Tuesday, December 29, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

गाजर

ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरतात. चवीला गोड असून डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं आहे.
ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरतात. चवीला गोड असून डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं आहे. कारण त्यात 'अ' जीवनसत्त्वाचा भरपूर साठा असतो. गाजराच्या देखील अनेक जाती असून भारतात प्रामुख्याने केशरी रंगाचं आढळतं. मात्र काही ठिकाणी ते जांभळं, लाल, पांढरं किंवा पिवळ्या रंगातही आढळतं. लोणचं, कोशिंबीर, हलवा किंवा सलाड अशा विविध रूपात भारतातच नव्हे तर अन्य काही देशांतही खाल्लं जातं. अशा या गाजराचे उपयोग पाहू या.

  •  यात जीवनसत्त्व अ असल्याने दृष्टी सुधारण्याचं काम करते.
  • यातील बिटा कॅरोटिनमुळे शरीरातील पेशींचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुरळीत ठेवला जातो.
  • अँटी ऑक्डिडन्ट म्हणून काम करत असल्याने शरीरातील अनावश्यक फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात.
  • जीवनसत्त्व अ आणि अँटी ऑक्सिडन्टमुळे त्वचा काळवंडण्यापासून बचाव होतो. त्वचा, केस आणि नखांचा कोरडेपणा कमी होतो.
  • अकाली येणारं वार्धक्य कमी होतं.
  • कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यापासून बचाव होतो.
  • याची पेस्ट करून चेह-यावर मास्क म्हणून लावल्यास त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचा तजेलदार दिसू लागते.
  • हृदयरोगापासून बचाव होण्यास मदत होते. आठवडय़ाला सहा गाजर खाणा-यांना अन्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमी होतं.
  • किडनीचं आरोग्य सुधारून शरीरातील नको असलेलं द्रव्य बाहेर टाकण्याचं काम करतं.
  • कच्च गाजर खावं. कारण त्यामुळे दातात अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडून तोंड आणि दातांचंही आरोग्य सुधारतं.

Read More »

योग्य आहाराच्या दिशेने पाऊल

अनेकांसाठी काबरेहायड्रेट्स हा शब्द त्यांच्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणून जातो आणि इतरांसाठी फॅट्स हा शब्द भयावह असतो.

अनेकांसाठी काबरेहायड्रेट्स हा शब्द त्यांच्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणून जातो आणि इतरांसाठी फॅट्स हा शब्द भयावह असतो. असेही काही लोक आहेत, जे जेवणाच्या टेबलवर स्वत:ला अनेक गोष्टींपासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये असतात. या सर्वाना एक वाक्य एकत्र आणते ते म्हणजे – 'मी डाएटवर आहे.'

एॅटकिन्सपासून कार्ब्सपर्यंत, बेयोन्स डाएटपासून ते मास्टर क्लिन्जपर्यंत दरवर्षी अशी काही गोष्ट सेवन करा जी वजन वाढीसाठी 'क्युअर' हा शब्द मनावर परिणाम करेल आणि मग तुम्हाला असे अनेक पर्याय मिळतील. बहुतांश लोक व्यवस्थित आकारमान मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या डाएट्सचे सक्तीने अनुकरण करतात, पण असेही काही लोक आहेत की ते खात असलेले अन्नपदार्थ ट्रेंड्सनुसार आहेत हे त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यांद्वारे दाखवले जाण्याची खात्री करून घेतात. यापैकी काही डाएट्स त्यांचे अनुकरण करणारे कमीत कमी कॅलरी इनटेक सहन करू शकतील अशी अपेक्षा करतात, तर बहुतांश डाएट्समध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त आवश्यक अन्नसमूहांना वगळले जाते आणि जवळपास हे सर्वच डाएट्स दररोज शरीर सहन करेल असे नसतात.

आपण अशा वेगळ्या पिढीतले आहोत, ज्यांना तत्काळ आनंदाची मिळेल अशी जबरदस्त इच्छा बाळगतात आणि जर तसे काही सेकंदांमध्ये घडून आले नाही तर ते लगेच दुसरा पर्याय शोधू लागतात. असे अनेकदा होते की लोक यापैकी एक डाएट सुरू करतात आणि त्यांचे वजन काही तासांमध्येच घटेल अशी त्यांची अपेक्षा असते.

तेच पाऊंड्स जे अनेक महिन्यांच्या असक्रियतेमुळे आणि मेदयुक्त आहारामुळे वाढलेले असतात, त्यांना काही क्षणातच आपण बारीक व्हावं अशी अपेक्षा असते. अशा प्रकारच्या अधिकाधिक अवास्तव असलेल्या अपेक्षांमुळे तुम्ही अशा लोकांमध्ये सहभागी होतात, जे सतत डाएट बदलत राहून सर्वोत्तम डाएटच्या शोधात असतात. ते सर्व घटणा-या किलोंबद्दल ऐकत असतात, पण असे थोडे लोक असतात की शरीराला कष्टदेखील द्यावे लागतात, याची त्यांना जाण असते. इतिहासामध्ये आपले शरीर अतिशय प्रगत स्वरूपाच्या चल प्रयोगशाळांपैकी एक आहे, पण ते अतिशय नाजूक आणि अंशत: समतोलाने बांधलेले असतात. दिवसाअखेर या सर्व घटकांच्या सक्रिय कार्यामुळे आपल्याला जीवन जगण्याची अनुभूती मिळते.

यापैकी एकही महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यक घटक जरी अनुपस्थित असला तरी त्यामुळे दुस-या घटकाच्या अस्तित्वावर मर्यादा येऊ शकते आणि शरीरात कल्लोळ माजतो. अशी काही उदाहरणे आहेत ज्यामध्ये डाएटचे अनुकरण करणारे लोक इ. आरमध्ये परिणामित होतात. कुपोषणाची उदाहरणे, हायपरप्रोटेमियाची उदाहरणे आणि कोणतीही गोष्ट अतिशय कमी प्रमाणात असणेदेखील गंभीर समस्येला कारणीभूत ठरू शकते.

न्यू यॉर्कमधल्या प्रख्यात काडयोलॉजिस्टनी एक विवादात्मक ट्रेंड सुरू केला, ज्यामध्ये ऊर्जेचा स्रोत केवळ फॅट्स आणि प्रोटिन्स असण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या मृत्यूनंतर अशी शिकवण मिळाली की डॉक्टर स्वत: ७३ वर्षापर्यंत हृदयरोगाने अ‍ॅटॅकने पीडित होते. अशा प्रकारचा ढोंगीपणा या ट्रेंड्समध्ये अनेकदा पाहायला मिळतो.

काही वर्षापूर्वी सिरीयल डाएटर्सवर अभ्यास घेण्यात आला असून या वास्तविकतेला अधोरेखीत करण्यात आले. सहभाग्यांना असा सबळ विश्वास होता आणि जास्तीत जास्त शक्यता होती की या डाएट्सचे अनुसरण करणे जास्त असते जर ते अधिक क्रांतिकारी असतील. अशा अभ्यासातून असा रोचक अनुमान काढण्यात आला की काही लोक अशा प्रकारच्या डाएट्सचे अतिप्रमाणात अनुसरून स्वत:ला शिक्षा करून घेतात आणि स्थूलपणावर पस्तावतात. मानवी शरीर आणि सौष्ठव दोन्ही बाबी एकमेकांशी अतिशय जवळून निगडित असतात आणि त्यांचे एकमेकांवर अतिशय खोलवर परिणाम होतात.

तुमच्यासाठी काय चांगले आहे हे जाणून घेण्याची सर्वात उत्तम पद्धत म्हणजे तुमच्या शरीराशी संवाद साधणे होय. प्रत्येक पेशी तुमच्याशी संवाद साधते; तुम्ही ते ऐकणे महत्त्वाचे आहे. एक आदर्श डाएट तुमच्या सर्व अन्नगटांची माफक प्रमाणात शाश्वती देतो. त्यात ताजे अन्नपदार्थ असतात आणि ते पॅकेज स्वरूपात असावेत अशी आवश्यकता नसते. म्हणजे हा आहार घेतल्यावर तुम्ही समाधानाने झोपी जाणं तुमच्या हितासाठी योग्य आहे. त्यामुळे पुढे जेव्हा तुम्ही स्वत:वर एखादे जेवणाचे नियोजन लादाल तेव्हा तुम्ही पुढच्या फसव्या दिवसांबद्दल विचार करा, जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही आहारातून बाहेर पडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची हिच वेळ आहे.

Read More »

मॅग्नेशिअमची आवश्यकता

आपल्या शरीराचा विविध आजारापासून बचाव करण्यासाठी मग्नेशिअम या खनिजाची आवश्यकता असते. म्हणूनच शरीराच्या जडणघडणीत मॅग्नेशिअमचं महत्त्व अधिक आहे. ते कोणत्या पदार्थातून मिळू शकतं. हे जाणून घेऊ या.

 आपण नेहमी म्हणतो की आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषणमूल्यांची आवश्यकता असते. त्यातही शरीराला भरपूर प्रमाणात मिनरल्स अर्थात खनिजांची अवाश्यकता असते. या खनिजांपैकी मग्नेशिअम हे महत्त्वाचं खनिज होय. हे आपल्या शरीराला का महत्त्वाचं आहे तसंच ते आपल्याला कोणत्या पदार्थामधून मिळेल हे पाहू या.

काही पदार्थाचा तुम्ही तुमच्या आहारात नियमित समावेश केल्यास तुम्हाला आपोआप मॅग्नेशिअम मिळू शकतं. केवळ मॅग्नेशिअम मिळवण्यासाठी वेगळं काही घ्यायची जरूरतही लागत नाही.

दही

यात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचा उत्तम स्रेत असतो.

केळं

यात पोटॅशिअमच्या सोबत मॅग्नेशिअमचादेखील भरपूर स्रेत असतो. आपली पाचक शक्ती मजबूत करण्याचं काम केळं करतं. याचबरोबर स्मरणशक्ती वाढवण्याचं कामही ते करतं.

सीताफळाच्या बिया

या बियांमध्ये याचा भरपूर स्रेत असतो. या बिया उन्हात वाळवून त्याला तेल आणि मीठ लावून भाजून घ्या आणि ते नियमित सेवन करा. शिराला आवश्यक असणारं मॅग्नेशिअम तुम्हाला यातून मिळेल.

बदाम

सगळ्यात उत्तम स्रोत म्हणजे बदामच म्हणावं लागेल. पाण्यात भिजवलेले पाच बदाम दररोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. त्याचप्रमाणे चेतासंस्था सुधारते. जेणेकरून चेतासंस्थेचे संबंधित आजरापासून बचाव होतो.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये लोह असतं हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याचबरोबर मॅग्नेशिअमदेखील भरपूर प्रमाणात मिळतं. शरीराला आवश्यक असणा-या हिमोग्लोबिनमध्ये वाढ करण्याचं काम करतं. त्याचबरोबर स्नायूंनादेखील मजबूत करण्यात मदत करतं.

कडधान्य

न्याहारीत मोड आलेले मूग आणि चणे खाल्ले तर शरीराचा मेटाबोलिजम सुधारतो.

फायदे काय आहेत?

कॅल्शिअमप्रमाणेच हे एक क्षार आहे. नुकत्याच केलेल्या सव्‍‌र्हेक्षणानुसार असम सिद्ध झालं आहे की शरीरात असलेल्या एन्झाइमबरोबर मिसळून ग्लुकोज करण्याचं काम करतं. इन्सुलिन करण्याच्या प्रक्रियेतही दुरुस्त करतं. मॅग्नेशिअमचा स्रेत असलेल्या पदार्थाचं सेवन केल्यामुळे टाईप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो.

जेणेकरून स्मरणशक्ती मजबूत होते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, हृदयविकार, ताण, माइग्रेन आणि अथ्र्रायटिससारख्या विविध समस्यांपासूनही बचाव करण्यास साहाय्य मिळते. त्याचप्रमाणे कॅल्शिअमसोबत राहिल्याने हाडांची मजबुतीही होते. गरोदर स्त्रियांसाठी हे आवश्यक आहे, कारण यामुळे बाळाची वाढ उत्तम होते.

अतिरेक नकोच

अति तेथे माती म्हणतात हे अगदी बरोबर आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाइट असतो. त्याचप्रमाणे या पदार्थाचंदेखील म्हणता येईल. हे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. कारण याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे कमी रक्तदाब, डायरियासारखे आजार होऊ शकतात.

मात्र नैसर्गिक प्रमाणात जितकं सेवन कराल तितकं अधिक चांगलं असतं. वर सांगितलेल्या पदार्थाचं सेव्हन केल्यास तुम्हाला नैसर्गिकपणे मॅग्नेशिअम मिळतं. मात्र त्याचा अतिरेक अजिबात करू नका. मुळात तुम्हाला कोणते आजारा किंवा समस्या असतील तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment