Monday, May 9, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

मनुका

मनुका किंवा बेदाणा ही अर्धवट वाळलेली द्राक्षे असतात. मनुकांचे मुख्यत: हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकार असतात.

मनुका किंवा बेदाणा ही अर्धवट वाळलेली द्राक्षे असतात. मनुकांचे मुख्यत: हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकार असतात. मनुका सहसा थॉमसन, सोन्नाक्का, ताशीगणेश, माणिक्यमान या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमान ही द्राक्षं केवळ मनुका तयार करण्यासाठी पिकवतात.

मात्र सा-या द्राक्षांच्या मनुका होत नाहीत. अगदी गोड द्राक्षेच यासाठी निवडतात. मनुका फार पौष्टिक आहेत. प्राचीन काळापासून मनुका या टॉनिक म्हणून आहारात आहेत. भूमध्य समुद्रात त्यांचा वापर ग्रीक व रोमन काळापासून चालत आला आहे.

जगात अनेक ठिकाणी मनुका तयार केल्या जातात; पण त्यापैकी बहुतांश उत्पादन इटली, स्पेन, फ्रान्स, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया व आफ्रिका या ठिकाणी होते. मनुकांत पिष्टमय पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे यांचे प्रमाण बरेच आहे. पाश्चात्त्य लोक सॅलेडमध्ये मनुकांचा वापर बराच करतात.

»  दुधाबरोबर मनुका घेतल्यास त्या शरीराची झीज भरून काढून ते शरीराला पुष्ट करतात. दुधातून प्रथिने व मनुकांतून शरीरास आवश्यक ती साखर मिळते.

»  मनुकांबरोबर काजू, अक्रोड व शेंगदाणे खाणे हिताचे असते.

»  बेकरीतील पदार्थ, बिस्किटे, केक, पेस्ट्रीज, जॅम, जेली यामध्ये मनुकांचा अधिक प्रमाणात वापर केला जातो.

»  मनुकांतील साखरेमुळे त्याची पौष्टिकता वाढते. मनुकांत द्राक्षांच्या आठपठ साखर मिळत असते.

»  मनुका शरीरात उष्णता व उत्साह निर्माण करतात.

»  मनुका खाल्ल्याने त्यातील जादा अल्कलीमुळे शरीरातील आम्ल संतुलित राहते.

»  रोज १.०५ ग्रॅम मनुका खाल्ल्यास लघवीतील आम्ले व अमोनियाही कमी होतो.

»  पोटाच्या तक्रारींसाठी लहान मुलांना रोज मनुकांचे पाणी द्यावे.

»  रक्तातील लोह वाढवण्यास मनुका खाणे हा उत्तम उपाय असल्याने रक्तक्षयावर त्या उत्तम आहेत.

»  वजन वाढण्यासाठी ३० ग्रॅम एका वेळी अशा रोज १ किलोपर्यंत मनुका खाव्यात.

»  ताप कमी होण्यासाठी मनुकांचा अर्क घ्यावा.

Read More »

सर्वागासन

या आसनात कमरेकडचा भाग वर उचलला जातो त्यामुळे या आसनास सर्वागासन असं म्हणतात.

योगा मॅटवर पाठीवर झोपावे. पूर्ण शरीर सरळ रेषेत असावे. दोन्ही पाय सरळ ताठ एकत्र असावेत. दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता पूर्ण शरीराला शिथिल (रिलॅक्स) करावे. आता हळुवारपणे दोन्ही पायांना वरती उचलावे.

तसंच दोन्ही हातांच्या साहाय्याने पायांना ९० अंशाएवढे वरती आणावे. दोन्ही हातांच्या साहाय्याने पाठीचा तोल सांभाळावा. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) दोन्ही पाय सरळ व ताठ असावेत. पाय गुडघ्यात वाकवू नयेत.

हाताची स्थिती चित्रात दाखवल्याप्रमाणे असावी. तसेच पाठीचा बाकदेखील सरळ व ताठ असावा. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे.

आसन सोडताना प्रथम दोन्ही पायांना गुडघ्यात वाकवावं. मग हळुवारपणे हातांच्या साहाय्याने पूर्वस्थितीत यावे. थोडा वेळ विश्रांती करावी.

श्वास

» सुरुवातीच्या स्थितीत श्वास घ्यावा.

» अंतिम स्थितीत श्वास रोखावा. (सुरुवातीला श्वास रोखणे शक्य नसेल तर नियमित श्वासोच्छ्वास करावा.)

» शरीराला खाली आणाल तेव्हा आतमध्येच श्वास रोखावा. मग हळुवारपणे शरीराचा खालील भाग जमिनीवर आणल्यावर श्वास सोडावा. तसंच काही सेकंद आराम करावा.

वेळ

» आसनस्थितीत काही सेकंद थांबावं.

» जितकं तुम्ही थांबू शकाल तितका वेळच थांबावे.

» हळूहळू सेकंद वाढवावे.

» हे आसन एकदाच केले तरी चालते.

काळजी

» सर्वागासन करताना घाई करू नये. सुरुवातीला दीर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा. पूर्ण शरीर सरळ रेषेत असावे. हाताच्या साहाय्याने शरीराचा खालील भाग वरती उचलावा. सुरुवातीला मानेवर ताण पडेल पण नित्य सरावाने मानेवर ताण पडणार नाही.

» आसन सोडताना प्रथम दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवावे. मग हळुवारपणे खाली आणावेत. दोन्ही पायांना खाली आणताना मान वर उचलता कामा नये किंवा शरीराचा वरील भागही उचलू नये. हे आसन केल्यानंतर काही सेकंद विश्राम करावा.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना एनलार्ज थायरॉईड, लिव्हर, सव्‍‌र्हिकल स्पॉन्डिलायटीस, स्लिप डिस्क, उच्च रक्तदाब किंवा अन्य हृदयविकार, डोळ्यांना रक्तपुरवठा कमी होणे असा त्रास असेल त्यांनी हे आसन करू नये.

फायदे

» पाठीचा कणा लवचिक राहतो.

» नित्य सरावाने स्वप्नदोष नाहीसा होतो.

» रक्ताभिसरण उत्तम पद्धतीने होते.

» नित्य सरावाने तळपायाला येणारी सूज, होणारी आग किंवा वेदना कमी होतात.

» गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात.

» शरीर निरोगी होते.

» नाडीसंस्था व पचनसंस्था कार्यक्षम ठेवणारे हे एकमात्र औषध आहे.

» मूत्राशयातील त्रासावरही उपयुक्त आहे.

» ज्या व्यक्तींच्या नाका-तोंडातून वारंवार रक्तस्रव होतो त्यांनी हे आसन करावे, खूप फायदेशीर ठरेल.

Read More »

टेलिमेडिसिन काळाची गरज

टेलिहेल्थ किंवा टेलिमेडिसिन्स म्हणजे दूरस्थ भागातील डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे प्रगत माहिती तंत्रज्ञान/ दूरसंचार यंत्रणा आहे. रुग्णांच्या आरोग्यविषयक माहितीचे व समस्यांचे एका भागातून दुस-या भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने संदेशवहन होऊन त्यांच्या म्हणजेच रुग्णांची चिकित्सालयीन आरोग्यविषयक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते.

टेलिमेडिसिन्सच्या विविध माध्यमांचा वापर करणा-या रुग्णांचे दूरगामी रोगनिदान व वैद्यकीय उपचार याच्याशी जसे की – दूरध्वनी व इंटरनेट यासारख्या माध्यमांचा वापर करतात. त्यात रुग्णालये, चिकित्सालये, आरोग्यसेवा व रोगनिदान तंत्र केंद्रं यांच्याशी संपर्क साधून रुग्णांना अतिजलद व गुणवत्ताप्रधान आरोग्यसेवा पुरविण्याची क्षमता असते.

रुग्णांना त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचे ज्ञान देऊन संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधण्याची सुसाध्य आयुधे पुरविली जातात. वैद्यकीय सेवांचा अभाव असणा-या भागात रोगलक्षणांचे निदान अचूकपणे करण्यासाठी डॉक्टर्स व परिचारिका सेवा पुरविली जाते. आरोग्यसेवांचा लाभ घेणा-या ग्राहकांसाठी ही स्वागतार्ह संधी आहे आणि चिकित्सालयीन उपचारांसाठी टेलिमेडिसिन ही उपकारक अशी उपचारपद्धती भारतात गेल्या दोन वर्षात लोकप्रिय झाली आहे. आरोग्यसेवेची सहज उपलब्धता व जलद सेवापुरवठा याकरिता ही उपयोगी पद्धती आहे.

रुग्णांना याचा उपयोग कसा होईल?

भारतात डॉक्टरांची कमतरता आहे म्हणजेच दर १,७०० रुग्णांमागे एक डॉक्टर अशी अवस्था आपल्याकडे आहे. डॉक्टरांद्वारे पुरवल्या जाणा-या वैद्यकीय सेवांची फलनिष्पतीचे गुणवत्ता नियंत्रण व मूल्यनिर्धारण करणारी कोणतीही पद्धती नाही. निमशहरी किंवा ग्रामीण भागात रुग्णांना वैद्यकीय सेवांचा अत्यल्प लाभ मिळतो किंवा डॉक्टरांना गाठण्यासाठी त्यांना मैलोगणिक प्रवास करावा लागतो. तसेच डॉक्टरांच्या भेटीची वेळ निश्चित करणे हीदेखील वेळेचा अपव्यय करणारी प्रक्रिया आहे.

टेलिमेडिसिन्स हा दुर्धर व्याधीग्रस्त रुग्ण, आजारी व्यक्ती यांना त्यांच्या आरोग्यविषयक वैद्यकीय दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जतन करायला लावणारा मार्ग आहे. टेलिहेल्थमुळे शहरी, निमशहरी व ग्रामीण जनतेला आजारविषयक वैद्यकीय इलाज करण्यासाठीचे एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

डॉक्टरांना याचा उपयोग

देशभरातील सुमारे २७० वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण पुरे केलेले २८,१५८ डॉक्टर्स दरवर्षी आरोग्यसेवा क्षेत्रात पदार्पण करतात. या नवागत डॉक्टरांना वैद्यकक्षेत्रात आपला पाया भक्कम करणे कठीण होते. दुसरीकडे असे चित्र असते की रुग्णाने एकदा दवाखान्याबाहेर पाऊल ठेवले की तो पुन्हा उपचारांसाठी परतेल याची हमी नसते.

बहुतांशी डॉक्टर आजमितीसही कागद व लेखणीचाच आधार घेत असून ते वैद्यकीय देयके व रुग्णांचे दस्तऐवज जतन करण्यासाठी ते पारंपरिक पद्धती अवलंबित आहेत. टेलिमेडिसिन्समुळे डॉक्टरांना स्थानिकेतर रुग्णांच्या आरोग्यविषयक स्थितीचा दस्तऐवज हा प्रमाणित संगणीकृत नमुन्यात जतन करणे शक्य असते. तसेच रुग्णांकडून वैद्यकीय उपचारांसाठी आकारल्या जाणा-या शुल्काच्या लेख्यांचे काम व वैद्यकीय प्रशासकीय काम करणेदेखील सुकर होते.

Read More »

उन्हाळ्यातही कूल कूल

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी शरीराला आंतर्बाहय़ थंड ठेवणं आवश्यक आहे. यासाठी नेमकं काय केलं पाहिजे?

उच्च तापमान आणि हवेत असलेली आद्र्रता यामुळे हा उन्हाळा अधिकच तापदायक होऊ लागला आहे. शरीराच्या आंतर्बाहय़ उष्णतेमुळे लोकांना डोकेदुखी, थकवा येणे, चक्कर येणे अशा उष्णतेच्या विकारांचा सामना करावा लागतोय.

थोडासा आराम, शरीराला थंड वातावरणात ठेवणे आणि हायड्रेट ठेवणे यामुळे या विकारांवर मात करता येते. मात्र हीट स्ट्रोक हा अतिशय गंभीर आणि दखल घेण्याजोगा आजार आहे. त्वचा कोरडी होणे, तापमान वाढणे आणि कधी कधी अबोधावस्थेतही जाऊ शकतो. हे सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराला उष्ण तापमानापासून दूर ठेवणं आवश्यक आहे. यासाठी नेमकं काय करायला हवं?

उन्हाळ्याच्या सुट्टीत कित्येकदा खेळण्यासाठी, कित्येक वेळ बाहेर फिरावं लागल्याने सूर्याच्या प्रखर किरणांचा सामना करावा लागतो. म्हणूनच अशा वेळी काही काळजी घेणं आवश्यक आहे. सनस्क्रीन लावणे हा पर्याय तर तुम्हाला माहिती आहेच; पण त्याव्यतिरिक्त अन्य काही पर्यायही आहेत.

ही वेळ टाळा

सकाळी दहा ते दुपारी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरातून बाहेर पडणं टाळा. कारण या वेळेत सूर्याची किरणं प्रखर असतात. तसंच महत्त्वाचं काम असेल तर कॉटन अर्थात सुती कपडे घाला. टोपी आणि गॉगलचा वापर करा.

भरपूर पाणी प्या

लक्षात ठेवा, भरपूर पाणी प्या. मात्र पाण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळा. साखर मिश्रित पेय टाळावीच.

बाळांसाठी

बाळांना हलके वजनाचे कपडे घालावेत. लांब हाताचे आणि पायाचे सुती शर्ट-पँट घाला. बाळाची पावलंदेखील बंद करून ठेवा. अंगावर पांघरूण घालतानादेखील ते कमी वजनाचं असेल याकडे लक्ष द्या. त्वचेच्या उघडय़ा पडलेल्या भागावर हलकंसं सनस्क्रीन लावा. मोकळ्या ठिकाणी फेरफटका मारायला बाळाला घेऊन जा.

आणखी काय काळजी घ्याल?

»  काहीही खाण्याअगोदर साबणाने आणि कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवावेत.

»  खाद्यपदार्थ आणि पेय वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवावं.

»  पटकन खराब होणारे पदार्थ दोन तासांपेक्षा अधिक वेळ बाहेर ठेवू नका.

»  जेव्हा बाहेरचं वातावरण तप्त असेल तर एक तासापेक्षा अधिक वेळ खाद्यपदार्थ बाहेर ठेवू नये.

आणखी काही

»  शक्यतो घरातच राहण्याचा प्रयत्न करा. एसी असल्यास एसीत बसण्याचा प्रयत्न करा. मात्र घरात एसी नसेल तर शॉपिंग मॉल किंवा लायब्ररीसारख्या ठिकाणी आवर्जून जा. काही वेळ एसीच्या ठिकाणी घालवा. जेणेकरून तुम्ही पुन्हा उन्हात जाल तेव्हा तुमचं शरीर थंड राहील.

»  तुम्हाला जसं गरम होतं, तसंच तुमच्या पाळीव प्राण्यांनाही गरम होतं. म्हणूनच त्यांना वाहनांच्या अधिक जवळ नेऊ नका. पाळीव प्राण्यांसाठी एखादी शेड असेल आणि त्यांना पिण्यासाठी थंड आणि स्वच्छ पाणी मिळेल हे लक्षात ठेवा.

»  पंख्यामुळेही तुम्हाला हायसं वाटू शकतं. मात्र जेव्हा आजूबाजूला भरपूर प्रमाणात उष्णता असेल तेव्हा मात्र पंख्याचं वारंदेखील कमी पडतं. म्हणूनच थंड पाण्याने अंघोळ करा. थंड जागी राहण्याचा प्रयत्न करा.

»  सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत कमीत कमी बाहेर पडावं लागेल याची काळजी घ्या. सावलीत राहण्याचा प्रयत्न करा.

»  दिवसभरात पाच कप ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करा.

»  पालकांनी लहान मुलांना फळांचा ताजा रस, नारळपाणी, ताक आणि लिंबाचं सरबत द्यावं म्हणजे घामाच्या वाटे शरीराबाहेर पडलेले क्षार त्यातून मुलांना मिळतील आणि ती ताजंतवानं ठेवतील.

»  पिझ्झा, बर्गर आणि पास्ता यांसारख्या मसालेदार पदार्थापासून मुलांना दूरच ठेवा. त्यापेक्षा कलिंगड, चिकू, किवी अशी फळं द्या. या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असल्याने ती अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात.

»  चांगले शेजारी व्हा. आजूबाजूला कोणी म्हातारं माणूस असेल तर त्यांना काही होत नाही ना हे तपासा.

»  तुमचे पाळीव प्राणी घराच्या बाहेर असतील तर ते सावलीत आहेत ना, त्यांना पिण्यासाठी पाणी आहे ना याची काळजी घ्या.

»  कुत्र्याच्या अंगावरचे केस उन्हाळ्यात थोडे कमी करा.

»  कॉफी, चहा किंवा कॅफीन आणि अल्कोहोल असलेले पदार्थ वज्र्य करा.

»  उन्हाळ्यात कित्येक जण बराच वेळ एअर कंडिशनचा वापर करतात. त्यामुळे पॉवर जास्त लागण्याचा धोका असतो. म्हणून एअर कंडिशनमधून वेळोवेळी व्हॅक्यूम बाहेर काढा. म्हणजे पॉवर शॉर्टेज होणार नाही.

»  उन्हामुळे काय होऊ शकतं आणि त्याची लक्षणं काय आहेत याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे लक्षणं काही दिसल्यास त्यावर त्वरित उपचार करा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment