| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शुभ्र काही स्फटीकसम!
मुंबईच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलातील मिठागरं म्हणजे या शहराची शुभ्र रुपेरी कडा. मुलुंड, विक्रोळी, मीरा रोड, वसई परिसरात ही मिठागरं इंग्रजांच्या काळापासून आहेत. मुख्य मुंबईतील वडाळ्यातही ही मिठागरं दिसतात. एके दिवशी पहाटेच्या सुमारास वडाळा भागात फिरत असताना अचानक ही मिठागरं दिसली. पहाटेच्या पुसट काळोखात मिठाचे पांढरे शुभ्र डोंगर उठून दिसत होते. एका मिठागराशेजारी बाइक थांबवली आणि तिथलं दृश्य पाहून थक्क झालो. पहाटे पाच वाजल्यापासून मिठागरावर कामाला सुरुवात झाली होती. कोणी वाफ्यातून मीठ आणून त्याच्या राशी करण्यात गुंतलेलं, तर कोणी वाफ्यांची मळणी करत होतं. कोणी विस्कटलेले वाफे नीट करत होतं, तर कोणी सुकलेल्या मिठाची मोजणी करत होतं. तेवढय़ात सूर्याचं पहिलं किरण त्या मिठाच्या वाफ्यांवर पडलं अन् या डोंगरावरून जांभळ्या पिवळसर रंगांचं परार्वतन झालं. ते तर स्फटीकमय दृश्य कॅमे-यात बंदिस्त करून ठेवण्याजोगंच होतं. अचानक उजाडलं, तेव्हा पाण्यात पडलेल्या मिठाचं प्रतिबिंबही पाहण्यासारखं होतं. खरंच हा आरस्पानी अनुभव होता. Read More »
कर्नाटकचे मंत्रिमंडळ…
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. राजभवनातील ग्लासहाऊसमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल एच.आर.भारव्दाज यांनी वीस आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची तर आठ आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. Read More »
"घोटाळ्यांचा राजा"
शारदा ग्रुपच्या चीट फंड कंपनीचा प्रमुख सु्दीप्तो सेनला कोलकाता येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. Read More »
"रिक्षातून आंदोलन"
भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रिक्षातून आलेल्या राजस्थान भाजप अध्यक्ष वसुंधरा राजे. Read More »
"चित्रपटाचे प्रमोशन"
अभिनेत्री प्रिती झिंटा आणि रेहान मलिक आपल्या आगामी इश्क इन पॅरिस चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मुंबईत एकत्र आले. Read More »
महानगरे
Read More »
महाराष्ट्र
Read More »
आयपीएल LIVE मुंबईची गोलंदाजी
पंजाब विरुध्दच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. धरमशाला- गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणा-या मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेऑफमधील मुंबईचा प्रवेश निश्चित असला तरी, हा सामना जिंकून अव्वल स्थान कायम राखण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. लाईव्ह स्कोरसाठी येथे क्लिक करा पंजाबचे प्लेऑफमधील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रतिष्ठा राखण्यापुरता या सामन्याचे महत्त्व आहे. घरच्या मैदानावर मुंबईने सर्वच्या सर्व आठ सामने जिंकले असले तरी, घराबाहेर मुंबईची कामगिरी बहरलेली नाही. त्यामुळे आज होणा-या सामन्यात बाहेरच्या मैदानावर कामगिरी सुधारण्याची मुंबईला संधी आहे. धरमशाला दोन्ही संघासाठी त्रयस्थ ठिकाण आहे. कर्णधार रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि कीरॉन पोर्लाड यांना रोखण्याचे पंजाबसमोर मुख्य आव्हान असेल. आयपीएलच्या सर्व अपडेटसाठी येथे क्लिक करा Read More »
आरोपी क्रिकेटपटूंची पून्हा चौकशी
एस.श्रीशांत, अजित चंडालिया आणि अंकित चव्हाण या तिघांची दिल्ली पोलिसांनी शनिवारी दुस-यांदा चौकशी केली. नवी दिल्ली – आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक झालेले राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू एस.श्रीशांत, अजित चंडालिया आणि अंकित चव्हाण या तिघांची दिल्ली पोलिसांनी शनिवारी दुस-यांदा चौकशी केली. गुरुवारी अटक झाल्यानंतर आज प्रथमच हे तिन्ही क्रिकेटपटू समोरासमोर आले. शुक्रवारी पोलिसांनी त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी आज तिघांची चौकशी केली. आयपीएलमधील बेटिंग रॅकेटच्या मूळापर्यंत जाण्यासाठी दिल्ली पोलिस शनिवारी आणखीं काही शहरात धाडी टाकण्याची शक्यता आहे. तिन्ही क्रिकेटपटू आणि अकरा बुकींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी क्रिकेटपटूंवर ४२० फसवणूक आणि १२० ब कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More »
अन्य शहरे
Read More »
प्रहार बातम्या- १८ मे २०१३
Read More »
'श्री' ४२०!
एस. श्रीशांत हा बुकींशी थेट संपर्कात असल्याचे, त्याच्या सामानाची झाडाझडती घेतल्यानंतर स्पष्ट झाले. मुंबई- स्पॉटफिक्सिंगप्रकरणी अटक झालेला मध्यम तेज गोलंदाज एस. श्रीशांत हा बुकींशी थेट संपर्कात असल्याचे, त्याच्या सामानाची झाडाझडती घेतल्यानंतर स्पष्ट झाले. तो आणि त्याचा मित्र जिजू जनार्दन या बुकीचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील खोल्यांमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोधमोहीम सुरू केली आहे. श्रीशांत व जिजूचे लॅपटॉप, आयपॅड, मोबाइल, डाय-या जप्त करण्यात आल्या असून, त्या आधारे दिल्ली पोलिसांप्रमाणेच मुंबई पोलिसांनीही खोलात जाऊन तपास सुरू केला आहे. स्पॉटफिक्सिंग प्रकरणाच्या तपासाची माहिती देण्यासाठी पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांच्या मागावर असलेल्या मुंबई गुन्हे शाखेने वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील श्रीशांत राहात असलेल्या पंचतारांकीत हॉटेलमधील खोल्यांमध्ये शोधमोहीम राबवली. श्रीशांतच्या खोलीतून अॅपल कंपनीचा लॅपटॉप, अॅपल कंपनीचा एक आयपॅड, ब्लॅकबेरी कंपनीचा मोबाइल, एक सीमकार्ड, तीन डाय-या, ७२ हजार २९० रोख रक्कम जप्त केले. जिजूच्या खोलीतून ब्लॅकबेरी कंपनीचा मोबाइल, अॅपल कंपनीचा आयपॅड आदी साहित्य जप्त केल्याचे रॉय यांनी सांगितले. न्यायालयाकडून मिळालेल्या परवानगीनुसार या साहित्याची तपासणी करण्यात येईल. याशिवाय या हॉटेलच्या सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत असून त्याच्या सहाय्याने श्रीशांत व जिजूला कोण-कोण भेटायला आले होते, याची तपासणी करण्यात येणार आहे, असे रॉय म्हणाले. गुन्हे शाखेने अटक केलेले रमेश बजरंगलाल व्यास (५२), पांडुरंग गोविंद कदम (४१) व अशोक लचपतराय व्यास(३२) हे तीनही बुकी बनावट सीमकार्डच्या सहाय्याने पाकिस्तान व दुबईतील बुकींचे दूरध्वनी भारतातील बुकींना जोडून देत होते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. या बुकींच्या चौकशीद्वारे शनिवारी मुलुंड परिसरातून पंकज शहा उर्फ बब्बू(५२) या आणखी एका बुकीला अटक केली. दरम्यान, याप्रकरणी मोक्का कायदा लावणे शक्य झाले, तर सर्व आरोपींविरोधात या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. बुकींची चर्चा ऐकून करायचा बेटिंग गुन्हे शाखेने अटक केलेला रमेश व्यास हा आरोपी भारतीय बुकी व दुबई-पाकिस्तानातील बुकींमध्ये दुव्याचे काम करायचे. त्यासाठी ३० लाइन व ९२ मोबाइलचा वापर होत असे. पण या बुकींचे बोलणे तो चोरून ऐकायचा आणि त्यानुसार जिंकत असलेल्या टीमवर पैसे लावायचा. श्रीशांत वेगळा राहिलाच कसा? राजस्थान रॉयल्सची सर्व टीम ट्रायडंट हॉटेलमध्ये राहिली असताना श्रीशांतला मात्र वेगळे राहण्याची परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. ही बाब चक्रावणारी असून, त्याचा तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. श्रीशांतच्या डाय-यांमध्ये महत्त्वाचे धागेदोरे? श्रीशांतच्या खोल्यांमधून जप्त करण्यात आलेल्या तीन डाय-यांमध्ये हिंदी व मल्याळम भाषेत लिखाण करण्यात आले आहे. या डाय-यांमध्ये नेमके काय लिहिले आहे, याचा तपास सुरू असून, त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात, असा विश्वास पोलिसांना आहे. 'बीसीसीआय, आयपीएलला माहितीच्या अधिकारात आणा' बीसीसीआय आणि आयपीएलला माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पंकज शर्मा यांनी शनिवारी केली. आयपीएलमुळे देशाचे नाव खराब झाले आहे. त्यामुळे आयपीएलच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची गरज आहे. आयपीएल व त्याच्या संबंधित कंपन्यांना माहिती अधिकार कायदा लागू करावा, असे शर्मा यांनी सांगितले. Read More »
चिन्नास्वामी स्टेडियमवर आग आणि पाऊस
चिन्नास्वामी स्टेडियमवरील गेट क्रमांक ९ वर शनिवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तर संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाचा फटका चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स लढतीला बसला. बंगळूरु- चिन्नास्वामी स्टेडियमवरील गेट क्रमांक ९ वर शनिवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मात्र ही आग किरकोळ असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले. दरम्यान, येथे संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाचा फटका चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स लढतीला बसला. Read More »
विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भात सूर्य आग ओकत असून शनिवारी नागपूरमध्ये या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश तापमान नोंदवले गेले. नागपूर- विदर्भात सूर्य आग ओकत असून शनिवारी नागपूरमध्ये या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश तापमान नोंदवले गेले. संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट पसरली असून नागरिकांना दैनंदिन कामकाज करणे अवघड बनले आहे. असह्य उकाडय़ाने नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. यंदा विदर्भातील वाढत्या तापमानामुळे विदर्भ भाजून निघत आहे. नागपूर शहरात शनिवारी ४७ अंश तापमान नोंदले गेले. चंद्रपूर ४६.६, ब्रह्मपुरी ४६.६, बुलडाणा ४६.५, वर्धा ४६, अकोला ४५.६, गोंदिया ४५.१ अंश तापमान नोंदवले गेले, अशी माहिती हवामान खात्याने दिली. कडक उन्हामुळे नागरिक सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घरात राहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे बाजारपेठा ओस पडलेल्या दिसत आहेत. Read More »
६४ गिर्यारोहकांकडून 'एव्हरेस्ट' सर
जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट शनिवारी तब्बल ६४ गिर्यारोहकांनी सर केले. कोलकाता- जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट शनिवारी तब्बल ६४ गिर्यारोहकांनी सर केले. त्यात ३५ परदेशी गिर्यारोहकांचा समावेश होता. सौदी अरेबियाच्या राहा मोहरक या महिलेनेही हे शिखर सर केले. ती एव्हरेस्ट सर करणारी सौदी अरेबियाची पहिलीच महिला आहे. बंगालची महिला गिर्यारोहक चंदा गायेन हिनेही हे शिखर सर केले. ३० वर्षीय चंदा गायन ही हावडा येथील रहिवासी आहे. १९९४ मध्ये दार्जिलिंग येथील कुंगा भुतिया हिने तर २००४ मध्ये मुर्शीदाबाद येथील शिप्रा मुजुमदारने एव्हरेस्ट सर केले होते. Read More »
पाकिस्तानातील २६/११ खटला लांबणीवर
न्यायाधीश चौधरी हबीब-उर-रेहमान रजेवर गेल्याने पाकिस्तानमध्ये सुरू असलेला २६/११ दहशतवादी हल्ला खटला २५ मेपर्यंत तहकूब करण्यात आला आहे. इस्लामाबाद- न्यायाधीश चौधरी हबीब-उर-रेहमान रजेवर गेल्याने पाकिस्तानमध्ये सुरू असलेला २६/११ दहशतवादी हल्ला खटला २५ मेपर्यंत तहकूब करण्यात आला आहे, अशी माहिती न्यायालयाच्या सूत्रांनी दिली. तसेच या खटल्यातील सरकारी वकील चौधरी झुल्फीकार अली यांच्या हत्येनंतर पर्यायी वकील अजूनही सरकारने दिलेला नाही. Read More »
पंतप्रधान लवकरच अमेरिकेच्या दौ-यावर
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधानांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे. नवी दिल्ली- पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग लवकरच अमेरिकेच्या दौ-यावर जाणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधानांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे. अमेरिकेचे डेप्युटी सेक्रेटरी विल्यम बर्न्स यांनी पंतप्रधान डॉ. सिंग यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीला पंतप्रधान जाणार असून त्याचवेळी हा दौरा होण्याची शक्यता आहे. ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सिंग हे दुस-यांदा अमेरिकेचा दौरा करणार आहेत. दरम्यान, तिस-या जगातील देशांमध्ये सामाजिक व विकास कामे करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करणार आहे, असे यूएसएडच्या सहाय्यक प्रशासक निशा बिसवाल यांनी अमेरिकी कॉँग्रेसच्या परदेशी व्यवहार समितीला सांगितले. भारत हा म्यानमारमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याने त्यांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे भारत व अमेरिकेने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. Read More »
चीनचे पंतप्रधान भारत दौ-यावर
चीनचे पंतप्रधान ली केकियांग रविवारपासून भारत दौ-यावर येत असून या दौ-यात सीमाप्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. बीजिंग- चीनचे पंतप्रधान ली केकियांग रविवारपासून भारत दौ-यावर येत असून या दौ-यात सीमाप्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने काही घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर केकियांग यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. केकियांग यांच्यासोबत उद्योजकांचे मोठे शिष्टमंडळ येणार आहे. या दौ-यात ते मुंबईलाही भेट देणार आहेत. दोन्ही देशातील व्यापारी संबंध अधिक वाढीस लागण्यासाठी आणि भारतीय मालाला चीनमध्ये अधिक वाव देण्याच्या हेतूने केकियांग हे खास योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. लडाखमध्ये झालेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर सीमावादावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत वगळता १४ पैकी १३ देशांशी चीनने सीमावाद सोडवला आहे, असे मत चीनच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास संशोधन केंद्राचे प्रमुख व्हिक्टर गाओ झिकाई यांनी सांगितले. Read More »
व्हीडीओ गेमच्या स्फोटात बालकाचा मृत्यू
व्हीडीओ गेम खेळत असताना त्याचा स्फोट होऊन त्यात जखमी झालेल्या एका सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. सांगली- व्हीडीओ गेम खेळत असताना त्याचा स्फोट होऊन त्यात जखमी झालेल्या एका सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना विटा तालुक्यातील घानवड या गावी घडली. इस्लामपूर येथे राहात असलेला शुभम राजमाने आपल्या आजोळी विटा तालुक्यातील घानवड गावी आला होता. गुरुवारी दुपारी तेथे व्हीडीओ गेम खेळत असताना अचानक त्या गेमचा स्फोट होऊन त्याचे काही तुकडे शुभमच्या छातीत घुसल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा तेथे मृत्यू झाला. खेळण्याच्या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Read More »
राशिभविष्य, १९ मे २०१३
दैनंदिन राशिभविष्य… Read More » | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Showing posts with label कमाल. Show all posts
Showing posts with label कमाल. Show all posts
Monday, May 20, 2013
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
Subscribe to:
Posts (Atom)