काय फरक आहे जेनरिक आणि ब्रँडेड औषधांमधे | जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय
generic medicine and branded medicine difference
जेनेरिक औषधे म्हणजे काय? जेनेरिक औषध म्हणजे काय?
एखाद्या आजारावर औषध शोधण्यासाठी कंपन्यांकडून अनेक वर्षे संशोधन केले जाते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शोधल्या गेलेल्या फॉम्र्युलानुसार औषध तयार केले जाते. प्रत्यक्ष औषधाचे उत्पादन करण्याचा खर्च कमी असला तरी संशोधनावर केलेला खर्च भरून काढणे कंपनीला आवश्यक असते. यासाठी या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी फक्त त्या कंपनीलाच देण्यात येतो व ती औषधे कंपनीच्या नावाने (ब्रॅण्ड नेम) बाजारात येतात. या कालावधीत संशोधनाचा खर्च वसूल झाल्यावर इतर औषध कंपन्याही ही औषधे तयार करू शकतात. या औषधात वापरलेल्या रासायनिक संयुगावरून ती औषधे ओळखली जातात.
जेनेरिक औषध |
का स्वस्त आहेत जेनेरिक औषधे?
जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने आधीच वसूल केलेला असतो. त्यामुळे केवळ औषधनिर्मितीच्या उत्पादन खर्चानुसार त्यांची किंमत ठरवली जाते. अर्थातच ही किंमत मूळ ब्रॅण्डेड औषधांपेक्षा खूप कमी होते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डेड औषधांची किंमत त्यांच्या जेनेरिक उत्पादनांपेक्षा सर्वसाधारणपणे पाच ते दहा पट महाग असल्याचे दिसते.
काय समस्या आहेत जेनरिक औषधांमध्ये ?
विविध कंपन्यांकडून त्यांच्या औषधविक्रीचे प्रमाण वाढवण्यासाठी डॉक्टरांना सवलती, भेटवस्तू दिल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे काही डॉक्टर जेनेरिक औषधांऐवजी संबंधित कंपन्यांची ब्रॅण्डेड औषधे लिहून देतात, असा आरोप केला जातो. मात्र सर्वच डॉक्टरांबाबत हे खरे नाही. जेनेरिक औषधे लिहून देण्यास हरकत नाही. मात्र अमेरिकेतील एफडीएप्रमाणे भारतातील एफडीए कार्यरत नाही, हे वास्तव आहे. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्याने जेनेरिक औषधांची गुणवत्ता तपासून पाहिली जात नाही. ही औषधे योग्य प्रकारे तयार केली गेली नसल्यास त्याचा अपाय होण्याची शक्यता अधिक. अशा वेळी रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न डॉक्टर विचारत आहेत. तक्रार आल्यास एफडीए कारवाई करणार असली तरी मुळात रुग्णाच्या जिवाचा धोका कसा पत्करणार, अशी शंका डॉक्टरांना आहे.
बरेच डॉक्टर ब्रँडेड कंपन्यांच्या नादाला लागून त्यांच्याच कंपन्यांची महाग असलेली औषधे लिहून देतात परंतु त्यांची खरंच काहीही गरज नसते.
त्यामुळे त्या ब्रँडेड कंपन्यांच्या कारभाराला लावण्यासाठी काही वेगळे करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी डॉक्टरांकडे गेल्यावर जेनेरिक औषधे देण्याविषयी आग्रह धरावा .
जेनेरिक औषधांबद्दल माहिती असलेली पीडीएफ कोणाजवळ असेल तर त्याने कमेंट शिक्षण मध्ये कमेंट करा.
जेनेरिक औषधांबद्दल पुस्तकं बद्दल मराठीत माहिती हवी असल्यास या वेबसाईटला नक्की भेट द्या जेनेरिक औषधांची माहिती मराठी
generic medicine and branded medicine difference
No comments:
Post a Comment