|
श्वेतप्रदर आणि घरगुती उपाय
| कित्येक महिलांना अंगावरून पाणी जाणं किंवा श्वेतपदराच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. मात्र कित्येकदा याकडे महिला दुर्लक्षच करताना दिसतात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. मुळात असं का होतं, आणि त्यावर घरच्या घरी उपाय कसे करावेत याविषयी जाणून घेऊ. उमाच्या पोटात खूप दुखत होतं. तिला काहीही काम करणं मुश्कील वाटायला लागलं होतं. तिच्या अंगावरून पाणी जात होतं. त्यामुळे तिला काहीसा थकवाही जाणवत होता. दोन दिवस झाले तरीही ही समस्या काही कमी होत नव्हती म्हणून मग तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांनी दिलेल्या औषधांमुळे तिला त्वरित आराम पडला. मात्र ती डॉक्टरांकडे गेली नसती तर मात्र या समस्येने गंभीर रूप धारण केलं नसतं.
श्वेतप्रदर हा काही गंभीर आजार नाही. तर गर्भाशयाशी संबंधित ही समस्या असल्यानं मानलं जातं. ही समस्या सर्वसामान्यपणे महिलांमध्ये आढळते. त्यात योनीमार्गातून अंगावरून पांढरा स्रव बाहेर पडतो. त्यालाच अंगावरून पांढरं जाणे, पाणी जाणे किंवा श्वेतप्रदर असं म्हणतात. हा स्रव कधी कधी निळसर, पिवळा, दुधाप्रमाणे, गुलाबी, घट्ट आणि कधी कधी काळ्या रंगाचाही असतो. सर्वसाधारणपणे पांढरा-पारदर्शक स्रव बाहेर जातोच, मात्र वरीलप्रमाणे त्यात रंग दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्यावी. नाही तर हा आजार गंभीर आजाराचं स्वरूप धारण करतो.
लक्षणं
- योनीमार्गातून पांढरा, चिकट स्रव बाहेर पडणं
- योनीमार्गात खाज येणं
- कंबर दुखणं
- चक्कर येणं
- अशक्तपणा जाणवणं
- बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
- डोकं दुखणे
- पोट फुगणे
कारणं
- थंडी वाजल्याने
- शरीराची स्वच्छता न राखल्याने
- गर्भाशयाला सूज येणं,
- वारंवार गर्भपात करणं,
- अधून मधून अंगावरून रक्त जाणं,
- अधिक मसालेदार पदार्थाचं सेवन करणं..
काय काळजी घ्यावी?
- दररोज योनीमार्गाची स्वच्छता राखणं आवश्यक असतं.
- प्रत्येक वेळी मूत्रविसर्जनानंतर ती जागा स्वच्छ पाण्याने धुणं आवश्यक आहे.
- शरीरसंबंधांनंतरही स्वच्छता राखणं आवश्यक आहे.
उपाय काय कराल?
- केळं खाऊन त्यावर मध घातलेलं दूध प्यायल्याने लगेच आराम पडतो. कारण केळं आणि दूध हे एक चांगलं डाएट समजलं जातं.
- कच्च्या केळ्याची भाजी किंवा दोन पिकलेल्या केळ्यांमध्ये मध घालून खाल्ल्यानेही आराम पडतो. पिकलेल्या केळ्यात साखर घालून खाल्ल्यानेही आराम मिळतो.
- डाळिंबाची ताजी पानं दहा-बारा काळी मिरीसोबत कुटायचं आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घालून ठेवा नंतर गाळून हे पाणी सकाळ-संध्याकाळी घेतल्याने आराम पडतो.
- शंभर ग्रॅम मूगडाळ तव्यावर चांगली भाजून त्याची पूड करून घ्यावी. त्यानंतर दोन मूठ पाणी एक कप पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून मूगडाळीचं चूर्ण पाण्यात घालून ते पाणी प्यावं.
- जिरं भाजून ते साखरेसोबत खाल्ल्यानेही आराम मिळतो.
- एक मोठा चमचा तुळशीचा रस आणि मधाचं चाटण दिवसातून दोनदा घेतल्यानेही आराम मिळतो.
- भाजलेल्या चण्यांमध्ये गूळ किंवा साखर घालून ते खावे आणि त्यावर एक कप दुधात तूप मिसळून प्यावं. आराम पडतो.
- दोन चमचे कांद्याच्या रसात मध मिसळून हे चटण सकाळ-संध्याकाळ घेतल्याने आराम मिळतो.
- पिंपळाच्या दोन-चार पानांचा लगदा करून तो दुधात उकळून प्यावा. या उपयाने स्त्रियांच्या अनेक रोगांवर नियंत्रण मिळतं. उदाहरणार्थ, मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास किंवा मासिक पाळीची अनियमितता.
- गुलाबाची फुलं सावलीत व्यवस्थित सुकवून घ्यावीत. नंतर त्याची बारीक पूड करावी. ही पूड तीन ते पाच ग्रॅम मात्रेत दररोज सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घेतल्याने श्वेतप्रदरापासून सुटकारा मिळू शकतो.
- आवळा सुकवून त्याचं चूर्ण करून घ्यावं. या चुर्णाची तीन ग्रॅम मात्रा दररोज सकाळ-संध्याकाळ घेतल्याने आराम मिळू शकतो.
- काकडीचं बी, काकी, कमळ जिरं आणि साखर समान मात्रेत घ्यावी. ही मात्र दररोज दोन ग्रॅम इतकी घ्यावी. त्यामुळेही लाभ होतो.
- गाजर, पालक, कोबी आणि बिटाचा रस प्यायल्याने गर्भाशयाची सूज नष्ट होते.
- मेथीचं चूर्ण असलेल्या पाण्यात बुडवलेला कपडा योनीमार्गात ठेवल्यानेही आराम मिळतो.
- एक चमचा भरडलेल्या मेथीचं चूर्ण आणि एक चमचा गूळ काही दिवस सेवन केल्याने ही समस्या दूर होते.
- दोन ग्रॅम दुधीच्या मुळांची पूड गाळून घ्यावी आणि दिवसातून तीन वेळा घेतल्याने श्वेतप्रदार आणि रक्तप्रदराचा त्रासही कमी होतो.
- गुलमोहराच्या फुलांचं चूर्ण मधासोबत सकाळी अनशापोटी (काहीही न खाता) आणि रात्रीच्या जेवणापूर्वी एक तास आधी घेतल्यानेही आराम मिळतो.
- इसबगोल दुधात चांगलं उकळावं. त्यात खडीसाखर घालून प्यायल्याने आराम मिळतो.
- शंभर ग्रॅम कुळीथ शंभर ग्रॅम पाण्यात उकळावं. त्यानंतर उरलेलं पाणी गाळून ते पाणी प्यायल्यानेही आराम मिळतो.
|
Read More »
मेरू वक्रासन
| शरीराचा वरचा भाग पूर्ण वळत असल्याने कंबर, पाठ, मान, हात आणि पायालाही चांगलाच ताण मिळतो. अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. पाय सोडून खाली बसावं. पाय सरळ आणि ताठ असावेत. तसंच पाठही सरळ असावी. आता डावा पाय गुडघ्यातून वाकवून उजव्या गुडघ्याजवळ ठेवावा. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे उजव्या बाजूने हाताच्या आधाराने वळा म्हणजेच दोन्ही हात उजव्या बाजूला घेऊन जमिनीवर ठेवावेत. जितकं मागे वळता येईल तितकं मागे जाण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर मानही वळवावी. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे. मग कमरेला सरळ करावे, म्हणजेच पूर्वस्थितीत यावं. दुमडलेल्या पायालादेखील पूर्वस्थितीत आणावं. थोडा वेळ थांबून हेच आसन आता दुस-या बाजूने करावे.
श्वास कसा घ्यावा
- पायाला दुमडताना श्वास घ्यावा.
- कमरेला मागे नेताना श्वास सोडावा.
- आसनस्थितीत श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे असावा.
- पूर्वस्थितीत येताना श्वास घ्यावा.
- पाय सोडताना म्हणजेच दुमडलेला पाय सरळ सोडताना श्वास सोडावा.
आसन करताना घ्यायची काळजी या आसनात शरीराच्या वरच्या भागाला वळवताना घाई करू नये. वळताना दोन्ही हातांच्या साहाय्याने करावे. सुरुवातीला शक्यतो जमेल तितकाच वळवावा. जितकं मागे नेता येईल तितकाचा न्यावा. आसन सोडताना पटकन वळून पूर्वस्थितीत येऊ नका. हळूहळू या. या आसनात मागे वळताना उजवा हात थोडासा वळवावा. म्हणजेच आतल्या बाजूला ज्या दिशेला वळाल त्या दिशेला हात दुमडावा. तसंच मागे वळताना नितंबांना उचलू नये. शक्यतो नितंब उचलली जाणार नाहीत असा प्रयत्न करावा. तसंच जो पाय सरळ असेल त्याचे घोटे बाहेरच्या दिशेला असावेत.
वेळ दहा सेकंद आसनस्थितीत असावे. किमान दोन ते तीन वेळा हे आसन करावे.
फायदे
- मेरू वक्रासन या आसनात मणक्याला चांगलाच व्यायाम मिळतो.
- या आसनाने कमरेवरील चरबी कमी होण्यास मदत होते.
- शरीराच्या वरच्या भागाला चांगलाच ताण मिळतो.
- कंबर, पाठ, मान, हात आणि पायालाही चांगलाच ताण मिळतो.
- हे आसन पाठीचं तसंच मानेचं दुखणं असलेल्या तसंच सायटीकचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अवश्यक करावे, फरक पडेल.
|
Read More »
| |