आंबा स्वयंपाकघरात आणि वैद्यकीय क्षेत्रात जसा लोकप्रिय झाला तसाच स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातही प्रसिद्ध होत आहे. यामुळे त्वचा तजेलदार राहते व चेह-यावरचा कोरडेपणा जातो. आंब्यापासून तयार करण्यात आलेले सौंदर्यप्रसाधन नेहमीच उपयुक्त व फायदेशीर ठरणारे आहे. अशा या आंब्यापासून घरच्या घरी फेसपॅक कसे तयार करायचे ते पाहू या. खाण्याचं व्यसन लागेल अशी चव असणारा, अमृताची आठवण करून देणारा आंबा आणि सर्वश्रुत असलेला फळांचा राजा आता बाजारात बराच जोर धरत आहे. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात आंब्याच्या अनेक प्रजाती आढळतात. हापूस आंबा, पायरी, तोतापुरी, राजापुरी, लंगडा आंबा, बारमाही आंबा असे कितीतरी आंब्याचे प्रकार कोकणात गेल्यावर कळतात. बाळ कै-या, कै-या व आंबा यांपासून आपण आतापर्यंत लोणची, पन्हं, गुळांबा, मोरांबा, छुंदा, आमरस इत्यादी पदार्थ बनवले आहेत. आमरस विशेष पद्धतीने आटवून ठेवून त्याच्या वडया आणि बर्फीही करता येतात. आंब्यामुळे वजन वाढतं, स्नायू मजबूत होतात, प्रकृती चांगली राहते. आंबा स्वयंपाकघरात आणि वैद्यकीय क्षेत्रात जसा लोकप्रिय झाला तसाच स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातही प्रसिद्ध होत आहे. यामुळे त्वचा तजेलदार राहते व चेह-यावरचा कोरडेपणा जातो. चेह-यावरच्या सुरकुत्या जाऊन चेहरा स्वच्छ होतो. अकालीन वृद्धापकाळामुळे झालेल्या निस्तेज त्वचेसाठी आंब्याचा वापर केला जातोय. उन्हामुळे त्वचेमध्ये गरजेपेक्षा जास्त ओलावा व चिकचिकीपणा निर्माण होतो व तजेलदारपणा नष्ट होतो. अशा वेळेस नेहमीच पार्लर ट्रिटमेंट करणं सोयीचं होत नाही. नैसर्गिकरीत्या केलेले उपचार हे फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारे असतात. आंब्यापासून तयार करण्यात आलेले सौंदर्यप्रसाधन नेहमीच उपयुक्त व फायदेशीर ठरणारे आहे. अशा या आंब्यापासून घरच्या घरी फेसपॅक कसे तयार करायचे ते पाहू या. » आंब्यामध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वं प्रामुख्याने आढळून येतात. शिवाय 'ब' जीवनसत्त्व, अल्फा हायड्रोक्सी अॅसीड व पोटॅशिअम यांचं प्रमाण कमी-अधिक प्रमाणात असतं. » आंब्यातील 'अ' जीवनसत्त्वामुळे चेह-यावरील तेलकटपणा जाऊन चेहरा टवटवीत दिसतो व सुरकुत्या नष्ट होतात. » 'ब' जीवनसत्त्व चेह-यावरील ताजेपणा आणण्यासाठी उपयोगात येतो. अल्फा हायड्रोक्सी अॅसीडमुळे मृत पेशी नष्ट होतात. त्यामुळे चेहरा नरम व निखळ दिसतो. » 'क' जीवनसत्त्व पांढरे संयोजक पेशी जलातील प्रथिन घटक वाढवण्यास मदत करतात. » पोटॅशिअममुळे चेह-यातील निस्तेज त्वचा सुधारते, कोरडया त्वचेवर ओला थर निर्माण होऊन चेहरा निखळतो. आंब्यापासून केले जाणारे फेस पॅक हायड्रेटिंग फेस पॅक उन्हाच्या वातावरणात आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त तेलकट होते. अशा वेळेस चेह-यावर तजेलदारपणा आणायचा असेल तर आंब्याचा रस घेऊन त्यात मुलतानी माती टाकावी. आंब्याचा रस व मुलतानी माती यांचे उत्तम मिश्रण करून चेह-यावर लावावं. हे मिश्रण चेह-यावर पंधरा मिनिटं ठेवावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. चेह-यावर तेज येऊन त्वचा सुंदर दिसते. संवेदनशील त्वचेसाठी काही तरुणींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे बाहेरील उन्हाचा, हवेचा व वातावरणाचा त्यांच्या चेह-यावर लगेच फरक जाणवतो. अशा वेळेस आमरसमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यात २ चमचे पाणी आणि १ चमचा दही टाकून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट तयार करून चेह-यावर व मानेवर हलक्या हाताने लावावी. हा फेस पॅक चेह-यावर जवळपास तीस मिनिटे ठेवावा. अध्र्या तासानंतर चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावा. ताजे मँगो फिल्टर संपूर्ण दिवसभर काम केल्यावर शरीरासोबतच आपला चेहराही थकतो. त्यामुळे चेह-यावर आलेला थकवा घालवण्यासाठी व अकालीन आलेलं वृद्धत्व दूर करण्यासाठी ताज्या मँगो फिल्टरचा वापर करावा. ७-८ अक्रोड किसून त्यात ओटचे जाडे भरडे पीठ २-३ चमचे टाकावे, ३ चमचे मुलतानी माती आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळावे. या सगळ्यांचे योग्य मिश्रण करावे. तयार झालेले मिश्रण चेह-यावर व मानेवर लावून जवळपास तीन तास तरी सुकवावे. चेहरा पूर्णपणे सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावा. जेणेकरून चेह-यावरचा ताण कमी होऊन चेहरा त्राणविरहीत दिसू लागतो. हा उपाय सर्व प्रकारच्या चेह-यासाठी उपयुक्त असून रोज वापर केल्यास चेहरा जास्त खुलून येतो. मँगो बॉडी स्क्रब चेह-यासोबतच बाहेरील वातावरणामुळे शरीरावरही परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होते तसंच त्वचेतील पेशी मृत पावतात. अशा वेळेस एका भांडयात २ चमचे आंब्याचा रस घ्यावा, त्यात २ चमचे दूध आणि एक चमचा साखर घालून मिश्रण तयार करावं. मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण चेह-यावर व शरीरावर लावून घ्यावं. २० ते २५ मिनिटं शरीरावर मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका. साखरेमुळे शरीरावरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे शरीर व चेहरा टवटवीत दिसतो. डागविरहीत त्वचेसाठी आंब्याच्या रसामध्ये हरभ-याचे कूट टाकून त्यात एक चमचा मधाचा टाकावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. चेह-यावर आणि विशेषत: डाग असलेल्या भागावर हे मिश्रण लावावं. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय रोज केल्यास चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ होऊन डागविरहीत होतो. मँगो फेशिअल चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेह-याला तेज आणण्यासाठी मँगो फेशिअल नावाचा प्रकार सध्या पार्लरमध्ये प्रचलित आहे. या फेशिअलमध्ये आंब्याच्या रसामध्ये अंडयातील आतील पिवळा द्रवपदार्थ मिसळावा आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावेय. १५ मिनिटांनंतर थंड पाणी व फेस वॉशने चेहरा धुवून घ्यावा. फेस वॉशने चेह-यावर अंडयामुळे आलेली दरुगधी कमी करता येते. साधारण तरुणी महिन्यातून एकदा तरी फेशिअल करतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात. मँगो फेशिअलमुळे चेहरा निखळ व तेजस्वी दिसतो. |
No comments:
Post a Comment