मुलं या ना त्या कारणांमुळे बरेचदा आजारी पडत असल्यामुळे हल्ली आपल्याला काळजी घ्यावी लागतेच; पण त्याहीपेक्षा अधिक सतर्क राहणं गरजेचं असतं. म्हणूनच आजारांना टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मुलांची व्यक्तिगत स्वच्छता कशी राखता येईल याकडे लक्ष वेधणं आवश्यक आहे. कारण मुलं शाळेच्या वातावरणात किंवा खेळाच्या मैदानावर त्यांच्याही नकळत जंतूंच्या जास्तीत जास्त संपर्कात येत असतात. तुम्ही पाहाल तिथे तुम्हाला जंतू दिसून येतात. काही अपरिहार्य असतात, तर काही अधिक प्रमाणात असतात. काही डोळ्यांना दिसतात तर काही दिसतही नाहीत. मुलांच्या अंगी व्यक्तिगत स्वच्छतेच्या चांगल्या सवयी बाणवणे हा जंतू संक्रमण आणि समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अंघोळीपासून ते हात धुण्यापर्यंत आरोग्यवर्धक स्वच्छतेच्या सवयी मुलं लहान असतानाच बाणवल्या पाहिजेत. ज्यामुळे त्यांच्या या सवयी संपूर्ण आयुष्यभर टिकून राहतील. त्याचा त्यांनाच फायदा होईल. हात धुणे हा एकमात्र अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे आजारांचा फैलाव टाळता येतो, हा केवळ लहान मुलांमध्येच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रौढांच्या बाबतीत देखील लागू होतो. मुलांना खाण्याआधी, प्रसाधनगृहातून आल्यावर, प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर, जर ती आजारी असतील किंवा ती लहान बाळासोबत असतील तेव्हा हात धुण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. युनिसेफच्या मते, साबणाने हात धुणे विशेषत: विष्ठेच्या संपर्कात आल्यावर हात धुण्यामुळे ४० टक्क्यांहून जास्त प्रमाणात डायरियल आजारांना तर ३० टक्क्यांहून जास्त श्वसनासंबंधित आजारांना कमी करता येतं. अगदी जन्माच्या वेळेपासून प्रसूतीआधी परिचारिकांनी हात धुतल्यामुळे मृत्युदरात १९ टक्क्यांनी घट झाली आहे आणि आईने आपल्या बाळाला हाताळण्याआधी हात धुतल्यामुळे मृत्यू होण्याच्या जोखमीमध्ये ४ टक्क्यांनी घट आली आहे. दुर्बल रोगप्रतिकारक क्षमता मुलांसाठी सर्वसामान्य आजारांवर संशोधन करताना असं आढळून आलं की आजार पुन:पुन्हा होण्याच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकीचा एक घटक म्हणजे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता होय. त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढत नाही. याचा असा अर्थ होतो की मुलाचं शरीर जंतू आणि संक्रमणांचा सामना करण्यासाठी ठोस बचाव यंत्रणेची निर्मिती करू शकत नाही; त्यामुळे त्याला/ तिला वातावरणातील जोखमीमुळे त्रास होण्याची शक्यता अधिक बळावते. वातावरणाच्या आधुनिक जोखमी पर्यावरणातले वाढते प्रदूषण हे आज मुलांमध्ये वाढत्या आजारांचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, कारण ती रोजच्या जीवनात घातक घटकांच्या सातत्याने संपर्कात येत असतात. आज हवा जास्त प्रदूषित आहे, पाणी अधिक दूषित आहे आणि अन्न आधीपेक्षा जास्त प्रमाणात रसायनांनी भरलेले आहे. शक्तिशाली आणि अधिक प्रतिकारक जंतू सद्य:स्थितीतील वातावरणातील बदल विशेषत: ग्लोबल वॉìमगमुळे जगभरात संक्रमित होणा-या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. संशोधकांनी हे दाखवून दिलं आहे की, डेंग्यू, मलेरिया इ.सारखे आजार उष्ण वातावरणात जास्त फैलावतात. हे आजार आपल्या मुलांसाठीच नव्हे तर प्रौढांसाठी देखील जोखीम निर्माण करतात. पारंपरिक स्वच्छतेच्या सवयींचा वापर करणे सुरू ठेवणे हे सिद्ध झालं आहे की, आजच्या जंतूंनी भरलेल्या जगात पारंपरिक स्वच्छतेच्या सवयी पुरेशा होत नाहीत. सर्वसमावेशक स्वच्छतेच्या सवयींची आवश्यकता वाढत आहे, यामध्ये हात धुणे आणि रोगप्रतिबंधक साबणांनी अंघोळ करणे अशा स्वच्छतेच्या सवयींचा देखील अंतर्भाव होतो. अस्वच्छ पृष्ठभागांशी जास्त प्रमाणात येणारा संबंध जंतुविरहित राहणे खासकरून मुलांसाठी निव्वळ अशक्यप्राय गोष्ट आहे. मुलांना चिखल व अस्वच्छ जागांवर खेळायला नेहमीच आवडतं आणि अनेकदा अशा मुलांसोबत वस्तूंची अदलाबदल करतात जी स्वच्छ नसतात. मुलं अनेक वेळा सर्वसामान्यत: सर्वाच्या संपर्कात येणा-या अस्वच्छ पृष्ठभागांच्या सान्निध्यात येतात उदा. दारांची हँडल्स, फुटबॉल्स, जिन्यांची रेलिंग्ज इ. त्यामुळे मुलांमध्ये साहजिकपणे जंतू संक्रमण होतं. थोडक्यात, आजाराला टाळण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे चांगली स्वच्छता होय. हात धुणे आणि रोगप्रतिकारक साबणाने अंघोळ करण्यासारख्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयींना आपण मुलांमध्ये अगदी लहानपणापासून बाणवले पाहिजे. |
No comments:
Post a Comment