Monday, June 6, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

बदलत्या जीवनशैलीचा आजार

मधुमेह हा आजार अनुवंशिकतेव्यतिरिक्त इतरही कारणांमुळे होतो. विशेष म्हणजे आई-वडिलांना हा आजार नसतानाही त्यांच्या मुलांना मधुमेह होण्याची अनेक उदाहरणे सध्या समोर येत आहेत आणि याचं एकमेव कारण म्हणजे चुकीची किंवा बदललेली जीवनशैली.

मधुमेह हा जीवनशैलीचा आजार म्हणून ओळखला जातो. बदललेली आहारपद्धती, कार्यशैली व वाढलेले वजन यामुळे मधुमेहाला आमंत्रण मिळते. मधुमेह हा आनुवंशिकतेनुसार होणारा आजार म्हणूनही ओळखला जायचा. परंतु अलीकडच्या काही अहवालात असं समोर आलं आहे की, हा आजार आनुवंशिकतेव्यतिरिक्त इतरही कारणांमुळे होतो.

विशेष म्हणजे आई-वडिलांना हा आजार नसतानाही त्यांच्या मुलांना मधुमेह होण्याची अनेक उदाहरणे सध्या समोर येत आहेत आणि याचं एकमेव कारण म्हणजे चुकीची किंवा बदललेली जीवनशैली आणि म्हणूनच मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित आजार ओळखला जातो.

सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार :

सकाळी वेळेवर उठणे, व्यायाम किंवा कमीत कमी दिवसांतून ४५ मिनिटं चालणे, एकाच जागी बैठय़ा स्वरूपातील कामकाज पद्धती असल्यास प्रत्येक तासाला थोडा वेळ फेरफटका मारून पायांची हालचाल करणं आवश्यक आहे.

शरीराच्या अवयवांची योग्य हालचाल केल्यास आरोग्य उत्तम राहू शकते व कोणत्याही प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळणार नाही, परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनमानात प्रत्येकांचे दैनंदिन जीवनमान हे घडय़ाळ्याच्या काटय़ानुसार चालते.

विशेष म्हणजे कामाच्या वेळाप्रत्रकात होत असलेले बदल, शिफ्टपद्धती, मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना कामानिमित्त सतत बाहेर फिरावे लागणे अशा अनेक कारणांमुळे बाहेरचे खाणे, व्यायाम, योगा, चालणे आदींसाठी वेळ न मिळणे व या सर्व घटकांमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, घुडघ्याचे आजार, मणक्याचे आजार, लठ्ठपणा आदी आजारांना निमंत्रण मिळत असल्याचं समोर आलं आहे.

सध्या घरी बनवलेल्या नाश्त्यापेक्षा केलॉग्ज, फ्रुट ज्युसेस, प्रक्रिया करून बनवलेले पदार्थ, ताक, बदाम शेक आदी पदार्थ आरोग्यास घातक असल्याचं दिसून आलं आहे व याच पदार्थाचा आपल्या नाश्त्यापासून ते जेवणामध्ये झालेले अतिक्रमण पाहायला मिळतं. या पदार्थामध्ये मीठ, तेल, मैद्याचा वापर असल्याने अति कॅलरीज, फॅट आदींमुळे कॉलेस्ट्रॉलचे शरीरातील वाढणारे प्रमाण धोकादायक आहे.

उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार व योग्य दिनक्रम आवश्यक

बरेचदा वाढलेलं वजन घटवण्यासाठी रुग्ण नाश्ता किंवा दुपारचं जेवण न घेताच राहतात, परंतु त्यामुळे वजन आटोक्यात येण्याऐवजी अधिक वाढू शकते, म्हणूनच सकाळच्या नाश्त्यांचं योग्य प्रमाणात कॅलरीज/ काबरेहायड्रेट असलेलं पदार्थ नाश्त्यात असणं आवश्यक आहे.

व्यायाम

सकाळी कमीत कमी ४५ मिनिटं चालणं आवश्यक आहे. व्यायाम करत असल्यास २० मिनिटं कार्डियो व २० मिनिटे इतर शारीरिक व्यायाम केल्यास अधिक चांगले.

नाश्त्यासाठी

सकाळी ९ ते १० च्या सुमारास नाश्ता करणे आवश्यक. नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्य, दूध, फळ, अंडी (पिवळे बलक काढून टाकावे), ड्रायफ्रुट, बदाम, आक्रोड यांचा समावेश असावा, यामुळे प्रोटिन, कबरेदके, फायबर मिळतात.

दुपारच्या वेळी सोबत घरचं जेवण घेतल्यास बाहेरचं खाणं टाळू शकता व आपलं आरोग्य उत्तम सांभाळू शकता. सलाड, दही, ताक, पोळी-भाजी या पदार्थाचा समावेश असावा.

सायंकाळी-पाच-सहाच्या आसपास चहा अथवा कॉफी (शुगर फ्री) घेतल्यास योग व सोबत डायजेस्टिव्ह बिस्किटे किंवा चणे, कुरमुरे, भेळ आदी पदार्थ खावू शकता.

रात्री ९ च्या आसपास रात्रीचे जेवण घेण अपेक्षित व जेवल्यानंतर थोडं चालल्यास पचन होण्यास मदत होईल.

उत्तम आहारासोबत तितकीच झोप घेणं आवश्यक आहे. दिवसातून ६ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. विशेषत: कॉलसेंटर्स किंवा शिफ्टमधे काम करणा-यांनी याकडे लक्ष दिल्यास आरोग्याचं संतुलन बिघडणार नाही.

तसंच प्रत्येक व्यक्तीने वयाच्या तीस वर्षानंतर दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

Read More »

अर्ध चंद्रासन

अर्ध चंद्रासनास हाफ मून पोझ असंसुद्धा म्हटलं जातं. हे आसन करताना तुम्हाला पहिल्यांदा अश्व संचालनासन या आसनाची प्रॅक्टिस हवी. मगच तुम्ही हे आसन सहजगत्या करू शकता

योगा मॅटर वज्रासन या आसनात बसावं. आता गुडघ्यावर उभं राहावं. हळुवारपणे डावा पाय मागे न्यावा, दोन्ही हात हे पायाच्या बाजूला असावेत. तसंच अलगदपणे मानेला वरती नेता नेता हातांनासुद्धा मागे न्यावं.

हाताला जेवढा ताण देता येईल तेवढा ताण द्यावा. त्याचबरोबर हातांची नमस्काराप्रमाणे स्थिती असावी. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) आसनस्थितीत तोल सांभाळून काही सेकंद थांबावं. थोडा वेळ विश्रांती घेऊन हेच आसन उजवा पाय मागे घेऊन करावं. काही सेकंद थांबून विश्रांती घ्यावी.

श्वास

»  वज्रासनात श्वास नियमित असावा
»  दीर्घश्वास घेत सुरुवातीच्या स्थितीत यावं.
»  श्वास सोडताना पायाला मागे न्यावं.
»  श्वास घेत दोन्ही हातांना मागे न्यावं.
»  अंतिम स्थितीत काही सेकंद श्वासाला थांबवावे.
»  श्वास घेत पूर्वस्थितीत यावं
»  वज्रासनात नियमित श्वास असावा

वेळ

सुरुवातीला पाच ते सात आकडे मोजावेत. जसा जसा तोल सांभाळणं शक्य होईल तसे तसे आकडे वाढवावेत. हे आसन दोन वेळा करावे.

आसन करताना घ्यायची काळजी

अर्ध चंद्रासनामध्ये पायाला मागे नेताना हळुवारपणे न्यावं. जेवढे तुम्ही ताण देऊ शकता तेवढाच ताण द्यावा. सुरुवातीला आसन करताना ताण जितका शक्य होईल तितकाच द्यावा. अधिक ताण देऊ नये.

तसंच दोन्ही हातांना मागे नेताना घाई करू नये. हळुवारपणे हातांना मागे नेताना शरीराचा तोल सांभाळावा. जेवढं शरीराच्या वरील भागाला मागे नेता येईल तेवढंच न्यावं. काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत येताना घाई करू नये.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना गुडघा, घोटा आणि पाठीचं दुखणं असेल त्यांनी हे आसन करू नये.

फायदे

»  अर्ध चंद्रासन या आसनाने मानेला, खांद्यांना, पाठीला आणि छातीला चांगलाच ताण मिळेल.
»  या आसनाने आपला शरीराचा तोल उत्तम सांभाळता येतो.
»  शरीराला चांगलाच ताण मिळतो.

Read More »

लठ्ठपणा आणि डायबेटिस

भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे, सध्या भारतात मधुमेहींचं वाढणारं प्रमाण चिंताग्रस्त करणारं आहे. समाजातील कोणत्याही स्तरात याचं प्रमाण बव्हंशी दिसून येतंच. याचं प्रमाण अतिशय जास्त असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अनुषंगाने येणारे आजार व इतर व्याधी हे जगण्याची ऊर्मी, उत्साह, इच्छा, ताकद वेगाने नष्ट करत जातात. वंध्यत्व, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विविध आजार, गँगरीन होणे, पॅरालिसीस, लिव्हरचे आजार हे सगळे आजार या व्याधीमुळे होतात.

लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा अत्यंत जवळचा संबंध असून त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे सांगताना त्यांचा किती परस्पर संबंध आहे हेही सांगितलं आहे. या दोन्ही समस्या परस्परावलंबी आहेत. या दोन्ही समस्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात एकत्रच आढळतात. याचबरोबर या दोन्ही समस्या तिच्या सर्वागीण पातळीवरही तितक्याच घातक आहेत. या दोन्ही समस्या एकत्र असल्यास त्याला मिथल कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं.

एका अर्थी हे प्राणघातक कॉम्बिनेशन आहे, असेच सूचित करण्यात आले आहे.  भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे, सध्या भारतात मधुमेहींचं वाढणारं प्रमाण चिंताग्रस्त करणारं आहे. समाजातील कोणत्याही स्तरात याचं प्रमाण बव्हंशीच दिसून येतंच. या आजाराला कोणताही भेदभाव मान्य नाही. या आजारामुळे अकाली मृत्युमुखी पडणा-यांची संख्या जास्त आहे.

याचं प्रमाण अतिशय जास्त असून ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अनुषंगाने येणारे आजार व इतर व्याधी हे जगण्याची ऊर्मी, उत्साह, इच्छा, ताकद वेगाने नष्ट करत जातात. वंध्यत्व, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडणीचे विविध आजार, गँगरीन होणे, पॅरालिसीस, लिव्हरचे आजार हे सगळे आजार या व्याधीमुळे होतात. लठ्ठपणाचे किंवा ओबेसीटीचे वर्गीकरण दोन गटात केलं जातं.

सिंपल ओबेसीटी आणि कॉम्प्लेक्स ओबेसीटी अशा दोन भागात याचं वर्गीकरण केलं जातं. सिंपल ओबेसीटी म्हणजे त्यात दुसरा कुठलाही आजार नसतो, परंतु अशा ओबेसीटीचे प्रमाण लाखामध्ये एक व्यक्ती किंवा त्याहीपेक्षा कमी आहे. अतिशय दुर्मीळ असा हा लठ्ठपणा मानला जातो. साधारणत: लठ्ठपणा म्हटलं की, इतर अनेक आजार असतात. यामध्ये वरील सर्व आजारांचा समावेश होतो.

ओबेसीटीची वर्गवारी

भारतीय वंशाच्या लोकांमध्ये ओबेसीटीची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात येते.

»  २३ ते २८ किलोग्रॅम पर मीटर/ स्क्वेअर बीएमआय (उंची आणि वजन यांचं गुणोत्तर) हा ओव्हरवेट म्हणजे लठ्ठ मानला जातो.

»  २८ ते ३२ किलोग्रॅम / स्क्वेअर बीएमआय ही ग्रेड वन ओबेसीटी मानली जाते.

»  ३२ ते ३७ किलोग्रॅम / स्क्वेअर बीएमआय ग्रेड २ ओबेसीटी मानली जाते.

»  ३७ किलोग्रॅम / स्क्वेअर बीएमआयच्या पुढे ग्रेड ३ ची ओबेसीटी मानली जाते.

ओबेसीटीचे दुष्परिणाम

»  वरील वर्णन केलेल्या विविध शारीरिक व्याधी

»  अतिरिक्त वजनामुळे येणारा सांध्यांवरील दाब

»  वय होण्यापूर्वीच सुरू झालेली सांधेदुखी

»  विविध हार्मोनचं असंतुलन वा अनियंत्रण : यामध्ये मुलींमध्ये वेळेवर पाळी न येणे, हार्मोन्स बिघडणे, स्त्रियांमधील वंध्यत्व, गर्भधारणेला बाधा, थायरॉईडच्या समस्या, पुरुषांमध्ये हार्मोन्स असंतुलन, शुक्रजंतूंची वाढ व्यवस्थित न होणे, थायरॉईडचा विकार, छातीची वाढ अवास्तव होणे इत्यादी लक्षणे दिसतात.

»  श्वसनसंस्थेवर पडणारा दाब, हलक्या श्रमानंतर दम लागणे, पाठीवर व्यवस्थित न झोपता येणे, उच्च स्वरामध्ये घोरणे, व्यवस्थित पुरेशी झोप न होणे, सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे ही लक्षणे म्हणजे शरीराला अपलं वाढतं वजन न झेपणारी लक्षणं आहेत.

»  पोटाचा वाढता घेर : हा फक्त सौंदर्याला बाधक ठरत नाही, तर त्यामधून अनेक व्याधी निर्माण होतात हे लक्षात घेतले पाहिजे.

»  ओबेसीटी ही समस्या केवळ दिसण्याशी संबंधित नसून चरबीच्या पेशींशी संबंधित आहे. यात मेदाच्या पेशी या अतिशय जोमाने कार्यरत असतात. त्यामधून शेकडो प्रकारचे द्रव स्त्रवतात. पचनाच्या विविध हार्मोन्सचा परिणाम चयापचय क्रियेवर होत असतो. चयापचय ही अतिशय गुंतागुंतीची क्रिया असून याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ओबेसीटीचा उपचार देणे अत्यंत चुकीचं आहे. ओबेसीटी एक्सपर्ट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपचार घेणेच योग्य असते. हे उपचार दीर्घकळ टिकणारे आणि धोकाविरहीत उपचार असतात.

खालील पद्धतीची उपाययोजना केल्यास ओबेसीटी आणि लठ्ठपणाचा आकार दीर्घकाळ नियंत्रणात ठेवता येतो.

डाएट

»  आहारामध्ये योग्य ते बदल करणे महत्त्वाचे असते; परंतु सर्वासाठी एकच प्रकारचा आहार हा योग्य उपाय नाही. व्यक्तिगणिक चयापचय क्रियेमध्ये बदल होतो, दिनचर्या बदलते, आजार बदलतात आणि सवयी बदलतात. त्यामुळे कोणताही एकच प्रकार आहार सर्वानी खाणं अथवा कोणता तरी एकच उपाय सर्वानी करणं योग्य नसतं.

»  अशा पद्धतीच्या उपचारांना फारसं यश मिळू शकत नाही. किंबहुना अशा प्रकारचे उपचार कित्येक वेळा धोकादायक ठरले आहेत. डाएटमध्ये प्रत्येक व्यक्तीचा प्लान जाणून घेणे, एक्सपर्टकडून त्या आहाराबाबत मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे असते. क्रॅश डाएट किंवा थोडय़ा थोडय़ा काळासाठी डाएट करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

»  कित्येक वेळेला या पद्धतीच्या डाएटमुळे मूत्रिपडाच्या समस्या उद्भवणे, इतर अवयवांचे कार्य नीट न होणे, हाडे ठिसूळ होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, जीवनसत्त्वांची कमतरता जाणवणे इत्यादी आजार उद्भवू शकतात. परंतु अभ्यास करून दिलेला पोषक आहार कायमस्वरूपी घेतला तर त्याचे परिणाम नक्कीच फायदेशीर असतात.

नियमित व्यायाम पद्धती

»  नियमित व्यायामाचा अंतर्भाव रोजच्या दिनचय्रेत असणे आवश्यक असते. एकाच दिवशी चार तास केलेला व्यायाम यापेक्षा दररोज केलेला एक तास व्यायाम जास्त महत्त्वाचा असतो.

»  व्यायाम करत असताना प्रथम आपल्या हृदयाला व गुडघ्यांना कोणत्या पद्धतीचा व्यायाम सुयोग्य असतो हे तज्ज्ञांकडून जाणून घेणे गरजेचे असते. कारण, व्यायाम करतानाच अचानक कोसळून मृत्युमुखी पडणा-यांची संख्या कमी नाही.

विशिष्ट पद्धतीचे औषधोपचार

»  वजन कमी करण्यासाठी जगामध्ये कोणतीही औषधपद्धती अस्तित्वात नाही. सध्या बाजारात दावा केली जाणारी वा जाहिरातीमध्ये दर्शवली जाणारी अशी औषधे धोकादायक मानली जात असून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधांवर बंदी घातली आहे.

»  ज्या लोकांना ग्रेड ३ ओबेसीटी आहे किंवा ग्रेड २ ओबेसीटीबरोबर इतरही काही व्याधी आहेत, अशा व्यक्तींसाठी बेरिएट्रिक सर्जरी वा ओबेसीटी सर्जरी हा अत्यंत प्रभावी, सुरक्षित व शास्त्रोक्त उपाय म्हणून सिद्ध झाला आहे.

»  यामध्ये दुर्बणीद्वारे शस्त्रक्रिया करून पचनसंस्थेच्या रचनेमध्ये काही विशिष्ट बदल केले जातात. या बदलांमुळे अतिरिक्त वजन कमी व्हायला मदत तर होतेच, पण रक्तदाब, मधुमेह असे विकार खात्रीशीररीत्या आटोक्यात येतात.

»  पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर डायबेटिस असेल तर तो कायमस्वरूपी आटोक्यात राहू शकतो, त्याची औषधे कमी होऊ शकतात, त्याचे दुष्परिणाम कमी होतात आणि वरील सर्व आजारांवर होणारा खर्च हा अत्यंत नगण्य होतो. जवळपास ८० टक्के लोकांना डायबेटिससाठी कुठल्याही औषधांची गरज भासत नाही.

»  वरील आजारांनी अकाली मृत्युमुखी पडणा-यांचे प्रमाण हे ९० टक्क्यांपेक्षा कमी होते. याशिवाय वंध्यत्व, न्यूनगंड, मानसिक नराश्य, सांधेदुखी यासारख्या सर्व गोष्टी सहजरीत्या गळून पडतात.

»  दुर्बणीतून ऑपरेशन करण्याची उपचारपद्धत असल्याने ऑपरेशननंतर कुठल्याही पद्धतीच्या विश्रांतीची गरज भासत नाही. तसेच तिसऱ्या दिवशी लोक पूर्ववत दैनंदिन व्यवहार करू शकतात.

»  शास्त्रोक्त पद्धतीचे ज्ञान आणि तंत्र अवगत असणाऱ्या बेरिएट्रिक एक्सपर्टकडून घेतलेले उपचार हे अत्यंत निर्धोक आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले असून ही एक संपूर्णत: शास्त्रोक्त उपचारपद्धत आहे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment