Monday, July 18, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

विपरीतकरणी आसन

विपरीतकरणी हे आसन सर्वागासनासारखेच आहे. सर्वागासनात आपण पाय आणि पाठ सरळ उंच दिशेत रेषेत ठेवतो तर विपरीतकरणीमध्ये गळ्यापासून ते वपर्यंतचा (बैठकीपर्यंतचा) भाग हा जमिनीकडे झुकलेल्या अवस्थेतच ठेवतो.

योगा मॅटवर पाठीवर झोपावे. शरीर हे सरळ एका रेषेत असावे. तसेच दोन्ही पाय सरळ आणि ताठ असावेत. दोन्ही हात शरीरालगत असावे. पूर्ण शरीराला रिलॅक्स ठेवावे. आता हळुवारपणे दोन्ही पायांना वर उचलावे.

चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांच्या साहाय्याने नितंबांना उचलून तोल सांभाळावा आणि दोन्ही पाय एकत्र असावेत. हनुवटी छातीला स्पर्श करू नये. पाय हे ४५ अंशांवर उचलावे. काही सेकंद आहे त्याच स्थितीत राहावे आणि हळुवारपणे आसन सोडावे. थोडा वेळ रिलॅक्स राहावे.

श्वास

» सुरुवातीच्या स्थितीत श्वास घ्यावा.

» शेवटच्या स्थितीत श्वास रोखावा अथवा नियमित श्वासोच्छ्वास असावा.

वेळ

»  सुरुवातीला हे आसन करताना काही सेकंदच थांबावे. हळूहळू आकडे वाढवावेत.

आसन करताना घ्यायची काळजी

हे आसन करताना घाई करू नये. प्रथम पूर्ण शरीराला रिलॅक्स करावे. मगच हे आसन करावे. दोन्ही पायांना वरती नेताना हळुवारपणे न्यावे. दोन्ही पाय सरळ आणि ताठ असावेत. आता अलगदपणे हातांच्या साहाय्याने नितंबांना पकडून किंवा पाठीला पाठिंबा देऊन पायांना उंच करावे.

पायांना वरती नेताना घाई करू नये. नाहीतर पाठीला क्रॅम्प येऊ शकतो. जितका वेळ आसनास्थितीत राहता येईल तितकाच वेळ राहा. जशी आसनाची सुरुवात करतो अगदी त्याच पद्धतीने आसन सोडावे. जमत नसल्यास प्रथम पायांना वाकवावे आणि पाय पोटाजवळ आणून अलगदपणे पाय जमिनीवर ठेवावे.

फायदे

» पायावरील सूज कमी होते.

» दृष्टी सतेज बनते.

» या आसनाने रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे शरीर सुंदर, आकर्षक आणि बलवान बनते.

हे आसन सर्वागासनास मिळते-जुळते आहे. म्हणून जे फायदे सर्वागासनास या आसनाने मिळतात तेच या आसनाने सुद्धा मिळतात.

Read More »

वाढलेले वजन नराश्याचे कारण

लठ्ठपणाचा खिन्नतेशी फार मोठा संबंध आहे. कारण वजन आणि खिन्नता या दोन्ही कारणांमुळे अनेक प्रकारच्या मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. खिन्न असलेल्या लोकांची जीवनशैली बैठी असल्याचे दिसून येते व खाण्याच्या सवयीदेखील चांगल्या नसतात, जसे अति खाणे ज्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागतो.

चांगल्या पगाराची नोकरी, प्रेमळ कुटुंब आणि काळजी घेणारा मित्रपरिवार.. २७ वर्षीय फॅशन डिझायनर अंकिता गर्गचे नराश्यग्रस्त होण्यापूर्वीचे जीवन एकदम आनंददायी होते. परंतु हे सगळे तिला खिन्नता येण्यापूर्वीचे जीवन होते. प्रसन्नचित्त स्वभावाच्या अंकिताचे वागणे आता सतत उदासीन व नकारात्मक असल्याचे जाणवत होते. ती मित्र-परिवार व कुटुंबातील सदस्यांबरोबर राहाणे टाळत होती.

घरात एकटंच राहणे, कोणातही मिळून मिसळून राहणे पुढे पुढे टाळू लागली. तिच्या अशा वागण्याने तिच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर असे लक्षात आले की तिच्या नराश्याच्या लक्षणांमागे प्रामुख्याने तिचे वाढलेले वजन कारणीभूत आहे.

लठ्ठपणाचा खिन्नतेशी फार मोठा संबंध आहे. कारण वजन आणि खिन्नता या दोन्ही कारणांमुळे अनेक प्रकारच्या मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. लठ्ठ लोक विशेषत: महिला अनेकदा स्वत:ला कमी लेखतात. परिणामी त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाची कमतरता व उदासीनता दिसून येते.

याशिवाय खिन्न असलेल्या लोकांची जीवनशैली बैठी असल्याचे दिसून येते व खाण्याच्या सवयीदेखील चांगल्या नसतात, जसे अति खाणे ज्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागतो.
लठ्ठपणाचा जागतिक दर दुप्पट झालेला आहे. जगामध्ये मृत्यूच्या महत्त्वपूर्ण कारणांमध्ये लठ्ठपणा हा पाचव्या क्रमांकावर आहे.

कमी वजनाच्या लोकांपेक्षा लठ्ठ लोकांचे मृत्यू अधिक होताना दिसतात. दुसरे म्हणजे यामुळे संपूर्ण जगभरातील ३५० दशलक्ष लोकांमध्ये खिन्नतेचा प्रभाव देखील असल्याचा अंदाज काढण्यात आलेला आहे.

आरोग्याच्या धोक्याबाबत बोलायचे झाल्यास घेतलेल्या कॅलरीज, न खर्च केलेल्या कॅलरीज यामध्ये ऊर्जेचा जो असमतोल असतो, त्यामुळे लठ्ठपणा येतो. वास्तविक शरीरामधील कॅलरीमध्ये वाढ होते व त्याबरोबर पुरेसा शारीरिक व्यायाम होत नाही, त्यामुळे शरीरात जास्तीचा मेद वाढीस लागतो. लठ्ठ लोकांना खिन्नतेचा धोका अधिक असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अति खाण्याव्यतिरिक्त, शारीरिक हालचालीची कमतरता व असमाधान यामुळे वजन वाढते. त्यामुळे खिन्नता येते व अशा लोकांच्या रक्तातील कॉर्टसिॉल संप्रेरकाची पातळी अनियमित राहाते. यामुळे अति खाणे व मेदयुक्त उतीचे उत्पादन वाढते.

जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल केल्याने शरीराचे वजन योग्य ठेवण्यास मदत होत असली तरी देखील संप्रेरकाच्या (हार्मोन समस्या) अनुवंशिक किंवा गुडघ्यांच्या समस्या ज्यामुळे शारीरिक हालचाली कठीण होतात. त्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रियादेखील कठीण होते व काही वेळा अशक्य होते आणि अशा वेळी बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेसारख्या वैद्यकीय प्रक्रिया महत्त्वाचे कार्य करतात.

अत्यंत लठ्ठ असलेल्या लोकांमध्ये आहारातील बदल किंवा व्यायामामुळे फायदा होत नाही किंवा त्यांच्या लठ्ठपणास एखादे आजारपण कारणीभूत असते तेव्हा अशा लोकांसाठी बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेचा पर्याय असतो. थोडाफार शारिरिक व्यायाम, निरोगी आहार व पूरक अन्न यांच्या जोडीने बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी होण्यामध्ये उपयुक्तदिसून येते.

व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होणा-या परिणामांवर आधारित एक वर्षाचा अभ्यास पबमेडमध्ये प्रकाशित करण्यात आला त्यानुसार, बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर महिला रुग्णांमध्ये खिन्नता कमी झाल्याचे उघडकीस आले आहे. बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी करण्याची व खिन्नतेचे व्यावस्थापन करण्याची परिणामकारक पद्धती असल्याचे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झाले आहे.

अलीकडे झालेल्या वैद्यकीय प्रगतीमुळे बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेसारखी गुंतागुंतीची पद्धती कमी आक्रमी, सुरक्षित आणि अत्यंत परिणामकारक असल्याचे दिसून येतं. बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया एक तर जठराचा आकार (गॅस्ट्रिक बँडिंग) कमी करून, कॅलरी घेण्यावर नियंत्रण मिळवून एकंदर जठरामध्ये जाऊ न देण्याचा (रॉक्स-एन-वाय) उपाय करण्याचे काम करते किंवा जठराचा भाग (स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी) काढून टाकते. तिन्ही पद्धतीमध्ये थोडाफार फरक असला तरीदेखील तिन्ही प्रकारांमध्ये जठरांमध्ये जठराचा आकार कमी होतो. ज्यामुळे अन्न घेणे कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

Read More »

डिस्टोनियातून बरे व्हा!

डिस्टोनिया या न्यूरॉलॉजिकल मूव्हमेंट डिसऑर्डरचे निदान झालेल्या रुग्णांना हालचाल करता येत नाही, सामाजिक बट्टय़ा लागतो आणि कौटुंबिक आयुष्यात अडचणी येतात. परंतु, या शक्यता नाहीशा झाल्या असून त्यावर उपचार करणं आता शक्य झालं आहे.

डिस्टोनियाचा तीव्र त्रास असलेला ३५ वर्षीय रुग्ण सर्वसाधारण जीवन जगत होता. त्याच्या मुलीच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी, अनच्छिक रीपिटेटिव्ह ट्विस्टिंग आणि सतत स्नायूंचे आकुंचन यामुळे त्याला डिस्टोनियाने घेरण्यास सुरुवात झाली. त्याच्यावर विविध उपचार करण्यात आले, स्नायूंना येणारे झटके नियंत्रित करण्यासाठी बॉटय़ुलिनम इंजेक्शन देण्यात आली. त्यांची झपाटय़ानं बिघडती तब्येत आटोक्यात ठेवण्यासाठी असंख्य फार्मा एजंटची मदत घेण्यात आली. त्यांना आमच्याकडे आणण्यात आले तेव्हा आम्ही डीप-ब्रेन स्टिम्युलेशन सुचवले. यास ब्रेन पेसमेकर असेही म्हणतात.

न्यूरोसर्जरीचे हे स्पेशलाइज्ड रूप आहे आणि ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) व औषधांनी नियंत्रित न होणारे डिप्रेशन नियंत्रित करण्यामध्ये ते प्रभावी सिद्ध झाले आहे. दोन आठवडे इतक्या अल्प काळात रुग्ण या आजाराच्या स्थितीतून बाहेर आलाच, शिवाय त्यास सर्वसाधारण कौटुंबिक व सामाजिक जीवन जगता येऊ लागले असून लवकरच रुग्ण त्याच्या प्रोफेशनमध्येही पुन्हा परतण्याची आशा आहे.

गेल्या काही वर्षात, पाíकन्सनच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठीही डीप-ब्रेन स्टिम्युलेशन अतिशय उपयुक्त ठरत आहे. आम्ही सर्वोत्तम आधुनिक इंट्रा-ऑपरेटिव्ह न्यूरोमॉनिटिरग उपकरणांचा वापर केला आहे. पहिल्या दिवसापासून, त्यांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांना स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण मिळवता आले आहे आणि ते क्रिकेटसारखे खेळही खेळू शकतात. यातून त्यांची तब्येत झपाटय़ाने पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येते.

देशात डिस्टोनियावर उपचार करण्यासाठी उपकरणांची अनुपलब्धता आहे. गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल आणि अन्य वैद्यकीय डिसऑर्डरवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांचे स्थानिक स्तरावर उत्पादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया मोहिमेत सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे.

डिस्टोनियासारख्या न्यूरोलॉजिकल आजारांवर उपचार करण्यासाठी उपकरणे व साधने यांचे स्थानिक स्तरावर उत्पादन करणे गरजेचे आहे, जेणेकरून उपचारांच्या खर्चात प्रचंड घट होईल आणि देशातील लाखो रुग्णांना फायदा होईल.

डिस्टोनिया म्हणजे न्यूरॉलॉजिकल मूव्हमेंट डिसऑर्डर असून त्यामध्ये स्नायूंच्या आकुंचनामुळे हालचाली निर्माण होत नाही. त्यामुळे रुग्णाची स्थिती अवघडल्यासारखी होते. डिस्टोनियासाठी ऐच्छिक हालचाली हे प्राथमिक कारण असते आणि त्याची लक्षणे अन्य स्नायूंमध्येही दिसून येऊ शकतात.

अनुवंशिक घटकांमुळे किंवा जन्माशी संबंधित कारणांनी, फार्मास्युटिकल औषधांमुळे झालेली विषबाधा वा रिअ‍ॅक्शन या कारणांनी डिस्टोनिया होऊ शकतो. डिस्टोनियासाठीचे उपचार रुग्णांच्या गरजांनुसार ठरवावे लागतात आणि त्यामध्ये तोंडाद्वारे औषधे, बॉट्युलिनम न्यूरोटॉक्सिन इंजेक्शन आणि डीप ब्रेन स्टिम्युलेशन यासारख्या सर्जकिल उपचार यांचा समावेश असू शकतो. त्याच्या जोडीला फिजिकल थेरपीही वापरता येऊ शकते.

Read More »

वेळेत निदान कोडापासून बचाव

कोड हा असा आजार आहे ज्याला सोपा इलाज नाही. परंतु आरंभीच्या अवस्थेमध्ये निदान आणि उपचार झाल्यास हा रोग कमी करता येऊ शकतो आणि तो पसरण्यावर नियंत्रण आणता येतं. हा रोग संसर्गजन्य नाही आणि प्राणघातकही नाही.

मानवाच्या त्वचेतील मेलॅनिन पेशी किंवा रंग निर्माण करणा-या पेशी योग्य प्रकारे कार्यरत नसतात तेव्हा कोड नावाचा रोग होतो. आरंभीच्या अवस्थेमध्ये फिक्कट रंगाचे ते दुधी-पांढ-या रंगाचे भाग दिसू लागतात, जे हळूहळू आकाराने वाढत जातात किंवा शरीराच्या दुस-या भागात दिसू लागतात. त्यामुळे शरीराच्या त्वचेवर परिणाम होतो. तसाच परिणाम टाळू, ओठ आणि जननेंद्रियांवर दिसून येऊ शकतो.

इतर अनेक त्वचारोगांप्रमाणेच कोडाशी संबंधित प्राथमिक आव्हान मानसिक आहे. सर्वदूर पसरलेले गरसमज, क्षयरोगाबरोबर त्याची गल्लत, मर्यादित समज आणि लोकांच्या संवेदनाशून्य शंका यामुळे रोग्याला समाजात वावरताना फार त्रासदायक होते. कोडाने ग्रस्त असलेले भारतीय सामान्यपणे कमी आत्मविश्वास, काळजी, शरम, राग आणि कधी कधी गंभीर निराशेचे बळी ठरलेले आढळून येतात. पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना सारख्याच प्रमाणात होणारा हा रोग अंदाजे २% भारतीय लोकसंख्येमध्ये आढळतो.

ब-याचशा लोकांत वयाच्या चाळीसाव्या वर्षापूर्वी त्वचारोग (कोड) होतो. साधारण निम्म्या लोकांत तो वयाच्या २० वर्षापूर्वीच होतो. त्वचारंजकपेशींचं कार्य परिणामकारकपणे का होत नाही हे काही ठरावीक नाही. तरीही, त्यात काही घटक असतात जे बहुधा जबाबदार असू शकतात. त्यातील काहींमध्ये अनुवंशिकशास्त्र, सदोष रोगप्रतिकार प्रणाली जी स्वत:च्या पेशींवरच हल्ला करते (स्वयं-प्रतिकार) आणि वाढलेले फ्री रॅडिकल-इंडय़ूस्ड डॅमेज (ऑक्सिडीकर तणाव) यांचा समावेश होतो.

त्वचेला झालेली जखम आणि सूर्यप्रकाशाने होणारा त्वचेचा तीव्र क्षोभ हे इतर काही घटक आहेत ज्यामुळे शरीरावर कोडाचे डाग उठू शकतात. ४०% प्रकरणांत, अनुवंशिकतेमुळे त्वचारोग दिसून येत असला तरी, अशीदेखील प्रकरणे आहेत ज्यांच्यामध्ये त्वचारोगाचा कोणताही कौटुंबिक इतिहास नसणा-या रुग्णांना पहिल्यांदाच त्वचारोग झालेला आढळून आलेला आहे.

कोड हा असा आजार आहे ज्याला सोपा इलाज नाही. परंतु आरंभीच्या अवस्थेमध्ये निदान आणि उपचार झाल्यास ५०% हून जास्त उदाहरणांमध्ये औषधं आणि फोटो उपचारपद्धतीद्वारे (लाईट उपचारपद्धती) रोग कमी करता येऊ शकतो आणि तो पसरण्यावर नियंत्रण आणता येऊ शकते.

सध्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून कोडाचा गंभीररित्या परिणाम झालेल्या त्वचेवर सुधारणा होण्यासाठी मदत होऊ शकते. यामध्ये तात्कालिक आणि तोंडाने घेण्याची औषधे, सौंदर्यप्रसाधने, लाईटपद्धती वापरून परत पिगमेंटेशन, परिणाम न झालेल्या त्वचेच्या भागाचे पिगमेंटेशन कमी करणे आणि त्वचा रोपण यांचा समावेश होतो.

इतर अनेक त्वचारोगांप्रमाणेच कोडाशी संबंधित आव्हान रोगाचा मानसिक आघात हे आहे. बहुतेक वेळा या रोगाने ग्रस्त लोकांना अनेकदा समाजात सामावून घेतले जात नाही. लग्नासाठी अयोग्य ठरवले जाते आणि अनावश्यक लक्ष्याचे केंद्र ठरतात. याचा माणसावर गंभीर मानसिक आघात होतो. त्याच्या त्वचेच्या स्वरूपामुळे तो निराश होतो.

जागतिक कोड दिनाच्या दिवशी या त्वचारोगासंबंधीचे सर्वसामान्य गरसमज दूर करण्याची तातडीची गरज आहे. हा रोग संसर्गजन्य नाही आणि प्राणघातकही नाही. हा क्षयरोग नाही, जे अनेकदा मानले जाते आणि त्याचा व्यक्तीच्या शारीरिक अंगभूत गुण आणि मानसिक क्षमता यावर कोणताही परिणाम होत नाही. कोडाशी संबंधित सामाजिक कलंक दूर झाला तर हा रोग झालेल्या व्यक्ती सामान्य माणसाप्रमाणेच सर्वसाधारण आणि पूर्णपणे कार्यक्षम आयुष्य व्यतित करू शकतात.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment