Monday, April 18, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

कोलेस्टेरॉलपासून सुटका

कोलेस्टेरॉलपासून सुटका करायची असेल तर जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे हृदयरोगाला आमंत्रण देणारे अन्नपदार्थ ओळखता येतात आणि त्यांचे सेवन कमी करता येतं. कोलेस्टेरॉलच्या वाढलेल्या पातळीमुळे कोणत्याही शरीर प्रकारच्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.

कोलेस्टेरॉलला चांगलं मानलं जात नाही, कारण आपल्यापैकी बरेच जण या कोलेस्टेरॉलचे बळी ठरतात. हो, कोलेस्टेरॉलचं वाढतं प्रमाण म्हणजे आजारपणाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होतात. पण खरा गुन्हेगार कोलेस्टेरॉल नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? हे लिपीड पित्ताशयात (लिव्हर) तयार होतं.

तसंच शरीराच्या अनेक प्रक्रियांमध्ये ते महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ मेंदूमध्ये असलेल्या चेतापेशींचे विसंवहन (इन्सुलेटिंग), पेशींना आकार देण्यात कोलेस्टेरॉल महत्त्वाची भूमिका बजावतं. हाय डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एचडीएल)ची पातळी घसरते तेव्हा समस्या सुरू होते, तर दुसरीकडे हृदयातील धमन्यांवर लो डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एलडीएल) जमू लागते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तप्रवाह मंदावतो आणि हृदय तसेच रक्तवाहिकांचे आजार बळावतात.

याचा अर्थ आजार हे एलडीएलच्या उच्च पातळीमुळे आणि एचडीएलचा स्तर घसरल्याने होतात. कोलेस्टेरॉलमुळे नव्हे! हृदयरोग निर्माण होण्याचं हे एक मुख्य कारण आहे.

जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे हृदयरोगाला आमंत्रण देणारे अन्नपदार्थ ओळखता येतात आणि त्यांचे सेवन कमी करता येतं. कोलेस्टेरॉलच्या वाढलेल्या पातळीमुळे कोणत्याही शरीर प्रकारच्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.

तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट (संतृप्त मेद) आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ टाळा. अनेक हवाबंद अन्नपदार्थ उदाहरणार्थ बटाटयाचे वेफर आणि बेकरी उत्पादने ज्यामध्ये मैद्यासारखे घटक वापरले जातात, त्यात तंतुमय घटक कमी असतात आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते.

काय कराल?

» जेवणाकरिता वारंवार उकळवलेल्या तेलाचा वापर केल्यास ट्रान्स फॅटची पातळी वाढते.

» त्याचपद्धतीने लाल मांस, मलईयुक्त दूध उत्पादनं, तूप आणि खोबरेल तेलाचा वारंवार वापर केल्याने लो डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एलडीएल)चं प्रमाण वाढतं. कारण त्यात संतृप्त मेद अधिक असतो. अशा प्रकारच्या सेवनावर मर्यादा आणून ताजे, प्रक्रियारहित अन्न आहारात घ्यावं.

» आपण नियमितपणे आपला आहार घेत असतो, मात्र काही जागरूक व्यक्तीच कोशिंबिरी आणि कच्च्या फळांचा समावेश आपल्या आहारात करतात. आपल्या नियमित आहारात मैदा, ब्रेड, पांढरा भात, बिस्किटांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थाचा उपयोग कमीत कमी करणं महत्त्वाचं आहे.

» सालासकट असलेली धान्य, न सडलेली धान्य म्हणजे लाल तांदूळ, लाल पोहे, सालासकट असलेल्या डाळी इत्यादींचा जेवणात समावेश करावा.

» बदाम हा असा अन्नघटक आहे ज्यामुळे शरीरात हाय डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एचडीएल) कोलेस्टेरॉल वाढते. तसंच आहारात अळशीचा नियमित वापर केल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

» आणखी एक प्रभावी बदल म्हणजे संतृप्त मेद अधिक प्रमाणात असलेले पदार्थ म्हणजे बटर न वापरता कमी मेद असलेले पर्याय उदा. लो फॅट टेबल स्प्रेडचा वापर करावा. लो फॅट टेबल स्प्रेड हे आरोग्याला हितकारक असतात. टेबल स्प्रेडची निवड करताना न्यूट्रीशन फॅक्ट लेबलवर शून्य टक्के कोलेस्ट्रॉल आणि शून्य ग्रॅम ट्रान्स फॅट पाहा. तंतुमय घटकही दोन प्रकारचे असतात. एक विरघळणारे आणि दुसरे न विरघळणारे. तुम्ही आहारात विरघळणा-या तंतुमय घटकांचा समावेश करा. या दोन्ही घटकांचे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधिक आहे. परंतु, विरघळणारे घटक कमी एलडीएल पातळी राखण्यास मदत करतात.

» ओट्स, ओट्सचा कोंडा, कडधान्य, डाळी आणि भाज्यांचा तुमच्या नियमित आहारात समावेश करा.

» आहारात कायम तेलाचा वापर कमी ठेवा. मग ते फिल्टर तेल असो किंवा रिफाईन. कारण रिफाईन तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते आणि फिल्टर तेलावर यांत्रिक.

» आहारात सुका मेवा प्रामुख्याने पिस्त्यांचा समावेश करा. डायबेटीज फाऊंडेशन ऑफ इंडिया (डीएफआय) अँड दी नॅशनल डायबेटीज, ओबेसीटी अँड कोलेस्ट्रॉल फाऊंडेशनच्या पाहणीनुसार पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ते नसíगकरित्या कोलेस्ट्रॉलमुक्त असतात. त्यात प्रथिने, तंतुमय घटक आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक विपुल प्रमाणात असतात. या घटकांमुळे पिस्त्यांचे सेवन स्थूलतेची भीती असणा-यांसाठी आणि हृदयरोग्यांकरिता अतिशय उपयोगी ठरते.

» याशिवाय साली-कोंडयांसकट असलेली धान्यं, प्रक्रियारहित अन्न, फळे आणि भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात नियमित करावा.

» अळशी, सूर्यफूल बिया आणि चरबीयुक्त मासे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदतीचे ठरतात. अधिक प्रमाणात मेद असलेले दुग्धजन्य पदार्थ न घेता कमी प्रमाणात मेद असलेले पदार्थ वापरावेत.

» नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. नियमित साधे चालणे, सायकल चालविणे, पोहणे किंवा तुमचा आवडता खेळ खेळल्याने मदत होऊ शकते.

» लिफ्ट, एलिवेटर न वापरता पाय-यांचा वापर करावा.

» टीव्ही पाहताना अधे-मधे केलेली ऊठबस फायदेशीर ठरू शकते.

» तुमचे आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात असू द्या. त्याची काळजी केवळ तुम्हीच घेऊ शकता.

Read More »

गुडघ्यासाठी पीआरपी इंजेक्शनची उपचारपद्धती

गुडघेदुखीसाठी शस्त्रक्रिया न करताही तुमचे गुडघे बरे होऊ शकतात. पीआरपी (प्लेटलेट रीच प्लाझ्मा) इंजेक्शनमुळे हे शक्य होतं. हे जैविक इंजेक्शन आहे, जे रुग्णाच्या स्वत:च्या रक्तापासून तयार केलं जातं. याद्वारे सांधेदुखीच्या कुच्रेला विकास घटकांचे उच्च एकत्रीकरण पुरवलं जातं. ज्यामुळे ती सुधारण्याची संभावना वाढवली जाते.

शैला दवे, या ७० वर्षीय महिलेच्या, दोन्ही गुडघ्यांमध्ये आणि उजव्या पावलामध्ये वेदना होत होत्या. त्या किंचित स्थूल होत्या आणि त्यांच्या गुडघ्यांमध्ये आणि पावलामध्ये सांधेदुखीचा त्रास जाणवत होता. या सत्तरीच्या महिलेला आधाराशिवाय चालणं शक्य नव्हतं. थोडंसं अंतर चालण्यासाठी देखील त्यांना काठीच्या आधाराची गरज होती.

नी कॅप, वेदनाशामके आणि विविध भौतिकोपचार इत्यादी वैद्यकीय साधने आणि उपचार घेऊन झाल्यानंतर गुडघारोपण शस्त्रक्रिया करायची नाही म्हणून पर्यायी उपचारांसाठी डॉक्टरांकडे आल्या. त्यांची अवस्था बघून आणि त्यांच्या मनातील शंका लक्षात घेऊन त्यांना पीआरपी (प्लेटलेट रीच प्लाझ्मा) इंजेक्शनचा सल्ला दिला.

इंजेक्शन घेतल्यापासून सहा आठवडयांमध्ये दवे यांना लक्षणीयरित्या वेदना कमी झाल्याचं जाणवलं, इतकं की आता त्या कोणत्याही आधाराशिवाय हिंडू फिरू लागल्या आहेत. वेदनाशामक औषधांवरील त्यांचे अवलंबित्व खूपच कमी झाले.

पीआरपी उपचार म्हणजे नक्की काय?

कृत्रिम इंजेक्शनपेक्षा, पीआरपी, हे जैविक इंजेक्शन आहे, जे रुग्णाच्या स्वत:च्या रक्तापासून तयार केलं जातं. याद्वारे सांधेदुखीच्या कुच्रेला विकास घटकांचे उच्च एकत्रीकरण पुरवलं जातं. ज्यामुळे ती सुधारण्याची संभावना वाढवली जाते.

ही एक अतिशय साधी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आम्ही रुग्णाचे रक्तघेऊन ते वेगाने फिरवून त्यातील प्लेटलेट्स एकत्र करतो आणि त्या रुग्णाच्याच प्लेटलेट्स एकत्रित स्वरूपात त्याच्याच गुडघ्यामध्ये इंजेक्ट केल्या जातात.

यामुळे विकास घटक आणि स्टेम सेल्स सक्रिय होतात आणि यामुळे ते टिश्यू दुरुस्त केले जातात, सूज कमी होते आणि त्याचबरोबर सांधेदुखीची लक्षणंही कमी होतात. या संपूर्ण प्रक्रियेला जास्तीत जास्त दोन ते तीन तास लागतात आणि यासाठी रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नसते.

शैला दवे यांना इंजेक्शन देऊन आता ७ महिने झाले आहेत आणि त्यांनी वेदना होत असल्याची तक्रार केलेली नाही. आधी सांगितल्याप्रमाणे हे जैविक इंजेक्शन असल्यामुळे याचा प्रभाव रुग्णानुसार वेगवेगळा असू शकतो. विविध अभ्यासानुसार, ७३ टक्के केसेसमध्ये, चिकित्सक आणि कार्यात्मक फायदे दिसून आले आहेत आणि वर्षभरात सांधेदुखीचा प्रसार आढळून आला नाही.

पीआरपी इंजेक्शनच्या बाबतीत एकच गोष्ट आहे की याचा परिणाम दिसून येण्यासाठी चार ते सहा आठवडयांचा कालावधी लागतो, त्यामुळे रुग्णांनी ताबडतोब परिणाम दिसावे या उद्देशाने येऊ नये. हे इंजेक्शन म्हणजे आíथकदृष्टया अतिशय व्यवहार्य पर्याय आहे, कारण गुडघा रोपण शस्त्रक्रियेच्या एक दशांश इतकाच खर्च यासाठी येतो.

या उपचारांना कोणतेही साईड इफेक्ट्स नसल्याने कोणत्याही वयोगटासाठी हा उपचार लाभदायक आहे. या उपचारांना वयाचे कोणतेही बंधन नसले किंवा पीआरपी इंजेक्शन घेतल्यावर कोणतीही बंधने नसली तरी सांधेदुखीच्या प्राथमिक टप्प्यातच हा उपचार घेणे हितावह आहे म्हणजे याचे संपूर्ण आणि दीर्घकालीन फायदे मिळू शकतील.

Read More »

खेकडे खा, तंदुरुस्त राहा

अंडी, चिकन, मटण, मासे याचबरोबर चिंबो-या म्हणजे खेकडे हादेखील मांसाहारींच्या आहारात हमखास आढळणारा एक पदार्थ. मात्र असं असलं तरीही तो अंडी, चिकन, मटण, मासे यांच्या तुलनेत कितीतरी पौष्टिक आहे. अशा या खेकडयांचं आरोग्याच्या दृष्टीने असलेलं महत्त्व जाणून घेऊ या.

मांसाहारींच्या आहारात मासे, अंडी, चिकन यासोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे खेकडे. सूप सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारांतून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकडयातून खनिजं, ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन यासोबतच उच्च प्रतीच्या प्रोटिन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थाचा समावेश करण्याचीही कारणं जाणून घ्या.

मधुमेहींसाठी फायदेशीर

खेकडयांमध्ये उच्च प्रतीचं क्रोमियम असतं. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकडयातील मांसल भागामध्ये काबरेहायड्रेट कमी असतं. त्यामुळे मधुमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीही हे पदार्थ आहारात जरूर ठेवा.

कॅन्सरचा धोका कमी होतो

खेकडयांमधून ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यात कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते. यात आढळणा-या नायसिन आणि क्रोमियममुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

त्वचाविकारांपासून सुटका

अ‍ॅक्ने, रॅशेस अशा त्वचाविकारांसोबत कोंडयाचा त्रास कमी होण्यास मदत होते. यात मुबलक प्रमाणात झिंक असतं. यामुळे तेलनिर्मितीचं प्रमाण नियंत्रणात राहतं. जेणेकरून त्वचाविकारापासून बचाव होतो.

रक्तपेशींच्या निर्मितीचं कार्य सुधारतं

रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणा-या व्हिटॅमिन बी १२चा खेकडयात मुबलक साठा असतो. यामुळे अ‍ॅनिमिया होण्याचा धोकादेखील कमी होण्यास मदत होते. ओमेगा थ्री या फॅटी अ‍ॅसिडमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते

वजन कमी करते

चविष्ट असले तरीही यात कॅलरी अधिक प्रमाणात नसल्याने खेकडयांचा आहारात समावेश करू शकता. यामुळे आरोग्यपूर्ण पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकता. यातून मिळणारी प्रथिनं खेळाडू आणि बॉडिबिल्डर्सच्या आहारात असणं फायदेशीर असतं.

रक्तदाबावर नियंत्रण राहते

खेकडयात असलेला पोटॅशिअम घटक शरीरात इलेक्ट्रोलेट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. जेणेकरून रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटॅशिअम हा घटक रक्तदाब नियंत्रण ठेवण्यात प्रमुख भूमिका बजावतो.

सांधेदुखी कमी होते

यात सेलेनियम या अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा पुरवठा अधिक असतो. त्यामुळे हा मांसाहारींसाठी उत्तम स्रेत आहे. शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. म्हणूनच आहारात खेकडयांचा समावेश करावा. याच्या सेवनाने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment