कधी टेन्शनमुळे तर कधी झोप पूर्ण न झाल्यामुळे तर कधी पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे कित्येकांच्या डोळ्यांखाली खाळी वर्तुळं झालेली दिसतात. आजकाल अधिक वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळेही ही काळी वर्तुळं येतात. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याबरोबरच काही घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे? कधी टेन्शनमुळे तर कधी झोप पूर्ण न झाल्यामुळे तर कधी पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे कित्येकांच्या डोळ्यांखाली खाळी वर्तुळं झालेली दिसतात. आजकाल अधिक वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळेही ही काळी वर्तुळं येतात. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याबरोबरच काही घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे? बटाटा काळवंडलेल्या त्वचेवर बटाटा लावला जातो हे तर तुम्हाला माहितीच आहे. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर बटाटयाच्या पातळ काप करून त्यांना किमान २० ते २५ मिनिटं डोळ्यांवर ठेवावं. त्यानंतर पुन्हा चेहरा धुऊन घ्यावा. टोमॅटो टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस घालावा. त्यात बेसनपीठ आणि हळद घालून त्याची पेस्ट डोळ्यांभोवती २० मिनिटं लावून ठेवावी. आठवडयातून तीन वेळा हा प्रयोग केल्यास लवकर फायदा होईल. एक कप टोमॅटोच्या रसात पुदीन्याची पानं, लिंबाचा रस आणि मीठ घालावं. हा ज्युस तयार केल्यावर ताबडतोब प्यावा. असा ज्युस दिवसातून दोन वेळा आठवडाभर प्यायल्याने काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते. बदाम तेल बदामाचं तेल खुपच फायदेशीर आहे. डोळ्यांभोवतालच्या भागाला लावून ठेवावं. दहा मिनिटांनी डोळ्यांना हलका मसाज करून ते स्वच्छ करून घ्यावं. टी बॅग कित्येकांच्या घरी टी बॅग्ज असतात. या बॅग्ज वापरल्या की फेकून दिल्या जातात. पण वापरलेल्या टी बॅग्जचाही तुम्ही वापर करू शकता. यात असलेलं टॅनिन डोळ्यांच्या आजूबाजूची सूज आणि त्वचेचा काळसरपणा दूर करण्यास मदत करते. गुलाब पाणी डोळे बंद करून त्यावर गुलाब पाण्यात भिजवलेला कापूस दहा मिनिटं ठेवावा. जकाळेपणा कमी तर होईलच पण त्याचबरोबर थंडावाही वाटेल. पुदीना पुदीन्याची पानं चुरगळून त्यांना डोळे आणि आजूबाजूच्या भागावर ठेवावं. नंतर धुऊन टाकावं. संत्र संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. हे विटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. संत्र्याच्या रसात थोडं ग्लिसरीनचे थेंब मिसळून ही पेस्ट दररोज डोळ्यांवर ठेवावेत. काळी वर्तुळं लवकरच दूर होतील. ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब हातावर घेऊन त्याने हलक्या हाताने मालिश करावं. असं केल्याने डोळ्यांकडे रक्तपुरवठाही व्यवस्थित होतो आणि आरामही मिळतो. काकडी काकडीचा रस किंवा काकडीची सालं डोळ्यांवर ठेवावी. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. आणि काळ्या वर्तुळांपासून आरामही मिळतो. लिंबू लिंबाच्या रसात क जीवनसत्त्व असल्याने ते डोळळ्यांखालची काळी वर्तुळं कमी करण्यास मदत करतात. कापसाच्या साहाय्याने लिंबाचा सर डोळ्यांभोवतालच्या त्वचेवर लावावा. दहा मिनिटं ठेवून नंतर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही आठवडे दिवसातून एकदा हा प्रयोग करावा. आणखी दुसरा प्रकारही तुम्हाला करता येईल. एक चमचा लिंबाच्या रसात दोन चमचे टोमॅटो प्युरी, चिमूटभर बेसन आणि हळदी पावडर करून मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यावं. ही पेस्ट डोळ्यांभोवती लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवावी. आठवडयातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करावा. |
No comments:
Post a Comment