Tuesday, October 6, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

तापदायक वातावरणात राहा फिट

दिवसा कडक ऊन आणि रात्री धो धो पाऊस असं काहीसं वातावरण सध्या मुंबईकर अनुभवत आहेत. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. अशा वेळी आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. या ऑक्टोबर हिटमध्ये स्वत:ला फिट ठेवण्यासाठी या काही टिप्स

सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसा कडकडीत ऊन आणि विजा चमकून आणि ढग गडगडून पडणारा धो धो पाऊस.. असं काहीसं वातावरण मुंबईकर अनुभवत आहेत. खरं म्हणजे ऑक्टोबर हिट जाणवायला लागली आहे आणि त्यात संध्याकाळी पाऊस पडायला लागल्यामुळे मुंबईकरांची अक्षरश: दैना उडत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजारही डोकं वर काढत आहेत.

दिवसभर कडक ऊन आणि त्यात पावसाचं घुंगट त्यामुळे वातावरणात अधिकच गुदमरायला होतं. घामाच्या धारा वाहत आहेत. अति प्रमाणात घाम आल्यामुळे चक्कर येण्याचं प्रमाण वाढतंय. आपण वातावरण काही बदलू शकत नाही; मात्र या बदललेल्या वातावरणात आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी आरोग्य टिकवण्याचा मात्र प्रयत्न करू शकतो. कसं ते पाहू या.

रखरखत्या उन्हामुळे शरीरातील ग्लुकोज, व्हिटॅमिन कमी होतं. शिवाय अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीराला वातावरणाशी जुळवून घ्यायला लागतं. असं जुळवून घेत असतानाच आजारी पडायला होतं. म्हणूनच हे सगळं टाळण्यासाठी आणि अशा वातावरणात शरीराला फिट ठेवण्यासाठी काय करता येईल म्हणजे या ऑक्टोबर हिटचा त्रास काहीसा कमी होईल हे जाणून घेऊ या.

अति उष्णतेमुळे काय होतं?

»  त्वचा काळवंडते

»  स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात.

»  सतत अशक्तपणा जाणवतो किंवा थकवा येतो.

»  डोकं कलकलल्यासारखं होतं. गोंधळ उडतो.

»  डोकेदुखी

»  मळमळणे किंवा उलटी होणे

»  चक्कर येणे

अशा वेळी नेमकं काय करावं?

»  घामावाटे शरीराबाहेर जाणारं पाणी टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. त्यासाठी तहान लागण्याची वाट पाहात बसू नका. मुळात आजारी असाल किंवा तुमच्या काही गोळया सुरू असतील तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

»  बाहेर जाताना किंवा घरातही शक्यतो घट्ट कपडे घालणं टाळावं. सैल, वजनाने आणि रंगाने हलके कपडे वापरावेत.

»  उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढते. घामाच्या धारा वाहून शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून ग्लुकॉन-डी, इलेक्ट्रोल पावडरचं पाणी सोबत ठेवावं. म्हणजे शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते.

»  अशा वेळी चक्कर येणे, नाकातून रक्त येणे असे विकार होतात. म्हणूनच ज्यांना हा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने या विकारांवर पटकन बरं वाटेल अशी औषधं सोबत ठेवावीत.

»  शरीरातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. तेव्हा सोबत साखरेची पुडी ठेवावी.

»  दिवसभर घामाच्या धारांमुळे शरीर अगदी चिकट होऊन जातं. अशा वेळी रात्री झोपताना कोमट पाण्याने अंघोळ करावी म्हणजे फ्रेश वाटतं. शिवाय घामामुळे येणारा थकवा कमी होतो. शरीराची दरुगधी कमी होते.

»  स्कीनची काळजी अधिक घ्यावी लागते. एसपीएफ असलेल्याच क्रीम वापराव्यात. अन्यथा त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

»  गाडीने प्रवास करत असाल तर गाडी पार्क करताना सावलीत पार्क करावी. कारण गडद रंग आणि इंजिनमुळे गाडी लवकर तापते आणि पुन्हा प्रवास करायला लागलो की त्याचा त्रास अधिक होतो. उन्हात पार्क केलेल्या गाडीत लहान मुलांना अजिबात ठेवू नका.

»  अल्कोहोल किंवा साखरेचं अतिरिक्त प्रमाण असलेली अन्य प्रकारची शीतपेयं शक्यतो टाळणंच योग्य ठरेल.

»  ताप आलेल्यांना थंड पाण्याच्या फडक्याने पुसून काढावं म्हणजे ताप लवकर उतरायला मदतच होईल.

»  या दिवसांत अगदी लहान बाळं, लहान मुलं आणि वयोवृद्ध मंडळींची विशेष काळजी घ्यावी.

»  शक्यतो थंड ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे घरात फॅनखालीच बसावं. बाहेर जाणं आवश्यक असेल तर एसी असलेल्या ठिकाणी म्हणजे शॉपिंग मॉलमध्ये जावं. म्हणजे काही वेळ का होईना पण शरीराला थंडावा मिळतो.

»  घरात दुपारच्या वेळेला ऊन येत असेल तर खिडकीला पडदे लावावेत. म्हणजे हे ऊन आत येणार नाही. पडदे फिक्या रंगाचे, मात्र सुती आणि काहीसे जाड असावेत. मात्र पारदर्शक असू नयेत, कारण अशा पडद्यांमधून ऊन परावर्तीत होऊ शकतं.

»  संत्र, कलिंगड, मोसंबी, पेर अशी पाणीदार फळं सेवन करावीत.

»  दुचाकीवरून प्रवास करणार असाल तर चेहरा आणि केस स्कार्फने झाकावा.

»  डोळ्यांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करावा. शक्य असल्यास छत्रीचाही वापर करावा.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी..

»  अशा वेळी त्या माणसाला प्रथम उन्हातून सावलीत आणावं. शक्य असल्यास अशा व्यक्तींना एअर कंडिशनमध्ये ठेवावं.
सर्वप्रथम त्या माणसाला पाणी प्यायला द्यावं.

»  त्याच्या गळ्याला खांद्यावर बर्फ चोळावा. म्हणजे रक्ताभिसरण सुरळीत होते.

»  जाड कपडे घातले असतील तर ते कमी करावेत.

» अंगावर थंड पाणी ओतावं. शक्य असल्यास बाथ टबमध्ये बसवावं.

Read More »

पाचक दुधी भोपळा

हीदेखील तांबडया भोपळ्याप्रमाणे वेल वर्गातील वनस्पती असून हिचं शास्त्रीय नाव लजेनरिया सिसररिया असं आहे. इंग्रजीत 'कालाबॅश' किंवा 'बॉटल गूर्ड', हिंदीत 'लौकी' तर मराठीत 'दुधी भोपळा' असं म्हणतात.

हीदेखील तांबडया भोपळ्याप्रमाणे वेल वर्गातील वनस्पती असून हिचं शास्त्रीय नाव लजेनरिया सिसररिया असं आहे. इंग्रजीत 'कालाबॅश' किंवा 'बॉटल गूर्ड', हिंदीत 'लौकी' तर मराठीत 'दुधी भोपळा' असं म्हणतात. वेलीला दंडगोलाकार फळं लगडतात. ही फळ दुधट हिरव्या सालीची आणि आतून पांढ-या तंतुमय गराची असतात. यात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, खनिजं, तसंच 'क' जीवनसत्त्व असतात. म्हणूनच याला औषधी महत्त्व प्राप्त झालं आहे.

अन्नपदार्थाप्रमाणेच दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी तसंच अन्य काही वस्तू तयार करण्यासाठीही केला जातो.

»  आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दुधी भोपळ्याचा ९० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो. त्यामुळे हा उत्तम पाचक ठरतो.
मूत्राशयाचे सगळे विकार दूर करण्यास मदत करते. त्यामुळे लघवी होताना होणारी जळजळ होत नाही. जळजळ होत असल्यास ताज्या दुधीच्या रसात चमचाभर लिंबाचा रस घालून प्यायल्यास लघवीच्या वेळी होणारी जळजळ कमी होते.

»  नियमित ज्युस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

»  उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते, त्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं.

»  मधुमेहीच्या रुग्णांना लागणारी अतिरिक्त तहान कमी करण्यास मदत करतं.

»  बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. पोटातील वात कमी करण्यास मदत करते.

»  या भाजीचा आहारात नियमित समावेश केल्याने अकाली केस पांढरे होत नाहीत. सकाळी अनशापोटी नियमित ज्युस प्यायलाने लवकर असर पडतो.

»  दुधीच्या ज्युसमध्ये चिमूटभर मीठ घातल्याने शरीराचा इलेक्ट्रोलेट संतुलन राखायला मदत होते. अतिसारावरही हे उत्तम औषध आहे.

»  यकृत किंवा किडणीला सूज आल्यास डॉक्टर ही भाजी खाण्याचा सल्ला देतात. कारण सूजेवर ही भाजी रामबाण औषध आहे.

»  प्रकृतीच्या बारीक-सारीक तक्रारीही दुधीचा ज्युस प्यायल्याने कमी होतात.

»  तिळाचं तेल दुधीच्या रसात घालून प्यायल्याने निद्रानाशाचा त्रास कमी होतो.

विशेष टीप : अस्थमा, दमा,सर्दी असलेल्या रुग्णांनी ही भाजी खाऊ नये.

Read More »

मानसिक रुग्णांना स्पर्शाचा आधार

कित्येक आजार स्पर्शाने बरे होतात, असं म्हटलं जातं. मनोरुग्णांचंही तसंच आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अशा व्यक्तींकडे सतत लक्ष देणं शक्य नसतं. कित्येकदा अशा रुग्णांना रुक्ष वागणूक दिली जाते. पण त्यांना तुम्हीही सर्वसामान्य माणसांप्रमाणे आहात ही जाणीव केवळ स्पर्शच देतो. १० ऑक्टोबर या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक रुग्णांना आधार देणा-या स्पर्शाविषयी..

आपण आपल्या आसपास कित्येक मानसिक रुग्णांना पाहतो, ज्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता निर्माण झाल्यामुळे ते या अवस्थेला बळी पडत आहेत. मात्र सतत वाढत जाणा-या स्पर्धेमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसते आहे. मानसिक रुग्णांना सांभाळून त्यांचे इलाज करणं हे खरं तर आव्हानात्मक काम आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्यासाठी औषधांपेक्षाही अधिक गरज असते ती स्पर्शाची किंवा आश्वासनाची. कित्येक रुग्ण हे आलेल्या परिस्थितीमुळे रुग्ण होतात.

ज्यांना परिस्थितीशी सामना करता येत नाही असेच रुग्ण मानसिक अवस्थेची शिकार होतात. भावना आणि भावनाशून्यता असणं हे मानसिक रुग्ण होण्याचं मूळ कारण असतं. त्यांना वेळच्या वेळी औषधं किंवा त्यांच्याशी संवाद साधला नाही अथवा त्यांना योग्य वेळी मानसिक आधार मिळाला नाही तर त्यांचं मानसिक आरोग्य ढासळतं. त्यांच्याशी सतत संवाद साधल्यावरच ते या अवस्थेतून बाहेर पडून पूर्णपणे बरे होतात.

मानवी जीवनात स्पर्श ही भावना अधिक महत्त्वपूर्ण आहे. कित्येक आजार केवळ स्पर्शाने बरे होतात असं म्हटलं जातं ते काही उगीच नाही. याचं कारण म्हणजे शरीराचा बराचसा भाग हा त्वचेने व्यापलेला आहेत. या त्वचेमुळे स्पर्शाचं ज्ञान माणसाला होत जातं.

स्पर्श हा भावनिक आणि मानसिक देवाण-घेवाणाचं मुख्य साधन आहे. म्हणूनच या स्पर्शाचा वापर चिकित्सेत किंवा तपासणीत केला जातो. नेत्रहीन, बधिर, मूक इतकंच नाही तर अपंग असलेल्या व्यक्तीही या स्पर्शामुळेच त्यांचं जीवन आरामात व्यतीत करतात. म्हणूनच स्पर्श हा रुग्णाचं सर्वाधिक माध्यम असतं. जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिला स्पर्श बाळाला आपल्या आईचा होतो. या स्पर्शाच्या जोरावरच त्या बाळाला पुढील जीवनात संघर्ष करण्याची शक्ती मिळते.

ज्यांच्याकडे शब्द नाहीत असे प्राणीदेखील आपल्या भावभावना स्पर्शातून व्यक्त करतात. स्पर्शामधून संवेदनांची देवाण-घेवाण अधिक वेगाने होते, तितक्या अन्य कोणत्याही माध्यमातून ती होत नाही. मानसिक रुग्णांचंही तसंच असतं. मुळातच अशा व्यक्तींसोबत लोक काहीसे रुक्षपणे वागतात. त्यांच्यासोबत कोणाला बसायला, बोलायला वेळ नसतो.

प्रत्येक जण आपल्या बिझी शेडय़ुलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे हा त्यांचा दोष आहे असं म्हणता येत नाही. कारण रोजच्या व्यापामुळे त्यांनाही अधिकाधिक वेळ मानसिक रुग्णांना देणं शक्य नसतं. अशा वेळी त्यांना सांभाळणं मोठं कठीण काम वाटतं. म्हणूनच अशा रुग्णांना आपण त्यांच्यासोबत आहोत, त्यांची आपल्याला काळजी आहे, हे जर स्पर्शातून तुम्ही जाणवून दिलं तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल.

मानसिक रुग्णांना समजवण्यापेक्षा स्पर्शाची भाषा अधिक कळते. कारण स्पर्शातून त्यांना आत्मविश्वास मिळतो, याचबरोबर त्यांच्यात प्रेम, आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. इतकंच नाही तर तुम्हीदेखील सर्वसामान्य माणसांप्रमाणेच आहात ही भावना त्यांच्या मनात रुजवायला हा स्पर्शच कारणीभूत ठरतो.

अर्थात, त्यांना दिली जाणारी औषधं त्यांच्या मेंदूच्या आरोग्यावर निश्चितच रासायनिक प्रक्रिया करून त्यांना बरं होण्यास मदत करतात यात काही शंका नाही, मात्र अशा रुग्णांना जो आत्मविश्वास देण्याची गरज असते तो आत्मविश्वास त्यांना या स्पर्शातूनच देता येतो किंवा आपण असं म्हणू शकतो की औषधांमुळे आपण त्यांच्या लक्षणांवर नियंत्रण आणू शकतो, मात्र मनस्थितीवर नियंत्रण आणणं शक्य होत नाही.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment