़ा किमतीत विकल्या जाणाऱ्या ब्रॅण्डेड औषधांचाच बोलबाला आहे. 


जेनेरिक औषधे विकिपीडिया

या पाश्र्वभूमीवर खरं सांगायचं तर खरं सांगायचं तर जेनेरिक औषधे म्हणजे नेमके काय, भारतातील वास्तव व तज्ज्ञांचे मत याचा घेतलेला हा आढावा.

  जेनेरिक औषधे म्हणजे काय?

एखाद्या आजारावर औषध शोधण्यासाठी कंपन्यांकडून अनेक वर्षे संशोधन केले जाते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शोधल्या गेलेल्या फॉम्र्युलानुसार औषध तयार केले जाते. प्रत्यक्ष औषधाचे उत्पादन करण्याचा खर्च कमी असला तरी संशोधनावर केलेला खर्च भरून काढणे कंपनीला आवश्यक असते. 


जेनेरिक औषधे मराठी

यासाठी या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी फक्त त्या कंपनीलाच देण्यात येतो व ती औषधे कंपनीच्या नावाने (ब्रॅण्ड नेम) बाजारात येतात. या कालावधीत संशोधनाचा खर्च वसूल झाल्यावर इतर औषध कंपन्याही ही औषधे तयार करू शकतात. या औषधात वापरलेल्या रासायनिक संयुगावरून ती औषधे ओळखली जातात.

 जेनेरिक औषधे स्वस्त का ?

 जेनेरिक औषधांबद्दल माहिती मिळवा व त्याबाबत वर्गात चर्चा करा : खरं  तर जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने आधीच वसूल केलेला असतो. त्यामुळे केवळ औषधनिर्मितीच्या उत्पादन खर्चानुसार त्यांची किंमत ठरवली जाते. अर्थातच ही किंमत मूळ ब्रॅण्डेड औषधांपेक्षा खूप कमी होते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डेड औषधांची किंमत त्यांच्या खरं सांगायचं तर जेनेरिक उत्पादनांपेक्षा सर्वसाधारणपणे पाच ते दहा पट महाग असल्याचे दिसते.

अमेरिकेतील चित्र

अमेरिकेतील औषधांच्या एकूण बाजारपेठेत ८० टक्के वाटा खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांचा आहे. खरं सांगायचं तर जेनेरिक औषधे वापरल्याने दरवर्षी अमेरिकेने शेकडो अब्ज रुपये वाचवले आहेत. २०१३ मध्ये खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांमुळे अमेरिकेचे तब्बल २१७ अब्ज डॉलर वाचले . 

जेनेरिक औषधाची नावे

यातील औषधे अमेरिकेत आयात केली जातात व त्यातही भारतात उत्पादन होत असलेल्या औषधांचा वाटा महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षी भारतातील  रॅनबॅक्सी कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घालण्यात आली. या बंदीचे कारण या औषधांचा घसरलेला दर्जा हे होते.

भारतातील परिस्थिती

भारतातील कंपन्या ५० हजार कोटी रुपयांची खरं सांगायचं तर जेनेरिक औषधे निर्यात करतात. देशात मात्र ब्रॅण्डेड नावाने अधिक किमतीत ही औषधे विकली जातात. भारतात एकीकडे गरिबांसाठी सरकारी मोफत आरोग्यव्यवस्था असली तरी ब्रॅण्डेड औषधांमुळे रुग्णांना मोठी किंमत चुकवावी लागते. 

जेनेरिक औषधांची माहिती मराठी

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर नियमित व दीर्घकालीन औषधे आवश्यक असतात. या आजारांच्या रुग्णांना खरं सांगायचं तर जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास आर्थिक ताण नक्कीच कमी होईल. सरकारी रुग्णालयातही खरं सांगायचं तर जेनेरिक औषधेच दिली जातात. खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांचे प्रमाण वाढवण्यासाठी गेल्या दशकभरापासून आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. मात्र आजही काही अपवाद वगळता खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांची उपलब्धता वाढलेली नाही.

एफडीएची भूमिका

डॉक्टरांनी रुग्णांना औषधांची खरं सांगायचं तर जेनेरिक नावे लिहून द्यायला हवीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, अशी भूमिका अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे. खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांचे नाव लिहून दिल्यास रुग्णांकडे अनेक पर्याय उपलब्ध होतील व त्यामुळे ब्रॅण्डेड कंपन्यांची औषधे भरमसाट किमतीला खरेदी करण्याबाबत रुग्णाला विचार करता येईल, अशी भूमिका त्यामागे आहे. मात्र डॉक्टरांकडून याबाबत फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांबाबत काही तक्रारी आल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाईल, असेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

औषधांमधील समस्या

विविध कंपन्यांकडून त्यांच्या औषधविक्रीचे प्रमाण वाढवण्यासाठी डॉक्टरांना सवलती, भेटवस्तू दिल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे काही डॉक्टर खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांऐवजी संबंधित कंपन्यांची ब्रॅण्डेड औषधे लिहून देतात, असा आरोप केला जातो. 

जेनेरिक औषधा बदल माहिती

मात्र सर्वच डॉक्टरांबाबत हे खरे नाही. खरं सांगायचं तर जेनेरिक औषधे लिहून देण्यास हरकत नाही. मात्र अमेरिकेतील एफडीएप्रमाणे भारतातील एफडीए कार्यरत नाही, हे वास्तव आहे. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्याने खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांची गुणवत्ता तपासून पाहिली जात नाही. 

जेनेरिक औषधांची नावे

ही औषधे योग्य प्रकारे तयार केली गेली नसल्यास त्याचा अपाय होण्याची शक्यता अधिक. अशा वेळी रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न डॉक्टर विचारत आहेत. तक्रार आल्यास एफडीए कारवाई करणार असली तरी मुळात रुग्णाच्या जिवाचा धोका कसा पत्करणार, अशी शंका डॉक्टरांना आहे.

खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांच्या दर्जाबाबत खरेच प्रश्नचिन्ह आहे. काही कंपन्यांनी तयार केलेल्या  तर जेनेरिक औषधांबाबत शंका घेण्याचे कारण नसते. 

जेनेरिक औषधा विषयी माहिती

मात्र सर्वच कंपन्यांबाबत असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे खरं सांगायचं तर जेनेरिक औषधांच्या मोहिमेला वेग येत नाही. अनेक आजारांवरील खरं सांगायचं तर जेनेरिक औषधे उपलब्ध नसतात किंवा त्यांच्या दर्जाबाबत शंका असल्याने आम्हाला ती रुग्णाला देता येत नाहीत.    

 


मात्र यावेळी ती औषधे प्रौढांसाठी असून त्यांची महत्त्वाची माहिती कंपनीने एफडीए अ‍ॅथॉरिटीला दिली नव्हती. कंपनीच्या तत्कालीन संचालकांनी परवाने मिळवण्यासाठी प्रशासनाला चुकीची माहिती दिली असल्याने याबाबत अमेरिकन न्याय विभाग आणि एफडीएकडून चौकशी केली जात आहे. मात्र नुकतीच रॅनबॅक्सीने हे प्रकरण मिटवण्यासाठी ५० कोटी डॉलर्स मोजण्याची तयारी दर्शवली आहे. ज्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. कंपनीने स्वत:हून औषध निर्मितीतील झालेल्या हलगर्जीपणाची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे जेनेरिक औषध निर्माण क्षेत्रातील कंपनीवर एखाद्या प्रकरणात ठोठावण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे.
रॅनबॅक्सी प्रकरणामुळे भारतीय औषधनिर्माण क्षेत्राची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रतिमा मलीन झाली आहे. तर औषधांच्या बाबतीत गाफिल राहणा-या रॅनबॅक्सीच्या औषधांवरच बंदी घालण्याचा गंभीर विचार अमेरिकन न्याय विभाग आणि 'एफडीए' अ‍ॅथॉरिटी करत आहे. बाजारातील स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी उत्पादन प्रक्रियेत नियमांची पायमल्ली करणा-या रॅनबॅक्सीच्या या हीन कृत्यामुळे भारतीय औषध निर्माण क्षेत्रावर संशयाचे ढग जमू लागले आहेत. यामुळे जेनरिक औषधांची आणि त्यांची निर्मिती करणा-या कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. जेनरिक औषधांमध्ये आणि ब्रँडेड औषधांमधील फॉम्र्युले योग्य असतात की नाही यावरही तज्ज्ञांनी बोट ठेवले आहे.
सध्या रॅनबॅक्सीमध्ये जपानची आघाडीची औषध निर्माती दायची सान्को हिचा सर्वाधिक हिस्सा आहे. जून २००८ मध्ये दायचीने गुडगावच्या मलविंदर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालकी असलेल्या रॅनबॅक्सीमधील ३४.८२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. यासाठी दायचीने ४.६ अब्ज डॉलर्स (जवळपास १०,००० कोटी रुपये) मोजले होते. मात्र याच वर्षात प्रौढांच्या औषधाची माहिती दडवल्याप्रकरणी रॅनबॅक्सीवर अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला. भारतातील देवास आणि पाओंता साहेब या ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये औषधांची निर्मिती करताना योग्य ती खबरदारी घेतली जात नाही, असे सांगत एफडीएने कंपनीला दोन कारणे दाखवा नोटिशी बजावल्या होत्या, त्याचबरोबर जवळपास ३० विविध जेनरिक औषधांवरही अमेरिकेत बंदी घालण्यात आली होती. दरम्यान कंपनीकडून पाओंता साहेब प्रकल्पाची चुकीची माहिती दिली गेल्याने एफडीएने २००९मध्ये आपली कारवाई आणखी तीव्र केली. रॅनबॅक्सीच्या औषधांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठवण्यासाठी रॅनबॅक्सीने २०११मध्ये 'एफडीए'शी तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही कंपनीची फसवेगिरी सुरूच राहिली, ज्यामुळे अमेरिकन एफडीए अ‍ॅथॉरिटीला कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे.

अमेरिकन न्यायालयाच्या रॅनबॅक्सीवरील निकालाने जागतिक बाजारपेठेत भारतीय कंपन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. रॅनबॅक्सीने नियमांचे उल्लंघन केले आहे का, याची चौकशी केली जात आहे. तसेच अमेरिकन न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास केला जाईल, असे आरोग्य विभागाच्या एका अधिका-याने म्हटले आहे. तसेच भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडूनही औषध निर्मितीतील हलगर्जीपणाची चौकशी केली जाणार आहे.


चुकीची माहिती भोवली
रॅनबॅक्सीने २००८ मध्ये प्रौढांच्या औषधांना परवाना मिळवण्यासाठी 'एफडीए' अ‍ॅथॉरिटीला चुकीची माहिती सादर केली. यामध्ये काही औषधांचे फॉम्र्युलेही सादर केलेले नाहीत, असा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला. ज्यामुळे कंपनीवर कडक कारवाई करण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, सात गुनंमध्ये कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. औषधांना परवाना मिळवण्यासाठी अमेरिकन सरकारला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे, औषधांमधील घटकांची माहिती लपवणे अशा प्रकारचे आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहेत. तसेच कंपनीने आपल्या उत्पादन प्रकल्पांमध्ये वार्षिक ऑडिटही केलेले नाही, असाही आरोप ठेवण्यात आला आहे. रॅनबॅक्सी अमेरिकन जनतेच्या जीवाशी खेळली आहे. त्यामुळे तिच्या औषधांवर कायमची बंदी घालावी, असा विचार अमेरिकन 'एफडीए'कडून केला जात आहे. १५०हून अधिक देशांमध्ये कंपनीची औषधे विक्री होत आहेत. तर १४,६०० कर्मचारी आहेत. या प्रकरणाने कंपनीला अमेरिकन बाजारपेठेला गमवावे लागल्यास तिच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.


वादग्रस्त वाटचाल
रॅनबॅक्सीवर अमेरिकन 'एफडीए'कडून याआधीही कारवाई करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१२ मध्ये कंपनीने अमेरिकन बाजारपेठेतून औषधाच्या लाखो गोळय़ा परत घेतल्या होत्या. या गोळय़ांमध्ये काचेचे बारीक कण आढळून आले होते. ज्यामुळे कंपनीला विक्रीसाठी बाजारात असलेल्या लाखो गोळय़ा परत घ्याव्या लागल्या होत्या. त्यावेळी रॅनबॅक्सीवर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर मार्चपासून 'एफडीए'ने विक्री करण्यास परवानगी दिली. मात्र 'एफडीए'च्या या धोरणावर अमेरिकेत टीका केली जात आहे.


शेअर गडगडला
'एफडीए'कडून करण्यात आलेल्या कारवाईचे परिणाम कंपनीच्या शेअरला भोगावे लागले. गेल्या आठवडय़ात रॅनबॅक्सीच्या शेअरमध्ये तब्बल १६ टक्क्याची घट झाली. तसेच व्होखार्टचा शेअरही ३३ टक्क्यांनी घसरला.


अमेरिकेतील विक्रीवर परिणाम
अमेरिका जेनरिक औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या देशात जेनरिक औषधांची विक्री करण्याचा पहिला मान रॅनबॅक्सीला मिळाला होता. गेल्या काही वर्षात कंपनीने अमेरिकन बाजारपेठेत मुसंडी मारली. कंपनीची औषध विक्री १ अब्ज डॉलरच्याही पुढे गेली. जेनरिक औषध निर्मितीतील अमेरिकेतील ही सहावी मोठी कंपनी आहे. कंपनीच्या जागतिक विक्रीमध्ये जवळपास एक तृतीयांश विक्री अमेरिकेत होत आहे. मात्र पैशाच्या हव्यासापोटी घाईगडबडीत औषधे बाजारात आणून कंपनीने बाजारपेठेतील विश्वासार्हतेची माती केली रॅनबॅक्सीवर एफडीएने फास आवळला आहे. ज्यामुळे कंपनीवर ताबा असलेल्या 'दायची सॅन्को'च्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


इतर कंपन्यांना झळ बसणार
रॅनबॅक्सीमुळे इतर भारतीय कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एफडीएने कंपनीवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिकन बाजारपेठेत औषधांना प्रवेश देतानाची नियमावली अधिक कडक केल्यास त्याचा फटका इतर कंपन्यांना बसेल. गेल्या वर्षी भारतीय कंपन्यांनी 'एफडीए'कडे सादर केलेल्या ४७६ प्रस्तावांपैकी १७८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती.दरम्यान, व्होखार्टच्या औषधांवर 'एफडीए'ने बंदी घातली आहे. कंपनीच्या औरंगाबाद प्रकल्पात औषध निर्मितीसाठी आवश्यक नियमावलीचे पालन न केल्याने कंपनीवर एफडीएने कारवाई केली आहे. केवळ भारतीयच नव्हे तर इतर देशांमधील औषध कंपन्यांवर एफडीएची करडी नजर आहे. भारतीय औषधांचा दर्जा आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत होणारी हलगर्जी लक्षात घेत 'एफडीए'कडून कठोर नियमावली अंवलंबल्यास इतर कंपन्यांना झळ बसेल.

ग्रहांचे भाकीत


साप्ताहिक राशिभविष्य, २६ मे ते एक जून २०१३ 



मेष : लोकांच्या आदरास पात्र व्हाल


सबंधितांच्या रास्त कळकळीला, लोकाग्रहाला मान देऊन उपयुक्त करार-मदाराने जी आश्वासने द्याल, त्यांची पूर्ती कराल. यातून चांगली निष्पत्ती साधली जाईल. धावपळीत, दगदगीत आरोग्याचे वेळापत्रक पार कोलमडले जाऊन सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या कुरबुरींनी होईल. सप्ताह सरता-सरता चंद्र-शुक्राच्या अनुकूलतेने कलाक्षेत्रात मोठीच झेप घ्याल. लोकांच्या आदरास पात्र व्हाल. गायन-वादन क्षेत्र तुमचेच असेल, तर त्या क्षेत्रातील यशाचे श्रेय मात्र फक्त रसिकांनाच द्याल.

वृषभ : संधी खेचून आणाव्या लागतील

चालू सप्ताह तुम्हाला काहीसा मिश्र-फलदायी असेल. स्वार्थ साधून परमार्थ साधण्याच्या प्रयत्नात तुमचा ताठर स्वभाव लोकप्रियतेस प्रतिकूल ठरू शकतो. उद्योगकारक मंगळ अस्तंगत होऊन व्यवसायात काहीसा चढ-उतार जाणवेल, पण यशस्वी उद्योग-नीती वापरूनच त्याला स्थैर्य प्राप्त करून द्याल. कोणत्याही संधी चालून येणार नाहीत, तर त्या तुम्हास खेचून आणाव्या लागतील. फिरतीवर जाण्याचे प्रसंग येतील.

मिथुन : सरकारी दौ-यावर जाण्याचा योग

सरकारी दौ-यावर किंवा फिरतीवर जाण्याचे योग चालू सप्ताहात येतील. योजकता, अभ्यास, महत्त्वाच्या नोंदी आणि दर्शनीयता यांनी दौरे यशस्वी होतील. फारसे पुढे-पुढे न करताही तुमचे योगदान लपून राहणार नाही. गाण्यांना उत्तम चाली द्याल. वधु-वरांची स्थळं मोठीही झालेली असतील आणि त्यांच्या अपेक्षाही तितक्याच रास्त असतील. यातून विवाह जमणे अधिकच सोपे झालेले असेल.

कर्क : जोखमीच्या पदावर रुजू व्हाल

लाभातील रवि-मंगळाच्या युतीने उद्योगधंद्याची भरभराट साधत असताना तुम्हाला समाजकार्याकडेही पाठ फिरवून चालणार नाही. नेतृत्वाच्या संधी चालून येतील. तुमच्या प्रभावी वक्तव्याने तुम्ही यशाचे गमक नव्या पिढीला समजावून सांगाल. नोकरदार आपली विश्वासार्हता वाढवून जोखमीच्या पदावर रुजू होतील. कौटुंबिक जबाबदा-या आणि कर्तव्य यांचे भान असेल. उत्तम आरोग्यासाठी आनंदी जीवनशैली अनुसरणे हितकारक ठरेल. मनोरंजनासाठी हवापालट कराल.

सिंह : नोकरीत महत्त्वाचे पदभार मिळतील



चालू सप्ताहात पोषण आणि संगोपन ही तुमच्या कार्याची आणि कर्तबगारीची निष्पत्ती असेल. तुमचे कष्ट, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि प्रसंगी शारीरिक कष्ट यातून यशस्वी उद्योजकतेचा आदर्श घालून द्याल. उपयुक्त माणसे हाकेसरशी धावून येतील. कर्मचा-यांच्या, सेवकांच्या गुणांचा गौरवही कराल. पित्याचे स्वप्न साकाराल. सप्ताहाच्या उत्तरार्धात कामांना गती येईल. मौलिक सल्ले प्राप्त होतील. नोकरीत महत्त्वाचे पदभार येऊन पडतील.


कन्या : क्रीडाक्षेत्रात गौरवले जाल
भाषेवरील प्रभुत्वाने कल्याण साधण्याच्या तुमच्या प्रयत्नात केलेले मार्गदर्शन उपकारक ठरून लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण कराल. क्रीडा क्षेत्रात गौरवले जाल. विद्यार्थीवर्गाकडून चिकित्सक आणि संशोधनात्मक कामगिरी बजावली जाईल. नाटय़ाभिनय आणि संगीत क्षेत्रात कीर्ती प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. धार्मिक कार्यास सढळहस्ते मदत कराल. विवाहाच्या प्रतीक्षेत असणा-यांचे विवाह भाग्योदयकारी ठरतील.

तूळ : श्रद्धेची ताकद जाणून घ्याल
तुमचे गुण आणि तुमच्या क्षमता याबाबत तुम्ही अनभिज्ञ असताना चालू सप्ताहात बुध- गुरू- शुक्र हातात हात धरून तुमच्या भाग्याचे दरवाजे ठोठावतील. अष्टमातील व्यापारी राशीतील रवि- मंगळ सुवर्णालंकारातील गुंतवणुकांचा तुम्हाला मोह घालतील. गीतेत आणि पुराणात डोकावाल. श्रद्धेची ताकद जाणून घ्याल. निरूपण कराल. भिक्षुकवर्ग शास्त्रशुद्ध मंत्रोच्चारण आणि संथा यांचे तंत्र अचूक आत्मसात करतील. मंगलाष्टके तसेच वधु-वरांना सुसंस्कारीत कराल.

वृश्चिक: स्थावर मालमत्तेचे लाभ होतील
गुरू-चंद्र गुरू-शुक्र आणि बुध-शुक्र हे ग्रह सप्ताहाच्या पूर्वार्धात तुम्हास अनुकूल होऊन विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. कुटुंबीयांमध्ये, भागीदारांमध्ये, नोकर- मालकांमध्ये सुसंवाद राहील. अडी-अडचणी सांगितल्या जातील. यशाचे नवे रस्ते सापडतील. स्थावर मालमत्तेचे लाभ पदरी पडतील. आहार संतुलित ठेवला तर आरोग्य उत्तमच राहील. अंत:प्रेरणा प्राप्त होऊन काव्य स्फुरेल. अध्यात्म विचार समजून घ्याल.

धनू : आत्मविश्वास -आत्मबल वृद्धिंगत होईल
चालू सप्ताहात रुसवे-फुगवे विसरून प्रसंगाची शोभा वाढवाल. नोकरदारांना घबाड मिळाल्याचे समाधान नोकरीतून प्राप्त होईल. महत्त्वाची बोलणी यशस्वीरीत्या पार पडतील. नियम, कायदे, प्रथा तुम्ही डावलणार नाही. आत्मविश्वास आणि आत्मबल वृद्धिंगत होईल. खेळाडूंनी क्रीडाकौशल्याबरोबरच शरीराच्या आयोग्याकडेही लक्ष द्यावे. टिकाऊ स्वरूपाचे लाभ पदरी पडतील. डॉक्टरी व्यावसायिक, डॉक्टरी कौशल्यातून स्वत:ची प्रतिमा निर्माण करतील.

मकर : उद्योगाला ऊर्जितावस्था येईल
चालू सप्ताह हा तुम्हास प्रत्येक क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनवणार आहे. रवि-मंगळ युती तुमचे कार्यकौशल्य अधिक विकसित करतील आणि तुमच्या उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देतील. तुमच्या गुणांची आणि ज्ञानाची दखल घेतली जाईल. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात संशोधनाच्या प्रेरणा प्राप्त होतील. त्यातून संसारोपयोगी उपकरणे अधिक प्रगत कराल. पुत्रांचा उत्कर्ष होईल. त्यांच्याशी सुखद संवाद होऊन खुशाली कळत राहील.

कुंभ : कार्यप्रेरणा उन्नत होतील
घर आणि निवास हे केंद्रबिंदू मानून तुमच्या कार्यप्रेरणा उन्नत होतील. घराचे घरपण जपाल. संसारोपयोगी वस्तूंची खरेदी होईल. गृहसंपादनासाठी हालचालींना वेग येईल. वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्र, अंतर्गत सजावट इत्यादी संबंधातील अध्ययनाकडे ओढा निर्माण होईल. संगीत, नाटय़संगीत यांच्या मैफली गाजवाल. दुर्मीळ वनौषधींचा शोध घ्याल. वाणिज्य आणि सनदी लेखा अधिकारी या शाखांतील विद्यार्थी आपल्या ज्ञानात प्रगल्भता प्राप्त करतील.
.

मीन : स्थित्यंतराचे सूतोवाच होईल
तुमच्याजवळ ज्ञानाचा आणि अनुभवांचा खजिनाच असताना राशीमुळे प्राप्त होणारी द्विधा मन:स्थिती तुम्हाला योग्य दिशा चाचपडायला लावेल. जिथून अनेक फाटे फुटतात, अशा संधीवर उभे करेल. आमंत्रणे खूप येतील, पण सगळीकडे एकाच वेळी जाण्याची क्षमता नसेल. एखाद्या स्थित्यंतराचे सूतोवाच चालू सप्ताहात होईल. बंधूंचे अचूक मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य प्राप्त होईल. सर्व गुणांची गोळाबेरीज करून जे रसायन तयार होईल, ते मौलिक ठरेल.

राशिभविष्य, २६ मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…

मेष : तुमच्याकडून तुम्ही शब्द पाळाल.



वृषभ : आपली मतं इतरांना पटवून द्याल.

मिथुन : अध्यात्मावरील वाचन कराल.
कर्क : गरजूंना मदतीचा हात द्याल.

सिंह : भावंडांचे मौलिक सहकार्य मिळेल.

कन्या : बद्धकोष्ठता संभवते.
तूळ : अध्यात्मचिंतन कराल.

वृश्चिक : व्यावसायिक दौ-यावर जाल.

धनू : नातेवाइकांशी सुखद संवाद साधाल.

मकर : तीर्थयात्रा घडतील.

कुंभ : उच्चशिक्षणाचे वेध लागतील.


मीन : वर्षाची खरेदी करून टाकाल.



आयपीटीएलमध्ये जगातील दिग्गज टेनिसपटूंचा सहभाग

भारताचा अनुभवी टेनिसपटू महेश भूपतीच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंतरराष्ट्रीय प्रिमियर टेनिस लीगचे (आयपीटीएल) शुक्रवारी येथे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले.

पॅरिस - भारताचा अनुभवी टेनिसपटू महेश भूपतीच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंतरराष्ट्रीय प्रिमियर टेनिस लीगचे (आयपीटीएल) शुक्रवारी येथे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले.
भूपतीला त्यासाठी जर्मनीचा माजी दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर आणि जागतिक टेनिस महासंघाचे (एटीपी) माजी सदस्य जस्टिन गिमेलस्टोब यांचे सहकार्य लाभले आहे. या लीगमध्ये दिग्गज टेनिसपटूंनी त्यांचा सहभाग निश्चित केला आहे.
भूपतीच्या या पुढाकाराला मिळालेली ही पोचपावती आहे. ही स्पर्धा आशियात डिसेंबर २०१४मध्ये प्रथमच खेळण्यात येणार आहे. भूपतीच्या या कल्पनेचे कौतुक नोवाक जोकोविच आणि राफाएल नाडाल या अव्वल टेनिसपटूंनीही केले आहे.
आयपीटीएल कशी असेल?
आशियातील सहा शहरांचे सहा संघमालक असतील.
जानेवारीत होणा-या लिलावात ६ ते १० टेनिसपटूंना मोठय़ा रकमेवर करारबद्ध करणार
नोवाक जोकोविच, राफाएल नाडाल, अ‍ॅँडी मरे, टोमास बर्डिच, जो-विल्फ्रेड त्सोंगा, यांको टिपसारेविच, सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा, व्हिक्टोरिया अझारेंका, ली ना, कॅरोलिन वोझनियाकी, समंता स्टॉसूर यांचा सहभाग निश्चित. पीट सॅँप्रस, आंद्रे आगासी आणि पॅट राफ्टर या सिनियर टेनिसपटूंचाही सहभाग अपेक्षित.
बंगळूरु, कोलकाता, ओसाका, टोकियो, बीजिंग, सिंगापूर, मनिला, हॉँगकॉँग, दुबई आणि दोहा ही शहरे संघ विकत घेण्यासाठी आघाडीवर.

  समाधान हे मानण्यात असतं!

अमेरिकेत कुमारवयीन मुलींच्या गर्भारपणाचं प्रमाण खूप जास्त आहे. टीनएज प्रेग्नन्सी, संयम ठेवा मोहीम, अ‍ॅबॉर्शनविरोधी कायदे हे सर्व एकत्रितपणे एकाच समाजात बघायला मिळणं, हेसुद्धा एक अमेरिकेचं वैशिष्टय़च. व्यक्तिस्वातंत्र्य, समवयस्क मुलांचं वागणं, लैंगिक व्यवहारात असलेला मोकळेपणा आणि धार्मिक पगडा अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. दुस-या बाजूला अँजलिना जोली नावाची अभिनेत्री दोन्ही स्तन काढण्याचा निर्णय घेते, तेव्हा ती तिच्या स्त्रीत्वाची ओळख का पुसतेय, असा प्रश्न पडतो.
मिशिगन या राज्यातल्या एका छोटय़ा गावात घडलेली ही घटना. म्हटलं तर साधी नैसर्गिक, म्हटलं तर शरीराला केंद्रस्थानी ठेवणारी. हायस्कूल संपवून कॉलेजमध्ये जाणा-या दोन गर्भवती मुली आहेत. त्यांच्या हायस्कूलने तुम्हाला दिवस गेले आहेत हे लक्षात येईल, असे फोटो आम्ही इयरबुकात छापणार नाही, असं सांगितलं आहे. तुमचे दुसरे फोटो दिले तरच आम्ही छापू, असा पवित्रा संबंधितांनी घेतला आहे. हे दुसरं काही नसून हा निव्वळ भेदभाव असल्याचं त्या दोन्ही मुलींनी वार्ताहरांना सांगितलं. शाळेचे पदाधिकारी जे म्हणत आहेत, तसं वागणं त्यांना मान्य नाही. आपल्याला दिवस गेले आहेत हे लपवण्याचं काही कारण असू शकतं, हे लपवणं त्यांना पटलेलं नाही. सध्या तरी त्या दोन मुलींच्या फोटोशिवाय इयरबुक प्रकाशित होईल, अशी चिन्ह दिसत आहेत.
टीनएज प्रेग्नन्सी आणि स्वत:वर संयम कसा ठेवायचा, असे दोन्ही उपक्रम हायस्कूल राबवते. या मुली प्रेग्नंट आहेत हे सर्व गाव जाणतं, पण मुद्दाम तसे फोटो छापणं म्हणजे आमचा अ‍ॅबस्टिनंसचा उपक्रम फसला असं आम्हाला वाटतं आणि ते इतरांना मुद्दाम कळावं किंवा मुद्दाम लक्षात राहावं असं वाटत नाही. म्हणून आम्ही या मुलींना दिवस गेल्याचं लक्षात येईल, असे फोटो छापणार नाही, असं त्या शाळेच्या पदाधिका-यांचं म्हणणं आहे. या दोन्ही मुली रोज वर्गात येतात, शिकतात, उद्या त्यांना मूल झालं की त्यांना योग्य ती मदत देणं अथवा पाळणाघर इत्यादी सोय करून देणं हे शाळा-कॉलेजकडून गृहीतच धरलं जातं. मग या मुलींचे फोटो त्यांनी इयरबुकात का घेऊ नये, हा प्रश्न अगदी रास्त आहे. त्यांना दिवस गेले आहेत, हे स्पष्ट दर्शवणारे असे त्यांचे फोटो घेणे म्हणजे टीनएज प्रेग्नन्सीचं उदात्तिकरण करणं आहे आणि तसा आमचा बिलकूल उद्देश नाही, असं शाळेकडून सांगण्यात आलं. टीनएज प्रेग्नन्सी, संयम ठेवा मोहीम, अ‍ॅबॉर्शनविरोधी कायदे हे सर्व एकत्रितपणे एकाच समाजात बघायला मिळतं, हीसुद्धा एक अमेरिकाच आहे. या गावात लहान गाव म्हणून घटना लगेच सर्वाना कळली. मोठय़ा गावात हे कालांतराने घडलंच असतं. मुळात तुमची मूल्य नक्की काय आहेत, हा खरा मुद्दा आहे. मानवी हक्कांपेक्षा इथे धर्माच्या नावाखाली अ‍ॅबॉर्शनला होणारा विरोध तर सर्वानाच माहिती आहे. एखाद्या टीनएज मुलीने अगदी कोणाला न कळू देता अ‍ॅबॉर्शन केलं. काही झालंच नाही, अशा थाटात तिचा फोटो इयरबुकात आला, अशी घटना सहज घडली असेल आणि घडतही राहील.
मे महिना संपत आला की, शाळा कॉलेजचं वर्ष संपत आलं, याची जाणीव होते. बक्षीस समारंभ, पदवीदान समारंभ इत्यादी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होतं. अशा अनेक कार्यक्रमांपैकी एक ही गोष्ट असते, ती इयरबुक तयार करणं, प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याची कॉपी मिळणं. इयरबुकात प्रत्येक वर्ग, इयत्ता, शिक्षक, वर्षभराचे विशेष कार्यक्रम याचे फोटो असणारे इयरबुक जवळ ठेवून लोक आठवणी बाळगत असतात. या फोटोंचा गरवापर होण्याची शक्यताही असते. म्हणूनच हे फोटो देताना लोक काळजी घेतात. शाळा-कॉलेजेस पालकांकडून सह्या आणि मान्यता घेतात. काय एवढं त्या फोटोचं, असं मनात येईल. पण मी माझ्या अमेरिकन सहका-यांकडे मित्रमैत्रिणींकडे अशी इयरबुक्स पाहिली आहेत. अनेक ठिकाणी जेव्हा दोन-तीन पिढय़ा एका गावात शहरात राहतात, तेव्हा तसेही लोक एकमेकांना माहिती असतात. आठवणी ताज्या करण्यासाठी, एखादी गोष्ट खरंच घडली होती का, अशा प्रकारच्या नोंदीकरता हे इयरबुक कामी येतं. त्यामुळे त्याकडे बघण्याचा शाळांचा व इतरांचा दृष्टिकोन गंभीर असतो.
मध्यंतरी एका अशाच छोटय़ा गावातल्या एका वर्गातल्या सर्व म्हणजे १३ मुलींनी हायस्कूलमध्ये म्हणजे १२ वी पास होण्याआधी आपण गरोदर होऊ, अशी पैज लावली होती. तारुण्याची चाहूल, एकंदर वेडं वय आणि वातावरण अशा सर्वाचा कसा परिणाम मुलांवर होईल ते ठरवणं अवघड आहे. पण असं काही एखाद्या शाळेत झालं नाही, म्हणजे थोडक्यात सर्व कामं बिनबोभाट झाली, तर त्या सर्वाचे काही सामाजिक आणि शैक्षणिक उद्देश ठेवून केलेले उपक्रम तडीस गेले, असं म्हणायचं का? मला तरी असं वाटत नाही.
अनेक राज्यांमध्ये 'टीनएज प्रेग्नन्सीज' होऊ नयेत आणि त्यामुळे होणारे अ‍ॅबॉर्शनचे प्रमाणही पर्यायाने कमी व्हावं याकरता विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवले जातात. १८८०-९० या दशकाच्या मानाने आता अशा वयाच्या मुलींचं गरोदर होण्याचं प्रमाण खूपच कमी झालं आहे. त्या काळी नववी ते बारावीत असताना अनेक मुली हायस्कूलमधून बाहेर पडत, याचं मुख्य कारण त्या गरोदर होणं हे होतं. हे प्रमाण कमी झालं तरी व्यक्तिस्वातंत्र्य, समवयस्क मुलांचं वागणं, लैंगिक व्यवहारात असलेला मोकळेपणा आणि धार्मिक पगडा अशा अनेक कारणांमुळे ते टाळता आलेलं नाही. आम्ही बॅटन रुजला राहत होतो तेव्हा माझे तीनही शेजारी गोरे अमेरिकन होते.
त्यापैकी दोघी जणी पूर्ण वेळ गृहिणी होत्या. त्यांचं वय माझ्याएवढंच असेल. त्यांना तीन तीन मुलं होती. मोठं मूल अकरावी-बारावीत आणि माझी मुलगी जेमतेम केजीत होती. दोघींपैकी एक जण मला म्हणाली, ''त्या वयात मुलगा मिळावा, म्हणून मग जे पडेल ते केलंच पाहिजे. आपण केलं नाही तर इतर मुली करतील अशी भीती असते. मग कधी कधी लग्न लवकर करायचं, असं दोघं मिळून ठरवतो, तर कधी ते ठरवावंच लागतं. अ‍ॅबॉर्शन करणं हा पर्यायच नसतो. पण आता माझ्या नव-याबरोबर काम करणा-या बायका बघितल्या की, मी अवस्थ होते. आपण शिक्षण सोडलं नसतं तर कदाचित मीही त्यांच्यासारखं काम केलं असतं. आताही करेन, पण शेवटी मर्यादा आहेत. नव-याला बरंच ट्रॅव्हल असतं. तो दूर असतो, त्याच्याबरोबर स्त्रिया असतात, मग ते एकदा डोक्यात आलं, की मला जास्तच असुरक्षित वाटायला लागतं.''
दुसरी म्हणाली, ''एकदा लग्न केलं म्हणजे तो कायमचा माझा झाला, असं वाटणं किंवा मानणं ठीक आहे. पण त्यात फार तथ्य नाही हा भागही आहेच. हायस्कूल स्वीट हार्ट्स म्हणून लगेच लग्न करणारे पुढे चाळिशी जवळ आली की, पुन्हा प्रेमात पडतात, विभक्त होतात, अशी अनेक उदाहरणे मला माहिती आहेत.''
''पुन्हा तुझ्या मुलाचे आणि मुलीचं प्रेमात पडायचं वयपण हेच ना?'' नकळत माझ्या तोंडून निघून गेलं. एकंदर शरीराचं अस्तित्व नाकारता येत नाही. हेच पुन:पुन्हा जाणवत होतं. माझी एक अमेरिकन सहकारी म्हणाली की, अमेरिकन समाज 'सेक्स'ला आयुष्यात जास्तच उघडपणे महत्त्व देतो. १२-१३ व्या वर्षापासून सुरुवात होत असेल, तिथून पार सत्तरी झाली तरी सेक्स ही भावना आणि ते करण्याची इच्छा राहिल, हे गृहीत धरून वागतो. पण या इच्छेबरोबर प्रत्येकाने कुठेतरी, केव्हातरी आयुष्यात याबाबत समाधान मानायला हवं, ते तो कधीच मान्य करत नाही. ते समाधान म्हणजे फक्त शारीरिक जाणीव नसून त्याला मनाची जोड असेल तरच ते मिळेल, याचा विसर फार चटकन पडतो. त्यामुळे आयुष्य ढवळून निघतं, असं वाटत नाही का, मी तिला विचारलं होतं. अँजलिना जोली इयरबुकात कशी दिसायची, याचा शोध काही जणांनी घेतला असेलच. या प्रसिद्ध अभिनेत्रीने कर्करोगाचा धोका कमी व्हावा, म्हणून दोन्ही स्तन काढण्याचा निर्णय घेतला याची मोठी बातमी झाली आहे. पण तिने प्रत्यारोपण करून घेतलं हेसुद्धा सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट आहे. तिचा निर्णय व्यक्तिगत आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरावर फायद्याचा विचार करून घेतलेला आहे. तो घेण्याचं स्वातंत्र्य तिला आहेच. पण किती हे धाडस, असं मनात येऊन स्त्रीवादी मंडळी फार खूश आहेत, असं चित्र असेल तर यात फार मोठा स्त्रीवादी विचार आहे, असं मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे इथली विमा व्यवस्था किती बदलेल, इत्यादी सर्व मला खूपच दूरचा विचार वाटतो.
पुरुषांच्या नजरेतलं स्त्रीत्व आणि त्याचा अविभाज्य घटक म्हणजे स्तन! निसर्गाचा मूळ उद्देश वगळता हा उभार म्हणजे पुरुषाने केलेली स्त्री असण्याची व्याख्या! स्तन म्हणजे दुसरं काही नसून ती आहे, समाजाची स्त्रीच्या लैंगिकतेची ओळख. आईच्या दुधाला स्त्रियांनी पर्याय मिळवला आहे, पण त्यांना ही ओळख नाकारता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारायची की नाही, हा स्त्रीवादामधला एक मुद्दा असू शकतो, पण तो भाग वेगळा. स्तनाशिवाय स्त्रीला आपण अपूर्ण वाटतो, ही चक्क आजच्या स्त्रीची भावना आहे. ती जन्मला आली, तेव्हा तर या स्तनाच्या पेशी वाढलेल्या नव्हत्या. तिच्या नकळत्या वयापासून कळत्या वयाचा प्रवास या स्तनामुळे सुरू होतो, हे वास्तव आहे. त्याची जाणीव पदोपदी तिला एक पुरुष करून देतो, हे किती अंशी नाकारता येईल? स्त्री असणं कमीपणाचं नाही. स्तन असणं जसं कमीपणाचं नाही तसं ते गमावले तर निराश व्हायचं कारण नाही, हे कुणी सांगेल का मुलामुलींना? ते सांगणं आवश्यक आहे. कारण असं की, एकीकडे लठ्ठपणा ही एक समस्या आहे, तर दुसरीकडे अगदी १० वर्षाच्या मुलीपासून सगळे सेलेब्रिटीचं अनुकरण करण्यात प्रयत्नशील असतात. शरीर केंद्रस्थानी ठेवून मग सुख मिळतं, असं मनात इतकं ठसतं की मग झीरो फिगरपासून तर हवे तसे अवयव करून घेणं हा एक सर्वमान्य प्रकार आहे. येणा-या ट्रेंडनुसार डाएट आणि हवे तसे बदल करत सर्व जनता हॉलिवुडच्या सेलेब्रिटींचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करते, हे मी बघितलं आहे. गेली दहा-पंधरा र्वष वयाच्या दहाव्या वर्षापासून आपल्या शरीराविषयी-बाह्यरूपाविषयी जास्त जागरूक असलेली पिढी मी पाहते. अवयवात बदल करून घेणं सर्वाना शक्य होतं असं नाही. पण बाह्यरूपाला अवास्तव महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामुळे अपंगच नाही तर व्याधींमुळे शरीराचं बाह्यस्वरूप बदललेले लोक आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून बसतात. वाध्र्यक्याचा स्वीकार त्रासदायक असतो, त्याहून किती तरी पट मोठा हा आघात असतो. अशा अपघातानंतर कितीही मदत आणि आधार दिला तरी आपण काही गमावलं आहे वा आपल्यात काही कमतरता आहे, याची बोच अनेकांना छळते. नराश्य येणा-यांमध्ये अशांची संख्या जास्त असते, असं अहवालात दिसतं.
र्वाची आर्थिक स्थिती अवयवांचं प्रत्यारोपण करून घेता येईल, अशी असतेच असं नाही, हेही अमेरिकेतलंच नव्हे तर जगभरातलंच एक सत्य आहे. अशा परिस्थितीत खूप जणांना वेगवेगळ्या प्रकारे मानसिक कुचंबणाही सहन करावी लागते. स्पर्धा, ताण आणि जगण्याच्या रेटय़ात बाह्यरूपाला किती महत्त्व द्यायचं? इयरबुकात असलेलं शरीराचं तारुण्य कायम टिकणार नाही हे कधी मान्य करायचं? स्त्री-पुरुष दोघांनीही शरीरापलीकडचा समाधानी विचार कधी करायचा?

  असद रौफ आणखी अडचणीत

स्पॉटफिक्सिंगप्रकरणी पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परदेशात सुरू असणा-या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधील अंतर्गत माहिती रौफ सट्टेबाजांना पुरवायचे, अशी माहिती विंदू दारासिंगच्या चौकशीतून पुढे आली आहे.

मुंबई - स्पॉटफिक्सिंगप्रकरणी पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परदेशात सुरू असणा-या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधील अंतर्गत माहिती रौफ सट्टेबाजांना पुरवायचे, अशी माहिती विंदू दारासिंगच्या चौकशीतून पुढे आली आहे. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा त्यांच्या मुसक्या आवळणार असून, या भीतीने त्यांनी देश सोडल्याचीही चर्चा आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष व चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन मोठय़ा प्रमाणात सट्टा खेळायचे, अशी माहिती विंदूच्या चौकशीतून पुढे आल्यानंतर आता रौफही सट्टेबाजांना कशा प्रकारची मदत करायचे, अशी माहिती विंदूच्या चौकशीतून पुढे आली आहे. परदेशात सुरू असणा-या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधील अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी सट्टेबाज रौफ यांचा वापर करत असल्याचे विंदूने सांगितले आहे.
रौफ यांनी दिलेल्या माहिती वापर सट्टेबाजीत करण्यात यायचा. सामना जिथे आहे, तेथील हवामान, खेळाडूंची अंतर्गत चर्चा आणि इतर माहिती रौफ यांच्याकडून सट्टेबाजांना मिळायची. त्याबदल्यात पवन जयपूर व संजय जयपूर हे सट्टेबाज रौफ यांचा मुंबईतील राहण्याचा खर्च करायचे, त्यांना महागडय़ा भेटवस्तू द्यायचे, अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे.
रौफ यांना पवन जयपूरने २५ हजारांच्या जीन्स, महागडी घडय़ाळे अशा भेटवस्तू असलेल्या दोन बॅगा दिल्या होत्या. या भेटवस्तूच्या दोन बॅगा विंदूने त्याचा साथीदार प्रेम तनेजा याच्यामार्फत कार्गोने दिल्लीला पाठवल्या होत्या. पण दिल्ली पोलिसांच्या तपासात पवन व संजय जयपूर यांचे नाव पुढे आल्यानंतर विंदूने त्यांना दुबईत पळण्यास मदत केली. दरम्यान, रौफ यांना पाठवण्यात आलेल्या दोनही बॅगा शुक्रवारी गुन्हे शाखेने दिल्लीहून हस्तगत केल्या. रौफ राहत असलेल्या वांद्रे येथील नोव्हेटेल आणि सोफिटेल या हॉटेलमधील सीसीटीव्हींचीही पाहणी होणार आहे.
महाराष्ट्र एटीएसने दिला पहिला धागा
महाराष्ट्र एटीएसने सट्टेबाजांचे दूरध्वनी संभाषण इंटरसेप्ट केल्यामुळे स्पॉटफिक्सिंग प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणाची माहिती गुन्हे शाखेला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानातून येणा-या दूरध्वनीमुळे घातपाती कारवायांचा संशय आल्यामुळे एटीएसने हे दूरध्वनी इंटरसेप्ट केले होते. पण त्यात सट्टेबाजांचा सहभाग आढळल्यामुळे या प्रकरणाची माहिती व जवळपास ७५ दूरध्वनी संभाषणाच्या नोंदी गुन्हे शाखेला देण्यात आल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे.

  पत्रकारांचे किस्से – भाग २

दिल्लीत १९८० मध्ये इराणी करंडक सामन्यासाठी पंच असताना गोलंदाजांच्या हातून चेंडू टाकताना सुटला आणि दुस-या टप्प्यात सिली पॉइंटच्या दिशेने जात होता म्हणून माझा सहकारी तो 'डेड बॉल' म्हणून तंबूकडे इशारा करणार, तेवढय़ात फलंदाजाने तो चेंडू जोरात मारला आणि तो सीमारेषेबाहेर गेला

दिल्लीत १९८० मध्ये इराणी करंडक सामन्यासाठी पंच असताना गोलंदाजांच्या हातून चेंडू टाकताना सुटला आणि दुस-या टप्प्यात सिली पॉइंटच्या दिशेने जात होता म्हणून माझा सहकारी तो 'डेड बॉल' म्हणून तंबूकडे इशारा करणार, तेवढय़ात फलंदाजाने तो चेंडू जोरात मारला आणि तो सीमारेषेबाहेर गेला.
पंचांनी तो चौकार रद्द केला. मात्र तेथील एका पत्रकाराने हे पाहिलेच नसल्याने त्याने आपल्या वर्तमानपत्रात गोलंदाजाने चौकार मारला तरी पंचांनी तो रद्द केला, असे छापले. मी ते वाचल्यावर त्याला बोलावून वस्तुस्थिती सांगितली. माहिती करून घ्या आणि मगच लिहा आणि खेळाकडे लक्ष ठेवा, असे सांगून तंबीही दिली.
१९८३ मधील वेस्ट इंडिजच्या दौ-यात दिवसाला ७७ षटके (कमीत कमी) टाकलीच पाहिजेत. मग खेळ पुढे वाढवला गेला तरी चालेल, अशी तरतूद होती. दिल्लीतील कसोटीत एका दिवशी ७४ षटकानंतर खेळ थांबल्यावर आम्ही आमच्या खोलीत कपडे बदलत असताना एक पत्रकार दार न ठोठावताच आत आला आणि आपण कोणीतरी चौकशी अधिकारी आहोत आणि जाब विचारत आहोत अशा अविर्भावात कमरेवर हात ठेवून (विठ्ठलाप्रमाणे) '७४ षटकेच का टाकलीत' असे विचारता झाला. तेव्हा 'तू कोण आणि दार ठोठावण्याचे सौजन्य न दाखवता आत येणे पत्रकाराला शोभते का?' असे म्हणून त्यास बाहेर जाण्यास सांगितले.
नंतर परत आत आल्यावर त्याला समजावले की, डाव संपल्यामुळे १० मिनिटांच्या मध्यंतरावेळची तीन षटके काढल्यामुळे (त्या वेळेला तीन मिनिटाला एक अशी पूर्ण षटके वजा करायची, असा नियम होता) ७४ षटके टाकली गेली, असा खुलासा केला. तसेच नियम माहीत करून घ्या आणि संप्रदायही पाळा, असा सल्ला दिला. त्याच सामन्यात खेळ संपल्यावर एक व्यक्ती खेळपट्टीजवळ आली आणि आम्ही आच्छादित केलेली खेळपट्टी पाहायची आहे, असे म्हणताच ''इथे कसा आलास? पंच, संघनायक आणि व्यवस्थापक यांच्याशिवाय कोणीही इथे येऊ शकत नाही (पूर्वीचा नियम, हल्ली समालोचकसुद्धा जातात) असे सांगितले.
तेव्हा 'मला त्या आत बसलेल्या पत्रकाराने सांगितले,'' असे सांगत त्याने वर नमूद केलेल्या पत्रकाराकडे बोट दाखवले. त्याबद्दलसुद्धा त्याला समज दिली. त्याच सामन्यात ब्रॅडमनच्या २९व्या शतकाची बरोबरी करण्याच्या जवळ गावस्कर असताना समोरच असलेल्या पत्रकार कक्षात हाच पत्रकार रंगीत कपडे आणि पांढरी हॅट घालून बसला पण मिनिटामिनिटाला उभा राहात होता. इतरांना खाली बसण्यासाठी हातवारेही करीत. उद्देश हा की, त्याचे लक्ष विचलित होऊन फलंदाज बाद व्हावा. मला गावस्करने तसे सांगितल्यावर मी १२व्या खेळाडूला बोलावून त्या पत्रकाराला ताकीद देण्यास सांगितले आणि तसा त्याला इशारा करताच हे चाळे बंद झाले!


  उडनखटोल्यातून 'उलानबतार'कडे

मंगोलिया हा देश आपल्याला माहीत आहे तो इतिहासातल्या चेंगीझ खानमुळे. या देशाची उलानबतार ही जगातली सर्वात उंचावर असलेली राजधानी. हे छोटेखानी शहर जगातील अनेक राजधानींच्या शहरांहून वेगळं आहे
'चिंगीस ख्हान' याची माझी ओळख 'चेंगीझ खान' अशी होती. मंगोलियाला भेट दिली नसती तर ती तशीच राहिलीही असती. मराठी माध्यमाच्या शाळेत माझ्या पुस्तकांनी व शिक्षकांनीही तसंच शिकवलं होतं. तसं तर सगळं जग त्याला त्याच्या पराक्रमांमुळे ओळखतं. मला तो भेटला नाही. तशी शक्यताही नव्हतीच, पण त्याचे वंशज भेटले, तेही त्याच्या देशात-मंगोलियात! तिथे मला त्याच्या नावाचा 'चिंगीस (यातला 'स' जरा 'ज' च्या जवळ जाणारा) ख्हान हा' खरा मंगोलियन उच्चार समजला व त्याच्या पराक्रमाबद्दल व तिथले लोक त्याचा किती आदराने उल्लेख करतात हेही कळलं.
तिथे जाण्याची संधी मला लाभली 'युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन'ने (म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने) देऊ केलेल्या फेलोशिपमुळे. १९९० मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या मंगोलियाला मी २००५ च्या एप्रिलमध्ये भेट दिली. मला जायचं होतं मंगोलियाची राजधानी उलानबतार येथे, तेही एका महिन्यासाठी. शिवाय जमलं, तर तिथल्या युनिव्हर्सिटीत मला शिकवायचं होतं. यासाठी की, तिथे शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम वापरत नसणार, असं मला वाटत होतं. उलानबतार हे नावच मला खूप गमतीदार वाटत होतं, कारण ते फार ऐकिवात नव्हतं. मला ते सारखं 'उडनखटोला' असंच आठवायचं आणि वाटायचं. कुणी तिथे गेल्याचं मी ऐकलंही नव्हतं.
उलानबतार ही जगातली सर्वात उंचावर असलेली राजधानी. मोंगोल म्हणजे मों (Mon) नदी (gol). काहींच्या मते, Mun म्हणजे सत्य आणि gol म्हणजे केंद्र वा तत्त्व. पुराणवास्तू शास्त्राप्रमाणे मंगोलियातला प्राचीन माणूस सुमारे ३०० ते ३५० हजार वर्षापूर्वी तिथे आढळला. या लोकांचं मूळ मध्य अशियात राहणा-या हूण लोकांत सापडतं. उलानबटारच्या दिशेने केलेला माझा प्रवास खूप वळणावळणांचा होता. मुंबईहून प्रवास सुरू करताना तो 'एअर इंडिया'नेच करण्याची युनिव्हसिटी ग्रँट्स कमिशनची अट होती. त्यामुळे 'मुंबई ते दिल्ली ते बँकॉक ते शांघाय' अशी फ्लाइट मला घ्यावी लागली. मग शांघाय ते बिजिंग, अशी 'चायना एअरलाइन्स'ने दुसरी फ्लाइट. बिजिंगच्या रात्रभराच्या मुक्कामानंतर 'चायना एअरलाइन्स'ची उलानबटारला जाणारी तिसरी फ्लाइट. या सर्व प्रवासात माझं सामान पुढच्या विमानात जाणार की नाही, ही शंका छळत होती. शांघायला तर हे कसं आणि कुणाला विचारायचं हे मला कळेना. तिथल्या विमानतळावर इंग्रजी कुणालाही कळत नव्हतं. शेवटी इंग्लंडहून आलेल्या एका प्रवासी कंपनीच्या प्रतिनिधीला विचारलं, तेव्हा त्याने मदत केली म्हणून कळलं की, माझं सामान मी स्वत:च पुढच्या फ्लाइटवर नेण्याची गरज होती. माझा संशय खरा ठरला होता.
शांघाय खरं तर औद्योगिक शहर, पण इंग्रजी बोलणारे चिनी मला बिजिंगला भेटले. बिजिंगहून घेतलेल्या दोन तासांच्या फ्लाइटबरोबर खाली थोडा बर्फही अधूनमधून साथीला होता. माझ्या शेजारी जर्मन बाई बसली होती. ती 'लिव्हिंग प्लॅनेट' वाचत होती. मी माझा खाली पाहण्याचा कार्यक्रम चालू ठेवला होता. सगळा परिसर मला नवीनच होता. बराचसा वेळ तर खाली गोबी वाळवंट व वर आकाश सोबतीला होते. शेवटी-शेवटी तर सगळीकडे बर्फच बर्फ होता. उलानबतारच्या 'बोयान्त उहा' या विमानतळावर उतरताना त्याच्या सभोवतीच्या बर्फाने झाकलेल्या लहान डोंगरांशी लपाछपी खेळावी लागली. पायलटने केलेल्या उद्घोषणेप्रमाणे तिथलं तापमान उणे ११ होतं. विमानतळावर बरीच माणसं होती, हे पाहून बरं वाटलं. मला घ्यायला सारांगतुया आली होती. विमानतळाच्या बाहेर पडताना तिने मला कान झाकून घ्यायचा आग्रह केला. मी तिला सांगितलं की, मी फिनलंडमध्ये उणे २० तापमान अनुभवलेलं आहे. तरीही तिने आग्रह धरला आणि तो किती योग्य होता ते बाहेर पडल्याबरोबर जोरात वाहणा-या थंडगार वा-यामुळे कळलं.
सकाळची ऑफिसं सुरू व्हायची वेळ होती, परंतु रस्त्यावर काही खूप गर्दी नव्हती. म्हणा २७ लाखांच्या आसपास लोकसंख्या व फक्त १.६ घनता (दर चौरस किलोमीटरला असलेली माणसांची सरासरी) असलेल्या या इतक्या थंड हवेच्या देशात एकावेळी किती माणसं मला दिसणार होती? तरी त्यापैकी एक तृतीयांश लोकं या शहरात राहत होती. त्या रुंद रस्त्यांवर मोठय़ा लांब कोरियन मोटारी फिरत होत्या. गरीब देशाला या मोटारी कशा परवडतात, या प्रश्नाचं उत्तर मला पुढच्या काही दिवसांत मिळालं. कोरियन लोकांनी वापरून जुन्या झालेल्या मोटारी इथले लोक विकत घेतात. तरीही आपल्या मोटारीची दुरुस्ती परवडण्यासाठी वाट पाहवी लागते, इतकं कमी उत्पन्न असलेली कुटुंब मला या वास्तव्यात भेटली. कोळशाच्या पॉवर प्लांट्सनी दूषित केलेल्या वातावरणात या जुनाट मोटारी भर घालतात. शिवाय पर्यावरणरक्षणासाठी कोणतेही कायदे केलेले नाहीत, त्यामुळे दुसरं काय होणार, असं मला त्या महिन्याभराच्या वास्तव्यात माझा सारखा खराब होणारा घसा सांगत राहिला. शिवाय हा देश सगळीकडून रशिया व चीनच्या जमिनीने वेढला आहे. कुठेही समुद्राशी भेट नाही. त्यातच तो सगळीकडून डोंगरांनी वेढलेला. मग दूषित हवा जाणार तरी कुठे?
प्रथमदर्शनी तरी उलानबतार एखाद्या युरोपातल्या देशासारखंच वाटतं. एकीकडे रशियन आर्किटेक्चरच्या भव्य इमारती ऑपेरा, पार्लमेंट इ. तर दुसरीकडे लोकांना राहण्यासाठी बांधलेल्या तीन-चार मजली ठोकळेबाज अनाकर्षक इमारती. पारंपरिक कपडे घालणा-या एखाद्-दुस-याचा अपवाद सोडल्यास इतर सगळे बाया-पुरुष युरोपियन पद्धतीचे कपडे वापरणारे! त्यामुळे इथल्या लोकांना इंग्रजी येत असणार व भाषेची अडचण येणार नाही, असा कुणी समज करून घेतला तर तो चुकीचा ठरावा. कारण इथे वापरली जाते मंगोलियन भाषा आणि लिहिण्यासाठी वापरतात रशियन लिपी, पण शब्द वेगळे व त्यांचे उच्चार वेगळे आणि त्यांचे अर्थही अनाकलनीय. काही मोजक्या लोकांनाच इथे इंग्रजी समजतं.
एकदा या शहराच्या बाहेर पडलं की, आणखी दोन-चार शहरं सोडली तर सगळ्या देशभर फक्त भटके लोक राहतात. त्यांचं आयुष्य अगदीच वेगळं. उन्हाळ्यात अति उत्तरेकडच्या डोंगरांवर थंड हवेत राहायचं व थंडीत सगळा बाडबिस्तरा, अगदी प्राण्यांसकट, घेऊन दक्षिणेकडे राहायला जायचं. हे करणं गरजेचं असतं. हा प्रवास इतका जिकिरीचा असतो की वृद्ध व्यक्तींना तो झेपत नाही, त्यामुळे त्यातली काही जण या प्रवासादरम्यान प्राण सोडतात. लहानग्यांनाही हा प्रवास कठीणच पडतो. या प्रकारच्या अस्थिर संस्कृतीत कला जोपासल्या जात नाहीत. त्यामुळे कलोपासक मंडळी इथे जवळपास नाहीतच. शिवाय शेतीही फारशी होत नाही कारण त्याला लागणारी सपाट वा शेतीला उपयुक्त जमीन इथे नाही व हवाही अति थंड! म्हणून निसर्गाने मेहेरबान होऊन इथल्या डोंगरांत सोनं, झिंक, लोखंड, फॉस्फेट, चांदी, कोळसा, निकेल अशी संपत्ती या देशाला बहाल केली असावी.
इथल्या लोकांचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे धुळीची वादळं, वणवे, दुष्काळ व 'झुड'(अत्यंत थंड हिवाळा).ब-याचदा या 'झुड' मध्ये इथल्या भटक्या जमातीला त्यांची जनावरं गमवावी लागतात. खूप नुकसान होतं त्यांचं. शिवाय हंगामाप्रमाणे उत्तर-दक्षिण-उत्तर-दक्षिण अशा केलेल्या प्रवासातही त्याचं (माणसं व संपत्ती याचं) नुकसान होतं. हे सगळं खरं असलं तरी त्यांची ही भटकंती अजूनही चालूच आहे. त्यांच्या अस्तित्वाचा तो भाग आहे. ही माणसं अत्यंत गरिबीत दिवस काढतात. त्यामानाने शहरातल्या लोकांना बरं उत्पन्न मिळतं. तेही काही फार मोठं नसतं. सुमारे दर महिना १०० डॉलर म्हणजे चांगलं उत्पन्न समजायचं. माझ्या महिनाभरातल्या वास्तव्यात मला एकटीसाठी तेवढे पैसे लागले होते.
विमानतळावरून परत जाताना सारांगतुया मला माझे डॉलर्स तिथल्या पैशात बदलण्यासाठी एका बँकेत घेऊन गेली. तिथलं चलन आहे तुग्रीक! माझ्या ५० डॉलर्सचे मला मिळाले ५८५०० तुग्रीक. मी आनंदले! माझ्याकडे खूपच पैसे होते, वाटलं एवढे डॉलर्स उगाच बदलले आपण. हे तर एका महिन्याला पुरून उरतील. मात्र संध्याकाळी सारांगतुया मला बाजारात घेऊन गेली, तेव्हा तो माझा केवळ भ्रम होता हे लक्षात आलं. दूध, ब्रेड, बटर, कॉर्नफ्लेक्स, ज्यूस आणि थोडी फळं घेतली तेव्हा माझ्याकडचं जवळपास १०००० तुग्रीक चलन संपलं होतं. मी सारांगतुयाला म्हटलं, ''हे सगळं एवढं महाग का गं आहे?''
ती म्हणाली, ''हे सगळं आमच्याकडे बनत नाही. आयात केलं जातं, म्हणून महाग आहे, म्हणूनच तर आम्हा सगळ्यांना फळं खायला परवडत नाहीत.''
''मग तुम्ही काय खाता?'' मला उत्सुकता होती.
''सगळे मांसाहारी आहोत, त्यामुळे तेच खातो. हे बाकीचं कधीतरी पैसे असले उडवायला तरच..'', सारांगतुया सुस्कारा टाकत म्हणाली.
माझा नाईलाज होता. कारण मी शाकाहारी आहे. मंगोलियन कट्टर मांसाहारी. मेंढी, घोडा, गाय अशा तिथे मिळणा-या कोणत्याही प्राण्याचं मांस ते खातात. जागतिकीकरणामुळे अलीकडच्या काळात मुख्यत्वे भाजीपाला, फळं, इत्यादी आयात केलं जातं. हे सगळं नसतं तर माझ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली असती. तिथे जो ब्रेड मिळत असे त्यालासुद्धा अंडय़ाचाच वास येई वा ब-याचदा त्यात मांस भरलेलं असे. ते खाणंही मला शक्य नव्हतं. कधीतरी युनिव्हर्सिटीच्या कँटिनमध्ये मिळणारा चिनी तांदळाचा चिकट भात व त्याला तोंडी लावणं म्हणून आलटून पालटून गाजर वा काकडीचं सॅलड खाऊन 'जगण्यासाठी खाणं' हा मंत्र मी जपत होते.
दूधदेखील प्रथम विकत घेतलं तेवढंच. त्याचं असं झालं की, कॉर्नफ्लेक्स विकत घेतले होते. त्यामुळे दूध विकत घेणं आलं. जवळच्याच एका दुकानातून मी 'गायीचं दूध' असं लिहिलेलं एक पॅकेट विकत घेतलं. मी जिथे राहत होते तिथल्या हॉस्टेलच्या खोलीत येऊन ते उघडलं आणि कॉर्नफ्लेक्सवर ओतलं. खुशीत खायला सुरुवातही केली न् काय! त्याच्या वासाने हैराण होऊन मी तोंडातला घास थुंकला. मला कळेना की, वास कॉर्नफ्लेक्सला येतोय की दुधाला? वेगळा वास घेऊन पाहिल्यावर लक्षात आलं की तो दुधाला येत होता. गायीच्या दुधाला एवढा घाण वास?
दुस-या दिवशी युनिव्हर्सिटीत पोहोचल्यावर मी सोलाँगोला विचारलं तर ती खूप हसली. ''अगं, आमच्याकडे गाय म्हणजे याक. त्याचं दूध आहे ते. असाच वास असतो त्याला. तू घेऊ नकोस.''
मग दूध या विषयावर चर्चा सुरू झाली. नारन्त्सेतसेग म्हणाली, ''आमच्याकडे तर घोडीचं दूधदेखील पितात. ते आरोग्यासाठी खूप छान असतं.''
''ते प्यायल्याने रक्त शुद्ध होतं. सगळे आवडीने पितात. मुलांनाही पाजतो ते. या दिवसांत (ते एप्रिलचे दिवस होते) ते मिळत नाही. नाहीतर तुला नक्की दिलं असतं,'' ऑडवल म्हणाली.
मी याबाबत ऐकलेलं होतं, म्हणून उत्सुकतेने मी जास्त माहिती विचारली. तेव्हा कळलं की, हेच ते 'आंबट दूध (sour milk) ज्याबद्दल मी वाचलं होतं. घोडीचं दूध आंबवून ते बनवतात. आंबल्यावर ते कातडीच्या पिशवीत घालून लाकडाने खूप ठोकतात. मग ते प्यायचं. हे सांगून झाल्यावर सोलाँगो हसत म्हणाली,''जपून पी हं. ते दारूसारखं चढतं.'' आश्चर्य हे होतं की, तरीसुद्धा ते मुलांना पाजलं जातं. आपल्याकडे लहान मुलांना बाळकडूबरोबर एक वळसा अफूचाही घालत असत, त्याची आठवण झाली.
तेवढय़ात सोलाँगोच्या मुलीची शाळा सुटायची वेळ झाली म्हणून ती शाळेकडे निघाली. ब-याच जणींची मुलं त्यांच्या शाळेतून आली की, त्यांच्याबरोबर ऑफिसातच येत होती. स्वत:च्या घरात असल्यासारखी ती तिथेच खेळत बागडत. कॉम्प्युटर वापरत. संध्याकाळी आईबरोबर घरी जात. हे सगळं तिथे मान्य होतं. सगळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या गावी राहात. उलानबतारमध्ये फक्त काम करणारी मंडळी राहात. मग मुलांनी कुठे जायचं? इथल्या शहरातली लोकसंख्या कमी होत आहे. कारण मुलं झाली तर ती सांभाळणार कोण? त्यासाठी नोकर परवडत नाहीत. विकसित देशांत असते तशी मुलं सांभाळण्यासाठी सरकारी सुविधाही नाही. साधारणपणे शाळेत जायच्या वयाची होईपर्यंत ही मुलं 'गावी' दोघांपैकी कुणाच्या तरी पालकांबरोबर राहतात. जरी तिथे सगळ्यांचे कपडे युरोपियनांसारखे होते तरी प्रश्न मात्र खूप वेगळे होते.
आपल्याकडे मात्र असं दृश्य पाहायची मला सवय नव्हती. लायब्ररीमध्ये काम करणा-या तोलगाशी माझी नीट ओळख झाली, तेव्हा मला तिची गोष्ट समजली. तोलगाला दोन वर्षाची मुलगी होती. पण ती दूर तिच्या आईबरोबर राहत होती. 'तू तिला जवळ का ठेवत नाहीस?' या प्रश्नाला तिने दिलेलं उत्तर मी प्रातिनिधिक मानते. ती म्हणाली, ''शक्यच नाही. तिला सांभाळण्यासाठी कुणी ठेवणं परवडतच नाही. शिवाय ती आईकडेच असल्याने मी काळजीही करत नाही. ती शाळेत जायच्या वयाची झाली की, तिला इथे आणेन मी. सगळं तसंच करतात. आठवण खूप येते, पण नाईलाज आहे.'' खरं तर तिला मुलगी आहे वा तिचं लग्न झालंय, हे नारन्त्सेतसेगने सांगितलं नसतं तर तिच्याकडे पाहून कळलंच नसतं मला, इतकी ती नाजुक होती. हे सांगताना मात्र तिच्या रुंद चेह-यावर थोडी दु:खाची छटा दिसत होती.
मंगोलियाबद्दल आणखी पुढील भेटीत..

  प्रकाशाचा रंगारंग खेळ!

वृत्तपत्रछायाचित्रकार म्हणून काम करताना ब-याच वेळा स्टेज इव्हेंट कव्हर करावे लागतात. ते करताना सर्वात आव्हानात्मक असतं ते दिव्यांची उघडझाप सांभाळणं. स्टेजवर चाललेल्या नृत्याच्या ठेक्याप्रमाणे स्टेजवरचे दिवेही कधी प्रखर होतात, तर कधी मंद. त्यामुळे कॅमे-याच्या रीडिंगमध्ये फरक पडतो. साहजिकच छायाचित्रं टिपणं अवघड बनतं. डिस्को लाइटची उघडझाप होत असल्याने फोकस शिफ्ट होतो, मग अशा वेळी अत्याधुनिक कॅमेरा असूनही मॅन्युअल फोकसचा वापर करावा लागतो. बदलते लाइट्स आणि कमी-जास्त होणा-या प्रकाशात कॅमे-याचं रीडिंग, फोकस, नृत्याची मूव्हमेंट हे सर्व सांभाळणं म्हणजेच छायाचित्रकारांसाठी तारेवरची कसरत असते. ती साधत मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या कोकणातल्या लोककलांचं सादरीकरण करणा-या 'रंगारंग २०१३'ची टिपलेली ही काही छायाचित्रं..


  नजूबाईंचा एल्गार

आदिवासींना आपल्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात यासाठी धुळे-नंदूरबार परिसरात १९७२ साली देशात पहिला लढा उभा राहिला. या लढय़ाचे प्रमुख नेतृत्व नजूबाई गावित यांनी केले होते. हा लढा रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजापर्यंत नेण्याचे मोठे योगदान त्यांचेच आहे. आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी उभ्या केलेल्या संघर्षातून त्यांची नकळतपणे नेणीव घडली आणि त्यातूनच 'आघोर', 'तृष्णा', 'भिवा फरारी' या कलाकृतींची निर्मिती होत गेली. याच नेणिवेच्या आविष्कातून घडलेला नजूबाईंचा 'नवसा भिलणीचा एल्गार!' हा पहिला कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे.
धुळे जिल्ह्यातल्या भूमिहीन आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या आणि जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या नजूबाई गावित यांचा 'नवसा भिलणीचा एल्गार!' हा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. एकूण सात कथांचा समावेश असलेल्या या कथासंग्रहातील 'जवानीमा किसबीण', 'धडमपणा डाकीण','मी ह्येर ना, नदी सय','बांबूची मोळी' या तीन कथा 'सत्यशोधक मार्क्‍सवादी'च्या जून, मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबरच्या १९९२च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. १९९२च्या काळात गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, शरणकुमार लिंबाळे आदी अनेकांनी नजूबाईंची 'बांबूची मोळी' ही कथा वाचून त्यांना पत्र लिहून कथा आवडल्याच्या प्रतिक्रिया कळविल्या होत्या, नाटककार विजय तेंडुलकर याच कथेवर चित्रपट तयार करण्याच्या तयारीत होते. अशी ही कथा वाचकांना 'नवसा भिलणीचा एल्गार!' या कथासंग्रहाच्या माध्यमातून पुन्हा वाचकाला उपलब्ध झाली आहे. नजूबाईंनी सुरुवातीला १९९५ साली 'आदोर' ही आत्मनिवेदनपर कादंबरी लिहिली होती. त्यानंतर चार वर्षानी 'तृष्णा'आली आणि तीन वर्षापूर्वी 'भिवा फरारी'! नजूबाईंनी मोजक्याच कथा लिहिल्या आहेत. त्या सर्व कथाचं संकलन असलेला 'नवसा भिलणीचा एल्गार!' त्यांचा पहिलाच कथासंग्रह! नजूबाईंची खरी ओळख देशातील पहिल्या स्वतंत्र आदिवासी लेखिका अशी आहे. नजूबाईंनी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलेलं असलं तरी त्यांची प्रतिभाशक्ती आणि साहित्यातील जीवनवादी दृष्टिकोन लक्षात घेता त्यांची प्रत्येक साहित्यकृती मराठी साहित्याला आयाम देणारी ठरत आहे. त्याचे हे लिखाण लेखिका बनण्याच्या ओढीतून घडलेले नसून ते स्वभावत: त्यांच्या संघर्षशील आयुष्यातून घडत गेले आहे. यामुळेच या संघर्षानेच ज्ञान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची त्यांची नेणीव घडली. आदिवासींचे आयुष्य एखाद्या चलत्चित्राप्रमाणे त्यांनी रेखाटले आहे. स्वत:च्या नकळत 'परिणत' साहित्यिका बनलेल्या नजूबाईंनी उभी केलेली पात्रे हे साहू बोलीतून बोलताना दिसतात. त्यामुळे बिगर आदिवासी समाजालाही त्यांचे लेखन सहज भावते. ओघवती व साधी शैली ही त्याच्या संपूर्ण लिखाणाची वैशिष्टय़े म्हणता येतील. साध्या सरळ जीवनशैलीची त्यांच्यावर छाप असल्यामुळे त्यांच्या कथासंग्रहातील प्रत्येक पात्र हे आपल्या आजूबाजूच्या साहू समाजाचे आणि त्यापलीकडे आदिवासीच्या जीवनात असलेल्या तीव्र संघर्षाचे भयाण वास्तव मांडताना दिसतात.
मुळातच ज्ञानप्रक्रियेमध्ये नजूबाईंसारख्या आदिवासी स्त्रीने येणे हा एक चमत्कार म्हणायला हवा. अद्याप खुद्द साहू समाजातील शोषित घटकसुद्धा या ज्ञानप्रक्रियेपासून कितीतरी दूर आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दशकात दलित, ग्रामीण साहित्य प्रस्थापित व्यवस्थेच्या वळचणीला गेल्यामुळे त्यात नावीन्य उरलेले नाही. यामुळे ते मरणासन्न अवस्थेत गेल्याचे दिसते. या कारणामुळे नजूबाईंचा 'नवसा भिलणीचा एल्गार!' हा कथासंग्रह दलित साहित्याला नवं जीवनदान देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे वाटते. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही आदिवासी समाजातील आणि देशातील हजारो वर्षाच्या पुरुषसत्तेचा बुरखा फाडणा-या आहेत. केवळ व्यवस्थेच्या विरोधात शिव्या घालणारे लिखाण त्यांनी केले नाही. त्यांच्या कथेतील प्रत्येक पात्र हे या देशातील व्यवस्थेचा एक भाग असते. ती व्यवस्था आदिवासी कुटुंबातच आहे, असे नाही तर त्याचा प्रत्यय सर्वच समाजात कमी-अधिक फरकाने दिसून येतो. यामुळे या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही या देशातील व्यवस्थेला एक नवे आव्हान निर्माण करणारी आहे.
स्त्री ही स्वभावत:च समतावादी असते. ती समतेच्या विद्रोहाने पेटून उठली तर पुरुषी व्यवस्था उलथून टाकू शकते. यामुळेच तिला विद्रोहाच्या पातळीवर येऊ न देता आत्यंतिक दमनावस्थेत सोडणे हे पुरुषी व्यवस्थेचे परमकर्तव्य असते. भारतीय जात-जमात, वर्ग समाजव्यवस्थेमध्ये स्त्री ही तीनस्तरीय दमनाची शिकार असली, तरी आधुनिक काळामुळे तिला लाभलेले निमस्वातंत्र्य तिला समग्र समतेच्या संघर्षाकडे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे पुरुषी व्यवस्था नष्ट होऊ शकते. अधिकार वंचित होऊ शकते. या पुरुषी असुरक्षित भावनेतूनच तिला डायण, डाकीण ठरवून या संघर्षापासून दूर ठेवले जाते. तिला स्वातंत्र्यापासून, अधिकारापासून कायम वंचित ठेवले जाते. याच सर्व व्यवस्थेच्या विरोधात तिचा संघर्ष, बलिदान सुरू आहे. सीता, ताटका, शबरी, शूर्पणखा यांनी निर्ऋतीच्यास्वातंत्र्य, समता व मित्रता या मूल्यत्रयीच्या आधारे वैराज्याची जी परंपरा जतन केलेली आहे व त्या मूल्यातून नवसमाजवादाची निर्मिती होणार आहे. हा स्त्रीच्या सामूहिक नेणिवेचे अपत्य हाच नजूबाईंच्या कथासंग्रहाचा मूळ गाभा आहे. नजूबाईंच्या प्रत्येक कथेत स्त्रियांचा व्यवस्थेच्या विरोधातील संघर्ष असला तरी कुतर-खांब या कथेत गोमा, झिमा आणि गो-या या तिघांची कथानके आदिवासींच्या जीवनातील इतर अनेक अंग उलगडून दाखवताना दिसतात.
नजूबाईंच्या प्रत्येक कथेमधून जातिव्यवस्थेचे विदारक व मरणोन्मुख चित्र पाहावयास मिळते. यामुळेच 'नवसा भिलणीचा एल्गार!' या कथेतील पुरुषसत्तेचे बळी ठरलेली नवसा म्हणते, 'आसरा मावल्यांनो! पुरुषसत्तेचा नाश होऊन पुढच्या काळात बायांचं राज येओ!' तर दुसरीकडे नव-याच्या विरोधात बंड करून आपले आयुष्य नव्याने सुरू करताना 'मी मर्दासारखी आहे, परक्या कुत्र्याची सेवा करण्यापेक्षा आईबाची सेवा मोठी' असे सांगून व्यवस्थेला हादरे देणारीही ठरते. आसरांनी केलेल्या नवसातून जन्मलेली सामाजिक सर्वहारांची प्रतिनिधी म्हणून नवसा भिलीण जातिव्यवस्थेच्या विरुद्ध एल्गार करते. या कथासंग्रहातील जवानीमा किसबीण, धयडपणमा डाकीण या कथेत याच व्यवस्थेने डाकीण ठरवलेली तानकुबाईची कथा ही मनाला प्रचंड वेदना देऊन जाते. तानकुबाईचा दोष केवळ मूल होत नाही इतकाच असतो. व्यवस्थेने वांझ ठरवलेली तानकुबाई आपल्या नव-याला नुसती अडचणीची ठरत नाही तर तिला विकण्यापर्यंत नव-याची कशी मजल जाते याचे हृदयद्रावक चित्र लेखिकेने उभे केले आहे. भुताळ्या या कथेतील वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. मंगळ्या भगताकडून चालवलेल्या अमानुष प्रथेबद्दल चीड निर्माण होते. एकूणच नजूबाईंच्या या कथासंग्रहात देशातील सर्व कष्टकरी, शोषित, महिलांचा व स्त्रीसत्तेचा आणि नवसमाजवादाची उभारणी करण्याचे सामर्थ्य देतो. गेल्या दोन दशकांनंतर मराठी साहित्याला समृद्ध करणारा हा कथासंग्रह म्हणून आणि येत्या काळात मराठी कथेला एक नवे आयाम देणारा कथासंग्रह ठरू शकेल.
नवसा भिलणीचा एल्गार
सुगावा प्रकाशन
पानं : ९६ किंमत : ७० रुपये

  दिवस कवीचे फुलायचे

मंगेश पाडगावकर आणि मकरंद साठे एक कवी तर एक नाटककार या दोन लेखकांनी आपापल्या क्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीचा गौरव गेल्या आठवडय़ात करण्यात आला. भिन्न लेखनशैली असलेल्या या दोन लेखकांच्या सन्मानाच्या कार्यक्रमांचा हा वृत्तांत..
काही कवी असे असतात, ज्यांनी कुठल्याही विषयावर लिहिलेली कविता रसिकांची सहज दाद मिळवून जाते. मंगेश पाडगावकर असंच एक नाव आहे! ज्यांच्या अनेक कवितांची गाणी तयार झाली आहेत. अनेक मान्यवर संगीतकार आणि गायकांच्या आवाजामुळे या कवितांची अजरामर गीतं तयार झाली आहेत. वयाची ८४ वर्ष पूर्ण करूनसुद्धा आजही हा कवी एखाद्या तरुण कवीला लाजवेल अशा दमाने कविता सादर करतात. या सगळ्याची पुन्हा मनाला जाणीव 'माझे जीवन गाणे- एक कविता चरित्र' या डीव्हीडी संचाच्या प्रकाशन कार्यक्रमात झाली. पाडगावकरांचा कविता लेखनाच्या क्षेत्रातला आजवरचा सगळा प्रवास मुलाखतीतून उलगडण्याचा प्रयत्न निवेदक भाऊ मराठे यांनी केला. याच मुलाखती दोन भागात डीव्हीडीच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. १९ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमाला रविवार असल्याकारणाने निवडक पाडगावकर प्रेमींनीच हजेरी लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात मराठे यांनी पाडगावकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन झाली. यामुळे मुलाखतीच्या पहिल्या भागात पाडगावकर जुन्या आठवणींविषयीच बोलत होते. असं असलं तरी त्यांनी अधूनमधून प्रश्नाला अनुसरून काही कवितांचं वाचन केल्यामुळे कार्यक्रमाची रंजकता टिकून राहिली. 'नाना-काकांच्या वडिलांचा वाढदिवस'ही कविता वाचून झाल्यावर 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' ही कविता वाचून दाखवण्याचा आग्रह निवेदकांनी धरला आणि ती वाचून दाखवण्यास ते राजी झाले, पण याआधी पाणी हवं म्हणून त्यांनी पाणी प्यायला घेतले आणि त्यानंतर 'प्रेमाची कविता वाचायची म्हटल्यावर घसा ओला हवा ना,' प्रसंगावधान राखून केलेल्या विनोदाने सभागृहातील प्रेक्षकांना मनमुराद हसवले.
कवितेतला अमुक एक शब्द बदला, असं कोणी आजपर्यंत सांगितलं आहे का, या प्रश्नाला त्यांनी असं सांगायची अजून तरी कोणाची हिंमत झाली नाही. पण एकदा असं झालं, मी 'दिवस तुझे हे फुलायचे' ही कविता माझ्या वहीत लिहून ठेवली होती. मुलगा घरी आला आणि बाबांनी नवीन काय लिहिलं आहे का, हे पाहायला त्याने सहज वही उघडली. कविता वाचून 'थांब नागडे' जराशी या ओळी बदलायला सांगितल्या. त्याला मी याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, हे गाणं गाणा-या गायकाला योग्य पॉज कुठे घ्यायचा हे जरं कळलं नाही तर गाण्याचा अनर्थ होईल. हे म्हणजे माझ्या कवितेचं वस्त्रहरणच होतं. या उत्तराच्या जोडीला त्यांनी कवितेची गाणी होताना आलेले इतर दोन-तीन गमतीदार अनुभवही सांगितले.
कार्यक्रमाच्या दुस-या भागात ज्येष्ठ गायक आणि बंदीशकार शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि आबा सोहनी यांच्या हस्ते डीव्हीडीचं प्रकाशन करण्यात आलं. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा सगळा कार्यक्रम पार पडला. राजेंद्र प्रकाशनचे सर्वेसर्वा राजेंद्र कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनाचं औचित्य साधून त्यांच्या प्रकाशन संस्थेतर्फे 'व्यक्त अव्यक्त', 'अद्भुताच्या शोधात', 'वाळूत उमललेलं फूल', 'एका पुनर्जन्माची कथा', या चार वेगळ्या विषयावर आधारित पुस्तकांचं प्रकाशन पं. यशवंत देव यांच्या हस्ते करण्यात आलं. स्मृतिदिनानिमित्ताने उपस्थित लेखकांनी राजेंद्र कुलकर्णीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे त्याच्या कुंटुंबीयांसह उपस्थित सर्वच जण भावूक झाले होते. अत्यंत गंभीर वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यंदाचं केशराव कोठावळे स्मृती पारितोषिक मकरंद साठे यांच्या 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' या त्रिखंडात्मक ग्रंथाला देण्यात आलं. प्रा. पुष्पा भावे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं. एका नाटकांविषयी चांगली आणि वाईट निरीक्षणं तटस्थपणे नोंदवली असून त्यांची छेदात्मक सूची या विषयातील अभ्यासकांना महत्त्वपूर्ण ठरणारी असल्याचं मतं त्यांनी आपल्या भाषणात नोंदवलं. समीक्षक सुबोध जावडेकर यांनी या तिन्ही ग्रंथांचं अत्यंत अभ्यासपूर्वक विश्लेषण करत ग्रंथातल्या त्रुटींवर अचूक बोट ठेवलं. याही कार्यक्रमाला तुरळकच श्रोते उपस्थित होते.
कोठावळे प्रकाशन ठाणे यांच्या 'चौफेर', 'भावस्पर्श' आणि 'व्हायब्रंट आंत्रप्रिन्योर' ही अभिजीत तुपदाळे, रवींद्र जाधव, विलास मुणगेकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सहयोग मंदिर, ठाणे येथे पार पडला. सुमेध वडावाला यांनी लिहिलेलं सुनीता श्िंादे यांचं 'पुस्तक उघडलं' या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा आमदार विद्या चव्हाण, महेश नवाथे, प्रदीप लोखंडे, उत्तमकुमार जैन यांच्या उपस्थितीत शिवाजी मंदिर येथे पार पडला. कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेण्याची दृष्टी स्त्रीकडे असते. जेव्हा विदर्भातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनी आत्महत्या केल्या नाहीत, त्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला, जो आजही सुरू आहे. एकीकडे नवरा कुष्ठरोगाने आजारी असताना आणि दुसरीकडे याच कारणामुळे समाजाने बहिष्कृत केलं,असं असलं तरी या सर्व अडचणीवर मात करत स्वत:चं कुटुंब सावरण्याबरोबरच इतर सामान्य महिला आणि अनाथ मुलांसाठी सामाजकार्य शिंदे यांनी केलं. त्यामुळे त्याचं हे आत्मकथन म्हणजे खरोखरच स्त्रीशक्तीचा एक वेगळा आविष्कार असल्याचं मत विद्या चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं. चळवळीत काम करणा-या प्रत्येक स्त्रीने हे आत्मचरित्र वाचायला हवं,  असंही त्या यावेळी म्हणाल्या. सुनीता शिंदे यांच्या मनात धडाडी, कल्पकता, अखंड ज्ञानलालसा आणि कृतज्ञता आणि करुणा या पंचकन्या वसत होत्या. म्हणूनच त्या दारिद्रय़ावर यशस्वी मात करू शकल्याचं सुमेध वडावाला (रिसबूड) म्हणाले. लेखिका सुनीता शिंदे यांनी सहशिक्षिका ते फिल्ड ऑफिसर हा प्रवास करतानाच्या ब-या वाईट आठवणींना उजाळा दिला.

  स्वच्छंदी 'रान-उन्मन'

कोणत्याही गोष्टीचं आकर्षक वर्णन करण्यासाठी विशिष्ट दृष्टी असावी लागते. त्यासाठी शून्यात शिरणं क्रमप्राप्त असतं. नंतरच फुलतो उत्कट शब्दप्रपंच. कवी डॉ. प्रशांत पांढरे अशा प्रकारचाच एक उत्तम काव्यसंग्रह घेऊन काव्यप्रांगणात दाखल झाले आहेत.
झाडाचा डोलारा कितीही पसरला तरी त्याचं मूळ नातं जमिनीशीच असतं. माणसाचंही याहून वेगळं नाहीयं. एखाद्याचं व्यक्तिमत्त्व कितीही मोठं झालं तरी त्याची नाळ त्याच्या मुळाशी म्हणजेच जन्माच्या ठिकाणाशी जोडलेली असते. कवी डॉ. प्रशांत पांढरे हे अशांपैकीच एक. पेशाने डॉक्टर, मात्र मनानं गावरान गावकरी. व्यवसायाच्या माध्यमातून विज्ञानाच्या हातात हात घालावा लागत असला, तरी मायमातीचं बोट त्यांनी कधीच सोडलं नाही. म्हणूनच तर गावाकडच्या आपल्याच विश्वात मश्गुल जीवनाला त्यांना शब्दरूप द्यावंसं वाटलं आणि साकारला 'रान-उन्मन' हा बहुरूपी कवितासंग्रह!
शेती हा केवळ व्यवसाय नसून एक उन्माद आहे. अवसानघातकी मौसमाशी झुंजत दाण्यांना नवं जीवन देण्यात एक वेगळंच 'थ्रील' आहे. अर्थात, याची जाण केवळ त्या मातीत राबलेल्याच असू शकते. कवीनेही अगदी कापसापासून तुरीपर्यंतच्या पिकाच्या हंगामाचा या कवितासंग्रहात न चुकता आढावा घेतला आहे. तो म्हणतो,
हिर्व्या हिर्व्या कपाशीले
चांदण्या लगडल्या
तुरीच्या हारी मधी
राघू मैना झगडल्या

ओटीपोटी गचगच्च
दाटला हंगाम
लख्लख् लख्लख्
दान्यादान्यावर तेजाब

आपल्याकडच्या पावसाचा काहीच नेम नसतो. तो कधी आभाळाकडे डोळे लावून बसायला भाग पाडतो, तर कधी डोळ्यांत पाणी आणेस्तोवर कोसळतो. गावच्या जीवनाचा आस्वाद घेतलेल्यांना हा अनुभव नवा नाही. साहजिकच कवीसुद्धा याला अपवाद नाहीयं. आधाश्यासारखा ओतणा-या या पावसाचे व त्याच्यामुळे खोळंबा झालेल्या शेतक-याचे वर्णन करताना तो म्हणातो,
वघळच वघळ
रिपरिप पान्याचे
झडीनं सादळले
कुडं घराचे
निसर्गाची नानारूपं शब्दबद्ध करणा-या डॉ. प्रशांत पांढरे यांना केवळ 'निसर्गकवी' म्हणणं अनुचित ठरावं. कारण सृष्टीचे सुरेख रेखाटन करतानाच त्यांनी सामाजिक आशयही तितक्याच उत्तमरीत्या हाताळला आहे. खासकरून त्यांच्या शृंगारिक ओळी त्यांच्यातील प्रतिभेचा अनोखा आयाम समोर आणतात. प्रदीप गांधलीकर यांनी आपल्या प्रस्तावनेत डॉ. पांढरे यांचा निसर्गकवी म्हणून परिचय करून दिला असला तरी त्यांच्या कविता निसर्गवर्णनाच्या खूप पुढे जातात. त्यांच्या कवितासंग्रहाची सुरुवातच पांडुरंगासोबतच्या लडिवाळ भांडणाने होते.
खूब फसवलंस बाबा.
चांगली कोंडी केलीस देवा!
तुझ्यापायी धड संसारात मन रमेना
अन् संसाराच्या बेडीपायी मोकळं भटकताही येईना
समाजातील स्वार्थी वृत्तीवरही कवीने अत्यंत मार्मिक टिपण्णी करताना तो म्हणतो,
चारा घेऊन चोचीत
जात होता हंस एक
पाठीमागे आशाळभूत
काक अनेक अनेक

स्वार्थ हेच सा-या
कारस्थानाचे कारण
जाणून मर्म हंसाने
मोती दिले भिरकावून
दुस-या एका कवितेत कवीने ढोंगीपणावर बोट ठेवले आहे.
वस्तीत फाटक्यांच्या
वसतात वेद सारे
देहात फासळ्यांच्या
झिजतात देव सारे

अवघा संत गोतावळा
इथलेच अभंग गाणारे
माझे विठ्ठल रुख्माई
तुझे बुडताना भेटणारे
शृंगाराच्या नानाछटा कवीने आपल्या शब्दांतून चितारल्या असल्या तरीही मात्र सर्वाधिक भावतं ते चिंब पावसात भिजलेल्या ललनांचं वर्णन करताना कवी म्हणतो,
भर पावसात झिम्मा फुगडी
नितळ काया चिंब लुगडी

नग्न केतकी पाठीवरती
केस ओले कुरळे कुरळे
गच्च बिलगून पोट-यांना
वाटसरूचे आसूस डोळे
'रान-उन्मन' हा कवी डॉ. प्रशांत पांढरे यांचा पहिला कवितासंग्रह निसर्गाच्या निर्विवाद सौंदर्यासोबत जीवनातील विविध छटांचे दर्शन घडवून आणतो. बहिणाबाई, बालकवींपासून ते ना. धों. महानोर यांसारख्या खान्देशातील अनेक प्रगल्भ कवींनी निसर्ग कविता आपापल्या प्रतिभेने समृद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याच मार्गावर पाऊल टाकताना डॉ. पांढरे यांनी निसर्गासोबत अन्य सामाजिक विषयही तेवढय़ाच ताकदीने हाताळले आहेत. त्यांचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.
रान-उन्मन
संवेदना प्रकाशन
पानं : ७२ किंमत : १०० रुपये

  काळाचा सुकाळ नसला तर काय झाले?

इंग्लिशमध्ये आहेत तसे काळ मराठीत नाहीत म्हणून नव्यानं एखादा काळ सुरू करण्याची गरज नाही. तशी ठिगळं मराठीला जोडल्यास मराठीच्या गालिच्याचं सहजपणे पोतेरं होण्याची शक्यता आहे. तेव्हा भाषेच्या मूळ सांगाडय़ात कोणीही अशी मोडतोड करता कामा नये. इंग्लिशचा भारी सुंदर आयता बूट मिळाला आहे, तेव्हा आपलं पाऊल त्यानुसार लहान करून घेऊ, असा अविचार कोणीही करता कामा नये.
मागच्या लेखात आपण पाहिलं की, काळ हे त्या-त्या भाषेचं वैशिष्टय़ असतं. आजकाल इंग्लिशच्या संपर्कामुळे अनेकांना असं वाटतं की, इंग्लिशच्या तुलनेनं आपल्या भाषा कमी पडतात, कारण इंग्लिशमध्ये आहेत तसे आणि तेवढे काळ आपल्या भाषांमध्ये नाहीत.
इंग्लिशमध्ये चालू काळ (कन्टिन्युअस टेन्स) वर्तमान, भूत आणि भविष्य अशा तिन्ही प्रकारात असतात. उदा-
वर्तमानकाळात – I am reading a novel. (मी कादंबरी वाचत आहे.)
पूर्ण वर्तमानकाळात – I have been reading a novel.(मी केव्हापासून कादंबरी वाचत आहे.)
भूतकाळात – I was reading a novel.(मी कादंबरी वाचत होतो.)
पूर्ण भूतकाळात – I had been reading a novel.(मी कधीची कादंबरी वाचत होतो.)
भविष्यकाळात – I will be reading a novel. (मी कादंबरी वाचत असेन/असणार.)
या काळांची तुलना आपल्या भाषांशी केली तर दिसतं की, यातले दोन काळ म्हणजे Present perfect continues आणि Past perfect continues हे काळ आपल्याकडे नाहीतच. (जी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि अजूनही चालू आहे अशा क्रियेचं वर्णन करण्यासाठी इंग्लिशमध्ये काळांचा उपयोग होतो.) अशा काळांची कल्पनाच आपल्याकडे नसल्यामुळे सामान्यत: इंग्लिशमधल्या अशा वाक्यांचं भाषांतरही भारतीय भाषांमध्ये नीट होत नाही.
I am readign a novel आणि I have been reading a novel किंवा
I was reading a novel आणि I had been reading a novel
या दोन्ही वाक्यांच्या जोडय़ांचं भाषांतर एकसारखंच केलेलं असतं.
हे दोन काळ आपल्या भाषांमध्ये नाहीत याचा अर्थ असा मुळीच नाही की, आपल्या भाषा अभिव्यक्तीत कमी आहेत. ही गोष्ट आपण वेगळ्या तऱ्हेनं सांगतो, उदा. I have been reading a novel याचा अर्थ मराठीत योग्य प्रकारे सांगण्यासाठी ती क्रिया पूर्वीच सुरू झालेली आहे, हा अर्थ आपण काळाच्या माध्यमाने सांगू शकत नसलो तरी त्यासाठी एखादा शब्द योजून आपण तो अर्थ सांगू शकतो – मी कधीची / केव्हापासून / पूर्वीपासून / अगोदरपासून / मागच्या महिन्यापासून / कालपासून / सकाळपासून..अशा अनेक प्रकारे हे सांगू शकतो. हा काळ नाही म्हणून मराठीत नव्यानं एखादा काळ सुरू करण्याची गरज नाही. तशी काही ठिगळं मराठीला जोडल्यास मराठीच्या गालिच्याचं सहजपणे पोतेरं होण्याची शक्यता आहे. तेव्हा भाषेच्या मूळ सांगाडय़ात कोणीही अशी मोडतोड करता कामा नये. इंग्लिशचा भारी सुंदर आयता बूट मिळाला आहे, तेव्हा आपला पाऊल त्यानुसार लहान करून घेऊ, असा अविचार कोणीही करता कामा नये. यासाठी आपल्या भाषेचा अभ्यास बारकाईनं आणि तुलनात्मक पद्धतीनं केला तर वरवर वाटणा-या कित्येक मुद्दय़ांवर आपल्याला योग्य मार्ग सापडतील.
काही बाबतीत असंही असू शकतं की, ती विशिष्ट गोष्ट आपल्याकडे मुळीच नाही, उदा. हेतूदर्शक क्रियापदं – मोडाल व्हर्ब. जरमॅनिक भाषांमध्ये ती जितक्या पद्धतशीरपणे आहेत तशी ती भारतीय भाषांमध्ये नाहीत, याला काय करणार? इथेही ती दत्तक घेण्याचा प्रयत्न इंग्रजाळलेले काही जण करतात, पण त्यामुळे मराठीची मोडतोड होते. कोणाच्या तरी हाताला सहा-सहा बोटं आहेत आपल्या हाताला नाहीत यात वैषम्य वाटायचं काही कारण नाही, आपल्या हातांना आणखी एक-एक बोट जोडून घेण्याची गरज नाही / नसते हे आपण विसरता कामा नये. (आपण मोडाल व्हर्बचा प्रकार पुढे पाहणार आहोत.)
आपल्या भाषेत नक्की काय आहे नि कसं आहे हे आपल्याला नीट माहीत असेल, तर अशा तऱ्हेच्या कल्पना आपल्या डोक्यात येणार नाहीत, आपल्या मनात कोणतीही हीन भावना उत्पन्न होणार नाही, आपली भाषा गरीब-बिचारी आहे असं वाटणार नाही, असं होऊ नये म्हणूनच आपण आपल्या भाषेचा, तिच्या रचनेचा (म्हणजे व्याकरणाचा) चांगला अभ्यास करायला पाहिजे. सुदैवानं आपल्याला थोडंफार संस्कृत अभ्यासणं शक्य असतं. न शिकताही हिंदी येतं, फार चांगलं नाही तरी ब-यापैकी इंग्लिश येतं / येऊ शकतं. अशा परिस्थितीत आपण आपल्या भाषेचा आणि व्याकरणाचा तौलनिक अभ्यास केला तर आपण त्यातही कधी कमी पडणार नाही, उलट आपल्याला भाषांची चांगली जाण येईल. आपण भाषिकदृष्टय़ा समृद्ध होऊ आणि आपली भाषा समृद्ध होईल आणि आपली संस्कृतीही समृद्ध होईल यात मुळीच शंका नाही.

छंद' असे हा गड्या!

आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत छंद जोपासणारे फार कमी जण दिसतात. जुहू येथील वयाची पासष्टी गाठलेल्या अशोक मोदींचा उत्साह मात्र या वयातही नवी उमेद देणारा आहे. पेशाने वास्तुविशारद असलेले मोदी आपला चित्रकलेचा छंद अविरतपणे जपत आहेत. 'ग्राफिक एक्स्प्रेशन्स' हे त्यांचे चित्रप्रदर्शन येत्या २९ मे ते ३ जून दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत आयोजित केले आहे.
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणं विरळाच! कोणी टपाल तिकिटं जमवतं, कोणी जुन्या नाण्यांचा संग्रह करतं, कोणाला गाणी ऐकण्याचा छंद असतो तर एखादा शक्य तितके गड-किल्ले सर करतो. पण शेवटी हा 'छंद' असल्याने त्याच्या आधी आपला व्यवसाय आणि इतर कामं यांनाच प्रधान्य दिलं जातं. मग अगदी लहान असताना 'छंदवर्गा'मध्ये सुरू झालेले हे अनेक छंद वयाबरोबर वाढणा-या जबाबदा-यांच्या भाऊगर्दीत कुठे हरवून जातात कळतही नाही. त्यामुळे इतरांच्या कलांचा आनंद घेत त्यांना कौतुकाची दाद देणं, आपल्या छंदाचा विषय असणा-या प्रदर्शनांना भेटी देणं यामार्गे आपली हौस भागवली जाते. पण छंद जोपासण्याची ती सुप्त इच्छा मनात रेंगाळत राहिलेली असते. मात्र कितीही इच्छा असली तरी फार मोजके लोक एकाच वेळी आपला व्यवसाय आणि छंद सांभाळण्याची उत्तम सांगड घालू शकतात.
जुहू येथे राहणारे अशोक मोदी हे पेशाने वास्तुविशारद असले तरी आपली चित्रकलेची आवड ते उत्तमरीत्या जोपासत आहेत. तब्बल चाळीस वर्ष मोदी हे वास्तुकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी मुंबईतली अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. वास्तुशास्त्रातले अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. पण तरीही त्यातून वेळ काढून त्यांनी मनात असलेली चित्रकलेची आवड प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. 'जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर'मध्ये वास्तुशास्त्राचं शिक्षण घेतल्याने मोदींचा चित्रकलेशी फार पूर्वीपासूनच संबंध आला होता. पण ती चित्रकला वास्तुशास्त्राच्या रचनांपुरतीच मर्यादित होती. गेल्या आठ-दहा वर्षापासून त्यांनी त्यांच्या कलेचा कॅनव्हास विस्तारला आणि 'ग्राफिक एक्स्प्रेशन'ची कल्पना त्यांना स्फुरली. ''चित्रकलामय महाविद्यालयात माझं शिक्षण झाल्यामुळे ते संस्कार मनावर होतेच. जहांगीर आर्ट गॅलरीलासुद्धा मी नित्यनेमाने भेट देत असे. पण मी स्वत: पेंटिंगचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं की कधी चित्रं काढली नव्हती. २००३ साली माझ्या पत्नीने आणि मुलीने वाढदिवसाला मला 'रंग' भेट दिले आणि तेव्हापासून मी ख-या अर्थाने माझ्या छंदाला जोपासू लागलो,'' असं मोदी सांगतात.
२९ मे ते ३ जून दरम्यान अशोक मोदी यांच्या चित्रांचं 'ग्राफिकल एक्स्प्रेशन' हे चित्रप्रदर्शन 'जहांगीर आर्ट गॅलरी'मध्ये भरणार आहे. काही प्रशंसनीय वास्तू आणि काही पगडी परिधान केलेली माणसं ही चित्रं या चित्रप्रदर्शनात पाहायला मिळणार असली तरी 'महात्मा गांधी' हा त्यांच्या चित्रांचा मुख्य विषय आहे. गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे. घरात गांधीतत्त्वांचं वातावरण असल्याने माझी जडणघडणही त्याच पद्धतीने झाली, असं ते सांगतात. 'मी गांधीजींना माझा आदर्श मानतो. त्यामुळे मी माझ्या चित्रांमधून गांधीजींच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे विविध हावभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो,' असं ते सांगतात. कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक रंगांमधून त्यांनी ही चित्रं साकारली आहेत. छायाचित्रं पाहून त्याप्रमाणे ते ही चित्रं काढतात.
व्यवसायाने वास्तुशास्त्रज्ञ असल्याने त्यांनी ही सर्व चित्रं काढण्यासाठी 'ग्राफिकल' शैलीचा वापर केला आहे. त्यामुळे ही चित्रं वास्तववादी नसली तरी हुबेहूब आहेत. मोदी यांनी गांधीजींची चित्रं काढताना दोन किंवा तीन रंगांचाच वापर केला आहे. पण इतक्या कमी रंगांचा वापर करूनही चित्रांमध्ये असलेला जिवंतपणा आश्चर्यचकित करून टाकतो. महात्मा गांधींच्या काळातला एखादं कृष्णधवल छायाचित्र वाटावं इतकी ही चित्रं खरी भासतात. तर पगडी धारण केलेली माणसं आणि काही वास्तूंच्या चित्रांमध्ये ब-याच रंगांचा वापर केल्यामुळे तीसुद्धा अतिशय आकर्षक दिसतात. या चित्रांबाबत सांगताना मोदी म्हणाले, 'मला रंग फार आवडतात. त्यामुळे नेहमीच मी गडद रंगांचा वापर करतो. या चित्रांमध्ये मी 'ग्लेझिंग टेक्निक' वापरलं आहे. अ‍ॅक्रेलिक रंगांचे दोन पातळ थर एकमेकांवर देऊन अर्धपारदर्शक परिणाम साधला आहे. हीच क्लृप्ती वापरून मला गांधीजींच्या चित्रांमध्ये खादीचा परिणाम साधणंही शक्य झालं आहे.'
२००७ साली 'गांधीजी माय फर्स्ट इन्सपिरेशन' हे त्यांचं पहिलं चित्रप्रदर्शन भरलं. त्यानंतर २००९ मध्ये 'गांधीजीज् इंडिया- ए मेरियाड मोन्टाज' या त्यांच्या चित्रप्रदर्शनाला चित्रप्रेमींनी भरभरून दाद दिली. हे प्रदर्शन पाहून गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रमांमध्ये मोदी यांनी गांधीजींची काढलेली चित्रं समाविष्ट करण्यासाठी 'इंडियन कॉन्सुलेट, दुबई' या संस्थेने त्यांना आमंत्रित केलं होतं. 'सद्भावना', 'रिमेंबरिंग गांधीजी', 'समर ह्युज', 'कलाविष्कार', 'आर्ट फॉर कन्सर्न' ही त्यांची इतर काही प्रदर्शनं.
'कामाचा इतका मोठा व्याप आणि त्याबरोबरच छंद हे दोन्ही कसं सांभाळता?', असं विचारल्यावर ते म्हणाले, 'जर तुम्हाला त्या कलेची खरी आवड असेल तर वेळ आपोआप निघतो आणि नवनिर्मितीतून मिळणारा आनंदच तुमच्या छंदाला जागृत ठेवू शकतो.'
एखाद्या चित्रप्रदर्शनाला 'दाद देण्यापासून' ते स्वत:च्या चित्रप्रदर्शनासाठी 'दाद घेण्यापर्यंत'चा अशोक मोदी यांचा कलाप्रवास 'आवड असली तर सवड निघते' ही उक्ती सार्थच ठरवतो!


  मूर्ख कोणास म्हणावे?

संताच्या मेंदुतही मुर्खाचा एक कोपरा असतो. हे मी नाही महान विचारवंत ऑरिस्टॉटल म्हणालाय. आपल्याकडे आताच्या संताबद्दल कोण बोलणार?
संताच्या मेंदुतही मुर्खाचा एक कोपरा असतो. हे मी नाही महान विचारवंत ऑरिस्टॉटल म्हणालाय. आपल्याकडे आताच्या संताबद्दल कोण बोलणार? आताच्या या संताच्या भक्तांनी आपला मेंदू म्हाराजांकडे गहाण ठेवलेला. त्यामुळे म्हाराज आदेश देतील तसे ते वळतात, बोलतात, पळतात नी मारतात. ऑरिस्टॉटलचे बोलणं वेगळं नी आमचं बोलणं वेगळं. आम्ही कुणा साधुसंताच्या विरोधात बोललो तर तुरुंगांत आयुष्याची टोटल मारत बसावे लागेल. असो.
मुख्य मुद्दा आहे मूर्खपणाचा. फार पूर्वी विदुराने धृतराष्ट्राला मूर्खपणावर मोठं लेक्चर दिलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता, ज्याला स्वत:ची बुद्धी नसते. सारासार विचार नसतो, ज्याचे अंत:करण शुद्ध नसते. ज्याला बरेवाईट कळत नाही. ज्याला हिताहित जाणता येत नाही. अशा मनुष्याला मुर्ख समजावे. मुर्खाची लक्षण किती सांगितली तरी थोडीच आहेत. जो मूर्ख असतो तो वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन करतो, गुरूचे वचन मानीत नाही. तो द्यूत खेळून द्रव्य मिळवू इच्छितो. आपले काम सोडून उगाचच दुस-याच्या घरी जातो. समर्थाबरोबर वैर करतो. आणि वै-याबरोबर मित्रत्व करतो. कोणी विचारल्या वाचून बडबड करतो. स्वत:च्या चुकाबद्दल तो दुस-यास दोष देतो. अंगात शक्ती नसूनही दुस-यावर रागावतो. ज्याला समजत नाही त्याला तो उपदेश करतो असे मूर्खाबद्दल विदुराने बरेच काही लिहून ठेवलेय.
आजच्या जगात मूर्ख कोण नी शहाणा कोण यातला फार काय कळत नाही. काहीजण मूर्खपणा करून शहाण्यांच्या पंक्तीत जाऊन बसतात. काही शहाणे अती शहाणपणा दाखवून मूर्ख ठरतात. परवा कांदेवाडीत एकाने एकाच्या कानशीलात लगावून म्हणाला जास्त शहाणपणा नको शिकवू! मला नवल वाटले. तिथेच कुणीतरी पुटपुटलही. शहाण्याला शब्दाचा मार पुरे. त्याने कानाखाली आवाज काढायची काय गरज होती. मी त्या सदगृहस्थाला म्हटलं आपण आपले हे मत त्या मारणा-याला एकवलं तर बरे होईल. समोरचे महाशय क्षणार्धात गायब झाले ना.
संस्कृतात त्यावेळच्या सुसंस्कृत लोकांनी मूर्खपणाची पाच लक्षणं सांगितली आहेत. गर्विष्ठपणा, वाईट बोलणं, हट्टीपणा, अप्रिय बोलणं आणि लोकांचं न ऐकणं. ही ती पाच लक्षणं. आजकाल ही लक्षण मला तर सर्रास ब-याच जणात दिसतात. पावलोपावली या लक्षणाची माणसं दिसतात. तरीसुद्धा अशा मूर्खाना आपण रोखत नाही. कुणी म्हटलंय एकवेळ मगरीच्या दातातून रत्न काढता येईल, विषारी सापाचे डोक्यावर पागोटे करता येईल, पण मुर्खाची समजूत काढणे फार कठीण.
आईन्स्टाईनच्या बाबतीत एक मार्मिक गोष्ट सांगितली जाते. आईन्स्टाईन फावल्या वेळात चित्रं काढायचा. ब-याच जणांना हे ठाऊक नव्हतं. एकदा तिकडे मोठी चित्रस्पर्धा जाहीर झाली होती. आईन्स्टाईनच्या चाहत्यांनी एक गम्मत केली. आईन्स्टाईनच एक चित्र त्यांनी गुपचुप पळवलं नी त्या स्पर्धेत पाठवून दिलं. दोनेक दिवसांनी त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. आईन्स्टाईनला बक्षिस जाहीर झाले. चित्रकलेतल्या नवचित्र प्रकारातले ते चित्र खूप गाजले. वाहव्वा झाली. निकाल ऐकून आईन्स्टाईनला धक्का बसला. बक्षीस मिळालेली सर्व चित्रं एका हॉलमध्ये लावली गेली होती. आईन्स्टाईन पहायला गेला. त्याचही चित्रं तिथे टांगलेलं होतं. आईन्स्टाईनने आपल्या वडिलांचे चित्र काढले होते. चित्र पाहून आईन्स्टाईनला दुसरा मोठा धक्का बसला. त्याचं चित्र उलटं टांगून ठेवलं होतं. त्या उलटय़ा चित्राचीच तिथे चर्चा जास्त होत होती. तारीफ होत होती. तेव्हा आईन्स्टाईन म्हणाला होता. आपणाला जे आवडतं त्यापेक्षा केव्हा केव्हा लोकांना उलटं आवडतं. हा नवीन सिद्धांत मला कळला. असो.
मूर्खपणाबद्दल बोलावं तेव्हा कमीच. मूर्ख लोक आपापसात जेव्हा बोलत असतात तेव्हा सुज्ञ लोकांनी मौन धरावे हेच चांगलं. परवा मी सुद्धा असंच मौन बाळगलं. केव्हा बरं?. हं आठवलं. कुठल्यातरी पेपरात मोठा फोटो पाहिला. आयपीएलच्या सामन्याच्या तिकिटासाठी लोकांनी स्टेडियमबाहेर प्रचंड मोठी रांग लावली होती!

  इतिहास घडवण्याची नाडालला संधी

ग्रॅँडस्लॅमच्या इतिहासात आतापर्यंत एकाही टेनिसपटूला एकाच स्पर्धेची आठ ग्रॅँडस्लॅम मिळवता आलेली नाहीत. हा इतिहास घडवण्याची संधी फ्रेंच ओपनचा बादशाह राफाएल नाडालला आहे.

पॅरिस - ग्रॅँडस्लॅमच्या इतिहासात आतापर्यंत एकाही टेनिसपटूला एकाच स्पर्धेची आठ ग्रॅँडस्लॅम मिळवता आलेली नाहीत. हा इतिहास घडवण्याची संधी फ्रेंच ओपनचा बादशाह राफाएल नाडालला आहे.
रविवारपासून (२६ मे) सुरू होणा-या फ्रेंच ओपनमध्ये गतविजेता नाडाल पुन्हा एकदा त्याचा 'क्ले कोर्ट'वरील प्रभाव दाखवण्यासाठी आतूर असेल. यंदा त्याला प्रमुख आव्हान असेल ते अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे.
गतउपविजेता जोकोविचला आजवर फ्रेंच ओपन जिंकता आलेले आहे. यावर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यावर लागलीच 'आपण फ्रेंच ओपनच्या तयारीला लागल्याचे', जोकोविचने म्हटले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. मात्र नाडाल आणि जोकोविच हे एकाच 'हाफ'मध्ये आल्याने दोघांपैकी एकाला अंतिम फेरी गाठता येईल, हेही लक्षात घ्यायला हवे.
गेल्या वर्षी विम्बल्डनमधून लवकर बाहेर पडावे लागल्यावर गुडघा दुखापतीमुळे नाडाल सात महिने टेनिसपासून दूर होता. मात्र फेब्रुवारीत पुनरागमनानंतर आठ स्पर्धा खेळताना त्याने सहा जेतेपदे पटकवलीत.
वेळ : दु. २:३०वा. थेट प्रक्षेपण : नियो प्राइमवर.
सोमदेव मुख्य फेरीत
भारताचा सोमदेव देववर्मने पात्रता फेरीचा अडथळा पार करत पुरुष एकेरीची मुख्य फेरी गाठली. सोमवारी (२७ मे) पहिल्या फेरीत सोमदेवची गाठ पात्रता फेरीतूनच आलेल्या स्पेनच्या डॅनियल मुनोझशी पडेल.
एकच ग्रॅँडस्लॅम आठ वेळा जिंकण्याचा विक्रम होईल?
नाडालने गेल्या वर्षी सातव्यांदा फ्रेंच ओपन जिंकून माजी सवरेत्तम टेनिसपटू, स्वीडनचे बियॉन बोर्ग यांना मागे टाकले. ब्रिटनचे विलियम रेन्शॉ, अमेरिकेचा पीट सँप्रास आणि स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररने प्रत्येकी ७ वेळा विम्बल्डन जिंकले आहे. बिल लान्र्ड, बिल टिल्डेन आणि रिचर्ड सियर्स या अमेरिकच्या माजी टेनिसपटूंनीही प्रत्येकी ७ वेळा अमेरिकन ओपनमध्ये बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाचे महान टेनिसपटू रॉय इमरसन यांनी विक्रमी ६ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे.
फ्रेंच ओपनची निराशा सेरेना भरून काढेल?
तब्बल १५ ग्रॅँडस्लॅम जिंकणा-या अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला फ्रेंच ओपनमध्ये मात्र अपयश आले आहे. आतापर्यंत एकदाच म्हणजे २००२ मध्ये तिने ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे ३१ वर्षीय सेरेना दुस-यांदा फ्रेंच ओपन जेतेपदासाठी उत्सुक आहे. त्यासाठी या हंगामात तिने क्ले कोर्ट सरावावर अधिक भर दिला. या मोसमात तिने जिंकलेली चारपैकी तीन जेतेपदे ही क्ले कोर्टवरील आहेत.
'संडे स्पेशल' लढती
नोवाक जोकोविच (१) (सर्बिया) वि. डेव्हिड गॉफिन (बेल्जियम)
राफाएल नाडाल (३) (स्पेन) वि. डॅनियल ब्रॅँड्स (जर्मनी)
सेरेना विल्यम्स (१) (अमेरिका) वि. अ‍ॅना टॅटिश्विली (जॉर्जिया)

 गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे

मंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मरगळ आली आहे. त्याचे परिणाम भारतावर होत आहेत. गेल्या दोन वर्षामध्ये चढे व्याजदर, वित्तीय तूट आणि दुहेरी आकडयांमध्ये गेलेल्या महागाई निर्देशांकाने गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम केला आहे. गुंतवणूक बाजारांमधील अस्थिरतेने गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा मिळालेला नाही. मात्र असे असले तरी लवकरच अर्थव्यवस्था सुधारेल, या विश्वासाने शेअर बाजारात गुंतवणूक वाढवण्याकडे अधिकाधिक गुंतवणूकदारांचा कल असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.


सग्रहित छायाचित्र गुंतवणूकदारांच्या भविष्यातील योजनांविषयी मते जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकतेच 'फ्रँकलिन टेंपल्टन' या संस्थेने एक सर्वेक्षण केले. यामध्ये भारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक योजनांबाबतही मत जाणून घेण्यात आले. यात जवळपास ८३ टक्के गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजाराविषयी जास्त आशावादी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर भारतीय गुंतवणूकादारांना २०१३ आणि पुढील १० वर्षात मालमत्ता, मूल्यवान धातू आणि समभागांमध्ये उत्तम संधी दिसत आहेत. बहुतेक भारतीय गुंतवणूकदार २०१३ मध्ये जागतिक स्तरावरील घडामोडींच्या अनुषंगाने पारंपरिक गुंतवणूक धोरणाचा अवलंब करण्याची योजना आखत आहेत.
जगभरातील गुंतवणूकदार २०१३ मधील शेअर बाजाराच्या कामगिरीबद्दल जास्त आशावादी असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये जास्त आहे, जिथे ६६ टक्के गुंतवणूकदारांना स्थानिक शेअर बाजारात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या तुलनेत विकसित देशांमध्ये हे प्रमाण ५८ टक्के इतकेच आहे. मात्र आशावाद व्यक्त करण्यात येत असला तरी सर्वेक्षण केलेल्या एकूण गुंतवणूकदारांपैकी ५७ टक्के गुंतवणूकदार यंदाची आर्थिक स्थिती लक्षात घेता गुंतवणुकीच्या अधिक पारंपरिक पद्धतींचा वापर करणार आहेत.
तर तरुण गुंतवणूकदार 'सुरक्षित' गुंतवणूक पद्धतींचा अवलंब करणार असल्याचे दिसून आले आहे. ६२ टक्क्यांहून जास्त भारतीय गुंतवणूकदारांनी आपण गुंतवणूकविषयक पारंपरिक दृष्टिकोन अवलंबणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षात असे दिसून येत आहे की, जोखीम टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे अनेक गुंतवणूकदार बाजूला पडले आहेत आणि त्यांना गुंतवणूकविषयक अनेक संधींना मुकावे लागले आहे. धोका टाळण्याच्या निर्णयाचे सर्व बाजूंनी मूल्यांकन करण्याकरिता वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे कधीही हितावह मानले जाते. याकडेही गेल्या काही महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला असल्याचे फ्रँकलिन टेंपल्टनने म्हटले आहे.
या सर्वेक्षणात इतर देशांतील गुंतवणूकदारांच्या तुलनेत भारतीय गुंतवणूकदारांनी उच्च परताव्याची अपेक्षा केली आहे, जे प्रमाण २०१३ करिता १५ टक्के आणि पुढील १० वर्षाकरिता २२ टक्के इतके आहे. तरीही जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात गुंतवणूकदार सध्या तरी फारसे उत्साही नाहीत. याला देशातील महागाईचा उच्च दर कारणीभूत आहे.
मध्यम उत्पन्न असणारे भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही त्यांच्या एकूण गुंतवणुकींच्या एक चतुर्थाश आहे आणि पुढील पाच वर्षात तिच्यामध्ये एक-तृतीयांश वाढ व्हावी, असे म्हटले आहे. जागतिक पातळीवरील इतर देशांच्या तुलनेत स्थानिक इक्विटी आणि निश्चित परतावा ठेवींची कामगिरी उत्तम व्हावी, अशी आशा भारतीय गुंतवणूकदारांना वाटते. त्याचबरोबर नवे घर खरेदी करणे हे भारतीय गुंतवणूकदारांचे चालू वर्षातील गुंतवणूकविषयक मुख्य ध्येय आहे. त्यांच्या पहिल्या तीन ध्येयांपैकी निवृत्तीचा क्रमांक वरचा असला तरी जागतिक पातळीवरील इतर गुंतवणूकदारांच्या तुलनेत भारतीय गुंतवणूकारांचे निवृत्ती हे ध्येय असण्याचे प्रमाण कमी आहे.
विशेष म्हणजे, ९७ टक्के भारतीय गुंतवणूकदारांना आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याविषयी विश्वास वाटत असला तरी त्यातील बहुतेक गुंतवणूकदारांना ती उद्दिष्टे इक्विटीमध्ये गुंतवणूक न करता गाठता येतील, असे वाटते. यासाठी दोन तृतीयांशाहून अधिक गुंतवणूकदारांनी (६९ टक्के) अशा आर्थिक सल्ल्यांकरिता शुल्क देण्याची तयारी दाखवली. देशांतर्गत वाढती महागाई, वित्तीय तूट, निर्यातीत झालेली घसरण आणि सरकारकडून विकासाला चालना देण्यासाठी केलेले प्रयत्न या घटकांचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे 'फ्रँकलिन'ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
याउलट शेअर आणि निश्चित उत्पन्न हे मध्यवर्ती मालमत्ता वर्ग म्हणून स्वीकारले जाण्याकरिता गुंतवणूकदारांमध्ये प्रबोधन करणे आवश्यक आहे. यासाठी उद्योगाने हातभार लावला पाहिजे. गुंतवणूकदारांकडून गेल्या दोन वर्षामध्ये सोने आणि रिअल इस्टेटसारख्या भौतिक मालमत्तेतील गुंतवणुकीवर जास्त भर दिलेला दिसून आला आहे. पॉलिसींवर सवलती देऊन आणि जागरूकता वाढवून पैशाच्या बचतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे फक्त सर्वसाधारण गुंतवणूकदाराला लाभच होणार आहेत असे नव्हे, तर आíथक वाढीकरिता महत्त्वाची असलेल्या बचतीचा दीर्घकालीन आणि उत्पादक स्रोत निर्माण होणार आहे.
 भारतात अवघड परिस्थिती असूनही लोकांमधील वाढीसंबंधीचा आशावाद दिसून येत आहे. मध्यम उत्पन्न असणाऱ्या गुंतवणूकदारांमध्येही गुंतवणूकविषयक व्यावसायिक सल्ल्याकरिता सल्ला शुल्क देण्याची तयारी दिसून येत आहे. गुंतवणूकदारांच्या मानसिकतेतील हे बदल वित्त नियोजक आणि आर्थिक सल्लागारांना लाभदायक ठरणार आहेत.
- हर्षेदू बिदाल ,
अध्यक्ष, फ्रँकलिन टेंपल्टन इंडिया
गुंतवणूकदार अधिक आशावादी असूनदेखील उच्च परतावे प्राप्त करण्यापेक्षा तोटा टाळण्याकडे त्याचा कल दिसून आला आहे. अधिकाधिक गुंतवणूकदारांनी त्यालाच प्राधान्यक्रम दिला आहे. गेल्या पाच वर्षातील बाजारपेठेतील चढ-उतार पाहता भांडवलावर नफा प्राप्त करण्यापेक्षा भांडवल टिकवण्याला जास्त प्राधान्य दिले जात आहे हे स्पष्ट होते.
-ग्रेग जॉन्सन, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,
फ्रँकलिन टेंपल्टन इन्व्हेस्टमेंट

  दीड दमडीचे शिक्षण!

माझा दीड रुपया राहिला आहे बरे का!.. चांगले शिक्षक..  पण शिकलो काय ?…
''माझा दीड रुपया राहिला आहे बरे का!
म्हणजे तुम्ही मला द्यायचाय
साडे अठ्ठय़ाणव झाले.. मी शंभर दिले!! ''
असे आपण म्हणालो की, दुकानदार म्हणतो,
''सुट्टे नाहीत ना!
नाहीतर दीड रुपयाच्या गोळ्या देऊ का तीन?
मस्त पेरूच्या स्वादाच्या आहेत
टेस्ट करून बघा!''
हे बरे आहे! माझ्याच पैशांनी याच्या
दुकानातल्या नवीन आलेल्या गोळ्या
मी टेस्ट करून बघायच्या?
नाही आवडल्या तरी याला पैसे तर मिळालेच आहेत.
आवडल्या तर मी खरेदी करणार?
छे छे त्यापेक्षा आपण आपले
ओढूनताणून माधुर्य आवाजात आणतो
आणि म्हणतो, ''असू देत हो,
गोळ्या खायला लहान कोणी नाही आमच्याकडे..
असू देत दीड रुपया ..पैसे कुठे पळून जातायत?
पुढच्या वेळेला येईन तेव्हा दीड रुपया कमी घ्या!''
असे आपण म्हणतो खरे..
पण तीन-चार वेळा त्या दीड रुपयाचा उल्लेख करतो,
कारण तो दीड रुपया काही आपल्या मनातून गेलेला नसतो..
म्हणून दीड रुपया राहिलाय याची
सतत आठवण करून देतोच!

दुकानदाराने एक्सपायरी डेट उलटून गेलेले,
जडीबुटीवाले दंतमंजन आपल्या गळ्यात मारलेले असते..
आयुर्वेदिक गोष्टींना कोठे एक्सपायरी डेट असते?
असे त्याचे तर्कट आपल्याला खोडता आलेले नसते..
त्याच्याकडे पडून असलेली बिस्किटे,
आपल्याला हव्या त्या कंपनीच्या बिस्किटांपेक्षा चांगली,
म्हणून आपण त्याचे ऐकून घेतलेली असतात.!
तांदळाचेही माप हलके मारलेलेच असते..
पेट्रोल महागले म्हणून ट्रान्सपोर्ट महागतो,
म्हणून वस्तूही महाग झालेल्या असतात.!
चुकून जेव्हा पेट्रोल खाली उतरते तेव्हा,
किंमत आठ आणे कमी झाली असे काही होत नाही..!
दूध पिशवी फ्रीजरमध्ये ठेवतात ना,
नासायला नको म्हणून?!
मग इलेक्ट्रिकचे बिल? पिशवीमागे एक रुपया एक्स्ट्रा!
अरे पण आज लोडशेडिंग आहे.. तरी नाही..
रुपया जास्तच!
ते सगळे ठीक आहे हो,
तसे शंभर रुपये गेले तर चालतील मात्र
आपला हिशेबातला दीड रुपया गेलेला चालणार नाही?
शेअर मार्केटपण दीड रुपयाने कोसळते म्हणे!
नाही नाही तो दीड रुपया नाही विसरता येत..
बरोबरच आहे आपला राहिला असता तर
दुकानदार विसरला असता का?
शेवटी व्यवहार आहे हो!
आपण काय हिमालयात संन्यास घेऊन राहतो काय ?
इथे क्षणाक्षणाला दीड रुपया सुट्टा लागतो..
तो कोणी भरायचा?
कंडक्टरनी उतरवले बसमधून मग?
पाचशे रुपयाची नोट घेऊन
काय नाचायचे आहे भलत्याच थांब्यावर?
दीड रुपया तो दीड रुपया!
शेअर रिक्षाला तेवढाच महत्त्वाचा ठरतो..
होय की नाही?!
व्यवहार हा व्यवहार!
मापात आणि हिशेबात पाप नको रे बाबा!!
असेच आपण लहानपणापासून शिकतो..
पैसे नीट मोजून घ्यायला शिकतो..
समोरच्यालाही सांगतो मोजून घे रे बाबा!
कुणी दिले आणि आपण त्याच्यासमोर मोजले
तरी तो काही त्याला अपमान वाटत नाही..
पैसे मोजून घेणे हा आपण सर्व जण व्यवहारच समजतो..
समजा कोणी फसवलेच,
तर काय दीड-दोन रुपयाचे नुकसान होईल..
पण नाही.. व्यवहार तो व्यवहार!

व्यवहार हा व्यवहार, हे अगदी बरोबर
म ऽऽ ग.. अवाच्या सव्वा
पैसे मोजून घेतलेल्या त्या शिक्षणाबद्दल काय?
अं ..त्या दीड दमडीच्या शिक्षणाचे काय?
ते नाही शिकवत आपल्याला कोणी?
कोणी इतरांनी जाऊ दे,
आपणही विचारच नसतो केलेला असा!
बालवाडीपासून ते अ‍ॅनिमेशनच्या कोर्सपर्यंत
नुसते पेसे मोजा.. पण शिकलो काय ?
का नाही दमडी वसूल करायची
त्या दीड मास्तरांकडून?

पैशाचे नुकसान भरून निघेल..
परंतु ज्ञानाचे नुकसान..?
एक तर ते झाले हेच कळणार नाही,
अन् कळेल तोवर आयुष्य हातात उरणार नाही..

नको का वाजवून घ्यायला आपण हे ज्ञानाचे नाणे?
दीडचे आहे की दमडीचे आहे?
पैसे देतो तर बघायला नको?
नाही पोरगा भारीतल्या कॉलेजात शिकतो!
काय शिकतो? कोण तपासणार?
जेवढी फी जास्त तेवढे शिक्षण भारी!
फीच्या पैशासाठी बँकाही जोडलेल्या असतात
कर्ज द्यायला.. त्यांना काय व्याजावर
पैसे कमवायचे असतात..
उद्या सुलभ सोयीसाठीही पैसे लागले
तरी बँका ते व्याजाने देऊ शकतील!
आपण पैसे सव्याज परत करू शकतो की नाही
एवढेच तपासतात बँका.!
तो त्यांचा व्यवहारच आहे..

दीड रुपयाचा हिशेब ठेवणारे आम्ही
या शिक्षणाने आमचे आयुष्य कसे घडणार आहे
ते मात्र बघतच नाही..

काय माहिती हो हल्लीचे नवे नवे शिक्षण..
जिथे इतर जातात तिथे जायचे..
आधी माहितीपत्रकासाठीही शुल्क भरायचे
पण काय माहिती आहे ते कुणी वाचायचे?
कागद चकाचक असला,
भारीतले िपट्रिंग असले की झाले..
आम्हाला तेच कॉलेज पाहिजे असते..

चूक धंदा करणा-यांची असेल,
त्यापेक्षा अधिक आम्हा फसणा-याची असते..
हौस आम्हालाच असते
शिकून भारी नोकरीला लागेल म्हणून!
जेवढे पैसे आम्ही उच्चशिक्षणात घालवतो
तेवढय़ा पैशात पोरगा,
आयुष्यभर घरी बसून,
दोन वेळचे तरी समाधानाने जेवू शकतो.!
याउलट पैसे जातात मग गेलेले
पैसे वसूल करण्यात वैध-अवैध मार्गाने
आयुष्य संपते.. पुन्हा पुढच्या पिढीला
याच चक्रात ढकलले जाते..
बरे पैसे अधिक तेवढे शिक्षण उच्च..
असा उच्चशिक्षित श्रमाला कमी लेखतो..
म्हणजे तो स्वत:चे कामही स्वत: करणार नाही..
खरे म्हणजे हे एवढेच शिकले जाते..

हं प्रेझेंटेशन भारी असते हं
कम्प्युटरवरती..
दीड रुपयाच्या तीन गोळ्या देणारा
दुकानदारही छान हारीने मांडतो दुकान!
दुकान मांडणे हे त्याचे प्रेझेंटेशनच असते!!!
दुकानातल्या वस्तू त्यांनी बनविलेल्या नसतात..
इथेही तेच! सॉफ्टवेअर बाहेरचे,
कोटेशन्स दुस-याची,
फोटो डेटा बीटा नेटवरून डाउनलोड केलेला
याचे बनवलेले काय?
शिक्षणाच्या नावाने हाच बनलेला असतो
हा दुस-यांना बनवतो..

मास्तरही ब-याचदा असेच असतात..
तेही याच पोकळ शिक्षणातून आलेले असतात..
बाहेर काही जमत नाही
ते मास्तरकीला चिकटतात..
नाही त्यांना पगारवाढ हवी असते ना!
द्यायलाच पाहिजे
अन् ज्ञान घेणा-यांना?
त्यांना त्यांच्या फीचे मूल्य मिळायला नको?
शासकीय शाळेत शिकला. फी कमी!
अरे भाऊ, पण पगार जनतेच्याच खिशातून जातोय ना?

दीड दीड रुपयाचा हिशेब करणारे आम्ही
आयुष्यभर उपयोगी पडणारे
आमचे शिक्षण दीड दमडीचे आहे की
अमूल्य आहे, ते तपासायला नको?

गुरुर्देवो भव:
गुरु देव असतो बरोबर..
पण देवासमोरचा नैवेद्य देव खात नाही..
त्याचे काय?
आहेत की चांगले शिक्षक..
नाही कोण म्हणतेय
माझ्या नशिबाने मला खरेच
चांगले शिक्षक लाभले होते!
पण किती असतात असे शिक्षक?

तांदूळ विकत घेतो तेव्हा
तांदळात खडे असणारच हे गृहीत धरतो
उद्या खडय़ांमध्ये तांदूळ शोधायची पाळी आली तर?

तांदळाबरोबर खडय़ांचे पैसे आपण देतोच हो!
पण म्हणून बासमतीच्या पैशात
सरळ सरळ दीड दमडीची खडीच घ्यायची का?

  फिक्सिंगने झाकोळली राजस्थानची कामगिरी

राजस्थान रॉयल्सचे आव्हान 'प्ले ऑफ'मध्ये संपुष्टात आले. 'क्वॉलिफायर २' मध्ये मुंबई इंडियन्सने त्यांना हरवत अंतिम फेरी गाठली.

मुंबई - राजस्थान रॉयल्सचे आव्हान 'प्ले ऑफ'मध्ये संपुष्टात आले. 'क्वॉलिफायर २' मध्ये मुंबई इंडियन्सने त्यांना हरवत अंतिम फेरी गाठली. या मोसमात अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवल्याने द्रविड आणि सहका-यांची कामगिरी सर्वोत्तम झाली. मात्र मैदानावरील उल्लेखनीय कामगिरीमुळे नव्हे तर स्पॉटफिक्सिंगमुळे राजस्थान संघाची यापुढे दखल घेतली जाईल. 'फिक्सिंग'मुळे त्यांची बहारदार कामगिरी झाकोळली गेली आहे.
द्रविडचा 'रोल' महत्त्वाचा
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ अव्वल चार संघांत स्थान मिळवेल, असे छातीठोकपणे कुणीही म्हटले नव्हते. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि ब्रॅड हॉज तसेच मुंबईकर अजिंक्य रहाणेवर त्यांची फलंदाजीची भिस्त होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या द्रविडला 'टी-२०'ला अनुकूल फलंदाज मानण्यास कुणी तयार नाही. गोलंदाजीतही 'स्टार्स'ची वानवा होती. तरीही राजस्थानने अव्वल संघांना मागे टाकत 'प्ले ऑफ' फेरी गाठली. द्रविडचे कुशल नेतृत्व तसेच रहाणेसह त्याने फलंदाजीत दाखवलेले सातत्य आणि वॉटसन, हॉज, जेम्स फॉकनर, केवॉन कूपर आदी सहका-यांची मिळालेली सवरेत्तम साथ हे त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, सिद्धार्थ त्रिवेदी या दुस-या फळीतील क्रिकेटपटूंच्या योगदानाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
'फिक्सिंग'ने हादरवले
राजस्थान संघासाठी आयपीएलचा शेवट वाईट ठरला. गेल्या पाच मोसमांत प्रथमच त्यांना अंतिम फेरी गाठण्याची संधी होती. मात्र मुंबईने त्यांची घोडदौड रोखली. खेळात 'हार-जीत' असतेच. त्यामुळे मैदानावरील पराभवाचे फार वाईट वाटले नाही. मात्र शांताकुमारन श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या 'फिक्सर' त्रिकुटामुळे राजस्थानला सर्वात वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले. मैदानावरील पराभवापेक्षा ही मानहानी अधिक वाईट ठरली. परिणामी शेवटच्या तीन लढतींमध्ये राजस्थानचे क्रिकेटपटू प्रचंड दबावाखाली होते. तरीही त्यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबईसमोर १६७ धावांचे आव्हान फार मोठे नव्हते. मात्र अचूक मारा करत सामन्याचा निकाल शेवटच्या षटकापर्यंत नेत द्रविड आणि सहका-यांनी झुंजार खेळाचे प्रात्यक्षिक घडवले.


बेटिंग आयपीएलपुरते मर्यादित नाही
कोलकाता – आयपीएल केवळ आयपीएलपुरते मर्यादित नाही. त्यामुळे ही लीग बंद करण्याची मागणी चुकीची आहे, असे राजस्थानचा कर्णधार राहुल द्रविडने म्हटले.
''स्पॉटफिक्सिंगनंतर आयपीएल वाईट आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. आयपीएलमुळे अनेक चांगल्या गोष्टीही झाल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आयपीएल नव्हे जगभरातील क्रिकेट फिक्सिंगमुक्त असायला हवे. त्यासाठी बेटिंगच्या मुळाशी जायला हवे. पोलिसांना त्यांच्या काम करू द्या. त्यांच्या कामात अडथळा आणू नका. आयपीएलवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यापेक्षा फिक्सिंग प्रकरण लवकरात लवकर निकालात काढण्याची आवश्यकता आहे,''असे द्रविडने म्हटले.
चँपियन्स लीगनंतर द्रविडचा राजस्थानला रामराम?
आगामी चँपियन्स लीग टी-२० नंतर राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा निरोप घेण्याची शक्यता आहे. ''आता मी ४१ वर्षाचा आहे. पुढील मोसमासाठी अद्याप एक वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे सातव्या मोसमात खेळेन किंवा नाही, हे सांगणे कठीण आहे. मात्र चँपियन्स लीगसाठी पात्र ठरलो आहोत. ऑक्टोबरमध्ये होणा-या या स्पर्धेत मी नक्की खेळेन,''असे द्रविडने सांगितले.


  'हिंमतवाला' आणि वाहय़ात भांड!

भांड हा प्राचीन कलाप्रकार आपल्याकडे प्रसिद्ध होता. तो सादर करणा-या पात्रालाही भांड म्हणतात. हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला तेव्हा भांड व्यक्तिरेखा ही नेहमीच सहाय्यक भूमिकेत असायची. रोमँटिक नायकाला मदत करणारा विनोदवीर किंवा नायिकेच्या प्रेमात पडलेला मूर्ख प्रतिस्पर्धी अशी त्याची प्रतिमा असायची. आय. एस. जोहर, मेहमूद, राजेंद्रनाथ यांनी काही चित्रपटांतून भांड रंगवला. १९८० नंतर भांडाचे काम करणारा मेनस्ट्रीम अभिनेता मिळणे, हे कठीण झाले. तरीही दाक्षिणात्य सिनेमात हा प्रकार लोकप्रिय होत होता. अखेरीस एका दाक्षिणात्य निर्मात्यानेच जितेंद्रला घेऊन 'हिंमतवाला'च्या रूपाने तो हिंदीत आणला.
हसणे ही एक मूलभूत मानवी भावना आहे. अगदी मोबाइल आणि संगणकापासून स्माईलीच्या स्वरूपात तो मॉडिफाय करावा लागला. इतका त्याचा वापर मानवी व्यवहारात होत असतो. विनोद सांगणे आणि विनोद ऐकणे, हे आपण टाइमपास म्हणून नेहमीच करत असतो. त्यामुळेच मानवी समाजजीवन जेव्हा टोळीय अवस्थेत होते, तेव्हादेखील ते दिलखुलास हसत होते. एकेकाळी हसणे हा फक्त मानवी अलंकार आहे, अशी गैरसमजूत होती. पण अलीकडे प्राणिविश्वातही हसण्याचा सूक्ष्म वावर असतो, असा शोध लागला आहे. त्यामुळे साहजिकच कलेच्या दुनियेत 'हास्य' ही सर्वाधिक लोकप्रिय भावना आहे.
प्राचीन भारतात हास्याला अत्यंत आदराचे स्थान असल्याने दर्शनकारांनी हास्य हा स्वतंत्र रस मानला आणि हास्यप्रधान नाटय़प्रकारांना अतिशय मोठय़ा प्रमाणात उत्तेजन दिले. अगदी 'रामायण' आणि 'महाभारता'तदेखील हनुमान आणि भीम या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा खेळकर आहेत. 'हितोपदेश', 'जातककथां'मध्येदेखील हास्याचे स्फोट आहेत. त्यामुळे साहजिकच भारतात दृश्यकलांचा विचार करताना हास्यकलेला एक वेगळे वर्गीकरण विश्वीय दर्शनकाराने लागू केले. हास्यात्मिका, प्रहसन आणि भांड हे तीन कलाप्रकार भारतीय हास्यसंस्कृतीत प्रमुख मानले जातात. यातील सामान्य माणसाला खदाखदा हसवणारा हास्यप्रकार म्हणजे भांड होय. भारतात 'भांड' हा संपूर्णपणे हास्यकेंद्रितकलाप्रकार आहे. हास्यात्मिकेमध्ये हास्य हे पूर्णपणे सभ्यपणाने आणले जाते तर प्रहसनामध्ये हास्याबरोबरच टिंगलटवाळीही असते आणि अत्यंत विपरीत परिस्थितीतही हास्य निर्माण केले जाते. भांड या कलाप्रकारात हास्य असते, टिंगलटवाळी असते, पण त्याचबरोबर वाहय़ातपणाही असतो. हा वाहय़ातपणा अत्यंत असभ्य आणि कधी कधी अश्लीलतेकडेही झुकू शकतो. त्यामुळेच सभ्य लोक भांड या कलाप्रकाराला मान्यता देताना खळखळ करतात. त्या उलट ग्राम्य संस्कृतीतून आलेले लोक भांडाला डोक्यावर घेऊन नाचतात. त्यातून सभ्य माणसाला आवडतील, असे भांड निर्माण करण्याचीही खेळी खेळली गेली. त्यामुळे प्राचीन काळात आपल्याला भांडाचे दोन प्रकार दिसतात. पहिला प्रकार सभ्य भांड आणि दुसरा प्रकार वाह्यात भांड.
सृष्टीयतेत जेव्हा विचारप्रणालीचे आणि बुद्धिवादाचे वर्चस्व वाढत गेले, तसतसे भांडाची शामत आली आणि हास्यात्मिका (कॉमेडी) आणि प्रहसन (फार्स) यांचा प्रभाव वाढत गेला. त्यामुळे साहजिकच भांड केंद्रवर्ती राहिला नाही. मात्र, तमाशासारख्या कलेमध्ये गण-गवळणसारख्या विभागात भांड शाबूत राहिला. विशेषत: गण-गवळणमधील मावशी ही नेहमीच वाहय़ात असायची आणि पेंद्या हा भांड असायचा. पुढे प्रतिसृष्टीयतेत भांड विकास पावला, तसे तमाशात नाचा हे पात्र भांडाचे काम करू लागले. मराठीतील भांडखोर या शब्दाचा मूळचा अर्थ भांडाचे काम करणारा नट असा होतो. पुढे काळानुरूप तो बदलला आणि भांडण करणारा तो भांडणखोर, असा नवा अर्थ रूढ झाला. मात्र, अलीकडे भांड या शब्दाचे पुनरुज्जीवन झाले आहे आणि भांडात काम करणारा तो भांड, अशी नवी व्याख्या निर्माण झाली आहे. नटाला आणि कलाप्रकाराला भांड हा एकच शब्द असल्यामुळे वाचकांचा गोंधळ उडू शकतो, म्हणून हे स्पष्टीकरण आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला तेव्हा भांड व्यक्तिरेखा ही नेहमीच सहाय्यक भूमिकेत असायची. रोमँटिक नायकाला मदत करणारा विनोदवीर अशी त्याची प्रतिमा असायची किंवा नायिकेच्या प्रेमात पडलेला मूर्ख प्रतिस्पर्धी असे त्याचे सादरीकरण व्हायचे. उदा. 'शागीर्द' या चित्रपटात जॉय मुखर्जीला आणि आय. एस. जोहर या भांडाला एकाच मुलीबद्दल प्रेम वाटू लागते. या चित्रपटात आय. एस. जोहर हा मूर्ख भांड जॉय मुखर्जीचा प्रतिस्पर्धी आहे. मात्र ज्याला ख-या अर्थाने भांड म्हणावा, असा आधुनिक भांड हा राजेंद्रनाथ या भांडाने सादर केलेला दिसतो. उदा. 'अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस'मध्ये शम्मी कपूर या नायकाला शर्मिला टागोर पटावी म्हणून राजेंद्रनाथ हा उलटीसुलटी मदत करतो. इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी ती म्हणजे भांड म्हणजे विदूषक नव्हे. विदूषकाचा अभिनय वेगळा आणि भांडाचा अभिनय वेगळा. विदूषकाला वाहय़ात होता येत नाही आणि यदाकदाचित तो वाहय़ात झाला तर त्याला गांभीर्य असते. भांडाला अशा प्रकारचे गांभीर्य मान्य नाही. 'कुणी निंदा, कुणी वंदा, हसवणे हाच आमचा धंदा' हा भांडाचा स्वभाव आहे. त्यामुळेच मेहमूद हा अभिनेता काही चित्रपटात भांड झाला असला तरी त्याची प्रकृती ही विदूषकाची आहे, हा फरक येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. एक प्रकाराचा आपादमस्तक मूर्खपणा ही राजेंद्रनाथची विशेषता होती. पण त्यामुळेच एखाद्या भांडाचे नायक होणे, त्याला अवघड गेले. त्या उलट त्याचा समकालीन प्रतिस्पर्धी आय. एस. जोहर याने 'जोहर मेहमूद इन गोवा', 'बेवकूफ' यासारखे काही चित्रपट भांड म्हणून निर्माण केले. यामागचे हेतू अत्यंत उघड होते, ते हेतू म्हणजे स्वत:ला नायक बनवणे. मेहमूदने 'दो फुल' नावाचा एक अफलातून भांड आपल्याला दिला आहे. मात्र, ज्याला ख-या अर्थाने प्रतिसृष्टीय भांड म्हणावे असे भांड काही चित्रपटसृष्टीत निर्माण झाले नाहीत. अशा प्रकारच्या प्रतिसृष्टीय भांडाचे उत्तम उदाहरण म्हणजे १९८० ते १९९० या दरम्यान नाटय़स्पर्धेत प्रचंड गाजलेली 'चटाटो' ही एकांकिका. (हे नाव चटईला टाचणी टोचल्याचे संक्षिप्त रूप आहे.) ही एकांकिका म्हणजे वाह्यातपणाचा कळस होती. ती जेव्हा मी पाहिली तेव्हा पोट धरून हसलो.
मराठीमध्ये जोहर आणि मेहमूद या नायकांपासून प्रेरणा घेऊन दादा कोंडके यांनी भांड चित्रपट सादर केले. दादांच्या 'सोंगाडय़ा' आणि 'एकटा जीव सदाशिव' या दोन पहिल्या चित्रपटांचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केले होते. त्यामुळे साहजिकच त्यांचे सुरुवातीचे चित्रपट भांड नव्हते. वाहय़ातपणाची सुरुवात झाली ती 'राम राम गंगाराम'पासून. एका अर्थाने हा मराठीतील पहिला भांड म्हणायला हरकत नाही. जवळजवळ १० वर्षे दादा कोंडके यांच्या वाहय़ातपणाने मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला. अर्थातच पुढे पुढे वाहय़ातपणाची जागा अश्लीलतेने घेतली आणि वाह्यात भांडाचे रूपांतर अश्लील भांडात झाले. दादा कोंडके यांच्या या यशाचे पडसाद दक्षिणेत उमटले आणि दक्षिणेकडे दादा कोंडके यांच्या भांडाला खास दाक्षिणात्य फोडणी देऊन ज्याला दाक्षिणात्य भांड म्हणावे, असे भांड निर्माण झाले. या दाक्षिणात्य भांडाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे या भांडांचे नायक हे मेनस्ट्रीम नायक होते. टी. रामाराव, के. राघवेंद्र राव यांसारख्या दिग्दर्शकांनी मुख्य नायकांना घेऊन भांड बनवायला सुरुवात केली. याचा एक परिणाम असा झाला की, जो भांड हा प्रकार मुख्य कथेचा केवळ उपविषय म्हणून येत होता तो चक्क मुख्य कथानक बनला. आश्चर्याची गोष्ट अशी की, दक्षिणेकडे हे सुपरस्टारने सादर केलेले भांडही ब्लॉकबस्टर ठरले आणि त्यामुळे साहजिकच केवळ पैसा बघणा-या बॉलिवुडला त्यांच्या रिमेकिंगमध्ये प्रचंड पैसा दिसायला लागला. आता प्रश्न असा होता की, बॉलिवुडमधला कुठलाच स्टार अशा प्रकारचे भांड तयार करायला तयार होईल? कारण भांडाचा अभिनय करणे जे जितके सोपे दिसते तितके ते सोपे नाही. भांडाचा अभिनय करायला तुमच्याकडे अत्यंत चपळ शरीरयष्टी लागते. त्याबरोबर वाह्यात नृत्य करण्यासाठी तुमच्याकडे एक टपोरी असे नृत्यकौशल्य लागते. याशिवाय फाइट सीनमध्ये हाणामारीही करावी लागते. त्यामुळे साहजिकच दाक्षिणात्य पद्धतीचा भांड करायचे ठरले, तेव्हा चित्रपटात कुणाला घ्यायचे हाच मोठा प्रश्न होता.
१९८० नंतर भांडाचे काम करणारा मेनस्ट्रीम अभिनेता मिळणे, हे कठीण असले तरी त्याचा शोध सुरू झाला. त्या काळात ज्यांना नाचता येईल, असे तीन नायक भांडाच्या कामासाठी योग्य होते. पहिला मिथुन चक्रवर्ती, दुसरा ऋषी कपूर आणि तिसरा जितेंद्र. यातील मिथुन चक्रवर्तीची भांड करण्याची तयारीच नव्हती. ऋषी कपूर हा नायक म्हणून कितीही चांगला असला तरी वाहय़ातपणा करणे आणि अश्लील हावभाव करणे, हे त्याच्या चेह-याला साजेसे नव्हते. त्यामुळे साहजिकच त्या काळानुरूप जितेंद्र हा एकमेव चॉइस उरला. जितेंद्रने 'धरमवीर' नावाच्या चित्रपटात संस्कृत भांडाचे काम केले होते. 'हम बंजारोंको बात मत पुछो जी', या गाण्यात त्याने धमाल उडवली होती. पुढेही 'अनोखी अदा', 'एक ही रास्ता', 'दिलदार', 'लोक परलोक', 'जुदाई' या चित्रपटांमुळे तो भांड म्हणून काम करू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. एक तर ज्याला टपोरी म्हणावे असे नृत्यकौशल्य वादातीतपणे त्याच्याकडे होते. शिवाय वाहय़ातपणा करूनही आणि अश्लील भाव करतानाही त्याच्या देखण्या रूपाला कुठेही छचोरपणाचा स्पर्श होत नसे. त्यामुळेच साहजिकच जेव्हा के. राघवेंद्र राव यांनी वुरिकी आणि मोनागडू हे सुपरडुपर हीट झालेले भांड हिंदीत आणायचे ठरवले, तेव्हा त्यांच्यापुढे एकच नाव होते ते म्हणजे जितेंद्र. अर्थात मूळ चित्रपटात असलेली जयाप्रदा ही नटी या चित्रपटात यावी, अशी के. राघवेंद्र राव यांची इच्छा होती. परंतु 'हिंमतवाला' या चित्रपटामध्ये असलेली उत्तानता हिंदी चित्रपटात घेऊन येण्याची जयाप्रदाची इच्छा नव्हती. शिवाय तारखांचाही गोंधळ होता. ही एका पारशी जमीनदार मुलीची आणि पंजाबी मुलाची अत्यंत वाहय़ात अशी सुडाने भरलेली आणि तमाशाने सजवलेली, अशी कहाणी होती. जेव्हा ती बनवली गेली तेव्हा ती आतापर्यंत झालेल्या भांडाची रचना बदलून टाकणार आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. हा भांड एक कल्ट भांड ठरला. त्याची आणि आता आलेल्या 'हिंमतवाला'ची चर्चा आपण पुढील लेखात करू.



  त्याच्या नजरेत तिची आत्मप्रतिष्ठा

लैंगिक अत्याचारांच्या घटनांवरचा ऊहापोह होत असताना ब-याचदा कायदेशीर बाबी आणि सुरक्षाव्यवस्थेची चिकित्सा केली जाते. मात्र या सगळ्या गदारोळात जिच्या वाटय़ाला हे दु:ख आलंय तिच्या भावनिक स्थितीचा फारसा विचार होत नाही. तिच्या सक्षमीकरणाचा विचार करतानाच पुरुषांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाची धुरकट काचही स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे.
१६ डिसेंबर २०१२ ला दिल्लीत अतिशय भयावह पद्धतीने 'निर्भया'वर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेने अवघा देश पेटून उठला होता. या धगीतूनच लैंगिक अत्याचाराच्या विरोधात स्त्रीविषयक कायदे अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध पातळींवर चर्चा घडवून आणल्या गेल्या. समाजातील बुद्धिजीवी घटकांकडून कित्येक पानी अहवाल सादर केले गेले. 'निर्भया'च्या मृत्यूनंतर तर जनमानसांत समाजव्यवस्था बदलाची लाटच उसळलेली दिसली. या सर्व घटनेला सहा महिनेही उलटत नाहीत, तर पाच वर्षाच्या 'चिमुरडी'वर त्याच दिल्लीत त्याहूनही अधिक क्रूर आणि विकृत पद्धतीने लैंगिक अत्याचार झाला. तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला गेला.. मग लैंगिक अत्याचाराच्या मोठय़ा स्वरूपातील या घटना घडणारं दिल्ली हे 'राजधानीचं शहर नसून ते बलात्काराचं शहर आहे' (Delhi is not a cape town, Its a rape town of India.), अशा अर्थाचे अनेक मेसेजेस फॉरवर्ड होऊ लागले. आपण ते वाचले, शेअर केले. पण ही घटना कोणा एका दिल्लीतच घडतेय असा युक्तिवाद प्रकट करणारी एक फळी आणि त्याला विरोध करणारी दिल्ली दरबारीची दुसरी फळी.. या गंभीर विषयाचंही राजकारण करणारी आणि स्वत:ला समाजप्रवाहातील मुख्य घटक मानणारी अशी ही राजकारणी वृत्ती सामाजिक प्रश्नांमध्ये खरंच डोकावू पाहतेय का, असा प्रश्न आपल्या सर्वसामान्यांच्या गर्दीला सतावून सोडणारा होता. याच चर्चारूपी गर्दीचा एक भाग बनून आपणही कुठे ऑफिसात, कुठे घरी, कुठे कट्टय़ांवर बसून या सर्व प्रकरणांबाबत गंभीर चर्चा केल्या. काही क्षण मनोमनी किंवा प्रत्यक्षपणे रागही व्यक्त केला. मात्र अशा घटना कायद्याचे पाश घट्ट करूनही आपण थांबवू शकलो का? किंवा काही अंशी तरी या कठोर कायद्यांनी अशा घटनांना रोख बसला का?
उलट ही अत्याचारांची मालिका अशीच सुरू आहे.. आणि दिवसेंदिवस तिचे स्वरूप अधिकाधिक जहाल होताना दिसत आहे. लैंगिक अत्याचाराची एखादी घटना समोर आली, समाजाने त्यावर विरोध दर्शवत सत्ताधारी पक्ष, पोलीस यंत्रणा यांच्याविरोधात आंदोलनं पुकारावी, कायदे कडक करून त्यावर कठोर अंमलबजावणीची मागणी केली आणि मीडियाने या सगळ्याला उत्तम पद्धतीने कव्हरेज द्यावं की, त्या दरम्यानची इतर प्रकरणंही एकेक करून हळूहळू समोर येऊ लागतात. मग चॅनेलवर विशेष कार्यक्रमांमध्ये त्यावर चर्चा झडतात. सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष अशा घटनांचंही राजकारण करत, मूळ मुद्दा बाजूला सारून एकमेकांवर टीकेचे झोड उठवत तोंडसुख घेताना आणि हे एक राजकीय रणांगण असल्यासारखं एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसतात. अशा कार्यक्रमांत विविध स्तरातील सामाजिक कार्यकर्ते आपापली बाजू प्रकर्षाने मांडत असले तरी कार्यक्रमाला आलेले राजकीय रणांगणाचे स्वरूप त्यांचा आवाज दडपून टाकण्यात ब-यापैकी समर्थ ठरते. कार्यक्रमाच्या निवेदकाने आ वासून सुरू ठेवलेली प्रश्नांची सरबत्ती मूळ प्रश्न ओलांडून कधीच राजकारण्यांच्या पक्षाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न बनून गेलेली दिसते. याही पलीकडे आता सत्ताधारी पक्षांचे या संवेदनशील घटनेवरील 'असंवेदनशील' वक्तव्य, 'हे अस्सच सुरू राहणार का?' या मनातली भीतीची गर्तता अधिक खोल करणारं आहे. एक सुजाण नागरिक म्हणून आपणही कळकळीने या सर्व घटनांवर व्यक्त होतो.. कालांतराने संपूर्ण व्यवस्थेलाच याचा विसर पडतो. मात्र जिच्यावर हा आघात झाला आहे, तिचं मन राजकारण्यांसाठी एक अ‍ॅसेट होऊन बसतं, चॅनेलसाठी एक बातमी.. आणि या असंवेदनशील समाजासाठी तात्पुरत्या चर्चेचा विषय.
'या घटना रोखायच्या असतील तर स्त्रीने अंगभर कपडय़ातच वावरावं', असा युक्तिवाद मांडणारा एक वर्गही या समाजात आहे. स्त्रीसौंदर्याच्या परिभाषेतून असं परिमाण लावायचा प्रयत्न आपण एक क्षण केलाही तरी आज आसपास घडणा-या या लैंगिक अत्याचाराच्या घटना केवळ स्त्रीच्या शरीर आकर्षणातूनच घडताहेत का? तर तसं म्हणताच येणार नाही, कारण हा अत्याचार कधी चिमुकल्या पावलांनी आपल्या अंगणात लुटुपुटूचा खेळ खेळणा-या एखाद्या 'उमलत्या कळी'वरही होतोय, कधी तारुण्याच्या उंबरठय़ावर उभ्या ठाकलेल्या आणि मला शिकून मोठं व्हायचंय, या आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकणा-या 'युवती'वरही, कधी आपल्या घराची काळजी वाहणा-या 'गृहिणी'वर तर कधी 'वृद्ध महिले'वरही. ना या घटनांकडे कोणत्या ठिकाणाच्या, प्रदेशाच्या, ना राज्याच्या आणि ना ही कोणत्या देशाच्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वरूपाची परिणीती म्हणून पाहता येईल. यत्र-तत्र आणि सर्वत्र या घटना कमी-अधिक स्वरूपात घडतच आहेत. अगदी, जंगलातील आदिवासी भागापासून ते कॉर्पोरेट कल्चरच्या काचेच्या कित्येक मजली भिंतीआडपर्यंत.
समाजातील खोलवर रुजलेल्या पुरुषसत्ताक मानसिकतेने विणलेलं आणि पसरलेलं विकृतीचं जाळं असं एका घावात तुटणं शक्य नाही, हे जरी सत्य असलं तरी कायद्यांनाही न जुमानणा-या पुरुषी आवेगाला रोखायचं तर स्त्रीला सक्षम करावं, हा यावर उपाय म्हणावा का? मात्र तसंही आपण एकीकडे म्हणतोय. पण स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी 'स्त्री सक्षमीकरणा'च्या उपाययोजनांची, उपक्रमांची मांडतोय ती यादी पुरेशी म्हणावी का? केवळ तिचं सक्षमीकरण हा मुद्दाही आता इथे असमर्थ ठरू लागला आहे. तिने शारीरिकदृष्टय़ा कितीही विरोध केला तरी या घटनांमधून होणा-या तिच्या मानसिक खच्चीकरणावर काय इलाज आहे? ती घटनेची बळी ठरते, कायद्याच्या चौकटी पार करत तिला योग्य तो न्याय मिळतो (पण तत्परतेने नाहीच) तरी भविष्यात तिच्या मनाच्या जखमा भरून काढणारं कोणतं औषध आपल्या कथित सुदृढ समाजव्यवस्थेत निर्माण केलं जातंय? तिचं शरीर हे उपभोगाचीच चीज, असं समजणा-या या पुरुषी मानसिकतेला योग्य वळण देणारी कोणती यंत्रणा आज समाजात उपलब्ध आहे?
मूल्यशिक्षणाचा कित्ता आपण शाळाशाळांमधून गिरवायला सुरुवात केली खरी.. मात्र या मूल्यशिक्षणात दैनंदिनी, सुविचार, आदर्श व्यक्तिमत्त्वांची तोंडओळख यांसारखे उपविषयही फलकांवर लिहिण्यापुरतेच मर्यादित ठेवले. या मूल्यशिक्षणात नव्या पिढीला कोणत्या मूल्यांची आंतरिक जाणीव होईल, अशी पूर्तता केली गेली. पुन्हा हा विषय आम्ही पाठय़पुस्तकीय अभ्यासक्रमातच नेऊन ठेवला. शाळेत शिकवलं जाऊ नये, अशा पठडीतल्या लैंगिक शिक्षणाची कल्पना आपली शैक्षणिक व्यवस्था करत असेल तर तसं होऊ नये. या मूल्यशिक्षणाचाच एक भाग म्हणून 'लैंगिक शिक्षणा'चा अंतर्भाव करणारी सुलभ शिक्षण पद्धती ही पुरुषी मानसिकता बदलाला परखडपणे नव्हे तर हळुवारपणे कारणीभूत ठरू शकेल, यावर विचार व्हायला हवा.
लैंगिक शिक्षणात पुरुषाच्या सोशलायझेशनचा खूपच कमी विचार होतो. वरील सर्व प्रकरणी शॉविनिस्ट अर्थात पुरुषी मानसिकता ही सार्वत्रिक समस्या राहिली आहे. तीव्रता थोडीबहुत कमी-अधिक असेल इतकंच. पुरुषी मानसिकता आर्थिक स्तर, जात-पात, शिक्षण-हुद्दा या गोष्टींच्या पलीकडेही दशांगुळे उरतेच. म्हणूनच स्त्रीची आत्मप्रतिष्ठा जपण्यासाठी पुरुषांची मानसिकता घडवण्याची नितांत गरज आहे. आणि त्याची सुरुवात कुटुंबापासून व्हायला हवी. स्त्रियांनीच याकामी पुढाकार घ्यायला हवा. घरातल्या पुरुषांमध्ये सर्वप्रथम स्त्रियांच्या प्रतिष्ठेविषयी संकल्पना रुजवायला हवी तरच ती घर ओलांडून समाजात झिरपेल. भारतीय पुरुषाच्या नजरेतून कामपिपासा काढणं किंवा त्याच्या नजरेत कायद्याचा धाक निर्माण करणं याहीपेक्षा त्याच्या नजरेत स्त्रीविषयक सन्मानाची भावना निर्माण करणं अधिक गरजेचं आहे.

गणिताची गंमत!


गणित हा अत्यंत किचकट विषय समजला जातो. परंतु हा विषय तेवढाच रंजकही आहे आणि त्याचा तुमच्या-आमच्या दैनंदिन जीवनाशीही संबंध असतो. विश्वास बसल नसेल तर ही प्रश्नमालिका वाचा..
मॅक्स कोहेनच्या एकाकी आयुष्यात गणितीय सिद्धांताच्या पलीकडे काहीच नाही. गणित निसर्गाची भाषा आहे. आपल्यापुढे जे आहे ते आणि भविष्यात जे होणार आहे ते सगळे संख्यात्मक आहे आणि त्या संख्यांचे आलेख तयार केले तर जे साचेबंद चित्र तयार होईल तेच आयुष्याचे कोष्टक आहे. हे मॅक्सचे आवडते सिद्धांत आहेत. १९९६ साली आलेल्या पाय नावाच्या एका चित्रपटाची ही कहाणी आहे. मॅक्स कोहेन हे काल्पनिक व्यक्तिमत्त्व आहे, पण त्याचे सिद्धांत आपल्या आयुष्यात पण अधूनमधून भेटत राहतात आणि कदाचित ते खरे असतील याची प्रचिती देत असतात. आजच्या प्रश्नमालिकेत आपण बघू या, जीवनाच्या अनेक अंगाला स्पर्श करणारे गणित. त्यासाठी एक विचार If people do not believe that mathematics is simple, it is only because they do not realize how complicated life is John Louis von Neumann म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास या दोन्हीचा संबंध. संबंध म्हणण्याचे कारण असे की २२/७ ही शाळेत शिकलेला अपूर्णाक त्याचे अनुमानित रूप आहे. दशांश पद्धतीत ते ३.१४ असे लिहिले जाते. ही सर्व रूपे अर्धवट आहेत. 'पाय'ची किंमत नक्की किती हे कोणालाच माहिती नाही. इरॅशनल नंबर असल्याने संगणकाच्या युगात काही करोड संख्यांपर्यंत आपण ती सांगू शकतो, पण नक्की किती हा प्रश्न अनुत्तरीतच राहील. पायची दशांशानंतर शंभर आकडय़ापर्यंतची किंमत आहे ३.१४१५९ २६५३५ ८९७९३ २३८४६ २६४३३ ८३२७९ ५०२८८ ४१९७१ ६९३९९ ३७५१० ५८२०९७४९४४ ५९२३० ७८१६४ ०६२८६ २०८९९ ८६२८० ३४८२५ ३४२११ ७०६७९ ..'पाय'च्या या किमती लक्षात ठेवण्याचे एक स्वतंत्र शास्त्र आहे. त्या शास्त्रशाखेचे नाव काय?
आइनस्टाइनचे नाव घेतले की e = mc2 या गणितीय सूत्राची आठवण होते. मूलद्रव्याच्या वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर करून सांगणारे हे सूत्र आहे. हे वैश्विक चिरंतन असे सूत्र आता परिचित असले तरी सूत्रापर्यंत पोहोचण्यामागे गणिताचा अनेक शतकांचा प्रवास आहे. अमुक एका वस्तुमानात अणूंची संख्या किती आहे, याचा अंदाज आला की या सूत्राची ताकद कळते. कुठल्याही मूलद्रव्याच्या एक मोल या परिमाणात ६.०२२१४१०२३ (दहाचा तेविसावा घात) अणू असतात. या सिद्धांताचा पाया १८११ साली एका इटालियन शास्त्रज्ञाने घातला. ज्यॉ पेरीन या शास्त्रज्ञाने या आकडय़ाची सिद्धता अनेक प्रयोगाने सिद्धकेली. त्याबद्दल त्याला १९२६ भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. वर निर्देश केलेल्या ६.०२२१४१०२३ संख्येला ज्या इटालियन शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले त्याचे नाव काय?
आतापर्यंत आपण ज्या संख्या बघितल्या त्या वाचताना कशा वाचणार, ही एक मोठी समस्या आहे. सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात एकावर फार तर सात शून्य म्हणजे एक कोटीपर्यंतचा संबंध येतो. त्या पुढचे आकडे कोणते आणि त्यांना काय म्हणायचे हा मोठा प्रश्न आहे. कुतूहलाची पूर्तता म्हणून एकावर सतरा शून्यापर्यंतची नावे देतो आहे. सुरुवात एकापासून करू या. एक, दहा, शंभर, हजार, दहा हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्य, शंकू जलधी, अन्त्य, मध्य, परार्ध. परार्धाच्या पुढेही संख्या आहेतच. ही संख्या पद्धती भारताने विश्वाला दिलेली देणगी आहे. युरोपात वापरल्या जाणा-या पद्धतीत शून्य नव्हतेच. अरबांमार्फत शून्याची संकल्पना युरोपात पोहोचली. तोपर्यंत रोमन आकडे असे होते. I =1 V=5 X=10 L=50 C=100 D=500 M =1,000 या रीतीने एक्स म्हणजे दहा असेल आणि एल म्हणजे पन्नास असेल तर एक्सएल म्हणजे किती ?
संख्यांचे अनेक गुणधर्म असतात. काही सम, काही विषम, काही पूर्ण तर काही अपूर्ण. मानवी स्वभावाचे सर्व कंगोरे संख्यांमध्ये बघायला मिळतात. ६१७४ ही एक गूढ संख्या आहे. कोणतीही चार आकडी संख्या घ्या. या संख्येत चारही आकडे एकसारखे नकोत. उदाहरणार्थ २००५ आता २००५ पासून छोटय़ात छोटी संख्या तयार होते ती ००२५. (२००५-००२५ = ५१७५) आता हाच प्रयोग सतत करा.
७५५१ – १५५७ = ५९९४
९९५४ – ४५९९ = ५३५५
५५५३ – ३५५५ = १९९८
९९८१ – १८९९ = ८०८२
८८२० – ०२८८ = ८५३२
८५३२ – २३५८ = ६१७४
७६४१ – १४६७ = ६१७४
यानंतर हेच आवर्तन पुढे चालू राहते. हा गुणधर्म कोणत्याही चार आकडी संख्येला लागू पडतो. ही गूढ संख्या ६१७४ म्हणजे नाशीकजवळच्या देवळाली येथील एका शाळा शिक्षकांनी जगाला दिलेली भेट आहे. त्यांच्या निधनानंतर या संख्येला त्याच्या नावाने ओळखले जाते. या संख्याशास्त्रज्ञाचे नाव काय?
गणित आपल्या दैनंदिन आयुष्याच्या किती जवळ असते, काही नमुने आता बघू या. हा संख्याक्रम बघा. ०। १ । १ । २। ३। ५। ८। १३। २१। ३४। ५५। ८९। १४४ । २३३। ३७७। ६१०। ९८७। १५९७। २५८४। ४१८१। ६७६५ या क्रमातील पहिले दोन आकडे म्हणजे ० आणि १, त्यानंतरची प्रत्येक संख्या म्हणजे आधीच्या दोन संख्यांची बेरीज आहे. या संख्याक्रमाचा आविष्कार झाडांच्या फांद्यांवरची पानांची रचना – फुलांच्या पाकळ्यांची संख्या – मधमाश्याच्या पोळ्यातील माशांची संख्या – संगीतातील आवर्तने – समुद्राच्या लाटा – शेअरबाजारातील चढउतार या सगळ्यांना लागू पडतो. उदाहरणार्थ, शेअर बाजारातील चढउतार आठ लाटांमध्ये विभागला जातो. त्यापैकी १/३/५ या लाटा चढत्या आणि २/४ या पडत्या बाजाराच्या आणि पुढचे आवर्तन तीन लाटांमध्ये (एकूण आठ लाटा) अर्थात हे जितक्या सहजतेने लिहिले आहे, तितके सोपे नाही पण बाजाराची वेव्ह थिअरी याच संख्याक्रमावर आधारित आहे. या संख्याक्रमाचे नाव काय?
वर दिलेला नमुना फार कठीण वाटत असला तर एक सोपा नमुना बघा. प्रमाणित कागदाचा आकार नेहेमी ए/३ किंवा ए/४ असा सांगण्यात येतो. हे आकार जागतिक प्रमाणीकरणाच्या प्रणालीत आयएसओ २१६ किंवा आयएसओ २१७ प्रमाणे असतात. या प्रणालीत कागदाच्या लांबी भागिले रुंदी हे गुणोत्तर नेहेमी कायमच असते. म्हणजे ए/२ (४२०: ५९४) तर ए/४ (२१०: २९७)आकाराचा कागद तयार होतो. आता दोन्ही आकाराचे लांबी-रुंदीचे गुणोत्तर तपासून बघा. उत्तर एकच येते ते म्हणजे १.४१४२१३ हा प्रयोग ए सीरिजच्या कोणत्याही कागदावर करून बघा, उत्तर तेच येते. यामुळेच कागदाच्या आकाराला प्रमाणबद्धता येते. ही संख्या १.४१४२१३ म्हणजे एका संख्येचे मूळ आहे. ही संख्या कोणती?
एखादा आकडा उचारला की मनात काहीतरी लोकप्रिय तर कधीकधी चमत्कारिक तर कधी व्यंगात्मक असे काही चित्र उभे राहते. सहा म्हटल्यावर काही जणांच्या डोळ्यांसमोर आयपीएलचे षटकार उभे राहतील तर काहींच्या डोळ्यांसमोर छक्का उभा राहील. सत्ता म्हटल्यावर राजकारण्यांच्या डोळ्यांसमोर खुर्ची उभी राहील, तर मटका खेळणा-यांच्या नजरेत सत्ता म्हणजे लंगडा माणूस उभा राहील. आता एक वेगळेच उदाहरण बघा. इंग्रजी आकडा फोर म्हटल्यावर ब-याच वेळा मनात येतो तो संबंध फोर लेटर वर्डसोबत. लव्ह म्हणा किंवा वर्क म्हणा हे दोन्ही फोर लेटर वर्डच आहेत, परंतु फोर लेटर वर्ड म्हटले की मनात येतो तो एफपासून सुरू होणारा शब्द!!! तोच शब्द क्रम बदलून एक विश्वप्रसिद्ध तयार कपडय़ांचा ब्रँड आहे, तो कोणता?
एक म्हणजे एकच. त्यात दुजाभाव नाही तर दोन म्हणजे दोनच. दुज्या भावाशिवाय काही नाही. संख्यांचे गुणधर्म असे अविचल असतात. पण याच संख्या जेव्हा दैनंदिन व्यवहारात येतात, तेव्हा त्या संदिग्ध होतात. उदाहरणार्थ, दर्जा दर्शवताना नेहमी प्रश्न विचारला जातो की, वन टू टेन या स्केलवर कुठे याचा अंदाज सांगा. सौंदर्याचा विचार करायचा झाला तर वन म्हणजे कुरूप आणि टेन म्हणजे तिलोत्तमा. एक मध्यमवयीन गृहस्थ घरातून सहचरीसोबत भांडून बाहेर पडतो आणि त्याला एक तिलोत्तमा भेटते. त्यानंतरचा त्याचा स्वप्नप्रवास म्हणजे या चित्रपटाची कहाणी. डडली मूर आणि बो डेरेकचा हा चित्रपट गाजला तो, बो डेरेकच्या ओलेत्या सौंदर्यासाठी. या चित्रपटाचे नाव काय?
अर्थात उत्तराचा विचार करताना वन टु टेन स्केलचा विचार करा.
आता एक शेवटचा प्रश्न. लॅटिन भाषेप्रमाणे ऑक्टो म्हणजे आठ तर सेप्ट म्हणजे सात. नोव्हाचा संबंध नवाशी आहे, तर डिसेंबरचा दहाशी. असे असेल तर ऑक्टोबर आठवा, सप्टेंबर सातवा, नोव्हेंबर नववा आणि डिसेंबर दहावा महिना का नाही?

(या लेखातील प्रश्नांची उत्तरे)
१. पायच्या या किमती लक्षात ठेवण्याचे एक स्वतंत्र शास्त्र आहे त्या शास्त्रशाखेचे नाव : पायफिलॉलॉजी
२. ६.०२२१४.१०^२३ संख्येला ज्या इटालियन शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले त्याचे नाव : अमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो
३. एक्स म्हणजे दहा असेल आणि एल म्हणजे पन्नास असेल तर एक्स एल म्हणजे : चाळीस
४. देवळाली येथील शिक्षक शास्त्रज्ञाचे : काप्रेकर काँस्टंट – दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर
५. वेव्ह थिअरी ज्या संख्याक्रमावर आधारित त्याचे नाव : फेबोनाची किंवा फेबोनासी सिक्वेन्स
६. कागदाच्या आकाराला प्रमाणबद्धता देणारी १.४१४२१३ ही संख्या जी, एका संख्येचे मूळ आहे, ती संख्या : या संख्येचे मूळ (रूट ऑफ २)
७. इंग्रजी 'एफ'वरून सुरू होणारा विश्वप्रसिद्ध तयार कपडय़ांचा ब्रँड : FCUK French Connection UK
८) डडली मूर आणि बो डेरेकचा गाजलेला चित्रपट : टेन.
९) ऑक्टोबर आठवा, सप्टेंबर सातवा, नोव्हेंबर नववा आणि डिसेंबर दहावा महिना यामुळे नाही : फार पूर्वी वर्षाचा पहिला महिना मार्च होता. जानेवारी पहिला महिना झाल्यावर क्रम बदलला.

पंचमुखी हनुमान


तीन मुखं असलेले दत्त आणि दहा मुखं असलेला रावण यासारखी दैवतं आपल्या संस्कृतीत पाहायला मिळतात. भक्तांना त्यांचं दैवत मूर्त स्वरूपातच दिसावं, हे त्याचं कारण असतं. कलेशी त्यांचं देणं-घेणं नसतं. पंचमुखी हनुमान हे यातलंच एक दैवत. निरनिराळय़ा पुराणांतून आढळणा-या उल्लेखांचा मेळ आणि घोळ घालून पंचमुखी हनुमान चितारला गेला.


धातूत कोरलेलं पंचमुखी हनुमानरक्षा कवच महायंत्र विकत मिळतं. आकार १२ इंच बाय १४ इंच व पंचमुखी हनुमान यांच्या वाढत्या महत्त्वाची शनीदेव ही साक्ष होय. पंचमुखी हनुमान हे एक बुचकळ्यात टाकणारं दैवत आहे. मूर्तिकलेत (iconography मध्ये) त्याला स्थान नाही, कारण एक तर हे दैवत प्राचीन नाही, शिवाय अशी मूर्ती घडवायची तर तिच्यात कलेची तरलता, नाजूकपणा, सौंदर्य, कॉम्पोझिशन वगैरे गुण आणणं कठीण आहे. घारापुरीचा पंचमुखी शिव त्रिमूर्ती रूपात आकारावा लागला. कन्हेरीचा अकरामुखी अवलोकितेश्वर एकावर एक मुंडकी रचून दाखवावा लागला. त्यात कलात्मकता संपली. रावणाची दहा तोंडं शिल्पात सोडा, पण चित्रातही नीट बसत नाहीत, पण भक्तांना त्यांचं दैवत मूर्त स्वरूपातच दिसावं लागतं. कलेशी त्यांचं देणं-घेणं नसतं. म्हणून निरनिराळय़ा पुराणांतून आढळणा-या उल्लेखांचा मेळ आणि घोळ घालून पंचमुखी हनुमान चितारला गेला.
शनीदेवाच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर पंचमुखी हनुमानाचं महत्त्व वाढलं. हनुमान हा शनीचा उपकारकर्ता मानला जातो. म्हणून हनुमान चालिसा वाचल्याने व पंचमुखी हनुमानाची आराधना केल्याने शनीदेव प्रसन्न होतो, अशी श्रद्धा आहे. मारुती व शनी यांचं परस्परपूरकत्व हे एक कोडं आहे. त्यावर संशोधन झालं पाहिजे, असं दुर्गाबाई भागवत म्हणत, पण येथे प्रश्न पंचमुखी हनुमानाचा आहे. शनीला पुजणा-या घरांतून तसंच पानपट्टीच्या दुकानातूनसुद्धा पंचमुखी हनुमानाचं भडक रंगातलं चित्र आढळतं. त्याचं प्रतीकशास्त्र काय, हे भक्तांना माहीत नसतं. १. हनुमान, २. नरसिंह, ३. गरुड, ४. वराह व ५. हयग्रीव अशी पाच मुखं एकत्र का आणली, हे सांगणारे आढळत नाहीत.
पुराणांतील माहितीनुसार नरसिंह हा विष्णूच्या १० अवतारांमधील चौथा अवतार. हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी तो घ्यावा लागला होता. भागवत पुराणाने (ज्याला हरिवंश पुराण असंही म्हणतात) विष्णूचे अवतार १० वरून १४ वर नेले. त्यात हयग्रीव तेविसावा व हंस चोविसावा असल्याचं सांगितलं. पण मत्स्यपुराण वेगळी माहिती सांगतं. अवतार १० वरून २४ वर गेल्यामुळे नव्या अवतारांना त्याच मालिकेत बसवणं भाग होते. म्हणून मत्स्यपुराणाने पहिल्या मत्स्यावतारापूर्वी हयग्रीव अवतार टाकला. त्याचा खुलासा केला, तो असा : फार पूर्वी सृष्टी जळून नष्ट झाली होती. तेव्हा विष्णूने अश्वाचं रूप धारण करून वेद-वेदांगाची पुनर्स्थापना केली. घनदाट जंगलात लागणा-या वणव्याची त्यात पुसट जाण दिसते. पुढे आगीतून वाचवलेले वेद चोरून शंकासुराने समुद्रात बुडी मारली. म्हणून मत्स्याचं रूप धारण करून विष्णूने शंकासुराचा वध केला व वेद वाचवले. हयग्रीव अवताराची कथा महाभारताच्या शांतीपर्वात असून स्कंदपुराणातही आढळते.
मिथकांच्या भाषेत बोलणा-या मानवी मनोव्यापारांचा हा अभ्यास आहे. त्यामुळे वेदांचा काळ कोणता, वेद फायरप्रूफ व वॉटरप्रूफ होते काय, असे प्रश्न उभे करायचे नसतात. धार्मिक पंथांमधील संघर्ष व समन्वय त्यातून व्यक्त होतात, ते लक्षात घेण्यासारखे होत. विष्णूचे अवतार १० वरून २४ वर का नेले? कारण २४ हा आकडा जैनांनी पवित्र व लोकप्रिय बनवला होता. त्याचं अनुकरण अनेकांनी केलं. जैनांचे र्तीथकर २४, बुद्धसुद्धा २४, तर विष्णूचे अवतार त्याहून कमी कसे असणार? लिंगपुराणात शिवाचे अवतार २८ सांगून शैवांनी वैष्णवांवर कुरघोडी केलेली आहे. अशा माहितीत एकवाक्यता कधीच नसते.
पण आपला प्रस्तुत प्रश्न आहे, पंचमुखी हनुमानाच्या अर्थाचा व आधुनिक काळात त्याला लाभलेल्या लोकप्रियतेचा. शनीपूजेच्या प्रसाराशी तो निगडित आहेच, पण त्याचबरोबर 'वास्तुशास्त्रा'चा एक विषय बनला आहे. घरबांधणीसाठी जमीन विकत घेणं म्हणजे तिचा आकार, सर्व बाजूंच्या दिशा, त्यातून उद्भवणारी संभाव्य संकटं व त्यापासून वाचवणारे दैवी उपाय यांचा विचार करावा लागतो. जमिनीत पैसा घालणं, तिचे प्लॉट पाडून इमारत उभारणं, त्यासाठी कर्ज काढणं, सोनं-नाणं गहाण ठेवणं हा एक जुगार असतो. तो खेळणारा कुणी करोडपती-अब्जाधीश होतो, तर कुणी मार खाऊन फरार होतो. या धंद्यात इस्टेट एजंट, आर्किटेक्ट, इंजिनीयर, इंटिरियर डेकोरेटर यांना आपल्या ग्राहकांची मनं जिंकण्यासाठी वास्तुशास्त्र व त्याचं चिनी भावंड फेंगशुई यांचा आश्रय घ्यावा लागतो. पंचमुखी हनुमानाची आराधना त्यात बसते.
एका वास्तुशास्त्रावरील पुस्तकात पंचमुखी हनुमानाची माहिती मिळाली ती अशी : महिरावणाचा वध करायला हनुमान पाताळ लोकांत गेल्यावर तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळी विनाश करून ते विझल्याशिवाय महिरावण मरणार नाही, हे हनुमानाला माहीत होतं. त्यामुळे त्यांनी पंचमुखी रूप धारण करून तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळी विनाश केला. पाच वेगवेगळय़ा शक्ती एकत्र करून एकच रूप धारण केलेल्या हनुमानाने दक्षिणेच्या महिरावणाचा विनाश केला म्हणून दक्षिणेकडे तोंड करून पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्याची प्रथा प्रचलित आहे. पूजाघरात पंचमुखी हनुमान असला तरी घराच्या दक्षिणेस एक अ‍ॅडिशनल एकमुखी हनुमान लावतात तो त्यामुळेच. दक्षिण ही यमाची दिशा, शिवाय दक्षिण म्हणजे पाताळ म्हणून ही खास खबरदारी.
पंचमुखी हनुमानाची पाच मुखं :
१. सात्त्विकता, पावित्र्यता, यश, भक्ती, औदार्य, त्याग आणि बलाचा संदेश देणारं मुख्य हनुमान मुख
२. निर्भयपणा आणि संकटाशी सामना करण्याचा संदेश देणारं प्रबळ शक्ती देणारं नरसिंह मुख
३. जादूटोणा, मंत्रतंत्र, पिशाच्च व विविध बाधांपासून हरण करणारं आणि त्यापासून सतत रक्षण करून आवरण कवच निर्माण करणारं गरुड मुख
४. सर्व क्षेत्रात प्रगती, संपत्ती, यश, धन, समृद्धी, ऐषाराम देणारं वराहमुख
५. अवकाशापासून येणा-या सर्व दुष्ट शक्तींना रोखून चांगल्या शक्तींना थारा देणारे हयग्रीवाचं मुख

जोर का झटका.. धीरे से

महाभंयकर, अनर्थकारी घटनाक्रमाच्या मुळाशी एक छोटीशी कडी असते. घटनाक्रमाला चालनाही तीच देते आणि त्यामुळे आधुनिक जगात मोठीच उलथापालथ होते. या छोटय़ा कडीला लोकप्रिय भाषेत 'जोर का झटका.. धीरे से' असंही म्हणता येईल. मात्र या छोटय़ा कडीची कॅटॅस्ट्रॉफे थिअरी अर्थात विप्लव संहितेद्वारे गणिती समीकरणात मांडणी करून सामाजिक-सांस्कृतिक घटितांचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
'फायनल डेस्टिनेशन' या मालिकेतले हॉलिवुड सिनेमे अधनंमधनं टीव्हीवर लागत असतात. एरव्ही भुताच्या किंवा सीरिअल किलरच्या सिनेमांनाही न घाबरणारे लोक या 'फायनल डेस्टिनेशन' सिनेमांमुळे पार सटपटून जातात. अज्ञाताची भीती, असा शब्दप्रयोग आपण वापरतो. पण ज्ञाताचीही भीती असते आणि ती जबरदस्त असते. या 'फायनल डेस्टिनेशन'मध्ये शहरी जीवनातल्या अनर्थकारी महाभयंकर घटनांची सिनेमॅटिक जंत्रीच आहे. धावत्या रोलरकोस्टरमध्ये बसल्यावर अचानक कुठला तरी बोल्ट निखळतो आणि पाळण्यात बसलेल्या सा-यांसकट अपघातांची मालिका सुरू होते. रस्त्यावर एखादा गॅसचा टँकर अचानक उलटतो आणि हाय-वेवर आगीचे लोळ उठवत असंख्य जीव घेतो. सुखाने चायनीज स्पामध्ये झोपलेला माणूस अचानक पंख्यामुळे कलंडलेल्या एका ज्वालाग्राही प्रसाधन सामुग्रीमुळे मृत्यूच्या दारात जातो. वेगवान कारची शर्यत बघायला गेलेले सवंगडी अकस्मात एका कारचं नियंत्रण सुटल्यामुळे प्रेक्षकांच्या पॅव्हेलियनमध्ये चिरडून मरतात वगैरे. विशेष म्हणजे ब-याचदा नायकाला अशा घटना घडणार आहेत, याचा स्वप्नदृष्टांत झालेला असतो. आणि तो कोणता तरी छोटा घटनाक्रम बदलून पुढील आतंक वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. या सगळ्या घटितांमध्ये आपल्या आसपासचीच सामुग्री वापरलेली आहे. आपण ज्याला सुरक्षित आणि संतुलित जीवन समजतो, ते तितकं सुरक्षित नाही. छोटीशी खिट्टी सटकली तरी आपलं मरण ओढवू शकतं, हा एक विचित्र फोबिया हे सिनेमे हायलाइट करतात. या हादस्यांच्या सिनेमाचा हॉरर कोशंट अधिक असल्याचं मानलं जातं.
हे अशा पद्धतीचे अमेरिकन सिनेमे 'केऑस थिअरी'च्या आधारावर काढलेले असतात. काही गणिती समीकरणं मांडून या सगळ्या विखुरलेल्या घटनाक्रमांचा अंदाज लावला जाऊ शकतो, हे पटवण्याचा हा प्रयत्न असतो. गमतीने का होईना हे अपघाताचा फोबिया वाढवणारे हे सिनेमे बघताना अचानक या सगळ्या विध्वंसाचं लॉजिक मांडणा-या 'केऑस थिअरी'बरोबर 'कॅटॅस्ट्रॉफे थिअरी'ची आठवण झाली. या थिअरीबद्दल ओझरतं वाचलं होतं. 'कॅटॅस्ट्रॉफे थिअरी' हीसुद्धा 'केऑस थिअरी'प्रमाणे मुळातली एक गणिती संकल्पना. भौतिक जगातील भूकंप, सागरी लाटा, त्सुनामी, दरडी कोसळणे किंवा पुल कोसळणे वगैरे गोष्टींचा अभ्यास करता करता या गणिती संकल्पना मानवी सभ्यता आणि संस्कृतींनाही लागू होतात, असा विचार पुढे आला. मग इतिहासातल्या घटितांमागची समीकरणं शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला.
'बडे शहर में छोटे छोटे हादसे होते रहते हैं' हे वाक्य कोण कोणास म्हणाले हे सांगायची गरज नाही, इतकं ते लोकप्रिय आहे. मीडियाने या वाक्याची यथेच्छ खिल्ली उडवली आहे आणि प्रत्येकवेळी दहशतवादी हल्ल्यांच्या संदर्भात या वाक्याची आठवण काढली जाते. पण खरी गोष्ट छोट्या हादस्यांचीच आहे. कारण छोटे हादसेच मोठय़ा उलथापालथीला कारणीभूत ठरतात. आपण सारे बडय़ा हादस्यांना सरावलोय. मीडियानेच ती सवय लावली आहे. गळ्याच्या शिरा ताणून, तावातावाने ब्रेकिंगची ललकारी देण्यासाठी मोठा हादसा बरा पडतो. या सगळ्या दणदणाटात आपण मोठय़ा हादस्यांना चालना देणारे छोटे हादसे विसरून जातो. 'कॅटॅस्ट्रॉफे थिअरी' छोटय़ा छोटय़ा हादस्यांचीही संहिता मांडू पाहाते. तिची मांडणी करणा-या अभ्यासकांच्या मते छोटय़ा घटितांमुळेच मोठमोठय़ा उलथापालथी झाल्या आहेत. जिंकत आलेली युद्ध हरली गेली आहेत, सुखाने चाललेल्या सत्ता उलथल्या गेल्या आहेत, जगज्जेते क्रीडासंघ अचानक पराभवाच्या छायेत गेले आहेत, हमखास जिंकणार अशा वाटणा-या निवडणुकांमध्ये नेत्यांचे पानपत झाले आहे, अनेक उद्योगसमूह होत्याचे नव्हते झाले आहेत. इतिहासातल्या सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींमागे छोटय़ा घटना आहेत आणि त्या व्यवस्थित अभ्यासाने गणितात मांडता येऊ शकतात, असा या संहितेचा पवित्रा आहे.
आपल्याकडे सेफॉलॉजीही अजून चाचपडत असताना आणि एक्झिट पोलचा बो-या वाजत असताना हे कॅटॅस्ट्रॉफे थिअरीचं गणिती-भूमिती प्रकरण मधेच कुठून उपटलं, असं वाटू शकतं. पण हे आडाखे सांगणारं शास्त्र वगैरे नाही. ही कॅटॅस्ट्रॉफे अर्थात विप्लव थिअरी तशी जुनी आहे. फ्रेंच गणितज्ञ रेने थॉम यांनी ती प्रथम ६० च्या दशकात मांडली. आकस्मिक बदलांना सामोरं जाणा-या घटितांमुळे नवी समीकरणं कशी निर्माण होतात, याचं गणित मांडायचा हा प्रयत्न होता. ही गणिती संकल्पना असली तरी तिची अ‍ॅप्लिकेशन्स सामाजिक आणि सांस्कृतिक घटितांना लागू होतात यावर मग अभ्यास सुरू झाला. थोडक्यात विप्लव संहिता ही अरिष्ट किंवा अनर्थाचं गणित मांडणारी असू शकते, हा विचार रुजू लागला.
विप्लव थिअरीची मूळ गणिती संकल्पना साधारण अशी. छोटा दाब एखाद्या वस्तूला छोटय़ा पातळीवर ढकलतो आणि मोठा दाब मोठय़ा पातळीवर परिणाम घडवून आणतो हे आपल्या सर्वाना माहीत आहे. मात्र काही काही परिस्थितीत भूमितीय प्रतलांमध्ये छोटा दाबही मोठा उत्पात घडवून आणू शकतो. गणिती विप्लव संहिता खूप गहन आहे. पण त्याचे सामाजिक-सांस्कृतिक अ‍ॅप्लिकेशनही गमतीदार आहेत. संतुलित व्यवस्थेतील अचानक होणा-या बदलांचा अभ्यास, ही गोष्ट स्वारस्याची असणारच. विप्लव संहितेतल्या संकल्पना वापरून काही साहित्यसंपदाही निर्माण झाली. मराठीतही जयंत नारळीकरांसारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने त्यावर आधारित कथा लिहिली आहे. विप्लव संहितेनुसार पानिपतमधल्या छोटय़ा कलाटणी घटनेमुळे पराभूत झालेल्या मराठय़ांच्या इतिहासाला ती घटना टाळून विजयी केल्यास पुढचा इतिहास कसा बदलतो, याची विज्ञानकथा त्यांनी विकसित केली आहे. कटु इतिहास बदलण्याची फॅण्टसी सर्वच वाचकांच्या मनात उमटते. कलाटणी देणा-या घटनांबाबत 'जर-तर' आपण सारेच करतो. पण ते इतक्या काळानंतर!
दिल्ली बलात्कार घटनेतल्या निर्भया प्रकरणाने महिला सुरक्षेविषयी नव्या जाणिवांना सुरुवात केली. कायद्याच्या चष्म्यातून ही घटना तशी छोटीशीच होती. पण तिने मोठय़ा विषयाला वाचा फोडली. 'आयपीएल'मधल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणातला पहिला धक्का तसा छोटासाच होता आणि त्यामुळे पुढे क्रिकेट नामक सभ्य पुरुषांच्या खेळाचा मोठाच पर्दाफाश केला गेला. नको तेवढा बोलघेवडेपणा केल्यामुळे पद सोडाव्या लागलेल्या राजकारण्यांची तर मोठी यादी होईल. पण एरवी एवढे मोजूनमापून बोलणारी ही फर्डी व्यक्तिमत्त्व नेमक्या अशाच कोणत्या तरी क्षणी बेसावधपणे का बोलून बसली, याचं काही लॉजिक लागत नाही. पण या बेजबाबदार वक्तव्यांमागेही एक थिअरी असते, एक गणित असतं असं मानणारा मोठा वर्ग आहे. काही त्याचा दोष ग्रहदशेला देतात तर काही चुकीच्या योगांना. मात्र नीट गाणित मांडलं तर हा घटनाक्रम या वाटेनेच गेला असता, असं मानायला जागा असते.
इतिहासातल्या घटनांची मांडणी करताना किंवा इतिहासाचं पुनर्लेखन करताना त्यातील प्रक्षेप ओळखणारं विज्ञान विकसित होतंय. इतिहासासोबत मानववंशशास्त्र, हवामानशास्त्र तसेच भौतिकशास्त्राने विकसित केलेली आधुनिक उपकरणं यांच्या माध्यमातून पुराशास्त्रातले जुने पुरावे आता नवं सत्य मांडू लागले आहेत. मग इतिहासाला कलाटणी देणा-या छोटय़ा घटितांचा अभ्यासही विकसित होत असेल तर ते रंजक ठरू शकेल. आपण मराठीत 'उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी' असं म्हणतो त्या काडीचं गणित मांडणारी संहिता. उंटाची पाठ मोडणारी ते काडी शेवटची हे आपल्याला कधी कळतं, तर उंटाची पाठ मोडल्यावर मगच. पण जर आधीच्या काही काडय़ांनंतर नेमकी कोणती काडी रचली की उंटाची पाठ मोडू शकेल याचं तर गणित आपल्याला आधुनिक जगतात मांडता येईलच ना.
या छोटय़ा काडय़ा किंवा छोटय़ा घटना किंवा छोटे इशारे आधुनिक जगात आपल्याला मिळतात की नाही हे बघणं महत्त्वाचं. नाहीतर मोठय़ा घटनांना छोटय़ा घटना म्हणून अंडरएस्टिमेट करणारे राजकारणी आणि छोटय़ा घटनांना भिंगातून दाखवून लोकांना घाबरवणारा मीडिया या दोहोंना दोष देऊन काहीच फायदा होणार नाही.

संवेदनशील 'प्रीती'चा सिनेमा


काही वर्षापूर्वी पाठयपुस्तकात सॉमरसेट मॉम यांची 'लंचन' ही कथा होती. पॅरिसमधल्या एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये एका नवोदित लेखकानं त्याच्या प्रौढ चाहतीला दिलेल्या जेवणाची ती कथा.



इश्क इन पॅरिस
दिग्दर्शक : प्रेम राज
कलाकार : प्रिती झिंटा, इसाबेल अदजानी, रेहान मलिक काही वर्षापूर्वी पाठयपुस्तकात सॉमरसेट मॉम यांची 'लंचन' ही कथा होती. पॅरिसमधल्या एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये एका नवोदित लेखकानं त्याच्या प्रौढ चाहतीला दिलेल्या जेवणाची ती कथा. त्यातून पॅरिसमधल्या दुपारच्या जेवणाची खासियत दिसून येते. पॅरिसमधलं नाइटलाइफ जसं प्रसिद्ध आहे तसंच दुपारचं जेवणही. सर्वसामान्यांसाठीही तिथे दोन तासांचा लंचटाइम असतो.
जे करायचं ते सगळं सावकाश आस्वाद घेत, अशी त्यामागची विचारसरणी. ती त्यांच्या सर्वच कलाप्रकारांतूनही दिसून येते. तिथल्या जीवनशैलीतूनही दिसून येते. निर्माता म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटात प्रीती झिंटाने या पॅरिसचं जीवन जसंच्या तसं उभं करण्याचा प्रयत्न केलाय. 'इश्क इन पॅरिस' या चित्रपटातून तिने एक फ्रेंच-भारतीय असा फ्युजन असलेला चित्रपट रसिकांसमोर आणलाय. पण काहीसा संथगतीनं चालणारा हा चित्रपट इथले प्रेक्षक कसा स्वीकारतात, याबद्दल शंकाच आहे.
ही एक साधारण प्रेमकथा आहे.
तिचं सादरीकरण मात्र मनोविश्लेषणाच्या पातळीवर होतं. अशा प्रकारचा प्रयत्न केल्याबद्दल दिग्दर्शक प्रेम राज याचं कौतुकच करायला हवं. पात्रांच्या जीवनात घडलेल्या घटनांपेक्षा त्यांच्या मनोव्यापारावर हा चित्रपट बेतलाय. कथा सादर करण्याची ही नवी शैली आश्वासक वाटते. पण हा चित्रपट अनेक वैशिष्टय़ांनी भरलेला असला तरी तो एक व्यावसायिक चित्रपट वाटत नाही.
पॅरिसमध्ये आपल्या आईबरोबर राहणारी एक मुलगी इश्क (प्रीती झिंटा) हिची ही कथा. तिच्या विचारांची, तिच्या जीवनशैलीची. तिची आई मारी (इसाबेला अदजानी) ही चित्रपट व नाटकांमधून चमकणारी एक अभिनेत्री आहे. गंमत म्हणजे, ती या सिनेमाची कथा लिहायला घेते. चित्रपटातल्या अनेक प्रसंगांचं निवेदन ती प्रेक्षकांसमोर वेळोवेळी करत असते. पॅरिसमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करणा-या इश्कचा विवाहसंस्थेवर विश्वास नसतो. ती कोणत्याच नात्याला गंभीरपणे घेत नाही. एकदा रोमवरून पॅरिसला येत असताना तिची भेट आकाश या व्यावसायिकाबरोबर होते.
तो तिच्या वागणुकीवर फिदा होतो. जीवनात पुन्हा कधीही भेटायचं नाही, असं ठरवून ते एक रात्र पॅरिस फिरायचं ठरवतात. या दोघांच्या सहवासातून, संवादातून त्यांच्यात प्रेम निर्माण होतं.  पुढे एकमेकांना कधीही न भेटण्याचा निर्धार गळून पडतो व आकाश एका विवाहाच्या निमित्ताने पुन्हा पॅरिसला येऊन इश्कला भेटतो. आतापर्यंत कोणतंही नात्याकडे गंभीरपणे न बघितलेल्या इश्कला त्याच्यातलं गुंतणं वेगळंच वाटतं. या प्रेमाचा खुल्या दिलानं स्वीकार करण्याऐवजी ती हे सत्य स्वीकारायला तयार नसते. यानंतर या दोघांच्या नातेसंबंधात काय होतं, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलंय.
कथा सांगण्याची दिग्दर्शकाची शैली अनोखी आहे. मूळ कथानकात लेखक असण्याचे प्रयोग अनेक साहित्यकृतीत, नाटकात व चित्रपटात झाले आहेत. इथेही एक लेखिका या कथानकात सहज सामावून जाते. लेखकानं पात्रांच्या जीवनात घडणा-या कथेतला गुंता सोडवणं अपेक्षित असतं. इथे तर पात्रच लेखकाच्या जीवनातला गुंता सोडवतात. दिग्दर्शक प्रेम राज यानं ज्या तरल पद्धतीनं पात्रांचा मनोव्यापार उलगडला आहे तो वैशिष्टयपूर्ण आहे. हा चित्रपट पॅरिसमध्ये घडतो आणि त्याबरोबर या संपूर्ण चित्रपटावर फ्रेंच चित्रपटांचा असलेला प्रभावही जाणवल्याशिवाय राहत नाही.
चित्रपट ही घटनांची मालिका असा सर्वसाधारण समज, त्याला हा चित्रपट छेद देतो. कमी घटना व प्रसंगांना दिलेलं महत्त्व या चित्रपटातून ठळकपणे जाणवतं. ही शैली वैशिष्टय़पूर्ण असली तरी केवळ व्यावसायिक चित्रपटांच्या प्रेक्षकांकडून तिला काय प्रतिसाद मिळतो, ते महत्त्वाचं आहे. एक प्रेमकथा सांगता सांगताच प्रेमाच्या संकल्पनेवरचं भाष्य करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. या दोन्ही पात्रांचं प्रेम हे आकर्षणातून, सहवासातून निर्माण झालेलं नाही, तर एकमेकांना समजून घेऊन केलेल्या एका वेगळय़ा पातळीवरचं प्रेम इथे दाखवण्यात आलंय.
तांत्रिकदृष्टय़ा चित्रपट जबरदस्त आहे. सिनेमॅटोग्राफी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. हिंदी चित्रपटात आजवर कधीही न दाखवण्यात आलेलं पॅरिस दाखवण्यात आलंय. तेही एक लोकेशन म्हणून नव्हे तर चित्रपटातलं एक अविभाज्य घटक, एक पात्र म्हणून. इश्कच्या जडणघडणीत या शहराचा मोलाचा सहभाग आहे. पॅरिसची जीवनशैली व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही यातून दिसून येतो. असं असलं तरी मध्यंतरापर्यंत या चित्रपटाचा प्रवास हा काहीसा रेंगाळणारा झाला आहे. पण मध्यंतरानंतर त्याने अपेक्षित वेग धरलाय.
अभिनयात प्रीतीनं स्वत:ला सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. भूमिकेचे विविध रंग तिनं समर्थपणे दाखवलेत. ती दिसलीही सुंदर आहे. एकाच वेळी दोन पातळय़ांवर जगणारी इश्क तिने समर्थपणे उभी केलीय. आनंदानं बेभान होऊन जगतानाचं दु:ख लपवणं तिनं सहज साकारलंय. या चित्रपटातून आपण बॉलिवुडमधली एक श्रेष्ठ अभिनेत्री असल्याचं तिनं सिद्ध केलंय. तिच्या या प्रयत्नात इतर पात्रं मात्र काहीशी धुक्यात हरवल्यासारखी वाटत राहतात.
आकाशची भूमिका करणा-या रेहान मलिकने आपली भूमिका जबाबदारीने केलीय. फ्रेंच अभिनेत्री इसाबेल अदजानी हिने इश्कच्या आईची भूमिका मन लावून केलीय. तिच्या चेह-यावरचे सूक्ष्म भाव तिच्या भूमिकेची उंची वाढवतात. या तीन कलाकारांशिवाय इतर कलाकार हे केवळ एक-दोन प्रसंगांपुरतेच आहेत. शेखर कपूरनं आपल्या दोन मिनिटांच्या प्रसंगात धमाल आणलीय. सलमान खानचं आयटम साँगही
यात आहे.
चित्रपटात ठाशीवपणे लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे कलादिग्दर्शन व प्रकाश योजना. पॅरिसच्या रस्त्यांवरच्या रंगीबेरंगी प्रकाश योजनेचं प्रतिबिंब प्रत्येक प्रसंगातल्या मूडनुसार वापण्यात आलंय. एकंदरीत हा चित्रपट देशी वातावरणात फ्रेंच शँम्पेनचा आनंद देतोच देतो.

दोन मोत्ये गळाली..


फुटबॉलच्या खेळातली सर्वात लोकप्रिय असलेली सर अलेक्स फर्ग्युसन आणि डेव्हिड बेकहॅम ही दोन व्यक्तिमत्त्वं पाठोपाठ निवृत्त झाली. दोघांचाही मँचेस्टर युनायटेड या इंग्लिश क्लबशी संबंध. आता दोघंही निवृत्त झाल्याने इंग्लिश फुटबॉलबरोबरच अनेक स्पॉन्सर कंपन्यांचीही पंचाईत होणार आहे.
सर अलेक्स फर्ग्युसन आणि डेव्हिड बेकहॅम हे इंग्लिश फुटबॉलमधील मेरूमणी पाठोपाठच्या आठवडय़ात निवृत्त झाली. यामुळे सगळ्यात पंचाईत इंग्लिश फुटबॉलबरोबरच अनेक स्पॉन्सर कंपन्यांचीही होणार आहे. कारण १९९९ मध्ये अलेक्स फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर युनायटेडनं जर्मनीच्या बायर्न म्युनिचला हरवून युरोपियन चँपियन्स लीग ही फुटबॉल जगतातली सर्वात प्रतिष्ठेची आणि वर्ल्डकपखालोखाल सर्वात लोकप्रिय स्पर्धा जिंकली, त्यावेळी त्या संघात डेव्हिड बेकहॅमही होता. इंग्लिश संघाला वर्ल्डकप किंवा युरो स्पर्धामध्ये काहीही करून दाखवता येत नव्हतं. १९९६ मध्ये इंग्लिश भूमीवर झालेल्या युरो स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी जर्मनीनं यजमानांना उपांत्य फेरीत पेनल्टी शुटआउटमध्ये गारद केलं होतं. ती जखम ठसठसत होतीच. १९६६ मध्ये इंग्लंडनं जर्मनीला हरवून पहिल्यांदा आणि अखेरचा वर्ल्डकप जिंकला. तेव्हापासून फुटबॉल जगतातील सर्वाधिक सातत्यपूर्ण मानल्या गेलेल्या जर्मनीविरुद्ध इंग्लिश चाहते, फुटबॉलपटू उघडपणे खुन्नस व्यक्त करू लागले होते. या कडवटपणाला अर्थातच दुस-या महायुद्धाची पार्श्वभूमी होतीच. जर्मनीला बरोबरीचा प्रतिस्पर्धी मानताना, त्यांची फुटबॉलमधील प्रगती इंग्लिश चाहत्यांना खटकत होती. तीन जगज्जेतेपदं, तीन युरो अजिंक्यपदं विरुद्ध अवघं एक जगज्जेतेपद! युरोपियन अजिंक्यपद तर एकही नाही. क्लब फुटबॉलची जन्मभूमी इंग्लंड. आंतरदेशीय स्पर्धात्मक फुटबॉलची (वर्ल्डकप, युरो कप वगैरे) जन्मभूमी फ्रान्स. पण कित्येक र्वष मैदानावरील कामगिरीच्या बाबतीत इंग्लंडचं 'गावंढळ भावंड' राहिलेल्या फ्रान्सनं १९८० आणि १९९०च्या दशकात एक जगज्जेतेपद नि दोन युरोपियन जेतेपदं पटकवून ट्रॉफींच्या आकडेवारीत इंग्लंडला मागे टाकलं. इंग्लिश चाहते अधिकच खवळले, अस्वस्थ झाले. नव्वदच्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत जर्मनीनंच त्यांना (पेनल्टीवरच) चकवलं. आणि मग ती इंग्लंडमधली युरो ९६ची सेमी फायनल.
या पार्श्वभूमीवर १९९९मध्ये माद्रिदला झालेल्या युरोपियन चँपियन्स लीगची फायनल भलेही मँचेस्टर युनायटेड आणि बायर्न म्युनिच या दोन क्लबांमध्ये झाली असेल, पण इंग्लिश फुटबॉल रसिकांच्या दृष्टीनं ती लढत म्हणजे इंग्लंड विरुद्ध जर्मनी अशीच होती. सामन्यातला बराच काळ बायर्न म्युनिच १-० असे आघाडीवर होते. सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये टेडी शेरिंगहॅम आणि ओले गनर सोल्स्कायेर यांनी दोन गोल करून मँचेस्टरला एक अद्भुत विजय मिळवून दिला. भारतात तोपर्यंत इंग्लिश प्रिमियर लीग दिसू लागली होती. त्यामुळे त्या लीगमध्ये आणि लीगच्या स्टार मंडळींमध्ये रस घेणारा तरुण वर्ग इथं मोठय़ा प्रमाणावर होता. त्यांच्या दृष्टीनंही हा थरारक विजय म्हणजे अलेक्स फग्र्युसन यांच्या करामतींची परिणती ठरली. दोन्ही गोल कॉर्नरवर झाले. ते कॉर्नर अत्यंत कौशल्यानं बायर्नच्या गोलक्षेत्रात वळवणारी असामी होती डेव्हिड बेकहॅम! 'बेंड इट लाइक बेकहॅम' ही लाइन फॅशनेबल झाली, त्या सामन्यानंतरच! जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत, बहुचर्चित फुटबॉल क्लबांमध्ये मँचेस्टर युनायटेडची गणना होते. फग्र्युसन यांनी या क्लबला इंग्लिश क्लब फुटबॉलमधली महासत्ता बनवलं. बहुतेक इंग्लिश फुटबॉलवेडय़ांसाठी त्यांच्या राष्ट्रीय संघापेक्षाही मँचेस्टर युनायटेड हा अधिक मानाचा, मोलाचा संघ बनला. त्यामुळेच डेव्हिड बेकहॅम वर्ल्डकप किंवा युरो स्पर्धामध्ये चमकत नसला, तरी मँचेस्टर युनायटेडसाठी तो जोपर्यंत खेळला, तोपर्यंत जणू देव बनून राहिला. व्हिक्टोरिया अ‍ॅडॅम्स नावाच्या ब-यापैकी सामान्य दिसणा-या नि त्याहूनही सामान्य गाणा-या पॉप गायिकेशी त्यानं सोयरीक जुळवली. 'स्पाइस गर्ल्स' या बँडमध्ये व्हिक्टोरिया नेहमीच मागे कुठं तरी उभी राहायची. डेव्हिडशी लग्न झाल्यानंतर या जोडप्याचा सेलेब्रिटी कोशंट एकदम फळफळला. डेव्हिड आणि व्हिक्टोरिया बेकहॅम सेलेब्रिटी कपल बनलं. खरं तर डेव्हिड बेकहॅमसाठी तो प्रवासाचा पूर्णविराम ठरला असता, तरी काही बिघडणार नव्हतं. पण तो फग्र्युसन यांच्या देखरेखीखाली राहिला आणि फुटबॉलच्या मैदानावरही कर्तृत्व दाखवता झाला.
बेकहॅमसाठी फर्ग्युसन वडिलांसारखे, गुरुवत (फादर फिगर) होते. मँचेस्टर युनायटेड एक अव्वल क्लब बनला याचं प्रमुख कारण म्हणजे फग्र्युसन मास्तरांची करडी शिस्त. १९८५मध्ये त्यांनी मँचेस्टरच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतली, त्यावेळी हा क्लब शेवटच्या चारांमध्ये फेकला गेला होता. नव्वदच्या दशकात विशेषत: मँचेस्टर युनायटेडच्या अ‍ॅकॅडमीतील पोरं हेरून, त्यांना घडवून फग्र्युसन यांनी १९९९मध्ये युरोपियन क्लब अजिंक्यपद पटकवले होते. रायन गिग्ज, निकी बट, पॉल स्कोल्स, फिल आणि गॅरी नेव्हिल बंधू, तसेच डेव्हिड बेकहॅम अशी अत्यंत मेहनती फळी त्यांनी उभी केली होती. फग्र्युसन यांच्याविना डेव्हिड बेकहॅम कदाचित नुसता एक सेलेब्रिटी फुटबॉलर बनून संपला असता. फग्र्युसन यांच्या दृष्टीनं टीम आणि क्लब हे वैयक्तिक फुटबॉलपटूंपेक्षा मोठे होते. त्यांनी कधीच स्टार मंडळींची प्रमाणाबाहेर कदर केली नाही. त्यांचा हा अ‍ॅप्रोच भारतीय क्रिकेटधुरीणांनाही बरंच काही शिकवून जाईल. एखाद-दुसरा अपवाद वगळचा, फग्र्युसन यांचा एकही शिष्य किमान मँचेस्टर युनायटेडच्या सेवेत असताना सामन्याच्या आदल्या रात्री, सरावाच्या आदल्या रात्री मदिरा वा मदिराक्षीकडे वळला नाही. क्लबच्या वळचणीला आलेला कितीही मोठा स्टार फग्र्युसनना टरकायचा. डेव्हिड बेकहॅम, ख्रिस्तियानो रोनाल्डो, वेन रूनी, रूड व्हॅन नीस्टलरोय अशा कितीतरी स्टार्सना फग्र्युसन यांनी जमिनीवर आणलं आणि प्रसंगी जमिनीत गाडलंही! बेकहॅम स्वत:ला फुटबॉलपेक्षा, क्लबपेक्षा मोठा समजायला लागला हे पाहिल्यावर त्यालाही हाकलून लावताना फर्ग्युसन यांनी मागेपुढे पाहिलं नाही. २००३मध्ये या दोघांमध्ये ड्रेसिंगरूममध्ये एकदा वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात फर्ग्युसन यांनी बेकहॅमच्या दिशेनं बूट फेकला. फर्ग्युसन यांच्या खास शैलीतल्या कानउघाडणीला 'हेयर ड्रायर ट्रीटमेंट' असं नाव पडलं होतं. हेयर ड्रायरप्रमाणेच गरमागरम आणि कर्कश!! बेकहॅम मँचेस्टर युनायटेडमधून बाहेर पडला.रेआल माद्रिद, लॉस एंजलिस गॅलक्सी आणि पॅरिस सेंट जर्मेन या क्लबांकडून खेळला. इंग्लंड, स्पेन, अमेरिका आणि फ्रान्स या देशांच्या राष्ट्रीय लीग जिंकणारा तो एकमेव फुटबॉलपटू. स्पोर्ट्स शूज ते ब्रीलक्रीम आणि परफ्युम्स ते अंडरवेअर अशा विविध उत्पादनांच्या एन्डॉर्समेंटनी त्याचं उत्पन्न कल्पनातीत फुगवलं. तो यशस्वी फुटबॉलपटू फुटबॉलपटू मैदानापेक्षा मैदानाबाहेरच अधिक ठरला. त्याचं वार्षिक उत्पन्न अंदाजे सव्वादोन कोटी पौंडांमध्ये भरतं. तीन मुलगे आणि एक मुलगी जन्माला घातल्यानंतर बेकहॅम हे आता जगातलं सर्वाधिक परिचित कुटुंबही बनलंय. त्याच्या निवृत्तीमुळे बेकहॅम हा ब्रँड ब-यापैकी संपुष्टात आलाय. फग्र्युसन नाही, बेकहॅमही नाही. इंग्लिश फुटबॉल त्यामुळे सेलिब्रेट काय करणार, हा प्रश्न आहे. गेली १५ र्वष त्याचं उत्तर शोधण्याची गरज इंग्लंडला (फग्र्युसन हे जन्मानं स्कॉटिश असूनही) पडली नव्हती. आता मात्र विचार करावाच लागणार आहे.

चीनचे आव्हान!


चीनचे पंतप्रधान ली कुचीअँग नुकतेच भारतभेटीवर येऊन गेले. चीन आणि भारतात सीमेवरील घुसखोरीवरून झालेला तणाव त्यामुळे निवळल्यासारखे चित्र उभे राहिले आहे. त्यांच्या भेटीत चीनबरोबर व्यापारवाढीचा करारही झाला. व्यापार वाढवल्याने चीनची आक्रमकता कमी होईल, अशी धारणा म्हणजे भ्रम आहे.
नुकतेच चीनचे पंतप्रधान, प्रीमियर Li Keqiang, (यांच्या नावाचा चिनी भाषेत उच्चार ली कुचीअँग, असा होतो), हे भारताच्या दौ-यावर आले होते. त्यानिमित्ताने भारतीय राजकीय वातावरण आणि प्रसारमाध्यमे एका अर्थाने ढवळून निघाली. अनेक लेख, परिसंवाद इत्यादींचे आयोजन केले गेले. मी स्वत: कालच 'जय महाराष्ट्र' टीव्ही वाहिनीवर 'लक्षवेधी' या कार्यक्रमात भाग घेतला. माझ्यासोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी होते. परिसंवादाचा विषय होता, 'चिनी Dragon चे आव्हान'. या परिसंवादाच्या निमित्ताने मला आपल्या समाजातल्या विशिष्ट नेतृत्वाच्या लोकांची मानसिकता जवळून पाहता आली. शिवाय आपल्या गेल्या रविवारच्या 'पाहिजे ते सावधपण' या लेखाशीही या विषयाचा घनिष्ठ संबंध आहे, तो उलगडून दाखवण्याचा हा प्रपंच!
भारतीय मानस हे निखळ शांतताप्रेमी आहे. एकूणच त्याला युद्ध नको असते. त्यामुळे ज्या ज्या वेळेला शांतीचा उद्घोष केला जातो, तेव्हा आपल्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना एक प्रकारचे समाधान वाटते. असे वाटण्यात काहीच गर नाही. पण याच्या पुढील पायरी म्हणजे जसे आपण शांतताप्रेमी आहोत, तसेच इतर समाजदेखील शांतताप्रेमी आहेत, ही मनाची पक्की धारणा होऊन बसते. आणि या टप्प्यावर आपली समजूत पक्की झाली की, मग वस्तुस्थितीचे भान सुटून स्वप्नरंजनास सुरुवात होते. १९५०-६०च्या दशकात आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान नेहरू यांची अशीच स्थिती झाली होती. 'पंचशील'च्या उदात्त तत्त्वांनी त्यांच्या मनाचा पूर्ण कब्जा घेतला होता आणि आपला शेजारी चीनदेखील याच तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे, अशी त्यांची खात्री झाली होती. त्यानंतर १९६२ मध्ये जेव्हा चीनने आपल्यावर आक्रमण केले, तेव्हा मात्र हे नेतृत्व भांबावूनच गेले आणि याचा प्रतिकार कसा करावा हेच त्यांना समजेनासे झाले. या आक्रमणाने त्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या ठिक-या उडाल्या व जगात फक्त बलवानांचीच सद्दी चालते आणि दुर्बलांच्या वटवटीला कवडीचीही किंमत नसते, हे सत्य त्यांना फार उशिरा उमगले. भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची खूपच हानी झाली. शिवाय आपला जो एक विस्तृत भूभाग अक्साई चीन प्रदेशात (लडाखमधील), चीनने बळकावला तो अजूनही त्यांच्याचकडे आहे.
चीनचे या आक्रमणामागचे उद्दिष्ट स्पष्ट होते. चीनला दाखवून द्यायचे होते की दक्षिण आशियात फक्त चीनच सर्वात बलिष्ठ राष्ट्र आहे आणि भारताला त्याची जागा दाखवून द्यायची. हे या आक्रमणामुळे पूर्ण झाले. त्यानंतर पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीर प्रदेशातून त्यांनी काही प्रदेश चीनला परस्पर देऊन टाकला, याच प्रदेशातून चीनने 'काराकोरम हायवे' हा रस्ता बांधून भारताच्या सुरक्षेला कायमचा धोका निर्माण केलेला आहे. पाकिस्तानला शस्त्रे, क्षेपणास्त्रांचे सुटे भाग असा सगळा पुरवठा याचमाग्रे चीन आणि त्याचा अंकित देश उत्तर कोरिया करीत असतो. आपल्या नेतृत्वाचा भोंगळ आणि बेसावधपणा या सगळ्याची ही फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागत आहे.
हा इतिहास आपल्याला डोळ्याआड करून चालणारच नाही. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये जेव्हा दोन तुल्यबळ राष्ट्रे शेजारी शेजारी असतात तेव्हा त्यांच्यात निखळ मैत्री ही जवळजवळ अशक्यच असते. फक्त त्यांच्यातले शत्रुत्व छुपे आहे की स्पष्ट आहे, हाच फरकाचा मुद्दा असतो. हे एक वैश्विक सत्य आपल्या समाजाला पचायला जरा जड जाते. त्यामुळेच 'हिंदी चिनी भाई भाई'च्या घोषणा लगेच सुरू होतात आणि सगळा समाज त्याला हुरळून जाऊ शकतो. पण वस्तुस्थितीची यथार्थ कल्पना आपल्या नेतृत्वाला आणि समाजाला असणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने आता आपण या चिनी पंतप्रधानांच्या भेटीकडे बघू या. या भेटीच्या अगोदर चिनी सन्याने भारताच्या लडाख प्रांतात 'दौलत बेग ओल्डी' या भागात एकोणीस किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केली. आपण त्यासंबंधी तक्रार केली त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. ही घुसखोरी ब-यापैकी यशस्वी झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रांच्या सनिक अधिका-यांच्या भेटीत 'दोन्ही सन्यांनी आपापले सन्य मागे घ्यावे' अशी तडजोड केल्याच्या बातम्या आल्या. आपल्या भूमीत आक्रमण झाले असताना आपण आपले सन्य मागे घेण्याची तडजोड? हे प्रकरण जरा निवळल्यावर आपले परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद बीजिंगवारी करून आले. त्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर आता ली कुचीअँग हे भारतभेटीला आले आहेत.
नेमका असाच घटनाक्रम १९६०-६२ सालातही घडला होता. तेव्हा भारतात नेहरू पंतप्रधान होते आणि चीनतर्फे त्यांचे पंतप्रधान चौ एन लाय हे भारतभेटीला आले होते. बाकी 'हिंदी चिनी भाई भाई'च्या घोषणा तशाच! एक विलक्षण फरक मात्र आहे, त्या वेळेस चीनमधील नकाशे, भारताचा भूभाग हा चीनचा प्रदेश म्हणून दर्शवत होते आणि आपण तक्रार केल्यावर चिनी नेतृत्वाने सारवासारव करून 'हे जुनेच नकाशे आम्ही छापले आहेत आणि अजून नवीन नकाशे करण्याचे काम पूर्ण झालेले नाही', असे उत्तर दिले होते. या वेळेस मात्र भारतीय 'तज्ज्ञांनीच' आपल्या नकाशातून अरुणाचल प्रदेशाचे उच्चाटन केले आहे! या सगळ्या 'भाई भाई' पर्वानंतर आपले सरकार गाफील राहिले आणि मग चिनी आक्रमण झाले. या वेळेस तसे काही होऊ नये, यासाठी डोळ्यांत तेल घालून आपल्या सीमांचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. तसेच भारत अशी कुठलीही घुसखोरी खपवून घेणार नाही, हा स्पष्ट संदेश चीनला देणे गरजेचे होते. त्याऐवजी भारत आणि चीनमधील व्यापार वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करणे, अशा कृतींनी आपल्या सरकारच्या भूमिकेबाबत संभ्रम उत्पन्न होतो.
बरे, हा व्यापार जो सध्या ६७ वार्षिक अब्ज डॉलरच्या घरात आहे, त्यामध्ये आपली निर्यात केवळ १३ अब्ज डॉलर आहे, बाकी सगळी आयातच आहे. म्हणजे हा व्यापार आपल्यापेक्षा चीनच्याच फायद्याचा आहे. तोच आता १०० अब्ज डॉलर करण्याचा उद्देश जाहीर झाला आहे. आपल्या नेत्यांना कदाचित असे वाटत असेल की, चीनचा व्यापार वाढवला की त्यांची आक्रमकता नाहीशी होईल. हीपण एक भोळसट समजूत आहे. उदाहरणार्थ, चीन आणि जपानचा ३०० अब्ज डॉलरचा व्यापार आहे, पण चीनने जपानशी आक्रमक शत्रुत्वाच्या खेळी अजिबात मागे घेतलेल्या नाहीत. उलट अधिकाधिक जोरकसपणे त्या सुरू आहेत. तीच गोष्ट चीन-अमेरिका संबंधांची. चीनचे विस्तारवादी धोरण त्यांच्या सगळ्याच शेजा-यांना खुपत आहे. आता आपल्याला अशा सगळ्या शेजा-यांची एक आघाडी उभारायला हवी. त्यात जपान, व्हिएतनाम, थायलंड, काम्पुचिया, फिलिपाइन्स, ब्रह्मदेश, कझाखस्तान, मंगोलिया असे सगळे देश येतात. शिवाय चीन अधिकाधिक बलिष्ठ होत चालला, आहे हे अमेरिकेलाही खपणार नाही आणि तेदेखील चीनला रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतच आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने आपल्याला ही आघाडी बांधण्याशिवाय गत्यंतर नाही आणि या आघाडीला अमेरिकेच्या समर्थ पाठिंब्याची गरज भासणारच आहे. असे होऊ लागले आहे याचे संकेत मिळत आहेत, कारण आता लवकरच पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेच्या दौ-यावर बराक ओबामांना भेटण्यास जात आहेत. आणि नेमक्या याच कारणासाठी भारतातील कम्युनिस्ट आणि इतर डाव्या पक्षांचा अशा आघाडीला आंधळा विरोध असणार आहे.
कम्युनिस्ट पक्षाची चीनविषयीची भूमिका नेहमीच बोटचेपी आणि संदिग्ध राहिली आहे. १९६२ साली तर चीन हा भारतावर आक्रमण करणारा देशच नाही, असे त्यांच्यापैकी अनेक नेत्यांचे मत होते. शेवटी त्यांच्या पक्षाची या मुद्दय़ावर दोन शकले झाली. अजूनही या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या नेतृत्वाने चीनच्या आक्रमणाबद्दल नि:संदिग्ध भूमिकेचा स्वीकार केलेला नाही. चिनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा भारतात उत्तर-पूर्व राज्यातील अलगतावादी अतिरेकी संस्था आणि नक्षलवादी गटांना विनासायास मिळू शकतात हे सत्यदेखील या पक्षांना पचवणे जड जाते. त्यांच्या मते, चीन हा आक्रमक देश नाहीच. अर्थात, हे त्यांचे मत चीनने कम्युनिस्ट व्हिएतनाम देशावर आक्रमण केल्यावर मात्र बदलले होते. पण भारताच्या बाबतीत मात्र ते वेगळा न्याय लावतात. आणि त्यावर कडी म्हणजे यांचा आंधळा अमेरिकाविरोध! म्हणून अशा कुठल्याही प्रस्तावाला ते कडाडून विरोध करतात. तो प्रस्ताव जरी भारताच्या अंतिम हिताचा असला तरी. अणुकराराला त्यांनी केलेला विरोध आपल्याला आठवत असेलच. परंतु आपल्या सरकारने डाव्या विरोधाची जराही परवा न करता चीनसंबंधी धोरण हे समविचारी देशांची वर सांगितल्याप्रमाणे साखळी बांधून पुढे रेटणे जरुरीचे आहे. हे करताना अर्थात चीनशी आपला व्यापार चालूच ठेवावा पण या व्यापारात आपल्या देशाचा फायदा करून घेणे, हे प्रमुख लक्ष्य असायला पाहिजे, चीनला खूश करणे वा गोंजारणे हे नव्हे. कारण अशा गोंजारण्याचा चीनवर काहीही परिणाम होणार नाही.
चीनपासून आपल्याला असलेला आणखी मोठा धोका अजून आपण पूर्णपणे समजून घेतलेलाच नाही. चीनला आपल्या अफाट लोकसंख्येला चांगला आयुष्यक्रम देण्यासाठी प्रचंड प्रमाणात वीज लागणार आहे. ही वीज मिळवण्यासाठी आता त्याची नजर तिबेटमधून वाहणा-या ब्रह्मपुत्रा नदीकडे वळली आहे. या नदीवर चीन महाकाय धरण बांधत आहे. त्यामधून भरपूर वीजपुरवठा करता येईल. पण यामुळे भारताला मोठय़ा जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे. शिवाय गरज पडल्यास या धरणातील प्रचंड पाणीसाठा एकदम सोडून देऊन भारतात पूरपरिस्थिती निर्माण करता येते ते वेगळेच! या धरणबांधणीला आपण करत असलेल्या विरोधाला चीनने काहीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. ही सगळी लक्षणे एका 'मित्र'देशाची खचितच नाहीत. आपण या सगळ्याचा परिपूर्ण विचार करून मगच आपले चीनविषयक धोरण आखणे अत्यावश्यक आहे. आणि अखंड सावधपण ठेवण्यास पर्यायच नाही. हे जर केले नाही तर १९६२ची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. कारण म्हटलेच आहे की, 'जे देश इतिहासापासून काहीच धडा घेत नाहीत, त्यांना तोच इतिहास पुन्हा गिरवायला लागतो!'

सीमाप्रश्नाचे शर्करावगुंठीत कडू औषध झालाच पाहिजे


असे काही प्रश्न, समस्या असतात की, त्या सोडवण्यापेक्षा त्यांचं 'भिजत घोंगडं' ठेवण्यातच राजकारण्यांना रस असतो. ते प्रश्न, समस्यांपेक्षा त्यामागचं राजकारण, सत्ताकारण आणि 'इतर' सामाजिक-आर्थिक समीकरणं यांना अधिक महत्त्व दिलं जातं.


झालाच पाहिजे
लेखक : प्रदीप राणे, संतोष पवार
दिग्दर्शक : संतोष पवार
कलाकार : हेमंत ढोमे, रमेश वाणी, संदेश उपश्याम, अनिल रसाळ, मानसी सिंग, सविता मालपेकर, सुबोध भावे, संजय नार्वेकर, नंदेश उमप, संभाजी भगत, सुशांत शेलार, सुबोध भावे व मोहन जोशी असे काही प्रश्न, समस्या असतात की, त्या सोडवण्यापेक्षा त्यांचं 'भिजत घोंगडं' ठेवण्यातच राजकारण्यांना रस असतो. ते प्रश्न, समस्यांपेक्षा त्यामागचं राजकारण, सत्ताकारण आणि 'इतर' सामाजिक-आर्थिक समीकरणं यांना अधिक महत्त्व दिलं जातं. परिणामी, ज्यांनी हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा ते सत्ताकांक्षी या समस्यांबाबत मूग गिळून गप्प बसतात.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, पण जागतिक नकाशात भारताचा हा टापू 'एरिया इन डिस्प्यूट' म्हणून (वादग्रस्त प्रदेश म्हणून) दाखवला जातो, त्याचं वैषम्य कुणालाच वाटत नाही. हा एक मासला. असे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकीच एक बेळगाव सीमावाद!
स्वातंत्र्यानंतर, भारत प्रजासत्ताक झाल्यावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाषावार प्रांतरचना करून 'राज्यां'च्या सीमा आखून दिल्या. दिल्लीच्या राज्यकर्त्यांना, अगदी पूर्वापार 'महाराष्ट्रा'बद्दल आकस होताच, तो या भाषावार प्रांतरचनेतही दिसून आला. सारा मुंबई प्रांत त्यांनी द्विभाषिक केला. (गुजराती भाषिकांसाठी 'गुजरात'ची निर्मिती केलेली असताना पुन: 'मुंबई'वर 'हक्क' का?) या प्रश्नाला उत्तर नाही. 'बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' अशी घोषणा बेळगाव, कारवार हे प्रांत महाराष्ट्रात जोडण्यासाठी लढणा-या आचार्य अत्र्यांची होती.
सा-या पक्षांचे प्रमुख नेते या सीमाप्रश्नासाठी एका झेंडय़ाखाली, एका अजेंडय़ाखाली आले होते, पण केंद्रानं या नेत्यांच्या झोळीत अपेक्षाभंगापलीकडे काहीही टाकलं नाही. 'केंद्रा'त सत्ताबदल झाला, महाराष्ट्र-कर्नाटकातही राजकीय उलथापालथ झाली, पण बेळगाव, कारवार, निपाणी या प्रांतांना 'महाराष्ट्रा'च्या उंबरठय़ाबाहेरच ताटकळत ठेवण्यात आलं. तिथल्या मराठी जनतेची अजूनही 'महाराष्ट्रा'त यायची तीव्र इच्छा आहे, पण राजकीय इच्छाशक्तीच कमकुवत असल्यानं त्यांना कर्नाटकाच्या 'सासरचा जाच' सहन करावा लागतोय.
'सीमावाद' हा काही नाटकाचा विषय होऊ शकत नाही, पण प्रदीप राणे यांनी हा प्रश्न आपल्या परीनं महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याचं धाडस केलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. 'सीमावाद' आणि तो न सुटण्यानं तेथील जनतेवर होणारा अन्याय, अत्याचार, मानखंडना, मराठीची गळचेपी आणि कानडीची होणारी सक्ती, दडपशाही.. हा सारा प्रकार 'नाटय़ात' मांडणं मोठं आव्हानात्मक होतं. ते प्रदीप राणे यांनी सुरेख केलंय.
त्यांचं 'झालाच पाहिजे' हे नाटक गंभीर प्रवृत्तीचं. त्याचं दिग्दर्शन संतोष पवार यांच्याकडे आल्यावर त्यांनी, त्यात बदल केले, मांडणी बदलली आणि त्यास 'मुक्तनाटय़ा'ची जोड दिली. साखरेच्या अवगुंठनातून कडू औषध द्यावं, तसा परिणाम या मांडणीनं केला आहे. गण, बतावणी, (गवळण वगळून) वग असं स्वरूप 'झालाच पाहिजे'ला दिलं आहे. आबूराव, बाबूराव यांची बतावणी, किसन-पेंद्या-मावशी यांची गवळणींविना गवळण अन् मग 'झालाच पाहिजे' हा वग. बतावणीत संतोष पवार यांनी, वर्तमान संदर्भावर टीकाटिप्पणी करण्यासाठी सोडलेल्या जागा आबूराव- बाबूराव मस्तपणे भरून काढतात. प्रदीप राणे आणि संतोष पवार यांनी केलेल्या शब्दांच्या कसरती, शब्दांशी खेळत साधलेले विनोद आणि राजकीय टीकाटिप्पणी यामुळे बतावणी खुसखुशीत होते.
'वगा'चा विषय गांभीर्यपूर्ण, पण त्याचा 'डोस' फार कडक होणार नाही, याची दक्षता लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी घेतली आहे. राजा-राणी-प्रधानजी यांना 'वर्तमाना'त आणून मंत्री, राणीसाहेब, खासगी सचिव यांच्या रूपांतून, पवारांनी 'प्रश्न' जनतेसमोर आणला आहे. या प्रश्नाचं गांभीर्य गडद करण्यासाठी स्थानिक रहिवाशांच्या मुलाखतीही, दृश्य माध्यमातून दाखवल्या आहेत. शिवाय 'कर्नाटक' शासनाची दंडेली, गुंडगिरी, मराठीवरचा, मराठी भाषिकांवरचा अन्याय, अत्याचार याचेही पुरावे त्यांनी दिले आहेत.
युवराज आणि अस्मिता यांचं लग्न, महाराष्ट्राची 'अस्मिता' आणि बेळगावचा युवराज. स्थानिक वातावरणामुळे या तरुण पिढीवर होणारा परिणाम, त्यांच्या कोमल नात्याचा, त्यांच्या भावभावनांचा होणारा चुराडा, उमलत्या-कोवळय़ा मनाचा होणारा कोंडमारा.. यांचंही विदारक अन् विचाराला चालना देणारं चित्र 'झालाच पाहिजे'मधून परिणामकारकतेनं येतं.
दिग्दर्शक संतोष पवार यांनी प्रेक्षकांना हसवत, हसवत, त्यांचं मनोरंजन करत गंभीर विषयाकडे नेलं आहे. कथित विषयाकडे लोकांचं लक्ष वेधणं, सीमाप्रश्नाविषयी सहानुभूती मिळवणं, बेळगाव- कारवारवासीयांसाठी अनुकूल मत तयार करणं, हे या 'प्रयोगा'तून त्यांनी साध्य केलं आहे. 'भुलुनाटय़ा'चा प्रकार आविष्करणासाठी निवडल्याने त्यांना ब-याच गोष्टीत लवचीकता आणता आलेली आहे.
सुबोध गुरुजी यांनी पार्श्वभूमीवर पेटती ज्योत धरलेली मूठ आणि अठरापगड जाती- धर्माच्या लोकांचे चेहरे रंगवून, अनुक्रमे या लढय़ाचं ज्वलंतपण अधोरेखित केलंय तसंच त्यात 'महाराष्ट्रा'तील जनतेचा 'सहभाग'ही सूचित केलाय. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजनाही सुविहित होती. शाहीर संभाजी भगत यांचं गीत-संगीत वीरश्रीयुक्त. कमलेश भडकमकर यांचं संगीतही सुश्राव्य. दीपाली विचारे यांनी नृत्यरेखन केलं होतं, ते 'मराठमोळं' अन् नेत्रसुखद. शशी सकपाळ यांनची रंगभूषा आणि करिश्मा नानावटींची वेषभूशा ठीक.
या 'प्रयोगा'तील कलावंतांचा अभिनय ही आणखी एक जमेची बाजू लोकनाटय़ातला 'किसन' आणि वर्तमानातला 'युवराज' या दोन्ही भूमिकांची धारणा हेमंत ढोले यांनी सुरेख सांभाळली. अन्यायाविषयीची चीड, राजकीय खेळखंडोब्याविषयीचा त्यांचा सात्त्विक संताप, त्या भागातील तरुण पिढीच्याच भावना व्यक्त करणारा. रमेश वाणी यांचा प्रधानजी म्हणजे 'व्यवहारी', आतल्या गाठीचा राजकारणी, सूत्रं हलवणारा, बेरकी असा 'सहजते'नं केला. अप्रतिम. अनिल रसाळ यांचा बाबूराव आणि आप्पा मस्त.
विशेषत: आप्पा झाल्यानंतरची त्यांची देहबोली फर्मास. सविता मालपेकरांची राणीसाहेब ही भूमिका विविधढंगी. ती त्या स्वत: एन्जॉय करतात आणि 'मजा' आणतात. संदेश उपश्याम यांच्या मावशी, आबूराव आणि मंत्री या भूमिका झकास. (मात्र त्यांची मावशीच्या भूमिकेची 'धारणा' ते मंत्री करतानाही सोडत नाहीत.) त्यांच्या अभिनयशैलीत टिकू तलसानियांच्या अभिनयाची झाक जाणवते. मानसी सिंग यांची 'अस्मिता' ही लक्षणीय. महाराष्ट्राच्या दुख-या जागेला आणि सीमाबांधवांच्या मनातील 'सल' यांना 'झालाच पाहिजे'द्वारा जनतेसमोर विचारार्थ आणल्याबद्दल 'महाराष्ट्र कलानिधी' आणि 'नाटय़संपदा' यांचे आभार मानायला हवेत.

विकासक्रांतीचा उद्गाता

विचारवंत आणि तत्त्वज्ञ प्लेटो यांनी 'द रिपब्लिक' या ग्रंथामध्ये 'फिलॉसॉफर किंग' (तत्त्वज्ञ राजा) ही संकल्पना मांडली होती. ते म्हणतात, 'प्रज्ञावंत आणि ज्ञानी व्यक्ती राजा झाली पाहिजे किंवा जे राजे बनले आहेत, ते तत्त्वज्ञ झाले पाहिजेत.' प्लेटो यांनी 'फिलॉसॉफर' या शब्दाची व्याख्या करताना 'ज्ञानप्रेमी' अशी केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या रूपाने २००४ पासून भारताला तत्त्वज्ञ आणि ज्ञानी नेतृत्व लाभले. परंतु त्या आधीपासून १९९१ सालीच त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला योग्य दिशा दाखवण्याचे महान कार्य केले होते. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या नव्या युगात खुलेपणाने शिरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिवाय पुढील पाच वर्षे भारतीय अर्थकारणाला गतीसुद्धा दिली. म्हणून आपण जागतिक स्पर्धेमध्ये तग धरू शकलो. मंदीच्या लाटा वारंवार उसळल्या तरी चांगला नावाडी असल्यामुळे बराच टप्पा पार करू शकलो. २००४ ते २०१३ पर्यंतचा आर्थिक चढ-उतारांचा काळही डॉ. सिंग यांच्या कुशल कामगिरीमुळे चांगला गेला. आज विरोधक भ्रष्टाचार आणि महिला अत्याचार हे दोन मुद्दे घेऊन सरकारला झोडपताहेत, पण त्याच वेळी देशातील दारिद्रय़रेषेखालील लोकांची संख्या पाच कोटीने कमी होणे किंवा देशातील जनतेचे आयुष्य पाच वर्षानी वाढणे या अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करताहेत. पण डॉ. सिंग यांचे पंतप्रधान म्हणून दहाव्या वर्षात होणारे पदार्पण आणखी नव्या निर्णयांची नांदी असणार आहे. आज भलेही भाजपने कोटय़वधी लोकांच्या जगण्याशी संबंधित 'अन्नसुरक्षा विधेयक' आणि 'भूसंपादन विधेयक' रोखून धरले असले तरी गोरगरिबांच्या जनमताचा प्रचंड लोंढा जेव्हा काँग्रेसच्या बाजूने उसळेल, तेव्हा कमळाच्या पाकळ्या विखुरल्या जातील..
भारताला स्वातंत्र्य मिळाले ते वर्ष इंग्लंडसाठी खूपच वाईट गेले होते. सुमारे दीडशे वर्षे ज्या देशाची पिळवणूक केली आणि स्वत:चे घर भरले होते, तो देश आपल्या तावडीतून सुटला याचे सभ्य असल्याचा आव आणणा-या ब्रिटिशांना फार दु:ख झाले होते. विशेषत: पंतप्रधान विन्स्टन चर्चिल या फाटक्या तोंडाच्या माणसाला तर अगदी चेव आला होता. इंग्रजांच्या अनुपस्थितीत भारताचे प्रशासन चालणे अशक्य आहे, असे ते उघडपणे म्हणत असत. एकदा तर चर्चिल यांनी कहर केला. ते म्हणाले, ''भारताचे प्रशासन आम्ही पेंढा भरलेल्या माणसांकडे दिले आहे.'' चर्चिलच्या या बोलण्याने 'पोलादी पुरुष' वल्लभभाई पटेल प्रचंड संतापले आणि त्यांनी चर्चिलना त्यांच्याच शब्दांत उत्तर दिले, ''चर्चिल हे निर्लज्ज साम्राज्यवादी आहेत. हुशारी आणि तर्कसुसंगता यापेक्षा मूर्खपणा आणि मुजोरी त्यांच्या डोक्यावर स्वार झालेली असते.''
गेली नऊ वर्षे संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे नेतृत्व करणा-या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बोलभांड नेत्यांकडून केली जाणारी टीका चर्चिलसाहेबांच्या उन्मत्त मुजोरीची आठवण करून देणारी आहे. जागतिक मंदीच्या फटक्यामुळे जगातील भल्याभल्या अर्थव्यवस्था अगतिक झाल्या असताना अर्थतज्ज्ञ असणा-या डॉ. सिंग यांनी देशात आर्थिक स्थैर्य ठेवले. ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीपासून उच्च शिक्षणापर्यंत, महिला सुरक्षा विधेयकापासून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यापर्यंत डॉ. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केले आहे. ज्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना घरी बसवले. ज्या सहयोगी पक्षांनी मनमानी केली, त्यांच्याशी संबंध तोडले. फक्त देशांतर्गतच नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही आपल्या मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवली. तरीही जर केवळ राजकीय स्वार्थासाठी भाजपची मंडळी पंतप्रधानांना 'मौनीबाबा' किंवा 'कणाहीन पंतप्रधान' म्हणत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण समाजातील सर्वमान्य व्यक्तीची टिंगलटवाळी करणे हा रा. स्व. संघाच्या शाखेत 'तयार' झालेल्या लोकांचा मूलधर्म असतो. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहिलेले नरेंद्र मोदी असो वा बोलघेवडय़ा सुषमा स्वराज, त्यांची भाषा आणि धोरणे त्यांच्यावर झालेल्या 'संघसंस्कारांना' अनुरूप असते. तिथे तर्कसुसंगत बोलण्याऐवजी मुजोर भाषा वापरली जाते. अगदी आकडेवारीच्याच निकषांवर भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि काँग्रसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारची कामगिरी तपासली तरी डॉ. सिंग यांची कामगिरी नजरेत भरते. गेल्या वर्षी जागतिक मंदीच्या फटक्याने सगळ्याच अर्थव्यवस्था हादरल्या होत्या. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेलाही झटका बसला आणि २०१२-१३ चा विकासदर पाच टक्क्यांपर्यंत खाली घसरला. पण या जागतिक मंदीच्या काळातही सरासरी विकासदर आठ टक्क्यांपर्यंत राखण्यात डॉ. सिंग सरकारला यश आले होते, ही बाब विरोधक जाणूनबुजून नजरेआड करतात. भाजपप्रणीत 'एनडीए' सरकार सहा वर्षे सत्तेवर होते. पण त्यांना एकदाही विकासदर ५.७ टक्क्यांवर नेता आला नव्हता, ही वस्तुस्थिती जगजाहीर आहे. तरीही मनमोहन सिंग सरकारवर बेछुट टीका करणा-या 'संघीय' मंडळींच्या टीकेने न डगमगता यूपीए सरकारने २०१३-१४ या आर्थिक वर्षात विकासदर सहा टक्क्यांवर नेण्याचे निश्चित केले आहे. तसेच बाराव्या पंचवार्षिक योजनेत आठ टक्के विकासदर गाठण्याचे स्वप्न पंतप्रधानांनी पाहिलेले आहे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू झालेले आहेत, मात्र केवळ विरोधासाठी विरोध करणारे सत्तातुर भाजपनेते लोकशाहीबाह्य मार्गाचा अवलंब करून सरकारच्या कामात अडथळे आणत आहेत. वास्तविक पाहता, २००४ मध्ये काँग्रेसप्रणीत सरकार सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने सहा वर्षे सत्तेची चव चाखली होती. त्या कालावधीत काँग्रेस वा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाने संसदीय कामकाज वेठीस धरले नव्हते; परंतु गेल्या दोन वर्षापासून राजकीय वैफल्यग्रस्त भाजपने गोंधळ, सभात्याग आणि असहकाराचा मार्ग पत्करून अवघी संसदीय प्रक्रियाच रोखलेली दिसते. देशातील गोरगरिबांच्या जगण्याशी संबंधित असणारे अन्नसुरक्षा विधेयक असो किंवा भूसंपादन विधेयक, हे चांगले निर्णय भाजपच्या आडमुठय़ा धोरणामुळे लांबणीवर पडले आहेत. आज भारतातील ५२ टक्के जनता शेतीवर आधारित रोजगारावर जगताना दिसते. भूसंपादन विधेयक चांगल्या पद्धतीने अंमलात आले, तर या शेतीशी संबंधित कोटय़वधी लोकांना त्याचा फायदा होईल, याची भाजपच्या 'चाणाक्ष' नेतृत्वाला जाणीव आहे आणि अन्नसुरक्षा विधेयक ही तर देशातील सुमारे ३० कोटी भुकेकंगाल लोकांना जगविणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. ती या विधेयकामुळे प्रत्यक्षात आली तर काँग्रेसला लोक डोक्यावर घेतील याचीही भाजपला कल्पना आहे आणि म्हणूनच आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपच्या स्वार्थी नेतृत्वाने या दोन्ही विधेयकांचा संसदेतील मार्ग रोखलेला दिसतोय. थोडक्यात सांगायचे तर 'सत्तातुराणाम् न भयं न लज्जा' या न्यायाने अगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याची धडपड भाजपने चालवलेली आहे. 'कुजबुज मोहीम' (व्हिस्परिंग कॅम्पेन) हा तर संघप्रणीत भाजपच्या चलाख कार्यपद्धतीचा आत्मा. ही कार्यपद्धती काही वेळा त्यांना लाभदायी ठरली हे खरे, मात्र त्याचा नेहमीच फायदा होतो, असे नाही. हे कटुसत्य भाजपला नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत अनुभवायला मिळाले होते; परंतु अनुभवातून शहाणपण शिकतील मग ते भाजपवाले कसले? 'यूपीए' सरकार नऊ वर्षाची कारकीर्द पूर्ण करून दहाव्या वर्षात पदार्पण करीत असतानाच भाजपमधील मोदी गटाच्या 'मालदार' नेत्यांनी विविध जनमत चाचण्या 'मॅनेज' करण्याचा सपाटा लावला होता. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, हे जगाला ओरडून सांगणे हा या विविध जनमत सर्वेक्षण चाचण्यांचा हेतू होता. त्यातील निकालांकडे एक नजर टाकली तरी आपल्याला त्यामागील हेतू लक्षात येतो.
वास्तविक पाहता भारतासह सर्वच प्रगत लोकशाहीप्रधान देशांमध्ये या निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांवर कायद्याने बंदी आहे. कारण त्या चाचण्यांमध्ये जनमताचा प्रामाणिक कौल दर्शविण्याऐवजी एखाद्या पक्षाची 'हवा' करण्याचा प्रयत्न असतो, हे एकदा नव्हे अनेकदा सिद्ध झाले आहे. १० कोटींच्या महाराष्ट्रातील जनतेचे मत केवळ एक हजार लोकांच्या मतांवर ठरविणे हे तर्कदृष्टय़ा जसे योग्य नाही, तद्वत त्या निष्कर्षाना अफाट प्रसिद्धी देणेही माध्यमांच्या प्रगल्भतेचे लक्षण ठरत नाही. परंतु अजून निवडणुका जाहीर झालेल्या नसताना खरे सांगायचे तर निवडणुकांना एक वर्ष उरले असताना मोदींच्या प्रसिद्धीसाठी 'लॉबिंग' करणा-या माध्यमतज्ज्ञांनी जनमत चाचण्यांचा कौल नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे असाच आहे, अशी हूल उठवली आहे. होय, प्रत्येक सर्वेक्षणात नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदासाठी उमेदवार घोषित केल्यास कसा आणि किती फायदा होईल, हे दाखवण्याचा आवर्जून प्रयत्न केलेला दिसतो. एका अर्थाने हा भाजप नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. अर्थात त्यामुळे लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि आणखी किमान अर्धा डझन भाजप नेते, अगदी नितीन गडकरीही पंतप्रधानपदाकडे डोळे लावून बसले आहेत. त्या नेत्यांचा मोदीविरोध मावळेल असे मानण्याचे कारण नाही. प्रत्यक्षात तो विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मोदी यांची 'पंतप्रधानपदाचे दावेदार' अशी प्रतिमा 'बनविण्याचा' प्रयत्न काही प्रसारमाध्यमांद्वारा सुरू आहे. त्यातील काही माध्यमसमूहांनी ही जनमत सर्वेक्षण चाचण्यांची टूम काढलेली असल्यामुळे लोकांनी त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही. सगळ्यात पहिला असा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला, 'एबीपी-नेल्सन' यांनी. या सर्वेक्षणात पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना ३६ टक्के तर राहुल गांधी यांना फक्त १३ टक्के लोकांची पसंती असल्याचे प्रसिद्ध केले गेले. त्यानंतर दुसरी वृत्तवाहिनी 'सीएनएन-आयबीएन आणि जीएफके-मोड' यांच्या वतीने झालेल्या सर्वेक्षणात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी ५६ टक्के तर राहुल गांधी यांना २९ टक्के लोकांनी कौल दिला आहे, असे सांगण्यात आले. तिस-या सर्वेक्षणात 'इंडिया टूडे व सी-वोटर' यांनी संयुक्तपणे केलेल्या पाहणीमध्ये अगामी निवडणुकीत यूपीएला ९० जागांवर फटका बसेल, असे आढळून आले. म्हणजे २०६ वरून यूपीएची ताकद ११६ पर्यंत घसरेल, पण भाजप मात्र मजबूत स्थितीत असेल. मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केल्यास ४०-५० जागांचा फायदा होईल, असे या जनमत सर्वेक्षणात आढळल्याचे आवर्जून सागण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनीसुद्धा या तिन्ही सर्वेक्षण निष्कर्षाची दखल न घेणे, हे खूप काही सांगून जाते.
थोडक्यात सांगायचे तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपला अंतर्गत कलहाने ग्रासलेले आहे. नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वानाच सत्तेचे डोहाळे लागले आहेत, त्यामुळे प्रत्येक जण पक्षाची सूत्रे आपल्या हाती राहावी, असा प्रयत्न करीत आहे. नितीन गडकरी यांनी आपल्याला अकस्मात लाभलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची खुर्ची पुन्हा एकदा मिळावी, यासाठी घटनात्मक तरतुदीपासून संघ मुख्यालयातील रसदींपर्यंत सगळी व्यवस्था झाली होती; परंतु मोदींच्या काही चेल्यांनी गडकरींची स्वप्नपूर्ती होऊ दिली नाही. दुस-यांदा अध्यक्षपद मिळवण्याच्या त्यांच्या आकांक्षेची पुरती वाट लावून ते थांबले नाहीत, तर महाराष्ट्रातही गडकरी समर्थक प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मुदतवाढ मिळणार नाही, अशी 'फिल्डिंग' लावली गेली. गडकरी विरुद्ध गोपीनाथ मुंडे हे युद्ध दिल्लीतून महाराष्ट्राच्या मातीपर्यंत आले आणि त्यात मुंडे यांची सरशी झाली. अगदी आरंभापासून ज्या देवेंद्र फडणवीस यांची राजकीय वाढ होऊ नये, यासाठी गडकरींनी प्रयत्न केले होते, त्याच देवेंद्र फडणवीस यांना मुंडे यांनी प्रदेशाध्यपदी बसवले. परिणामी महाराष्ट्राच्या पक्षकारणात पुन्हा एकदा मुंडे यांचा शब्द परवलीचा ठरू लागला आहे. भाजपची नवी पक्षकार्यकारिणी पाहिल्यावर तर मुंडे यांचे प्रदेश भाजपवरील वर्चस्व सहज लक्षात येते. भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मुंडे यांची मुलगी पंकजा पालवे आणि भाजप कार्यालय प्रमुखपदी प्रतापभाई आशर यांची नियुक्ती यासह सर्वच महत्त्वाच्या पदांवर मुंडेसमर्थकांची वर्णी लागल्याने गडकरींच्या वाडय़ात अस्वस्थता पसरली आहे. मुंडे गटाला जशास तसे उत्तर कसे द्यायचे, याची खलबते सुरू आहेत. थोडक्यात सांगायचे तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपला अंतर्गत संघर्षाने ग्रासलेले दिसत आहे. तरीही त्यांचा २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा आशावाद मोठा कौतुकास्पद वाटतो.
डॉ. मनमोहन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थतज्ज्ञ म्हणून नाव कमावल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या प्रेरणेने भारतात येऊन आपल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे ऐंशीच्या दशकात निश्चित केले. अत्यंत गरिबीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या डॉ. सिंग यांनी शिष्यवृत्तीच्या आधारे आपले शिक्षण घेतले. विदेशात अत्यंत मानाच्या आणि मोलाच्या नोक-या खुणावत असताना देशसेवेच्या विचाराने मायदेशी आलेल्या या गुणी भारतपुत्राने १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून ऐतिहासिक कामगिरी बजावली. अर्थमंत्री म्हणून अवघा एक रुपया पगार घेणा-या डॉ. सिंग यांनी भारताला जागतिकीकरणाची दिशा दिली. म्हणून आम्ही आज चांगली प्रगती करू शकलो. त्यांनी जेव्हा खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा पुरस्कार केला होता, त्या वेळी 'अर्थ निरक्षर' साम्यवादी, बिनडोक हिंदुत्ववादी आणि समाजद्वेष्टे समाजवादी नेते त्यांच्यावर तुटून पडले होते. तुम्ही १९९१-९२ च्या काळातील वर्तमानपत्रे पाहिली तर डॉ. सिंग यांच्यावर झालेली चौफेर टीका कोणत्या थराला गेली होती, हे लक्षात येईल; परंतु तरीही अत्यंत स्वच्छ चारित्र्य, नम्र वागणूक आणि सौम्य बोलणे असणा-या मनमोहन सिंग यांनी आपली पायरी सोडली नाही. ते आपले कार्य निष्ठेने करत राहिले. त्यामुळे २००४ मध्ये जेव्हा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा कळीचा बनला तेव्हा पंतप्रधानपदासाठी डॉ. सिंग यांच्या नावावर सर्वाचे एकमत झाले होते. वास्तविक पाहता २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसला १४५ जागांवर समाधान मानावे लागले होते; परंतु डॉ. सिंग आणि सोनिया गांधी यांच्या संयुक्त नेतृत्वामुळे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने २०६ जागा पटकावून सहयोगी पक्षांच्या बेलगाम वर्तणुकीपासून स्वत:ची सोडवणूक केली होती. आता पुन्हा २०१४ च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी श्रीमती गांधी आणि डॉ. सिंग यांचे नेतृत्व नव्याने सिद्ध झालेले आहे. विरोधकांनी टू-जी आणि कोळसा भ्रष्टाचार प्रकरणाचे भांडवल करून सरकारच्या सगळ्याच कामांची टिंगल करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: सोशल नेटवर्किंग साइट्सवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन काँग्रेस नेतृत्वाचे प्रतिमाभंजन करण्याचे प्रकार यथेच्छपणे सुरू आहेत. अशा प्रयत्नांनी सत्ता मिळते, असे जर भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर ते आपल्याच हातांनी पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत. जिने आपल्या पतीप्रेमासाठी देश, धर्म, परिवाराचा त्याग केला; पतीनिधनानंतरही आपल्या कुटुंबीयांसाठी, पक्षासाठी सर्वोच्च पद, वैभवाकडे पाठ फिरवली; अशा सोनिया गांधी यांच्यासारख्या स्त्रियांविषयी भारतीय समाजमनात अजूनही सहानुभूती, प्रेम व आदर असतो. अगदी त्याच पद्धतीने विद्वान, नि:स्वार्थी, निष्कलंक आणि देशभक्त वरिष्ठांनाही मान देण्याची भारतीय संस्कृतीत पद्धत आहे. त्यामुळे संघ-भाजपच्या नेत्यांनी सत्तेसाठी काँग्रेस नेत्यांचे ज्या पद्धतीने चारित्र्यहनन चालवले आहे, त्याचा भाजपला फायदा होण्यापेक्षा तोटाच होईल.. कर्नाटकात भ्रष्टाचाराने जर्जर झालेल्या भाजपची राजवट जशी कोसळली तशीच केंद्रात सरकार बनवण्याची स्वप्ने धुळीस मिळतील..

मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल १,२०० खड्डे

पावसाळा आला की मुंबईत रस्त्यांवरील खड्डयांची चर्चा रंगायला लागते. भर पावसात या खड्डय़ांचा सामना करत मार्ग काढताना मुंबईकरांच्या नाकीनऊ येतात.

मुंबई - पावसाळा आला की मुंबईत रस्त्यांवरील खड्डयांची चर्चा रंगायला लागते. भर पावसात या खड्डय़ांचा सामना करत मार्ग काढताना मुंबईकरांच्या नाकीनऊ येतात. असे असले तरी पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत मुंबई महापालिका गंभीर असल्याचे दिसत नाही. कारण आजच्या घडीला मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल १,२०० खड्डे आहेत. यात एमएमआरडीएसह सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, एमटीएनएल यांच्या तब्बल ८८३ खड्डय़ांचा समावेश आहे.
एरव्ही पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेत त्यावर करोडो रुपये खर्च करणा-या पालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे काम कासवगतीने केले जात आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने मागील वर्षापासून 'पॉट होल ट्रकींग सिस्टम'चा अवलंब सुरू केला आहे. याचे कंत्राट प्रोबिटी नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शनिवापर्यंत घेतलेल्या आढाव्यामध्ये एकूण २६ हजार २८५ खड्डय़ांची नोंद दाखवली असून, त्यातील २४ हजार ९९४ खड्डे बुजविण्यात आल्याचेही ट्रकींग सिस्टमवर नोंदवण्यात आले आहे.
मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी यंदा महापालिकेने ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी मध्यवर्ती यंत्रणेद्वारे कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर तब्बल ११८ खड्डे आहेत, तर प्रशासकीय विभागांमार्फत बुजविण्यात येणा-या कामांमध्ये १५८ खड्डे शिल्लक असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या जलअभियंता, पर्जन्य जलअभियंता आणि मलनि:स्सारण वाहिनी विभागांमार्फत १६३ खड्डे निर्माण करण्यात आले असून, त्यापैकी केवळ २९ खड्डे बुजवण्यात आले आहेत. म्हणजेच १३४ खड्डे शिल्लक आहेत.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच यंदापासून रस्ते अभियंते नेमून रस्त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपावण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची त्वरित दखल घेऊन ते बुजवण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे यंदा खड्डय़ांची समस्या फारशी जाणवणार नाही, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
एमएमआरडीएने घातले खड्डयातच
मुंबईत एमएमआरडीएच्या रस्त्यांवर तसेच त्याच्या प्रकल्पांतर्गत तब्बल ४६८ ठिकाणी खड्डे करण्यात आले आहेत. मात्र यापैकी एकही खड्डा शनिवापर्यंत बुजवला गेला नव्हता. एमएमआरडीएसह म्हाडा, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, खासगी वसाहती, एमटीएनएल आदींनी तब्बल ८८३ खड्डे केले असून, त्यांनीसुद्धा एकही खड्डा बुजवलेला नाही.

तीन वर्षापूर्वीचा रिमेक


मुंबई इंडियन्सच्या रूपाने आयपीएलला नवा 'चँपियन' मिळेल की चेन्नई सुपर किंग्ज तिस-या वेळी जेतेपदावर नाव कोरेल, याचा निकाल रविवारी (२६ मे) ईडन गार्डन्सवर लागेल.
कोलकाता - मुंबई इंडियन्सच्या रूपाने आयपीएलला नवा 'चँपियन' मिळेल की चेन्नई सुपर किंग्ज तिस-या वेळी जेतेपदावर नाव कोरेल, याचा निकाल रविवारी (२६ मे) ईडन गार्डन्सवर लागेल. सहाव्या हंगामातील अंतिम फेरीत चेन्नई आणि मुंबई झुंजतील. २०१० मध्ये हेच दोन संघ आमनेसामने आले होते. त्यामुळे तीन वर्षापूर्वीचा 'रिमेक' पुन्हा पाहायला मिळाला आहे.
आयपीएल स्पॉटफिक्सिंगमधील कारवाईला वेग आला आहे. त्यात चेन्नई फ्रँचायझीचा प्रमुख पदाधिकारी गुरुनाथ मयप्पनला पोलिस कोठडीत डांबण्यात आल्याने चेन्नईचे क्रिकेटपटू प्रचंड दडपणाखाली आहेत. संशयाची सुई आता त्यांच्याकडेही वळली आहे. त्यामुळे मैदानाबाहेरील घडामोडींकडे दुर्लक्ष करून कामगिरीत सातत्य राखण्याचे मोठे आव्हान महेंद्रसिंग ढोणी आणि सहका-यांवर आहे.
मैदानावरील कामगिरीचा विचार करता अंतिम फेरीत खेळण्याचा सर्वाधिक अनुभव चेन्नईकडे आहे. सहापैकी पाच 'फायनल'मध्ये ते खेळलेत. गेल्या चार हंगामात सलग अंतिम फेरी गाठण्याची करामत त्यांनी साधली आहे. मागील वर्षी कोलकाता नाइट रायडर्सनी चेन्नईला हॅटट्रिकपासून रोखले. मात्र तिस-यांदा जेतेपद पटकावण्याची संधी त्यांना आहे. २०१० नंतर मुंबईला पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्यात यश आले. त्यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तीन वर्षापूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्यास रोहित शर्मा आणि सहकारी उत्सुक असतील.
सहाव्या हंगामातील कामगिरी पाहता चेन्नई आणि मुंबई हे अंतिम फेरीतील संघ मजबूत आहेत. दोघांकडे अनेक टी-२० स्पेशालिस्ट फलंदाज आहेत. त्यात माइक हसी, ड्वायेन स्मिथ, कीरॉन पोलार्ड, सुरेश रैना, महेंद्रसिंग ढोणी तसेच रवींद्र जडेजाची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील. चेन्नईची फलंदाजीची भिस्त जबरदस्त फॉर्मात असलेल्या हसीवर आहे.
मात्र रैना, ढोणी आणि जडेजाची त्याला चांगली साथ लाभत आहे. स्मिथ आणि पोलार्डवर मुंबई विसंबून आहे. मात्र कर्णधार रोहित शर्मासह दिनेश कार्तिक, आदित्य तारे आणि अंबाती रायडूकडेही मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या समावेशाबाबत साशंकता कायम आहे. मात्र तो खेळल्यास मुंबईच्या क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास उंचावेल, यात शंका नाही.
चेन्नई आणि मुंबईकडे प्रभावी तेज गोलंदाज तसेच फिरकीपटू आहे. मिचेल जॉन्सन, लसित मलिंगा आणि कीरॉन पोलार्डवर मुंबईच्या तेज आक्रमणाची धुरा आहे. ड्वायेन ब्राव्हो, आल्बी मॉर्केल आणि मोहित शर्माने चेन्नईच्या वेगवान मा-याची धुरा समर्थपणे पेलली आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरल्यास रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा तसेच हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझाच्या कामगिरीवर खूप काही अवलंबून असेल. राजस्थानविरुद्ध हरभजनने (२३-३) प्रभावी 'स्पेल' टाकला. मात्र कोपराला दुखापत झाल्याने ओझाच्या समावेशाबाबत साशंकता आहे.
वेळ : रा. ८ वा. थेट प्रक्षेपण : सेट मॅक्सवर.
दोन्ही कर्णधारांची पत्रकार परिषदेला दांडी
कोलकाता : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अंतिम लढतीपूर्वीच्या पत्रकार परिषदेला दांडी मारली. ढोणीच्या अनुपस्थितीत चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ''स्पॉटफिक्सिंगच्या आरोपांमुळे चेन्नईच्या क्रिकेटपटूंवर मोठे दडपण आहे. त्यामुळे क्रिकेटपटू किंवा सपोर्ट स्टाफपैकी कोणीही बेटिंग आणि फिक्सिंगबाबत बोलणार नाही,'' असे फ्लेमिंग यांनी सांगितले. ढोणीपाठोपाठ मुंबईचा कर्णधार रोहितनेही पत्रकार परिषदेला जाणे टाळले. त्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक जॉन राइट यांनी मीडियाशी संवाद साधला.










'सीएसटी' झळकणार पोस्ट पाकिटावर

जागतिक वारसा लाभलेले छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) लवकरच पोस्ट पाकिटावर झळकणार आहे.

मुंबई - जागतिक वारसा लाभलेले छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) लवकरच पोस्ट पाकिटावर झळकणार आहे. सीएसटी स्थानकाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. २७ मे रोजी या पोस्टपाकिटाचे अनावरण सीएसटी स्थानकातच करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य पोस्टमास्टर आणि मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक उपस्थित रहाणार आहेत.
पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बांधकामाला १८७८मध्ये सुरुवात झाली. १८८८ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तत्पूर्वी १८८७मध्ये या इमारतीचे व्हिक्टोरिया टर्मिनस असे नामकरण करण्यात आले होते. १९९६मध्ये या इमारतीला छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण करण्यात आले.
२००४मध्ये या इमारतीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केले. विशेष म्हणजे डिसेंबर २०१२मध्ये ही इमारत सर्वाना पाहाण्यासाठी खुली करण्यात आली. त्यामुळे इमारतीचे वैभव, बांधकाम आणि त्यावर केलेली कलाकुसर सर्वानाच जवळून पाहाण्याची संधी मिळाली. या इमारतीला यंदा १२५ वष्रे पूर्ण होत असल्याने पोस्ट विभागाकडून 'सीएसटी'चा गौरव होणार आहे.


राजकारणी, सेलेब्रिटींवर परिवहन विभाग मेहरबान?

सर्वसामान्य व्यक्तींनी गाडय़ांच्या काचांना काळ्या फिल्म्स लावलेल्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे परिवहन विभागाने ठरवले आहे

मुंबई - सर्वसामान्य व्यक्तींनी गाडय़ांच्या काचांना काळ्या फिल्म्स लावलेल्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे परिवहन विभागाने ठरवले आहे, मात्र अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि सेलेब्रिटींच्या गाडय़ांच्या काचांना काळ्या फिल्म्स असल्यास काय करावे? या बाबत निश्चित नियमावली तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा उभारतानाच व्हीआयपी आणि सेलेब्रिटींना मोकळे रान दिले जात आहे.
गाडय़ांच्या खिडक्या पारदर्शक असव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याच्यावर काळ्या रंगाच्या फिल्म्स लावता येणार नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. या बाबत जनजागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. ज्यांनी गाडय़ांच्या काचांना काळ्या फिल्म्स लावल्या असतील त्या काढाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेलेब्रिटी आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाडय़ांबाबत काय कारवाई करावी का ? या बाबत कोणतेच निर्देश देण्यात आले नसल्याचे परिवहन विभागाच्या एका अधिका-याने सांगितले. कोणत्या अतिमहत्त्वाच्या आणि सेलेब्रिटींच्या गाडय़ांच्या काचांना काळ्या फिल्म्स लावण्यास सवलत द्यावी, या बाबत निर्णय घेण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वर्षापूर्वी समिती नेमली होती. तिने अजून निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सध्या तरी सर्वच अतिमहत्वाच्या व्यक्तींना आणि सेलेब्रिटींवर कारवाई केली जात नाही.
केंद्रीय मोटार वाहन कायदा १०० (२) नुसार काही अंशी काळ्या काचांचा वापर करता येतो. मात्र त्या नियमानुसार असणे गरजेचे आहे. पुढील बाजूच्या काचेचा ७० टक्के भाग पारदर्शक तर बाजूच्या काचांमधील ५० टक्के भाग पारदर्शक असावा. हा नियम न पाळणा-यास १०० रूपये दंड आकारला जातो.

रिव्हर्स स्विंग, २६ मे २०१३

क्रिकेटच्या मैदानातील रंजक किस्से
१९४७
न्यूझीलंडचे एक सर्वोत्तम माजी सलामीवीर ग्लेन टर्नर यांचा जन्म. १९७१-७२ मध्ये गयाना कसोटीत टर्नर यांनी (२५९) टेरी जार्विस यांच्यासह ३८७ धावांची सलामी दिली. कसोटी इतिहासातील ही चौथी सर्वाधिक सलामी आहे. १९७३-७४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ख्राइस्टचर्च कसोटीत टर्नर यांनी दोन शतके झळकावली. एका कसोटीत दोन शतके झळकावणारे ते न्यूझीलंडचे पहिले फलंदाज ठरले. या कसोटीतील यजमानांचा विजय ऑस्ट्रेलियावरील पहिला कसोटी विजय ठरला.

१९४८
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू जेफ ग्रीनिज यांचा जन्म. ब्रेंडन नॅशपूर्वी वेस्ट इंडिज संघात खेळलेले ते शेवटचे श्वेतवर्णीय क्रिकेटपटू होते. १९६६-६७ मध्ये बार्बाडोसतर्फे खेळताना ब्रिजटाउनमध्ये जमैकाविरुद्ध त्यांनी धडाकेबाज डोमेस्टिक पदार्पण केले. दमदार द्विशतकी (२०५) खेळीनंतर प्रभावी लेगस्पिनने ग्रीनिज (१२४-७) यांनी प्रतिस्पर्धी संघाला हादरवले. मात्र फारच कमी कारकीर्द त्यांना लाभली. केवळ वर्षभराची कारकीर्द असलेल्या ग्रीनिज यांनी पाच कसोटी सामने खेळताना २०९ धावा केल्या.

१९७६
इंग्लंडला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणा-या पॉल कॉलिंगवुडचा जन्म. मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक अशी कॉलिंगवुडची ओळख आहे. ६८ कसोटी सामन्यांत १० शतकांसह ४२५९ आणि १९७ वनडेत पाच शतकांसह ५०९२ धावा त्याच्या नावावर आहेत.

१९९९
टाँटनमध्ये झालेल्या वर्ल्डकप सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सौरव गांगुली (१४७ चेंडूंत १८३ धावा) आणि राहुल द्रविडने (१२९ चेंडूंत १४५ धावा) दुस-या विकेटसाठी ३१८ धावांची झंझावाती भागीदारी केली. त्यावेळी वनडेतील कुठल्याही विकेटसाठीची ती सर्वाधिक भागीदारी होती. मात्र त्याच वर्षी हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने दुस-या विकेटसाठी ३३१ धावा जोडताना काही महिन्यांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेने केनयाला सात विकेट्सनी हरवले. सामन्यात पाच विकेट्स घेणा-या तेज गोलंदाज लांस क्लूजनरने सलग तिस-यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. हॉलंडमध्ये झालेला तो पहिला वनडे सामना होता.

२००७
बांगलादेशविरुद्धच्या मिरपूर कसोटीतील पहिल्या डावात भारताच्या चार फलंदाजांनी शतके ठोकली. कसोटी इतिहासात असे प्रथमच पाहायला मिळाले. या कसोटीत सलामीसाठीचा विश्वविक्रम थोडक्यात हुकला. वासिम जाफर आणि दिनेश कार्तिकने २८१ धावांची सलामी दिली. कार्तिक 'रिटायर्ड हर्ट' झाल्यामुळे राहुल द्रविड फलंदाजीला आला. त्यानंतर जाफरही पायात गोळे आल्याने मैदानात परतला. द्रविडने सचिन तेंडुलकरसह दुस-या दिवशी भारताला सव्वातीनशेपार पोहचवले. बिनबाद ३२६ धावा असताना द्रविडच्या रूपाने भारताची पहिली विकेट पडली. पहिल्या विकेटसाठीच्या विश्वविक्रमासाठी पाहुण्यांना त्यावेळी केवळ सहा धावांची आवश्यकता होती. भारताच्याच पंकज रॉय आणि विनू मांकड यांनी विक्रमी ४१३ धावांची सलामी दिली आहे.


परिवर्तन यात्रा : नंदकुमार पटेलांची हत्या

काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या हल्ल्यात माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश याची नक्षलवाद्यांनी हत्या केली आली आहे.
रायपूर – छत्तीसगडमध्ये शनिवारी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी हल्ल्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश याची हत्या करण्यात आली आहे. बास्तर भागात जिराम येथे या दोघांसह आठ जणांचे मृतदेह रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी शनिवारी या दोघांचे अपहरण केले होते.
नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्यामध्ये आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी अधिकृतरित्या सांगितले आहे. तर ३२ जणं गंभीर जखमी झाल्याचे पोलिस अधिक्षक राम निवास यांनी सांगितले.



बीसीसीआयने केले मय्यपनला निलंबित

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने चेन्नई सुपर किंग्सचा संघमालक गुरुनाथ मय्यपनला बीसीसीआयने निलंबित केले आहे.
मुंबई – स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने चेन्नई सुपर किंग्सचा संघमालक गुरुनाथ मय्यपनला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निलंबित केले आहे.
गुरुनाथ मय्यपन हा बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा जावई असून स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली आहे.
आयपीएलमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली बीसीसीआयने मय्यपनला क्रिकेटमधील सहभागाबाबत, विशेषत: चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सहभागाबाबत निलंबित केले आहे. अशी माहिती बीसीसआयचे सचिव संजय जगदाळे यांनी दिली. यासंदर्भात बीसीसीआयची मुंबई पोलिसांसोबत बैठकही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेल्या मय्यपनला न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेता विंदू दारा सिंग याच्या साथीने मय्यपन आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा खेळत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.


फिक्सिंग रोखण्यासाठी नवा कायदा


क्रिडा क्षेत्रातील सामने निश्चितीच्या घटना रोखण्यासाठी सरकार लवकरच नवा कायदा करणार आहे असे केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी शनिवारी दिली.

लाहोरिया हत्याकांडातील आरोपीवर गोळीबार

वाशी येथील बांधकाम व्यावसायिक सुनीलकुमार लाहोरिया यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या बांधकाम व्यावसायिक सुरेश बिजलानी यांच्यावर गोळीबार झाला.
नवी मुंबई – वाशी येथील बांधकाम व्यावसायिक सुनीलकुमार लाहोरिया यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या बांधकाम व्यावसायिक सुरेश बिजलानी यांच्यावर गोळीबार झाला. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास खारघर येथे हा प्रकार घडला.
नवी मुंबईत १६ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता बांधकाम व्यावसायिक लाहोरिया यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बिजलानी यांचा हात असल्याचा आरोप लाहोरिया यांचा मुलगा संदीप कुमार ऊर्फ सनी याने केला होता. बिजलानी यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बिजलानी गेले काही दिवस बेपत्ता होते. पाच दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन दिला होता. आठ दिवसापूर्वीच जामीन मिळवला होता.
शुक्रवारी दुपारी बिजलानी हे त्यांचा मित्र मनीष भतिजा याला भेटण्यास जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बिजलानी यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांच्यावर दोन राउंड फायर केले. मात्र बिजलानी व त्यांचा मित्र या हल्ल्यात बचावले. त्यानंतर हल्लेखोर पनवेलच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिस उपायुक्त संजयसिंग एनपुरे यांनी दिली. दरम्यान, हा हल्ला लाहोरिया यांचा मुलगा सनी याच्या इशारावर झाल्याचा आरोप बिजलानी यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे.

कर्जतमधील सात गावे,२० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, १२ गावे आणि ३२ आदिवासीवाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
नेरळ – कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, १२ गावे आणि ३२ आदिवासीवाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. पैकी ७ गावे आणि २० आदिवासीवाड्यांपर्यंत टँकर पोहोचला असला तरी इतर पाणीटंचाईग्रस्त भागांत टँकरची प्रतीक्षा कायम आहे.
मार्चपासून पाणीटंचाईग्रस्त भागात पाण्याचे टँकर पोहोचतील, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन तसे नियोजनही करण्यात आले. कर्जतमधील टंचाईग्रस्त १२ गावे ३२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याकरता कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. परंतु या गावांत टँकर सुरू व्हायला २३ एप्रिलचा दिवस उजाडला. त्यानंतर आदिवासी दुर्गम भागासाठी पिकअप व्हॅन सुरू झाली. तर तिसरा टँकर सुरू व्हायला मे उजाडला आणि चौथा टँकर मेअखेरीस सुरू झाला आहे. मात्र या चारही टँकरचे पाणीटंचाईग्रस्त सर्वच भागांत पोहोचत नाही. त्यामुळे आज सात गावे आणि २० आदिवासीवाड्यांना टँकरचे पाणी पोहोचत असले तरी पाच गावे आणि १६ आदिवासीवाड्या अद्याप तहानलेल्याच आहेत.
दरम्यान, ओलमण, पेंढरी, पाथ्रज, मोगरज, स्वानंद, धामणी, पिंगळस या सात गावांना टँकरचे पाणी पोहोचत आहे. तर सागाची वाडी, भूतीवलीवाडी, बोरीचीवाडी, आषाणेवाडी, बांगरवाडी, ताडवाडी, मोरेवाडी, काठेवाडी, बेलाचीवाडी, नागेवाडी, अंभेरपाडा, चाहूचीवाडी, बोरीचीवाडी (कळंब), तेलंगवाडी, मिरचूलवाडी, बनाचीवाडी, सुतारपाडा, भक्ताचीवडी, अल्याचीवाडी आणि जांभूळवाडी या २७ आदिवासीवाडय़ांना टँकरने तसेच पिकअप गाडीने पाणी पुरवले जात आहे. तरीही भोपळेवाडी, चेवणे, चाफेवाडी, पादीरवाडी, टेपाचीवाडी, पेठारवाडी, पळसदरी, कातकरवाडी, डोणेवाडी, साळोखवाडी, वाघाचीवाडी, पोटलवाडी, आंबेवाडी, सावरगाववाडी, किरवलीवाडीत पाणीटंचाई कायम आहे.
पाणीटंचाई मे महिन्यातील अखेरचे काही दिवस आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत जाणवते. हे लक्षात घेऊन तहसील कार्यालय आणि पंचायत समितीने जिल्हा भूजल सर्वेक्षणाच्या अहवालाची प्रतीक्षा न करता पाण्याचे टँकर सुरू करून पाण्यासाठी वणवण थांबवावी, अशी मागणी आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेचे वामन ठोंबरा, चाहू सराई, जैतू पारधी यांनी केली आहे.
माथेरानमध्ये पाणीवाटपात गैरव्यवहार
माथेरान – माथेरान गिरीस्थान नगरपालिका हद्दीतील रहिवाशांसाठी माथेरान जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. नेरळहून दररोज आठ लाख लिटर पाणी उचलले जात असतानाही जीवन प्राधिकरण मात्र दिवसाआड पाणी पुरवत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य सचिवांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या कारभाराविरोधात महिलांनी दंड थोपटले असून, सोमवारी सर्वपक्षीय महिला तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार आहेत.
माथेरानची एकमेव पाणी योजना प्राधिकरण चालवत आहे. ही फायद्यात असलेली पाणी योजना आहे. किती पाणी उचलले जाते, ते किती वितरित होते, याची मोजदाद ठेवणारी जलमापके गेली अनेक वर्षे बंद आहेत. जलमापके बंद असल्याने पाणी किती उचलले गेले आणि वितरित केले, याची नोंद होत नाही. परिणामी पाणी उपलब्ध असूनही प्राधिकरणकडून कृत्रिम पाणीटंचाई दाखवण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.

ठाण्यातील व्यापा-यांचे 'एलबीटी'विरोधातील आंदोलन मागे

ऐन लग्नसराईच्या काळात 'एलबीटी'विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसणा-या ठाण्यातील व्यापा-यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
ठाणे – ऐन लग्नसराईच्या काळात 'एलबीटी'विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसणा-या ठाण्यातील व्यापा-यांनी आंदोलन मागे घेतले आहे. एलबीटीची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर आणणे, तसेच एलबीटीबाबत व्यापारी आणि अधिका-यांची समिती तयार करून जाचक अटींबाबत तोडगा काढण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयांनतर शनिवारी व्यापा-यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
१५ मेपासून ठाण्यातील व्यापा-यांनी बेमुदत बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर १९ मे ला ठाण्यातील व्यापा-यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार ठाणे व्यापारी उद्योग महासंघाचे मुकेश सावला यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील व्यापा-यांनी शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या चर्चेत व्यापा-यांना भेडसावणा-या जाचक अटींची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. एलबीटी कायद्यात काही विसंगती आहेत, त्या दूर करण्याची मागणी व्यापा-यांनी केली. एलबीटीची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख रुपये करण्याची व्यापा-यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्य केली आहे.
एलबीटी भरण्याची या महिन्यातील मुदत संपलेली आहे. ती २० जूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिली. त्यामुळे या महिन्यात एलबीटीवर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. जीवनावश्यक वास्तू आणि औषधांना राज्यात समान दर ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. व्यापा-यांची छळवणूक होणार नाही. महापालिकेमार्फत अ‍ॅसेसमेंट केले जाणार नाही. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीत व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करून एक महिन्यात अहवाल तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. एलबीटीचा दर कमी ठेवावा, अशी व्यापा-यांची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.


डोंबिवलीत एमआयडीसीची जलवाहिनी फुटली

कोळेगाव येथील एमआयडीसीची जलवाहिनी शनिवारी पहाटे अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.


संग्रहित दृश्य डोंबिवली – कोळेगाव येथील एमआयडीसीची जलवाहिनी शनिवारी पहाटे अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा दाब अधिक असल्याने कोळेगाव परिसरातील नागरिकांच्या घरांत व दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी जांभूळ येथील पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने कल्याण-डोंबिवली, औद्योगिक परिसर, नवी मुंबई, ठाणे व मिरा-भाईंदरकडे जाणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.
कोळेगाव येथील एमआयडीसीची १७७२ मीमी व्यासाची जलवाहिनी शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक फुटल्याने कोळेगावातील रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. एमआयडीसीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन कामास सुरुवात केली. सकाळपासून दोन पंप लावून पाणी उपसण्याचे काम सुरू होते. जलवाहिनीही जमिनीच्या भागाकडे फुटल्याने जेसीबीच्या साहाय्याने माती काढून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, गावात कमरेएवढे पाणी साचले होते. पाण्याला अधिक दाब असल्याने गावातील रहिवासी अशोक पाटील, मनोज पाटील, नामदेव भोईर, गुरुनाथ भोईर, कि शोर पाटील यांच्या घरांत पाणी शिरले. तसेच खंडेलाल कंपाऊंडमधील प्लायऊडच्या गोडाऊनमध्येही पाणी शिरले. या पाण्यामुळे गोडाऊनमधील अनेक प्लायवूड वाहून गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी माजी सरपंच लालचंद भोईर यांनी दिली. या परिसरातील मासळी व चिकन विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. ही जलवाहिनी गंजलेली असल्याने एमआयडीसीकडे अनेक वेळा पाठपुरावा क रण्यात आला आहे. जलवाहिनी फुटल्याने अनेक गावांत पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे गावक-यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.
जलवाहिनी फुटल्याने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या जलवाहिनीतून कल्याण, डोंबिवली, औद्योगिक परिसर, नवी मुंबई, ठाणे व मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा केला जातो. मुख्य जलवाहिनी फुटल्याने अंबरनाथ-जांभूळ येथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याच्या दाबामुळे जलवाहिनी फुटली असावी, असा अंदाज आहे. - नितीन वानखेडे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

कमल-करांचा अक्षरयज्ञ

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव आज सगळ्याच क्षेत्रावर पडलेला दिसतो, त्याला कला क्षेत्रही अपवाद नाही. पूर्वी हाताने लिहून तयार केला जाणारा जाहिरातीचा मजकूर आज कम्प्युटरच्या सहाय्याने काही तासांत तयार करणं सहज शक्य झालं आहे. या स्थित्यंतराविषयी गेली कित्येक वर्ष आपल्या अक्षरलेखनाने मराठी नाटक आणि सिनेमांच्या जाहिरातींत स्वत:चा ठसा उमटवणा-या कमल शेडगे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा २१व्या शतकातल्या बदलांचा एका कलाकाराच्या कलेवर झालेल्या ब-या-वाईट परिणामांची मनाला सतत जाणीव होत राहते. वयाची ७८ वर्ष पूर्ण करणारे शेडगे अक्षरलेखनविषयी खोलवर जाऊन बोलतानाच, आज या क्षेत्रात आलेल्या उथळ आणि दिखाऊपणावरही टीका करतात.
दैनिकाच्या कलाविभागात काम करताना तुम्ही चित्रकलेऐवजी अक्षरलेखनाकडे कसे वळलात?
माझा कल अक्षरलेखनापेक्षा चित्रं काढण्याकडे जास्त होता. 'स्क्रीन' या सिनेसाप्ताहिकातून प्रसिद्ध होणा-या सिनेमांच्या जाहिरातीतील नटनट्यांची रेखाचित्रं मी माझ्या परीनं कॉपी करीत असे. तेव्हा माझे वडील 'टाइम्स'च्या कलाविभागात वरिष्ठ अक्षर लेखनकार म्हणून कार्यरत होते. घरीही जाहिरातीचं कामं ते करत. ते करत असलेलं मराठी अक्षरलेखन मी नेहमी पाहत असे. ती कला पाहतच मी लहानाचा मोठा झालो. वयाच्या विशीत पोहोचतच होतो. त्यावेळी टाइम्सच्या कलाविभागाचं काम आर्ट डायरेक्टर वॉल्टर लँगहॅमर नावाचे ऑस्ट्रियन गृहस्थ पाहत होते. त्याच सुमारास कलाविभागतील एक आर्टिस्ट निवृत्त झाले. 'माझा मुलगा होतकरू आर्टिस्ट आहे. त्याला इथं ज्युनीअर आर्टिस्ट म्हणून ठेवता येईल का?' असं माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं. 'तुझा मुलगा माझ्या परीक्षेत पास झाला पाहिजे, तरच हे शक्य आहे. कारण या जागेसाठी जी.डी.आर्टचा डिप्लोमा घेतलेला उमेदवार तयार आहे. दोघांपैकी जो अधिक चांगलं काम करेल तोच इथं राहील,' असं त्यांनी सांगितलं.
माझं काम सुरू झालं. माझ्याकडे आलेलं पहिलं शीर्षक होतं, 'नये बरस का पहला दिन'. शीर्षक कसं झालं होतं माहीत नव्हतं. पण 'धर्मयुग' या हिंदी साप्ताहिकात ते प्रसिद्ध झालं, यावर माझाच विश्वास बसेना. माझ्या हाती फक्त सहा महिने होते. माझ्या वडिलांनी 'धर्मयुग'मधील त्यांनीच आधी केलेल्या शीर्षकांची कात्रणं कापून त्यांची एक चिकटवही मला दिली. हळूहळू त्यावरून मी शिकत गेलो. अक्षरांशी माझं असलेलं नातं अपोआप जुळत गेलं. अशा रीतीने सहा महिने निघून गेले आणि चमत्कार झाला. मीच तिथे कायम झालो. आता इतक्या वर्षानंतरही मला राहून राहून याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, लँगहॅमरला माझ्यात काय गुण दिसले की कलाविषयाचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसतानाही त्यांनी माझी निवड केली!
नाटकांच्या जाहिरातीचा अक्षरलेखन प्रवास कसा सुरू झाला?
१९६२ मध्ये 'दि गोवा हिंदू असोसिएशन'च्या 'रायगडाला जेव्हा जाग येते' नाटकासाठी पहिलं जाहिरात डिझाइन केलं. संस्थेचं पुढचं नाटक होतं 'मत्स्यगंधा.' त्यात 'ग'वरील टिंबाच्या जागी मी लहानशी मासोळीच ठेवली. दोन्ही नाटकं एकदम हिट झाली. त्यामुळं माझ्या नावाची चर्चा नाट्यसृष्टीत होऊ लागली. त्याच वेळी योगायोगानं मोहन वाघशी माझी ओळख झाली. तेव्हा तो छायाचित्रकार म्हणून सिनेक्षेत्रात वावरत होता.
त्याच्यासाठी मी तेव्हा 'ललना', 'अनुराधा', 'शाम सुंदर,' 'रसरंग'साठी मुखपृष्ठ सजावट केली. अशा रीतीनं मुखपृष्ठांवर त्याची नट्यांची छायाचित्रं आणि माझी शीर्षकांची सजावट असा सिलसिला सुरू झाला. एवढंच नव्हे तर एचएमव्हीसाठी इपी, एलपी ध्वनिमुद्रिकांची अनेक कामं आम्ही केली. १९६४ साली त्यानं प्रभाकर पणशीकर यांच्या भागिदारीत 'नाट्यसंपदा' ही नाटसंस्था सुरू केली. संस्थेचं 'अश्रूंची झाली फुले' हे वसंत कानेटकर यांचं नाटक तुफान लोकप्रिय झालं. मीही वेगवेगळ्या पद्धतीनं ती डिझाइन्स केली. प्राजक्ताची फुलं, विमानतळ, अश्वमेधाचा डौलदार घोडा, बेड्या यांचा चपखल वापर डिझाइन्समध्ये केला. नाटकाचं शीर्षकही वेगवेगळ्या शैलीत केलं. तेव्हा लोगोची पद्धत रूढ झाली नव्हती. कालांतरानं नेहमीप्रमाणे संस्था फुटली. मोहनननं आपली नवी संस्था स्थापन केली.
मोहन वाघ यांच्यासाठी तुम्ही एकूण किती नाटकांची डिझाइन्स केलीत?
त्याच्या नवीन नाट्यसंस्थेचं नाव 'चंद्रलेखा' नाटककार वसंत कानेटकरांनी सुचवलं होतं. संस्था स्थिरस्थावर होईपर्यंत त्यानं काही जुनी नाटकं नव्या थाटात रंगभूमीवर आणली. मधुकर तोरडमलांच्या 'आश्चर्य नं १०'पासून त्यानं नवीन नाटकांच्या निर्मितीला सुरुवात केली. अखेपर्यंत त्यानं ८८ नाटकांची निर्मिती केली असली तरी प्रत्यक्षात ८२ नाटकं रंगभूमीवर आली. १९६७ ते २००९पर्यंतच्या ४२ वर्षाच्या कारकीर्दीचा मी साक्षीदार आहे. ४२ वर्ष, ८२ नाटकं, त्यांचा एकच निर्माता, या सर्व नाटकांच्या जाहिरात डिझाइन्ससाठी एकच आर्टिस्ट हासुद्धा एक जगावेगळा विक्रम आहे.
वृत्तपत्रसृष्टीला खरोखरच मानलं पाहिजे. पावसाळ्यात मुसळधार पावसानं आगगाड्या बंद पडू देत, रस्त्यावर पूरस्थितीनं वाहतूक, उद्योगधंदे बंद पडू दे, लोकांना नाइलाजानं घरात बसायला लागू दे, दुस-या दिवसाचा पेपर आपल्या घरात आलेला असतो. अर्थात मी त्यावेळची गोष्ट सांगतोय!


आपण बनवलेले, नियककालिकांचे लोगो (मास्ट हेड) यांच्या काही आठवणी असतीलच!
ध्यानीमनी नसताना १९६२ मध्ये 'महाराष्ट्र टाइम्स'चं मास्ट हेड बनवण्याचं काम आर्ट डायरेक्टर रमेश संझगिरी यांनी माझ्यावर सोपवलं. हा तर मला अगदी, जोर का झटका होता. तेव्हा तिथंही शीर्षकं बनवणारे होतेच की! इतकी वर्ष शीर्षकांची सजावट, म्हणजे १९५९ पर्यंत, निवृत्तीपर्यंत माझे वडील जयंत शेडगे करीत होते. त्यांनी तर अनेक मानपत्रं इंग्रजी 'पॅलेस स्क्रिप्ट' शैलीत एकही चूक न करता बनवून दिली होती, पण त्यावेळी टाइम्सची 'नवभारत टाइम्स' आणि 'धर्मयुग' ही दोनच हिंदी प्रकाशनं होती. शिवाय तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाही नव्हता. त्यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात ते कायमचे बिनओळखीचे राहिले. हे थोडं विषयांतर झालं. सांगायचं काय तर मी बनवलेलं 'महाराष्ट्र टाइम्स' मास्ट हेड म्हणजे मला मिळालेला दणकेबाज ब्रेक होता. विशेष म्हणजे माझ्याएवढे नियतकालिकांचे लोगो कोणी केले नसतील. अक्षर, श्रीदीपलक्ष्मी, कथाश्री, मुक्त शब्द, चारचौघी, चंद्रकांत, चंदेरी या नियतकालिकांबरोबरच कालनिर्णय, साईनिर्णय या दिनदर्शिकेची संपूर्ण सजावट माझी आहे.
मास्ट हेड बनवताना आलेल्या काही उल्लेखनीय आठवणी सांगा?
१९७२ साली एके दिवशी जयंत साळगावकर लालबागला आमच्या घरी आले. त्यांच्या नवीन 'कालनिर्णय' दिनदर्शिकेचा लोगो माझ्याकडून तयार करून हवा होता. तो मी करून दिला, पण आपण जो 'कालनिर्णय' लोगो पाहत आहोत, तो १९७४ साली केला आहे. दिनदर्शिकेतील आकडे, स्वस्तिक आणि सूर्य यांचा मिलाफ असलेला संस्थेचा ट्रेडमार्क आदी सर्व माझं आहे. इतकंच नव्हे, तर दिनदर्शिकेच्या वरच्या आणि खालच्या पट्ट्यावरील जाहिरातींही कमल-करांनी केलेल्या आहेत. कालनिर्णय लोगोतील की चुका मला दिसतात, पण 'कालनिर्णय' लोगो गेली ४० वर्ष लोकांशी इतका एकरूप झाला आहे की, तो सुधारण्याचा विचारसुद्धा करू नये. 'अक्षर'चं काम निखिल वागळे यांनी दिलं. ते १९८२ साल असावं. त्याच अंकात 'बोलकी अक्षरं' हा माझा लेखही होता. 'किर्लोस्कर'चं काम ह. मो. मराठे यांनी दिलं. सुनील कर्णिकसाठी 'रविवार दिनांक' केला. आणखी सांगायचं राहिलंच. ठाण्याची 'गडकरी रंगायतन' ही अक्षरं माझी आहेत. माटुंग्याच्या यशवंत नाटय़संकुलातील नाट्यगृहावरील 'यशवंत नाट्यमंदिर' ही अक्षरं तसंच रवींद्र नाटय़मंदिराच्या प्रवेशद्वारावरील पुलंच्या चौथ-यावरील 'पुल देशपांडे – महाराष्ट्र राज्य कला अकादमी' ही अक्षरंही माझीच आहेत. पण हे माझ्याशिवाय कोणलाच कसं ठाऊक नाही, हेच मला ठाऊक नाही.
नाटकाविषयी जाणून घेतल्याशिवाय तुम्ही जाहिरात बनवण्यास तयार होत नाही, असं माझ्या वाचनात आलंय.
आता जर माझ्याकडे एखादं नाटक आलं तर त्याचा विषय काय आहे, हे तर समजायला हवं. त्यासाठी नाटकाची संहिता मला वाचायला हवी. म्हणजे जाहिरातीचं डिझाइन बनवताना ती कशा प्रकारे करता येईल, शीर्षकासाठी कोणता प्रकार वापरात येईल याचा विचार करता येतो. छायाचित्रांचं प्रस्थ आता वाढलं आहे. पूर्वी असं नव्हतं. तिथं नाटकाचा विषय चित्रातूनच व्यक्त करता येत असे. 'बेईमान'साठी दोन मित्र नंतर एकमेकांचे शत्रू बनतात. त्यात शेवटी एकाचा बळी जातो, हे दाखवण्यासाठी बुद्धिबळातील राजा व वजीर या सोंगट्यांचा वापर केला. अर्थात संहिता वाचल्यानंच हे शक्य झालं होतं. 'बॅरिस्टर'साठी दाखवलेली भिंतीत शिरलेली वृक्षाची मुळं, स्त्रीच्या केशसंभारातून उसळलेल्या लाटा हे 'महासागर'साठी केलेलं चित्र हे संहिता वाचल्यामुळंच शक्य झालं आणि त्या-त्या विषयानुरूप नाटकाचं शीर्षक बनवणं शक्य झालं. पूर्वीची वृत्तपत्रं आकारानं मोठी होती, त्यामुळे प्रत्येकी साडेचार सेंटिमीटर रुंदीचे आठ कॉलम्स असत. त्यामुळे नाटकांच्या जाहिराती बनवायला मोठी जागा मिळायची. आता वृत्तपत्रं लहान झाली तर आहेत, पण कॉलम्सही आठऐवजी दहा झाले आहेत. त्या डिझाइन्स बनवताना तशा मर्यादाच पडल्या आहेत. आर्टिस्ट मंडळींना या नाटकातील आशय व्यक्त करताना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय सबंध नाटकांच्या जाहिरातीच्या भाऊगर्दीत आपल्या नाटकाची जाहिरात उठून दिसावी, असं वाटणं साहजिकच आहे.
त्यामुळे नाटकांचं नाव बोल्ड व डोळ्यांत भरेल असं करावं लागतं. संगणकीय तंत्रज्ञानामुळे डिझाइन्स आता सोपी झाली आहेत. शीर्षक, छायाचित्रं, मजकूर क्षणांत सरकवून त्यात वेगळेपणा आणला जातो. आमच्या वेळी सर्व मामला कापाकापीचा होता. आधी शीर्षक बनवून, त्याचे ब्रोमाइड्स बनवायचे. नटनटय़ांची छायाचित्रं कात्रीनं कापून मिळालेल्या जाहिरात आकाराच्या चौकटीत लावायची. शीर्षकाचा ब्रोमाइड कापून तो चिकटवायचा. लेखक-दिग्दर्शक आदींची नावं शेवटी चिकटवली आणि झालं डिझाइन तयार! अशी सहा डिझाइन्स असतील तर सहा वेळा कापा, चिकटवा, असं करावं लागायचं.
काही इंग्रजी टाइप्सचं तुम्ही मराठीत रूपांतर केलं आहे, त्याविषयी..
फक्त इंग्रजीवरून मराठीत असं दोनच टाइप्सचं रूपांतर केलं आहे. फारच कठीण आहे ते काम. मुळात ससकट कुठल्याही इंग्रजी टाइपवरून ते मराठीत आणता येत नाहीत. शिवाय इकार, उकार, वेलांटया, जोडाक्षरं आदी भानगडी मराठीत असतात. अर्थात एखादा इंग्रजी टाइप नाटकाच्या नावासाठी वापरता येऊ शकतो. इंग्रजीचं मराठीकरण करताना त्यातील आधी त्यातील आधी, उफर व तीन हा आकडा पाहतो. कारण उ वरून व क च, फ वरून र, र वरून ई ड ह व ह व तीन वरून अक्षर बनवता येऊ शकतं.
शीर्षक कलेव्यतिरिक्तइतर कुठल्या कलेत आपण काम केलंत?
मला लहानपणी नटनट्यांच्या छायाचित्रावरून रेखाचित्र काढायचा छंद होता. त्यावेळी 'स्क्रीन' या सिनेमासाप्ताहिकातील जाहिरातीत प्रसिद्ध झालेली नटनट्यांची रेखाचित्रं मी वेगळी कापून त्यांचा संग्रह केला होता. पण याबाबतीत माझ्यावर संस्कार झालेत ते टाइम्सच्या कलाविभागात. मारिओ मिरांडा, रवि परांजपे, प्रभाशंकर कवडी, वसंत साई, दत्ता पाडेकर यांना प्रत्यक्ष काम करताना पाहायला मिळालं. रेखाटन करायची प्रत्येकाची आपापली स्टाइल होती. कोणत्या कागदासाठी कोणतं टेक्निक-माध्यम वापरायचं हे त्यांच्याकडून शिकता आलं. त्याचीच फलश्रुती म्हणजे मी काढलेली, कलाकारांचं व्यक्तिमत्त्व उभी करणारी अमिताभ बच्चन, श्रीराम लागू, नाना पाटेकर, मा. दीनानाथ, लता मंगेशकर, आशा भोसले, हॉलिवुडचे रिचर्ड बर्टन व जेम्स डीन यांची वेगवेगळय़ा ढंगातील रेखाचित्रं. मी केलेलं लतांचं रेखाचित्र तर त्यांचा ट्रेडमार्क झाला आहे, असं मत राज ठाकरे यांनी माझ्या एका प्रदर्शनाच्या वेळी व्यक्त केलं होतं. अर्थातच ही सर्व रेखाचित्रं तीस वर्षाहून ही अधिक मागच्या काळाची असल्यानं आजच्या पिढीतील लोकांना कशी माहीत असणार!
कॅलिग्राफी अर्थात सुलेखन या विषयात तुम्ही काही प्रयोग केलेत का?
सध्या मराठीत तरी 'सुलेखन' हा प्रकार जास्तच लोकप्रिय आहे. मुळात सुलेखन म्हणजे सुरेख, सुंदर, सुवाच्च लेखन. रामदासांनीच वर्णिल्याप्रमाणं
अक्षर मात्र तितुके नीट। नेमस्त पैसे काने नीट आडव्या मात्रा त्याही नीट। आर्कुलीं वेलांट्या॥ पहिले अक्षर जे काढिलें। ग्रंथ संपेतों पाहाता गेले। येका टांकेचि लिहिले। ऐसे वाटे॥ असं हवं. पण मराठीत असं दिसतं का? सध्याचं कोणतंही वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक पाहा, सगळीकडे सुलेखन एके सुलेखन. दुसरी बात नाही. बरं, सर्वाची अक्षरं इतकी सारखी झाली आहेत की, ती कोणी केलीत त्याचा पत्ताच लागत नाही.
मागील पिढीतील दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, दत्तात्रय ग. गोडसे यांचीही अक्षर रचनेची स्वतंत्र ओळख होती. अर्थात आजच्या पिढीतील पत्रकार- चित्रकारांना याची माहितीच नसणार! एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान लागतंच असं काही नाही. मराठीतही सुलेखनासाठी अक्षरांचा अभ्यास वगैरे असावा, त्यातील वाक्वळणं जाणू घ्यावी, यासाठी आर्ट स्कूलमध्ये जावं यावर आजच्या सुलेखनकारांना जरूरी वाटत नसावी. जाऊ दे. पण यामुळं झालं काय, तर अक्षराचा फटकारा किती लांबवावा किवा कुठं थांबवावा याचं भान सुलेखनकारांना राहत नाही. एखादा शीर्षकात तर अक्षरांचे लटके-झटके काना, मात्रा, इकार-उकार-वेलांटय़ा यांचे आळोखे-पिळोखे असतात की जणू अक्षरांची सर्कस चालली आहे, असं वाटतं. बरं हे सर्व अगदी झटपट काम! मग शिस्तशीर, बेतशीर, आखीव-रेखीव काढण्यात वेळ कशाला घालवायचा! अशी अक्षरं काढायची म्हणजे आधी त्या अक्षरांवर प्रेम हवं, जिव्हाळा हवा आणि मुख्य म्हणजे त्या अक्षरांना, ती मागतील तेवढा वेळ द्यायला हवा. अशी अक्षररचना शेवटपर्यंत तडीस नेण्यासाठी आर्टिस्टकडे तेवढी जेवढी जिद्दही असावी लागते. ती आजच्या आर्टिस्टकडे आहे? असली तरी प्रसिद्धीचा मार्ग सुलेखनानं साध्य होत असेल तर त्यासाठी आखीव-रेखीव अक्षरं गिरवण्यात, वेळ वाया घालवायचा कशाला? माझा आणखी एक भोळा-भाबडा प्रश्न आहे. या सुलेखन कलेचं मराठीतच एवढं का कोडकौतुक चाललं आहे? इंग्रजीत का नाही? इंग्रजी भाषेतील कोणत्याही वृत्तपत्र- पुरवणीत, सिनेमांच्या, स्त्रियांच्या, तसंच अन्य नियतकालिकांतसुलेखन कुठंही दिसत नाही. तिथं तर सर्व सजावट फॉण्टसच्याच साहाय्यानं होत असते, तरीही मजकुराच्या, इंट्रोच्या मांडणीमुळं ती पानंही आकर्षक वाटतात ना! अजून तरी तिथं सुलेखन जाहिरातीतील मजकुरापुरतं राहिलं आहे.
अक्षरलेखनात आपल्यासारखे काटेकोर, सौंदर्यवादी अक्षररचनाकार हल्ली फारसे का दिसत नाहीत?
याचं कारण म्हणजे आजचं जीवन इतकं गतिमान झालं आहे की, स्फूर्ती येईपर्यंत थांबणा-या कलाकारांना इथं स्थान उरलेलं नाही. लोकांनाही मनोरंजन म्हणून काहीतरी हलकफुलकं गतिमान हवं असतं. म्हणून तर 'डिंकाचिका' 'चिकनी चमेली' 'चिंता ता चिता चिता' यासारख्या गाण्यांची चलती आहे. यामुळे उत्तम, भावमधुर संगीताला इथं टिकून राहणं कठीण होणार आहे. अक्षररचनेच्या बाबतीत मराठीत हीच स्थिती होत आहे. तरी एक आशा आहे. मराठी नाटकांच्या जाहिरातीत मात्र अजून देखण्या, विषयानुरूप अक्षररचनांना स्थान आहे. कारण दिलेल्या नेमक्या जागेत छायाचित्रं, मजकूर भरल्यावर उरलेल्या जागेतच शीर्षक बसवावं लागतं. शिवाय निर्मात्याची विनंती असते, अक्षरं बोल्ड व स्पष्ट हवीत. संपूर्ण पानावरील नाटकांच्या जाहिरातींत माझी जाहिरात मरता कामा नये. अशाही स्थितीत अनेक उत्तम अक्षररचना मी घडवल्या आहेत. 'वस्त्रहरण', 'ऑल दि बेस्ट', 'ती फुलराणी', 'पुरुष', 'वा-यावरची वरात', 'चारचौघी', 'सही रे सही', 'एका क्षणात' 'ठष्ट' ही यातील काही उदाहरणं. याशिवाय 'सखी', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'काकस्पर्श', 'मोरया', 'तुकाराम', 'फक्त लढ म्हणा', 'कुटुंब' या सिनेमांचे लोगो माझेच आहेत.
काही कॅलिग्राफर आपल्या कलेचा टी-शर्टसाठी मुक्तपणं वावर करतात. तुम्हाला तसं करावंसं वाटलं नाही?
आजकाल टी-शर्टवर कवितांच्या ओळी छापण्याची फॅशन आली आहे. हेतू चांगलाच आहे, पण त्यांचं सुलेखन अगदी बारीक असल्यानं ती वाचली जाण्यापूर्वीच समोरचा टी-शर्टधारी निघून गेलेला असतो. या उलट इंग्रजी टी-शर्ट्स नेमक्या शब्दांत आणि एकदम बोल्ड अक्षरांचे असतात. हाच प्रयोग मी टी-शर्ट्स डिझाइन बनवताना केला. लांबूनही दिसतील व स्पष्टपणे वाचता येतील अशी कमीत कमी शब्दांत बसतील व आजच्या पिढीला डोळ्यांसमोर ठेवून, त्यांना आवडतील अशी 'असेल हिंमत तर अडवा', 'ओम शांती ओम', आणि 'हम यंगिस्तानी' अशी निरनिराळय़ा शैलीतील बोल्ड अक्षरं डिझाइन केली आहेत. तरुण मंडळी याला कसा काय प्रसाद देतात ते पाहू.
लिपीच्या गोडव्यामुळे तुम्ही बंगाली भाषा शिकलात, असं माझ्या वाचनात आलंय, त्यासंबंधी थोडं सांगा?
या गोष्टीला आता ४५ वर्ष झाली, त्यावेळी पृथ्वीश गांगुली याच्याशी माझी नवीनच ओळख झाली होती. एकदा तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. तो मूळचा कोलकात्याचा! तेव्हा त्याच्याकडचा एक जाडजूड अंक मला दिसला आणि त्यातल्या सिनेमांच्या जाहिरातीतील शीर्षकाचे अनेकविध आविष्कार पाहून मी चाटच पडलो. मग हे मराठीत यायलाच पाहिजे असं मी ठरवलं. पण यात भाषा न येणं हा फार मोठा अडसर होता. यावर उपाय म्हणून त्याने मला बंगालीचे धडे द्यायला सुरुवात केली. त्यानेच मला बंगाली अंकलिपी आणि डिक्शनरी आणून दिली. त्यामुळे मी उत्तम नाही तरी ब-यापैकी बंगाली वाचायला लागलो. दर शुक्रवारी 'जुगांतर' वृत्तपत्र सिनेमांच्या जाहिरातींसाठी घेऊन त्यांचीही एक चिकट वही केली. 'औषध न लगे मजला', कोंडी या नाटकाची शीर्षकं बंगालीवरून बेतलेली आहेत.
आपण भरवलेल्या आजवरच्या प्रदर्शनाविषयी सांगा.
आजवर माझ्या शीर्षकांची व इतर कामांची अशी नऊ प्रदर्शनं भरवली आहेत. अगदी पहिलं झालं १९७९ डिसेंबरमध्ये, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या हॉलमध्ये. त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अमोल पालेकर यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. केवळ अक्षरं बघायला येणार कोण, याविषयी साशंकता होती, परंतु याला प्रेक्षकांनी अनपेक्षित असा प्रतिसाद दिला. त्यामुळं लगेच पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुण्याच्या बालगंधर्वमध्ये हेच प्रदर्शन भरवलं. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
उद्घाटकाच्या बाबतीतही माझा आग्रह होता. उद्घाटक मराठी भाषिक हवा आणि तो या कलाक्षेत्राचा जाणकार हवा. आजवरच्या माझ्या प्रदर्शनाचे उद्घाटक आहेत – अमोल पालेकर, ज्येष्ठ संपादक श्री. ग. मुणगेकर, व्यंकटेश माडगूळकर, रत्नाकर मतकरी, मोहन वाघ, बाळासाहेब ठाकरे, अनिल अवचट, रचना संसदचे एच. एस. वान्द्रेकर आणि राज ठाकरे.
आज इतकं वय झाल्यावरही काम करावंसं वाटतं का?
या वयात म्हणजे? आता कुठं मी अठ्ठावीस वर्षाचा झालो आहे. अर्थात अठ्ठाविसाव्या वर्षी स्वत:ला अठ्ठय़ाहत्तर वर्षाचं समजायचं की, अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी स्वत:ला अठ्ठावीस वर्षाचा समजायचं हे ज्याच्या-त्याच्या स्वाभाव आणि मनोवृत्तीवर अवलंबून असतं. अगदी विसाव्या वर्षापासून ते आजपर्यंत मी न थकता अविरतपणे या क्षेत्रात वावरण्याचा आनंद घेत आहे. आता दृष्टीही कमजोर होत चालली असली, तरी या वयातही हात स्थिर व पुढंही तसाच राहो. मालवणी भाषेत सांगायचं तर यापुढे 'माझी देवाक काळजी'!

भ्रष्टाचार रोखण्यासाठी पुढाकार घ्या!

'आयपीएल' सामन्यांमधील 'स्पॉटफिक्सिंग'चे प्रकरण उजेडात येताच क्रिकेटविश्वात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 'स्पॉटफिक्सिंग' प्रकरणी अटक झालेले खेळाडू आणि बुकींच्या चौकशीतून समोर येत असलेली नावे धक्कादायक असली तरी हे छोटे मासे आहेत. मोठ्या माशांची नावे गुलदस्त्यातच आहेत. क्रिकेटमध्ये 'मॅचफिक्सिंग' हा प्रकार काही नवा नाही. याबाबत माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांच्याशी केलेली बातचीत…
मॅचफिक्सिंगची सुरुवात कधी झाली?
जागतिकीकरणाची संकल्पना भारतात रुजू लागल्यानंतर, 'मॅचफिक्सिंग' या खेळातील भ्रष्टाचाराने देशात पाळेमुळे रोवायला सुरुवात केली. त्यापूर्वी खेळाडू फक्त खेळाला प्राधान्य द्यायचे, मात्र खेळात जसजसे अर्थकारण, राजकारण डोकावू लागले, तसा येथे भ्रष्टाचार वाढू लागला. खेळाडूची कामगिरी चांगली नसेल तरीही त्याच्याकडे मोठ्या कंपनीच्या जाहिराती असतात. पैशाची चटक लागल्याने झटपट पैसा मिळवण्याची ओढ सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येते. त्यामुळे 'मॅचफिक्सिंग'ची नेमकी सुरुवात कधी आणि कशी झाली, याचे उत्तर देणे जरा कठीणच आणि गुंतागुंतीचे ठरेल.
'मॅचफिक्सिंग', 'स्पॉटफिक्सिंग' आणि 'बेटिंग' असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून काय प्रयत्न होत आहेत?
समाजात काही आक्षेपार्ह घडलं की, जो-तो पोलिसांकडे धाव घेतो. मात्र, आपल्याकडून समाजातील नीतिमत्ता कशी ढासळत आहे, याकडे सर्वाचेच दुर्लक्ष असते. पोलिस यंत्रणेकडून सर्वच क्षेत्रांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, हे जाणून घेण्यापूर्वी आधी आपल्या मूळ व्यवस्थेतच भ्रष्टाचार आहे हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे. त्यामुळे प्रयत्न केवळ पोलिस यंत्रणेकडून नव्हे, तर सर्व स्तरावरून व्हायला हवेत. सर्वचा क्षेत्रांमध्ये चांगली आणि नीतिमत्तेला धरून चालणारी माणसे असतात. त्यांची संख्या मोजकी असली तरीही त्यांनी एकत्र येऊन समाजातील या घातक विकृतींना आळा घातला पाहिजे.
पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाही असे प्रकार घडतात, त्याची कारणे काय आहेत?
संस्कारांचा अभाव. लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार झाल्यास भविष्यात मुले वाईट मार्गाने जात नाही. पैसा मेहनतीनेच कमावला पाहिजे हे आपण मुलांना लहानपणीच शिकवले पाहिजे. झटपट पैसा कमावून आपण आपल्याच संस्कारांचा अपमान करतोय, याची जाणीव प्रत्येकाला नसल्याने हे प्रकार घडत आहेत.
मॅचफिक्सिंग, 'स्पॉटफिक्सिंग' रोखण्यास कायदा पुरेसा सक्षम आहे का?
भारतीय संविधानात कायद्यांची कमतरता नाही. मात्र, कायद्याची योग्यरीत्या अंमलबजावणी होत नसल्याने भ्रष्टाचार फोफावत आहे. कायद्याची योग्य व प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ब-याच अंशी अशा घातक प्रवृत्तींना आळा बसेल. 'टाडा' न्यायालयात आता भलत्याच केसेस चालल्या आहेत. कायदा निर्भीड असल्यास कितीतरी खटकणा-या गोष्टींवर आळा बसू शकेल.
या प्रकारांमधील 'अंडरवर्ल्ड कनेक्शन'बद्दल काय सांगाल?
'मॅचफिक्सिंगमधील' अंडरवर्ल्ड कनेक्शन हे कधीही न उलगडणारे मोठे कोडे आहे, नव्हे गुंतागुंतीचे जाळे आहे. अंडरवर्ल्डमध्ये साधा माहीतगार काही काळाने डॉन बनतो. जेथे काळा पैसा येतो, तेथे आपोआपच अंडरवर्ल्ड कनेक्शन येते, हे सर्वाना माहीत आहे. 'मॅचफिक्सिंगमध्ये' थोडय़ा अवधीतच कोटय़वधी रुपयांची कमाई होते. या सर्वाच्या मुळाशी जाणे पोलिसांच्या आवाक्याबाहेरचे आहे, हे जरी सत्य असले तरीही या सगळय़ा अपप्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे.
या अपप्रवृत्तींची पाळेमुळे कुठपर्यंत पसरलेली आहेत?
खरे तर केंद्रीय गुप्तचर संघटनेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 'मॅचफिक्सिंग' आणि 'अंडरवर्ल्ड' संबंधाची कल्पना येते. येथे अटक होणा-या व्यक्तींना राजकीय वरदहस्त असल्याने ते कित्येकदा सहज सुटतात. यावरून भ्रष्टाचार किती खोलवर रुजलाय, याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
आंतरराष्ट्रीय 'लॉबी'बाबत काय सांगता येईल?
'मॅचफिक्सिंग', किंवा 'बेटिंग' या प्रकारांमध्ये मोठी गुंतागुंत आहे. खेळाडू, बुकी, सट्टेबाज आणि पैसा पुरवणारे लोक अशी ही मोठी साखळी आहे. या साखळीतील प्रत्येकाला पुष्कळ पैसे मिळतात. त्यामुळे अशा परिस्थितीत 'लॉबी'चे चित्र रेखाटणे कठीणच आहे.
'मॅचफिक्सिंग'सारखे प्रकार रोखण्यासाठी काय उपाय सुचवाल?
शेवटी एकच सांगावंसं वाटतं की, आरोप-प्रत्यारोपांच्या या खेळात समाजाने नाक मुरडण्यापेक्षा या गोष्टींची कारणे शोधून त्यावर मार्ग शोधावा. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. जादूची कांडी फिरवून हे काम होणार नाही, सुसंस्कृतपणा आणि नैतिकता या दोन गोष्टींची सांगड घातल्यास मार्ग निघू शकेल.

सट्टे पे सट्टा!

आयपीएलमध्ये स्पॉटफिक्सिंग केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयलच्या श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या तीन क्रिकेटपटूंना ताब्यात घेतले. मात्र, क्रिकेटपटूंनंतर बॉलिवुड कलाकार, अंपायर तसेच आयपीएलच्या संघांमधील काही प्रमुख पदाधिकारीही गुंतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील 'अंडरवर्ल्ड कनेक्शन'ही उघड होत आहे. एकूणच स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. क्रिकेटमध्ये झालेले आजवरचे फिक्सिंग आणि सध्याच्या स्पॉटफिक्सिंग प्रकरणाचा घेतलेला हा मागोवा..
अंडरवर्ल्ड कनेक्शन
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या सट्टेबाजीने तिची पाळेमुळे अगदी खोलवर रुजली आहेत, हेच सिद्ध होते. सध्या प्रत्येक क्रिकेट सामन्यावर सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा सट्टा खेळला जातोय, यावरून हा काळा धंदा किती मोठा झालाय, याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंना 'फिक्स' करण्यासाठी सट्टेबाजांना लाखो रुपये खर्च करण्यात कोणतीही अडचण येत नाही. या काळ्या कमाईच्या जोरावर रस्त्यावरील सडकछाप सट्टेबाज आज गब्बर झाले आहेत.
हा काळा धंदा भारतातील क्रिकेटमध्ये फोफावतोय, याची चाहूल पोलिसांना १९९४ मध्ये प्रथम लागली. तत्कालीन मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त राकेश मारिया
अंडरवर्ल्डची पाळेमुळे खोदण्यात लागले असताना त्यांनी एका सट्टेबाजाचा दूरध्वनी इंटरसेप्ट केला होता. त्यावेळी भारतीय खेळाडूही सट्टेबाजीच्या दलदलीत रुतले असल्याचा धक्कादायक खुलासा झाला होता. पण या प्रकरणाच्या एक दशकाआधी म्हणजे १९८५ पासूनच सट्टेबाजी अंडरवर्ल्डच्या मिळकतीचा प्रमुख स्रेत बनली होती. याच वर्षी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारत सोडून दुबईत स्थायिक झाला आणि तेव्हापासून दुबई आंतरराष्ट्रीय सट्टेबाजीचा केंद्रिबदू बनले. २०१० मध्ये स्पॉटफिसिंग प्रकरण पुढे आले आणि याप्रकरणी तीन पाकिस्तानी खेळाडूंना शिक्षाही झाली होती, त्यावेळी आयसीसीने १९८५पासून खेळल्या गेलेल्या पाकिस्तानच्या सर्व कसोटी सामन्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यावरूनच आयसीसीला या प्रकारामागे 'डी' कंपनी असल्याची कुणकुण लागल्याचे स्पष्ट झाले होते. पण १९८५ मध्ये शारजामध्ये रंगणा-या सामन्यांदरम्यान दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनिस इब्राहिम, छोटा शकील आणि त्यांचे पंटर उपस्थित असायचे, त्यावेळी कुठेतरी काळबेरे आहे, याची जाण आयसीसीला व्हायला पाहिजे होती. पण क्रिकेट या जंटलमनच्या खेळात फिक्सिंगसारखेही प्रकार घडतात. ही बाब २०००मध्ये क्रिकेट नियामक मंडळाला मान्य करावी लागली. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी दक्षिण आफ्रिका संघाचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए व एका सट्टेबाजाचे संभाषण इंटरसेप्ट केले होते. त्यात क्रोनिए सामना फिक्स करण्यासाठी बोलत होता.
दाऊद व मियाँदाद यांची सोयरीक 'फिक्स'
दाऊदची मुलगी माहरुख हिचा २००५मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांचा मुलगा जुनदसोबत विवाह झाला. त्या विवाहाला अनेक बड्या सट्टेबाजांनी उपस्थिती दर्शवली होती. गुप्तचर यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून होत्या. पण ही सोयरीक जुळली त्याच वेळी 'आयसीसी'च्या डोक्यात प्रकाश पडायला पाहिजे होता. मियाँदादने त्यापूर्वीच क्रिकेट खेळण्यापासून संन्यास घेतला असला, तरी ही सोयरीक जुळली त्यावेळी तो पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद भूषवत होता. म्हणजे अगदी टॉसपासून टीमबाबतच्या महत्त्वाच्या निर्णयांची त्याला माहिती होती. त्यावेळी आयसीसी अप्रत्यक्षरीत्या बरेच काही करू शकली असती. पण आयसीसीचे डोळे उघडले ते २००७ मध्ये जेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन प्रशिक्षक बॉब वुल्मर यांचा संशायास्पद मृत्यू झाल्यानंतर विशेष म्हणजे त्यापूर्वीच विश्वचषक स्पध्रेत आर्यलडसारख्या लिंबूटिंबू संघाबरोबर पाकिस्तानचा पराभव झाला होता. चर्चा अशी आहे की, हा सामना सट्टेबाजांनी फिक्स केला होता. त्याचा संशय वुल्मर यांना लागला होता. त्यांच्या हाती काही पुरावेही लागले होते. त्यामुळे येणा-या दिवसांत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार होते. पण त्यापूर्वीच जमैकामधील हॉटेलमध्ये त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला.
कोट्यधीश बारबाला आणि बॉलिवुड कनेक्शन
कोट्यधीश बारबाला तरन्नूमची अटक आणि याप्रकरणात सट्टेबाजीबाबत झालेल्या खुलाशामागेही खुसखुशीत किस्सा आहे. तरन्नूमचे काही कारणामुळे तिच्या सीएसोबत वाजले आणि तिने नवा सीए ठेवला. या प्रकारामुळे संतापलेल्या तिच्या जुन्या सीएने तरन्नूमच्या बेनामी संपत्तीबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली. त्यावेळी प्राप्तिकर विभागाने तरन्नूमच्या नव्या सीएची चौकशी केली, त्यावेळी त्याने तरन्नूमकडे क्रिकेट बेटिंगमधून कमवलेला पैसा असल्याची लेखी माहिती प्राप्तिकर विभागाला दिली. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने या संपूर्ण प्रकाराची माहिती गुन्हे शाखेला दिली आणि तरन्नूमला अटक झाली. त्यावेळी श्रीलंकेचा महान गोलंदाज मुरलीधरनही वादाच्या भोव-यात अडकला होता. तरन्नूम ज्या बारमध्ये काम करायची, त्या बारमध्ये मुरलीधरनही यायचा. विशेष म्हणजे, त्याला तेथे घेऊन येणा-या अभिनेत्यालाही बेटिंगमध्ये फार रस होता. पण चौकशीअंती मुरलीधरनला क्लीन चिट मिळाली. विशेष म्हणजे, सध्या सट्टेबाजीप्रकरणी तपास करणारे पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे त्या प्रकरणातही तपास करत होते. त्यावेळीही सट्टेबाजी आणि बॉलिवूडचे कनेक्शन समोर आले होते.
सट्टेबाजीतील उस्ताद
दाऊद टोळीचा सट्ट्याचा व्यवसाय यापूर्वी शरद शेट्टी नावाचा दाऊदचा विश्वासू चालवायचा. पण छोटा राजनने त्याची दुबईत हत्या घडवून आणली आणि सट्टेबाजीचा 'डी' कंपनीचा सर्व व्यवहार अनिस इब्राहिम व छोटा शकीलच्या हाती आला. मात्र सानू अनाडकड हा या तिघांचाही सट्टेबाजीतील उस्ताद होता. शेट्टी, अनिस व छोटा शकील यांच्याकडे केवळ 'डी' कंपनीशी संबंधीत व्यक्ती सट्टा खेळायचे. पण अनाडकडकडे इतर टोळ्यांचे गुंडही सट्टा खेळायचे. त्यात राजनचा जुना साथीदार ओ. पी. सिंग आणि राजनपासून वेगळा झालेला गुरू साटम याचाही समावेश आहे. दाऊदचा विश्वासू सुनील सावंत ऊर्फ सावत्यानेही त्याच्याकडे लाखो रुपयांचा सट्टा खेळला. दुबईत जेव्हा राजनने सावत्याची हत्या केली, त्यावेळी अनाडकडला सर्वाधिक दु:ख झाले. कारण हत्येपूर्वीच सावत्या त्याच्याकडे ७५ लाख रुपयांचा सट्टा हरला होता. सहाजिकच सावत्याच्या हत्येनंतर ही रक्कम काही अनाडकडला मिळाली नाही.
सट्टेबाजी आणि हत्या
सट्टेबाजीमुळे अनेक हत्या झाल्या आहेत. पाच वर्षापूर्वी छोटा शकीलचा विश्वासू छोटे मियाँची हत्या झाली होती. छोटे मियाँ सट्टेबाजीत ५५ कोटी रुपये हरला होता. ही रक्कम न देण्यासाठी त्याने छोटा शकीलमार्फत सेटिंग लावून हा व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पंटरांनी छोटा राजनशी संपर्क साधून छोटे मियाँचा गेम केला. करण कुमार कक्कड याच्या हत्येनंतर तो मोठा सट्टेबाज असल्याचा खुलासा याप्रकरणातील प्रमुख आरोपी विजय पालांडे याने केला होता. कक्कडने सट्टयात ५० लाख रुपये हरल्यानंतरही महागडी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली होती. पण पालांडेचा सट्टय़ाचे पैसे परत करत नव्हता. म्हणून त्याने त्याची हत्या केली.
सट्टा आणि त्याचे बदलते स्वरूप
सट्टेबाजाचा काळा धंदा एका कॉर्पोरेट व्यवसायाप्रमाणे चालवला जातो. क्रिकेटच्या एका सामन्यावर सट्टा सुरू करण्यापूर्वी सट्टेबाजांची विश्वासू माणसे दोन्ही संघ, हवामान, खेळपट्टी, खेळाडूचा फॉर्म याची चोख माहिती काढतात. पुढे त्यातून ज्या संघाचे पारडे जड असते, अशा संघाचा भाव कमी आखण्यात येतो. उदा. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे पारडे दिल्लीविरोधात जड असल्यास चेन्नईला एक रुपयाला ४० पैशांचा भाव दिला जातो, तर त्याच्या तुलनेत कमकुवत असलेल्या संघाला म्हणजे दिल्लीला एक रुपयाला ६० पैसे अथवा त्याहून अधिकचा भावाची बोली खुली करण्यात येते. त्यामुळे जर चेन्नईजिंकली, तर चेन्नईवर पैसे लावणा-याने एक रुपया लावला असेल, तर त्याला एक रुपया ४० पैसे मिळतात आणि दिल्लीजिंकली, तर एक रुपयावर एक रुपया ६० पैसे मिळतात. पण हा दर प्रत्येक चेंडूनंतर बदलतो. अशा वेळेला चेन्नईवर जर अधिक पैसा लागला असेल, तर सट्टेबाज त्या संघाला हरवण्यासाठी मॅचफिक्सिंग करण्याचा प्रयत्न करून अधिकाधिक नफा कमावण्याचा प्रयत्न करतात.
सट्टेबाजीचा फॅन्सी सट्टा हाही एक प्रकार आहे. त्यात प्रत्येक चेंडू, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक षटकावर सट्टा लागतो. उदा. या षटकात १४हून अधिक धावा मिळतील. धोनी या षटकाला दोन षटकार मारेल, सचिन या सामन्यात सेंचुरी मारेल आदी. अशा फॅन्सी सट्टय़ावर बुकी अधिकाधिक नफा कमावतात. त्यासाठी सट्टेबाज स्पॉटफिक्सिंगसारखे प्रकार करण्याचा प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार हवालामार्फत चालतो. त्यासाठी सट्टा खेळणारा व्यक्ती स्थानिक सट्टेबाजाकडे पैशाची बोली लावतो. त्यानंतर हा छोटा सट्टेबाज मोठय़ा सट्टेबाजांकडे याची माहिती देतो. त्यानंतर सामन्याच्या निकालानुसार पैशांची देवाणघेवाण केली जाते. हवाला ऑपरेटरची माणसे सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीच्या घरी स्वत:हून येऊन पैसे घेऊन अथवा देऊन जातात. त्याबदल्यात हवाला ऑपरेटरला ०.२५ ते ०.५० टक्के कमिशन असते. पैशात तुलना केली, तर एक हवाला ऑपरेटर एका सामन्यामागे पाच ते १० कोटींचा फायदा होतो. हा सर्व प्रकार केवळ बोलण्यावर चालतो. त्याच्या नोंदी असतात. मात्र, अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे या व्यवहारात अंडरवर्ल्डची मदत घेतली जाते. कारण पैसे देण्यास एखाद्याने नकार दिल्यास त्याची वसुलीची जबाबदारी या टोळ्यांच्या गुंडावर असते. त्याबदल्यात टोळीच्या भाईला मोठा वाटा मिळतो. सट्टेबाजीत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सुरक्षा यंत्रणाच्या डोक्यात धूळ फेकण्यासाठी सट्टेबाज थेट दूरध्वनी करण्यापेक्षा कॉन्फरन्स तंत्राचा वापर करतात. सूत्रांवर विश्वास ठेवला, तर एका मोठ्या सट्टेबाजाचा दूरध्वनी किमान सात वेळा डायवर्ट होऊन ठरलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. म्हणजे जर कराचीतील मोठ्या सट्टेबाजाला दिल्लीतील सट्टेबाजाशी गुप्त व्यवहार करायचा असेल, तर तो थेट दूरध्वनी प्रथम दुबईतील सट्टेबाजाला करतो. मग कॉन्फरन्सिंगने तो त्याला मुंबईतील सट्टेबाजाला जोडतो. पुढे तो नाशिक, नागपूर, रायबरेली असे करत दिल्लीतील सट्टेबाजापर्यंत पोहोचतो. त्यामुळे तंत्राच्या सहाय्याने तपास करणा-या यंत्रणांना त्याचा माग काढणे कठीण जाते. याशिवाय सट्ट्याच्या कामासाठी वापरात येणारे मोबाइलचे सीमकार्ड बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने घेतले जाते. याशिवाय सट्टेबाजीत टोपणनावाचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे विंदू दारासिंग जॅक या टोपणनावाने सट्टा खेळत होता. पण पूर्वी जेव्हा मोबाइल फोन अस्तित्वात नव्हते, त्यावेळी लँडलाइन फोनमार्फत हा व्यवहार चालायचा. मात्र, त्यावेळी टेलिफोन कंपनीच्या स्थानिक कर्मचा-याला पटवून सट्टेबाज दुस-यांच्या पत्त्यावर कनेक्शन घ्यायचे. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा कॉल जरी इंटरसेप्ट केला, तरी पोलिस दुस-याच पत्त्यावर पोहोचायचे. त्यामुळे त्यांना तेथे कोणताही सट्टेबाज सापडायचा नाही.

बेटिंग ते स्पॉटफिक्सिंग

गेले १० दिवस आयपीएलपेक्षा चर्चा होतेय ती बेटिंग, फिक्सिंग, स्पॉटफिक्सिंग, भ्रष्टाचार, बॉलिवुड कनेक्शन आदी विषयांचीच. ही चर्चा इतकी जोर धरतेय की वृत्तवाहिन्याही मिनिटामिनिटाला सतत 'अपडेट' देत आहेत. गेलने यंदा किती षटकार मारले यापेक्षा यंदा स्पॉटफिक्सिंगमध्ये कोणी किती पैसे मिळवले हे कदाचित क्रिकेटप्रेमी चटकन सांगू शकेल.
आतापर्यंतचा स्पॉटफिक्सिंगचा प्रवास
दिल्ली पोलिसांनी १५ मेच्या मध्यरात्री श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटूंना स्पॉटफिक्सिंग प्रकरणी मुंबईत अटक केली. काही तास आधीच राजस्थानची वानखेडेवर मुंबई इंडियन्सविरुद्ध लढत झाली होती. श्रीशांतला त्याच्या मित्राच्या घरी तर चंडिला आणि चव्हाण यांना ट्रायडंट हॉटेलातून अटक झाली. तिथूनच आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणाला ख-या अर्थाने सुरुवात झाली. बीसीसीआय आणि राजस्थान रॉयल्स यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या तीनही क्रिकेटपटूंवर तात्पुरते निलंबन घातले आहे. या घटनेनंतर बीसीसीआय आणि क्रिकेट वर्तुळाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली. या तिघांच्याही पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. श्रीशांतचा लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून त्याने काही महागड्या वस्तू खरेदी केल्याचेही उघड झाले. चंडिलाच्या हरयाणातील नातेवाईकाच्या घरातून १२ लाखांची रोकडही सापडली.
तीनही क्रिकेटपटूंनी नावे घेतल्याप्रमाणे देशभरातून विविध सट्टेबाजांना अटक. याप्रकरणी सट्टेबाजांचे काही हजार कोटींचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. सट्टेबाजांचे अटकसत्र अद्याप सुरू आहे.
विंदू दारा सिंग यांनादेखील मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांशी असलेल्या संबंधांवरून ताब्यात घेतले. विंदूने आपण आयपीएलमध्ये स्पॉटफिक्सिंगमधून बरेच पैसे कमावल्याचेही सुरुवातीला म्हटले. मात्र त्याने चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई मय्यपनचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली. पाठोपाठ विंदू आणि मय्यपन यांच्यात अनेक वेळा दूरध्वनीवरून संभाषण झाल्याचेही तपासात समोर आले. मय्यपन हेच आपल्याला चेन्नईत 'व्हीआयपी बॉक्स'मधील तिकिटे द्यायचे, असेही विंदूने सांगितले. मय्यपनचाही स्पॉटफिक्सिंग प्रकरणात समावेश असल्याचे विंदूने सांगितल्याने श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने जोर धरला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मय्यपन यांना ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. फक्त क्रिकेटपटू किंवा बुकीच नाही तर पंचांचाही समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार असद रौफ प्रकरणानंतर समोर आला. पाकिस्तानचे पंच रौफ यांचाही स्पॉटफिक्सिंग प्रकरणाशी संबंध असल्याचे मुंबई पोलिसांनी समोर आणले आहे. त्यानंतर आयसीसीने रौफ यांना पुढील महिन्यात होणा-या चॅँपियन्स ट्रॉफीतून वगळले. रौफ यांना एका सट्टेबाजाकडून परदेशातील महागड्या वस्तूही पुरवण्यात येत असल्याचे समोर आले.
आयपीएलमध्ये गेल्या वर्षी म्हणजे पाचव्या हंगामातही 'स्पॉटफिक्सिंग' समोर आले होते. त्यावेळी मोहनिश मिश्रा, शालभ श्रीवास्तव, टी. पी. सुधींद्र, हरमीत सिंग आणि अभिनव बाली हे युवा क्रिकेटपटू 'फिक्सिंग'मध्ये आढळल्याचे निष्पन्न झाले होते. सुधींद्रवर तर आजीवन बंदी घालण्यात आली.
स्पॉटफिक्सिंगमध्ये पंचही (अंपायर) दोषी आढळल्याचा प्रकार गेल्या वर्षी उघड झाला. बांगलादेश, पाकिस्तानातील काही पंच हे देशांतर्गत सामन्यांत 'स्पॉटफिक्सिंग' केल्याचे आढळून आले.
दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी अजून काही क्रिकेटपटू स्पॉटफिक्सिंगमध्ये अडकल्याचा अंदाज व्यक्त केला. यासर्व प्रकरणांमध्ये बेटिंग हे अधिकृत करावे, अशी मागणीही इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांच्यापासून अनेकांनी केली. मात्र बेटिंग अधिकृत केल्यास क्रिकेट हा खेळ राहणार नाही, असे मत मांडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
फिक्सिंगचा इतिहास
हॅन्सी क्रोनिएचे १९९९-२०००मध्ये मॅचफिक्सिंगचे प्रकरण समोर येईपर्यंत पैसे घेऊन सट्टेबाजांना माहिती पुरवल्याचा प्रकार क्रिकेटविश्वाने पाहिला होता. १९९४मध्ये शेन
वॉर्न, मार्क वॉ या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर सामन्याची माहिती पुरवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई झाली होती. दक्षिण आफ्रिकेचा दिवंगत कर्णधार क्रोनिए प्रकरणाने तर कळस गाठला होता. गुन्ह्याची कबुली दिल्यावर काहीच दिवसांत त्याचा अपघातात मृत्यू झाला.
भारतालादेखील त्यावेळी मॅचफिक्सिंगने ग्रासले. तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, अजय शर्मा यांच्यावर याप्रकरणी आजीवन क्रिकेट बंदी घालण्यात आली. याप्रकरणानंतर क्रिकेटपटू धडा घेतील असे चित्र होते. मात्र आता त्याची जागा स्पॉटफिक्सिंगने घेतली आहे. या स्पॉटफिक्सिंगची खरी ओळख क्रिकेटजगताला झाली ती २०१०मध्ये पाकिस्तान-इंग्लंड कसोटीत. या प्रकरणी लंडन न्यायालयाने मोहम्मद आमेर, सलमान बट आणि मोहम्मद आसिफ या तीन क्रिकेटपटूंना तुरुंगवास भोगायला लावला. आयसीसीने पुन्हा हे प्रकार घडू नयेत म्हणून कठोर कारवाईचे केल्याचा संदेश दिला. मात्र सध्या आयपीएलमध्ये स्पॉटफिक्सिंगचे वादळ जितक्या वेगाने घोंघावत आहे ते पाहता ही हे सर्व थांबवण्यासाठी पारदर्शकता, फिक्सिंगविरुद्ध कठोर कायदा आणणे गरजेचे आहे.

सोनिया गांधी,पंतप्रधानांनी घेतली जखमींची भेट

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी छत्तीसगडमध्ये जाऊन नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या काँग्रेस नेत्यांची चौकशी केली.
रायपूर - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी छत्तीसगडमध्ये जाऊन नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या काँग्रेस नेत्यांची चौकशी केली. काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर शनिवारी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांसह २७ जण गंभीर जखमी झालेत.
या घटनेत मृत्यूमूखी पडलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस भवनात श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते जखमींची विचारपूस करण्यासाठी जगदलपूर येथे दाखल झाले, अशी माहिती काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने दिली.
नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या विद्याचरण शुक्ल यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी गुडगाव येथे हलवण्यात आले आहे.
तत्पूर्वी, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्या कुटुंबियांची देवेंद्रनगर येथे जाऊन भेट घेतली.




परिवर्तन यात्रा : नंदकुमार पटेलांची हत्या


काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या हल्ल्यात माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश याची नक्षलवाद्यांनी हत्या केली आली आहे.…


खाशाबा जाधवांवरील सिनेमासाठी 'कुस्ती'

भारतीय क्रीडा इतिहासात पहिले ऑलिंपिक पदक आणणा-या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते.
मुंबई – भारतीय क्रीडा इतिहासात पहिले ऑलिंपिक पदक आणणा-या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. ग्रामीण पार्श्वभूमी, साहित्यांची कमतरता व शासकीय दुर्लक्ष या सा-या गोष्टींवर मात करत जनसामान्यांच्या पाठिंब्यावर ऑलिंपिकपर्यंत पोहोचलेल्या व भारताला पहिलं कांस्यपदक मिळवून देणा-या खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय जीवनावर चित्रपट बनविण्याचीही 'कुस्ती' सुरू झाली असून, एकाच वेळेस दोन निर्मात्यांनी या चित्रपटासाठी खाशाबा जाधव यांच्या कुटुंबीयांकडून हक्क विकत घेतल्याचा दावा केला आहे.
खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित हिंदी व मराठी चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा निर्माता रितेश देशमुख याने शनिवारी केली. 'मुंबई फिल्म कंपनी' या त्याच्या कंपनीतर्फे 'पॉकेट डायनॅमो' नावाने हा चित्रपट येणार असून, तो एकाच वेळेस हिंदी व मराठी भाषेत तयार होणार आहे. या चित्रपटासाठी आपण खाशाबा जाधव विकास संस्था या रणजीत जाधव यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टकडून हक्क विकत घेतल्याचे रितेशने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दुसरीकडे आपण या चित्रपटाच्या निर्मितीसाठी गेल्या दोन वर्षापासून काम करत असून पटकथाही तयार असल्याचे निर्माते चंद्रकांत शिंदे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी 'प्रहार'सह अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्याही छापून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात विकास जाधव यांनी आपण काही दिवसांपूवीं रितेश देशमुख यांच्याशी केवळ चर्चा केली. त्यांना चित्रपट बनवण्याचे लेखी हक्क दिलेले नसून, त्यांच्याशी आर्थिक व्यवहारही झालेला नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आता खाशाबांच्या जीवनावर नेमका कोण चित्रपट बनवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


वाहन परवान्यावर आता अवयवदानाचा शिक्का

अवयवदानाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे फारसे अवयवदान होत नाही.
मुंबई - अवयवदानाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे फारसे अवयवदान होत नाही. मात्र याकामी तरुणांनी पुढाकार घेतल्यास अवयवदान मोहिमेला मोठे यश मिळेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. त्यामुळे वाहन परवाना काढताना आता अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. त्यानंतर अवयवदानासाठी इच्छुक असलेल्या तरुणांच्या वाहन परवान्यावर अवयवदानाचा शिक्का मारला जाईल, जेणेकरून त्यांच्या मृत्यूपश्चात अवयवदानाची प्रक्रिया सुलभ होईल. हा अभिनव पायलट प्रोजेक्ट लवकरच मुंबई व पुण्यात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अवयवदानाच्या मोहिमेला गती मिळावी व अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सरकारकडून काही सामाजिक संस्थाची मदत घेतली जात आहे. यातच आता या मोहिमेत तरुणांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. वाहन परवान्यासाठी अर्ज करतानाच तरुणांकडून अवयवदानाचा अर्ज भरून घेतला जाईल. त्यानंतर अर्जाची तपासणी होईल. आरटीओकडून त्यांना वाहन परवाना देताना त्यांच्या परवान्यावर 'अवयवदाता' म्हणून शिक्का मारला जाईल. त्यामुळे राज्यात किती अवयवदाते आहेत, त्याची माहिती मिळणे शक्य होणार आहे.
रस्ते अपघातात तरुण मोठय़ा प्रमाणात मृत पावत असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर त्यांच्या नातेवाइकांना अवयवदानाबाबत समजावून सांगणे कठीण असते. मात्र अपघातग्रस्त तरुणाच्या वाहन परवान्यावर अवयवदानाचा शिक्का असल्यास अवयवदानाचे ही प्रक्रिया सोपी होणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वाहतूक पोलिस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने तो राज्यभर सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे.


पालिका कर्मचा-यांचे अज्ञान कायम

मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये एप्रिल २००७पासून सॅप प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी आजतागायत ही प्रणाली शिकून घेण्यास महापालिकेच्या कर्मचा-यांची इच्छा नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई - मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये एप्रिल २००७पासून सिस्टम अ‍ॅप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स (सॅप) प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी आजतागायत ही प्रणाली शिकून घेण्यास महापालिकेच्या कर्मचा-यांची इच्छा नसल्याचे समोर आले आहे. विभागांच्या प्रमुखांकडून कर्मचा-यांना यासाठी प्रशिक्षित केले जात नसल्यामुळे एबीएम कंपनीचे आयतेच फावले असून, तब्बल सात वर्षे उलटून गेल्यानंतरही पुन्हा एक वर्षाकरता या कंपनीला मुदतवाढ देण्यात येत आहे. यासाठी या कंपनीवर तब्बल २० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
स्थायी समितीच्या मान्यतेनुसार एसएपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स सिमेन्स इन्फॉर्मेशन सिस्टम्स व एबीएम नॉलेज वेअर यांच्या कन्सॉशियमला हे काम देण्यात आले. 'सॅप' प्रणालीची अंमलबजावणी केल्यानंतर पाच वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच एप्रिल २०१२पर्यंत मनुष्यबळ सहाय्य सेवा पुरविण्याचे काम त्यांनाच देण्यात आले होते. परंतु त्यानंतर डिसेंबर २०११पासून मनुष्यबळ सहाय्य सेवा पुरवण्यासाठी एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड या कंपनीला काम सोपविण्यात आले होते. या कंपनीला यासाठी पाच वर्षाचा कालावधी असताना त्यांना आधी एक वर्षाची म्हणजेच ३० एप्रिल २०१३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यात आणखी एका वर्षाची भर पडली आहे.
एबीएमच्या वतीने प्राथमिक सहाय्य चमूअंतर्गत महापालिकेची १७० विभागांतील कार्यालयांसाठी १४२ व्यक्ती कार्यरत आहेत, तर दुस-या चमूमध्ये वरळी डेटा सेंटरमध्ये २८ व्यक्ती कार्यरत आहेत. परंतु या सर्व चमूंना आणखी ३० एप्रिल २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एबीएमच्या मनुष्यबळाच्या जागी महापालिकेच्या 'सॅप'प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्याबाबत सर्व विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांना अभिप्राय सादर करण्यास सांगितले होते. एबीएमच्या सहाय्य चमूची आवश्यकता ३० एप्रिल २०१३ नंतर आहे का, याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाने पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना प्रमुख लेखापाल (वित्त) यांनी १० प्राथमिक सहाय्य मनुष्यबळाची एका वर्षासाठी आवश्यकता असल्याचे कळविले. सध्या एफआयसीओ मॉडय़ुलसाठी २१ जणांचा प्राथमिक चमू आहे. तसेच उपायुक्त (सामान्य प्रशासन) व प्रमुख अभियंता (मलनि:सारण) यांना अनुक्रमे १० व १५ प्राथमिक सहाय्य मनुष्यबळाची आवश्यक असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यामुळे या चमूला मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले.


सिनेमातल्या लाटा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या

मुंबईच काय पण गडचिरोली शहर ज्यांनी कधी पाहिले नव्हते, रेल्वे आणि समुद्र ज्यांनी फक्त सिनेमात पाहिला होता, त्या गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी नुकतच मायानगरी मुंबईचे दर्शन घेतले.
मुंबई – मुंबईच काय पण गडचिरोली शहर ज्यांनी कधी पाहिले नव्हते, रेल्वे आणि समुद्र ज्यांनी फक्त सिनेमात पाहिला होता, त्या गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी नुकतच मायानगरी मुंबईचे दर्शन घेतले. समुद्रांच्या लाटांची गाज ऐकली आणि गेट ऑफ इंडियाचे दर्शनही कुतूहलाने घेतले. निमित्त होते गडचिरोलीतील शालेय विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्र समजावून घेणा-या 'आपला महाराष्ट्र' सुवर्णजयंती योजनेच्या सहलीचे.
गडचिरोली जिल्ह्यातील १४ ते १७ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना राज्याची ओळख व्हावी, तिथली प्रगती त्यांना पाहता यावी यासाठी गडचिरोलीचे पालकमंत्री व राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून आदिवासी विकास विभाग आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने 'आपला महाराष्ट्र' सुवर्णजयंती सहल योजना साकारली आहे.
राज्याच्या प्रगतीबरोबरच विविध भागांतील रूढी-परंपरा, कला, शिक्षण, उद्योग, शेती व संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी सुरू करण्याच आलेल्या या सहल योजनेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी मुंबईला भेट दिली. गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, तारापोरवाला मत्स्यालय, नेहरू तारांगण, गिरगाव चौपाटी आदी ठिकाणांना भेटी देऊन त्यांनी जीवाची मुंबई केली. सायंकाळी सात वाजता पोलिस मुख्यालयाच्या हिरवळीवर या छोटय़ा पाहुण्यांशी गृहमंत्री आर. आर. पाटील, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी संवाद साधला. 'आम्ही फक्त पिक्चरमध्येच ताज हॉटेल आणि समुद्र पाहिला होता. आज प्रत्यक्ष हे पाहिल्यावर आम्हाला खूप आनंद झाला,' अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आजपर्यंत गडचिरोलीतील सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना विविध योजनांतून 'महाराष्ट्र दर्शन' घडवून आणले असून, हा चौथा टप्पा असल्याचे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.
बच्चे कंपनींचा गृहमंत्र्यांसोबतचा संवाद रंगात आला असताना प्रसिद्ध गायक सोनू निगम हेदेखील या गप्पांच्या मैफलीत सहभागी झाले. त्यांनी त्यांच्यासाठी 'जिंदगी मौत ना बन जाये, संभालो यारो..' हे गाणे गायले व त्याला मुलांनी उत्स्फुर्त कोरस दिला. हिरवळीवर रंगलेल्या या कार्यक्रमात अपर पोलिस महासंचालक जावेद अहमद, एसआयडी आयुक्त के. एल. प्रसाद, बिष्णोई, पी. के. जैन, विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रज्ञा सरवदे, अमिताभ गुप्ता आदींनीदेखील बच्चे कंपनीबरोबर दिलखुलास संवाद साधला.


ठोसरवाडी मंडळाने उभारले केळवलीत सभागृह

केळवलीत श्रीमहालक्ष्मी येथील ठोसरवाडी सेवा मंडळाने बांधलेल्या भव्य सभागृहाचे उद्घाटन नुकतेच उद्योगपती दिनकरजी काशीद यांच्या हस्ते करण्यात आले.
राजापूर – केळवलीत श्रीमहालक्ष्मी येथील ठोसरवाडी सेवा मंडळाने बांधलेल्या भव्य सभागृहाचे उद्घाटन नुकतेच उद्योगपती दिनकरजी काशीद यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त १४, १५, १६ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमातील तीनही दिवस दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सभागृहाच्या व्यासपीठाचे उद्घाटन उद्योगपती मनोज तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या सभागृहाच्या वास्तूमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मधुकाका सप्रे यांनी धार्मिक विधीनुसार केली. श्रीगणेशाची मूर्ती व सभागृहासाठी लादी देणगी म्हणून देणारे नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा संदेश दिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला शुभसंदेश मंडळाचे सचिव प्रभाकर पवार यांनी वाचून दाखवला. या वेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केळवलीचे सरपंच रमेश ठोसर व विठोबा पांचाळ, उद्योगपती नंदकुमार पवार, डॉ. शिंदे, मुख्याध्यापक तळेकर आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडून कौतुक
सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १८ मे रोजी राजापूरमधील एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार डॉ. निलेश राणे आणि माजी आमदार गणपतराव कदम, रत्नागिरी जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचे सदस्य चंदूभाई देशपांडे यांची भेट घेतली व त्यांना सेवा मंडळाच्या कामांची संकल्पपूर्ती स्मरणिका भेट म्हणून दिली. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे आणि खासदार डॉ. निलेश राणे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या कामाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.


कोकणातील आंबा हंगाम अखेरच्या टप्प्यात

कोकणातील यंदाचा आंबा मोसम अखेरच्या टप्प्यात आला असून उशिरा का होईना शेतक-यांच्या हातात संपूर्ण आंबा पीक आले आहे.
कणकवली – कोकणातील यंदाचा आंबा मोसम अखेरच्या टप्प्यात आला असून उशिरा का होईना शेतक-यांच्या हातात संपूर्ण आंबा पीक आले आहे. यंदा हापूसचे पीक दरवर्षीपेक्षा ४० ते ५० टक्के अधिक आल्याने आंब्याला दरही चांगला मिळाला. कॅनिंगसाठीच्या आंब्यालाही चांगला दर मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत.
मागील वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाच्या आधीच संपूर्ण पीक मिळाले आहे. 'थ्रिप्स' रोगाचा प्रादुर्भाव न झाल्यामुळे यंदा चांगले पीक हाती आले आहे. मागील वर्षी आंबा कॅनिंगलाही विक्रमी दर मिळाला होता. मात्र, या वर्षी मोठय़ा प्रमाणात आंबा उपलब्ध झाल्याने कॅनिंग व्यापारी कोकणात उतरले नाहीत, त्यामुळे त्याचा फटकाही काही शेतक-यांना बसला आहे. मात्र, ते प्रमाण कमी आहे. स्थानिक बाजारपेठेतही आंबा हातोहात चांगल्या दराने खपू लागल्याने शेतक-याला दिलासा मिळाला.
पुणे, कोल्हापूर बेळगावमध्ये चांगली विक्री
मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये यंदा आंबा कमी प्रमाणात पोहोचला असला तरी राज्यातील विविध भागातील स्थानिक बाजारपेठांमधून आंबा उचलला जात आहे. शेतक-यांनी यंदा पुणे, बेळगाव, कोल्हापूर, तसेच मुंबई येथील स्टॉलवर आंबा विक्री केली. या ठिकाणी चांगल्या प्रतीचा पिकवलेला हापूस आंबा विक्रमी दराने विकला जात आहे. ठिकठिकाणी हापूस आंबा खरेदी-विक्री केंद्रे उभी राहिली आहेत. सर्वसामान्य शेतक-याच्या कलम बागायतीमधील किरकोळ स्वरूपातील आंबा डझनावर त्याचबरोबर वजनावरही घेतला जात आहे.

साथरोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना

पावसाळ्यात साथींचे आजार वाढू नये यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडून रत्नागिरीतील ३२ गावांमध्ये विशेष उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी – पावसाळ्यात साथींचे आजार वाढू नये यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडून रत्नागिरीतील ३२ गावांमध्ये विशेष उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याशिवाय गेल्या तीन वर्षात विविध आजार पसरलेल्या २७ गावांमध्येही उपाययोजना राबवल्या जात आहेत.
नैसर्गिक आपत्ती व पूरस्थितीत साथ पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुराचा धोका असलेली गावे तसेच नदीकाठच्या गावांची यादी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
पुराचा धोका असलेल्या गावांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. संभाव्य गावांना आरोग्य कर्मचारी व पर्यवेक्षक यांनी वेळोवेळी भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
साथीचे आजार पसरण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये पेवे, पणदेरी, अडखळ, निगडी, केगवळ, गोठे टाकेडे (मंडणगड), कुडावळे, उवली, वाघिवणे (दापोली), सार्पिली, कशेडी, सुमारगड (खेड), पाचेरी सडा, कुडली (गुहागर), तोंडली, पातेपीलवली, वीर, धामणवणे (चिपळूण), पुण्ये, परिधामापूर, परचुरी (संगमेश्वर), बागपाटोळे (रत्नागिरी), कुरंग, कोंडगे, विलवडे, माचाळ, चिंचुरटी, कोलघे (लांजा), मोगेर, तिवरे, कार्जिडा (राजापूर) आदी गावांचा समावेश आहे.


नैसर्गिक आपत्तींसाठी प्रशासन सज्ज


पावसाळी हंगामात शहरात येणा-या पुराचा आणि ओढवणा-या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे.
राजापूर – पावसाळी हंगामात शहरात येणा-या पुराचा आणि ओढवणा-या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. नगर परिषदेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून एक जूनपासून २४ तास नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
राजापूर शहरात दरवर्षी अर्जुना व कोदवली नदीला पूर येतो व पुराचे पाणी शहर बाजारपेठ व जवाहर चौकात शिरते. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होते. चिंचबांधे ते कांढेतड मार्गावर होडी वाहतूक सुरू करावी लागते. तर जवाहर चौकात पूर आल्यानंतर गुजराळी, खडपेवाडी परिसरात पलीकडे जाणाऱ्या नागरिकांसाठीही होडी वाहतूक सुरू करावी लागते.
प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शहरातील छोटी व मोठी गटारे, नालेसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर बंद असलेले पथदिवे सुरू करणे, कचरा उचलण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. पावसाळय़ात मच्छर हटाव मोहिमेसाठी नवीन फॉगिंग मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची निविदाही काढण्यात आली आहे. तर ब्लिचिंग पावडर, फिनेल व अन्य साहित्यही खरेदी करण्यात आले आहे. पूरपरिस्थिती आपत्ती ओढवल्यास त्याचा सामना करण्यासाठी २३ लाइफ जॅकेट सात जीवनरक्षकांचीही नोंद झाली आहे. ज्यांना पोहता येते त्यांचीही यादी तयार करण्यात आली आहे.
शहरातील प्राथमिक शाळा, हायस्कूल अशा दहा ठिकाणी पूरस्थितीत मदत केंद्रे तयार केली आहेत. झाडे, दरड कोसळणे अशा आपत्तींबाबतही प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. पूरपरिस्थितीची ग्रामस्थांना माहिती व्हावी यासाठी सायरन यंत्रणाही उभारण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष
आपत्ती व्यवस्थापनासाठी एक जूनपासून २४ तास नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी या कालावधीत (०२३५३) २२२०३९ या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी व कर्मचा-यांशी तात्काळ संपर्क साधता यावा, यासाठी या सर्वांचे दूरध्वनी व मोबाइल क्रमांक नगर परिषदेच्या नोटिस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

औरंगाबादच्या टंचाईसाठी १० कोटी


औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवरील उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
औरंगाबाद - जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवरील उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. या निधीपैकी दोन कोटी रुपयांची रक्कम हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी दिली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दिवसभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर दुपारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आ. कल्याण काळे, आ. एम. एम. शेख, विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, जि.प. सीईओ सुखदेव बनकर, मनपा आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते.
लागोपाठ दोन वर्षे कमी पाऊस झाल्याने यंदा राज्याच्या काही भागात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करत आहेत. लोकसहभागातून विविध सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. यामुळे भविष्यात पाणी साठवण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. जायकवाडी प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सातत्याने सुरू ठेवण्यासाठी यंत्र सामुग्री खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या निधीचा विनियोग करण्यासाठी पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिका-यांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पाणीटंचाईवरील उपाय म्हणून साखळी सिमेंट बंधारे बांधण्याचा प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झाला आहे. या कामासाठी केंद्र सरकारने पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. निकष निश्चित करून हा निधी राज्यातील विविध जिह्यांना उपलब्ध करून दिला जाईल. त्यातून दर्जेदार साखळी सिमेंट बंधारे बांधले जावेत. पाण्याचे पुनर्भरण होणे महत्त्वाचे असून त्याबाबतच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीच्या सुरुवातीला लोकप्रतिनिधींनी शेततळ्यांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे, टंचाई परिस्थितीत कोणाचाही वीजपुरवठा खंडित न करणे, संपूर्णपणे जळालेल्या फळबागांसाठी मदत देणे, आदी मागण्या केल्या.
फळबागा जगवण्यासाठी दोन टप्प्यात पैसे
जळून गेलेल्या फळबागांची भरपाई मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता फळबागा जगवण्यासाठी दोन टप्प्यात पैसे दिले जातील, मात्र त्याचे स्वरूप अजून निश्चित नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
'राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घ्यावा'
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना पतपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घेऊन अधिक वाटा उचलावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. जिल्हा बँका या शेतक-यांच्या आहेत. कृषी पतपुरवठा जिल्हा बँकांमार्फत होतो. सहकारी संस्था चालवणे ही आव्हानात्मक बाब आहे. अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली
औरंगाबादच्या दौ-यावर असताना शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तब्येत बिघडली. त्यांना अचानक ताप आणि उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने दौ-यामध्ये ऐन वेळी बदल करण्यात आले. दिवसभर घाटी रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक त्यांच्यासोबतच होते. शुक्रवारी रात्री मुक्कामी आलेले मुख्यमंत्री शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच दौ-यास सुरुवात करणार होते. मात्र, पहाटेपासूनच रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने दौरा उशिरा सुरू करण्यात आला.

डॉ. कर्नाड यांची नाटके वैश्विक दर्जाची

देशात आधुनिक रंगभूमीचा काळ डॉ. गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्या नाटकांनी आणला, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.


पुणे - देशात आधुनिक रंगभूमीचा काळ डॉ. गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्या नाटकांनी आणला, त्यांच्या काळात नवीन नाटक लिहिणा-यांना या चार लोकांची फार भीती वाटायची. त्यांच्या तोडीचे नाटक लिहिणे एक आव्हान होते. डॉ. कर्नाड यांची नाटके वैश्विक दर्जाची असून हॉलिवुडपटाला शोभेल, अशी त्यांची पात्र रचना आहे, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित समग्र गिरीश कर्नाड महोत्सवाचे उद्घाटन सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळय़ाला ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, डॉ. गिरीश कर्नाड, चित्रपट संग्राहलयाचे संचालक प्रशांत पाठरावे, 'आशय'चे स्तिश जकातदार, विरेंद्र चित्राव उपस्थित होते.
सत्तरच्या दशकात या चार नाटककारांना शोधण्याचे काम सत्यदेव दुबे यांनी केले. दुबे यांनी चौघांना फक्त शोधले नाही तर, देशाच्या कानाकोप-यात पोहोचवले. डॉ. गिरीश कर्नाड यांनी सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली नाटके रंगमंचावर आणली.
त्यांच्यावर आजही हॉलीवुडच्या बिगबजेट चित्रपटांसारखे चित्रपट निघू शकतील, अशी रचना त्यांनी केलेली आहे. त्यांच्या नाटकांमधून सशक्त स्त्रीचे चित्रण करण्यात आले आहे, असे आळेकर म्हणाले.

ग्रामीण रुग्णालयात यापुढे अतिदक्षता विभागाची सोय

जिल्हा रुग्णालयात चार आणि सहा खाटांची क्षमता असलेले अद्ययावत अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केले जाणार आहे, असे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ.सतीश पवार यांनी दिली. 
मुंबई – ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात कार्डियाक आयसीयूची सोय नसल्याने हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अधिक उपचार घेण्याकरता शहरामध्ये जावे लागते. त्यामुळे याची गंभीर दखल घेत सर्व जिल्हा रुग्णालयात चार आणि सहा खाटांची क्षमता असलेले अद्ययावत अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केले जाणार असून ही सुविधा राज्यात टप्प्याटप्याने सुरू केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. सतीश पवार यांनी दिली.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) प्रयत्न करत आहेत. जीवनशैलीशी निगडित असलेल्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचार घेण्याकरता शहरी भागात किंवा त्याच परिसरातील खासगी रुग्णालयात जावे लागते. यामध्ये खासकरून हृदयविकाराने त्रस्त असलेल्या गरीब रुग्णांची खासगी रुग्णालयात लूट होत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या होत्या.
त्याची दखल घेऊन जिल्हा रुग्णालयात अद्ययावत कार्डियाक अतिदक्षता विभागाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयात कार्डियाक अतिदक्षता केंद्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी येणारे हृदयविकाराने त्रस्त असलेल्या अतिगंभीर रुग्णांना कार्डियाक आयसीयू नसल्याने खासगी रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे एनआरएचएम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपकरणे खरेदी केले जाणार आहे.
कार्डियाक अतिदक्षता केंद्रांच्या सुवेधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे अतिदक्षता विभाग (आयसीयू) चार आणि सहा खाटांचे असणार आहेत. त्यामुळे यापुढे हृदयविकारासारखे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयाप्रमाणे अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध होणार आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णाचा या सुविधेचा फायदा होणार आहे. याकरता गुजरातमधील एका नामांकित कंपनीला ठेका दिला आहे.


यूपीएचीचं कामगिरी सर्वोत्तम – सिब्बल


यूपीए२ च्या चार वर्षांच्या  कालावधीत सर्वोत्तम कामगिरी झाल्याचे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले.
नवी दिल्ली – यूपीए-२ ला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. या चार वर्षांच्या कालावधीत दुस-या कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा यूपीएने सर्वोत्तम कामगिरी केल्याचे कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले. मात्र मिडियाने 'आम आदमी'समोर त्याचे नेहमीच चूकीचे चित्र दाखवले असेही त्यांनी म्हटले.
यूपीए २ च्या चार वर्षांतील चांगल्या योजनांचा पाढाही सिब्बल यांनी यावेळी वाचून दाखवला. थेट परकीय गुंतवणूक, आधारकार्ड, शिक्षणाचा मुलभूत अधिकार, टेलिकॉम या आणि अशा अनेक चांगल्या योजनांचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
भारताच्या राजकीय इतिहासातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या तुलनेत यूपीए सरकारने या चार वर्षांत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मात्र मिडियाने नेहमीच काँग्रेसची 'नकारात्मक'बाजूच दाखवली, असे त्यांनी सांगितले. आपल्या या वक्तव्यासाठी त्यांनी कृषी उत्पादनात झालेल्या वाढीचा (२६० टन) दाखला दिला. त्याशिवाय उर्जा क्षेत्रातही झालेल्या आमुलाग्र प्रगतीविषयी सांगितले.

आरोपांमुळे अडचणी वाढल्या – श्रीनिवासन

गेल्या काही दिवसांपासून स्पॉट फिक्सिंग प्रकरणात गुरुनाथ मय्यपन दोषी आढल्याने माझ्या वैयक्तिक जीवन खडतर झाले आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

कोलकाता - गेल्या काही दिवसांपासून स्पॉट फिक्सिंग प्रकरणात गुरुनाथ मय्यपन दोषी आढल्याने माझ्या वैयक्तिक जीवन खडतर झाले आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. मात्र आत्तापर्यंत मला कोणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही.  त्यामुळे या आरोपांमुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. मी माझे काम करत  राहणार आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सागितले.
दरम्यान, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोपी असलेले क्रिकेटपटू  एस. श्रीशांत, अजित चंडेलिया यांसह तीन बूकींच्य़ा पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांची विचारपूस…

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रायपूर येथे जाऊन नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या परिवर्तन यात्रेतील काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशी केली.


आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण

बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांची पत्रकार परिषद

बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांची पत्रकार परिषद

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही


बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही

श्रीनिवासन चेन्नई सुपर किंग्जचे मालक

श्रीनिवासन चेन्नई सुपर किंग्जचे मालक

एन.श्रीनिवासन यांची स्पष्टोक्ती

एन.श्रीनिवासन यांची स्पष्टोक्ती

नक्षलवादापुढे देश गुडघे टेकणार नाही

नक्षलवादापुढे देश कदापी गुडघे टेकणार नाही, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रायपूर येथे ठणकावून सांगितले.
रायपूर- नक्षलवादापुढे देश कदापी गुडघे टेकणार नाही, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रायपूर येथे ठणकावून सांगितले. बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात जखमी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग रविवारी रायपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी या हल्ल्यामधील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये राष्ट्रीय मदत निधीतून मदत देण्याचे जाहीर केले.
छत्तीसगड राज्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या परिवर्तन यात्रेवर सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा, उदय मुदलीयार यांच्यासह २७ जणांचा मृत्यू झाला. तर प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश या पिता पुत्राची अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याने काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. मात्र अशा संकटांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी धीराने सामोरे जायला हवे, या हल्ल्यातील जखमींना प्राथमिक उपचार मिळणे ही प्राथमिकता असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले. तसेच देशात वाढत चाललेल्या नक्षलवादाला रोखणे हे भारतापुढील मोठे आव्हान असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

ऑक्टोंबरमध्ये ऑस्ट्रेलिया भारत दौ-यावर


यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ भारत दौ-यावर येणार आहे. या दौ-यात सात एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना खेळला जाणार आहे.

नवी दिल्ली – यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ भारत दौ-यावर येणार आहे. या दौ-यात सात एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना खेळला जाणार आहे. १० ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर या कलावधीत हे सर्व सामने खेळवण्यात येतील.
भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाच्या दौरा कार्यक्रम निश्चित करणा-या समितीच्या रविवारी कोलकातामध्ये झालेल्या बैठकीत सामन्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. बंगळूरू, पुणे, मोहाली, नागपूर, जयपूर, रांची आणि कटकमध्ये एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत तर, राजकोटमध्ये एकमेवट ट्वेंटी-ट्वेंटीची लढत होईल.

राजीनामा द्या…


बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा श्रीनिवासन यांनी ‘तात्काळ राजीनामा द्या’, अशी मागणी करत कोलकाता येथे क्रिकेटप्रेमींनी निदर्शने केली.


राजीनामा देणार नाही…

बीसीसीआयच्या कोणत्याही सदस्याने राजीनाम्याची मागणी केलेली नसल्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. मी माझे काम करत राहणार', असे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन.श्रीनिवासन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


पळा पळा…


अंधेरी येथे रविवारी खास मुंबईच्या डबेवाल्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.


हल्ल्याचा निषेध…

छत्तीसगडमधील कॉँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर  नक्षलवाद्यांनी हल्ला केला. याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून छत्तीसगड सरकारचा निषेध केला.


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज अंतिम लढत- मुंबईचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय-सचिन खेळणार नाही

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज अंतिम लढत- मुंबईचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय-सचिन खेळणार नाही

आयपीएल LIVE मुंबईची प्रथम फलंदाजी


 आयपीएल सहाच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता - महिन्याभराहून अधिक काळ लाखो क्रिकेट चाहत्यांना टी-२० क्रिकेटमधील रोमहर्षकतेची प्रचिती देणा-या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दुस-यांदा अंतिम फेरीत आमने-सामने आले आहेत.
लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी मागच्या सामन्यातील संघ कायम ठेवला असून, सचिन तेंडुलकरचा दुखापतीमुळे संघात समावेश करण्यात आलेला नाही. दोन्ही संघ तुल्यबळ असून, साखळी फेरीत दोन्ही संघांनी सरस कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात मुंबईने चेन्नईला पराभूत केले होते. तर चेन्नईने क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
यापूर्वी २०१० मध्ये आयपीएलच्या तिस-या हंगामात दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम टप्यात असलेल्या आयपीएलला स्पॉट फिक्सिंगचे गालबोट लागले असले तरी क्रिकेट चाहत्यांचा उत्साह तूसभरही कमी झालेला नाही. उलट दोन्ही बाजूच्या चाहत्यांना आपलाच संघ बाजी मारेल असा विश्वास आहे.
आयपीएलच्या सर्व अपडेटसाठी येथे क्लिक करा

"स्मिथ आउट"

मुंबई इंडियन्सचा भरवशाचा आक्रमक सलामीवीर डेवेन स्मिथला तंबुत पाठवल्यानंतर जल्लोष करणारे चेन्नईचे खेळाडू.


मान्सून उशीरा येणार!


मान्सून उशीरा येणार असल्याचे भारतीय हवामान विभागाचे मुख्य भाकीत अधिकारी डी. शिवानंद यांनी सांगितले.

नवी दिल्ली- भारतीय हवामान खात्याने येत्या ३ जून रोजी केरळात मान्सून दाखल होणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होत असल्याने नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे मान्सून उशीरा येणार असल्याचे भारतीय हवामान विभागाचे मुख्य भाकीत अधिकारी डी. शिवानंद यांनी सांगितले.

आयपीएल सहा अंतिम सामना-मुंबई इंडियन्सच्या ९ बाद १४८ धावा-चेन्नईसमोर विजयासाठी १४९ धावांचे आव्हान

आयपीएल सहा अंतिम सामना-मुंबई इंडियन्सच्या ९ बाद १४८ धावा-चेन्नईसमोर विजयासाठी १४९ धावांचे आव्हान

एकाच कुटुंबातील पाच जणांचा अपघातात मृत्यू


मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कार्ल्याजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.


संग्रहीत मुंबई- मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कार्ल्याजवळ रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गाडीचालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगातील स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीवर आदळली. या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
जनार्दन चांगा वासकर (६५), लिलाबाई जनार्दन वासकर (६०), रवींद्र जनार्दन वासकर (३५) आणि रुपेश जनार्दन वासकर (२८) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुवर्णा जनार्दन वासकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एक पाच वर्षाची बालिका सुखरुप बचावली आहे.
नवी मुंबईतील खारघर येथील हे कुटुंब एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर आले होते. देवाचे दर्शन घेऊन घरी परतताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

चीनची पुन्हा घुसखोरी


चीनने आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून भारतीय हद्दीत पाच किलोमीटरपर्यंत घुसखोरी करत रस्ते बांधल्याचे उघड झाले आहे.

नवी दिल्ली- लडाख भागात घुसखोरी केल्याचे प्रकरण शांत होण्यापूर्वीच चीनने आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून भारतीय हद्दीत पाच किलोमीटरपर्यंत घुसखोरी करत रस्ते बांधल्याचे उघड झाले आहे. भारतीय लष्कराकडून गस्त घालत असताना चिनी लष्कराचे संदेश पकडल्यानंतर ही बाब उघड झाली.
लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात चीनच्या लष्कराने घुसखोरी केली होती. दोन्ही देशांमध्ये यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिका-यांनी चर्चा करून सैन्य मागे घेतले. मात्र, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून भारतीय हद्दीत पाच किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे.
चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या भारत दौ-यापूर्वी दोन दिवस आधी १७ मे रोजी सिरी जाप या भागात ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. चीनने सिरी जाप भागात रस्ते बांधण्यात यश मिळवले असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून पाच किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केली. चीनच्या नकाशाप्रमाणे हा भाग चीनच्या हद्दीत असल्याचा दावा केला आहे तर भारतीय लष्कराने हा भाग लडाखचा प्रदेश असल्याने ठासून सांगितले. दरम्यान, उधमपूर येथील लष्कराच्या प्रवक्त्याने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

प्रहार बातम्या- २६ मे २०१३
नमस्कार, प्रहार बातम्यांमध्ये आपल स्वागत…..
छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध
नक्षलवाद्यांसमोर झुकणार नाही- पंतप्रधानांचं स्पष्ट प्रतिपादन
कार्ल्याजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
चीनची पुन्हा घुसखोरी
ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया भारत दौ-यावर येणार
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा…  26052013

सेरेना, फेडररची विजयी सलामी


 अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि दुसरा मानांकित स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररने फ्रेंच ओपनमध्ये विजयी सलामी दिली.

पॅरिस - अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि दुसरा मानांकित स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररने फ्रेंच ओपनमध्ये विजयी सलामी दिली. रविवारी पहिल्या दिवशी महिला एकेरीत सेरेनाने जॉर्जियाच्या अॅना टॅटिश्विलीचा ६-०, ६-१ असा सहज पराभव केला.
२००४ नंतर स्पर्धा जिंकण्याची संधी ३१ वर्षीय सेरेनाला आहे. पुरुष एकेरीत फेडररनेही स्पेनच्या पॅब्लो कॅरॅनो-बुस्टाला ६-२, ६-२, ६-३ असे सरळ सेट्समध्ये नमवले. ३१ वर्षीय फेडररने विजयी सलामीसह कारकीर्दीत दुस-यांदा फ्रेंच ओपन जिंकण्याच्यादृष्टीने आगेकूच केली.
अन्य लढतींमध्ये पाचवी मानांकित इटलीच्या सारा इरानीनेही हॉलंडच्या अरांक्सा रुसला ६-१, ६-२ असे नमवले. १४व्या मानांकित सर्बियाच्या अॅना इवानोविचने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकवर ६-१, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. पुरुष एकेरीतील अन्य लढतीत १४वा मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिकने बेल्जियमच्या झेवियर मॅलिसला ६-२, ६-१, ४-६, ६-४ असे नमवले. १५वा मानांकित फ्रान्सच्या गाइल्स सिमॉननेही ऑस्ट्रेलियाच्या ल्युटन ह्य़ुइटची झुंज ३-६, १-६, ६-४, ६-१, ७-५ अशी मोडून काढली.


मुंबई इंडियन्सने पटकावले आयपीएलच्या सहाव्या मोसमाचे विजेतेपद-चेन्नईचा २३ धावांनी केला पराभव

मुंबई इंडियन्सने पटकावले आयपीएलच्या सहाव्या मोसमाचे विजेतेपद-चेन्नईचा २३ धावांनी केला पराभव

पर्यटकांनी अनुभवला थरार


सध्या सुरू असलेल्या 'माथेरान महोत्सवा'मध्ये स्थानिकांबरोबरच पर्यटकही मोठया प्रमाणात सहभागी होत आहेत.
माथेरान - सध्या सुरू असलेल्या 'माथेरान महोत्सवा'मध्ये स्थानिकांबरोबरच पर्यटकही मोठय़ा प्रमाणात सहभागी होत आहेत. या महोत्सवात इतर कार्यक्रमांबरोबरच साहसी खेळांचेही आयोजन करण्यात आले. व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग अशा अनेक साहसी खेळांचा थरार यावेळी पर्यटकांना अनुभवता आला.
माथेरानमधील एको पॉइंट, लॅँडस्केप पॉइंट, लुइझा पॉइंट, हनिमून पॉइंट या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग आदी साहसी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. एको पॉइट ते लॅँडस्केप पॉइंट दरम्यान बांधण्यात आलेल्या व्हॅली क्रॉसिंग रोपच्या उद्घाटनप्रसंगी माथेरान महोत्सवाचे आयोजक, नगराध्यक्ष अजय सावंत, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आकाश चौधरी आदी उपस्थित होते. तर हनिमून पॉइंट ते लुइझा पॉइंट येथे व्हॅली क्रॉसिंगसाठी दोन किमी अंतराचा रोप बांधला होता. या व्हॅली क्रॉसिंगच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विवेक चौधरी, सचिव संतोष पवार, नगरसेवक राजेश दळवी यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
एको पॉइंटवर आलेल्या ब-याच पर्यटकांनी या व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव घेतला. यात महिलांची संख्याही मोठया प्रमाणात होती.
'कपल ऑफ दी सीझन' स्पर्धेचे आयोजन
'माथेरान महोत्सवा'तील पर्यटकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता त्यांच्यासाठी 'कपल ऑफ दी सझन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माथेरान प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ३५ पर्यटकांनी सहभाग घेतला होता. यात पुण्यातील राजेश सालगर यांनी 'कपल ऑफ दी सिझन' हा पुरस्कार मिळवला.
श्रीराम मंदिर चौकामध्ये 'टाइम अ‍ॅण्ड टॅलेन्ट'च्या वतीने राजेश चौधरी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केली होती. मनोज सिप्पी, विद्या चौधरी, ओमिल मयेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नगराध्यक्ष अजय सावंत, उपनगराध्यक्ष प्रतिमा घावरे, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन
माथेरान महोत्सवात नौरोजी लॉर्ड उद्यानामध्ये बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणा-या मदन मोरे यांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षण, संस्कार, भ्रष्टाचार, एड्स निर्मूलन आदी सामाजिक विषय हाताळले. या विषयांच्या माध्यमातून मदन यांनी प्रेक्षकांना हसवण्याबरोबरच या विषयाचे गांभीर्यही पटवून दिले.

राशिभविष्य – २७ मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…

मेष : तुमचे बोलणे मनावर घेतले जाणार नाही.



वृषभ : तुमचा प्रभाव पडेल.

मिथुन : चुका करालही आणि शोधालही.
कर्क : पदोन्नतीचे योग येतील.

सिंह : टापटिपपणावर भर राहील.

कन्या : आज तुम्ही भाग्यवान ठराल.
तूळ : धडा घालून द्याल.

वृश्चिक : विवाहाची बोलणी यशस्वी होती.

धनू : अति आरामदायी जीवनशैली त्रासदायकच!.

मकर : स्थावर मालमत्ता खरेदीच्या संधी येतील.

कुंभ : वनौषधींचा अभ्यास कराल.


मीन : तत्त्वज्ञानावरील वाचन कराल.